2015 बाय ….बाय

सरत्या वर्षाचे ऋण आज31 डिसेंबर, आणखी एका दिवसाने हे वर्ष संपणार आणि नवे वर्ष सुरू होणार. जुन्या वर्षात घडलेल्या कितीतरी चांगल्या, वाईट घटनांची बेरीज – वजाबाकी मनात सुरू झालेली असते. कुटुंबात कोणा नव्या पाहुण्याचे आगमन, नाही तर कोणाचा तरी चिरविरह, एखादा प्रवास, एखादे पुस्तक, भावलेला सिनेमा, कायमची मैत्री व्हावी अशी एखादी ओळख, अचानक डोके वर […]

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

मंगेश पाडगावकरांनी माझ्या पिढीला गाणं गायला लावलं. त्यानी गद्य
माणसालाही पद्य म्हणायला लावलं.

कोकणातल्या माझ्या गावात डोगरावर हुंदडताना
रंगभरल्या आकाशाकडे बघताना ‘रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली? ही त्यांची
ओळ गुणगुणताना त्या वयात आकाशाची शोभा मी पाहिली, पाडगावकरानी ती ओळ लिहिली नसती
तर कदाचीत समोरचं सुंदर आकाश मी न्याहाळलंच नसतं. ‘काळोखाच्या दारावरती
नक्षत्रांच्या वेली’

साल २०१५ ची कमाई!

                              ॐ 

साल २०१५ ची कमाई ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक !
श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे !

संकलन: किशोर कुलकर्णी !
प्रकाशक: सौ. रेवती विभाकर कुरंभट्टी!
मुद्रक: सुपरप्रिंट, २६१, झुणका भाकर केंद्रामागे तहसिलकचेरीजवळ
जळगाव – ४२५००१!
मांडणी: डिगंबर शिरसाठ सुपरपिंट, जळगाव !
मुखपृष्ठ: विजय जैन, !
प्रथमावृत्ती : २१ मार्च २०१५ ( गुढीपाडवा ) !

बाकि ठिक. छान.
वसुधालय.

blogwalya-aajibai

ॐ उकडी चे पदार्थ !

              ॐ
उकडी चे पदार्थ !

पूर्वी ब्लॉग मध्ये उकडलेले पदार्थ व सुधारस केलेले
छायाचित्र दाखवित आहे.
उकडलेले तांदूळ पीठ नारळ सारण मोदक आणि
उकडलेले पुरण डाळिंब न वाटलेले पुरण
उकडलेली कोथिंबीर वडी
सुधारस असे फोटो दाखवीत आहे माहिती पूर्वी लिहिली आहे परत लिहित नाही

बाकि ठिक. छान.

वसुधालय.

गोचर ग्रह (२०१५-२०१६) दाते पंचांगाप्रमाणे Gochar Planets 2015-2016

गोचर ग्रह (२०१५-२०१६) दाते पंचांगाप्रमाणे 

गुरु : १० ऑगस्ट २०१६ पर्यंत सिंह राशीत
        ११ ऑगस्ट  २०१६ पासून कन्या राशीत
शनि: संपूर्ण वर्ष वृश्चिक राशीत
राहू: ८ जानेवारी २०१६ पर्यंत कन्या राशीत
       ९ जानेवारी २०१६ पासून सिह राशीत
केतू : ८ जानेवारी २०१६ पर्यंत मीन राशीत
       ९ जानेवारी २०१६ पासून कुंभ राशीत
हर्शल : संपूर्ण वर्ष मीन राशीत
नेपच्यून : संपूर्ण वर्ष कुंभ  राशीत

प्लुटो : संपूर्ण वर्ष धनु  राशीत
मंगळ : १५ सप्टेंबर २०१५ ते  २ नोव्हेंबर २०१५ पर्यंत सिंह राशीत
           ०३ नोव्हेंबर २०१५ ला कन्या राशीत
           २३ डिसेम्बर २०१५ ला तुळ राशीत
           २० फेब्रुवारी २०१६ ला वृश्चिक राशीत
           २१  जून ला मंगळ वक्री ( तूळेत )
           १३ जुलै  मंगळ वक्री ( वृश्चिकराशीत  )
           २१ सप्टेंबर मंगळ धनु राशीत
           ०५ नोव्हेंबर मंगळ मकरेत
           १२ डिसेम्बर मंगळ कुंभेत

साडेसाती : तुळ – वृश्चिक – धनु या राशींना साडेसाती आहे. 

