Page 1 of 1

मॅक्रॉनी उपमा

Posted: 24 Feb 2017 12:24
by rishika08
मुलांना खाऊच्या डब्यात नेहमीच्या पोळीभाजीपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर हा मॅक्रोनी उपमा उत्तम पर्याय ठरू शकतो! हा उपमा अंदाजे २० मिनिटात तयार होतो.

साहित्य:
१ वाटी मॅक्रॉनी
३-४ वाट्या पाणी
१/२ वाटी कांदा
१ लहान टॉमेटो
१ते२ हिरव्या मिरच्या
१ चमचा तूप
१/४ चमचा जिरे
२ चिमटी हिंग
४-५ कढीपत्त्याची पाने
चवीपुरता मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

पाककृती:
    ३-४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात.
    ८ ते १० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळेनुसार मॅक्रॉनी शिजवाव्यात.
    चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणू निथळू द्यावे.
    कढईत तूप गरम करावे. त्यामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी.
    त्यामध्ये कांदा घालून तो पारदर्शक होईस्तोवर परतावा, नंतर टॉमेटो घालून तो मऊसर होईपर्यंत परतून घ्यावा.
    वरील मिश्रणात शिजवलेल्या मॅक्रॉनी घालाव्यात, चव पाहून आवश्यक वाटल्यास मीठ घालावे.
    २ मिनिटे शिजवून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

अजून वाचा: https://goo.gl/uT62rC