पुरणपोळी- जरा हटके!

येथे केवळ व्हेज रेसिपी च प्रसिद्ध कराव्यात!
rishika08
Rgistered member
Rgistered member
Posts: 14
Joined: 29 Nov 2016 12:44
नाव: Pallavi
आडनाव: Deshmukh
Contact:

पुरणपोळी- जरा हटके!

Postby rishika08 » 20 Mar 2017 16:07

महाराष्ट्राची ओळख असणारी पारंपारिक ‘पुरणपोळी’ खवय्यांच्या मोठ्या लाडाची! सणासुदीला तर या पुरणपोळीचा मान फारच वधारतो. सणावाराला बनणा-या पारंपारिक पदार्थांच्या साहित्य व पाककृतीत थोडाफार बदल करुन एखादा नवीन पदार्थ बनविण्याची हौस असेल, तर खालील रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील! गणेशोत्सवाला विविध स्वादाचे मोदक, तर दिवाळीत अनेक प्रकारच्या करंज्या उपलब्ध असतात, त्याप्रमाणे आता हौशी सुगरणी बनवू शकतील नव्या चवीच्या पुरणपोळ्या!!

स्ट्रॉबेरी पुरणपोळी-

साहित्य- (आवरण)-दीड कप गव्हाचे पीठ, दीड कप मैदा, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीपुरते (सारण)- २ कप बारीक रवा, १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी, २ टे.स्पू. तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टे.स्पू. वेलची पूड, साजूक तूप
पाककृती – कढईमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे घेऊन साधारण मिनिटभर परतून घ्यावेत व त्यामध्ये २ टे.स्पू. पाणी घालून पुन्हा मिनिटभर शिजवून, बाजूला काढून ठेवावेत. आता, कढईमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये रवा घालून मंद आचेवर भाजून घ्यावा. भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यावा. नंतर, कढईमध्ये दूध व पाणी गरम करुन त्यामध्ये भाजलेला रवा घालून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्यावा व त्यामध्ये साखर, वेलचीपूड, शिजवलेल्या स्ट्रॉबेरीज घालून मिश्रण पाच मिनिटे शिजवावे. आवरणासाठी दिलेले साहित्य नीट मळून घ्यावे व त्याचे लहान गोळे बनवावेत. तयार आवरणात पुरण भरुन पुरणपोळी लाटावी व नॉनस्टीक तव्यावर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी. अशी, स्ट्रॉबेरी स्वादाने परिपूर्ण पुरणपोळी तूपासोबत गरमागरम सर्व्ह करावी.

अधिक वाचा: https://goo.gl/jCIVUb


Return to “व्हेज रेसिपीज”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 5 users online :: 1 registered, 0 hidden and 4 guests
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1830
Total topics 1438
Total members 647
Our newest member Shubhamkakade
No birthdays today