Two more comments

I had written summery of all my comments and objections and had closed the subject. I will add only two more points. 1. Shri. Oak produced an excellent video of ‘Vakra’ motion of Mars. It did not support his interpretation because the video showed Mars going Vakra near Rohini and not ‘मघासु’. I was waiting for a similar video for ‘Vakra’ motion of Jupiter near Shravan. I have not seen any such video published by Shri. Oak. Maybe, Jupiter also did not go vakra near Shravan (श्रवणे च बृहस्पतिः?)
2. About Bhishma spending 95+ days on deathbed, Shri. Oak repeatedly mentions that a large no. of observations in Mahabharata support it. Readers may get an impression that at many places there is a specific mention of the days spent by Bhishma on deathbed, by Vyasa or others. It is not so. The many references merely help in building a time-line from fall of Bhishma till the first visit by Pandavas and Krishna to Bhishma well after end of war. Only single mention of days spent by Bhishma other than what Bhishma himself said on the last day is what Krishna said at the time of this visit. He mentions 56 days as against 57 days (58 nights) mentioned by Bhishma himself. Shri. Oak considers Krishna’s 56 days as ‘from that day onwards’. I consider them to be total days he expected Bhishma to spend from fall to Uttarayana.

माणसाचा शाश्वत धर्म

ज्यालाही शारिरिक अथवा मानसिक किंवा लैंगिक हिंसेत रस असतो त्यांच्या मेंदुतील रसायनांत काहीतरी मुलभूत गडबड असते. असे लोक प्रत्यक्षात अशी हिंसा करतात किंवा स्वत:ला शक्य नसते तेंव्हा अशी कृत्ये करणा-या लोकांचे छुपे किंवा उघड समर्थक असतात. व्यक्तिगत हिंसा शक्य नसते तेथे झूंड करून हिंसा करतात. हिटलर केवढा क्रूर होता हे माहित असुनही त्याचे समर्थक जगभर कमी नाहीत. भारतातही आहेत. Polpot येथल्या लोकांपर्यंत अजून नीट पोचला नाही अन्यथा त्याचेही समर्थक येथे भराभर पैदा झाले असते. Sadist लोकांचा हा मानसिक छंद असतो आणि त्यांना खरे तर मानसोपचाराची गरज असते. भारतात आज अशा अनेक मानसोपचार केंद्रांची गरज आहे.
मनुष्याच्या अमानवीपणाला मनुष्यच वाचवू शकतो. किंबहुना आजवर माणसाची जी काही अंशता: का होईना प्रगती झाली आहे त्या मागे माणसाच्या मनात असलेल्या जन्मजात माणुसकीच्या समाजोपयोगी भावना आहेत. ती अनंत चुकांतुन अडखळत झालेली आहे. आम्ही चुका कमी करायच्या कि वाढवायच्या हाच काय तो प्रश्न आहे. मानवता राहणारच आहे. कालच्या संस्कृत्या आज नव्या रुपात का होईना साकारतच अहेत आणि उद्याही त्या कोणत्या ना कोणत्या, पण मानवतेच्या उदात्त मुल्यांच्या पायावरच उभ्या असणार आहेत.
विध्वंसकता, क्रुरता, माणसांना माणसांनीच मारण्यात विकृत आनंद शोधणा-यांचेही सहास्तित्व राहणारच आहे. खरे म्हणजे मानवी सहजीवनाच्या उपजत प्रेरणांना पुरातन काळापासून या केमिकल लोच्या झालेल्या झुंडींनी अडथळेच आणायचा प्रयत्न केला आहे. हिंसक लोकांना आदर्श मानणारे भविष्यातील हिंसक नेत्यांच्या उदयाचा पाया घातलेक्ला आहे हेही एक वास्तव आहे. माणसांना गुलाम करण्याची, स्त्रीयांना गुलाम करण्याचे भावना ही याच हिंसक मानसिकतेची परिणती आहे.
पण तरीही जीवन फुलते. तरीही प्रेमाच्या आणाभाका होतात. तरीही अजरामर मैत्रीचे बंध जुळतात. तरीही माणूस क्षमा करतो. तरीही माणसाच्या काळजात करुणेचे कोंभ फुटतात. तरीही “हे विश्वची माझे घर” अशा उदात्त भावना माणसाच्या अंतर्गर्भातून येतात. खांद्यावरून क्रुस वाहणारा म्रूत्युकडे वाट चालणारा येशू येतो तसाच सा-या मानवजातीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणारा गांधीही येतो. बुद्ध येतो तसाच महावीरही येतो. ते येतात कारण माणसाच्या मनातच मानवता आहे हे त्यांना माहित असते. त्यावरची अमानुषतेची पुटे काढण्यासाठीच काय ते आलेले असतात. ते माणसाला काहीच माणसाला माहित नसलेले नवे सांगत नाहीत. पण ते माणसाला माहित असलेले केवळ जगून दाखवतात, एवढेच!
चांगुलपणा व सौहार्दमय सहजीवन हा माणसाचा शाश्वत धर्म आहे. यत अडथळा आणत आपल्या असामाजिक भावनांना प्राबल्य देवू पाहणारे हे अधर्मी होत. हिंसेचे तत्वज्ञान हे मानवतेचे तत्वज्ञान असू शकत नाही. हिंसेचे परिप्रेक्ष न समजणे हे मानवता न समजल्याचे लक्षण आहे. मानवी प्रेरणा न समजल्याचे लक्षण आहे. असे लोक नेहमीच हरतात. गांधी आज मारुनही जीवंत असेल तर तो विजय मानवी सत्प्रेरणांचा आहे. हिंसक प्रेरणांचा नव्हे. आजही बुद्ध-महावीर-येशुची करुणामयता जीवंत असेल तर तो मानवतेचाच विजय आहे. हिटलर-पोलपोट-गोडसे भलेही काही लोकांना ग्रेट वाटो…त्यांचा पराजय त्यांच्याच विकृत नियतीने कधीच केला आहे. त्यांना भवितव्य नाही.
शेवटी ज्ञानोबा म्हनतात तेच खरे…
“खळांची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रती वाढो l
भूतां परस्परें पडो l मैत्र जीवाचें l”
आम्ही वैश्विक मित्र व्हायचे कि द्वेष्टे हे आम्हीच ठरवायचे आहे.
आणि मानवता, शांती आणि अहिंसा नेहमीच, अनेकदा हरल्यासारखी वाटूनही, जिंकते!
बापू, विनम्र अभिवादन!

शरीराचं ‘म्हणणं’

परवा एक फार दुर्दैवी घटना घडली. सेल्फी घेण्याच्या नादात काही तरुण मुलं बोट उलटून त्यात मृत्युमुखी पडली. फार दुर्दैवी. सगळ्यांसाठी एक अलार्मिंग सिग्नल म्हणावा अशी गोष्ट आहे ही. यानिमित्ताने एका चॅनेलवर झालेल्या चर्चेत मी सहभागी झाले होते. हिरीरीने माझी मतं मांडली. “कुठलीच टेक्नोलॉजी ही वाईट नसते. ‘सेल्फी’च काय, पण कुठल्याही टेक्नोलॉजीचा अतिरेक करणं हे वाईटच. प्रत्येकाने आपल्यापुरती लक्ष्मणरेषा पाळलीच पाहिजे,” हे सगळं अगदी मनापासून आणि ठासून सांगितलं मी.
आज जिममध्ये एक नवा धडा मिळाला. सायकलिंग करता करता मी गाणी ऐकत होते. तेवढ्यात तिथे आमचे परुळेकर सर आले. आणि गोड शब्दात ओरडलेच मला. मला म्हणाले, की  “आपल्या जिममध्ये टी.व्ही. आहे, उत्तम अशी महागडी म्युझिक सिस्टीम आहे. पण मी ती बंद ठेवतो. व्यायाम करताना तुम्हाला म्युझिक कशासाठी लागतं? तुम्ही नुसता केल्यासारखा व्यायाम करता खरा. पण तुम्ही तुमच्या शरीराचं म्हणणं ऐकतच नाही. लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट.. अहो हेसुद्धा एक प्रकारचं मेडीटेशनच आहे. पूर्ण फोकस त्यावर करून पहा. इथे आहात तोवर ही बाहेरची गाणी-बिणी काही काही नको. शंभर टक्के इथे राहून पहा बरं! बघा तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स कुठच्या कुठे असतील.”
हा विचारच केला नव्हता मी कधीच. या अशा पद्धतीने. मला गाणी ऐकायला खूप आवडतात. सतत आसपास ती सुरु लागतात. पण ही आवड कुठेतरी माझा शांतपणाच व्यापून टाकते आहे की काय असं पहिल्यांदाच वाटलं मला.. गाडी चालवताना, इस्त्रीचे कपडे टाकायला जाताना, भाजी चिरताना, फोडणी करताना, पुस्तक वाचताना, लेख लिहिताना .. इतकंच काय, पण अंघोळ करताना, झोपताना.. सगळीकडे सतत.. सतत.. एक आवाज सोबत लागतो. का? आज सरांनी ही गोष्ट दाखवून दिल्यानंतर मला अचानक लख्ख जाणवलं. यामध्ये कोणत्याच एका गोष्टीला पूर्ण न्याय देताच नाही आपण! ना भाजी चिरण्याला, ना पुस्तक वाचण्याला, आणि ना धड गाणं ऐकण्याला. सगळंच अर्धंमुर्ध. कोणत्याही एका गोष्टीवर मन स्थिर करायला किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला. मागे एकदा योगाच्या क्लासमध्ये तिथल्या बाईंनी शवासन करताना दिलेल्या ‘शिथीssssssल करा…’ या सूचना आठवल्या. शरीराचा एकेक स्नायू पुसट होत गेल्याची आठवण सरसरून जागी झाली. आणि तो अनुभव गेल्या कित्येक वर्षात आपण घ्यायचेच विसरलोयत, हेही लक्षात आलं.
आणि जाणवून गेली ती कमालीची अस्थिरता. लक्षात आलं, की हे फक्त माझ्यासोबत नाही घडते. माझ्या आसपासच्या सगळ्यांची हीच स्थिती आहे. ‘अचपळ मन माझे नावरे आवरीता!” असंख्य विचारांची भाऊगर्दी.  सतत ‘काहीतरी’ गाठायचं असणं! आणि ते नेमकं ‘काय’ आहे, हे माहितीच नसणं. नातेसंबंध, गुंतागुंत, वाढती टेन्शन्स… आणि हरवून, निसटून चाललेली शांतता. ती नेमकी आपल्याला नको असते, कारण आपल्याला ती मूलभूत प्रश्न पाडते. चुका दाखवते. फटकारते. हे टाळायला ही गोंधळाची पळवाट बरी वाटते. आणि मग आपण ती जगण्याची पद्धत म्हणूनच आपलीशी करतो. स्वीकारून टाकतो.
पण मी मात्र आता बदलायचं ठरवलंय. त्या वेळेला ‘ते’ कामच मनापासून करायचं ठरवलंय. या गोंधळी आव्हानाचा सामना मी करणार आहे. माझी खात्री आहे. ‘लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट’ हा परुळेकर सरांचा मंत्र मला नक्की लाभेल..!

