दंगा कथा – छोटू

बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे  आम्ही ७-८ सहपाठी  एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू.    नया  बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतिया खान  असा शाळेत जाण्याचा मार्ग.  शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा.   रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३  किलोमीटर पाई चालण्यामुळे  चप्पल आणि  जोड्यांचे बारा वाजयचेच.  मोतिया खान जवळ एक चांभार  होता. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याचा मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी अर्थात  ७-८ च्या दरम्यान तो  आपल्या वडिलांची कामात मदत करायचा. चप्पला आणि जोड्यांची छोटी-मोठीमरम्मत तोच करायचा.  

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे हे व्हायचेच.   आमच्या दृष्टीने दंगा म्हणजे बनियांच्या दुकानांची  जाळपोळ आणि लूट-पाट.  असाच एक दंगा सदर बाजार येथे  झाला.  त्या दंग्यात कपड्यांची बरीच दुकाने लुटल्या गेली. बहती गंगेत, बहुतस्या गरिबांनी हि आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी मुले नवीन कपड्यात दिसू लागली.  त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यात साजरी झाली. पण प्रत्येक सिक्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याचा १५-२० दिवसानंतरची गोष्ट.  शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला.  त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला, या वेळी  हा शाळा  सोडून इथे का बसला आहे?  कदाचित याचा वडिलांची तब्येत खराब असेल. जोड़ा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होताच. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारले, अब्बू की तबियत ख़राब है क्या?  छोटू म्हणाला, स्कूल छोड़ दिया है. अब दुकान में हि बैठूंगा. मी विचारले, का? तो निर्विकारपणे म्हणाला, अब्बू जेल में है. क्यों???
तो म्हणाला, उस दिन तडके, अम्मीने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही है पड़ोस का नानके दो-चार  कपडे के  थान उठा के लाया है. मोहल्ले के बाकि मर्द भी वहीं गयें है और तुम हो की सो रहे हो. अब्बू उठला, मनात विचार केला हे ठीक नाही. पण  त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण   मोह्ल्लाच हिंदू असो वा मुसलमान दुकाने लुटायला निघाला होता. अब्बू पण त्या भीड़चा हिस्सा बनला. सदर मध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बू हि त्या दुकानात घुसला. लालच बुरी बला होती है ही म्हण  उगाचच नहीं. शरीराला पेलवत नव्हते तरी ही ३-कपड्यांचे थान  डोक्स्यावर लादून अब्बू दुकानातून बाहेर पडला. अचानक आवाजे आली, पुलिस पुलिस. अब्बू घाबरला. त्याचा  तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच पण  पोलिसांनी हि त्याला रंगे हाथ पकडले.    अश्यावेळी काय म्हणावे हे कळण्या सारखे वय नव्हते तरी हि   मी हिम्मत करून  विचारले, कोई वकील किया है क्या? हां, एक वकील केला आहे, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत है, काही वर्ष  तरी अब्बूला जेल मध्ये काढावी लागतीलच. छोटू पुढे म्हणाला उस दिन अब्बू से गलती हो गयी. किस्मत खराब थी, और क्या.  खरोखरच!  किस्मतची मार छोटू वर पडली होती. त्याचे शिक्षण सुटले. लहान वयातच  घराचा संपूर्ण  बोझा  त्याच्या खांद्यावर आला होता.   
 त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार ही घेऊन आली होती.  

विनोद दोशी नाट्य महोत्सव – २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई

त्या लहानशा गावात लोक अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. गावाने अनेक उंबर्‍यांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. गावातल्या प्रत्येकाला केवळ तिथे जन्मलेल्याच नव्हे तर लग्न करून गावात आलेल्या सासुरवाशिणीच्याही चार पिढ्यांचा इतिहास ज्ञात आहे. केस पिकलेल्या, दातांचं बोळकं झालेल्या गावच्या वृद्धांना गावाच्या रस्त्यांवर नि मैदानावर बागडणार्‍या सार्‍या पोरासोरांच्या जन्माची गाणी अजून याद आहेत. इथे जन्मलेल्या

