All posts by Ramesh Thombre

माती

वर्षभरानं कधीकाळीमी शहरातून माझ्या गावात येतो तेंव्हा,भिरकावून देतो पायांना बंदीस्त करणारे शूज,श…

वगेरे

.

असू दे जरा आवर्षण वगेरे नको रोज देवूस दर्शन वगेरे.

तुझी ओढ केवळ विजातीयतेचीधृवाचे – धृवाशी …

इन्स्पेक्शन

गावात डांबरी सडक झाली तरी आज सुध्दा धुरळा उडवितच एस.टी.गावात येते. नदीच्या पलीकडची एस.टी. कोरड्या…

चैतन्य

रस्त्याच्या दुतर्फा ……काळ्या ढेकळांनी व्यापलेली रानं ,नजरेच्या सरळ रेषेत नागीनिसारख्या फुत्कारतसळसळणाऱ्या उन्हाच्या झळा ….थेट कानात घुसून मस्तकापर्यंत डंख मारत असताना ….वाऱ्यानं उडणाऱ्या डोक्यावरचा पदर सावरतत्याच रणरणत्या उन्हातती काड्या-कुड्या वेचून रान स्वच्छ करते आहे.

काही अंतरावर त्याच लिंबाच्याझाडाच्या खालच्या फांदीला बांधलेल्या …झोळीत शेतकऱ्याचा वारसदार निवांत झोपला आहे.बुंध्याला

मीच तिच्यावर निर्भर असतो

मीच ‘तिच्यावर’ निर्भर असतो
ती हसल्यावर क्षणभर हसतो

मौनामध्ये असतो तेंव्हा
मी माझ्याशी बोलत बसतो

ती माझी जर झाली नसती
मी माझाही झालो नसतो

तिचे नि माझे जरा निराळे
ती डसली की मी डसतो !

मला फसवणे अवघड नसते
ती फसली की मी फसतो

आशय आणि अर्थासाठी
मी गझलेची ‘जमीन’ कसतो
– रमेश ठोंबरे

छंदमुक्त !

 छंदमुक्त !लिहिण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीनुसार वाचकांच्या आणि वर्गीकरणाच्या सोयीसाठी म्हणून साहित्यात गद्य आणि पद्य विभाग आले, त्यानंतर गद्य साहित्य आणि पद्य साहित्य असे वर्गीकरण करण्याची सोय झाली. नंतर पद्यामध्ये असेच ‘मुक्त’ आणि ‘छंद / वृत्त’ असे वर्गीकरण झाले इथपर्यंत सगळंच आलबेल होतं.

कवितेमध्ये जेंव्हा  ‘मुक्त’ आणि ‘छंद / वृत्त’ असं वर्गीकरण झालं तेंव्हा मुक्त लिहिताना,