– स्पृहा जोशी 

शहरांची मेरिट लिस्ट

आतापर्यंत उच्च माध्यामिक परीक्षा, मेडिकल, आयआयटी इत्यादि अभ्यासक्रमांत प्रवेश देण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि यशस्वी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टही जाहीर केली जाते. भारतात किमान शंभर तरी शहरे स्मार्ट असली पाहिजे अशी कल्पना गेल्या काही वर्षांपासून मांडण्यात येत होती. मुंबईचे सिंगापूर किंवा शांघाय करण्याची कल्पना त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार ह्यांनी मांडली तेव्हा त्यांची भाजपादि पक्षांनी टवाळी केली होती. मुंबई परप्रांतियांच्या लोंढ्यामुळे त्रस्त झाली होती. उद्योगव्यापारासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वसंतराव नाईक ह्यांच्या काळात मुंबईतील नरिमन पाँईंटलगतचा समुद्र बुजवून जमीन करण्याचा प्रयोग धूमधडाक्याने राबवण्यात आला होता. त्याच सुमारास मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी नाईक सरकारने जुळ्या मुंबईचा प्रस्ताव ठेवला. मुंबईचे जुळे शहरदेखील आधीच्या मुंबईप्रमाणे घाणेरडे शहर राहणार, अशी शंका नागरिकांच्या मनात आली. त्यातून सरकारवर टीका सुरू झाली. म्हणून जुळी मुंबई नाव बदलून नवी मुंबई करण्यात आले. परंतु नाव बदलले तरी नव्या मुंबईचे वय जसे वाढत गेले तशी तिची चेहरेपट्टीही मूळ मुंबईच्या चेहरेपट्टीशी मिळतीजुळती दिसू लागली. फक्त नव्या इमारती आणि मलनिस्सारण व्यवस्था सोडल्यास नवी मुंबई फारशी वेगळी नाहीच. गर्दी आणि मुंबई ह्यांचे जे अविभाज्य नाते. ते नाते नव्या मुंबईतही कायम राहिले.
आता 20 शहरांचे स्मार्ट शहरांत रूपान्तर करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू ह्यांनी केली आहे. त्यांची घोषणा स्वागतार्ह अशासाठी की ज्या शहरांचे स्मार्ट शहरात रूपान्तर करण्याची घोषणा नायडूंनी केली त्या शहरांची निवड वशिलेबाजीने न करता काही निकषांवर करण्यात आली. स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज मागवतात तसे स्मार्ट शहराची निवड करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले. केंद्र सरकारच्या 12 सचिवांनी एकत्र बसून स्मार्ट शहराचा प्रस्ताव राबवण्यासाठी पहिल्या वीस शहरांची निवड केली. केंद्राला एकूण शंभर शहरांचे रूपान्तर स्मार्ट शहरात करायचे आहे. सुरूवातीला 20 नंतर दुस-या टप्प्यात 40 आणि तिस-या टप्प्यात 40 शहरे निवडायची आहेत. स्मार्ट शहरे निवडण्यासाठी केंद्र सरकारने निकष निश्चित केले होते. अर्थात ते करणेच भाग आहे. कारण केंद्राकडून स्मार्ट शहराला 500 कोटी रुपये दिले जाणार आहेत. स्मार्ट शहर प्रकल्पासाठी त्या शहरांच्या पालिकांनी, राज्य सरकारांनीही काही रक्कम उभारायची आहे.
पूर्वानुभव लक्षात घेता स्मार्ट शहर योजनेचा बट्ट्याबोळ होण्याची भीती नाकारता येणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी खेड्यांना खर्चाच्या नव्वद टक्के रक्कम देऊ केली होती. उरलेली 10 टक्के रक्कम त्या त्या खेड्याने उभी करावी अशी अपेक्षा होती. परंतु अनेक खेड्यांनी वशिले लावून ती 10 टक्के रक्कमही राज्य सरकारकडून उपटली. भरपूर पैसा खर्च होऊनही ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची अवस्था केविलवाणी आहे. अनेक गांवांना आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अकोला, जळगाव ह्यासारख्या शहरात रोज पाणीपुरवठा केला जात नाही. अकोला शहरात आठवड्यातून एकदा तर जळगाव शहरात दोन दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. बहुतेक सर्व राज्यात शहरी भागात पाणीपुरवठ्याची अवस्था लाजिरवाणी आहे. मोठे फ्लॅट, रो हाऊस वगैरे भपकेदार वास्तूत राहणा-या माणसांना पाण्याच्या टँकरची वाट पहावी लागते हे चित्र अनेक शहरात सर्रास पाहायला मिळते. बाजारपेठात जाण्यासाठी वाहने लांब कुठेतरी सोडून रस्त्यावरील दुकाने चुकवून अनेक शहरात तंगड्यातोड करावी लागते.
महाराष्ट्राचे नशिब थोर म्हणून पुणे आणि सोलापूर शहराचा पहिल्या विसाच्या मेरिटलिस्टमध्ये नंबर लागला आहे.  ह्या दोन्ही शहरांना स्मार्ट करण्यासाठी केंद्राकडून प्रत्येकी 500 कोटी रुपये मिळणार असून पाच वर्षांच्या काळात शहरे स्मार्ट करण्याची अट आहे. अलीकडे खर्चाचे प्रमाण पाहता 500 कोटी रूपयांत ही शहरे स्मार्ट होणार नाहीत हे उघड आहे. राज्याची मदत गृहित धरली तरी दोन्ही शहरांना स्वतःचा पैसा खर्च करावाच लागणार आहे. इथेच खरी मेख आहे. पाहिजे तितकी रक्कम उभी करता आली नाही तर ह्या पालिका सरकारकडे पुन्हा हात पसरायला मोकळ्या! म्हणजेच हातात रक्कम पडेपर्यंत शहरांचा नट्टापट्टा थांबणार!  शहर कोणतेही असो,  काम अर्धवट सोडून काढता पाय घेणा-या कंत्राटदारांची कमी नाही. पुणे आणि सोलापूर त्याला अपवाद नाही. पुणे तिथे काय उणे असे पुणेकर भेटेल त्याला सांगत फिरतात. आता पुणेकरांच्या उक्तीची कसोटी लागण्याची वेळ आली आहे. सोलापूर हे शहर तर फार काळापासून बकाल म्हणून प्रसिद्धच आहे. टॉवेल आणि चादरी तयार करण्यात सोलापूरचा भारतात पहिला क्रमांक आहे. तरीही मंदीचे रडगाणे न गाणारा एकही चादर उत्पादकह्या शहरात तुम्हाला भेटणार नाही. पुणे आणि सोलापूर शहरांच्या महापालिका सधन नाहीत असे मुळीच नाही. त्यांनी मनावर घेतले असते तर त्यांना शहर कितीतरी वर्षांपूर्वीच सुंदर करता आले असते.
घरपट्टी आणि पाणीपट्टी तसेच जकात ह्याखेरीज राज्यातल्या 20-22 महापालिकांना उत्पन्नाचे अन्य साधन नाही हे मान्य. परंतु मुंबईच्या बेस्टचा पॅटर्न लक्षात घेऊन त्यांना वीजवितरण सेवेतून थोडाफार पैसा मिळवता आला असता. तरीही राज्यभरातल्या महापालिकांचे उत्पन्न अलीकडे कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे हे विसरून चालणार नाही. उत्पन्नापैकी किती रक्कम शहर विकासासाठी खर्च होते आणि किती मेंबरांच्या घशात जाते ह्याची चौकशी करण्याची गरज नाही. इतकी वर्षे झाली तरी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असलेली सार्वजनिक इस्पितळे, भरवशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सुंदर गुळगुळीत रूंद रस्ते, वाहनतळे, थीम पार्क, टकाटक बाजारपेठा, शाळा, मैदाने, स्टेडियम हे सगळे ज्या शहरात यथायोग्य आहेत अशी शहरे शोधावी लागतील! ह्या उलट, सर्वाधिक घाणेरडे शहर कोणते ह्याची स्पर्धा लावल्यास सर्वच शहरांचा विजेत्याच्या यादीत समावेश करावा लागेल!
गेल्या तीस वर्षांत ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोंढे सुरू झाले. शहरीकरणास तुफान वेग आला. आधी बकालपणात आणि नंतर झोपडपट्ट्यात बेसुमार वाढ झाली. शहरे गलिच्छ होत गेली. ग्रामीण भागात रोजगार नाही हे खरेच आहे; त्याखेरीज पिण्याचे पाणी नाही की शिक्षणाची सोय नाही. म्हणूनही खेड्यातून शहरांकडे धाव घेण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे नागरी सोयी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीवर ताण पडला, असा युक्तिवाद सातत्याने केला गेला. त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही, पण बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले ते राज्यकर्त्यांनीच!  चुकार आणि भ्रष्ट अधिका-यांकडे काणाडोळा कोणी केला? मैदाने कोणी लाटली?  भ्रष्ट राजकारण्यांना चाप लावण्याऐवजी एकमेकांना वाचवण्यासाठी मांडवली कुणी केली? पालिकेच्या राजकारणात आणि अर्थकारणात मिलीभगत असून पक्ष विभागणी नावापुरतीच आहे हे खुले गुपित आहे. पालिकेच्या भ्रष्ट राजकारणात सारे सामील आहेत हे आता सगळ्यांना माहित आहे. राज्यकर्त्यांवर स्मार्ट शहरांची घोषणा करण्याची पाळी का आली ह्या प्रश्नाचे उत्तर कठीण नाही. झाले गेले विसरून जाणे शहाणपणाचे असते. मागे काहीही घडले असले तरी शहरे सुधारण्याचा आणखी एक जोरकस प्रयत्न म्हणून तरी स्मार्ट सिटीच्या घोषणेचे स्वागत केले पाहिजे.