अर्थसंकल्पः वाचेचा दिवा

अर्थमंत्री अरुण जेटलींनी 2016-2017 वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थवस्थेला गति देणारा अर्थसंकल्प ते सादर करतील अशी जेटलींकडून अपेक्षा नव्हतीच. सरकारी बँकांच्या भांडवलाची प्रचंड हानी. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या पलायनामुळे भांडवल बाजारात झालेली पडझड, ग्राहकोपयोगी मालाची महागाई, सातआठ राज्यातला दुष्काळ, आंतरराष्ट्रीय मंदी इत्यादि कारणांमुळे देशातले आर्थिक वातावरण अर्थमंत्र्याला अनुकूल नव्हते हेही खरे आहे. ह्या पार्श्वभूमीवर तारेवर कसरत करताना जेटली ह्यांची दमछाक होणे क्रमप्राप्तच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा आशावादाचा प्रचंड धबधबा आहे. त्या धबधब्यातून जेवढे पाणी खेचून घेता येईल तितके पाणी जेटलींनी खेचून घेऊन 2016-2017 चा अर्थसंकल्प सादर केला.
महागाई कमी झाल्याचा आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचा दावा 19.8 लाख कोटी खर्चाच्या ह्या अर्थसंकल्पात करण्यात आला असला तरी एकूण खर्चापैकी नियोजित खर्च फक्त साडेपाच लाख कोटींएवढाच आहे. उरलेला 14.28 कोटींचा खर्च अनियोजित स्वरूपाचा आहे. अर्थसंकल्पाची खरी गोम इथेच आहे. नव्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या अफाट तरतूदींनुसारच खर्च होईल ह्याचा खुद्द अर्थसंत्र्याला भरवसा नाही. नियोजित खर्चात 15.3 टक्के वाढ करण्यात आली असली तरी तो खर्च नियोजनानुसारच होईल असे नाही. अनियोजित खर्चात होणारी वाढ ही अर्थमंत्री आणि पंतप्रधान ह्यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करणा-यांमुळे होते हे उघड गुपित आहे. अनेक केंद्रीय योजनांत राज्य सरकारचा वाटा अपेक्षित असतो. परंतु अनेक राज्ये तो उचलत नाहीत. योजनांचे खर्चविषयक नियम केंद्राने घालून दिलेले असतात. त्या नियमानुसार राज्ये खर्च करतीलच असे नाही. नियमानुसार खर्च करण्यात आलेला नाही म्हणून अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी देण्यास केंद्र सरकार राज्यांना नकार देते. त्यापायी निरनिराळ्या खात्यात प्रचंड रकम शिल्लक राहते. ह्या शिलकी रकमेचा विनियोग अर्थमंत्री आणि पंतप्रधान ह्यांच्या मर्जीनुसार केला जातो. हाच तो अनियोजित खर्च!
देशाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने सरकारने 9 पिलर निश्चित करण्यात आल्याचे जेटलींनी सांगितले. कृषीविकास आणि शेतक-यांचे कल्याण, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि रोजगारावर भर, आरोग्य सेवांचा संपूर्ण विस्तार, शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्यविकास आणि उत्पादनाभिमुख समाज, पायाभूत सोयी आणि एकूणच कार्यक्षमतेत वृद्धी घडवून आणणारी गुंतवणूक, वित्तीय क्षेत्रात पारदर्शकता आणि स्थैर्याच्या दृष्टीने फेरबदल, सरकारी अर्थतंत्राचा सुयोग्य वापर आणि गरजूंना नेमकी मदत करण्याची नवी नवी तंत्रे विकसित करणे तसेच करदात्यांवर विश्वास ठेवणारी करप्रणाली अशी नऊ तत्त्त्वे जेटलींनी निश्चित केली. अर्थसंकल्पातील तरतुदी ह्या 9 तत्त्वांवर आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूणएक तत्त्वे फारच गोंडस आहेत. त्यांनी निःसंशय भरीव तरतुदीही केल्या आहेत. राज्यांना गेल्या वर्षांपैकी एकूण 99681 कोटी रुपये त्यांनी अधिक दिले आहेत. हे सगळे ठीक आहे. हा सगळा पैसा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे पाहूनच दिला जाणार हे न सांगताही समजण्यासारखे आहे.
मनरेगासाठी 38500 कोटी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी 2.18 कोटी रुपये अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. ह्यापुढे हायवे प्रकल्पात सिमेंटचा वापर केला जाणार असल्याचा निर्णय नितिन गडकरी ह्यांनी ह्यापूर्वीच जाहीर केला होता. हायवेसाठी मंजूर झालेल्या मोठमोठाल्या रकमांमुळे सिमेंट कंपन्यांचा फायदा होणार आहे. सिमेंट उद्योगात येणा-या संभाव्य तेजीचा फायदा घेण्यासाठी सिमेंट उद्योगातली जगातली सर्वात मोठी फ्रेंच कंपनी टपून बसली आहेच. गॅसचे उत्पादन वाढवण्याची आणि सेंद्रीय शेतीत अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा जेटलींनी केली. भारतातल्या बहुतेक गोशाळात खत निर्मिती होते. ह्या संघटना भाजपाला मानणा-या मंडळींच्या ताब्यात आहेत. इच्छा असली की वाट्टेल तसा मार्ग काढता येतो असाच खाक्या अर्थमंत्र्यांचा दिसला. पायाभूत सुधारण आणि ग्रामीण विभागासाठी वाढीव तरतुदींचे इंगित हे असे आहे.
खतांवर दिले जाणारे अर्थसाह्य थेट लाभधारकाच्या खात्यात जमा करण्याचा पथदर्शी प्रकल्प निवडक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.पण मुळात अर्थसाह्य हे एकूणच नाजूक प्रकरण आहे. अर्थसहाय्याची रक्कम खात्यात जमा करण्याची योजना चांगली आहे. परंतु आधारकार्ड नाही म्हणून बँकेत खाते नाही आणि खाते नाही म्हणून सरकारची अर्थसाह्याची रक्कम त्यांना मिळाली नाही. महाराष्ट्र राज्यातच सुमारे 500 कोटी रुपये बँकखात्याभावी वितरित होऊ शकले नाही. ह्या जनधनावर गरिबांचा अधिकार असला तरी प्रत्यक्षात तो अधिकार बजावला गेला नाही.
संकल्पित रकमेपैकी किती रक्कम खर्च झाली हा मुद्दा बाजूला ठेवा. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या अनेक करसवलती कितपत योग्य-अयोग्य हे काळच ठरवणार!  ह्यापूर्वीही प्रगतीच्या ह्या असमान संधी आधीच्या सरकारांनीही दिल्या होत्या. त्यांचा फायदा नेमका कोणाला झाला हा संशोधऩाचा विषय आहे. सरकारी मालकीच्या बँकांची बुडित कर्जे सुमारे 8 लाख कोटी रुपये आहे. तूर्तास त्यांना द्याव्या लागणा-या भांडवलासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सहकारी बँकांसाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. स्टॉक मार्केंटमार्फत गुंतवणूक करण्याचा सोस आता कोणालाही नाही. आता उद्योगांना हवी आहे थेट गुंतवणूक. भांडवलबाजाराचे काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. भारतासह जगभरातल्या भांडवल बाजारातून भांडवलदारांनी काढता पाय घेतला आहे. परिणामी सरकारला थेट विदेशी गुंतवणुकीचा मार्ग अधिक प्रशस्त करावा लागला. खुल्या बाजारातून भांडवल उभारण्याच्या भानगडीत न पडलेले बरे ह्या निष्कर्षावर सरकार आणि उद्योगपती आलेले दिसतात. मेक इन इंडिया कार्यक्रमान्तर्गत भारतात गुंतवणूक येणार असल्याचे भले मोठे आकडे रोजच्या रोज प्रसिद्ध होत असतात. जगात मंदी आहे त्याचा फायदा भारताला होणार; कारण भारताकडे नवनिर्मितीचे अफाट सामर्थ्य आहे असा जेटलींचा दावा आहे. हा आशावाद त्यांचा स्वतःचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तो त्यांनी उसना घेतला आहे. त्यांचा हा आशावाद नित्य वदावे काशीस जावे ह्या धर्तीचा आहे. काशीला जायचंय् असं नित्य सांगत राहिले तर एक ना एक दिवस माणूस काशीला पोहचणारच असे त्यांना वाटत असावे!     
जेटली सतत सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचा निर्वाळा देत आले आहेत. सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढले असेलही. लोकप्रचीति मात्र त्याच्या विपरीत आहे. वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. अलीकडे म्हणजे 2011-2012 साली जीडीपीचे निकष बदलण्यात आले. पूर्वी उत्पादित मालाची फॅक्टरीची किमत विचारात घेतली जात होती. आता ती बाजारभावानुसार विचारात घेतली जाते. परिणामी सकल राष्ट्रीय उत्पादन वाढत असल्याचा आभास होत आहे.  2016-2017 वर्षांत तो कायम राहील असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. महागाईच्या संदर्भातही हेच चित्र आहे. तूरडाळीचे उदाहरण प्रसिद्ध आहे. 80 रुपये किलो दराने मिळणारी तूर डाळ आता रीतसर 150 रुपये किलो दराने घ्यावी लागत आहे!  लोकांच्या दृष्टीने ती महाग असली तरी सरकारच्या दृष्टीने डाळीचा भाव महाग नाही! खेरीज तूरडाळीसाठी सरकारने ह्या अर्थसंकल्पात 800 कोटींची तरतूद केली आहे. कदाचित त्या तरतुदीचा उपयोग सरकारला करावाही लागणार नाही. औद्योगिक मालाचे गौडबंगाल समजणे खुद्द सरकाच्याही आवाक्यातले नाही; तर ते सामान्य माणसाला कसे समजणार?
अर्थसंकल्प सादर करताना जेटलींनी एकही खोटा दावा केला नाही! परकी चलन गंगाजळीत वाढ झाली, सरकारचा इरादा नेक आहे वगैरे वगैरे. अर्थसंकल्पाचा वाचेचा दिवा तर त्यांनी लावला. आता त्या दिव्यात तेलवात इत्यादि भरण्साठी ते सामग्री कोठून आणणार?  परकीय गुंतवणूक, देशाची कौशल्य वृध्दी ह्यावरच त्यांच्या अर्थसंकल्पाची मदार आहे. अनियोजित खर्च आणि नको तेथे नको ती वाढ असेच चित्र भावी काळात दिसण्याची शक्यता अधिक. सातव्या आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करण्याचा संकल्प जाहीर करतातना अन्य खात्याच्या गैरकारभाराबद्दल त्यांचे खाते काय कारवाई करणार ह्याबद्दल जेटलींनी अवाक्षरही काढले नाही.

