All posts by Jitendra Indave

बायको पाहिजे – भाग ३

indian-dulhan-in-dress

        मित्र पण  सांगतात – “यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणार…थांबव कि आता…एखादी पसंत  कर आणि लग्न कर ..कश्याला एवढे खोल वर विचारतो.”. पण मला उत्तर न देणेच योग्य वाटते. शाळा नियमित सुरु झालेली आहे. मुलगी पाहण्यासाठी सुट्टी घेवून बाहेर गावी जाणे कमीत कमी मार्च ते एप्रिल पर्यंत शक्य नाही. तरी मध्येच  जर सतत दोन तीन दिवसाच्या सुट्या आल्यात कि आई घाई करते. थोड्या दिवसापूर्वी सुरत मधेच आणखी एका बी एड झालेल्या मुलीसाठी आमंत्रण आले. पण इथे पण तेच नाटक होते. मुलीचा बाप राजकारणी (नेता ) होता. जे मला अजिबात आवडत नाहीत. पण आई ने केलेल्या जोर जबरदस्ती मुले जावे लागले. मुलगी सुरत मधेच कुठे तरी शाळेत माध्यमिक विभागात खाजगी जोब वर होती.

     त्या स्थळी  एका नातेवाईक द्वारे जाण्याचे ठरले. मी, आई आणि एक नाते वाईक अशी तीन व्यक्ती तेथे गेलो. दुपारची वेळ होती. बहुतेक लोक झोपलेले असतात त्या वेळी. अश्या वेळी एका सोसायटी मध्ये घर शोधत शोधत आम्ही पोहचलो. जेम तेम ते घर सापडले. एरिया थोडा अंडर प्रोग्रेस होता. पुरेशी सोय अजून झालेली नव्हती.घराच्या बाहेर मुलीच्या वडिलाने मोठे  बेनर  लावले होते. ठळक अक्षरात  दुरून कोणाला हि दिसेल अश्या पद्धतीने एका राजकीय पक्षाचे आणि स्वत:चे  नाव लिहिले होते. ज्या प्रकारे ते बेनर लावले होते त्या वरून मी एकच अंदाज लावला कि या व्यक्तीला लवकरच एखादा मोठा नेता होण्याची घाई झालेली आहे. बाहेरून लोखंडी दरवाजा बंद होता.आम्ही बेल वाजली.मधून एक स्त्री आली व सस्मित आम्हास आत येण्यास आग्रह केला. दरवाजाच्या अगदी समोर सोफा सेट वर मुलीचा मावशीचा मुलगा उलटा (उताणा) होऊन झोपलेला होता.त्याची पेंट मागून अर्धी उतरलेली असून  “रूपा” ची अंडर विंयर दिसत होती. ते पाहून मला अमीर खान चा  गेल्या वर्षी आलेला चित्रपट  Delhi Belly आठवला. त्याच्यात एक केरेक्टर अगदी तसेच आहे. मुलीच्या आई ने त्यास तीन चार थाप मारून उठवले. कुंभ कर्णी निद्रेतून जागे होऊन तो सरळ किचन मध्ये गेला.मुलीच्या आई आणि माझ्या आई मध्ये संभाषण झाले. पण मी कोणाशीही बोलू शकत नव्हतो कारण माणसा पैकी एक हि हजर नव्हते. त्या च संदर्भात मी त्यांना (मुलीच्या आईला ) विचारले समोरून मला उत्तर मिळाले कि “आज इलेक्शन आहे त्यामुळे ते वार्ड (बूथ) वर गेलेले आहेत.” हे ऐकून मला तर आश्चर्याचा धक्का बसला होता. एकच विचार मनात आला कि स्वत:च्या मुलीच्या लग्नाची गोष्ट निघालेली आहे आणि हा व्यक्ती घरी न थांबता बाहेर आहे. याचा अर्थ काय? कि त्याला कसली हि पडलेली नाही “राजकारण” शिवाय……
     थोडा वेळ झाला मुलीच्या आईने मुलीला चहा पाणी घेवून येण्यासाठी थोड्या हळू स्वरात ओरडली. तिकडून संतापात उत्तर आले – “हो येतेय !” त्याच क्षणी मी तिच्या आई कडे पहिले , नेमके त्याच क्षणाला त्यांनी देखील माझ्या कडे पाहिले आणि मान खाली करून घेतली.पंजाबी ड्रेस  मध्ये हातात चहा चा ट्रे घेवून ती हजर झाली. मी चहा घेतला. चहा जास्त होता म्हणून कमी करण्याचा आग्रह केला.पाच मिनिटा पर्यंत निवांत पाने चहा घेतला.  ती आली चहाचे कप व पाण्याचे ग्लास व ट्रे  घेवून किचन मध्ये परत गेली.मुलीच्या आई ने  तिला परत बोलावले समोर काही विचारायचे असेल तर विचारण्यास सांगितले. 
     आता दुसया वेळेस ती किचन मधून आली तेव्हा मात्र थोडी वेगळी दिसली.ज्या प्रमाणे मुले तोंडात बबल गम ठेवून तोंड हलवतात तशी ती तोंड हलवत आली. बहुतेक तिच्या तोंडात च्व्हिङ्गम होते.ते पाहिल्यावर तिला विचारण्यासाठी जे प्रश्न डोक्यात होते ते सर्व पुसले गेले. आणि “हम आपके है कोण ?” चित्रपटातील एकच दृश्य डोळ्या समोर आले – “जेव्हा सलमान खान बबल गम खात असताना माधुरीला गुलेल ने मारतो” 
मन सांगत होते कि जितु “या मायाशी लग्न केले म्हणजे तुला माधुरीचा रोल करावा लागेल आणि ते सलमान खान बनेल. जी रोज तोंडात चिंगम ठेवून गुलेल ने तुला मागे  मारेल.. “
     मी एका मिनिटा साठी विचारात पडलो होतो कि शिक्षिका असून असे कसे ? पण उत्तर कोण देणार ? कदाचित त्यांच्या घरात जर जास्तच मुक्त वातावरण असेल सुरुवाती पासून.येथे नुसत्या औपचारिकता म्हणून मी तिला शिक्षणा बाबतीत दोन तीन प्रश्न केलेत. सी आय डी  सारखे जास्त विचार पूस न करणेच मला योग्य वाटले. आणि आम्ही तेथून निरोप घेतला. बाहेर आल्या वर आईला म्हटलो – “आई !!!! केस क्लोज  नो मोर इन्क्वायरी “. आई ने देखील “होकार” मध्ये डोके हलवले. तो विषय तिथेच संपला होता.

     आणखी पाचेक दिवसा नंतर “आहिरे साहेबा कडून” (आहिरे व म्हतारी  यांच्या बद्दल अधिक माहिती साठी भाग दोन वाचा ) परत त्याच म्हातारी द्वारा एका नवीन मुलीला पाहण्यासाठी आमंत्रण आले. मुलगी आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाला होती. एवढी लायकात पाहून कोणी हि व्यक्ती “नाही” म्हणणार नाही. तरी येथे मनात संशय निर्माण झाला. संशय असा कि स्वत:च्या साली साठी त्या व्यक्तीने (आहिरे साहेबांनी ) मला पुढे न करता , मागेच केले होते. अर्थात त्याच्या साली साठी मला ते योग्य समजत नव्हते.  तर आता या नवीन स्थळा  साठी का बरे त्यांनी माझे नाव पुढे केले असावे ? डोक्यात एक प्रश्न चिन्ह होते. समोरून त्यांनी निरोप पाठवला कि अमुक दिवशी तुम्ही दुपारी अकरा वाजेला या म्हणजे आपण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पाडू. पण माझी शाळा जवळ जवळ एक वाजेला सुटते. त्या मुले हि बाब शक्य नव्हती , मी सांगितलेल्या वेळी जाण्यास असमर्थता जाहीर केली. आणि मग दोन दिवसा नंतर दुपारी दोन वाजेला पाहण्याचे ठरले.
     मी , आई व परत एक नाते वाईक अशी तीन लोक निघाले. मला वाटले स्थळ सुरत मधेच आहे तर काही लांब नसेल.पण मी चुकीचा होतो. ते स्थळ बरेच लांब होते. सुरत च्या बाहेर म्हणावे लागेल. ओटो चालकाने पण आम्हास अर्ध्या रस्त्यात सोडले. पुढे जाण्यास तो तयार नव्हता. मग ती चार किलो मीटर आम्हास पायी चालावे लागले. दूर पर्यंत एकी कडे शेती व दुसरी कडे बांधून पडलेले कोम्प्लेक्ष आणि रो हाउसेस दिसत होते. एकी कडे सिमेंट , कोन्क्रेत चे जंगल तर दुसरी कडे शेत. पण माणसे दुर्मिळ पणे दिसत होती.चालता चालता मधेच समोरून आहेरे  साहेब मोटार सायकल वर मागे एका व्यक्ती सह  गेस सिलिंडर नेत असताना दिसले. मी त्यांना दुरून ओळखले नाही. पण त्यांनी मला ओळखले.लगेच मोटार सायकल थांबवली.
मोठ्या स्वरात बोलले – “जयभीम हो इन्दवे साहेब. काय हो पायी !!!!!????? रिक्षा येते ना थेट “,
मी उत्तर दिले – “ओटो वाला तयार नव्हता त्यामुळे …..”
आहिरे – “बरे , असे करा तुम्ही सरळ माझ्या घरी जा , आई आहे बसलेली , तुम्ही भेटा आईला, मी जरा हा सिलिंडर पोहचवून येतो ..आणि काय हो सर तुमचा मोबाइल नंबर लागत नाही..”
मी – “तुम्ही युनिनोर चा नंबर डायल केला असेल. तो सध्या बंद आहे.”
आहिरे – “कोणता नंबर चालू आहे ?”
मी – “बरे हा घ्या , ९९९८७११०४२”
आहिरे – ” तुम्ही चिंता करू नका मुलगी हुशार आणि सुंदर आहे. सध्या आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाला आहे. माणसे देखील अगदी साधी  सिम्पल आहेत. ओ के . बरे ..येतो मी…नंतर चर्चा करू.”

परत प्रश्न चिन्ह उदभवला कि ज्या व्यक्ती द्वारा पाहण्यासाठी आमंत्रण आले तीच सोबत हजर नाही.? असे का ?

     ते निघून गेले . तेथे रस्त्यातच मला माहित झाले कि त्यांनी तेथे नवीन घर एकाद महिन्या पूर्वी विकत घेतले आहे. आहिरे च्या घरी पोहचलो. चहा पाणी झाला. त्यांची पत्नी व आई बरोबर एक दोन गोष्टी झाल्यात. घर विषयी गोष्टी निघाली होती तेव्हा मिसिस आहेरी यांनी सांगितले कि त्यांनी घर २० लाख रुपयात घेतले आहे.आणि एका महिन्या नंतर रेट २५ लाख झालेला आहे. मला माहित होते कि त्या ठिकाणी, त्या विस्तारात प्लॉट चा रेट काय चाललेला आहे.. अर्थात ते निव्वळ पणे खोटे बोलत होते. कदाचित त्यांना स्वतः चे स्टेटस जरा  जास्त उंच दाखवायचे होते. मी नुसते “होकार”  मध्ये मान हलवत होतो.

     थोड्या वेळाने आम्ही त्याच एरिया मध्ये थोड्या अंतरावर असलेल्या मुलीच्या घरी गेलो.मुलीचा भाऊ आणि आई हजर  होती.प्रथम दृष्टीस ते अगदी सादे  आणि भोळे  प्रकारची माणसे असल्याची आढळून आली. मुलगी पण चांगली होती फक्त शरीराने माझ्या पेक्षा थोडी सळ पातळ होती. त्या मुलीचा भोळे पणा आणि अगदी सस्मित प्रेमाने हळूच विचार पूर्वक बोलणे मला फार आकर्षितकरत  होते. ओवर आल माझ्या लायक मुलगी होती. पण मनात असलेल्या प्रश्न चिन्हामुले मी पुढे पाउल न टाकता . माघार घेतली. या ठिकाणी मी तीन ते चार दिवसाचा अल्प विराम ठेवला. कारण सरळ “नकार” देणे येथे मला प्रथम वेळेसच कठीण वाटत होते.
   
