फिरती

कथा, गोष्टी केवळ इथेच!
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
latenightevent
Rgistered member
Rgistered member
Posts: 15
Joined: 20 May 2016 19:49
नाव: Abhishek
आडनाव: Buchke

फिरती

Postby latenightevent » 07 Sep 2016 01:36

@Puneri_Misal #पुणेरी_मिसळ #माझे_ पुणेरी_अनुभव

श्रावणाचा पहिला दिवस होता. आजही पावसाची संततधार चालूच होती. गेले तीन दिवस पाऊस काहीच हालचाल करू देत नव्हता. हालचाल करून खूप मोठं कार्य तडीस न्यायचं होतं असंही काही नव्हता म्हणा. तीन दिवसांपूर्वी काहीतरी काम होतं म्हणून बाहेर पडलो होतो. बाहेर पडताना आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली होती. पण छत्री किंवा रेनकोट घ्यायचा कंटाळा आला होता. अंगात नवीन स्वच्छ कपडे होते. त्याच दिवशी #अण्णाभाऊसाठे जयंती आणि #टिळकपुण्यतिथी होती. मी पुण्यात होतो. तसाच @बाजीराव_रोडला भटकत गेलो. जे ऑफिस गाठायचं होतं तेथून बराच लांबचा असा #पीएमटी स्टॉप नशिबी आला. मग मोबाइलवर ते ऑफिस जीपीएस च्या माध्यमातून शोधत गल्ली बोळं फिरू लागलो. पुण्यातली लहान-मोठी रस्ते फिरताना बरं वाटत होतं. पावसाची रिपरिप चालूच होती. फार मोठा नाही म्हणून मीही तसाच फिरत होतो. पण रिपरिप पाऊसही बर्‍यापैकी भिजवून गेला. जवळचा नॅप्किन काढून शक्य तो भाग पुसून काढला. शेवटी शोधत-शोधत ऑफिसला पोचलो तर तिथे ज्याच्याशी काम होतं ते उपलब्ध नव्हते. तास-दीड तासाने भेटतील असं कळल्यावर परत मागे फिरलो.

सकाळच्या नाश्त्याला खाल्लेल्या पोह्याचा जोर ओसरला होता. पाऊस चालू होता. मग एका फक्कड हाटेलात गेलो. गरमा-गरम #मिसळ खायची हुक्की आली. “हाटेल” हे हाटेलच होतं अगदी. कोणीतरी पूर्वजांनी सुरू केलेला गल्ला पुढे चालवत बसला होता एकजण. जुनं बघूनच वाटलं होतं इथे अस्सल #पुणेरी चवदार काहीतरी भेटेल. दुकानात हे लोक साले पूर्वजांचे फोटो का लावतात तेच कळत नाही. नेहमी येणार्‍या गिराईकाला, ‘पूर्वीचा गेला, आता व्यवहार माझ्याकडे’ हे लक्षात आणून देण्यासाठी असेल कदाचित. पण तस्वीर तरी जरा चांगली निवडावी. छे! तो फोटोतला कोण जुना मालक, म्हातारा येणार्‍या-जाणार्‍याच्या ताटात बघितल्याप्रमाणे वाटत होतं. मी मागवलेल्या मिसळीकडेही त्याची नजर आहे असं वाटत होतं. मिसळ म्हणजे काय तर, भाडखाऊ ने चहाच्या पात्रात तेलकट रस्सा गरम केला आणि पलीकडे पत्र्याच्या डब्यात केंव्हातरी ठेवलेलं फरसान काढलं. त्यात रस्सा ओतला. कुठूनतरी पाव हजर झाले. एका थाळीत माझ्यासमोर आणून आपटले. दरम्यान फोटोतून जुना मालक #रंभा-उर्वशीमधून फुरसत काढून बघत होताच. मला वाटलं, चला चव तरी चांगली असेल. त्या पोर्‍याला वाटीत रस्सा आणायला सांगितला. एखाद्या गुन्हेगाराने जेलमध्ये पोलिसाकडे दारू-सिगार मागवावी आणि पोलीसाने त्याकडे ज्या भावनेने बघावे तसा तो पोर्‍या माझ्याकडे बघत पाठीमागे वळला अन मघाशी उकळलेला रस्सा एका वाटीत आणून माझ्यासमोर आदळला. मला उगाच हसू आलं. मनात त्याला किलोभर शिव्या दिल्या. पण पोट अन जीभ तृप्त झाली असती तर नंतर आशीर्वाद देऊन त्यात संतुलन साधावं असाही विचार केला.

