आपल्याला येणा-या मिस कॉल साठी सावधगिरीच्या टीपस्‌........

इथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.
pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

आपल्याला येणा-या मिस कॉल साठी सावधगिरीच्या टीपस्‌........

Postby pallavi kulkarni » 28 Nov 2011 21:07

वाचक सभासदंनो...
आपल्याला पुढील प्रश्न पडले असतील कदाचित...
हे मिस्डcall कशासाठी?
आज पहाटे ४ च्या सुमारास मोबाईल वर क्षणभर रिंग वाजली आणि थांबली. पुन्हा ६ च्या सुमारासही रिंग वाजल्यासारखी वाटली म्हणून बघे पर्यंत थांबली. नीट जागी झाल्यावर पाहिले तर +२३२ २२२९०२२४ अणि +२३२ २२२९०२६५ या अनोळखी नंबर वरून मिस्डcall.

अवेळी आलेले आणि परदेशी अनोळखी नंबर असल्यानते call घेतले नाही आणि परत त्याना फ़ोन केलेही नाहीत. नुकताच सकाळ मध्येअनोळखी "मिस कॉल' आलाय? सावधान!http://www.esakal.com/esakal/20111123/4873068067595902938.htm हे वाचल्याने जास्त सावध होते.

आंतरजालावर शोध घेतल्यावर अनेक लोकाना यानंबरवरून फ़ोन आल्याचे समजले.

असे फ़ोन येण्याचे कारण काय असावे?हा फ़क्त खोड्साळपणा का अजून काही?
तुम्हाला कोणाला असे काही call आले आहेत का?

चुकून कोणी असे call घेतले आणि काही फ़सवणूक , गड्बड आहे असे लक्षात आले तर काय कारायचे असते?


अशा प्रकारे आलेल्या मिस कॉल विषयी.....

हा प्रकार म्हणजे एक प्रकारचे स्कॅम आहे. हा प्रकार 'Sierra Leone scamm' म्हणून ओळखला जातो. शक्यतो मिसकॉल आल्यावरती त्यावर लगेच कॉलबॅक करण्याची सवय असलेले लोक ह्या स्कॅम मध्ये सापडतात. अर्थात भारतातच नाही तर अनेक देशातल्या लोकांना ह्या प्रकारे गंडा घातला गेला आहे आणि घातला जात आहे. गंमत अशी आहे की ह्या नंबर्सवरून आलेला फोन तुम्ही उचललात (रिसिव्ह केलात) तरी तुमचे पैसे कट होतात, कारण हे कॉल्स प्रिमियम लाईन वरून केलेले असतात.

ह्याचाच अजून एक प्रकार म्हणजे ह्या नंबरवरून तुम्हाला लॉटरी जिंकल्याचे, तुमचे एखादे पार्सल आल्याचे निरोप देणारे एसएमएस देखील येतात. तुम्ही हा एसएमएस डिलीट करायचा प्रयत्न केलात रे केलात की आपोआप प्रिमियम लाईनचा नंबर डायला व्हायला लागतो.

शक्यतो ऑनलाईन शॉपींग, फ्री एसएमएस सोयी पुरवणार्‍या वेबसाइटस, तुमचा फोन नंबर द्यायलाच लागतो अशा नविन चालू झालेल्या वेबसाइटस इत्यादी ठिकाणी आपला नंबर देणे टाळावे. फेसबुक, ऑर्कूट इत्यादी ठिकाणी सुद्धा आपला नंबर इन्व्हिजिबल आहे ह्याची काळजी घ्यावी. शक्यतो फार्मव्हिले, सिटीव्हिले, माफिया वॉर्स असे फेसबुक गेम्स खेळणारे आपल्या लिस्ट मध्ये अनेक अनोळखी मित्र अ‍ॅड करत असतात, त्यांनी तर विशेष काळजी घ्यावी.

सर्वात महत्वाचे म्हणजे असा कुठलाही संशयास्पद कॉल आल्यास ताबडतोब आपल्या सर्विस प्रोव्हाईडरकडे तक्रार नोंदवून त्या तक्रारीचा नंबर घेऊन ठेवावा. पुढे मागे पैसे कट झाल्यास, काही इतर फसवणूक झाल्यास हा नंबर अतिशय उपयोगी पडतो. .
-----

आपल्याला ही काही सुचवायचे असेल तर जरुर माहिती द्या....स्वागत आहे..


सौ.पल्लवी

Return to “Announcement | जाहीर खबर”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 7 users online :: 0 registered, 0 hidden and 7 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1804
Total topics 1437
Total members 638
Our newest member maharashtrianamit
No birthdays today