रमेश झवर
www.rameshzawar.com

डिसक्लेमर

हल्ली ब्लॉगचं वट्ट प्रॉडक्शन थांबलेलं आहे. याबद्दल लोकांनी विचारणाही केली, त्याबद्दल अनेक आभार. खरं तर कधी कधी मला हा ब्लॉग लोक अजूनही वाचतात याचंच आश्चर्य वाटतं. काही जुने लेख आता इतके बालीश वाटतात की डिलीट करण्यासाठी हात सारखा शिवशिवत असतो. माझं बहुतेक आयुष्य कॉस्मोपॉलिटन वातावरणात गेलं त्यामुळे शुद्ध मराठीच्या नावाने बोंब. बहुतेक र्‍हस्व दीर्घ अजूनही कळत नाहीत. वीस वर्षे हिंदी-उर्दू बोलणार्‍या मुसलमान शेजार्‍यांबरोबर काढली त्यामुळे मराठीवर हिंदीचा मोठा प्रभाव. अजूनही ‘मदत केली’ की ‘मदत झाली’ हे माझ्या मठ्ठ् डोक्यात शिरत नाही. असं सगळं असूनही लोक वाचतात याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

मराठी माणसाचा स्मरणरंजनाचा गुण माझ्यातही आहे. तो इतक्या पराकोटीला पोचलाय की आता त्याचा कालावधी तीन-चार वर्षांवर आला आहे. म्हणजे तेव्हा कसं विषय डोक्यात आला, लिहून टाकला असं व्हायचं. आता ते शक्य नाही. का? नुसतं सांगण्यापेक्षा उदाहरणे देतो म्हणजे स्पष्ट् होईल.

