Page 1 of 1

आणखी एक रात्र गाजवलेली…!

Posted: 07 Sep 2016 01:43
by latenightevent
वेळ तशी रात्रीची
होती, मध्यरात्रच म्हणा;
आम्ही आमच्या शयनकक्षात जाण्यापूर्वी गडाचे
सर्व दरवाजे तपासून पाहत होतो, ही
तर आमची जुनीच सवय, निजण्यापूर्वी
गडाचे सर्व दरवाजे व्यवस्थित लावले आहेत का हे तपासून पाहत असतो; आजही तिच रीघ ओढत होतो पण आज एक गजहब
झाला आमच्या हातून गडाच्या एका खिडकीला बंद करण्याचे राहून गेले होते.
आम्ही तातडीने ती चूक लक्षात येताच तिकडे धावलो आणि खिडकी लावून घेतलो.
खिडकी जर लावली नाही तर एखाद रातपक्षी किंवा इतर पशू आत येऊ गडाची नासाडी करीत
सुटत, शिवाय हा सुरक्षेचा
गंभीर मुद्दा,
चोरा-दरोडेखोरांना तर असे खासे कमकुवत
बाबी हव्याच असतात, पण आम्हीही कोणी अनादि
नव्हतो. असो…. आम्ही गडाची खिडकी लावलो आणि आम्हाला काहीतरी चाहूल लागली, कसलातरी आवाज कानी पडल्याचा आभास झाला,
कोणी तरी मागे उभे आहे असे वाटून गेले, भास होता की वस्तुस्थिती, आम्ही चटदिशा मागे वळून पाहिलो आणि आमची
पाचावर धारणच बसली, पिवळी
होण्याच बाकी राहिलं होत (त्या धक्क्याने घसरून मागे ठेवलेल्या शिळ्या
वरणावर पडून कपडे पिवळे होणे)….. मागे साक्षात….साक्षात…. मांजर
उभे…. परमेश्वरा हे काय विपरीत घडले….. ज्या पशूची आम्हास इतकी भीती
वाटते त्याच्या सामोरी जाण्याची वेळ आली…. परमेश्वर खासी वार्षिक परीक्षा
घेत आहे आणि तीही गणिताच्या विषयाची अशी जाणीव मनात आली….. पण
आम्हीही कोण ऐरे-गैरे नाहीत हा तो चांगलाच जाणून होता….. आम्ही घाबरलो
नसलो तरी थोडेसे भिलो होतो….. ते मांजर (उच्चारतानाही पापडची जीभ होते
आहे…. आपल जिभेची पापड होत आहे, तीही
लिज्जत पापड अगदी कर्रम-कुर्रम)….असो….ते मांजर आमच्याकडे आणि आम्ही त्याच्याकडे
उभ्या देहाने बघत होतो….. विशेष म्हणजे दोघांच्या नजरेत एकच भावना होती अस वाटत होत….
आम्ही बाजूला उडी घेतली आणि मांजर जेवणाच्या मेजावरून (टेबल बरका….) उडी
घेऊन त्या खिडकीकडे झेपावले, पण त्याच्या (आणि
आमच्या) दुर्दैवाने आम्ही आत्ताच ती खिडकी गच्च लावून घेतली……. मग आमच्या लक्षात सारी
गडबड आली, म्हणजे…. सारी गडबड
आमच्या लक्षात
आली…. आम्ही खिडकी लावायच्या आधी ते मांजर गडावर घुसल होत आणि आमच्या नजरेस चुकवून
ते सार गडभर फिरून आल, नव्हे
हेरगिरीच ती….असो… आणि आम्ही ती खिडकी लावत आहोत हे
त्याच्या ध्यानी येताच ते परतायला बघत होत, तो एकमेव त्याच्या परतीचा दोर आहे हे
त्यास खास मालूम होत… आम्ही आमच्या पराक्रमी हातांनी ते दोर कापून
टकले आपलं टाकले होते…..असो…. त्याला तर परतीचा मार्ग सापडला नाही पण
त्यामुळे ते आमच्यावर झेपायच्या आत आम्ही तेथून निसटलो….निसटलो कारण
हल्ल्याच्या आधी वाघही दोन पाऊले माघार घेतो हे आम्हास भलतं ठाऊक होत…..
