टवाळा आवडे विनोद

विनोद केवळ इथेच!
User avatar
Raman
Rgistered member
Rgistered member
Posts: 34
Joined: 16 Nov 2010 23:49
नाव: Raman
आडनाव: Karanjkar

टवाळा आवडे विनोद

Postby Raman » 18 Nov 2010 00:56

एकावर एका फ्री
घेलाशेठ पक्का कंजूष माणूस. त्याची मागील तीन चार दिवसापासून एक दाढ दुखत होती. पण पैसा खर्च होईल म्हणून तसाच त्रास सहन करत होता. शेठाणीने डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला तेव्हा घरीच दाढ काढली तर चालणार नाही का? असा प्रतिप्रश्न त्याने बायकोला केला. शेवटी बायकोने बराच आरडा ओरडा केल्यानंतर घेलाशेठ एकदाचा दंतवैद्याकडे गेला. डॉक्टर माजा उजव्या बाजूचे दाढ लई दुकते, तेचा किती पैसा घेणार? काहीतरी कमी घ्या आम्ही तुमचा फायदा करू अशी बडबड करून त्याने डॉक्टरला पटवण्याचा प्रयत्न केला. काही काळजी करू नका शेठजी, आरामात या खुर्चीत बसा आणि तोंडाचा आ करा व काहीही बोलू नका, मी तुमचा फायदा करून देणार आहे.

तेव्हा कुठे घेलाशेठ खुर्चीत तोंड वासून बसला. झालच हं म्हणत डॉक्टरांनी घेलाशेठच्या दोन दाढा उपटल्या. डॉक्टर बाजूला झाले तसा घेलाशेठ खुर्चीतून थयथया नाचत उठला, डॉक्टर हे काय केला तुमी मी एक दाढ काढायला सांगितला ने तुमी तर माझा दोन दाढा उपटले की. दोन दाढेचे पैसे द्यावे लागणार ह्या कल्पनेने अस्वस्थ झालेला घेलाशेठ ठणाणा बोंबलत सुटला. डॉक्टर हसत म्हणाले काही काळजी करू नका घेलाशेठ, मी तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुमचा फायदा केला आहे. तुम्ही फक्त एकाच दाढेचे पैसे द्या. कारण सध्या आमचेकडे एकावर एका फ्री ची स्कीम सुरु आहे!


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: टवाळा आवडे विनोद

Postby adwaitk007 » 09 Dec 2010 10:04

:D :ymapplause:


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: टवाळा आवडे विनोद

Postby आपली मराठी » 15 Dec 2010 19:26

रामनजी मला खरच आपला विनोद आवडला पण मी खरचं टवाळ नाही हो


Return to “विनोद विभाग”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1829
Total topics 1437
Total members 647
Our newest member Shubhamkakade
No birthdays today