मासिक धर्म…आणि धर्म!

शबरीमला या दक्षीणेतील विख्यात मंदिर सध्या चर्चेत आले आहे ते, “जोवर स्त्रीयाना त्या मासिक पाळीत आहेत कि नाही हे तपासण्याचे स्क्यनर बनत नाहीत तोवर मंदिरात स्त्रीयांना प्रवेश नाही.” या वादग्रस्त विधानामुळे. हे विधान केले मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमूख प्रयार गोपालकृष्णन यांनी. ते पुढे असेही म्हणाले कि मासिक धर्म स्त्रीयांना अपवित्र करतो आणि पवित्र मंदिरांत त्यांना प्रवेश देता येणार नाही. यामुळे वादंग उठले असून निकिता आझाद या विस वर्षीय तरुणीने “”Happy to bleed” हे आंदोलन सुरू केले असून आजवर असंख्य स्त्रीयांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. स्त्रीयांचा मासिक धर्म हे वरकरणी कारण असून अय्यप्पा ब्रह्मचारी होते आणि शबरीमला येथे त्यांनी तप केले असल्याने स्त्रीदर्शनाने त्यांचा तपस्याभंग होऊ नये म्हणून (मेनकेने विश्वामित्राचा केला तसा) तेथे स्त्रीयांना प्रवेश नाही. यावर आपण अधिक चर्चा पुढे करुच, पण स्त्रीयांचा मासिक धर्म आणि त्यामुळे प्रार्थनास्थळ प्रवेशबंदी कोठे कोठे आहे हे पाहू.

भारतात सबरीमला, हाजी अली, जामा मशिद, पद्मनाभय्य मंदिर, पुष्कर येथील कार्तिकेय मंदिर, निजामुद्दिन दर्गा इत्यादि धर्मस्थळांत स्त्री प्रवेश बंदी आहे. अलीगढ विद्यापीठाच्या ग्रंथालयातही विद्यार्थिनींना बंदी आहे, पण त्याचे कारण मनोरंजक आहे. मुली ग्रंथालयात आल्या कि विद्यार्थी अभ्यासात लक्ष घालणार नाहीत म्हणून बंदी…हा असला विनोदी प्रकार आहे. मुस्लिम बंदी घालणारे म्हणतात कि शरियातच ही तरतूद आहे तर हिंदू म्हणतात…धर्मशास्त्रांतच हे लिहिलेले आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंद्या भारतात अनेक धर्मस्थळांत अंमलात आणल्या जातात हे आपणास माहितच आहे.

मासिक धर्मामुळे स्त्री अपवित्र होते अशी समजूत यामागे आहे हे उघड दिसते. वरकरणी कारणे काहीही सांगितलेली असोत. यातून आपण स्त्रीयांचाचा अधिक्षेप करतो, धर्माच्या नांवाखाली निसर्ग-धर्माला पायतळी तुडवतो याचे भान मात्र आपल्याला आलेले नाही. यासाठी आपल्याला पुरातन काळापासून स्त्री, तिची मासिक पाळी आणि तिचा अपत्यजन्म देवून मानवी वंश साखळी अबाधित ठेवण्याच्या सामर्थ्याबाबत कसकसे विचार बदलत गेले हे पाहणेही उद्बोधक तसेच मनोरंजकही आहे.

मनुष्य जेंव्हा नुकताच कोठे भुतलावर अवतरला होता व निसर्ग व अन्य पशुंच्या प्रकोपात कसाबसा जगायचा प्रयत्न करत होता त्या काळात स्त्रीयांकडे तो कोणत्या दृष्टीने पाहत होता?

