Archive by Author

आपण हे करायचे का ??

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली. लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या … Continue reading
Read full storyComments Off

मुक्ताजोबा…

आज मिपावर नीलकांतचा लेख वाचला (माझे आजोबा – एक आठवण) आणि न राहवून हा लेख इथे प्रसिद्ध करत आहे. लेख जिने लिहिलाय ती माझी शाळेतली मैत्रीण, हल्लीच परत नव्याने सापडलेली. तिच्या परवानगीनेच तिचे खरे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर, हा … Continue reading
Read full storyComments Off

ये साली जिंदगी….

ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये तो एकटाच बसून होता. एसीची सौम्य घरघर आणि हातातल्या पेनाची टेबलावरची टकटक ती भयाण शांतता भंग करत होती. त्याच्या एका बाजूला पाण्याची बाटली, एक कॉम्प्युटर, दोन-तीन फाईल्स पडून होत्या. मध्येच ते पेन तोंडात धरून फाईल्सवर आणि कीबोर्डवर … Continue reading
Read full storyComments Off

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी…

१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ … Continue reading
Read full storyComments Off

अखेरचा सलाम…

खरं तर हा लेख लिहायला घेतला, तेव्हा तुम्ही सुखरूप आहात आणि लवकर बरे होत आहात म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी….. पण जेव्हा कोणी थोडे वयस्क मंडळी गावस्कर काय क्लास खेळायचा वगैरे चर्चा करायची, त्यात मला काडीचाही रस नसे. गावस्करला मी खेळताना … Continue reading
Read full storyComments Off

द्रोहपर्व – एक विजयगाथा

इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो. आजवर या इतिहासाने आपल्याला बरंच काही शिकवलंय, अजूनही शिकवतोय आणि पुढेही शिकवत राहील. १४ जान्युअरी १७६१ ला पानिपतला झालेला महासंग्राम कोणीही विसरू शकत नाही. मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या संग्रामात … Continue reading
Read full storyComments Off

MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन … Continue reading
Read full storyComments Off

MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

सर्वप्रथम कथेचा हा भाग पोस्ट करण्यास झालेल्या विलंबासाठी दिलगिरी व्यक्त करतो. काही वैयक्तिक कारणांमुळे लिहिणे शक्य झालं नाही आणि उगाच घाईघाईने कथा संपवायची नव्हती. दरम्यानच्या काळात अनेक मित्र-मैत्रिणींनी, वाचकांनी कान उघडणी केल्यावर आज भाग लिहायला घेतोय भाग पहिला – MH-02-XX-4XXX … Continue reading
Read full storyComments Off

उधाणाला ३ वर्ष…

तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ब्लॉगवर खरडपट्टी सुरु झाली. सुरुवातीचे दोन महिने काहीच नव्हतं लिहिलं. नंतर महेंद्रकाका आणि हेरंबच्या ब्लॉगचा पाठलाग करता करता करता, थोडंफार लिखाण सुरु केलं. जवळजवळ सगळे अगम्य लेखन प्रकार लिहिले आणि तुम्ही ते मुकाट्याने सहन केलेत. वेळोवेळी … Continue reading
Read full storyComments Off

वेरूळची लेणी..

एखाद्या लांबच्या ठिकाणी भटकंतीला जायचं, म्हणजे खूप आधीपासूनच तयारीला सुरुवात करावी लागते. गाड्यांचे वेळापत्रक बघणे, तिथे राहण्याची सोय आहे की नाही, असेल तर ते परवडणार की नाही. त्या ठिकाणी अजून काय काय बघता येईल, याची इत्यंभूत माहिती काढणे.. इत्यादी इत्यादी … Continue reading
Read full storyComments Off

MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला काहीतरी गडबड झालीय, हे लक्षात यायला जयेशभाईंना वेळ लागला नाही. बॉबीला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. इतका मोठ्ठा सेटअप, कोणाच्या भरोश्यावर सोडून जायचा? उद्या बँकेच्या लोकांना काही तांत्रिक मदत लागली तर … Continue reading
Read full storyComments Off

MH-02-XX-4XXX – भाग पहिला

(एकनाथचं टूर आणि ट्रॅव्हल्स ऑफिस) “ट्रिंग.. ट्रिंग… हां बोला. गाडी नं…मिळेल नं. (समोरची डायरी घाईघाईने ओढून, त्यात आजच्या तारखेच्या पानावर काहीतरी खरडू लागला) कधी जायचं आहे आणि कुठली गाडी हवीय? कुठे जायचं आहे…?” समोरून तो माणूस एकनाथला डीटेल्स देत असतो, … Continue reading
Read full storyComments Off

अवचितगड….

अनायसे १५ ऑगस्टला गोऱ्या साहेबांच्या मेहरबानीमुळे सुट्टी मिळाली. ही आयती संधी सोडणार तरी कशी? मग ट्रेकचा प्लान सुरु झाला. आधीच्या रविवारी पालघर इथला, कोहोज आयत्यावेळी रद्द केला. त्याला कारण तोच गोरा साहेब. अमेरिकेतून हे बेणं आलं आणि फुलं उखडावी तशी … Continue reading
Read full storyComments Off

पुस्तक परिचय स्पर्धा २०१२

‘मीमराठी.नेट’(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी ‘ललित लेखन स्पर्धा’, ‘लघुकथा स्पर्धा’ तसेच ‘कविता स्पर्धा’ यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल ‘मीमराठी.नेट’ सर्वांचा ऋणी … Continue reading
Read full storyComments Off

पुस्तक परिचय स्पर्धा २०१२ – माहिती व नियमावली

Reblogged from राज दरबार.....: ‘मीमराठी.नेट’(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी ‘ललित लेखन स्पर्धा’, ‘लघुकथा स्पर्धा’ तसेच ‘कविता स्पर्धा’ यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता … Continue reading
Read full storyComments Off