PROBUX ही एक अतिशय कमी वेळामध्ये प्रचलित झालेली PTC (paid to click) ह्या तत्वावर चालणारी वेबसाईट आहे. PROBUX ही सध्या PTC मध्ये द्वितीय क्रमांकाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची स्थापना २०१२ मधील आहे, इथे प्रत्येकजण आपले खाते काढण्यासाठी उत्सुक असतो, कारण इतर कोणत्याही PTC वेबसाईटपेक्षा इथे सर्वात जास्ती म्हणजे ०.०१$ प्रत्येक क्लिक साठी तसेच ०.०१५$ प्रत्येक रेफरलसाठी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच प्रत्येक ३० सेकंदांनी आपल्यासाठी एक advertise तयार असते.
पासवर्ड ऑनलाईन ‘इन्कम’चा !
by Tejas Kulkarni on 23. May, 2013 ; 1:28 PM in नवे लेख
PROBUX ही एक अतिशय कमी वेळामध्ये प्रचलित झालेली PTC (paid to click) ह्या तत्वावर चालणारी वेबसाईट आहे. PROBUX ही सध्या PTC मध्ये द्वितीय क्रमांकाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची स्थापना २०१२ मधील आहे, इथे प्रत्येकजण आपले खाते काढण्यासाठी उत्सुक असतो, कारण इतर कोणत्याही PTC वेबसाईटपेक्षा इथे सर्वात जास्ती म्हणजे ०.०१$ प्रत्येक क्लिक साठी तसेच ०.०१५$ प्रत्येक रेफरलसाठी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच प्रत्येक ३० सेकंदांनी आपल्यासाठी एक advertise तयार असते.
आमच्या समतेच्या विश्वात…!
by Sanjay Sonawani on 22. May, 2013 ; 10:21 PM in नवे लेख
भरलाय किती कोलाहल
कि समजतच नाहीय मला
भरलेय जीवनात कोणी
एवढे हलाहल...?
जाणीवांचे जंतू उद्रेकत राहतात एवढे
कि निर्जंतुकीकरनाची
औषधे भेसळच असावीत
असा संशय मला...
मग हे वीष
कसे पचावे मला?
मी शिव नाहीय!
बरे ...असुद्यात हा कोलाहल...
पण कशासाठी बरे?
कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ
यासाठी?
भडव्यांनो सांगा मला
वैदिकांचा सर्वश्रेष्ठ देव
इंद्र
म्हणे आईच्या गांडीतुन जन्माला आला
सुसंस्कृत भाषेत सांगायचे तर "पार्श्वातून" आला...
तो ज्यांचा श्रेष्ठ अनैसर्गिक नैसर्गिक देव
आणि
नपुंसक
(इंद्राला कोणता पोरगा कधी झाला, ऐकलाय कोणी गेल्या हजारो वर्षांत?)
असल्या नपुंसक देवतांना कोणी
विचारत नाही...
वरुण-मित्र गेले कोठे हे यांनाही माहित नाही...
कोठे संपले त्यांचे वंश?
आणि तरीही सुरुच आहे कोलाहल...
भरले जातेच आहे समाजात
ते वैदिक हलाहल
स्वत:चे देव धड सांभाळता
नाही कधी आले
चालले आम्हाला
दैवतशास्त्र शिकवायला...?
आम्हाला हलाहल पचवणारा
एकच देव माहिताय...आणि
ते आम्हीच आहोत..
एकमय...
कारण
आम्हीच शिव आहोत
पचवलेय आम्ही तुमचे हलाहल
ठेवून कंठात
लाथ मारत त्या तुमच्या वेदांवर
पुन्हा पुन्हा...
आम्हीच असणार मूक्त
आमच्या समतेच्या विश्वात...!