तिचा मासिक धर्म, तिने अपत्ये प्रसवणे ही बाब त्या काळातील मानवासाठी अद्भूत चमत्काराहून कमी नव्हती. महिन्यातील काही दिवस स्त्रीया रज:स्त्राव करतात आणि पुर्ववत होतात किंवा गरोदर होऊन अपत्य प्रसवतात या तिच्या शक्तीला आदिमानवाने देवत्व दिले. कारण असे का होते याचे असलेले स्वाभाविकच गहन अज्ञान. जगभरात आधी सुरू झाली ती स्त्रीपुजा. योनीपुजा. तिच्यात यातुशक्ती असाव्यात व ती आपल्याला जशी उपकारक अहे तशीच अपायकारकही असू शकते यामुळे स्त्री हे त्याच्यादृष्टीने गुढ-भयाचा सम्मिश्र विषय बनला. त्याला तोवर अपत्य जन्मात आपलाही सहभाग असतो हे माहितच नव्हते. चंद्रकला आणि नियमित येणारा मासिक धर्म यामुळे त्यांनी अपत्य जन्माचा संबंध चंद्राशी लावला. आपण आता चंद्र हा स्त्रीचा भाऊ आहे असे मानतो, पण पुरातन समाज हा चंद्र अपत्यला जन्म घालतो (म्हणजे तिचा पती) असा लावला गेला. भारतातील “चंद्रवंश” ही समजूत त्यातुनच निघाली.

उत्खनने आणि पुरातन गुहाचित्रातून ५०-६० हजार वर्षापुर्वीच्या माणसाचे लिखित नसले तरी समजुतींचे वस्तु-चित्ररूप दर्शन घडवते. सिंधू संस्कृतीत मातृदेवतांचे व तिच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते. स्त्रीयोनीतून निघालेल्या पिंपळाचे चित्रण स्त्रीच्या प्रसवक्षमतेचे कसे उदात्तीकरण होते हेही दर्शवते.  भारतात संभोगोत्सूक स्वरुपाची, शिर्षाच्या जागी कमळे असलेली पण ठळक योनी व स्तन दाखवणा-य मृण्मुद्रा आणि पाषाण शिल्पे विपूल प्रमानात तर आहेतच पण गांवदेवीच्या स्वरुपात जवळपास सर्व खेड्यांत स्त्रीमहत्तेचे अस्तित्व सापडते. किंबहुना मातृसत्ता आरंभीच्या काळत जगभरात पाळली जात होती असे पुरावे मिळतात. पुरातन काळात स्त्रीया पुरुषी कार्यात भाग घेतही असल्या तरी तो सीमित होता. किंबहुना तो सीमित ठेवला गेला तो या तिच्याकडे पाहण्याच्य गुढमिश्रीत श्रद्धाभावामुळे. बहुप्रसवा स्त्री ही टोळीचे वैभव मानली जात होती, कारण टोळीची लोकसंख्या त्यामुळेच वृद्धींगत होऊन टोळीसामर्थ्यही त्यामुळे वाढेल ही  भावना त्यामागे असणे स्वाभाविक आहे.

समाजेतिहास तज्ञ म्हणतात कि शेतीचा शोध स्त्रीने लावला. त्यात तथ्य आहे कारण तिला निरिक्षण करत फेकलेल्या बिया कशा उगवतात हे पाहण्याची अधिक संभावना होती. आधी सुरू झली ती फिरती शेती. नंतर मानूस जलाशय-नद्या-ओढे यांच्या काठी स्थिर शेती करू लागला. आधी स्त्री ही टोळेचे मालमत्ता असे. शेतीच्य शोधाने मालकीहक्क व वंशसातत्याची कल्पना आली. किबहुना स्त्री-स्वातंत्र्य लयाला घालवणारी ही घट्ना होती.

आपण शेतीत बीज पेरतो तेंव्हा पीक होते हे ज्ञान आपलाही अपत्यजन्मात सहभाग आहे कारण आपण आपले बीज योनीत पेरतो हे ज्ञान माणसाला झाले. वारसाहक्काच्या कल्पनेतून मग माणसाने विवाहसंस्थेला जन्म घातला. ही व्यवस्था सैल होती. बहुपतीकत्व जसे लागू होते तसे बहुपत्नीत्वही आरंभी लागू होते. महाभारतात आपण नियोग प्रथा, बहुपतीकत्वाचे अवशेष द्रौपदीच्या रुपात पाहू शकतो.