सध्या दोन-तीन विषय डोक्यात आहेत. पहिला म्हणजे बॉक्सिंग. पूर्वी मला बॉक्सिंगचा तिटकारा होता. रानटी खेळ यापलिकडे याबद्दल माहिती नव्हती. मग ‘रॉकी’चे पाच भाग बघितले, ‘रेजिंग बुल’ बघितला, ‘मिलियन डॉलर बेबी’ बघितला, ‘द फायटर’ बघितला आणि हळूहळू यातले बारकावे लक्षात यायला लागले. बॉक्सिंग म्हणजे फक्त मैदानात जाऊन धपाधप ठोसे हाणायचे असं नसतं, त्यामागे किती खोल स्ट्रॅटेजी असते हे समजलं. सध्या महंमद अलीचं आत्मचरित्र वाचतो आहे कारण तो आता माझा आवडता बॉक्सर झाला आहे. लेख लिहायला हा एक सुरेख विषय आहे. पण हा लेख लिहीला आणि लोकांच्या प्रतिक्रिया भलतीकडेच गेल्या तर वैताग येतो. ‘ह्याला बॉक्सिंग अचानक कसं काय आवडायला लागलं? म्हणजे मसल्सवाले उघडे पुरूष बघायला आवडतात की काय? तरीच पहिल्यापासून संशय होता. म्हणूनच अजून लग्न केलं नाही..इ.इ.’ आता मला ‘गे’ असण्याबद्दल कोणतीही गैरसमजूत नाही. ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे असं मी मानतो. मी ‘गे’ असतो तर जाहीर करण्यातही मला संकोच वाटला नसता.  संमती असेल दोन सज्ञान व्यक्ती काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र सुतावरुन स्वर्ग गाठून कुणाच्याही वैयक्तिक चॉइसबद्दल आपला आपणच निर्णय घेऊन मोकळं होणे हे मला पटत नाही. मला पिझ्झा आवडतो की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. मला अली आणि शकिरा दोघेही आवडतात पण शकिराबद्दल जे आकर्षण वाटतं ते अली किंवा इतर कोणत्याही पुरुषाबद्दल कधीही वाटणे शक्य नाही. आता याहून अधिक स्पष्टीकरण अशक्य आहे. इतकं सांगितल्यावरही लेख लिहीला तर लोकांचा संशय फिटेलच याची ग्यारंटी नाही. (काय दिवस आलेत च्यामायला! एखादा खेळ का आवडतो ह्यावर इतकी डोकेफोड करावी लागतेय. दिमाग का भाजीपाला होरेलाय मामू!! )

पुढचा इषय. एक सुंदर गझल आहे, तिचे निरनिराळे अर्थ लक्षात आले. त्यावर लिहायचं आहे. पण लेख लिहीला तर गझलेत जे आहे तेच माझ्या आयुष्यातही आहे असा समज करुन घेतला तर परत पंचाईत. म्हणजे समजा मी ‘हंगामा है क्यू बरपा’ वर लिहीलं तर याचा अर्थ मी रोज संध्याकाळी खंबा घेऊन बसतो असा कुणी काढला तर त्याला इलाज नाही.

तिसरा विषय. मला हिप-हॉप आणि रॅप विशेषतः ‘गँगस्टर रॅप’ पहिल्यापासून आवडतं. त्यात नुकताच ‘स्ट्रेट आउट ऑफ कॉम्प्टन’ हा चित्रपट बघितला आणि मनापासून आवडला. यावर एक उत्तम लेख होऊ शकेल. अडचण अशी की या प्रकारच्या संगीतात शिव्या अगदी खच्चून भरलेल्या असतात. ती संस्कृतीच तशी आहे. आता लेखात उदाहरण म्हणून एखादं गाणं दिलं आणि त्यातल्या शिव्या आपल्यासाठी आहेत असा समज कुणी करुन घेतला तर काय करायचं?

मला ‘रेव्हनंट’ फारसा आवडला नाही पण असं सांगणारा लेख मी लिहीला तर ज्यांना तो आवडला त्यांच्या मताविषयी कुठलाही अनादर नाही. आवडीनिवडी फार सापेक्ष असतात. निवडणुका झाल्यावर मी या सरकारला एक संधी देऊ या अशा प्रकारचा लेख लिहीला होता याचा अर्थ मी मोदी समर्थक आहे असा नाही. माझी मतेही रोज बदलत असतात. ओबामा सुरुवातीला प्रचंड आवडले, मग स्नोडेन प्रकरण झाल्यावर नावडले, सध्या ७५-२५, म्हणजे ७५ आवडतात. हे असं चालूच राहणार. त्या क्षणाला कोणतंही मत देणारा लेख लिहीला तर त्यामागे दुसरा कोणताही हेतू नसतो.

ब्लॉग लिहिणं मला आवडतं आणि फारसे चांगले लेख नसतानाही इतके लोक वाचतात याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अशा परिस्थितीत अशा सुरेख व्यासपीठाचा वापर कोणत्याही अंतस्थ हेतूसाठी करणे मला मान्य नाही. ब्लॉगवरचे लेख वाचताना त्यामागे केवळ त्या-त्या विषयावर मतप्रदर्शन इतकाच हेतू आहे.

आता इतके फिल्टर टाकल्यावर कोणते विषय उरले? रासायनिक खतांवर लिहावं ‘मोन्साटो’वाले धावून येतील. बालाजी तांब्यांवर लिहीलं तर विज्ञानवादी खवळतील. ‘बकर्‍यांची पैदास आणि निगा’ यावर लिहीलं तर व्हेगन लोक मोर्चा काढतील.

म्हणून काही न लिहिता स्वस्थ बसलो आहे. तुम्हाला एखादा निरुपद्रवी विषय सुचला तर सांगा. 

सुपरबोल

(सुपरबोल. दरवर्षी हा खेळ खेळाइतकाच किंबहुना खेळापेक्षा इतर कारणांनीही गाजतो. गेल्या आठवड्यात रविवारी खेळला गेलेला सुपरबोलही याला अपवाद नाही. सुपरबोलचं हे ५० वं वर्ष. मध्यांतरातील कार्यक्रमासाठी गायलेली बियॉन्से या वेळेला वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.)

