ट्रेक माणिकडोह.......

कथा, गोष्टी केवळ इथेच!
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
dr_sujeet
Rgistered member
Rgistered member
Posts: 4
Joined: 10 Jan 2011 11:53
नाव: सुजित
आडनाव: शिंदे

ट्रेक माणिकडोह.......

Postby dr_sujeet » 19 Feb 2011 12:56

विवेक आणि हरेश दोघेही ट्रेक ला गेले , इथे समीर आणि विन्या परीक्षा देताहेत ....
आपण मात्र काय करायचं ???? अस नेहमीचा प्रश्न घेऊन दिन्या दारात उभा .......

मी त्याला म्हणालो सध्या झोपा काढ ... दोघांच्या परीक्षा संपल्या म्हणजे आपणही जाऊ ट्रेक ला .....
तसा तो जरासा खुश झाला आणि घरी जावुन ट्रेक च्या तयारीला लागला .....

आता तसे मलाही तयारीला लागणे भाग होतेच म्हणायला ....
कारण जुना टेन्ट आता भरपूर झीझला होता.... नवीन आणायचा होता ... भरपूर शॉपिंग करायची होती .....
मग दिन्यालाच घेऊन गेलो आणि सगळी तयारी करून घेतली ....

समीर आणि विन्या परीक्षा देऊन आले आणि आम्ही असे चौघे निघालो ...
विवेक आणि हरेश ह्यांना आम्ही मधल्याच पोइन्टला गाठणार होतो ....

ह्या टोळीचा म्होरक्या मीच .. नकाशा, टेन्ट, ब्याटरी, दोऱ्या माझ्याच कडे ...
म्याग्गी , पाणी , फस्ट एड , डिशेस. भांडी .. बाकींच्या कडे ....

बोलता बोलता आम्ही गाडीतून खाली उतरलो ... आणि माणिकडोहच्या मागच्या बाजूला उतरलो ....
माणिक डोह म्हणजे जुन्नर मधील एक मस्त ठिकाण .....
पाणीच पाणी आणि आजूबाजूला ट्रेकर्स ला खुणावणारे उंचच उंच डोंगरकडे .....हिरवळ .... मस्त सगळे ...
ह्या आधी इथे आम्ही आलो न्हवतो .... म्हणजे मी सोडून बाकीचे ...
मी लहानपणी आलो होतो , शिवनेरी ,नाणेघाट ....वगैरे वगैरे पाहिले होते....
....
इतक्यात दिन्या ने समोरचा बोर्ड वाचला ..." इथे बिबटे आढळून येतात .... कृपया गटाने फिरावे ..हातात काठी अन्यथा आणखी शस्त्र बाळगावे .." झाले ..... दिन्या अगदी गार पडला ....
कसाबसा त्याला समजावून आम्ही पुढे निघालो ... माणिकडोह च्या बाजू बाजू ने आम्हाला नाणेघाटात जायचे होते ....
दुपारी उन जरा जास्तच लागत होत ... इतक्यात पाणीही संपले होत .....
समीर बाटल्या भरायला ... पाण्याकडे गेला आम्ही तिघे इथे जरा सावलीला बसलो .....

इतक्यात दिन्या आणि विन्या जरा हलके होऊन आले .... आणि माझीही एक डुलकी झाली ....
समीर ने जरास पाणी तोंडावर टाकून मला उठवले .... आणि आम्ही परत निघालो ..... आता चढण जरा जास्त होती ... झाडंही दाट होऊ लागली होती ....
विवेक ला फोन करून आम्ही विचारले कुठय आहे ते ... आणि मग त्यांना गाठायला आम्ही सर सर निघालो .....

पिंपळगाव जोगा धरण आणि माणिकडोह ह्या मध्ये एक डोंगररांग आहे .... त्यात अगदी मधला असा एक डोंगर चंद्रासारख्या आकाराचा आहे ....
तिथेच विवेक आणि हरेश थांबले होते .....
आम्ही जवळ पास पोहोचलोच होतो इतक्यात चढताना दिन्याचा पाय मुरगळला ......

आई ग .... आता काय ... स्प्रे मारा आणि निघा ... संध्याकाळ होत आली यार ... थांबून उपयोग नाही ,......
we have to move .... ... दिन्या बिचारा रडत कढत चालू लागला ......

