लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

येथे स्पर्धतिल विजेते स्वतःचे मनोगत व्यक्त करतील!
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

Postby admin » 20 Mar 2011 19:27

नमस्कार,
आज "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा निकाल घोषित करताना मनापासून आनंद होत आहे. २२ ऑक्टोबर,२०१० ला मराठी कॉर्नरचे उद्घाटन झाले आणि केवळ ४ महिन्यांत मराठी कॉर्नरच्या सभासदांची संख्या १८० हुन अधिक झाली. ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. कारण केवळ इतक्या कमी वेळेत एवढी लोकप्रियता लाभणे आम्ही भाग्याचे समजतो. आपल्या कविता आणि चारोळी विभागाचे संचालक/मॉडरेटर श्री. आमोल देशमुख यांनी मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा भरवावी असा आग्रह धरला. प्रथम थोडी चिंता वाटली की खरच कितपत यशस्वी ठरेल मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा ? तरिही त्यावर विचार करून, मराठी कॉर्नर टिमशी चर्चा करून "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चे आयोजन करण्यात आले. आणि गर्वाने सांगावेसे वाटते की आपल्या सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे.

मराठी कॉर्नरवरिल ही पहिलीच स्पर्धा होती पण तरिही जसा उत्तम प्रतिसाद लाभला आहे त्यावरून आम्ही आपल्याला खात्री देतो कि यापुढे वरचेवर अशा स्पर्धा नक्की आयोजित करू.आपला उत्स्फुर्त प्रतिसाद असाच मिळो ही देवा चरणी प्रार्थना.

सर्वप्रथम निकाल जाहिर करण्याआधी आपल्या मान्यवर परिक्षकांचे आम्ही आभार मानतो. या स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी आम्हाला श्री.श्रीकृष्ण सामंतजी, श्री. उल्हास भिडेजी व सौ. पल्लवी कुलकर्णीजी यांनी त्यांच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढला त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.

सर्व सभासदांनी खुपच छान लेख लिहुन पाठवले आहेत.विषयाची विविधता बघुन खुप छान वाटले.आपल्यातुन फ़क्त एकच लेख निवडणे तसे परिक्षकांची ही खरी परिक्षा होती असे म्हणावे लागेल.दिलेला पहिला नंबर जरी एकाला दिला गेला असला तरी खरे तर सारेच विजयी आहेत.कारण आपण यात सहभाग घेतलात आणि आपल्या मराठी कॉर्नरची शान वाढवलीत.तिला योग्य तो सन्मान दिलात,ह्यातच सर्व सभासदांचे यश सामावले आहेत.आम्हालाही खुप विचार वाचायला मिळाले.आपण सर्वांनीही सर्वांचे लेख वाचुन त्यावर प्रतिक्रीया लिहावी,कारण आपल्या लेखाला काय प्रतिक्रीया आली हे बघणे लेखकाला नक्कीच प्रोत्साहित करते."लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा थोडक्यात सारांश
एकूण सहभागी झालेले लेख : २०

1. संजयचा खून आणि…(कमलेश कुलकर्णी)
2 महिमा अंगठीचा (चेतन सुभाष गुगळे)
3 पिंपातले जगणे आहे आपले (शैलेंद्र शिरके)
4 तुझ्यामुळे .........तुझ्यामुळे (सौ. निवेदिता वाळिंबे.)
5 आमचा बैल भरल्या जाणार आहे (विश्वास भागवत )
6 एअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता साठी.(मा. ना . बासरकर. )
7 मराठीसाठी कोपरा ( अरविंद खानोलकर)
8 शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल (प्रकाश पोळ)
9 पूर्वी आणि आता (Kedar Dipak Lasane)
10 द लास्ट किस !(दीपक परुळेकर)
11 गंधवार्ता.....! (गंगाधर मुटे)
12 २६/११ च्या निमित्ताने..................................(Nivedita Patil)
13 ओळख --- ' स्व ' ची जाणीव (सौ.बागेश्री प्रशांत येवारे)
14 स्त्री जन्मा.... (प्रमोद सावंत)
15 मानपान (Jayant Aloni)
16 आपली मराठी (Shraddha Hegiste)
17 लेखमाला स्पर्धा - "असेल रंभा घायाळकर...... पण नाद नाय करायचा (धुंद रवी)
18 विकेट (सागर कोकणे)
19 वसुधालय... माझे साहस! (वसुधा चिवटे)
20 माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत (कमलेश वसंत गायकवाड)

[center]आणि विजेता लेख आहे[/center]

श्री.चेतन सुभाष गुगळे यांचा [blink]महिमा अंगठीचा[/blink]

पुन्हा लवकरच नवीन उपक्रमा बद्दल नक्की कळवु.आपल्याही सुचनांचे http://www.marathicorner.com/viewforum.php?f=7 इथे स्वागत आहे.
श्री.चेतन गुगळे यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! त्यांना त्यांचे बक्षिस लवकरच पोच होइल.


पुन:श्च एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आभार!!!!

कळावे,
मराठी कॉर्नर टिम.


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

Postby आपली मराठी » 21 Mar 2011 10:58

लेखन स्पर्धेतील विजेते श्री.चेतन गुगळे यांचे मनापासुन अभिनंदन, इतरही लेख खुप चांगले आहेत सहभागी लेखकांचेही अभिनंदन !!


gangadharmute
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 25 Nov 2010 19:39
नाव: Gangadhar
आडनाव: Mute

Re: लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

Postby gangadharmute » 21 Mar 2011 13:02

लेखन स्पर्धेतील विजेते श्री.चेतन गुगळे यांचे अभिनंदन
आणि
सर्व परिक्षकांना धन्यवाद.


गंगाधर मुटे
आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
nivedita
Rgistered member
Rgistered member
Posts: 28
Joined: 22 Oct 2010 22:56
नाव: निवेदिता
आडनाव: वाळिंबे

Re: लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

Postby nivedita » 24 Mar 2011 20:46

लेखन स्पर्धेतील विजेते श्री.चेतन गुगळे यांचे मनापासुन अभिनंदन,
:) इतरही लेख खुप चांगले आहेत सहभागी लेखकांचेही अभिनंदन
!!


Return to “स्पर्धेतिल विजेते”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 15 users online :: 0 registered, 0 hidden and 15 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1804
Total topics 1437
Total members 638
Our newest member maharashtrianamit
No birthdays today