" विचारधन"
by Rachana on 22. May, 2013 ; 12:38 PM in नवे लेख
* ( बॉबी फिशर, एक प्रसिध्द बुद्धीबळपटू -: यांचे एक वाक्य प्रेरणादायी आहे) -: "बुद्धीबळ जिंकण्यासाठी खेळायचे असते. जो जिंकतो, त्याला थांबविता येत नाही. मी जिंकल्यास मला कुणीच रोखू शकणार नाही !"
* "एवढा पैसा मिळतो म्हणून आपण काही सोन्याचा भात खात नाही. देवाने हा पैसा गरिबांना वाटण्याकरिताच दिला आहे, हे मी जाणून आहे !"
----- (सुधा मूर्ती , नारायणमूर्ती यांच्या पत्नी) -----
* "जोवर यश मिळत होतं, मी अजिबात प्रयोग करत नव्हतो. धोका पत्करण्याची तयारी नव्हती. अपयशाच्या एका झटक्यान Risk घेण्याची माझी हिम्मत वाढवली !"
----- (विश्वनाथन आनंद , बुद्धीबळपटू ) ------
* "जर तुम्हाला भरभर चालायचे असेल तर एकटे चाला ; पण तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असेल तर एकत्र वाटचाल करा !"
* " Hope....... makes the world go around !"
----- ( मार्टिन लुथर किंग ) -----
अबोली
by रणजित पराडकर on 22. May, 2013 ; 12:21 PM in नवे लेख
Ancient Indian coins and symbolism
by Sanjay Sonawani on 21. May, 2013 ; 9:28 PM in नवे लेख
we have seen on every triangle, petal or pentagram centrally a solid dot is positioned. In Shaivait occultism (Yogic practice) centred dot signifies the focalized energy and its intense concentration. It can be envisaged as a kind of energy deposit which can in turn radiate energy under other forms.
We also are going to have a look in next chapters at the coinage of later times till second century AD to understand whether symbolism changed with the introduction of empirical political system and what was the language being used in those times.
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ – मांगी- तुंगीजी
by Sagar Shivade on 20. May, 2013 ; 5:50 PM in नवे लेख
लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून :भाग ७ :कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर फाईल ऑपरेशन्स.
by bolmj on 20. May, 2013 ; 1:08 PM in नवे लेख
आपण मागील भागात कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर म्हणजे काय ते पहिले आता त्या डिव्हाईस ड्रायव्हर बरोबर डाटा ऑपरेशन्स कशी करावीत ते आपण या भागात पाहूया.
कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर हा त्याचा फाईलला जोडला गेलेला असतो.
आपली सर्व कामे तो फाईल्स च्या माध्यमातून पूर्ण करतो.
फाईल ऑपरेशन्स या स्ट्रक्चर मध्ये पण फाईल ची सर्व फंक्शन्स डिक्लेअर करून आपण तो फाईल ओपन, कोल्ज, रीड ,राईट करू शकतो.
प्रत्येक फंक्शन मध्ये सध्या आपण त्या फंक्शन चे प्रिंट करून नाव देऊ.त्यामुळे करेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर चा बेसिक प्रोग्राम खालील प्रमाणे होईल.
|
|
[REF:Linux for you magazine]
कोणती .h फाईल कधी इन्क्लुड करावी:
#include <linux/init.h> : बेसिक इनिशियलायझेशन
#include <linux/module.h> :कोणतेही मोड्यूल्स लिहताना
#include <linux/version.h> :लिनक्स व्हर्जनचा डाटा मिळवण्यासाठी.
#include <linux/kernel.h> : prinitk() हे फंक्शन वापरता येण्यासाठी.
#include <linux/fs.h> :फाईल्स च्या निगडीत ऑपरेशन्स करण्यासाठी
#include <linux/device.h> : डिव्हाईस शी निगडीत ऑपरेशन करताना.
#include <linux/cdev.h> :मेजर व मायनर नंबरसह करेक्टर डिव्हाईस तयार करण्यासाठी.
#include <linux/slab.h> :kmalloc() हे फंक्शन वापरण्यासाठी.
