रंगराव गायकवाडांचा वाडा....................

कथा, गोष्टी केवळ इथेच!
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
dr_sujeet
Rgistered member
Rgistered member
Posts: 4
Joined: 10 Jan 2011 11:53
नाव: सुजित
आडनाव: शिंदे

रंगराव गायकवाडांचा वाडा....................

Postby dr_sujeet » 30 Mar 2011 13:08

उन्ह तिरपी झाली ........ अन गुरं घराकडे पांगली की .........
संध्याकाळच्या वेळेला हा वाडा म्हणजेच रंगराव गायकवाडांचा वाडा अतिशय भयाण आवाज करीत असे .....
आत जणू सारे पिशाच्च अतोनात आळवीत असतील ...........
असे काही किळसवाणे आवाज येत की .... कुत्री सुद्धा भुंकायचे कमी करत ....
अश्या भयानक घडामोडीने सारा वाडा गजबजून उठत असे ....

वाड्यात तसे कुणीच राहत नसे .... वेशीच्या बाजूच्या आळीत सगळी दुकाने होती ...त्याच्या बाजूलाच हा वाडा होता ..... समशान अजून बरंच दूर होतं .....
कुणी म्हणे तिथे तीन मुंडीवाली हडळ आहे ... ती सारे आवाज काढत असते ... कुणी काय तर कुणी काय .....
पण ७ च्या नंतर तिथून कुणाचा वारा देखील जात नसे ..........

इतकी त्या वाड्याची दहशत त्या गावात होती .....
वाड्याचा इतिहास इतकाच की तो गायकवाडांचा फार जुना वाडा होता .....
सध्या सगळे गायकवाड बंधू मळ्यात राहत असत ....
वाड्यावर फक्त ते पारंपारिक पुजेलाच जात .....दरवर्षी त्या वास्तूदेवतेला नैवैद्य अर्पण करीत असे .....
वाड्याच्या मागेच ... तिच्या म्हणजे त्या हडळीच्या जटा गाडून ठेवल्या होत्या .... म्हणून ती हडळ तिथे ठाण मांडून बसली आहे असा समज होता ....
आजार कुणीही त्या जटा काढून जाळल्या नव्हत्या .. कारण ती हडळ तसे कुणालाच करू देत नव्हती .....
क्रीत्येक तांत्रिक आले मांत्रिक आले ..ती मात्र तिथेच राहिली.........बाकीचे पळून गेले .....

त्या वाड्याला त्या काळ आत्म्याने ग्रासून ठेवले होते .....

एकदा थोरले गायकवाड रंगराव ..... तिथे हिम्मत करून घुसले .... ते काही परत बाहेर आलेच नाहीत .....
म्हणून वाड्याचे नामकरण रंगराव गायकवाडांचा वाडा असे झाले .. खरेतर त्या हडळीने त्यास इतका लौकिक प्राप्त करून दिला होता .....
वाड्याच्या खिडक्या अजून ही सगळ्या शाबूत होत्या .... एकाध दोन फुटल्या तरीही दुसर्या दिवशी अचानक त्या तयार .........
वाड्याचा मुख्य दरवाजा मात्र नेहमी खुला असे ....फक्त रात्रीच तो बंद होत असे ......

वाडा वाडा वाडा ............. गाव त्याच्या नावाशिवाय काहीच नव्हता .....
गेल्या अडीच वर्षापूर्वी तिथे तीन अमेरिकन वैज्ञानिक आले होते ....
हडळ म्हणजे काय ते पाहायला ...... तिने तिन्ही तोंडाने तिघांचा घास घेतला .........

आता काय .... फक्त सैनिकी कारवाई शिल्लक होती .....

तसा तिचा कुणालाही त्रास नसे ...
फक्त वाड्यात जो शिरला तो बाहेर पडत नसे .......तसे त्या वाड्यालाही एकच दार होते ..... जाणार तेथूनच बाहेर पडणार ....
चोर दरवाजा .. मागचा दरवाजा असे खूळ काहीच नाही ..... मग आतल्या आत ही माणसे कुठे जात असावी ...????? नक्कीच हडळ की आणखीन काय ......???? त्या देवास ठाउक ....!!!

नाही नाही म्हणता आपल्याच मित्राच्या खानदानीत असे वाईट घडत आहे हे पाहवले नाही ......
आता पर्यंत भुताटकीचा अभ्यास भरपूर झाला होता ... अतृप्त आत्मा ... वेताळ ... पिशाच्च ... राक्षस .... चेटकीण ... हडळ ..... वास्तू पुरुष ..... क्रीत्येक अभ्यासून झाले होते ....
आता वाटले जरा प्रात्यक्षिक ही करू ....
म्हणून आम्ही चौघे .. मी, फिरोज , अमित आणि गायकवाडांचा जयराज ...
असे तिघे तयारीनिशी निघालो .....