रमेश झवर
www.rameshzawar.com

लॉटरी!

अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स!  लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट घरात यायचं. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणूया असा बेत करुन टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की  शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही  लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची  कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स  असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी मिळणारी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची.  अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. प्रत्येक ठीकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही  कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वांना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या गेल्याच.  अशीच एक घडली २००५ साली. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि  जवळजवळ २० मिलियन डॉलर्सही या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली त्यातील फार कमी जणांनी ती खर्‍या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण – तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्यां असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र – मैत्रीणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवर्‍याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारुकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने  नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगाराचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून  हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला  ते केलीला समजलंही नाही. मित्र – मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरुन आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र – मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या.  त्यातच दोघींनी आपला जीव गमावला.  सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष  सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही  लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद – विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजंही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला.  बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं.  थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही ह्याचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर… हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

पूर्वप्रसिद्ध – लोकसत्ता – चतुरंग पुरवणी – http://www.loksatta.com/lekh-news/lottery-1192070/

रणातला जनमेजय आणि इतर… १

जनमेजय
जनमेजयानं प्रस्थान ठेवलं. मनात ते सकाळपासूनच ठेवावं लागे. रात्रभर ते ठेवण्याच्या विचाराने अनेकदा जाग यायची, दचकून. तशी ती अनेक कारणांनी यायची अनेकदा. आकृतीताईचा पुरू, आठ वर्षाचा, गगनग्रास सहनिवासातच जास्त रमणारा, रात्रभर लोळ लोळ लोळे सर्वभर आणि पेकाटात लाथ हाणत राही. रात्रभर. तो नसेल तर विभूतीताईची शर्मिष्ठा, सहा वर्षाची, झोप झोप झोपत नसे रात्रभर. तीही इथेच रमणारी. ती चुकून झोपलेली असेल तर समीक्षाताई पुण्याहून आलेली असे. तिच्या जुळयांना घेऊन चार वर्षाच्या. त्याना बघायला, त्यांच्या लीलांचं कौतुक करायला आख्खा गगनग्रास सहनिवास लोटे. रात्रभर. किंवा मग बाळंतीण मीमांसाताईचं तान्हंबाळ असेच. रात्रभर. काहीच नसेल रात्रभर तर मग समिधाताईचं मित्रमंडळ असे ख्या ख्या करत हॉलमधे.