#include <linux/errno.h> :एरर्स चा कोड या फाईल मध्ये असतो.
#include <linux/types.h> :size_t ,dev_t या सारखे डाटा टाईप सपोर्ट साठी.
#include <linux/fcntl.h> : o_accmode साठी
#include <asm/system.h> :cli(), _flags वापरण्यासाठी
#include <asm/uaccess.h> :copy_from /to _users या सारखी फंक्शन्स वापरताना.
module.h मधील फंक्शन्सची माहिती :
| MODULE_ALIAS(_alias) | युजर स्पेस मध्ये मोड्युलचे नाव व माहितीदेण्यासाठी. |
| MODULE_LICENSE(_license) | मोड्युल कोणते लायसन्स वापरणार आहे त्याचे नाव. |
| MODULE_AUTHOR() | मोड्युलचा लेखक. |
| MODULE_DESCRIPTION() | मोड्युलच्या कामविषयक थोडक्यात माहिती |
| MODULE_PARAM() | मोड्युल लोड करताना पास केले जाणारी पँरामिटर |
| MODULE_VERSION() | वापरल्या जाणाऱ्या मोड्यूल चे व्हर्जन |
आपण modinfo मोड्युलचे नाव .ko अशी कमांड दिली असता वरील सर्व मोड्युल शी निगडीत माहिती आपणस मिळते.
फाईल ऑपरेशन्सच्या काही महत्त्वाच्या गोष्टी:
वरील कोड मध्ये ओपन आणि क्लोज फंक्शन int रिटर्न करतात ,० म्हणजे यशस्वीपणे पार पडले आणि निगेटिव्ह म्हणजे काही तरी प्रोब्लेम आहे.पण रीड आणि राईट हे फंक्शन्स काही पोझिटिव्ह नंबर रिटर्न करतात ते म्हणजे किती बाईट डाटा रीड किंवा राईट झाला म्हणूनच त्या फंक्शन्स चा रिटर्न टाईप ssize_t आहे.
तसेच आणखी एक मस्त गोष्ट आहे…read() हे फंक्शन len बाईट्स इतका डाटा buf या बफर मध्ये लिहिते आणि किती बाईट्स लिहिलेत ती संख्या रिटर्न व्हेल्यू म्हणून पाठवते.म्हणजेच रीड फंक्शन हे युजर स्पेसिफिक बफर मध्ये डाटा लिहिते कारण तो युजरला वाचता व वापरता यावा…आहे ना गंमत रीड फंक्शन्स बफर मध्ये राईट करते….
काही महत्त्वाचे कोडचे भाग:
loff_t (*llseek) (struct file *, loff_t, int);
यात llseek हि मेथड फाईल ची चालू रीड राईट पोझिशन बदलतो , loff_t म्हणजे लोंग ऑफसेट.
ssize_t (*read) (struct file *, char __user *, size_t, loff_t *);
हे फंक्शन डिव्हाईस कडून डा टा घेताना वापरतात जर या ठिकाणी काहीच डा टा नसेल तर ते –EINVAL म्हणजेच इन्व्हेलीड अर्ग्युमेंट म्हणून एरर दर्शविते.
int (*open) (struct inode *, struct file *);
डिव्हाईस ओपन करणे हि डिव्हाईस फाईल वर केली जाणारी पहिली क्रिया.
struct module *owner
हे आपल्या मोड्युल ला पोईंट करते आणि जर आपले मोड्यूल कामत असेल तर ते काढून टाकण्यास प्रतिबंध करते.
बयाचदा यास THIS_MODULE हे नाव राहते याची डेफिनेशन <linux/module.h> मध्ये असते.
ओपन मेथड :
ओपन मेथड पुढील काम करते:
- डिव्हाईस तयार आहे का नाही ते पाहणे आणि त्या निगडीत काही एरर्स आहेत का ते पाहणे.
- जर डिव्हाईस प्रथमच ओपन हॉट अहेल तर त्याचे इनिशियलायझेशन करणे.