क्रमश:

बायको पाहिजे – भाग 2

indian-bride-in-jwellary

 
      मागे बायको पाहिजे – भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी  मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात “नंदुरबार” जिल्ह्यात गेलो असतांना मला झालेला अनुभव.या भागात आपण वाचणार सुरत शहराचा प्रसंग. गुजरात मध्ये एक वस्तू आढळून येते कि जर कोणी एखादा मराठी माणूस पोलीस खात्यात साधारण पोलीस कोन्स्तेबल जरी असला तरी  त्याचा ठसा वेगळा असतो तो जणू काही एखाद्या कमिशनर च्या पोस्ट वर आहे तसे त्याचे वर्तन समाजात असते.  बाकीच्या समाजात असते कि नाही ते मला माहित नाही पण , कमीत कमी बुद्धिस्ट कम्युनिटी मध्ये हामखास पणे दिसून येते. त्यांचा स्वभाव फारच विचित्र असतो. त्यांचा रग्गटपणा व्यवहारात आणि वर्तुनुकीमध्ये दिसून येतो. समजा रस्त्यावर एखादा “पवार” “सोनवणे” “बैसाणे” “चित्ते ”  “रामटेके ” “मोहिते ” वगैरे पैकी जर कोणी पोलीस दिसून आला आणि जर तुम्ही प्रेमाने सस्मित त्याला राम राम किवा  “जयभिम” म्हटले, तर प्रत्युतर तुमच्या अपेक्षे प्रमाणे तुम्हास मिळणार नाही.त्यांना “राम राम” किवा  “जयभिम” म्हटल्यावर लगेच ते  चिडतील, त्यांना   त्याचे अपमान झाले असे वाटेल आणि रागात  ती व्यक्ती गुजराती मध्ये असे काही तर स्टेटमेन्ट देणार,  “चाल ओये,……आगळ चालतो था ” किवा “तारी भेन नो तारी चाल ने निकळ ने”  हे सर्व मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पहिले आहे. त्यांच्या अश्या वागणुकीमुळे समाजात त्यांच्या पासून अमुक वर्ग दूरच राहतो . कारण त्यां वर्गाला वाटते कि गुजरात मध्ये बुद्धिस्ट कम्युनिटी चा पोलीस म्हणजे माणुसकी नसलेला व्यक्ती. आणि ती म्हण जी आहे ती खरी आहे कि “पुलिस वालो से दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी “… याचा अर्थ असा नाही कि ते समाजा पासून अलिप्त असतात. ते समाजात असतात पण दिसत नाहीत. वास्तविक पणे अमुक पोलिस वर्गाला मराठी असल्याचा अभिमान नसतो. अमुक नेहमी स्वतः ची ओळख लपविण्याचा प्रयत्न करत असतात.मला देखील त्यांचा पासून दूर राहणेच आवडते. संबंध जुळविण्यासाठी त्यांच्यात योग्य आणि व्यावहारिक व्यक्ती शोधणे म्हणजे कोळसाच्या खाणीत हिरा शोधण्या इतके अवघड असते 

     या दोन वर्ष दरम्यान बरीच स्थळे आलीत जिथे मुलीचे वडील , काका किवा मामा पोलीस खात्यात असतील पण मी त्यांना नकार दिला. गेल्या वर्षी गुजरात मधील वापी परिसरातून बी एड झालेल्या मुलीला मला नकार द्यावे लागले कारण एकच होते त्या मुलीच्या मामा चा जास्त  डाम-डीमपणा. वडील, मामा व काका पोलीस खात्यात होते. मुलगी चांगली होती. तिने बी एड केले होते आणि मी बी ए च्या शेवत्याच्या वर्षाची परीक्षा अटेंड करणार होतो. चर्चा करत असतांना मुलीचे वडील जे माझ्या समोर बसले होते एक हि शब्द बोलत नव्हते. जणू काही एखादा लोखंडी लॉक तोंडावर लावला असावा. पण तिचे मामा व काका सतत वट वट करत होते. त्यात मामा चे बोलणे मला खपले नाही ते मला लहान दाखवत बोलत होते “आमची मुलगी तुमच्या पेक्षा जास्त शिकली आहे ती बी एड झाली आहे , तुमच्या पेक्षा जास्त कमवणार , नोकरी तर लगेच लागेल.” या ओळी मला ज्या रंगात त्यांनी सांगितले ते मला मुळीच आवडले नाही. मनात विचार आला कि हा व्यक्ती तर लग्न अजून झालेले नाही तोच एवढी वट वट करून धाक दाखवत आहे तो लग्न झाल्यावर कल्याण च करेल. म्हणून मुलगी मला पसंत असून हि “नकार” द्यावा लागला.

     पण या वेळी मला नकार देता आला नाही. आईच्या नात्या  मध्ये एक ६० ते ७० वर्ष वयोगटातील एक म्हतारी आहे. त्यांच्याशी सबंध फार चांगले आहे. मागे दोन आठवड्या पासून ती आजी (म्हतारी) तिच्या मुलाच्या साल्याची साली साठी बोलवत होती. मी पहिल्यांदा चक्क नकार केला.मी सरळ शब्दात सांगितले कि पोलीस खात्याची माणसे व राजकारणी लोक मला चालत नाहीत. तरी ती आजी दर दोन ते तीन दिवसांनी येवून आईच्या काना वर त्या मुली साठी गोष्ट टाकत असे. मी तीन ते चार वेळा नकार दिला त्या गोष्टिला आईचे म्हणणे होते कि ते आपल्या पेक्षा मोठे आहेत चांगल्या परिचयाचे आहेत आणि स्वभाव पण चांगला आहे ते आपल्यास फसवणार नाही एकदा त्यांचा आपण मान ठेवला पाहिजे  मुलगी जाऊन पाहण्यास काय हरकत आहे ? नंतर नकार देता येईल. मी मान्य केले आणि औपचारिकता म्हणून जाण्याचे ठरवले.
     तिथे एक दिवस जाण्या अगोदर आजी ने मला त्यांचा संपर्क नंबर आणून दिला व म्हटले कि तुम्हास तिथे जाण्या अगोदर काही विचारायचे असेल तर ह्या नंबर वर चर्चा करून घ्या.तो नंबर होता त्या मुलीच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा.मी फोन केला. त्या व्यक्तीचे नाव राजेंद्र होते.जे सुरत मध्ये एका प्राईवेट शाळेत एडमिनीस्ट्रेटर होते. रिंग वाजली समोरून फोन उचलला.

“हेलो …मी जितेंद्र इंदवे बोलत आहे. मला आजी कडून आपला संपर्क नंबर मिळाला ..तर मुली बद्दल मला विचारायचे होते “
समोरून — “मी राजेंद्र आहिरे..मुलीच्या मोठ्या बहिणीचा हसबंड बोलतोय….काय नाव आपले ?.”
मी –“जितेंद्र “
समोरून — “पूर्ण नाव काय ?”
मी – “जितेंद्र गिरधर इंदवे “
समोरून –“काय करता आपण?”
मी – “मी Computar faculy म्हणून जोब करतो “
समोरून –“कोणत्या शाळेत?”
मी — “समिती इंग्लिश मिडीयम स्कूल”
समोरून –“कोणत्या सेक्शन मध्ये ?”
मी — “सेक्शन म्हणजे?”
समोरून –“आपण प्रायमरी मध्ये शिकवतात का ?”
मी –“नाही ..मी इयत्ता 8 वी  पासून तर १२ च्या मुल मुल्लीना शिकवतो”
समोरून –“बरे ….किती सेलरी आहे?”
मी – “9500 प्रती महिना”
समोरून –“जन्म तारीख ?”
मी – “25 डिसेंबर 1981”
समोरून –“बरे …ठीक आहे मी तुम्हास फोन करून सांगतो.”

     आणि लगेच समोरून फोन कट झाला. मी तर अवाक च झालो मनातच म्हटले “च्या आईला कसली घाई होती या व्यक्ती ला मला काय बोलायचे किवा विचारायचे होते तो विषयच नाही झाला !!!!!!!”  तेव्हा परत मनात आले कि आपण तेथे जाण्याचे टाळले पाहिजे. पण आई ने आग्रह केला त्यामुळे जावे लागले. जाण्या अगोदर माझा संपूर्ण बायोडाटा त्यांच्या माहिती साठी एका कागदावर त्या आजीला लिहून दिला. तो त्यांनी तिथे पोहचवला. संध्याकाळी आजीने समाचार आणला कि त्यांनी काल दुपारी आपणास बोलावले आहे.
     सांगितलेल्या वेळे नुसार तेथे पोहचलो. मुलीचे मामा, आई-वडील आणि फोन वर माझ्याशी चर्चा करणारे राजेंद्र आहिरे हजर होते. मुलीचे  मामा धुळे जिल्ह्यात शिक्षक म्हणून सरकारी नोकरी वर होते आणि काका मुंबई ला कल्याण येथे एका कॉलेज मध्ये  प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कडून परत त्याच  विषया वर बोलणे झाले – नाव , गाव, शिक्षण, सेलरी वगैरे. मुलगी चहा आणि पाण्याच्या ट्रे हातात घेवून मरून कलरच्या साडी मध्ये नटून सजून समोर आली. मुलीचे नाव “सारिका” होते. पाहण्या लायक होती. पण थोडी लट्ठ भासत होती.ओवर आल ठीक होते.तिने बारावी नंतर डी  एड केले होते.आणि दोन वर्ष पासून घरी होती. सर्व चर्चा झाल्यावर तीला माझ्या समोर बोलावले गेले ,मी तिला  एकच प्रश्न केला कि जर माझी तिला पुढे शिकवायची इच्छा असेल तर ती पुढे मुक्त विध्यापिठातून शिकणार का ? — पहिल्या क्षणी ती काही बोलली नाही, कदाचित घाबरत होती. तोच प्रश्न तिच्या वडिलांनी केला..तेव्हा ती “हो” म्हटली.
     या ठिकाणी काका व मामा यांच्या बरोबर चर्चा करत असतांना माझे “राजेंद्र आहिरे ” वर दुर्लक्ष झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव सांगत होता कि ते माझ्याशी नाराज झाले आहेत. त्यांचा मनाची एक गोष्ट मी वाचली कि त्यांना वाटत होते कि मी त्यांना इग्नोर (नजर अंदाज) करत आहे. त्यांच्या मनात हेच कि मी एका शाळेच्या प्रीसिपाल च्या पोस्ट वर काम करतो आणि हा व्यक्ती तर मला काहीच समजत नाही, बिलकुल रेस्पोंस देत नाही. ना इलाज होता कारण एका वेळी मी एकालाच तोंड देवू शकत होतो.
चर्चा करत असतानाच मध्ये समोरून  त्यांनी एक शंका जाहीर केली कि   –“एवढी 9500 सेलरी Computer faculty ला असते का?”
मी राजेंद्र ला – “होय …कित्येक  इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असते.”
त्यांनी विचारले -” तुमच्या शाळेचा वेळ काय आहे ?”
 मी उत्तर दिले – “सकाळी ७ ते दुपारी १”
“मग तुम्ही एक वाजे नंतर काय करतात?”
आता या ठिकाणी सांगणे मला थोडे अवघड वाटले कि मी दुपार नंतर काय करतो.कारण मी web development आणि  search engine optimization चे काम करतो.त्यांचा पैकी कोणी ही आई टी फिल्ड मधून नव्हते म्हणून ते त्यांचा डोक्यात उतरले नसते परत तोच प्रश्न डोक्यात राहिला असता कि नेमके काय करतात?
शिवाय सेलरी वाढली असती..आणि त्या व्यक्ती ला पहिल्या पासूनच माझ्या सेलरी बद्दल संशय होता.त्यामुळे मी खरे सांगणे टाळले आणि प्रत्युतर दिले कि -“काही करत नाही”.
नंतर  पुढे थोड्या फार इतर विषयावर चर्चा झाल्यात ,मग  मी राजेंद्र आहिरे आणि मुलीच्या वडिलाचा फोन नंबर लिहून घेतला आणि तेथून घरी परतले. मनातल्या मनात विचार करत होतो. काय फरक पडतो मुलीचे वडील जरी पोलीस मध्ये आहेत. पण त्यांचे इतर नाते वाईक सर्व शिक्षणाच्या बाबतीत पुढे आहेत. प्रत्येक जन शिक्षक आहे, शिवाय मुली ने हि डी  एड केले आहे. आपली जमेल तिथे. म्हणून मला या ठिकाणी “हो” म्हणावे तसे वाटले.

     पुढच्या दिवशी आजी ने घरी येऊन सांगितले कि मुलगा त्यांना आवडला आहे.मी पण त्यांना हो कार  मध्ये उत्तर दिले. पण तरी मोठ्या बंधूना एकदा त्या लोकाशी एकदा भेट करून घेण्याचा मी आग्रह केला जे बाहेर गावी होते व एका दिवसांनी परतणार होते. समोरून फोन वर त्यांनी हि “हो नक्की या” म्हणून सांगितले.
     तिसरा दिवस उगवला. मोठ्या बंधूनी त्यांचा कामा वर लिव घेतली. सकाळी आम्ही निघण्याच्या बेतात तेवढ्यात ती आजी समाचार घेवून आली कि “मुलगी, तिची आई आणि मामा धुळे ला जात आहेत ते तुम्हास चार दिवसांनी कळवतील.’ .मी थक्क झालो. मला तर हा प्रकार समजलाच नाही कि अचानक काय झाले? त्यांना हि आवडले होते मला हि आवडले होते. मग एका रात्री दरम्यान काय नेमके झाले असेल? .

