लेखमाला स्पर्धा फ़ेब्रुवारी २०११--मराठीसाठी कोपरा

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
arvind
Rgistered member
Rgistered member
Posts: 9
Joined: 17 Nov 2010 17:36
नाव: Arvind
आडनाव: Khanolkar

लेखमाला स्पर्धा फ़ेब्रुवारी २०११--मराठीसाठी कोपरा

Postby arvind » 20 Feb 2011 12:22

मराठी कोर्नरला कोपरांपासून नमस्कार. आदराने हो. पण आपण मराठीला कोप-यांत बसवली म्हणून आपल्यावर राग धरावा की मराठीला महाजालात एक कोपरा तरी ठेवला म्हणून आपलेच अभिनन्दन करावे, हेच कळत नाही. मराठीला ह्र्दयांत कोपरा द्यावा की मराठीला डोक्यावर घ्यावी, हा ही सवाल अजून ह्रदयाला आणि डोक्यालाही सतावतोय. तस कोप-याच महत्व काही कमी नसतं हे मला ठाऊक आहे. आमच्या अस्सल मराठी हुतुतूतही कोपरा महत्वाचा असतो आणि विदेशी होकी आणि फ़ूटबोलमध्येही कोपरा मिळवण ही मोलाची गोष्ट आहे. पण माय मराठी रूसली आणि कोप-य़ात बसली असं कोणी म्हणू नये, ही प्रामाणिक ईच्छा. फ़ेसबुकपासून ट्विटरपर्यंत कानाकोपर-यात मराठीचा संचार व्हावा
आणि तीने दाही दिशांना आपला झेंडा फडकवावा अशीही मनीषा. पण फ़क्त ईच्छेने काय होणार? दरवर्षी अनेक मराठी शाळांचे मराठी शाळांचे मराठी माद्यमाचे वर्ग बंद होतात व तिथे इंग्रजी वर्ग सूरू होतात. मराठीतून कोणत्याही विषयाच पूर्ण शिक्षण मराठीत घ्यायच तर मराठीत त्या विषयांवरची पुस्तके आहेत कां? घरात आपण देवाला एक कोपरा देतो आणि मग दिवसातून एकदा नमस्कारही करतो, क्वचित आरतीही करतो. मराठीसाठी राखीव कोप-याच तेच हॊणार नाही ह्याची आपण काळजी घेऊया. यांत कोणाला कोपरखळ्या
नाहीत हो.
आपला,
कोपरकर

लेखक:- अरविंद खानोलकर
Last edited by arvind on 07 Mar 2011 17:13, edited 1 time in total.


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: लेखमाला स्पर्धा फ़ेब्रुवारी २०११--मराठीसाठी कोपरा

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:14

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 4 users online :: 0 registered, 0 hidden and 4 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 633
Our newest member memarathi
No birthdays today