आला आला डोंगर जवळ आला ....
इतक्यात लांबून कुणी येताना दिसले ......
दिन्या जरासा फुलला होता ......
कसला आता तर एकदम सुपरमेन झाला होता .... कारण समोरून .... विवेक आणि हरेश नाही तर दोन सुपर डुपर फट्याक पोरी येत होत्या .... त्याही ट्रेकर्स होत्या बहुतेक ...

पण फार त्रासिक दिसत होत्या ... एकीला गुडघ्याला काही लागले होते ....त्यांना पाहून दिन्या अगतिक होउन जवळ गेला अगदी आमच्या आधीच ......
थोडीसी विचारपूस झाल्यावर कळले की त्यांची चुकामुक झाली आहे .... त्यांचा ग्रुप त्यांना सोडून निघून गेले .....

ह्या मुली न अश्याच असतात ....नेहमी उशीर मग आणखी काय करणार ते ग्रुप वाले .... विन्या ने नेहमी प्रमाणे काडी टाकली ....
तितक्यात त्यातली व्यवस्थित असलेली शमिका ,,, विन्या ला म्हणाली ... , " रात्री , आम्ही झोपेत असताना .... एका बिबट्याने आमच्या कॅम्पवर हल्ला केला .... त्यात सगळ्यांची पांगापांग झाली ....
आणि तसेच त्यात मग आमचे मोबाईल आणि साहित्य असेच तिथे पडून राहिले ..... आता आमच्या कडे काहीच नाही ..... अंगावरच्या कपड्याशिवाय ... '' आणि अक्षरशः ती रडू लागली .....

त्यातच त्या हीना ला मार कसा लागला ह्याचे कळले .... मग काय त्यांना आमच्यात सामील करून आम्ही विवेक आणि हरेश ला .... गाठायला निघालो ....
आता पर्यंत त्या मुलींनी आमच्या मोबाईलवरून घरी आणि इतर ग्रुप वाल्यांना कळवले होते ....आम्ही आता विवेक आणि हरेश ला गाठून कॅम्प बंद करून घरी परतणार होतो ....

संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ..... तो चंद्रकोरी डोंगर भेटला ..... आम्ही सगळे इकत्र भेटलो ....
आणि सगळी माहिती सांगून आता परतीची वाट धरू लागलो ....
खरं तर तिथे बिबट्याने हल्ला केला म्हणून जास्त धमक करायची सोडून आम्ही परतण्याचा निर्णय घेतला .....
आता पर्यंत त्या दोघी आमच्यात भरपूर मिसळून गेल्या होत्या .... हसत खेळत आम्ही चालत होतो ....
बोलता बोलता आता रात्र झाली होती .....
आम्ही टेंट लावले .... मुलींना टेंट मध्ये झोपायला सांगितले .... आणि उरलेले दोघे कॅम्पफायर कडे लक्ष देतील असे ठरले ....
भूक हि लागली होती ..... पाणी वगैरे काढून आम्ही मेग्गी तयार केली .. पोटभर खाल्ली ... आणि गाणी वगैरे बोलून थकून मग झोपायला निघालो ....

विवेक आणि हरेश हे जागणार होते ....

रात्री ११.३० च्या दरम्यान ....अचानक टेंट च्या मागे कसली तरी हालचाल दिसली ......
विवेक ने शिटी वाजवून सगळ्यांना जागे केले ......
आम्ही टेंट मधून बाहेर आलो बघतो तर काय ..... तीन बिबटे एकमेकांत भांडत होते .... आगीमुळे ते जवळ येत नव्हते .....
दिन्याची तर बोबडीच वळली .... विवेक आणि हरेश हुश्शार झाले .... समीर ने काठी हातात घेतली ... विन्याने बेटरी त्या बिबट्यांच्या डोळ्यात मारायला सुरुवात केली .....
इतक्यात मी सुरी काढून हातात धरली ......
जवळ पास अर्धा तास हा खेळ चालला .... त्यांना हुसकावण्यात बराच वेळ गेला ....
पण त्या टेंट मधील पोरी अजून बाहेर आल्या नव्हत्या ......
ते बिबटे गेल्यावर आम्ही टेंट मध्ये पाहिले तर मुली गायब ...?????

कुठे गेल्या असतील ???