     मी राजेंद्र अहिरेसा फोन लावला आणि कळवले कि “तुमची इच्छा असेल किवा नसेल मला स्पष्ट पणे चार पाच दिवसात कळवा , कारण शाळा लवकरच उघडतील आणि मग मला या कार्या साठी इतर ठिकाणी जाण्यासाठी वेळ मिळणार नाही. आणि जर इच्छा असेल तर मुलेचे शाळेचे प्रमाण पत्र मागवून घेणे”. तेव्हा देखील फोन वर ती व्यक्ती फारच घाईत असल्याचे दिसून आले.त्यांना माझ्याशी चर्चा करण्यात थोडा देखील रस वाटत नव्हता.त्यांनी एक मिनिट देखील फोन वर गोष्ट न करता थोडक्यात “हो ठीक आहे -आम्ही सांगतो लवकर ”  बोलून  सरळ फोन कट केला.

    या फोन कोल नंतर मला त्यांच्या विषयी अजून जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली.मी सरळ DEO ऑफिस गाठले. आणि माहिती मिळवली.ते Non-Granted शाळेत administrator होते. शाळेची काही विशेष  प्रोग्रेस नव्हती. दरवर्षी येणारे परिणाम देखील प्रभावशाली नव्हते त्यांची सेलरी देखील माझ्या एकूण सेलरी पेक्षा जास्त नव्हति.

पण साहेबांचा तो थाट  म्हणजे के प्रकारचे कुतूहल होते माझ्यासाठी.

मनात त्या व्यक्ती विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले पण त्याचे  स्पष्टीकरण मला माझ्या मित्राने करवून दिले. त्याने  मला  सांगितले कि या case मध्ये नेमके काय होणार आहे. आणि तसेच झाले.

   मित्राने सांगितले कि इथे इगो प्रोब्लेम झाला आहे. त्याने सांगितले कि जशी एक म्यान मध्ये  दोन तलवार नाही राहू शकत  तशी गोष्ट इथे आहे. जर इथे तुमचे लग्न झाले तर राजेंद्र साहेबांचे तेज तुमच्या समोर डीम होईल त्यांचा प्रकाश जो सध्या सासर्याचा अवती भोवती दिसतोय तो दिसणार नाही . तुमच्या हुशारी मुळे  जास्त मान सन्मान तुम्हास लाभेल. ती गोष्ट त्यांनी बरोबर ओळखली आहे म्हणून ते स्वतः पेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला पुढे येऊ देणार नाहीत.  जरी मुलीचे पाल्य आणि नाते वाईक तयार असतील पण राजेंद्र साहेब सहमत होणार नाही. तुम्हास पाच ते सहा दिवसा नंतर ते सांगतील कि “ओवर आल आम्हा सर्वांना तुमचे आवडलेले पण वय माना मधेय थोडे मागे पुढे होत आहे. त्यामुळे जमेल तसे वाटत नाही.” किवा “मुलगी एकाद महिन्या नंतर परतेल तेव्हा आम्ही कळवू “

  मित्राने सांगितलेली हि गोष्ट मी नजर अंदाज केली. आणि इतर कोणत्याही ठिकाणी मुलगी पाहण्यास जाण्या अगोदर हा निर्णय (तिकडचा प्रतिसाद ) घेणे मला अत्यंत आवश्यक वाटले त्यामुळे आठवडा पर्यंत प्रत्युतर ची वाट पाहिली. पण……………………. काही नाही.

  शेवटी, आहिरे साहेबांनी जो मुलीचा वडिलांचा एक नंबर लिहून दिला होता त्या नंबर वर मी फोन केला. आश्चर्य !!!!! त्या व्यक्तीने, तो नंबर चुकीचा लिहून दिला होता (कदाचित त्यांची इच्छा होती कि मुलीच्या वडिलाशी किवा नाते वाईकाशी मी  डायरेक्ट संपर्क करायला नको त्यांच्या द्वारेच पुढे गेले पाहिजे )..  …समोरून कोणी दुसरी स्त्री हिंदी भाषेत बोलत होती. “रोंग नंबर ..यहा कोई बैसाणे नाही है .”
मग आहीरेना फोन केला. फोन रिसीव केला गेला समोरून
मी – ” मी जितेंद्र बोलतोय — जयभीम सर   “
समोरून – “जयभीम ..जयभीम “
मी – “सर आपण मला अजून हो किवा नाही काही स्पष्टता केली नाही. “
समोरून — “हो …हो.. मला आठवले …सर एक्च्युली मी तुम्हास सांगायचे विसरलो होतो कि इथे सर्वाना आवडलेले पण मुलीच्या आणि तुमच्या वयातील फरके मुले  मागे पुढे होत आहे.”
मी — “सर , मला तर तसे काही विशेष दिसत नाही..पण मला वाटते मुलीला मी शिक्षणाचा आग्रह केला तो तिला आवडला नसेल , तसे माझ्या कडून कोणत्याही बाबतीत जास्त प्रेशर नाही. तिला नसेल शिकायचे तरी चालेल…”
मधेच ते बोलले.
–“अहो नाही, नाही, तसे काही नाही…तोच विषय आहे जे मी तुम्हास सांगितले.”
एवढे बोलून ते कमीत कमी पाच सेकंद बोलून चूप झाले. मी कोईन बॉक्स वरून फोन केला होता..मिनिट संपला फोन कट झाला.

     मी परत लावला.कोईन बॉक्स वरून फोन केला असल्या कारणाने कट झाल्याचे सांगितले. इथे लग्नाचा विषय संपला होता काही बोलण्या सारखे नव्हते तरी मला आठवले कि हि व्यक्ती शाळेतच आहेत म्हणून एखादी मदद करेल. मी त्यांना विचारले. शाळेत नेहमी मुलांची टेस्ट घ्यावी लागते .म्हणून प्रत्येक आठवड्यात नवीन प्रश्न पत्रिका तयार करणे डोके दुखी असते. त्यामुळे मला त्यांच्या कडून जुन्या प्रश्न पत्रिका मिळतील त्या अपेक्षेने  सरळ विचारले
–“तुमच्या शाळेत अकरावी आणि बारावी चे इंग्रजी माध्यमाचे वर्ग असतील ..तर मला गेल्या वर्षाची चाचणी पेपर्स हवे होते.जर मिळाले असते तर बरे झाले असते.”
समोरून — “माझ्या हातात काही नाही आम्ही कम्प्युटर चा कंत्राट दिला आहे दुसर्या एका व्यक्तीला ते काय करतात कशी परीक्षा घेतात व पेपर्स बनवतात त्यांनाच माहित.आणि ते सर्व दिवाळी नंतरच आता काही नाही …सध्या रजा (सुट्ट्या) आहेत ….बरे मग ठेवतो” …आणि  घाईत त्यांनी फोन कट केला.
   
     फोन ठेवल्या नंतर मित्राने सांगितलेले शब्द मला आठवले.अगदी तसेच झाले होते.मुलगी मना पासून आवडलेली , पण काही हकारात्मक घडले नाही. शेवटी  फक्त मनातच म्हटले – ” घाबरू नको जितेंद्र, जर हि सारिका नाही तर दुसरी “सारिका” नक्की कुठे तरी तुझी वाट पहात असेल.”    

बायको पाहिजे – भाग 1

जुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, “लग्न केले कि नाही?” किवा “किती मुले आहेत तुम्हास ?”. या प्रश्नाचे उत्तर देवून मी पण कंटाळलो आहे. किती वेळा परत परत तेच उत्तर देत राहायचे ? शेवटी नाईलाजाने मित्र वर्तुळा पासून दूर राहिलो आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसे पाहिजे तसे स्थळ मिळत नाही . आणि समजा मिळाले तर तिथे एक अथवा दोन कारणाशिवाय जमत नाही. एक तर मुलगी जास्त शहाणी असेल किवा आई वडील व नाते वाईक दीड शहाणे असतील. दोन वर्ष झाले आहे पण ज्या सुंदरी च्या शोधात आहे ती काही अजून काही मिळालेली नाही. मागे, मला झालेल्या अनुभवाची नोंद ” सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे भाग एकदोन ” मध्ये केली आहे. या वर्ष दरम्यान देखील मला नवीन अनुभव झाला.खानदेश भागात “नंदुरबार ” म्हणून जिल्हा आहे. त्या ठिकाणी मुलगी पाहण्यासाठी गेलो होतो. मुलीने बारावी नंतर डी एम एल  टि केले होते आणि त्या बेस वर सरकारी हॉस्पिटल मध्ये जोब वर होती. अर्थात सरकारी नोकरी वर होती.जवळच्या नाते वाईकाने मला तिथे पाहण्यासाठी बोलावले.पण माझ्या मनात तर होतेच कि ते नक्की सरकारी नोकरीवाला नवरा शोधात असतील. म्हणून आपले जाणे योग्य नाही. मी टाळले. परत चार महिन्या नंतर दुसर्या नातेवाइका कडून त्याच मुली साठी बोलावाले गेले. मनातल्या मनात विचार आला कि मुलगी काही माझ्या कुंडळि  मधून जात नाही आहे. आपण नक्की गेले पाहिजे. माझ्या शाळेतील एका शिक्षक  मित्रा कडून माहिती मिळाली कि ते मुलगी च्या  वडिलाना ओळखतात. जेव्हा ते (मुलीचे वडील ) बस ड्राइवर होते तेव्हा ते नेहमी त्या शिक्षांना भेटत असत (त्यांचा कोलेज च्या रूट वर तीच एक बस होती ). व्यक्ती चांगले आहेत म्हणून आपण गेले पाहिजे असे मला वाटले. 

     नंदुबार ला आलो , त्या ठिकाणी सर्व प्रथम जुन्या विस्तारत जिथे ते राहत होते तिथे त्याचा विषयी माहिती गोळा केली. पण आश्चर्य !! कोणी हि मला त्यांच्या स्वभाव व वर्तणूक विषयी चांगले सांगितले नाही.पण तरी  माझ्या शिक्षक मित्राचे शब्द माझ्या लक्ष्यात होते. तेच डोक्यात ठेवून पुढे गेलो.
     बाजार पेठात त्यांचे दुमजली जुन्या टाईपचे घर होते , बाहेरून ते घर, माधव राव पेशवे यांच्या काळातले वाटत होते. घराची अवदशा पाहून वाटले नक्की यु एन ने त्या घराला इंडिअन हेरीटेज मध्ये सामील  करायला हवे.आत गेलो, बसलो, समोर च एकी कडे आई व दुसरी कडे बहिण बसली. मी एका पलंगावर बसलो. माझ्या डाव्या हाता कडे त्या दरवाज्यात  मुलीची आई उभी होती. आणि उजव्या हाता कडे वडील एका खुर्ची वर बसले होते.काल रात्री गली मध्ये लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून मुलगी थकलेली होती. त्यामुळे तिला तयार होवून चहा पाणी घेवून येण्यासाठी बराच वेळ लागला. तो पर्यंत मुलीचे वडील नाते वाईक विषयी एक दोन गोष्ट करू लागले. जवळ जवळ पंधरा मिनिटा नंतर  चहा आणि पाण्याचा ट्रे हातात घेवून मुलगी पांढर्या साडीत सुसज्ज होऊन आली. मुलेचे वय जवळ पास एकोणतीस ते तीस च्या जवळ पास होते पण मुलगी सुंदर होती त्यामुळे मी वय ईग्नोर केले..तिने प्रेमाने  मला , आई व बहिणीस चहा दिला. 
     दोघांनी एक दुसर्याचा परिचय करवून घेतला.नाव , गाव, शिक्षण,इच्छा वगैरे विषयी चर्चा झाली.  वीस मिनिटे  पसार झाली , पण मुलीची आई अजून काही बसलेली नव्हती.मुलीच्या मागे दरवाज्यात  उभीच राहिली. मला हे समजत नव्हते कि त्या मुलीच्या आईला बसायला काय झाले होते ?…अहो तब्बल वीस मिनिटा पासून जे काही गोष्टी होत होत्या त्यात ते उभे राहूनच हो कार आणि नकार देत त्यांचे मत मांडत होते. या चित्रा वरून तर एकच निष्कर्ष मला काढता आला कि येथे घरात मुलीच्या आईचे वर्चस्व आहे, वडील बिचारे नुसते औपचारिकता म्हणून असतील. पण पुढच्याच क्षणाला त्यांनी चांगल्याच पद्धतीने स्वतः चा परिचय करवून दिला.
     कारण समोरून अश्या काही स्टेटमेंटचा मारा त्यांनी केला कि मला तर फक्त ऐकतच राहावे लागले.
त्या पैकीचे काही विधाने या प्रमाणे होती.
“आमचे अमुक व्यक्ती (काका – मामा ) हे नाशिक शिक्षण बोर्डात अधिकारी आहेत “
     
“माझी मुलगी समग्र राज्यात अमुक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.”

