चिकन सलामी नूडल्स

येथे नॉन-व्हेज रेसिपीज प्रसिद्ध कराव्यात!
User avatar
mogaraafulalaa
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 31 Oct 2010 01:17
नाव: कांचन
आडनाव: कराई

चिकन सलामी नूडल्स

Postby mogaraafulalaa » 31 Oct 2010 11:25

वाढणी: तीन मोठ्या व्यक्तींसाठी पुरेसे

Image

साहित्य:
चिकन सलामीचे ५ ते ६ स्लाईसेस,
नूडल्स १८० ग्रॅम,
१ मध्यम आकाराचे टोमॅटो,
१ मध्यम आकाराचा कांदा
१ अंडे
३ टेबलस्पून तेल
३ टेबलस्पून टोमॅटो चिली सॉस
४ कप पाणी
१/२ टी स्पून लाल तिखट
२ टी स्पून गोडा मसाला

कृती:
सर्वात प्रथम कांद्‍याचे उभे व पातळ काप करावेत. टोमॅटो बारीक व चौकोनी तुकड्यांमधे कापून घ्यावे. चिकन सलामीचे उभे तुकडे कापून घ्यावे. पॅनमधे तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या. कांदा लालसर होत आला की त्यात गोडा मसाला व नूडल्ससोबत मिळणारा ’टेस्टमेकर’ मसाला टाकून चांगले परतून घ्या. त्यानंतर टोमॅटोचे आणि सलामीचे तुकडे पुन्हा एक दोन मिनिटे हे मिश्रण ढवळा. मग त्यात मॅगी नूडल्स आणि पाणी टाका. नूडल्स शिजण्यासाठी एरव्ही दोन ते तीन मिनीटे पुरतात पण यावेळेस इतरही जिन्नस वापरल्याने थोडा वेळ लागणार आहे. या मिश्रणाला उकळी आल्यानंतर सुमारे पाच ते आठ मिनिटे मंद गॅसवर हे मिश्रण उकळू दया. गॅस बंद करा आणि तयार झालेल्या चिकन सलामी नूडल्सवर नंतर त्यावर एक अंडे फोडून घाला.

टीप:
नूडल्य्स सुटे सुटे व्हायला हवे असतील तर अंडे फोडून टाकण्याआधी त्यात थोडे अमूल बटर टाका.


--
मोगरा फुलला
http://www.mogaraafulalaa.com
pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

Re: चिकन सलामी नूडल्स

Postby pallavi kulkarni » 31 Oct 2010 18:01

हाय कांचन!
मस्त सुरुवात केलीस....
अशीच इथे ही लिहित रहा..
सौ.पल्लवी


सौ.पल्लवी
User avatar
mogaraafulalaa
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 31 Oct 2010 01:17
नाव: कांचन
आडनाव: कराई

Re: चिकन सलामी नूडल्स

Postby mogaraafulalaa » 05 Nov 2010 21:50

प्रयत्न करत राहीन


--
मोगरा फुलला
http://www.mogaraafulalaa.com

Return to “नॉन-व्हेज रेसिपीज”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 11 users online :: 0 registered, 0 hidden and 11 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today