- f_op पोईंटर अपडेट करणे.
- file->private_data मध्ये ठेवण्यात येणाऱ्या डाटा स्ट्रक्चर साठी राखीव जागा करून त्यात तो ठेवणे.
रिलीज मेथड:
रिलीज मेथड पुढील काम करते:
- ओपन मेथडने file->private_data मध्ये ठेवलेली जागा काढून घेणे.
- डिव्हाईस बंद करणे.
रीड आणि राईट मेथड:
- ssize_t read(struct file *filp, char __user *buff, size_t count, loff_t *offp);
- ssize_t write(struct file *filp, const char __user *buff,size_t count, loff_t *offp);
- यात flip हा फाईलचा पोईंटर असतो.
- count म्हणजे ट्रान्सफर करणाऱ्या डाटाची साईझ.
- buff म्हणजे युजरचा बफर ज्यात रीड आणि राईट करताना डाटा ठेवला जातो.
- offp [लोंग ऑफसेट टाईप पोईंटर] युजर वापरात असणर्या फाईलची पोझिशन दर्शवते.
- रिटर्न व्हेल्यू ssize_t म्हणजेच signed size type.
हे अधिक स्पष्ट होण्यासाठी पुढील आकृती पहा:
[Ref:Linux Device Driver Book]
रीड आणि राईट मेथड साठी नियम:
जर रिटर्न संख्या हि फंक्शन मधील count या अंके इतकी असेल तर तितके बाईट्स पाठवले जातात.
जात रिटर्न संख्या हि पोझिटिव्ह असेल आणि count पेक्षा कमी असेल तर तितकाच डाटा पाठवला जातो
जर रिटर्न संख्या हो शून्य असेल तर फाईल संपली असे मानले जाते .
निगेटिव्ह रिटर्न संख्या म्हणजे एरर याचा नंबर <linux/errno.h>या फाईल मध्ये असतो यात –EINTR [interrupt system call],-EFAULT [bad address]यांचा समावेश होतो.
डिव्हाईस ड्रायव्हरचा बेसिक सारांश.
|
क्रिया |
युजर फंक्शन्स |
कर्नेल फंक्शन्स |
| मोड्युल लोड करणे. [load] | insmod | module_init() |
| डिव्हाईस उघडणे. [open] | fopen | file_operations:open |
| डिव्हाईस मधून वाचणे.[close] | fread | file_operations:read |
| डिव्हाईस मध्ये लिहणे.[read] | fwrite | file_operations:write |
| डिव्हाईस बंद करणे.[write] | fclose | file_operations:release |
| मोड्यूल काढून टाकणे.[remove] | rmmod | module_exit() |
[Ref:FreeSoftwareMagazine]
आता आपण सर्व बेसिक फाईल ऑपरेशन्स शिकला आहात..मजा आली ना…आता..पुढील भागात आपण पी सी आय डिव्हाईस ड्रायव्हर ची महिती घेवूया.
आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.
“लिनक्स मराठीतून “ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १]लिनक्सची ओळख आणि उबुंटू इन्स्टॉलेशन.
भाग २]लिनक्सची जान आणि शान टर्मिनलची ओळख आणि vi एडीटर.
भाग 3]लिनक्स कर्नेल आणि डिव्हाईस ड्रायव्हर ची ओळख.
भाग ४]डिव्हाईस ड्रायव्हरचा हँलो वल्ड प्रोग्रम.
भाग ५]डिव्हाईस ड्रायव्हरचा पँरामिटर पासिंग व प्रोसेस संबन्धित प्रोग्रम.