जवळजवळ रात्रभर. किंवा मग किचनमधे माधवस्वामी आणि कृपामाई- जनमेजयाचे जन्मदाते-समिधाच्या लग्नासकट कुठल्या न कुठल्या विषयाचा खल करत बसत. पहाटेपर्यंत. किंवा मग जनमेजयालाच झोप लागत नसे. उगाचच. पहाटेपर्यंत. पहाटे डोळा लागावा मस्त आणि ओटीपोटात हुरहूर सुरू व्हावी सुखद, आणखी खाली सरकणारी, तर दचकून जाग यावी प्रस्थान ठेवण्याच्या विचाराने. तर असं हे प्रस्थान.
सकाळी सकाळ झाली म्हणून मनातल्या मनात ते ठेऊन तो उठला तर त्याला कळलंच नाही आधी कुठल्या दिशेनं जावं. मग ते ध्यानात येतंय तर वाट सापडेना बाहेर पडायची. समिधाताईच्या मित्रमंडळींपैकी कुणीतरी, आकृतीताईचा नवरा, मीमांसाताईचा दीर, वरच्या चुलत चुलत गगनग्रासांकडचे पाहुणे अशी जनता आडवीतिडवी पसरलेली. नेहेमीप्रमाणे. बेसिनपर्यंत जातोय तर ब्रश कुणीतरी पळवलेला.  नेहेमीसारखा.  आंघोळीसाठी स्वतःचा टॉवेल शोधतोय तर तो आधीच ओलागिच्च. नेहमीच्या प्रथेप्रमाणे. चहाची वाट बघतोय तर आई योगाच्या क्लासला. आणि नाश्त्याचं बघावं तर विभूतीताई आंघोळीला आणि आता कुठे झोपेला आलेली शर्मिष्ठा याच्या कडेवर. अशी जनमेजयाची अवस्था. त्या धबडग्यात पोटात कळ. संडासात आधीच गेलेला. जाणार असणारा. त्यांच्यामधूनच तीर मारणारा भलता. असं करत करत करत शॉवरचे चार शिंतोडे अंगावर घेऊन तो पुन्हा बेडरूममधे येतोय तर दारातच आकृतीताईच्या सौभाग्याने तंगडया दोन दिशांना पसरवलेल्या. स्वतःच्या घरी असल्यासारखं खाजवणं. आकृतीताईचा प्रेमविवाह. ती पदवीधर होऊनही बुध्दिनं शालेयच राहिलेली. तिचा कथाकथनाचा चमू. त्याच्या ध्वनिफिती काढून विकणं हा सौभाग्याचा प्रमुख व्यवसाय. त्याच्या दोन टांगांवरून खापरी खापरी करत, मीमांसाताईचा दीर, समिधाताईचा मित्र नं.१ यांचे हातपाय चुकवत जनमेजय कपडयांच्या कपाटाजवळ आला. ते उघडल्यावर खरी कर्तबगारी होती. पँटशर्ट अमाप होते. ताया सगळया या ना त्या कारणाने तेच देत. ते प्रमाणाबाहेर वाढले की आई त्याचे पैसे घेई. हल्ली कपडयांवर भांडे मिळायचे बंद झाले होते. कर्तबगारी पुढे होती. पुढचं शोधण्यात. टयूब लावायला बंदी. अंधुक उजेडात, कपडयांच्या कपाटात, माझी कुठली आणि कुणाकुणाची कुठली? गोष्ट छोटी मुद्दा गौण पण हातात आली ती घातली आणि चालला असं एकदोनदा झालं तेव्हा रात्रीपर्यंत कोण पंचाईत झाली. आपल्या दोन टांगांमधला टॉवेल अर्धवट पकडत अर्धवट सोडत तो हातात आलेल्या- ती आपलीच आहे याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत- तिच्याशी झटापट करू लागला. भेलकांडू लागला. पुन्हा सावरू लागला. ते करत असताना पुन्हा पुन्हा त्याचं लक्ष दारात पसरलेल्या त्या आडदांड तंगड्यांकडे, हापपँटीतल्या, उगीचच जात राहिलं. सुखी माणसाची हापपँट अशी असते. आडदांड तंगड्यांवर चढलेली. काळ्या. मागे बुधबृहस्पती पुढे प्रजापती. एवढंच कर्तृत्व. हा विचार आला म्हणून जनमेजयाला कसंतरीच वाटलं मनात. लोखंडी कपड्याच्या कपाटावर हात हलके ठेवून दार बंद करताना अंगावर चरा उमटवणारं त्याचं कुरकुरणं दाबून टाकत त्यानं या विचाराचं प्रायश्चित्त घेतलं. तोपर्यंत त्या अंधुक उजेडात कुणीतरी धडपडत उठला. मीमांसाताईचा दीर किंवा समिधाताईचा मित्र नं.२ किंवा आणखी कुणीतरी. अंधारात सगळे सारखेच. अंधारात म्हणजे अंधुक उजेडात. तर तो उठला. घड्याळात बघितलं. सुटला तो उलट्याच दिशेने. जनमेजयाला आडवा. दोघांच्या आट्यापाट्या. नंतर त्याला योग्य दिशा सापडणं. मागोमाग जनमेजयालाही. जनमेजय थोडा थबकलेला. किचनमधे जावं की सरळ बाहेरच पडावं आता. आईचा योगा म्हणजे बाहेरच पडावं. बा- बाहेर- ही निजलेले- या बहुतेक निजलेल्या. समिधाताईचा चमू. जरा जपूनच उड्या मारल्या नाहीत तर थेट विनयभंग. टींग- टॉंग- टींग- आलंच कुणीतरी- अजून?- जनमेजयानं दार उघडलं. दारात माधवस्वामी- जन्मदाते आणि त्यांचे बैठकीतले मित्र. पीजे. आता एकापाठोपाठ. हं! सुरू… असं जनमेजय मनात म्हणाला आणि माधवस्वामींच्या दोस्तांनी जनमेजयाला समोर बघताच त्याचं नाव, त्याचं वय, घरातलं स्थान, क्रम, त्याचं वागणं, रहाणं सगळ्यावर विनोद सुरु केले. त्याची वाट अडवून. पूर्वाश्रमीचे स्वयंसेवक आता आपला वेगळा गट बनवून प्रात:बैठका घेणारे. बरेचसे एका उपासना ट्रस्टचे विश्वस्त. आपल्या बहुमूल्य मताला धार्मिक आधार असणारे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. त्यांच्या अध्यात्मिक विनोदातून फिल्टर होऊन जनमेजय सदनिकेबाहेर पाय ठेवतोय तर कानांवर जन्मदात्याचा खाकरा आवाज, आरे… लवकर ये आज! बंड्या- मग दोस्तांकडे नजर जाऊन माधवस्वामी कंटिन्यू- बंडू रे- आज बंडू गगनग्रासाच्या मुलीला पहायला येणारेत… हा बंड्या गगनग्रास म्हणजे नक्की कोण? चुलत चुलत चुलता की- याचा शोध एकदा घेतलाच पाहिजे- हा बंड्या तर मग तो- नाही नाही- तड लावलीच पाहिजे- असं मनाला समजावत आणि मानेने जन्मदात्याला होकार भरत तो टणाटण गगनग्रास सहनिवासाच्या पायर्‍या उतरु लागला. वाटेत अनेक गगनग्रास किंवा इथून तिथून गगनग्रास, मागावर असल्यासारखे किंवा वाट अडवल्यासारखे- तेच चुलत चुलत इत्यादी- त्याना चुकवत, हुलकावत, वेळच तशी, सगळ्यानाच घाई, कामवाल्यांना, चुकारांना, बेकारांना आणि रिकामांनाही. तड जनमेजयाला आत्ताच लावता आली असती हा रवि आणि हा जयद्रथ करुन. कुठला गगनग्रास नक्की कुठला याची. कारण सगळे याच वेळी एकमेकाला आडवेतिडवे होणारे. पण घडाळ्याचे काटे जनमेजयाच्या पार्श्वभागी रुतत तरी होते, घुसत होते किंवा पार्श्वभाग ते बडवून तरी काढत होते. नेहेमीप्रमाणे. तो रस्त्यावर उघडणार्‍या मुख्य फाटकाजवळ थडकला त्यांचा मार खात- गगनग्रासांचा आणि काट्यांचा- आणि थबकला…
क्रमश:

Swarna Bharat Party launches new website on Republic Day

Swarna Bharat Party (SBP), India’s only liberal party, congratulates everyone on the auspicious occasion of the Republic Day, when India’s liberal constitution came into effect in 1950.  
Today we must all pledge ourselves to the key objective of liberty that is embedded in the Preamble of India’s constitution. It is the reason we wanted freedom from British rule – so we could live our lives as a free people. But unfortunately, the idea of liberty has long since been destroyed by successive governments in India. Today, India is one of the most unfree nations in the world on almost all comparative benchmarks.
SBP is committed to your liberty and prosperity. SBP believes that India’s colonial governance arrangements, weakened further by socialist policies, have dramatically exacerbated corruption and inefficiency in government. We no longer have basic things like security, property rights and justice.  
SBP is committed to the total reform of India’s governance system, as detailed in its manifesto. No other party has any idea of the reforms India needs in order to become – once again – the greatest nation on earth.
SBP was registered by the Election Commission as a political party in mid-2014. We are launching our new website today. Please visit http://swarnabharat.in
We invite you to join the party. Please visit the website and register either as a member or volunteer. You can become a lifetime member on payment of a nominal fee of Rs.100. Please also donate liberally to the cause of liberty and good governance in India. 
SBP is your party, your platform to fight for your freedom and to transform India’s governance.

Swarna Bharat Party launches new website on Republic Day

Swarna Bharat Party (SBP), India’s only liberal party, congratulates everyone on the auspicious occasion of the Republic Day, when India’s liberal constitution came into effect in 1950.  
Today we must all pledge ourselves to the key objective of liberty that is embedded in the Preamble of India’s constitution. It is the reason we wanted freedom from British rule – so we could live our lives as a free people. But unfortunately, the idea of liberty has long since been destroyed by successive governments in India. Today, India is one of the most unfree nations in the world on almost all comparative benchmarks.
SBP is committed to your liberty and prosperity. SBP believes that India’s colonial governance arrangements, weakened further by socialist policies, have dramatically exacerbated corruption and inefficiency in government. We no longer have basic things like security, property rights and justice.  
SBP is committed to the total reform of India’s governance system, as detailed in its manifesto. No other party has any idea of the reforms India needs in order to become – once again – the greatest nation on earth.
SBP was registered by the Election Commission as a political party in mid-2014. We are launching our new website today. Please visit http://swarnabharat.in.
We invite you to join the party. Please visit the website and register either as a member or volunteer. You can become a lifetime member on payment of a nominal fee of Rs.100. Please also donate liberally to the cause of liberty and good governance in India. 
SBP is your party, your platform to fight for your freedom and to transform India’s governance.

साकव…प्रेम टु फ्रेम

२४ जानेवारी २०१६  च्या ’प्रहार’ या वृतपत्रात “फ्रेम टु फ्रेम’ या सदरात
 मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले आहेत.

                                                              साकव…प्रेम टु फ्रेम <= येथे क्लिक करावे.

