" The Original Love Story" ( Part 2)

कथा, गोष्टी केवळ इथेच!
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
Vinit
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 29 Sep 2014 11:29
नाव: Vinit
आडनाव: Dhanawade

" The Original Love Story" ( Part 2)

Postby Vinit » 30 Sep 2014 11:25

" सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . ," बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला . " आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , ....... अरे आहेस का विनू . " , " हो ..... हो … आहे , बोल बोल , मला वाटलं भास झाला मला .","अरे माझ्या फोन चा problem आहे रे म्हणून कट् झाला." , " अरे तू काही तरी सांगत होतास ना.. ","अरे ...... आपली सुची भेटली होती पुण्याला... ","कोण ? " , " अरे ' सुची ' .... आपली .... तुझी ' सुची '. "पुन्हा एकदा वीज कडाडली ..... आणि शांतात ... सगळं शांत झालेलं ,..... " Hello ..... Hello ..... ." विनू फोन पकडून तसाच उभा होता . कूठेतरी हरवून गेलेला , " Hello ..... Hello ..... .विनू ... विन्या " , " खरंच भेटली होती का रे ती ?" विनू पुन्हा भानावर आला .

" कशी आहे रे ती ? "," छान आहे पहिल्यासारखीच , विचारात होती सगळ्यांना .... आणि तूलाही विचारला तिने , विनू कसा आहे म्हणून ." टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात," अजूनही लक्षात आहे मी तिच्या ." विनू मनातल्या मनात बोलला." जास्त काही बोलली नाही , घाईत होती , मी तूझा फोन नंबर दिला आहे , करेल बोलली फोन तुला . " आणि फोन पुन्हा कट्ट झाला. " सुची भेटली होती ,माझी सुची " विनूला विश्वासच बसत नव्हता, पण सुची कधी फोन करणार हे तो बोललाच नाही . मग विनू त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता , खूप वेळा "try " केला पण व्यर्थ. थोडयावेळाने विनू शांत बसला, रात्री चे १२. ३० वाजले होते. इतक्यात फोन वाजला " बर झाले , याने call केला परत." पण अनोळखी नंबर होता ." Hello .... Hello .... अरे बोल ना .... " पलिकडून काही आवाज आला नाही . फोन तर चालू होता . " Hello .... विनू " हळूच आवाज आला फोन मधून , तो आवाज ऐकून विनू स्तब्ध झाला . सहा वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता.

"Hello .... विनू ... आहेस ना रे ... ओळखलंस का मला ?", " तूला कसं विसरणार " , " कसा आहेस ? ", " ठीक आहे , तू कशी आहेस ?" , " बरी आहे . " आणि दोघेही गप्प . खूप वेळ दोघेही काहीही बोलले नाहीत . एकदम विनू बोलला ," मला तुला भेटायचं आहे , कधी भेटशील ?" ," मलाही भेटायचं आहे तुला, मी सध्या पुण्यात आहे , येशील का पुण्याला ?"," येईन ना , कधी आणि कुठे ते सांग ?"," पुणे स्टेशनलाच भेटूया . उदया येशील स्टेशनला , सकाळी ११ वाजता ."," आणि १ नंबर platform च्या शेवटला एक लाकडी बाक आहे, तिथे भेटूया " असे बोलून तिने फोन ठेवून दिला. विनूला तर आपण सुची बरोबर बोललो हे खरंच वाटत नव्हता.

( पुढे वाचा……

http://vinitdhanawade.blogspot.in/2013/ ... art-2.html

आवडली तर नक्की share करा. )


Return to “कथा, गोष्टी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today