स्त्री जातक : महिलांवर केंद्रित ज्योतिषाचे एकमेव मराठी ई – बुक

माझ्या Green Apples कंपनीने प्रकाशित केलेले ज्योतिष विषयक ई – बुक 
स्त्री जातक : महिलांवर केंद्रित ज्योतिषाचे एकमेव मराठी ई – बुक
विषय : महिलांचे करीयर , आरोग्य ,वैवाहिक सुख ,   सौंदर्य क्षेत्रातील महिला , स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिला, राजकारणी महिला , खेळाडू महिला  इत्यादी क्षेत्रातील ग्रहयोग व उदाहरणासकट ( सोडविलेल्या पत्रिका ) माहिती .
नवख्या ज्योतिषापासून ,  अनुभवी ज्योतिषी , सर्वसामान्य माणसांसाठी उपयुक्त . 

लेखिका : सौ . मृणालिनी ठाकर (ज्योतिर्भास्कर , कसबा गणपती -पुणे यांच्या पुजारी ) ४० वर्षांहून अधिक वर्षे ज्योतिषाच्या क्षेत्रात कार्यरत असणार्या अनुभवी ज्योतिषी . सुमारे १८ वर्षे ” ब्रह्मलिखित ”  मासिकाच्या सह – संपादिका आणि सर्वेसर्वा !!!

तुमचे ईबुक प्रकाशित करायचे आहे ? संपर्क: डॉ. केतकी ( ९७६-४३६-४९४६) . केवळ ओफ़िशियल कामासाठी . 

Click here to view this Ebook !!!

चालतीबोलती कविता निघून गेली!

