नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

इथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby admin » 10 Apr 2011 13:08

नमस्कार मंडळी,
मागिल मेल मध्ये म्हटल्याप्रमाणे, नेहेमी मराठी कॉर्नरच्या सभासदांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी मराठी कॉर्नर टिम नेहमीच प्रयत्न करित असते!
गेल्या बर्‍याच दिवसांपासून मराठी कॉर्नरच्या सभासदांना मराठी डायरेक्ट लिहिता यावे यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करित होतो आणि आज या प्रयत्नांना यश मिळाले आहे! मराठी लेखनासाठी एकमेव पर्याय असलेल्या "बराहा"नेही आता सामान्यांना न परवडेल अशी किंमत त्यांच्या सॉफ्टवेअरला लावली आहे आणि त्यामुळे नक्कीच मराठी कॉर्नरवर मराठी लिखाणाची गैरसोय जाणवू लागली होती! पण आता नाही! :) कारण आजपासून तुम्ही मराठी कॉर्नरवर कधिही, कोठूनही मराठी लिहू शकता आणि तेही "कोणत्याही बाह्य सॉफ्टवेअर" शिवाय!

मग आहे की नाही भारी सोय??? मग करताय ना मराठी कॉर्नरवर लिखाणाला सुरूवात? होताय ना मराठी कॉर्नरवर active? एकवेळ ही सुविधा वापरून पाहाच आणि कोणताही प्रॉब्लेम आलाच तर लगेचच या मेलला रिप्लाय द्या. तसेच डायरेक्ट मराठी लिखाणाची सुविधा चालू किंवा बंदही करता येते. डाव्याबाजूला असलेल्या स्थिर "मराठी लिखाण" या चेकबॉक्सवर टिचकी मारून डायरेक्ट मराठी लिखाणाची सोय चालू किंवा बंद करता येते. ही सुविधा वापरताना काही अडचणी किंवा तुम्हाला यात आणखी काही नविन सुचवायचे असल्यास आम्हाला जरूर मेल करून कळवा! आपल्या सर्व सुचनांचे मराठी कॉर्नर टिम सदैव स्वागतच करेल!

तसेच आजपासूनच "झटक्यात रिप्लाय" ही सुविधा देखिल सादर करित आहोत. या सुविधेमुळे तुम्हाला जर कोणत्याही लेखाला रिप्लाय द्यायचा असेल तर त्या लेखाच्या खालीच रिप्लायचा बॉक्स असेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेलच शिवाय रिप्लाय देणे आता जास्त सोप्पे जाईल!

ट्विटर,बझ,ब्लॉग,फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्कस द्वारे या सुविधेची तुमच्या मित्रमंडळींना माहिती देऊन मराठी कॉर्नरच्या प्रसार व प्रचारात जर आपण काही मदत करू शकलात तर निःश्चितच आम्ही आपले ऋणी राहू. कारण सभासदांचा सपोर्ट नक्कीच आम्हाला नवा जोष, नवी ताकद देऊ शकतो. जेणे करून आणखी मस्त मस्त सुविधा आम्ही मराठी कॉर्नरच्या सभासदांना देऊ शकू.

सदैव आपल्या सेवेत!


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
mynac
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 04 Apr 2011 10:44
नाव: sadanand
आडनाव: bhandari

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby mynac » 10 Apr 2011 15:15

मन:पूर्वक धन्यवाद आपल्या अगदी त्वरीत क् ती बद्दल


Rajendra Bhandari
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 29 Mar 2011 11:53
नाव: Rajendra
आडनाव: Bhandari

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby Rajendra Bhandari » 11 Apr 2011 09:08

मराठी कोर्नरचे खुप खुप धन्यवाद .मराठीत लिखाण ही आज अत्यावश्यक बाब झाली आहे.आणि आपण
खुप सोयीचे सहज वापरता येणारे सोफट्वेअर उपयोगात आणले आहे या साठी सर्व टीमचे मनापासुन धन्यवाद.


krishnakumarpradhan
Rgistered member
Rgistered member
Posts: 10
Joined: 16 Jan 2011 17:00
नाव: krishnakumar
आडनाव: pradhan

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby krishnakumarpradhan » 18 Apr 2011 05:06

[url][/url]कृष्णकुमर प्रधान्@जीमेल्.कॉम
वत्सल्य
वात्सल्याचा येइ उमाळा
पुरुषांना का न्सतो लळा?
लाड कराए त्र कुणी न जवळी
शोधत अस्ता गवसली एक चिमणी
तिलाच घेइन दत्तक आता
पुठ्ठ्याचे घर करून देता
सुखावेल का ती थोडीतरी?
स्थिरावेल चिमण्या संसरीकृष्णकुमार्प्रधान


pkphadnis
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 24 Nov 2010 09:47
नाव: प्रभाकर
आडनाव: फडणीस

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby pkphadnis » 27 Apr 2011 22:49

मराठी असे आमुची मायबोली :)


pkphadnis
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 24 Nov 2010 09:47
नाव: प्रभाकर
आडनाव: फडणीस

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby pkphadnis » 27 Apr 2011 23:03