‘तारतम्य’कार

डॉ. अरुण टिकेकर ‘लोकसत्ता’चे संपादक झाले, तेव्हा त्यांनी ‘नि:पक्ष, उदारमतवादी’ (त्यांचा मूळ शब्द- नॉन कॉन्फर्मिस्ट, लिबरल) असं आपलं धोरण जाहीर केलं होतं, आणि ते त्यांनी आपल्या एक दशकाहून अधिकच्या संपादकीय कारकिर्दीत कसोशीनं पाळलं. खरं म्हणजे महाराष्ट्रातील पत्रकारिता ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून ध्येयवादी राहिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशहित मागे पडून समाजहित हा मराठी पत्रकारितेचा स्थायीभाव व्हायला हवा होता, पण स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांशी संपादक हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ध्येयवादी पत्रकारितेला आदर्श मानणारे होते. किंबहुना तेव्हापासूनच कार्यरत असलेले होते. त्यात स्वतंत्र भारताची उभारणी, देशाची राज्यघटना, पं. नेहरू यांच्यासारखा आदर्शवादी पंतप्रधान आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी वर्तमानपत्रांतील संपादकांपासून वरिष्ठ सहकाऱ्यांपर्यंत अनेकांची विविध राजकीय विचारधारांशी असलेली बांधीलकी, यामुळे सुरुवातीची १५-२० वर्षं ही भारलेली होती. त्या आदर्शवादाला पहिला धक्का बसला तो आणीबाणीने.
या आणीबाणीने भारतीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोतही बदलला. खरं म्हणजे साठचं दशक हे एकोणिसाव्या शतकाइतकं नसलं तरी साहित्य, राजकारण, समाजकारण, धर्मचिकित्सा, सामाजिक सुधारणा, यांच्यामुळे एका नव्या पुनरुत्थानाचं होऊ पाहत होतं. महाराष्ट्र राज्य साहित्यातल्या नवकथेपासून म्हैसाळमधील दलितमुक्तीच्या प्रयोगांपर्यंत अनेक सुधारणांचं आगार बनलं होतं.
हे एका अर्थाने समाजप्रबोधनाचं दुसरं पर्व होतं, पण पाहता पाहता दोन दशकांत साहित्यातल्या नवप्रवाहांपासून सामाजिक संस्थांच्या स्वरूपांपर्यंत सगळीकडे साचलेपण येत गेलं आणि समाजप्रबोधनाची, समाजहिताची भूमिका मागे पडत जाऊन ‘मी, माझं, मला’ हा विचार बळावत गेला. राजकीय नेतृत्वापासून साहित्यिक धुरिणांपर्यंत अनेक क्षेत्रांतील ‘लोकहितवादी लीडरशिप’ एकाच वेळी मागे पडत, निष्प्रभ होत गेली. सर्व क्षेत्रांतील मान्यवरांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि मननाचा केंद्रबिंदू आक्रसत गेला.
 असं का झालं, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यामुळे आता त्याच्या तपशिलात जायला नको.
पण ही उलटी गंगा थांबवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असं नाही. उलट दलित पँथर, लघुनियतकालिकांची चळवळ, शरद जोशींची शेतकरी संघटना, सुरुवातीची शिवसेना, एक गाव एक पाणवठा, अशा अनेक लहान-मोठ्या चळवळींनी या उलट्या गंगेला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने या साऱ्या प्रयोगांचं यश हे मर्यादितच राहिलं. त्यामुळे विचार पिछाडीवर आणि मतलब आघाडीवर येत गेला.
राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर यांनी आणीबाणी ही भारतातील सर्व संस्थात्मक पातळीवरील अपयशाचा परिपाक होती, असं विश्लेषण केलं आहे. पुरोगामी, सुधारणावादी आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राची ७०-८० या दोन दशकांतील अवनती हीसुद्धा राज्यातील सर्व पातळ्यांवरील अपयशाचाच परिपाक म्हणावा लागेल.
ऐंशीचं दशक संपलं आणि नव्वदचं सुरू झालं. टिळकांनंतर गांधींचं नेतृत्व मान्य करायला महाराष्ट्रानं जवळपास नकारच दिला होता, पण काळाच्या दबावापुढे महाराष्ट्रातील टिळक प्रभूतींचं काही चाललं नाही. मात्र, या ‘विरोधासाठी विरोध’ पद्धतीच्या राजकारणात या धुरिणांनी आपलं आणि महाराष्ट्राचं नुकसान करून घेतलं. नव्वदच्या दशकात आलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाबाबतही अशीच आडमुठी भूमिका घेऊन महाराष्ट्रातील साहित्यिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी महाराष्ट्राचं पुन्हा एकदा एक प्रकारे नुकसानच केलं.
जुलै १९९१ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरणाची/जागतिकीकरणाची द्वाही फिरवणारं अर्थसंकल्पीय भाषण करून त्याच्या अंमलबजावणीला देशात सुरुवात केली. तेव्हा महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. अभिजनांचं नेतृत्व करणारे ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंदराव तळवलकर निवृत्त होण्याच्या मार्गावर होते आणि त्यांची अभिजात, ध्येयवादी पत्रकारिताही. तळवलकरांच्या अभिजन पत्रकारितेला शह देणारी माधव गडकरी यांची ‘लोकसत्ता’मधील नको इतकी लोकाभिमुख पत्रकारिताही काहीशी ओहोटीला लागली होती.
जागतिकीकारणाने देशासह महाराष्ट्रातही प्रचंड घुसळणीला सुरुवात केलेली असताना अनपेक्षितपणे डॉ. अरुण टिकेकर ‘लोकमान्य, लोकशक्ती’ असलेल्या ‘लोकसत्ता’चे सप्टेंबर १९९१मध्ये संपादक झाले आणि त्यांनी ‘लोकसत्ता’चा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. (१९९५ मध्ये कुमार केतकर ‘मटा’चे संपादक झाले आणि या दोन दूरदृष्टीच्या संपादकांनी मराठी पत्रकारितेला कालानुरूप नवा साज चढवायला सुरुवात केली. केतकर डाव्या चळवळीतून आणि इंग्रजी पत्रकारितेतून आलेले आणि टिकेकर पत्रकारितेचा तीन पिढ्यांचा वारसा लाभलेले, पण पत्रकारितेऐवजी संशोधन-अध्यापन या क्षेत्रात रमलेले. त्यांच्यातील साम्य आणि फरक हाही स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने तूर्त इथेच थांबू.) टिकेकरांनी ‘लोकसत्ता’च्या संपादकपदाची १० वर्षं पूर्ण केली, तेव्हा प्रदीप कर्णिक यांनी “लोकसत्ता’मधील अरुणोदय’ या शीर्षकाचा लेख एका दिवाळी अंकात लिहिला होता. (तत्पूर्वी शशिकांत सावंत यांनी १९९६ साली कुमार केतकरांविषयी ‘‘मटा’तील झंझावात’ असा लेख दुसऱ्या एका दिवाळी अंकात लिहिला होता.)⁠⁠⁠⁠ असो.
डिसेंबर १९९२पासून टिकेकरांनी ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीत ‘तारतम्य’ हे साप्ताहिक सदर लिहायला सुरुवात केली, त्यामागे एवढी मोठी पार्श्वभूमी होती. हे सदर सलग पाच वर्षं- म्हणजे डिसेंबर १९९७ पर्यंत चाललं. आधी काँग्रेस आणि १९९५ ते ९९ या काळातील युतीचं सरकार महाराष्ट्रात होतं. या दोन्ही पक्षांच्या ध्येयधोरणांची चिकित्सा करण्याबरोबरच टिकेकरांनी या सदरातून महाराष्ट्रातील सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ््मयीन घटना-घडामोडींचीही चिकित्सा करायला सुरुवात केली. हे सदर पाच भागांत पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्यानंतर टिकेकरांनी त्यांना ‘उद्रेक-पर्वातील महाराष्ट्राच्या मानसिकतेची मीमांसा’, ‘अस्वस्थ-वर्षातील महाराष्ट्राचे चित्रण’, ‘सत्तांतर वर्षातील महाराष्ट्राची स्थिती’, ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घसरणीचे आणखी एक वर्ष’ आणि ‘संभ्रमावस्थेतील महाराष्ट्राचे आणखी एक वर्ष’ अशी उपशीर्षकं दिली. ‘नि:पक्ष, उदारमतवादी’ अशी स्वत:ची भूमिका सांगणाऱ्या टिकेकरांनी हे सदर लिहिताना न्या. रानडे यांच्या उदारमतवादाचा वारसा सांगत आणि ‘सुधारक’कार आगरकर यांचा आरसा दाखवत महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ्मयीन चिकित्सा करताना ‘‘तारतम्य’पूर्ण विचार’ हे सूत्र समोर ठेवलं होतं. चांगल्या चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायचं ते नेमकं कशाच्या आधारे, याची साधार मांडणी केली. कुठल्याही समाजामध्ये जेव्हा प्रचंड घुसळण होत असते, तो समाज संक्रमणकाळातून जात असतो, तेव्हा त्याला आधीच्या वारशाची पुर्नओळख करून द्यावी लागते. कारण सामाजिक-सार्वजनिक नीतीमत्ता ही नेहमी परंपरा, आदर्श आणि प्रेरणा यांच्या बळावर निर्माण होत असते. अनेक सुशिक्षित, विचारी महाराष्ट्रीयांच्या मनातलं किंबहुना त्यांना जे जाणवतं आहे, पण नीट शब्दांत सांगता येत नाही, ते टिकेकरांनी अचूकपणे सांगायला सुरुवात केली आणि तेही ‘तारतम्या’ने. त्यामुळे पुलं-सुनीता देशपांडे यांनी बंद केलेला ‘लोकसत्ता’ पुन्हा ‘तारतम्य’ वाचण्यासाठी सुरू केला. टिकेकरांची भाषा प्रगल्भ, सामान्य भाषेत सांगायचे तर, विद्वत्जड; पण तरीही त्यांचं ‘तारतम्य’ अल्पावधीतच लोकप्रिय झालं. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, चुकूनही अभिनिवेश न आणता, आक्रस्ताळेपणा न करता आणि शेरेबाजीच्या तर अनवधानानेही वाटेला न जाता, टिकेकरांनी शांत, संयमी पण परखडपणे रानडे-आगरकरी बुद्धिवाद प्रमाण मानत लेखन केलं. त्यामुळे ते ज्यांच्यावर टीका करत त्यांनाही त्यांची मांडणी फारशी खोडून काढता आली नाही. शिवाय नि:पक्ष आणि उदारमतवादामुळे कुठल्याच राजकीय विचारधारेची, पक्षाची, व्यक्ती-संघटनांची बाजू कधीही त्यांनी घेतली नाही. सच्च्या बुद्धिवाद्याला या गोष्टींचं पथ्य सांभाळावंच लागतं. टिकेकर त्यात तसूभरही कमी पडले नाहीत. त्यामुळे ‘तारतम्यकार’ अशी टिकेकरांची ओळख महाराष्ट्रातील सुशिक्षितांमध्ये निर्माण झाली. टिकेकरांनी एकप्रकारे या सदराच्या माध्यमातून ‘तारतम्यपूर्ण विचार’ कसा करावा याचा वस्तुपाठच घालून दिला.
पाच वर्षांनंतर ‘तारतम्य’ हे सदर टिकेकरांनी जाणीवपूर्वक बंद केलं. कारण आपल्या लेखनामध्ये तोचतोचपणा येऊ लागला, असं त्यांना वाटलं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९९९मध्ये त्यांनी ‘सारांश’ हे नवं साप्ताहिक सदर ‘लोकरंग’मध्ये लिहायला सुरुवात केली. साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झालेल्या या सदराचं २००१मध्ये पुस्तक निघालं, तेव्हा त्याला टिकेकरांनी उपशीर्षक दिलं – ‘समकालीन समाजाच्या संस्कृतीविषयी सात निबंध’. आणि सर्व लेखांची सात दीर्घ निबंधांमध्ये विभागणी करून त्यांनी हे सदर किती अभ्यासपूर्वक लिहिलं होतं, याची जाणीव करून दिली. ‘नेतृत्वाचे प्रशिक्षण’, ‘इतिहासाचे ओझे’, ‘साहित्याचे समाजशास्त्र’, ‘अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे राजकारण’, ‘संस्कृतीचा अपकर्ष’, ‘जीवनशैलीचा अभाव’ आणि ‘समाजमनाचे अस्वास्थ्य’ या सात निबंधांतून टिकेकरांनी महाराष्ट्राच्या अवनतीची कारणपरंपरा विशद केली. २००० हे विसाव्या शतकातलं शेवटचं वर्ष. तेव्हा या वर्षात टिकेकरांनी वर्षभर ‘कालमीमांसा’ या नावानं पुन्हा साप्ताहिक सदर लिहून ‘गेल्या दोनशे वर्षांतील सामाजिक बदलांची गती, त्या बदलांचे गतिरोधक ठरलेल्या प्रवृत्ती, त्या प्रवृत्ती बळावण्याची कारणं, त्या कारणांमागील राजकीय व अन्य प्रकारची गुंतागुंत’ यांची मीमांसा केली. म्हणजे ‘सारांश’ आणि ‘कालमीमांसा’ ही दोन्ही सदरं परस्परपूरक होती. त्यात त्यांनी महाराष्ट्रीय समाजाची सर्वांगीण चिकित्सा केली, एकोणिसाव्या शतकाच्या कॅनव्हॉसवर; तर आधीच्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ्मयीन या क्षेत्रांची परखड चिकित्सा केली. म्हणजे विश्लेषण, कारणपरंपरा आणि उपाययोजनांसाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी असा टिकेकरांच्या ‘तारतम्य’, ‘सारांश’ आणि ‘कालमीमांसा’ या सदरांचा गाभा आणि आवाका आहे. काही वर्षांनी निवडक ‘तारतम्य’ व निवडक अग्रलेख यांचे संग्रह ‘अस्वस्थ महाराष्ट्र- भाग १ व २’ या नावाने प्रकाशित झाले. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कालान्तर’ या पुस्तकाचं उपशीर्षक आहे -‘सामाजिक आणि सांस्कृतिक पडझडीचा आलेख’.
एकोणिसावं शतक हे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या आणि सर्व क्षेत्रांतील सुधारणांचं शतक होतं. त्यामुळे आजच्या कुठल्याही प्रश्नाकडे पाहण्यासाठी, त्याचं यथायोग्य आकलन करून घेण्यासाठी त्या शतकातल्या परंपरा, आदर्श आणि प्रेरणांशिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोनेक दशकांतच महाराष्ट्राची वैचारिक आघाडीवर आणि सर्व क्षेत्रांत पिछेहाट का होते आहे, याची साधार मांडणी टिकेकर यांनी ‘तारतम्य’, ‘सारांश’ आणि ‘कालमीमांसा’मधून केली. हे करतानाच त्यांनी आधीच्या संकल्पनांचीही पुनर्मांडणी केली. पण त्याकडे अजून कुणाचंच लक्ष गेलेलं नाही अन तोही स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
या सर्व पुस्तकांतून टिकेकरांनी काय सांगितलं?
… तर ‘तारतम्यपूर्ण विचार’ म्हणजे काय, तो कसा करायचा असतो आणि त्यासाठीच्या परंपरा, आदर्श आणि प्रेरणा काय असाव्या लागतात!  