“माझ्या मुलीला फोरेन मध्ये आमक्या गोष्टी साठी बोलावण्यात आलेले , पण आम्ही पाठवले नाही “

“औरंगाबाद हून एम बी ए झालेली व्यक्ती मुली साठी आली होती पण आम्हास आवडले नाही”


     आता राम जाणे एवढ्या विधान पैकी किती सत्य होते. त्यांनी मला अट  घातली कि मी जर मुलीला लेब उघडून देण्यास तयार असेल तर ते लग्नासाठी तयार आहेत. जर तसे नसेल तर मुलाला सरकारी नोकरी असली पाहिजे. मला सरकारी नोकरी नव्हती आणि लेब उघडणे म्हणजे खेळ नव्हे. साधारण लेब ठीक आहे पण कोम्प्लेक्ष लेब उघडणे थोडे अवघड असते. कारण बरेच पैसे गुंतवावे लागतात. आम्ही लवकरच तुम्हास कळवतो एवढे बोलून मी सुरत कडे वाट धरली. रात्रभर मी calculate  करत राहिलो कि आपल्याने होणार का ? दुसर्यादिवशी सकाळी, माझा एका मित्रा कडे लेब ची माहिती घेतली . मला समजले कि काही अवघड बाब नाही.म्हणून दुसर्याच दिवशी त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. मनात होते कि घरी आल्यावर त्यांना लेब ची माहिती देवू. पण इथे फोन केल्या नंतर मुलीच्या आई कडून उत्तर मिळाले कि मुलीचे मामा पुढच्या आठवड्यात नाशिक हून  नंदुरबार येणार आहेत तेव्हा ते कळवतील. पहिला आठवडा गेला. मी परत फोन लावला जवळच्या नातेवाईकास तपास करण्यास सांगितले ,पण  परत तेच उत्तर, दुसरा आठवडा आला, मी परत फोन केला , आणखी तेच उत्तर …..तिसरा आठवडा आला…….पण तेच. मला मात्र अनावर राग आला होता कि यांना नसेल करावयाचे तर नुसता समोरच्या व्यक्तीचा वेळ का घालवतात ? कोणत्या मनोवृत्तीचे माणसे असतील कि ज्यांना एका शब्दात हो किवा नाही म्हणणे पण अवघड जाते ?

आपणास काय वाटते ?
तिथे गर्व दिसून येत नाही का ? पण कशाला एवढे अभिमान ??????

एका क्षणा साठी वाटले कि मला पण एक बेनर  बनवायला हवे कि
“बायको पाहिजे”
“फक्त माणुसकी असलेल्यांनी संपर्क करावा”

पण विडंबना आशी आहे कि नुसते बेनर लावून चालत नाही.स्वत: हून त्या अपमानाला तोंड द्यावे लागते.

हि सत्य कथा फक्त एका स्थळा विषयी आहे.अशीच दुसरी घटना आता चार दिवसा पूर्वी घडली आहे.त्या कथेत सध्या intarval  आहे. picture  क्लीअर झाल्यावर लवकरच आपल्या समक्ष सादर होणार ….
चला परत मुलगी पाहण्यासाठी धुळे निघायचे आहे..तो घटनाक्रम परत आल्यावर …….लवकरच

क्रमश:  

डोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार …………

दोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा माझा प्रथमच प्रसंग होता. म्हणून एक वेगळाच प्रकारचा उत्साह होता. जाण्या अगोदर तेथे गडावर कोणती सुविधा आहे व कोठे थांबता येईल ती जानकारी इंटरनेट वर शोधण्याचा प्रयत्न केला. सप्तशृंगी मातेची वेब साईट सापडली पण पाहिजे तशी माहिती उपलब्ध नव्हती.रात्री दोन वाजेला सुरत हून प्रवास प्रारंभ केला.आई वडील आणि मी तसेच सोबत काका आणि त्यांची चार मुले होती.सकाळ च्या सहा वाजे पर्यंत प्रवास सुरळीत पार पडला . पण जसे आम्ही गुजरात च्या डांग जिल्ह्यात पोहचलो. चार हि बहिणी नी उलटी (ओमिट ) करायला सुरवात केली. कारण रस्ता सर्पाकार आणि वळणदार होता. ते त्यांनी पाहिले कि त्रास सुरु होत असे. पण नाइलाज होता. कोणत्याही प्रकारची औषधे सोबत घेतली नव्हती. त्यामुळे तो त्रास सहन करूनच पुढे जावे लागले. गाडीच्या दोन्ही बाजूचे दरवाजे बाहेरून रंगले गेले होते. दरवाजा उघडण्याचे hendal देखील सुटले नव्हते. सापुतारा या ठिकाणी चहा घेण्याचे ठरवले. दिवस उगवण्याच्या तयारीत होता. तेथील ते थंड आणि अल्हाद दायक वातावरण शरीरात एक वेगळ्याच प्रकारचे रोमांच उभे करत होते. सुरत व गुजरातच्या इतर भागातून आलेले प्रवाशी त्या वातावरणाचा आनंद घेत होते. पर्वतामागून सूर्याचे अगदी नयनरम्य दुर्श्य दिसत होते. फोन मध्ये बिघाड झाल्या कारणाने ते दृष्य मी घेवून शकलो नाही.ढगामध्ये कधी लाल तर कधी तांबड्या रंगाचे किरण पसरत होते. तर कधी अचानक सूर्य मावडला असावा तसा भास होत होता. सूर्य जणू काही लपा छपी खेळत असावा असे वाटत होते.पुढे आम्ही सापुतारा हून कळवण या भागातून नांदोरी ला जाण्याचा मार्गावर निघालो.पर्वतावर ढग जणू काही आम्हास पाहत होते.
     पहाटेची वेळ होती. सकाळी कळवण या मार्गाने जात असतांना मधेच रोडवर कोंबडी , पिले अमुक वेळेस कुत्रे मध्ये येत होते. त्यांना वाचवत वाचवत चालकाने व्यवस्थित गाडी काढली. चालकाला भीती वाटत होती जर चाका  खाली एखादी कोंबडी किवा पिलू आले म्हणजे गेली एखादी गांधीजींची नोट त्यामुळे त्याने अगदी काळजीपूर्वक त्या मार्गावर गाडी काढली. कळवण भाग संपला. पुढे त्या गडाच्या मार्गावर नांदोरी चेक पोस्ट लागले तेथे आम्ही सगळ्यांनी प्रवेशद्वार कडे दोन्ही हात जोडून नमन केले. आणि  आम्ही लागलो त्या पवित्र नांदोरी च्या वाटेवर. गोल गोल फिरून त्या डोंगरावर वाट काढायची होती. शिवाय रस्ता देखील थोडा रुंद आहे.वर जात असताना ढग जणूकाही डोंगराला आलिंगन घालत होते.  जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही सुखरूप पणे वर पोहचलो. गाडी पार्क करून तेथील धर्मशाळेत आंघोळी साठी व्यवस्था आहे कि नाही ते शोधू लागलोत. आश्चर्य !!! किती तरी धर्मशाळा आहेत. पण आंघोळी साठी सोय नव्हती. सर्व कळे पाण्याची बोंब. आजू बाजूला लौज वर आंघोळी साठी विचारले तर एका व्यक्ती चे ३० ते ४० रुपये आणि आम्ही जवळ पास आठ जन होतो. म्हणून आम्हास ते खर्चिक वाटले. पण न इलाज होता. शेवटी एका लौज वर सर्वांनी दोन रूम भाड्याने घेवून स्नान केले. मला तर वाटले कि स्नान केल्या शिवाय दर्शन केले तरी चालेल फक्त मन पाप पासून आणि वाईट विचार पासून एकदाचे धुतले पाहिजे. पण काकांनी स्नान करून जाण्याचा आग्रह केला.सर्व तयार झाले आणि निघाले मंदिराच्या दिशेने. 
आई ला पूजा अभिषेक साठी जे काही लागते ते विकत घेतले. पादत्राणे एका दुकानात ठेवले आणि निघालो सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. सर्व प्रथम काकांनी व भाऊ बहिणींनी ज्योत पहिल्या पायथ्याशी लावली. त्याच्या मागो माग मी देखील कपूर च्या वडीची ज्योत लावली. अश्या बर्याच पायर्यावर ज्योती लावल्यात. मधेच एका स्थळावर सोबत घेतलेले तेल, जे एका प्लास्टिक च्या पिशवीत होते ते वाहिले. ते तेल का वाहिले ते आज पर्यंत मला समजले नाही. मला वाटले एखादी पौराणिक कथा असेल त्या मागे त्याची नक्की खाली उतरल्यावर माहिती घेवू. पण दर्शन करून परत फिरल्यावर मला काही त्या बाबतीत विचारयाचे लक्ष्यात राहिले नाही. आता ते मला पुढे कधी प्रसंग जाण्याचा बनला तर माहित होईल. माझी प्रकृती ठीक नव्हती . शरीर अशक्त होते. पंधरा दिवसा पासून चा आजारी होतो. पाय उचलले जात नव्हते. पण जेम तेम मनात मातेचे नाव घेवून वर चढायला सुरुवात केली होती. पण मातेच्या कृपेने मला कोणतेही कष्ट जाणवले नाही आणि मी थेट वर मंदिरात जावून पोहचलो. सुदैवाने मातेची आरती व स्नान चालले होते. मला ते लाभले. मातेचे दुधाने स्नान केले जात होते. पण ते दुध खाली कुठे जात होते त्याचा काही मला पत्ता लागला नाही.नक्कीच चमत्कार म्हणावे लागेल. खाली उतरल्या नंतर दुकानावरून प्रसाद घेतला. आणि पादत्राणे घेवून लौज वर गेलोत. आप आपल्या बेग्स धरून गाडीत ठेवले आणि पुढे नाशिकला लग्न अटेंड करायचे असल्या कारणाने नाशिक मार्गावर निघालो.