सासवडहून खाली भिरोबाच्या देवळा नंतर उजव्या हाताला पुढे गेल्यास वीस एक मैलावर एक मोठ्ठ तळे आहे तळ्याच्या अगोदरच गाव .... मौजे कुळवाडी .....
कुळवाडी कुप्रसिद्ध वाड्यासाठी..... पण प्रसिद्ध होती त्या अगोदर त्या गायकवाड घराण्यामुळे .....
गायकवाड घराणे खालसा झाली ... सगळ्यांना वाटून देण्यात आले .... तरी ह्या कुळवाडीच्या गायकवाडांचा आणि त्या घराण्याचा काही संबंध नसल्याने ....
कुळवाडीचा हा वाडा असाच दूरलक्षित राहिला ....
हाही वाडा फक्त नावामुळे सरकार जमा होऊ नये म्हणून ... काही रामोशी मंडळी तिथे गायकवाड बनून राहू लागली ....
रोज दारू मटन नुसता धिंगाणा चालायचा .... रामोश्यांनी नुसता गायकवाड नावाचा संबंध घेतला होता ... कर्तुत्व शून्य ...!!!
गायकवाड वाड्याचा असा गैरवापर होऊ लागल्याने .. खरे संस्थानिक रंगराव ह्यांनी तिथे पोलिसी कारवाई करून रामोश्यांना बाहेर काढले ....
अन त्या नंतर तिथे .... हा हडळीचा प्रताप सुरु झाला ..... कुणी म्हणे त्या रामोश्यानीच तिला इथे आणले ....

इतका इतिहास हा पुरेसा नव्हता त्यामागच्या तपासासाठी .....
कारण मुळात आम्हाला असे वाटत होते .... की रामोश्यांना मुळातच असे जादू टोना किव्वा चेटूक जमत नव्हते .... ते तर कोणत्याही गावातील ..गुरव करत असे ....
म्हणून आम्ही अगोदर कुळवाडीच्या गुरवाची भेट घेतली ......

शामू गुरव .... आता गावात शाळेत शिकवत असतो ... मास्तर आहे
त्याच्या आज्जाने म्हणजेच उमाजी गुरवाने त्या रामोश्यांना मदत केली असे कळले ...
मग पुन्हा जरा पेचात पडलो .... की मुळात ती हडळ वाड्यातच होती की रामोश्यानी आणली की गुरवाने पोहचवली ?????
बर्र इतके सारे घडे पर्यंत गायकवाड झोपले होते काय ??
किव्वा त्या वाड्यात नक्की असे काही असणार की गायकवाड मुद्दाम त्या वाड्यात कुणाला शीरू देत नसावेत ...
हडळ तर नुसते थातूर मातुर खेळ आहे ... आणि गुरव आणि रामोशी नुसता एक संदर्भ असावा ....

खरे तर भरपूर मोठा वाडा होता तो .... वाड्यात एकूण २४ खोल्या होत्या .... मुख्य दारानंतर लगेच अंगण अंगण संपतो न संपतो तेच देवघर ......
गायकवाडांचे कुलदैवत भिरोबा तेही तिथेच .... मग तरीही ..?????

सारे काही गोलमाल होते ....

जयराज आणि आम्ही सारी माहिती मिळवल्यानंतर आता वाड्यात शिरण्याचे ठरविले .. ते ही अगदीच अमावास्येला .....
बघू तरी निदान ती हडळ एका वेळी चार जणांना कसे खाते ती ????
या पूर्वी रंगराव .... मग ते तिघे अमेरिकन आता आम्ही चार .... ...... ..... ....