रोहिथ वेमुला…एक मूक्त चिंतन

माहितीच्या व प्रोपागंड्यांच्या या महाविस्फोटात कोणी सत्य शोधायला जाईल तर पदरी निराशाच पडेल. प्रत्येकजण त्यामुळे हवे तेवढेच सत्य म्हणून स्विकारतो आणि आपापले अजेंडे राबवतो. त्यामुळे एकाच घटनेचे असंख्य अर्थ घेतले जातात किंवा जाणीवपुर्वक दिले जातात. आपणच काढलेला अन्वयार्थ खरा आहे असे दावे हिरीरीने शिस्तबद्ध पसरवले जातात. यातून जे संघर्ष उभे राहतात त्यातून मुख्य घटना मात्र पोरकी होऊन बसते. तिच्या मुळ कारणांचा तटस्थ शोध घेण्याच्या फंदात कोणी पडत नाही. अजून दुसरी कोणती घटना घडत नाही तोवर हे वादळ चालू राहते नि काही दिवसांत विझतेही.

रोहिथ वेमुलाचे आत्महत्या प्रकरण कितीही गंभीर असले तरी या प्रकरणाचेही हेच होत आहे असे माध्यमांतील चर्चा पाहिल्या तर स्पष्ट होते. एकीकडे आंबेडकरवादी/बहुजनवादी आक्रोशत आहेत, हे प्रकरण म्हणजे व्यवस्थेने केलेली हत्या आहे असे म्हणत आहे तर दुसरा संघवादी गट वेमुलाला देशद्रोही ठरवण्याच्या अथक प्रयत्नात आहे. त्याला बेजबाबदार, सातत्याने विचार बदलणारा अस्थिर मनोवृत्तीचा छंदी-फंदी आंबेडकरवादी म्हणून रंगवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यात पंतप्रधानांनी “भारतमातेने एक सुपुत्र गमावला…” असे विधान केले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी वेमुलाच्या प्रेताच्या साक्षीने आपापले राजकारण साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात अशी घटना घडतेच कशी याबाबत चिंतन करण्यात व असे पुन्हा कधी होनार नाही यासाठी कायमस्वरुपी व्यूहरचना करण्यात आम्ही अपेशी ठरत आहोत ही बाब पुन्हा अधोरेखित होते आहे.

मूख्य बाब म्हणजे तरुणाईचे मानसशास्त्र आम्ही समजावून घेत नाही आहोत. तरुणाई ही बंडखोर असते, रुढतेला नाकारणारी असते. तरुणाईने व्यवस्थेच्या, परंपरांच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. भारतात कोणी तरुण सावरकर-भगतसिंगांच्या क्रांतीवादी तत्वज्ञानाच्या मोहात जातो तर कोणी संघवाद, मार्क्सवाद, माओवाद व आंबेडकरवादाच्या छायेखाली जातो. गरम रक्ताच्या तरुणाईला गांधीवाद सहजी पचनी पडत नाही. भारतात तरुण कोणत्या वादाच्या आहारी जाईल हे जवळपास त्या तरुणाच्या जातीय/धार्मिक संदर्भांवर अवलंबून असते. निखळ वैचारिकतेचा पाया त्यामागे असतोच असे नाही. शिवाय ज्या महाविद्यालयात/विद्यापीठात जे जे विचारप्रवाह मजबूत असतील त्यापैकी एक तरी एखाद्याला इच्छा नसली तरी अपरिहार्यपणे स्विकारावा लागतो. एकटे पाडले जाण्याचा धोका किती तरुण पत्करू शकतात हाही अभ्यासाचा एक विषय आहे.

स्वविवेक जागा असलेले स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण या वातावरणात गोंधळून जाणे स्वाभाविक म्हणता येते. वेमुलाने आपल्या विचारधारा बदलल्या असा जो दावा केला जातो तो मुर्खपणाचा आहे. मुळात “स्वशोधाची” म्हणून जी प्रक्रिया असते त्यात “स्व” शी जवळीक साधणारे तत्वज्ञान कोणते याचा शोध घेणेही महत्वाचे बनून जाते आणि तरुणाईत तर अधिकच. खरे तर यालाच स्वातंत्र्य म्हणतात. माणसाने एकाच विचारसरणीत आयुष्यभर बंदिस्त व्हावे ही अपेक्षा करणे वेडेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मरणोत्तर वेमुलाला बदनाम करण्यासाठी त्याचे कालौघात बदललेले विचार वेठीला धरणारे मुर्ख आहेत. देशाला सुस्थितीत आणण्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवतांना एक लक्षात घ्यायला हवे कि काल जे योग्य वाटले होते त्यांनीही निराशा केली आणि आज जे योग्य वाटत आहेत तेही निराशा करत आहेत. भविष्यातले आपल्याला माहित नाही. अशा संभ्रमयूक्त राष्ट्रीय स्थितीत अनुभव्यांची जेथे पंचाईत झाली आहे तेथे जीवनाच्या प्रांगणात खुले पाऊल टाकु पाहणा-या सर्वच युवकांचे काय होत असेल याची कल्पना करुन पाहिलीच पाहिजे.

