नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

इथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Postby admin » 01 Jan 2013 09:50

नमस्कार,
आपणास व आपल्या संपुर्ण परिवारास मराठी कॉर्नर कडून नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्या जिवनात सुख, समृद्धी, यश व भरभराट घेऊन येवो हिच देवाचरणी प्रार्थना.

तसं बघायला गेलं तर २०१२ खरच खुप वाईट वर्ष ठरलं. या वर्षात आपण अनेक दिग्गज "भारतरत्न" गमावले, महागाई सोसली अन आर्थिक मंदीही भोगली. आणि हे कमिच होते की काय म्हणून वर्षाचा उत्तरार्ध आपल्या सर्वांच्याच काळजाला पिळवटून टाकणाऱ्या घटनांनी भरलेला ठरला. "दामिनी" जगू शकली नाही पण निश्चितच तिने कित्येकांना जगण्याची नवी उमेद दिली. वाईट फक्त याचच वाटतयं की समाजात जागरूकता यायला एवढी टोकाची घटना घडावी लागली. पण असो, म्हणतात ना, "देर आए, दुरुस्त आए". या सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे युवांनी घेतलेला "अराजकिय" पुढावा. या प्रकरणाचे "राजकारण होणार" हे निश्चित होते आणि तसा प्रयत्नही झाला पण जागरुक युवा पिढीने ते होऊ दिले नाही आणि याचा अभिमान वाटतो.

आज समाजात कित्येक "दामिनी" स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत तर कित्येकांनी आपले अस्तित्वच गमावले आहे. आज समाजात स्त्री, परपुरुष दुरच पण सख्ख्या नात्यातील पुरुषांपासून देखिल सुरक्षित राहिली नाही आणि ही खरच तीव्र नींदेची बाब आहे. पण याचा अर्थ असाही नाही की याला केवळ "पुरुष" जातच पुर्णतः जबाबदार आहे. थोड्याफार प्रमाणात स्त्रीयांनिही जबाबदारीने वागले पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा आणि समाजात वावरताना किती प्रमाणात "बिनधास्त" राहायचं हे प्रत्येक स्त्रीने आणि मुख्यतः तरूण मुलींनी समजुन घेणे गरजेचे आहे.

आज समाजात घडत असलेली प्रत्येक अनैतिकता ही जणू नैतिकतेवर झालेला बलात्कारच आहे. ही एक प्रकारची कीड आहे जी कित्येक वर्ष झाली या समाजात आहे आणि वाढतेच आहे. याला आता आळा घालण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचार, अत्याचार, विकृती या सर्वांवर आळा घालण्यासाठी केवळ मेणबत्त्या पेटवून निषेध दाखवून भागणार नाही, आता वेळ आली आहे एकत्रीत लढ्याची. जर देश स्वच्छ करायचा असेल तर म्हणतात ना सुरुवात आपल्यापासून होते. चला तर मग, २०१३ च्या या पहिल्या दिवशी संकल्प करू, की आजपासून ज्या ज्या ठेकाणी भ्रष्टाचार, अत्याचार, विकृती यासारख्या गोष्टी घडताना दिसतील त्याला "मी" जबाबदार नसेन आणि माझा सहभाग असलाच तर तो "विरोधक" म्हणून राहिल.

आज बर्‍याच दिवसांनी आपल्याशी संवाद साधत आहोत. खरच मनातल्या गोष्टी आपल्याशी "शेअर" केल्यानंतर मोकळं वाटू लागलय. यावर्षीपासून मराठी कॉर्नर बर्‍याच नविन सुविधा रुजू करण्याच्या विचारात आहे. लवकरच आम्ही मासिक किंवा तिमाही सुरू करण्याच्या विचारात आहोत. आणखिही बर्‍याच नविन कल्पना आहेत त्या तुम्हाला ज्यात्यावेळी आम्ही कळवूच पण त्यासाठी आमचा ईमेल पत्ता सेव्ह करायला विसरू नकात. कारण आम्ही एकाच वेळी हा इमेल सर्व सभासदांना पाठवत असतो त्यामुळे बर्‍याचदा Gmail, Yahoo यासारख्या इमेल साईट्स आमचा मेल "Spam" किंवा "Junk" ठरवू शकतात. त्यामुळे आजच आमचा इमेल पत्ता सेव्ह करा की जेणेकरून आम्ही आपल्याशी संवाद साधू शकू. आपल्याला या पत्रावर काही प्रतिक्रिया द्यावयाच्या असल्यास जरूर या पत्रास रिप्लाय करावा किंवा मराठी मराठी कॉर्नरवर नविन विषय सुरू करून देखिल आपण आपले विचार मांडू शकता. मराठी कॉर्नर नेहमीच तुमचे विचार जाणून घेण्यास उत्सुक आहे. मराठी कॉर्नरवर आजच सक्रिय व्हा. मराठी कॉर्नर हा प्रत्येकासाठी स्वतःचे विचार निर्भयतेने मांडण्याचा एक उत्कृष्ठ मंच आहे. येथे प्रत्येकाच्या विचाराची दखल घेतली जाते. या मुक्त व्यासपिठाचा आवश्य लाभ घ्या.

शेवटी मराठी कॉर्नरचा २०१२ मधिल संक्षिप्त आढावा:

• एकुण सभासद 423
• एकुण पोस्टस 2941
• एकुण मांडले गेलेले विषय 3312

पुन्हा एकदा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

कळावे,
आपली विश्वासू,
मराठी कॉर्नर टिम
http://www.marathicorner.com


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.

Return to “Announcement | जाहीर खबर”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there is 1 user online :: 0 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today