फूटबॉल या खेळाच्या विजेतेपदासाठी दरवर्षी होणारी चुरस म्हणजे सुपरबोल. राष्ट्रीय फूटबॉल संघटनेत (NFL) असलेले ३२ संघ दोन गटात विभागलेले आहेत. ते राष्ट्रीय  फूटबॉल संघ (NFC) आणि अमेरिकन फूटबॉल संघ (AFC) या नावाने ओळखले जातात. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात हे संघ सुपरबोलपर्यंत पोचण्यासाठी खेळतात. आणि फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अंतिम फेरीपर्यंत पोचलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतात.  फेब्रुवारी महिन्याचा  पहिला रविवार ’सुपरबोल सन्डे’ म्हणूनच ओळखला जातो. या ७ फेब्रुवारीला लढत होती कॅरोलायना पॅंन्थर आणि डेनवर ब्रॉन्को या दोन संघामध्ये.

हा खेळ जितका खेळासाठी प्रसिद्ध आहे तितकाच अनेक कारणांसाठी. काहींना खेळाची आवड म्हणून तर काहीजण केवळ जाहिरातीसाठी सुपरबोल पाहतात. मध्यांतरात होणार्‍या कार्यक्रमाचं आकर्षण असणारा वर्गही खूप मोठा आहे. मायकल जॅक्सन, मॅडोना, व्हीटनी ह्युस्टन अशा एकाहून एक नामवंत कलाकारांनी या वेळेला आपले कार्यक्रम सादर केले आहेत.

या वेळेला होते ब्रुनो मार्स, कोल्डप्ले आणि पॉपसिंगर बियॉन्से. बियॉन्से आणि तिच्या सहकारी नर्तिकानी घातलेल्या पोशाखावरून, गाण्यातील शब्दांवरुन सध्या हवा तापलेली आहे. आफ्रिकन – अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यातील  एक चळवळ म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स चळवळ. बियॉन्से आणि सहकारी नर्तिकांचा काळ्य़ा रंगाचा पेहराव आणि टोपी या दोन्ही गोष्टी त्या चळवळीतील कार्यकर्त्यांसारख्या होत्या,  नृत्यातून मालकम एक्स या मानवी हक्कासाठी जागरुक असलेल्या आफ्रिकन – अमेरिकन नेत्याबद्दलचा आदर साकारला, तसंच नृत्यातील  मुठी वळवून उंचावलेले हात म्हणजे ’ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न होता. १९६८ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक वितरणाच्या वेळेला  अमेरिकन राष्ट्रगीत सुरु झाल्यावर आफ्रिकन – अमेरिकन विजेत्यांनी मुठी उंचावल्या होत्या तशाच या नृत्यात वापरल्या गेल्या.  बियॉन्सेने सादर केलेल्या नृत्यानंतर चालू झालेल्या या चर्चेत भर पडली ती सुपरबोलच्या आधी म्हणजे शनिवारी बियॉन्सेने तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या  ’फॉरमेशन’  हे शीर्षक असलेल्या गाण्याने. या गाण्यातून  आफ्रिकन – अमेरिकन लोकांवर पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार थांबवावे असं सुचविण्यात आलं आहे. ते दाखविताना एक छोटा मुलगा रस्त्यावर पोलिसांच्या समोर हाताने थांबण्याची खूण करत उभा आहे असं दाखविलं आहे आणि पोलिसांच्या मागे असलेल्या भिंतीवर ’स्टॉप शूटिंग अॲट अस’ हे वाक्य दिसतं. गाण्यात, पाण्यात बुडणार्‍या पोलिसांच्या गाडीवर बियॉन्से बसलेली दिसते.  या गाण्यातून बियॉन्सेने पोलिसांची प्रतिमा  धुळीला मिळवली असा तिच्यावर आरोप होत आहे. जे पोलिस तिला, जनतेला संरक्षण देतात त्यांची बदनामी अशारितीने करुन बियॉन्सेने काय साधलं असं लोकांना वाटतं.  वर्णभेदाविरुद्ध विरोध दर्शविण्याची सुपरबोल ही योग्यं जागा नाही या मताच्या लोकांनी राष्ट्रीय फूटबॉल संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचं निश्चित केलं आहे.

या आधी सुपरबोलच्या इतिहासात गाजलेला प्रसंग म्हणजे  जॅनेट जॅकसन आणि जस्टीन टिंम्बरलेक यांच्या गाण्याच्या वेळेला घडलेली घटना. जस्टीन टिंम्बरलेकच्या हातून ’रॉक युवर बॉडी’ गाणं म्हणताना जॅनेटने घातलेलं जॅकेट चुकून ओढलं गेलं, फाटलं आणि त्यामुळे वक्षस्थळ उघडं पडलं. लाखो लोकांनी हा प्रसंग दूरदर्शनवर पाहिला. वार्डरोब मालफंक्शन म्हणून कुप्रसिद्ध झालेला हा किस्सा कितीतरी महिने वादळ उठवणारा ठरला किंबहुना सुपरबोल म्हटलं की प्रथम या प्रसंगाचीच आठवण आज १२ वर्ष होऊन गेली तरी लोकांच्या मनात ताजी होते. या प्रसंगाची परिणिती म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बंदच झालं. असे अनपेक्षित लाजिरवाणे प्रसंग टाळण्यासाठी  थेट प्रक्षेपण म्हणून जे आपण पाहतो ते काही क्षणानंतर दाखविलेलं दृश्य असतं. हा प्रसंग ज्यांनी दूरदर्शनवर पाहिला नाही त्यापैकी एक होते जावेद करीम. २००४ साली तो प्रसंग पुन्हा पाहण्यासाठी काही मार्गच नव्हता. आणि नक्की काय घडलं याचं कुतूहल असलेल्या जावेद आणि त्यांचे मित्र स्टीव्ह आणि चॅड यांच्या मनात लोकं स्वत:च चित्रीकरण अपलोड करु शकतील असं संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना आली. या कल्पनेचं मूर्त्य रुप म्हणजेच यु ट्युब. एकाच प्रसंगाने प्रसारमाध्यमामध्ये घडलेले हे २ मोठे बदल!