आज ही सोय पाहिली आणि सहजच वापरून पाहिली. मराठी मजकूर सुलभपणे आणि अचूक लिहिता येतो आहे हे पाहून आनंद झाला. मी बराहा चा वापर बराच काळ करीत आहे व ते नक्कीच उपयुक्त आहे. तसेच हेहि इथे लिहिण्यासाठी सोयीचे दिसते आहे. उपक्रमाबद्दल धन्यवाद. रकाराचे बहुतेक सर्व प्रकार बरोबर लिहिता येत आहेत असे दिसते, मात्र उलट्या वेलांटीसारखा र मध्यावर वापरून जोडाक्षर बनवणे जमत नाही. बराहामध्ये जमते! :) ते कसे लिहायचे त्याचा खुलासा करावा. :-ss


krishnakumarpradhan
Rgistered member
Rgistered member
Posts: 10
Joined: 16 Jan 2011 17:00
नाव: krishnakumar
आडनाव: pradhan

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby krishnakumarpradhan » 28 Apr 2011 00:57

काव्य की गाणे
पद्य हवे तुज पद्य हवे तुज
पद्यातोन संसारातील गद्य हवे पण
मधत घोळून कतु गद्य तुला मी संगावे,
तुपात्तळले कदॉऑ कारले उल वाटते ऐकावे,
शब्दंना मुळी गंध न उरला,
मालमसाला वरी लावता वासही सरला
शब्द बोलके एकेकाळी,आज तसे ते नसती ,
कटकुळ्या जणू कोणी महिला नऊवारी नेसती,
नकाच लवू चाल कोणीही मम काव्यला,
नकोच संगीत साज तयाला चढवायाला,
अर्थ्शून्य जरी मुळात माझे असेल कव्य,
गीत ऐकता म्हणतील अहे खूपच गेय!

कृष्णकुमार प्रधान


admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby admin » 28 Apr 2011 09:14

pkphadnis wrote:आज ही सोय पाहिली आणि सहजच वापरून पाहिली. मराठी मजकूर सुलभपणे आणि अचूक लिहिता येतो आहे हे पाहून आनंद झाला. मी बराहा चा वापर बराच काळ करीत आहे व ते नक्कीच उपयुक्त आहे. तसेच हेहि इथे लिहिण्यासाठी सोयीचे दिसते आहे. उपक्रमाबद्दल धन्यवाद. रकाराचे बहुतेक सर्व प्रकार बरोबर लिहिता येत आहेत असे दिसते, मात्र उलट्या वेलांटीसारखा र मध्यावर वापरून जोडाक्षर बनवणे जमत नाही. बराहामध्ये जमते! :) ते कसे लिहायचे त्याचा खुलासा करावा. :-ss


नमस्कार,
आपल्याला ही सुविधा आवडली हे वाचून खरच खुप बरे वाटले. सभासदांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. तुम्ही "उलट्या वेलांटीसारखा र" म्हणजे नेमके काय म्हणू इच्छिता आहात ते मात्र कळाले नाही! कदाचित "आर्त" वगैरे कसे लिहायचे हे हवे असेल? :-\

जर तसे लिहायचे असेल तर सर्वप्रथम आधिचे अक्षर "पूर्ण" करावे. म्हणजे जर "बर्र" लिहायचे असेल तर "B" दाबल्यानंतर "A" दाबून "ब" पूर्ण करावा. त्यानंतर एकदाच "R" दाबून अर्धा "र" लिहावा. आणि त्यानंतर कोणतेही योग्य ते अक्षर वापरून रफार द्यावा! :)


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby admin » 28 Apr 2011 09:17

krishnakumarpradhan wrote:[url][/url]कृष्णकुमर प्रधान्@जीमेल्.कॉम
वत्सल्य
वात्सल्याचा येइ उमाळा
पुरुषांना का न्सतो लळा?
लाड कराए त्र कुणी न जवळी
शोधत अस्ता गवसली एक चिमणी
तिलाच घेइन दत्तक आता
पुठ्ठ्याचे घर करून देता
सुखावेल का ती थोडीतरी?
स्थिरावेल चिमण्या संसरीकृष्णकुमार्प्रधान


krishnakumarpradhan wrote:काव्य की गाणे
पद्य हवे तुज पद्य हवे तुज
पद्यातोन संसारातील गद्य हवे पण
मधत घोळून कतु गद्य तुला मी संगावे,
तुपात्तळले कदॉऑ कारले उल वाटते ऐकावे,
शब्दंना मुळी गंध न उरला,
मालमसाला वरी लावता वासही सरला
शब्द बोलके एकेकाळी,आज तसे ते नसती ,
कटकुळ्या जणू कोणी महिला नऊवारी नेसती,
नकाच लवू चाल कोणीही मम काव्यला,
नकोच संगीत साज तयाला चढवायाला,
अर्थ्शून्य जरी मुळात माझे असेल कव्य,
गीत ऐकता म्हणतील अहे खूपच गेय!

कृष्णकुमार प्रधान


नमस्कार कृष्णकुमारजी,
कविता सुंदरच आहेत! त्यात वाद नाही पण आपली पोस्ट करण्याची जागा चुकली आहे. आम्ही याबद्दलचा सविस्तर "वैयक्तिक निरोप" पाठवत आहोत. त्यात सर्व माहिती देत आहे! :)


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
ईन्टरफ़ेल
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 02 Oct 2011 15:03
नाव: भारत जगताप
आडनाव: मु.पो.तारुखेडले ता.न

Re: नवी सुविधा: आता मराठी लिहा डायरेक्ट!

Postby ईन्टरफ़ेल » 02 Oct 2011 15:22

namaskaar mi navin aahe pan marathi tayping hot naahi activate gamabhana vaparun dekhil marathi et nahi


Return to “Announcement | जाहीर खबर”

Who is online

Registered users: Google Feedfetcher

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 10 users online :: 1 registered, 0 hidden and 9 guests
Registered users: Google Feedfetcher
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1804
Total topics 1437
Total members 638
Our newest member maharashtrianamit
No birthdays today