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे – 2

दोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे “सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे” या विषयावर चर्चा चालली होती. मला तर फारच विचित्र अनुभव झाले. अश्या ठिकाणी मुलगी पहावयास गेलो जिथे साधी बसण्यासाठी पण जागा व्यवस्थित नसेल. घराच्या पहिल्या द्वार पासून तर शेवटच्या द्वार पर्यंत नुसती धूळ उडतांना दिसते. कावळे एका खिडकीतून दुसर्या खिडकीद्वारे उडताना दिसायचे …. बसावेसे पण वाटत नाही. मुलगी जरी नुसती बारावी पास होती. पण मुलीचे पालक आणि नाते वाईक, जणू त्या मुलीने मोठाच पराक्रम केला असेल अशा पद्धतीने तिचा परिचय करून देतात. आणि त्या परिचय मध्ये पण मुलाला त्याचे हलक्या प्रकारचे स्टेटस आहे तसे दर्शवितात. आणि सरकारी नोकरी आहे का ? त्याच ओळीवर जास्त भर देतात.  अशा वेळेस मन तर फार वैतागले होते, मनात वाटायचे कुठे जंगला मध्ये मुलगी पहावयास येवून गेलो. या लोकांना बारावी च्या पुढे आणि सरकारी नोकरी शिवाय पण काही तरी असते ते माहीत आहे का ?. स्वतः वर संताप पण येत होता कि   येण्या अगोदर कमीत कमी चौकशी करायला हवी होती. माझा एक मित्र , विनोद जो कोल्हापूर ला आहे , बिचारा असाच कंटाडून गेला होता या सरकारी नोकरीच्या भूता मुळे , सर्व काही असून हि त्याला पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. नेहमी एकच प्रश्न समोर येत होता “सरकारी नोकरी आहे का?” जवळ जवळ एकाद वर्ष तो मुलीच्या शोधात होता. पण काही नाही. मग शेवटी त्याने ठरवले कि या सरकारी नोकरीच्या भुताला कसे हाताळायचे. तो सुरत मध्ये म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये कंत्राटी धोरणाने जल विभागात नोकरी वर लागला. सर्व काही त्याने प्लानिग नुसार केले. चार ते पाच महिन्यात त्याने खालचे वरचे जे कोणतेही अधिकारी असतात त्यांना खिस्यात केले. अर्थात पैस्याची लाच देवून त्यांना तयार केले. आणि परत एक वर्ष नंतर त्याच ठिकाणी गेला जिथे त्याला मुलगी आवडली होती. मोठ्या तोर्याने त्याने त्याचा काका आणि मामा बरोबर जावून मुलीच्या पालकाशी लग्नाची गोष्ट केली. या वेळेस मात्र सरकारी नोकरी माझ्या मित्राला असल्या कारणाने त्यांनी नकार दिला नाही(जी खरोखर नव्हती). त्यांनी सुरत म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये चौकशी केली. आणि त्यांना खरे वाटले. शेवटी  सासर्याने सर्व काही लग्नाचा खर्च केला कारण त्याला सरकारी नोकरीवाला नवरा मुलगी साठी पाहिजे होता आणि तो मिळाला देखील.दीड वर्ष तो सुरत मध्ये राहिला, पण त्याला भीती देखील वाटत होती कि जर मुलीच्या बापाला माहित झाले तो फ्रोड चा केस दाखल करेल. त्यामुळे त्याने लग्न झाले असून हि कोर्ट मेरीज केले. आणि लग्नाचे प्रमाणपत्र मिळवून घेतले.तेथे  सही करण्यासाठी माझे मित्र हजर राहिले होते. पण तसे काही झाले नाही जशी त्याला भीती होती. मुलगी सुखात होती. कोणतेही टेन्शन नव्हते. आणि बराबर दीड वर्ष नंतर तो कोल्हापूर परत स्वतः च्या घरी स्थायी झाला. सासर्यास माहित झाले. पण करणार काय  ?  त्याला मुलगी आनंदात दिसली. सर्व काही ठीक ठाक दिसले. शेवटी जी परिस्थिती होती ती त्याने मान्य केली. आज हि त्यांचा संसार सुखात चाललेला आहे. त्यांची लग्नाची एनिवर्सरी असली की त्या दिवशी ते आठवण करून मला फोन जरूर करतात. थोडक्यात, असे लोक पण सरकारी नोकरी चा भूत पळविण्यासाठी जवाबदार म्हणता येतील. हे गोविंदाच्या “कुली नंबर वन” नावाच्या चित्रपटात होते तसे झाले. पण प्रत्येकाचे तसे नशीब नसते. नाव त्याचे विनोद होते, पण त्याने गंभीर विनोद करून सुखद अंत आणला.  कित्येक मुलीचे पालक फसून हि जातात. डोळ्यावर सरकारी नोकरीचा लालचचा  काळा पट्टा असल्या कारणाने.  

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे

स्थळ – पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने नजीक बाहेर रोडवर असलेल्या चहा च्या स्टोल वर नेतात. आणि मुला सोबत असलेल्या नाते वाईकास मुलाचे नाव गाव , शिक्षण , पगार व राहण्या संबधित प्रश्न विचारतात .मुलीचा बाप सरकारी नोकरी च्या अपेक्षेत असतो. जेव्हा त्याला कळते कि मुलगा प्राइवेट जोब करतो तेव्हा विचारताना मुलगा एखादा गुन्हेगार असेल तसे हाव भाव चेहरावर दिसू लागतात.मुलाला सर्व काही विचारले जाते. सर्व काही अगदी व्यवस्थित आहे. मुलाला कोणते हि व्यसन नाही. स्वतः चे घर आहे ,रेगुलर जोब आहे, कोणाचाही एक पैशाचा कर्जबाजारी नाही. राहणीमान अगदी व्यवस्तीत आहे. त्या मुलीच्या बापाचे नसेल असे त्याचे घर आणि राहणीमान आहे. मधेच एक बहाणा करून ती व्यक्ती घरी फोन करून , दूर जावून काही तरी विचारते आणि मुलाला प्रत्युतर देते कि मुलगी तर आज पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यास गेली आहे. ती तुम्हास संध्याकाळी भेटेल. ते मुद्दाम तसे बोलतात कारण त्यांना माहित आहे समोर ची व्यक्ती फार लांबून आली आहे ते काही थांबणार नाही. अर्थात विषय तिथेच संपतो. असाच प्रकार माझा मित्र आणि माझ्या सोबत घडून गेला. मी चकितच झालो होतो कि समाजात एवढी निर्लज्ज लोक असतील कि ते कमीत कमी घरी चहा साठी बोलावून चर्चा करू शकत नाही. आणि रोडावर बसून एखाद्या स्टोल वर त्या संदर्भात चर्चा करतील. लोकांची मानसिकता आज पण बदलेली नाही. नव्या नियमानुसार सरकारी नोकरी वर कुठलाही पदावर किवा क्लास वन ऑफिसर जरी असेल त्याला देखील पूर्वी जे लाभ मिळत होते ते मिळत नाहीत. हो सुट्याच्या लाभ जरूर मिळतो. आणि दुसरा महत्वाचा फायदा असा कि सरकारी नोकरी वर आले म्हणजे बेफिकर होवून काम करणे. राजा पण आपला आणि प्रजा पण आपली. मग चालू द्यायचा कारभार आपल्या मर्जी नुसार. मला वाटते असे कोणाचे हि अपमान व्हायला नको त्या साठी. अश्या पालकांनी घरा बाहेर, कामाच्या ठिकाणी किवा जिथे ते लोकाना भेटतात  तिथे एक  पाटी लावली पाहिजे आणि त्यावर स्पष्ट  मोठ्या अक्षरात लिहिले पाहिजे “मुली साठी सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे”. जेने करून त्यांना खोटे बोलावे लागणार नाही कि “मुलगी कलेक्टर ची परीक्षा देण्यास गेली आहे किवा पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यासाठी गेली आहे वगैरे” शिवाय या मुळे बराच वेळ वाचेल दोन्ही पक्षाचा. आणि अपमानास्पद तर मुळीच वाटणार नाही. खरे आहे ना ? मला वाटते समाजात दोन वर्ग पडतात . एक वर्ग असा असतो जो मुलीची वय निघून जाते, मुलगी चांगलीच वयस्कर होते पण सरकारी नोकरी वाला नवरा मुलीचा बापाला मिळत नाही तो पर्यंत तो तिचे लग्न करत नाही. येथे सहन करणे फक्त मुलीच्या नशिबात येते. अशा वेळेस टोमणे मारणारे बिचार्या त्या मुलीला प्रत्यक्ष किवा अप्रत्येक्ष रिते वयाच्या बाबतीत चर्चा करून टोमणे मारतात. तिची मानसिक अवस्था बिघडते. कोणतीही मुलगी समोर जावून आपल्या आई वडिलांना कधी हि सांगू शकत नाही कि माझे आता लग्न करा. ती फक्त सहन करू शकते. समाजात असे बरेच प्रकरण पहावयास मिळतात. मग शेवटी …”बाबा पण गेले  नि दसम्या पण गेल्या”. सरकारी नोकरी च्या भूता मुळे आलेली चांगली स्थळे पण ते गमावतात. आणि आबड धोबड ठिकाणी मुलीला देवून टाकतात. याचा परिणाम फक्त बिचारी ती मुलगी भोगते. हा झाला एक वर्ग आणि दुसरा वर्ग जे मोजके आणि व्यावहारिक असतील. ते म्हणतात ना “लोहा गरम है मार दो हातोडा”  तसे त्यांचे असते योग्य स्थळ आणि माणसे दिसली म्हणजे मुलीची पसंत नापसंत विचारतील आणि मग लग्न साठी पुढे येतील. 
चला शिर्डी जाण्याचा प्लान आहे तिकीट बुक करण्यासाठी लवकर जावे लागेल.बाकी चर्चा पुढच्या भागात… 

परीक्षेत कोपी कितपत योग्यं ?

तीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्या ब्लोक मध्ये सुपर विजन ची जवाबदारी देण्यात आली होती त्या ब्लोक मध्ये तर अगदी आनंदाचे वातावरण होते. कारण आता पर्यंत सर्वच पेपर्स सोपे होते. पण जशी मुलांच्या हातात प्रश्नपत्रिका गेली तसे त्यांच्या चेहराचे हाव भाव बदलले. प्रत्येक जन चिंतातूर दिसत होते. कारण पेपर पाहिजे तेवढा सोपा नव्हता. मुले कॉपी करण्याचे प्रयत्न करू लागले. मी मात्र कोणत्या हि प्रकारे त्यांना कोपी करू देत नव्हते. काहींचे चेहरे तर रडके झाले होते. वाटत होते आताच रडून देतील कि काय ? पण ते म्हणतात ना चोरी करणार एन केन प्रकारे करूनच घेतो. तसे इथे घडले. तीन तास दरम्यान मला देखील काही पेपर वर्क करायचे होते. ते करताना जेव्हा हि टेबल वर जावून बसलो किवा उत्तर पत्रिकेत सही करण्यासाठी एखाद्या च्या बेच कडे गेलो कि पाठी मागे मुकाट्याने कोपी करायला सुरुवात होते असे. दोनदा एका मुलीला व मुलाला कोपी न करण्यासाठी टोचून बोललो. कार्यवाही करण्याची धमकी देखील दिली. फक्त दहा पंधरा मिनिटे शांत बसले असतील परत कोपी करण्याची त्यांची तळमळ सुरु होत असे. इथे एक नाही दोन नाही पण जवळ जवळ अर्धा क्लास,  वीस ते पंचवीस मुले उदास चेहरा ठेवून एक मेका कडे  मदतीच्या भावनेने पाहत होते. काही तर फारच दुखी दिसत होते.मनात आले आपण जरा जास्त कठोर झालो आहोत तसे करायला नको. पण कर्तव्य ते कर्तव्य असते ना. मी शेवट पर्यंत कोपी करू दिली नाही. ज्याला त्याला अधून मधून . माझी नझर चुकवून करता आली असेल तर केली असेल पण नझर समक्ष बिलकुल नाही. पेपर संपल्या वर एक मन म्हणत होते कि कमीत कमी पास होण्या इतकी कोपी करू द्यायला पाहिजे होती. दुसरे मन म्हणत होते कि मी योग्यच केले. बातमी पत्रात जेव्हा हि मुले मुलींचे आत्महत्येचे प्रकरण वाचले कि मला कधी कधी स्वतः वर संताप पण येतो कि माझ्या सारखेच शिक्षक या गोष्टीला जवाबदार असतील. तेव्हा अशी नोकरी करावीशी वाटत नाही.आणि एक विचार असा हि येतो कि यांना जर नुसत्या कोपी करवूनज जर पास व्हायचे असेल तर मग त्या शाळा कश्या साठी ? आणि ते तेजस्वी मुले जे उच्च क्रमांकासाठी  कोणत्या हि ट्युशन शिवाय रात्र दिवस मेहनत करतात त्यांच्या शी एव्हढा मोठा अन्याय ???? ? आई वडिलांच्या कष्टाचे पैसे मुले व मुलींनी का बरे उडवायचे ? फक्त परीक्षेलाच या कोपी करा आणि पास व्हा ..बरोबर ना ? फार विचित्र वाटते खोल वर विचार केला कि. आज बातमी पत्रात हरियाना राज्यात मुले कशी पराक्रम करतात बोर्डाच्या परीक्षेत चोरी करण्या साठी त्या संदर्भात बातमी वाचली आणि छायाचित्र पाहिलेत मला अस्श्चार्याचा धक्का लागला. ते छायाचित्र मी इथे पोस्ट करत आहे पाहाल………………
    
फेसबुक चा पंचनामा

रात्रीचे दहा वाजलेले आहेत, समोरच सत्संग चा कार्यक्रम असल्या मुळे लौड स्पीकर चा मोठ्याने घोंघाट  होत आहे. आज बारा ते एक वाजे पर्यंत काही झोप लागणार नाही. अगदी खिडकीच्या समोरच्या दिशेला तो लाउड स्पीकर लावलेला आहे. इ मेल चेक केले, फेसबुक वर थोडा हिंडलो. पण कंटाळा आला. काही नवीन नाही. तीच लबाड गोष्ट दिसते. एखादी मुलगी एखादे फोटो अपलोड करते आणि मध माश्या प्रमाणे मुळे कमेंट करण्यासाठी तुटून पडतात. त्या फोटो मध्ये जरी काही आकर्षक नसेल तरी बेफाम पणे “wow”, “nice”, “chhaan” वगैरे सारख्या शब्दाचा प्रेम पूर्वक वर्षाव होतो.घरात असलेले फ्रीज आणि फेसबुक यांच्यामध्ये एक साम्म्यता आहे. ती म्हणजे आपण नेहमी अधून मधून फेसबुक उघडून बघत असतो. कोणी कमेंट केली तर नाही न ? कोणी मेसेज तर नाही केला ना ? पण तिथे नवीन काही नसते. तसेच फ्रीज च्या संदर्भात आहे आपण परत परत उत्सुकतेने दरवाजा उघडून पाहतो पण नवीन काही नसते. होय , पण एक अपवाद म्हणावा लागेल. तो अपवाद म्हणजे लबाडी. अशी विधाने हामखास पणे फेसबुक वर पहावयास  मिळतात. पण एक गोष्ट तर स्वीकारावीच लागेल कि जिथे मुली असतील तेथे गर्दी असेलच. दोन आठवड्या पूर्वी माझ्या एका मैत्रिणीला फेसबुक वर एका दिवसात २०३ फ्रेंड्स request मिळाल्यात. फेसबुक च काय ..ओर्कुट मध्ये देखील तसेच. असे वाटते ना कि मुली साठी अर्धे जग रिकाम टेकडे आहे. एक  वेळ होता शालेय मुला मुलींच्या हातात जास्तकरून अभ्यास विषयक साहित्य असायचे . आता फक्त मोबाईल फोन दिसतो.आणि त्यात हि ते फेसबुक वर चिकटलेले दिसतात. अहो  चालू वर्गात देखील !!!…
आज माझ्या BSNL च्या conection  मधेय प्रोब्लेम असल्याने फोन कॉम्पुटर शी जोडून इंटरनेट सर्फिंग करत होतो. वाटले आज छान स एखादा टोपिक लिहिणार पण………… …हत्ती च्या !!!??!  पावर कट झाला आहे. बेटरी आवाज करत आहे.कॉम्पुटर बंद करावे लागणार. पण समोर जनरेटर वर परत घोघाट सुरु झाला आहे त्यामुळे   कानात कापूस खुपसावा लागणार .. चलां, नंतर कधी आपण चर्चा करू. भेटू मग…शुभ रात्री.