शोधाशोध सुरु .. आम्ही टेंट वगैरे बांधून त्यांना शोधायला निघालो ....तेही अगदी गटाने ...... एक एकटे नाही .....
बर्याच वेळा नंतर .... कुणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू आला ..... जवळ जाउन पाहतो तर ...हि तर हीना ..... हिचा गुडघा जखमी असून हि इतकी का पळाली ..??
बर्र शमिका कुठेय .? ती इतकी गप्प झाली कि काहीच बोलत नव्हती .... आम्हाला वाटले काही तरी वाईट घडले असेल ....
काही वेळा नंतर ती बोलली कि शमिका पुढे पळाली .... मग हीना ला पाठमोरी घेऊन .... समीर आणि आम्ही निघालो .....
समीर दमला कि विन्या घेई मग हळू हळू ते माझ्यापर्यंत येई .... दिन्या वाचला कारण तोही पायाने चुकला होता ना ....
२.३० वाजता शमिका सापडली .... अगदी विव्हळत होती ती .... बघतो तर तिच्या पायाला ..सापळा होता ..... त्याने तिचा पाय पूर्णपणे जखमी केला होता .....
मग काय तिला त्यातून सोडवले .... दवा पट्टी केली .... आणि निघालो तिला हि पाठमोरी घेऊन ....
काय हालत झाली होती म्हणून सांगू .... कशाला इतकी मदत करत होतो त्या मुलींची काय ठाउक .???....
पण तरी आता ते विधिलिखित असेन असे मानून .... चालत राहिलो ... आता रस्ता दिसू लागला होता ..... कारण काही गाड्या येत जाताना दिसत होत्या ..... आम्ही आता जंगल सोडले होते .....
माणिकडोह धरणाच्या बस स्थानकाजवळ एक छोटेखानी घर होते तिथे आम्ही थांबायचे ठरवले ....
त्या मुली एकदम गप्प झाल्या होत्या .. कुणीच कुणाकडे पाहत नव्हते फक्त त्या घराकडे कूच करत होतो ...
अचानक मला जाणवले कि पाठीवरचे ओझे अगदीच कमी झाले आहे .... मी लक्ष दिले नाही ...... वाटले आता सवय झाली असेन .... दोघींना त्या घराजवळ उतरवून हवे तर आराम करू ....
तितक्यात समीर म्हणाला .. ," अग हीना तू इतकी हलकी कशी झालीस ग ?"
काहीच आवाज नाही .... मी बघतोय तर हीना आहे कुठे त्याच्या पाठीवर ???? ," सम्या अरे ती हीना कुठेय ?"
" कुठेय म्हणजे ? हि काय पाठीवर ... " असे म्हणत त्याने पाठी पाहिले तर एक मेंढरू त्याच्या पाठीवर होते ....
तसेच एक माझ्याही पाठीवर होते ...... दोघांच्याही हृदयाचा ठोकाच चुकला ..... दिन्याने तर जीन्स ओलीच करून टाकली .....
घाबरलेले आम्ही ती मेंढर तशीच सोडून पळत पळत त्या घरापाशी पोहचलो ....
आमचा आवाज ऐकून घरातला एक माणूस बाहेर आला ...
पाणी पाजून त्याने अगोदर आम्हाला शांत केले ... अन मग विचारले काय झाले ते .....
त्याला आम्ही सगळी हक़िकत सांगितली ....
त्यावर तो म्हणाला ..... " काय फजिती करून घेतली पोर्र हो ....अस जंगलात कुणी पोरी घावत्यात होय ...?? अरे हडळी होत्या त्या .... अन ते बिबटे नव्हते काय .... जादू टोना होता .... नाहीतर त्यांनी तुम्हाला असेच सोडले असते काय ??? हे काय तुमच्या सोबत नाही झालं ... ह्या बाजून जाण्याऱ्या चार पाच लोकांसोबत झालाय ते ..... तुमी उगाच गेलात ह्या बाजून ...."

त्याने सांगितलेले पटले ही .....पण मग त्या हडळींनी आम्हाला काही का केले नाही ...??? बर्र मोबाईल मध्ये केलेले कॉल पाहिले तर काहीच एन्ट्री नव्हत्या .. असे कसे ..????

हाच विचार करत करत आम्ही घरी पोहचलो ...... भूत बित काही नसते ... असे मनोमन ठरवत .... झाला प्रसंग सारे विसरण्याचे ठरवून आम्ही पुन्हा रात्री भेटलो ....

आता पुन्हा पुढच्या महिन्यात ट्रेक तोही ..... पुन्हा माणिकडोहच ....!!!!!!!!!!!! बघू त्या हडळी भेटतात का ???? ;) ;) ;) :D

:- सुजित ( धवल ध्रुव )


Return to “कथा, गोष्टी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 19 users online :: 0 registered, 0 hidden and 19 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today