मंगेश पाडगावकरांनी अखेर निरोप घेतला. चालतीबोलती कविता निघून गेली. कविता हा त्यांचा श्वास होता. संदेश देणे ही त्यांची प्रकृती नव्हती. तरीही त्यांनी लिहीलेली ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही ओळ महाराष्ट्राला संदेश ठरली! जीवनावर भाष्य करावं अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती. ते लिहीत राहिले. सुचलं की लिहीलं हा त्यांचा पिंड होता. उच्च्भ्रू साहित्यिक वर्तुळाची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. त्यांच्या अंतःस्फूर्तीने कुठलाच नियम मानला नाही. लिज्जत पापडच्या जाहिरातीत, पावसाळा आला की पावसावर ! आकाशवाणी आणि नंतर मुंबईस्थित अमेरिकन माहितीकेंद्रावर नोकरी करत असताना तिथल्या राजकारणात अजिबात भाग न घेणा-या पाडगावकरांनी कधी माहितीचा आव आणला नाही की रसिकतेचा टेंभा मिरवला नाही. तो मिरवायची त्यांना कधी गरजच भासली नाही!
यशवंत, गिरीश आणि सोपानदेव चौधरी ह्या कवीत्रयींना महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांच्याआधी एकाही मराठी कवीला ते भाग्य मिळाले नव्हते. परंतु वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर ह्या कवीत्रयींना हे भाग्य मिळाले. सोपानदेव, यशवंत आणि गिरीश ह्यांच्या काव्यगायनाची परंपरा बापट, विंदा आणि पाडगावकरांनी जिवंत ठेवली इतकेच नव्हे तर त्या परंपरेत रसरशीतपणा ओतला. मी स्वांत सुखाय लिहतो ह्या दंभोक्तीच्या आहारी मराठीतले अनेक कवी गेले आहेत. पण मंगेश पाडगावकरांना ह्या दंभोक्तीने कधी पछाडले नाही. नोकरीमुळे त्यांच्या काव्यलेखनात विघ्न आले नाही की खासगीत सतत चालणा-या निंदानालस्तीनेही कधी त्यांच्या काव्यलेखनात विघ्न आले नाही. मराठी माणूस नाटकांवर जितके प्रेम करतो तितकेच तो कवितेवरही प्रेम करतो हे मंगेश पाडगावकर ओळखून होते. म्हणूनच ताजी कविता त्यांना ताज्या मासळीइतकीच प्रिय होती.
ज्योतिष हा एक त्यांचा छंद होता. अनेकांच्या कुंडल्या त्यांनी पाहिल्या होत्या. आपले  भविष्यकथन हा चेष्टेचा विषय होतो हे त्यांना माहित होते. पण त्यांनी कधी त्यांची पर्वा केली नाही. माझे बंधू   बाळकृष्ण झवर ह्यांच्या संपादकत्वाखाली ज्योतिषधारा ते वाचत असत. ज्योतिषधाराच्या अंकात छापून आलेले लेख आवडले की ते आवर्जून फोन करायचे. लोकसत्तेत आले तर मुद्दाम माझ्या टेबलापाशी येऊन कौतुक करायचे. पुढे ज्योतिष धाराचे स्वरूप बदलले. तेव्हा ते त्यांना आवडले नाही. ते म्हणाले, मी जगातली अनेक नियतकालिके चाळत असतो. तुमच्या ज्योतिषधाराचे स्वरूप जागतिक नियतकालिकांच्या तोडीचे होते. ते तुम्ही का बदलले?  ह्या त्यांच्या प्रश्नाला प्रामाणिक उत्तर देण्याची मला भीती वाटली. साधारण महिना उलटल्यावर मी त्यांना युसिसमध्ये भेटलो. सांगितलं, अण्णा जाहिरातीचं उत्पन्न नव्हतं. म्हणून स्वरूप बदललं. नाव बदललं. त्यावर ते काही बोलले नाही. एक दयाद्र कटाक्ष टाकला, बस्स! पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ज्योतिषधाराचा विषय कधीच काढला नाही.
विद्याधर गोखल्यांनी त्यांना दिवाळी अंकासाठी कविता मागणारे पत्र पाठवायला सांगितले. दोन दिवसांनी त्यांनी फोन केला, ह्या वर्षी एकाही दिवाळी अंकात कविता देणार नाही. माझ्यापुढे संकट उभे राहिले. मी लगेच विद्याधर गोखल्यांच्या हातात फोन दिला. गोखल्यांनाही त्यांनी तेच सांगिततले. गोखले म्हणाले, मंगूअण्णा! याद राख. तुझी कुठल्याही दिवाळी अंकात कविता दिसली तर तुझं डोस्क फोडीन…पाडगावकर काय म्हणाले हे मला ऐकू आले नाही. पण त्यांनी सांगितलं असावं, एका दिवाळी अंकात जरी कविता दिसली तर तुम्ही खुशाल माझं डोकं फोडा!
त्या वर्षी एकाही दिवाळी अंकात पाडगावकरांची कविता दिसली नाही. ह्या प्रसंगाला खूप वर्षे झाली. आजचा दिवस असा उगवला, पाडगाव दिसणार नाही!  त्यांची गजल, भावगीत किंवा मुलांचे गाणं त्यांच्या स्वरात ऐकायला मिळणार नाही. पेयतेवाचून पाणी नाही तसं गेयतेवाचून गाणे नाही. पण पाडगावकर कधी गेयतेही अडकले नाही. त्यांचं साधं वाचनही गेयतेवर कडी करणारं होतं. सूर आणि स्वराबरोबर त्यांच्या कवितेला अर्थाचे वावडे नव्हते. नव्हे, त्यांच्या सा-याच कविता अर्थगर्भ होत्या. मनामनातल्या भावना त्यांच्या कवितेत सहज प्रवेश करायच्या! हिंदीतला मुशायरा काय चीज आहे हे कळलं हे महाराष्ट्राला प्रथमच कळलं. कवितेखेरीज कशाच्याच भानगडीत न पडलेल्या मंगेश पाडगावकरांचे महाराष्ट्राला सतत स्मरण होत राहील!