     

  

देर से आए पर दुरुस्त आए

आज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस बोलावले होते. जेवण करता करता रेल्वेचा टाईम टेबल पाहू लागलो. पाहतो तर फक्त २० मिनिटे बाकी होती ट्रेन सुटायला. मग मला जेवण सोडून द्यावे लागले. घाईतच कपडे बदलले , बूट घातले काळा चष्मा लावला आणि निघालो. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रिक्षेत बसलो. रीक्षा चालकाला त्वरेने नेण्यासाठी मी विनंती केली. पण तो जशी बैल गाडी चालते तशी रिक्षा चालवत होता. मी त्याला दोन वेळा विनंती केली. पण तेच. शेवटी कंटाळून ती रिक्षा सोडली आणि दुसरी रिक्षेत बसलो.त्याने वेगाने चालवली रिक्षा, पण ट्राफिक मुळे उशीर झाला. स्टेशन च्या गेट पर्यंत पोहचलो तेवढ्यात तर गाडी प्लेटफोर्म वर आली. सूदैवाने तिकीट विंडो वर गर्दी नव्हती. पटकन तिकीट काढले आणि दोन नंबरच्या प्लेटफोर्म कडे धाव घेतली. धावत असतांना मी विसरलो कि मी रेल्वे ट्रेक क्रॉस करून पडत होतो. आणि त्याच ट्रेक वर मुंबई (विरार) – भरूच शटल वेगाने येत होती.ते दृश्य पाहून दोन्ही प्लेटफोर्म वरचे लोक जोराने ओरडू लागले. तेव्हा माझे समोर येणारी ट्रेन वर लक्ष गेले. आणि समय सूचकता वापरून ट्रेक वरून बाजूला झालो.मी फार काही तरी अनुभवले त्या एक क्षणात. मला वाटले जीव गेला आणि परत आला त्या एका क्षणात. मी स्तब्ध होतो. जवळचे रेल्वे पोलीस माझ्या कडे आले. आणि हाथ धरून समोरच्या प्लेटफोर्म वर घेवून गेले व बाक वर बसवले. त्यांनी मला सांगितले कि हा चमत्कार आहे कि तू वाचला. पुढे असे करू नको. तुझी गाडी सुटत असेल तर सुटू दे, सुटलेली गाडी परत मिळेल पण शरीरातील जीव नावाची गाडी जर एकदा जीवनाच्या प्लेटफोर्म वरून गेली तर कधी परत येत नाही.मी त्यांचा आभार व्यक्त केला आणि समोर उभी असलेल्या गाडीत जावून बसलो. या घटने मुळे सर्व लोकांची दुर्ष्टी माझ्यावरच होती. मधेच शाळेतील एक शिक्षक भेटले त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यात. अर्धा तास नंतर माझे stop आले मी उतरलो.रोटरी आय हॉस्पिटल जाण्यासाठी रिक्षेची वाट पहिली. पण एक पण रिक्षा चालक ४० किवा ५० रुपया खाली बसवायला तयार नव्हता.जिथे जाण्यासाठी किमान ५ रुपये लागतात तेवढ्या जागे साठी ५० रुपये ? मी पायीच निघालो. 
     जवळ जवळ २० मिनिटांनी तेथे पोहचलो.केस पेपर काढला आणि क्लिनिक मध्ये शिरलो पाहतो तर एक हि डॉक्टर नाही. त्यांची  Conference  चालली होती त्यामुळे मला वाट पहावी लागली.आणखी दोन तास झाले तेव्हा ते डॉक्टर आले. माझ्या अगोदरच काही पेशंट येवून बसलेले होते. ते एक एक करून मध्ये बोलावल्यावर जात होते.मी मात्र माझा नंबर कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. मध्ये मध्ये च दुसरे पेशंट येत होते. ते हि आत जात होते. मी विचार केला नंतर येणार्यांना आत बोलावत आहे मला का बोलावत नाही ?आत वार्ड रूम मधेय जावून  नर्स ला दोन वेळा विचारले. दोन्ही वेळा तिने सांगितले “डॉक्टर बोलावतील तुम्हास ..थोडे थांबा.” परत बाक वर जावून बसलो.समोर एक सतरा – अठरा वर्षाची मुलगी आणि ३५ ते ३६ वर्ष  वयोगटातील स्त्री येवून बसली. दोन्ही एन आर आई होते. त्या मुलीच्या आई ला गुजराती बोलता येत होते पण मुलीला अजिबात गुजराती समजत नव्हते आणि बोलता पण येत नव्हते म्हणून ते इंग्लिश मधून संभाषण करत होते. मी काळा चष्मा घातला होता म्हणून त्यांना वाटत होते कि माझे लक्ष त्यांचावरच आहे.कदाचित ती स्त्री माझा तिरस्कार करत होती. माझ्या कडे पाहून ती स्त्री तिच्या मुलीला स्थानिक लोका विषयी बरे वाईट सांगू लागली.मला तर रागच आला होता. पण काही न बोलण्याचे योग्य वाटले आणि बसून राहिलो.माझा नंबर आला आत गेलो.तपासणी झाली , औषध घेतली आणि निघालो स्टेशन कडे. त्या दोन्ही एन आर आई माय लेकी देखील माझ्या मागे निघालेत. योगानु-योग त्यांनाही स्टेशन जावयाचे होते म्हणून एकाच रिक्षेत बसलो. त्या स्त्रीला वाटले मी गुजराती असावा म्हणून तिने मला प्रश्न केला “तमे गुजराती  छो ?”(तुम्ही गुजराती आहात का ?) मी प्रत्युत्तर दिले “हु भारतीय छु.” (मी भारतीय आहे.) आणि मी स्थानिक व्यक्ती आहे. त्या स्त्रीला अपमानास्पद वाटले आणि तिने बोलणे बंद केले. तिच्या मुलीला माझ्या विषयी बरे वाईट इंग्रजी तून सांगू लागली.मी फक्त ऐकत होतो. स्टेशन आले. रिक्षे चे पैसे दिले आणि पुढे निघालो.तिच्या कडे सुटे पैसे नव्हते म्हणून रिक्षा चालक डोके लावू लागला. मी मागे वळून तो प्रकार पाहिला आणि स्वतः समोर जावून त्या दोघांचे हि  दहा रुपये रिक्षा चालकाला दिले. आणि घाईत  प्लेटफोर्म कडे निघालो. त्या दिवशी मला तर असे वाटले कि माझ्या नशिबाच्या रेघा मधून त्या दोन्ही व्यक्ती निघणार नव्हती. कारण ज्या ट्रेन मध्ये मी बसलो त्याच ट्रेन वर ते पण मागो माग आले. मी दहा रुपये जरी दिले तरी ती स्त्री (मुलीची आई) मला थेंक यु म्हणायला पण तयार नव्हती.. गच्च गर्दी असल्याने लोक एक मेकांना लोटत होते. आणि त्यांना भारतातील अशी धक्का बुक्कीची सवय नव्हती.मी त्या मुलीला माझ्या जागेवर बसण्याचा इशारा केला.अगोदर तिने नाकारले .थोड्या वेळाने गर्दी जास्त वाढली , मी परत इशारा केला, तेव्हा ती मुलगी येवून बसली. मी मात्र उभा राहिलो.पंधरा मिनिटे झाली माझे स्टेशन येणारच होते. मी त्या स्त्री जवळ गेलो आणि म्हटले “which ever place you go to visit, never ever insult of there local people. There will not be always a gujarti to help you. there will be only an indian and that indian means a local people. at lest don’t teach your child to wrong things about local people. you also belongs to same locality before being a foreigner.” ती स्त्री अवाक च झाली होती. तिने देखील काळा चष्मा घातला होता . तो चष्मा डोक्या वर करून तिने खाली मान घातली. तेव्हा ती मुलगी मला मात्र “thanks” म्हटली.मी वेल कम म्हटले आणि उतरलो. कदाचित त्या स्त्रीला चुकी कळली असेल त्या मुळे तिने खिडकी मधूनच “बाय” चा इशारा केला. तेव्हा वाटले कि आता ती स्त्री कोणाचाही अपमान करणार नाही.चलो कोई बात नाही “देर से आये पर  दुरुस्त आये”                                                 

जाना था जापान , पहोच गए चीन !!

हाश !! संपली मुलांची परीक्षा. कालच बारावी च्या मुलांची  कम्प्युटर विषयाची परीक्षा संपली. दोन दिवस चालली. गुण देण्यासाठी सकाळ पासून दुपारचे बारा वाजेपर्यंत एका लेब मधून दुसर्या लेब मधेय चकरा मारत होतो. आता थोडा विसावा मिळाला आहे.तरी अधून मधून मेनेजमेंट मुलाकडून प्रोजेक्ट तयार करवून घेण्यासाठी रोज रोज टोमणा मारत आहेत. कॉम्प्युटर चा हेड फोनमध्ये बिघाड झाला आहे. त्याला सर्विस सेन्टर वर घेवून जावयाचे आहे. मित्राचे जुने कॉम्प्युटर घरी आणून ठेवले आहे त्याचे दुरुस्तीकरण बाकी आहे.इतर वर्गामध्ये अजून बरेच धडे पूर्ण करायचे राहिले आहेत.त्या बद्दल प्रिन्सिपल माझी लेफ्ट राईट  करवून घेत आहे . रोज नवीन काही न काही काम निघत आहे. माझे स्वतः चे कामे अजून राहिली आहेत ते पूर्ण करायला वेळ मिळत नाही. तीन आठवड्या पूर्वी आमचे जुने हेड अमेरिके हून परत आले  तेव्हा पासून शाळा सुटल्या वर हि दोन दोन तीन तीन तास मीटिंग करत बसत आहे. काय करायचे काही सुचत नाही. हे झाले .. लगेच तीन दिवसा पूर्वी पूर्ण फेमिली गावाला गेली आहे. मग काय ? अहो.. घरातील सर्व …म्हणजे सर्वच काम करावे लागत आहे. भांडी , कपडे , बाजार , पाणी भरणे पासून सर्व काही. असे वाटते ना कि लोक जगण्यासाठी काम करतात पण मी कामा साठी जगात आहे. नुसती कृत्रिम लाईफ झाली आहे. आजचा दिवसच विचित्र होता. आज गुगल वर सर्च करून साधी खिचडी कशी बनवतात ती कृती शोधली आणि कागदावर लिहून घेतली.बस त्या लिहिलेल्या कृती नुसार सुरवात केली. पण तांदूळ उकडत असतांना मला समझले नाही कि अजून किती पाणी ओतावे लागेल. चुकीने माझ्या ने जास्त पाणी टाकले गेले. दहा ते पंधरा मिनिटे ते जास्ती चे पाणी बाष्प बनून जात नाही तो पर्यंत वाट पाहिली. पाणी चे बाष्प तर झाले पण तेथे खिचडी च्या ऐवजी दुसराच कोणत्या तरी प्रकारचा पदार्थ तयार झाला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले “झाले कल्याण ….जाना था जापान पोहोच गये चीन” खिचडी च्या एवजी पिवळ्या रंगाचा चवदार गुंदर तयार झालेला दिसत होता !!. मला भीती हि वाटली कि बाबा आले तर नक्कीच बोलतील. मग आता काय पर्याय ? फेकू तर शकत नव्हतो. काय करायचे ? घराच्या बाहेर निघून गाय शोधू लागलो. म्हटले दिसली तर टाकून देणार. पण तेही दिसत नव्हती. तरी वाटले एकाद तासाने रोड वर ईकडे तिकडे फिरताना एखादी गाय तर नक्की दिसेल. दोन तास पसार झाले पण गाईचा काही पत्ता नाही. शेवटी पाच वाजता गाय दिसली तेव्हा ते गाई समोर ठेवले. तो पर्यंत मेगी वर टाइम पास केला.चांगलीच फजिती झाली आज. बघू ..उद्या जर आई लवकर परतली. तर परत अशी फजिती होणार नाही. नाही तर परत दुपारी मेगी आणि संध्याकाळी चाइनीस च्या स्टोल वर चाइनीस. पण एक गोष्ट लक्षात आली कि जेवण बनवणे म्हणजे काही तोंडाचा खेळ नव्हे.शाळेला उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्यात का आई कडून नक्कीच काही तरी बनवायचे शिकून  घ्यावयाचे आहे.  