भाग ६ ]कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर बेसिक
धन्यवाद -MJ :-)
Filed under: Char Device Driver File operations, x-All Tablets
Energy Crisis
by Vishnu Vajarde on 20. May, 2013 ; 7:38 AM in नवे लेख
स्वराज्याचे शिलेदार – गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक
by || धाकलं पाटील || on 19. May, 2013 ; 6:49 PM in नवे लेख
ओल्या फेण्या / Olyaa Fenyaa
by Resh on 19. May, 2013 ; 2:58 PM in नवे लेख
आज मी जी recipe इथे share करत्ये तो खास कोकणातला पदार्थ आहे. तांदळापासून बनणारा हा पदार्थ अतिशय साधा आणि कमीत कमी साहित्य वापरून तयार होतो. मात्र खावासा वाटला आणि करून खाल्ला असा मात्र नाही. याच्या तयारीला थोडा वेळ द्यावा लागतो. याला कोकणामध्ये ओल्या फेण्या म्हणतात. काहीजण त्यांना पापड्या देखील म्हणतात. या फेण्या वाळवल्या कि तळायच्या फेण्या तयार होतात. अतिशय हलक्या आणि कुरकुरीत तळलेल्या फेण्या जिभेवर अक्षरश: विरघळतात.
चला तर मग वळूया या आगळ्या recipe कडे.
साहित्य:
१ वाटी तांदूळ
१ Tb sp खसखस
चवीनुसार मीठ
दही
कृती:
१) तांदूळ धुवून घ्यावे. दुप्पट पाणी घालून भिजवावे व झाकून ठेवावे. ३ दिवस हे तांदूळ तसेच ठेवावे. पाणी बदलू नये.
साधारण तिसऱ्या दिवशी त्याला आंबूस वास येतो.
२) ही fermantation process झाली कि चौथ्या दिवशी तांदूळ धुवावे. धुतलेले तांदूळ mixer वर वाटून घ्यावेत. वाटताना त्यात अजिबात पाणी घालू नये. ते घट्टच वाटावेत. हे batter इडलीच्या पिठाइतके घट्ट असावे.
३) नंतर त्यात खसखस आणि मीठ घालून नीट mix करावे. हे झाले फेण्यांचे batter तयार.
४) फेण्या करायच्या वेळी प्रथम stand मधील ताटल्यांना थोडसे दही लावावे. नंतर त्यावर batter डावेने घालून घ्यावे. एका stand मध्ये ६ ताटल्या मावतात. ताट्ल्यांवर घातलेले batter खूप जाड अथवा पांतळ असू नये.
५) ढोकळ्याच्या cooker मध्ये किंवा मोठ्या पातेली मध्ये तळाशी पाणी घ्यावे व gas वरती उकळण्यास ठेवावे.
६) पाणी उकळले कि फेण्यांचा stand त्यात ठेवावा व झाकण लावावे. साधारण १० - १५ मिनिटांनी झाकण काढावे व गरम गरम फेण्या दह्याबरोबर serve कराव्यात.
काही महत्वाचे:
१) फ़ेण्या करण्यासाठी तांदूळ आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या batter ला तुम्ही मिरची कोथिंबीरही वाटून लावू शकता.
३) फ़ेण्यांचा stand तुळशीबाग पुणे येथे नक्की मिळेल. जर stand नसेलच तर stand ऐवजी मोठ्या पानांवर फ़ेण्या लिहू शकता जसे की केळीची पाने.






Recipe in English
Ingredients:
1 cup rice
1 Tb sp Poppy seeds
Salt as per taste
1 bow curd
Method:
1. Wash the rice and soak it in water two times the quantity of rice. Keep it covered for 3 days without changing the water. You will observe fermented smell on 3rd day
2. After the fermentation process, on the fourth day wash them with fresh water & grind finely on mixer. Please do not put water while grinding. The batter should be thick as of Idli batter.
3. Add poppy seeds & salt as per taste. Your batter is ready.
4. While preparing Feni, grease the plates with curd. A typical Feni stand has 6 plates. Put the batter on each plate. The layer of batter poured on the plates should neither be too thin nor too thick.