 सुपरबोल जसा अशा घटनांनी गाजतो तितकाच तो प्रसिद्ध आहे जाहिरातींमुळे. सुपरबोल प्रक्षेपणाच्या दरम्यान  जाहीरात झळकण्यासाठी कंपन्यांना ३० सेकंदांसाठी जवळजवळ ३० लाख डॉलर्स मोजावे लागतात. ’ क्रॅश द सुपरबोल’ अशी स्पर्धाही फ्रिटो ले ही चिप्स उत्पादक कंपनी घेते. २०१६ हे या स्पर्धेचं शेवटचं वर्ष होतं. डोरीटो चिप्सच्या जाहीरात स्पर्धेत हातात कॅमेरा आणि कल्पना असलेल्या कुणालाही भाग घेता येत होता. शेवटच्या वर्षात कंपनीने विजेत्याला हॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून देण्याचीही जबाबदारी उचलली आहे. २००६ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत २०१३ पासून जभभरातून  कुणीही भाग घेऊ शकत होतं.  आलेल्या जाहिरातीतील कमीत कमी १ जाहिरात या खेळादरम्यान दाखविण्य़ाची हमी कंपनीची. त्याव्यतिरिक्त युएसए टुडे च्या सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण मिळालेल्या जाहिरातीला ४ लाख ते १० लाख डॉलर्सचं बक्षीसही कंपनीकडून मिळत होतं. या अखेरच्या वर्षी ४५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातील ५० स्पर्धकांनी उपांन्त्यपूर्व फेरी गाठली. उपांन्त्यफेरीतील ३ स्पर्धकांपैकी विजेती ठरली ती ’डोरीटोज डॉग्ज’ जाहीरात. ३ कुत्र्यांना डोरिटो चिप्स खायची इच्छा असते आणि ती ते कशी पुरी करतात ते विनोदीपद्धतीने दाखवलेली ही जाहिरात. अवघ्या १००० डॉलर्समध्ये पूर्ण झालेल्या जाहीरीतीने जेकब चेसला हॉलिवूड मध्ये प्रवेश तर मिळालाच पण त्याचबरोबर १० लाख डॉलर्सही.

युएसए टुडे च्या सर्वेक्षणानुसार व्यावसायिक जाहिरातींमध्ये या वर्षी हंडे कंपनीने बाजी मारली. गाडी आणि गाडीतील अत्याधुनिक यंत्रणेची जाहिरात करणार्‍या  जाहीरातीत मुलगी तिच्या मित्राबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात आहे. वडील आग्रहाने नवीन हंडे गाडीची किल्ली मुलाच्या स्वाधीन करतात. गाडीमधील ’कार फाईंडर’ मुळे गाडी कुठे आहे ते वडिलांना कळत राहतं आणि त्या त्या ठिकाणी  ते पोचतात, दोघांना ’एकांत’ मिळूच देत नाहीत अशी ही जाहिरात. मुलगा कंटाळून थोड्याच वेळात मुलीला घरी सोडतो. आणि बाबा मुलीला विचारतात, ’मग काय केलं तुम्ही आज?’ आणि जाहिरातीचा शेवट होतो – ’बिकॉज डॅड गोट  डू व्हॉट डॅड गोट टू डू’ या वाक्याने. सुपरबोल मध्ये दाखविल्या गेलेल्या जाहिरातीत विनोद, प्राणी आणि सेलिब्रेटी ह्या ३ गोष्टींचा वापर प्रामुख्याने केलेला होता.

सुपरबोल म्हटलं की जाहिराती, वादग्रस्त घटना जितक्या महत्त्वाच्या तितकेच प्राणीही. दरवर्षी प्राणीही ही स्पर्धा कोण जिंकेल याचा अंदाज वर्तवायला पुढे सरसावतात. एका प्राणी संग्रहालयातील माकडांनी म्हणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या चिठ्ठ्यांतून कॅरोलायना पॅन्थर लिहिलेला कागद उचलला तर दुसर्‍या प्राणिसंग्रहालयात कासवं संथगतीने मार्गक्रमणा करत ब्रान्को पर्यंत पोचली.  टेडी बेअर नावाच्या साळूचे  फेसबुकवर ४५००० चाहते आहेत तर यु ट्यूबवर २४००० अनुयायी. साळूचे आत्तापर्यंत ४ पैकी ३ अंदाज अचूक ठरले. यावेळीही डेनवर ब्रान्को जिंकतील हा साळूचा अंदाज खरा झाला.

या सगळ्यात सर्वसामान्यांनी तरी का बरं मागे राहावं? पैजा मारण्याची चढाओढ सुपरबोलच्या वेळी खेळात रंगत भरते. कुठला संघ जिंकेल यावरच पैजा मारण्याइतके लोक अल्पसंतुष्ट नाहीत. या वर्षी सुपरबोल होता कॅलिफोर्नियामध्ये. तिथे भूकंप होईल का, बियॉन्से कार्यक्रम सादर करेल तेव्हा कोणत्या रंगाच्या चपला घालेल, खेळ दूरदर्शनवर दाखविला जात असताना शहराला अभिमान असलेला असलेला गोल्डन गेट पूल कितीवेळा दाखवला जाईल, पेटन मॅनिंग निवृत्ती जाहीर करेल का, केली तर ते सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतील का असे  प्रश्न घेऊन एकापेक्षा एक पैजा मारल्या गेल्या. या पैजांमुळे काही काही वेळा कंटाळवाणा होऊ लागलेल्या खेळातही रंगत यायला लागते. तसंही कुणाच्या मनोरंजनाची काय साधनं असतील हे ज्याचं त्यानेच तर ठरवायचं.