 वेमुलाने (व त्याच्या सहका-यांनी) याकुबच्या फाशीला विरोध केला म्हणून तो देशद्रोही असाही एक हिंस्त्र विचार लाटेसारखा पसरवला जात आहे. या देशात प्रत्येकाला आपले मत लोकशाही मार्गाने मांडायचा अधिकार आहे हे मात्र सोयिस्करपणे ही मंडळी विसरते. गोडसेंचे पुतळे / मंदिरे उभी करण्याची मागणी करणारे त्यांचे स्वातंत्र्य वापरत नाहीत काय? त्यांना जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य वेमुलालाही होते हे कसे विसरणार? शिवाय याकुबच्या फाशीला विरोध आणी त्याची आत्महत्या या दोन घटनांचा काय संबंध आहे? त्याची आत्महत्या ही त्याच्यासह काही विद्यार्थ्याला होस्टेलमधून काढून लावले, विद्यापीठाच्या परिसरात काही विभाग त्यांच्यासाठी बंद केले गेले, केंद्र सरकार ते विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीने आणि अभाविपने जे असह्य दबाव निर्माण केले त्यास तोंड देणे असह्य झाल्याने त्याने हार मानून आत्महत्या केली असे हाती आलेल्या सर्व माहित्यांचा आढावा घेतला तर दिसते. या दबाव आणणा-या घटकांची नि:पक्षपाती चौकशी करणे व त्याबाबतच बोलणे अभिप्रेत असता वेमुलाची बदनामी करण्याचे कारण काय? पण असे घडते आहे. वेमुलाबाबतच नाही तर गेल्या दोनेक दशकांतील घटना पाहिल्या तर असेच झाले आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे मोडस ओपरेंडी एकच आहे…पिडित मयतांना व त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करणे. त्यात ते यशस्वी होतात हेही कटू वास्तव आहे.

यातून काय साध्य करायचे आहे? विरोधी गटांत उभी असलेली तरुणाई व अनुभवी घटक यांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल हे पहायचे. संघवादी तरुणांची मानसिक ससेहोलपट शक्यतो होत नाही कारण ते नुसते एका विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात असे नाही तर त्यांच्या मागे शक्तीशाली शिस्तबद्ध काम करणारी यंत्रणा उभी आहे. अशी यंत्रणा दुस-यांकडे नाही ही कटू वस्तुस्थिती आहे. मार्क्सवादाची लय कधीच विरलेली आहे. आंबेडकरवादी आज केवळ प्रतिक्रियावादी व विखुरलेले आहेत व तो केवळ भावनिक आहेत. वैचारिक गंभीर पाया त्यांनी कधीच गमावला आहे. अन्य हिंदू बहुजनांना आंबेडकरवाद आजच्या आंबेडकरवाद्यांमुळेच फारसा स्विकारार्ह नाही असे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे ते एकतर संघवाद्यांच्या कळपात जातात किंवा स्वजातीय संघटनांत अथवा कळपांत आपले अस्तित्व जपतात. सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ व्यापक होण्याऐवजी ती आक्रसत चालली आहे. बाबासाहेब म्हणाले होते, जोवर सामाजिक स्वातंत्र्य येत नाही तोवर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही आणि नेमके हेच आंबेडकरवादी विसरले आहेत.

जातीयवादाविरुद्ध बोलतांना, दुस-यांना त्यासाठी जबाबदार धरतांना, आम्ही आमची जात सोडायचा यत्किंचितही प्रयत्न करत नसू… तर आम्ही आंबेडकरवाद त्यागला आहे असेच म्हणावे लागेल. आम्हाला नीट राष्ट्रव्यापी सम्यक विचारधारेचे संघटन करत संघाला वैचारिक व सांस्कृतिक तोंड देता येत नसेल तर आंबेडकरांचा बुद्धीवाद, फुल्यांची बंडखोरी आम्हाला मान्य नाही असेच म्हणावे लागेल. खरे तर आज आंबेडकरवाद एकाकी पडत आहे काय यावर नव्याने चिंतन करावे लागेल. जाते/धर्म निरपेक्ष मानवतावादी राष्ट्रव्यापी, राजकारण निरपेक्ष संघटन करावे लागेल…आणि तरच आम्ही वेमुलासारख्या विद्यापीठांत झालेल्या अनेक आत्महत्यांना न्याय देवू शकू आणि पुन्हा अशा आत्महत्या होणार नाहीत याची दक्षता घेऊ शकू!

अन्यथा…अजून एक घटना….तेच निषेध…तेच मोर्चे….सोशल मिडियावर एकाहुन एक तीव्र आवेगातले आक्रोश…एवढेच घडत राहील…बाकी काही नाही!

क्युरीयस केस ऑफ सतारवादक आणि तबलावादक

क्युरीयस केस ऑफ सतारवादक आणि तबलावादक
प्रसंग १
 दोन दिग्गज कलाकारांची जोरदार जुगलबंदी चालू आहे. दोघेही तुफान गाणी म्हणतायेत. राजसभा भरली आहे. एक जेष्ठ आणि श्रेष्ठ गायक आसनावर बसून घाबरल्यासारखा गाणी ऐकतोय. राणी सोडून इतर सगळी (रविवारी सकाळी वारजे पुलाखाली जमणाऱ्या मंडळी सदृश्य)  डोकी फेटे/पागोटे/झब्बा घालून यथेच्च माना डोलवतायेत. गायकाच्या भावमुद्रा, त्याने घेतलेल्या आलापी, स्वर प्रेक्षकांप्रमाणे (म्हणजे आपण) राज दरबारातील सगळ्यांच्या कानांना तृप्त करून सोड्तायेत (असे दिसतंय). इतक्या की मागच्या तबला वादकाला आपण गायकाच्या आलापीलाही तबला बडवल्याचा मुक्त अभिनय करतोय याचा पत्ताही लागत नाही.
प्रसंग २: 
एक मुलगा जन्मतःच वृद्धावस्थेत जन्म घेतो. जसे दिवस लोटत जातात तसे तसे तो तरुण आणी वयाने कमी होत जातो. अजून काही काळाने तो छोट्या मुलासारखा छोटा होत होत बायकोच्याच मिठीत बाळ होऊन कालवश होतो.
(सुमारे सात वर्षांपूर्वी ब्रॅड पिट काकांचा “The Curious Case of Benjamin Button” या नावाचा अप्रतिम सिनेमा येउन गेला. वार्धक्यात जन्म घेऊन म्हणजे जन्मतः वार्धक्यात असलेल्या अर्भकाची जशी वाढ(?? येथे नक्की काय म्हणता येईल? असो काहीही म्हणा.)  होत जाते तसा तो तरुण (वयानी कमी) होत जातो अशी स्टोरी लाईन होती. तसाच एक प्रसंग मराठीत सापडला आहे. )

प्रश्न :
आता वाचकांना प्रश्न पडला असेल (पडू दे!) की पहिल्या गायनाच्या जुगलबंदीचा आणी बटन काकांच्या म्हातार्याचा तरुण होण्याचा या सदरात ( का सदरयात) काय संबंध? 

निरुपण :
हिरो लोकांच्या गाणी बजावणी कार्यक्रमात बसलेले सतार वादक आणि तबला वादक पागोट्याच्या खाली मानेवर खोटे केस लाऊन आणी झब्बा घालून आपापले वाद्य वाजवतायेत. दोघे गायक चौदा वर्षापूर्वी एकमेकांना तरुण असताना भेटलेले आता कालानुरूप प्रौढ झालेत. दोघांच्या केस,दाढी,मिश्या पिकल्यात. बाकी काही मंडळी उदा. राजा,राणी, कविराज मात्र तसेच्या तसे आहेत. काही मंडळी चिरतरुण असतात याचाच अविष्कार हा. 

पुरावा :
वर्तमान :

चौदा वर्षांपूर्वी :


निष्कर्षाकडे वाटचाल :
निसर्गाचा महिमा इतका अद्भुत की, चौदा वर्ष्यापूर्वी म्हातारे म्हणजे मिशी,दाढी पिकलेले त.वा. आणि स.वा. आजच्या घडीला तरुण आणी काळी कुळकुळीत मिशी, दाढी वागवत मस्त दाद देतायेत.सगळ्यांचा प्रवास म्हातारपणाकडे होत असला तरी हे दोघे दिवसेंदिवस तरुणच होत असावेत. स्वरांना घराण्याची बंधने नाहीत तसे या दोघांना काळाची आणी शरीर-शास्त्राची बंधने नसावीत. 

असो. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे.


