लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ - आमचा बैल भरल्या जाणार आहे

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
koyote
Posts: 2
Joined: 16 Jan 2011 11:10
नाव: Vishwas
आडनाव: Bhagwat

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ - आमचा बैल भरल्या जाणार आहे

Postby koyote » 19 Feb 2011 10:45

त्याचं काय आहे, काही महीन्यांपासून आमची अक्कलदाढ उगवायला सुरूवात झाली. (दाढ आणि दाढी ह्यांच्यात हे एक साम्य की ह्या उगवतात !) आता ही नेमकी वाढली तिरपी, तिही अशी की जबडा हलला की गाल चावल्या जावा....!! (स्वत:चाच आणि आतमधून....) ;)

आमचा जबडा हा ...जरा लहान आहे (नाव जरी ''विश्वास’’ असले तरी ’खाण्याची ’सवय नसल्याने असे असावे....), त्यामुळे दाढेला नीट वाढता आलं नाही, असं दातांचे डॉक्टर म्हणाले। :-o

आता ही अक्कलदाढ ’अक्कल ’आल्यावर येते म्हणे. आम्ही आधीच दीडशहाणे ! त्यात परत वाढीव अक्कल येणार, म्हणजे आहे की नाही आता... त्यामुळे आम्ही झालो ’अतिशहाणे’. ( आमच्या नातेवाईकांच्या मते आम्ही ’अतिशहाणपणात आगाऊच" आहोत, आधीपासूनच...) :|

"अतिशहाणा त्याचा बैल रिकामा !" ह्या उक्तीप्रमाणे आमचाही बैल गेल्या काही महीन्यांपासून रिकामा होत आलेला आहे. L-)

नेहमी आम्ही स्वत:च दात काढत असलो तरीही आता डॉक्टरांकडून दात काढून घेणार आहोत। एकदाची अक्कलदाढ काढल्या गेली की वाढीव अक्कल जाऊन, शहाणपणा कमी होऊन, आम्ही फ़क्त शहाणेच उरणार आहोत. ;)

सबब, आमचा बैल भरल्या जाणार आहे ! (...आणि आम्हांला कोर्टाच्या पायऱ्याही चढता येणार नाहीत...!) :P

ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे, उद्या त्या दंतवैद्याने दात नीट काढून द्यावा...!
( नाहीतर आम्ही फ़ी पोटी पैसे घालून आणखी शहाणपणा विकत घेतल्यासारखे होईल आणि आमचा बैल आणखी रिकामा !!) :( (-|



विश्वास भागवत
Vishwas Bhagwat
Last edited by koyote on 02 Mar 2011 12:39, edited 2 times in total.


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ - आमचा बैल भरल्या जाणार

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:14

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 633
Our newest member memarathi
No birthdays today