आता राहता राहिले खेळाडू. कोणत्याही गोष्टीत यश मिळविण्यासाठी प्रत्येकाकडे ’लाभदायक’ म्हणून काहीतरी गोष्ट असतेच. दोन्ही संघातील खेळाडू याला अपवाद नाहीत. कुणी काळ्या रंगाचे बूट घालतं तर कुणी खेळताना च्युईंगम चघळतं, ते कडक राहिलं तर आपण जिंकणार अशी त्या खेळाडूला खात्री वाटते.

एक ना अनेक… सुपरबोल आणि त्याचे हे असे भन्नाट किस्से! आता काही काळ बियॉन्से प्रकरण चघळायचं आणि नंतर वाट पाहायची ती पुढच्या वर्षीच्या सुपरबोलची. का? अर्थात या सार्‍याच कारणांकरिता…

मोहना प्रुभुदेसाई – जोगळेकर
mohanajoglekar@gmail.com

माझी बोली भाषा

.

     एक संकेत स्थळाने बोली भाषेत साहित्य पाठवण्याची सभासदांना विनंती केली. संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते.  एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो.  शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.  

आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण. जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात आम्ही भाड्यावर राहायचो तिथे पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी भाषी आणि मराठी भाषी असे ८-९ भाडेकरू होते. शेजार बनिया आणि मुसलमान. आमचे घरमालक कडक शिस्तीचे होते. वाड्यात राहणाऱ्या कुणा मुलाच्या तोंडून ‘साला’ शब्द जरी बाहेर पडला तर श्रीमुखात फडकावयाला कमी करत नसे.  संध्याकाळी वडील घरी आल्यावर तोंड-हात धुवायचे आणि नंतर  आई देवासमोर दिवा लावायची. रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणायचो. (आंम्हाला तीच मराठी वाटायची, नंतर कळले रामरक्षा,  स्त्रोते इत्यादी  संस्कृत भाषेत असतात).     
जुन्या दिल्लीत मराठी परिवार हि होते. रविवारच्या दिवशी सर्व मराठी मुले, महाराष्ट्र समाजात खेळायला जमत असू. आपसांत बोलताना सुरुवात मराठीतून  व्हायची आणि नंतर केंव्हा हिंदीत बोलू लागू कळत नसे. कुणी मोठ्यानी टोकले ‘जरा मराठीच बोला’ तेंव्हा लक्ष्यात यायचे. अश्यारितीने अधकचरी मराठी बोलायला शिकलो.  माझ्या बोली भाषेवर – उर्दूची अदब आणि तहजीब, शुद्ध हिंदी (शालेय शिक्षक) आणि घरची मराठी या सर्वांचा परिणाम झाला.  वर्ष-दोन वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नागपूरला जायचो. तिथे गेल्यावर वाटायचे इथली मुले किती असभ्य. यानां बोलण्याची तमीज सुद्धा नाही. मोठ्याशी हि अरे-तुरे करतात. तिथे आमची, “काका आपल्या साठी पाणी आणू का?(चाचाजी आपके लिये पानी लाऊं क्या).” काका वैतागून म्हणायचा हे काय आप, आपण लावून ठेवले आहे, अरे मला तू म्हणत जा. पण मला, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर सोडा, लहान मुलांना  हि, ‘तू’ म्हणणे आजगयात जमले नाही.  

आई भंडार्याची होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एक दोन वेळा आजोळी गेलो होतो. तेही ८-१०  वर्षाचा होतो तेंव्हा. एवढे आठवते, आम्हा भावंडांचे बोलणे ऐकून, तुम्ही मुसलमान आहात का? अशी विचारणा केल्या गेली. नंतर एकदा लहान मामाच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो.  नुसती मुंडी हलविण्याचे काम केले, कारण लोक काय बोलत आहे काहीच कळत नव्हते.  असो.

पुन्हा प्रश्न आलाच माझी बोली भाषा कुठली. मला आठवले, एकदा माझ्या भावाला एक शेजारच्या मुलाने शिवी दिली, दगड हातात उचलीत तो म्हणाला, “मनोजजी, इज्जत से बात कीजिएगा, आइन्दा बत्तमीजी की तो हमसे बुरा कोई नहीं होगा, हमारा निशाना सटीक है, तुम्हारा डोक फोड़ दूंगा. समझे.”  बहुधा हीच माझी बोली भाषा. कारण भांडताना आपण आपली खरी भाषा लोकांसमोर उघडी करतो.


मराठी भाषा

                                            ॐ

मराठी भाषा दिवस शुभेच्छा !

ॐ गं गणपतये नम: ||

ॐ नमस्तस्यै । नमस्तस्यै । नमस्तस्यै । नमो नमः ।।

मराठी

“ही माझी अमेरिकन आई.” माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आ…

Caste means profession!

Readers would have got by now that the caste is nothing but the profession one adapts for the livelihood. Also we have seen that how new castes emerged with new innovations and inventions and how some castes disappeared as their professions no more were required. It was the flexible system, unlike the pyramid of Vedic Varna system it was horizontal. People could move from one to other professions easily. We have many historical evidences to prove this fact.

 The problem of the scholars is invariably they have tried to analyze Indian social system through Vedic glasses. One must bear in mind that Vedic literature naturally would talk about its own system. This is why Vedic literature doesn’t provide any definition of origin of the caste system. “Jati” (Caste) was never ever foundation of their social order. It was Varna, descending order of the social classes. Larger segment of the Indian society always remained non-Vedic, following their pre-Vedic religious and social order. Hence connecting both, Vedic and non-Vedic, was wrong which created social confusion. 