म्हणून आम्ही त्या मुदपाकखाण्यातून (किचन) बाहेर पडलो….. त्याच्या परतीचा मार्ग बंद आहे हे
त्याच्या ध्यानी आल्याने ते मांजर बिथरल होत, आणि त्याचमुळे ते सगळीकडे धावून
हलकल्लोळ माजवत
होत, सगळे भांडे पाडत होत,
खिडकी-दरवाजे परत-परत तपासात होत…. ते आमच्याकडे धावलच पण
तितक्यात आमच्या हाती कपडे वाळत घालण्याची काठी, अगदी भवानी मातेच्या कृपेने, अलगद सापडली आणि आम्ही ती काठी जमिनीवर
आपटताच ते मांजर
आमच्या रौद्र रूपाला (खर तर भेदरलेलं असच म्हणावं) घाबरून परतल आणि त्या मघाशी
सांगितलेल्या मेजाखाली जाऊन दडून बसलं…. त्या क्षणाला ती कपडे वाळत घालण्याची काठी
जणू आम्हाला भवानी मातेने महाराजांना दिलेल्या भवानी तलवरीपरमाने वाटून राहिली….. आता ते
मुदपाकखाना आणि इतर गडाच्या त्या रस्त्यात आम्ही अगदी वीर बाजीप्रभू
प्रमाणे उभे होतो…. मघाच्या छोट्या विजयाने (काठी आपटणे, मांजर मागे जाने) आमच्या अंगात दहा हत्तींचे
बळ सामावले,
अंगात वीरश्री संचारली होती…. आम्ही
त्या मांजरला ठार मारायचं नाही पण चांगली अद्दल घडवायच ठरवलं
होत….. पण…… हो हो पण……. मघाशी झालेल्या भांड्याचा आवाजाने
आमच्या मातोश्री दचकून जाग्या झाल्या होत्या, आमचे वडीलसाहेब आणि थोरले बंधु परदेश
मोहिमेवर असल्याने काय संकट आले असे त्यांना वाटले, पण त्यांना सत्य परिस्थिती समजल्यावर
काही गंभीर अस वाटलं नाही, पण
आम्ही त्या घटनेच गांभीर्य चांगलाच ‘जाणवलं’ होत…. मातोश्रीन्नी आधी
आम्हास जोरदार शिव्या दिल्या, का
तर आमच्यामुळे इतका धिंगाणा आणि आवाज झाला, त्यात मांजराच्या केसालाही धक्का
लागायला नाही पाहिजे
अशी गळ घातली, का
तर, त्याला काही झालं तर
काशीला जाऊन प्रायश्चित्त घ्यावं लागेल असे त्यांचे बोल होते….
पण त्या अघोरी मांजराने आमच्यावर धाव घेऊन, हल्ला करून जर का आमचा गळा फाडला असता
किंवा कोथळा बाहेर काढला असतं तरीही नंतर त्यांना काशीला आमच्या
अस्थि अर्पण करायला जावच लागलं असत हे दुर्दैवाने त्यांच्या मनी आल नसत….
त्या बिचार्‍या ‘मनी’
मुळे ही गोष्ट त्यांच्या ‘मनी’ आली नाही………असो…….. आता
त्याला न मारता काहीही करून गडाच्या बाहेर घातल पाहिजे हे आमच्या मनी आल….
मग काहीही करून
त्याला बाहेर काढायचा आम्ही विडाच उचलला….. ह्या सार्‍या गोष्टी घडत असताना आम्हाला
लिहायला लागेल तितका वेळ निघून गेला अर्थात आता रात्रीचा एक वाजून गेला होता…. ते दुष्कर्मी
मांजर डोळे वट्टरुण तेथून आमच्याकडे बघत होत… आमकी तर सटकलीच… पण आमचे
हात दगडाखाली अडकले होते….. करणार काय हीच श्रींची इच्छा हे आमच्या तल्लख
बुद्धीने जाणले होते…. मग आम्ही विचार केला की गडाचा आतील दरवाजा उघडावा
का की, त्यातून ते निर्लज्ज
मांजर तेथून
निघून आपल्या मार्गाला जाईल…. पण हे होणे नियतीच्या मनात नव्हतच मुळी, त्याने मनो’मनी’ आम्हाला छळायच निश्चित केल होत… तसा
आमचा गुन्हा काय
तर अनावधानाने त्याच्या परतीचा मार्ग बंद केला होता, पण आतातर तोही उघडून दिला होता, पण ते त्याला मान्य नसावं, त्याच्या ‘ मनी’ कदाचित ‘बूंद से गई वो हौद से नही आती’ अस काही असावं…. आम्हाला तर ते मांजर
‘कृष्णकुंज’ कडील वाटलं…. पण त्याची धुण्यावाचून
(पापं) आम्हास दूसरा मार्ग नव्हता…. आम्ही धर्मसंकटात सापडलो होतो….. एका बाजूस
मातोश्री त्यास
त्रास देण्याच्या सख्त विरोधात होत्या, आम्ही काही त्यांच्या शब्दबाहेर नव्हतो, कारण गेलो असतो तर मांजर नंतर पण
त्याच्याआधी आम्हीच गडाबाहेर फेकलो गेलो असतो आणि ते मांजर खिदळत
आमच्याकडे बघत बसलं असत, अशी नामी संधि आम्ही
त्याच्या हाती लागू देणे क्रमप्राप्त नव्हते…. दुसर्‍या बाजूने त्याला हाणल्या शिवाय आमचा आत्मा
शांत झाला नसता…… पण ‘मौका सभी को मिळतं है’
हे आम्ही जाणून होतो म्हणूनच त्याला
निसटण्याची संधि आम्ही देत होतो……. तेही आमची सय्यम परीक्षा घेत होत,
इतका मोठा दरवाजा उघडूनही ते काही हलायला तयार
नव्हतं….. ते तिथून अतिशय खुनशी नजरेणे आमच्याकडे बघत होत, त्याचा राग यावा तितका कमी पण आम्ही
सय्यमी आहोत हे सर्वांना ठाऊक आहेच…. ते मांजर सारखं त्या खिडकीकडे डोळे
वट्टारुण एकदा तर माझ्याकडे एकदा पाहत होत, तिच खिडकी जेथून त्याने शिरकाव केला
होता…. त्याची
नजर दोन वेगळ्या जागेवर फिरायची पण नजरेतील भाव एकच असायचे…. आम्हाला कळून चुकल की
ज्या खिडकीतून ते आल आहे, तेथूनच
परत जाण्याची त्याची इच्छा आहे…. त्याची मर्जी राखण्याच आता आमच्या नशिबी आहे हे
दुख आमच्या ‘मनी’
आल…. पण ही त्याची एखादी खेळी तर नसावी ना?