5. Pour some water in the cooker the way you do to cook rice. Put the cooker on gas flame. Once the water boils, put the feni stand and cover with a lid. Steam it for 10-15 minutes
6. Remove the feni from plate and serve hot with curd
Important:
1. It is very important that the rice should be properly fermented.
2. You may add green chilly & coriander paste to the batter if you like.
3. You can get the Feni stand in Tulshi baag Pune or similar market. In case you don’t get the stand you can use big green leaves like banana leaf.
विचारा..
by रणजित पराडकर on 19. May, 2013 ; 1:41 PM in नवे लेख
Motives for writing autobiographies
by Vishnu Vajarde on 19. May, 2013 ; 11:15 AM in नवे लेख
Others have a grievance and wish posterity to know why hew were elbowed out of office, who was really responsible for the miscarriage of a military expedition, who was the real author a literacy and scientific discovery and so on. Classical scholars have admitted that the dignity of Thucydides in not giving his own story of the reverses at Amphipolis were he was the commander.
नाथयोगिनी मुक्ताबाई!
by Sanjay Sonawani on 18. May, 2013 ; 6:45 PM in नवे लेख
संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण एवढीच ओळख मुक्ताबाइंची नाही. चारही भावंडांना वैदिक धर्मव्यवस्थेने झिडकारले. अत्यंत छळ केला. तत्कालीन समाजव्यवस्थेत नाथ संप्रदाय हा समतेचा संप्रदाय म्हणुन अत्यंत प्रसिद्ध होता. निवृत्तीनाथ हे मुक्ताईचे थोरले बंधू. त्यांनी वैदिक व्यवस्था आपल्याला जवळ करत नाही हे पाहुन गहिनीनाथांकडुन नाथपंथाची दीक्षा घेतली. निवृत्तीनाथ आपल्या भावंडांचेही गुरू बनले. योगासाधनेने चारही भावंडांनी आपले व्यक्तिमत्व तेजस्वी आणि आत्मज्ञानाने सम्रुद्ध बनवले. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहून नाथ तत्वज्ञानाला नवी झळाळी प्राप्त करुन दिली.
मुक्ताबाईंच जन्म १२७९ मधील. चार भावंडांत त्या सर्वात धाकट्या...आणि म्हणुन सर्वांच्या लाडक्याही. मुक्ताबाईंना अवघे एकोणिस वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु नाथ योगामुळे हे आयुष्य ज्ञानाने समृद्ध आणि अत्यंत सुखमय असे बनवण्यात मुक्ताबाई यशस्वी झाल्या. निवूत्ती-ज्ञाना-सोपानासारखे उत्तुंग आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे बंधु असतांनाही त्यांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व लोप पावू दिले नाही. सुशीला कुप्पुस्वामी म्हणतात, मुक्ताबाई हे एक प्रगल्भ आणि आत्मविश्वासाने भरलेले स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. स्त्री असुनही दीनवाना स्त्रीभाव तिच्या एकाही अभंगात आढळुन येत नाही. सगुण भक्तीपेक्षा निर्गुणाच्या प्रतीतीला तिने महत्व दिले आणि हाच तिच्या योगिनी असल्याचा महत्वाचा पुरावा आहे. चांगा वटेश्वरासारख्या तत्कालीन महान योग्यालाही ज्ञानोपदेश करनारी मुक्ताबाई ही यादवकाळातील एक अत्युच्च स्त्रीवैभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
"नाही सुख दु:ख...पापपुण्य नाही
नाही कर्म धर्म...कल्पना नाही
नाही मोक्ष...ना भावबंध नाही
म्हणे वटेश्वरा ब्रह्म नाही...सहजसिद्ध बोले मुक्ताई!
