चौकट

या विभागात केवळ ललित लेखनच असावे..एखादा विषयाला केंद्रबिंदू ठेवुन त्यावरील आपले विचार व्य्क्त करावेत...यावर कुणावरही टीका असू नये....
Forum rules
*येथे पोस्ट केले जाणारे ललित जर तुमचे नसेल तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
User avatar
smartvish143
Rgistered member
Rgistered member
Posts: 7
Joined: 03 Oct 2012 20:37
नाव: विशाल
आडनाव: कदम
Location: Thane
Contact:

चौकट

Postby smartvish143 » 12 Oct 2012 23:52

आपण आपल्या आयुष्याला एका चौकटीच्या आतच ठेवलं आहे........आणि आपण एका मर्यादित चौकटीतच जीवन जगतोय अस कोणाला वाटत का ?

कदाचित काही लोकांच उत्तर हो असेल तर काहींच नाही.....कारण काही लोकांना या चौकटीच्या पलीकडे जायचाच नाही तर काही लोकांना या सगळ्या चौकटी ओलांडून त्याच्या सगळ्या हद्द पार करायच्या आहेत पण ते करत नाहीत....

पण काय आहे हि चौकट ? प्रत्येक माणसा प्रमाणे ह्या चौकटीची व्याख्या बदलत जाते.....तुम्हाला कधी अस वाटत नाही आपण रोज एक routine life जगतोय...रोज त्याच वेळेला उठन, तीच ट्रेन , रोज तेच office च काम......पण यावर तुम्ही म्हणाल हे तर सगळेच करतात......त्याला पर्याय नाही पण आम्ही शनिवार आणि रविवारी एन्जोय करतो.....

आम्ही दर शनिवारी आणि रविवारी बाहेर जेवायला जातो, महिन्यातून एका रविवारी movie बघतो , आणि ३ महिन्यातून एकदा बाहेर फिरायला जातो.......म्हणजे हि पण एका प्रकारे तुम्ही आखलेली एक चौकटच ना आणि ते पण एक routine च आहे कि नाही........

“रोज जेवण बनवायला कंटाळा येतो” ह्या सत्याला पांघरून घालायला तुम्ही शनिवारी आणि रविवारी बाहेर जाता अस मला सांगता.....

आता तुम्ही स्वताला च काही प्रश्न विचारा.....

ह्या रोजच्या routine work मध्ये तुम्ही काही नवीन करता का ?....office मध्ये काम नसल कि तुम्ही कधी काही वेगळ करायचा प्रयत्न करता का ?

ह्यावर सगळ्यांचा प्रश्न म्हणजे आम्ही नक्की करायचं काय ?

हेच.....या तुमच्या आखलेल्या चौकटीतून बाहेर पडाल तर तुम्ही विचार कराल ना....अरे बाहेर बघा.....हे office , घर , आणि रोजच routine काम सोडून सुद्धा बाहेर एक जग आहे......आणि ते खूप सुंदर आहे......

काहीतरी वेगळ करायचा प्रयत्न तरी करा........फक्त बाहेर जेवायला जाण्यापेक्षा एका रविवारी तुम्ही जेवण बनवा आणि तुमच्या हाथाने तिला जेवू घाला......त्या भाजीत तिखट-मीठ कमी असल तरी ती भाजी तुमच्या हाथून खाताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या five star हॉटेल मध्ये जेवलेल्या जेवणा पेक्षाही जास्त असेल....

movie बघण्यापेक्षा बऱ्याच वर्षा पासून तुम्ही न गेलेल्या मराठी नाटकांना जावा......नाहीतर असच तिच्या बरोबर भटकायला निघा......३ तास movie मध्ये तिच्या बाजूला शांत बसण्या पेक्षा तिच्याशी छान गप्पा मारा.......बघा तुम्हाला किती बर वाटेल.....

अरे मित्रानो फिरा , मजा करा , आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्याला एका चौकटीत आखून ठेवू नका....ह्या आखलेल्या चौकटीतून कधीतरी बाहेर पडा , काहीतर आज वेगळ करा म्हणजे तुमचं सुंदर आयुष्य अजून सुंदर होईल........


विशाल कदम

माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/विशाल
माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: चौकट

Postby adwaitk007 » 17 Oct 2012 19:03

खरच खुप छान लिहिले आहे.... :) अस वाटतय "आज कुछ तुफानी करते है!!" ;) :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
User avatar
smartvish143
Rgistered member
Rgistered member
Posts: 7
Joined: 03 Oct 2012 20:37
नाव: विशाल
आडनाव: कदम
Location: Thane
Contact:

Re: चौकट

Postby smartvish143 » 18 Oct 2012 01:05

खूप धन्यवाद......पण सगळ तुफानी आजच नको...... :D :D


विशाल
माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/

Return to “ललित विभाग”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 1 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1824
Total topics 1437
Total members 643
Our newest member 4295
No birthdays today