रात्रीचे ७ वाजले ....
घड्याळ बघून वाड्यात आवाज सुरु झाले ....
कुठून कुठून प्रकाश सारखा येत जात होता .....
मुख्य दरवाजा खचकन बंद झाला .... अगोदरच आम्ही वाड्यात प्रवेश केला होता .....
नाही नाही म्हणता फिरोज अल्लाह अल्लाह करू लागला .....
अंगणात जमीन सारवलेली होती ... अगदी ताज्या शेणाचा वास होता तो .....
म्हणजे कुणीतरी नक्की इथे राहत असावे ह्याचा अंदाज बांधला ....
वाड्यात देवघरात तितका अंधार होता ..... पण इतर खोल्यातून येणारा प्रकाश सारखा सारखा देवघर उजळत होता .....
फिरोज जरा सैल पडला .... त्याला पाणी पाजून ... आम्ही सारे देवघरातच जरा विसावलो ....
आता ते आवाज इतके वाढले होते ... की जणू आताच बाजूने कुणी गेले आहे असे भास होऊ लागले ....
गावातली कुत्री तर कधीच शांत झाली होती ....
आम्ही मशाली पेटवल्या .... विजेरी पेक्षा त्या बर्या पडतात
कारण भूत म्हणे आगीला घाबरतात .....
चौघेही ... आता माडीवर पोहचलो होतो ...
स्वयंपाक घराच्या वरच्या माडीवर आम्ही आता उभे होतो .....
इतक्यात क्यावू क्यावू करत एक मांजर पळाली ....
अमित थंडच पडला ....
जयराज आणि मी अजून घाबरलो नव्हतो कारण आम्हा दोघांनाही त्या तीन मुंडीवाल्या हडळीचा फोटो काढायचा होता ...
त्याच खोलीत कुणीतरी काही खात असल्याचा ..... आवाज येत होता ...
अगदी मीच मीच आवाज करीत उपाशी कुत्री कशी खातात तसा आवाज होता तो .... अगदी किळसवाना ....
दरवाजा उघडला .... कार्र्र्र आवाज झाला .... बिजागर्या सैल होत्या दाराच्या .....
सगळ्यात पुढे जयराज मागे मी माझ्यामागे अमित आणि अगदी टोकाला फिरोज ................
त्या हडळी साठी आमची चांडाळ चौकडी सज्ज होती ....
मशाल जरा पुढे केली ..
तर पाहतो तर काय .........
खरच खरच खरच .... तीन मुंडी वाली हडळ ......!!!!!!!!!!!!!!!

खिडकीखाली जमिनीवर एक ताट ठेवले होते .... ताटाच्या उंचीवरच फक्त तिच्या त्या मुंडक्या होत्या .....अन ती अघोरी सारखी ते काही खात होती ....
फिरोज पळाला .. अमित ही पळाला ...... रामराम रहीम रहीम .... दोघे ही गायब ......
फक्त जयराज आणि मी ... मशाल धरून बघत होतो ... इतक्यात ती हडळ किंचाळली .....
किंचाळली कसली चांगलीच केकाटली ....
आमची तर जागेवरच झाली होती .....
इतक्यात जयराज म्हणाला ....," नीट बघ ताट तीन आहेत ....
आणि त्या आरश्यात बघ आपणही तीन दिसतोय .."

झाली सारी भीती निघाली ....
पुढे सरून बघतोय तर काय जमिनीला एक मोठे छिद्र पाडून ती बया उभी होती
तिची एकच मुंडकी आरश्यात तीन तीन दिसत होती ....
आरश्याचा असा काही कोन केला होता .... की पाहणाऱ्याला वाटे .... तीन मुंडीवाली हडळ .....!!!!

आता आम्ही स्वतः वरच हसत होतो ....
झाला प्रकार.. खरंच फार भयावह होता .....

तिला धरून गावात आणले आणि पोलिसांना दिले ..
तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला ....
फिरोज आणि अमित दारातच घाबरून पडले होते ... बेशुद्धच झाले होते ... कारण दरवाजा काही खोलता ... येईना ....
आम्ही बाहेर पडताना नीट पाहिले मुख्य दरवाज्याला अगदी बारीक अशी एक कडी होती आतून ... जी फक्त नीट पाहनार्यालाच दिसेल .. घाबरलेल्याला नाही ....

तिने सारी हक़िकत सांगितली ...
" रामोश्यांना वाड्यातून काढल्या नंतर तो वाडा पुन्हा गायकवाडांना मिळू नये म्हणून ह्या गुरवाने आणि रामोश्याने ही युक्ती केली होती ...
आता पर्यंत त्या वाड्यात अश्या रामोश्यांच्या पाच बायका हडळ म्हणून वावरत होत्या ....
बेशुद्ध पडलेले रंगराव आणि ते तिघे ह्यांना ह्यांचेच सहकारी म्हणजे रामोशी उचलून वाड्याच्या मागे गाडून टाकत असत ....
वाड्यात रामोश्याच्या लुटीची सारी रक्कम ... दाग दागिने होते .... आणि ते कुणाला सापडू नये म्हणून हा सारा तमाशा ..... "

चला ... जयराजला त्याचा वाडा मिळाला .... आम्हाला त्या लुटीचा माल पकडून देण्यात आला म्हणून बक्षीस मिळाले ...
हडळीचा त्रास आता संपला होता ... तीन मुंडी पातळ धुंडी झाली होती .... अन वाड्या मागच्या त्या हडळीच्या जटा म्हणजेच रंगरावांची कबर आता सार्वजनिक पूजेचे स्थळ झाले होते ....

देवघरात आता रोज भिरोबा प्रकाशित असतो ....
कुळवाडीत आता हा वाडा .. एक नवा इतिहास बनलेला असतो .....


:- सुजीत ( धवल ध्रुव )


Return to “कथा, गोष्टी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1824
Total topics 1437
Total members 643
Our newest member 4295
No birthdays today