हा प्रबळ आत्मविश्वास मुक्ताईने नाथ परंपरेचे तत्वज्ञान केवढे पचवलेले होते याचे एक प्रतीक आहे. या भावंडांना वैदिक मंडळीकडुन अविरत छळ सोसावा लागला, पण मुक्ताईने कधी आपला तोल ढळु दिलेला दिसत नाही. ताटीचे अभंग मुक्ताईच्या कारुण्यशील वत्सल भगिनीच्या मनाचा एक आकांत आहेत...पण त्यात शरणागतता नाही. हीनदीन भावना नाही. आहे तो उत्कट आत्मविश्वास आणि सत्यावरील अगाध निष्ठा. आपल्या भावंडांचे तिने मातेच्या जबाबदारीने अपरंपार काळजी घेतली. नाथपरंपरेला साजेश्या पद्धतीने एका मागुन एक भावांनी समाध्या घेतल्यानंतर या विरक्त योगिनीला संसार निरर्थक वाटला असल्यास नवल नाही.
वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी मुक्ताईंनी समाधी घेतली. एक नाथ योगिनी, कारुण्यसिंधू मुक्ताई भवसागराच्या पाशातुन मुक्त झाली. मुक्ताईचे आज फारफार तर पन्नास अभंग अवशिष्ट आहेत. पण त्यातुन मुक्ताईचे भव्य दीव्य व्यक्तिमत्व ठळकपणे उभे राहते. आज त्यांच्या समाधीदिनाला ७१६ वर्ष पुर्ण झालीत. या महायोगिनीस विनम्र अभिवादन!
थोर तत्वज्ञ-महाराणी अहिल्यादेवी होळकर!
by Sanjay Sonawani on 18. May, 2013 ; 1:16 PM in नवे लेख
अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ सालचा. नगर जिल्ह्यातील चौंडी येथील. मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडनातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.
अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सास-याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता...आताही फारसा नाही...परंतू मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.
१७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला. वारसाहक्काचा प्रश्न निर्माण करत संपुर्ण होळकरी संस्थान घशात घालण्याचे प्रयत्न पेशवे दरबारात सुरु झाले. अहिल्यादेवींनी सर्व कारस्थानांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले होते. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्ध्या होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. राघोबादादा पेशव्याला हे संस्थान गिळायचे होते. अटकेपार झेंडे (जे त्यांनी नव्हे) फडकाविले असा दुराभिमान अशा या महान (?) योद्ध्याने अहिल्यादेवींवर स्वारी केली. अहिल्यादेवींनी राघोबादादाचा माज उतरविला आणि माघार घ्यायला भाग पाडले.
अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले. सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते,, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते. सर जदुनाथ सरकार म्हणतात, "सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या उच्च दर्जाची राजकीय धोरण असलेली ही महिला होती." अहिल्यादेवींनी शेतसारा असो कि शेतीसाठीचे पाणी वाटप...यासाठी नुसते बंधारे घालुन दिले नाही तर एक उत्कृष्ठ प्रशासकीय व्यवस्था घालुन दिली. राज्यात तीर्थयात्री येत. भिल्लादि समुदाय उपजिविकेसाठी नाविलाजाने वाटमा-या करत. अहिल्यादेवींनी त्यांना शिक्षा देण्यापेक्षा विधायक मार्ग निवडला. त्यांच्या गुन्ह्यांमागील कारण शोधले आणि "भिल्लाडी" ही अभिनव पद्धत सुरु केली. या पद्धतीत यात्रेकरुंना संरक्षण देण्याचे काम भिल्लांवरच सोपवले आणि यात्रेकरुंकडुन त्यासाठीचा कर घ्यायची अनुमती दिली. यामुळे यात्रेकरुही निर्धास्त झाले व भिल्लांनाही उपजिविकेचे साधन मिळाले. हा क्रांतीकारी निर्णय फक्त प्रजाहितदक्ष व्यक्तीच घेवू शकत होती. आणि तो अहिल्यादेवींनी घेतला. जगातील हे पुन्हा पहिले उदाहरण आहे.
हैदराबादचा निजाम म्हणतो...""Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar." अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. अहिल्यादेवींना आम्ही करंट्या अभिमन्यांनी "एक धार्मिक महिला" असे त्यांचे रुप रंगवले आहे. त्या नक्कीच धार्मिक होत्या. महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणा-या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता. पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा अविच्छिन्न ठरवली.