The Smriti’s started giving strange explanations of origin of the castes. They found it in anulom and pratilom marriages. The offspring’s of such marriages would form certain caste. Social history doesn’t support it. It was a lame explanation in absence of the knowledge of practical reasons that formed a caste. Dr. Ajay Mitra Shastri says in this regard that, as various occupations became ancestral, they formed the castes. To adjust the castes in Varna system Smriti’s considered anulom (marriage of lower Varna woman with high Varna man)and pratilom (marriage of high Varna woman with lowerVarna man) marriages being responsible for emergence of various castes. However, the attempt seems to have failed as people mentioned their own castes in various donations inscriptions.  (Itihas: Parachin Kal (Vol.1) Maharashtra State Gazetteer, page 489)   
However, the idea that was invented to explain the castes (professions) of non-Vedic masses through Vedic perspective; was certainly insulting as the definition treated them as a product of corrupt marital ties. This couldn’t have been accepted by the masses or rather they may not even know it because they anyway were forbidden from Vedic literature. What we can say is it was a fine example of moral corruption of Vedics.  

Here Dr. Shastri is referring to the donation inscriptions in Buddhist caves of early history of Maharashtra. We also know the instances of numerous Shudra kings, mentioned by Mahabharata, Satapatha Brahmana and Manu. Dr. Shastri sates that there were many Shudra kings came in the power in early and medieval era as well, and with proud they have mentioned their Shudra origin in inscriptions. However there are rare instances where kings are referring themselves as Kshatriyas. 

Most of the occupational professions were controlled by the non-Vedic masses. They were money lenders, artisans, landlords, peasants, knights, traders, sea farers, service providers and soldiers. Vedic’s too on small scale have seen to be entering in to such professions during Mauryan era those were prohibited to them by Smritis. What we can see that the social mobility did prevail. 

Warrior was never ever a permanent class in INDIAN society. Kings seldom established their permanent salaried forces. The Farmers and peasant would be part time soldiers while most of the times landlords being their commanders. They would assemble their army in the times of the needs to join the expeditions. Such profession couldn’t have been traditional. It was occupation of choice, unrelated to Vedic social system simply because they were not part of it. 

Vedic kings appear in the history in form of Shungas and Kanvas. Revival of Vedicism is attributed to their reign. Maurya’s were non-Vedic and so were the Satvahana’s, the most powerful dynasties of India. THE WARRING Clans like Yodheya, Abhira, Kuntal, Shakya etc. too were non-Vedic, not belonging to any Varna of Vedic social order. In fact the influence of Vedic religion is nowhere to be traced in iconography of ancient times. Had it been influential we could note some presence of it in numismatics or inscriptions.  But this also is not the case.
When we hardly can trace influence of Vedicism in early era, except for few regions of north, it is unscientific to say that Indian social order was  influenced by Vedic code in those times. People in inscriptions inscribed their castes, but not Varna is also a proof to indicate Vedic social order had not been accepted by the people at large.

People have mentioned their castes (professions) with pride in the donation inscriptions. Such  castes include Halik (ploughers), Sutar (carpenter), Sonar (Goldsmith) Lohar (Blacksmith) Teli (oil makers), Vinkar (Weavers), Koli (Fishermen), Mali (gardener), Charmakar (Cobbler) etc. It would appear that the donor castes were rich enough to donate. They could accumulate wealth and spend it as per their own choice without any social or religious restrictions.

Also we can see that many castes of early centuries of our era no more exist, such as Ploughers (Halik). Hence there is no proof that the caste system was rigid from its inception. Many new castes appeared and old were vanished. Also there was a caste “Odyantrik” (makers of water-run-machines) which also is no more now.

We can safely conclude that the caste meant profession. The names of the caste too clearly suggest profession. It was a flexible and horizontal system. Status or dignity of the profession would naturally depend on the financial or authoritative status it would provide. There could be up and downs depending on the economic and political circumstances. We are aware that many people lost their professions during waning era of the Indus civilization as foreign trade came to gradual halt and worsening climatic changes. Naturally people turned to other professions for survival. However evidences indicate that the independent invention of glass making helped some to establish other profession (caste) for survival. No one can claim, under the circumstances, that his ancestors always belonged to the same caste to which he belongs now! Pride of the caste hence is unnatural.

So there is no shred of the evidence to show that caste system was rigid, birth based since its beginning and it was enforced upon indigenous people by invading barbaric Vedics. It originated with the professions those human being invented, innovated in course of the time for survival. It has nothing to do with any religious doctrine. confusing caste system with the Vedic religion’s  social Varna system have already done irreparable harm to Indian society. The caste customs have entirely different origin that we will discuss in next chapters.

This also would mean that the status or prestige of the castes solely were dependent on the economic strength or weakness that would provide. The needs of the society are ever changing bringing ups and downs in every profession. Many professions become extinct as there remains no anymore requirement and new professions flourish with the demand.

Such social situation we can find to be prevailing till tenth century AD. The birth based rigid caste system seems to have been emerged after this era. We will naturally have to discuss what led society to enter in a dark era from its original free atmosphere? When Varna system did start plaguing non-Vedic masses and how did they accept supremacy of Vedic religion though they largely remained non-Vedics and continued to follow their pre-Vedic faith?

We shall probe this vital question in next chapters.

माघ संकष्ट चतुर्थी

                                   ॐ

मन्मथनाम शके १९३७ उत्तरायण शिशिरऋतु माघ कृष्णपक्ष

शुक्रवार ४
संकष्ट चतुर्थी

दिनांक २६. २. २०१६.