रमेश झवर
www.rameshzawar.com

Last of the Wanderers

Last Of The Wanderers

Review by Harshwardhan Deshpande on my Novel, “Last of the wanderers”
“This is a fictional novel based on real events that happened around first century AD. These are interesting times in central Asia and event happening during this period had major influence on how Indian civilization morphed into what we have today. Greek kingdom in Bactria is on the decline and Buddhism in India is about reach its zenith. This is also the time when a large number of nomadic tribes such as Yuezhi in central asia are about to give up their nomadic lifestyle and settle down to form villages and eventually kingdoms.
On the whole I found the novel thoroughly captivating. This is not a historical novel so author has taken creative permission to move around a few historical references to provide a fascinating insight into how and why the urbanization of central Asia might have started.
Western readers might find that reading this novel as a different experience. This is due to the fact that the author is from India and his writing comes with an Indian flavor. This is not something new, even someone like Salman Rushdie has unmistakable style that only be called Indian English. There are also a few gaps in the narrative which can be attributed to the faulty editing but fortunately they do not stand in the way to enjoy the book.
My major gripe with this novel is that this is the subject of an epic and not a short book. As far as I know no epic has been written based upon the happenings in this part of the world during this period of turmoil. I hope that in the future the author will come up with an epic novel based on the same story.”
-Harshwardhan Deshpande

Last of the Wanderers

Last Of The Wanderers

हर्षवर्धन देशपांडे यांनी केलेले माझ्या “Last of the Wanderers” या कादंबरीचे परिक्षण
This is a fictional novel based on real events that happened around first century AD. These are interesting times in central Asia and event happening during this period had major influence on how Indian civilization morphed into what we have today. Greek kingdom in Bactria is on the decline and Buddhism in India is about reach its zenith. This is also the time when a large number of nomadic tribes such as Yuezhi in central Asia are about to give up their nomadic lifestyle and settle down to form villages and eventually kingdoms.
On the whole I found the novel thoroughly captivating. This is not a historical novel so author has taken creative permission to move around a few historical references to provide a fascinating insight into how and why the urbanization of central Asia might have started.
Western readers might find that reading this novel as a different experience. This is due to the fact that the author is from India and his writing comes with an Indian flavor. This is not something new, even someone like Salman Rushdie has unmistakable style that only be called Indian English. There are also a few gaps in the narrative which can be attributed to the faulty editing but fortunately they do not stand in the way to enjoy the book.
My major gripe with this novel is that this is the subject of an epic and not a short book. As far as I know no epic has been written based upon the happenings in this part of the world during this period of turmoil. I hope that in the future the author will come up with an epic novel based on the same story.
-Harshwardhan Deshpande

"पालवी ” 2015-12-29 09:17:14

मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. साठे बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना, “love you All” असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही. पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत. त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता. तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि साठे बाईंना त्याच्याबद्दल […]

शक १९३७ मन्मथनाम संवत्सरमार्गशीर्षसंकष्टचतुर्थी

                          ॐ               तारिख 28. 12( डिसेंबर ) 2015.

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर
उत्तरायण हेमंत ऋतु मार्गशीर्ष कृष्णपक्ष ३ सोमवार
संकष्ट चतुर्थी

शुभेच्छा ! शुभ दिवस

वसुधालय.

img_14231aca1f8502b4e

bf0e18dd9e09dscf29182