की आम्ही त्याच्यासमोर ती खिडकी उघडाया जावे
आणि त्याने झेप घेऊन आमचा गळा धरावा… छे….छे….छे….. आम्ही गाफिल असू
शकत नव्हतो…. भावनेच्या आहारी जावून निर्णय घेणे आम्ही नेहमीच टाळत आलो
आहोत…. मग आम्ही शक्कल लढवली (गेल्या दीड-दोन तासाच्या लढाईमुळे आमची शकल बिघडली होती म्हणून….)…. आम्ही हातात उशी घेतली…. काय म्हणता? आमच्या हातात तर काठी होती अस का…. हो पण आमचा दूसरा हात अजून शाबीत होता म्हंटलं….. मग काय….एका हातात उशी आणि दुसर्‍या हातात काठी हे आमच रौद्र रूप पाहून भले भले घाबरले असते, पण त्या नादान मांजरला जिवाची फिकीर नसावी, तो आमच्या ह्या तेजोमय रूपाकडे ढुंकूंनाही पाहत नव्हता आणि पहिलाच तर त्याच्या भावना खुंकर होत्या….. आम्ही बळ एकवटल, धैर्य दाखवलं आणि तसेच त्या मूदपाकखाण्यात शिरलो….. एव्हाना मनात विविध भावना जमा होऊ लागल्या होत्या, लहानपणी गणितात नापास झाल्यावर पिताश्रिंच्या सामोरे जाण्यास जेवहाडे घाबरलो नसू तितके आज घाबरलो होतो, काय करणार प्रसंगच बाका होता, आई भवानी ने ऐसी कठीण परीक्षा घेण्याचे योजले होते त्यापुढे कोणाचे ते काय चालावे…….. आम्ही चलाखीने मेजावर असलेल भांड काठीच्या एका तडाख्याने पाडले, आणि आमच्या अचूक अंदाजाप्रमाणे ते नीच मांजर धाय मोकलून ओरडत बाहेर निघाले (ह्यावरून आम्ही मैदानी लढाईत किती सामर्थ्य दाखवू शकतो हे सारांच्या लक्षात आले होते)….. मग तितक्याच चपळाईने आम्ही ती खिडकी उघडली ज्यावर मांजराचा इतका वेळ डोळा होता…. ती खिडकी उघडून आम्ही मागे वळतो न वळतो एवढ्यात ते ते ते मांजर आमच्या मागून आले आणि घात झाला….. दगा….दगा…..दगा….. बाहेर पळतो आहे ऐसे दाखवून आमची त्या खिडकीनजीक येण्याची वाटच पाहत होते…….. त्याने आमच्या अंगावर जोरदार उडी घेतली आणि आमची पिवळी झाली (पुन्हा एकदा सांगतो, आम्ही घसरून तेथे ठेवलेल्या शिळ्या वरणावर पडलो आणि आमची पॅंट पिवळी झाली)….. आणि उगाच आम्हाला भीती दाखवून ते मांजर त्याच्या मनोमन इच्छेप्रमाणे त्या खिडकीतून बाहेर केंव्हाच पळून घेतलं होत….. ह्या सार्‍या घटना घटेपर्यंत रात्रीचा एक प्रहार संपला होता… त्या भयानक संग्रामानंतर सारी रात्र आम्ही झोपू शकलो नाही, रातभर उगा येर झार्‍या मारत होतो….. अखेर ज्यासाठी ते पातळ आपल पाताळयंत्रि मांजर आमच्या गडावर घुसल होत ते दूध आम्ही प्राशन केल आणि गप गुमान आमच्या बिस्तरात जाऊन पडलो….. रात्रभर स्वप्ने आली पण झोप काही येऊ शकली नाही…..!
http://latenightedition.in/wp/?p=182

Re: आणखी एक रात्र गाजवलेली…!

Posted: 02 Jan 2017 11:06
by rishika08
:)) :)) भन्नाट!! हसून हसून पोट दुखलं राव.. बरं लेखन काल्पनिक कि सत्य घटनेवर आधारित?? :p