निष्कर्ष:
बाकी तुम्ही आम्ही मात्र एक एक क्षण वयाने मोठेच होत जाणार म्हणून असले काही वाचण्यात आपला वेळ घालवू नका. असे साहित्यिक भोग टाळून वेळेचा सदुपयोग करायला शिका. 

जिते रहो पर वाचते रहो 🙂 

प्रतीक्षा

गेले दोन दिवस लहान लहान वादळं येउन पावसाच्या सरीवरसरी कोसळत होत्या.गेल्या चार वर्षाच्या दुष्काळा नंतर पावसाची आवश्यकता काय ती चांगलीच कळली आहे.प्रो.देसायांना मात्र दोन दिवसापुढे संध्याकाळी घरी रहायला आवडत नाही.ते कंटाळातात.एक तरी संध्याकाळची खेप तळ्यावर फिरायला मिळाली तर ते खुषीत असतात.आज अजीबात पाऊस पडणार नाही असं हवामान सांगणार्‍यांचं भाकीत होतं.सकाळपासूनच भाऊसाहेब मला फोन करून नक्की तळ्यावर या म्हणून सांगत होते.पाउस नसला तरी सध्या थंडीचे दिवस आहेत.त्यामुळे स्वेटरसकट नीट कपडे घालून बाहेर पडावं लागतं.त्याचा मलाही कंटाळा येतो.पण बाहेर जाण्याच्या उमेदीत कंटाळा विसरावा लागतोच.
तळ्यावर गप्पा मारीत असताना,गप्पाचा विषय होता.प्रतीक्षा.पाऊस येण्याची प्रतीक्षा,पाऊस जाऊन सुंदर उन पडण्याची प्रतीक्षा.एक ना दोन.

“आपल्या आयुष्यात असा किती वेळ प्रतीक्षा करीत आपण रहात असतो.?”
मी प्रो.देसायांना विचारलं.

ते म्हणाले,
बारीक,बारीक गोष्टीची आपण प्रतीक्षा करीत अस्तो.एखादा नवा चित्रपट पहाण्यासाठी प्रतीक्षा करीत रांगेत उभे राहिलो असू.एखाद्या प्रसिद्ध होटेलमधे जेवणाची प्रतीक्षा करीत राहिलो असू.कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर थंडगार पावसाच्या सरीसाठी प्रतीक्षा करीत राहिलो असू.मोठ्या गोष्टीसाठीपण आपण प्रतीक्षा करीत राहिलो असू. एखाद्या सदनिकेच्या लॉट्रीच्या रीझल्टसाठी प्रतीक्षा करीत राहिलो असू. केव्हा एकदा नोकरीतून निवृत्त होऊन सदामरीच्या आयुष्यातून सुटणासाठी निवृत्तीच्या शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा करीत राहिलो असू.
आणि अनेक वेळा अशी प्रतीक्षा करीत रहात असताना,जणू आपला वेळ निष्कारण खर्ची होत आहे अशा भावनेतून आपण जात असतो.”

भाऊसाहेबांच्या म्हणण्यात भर घालण्यासाठी मी त्यांना म्हणालो,
“मला तुमचं म्हणणं अगदी पटतं. अलीकडची ह्या दिवसातली आणि ह्या जीवनातली आपली ही पिढी, संगणक वापरायला चतुराई दाखवत असताना आपल्या मातृभाषेत चतूर नसलो तरी त्यांना चालतं. प्रतीक्षा करणं हे वास्तविकतेपेक्षा जरा अधीकच झाल्यासारखं ते समजत आहेत.
संगणकाच्या टच-स्क्रीनला स्पर्श केल्याक्षणी अपेक्षीत घटना दिसायालाच हवी.इमेलचं उत्तर पाहायला प्रतीक्षा करायला वेळ नसतो.प्रतीक्षेव्या बदलीत एखादी ऍप असती तर बरं झालं असतं असं त्यांना वाटत असतं.प्रतीक्षेच्या गम्मतीच्या फायद्याचं आपल्याला विस्मरण झालं आहे.मित्रांबरोबर आवडत्या नाटकाला गेल्यानंतर कधी एकदा नाटकाचा पडदा उघडतो ह्याची प्रतीक्षा करण्यातली मजा आपण विसरलो आहो. चौपाटीवर गेल्यावर भेळेच्या गाडी समोर उभं राहून आपल्या हातात भेळेची पुडी पडेपर्यंत प्रतीक्षा करायला आपल्याला आवडत नसतं.वेटर थाळ्या आणून ठेवण्याच्या प्रतीक्षेत,मित्रांच्या चौकडीत गप्पा मारण्यात किंवा एखादी सनसनाटी बातमी ऐकण्यात भागीदार होण्याचं आपण विसरून गेलो आहो.
दिवाळीचा पहिला दिवस महत्वाचा नसून दिवाळी सणांच्या दिवसांची प्रतीक्षा करण्यातली मजा आपण विसरून गेलो आहोत.दिवाळीत येणार्‍या थंडीच्या दिवसांची प्रतीक्षा,फराळाचं ताट समोर येण्याची प्रतीक्षा, फुलबाज्या,सूरनळे, आकाशात उडणार आहेत त्याची प्रतीक्षा करण्यात येणारी मजाच आपण विसरून गेलो आहोत.”

प्रो.देसाई माझ्याशी सहमत होत मला म्हणाले,
“अलीकडे आपण जीवन जगण्यात एव्हडे व्यस्त झालो आहोत की,खरं जीवन जगायचं,म्हणजे तोंडात घास घेऊन हळुवार,चघळत,घोळत,चव घेत,घेत आनंद घेत असतो तसं आनंद घेत ते जगलं पाहिजे. जीवनाच्या संगीतात स्वतःला अविचल लयीत झोकून देण्याऐवजी आपण,त्या संगीताचा आवाज वाढवून,वेग वाढवून,प्रतीक्षा करण्याच्या ग्म्मतीवर उगाचच दबाव आणत आहो.

मला जाणीव झाली आहे की,प्रतीक्षा करण्यात आपण काहीतरी शिकून जातो. प्रतीक्षा ही एक प्रकारे आपली शिक्षीका आहे.थांबून,प्रतीक्षा करीत आकाशाकडे टक लावून पहायला ती शिकवते.किंवा जोरदार येणार्‍या वार्‍याने हलणार्‍या,सणसणार्‍या पानांचा आवाज ऐकायला शिकवते.हिच प्रतीक्षा,धीर धरायला शिकवते की,आशा करीत रहा.
असं शिकवते की,ज्यामुळे खंबीर राहून बलशाली व्हा,जे बळ आपल्यात आहे आणि आपल्याला त्याचा विसर पडला आहे ह्याची जाणीव देते.प्रतीक्षा,आशेचीही जाणीव करून देते.तुम्हाला आत्ताच,इथेच हवं आहे ते कदाचीत मिळणार नाही,आणि तसं असलं तर ते तुर्तास तसंच बरं आहे.”

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“ह्याच विषयावर मी माझ्या नातीशी बोलत होतो.ती मला म्हणते कशी,
“माझी आई मला म्हणते की,
“तंत्रज्ञानाच्या युगात तू वाढत असल्याने,शिष्ट झाली आहेस.पण तिच्या म्हणण्यावर थोडा विचार केल्यावर मला वाटतं की,वंचित म्हणण्या ऐवजी ती मला शिष्ट म्हणत असावी.वंचित होण्याचं कारण, आपल्याला अपेक्षेपेक्षा फारच मिळत जात आहे.त्यामुळे आवश्यक्यतेकडे डोळेझाक होत आहे.”

मी माझ्या मैत्रीणीशी ह्याच विषयावर चर्चा करीत होते.तिने तर मला खूपच गमतीदार उदाहरण दिलं.ती मला म्हणाली,
“लष्करात असलेल्या नवर्‍याला लढाईवर जाताना त्याच्या पत्नीने म्हणावं,
“मी तुमची प्रतीक्षा करीत राहीन”
अगदी असंच माझे आजोबा माझ्या आजीच्या निर्ववतनाला म्हणाले होते
“मी तुझी प्रतीक्षा करीत राहीन.”
अशासारखच,माझी चुलत बहिण माझ्या कानात पुटपूटली होती,जेव्हा मी माझ्या आजोबांच्या खोलीत काळोख असताना जायला घाबरायची.
असंच काहीसं, लहानपणी माझा हात धरून मला शाळेच्या बसकडे पोहोचवताना माझा मोठा भाऊ मला म्हणायचा.”

चर्चेचा समारोप करताना भाऊसाहेब मला म्हणाले,
“प्रतीक्षा म्हणजेच,खंबीर होणं,म्हणजेच,आशा करीत रहाणं,म्हणजेच,भरवसा करणं,म्हणजेच,प्रेम करणं.

बाहेर काळोख फार झाला होता.आत्ताकुठे रात्र कमी आणि दिवस जास्त वेळ रहाण्याचे दिवस येत आहेत.म्हणजेच वसंत ऋतूचं आगमन होणार आहे.त्याची आता प्रतीक्षा करायला हवी.
असं मी म्हणालो आणि आम्ही घरी जाण्यासाठी उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)