मिसळ जिभेवर ठेवली अन घोर अपेक्षाभंग झाला. निव्वळ रद्दी अन भंगार मिसळ होती. एक-एक घास घेता घेता शिव्या देत होतो. फरसान तर साला फोटोतल्या म्हातार्‍याच्या जमान्यात आणून ठेवलं होतं की काय कोण जाणे! मी त्या म्हातार्‍यालाही शिव्या दिल्या. म्हंटलं, बघ बाबा तुझ्यामागे काय हाल चालू आहेत तुझ्या धंद्याचे. तो बिचारा अप्सरेच्या हातून फळं खात म्हंटला असेल, भडव्या मी असतानापेक्षा खूप बरे आहेत, मी एक्स्ट्रा रस्सा कधीच देऊ दिला नसता. मी मनातच इंद्रदेवाला विनंती केली आणि म्हंटलं, म्हातार्‍याला शिळे झालेले अंगूर खाऊ घाल म्हणजे हरामखोर ताळ्यावर येईल. कशीतरी मिसळ संपवली. म्हातारा बघत होताच. लालभडक तेलाचे तवंग आणि त्यात भुसकट झालेल्या फरसानच्या गाठी. पलीकडच्या टेबलवर कोणत्यातरी कंपनीत वगैरे काम करणारे तीन लोक येऊन बसले आणि काहीतरी मादक-अश्लील गप्पा करत होते. कोणत्यातरी बाईवर त्यांची टीका-टिपन्नी चालू होती. मी जाणीवपूर्वक संथपणा आणला अन कान टवकारून त्यांचं बोलणं डोळे तिसरीकडे ठेऊन ऐकू लागलो. दोन-पाच मिनिटांत पोर्‍याने माझ्या टेबलवर पाण्याचा ग्लास खडकण आपटला. ऐकण्यातील रेषेत तुटकपणा आला. त्याने मिसळीची डिश उचलली. वाटीतील रस्सा घेतला नाही बघून परत तो पोर्‍या माझ्याकडे खुन्नस देऊन बघू लागला. मी ह्या वेळेस हसलो नाही. फार नखरे केले तर त्याच्या मिसळीची औकात काढायची ठरवलं होतं मी. मी त्याच्याकडे तसाच बघितल्याने तो बिचारा गप निघून गेला. माझ्या डोळ्यासमोर नको तो प्रकार घडला. तो डुक्कर तिकडे जाऊन मघाशी ज्या पात्रात मिसळ तापवली त्यातच मी शिल्लक ठेवलेली मिसळ मिसळली. कुत्रा! माझं डोकं सरकलं. काय खाल्लं म्हणून किळस आली. पलीकडे बेसिनमध्ये जाऊन हात धुतला अन दोन-तीन चुळा भरल्या. समोर लिहिलं होतं, चुळा भरू नका, मी अजून दोन-तीनदा चुळा भरल्या. थंड पावसात मला राग चढला होती. नंतर वाटलं उगाच चुळा भरल्या, पाणी तोंडात घ्यायच्या लायकीचं नसावं.

परत टेबलवर जाऊन बसलो. तोपर्यंत त्या तिघांच्या @adult गप्पा संपल्या होत्या. मला वाईट वाटलं. मी एक क्षण बसलो. परत पोर्‍या आला आणि म्हणाला, ‘तहा आणू ता???’ मी ताडकन त्याच्याकडे बघितलं. तिच्या आईला म्हंटलं, हा तर तोतरा!!! मनात जोरजोरात हसलो. तिकडे फोटोतून म्हाताराही हसतो आहे असा भास झाला मला. मी त्याला म्हंटलं ‘आण’. मला खरं तिथे पाणी प्यायचीहि इच्छा नव्हती पण ते तिघे पुन्हा काही ‘विषय’ काढतात का याची उत्सुकता तर होतीच शिवाय पोर्‍याची गम्मत पाहायची होती. बिचारा तोंडाऐवेजी डोळ्याने जास्त का बोलतो याचं गुपित कळलं होतं. चहा आला. मला फार इच्छा नव्हती पण गरम वाफा बघून सहज ओठांवर कप टेकवला तर फक्कड चहाची चव मिसळीच्या रद्दीला लाजवणारी होती. चहा अगदी #खुंखार होता. पावसाच्या भिजण्याने अंगात आलेला तुटकपणा अन आळस चहाच्या एका घोटाने गेला. मस्त घोट-घोट चहा घेतला. त्या तिघांनी परत काही चर्चा केली नाही याचं वाईट वाटलं. म्हातारा बघत होता, इंद्राला तक्रार केल्याने चहा चांगला भेटला असं वाटलं मला. म्हातार्‍याकडे मी बघितलं नाही. त्या फोटोतल्या विद्रूप चेहर्‍यावर कपाळावर, दोन कानांवर अन गळ्यावर अष्टगंध लावल्याने तो अजूनच विद्रूप झाला होता. मी चहाकडे लक्ष दिलं. समोर दरफलक होता. मिसळ अन चहा धरून ४३ अर्थात त्रेचाळीस रुपये झाले होते. मला आता हसू आवरेना. मी तोंडावर हात ठेऊन हसत होतो. नशीब म्हातारा सोडून अजून कोणी बघत नव्हतं माझ्याकडे.

