
साहित्य:
चिकन सलामीचे ५ ते ६ स्लाईसेस,
नूडल्स १८० ग्रॅम,
१ मध्यम आकाराचे टोमॅटो,
१ मध्यम आकाराचा कांदा
१ अंडे
३ टेबलस्पून तेल
३ टेबलस्पून टोमॅटो चिली सॉस
४ कप पाणी
१/२ टी स्पून लाल तिखट
२ टी स्पून गोडा मसाला
कृती:
सर्वात प्रथम कांद्याचे उभे व पातळ काप करावेत. टोमॅटो बारीक व चौकोनी तुकड्यांमधे कापून घ्यावे. चिकन सलामीचे उभे तुकडे कापून घ्यावे. पॅनमधे तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या. कांदा लालसर होत आला की त्यात गोडा मसाला व नूडल्ससोबत मिळणारा ’टेस्टमेकर’ मसाला टाकून चांगले परतून घ्या. त्यानंतर टोमॅटोचे आणि सलामीचे तुकडे पुन्हा एक दोन मिनिटे हे मिश्रण ढवळा. मग त्यात मॅगी नूडल्स आणि पाणी टाका. नूडल्स शिजण्यासाठी एरव्ही दोन ते तीन मिनीटे पुरतात पण यावेळेस इतरही जिन्नस वापरल्याने थोडा वेळ लागणार आहे. या मिश्रणाला उकळी आल्यानंतर सुमारे पाच ते आठ मिनिटे मंद गॅसवर हे मिश्रण उकळू दया. गॅस बंद करा आणि तयार झालेल्या चिकन सलामी नूडल्सवर नंतर त्यावर एक अंडे फोडून घाला.
टीप:
नूडल्य्स सुटे सुटे व्हायला हवे असतील तर अंडे फोडून टाकण्याआधी त्यात थोडे अमूल बटर टाका.