उत्कृष्ठ नागरी व लश्करी प्रशासक, नैतीकतेची आदर्श बिंदू, देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करनारी, तुलनेने अल्प भुभाग स्वत:चा असुनही, एकमेव शासिका, विस्कळीत झालेल्या, अवमानित झालेल्या हिंदू धर्मात पुन्हा प्राण ओतणारी दुर्गा म्हणुन अहिल्यादेवींचे भारतीय इतिहासातील स्थान एकमेवद्वितीय महिला म्हणुन कायमच राहील. पण आम्ही करंटे आहोत. जातीय प्रेरणा आम्हाला लाजीरवाने कृत्य करायला भाग पाडतात. अहिल्यादेवी सर्वांच्या होत्या पण सर्व त्यांना मानायला कंजुसी करतात. महाराष्ट्र राज्य हे पुरोगाम्यांचे राज्य आहे असे चुकुन म्हटले जाते. या राज्यात एकाही विद्यापीठाला अहिल्यादेवींचे सोडा पण एकाही महिलेचे नांव नाही हा आमचा असला दांभिक पुरोगामीपणा आहे. या राज्यात जन्माला आलेल्या, कर्तुत्वशालीनी ज्ञानवर्धिनी अशा अहिल्यादेवी आणि सावित्रीमाई झाल्या. आणि एकाही विद्यापीठाला या महनीय रष्ट्रमातांचे नांव नसावे असा करंटेपना फक्त आम्हीच दाखवू शकतो. सोलापुर विद्यापीठाला महाराणी अहिल्यादेवींचे नांव द्यावे अशी जनमागणी जोर धरत आहे. खरे तर मुळात अशा कोणत्याही मागणीची गरजच काय? पुरोगामी महाराष्ट्राने एव्हाना या नांवांनी अनेक प्रशासकीय, शैक्षणिक केंद्रांना अहिल्यादेवी आणि सावित्रीमाइंची नांवे देत त्यांची कर्तुत्वगाथा सन्मानित करायला हवी होती. आजही वेळ गेलेली नाही. सोलापुर विद्यापीठाला महराणी अहिल्यादेवींचे तर पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईंचे नांव त्वरित दिले गेले पाहिजे आणि त्यांच्या प्रेरणादायी कर्तुत्वाला सलाम केला पाहिजे. महिलांना बळ पुरवायचे असेल तर याला पर्याय नाही हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे.
तसे होणार नसेल तर हे सरकार जातीयवादी आहे असेच आम्हाला समजावे लागेल!
-संजय सोनवणी
ताज्या नोंदी
- पासवर्ड ऑनलाईन ‘इन्कम’चा !
- आमच्या समतेच्या विश्वात…!
- " विचारधन"
- अबोली
- Ancient Indian coins and symbolism
- ईश्वरास
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ – मांगी- तुंगीजी
- लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून :भाग ७ :कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर फाईल ऑपरेशन्स.
- Energy Crisis
- स्वराज्याचे शिलेदार – गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक
- ओल्या फेण्या / Olyaa Fenyaa
- विचारा..
- Motives for writing autobiographies
- नाथयोगिनी मुक्ताबाई!
- थोर तत्वज्ञ-महाराणी अहिल्यादेवी होळकर!
- मराठी संगीताविषयी थोडं हेही वाचा.
- अण्णा
- Discipline : Do we need it ?
- केस पांढरा (तरूण कविता !)
- एलबीटी वसुलीसाठी पर्याय
- फोटोशॉपमध्ये identity फोटो बनवणे – भाग 2
- Rachana 2013-05-15 15:13:00
- काहीतरी हरवलंय …
- मे महिना…. विचारांचा वणवा………
- फोटोशॉपमध्ये identity फोटो बनवणे – भाग १