मकर संक्रांती कि मोठे पाप ???

“कायपो छे रे …ए पकड !!! आ राह्यो छेडो…..ए लाल गई, जो लीलो आवे छे ……….”
सकाळी झोपलेलो असतांना कानावर हे शब्द पडत होते. आज सुट्टी असल्यामुळे नऊ वाजे पर्यंत झोपण्याचा बेत केला होता. पण या आरळा ओरळ होत होती म्हणून झोप उडाली. घड्याळात पहिले तर साडे आठ वाजले होते. परत झोपायचा प्रयत्न केला पण आवाज मुले काही झोप लागली नाही. मकर संक्रांत चा दिवस होता आज. लवकर लवकर तयार झालो. आणि छतावर गेलो. सर्वत्र हल्ला गुल्ला दिसत होता. प्रत्येक जन मोठा लाउड स्पीकर वाजवत होता. त्यामुळे जवळ चे व्यक्ती काय बोलत आहेत ते हि कळत नव्हते. सकाळचा जसा वरती गेलो तसा भूक लागत नाही तो पर्यंत खाली काही आलोच नाही. आई जेवण साठी वारवार बोलावत होती , पण माझे मन वरती आकाशात पतंग पाहण्यात तल्लीन झाले होते.तसे पाहिले तर दोन दिवस हा सन येथे गुजरात मध्ये साजरा केला जातो. लोक नुसते त्यांच्या रंगात रंगलेले दिसून येतात . खाण्या पिण्याचे तर विचारू नका. आज वर्तमान पत्रात आलेल्या बातमी नुसार सुरत मध्ये एका दिवसात लोक एकूण आठ करोड  …..होय तब्बल आठ करोड रुपयाची मिठाई व इतर खाद्य पदार्थ मध्ये पैसे उडवतात. मला तर वाचून फारच आश्चर्य झाले.एवढी रक्कम नुसती खाण्या पिण्या मध्ये ? मकर संक्रांतीच काय तर इतर सणा मध्ये देखील लखलुट पैसा लोक खर्च करत असतात. तसा मला पक्ष्या विषयी फारच प्रेम असल्याने मी कधी हि पतंग उडवत नाही. हो पतंग जर पकडायचा असेल ..तर चालेल … पण उडवायचे नको रे बाबा. चार वर्षा पूर्वी मी मित्र कडे गेलो होतो , तेव्हा हाच सन होता. दोघे हि पतंग उडवत होतो. अचानक माझ्या पतंगाच्या दोर्याने एक पक्षी घायाळ झाले. आणि जमिनी वर पडले. ते तर फडत होते. मी त्याला उचलले. जख्मावर हळद लावले. पण शेवटी ते पक्षी मरण पावले. मला फारच दुख झाले. बस तेव्हा पासून चा नेम धरला कि आयुष्यात कधी हि पतंग उडवणार नाही. काय मिळते याने ? कधी आपण विचार करतो का ? फक्त या एका दिवसा मुळे लाखो पक्षी मरण पावतात. एवढे मोठे पाप कश्याला ? फक्त आपल्याला आनंद मिळावा म्हणून ??? .छे …. योग्य नाही. 
मित्रांनो, आनंद मिळवायचा असेल तर जरूर मिळवा. पण आपल्या आनंदामुळे  कोणाचा जीव धोक्यात येईल तसा नव्हे. नक्की विचार करा. तुमचा एक विचार कुण्या पक्षीच जीव धोक्यात जाण्या पासून वाचवेल.   

शेवटी. मकर संक्रांतीच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबीयास हार्दिक शुभेच्छा

तुमचा
जितेंद्र इंदवे

नवीन वर्ष : आशेचे , शिकण्याचे आणि प्रगतीचे .

     ३१ डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. बरेच काही देवून गेले वर्ष आणि घेवून हि गेले. एकंदरीत दुख आणि सुख दोन्ही गोष्टीचा अनुभव झाला. बऱ्याच गोष्टी शिकलो. शाळेतच माहितगार झालो कि कोणत्या कोणत्या प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक असतात.तशी तर शाळेत पंचरंगी प्रजा  असल्या कारणाने त्यांच्या आचार विचाराचे वेग वेगळे रंग पाहिले. केराली, तमिळ , गुजराती, राजस्थानी अशी प्रजा शाळेत आहे.  अमुक विचाराच्या रंगात  रंगल्यावर आनंद झाला तर अमुक रंगात रंगल्यावर दुख झाले. थोडक्यात जेथे मला सामेल व्हायचे नव्हते तेथे मी सामील झालो. चूक तर माझीच होती. ती मी सुधारून  घेतली आहे.  
     डिसेंबर च्या १२ तारखेला डोळ्याचे लेसिक सर्जरी झाली. माझी दृष्टी कमजोर असल्या मुले चष्मा घालावा लागत होता. त्याचे मी निदान केले. आता दोन महिन्या पर्यंत मला काळा गोगल घालून फिरावे लागणार आहे. शाळेत देखील काळा गोगल घालून जातो. पण या गोष्टी मुळे मला अजून बरेच समजले. कोण माझे हित चिंतक आहेत किवा कोण हित शत्रू ते कळले. काळा चष्मा घालून शाळेत जात होतो तेव्हा काही लोक्काना वाटले कि मी नुसता हुशारी मारण्या साठी तो गोगल घातला असेल. त्यामुळे ते माझ्या बरोबर बोलत नव्हते. अगदी समोरून जात होते पण का म्हणून मी काळा चष्मा घातला ते विचारण्यात त्यांना रस नव्हता. काही तर बाजूला उभे असून हि एखादा अनोळखी चा व्यक्ती बाजूला उभा असावा तसे व्यवहार करीत होते. ते मला नजर अंदाज करीत होते. एका क्षणा साठी वाटले कि मी कुठे चुकलो तर नाही ना ? मला समजले होते. त्या काळ्या गोगल मधून जणू काही मी जगात लोंकाचा खरा चेहरा काय आहे ते पहिले.  जर कोणाचे चांगले होत असेल तर त्याला प्रोत्साहित करणारे आणि “छान” म्हणणारे खूप कमी असतात. 80 ते 90  टक्के लोक बनावटी स्मित चेहरावर ठेवत असतात. त्यांचा एकच बेत असतो की समोरच्या व्यक्ति कडून आपले काम कसे करवून घेता येईल. मग काम करवून घेण्यासाथी त्यांना वाटेल तेवढ्या खोट्या प्रशंशा कराव्या लागल्यात समोरच्या व्यक्ति साथी . ते ती गोष्ट हामखास पणे बेधड़क रित्या करतील. आणि जगात दूसरी एक विडम्बना अशी आहे की जर तो दुसरा व्यक्ति खरा असेल आणि त्याला पण एखादे काम करवून घ्यायचे असेल तर त्याला देखिल असा रोल करावा लागतो. खोटे बोलावे लागते, खोटी प्रशंशा एखाद्याची करावी लागते. थोडक्यात फार वाईट बनावे लागते. आज हाच नियम आहे जगण्यासाठी चा. जाऊ दया के उपदेश देत बसत आहे उगीच मी पण.!! 


     शेवटचा दिवस असल्या मुले शाळेत संध्याकाळी सहा वाजेला एक लहान पार्टी होती. सहाजिकच पणे मला पण जाणे भाग पडले. संगीत खुर्ची चा कार्यक्रम झाला. नंतर अन्ताक्षरी खेळले. फार फार मजा आली. अजुन बरेच काही होते. पण मधेच ऑडियो प्लयेर मध्ये बिघाड झाला. त्यामुले पुढचा कार्यक्रम रद्द करावा लागला. रात्रि चे सवा आठ वाजले होते. प्रत्येकाचे डोळे डिन्नर शोधत होते.सर्व जन दोन, चार, पांच असे  ग्रुप करूँन एक दुस्र्याशी चर्चा करत होते. माझ्या बरोबर हजर असलेली पुरुष मंडळी निघून गेली होती. फ़क्त मी आणि P  T  चे शिक्षक असे दोन पुरुष मंडळी हजर राहिली होती. आणि बाकी सर्व medams  होत्या . होल मध्ये बाजुला जावून गुप चुप उभा राहिलो. आणि निरिक्षण केले इकडे तिकडे की कोण काय करत आहे.  काळा चश्मा असल्या मुले  माझी नजर कुठे जात आहे ते कोणाला समजत नव्हते. मी समोरच्या व्यक्ति कड़े जर पाहिले त्याला वाटायचे की माझे त्यांच्या कड़े लक्षच नाही म्हणून मला कोणी प्रतिसाद देत नव्हते. मधेच समोरून पसार होत असतांना primary  च्या एक मैडम ने विचारले. की कधी झाले डोळ्याचे ओपरेशन. कोणी बोलत नव्हते आणि अचानक कोणी बोलले म्हणून फार उत्साह वाढला.मी प्रतिसाद देता उत्तर दिले की दोन आठवडे झालेत. आता बरे आहे म्हणून. पण माहित नाही के झाले. नंतर माझ्या कडून त्या medam  ची फारच थट्टा मश्करी झाली. पण त्यांनी राग काही व्यक्त केला नाही. कदाचित ………….हो कदाचित ..मला त्यांचे आकर्षण झाले होते. अर्धा पाऊन तास माझे लक्ष काही त्यांच्या वरून दुसर्या गोष्टी वर जात नव्हते. खाऊन पिऊन निघत असतांना देखिल मला राहिले गेले नाही आणि परत थट्टा केली. फार मस्त, आणि उत्तम दर्जाची व्यक्ति आहेत त्या मेडम. शेवटी मनात आले की थट्टा करून चुकीचे केले. एक तर अगोदर पासून च माझ्या लिस्ट मधे चांगल्या लोकांचा तुटवडा आहे. आणखी जर एखादी गेली तर दुष्काळच पडेल. मग  घरी जावून त्यांना आणि माझ्या इतर मित्रांना नव्या वर्षाच्या मोबाईल  वर शुभेच्छ्या पाठवल्यात . एक चंग बांधला की या वर्षी मला चांगल्या लोंकाचे सम्बन्ध जपून ठेवायचे आहेत.बस !! डोळे बंद केले आणि एकच विचार केला जितेन्द्र एक नविन सकाळ परत तुझे कर्त्तव्य आणि पराक्रमाची साक्ष होण्याची वाट पाहत आहे ज्या  काही गोष्टी गेल्या वर्षी दुःख देवून गेल्यात त्या आता जसा सूर्यास्त वेळी सूर्य मावळतो तशा तुझ्या हृदयात मावळू दे , या विचारा सह मी ३१ डिसेंबर २०११ चा शेवटचा निरोप घेतला आणि  गाड़ निद्रेत  झोपलो.  तर मित्रांनो तुम्हास पण या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा  नवीन वर्ष भर  भराटी चे जावे अशी देवा चरणी प्रार्थना  .

तुमचा 
जितेन्द्र इन्दवे           
   

कोलावेरी कोलावेरी दी .

     बऱ्याच दिवसानी येथे परत फिरत आहे. मागचा सम्पूर्ण एक महिना नुसत्या ह्या गावी तर त्या गावी मुलगी पाहण्यात पसार  झाले. त्यात ही बऱ्याच रसप्रद घड़ा मोड़ी झाल्यात. ती चर्चा नंतर कधी करेल. तर सध्या वळूया   आजच्या विषया वर .