चहाची चव जिभेवर अन अंगात रेंगाळून झाल्यावर मी पोर्‍याला बोलावलं अन विचारलं, ‘किती झाले?’ मला प्रचंड उत्सुकता होती तो काय बोलतो याची. त्याने बोटावर अन मेंदूत काहीतरी आकडेमोड केली अन उत्तरला, ‘तेतालीस’ मी मनातच आडवा-तिडवा होऊन हसलो. म्हंटलं, साल्या बघ माझ्याकडे अजून खुन्नस देऊन… बघशील का… मी न समजून परत विचारलं, किती? तर तो चिडून म्हंटला मितळ पत्तीस अन तहा आठ… तेतालीस… फोती ट्री… मी म्हातार्‍याकडे बघितलं, तो तिकडून हसत होता. मी मनात मनमुराद हसून घेतलं अन शेवटी उठलो. तोंड दाबून हसल्याने माझं पोट उडत होतं. त्याचे तेतालीस रुपये दिले. साला मालक तीन रुपये सुट्टे मागत होता. हे लोक धंदा कशाला उघडून बसतात तेच कळत नाही. दिले पैसे अन परत भुरभुर पावसात फिरायला लागलो.

पण वरुण पडत असलेल्या पावसाने अन अंगतील थंडीने शरीरातील पाणी जास्त झालं आहे ते बाहेर काढ असा आदेश मेंदूने द्यायला सुरुवात केली. अर्थात, जोराची लागली होती. थोडसं इकडे-तिकडे आडोसा शोधत होतो. काही सापडलं नाही. शेवटी मग भारत संचार निगम लिमिटेड मध्ये घुसलो. तिथे सगळा भूलभुलय्या. मुतारी होती की खजिना, इतकं लपवण्यासारखं काय होतं त्यात. शेवटी सापडली. रिता झालो. पुन्हा रिपरिप पावसात भटकंती. अजून ऑफिस मध्ये जायला बराच वेळ होता. मग चक्कर सहज #सारस_बागेकडे वळली. अण्णा भाऊ साठे जयंती होती. मिरवणुका जोरात चालू होत्या. झिंगाट, मुंगळा वगैरे डीजे गाण्यांवर थिरकणे चालू होतं. कुठल्यातरी कॉलेज मधल्या मुली चौकात उभारल्या होत्या. त्यातली एक उत्साही गाबडी उगाच थिराकायला लागली. तिला आर्ची असल्याचा भास होत होता कदाचित. बिचारी वेंधळटासारखी नाचत होती. मलाही नाचावं वाटत होतं पण भिकारचोटपणा नको म्हणून उगा बघत होतो. रिपरिप पावसात चंगळ चालू होती नाचणार्‍यांची. त्या पोरीने तर कहर केला.@ नागराज_मंजुळे बघत असेल असं तिला वाटत असावं. थोडा वेळ फिरलो आणि पुन्हा ऑफिसकडे गेलो. साधा चहाही विचारला नाही. भर पावसात फुकटाच्या चहाची आस धरणे काही गैर नाही. त्यात मी जरा भिजलेलो होतो. पंधरा मिनिटांत काम झालं. निघालो. मजेशीर अनुभवांच्या यादीत अजून एक भर पडली!
Our Website - http://latenightedition.in/wp/?p=1904


Return to “कथा, गोष्टी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1824
Total topics 1437
Total members 643
Our newest member 4295
No birthdays today