ओळीमधला एक व्यक्ती- [भाग १/३]

कथा, गोष्टी केवळ इथेच!
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
kumarsonavane
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 30 Dec 2015 19:09
नाव: कुमार
आडनाव: सोनवणे

ओळीमधला एक व्यक्ती- [भाग १/३]

Postby kumarsonavane » 05 Jan 2016 16:32

“आज्जी चॉकलेट?”,

सामानाची ट्रॉली घेऊन चॉकलेटच्या रॅक पाशी थांबलेल्या आपल्या सात वर्षांच्या नातीचा प्रश्न ऐकून आज्जी क्षणभर थबकली. पण लगेचच स्वत:ला सावरत ती म्हणाली,
"नको बाळा, चॉकलेटने दात खराब होतात."

मेनरोडवरच्या त्या सुपरमार्केट मधला आज्जी आणी नातीचा हा ठरलेला संवाद. दरवेळी नात चॉकलेटची
मागणी करत आणी दरवेळी आज्जी ठरलेलं उत्तर देत.
चॉकलेट मिळालं नाही म्हणून नात खट्टू झाली पण थोड्याच् वेळात हसत-बागडत आणी पुन्हा आपल्या विश्वात दंग होऊन ती आज्जीच्या मागे - मागे ट्रॉली ढकलत जाऊ लागली.

शक्य असेल त्यावेळेस आज्जी न मगताच तिला चॉकलेट घेऊन देईल हे तिला ठावुक होते. त्यामुळे हट्ट करण्याची गरजच नव्हती. बाबा गेल्यानंतर आणी आजोबा व्हीलचेअरवर बसल्यापासून आज्जीला किती कष्ट घ्यावे लागत आहे हे ती पाहतच होती, त्यामुळे ति कधी हट्ट करत नसे. आत्ताही तिने फक्त मागून पाहिले. ‘मिळालं तर मिळालं’.

यादीतील एक-एक सामान गोळा करण्यात आज्जी गुंग होती, तर ट्रॉलीत बसलेल्या ‛प्रवाशांना’ त्यांच्या ‘गंतव्य’ स्थानपर्यंत पोहचवण्यात नात दंग होती.
सुपर मार्केट मधल्या त्या गुळगुळीत ‘रस्त्यावरुन’ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ‛वाहनांना’ चुकवत आणी सामानाच्या ‘बिल्डिंगांमधुन’ रस्ता शोधत ती ट्रॉलीची गाड़ी चालवायला तिला खुप आवडायचं. सुपरमार्केट आवडण्याचं हे तिचं दुसरं महत्वाचं कारण.
"पहिलं?" अर्थातच - ‘चॉकलेट’.

प्रत्येक वस्तु घेताना आज्जी त्याचं बारीक निरीक्षण करी. चार - चार वेळा वर- खाली फिरवुन व्यवस्थित वाचून - बघुन मगच ती वस्तु घेत.
खरेदीच्या बाबतीत तीचा एक साधा आणी सरळ फॉर्म्युला होता. चव, वास, रंग, क्वालिटी, ब्रॅण्ड असल्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करून ती फक्त एकच गोष्ट चेक करायची - ‛किंमत’.
सगळं सामान तिला 2000 रूपयांमधे बसवयाचे होते त्यामुळे स्वस्तातले स्वस्त सामानच निवडणे तिला भाग होते.

अश्याच ‛स्वस्त’ प्रवाशांनी नातीची गाड़ी पूर्ण भरली होती आणी आता ती गाड़ी तिच्या अखेरच्या स्टॉपवर पोहोचली होती - ‛बिलिंग काउंटरच्या’.
काउंटरवरच्या मुलीने त्या ट्रॉलीतले सामान टेबलावर ओतलं आणी बारकोड रीडरने प्रत्येक वस्तुचे बिल करू लागली.
"1940 रूपये", कॅरीबॅग मध्ये सामान भरत ती मुलगी म्हणाली
आज्जीने पर्समधल्या हजार हजारच्या दोन नोटा तिच्या हातावर टेकवल्या आणी ती कॅरीबॅग नातीच्या हातात दिली. यादीतल्या सामानाचा आणी पर्समधल्या पैशांचा योग्य मेळ बसवल्यामुळे ती स्वतःवरच खुश झाली.
सामानाची पिशवी हातात पडताच नातीने सम्पूर्ण पिशवी धुंडाळुन काढली पण तिला अपेक्षित असलेली गोष्ट त्यात दिसलीच नाही. तिने चमकुन आज्जीकडे पाहिले आणी म्हणाली,
"केक?"
‛केक’ हा शब्द ऐकताच आज्जीचं तोंड बारीक झालं. इथं येऊ पर्यन्त नातीने सारखा केकचाच धोशा लावला होता. तरी शेवटी केक घ्यायचा राहुनच गेला. याचं तिला आच्छर्य वाटलं.
तीने पर्स उघडून पाहीले त्यात अवघे 105 रुपये शिल्लक होते. त्यातले 30 रुपये रिक्षाला जाणार. राहीले 75 रुपये.
‛आत्ता काय करायचं’ ती विचारात पडली. गेल्या दोन महिन्यापासून नात या दिवसाची वाट बघतेय, केक घेऊन देणं तर भागच होतं.

75 रुपयांमध्ये काही मिळतेय का ते पाहण्यासाठी ती केकच्या रॅक पाशी गेली. प्रत्येक केक समोर त्याच्या किमतीचे लेबल लटकत होते. Rs 220, Rs 240, Rs 345, Rs 460, Rs 550......
लेबल वाचून तिला धडकीच भरली.
"आत्ता नातीला काय सांगणार?" या विचाराने हताश होऊन ती खाली बसली तेवढ्यात कोपऱ्यातल्या एका केकवर तिची नजर गेली त्यावरची किंमत पाहून तीचा विश्वासच बसेना - “70 रुपये”. केक पाहून तीला प्रचंड आनंद झाला. केक घेऊन ती घाई - घाईने काउंटरपाशी आली. काउंटर वरच्या मुलीच्या हातात तो केक देऊन तीने 70 रुपये पुढे केले.
तिच्या हातातल्या पैशांकडे पाहून ती मुलगी चपापली एक क्षण तिने आज्जीच्या तोंडाकडे पाहिले आणी दुमडलं गेलेलं लेबल उघडून दाखवत ती म्हणाली, "मॅडम हा केक 370 रुपयांचा आहे".

क्रमश:


Return to “कथा, गोष्टी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 17 users online :: 0 registered, 0 hidden and 17 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today