      आज सकाळी ८.०५ ला अकरावीच्या वर्गात कॉम्पुटर चा  दुसरा तास होता. नेटवर्क चा टोपिक चालला होता. चर्चा चालू होती. मधेच काही मुली हळू हळू त्यांच्या चर्चा खाली मान घालून करत होते. अगोदर तर मी त्यांना ध्यानात घेतले नाही. पण जवळ जवळ पाच मिनिटे पसार झाली असतील आवाज वाढला. साहजिक पणेच त्या मुलीना उभे केले आणि रागावून वर्गाच्या बाहेर जाण्याचा इशारा केला.पण तरी जाताना एक मुलगी बोलली. “बस का सर !! कोलावेरी ?!!” . मी स्तब्ध झालो. मला काही समजलेच नाही. म्हणून मी काही प्रत्युत्तर दिले नाही. पुढे चर्चा करून नेटवर्क चा टोपिक संपवला. वर्गाच्या बाहेर आलो. तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली, “”सर डोन्ट कोलावेरी …” . आता तर माझ्या डोक्याचा एक एक तंतू हलला होता. डोके खाजवत स्टाफ रूम मध्ये शिरलो. सतत विचार करत राहिलो. काय आहे हे कोलावेरी. उत्तर शोधण्या साठी सरळ कॉम्पुटर लेब मध्ये दाखल झालो आणि गुगल वर सर्च केले. पाहतो तर कोलावेरी नावाने एक तमिळ चित्रपटाचे गाणे होते ते. आणि त्याचा अर्थ होता “अगदी संतापाने एखाद्याच्या खून करणार तेवढ्या रागाने पाहणे”. मला समजले त्या मुलीना काय सांगायचे होते. 
     इंटरनेट वर सध्या या कोलावेरी ने धूम केली आहे. सर्वत्र तेच. शाळेत , रोडवर, कॉलेज मध्ये, हॉटेल मध्ये, बस मध्ये, एखादा नमुना जर रिंग टोन ठेवत असेल तर हीच “कोलावेरी”. तसे पहिले तर वास्तविक अर्थ या गाण्याचा बर्याच लोक्कांना माहीत  नाही पण नुसती धून आवडते म्हणून ऐकायचे आणि आनंदाने मान हलवायची किवा अंग मोडायचे. मी देखील समजण्यासाठी पाच वेळेस ऐकले तरी अमुक शब्द मला समजले नाही. शेवटी इंटरनेट वरून लीरीस शोधून वाचले तेव्हा कळले की कोलावेरी ही काय भानगड आहे. 

काय हि ओन लाईन शॉपिंग ?!!?!! नुसता त्रास…

आमच्या शाळेतील प्यून “राजेश ” तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत असतो.काही अडचण आली. किवा समजले नाही तर लगेच फोन करतो मला. त्याच्या या इंटरनेट वरील संशोधन करण्याच्या वृत्ती मुळे बहुतेकदा शाळेतील शिक्षक गण त्याची प्रशंसा करताना दिसून येतात. पण म्हणतात ना जास्त शहाणपणा केलेले देखील नुकसान कारक ठरत असते. बस !! तसच काही तर झाले एका आठवड्या पूर्वी त्याच्या सोबत. मागे फेसबुक वर माझ्या द्वारा स्वस्त दरात भारतात लौंच होणारे teblet नावाच्या डिवाईस ची पोस्ट केली गेली होती. ती पोस्ट वाचल्या नंतर teblet सतत त्याच्या डोक्यात फिरत होते. त्याला देखील ते विकत घेण्याची इच्छा झाली. तो प्रत्यक्ष रित्या माझ्या कडे आला आणि कुठून ते खरेदी करता येणार त्याची विचार पूस करू लागला. मी म्हटले अजून एकाद महिना कमीत कमी तुला वाट पहावी लागेल. पण हा भाऊ काही शांत बसत नव्हता. गुगल मध्ये, याहू  मध्ये , रीडीफ मध्ये आणि बऱ्यांच सर्च इंजिन वर त्याने सर्च केले. शेवटी फेसबुक मधेच त्याला ती जाहिरात सापडली आणि नाप तोल डॉट कॉम नावाच्या वेब साईट वर त्याने ओन लाईन खरेदी चा ओर्डर दिला. लगेच दुसर्या दिवसी त्याने मला कमीत कमी ४००० रुपयाची सविनय मागणी केली. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला नकार द्यावा लागला. कारण माझी पूर्ण सेलरी महिना अखेरला मी बाबा ना देवून टाकतो. तरी मी त्याला दोन दिवसात कुठून हि पैसे आणून देण्याचे आश्वासन दिले.   कामा कामात मी ते पैसे देण्याचे विसरलो. दोन दिवस पसार झाले असतील तिसऱ्या दिवशी नाप तोल डॉट कॉम वरून एका कुरियर द्वारा त्याचा घरी ती वस्तू आली. स्वाभाविकच पणे त्याच्या कडे पैसे नव्हते तरी तेव्हा त्या वस्तू साठी त्याने शेजारया कडून रु. ४००० घेतले. एकूण त्याने ७२०० रुपये कुरियर डिलिवरी बोय ला दिली. उत्साहाने लवकर लवकर त्याने नाप तोल डॉट कोम चे रेपर फाडले. आत वेस्प्रो कंपनीचे बोक्ष होते. त्यात ते वेस्प्रो टेबलेट होते.  
वस्तू नवीनच होती म्हणून आणखी शेजारी असलेले पाहण्यासाठी गर्दी करून उभे राहिले. त्याने खोक्या मधून ते teblet  बाहेर काढले आणि ओन करून एक एक फंक्शन चेक करू लागला. सर्व काही ठीक होते पण मात्र त्याचा केमेरा चालत नव्हता. अर्थात त्यात बिघाड होता. लोक पाहत होते पण केमेरा चालत नव्हता म्हणून त्याला फारच वाईट वाटले. त्याला वाटले कि त्याला वेस्प्रो आणि नाप तोल डॉट कोम वाल्यांनी सात हजार रुपयाचा चुना लावला. तो उदास झाला. त्याने परत करण्यासाठी कुरियर बोय ला  फोन केला पण तो बर्याच लांब निघून गेला होता पण तरी त्याने एका तासात परत उधना मध्ये उडीपी हॉटेल जवळ मिळण्याचे काबुल केले. लगेच त्याने मला हि फोन लावला आणि सर्व हकीकत सांगितली व मला देखील त्या हॉटेल जवळ येण्यास सांगितले. हातात शाळेच्या प्रश्न पत्रिकेचे काम घेवून बसलो होतो ते बाजूला ठेवून मला भर दुपारी उन्हामध्ये निघावे लागले.  बाईक मध्ये पेट्रोल देखील नव्हते. जेम तेम लोटत पेट्रोल पंप वर गेलो व पेट्रोल टाकले डोक्यावर हेल्मेट घातले निघालो. पांच मिनिटात पोहचलो . पाहतो तर तो हॉटेल च्या बाहेर माझीच वाट पाहत होता. त्याच्या मुखावरील उदासीन पणा मला दिसत होता. तो विनंती करू लागला मला कि यार तू काही हि कर. पण मला हि वस्तू नको पाहिजे , कशे हि करून माझे पैसे मला परत करवून दे. मी होकार दिला म्हटले येवू दे कुरियर बोय ला गोष्ट करू. दोन तास झाले पण तो कुरियर वाला काही दिसत नव्हता. त्याला फोन वर फोन केले राजेश ने पण तरी हि तो दिसत नव्हता. फक्त समोरून एकच उत्तर मिळायचे कि आताच येतो ..अर्ध्या तासात. कदाचित त्याला माहित पडले असेल कि राजेश त्याला ते teblet  परत करू इच्छितो. इथे तो कंपनी च्या पोलिसी विरुद्ध जावू शकत नव्हता. कारण एकदा त्याने कस्टमर ला वस्तू दिली आणि पैसे घेतले म्हणजे झाले काम. मग त्या वस्तू च्या संदर्भात काही समस्या असतील तर ती जवाबदारी कंपनी आणि ग्राहकाची असते त्यात कुरियर वाल्याचा कुठलाही प्रकारच संबंध नसतो. तीन तास झाले ….राजेश चिडला त्याचे डोके तापले होते, त्याने त्या कुरियर वाल्याला मारण्याचा बेत केला. राजेश ला माहित होते कि तो कुरियर बोय त्यांचा सोसायटीच्या जवळ पास राहतो. लगेच त्याने आणखी दोन मित्रांना फोन करून बोलावले. मला हे सर्व योग्य वाटत नव्हते. म्हणून मी त्याला हे न करण्यास सांगितले . त्याची समजूत घातली कि त्या व्यक्ती चा त्यात काही दोष नाही. त्याने तर त्याची ड्युटी केली. जेम तेम त्याला मी शांत केले. हॉटेल मध्ये नेले आणि त्यांची स्पेशियल डीश “इडली सांभार” मागवले. कसा तरी तो शांत झाला होता. परत बाहेर येवून वाट पहु लागलो वाटले तो शांत असावा पण तरी अधून मधून तो कुर कुर करत होता. निव्वळ चार तास मी तिथे हॉटेल च्या बाहेर घालवले. त्याला सांगितले की ही वस्तु सूरत मधे वेस्प्रो च्या सर्विस सेंटर वर रिपेरिंग ला पाठव ते रिपैर करून देतील व म्हटले की तू चिंता करू नको ती वस्तू आपण दुसर्या कोणाला विकून पैसे काढून घेवू. आणि ग्राहक मीच तुला शोधून देतो. त्याने मान्य केले. गेरंती कार्ड काढले आणि नंबर डायल केले. पण आश्चर्य !!! एक ही सर्विस सेंटर अस्तिवात्त नव्हते . सर्व रोंग नम्बर्स जिथे सर्विस सेंटर होते ते बंद झालेले होते. अहमदाबाद , वापी , बरोडा आणि बर्याच ठिकाणी फोन लावला पण परिणाम शुन्य. काही पर्याय नव्हता .मी त्याला घरी जाण्याचा इशारा केला. काम झाले नहीं म्हणून मला वाईट वाटले उदास मनाने आम्ही आप आपल्या घरी निघालो. घरी पोहचून मला अर्धा तास झाला असेल परत त्याचा फोन आला. “सर, काम झाले, माझे पैसे परत मिळाले. मी त्यांच्या हेड ऑफिस वर गेलो होतो.तिथे काम करणारे माझ्या परिचयाचे निघाले त्यांनी सोल्व केला प्रोब्लेम., आपण भेटू उद्या शाळेत करू चर्चा. गुड नाईट ” फोन कट झाला. एकूण मला हि आनंद झाला.
        
    येथे राजेश जास्तच आत्मविश्वासाने फक्त फेसबुक मध्ये एक पोस्ट वाचून ओन लाईन खरेदी करावयास गेला. पण सर्व उलटेच झाले. त्याने कोणाला विचारले  नाही, सल्ला घेतला नाही. शेवटी झाली फसवणूक. पण तरी तो भाग्यशाली म्हटला जाणार कि त्याला त्याचे पैसे परत मिळाले. ते पण कुरियर मध्ये परिचयाचे व्यक्ती असल्या कारणाने . राजेश सारखे नसीब प्रत्येकाचे नसते. प्रत्येकाला काही त्यांचे पैसे परत मिळत नाही. लोक फक्त आलेल्या वस्तू विषयी कंपनी ला फिर्याद करतात पण काही आउटपुट मिळत नाही.  घटने वरून खरोखर एक गोष्ट शिकायला हवे कि ओन लाईन खरेदी करताना माणसाने व्यवस्थित विचार पूस आणि सर्वे करूनच करायला हवे कि जेणे करून असे फसवणुकीचे केसेस बनणार नाही.     

निसर्गाची किमया

विजेच्या रुपाने शंखनाद झाला
रवि कुठे ढगा मागे लपला 
गार गार मंद मंद वारा वाहिला 
अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला 
हिरवे हिरवे हे गवत डोलू लागले
मूक जनावर ही काही  तरी गीत बोलू  लागले
माती च्या सुगंधाने मन मोहिले 
नभाने इंद्रधनुष्य रुपी वस्त्र परिधान केले 

काय ते मधुर संगीत पावसाच्या सरी ने निर्माण केले 
ते एकण्यात मन माझे तल्लीन झाले 
कवितेच्या चार ओळी लिहिताना ध्यान माझे निसर्गात गुंतले 
काय लिहिणार ? कारण मना तील सारे विचार पाउसाच्या पाण्यात भिजले. 

कविते साठी बसलो होतो पण ती अपूर्ण राहिली 
कारण निसर्गाची अशी किमया पूर्वी मी कधी न पाहिली
अहो भाग्य माझे , आंतरात्मा निसर्ग सौंदर्याचा साक्षी झाला 
फार फार आभार तुझे परमेश्वरा !! 
मला या स्वर्गात जन्म दिला 
मला या स्वर्गात जन्म दिला 

— जितेन्द्र