All posts by anuvina

सुट्टी आणि मी : भाग ०२

मुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली […]

चहाट(वा)ळकी – ०१ : मुंबई ला कोण वेगळे करणार?

आमच्या ऑफिस मध्ये येणारा बाबू चहावाला मोठा आसामी. त्याचे व्यावहारिक तर्क पण आसाम चहा सारखेच एकदम कड़क. मुळात कोकणातला असल्याने साखरेचा हात सढळ असला तरी जिभेवर गोडवा कमीच. बेताची उंची, गोल वाटोळे शरीर, चहाच्या रंगाशी साधर्म्य सांगणारा ताम्बुस काळपट रंग, कंगव्याची गरज न भासेल इतपतच केशसांभार उरलेला, कपाळावर जमिनीला समांतर जाणाऱ्या २ ठसठशीत मस्तकरेषा आणि […]

भेळवाला चाचा

(या कथेतील बरेचसे स्थलकालादी दाखले हे काल्पनिक असून व्यक्तिमत्व मात्र खरे आहे. काल्पनिक गोष्टींचा उपयोग केवळ व्यक्तिमत्व खुलवण्या साठी केला आहे.) ठाणे कॉलेज मधून डिग्री घेतली आणि तडक पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या विज्ञान संस्था या महाविद्यालयात दाखल झालो. विज्ञान संस्था दादाभाई नवरोजी रोड वर रिगल थेटरच्या समोर असल्याने बरेच वेळा चालतच जायचो. दादाभाई नवरोजी रोडवरील फेरीवाले, […]

सिद्धेश्वर भ्रमण

नागांवला आमच्या घरी दर वर्षी कृष्ण जन्माचा उत्सव असतो. आमच्या करता हा एकदम महत्वाचा सोहळा कारण याला ५-६ पिढ्यांचा इतिहास आहे. जवळचे सगळे नातलग आवर्जुन या उत्सवाला हजेरी लावतात. त्यामुळे नविन वर्षाची दिनदर्शिका हाती पडताच काही महत्वाच्या तारखांच्या नोंदी करताना श्रावण कृष्ण अष्टमीचा देखिल अंतर्भाव असतोच. त्यात सुद्धा कुठे विकांत लागून येत असेल तर मग […]

हरवलेले क्षण

सदर लेख महाराष्ट्र मंडळ, दुबई यांच्या त्रैमासिका मध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचा दुवा सोबत देत आहे. http://mmdubai.org/publications/ ——––————————————— उन्हाळ्याची सुट्टी लागल्या वर आलेला पहिलाच विकांत आणि सुट्टी नंतरचा पहिलाच आकांत. स्थळ अर्थातच घर. “अगं बास झाले किती वेळ त्या टैब वर खेळत बसणार आहेस?? सुट्टी लागली आणि काही वेळा साठी तुला तो टैब खेळायला […]

जिव्हाळ्याची शहाळी

माझी सासुरवाडी मुळची नागांवची. त्यामुळे काही नातेवाईक म्हणजे माझ्या पत्नीची चुलत आत्या, तिचे काका अशी मोजकी दोन चार घरे अजुन आहेत. त्यामुळे नागांवला गेलो की अधून मधून ख्याली खुशाली निमित्त जाणे होते. तिच्या या सगळ्या नातेवाईकांना आधी पासूनच ओळखत होतो पण सोयरीक झाल्यावर येणे जाणे वाढले…..कधी सहजच म्हणुन तर कधी निरोप्या म्हणुन. नागांव ला आमच्या […]

तू आणि मी

तू आणि मी ….. अगदी एक रूप …. एक तत्व …. एकमेकांत मिसळलेले ….. पहिला श्वास पण आपण एकत्रच घेतलेला. जो तुझा रंग तोच माझा देखील पण ढंग मात्र भिन्न …. पूर्णपणे. तू चौकटीत सामावलेला तर मी चहु बाजूनी उधळलेल्या संध्याकाळच्या तांबुस भगव्या रंगा सारखा. पण तरीही आपण एकमेकांत मिसळलेलो …. नदी सागरात मिसळुन जाते […]

वसंत

झाडाची फांदी फांदी वर पान पानात भरलय हिरवे रान हिरव्या रानाचा हिरवा चुडा मातीत मिसळलाय फुलांचा सडा फुलाची पाकळी पाकळीचे रंग फुलांच्या प्रेमात वाराही दांग रानातले तळे तळ्यातली कमळे चिखलात उभे ध्यानस्थ बगळे आकाशात मेघ त्याची शाल निळी निळी पहाटेच्या किरणांना कड सोनसळी रानातल्या वाटेवर वाजते पाउल कोवळ्या पालवीच्या आड देतो वसंत चाहुल.

खरं आणि खोटं

कित्येकदा खोटे बोललो तुला बरं वाटावे म्हणुन आता तूही खोटे बोलतेस मला खरं वाटावे म्हणुन

प्रेमाचा तिळगुळ …. तुझ्यासाठी खास

तिळगुळ नाही दिलास तरी चालेल पण बोलण्यात सगळी रुची असू दे …. पदार्थाला चव येण्यासाठी चिमुट चिमुट लागणाऱ्या गोष्टीच खर तर गरजेच्या. मिठाचे म्हणशील तर चव खारट होण्या पेक्षा चिमटीत कमी आले तरी चालेल. आणि तशीही तू नमकीन प्रकारात येतेस. :-D. प्रसंगी मिठ्ठास बोलण्या बरोबर तिखट तडका पण बरा वाटतो. तेलाचा तवंग असलेली लाल तर्री […]