" The Original Love Story" (Part 1)"

कथा, गोष्टी केवळ इथेच!
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
Vinit
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 29 Sep 2014 11:29
नाव: Vinit
आडनाव: Dhanawade

" The Original Love Story" (Part 1)"

Postby Vinit » 29 Sep 2014 12:35

" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", " हो. निघतोच आहे सर आता."," OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.","असं .. का सर ?","अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." "पाऊस ?.... आता ?" " कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?"," नाही सर . खरंच नाही माहित ", "अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले, ते मनात बोलले ," जाऊ दे . हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही,त्यापेक्षा मीच जातो,राहू दे त्याला एकट्याला. " आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता.


एका थंड हवेच्या झोताने त्याच्या office ची एक खिडकी उघडली आणि पूर्ण office मध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा A.C. पेक्षा ही सुखद होता. कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकी जवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरु झाला होता. काहीजण छत्री नसल्याने आडोश्याला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता.


" आज ७ तारीख, ७ जून आणि उद्या ८ जून , हो. उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती २७ वर्षाची होईल. काय ना,कशी वर्ष गेली पटापट." स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळ office घरी गेलं होते. तो एका software company मध्ये job ला होता. software engineer होता तो. वय वर्षे २८. दिसायला देखणा, उंच ,गोरापान. एकूणच " Handsome" होता तो . office मध्ये सर्व त्याला ओळखायचे,कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत त्याचं, "famous" होता office मध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा " एकलकोंडेपणा ". गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा, कधी कधी कुठे हरवून जायचा तेव्हा तर आपण office मध्ये आहोत, हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरु झाला कि खिडकीबाहेर कितीतरी वेळ कूठेतरी बघत राहायचा,अगदी पाऊस थांबेपर्यंत, उशिरापर्यंत office मध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहित होते कि तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला.

(पुढे वाचा……

http://vinitdhanawade.blogspot.in/2013/ ... art-1.html

आवडली तर नक्की share करा.)


Return to “कथा, गोष्टी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1811
Total topics 1436
Total members 635
Our newest member rushidshinde
No birthdays today