ओळीमधला एक व्यक्ती - [भाग २/३]

कथा, गोष्टी केवळ इथेच!
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
kumarsonavane
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 30 Dec 2015 19:09
नाव: कुमार
आडनाव: सोनवणे

ओळीमधला एक व्यक्ती - [भाग २/३]

Postby kumarsonavane » 06 Jan 2016 17:00

marathistoryblog.wordpress.com

‛370’ चा आकडा पाहताच तीचा सगळा आनंद मावळला. या वेळेसही केक नाही हे कळातच नातीचे डोळे भरून आले. आज्जीला तिचा रडवेला चेहेरा पाहवेना. तिने नातीला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिचं काहीएक ऐकून न घेता ती ओरडली.

" … पण आज वाढदिवस आहे ना… मग केक नको?"
"शोन्या आपण पुढच्या वेळेस नक्की घेऊ."
"मागच्या वेळेस पण तु अशीच म्हणाली होतीस."

आज्जीला काय बोलावे ते सुचेना. काय बोलणार? गेल्या दोन महिन्यांपासून नात या दिवसाची तयारी करतेय. बर्थडे च्या दिवशी काय काय करायचे याचा प्लॅन तीने दोन महिन्यांपूर्वीच तयार केला होता. आणि आत्ता हा सगळा प्लॅन फेल होणार होता. पण आज्जी तरी काय करणार, तिच्या कडे दुसरा पर्यायपण नव्हता.
"बाळा वाढदिवसाला केक कापावाच लागतो असे काही नसते………आपण घरीच काहीतरी करु ……. तुला ते चॉकलेट पाहिजेना चल आपण घेउ." तिने नातीला समजावण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला पण नातीचे कशानेच समाधान होईना. तशीच कशीतरी समजूत काढून ती नातीला घेऊन सुपरमार्केटच्या बाहेर पडली.

बिलिंग काउंटरच्या त्या ओळीत नातीच्या मागे एक तरुण उभा होता. आज्जी आणि नातीचा केकचा हा सर्व खेळ त्याने पहिला होता.
सामानाचं बिल झाल्यावर तिथेच टेबलावर ठेवलेला तो केक त्याने उचलला आणि त्याचेही बिल करण्यास सांगितले. सगळ्या वस्तू घेवून तो घाई - घाईने बाहेर आला.

बाहेर रस्त्यावर आज्जी नातीला घेऊन रिक्षासाठी थांबली होती. नात अजूनही हुंदके देऊन रडत होती.
तिच्या समोर तो केक धरत तो तरुण म्हणाल," हे घे माझ्यातर्फे तुला गिफ्ट".
केक पाहताच नातीचे डोळे आनंदाने चमकले. पण आज्जी त्या तरुणाला म्हणाली.
"माफ करा मी हा केक नाही स्वीकारू शकत".

"का?", त्याने थोडेसे आश्चर्याने विचारले.
“तिला अशी सवय लागु नये म्हणून”.
“तुम्ही काय म्हणताय ते मला कळलं नाही” - तरुण.

"पुढे आयुष्यात अश्या अनेक अडचणी येतील त्यावेळेस त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कदाचित ती अशीच कुणाच्यातरी मदतीची वाट पाहत बसेल. आणि तिच्यावर असे संस्कार होऊ नये म्हणून मी हा केक नाही घेऊ शकत. प्लिज तुम्ही राग मानू नका".

आज्जीचं बोलणं ऐकूण तो तरुणही दोन क्षण थांबला पण लगेचच तो म्हणाला,
"ही मदत नाहीये, हे तर फक्त आनंदाचे फक्त काही क्षण आहेत जे मी आजपर्यंत कुणाला देऊ नाही शकलो."
"म्हणजे?" काहीच बोध न झाल्याने आज्जीने विचारले

"आज जसा तुम्ही हिला स्वावलंबनाचा धडा देत आहात तसाच एक धडा मला माझ्या लहानपणी मिळाला होता".
त्याच्या बोलण्यातून अजूनही काहीच उलगडा होत नव्हता पण आज्जीची उत्सुकता मात्र वाढली होती.

तो सांगू लागला, "मी तेव्हा 8 वर्षांचा होतो, माझ्या वाढदिवसाचा केक घेण्यासाठी मी आई बरोबर एका दुकानात गेलो होतो. पण त्यावेळेस आईकडे पुरेसे पैसे नव्हते त्यावेळेस माझ्या मागे उभे असलेल्या एका व्यक्तीने त्याचे स्वतःचे सामान न घेता मला त्या पैशातुन केक विकत घेऊन दिला आणि सांगितले कि मोठा झाल्यावर जर तुला कधी कोणाची मदत करायची संधी मिळाली तर ती तू सोडू नकोस, ज्यावेळेस तू कोणाचीतरी मदत करशील त्यावेळेस मला माझे पैसे परत मिळाले असे समज".

आपल्या पाणीदार डोळ्याने आज्जीकडे पाहत तो म्हणाला "आज त्या व्यक्तीचे आभार मानायची संधी मला मिळाली आहे तरी कृपा करून तुम्ही हा केक घ्या".

तरुणाचे बोलणे ऐकून आज्जी भारावुन गेली तिने केक घेतला पण तरीदेखील असे विनामोबद्दला तो केक घेणे तिच्या मनाला पटेना. तिने त्या तरुणाला त्याचे पैसे परत करण्याच्या हेतूने त्याचं नाव आणि पत्ता मागितला. त्या तरुणाने एका कागदावर नाव आणि पत्ता लिहून ती चिट्ठी नातीच्या हातात दिली. ती चिट्ठी आणि केक घेऊन नात उड्या मारतच घरी पोहोचली.

क्रमशः


कृपया पूर्व-परवानगीशिवाय ही कथा कुठेही वापरू नये.
अधिक कथांसाठी मझ्या ब्लॉगला भेट द्या - marathistoryblog.wordpress.com


Return to “कथा, गोष्टी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 14 users online :: 0 registered, 0 hidden and 14 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1801
Total topics 1436
Total members 635
Our newest member rushidshinde
No birthdays today