भारतात वैदिक धर्म आणि शैवप्रधान धर्माच्या धारा आहेत हे आपण जाणतोच. वैदिक धर्म येण्यापुर्वी सिंधुपुर्व काळापासून भारतात ,लिंग आणि योनीपुजा सुरू होती याचे अवशेष आपल्याला प्राप्त आहेत. पुढे स्त्री-पुरुष यांत एकात्मता प्रस्थापित करत लिंग आणि योनी संयुक्त स्वरुपात शिवलिंग या प्रतीक रुपाने सुरु झाली. या धर्मात स्त्रीमाहात्म्य व समता याचा परिपाक या प्रतीकातून दिसतो. शैव-शाक्त संप्रदायांनीही शक्ती (स्त्री) तत्वालाच जगन्माता मानत तिची आराधना प्राधान्याने केली. तंत्रांची निर्मिती शिवाने केली अशी श्रद्धा आहे. प्रस्तूत लेखाच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे यात रज:स्वलेला अनन्यसाधारण महत्व आहे. रज:स्त्रावाचा उपयोग यात्वात्मक क्रिया साधण्यासाठी केला जात असे. स्त्री रजोकालात अपवित्र नव्हे तर पवित्र व साधनेचे साधन मानली जात होती.

पुरातन काळी स्त्रीला किती महत्व होते हे आपण शैवांच्या/शाक्तांच्या आजही अवशिष्ट राहिलेल्या परंपरांतून पाहू शकतो. शक्ती (स्त्री) ही पृथ्वी व अवकाश हे शिव तर पर्जन्य म्हणजे त्याचे वीर्य. या संगमातून पृत्वी सुफला होते अशी भावना होती. मानवी जीवनाचे आरोपण सृष्टीवर करणे हा मानवी स्वभाव आहे. सूर्य मृग नक्षत्रात गेल्यानंतरचे पहिले तीन दिवस हा पृथ्वीच्या रजोदर्शनाचा काळ मानला जातो. या काळात नांगरणे, बी पेरणे वर्ज्य मानले जाते. चवथ्या दिवशी दगडांना स्नान घालून पृथ्वी सुफलनासाठी योग्य झाली असे मानले जाते.  अंबुवाची नांवाने हा उत्सव बंगाल, आसाम येथे व्यापक प्रमाणात तर अन्यत्र तुरळक प्रमाणात आजही साजरा होतो. आसाममद्ध्ये कामाख्या मंदिरातही हा देवीचा रजोदर्शन उत्सव साजरा होतो. या काळात मंदिर तीन दिवस बंद असते. चवथ्या दिवशी देवीला स्नान घालण्यात येते व भक्तांना लाल कपड्याचे तुकडे  देवीच्या रजोदर्शनाचे प्रतीक म्हणून वाटले जातात. शबरीमलाच्या निषिद्धांच्या विपरित, खुद्द केरळमद्ध्येही पार्वती देवीच्या मंदिरात (चेंगान्नूर) पार्वतीच्या मासिक धर्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

याचा एक अर्थ असा कि रजोदर्शन हे काहीतरी अपवित्र आहे अशी भावना मुळात नव्हती. किंबुहना सुफलनतेत रजोदर्शन हे अतळ आहे, अपरिहार्य आहे आणि मानवाला वंशसातत्यासाठी आवश्यकच आहे अशी भावना होती असे दिसते. तीन दिवस स्त्रीला कामांपासून विश्रांती मिळावी म्हणू दूर बसणे हा तत्कालीन स्थितीत सुचलेला पर्याय सोडला तर स्त्री या काळात अस्पर्शीही होती असा आभसही मिळत नाही. उलट भारतातील ५२ शक्तीपीठे (सतीचे एकेक अवयव जेथे जेथे गळून पडले त्या स्थानांवर उभारलेली मंदिरे)  स्त्री हे नरकाचे द्वार आहे, पापयोनी आहेत अशी वैदिक धर्मशास्त्रांनी निर्माण केलेली निषिद्धे शैव पाळत नव्हते असे दिसते.

वैदिक धर्मातही आरंभकाळी स्त्रीकडे पहायचा दृष्टीकोण व्यापक व उदारच होता असे ऋग्वेदावरुनच दिसते. अनेक स्त्रीयांनी सुक्ते रचलेली आहेत. ऋग्वेदातील १.७९ हे सूक्त लोपामुद्रेने लिहिलेले असून ती तत्ववेत्ती होती हे स्पष्ट दिसते. वैदिक स्त्रीयांना उपनयनाचा, वेदांचा व यज्ञकर्मात भाग घेण्याचाही अधिकार होता. ऋग्वेदात कोठेही ऋतुमती स्त्री अपवित्र असते वगैरे उल्लेख नाही. अगदी मनुस्मृतीतही मासिक धर्मकाळात पुरुषाने स्त्रीशी संभोग करू नये याव्यतिरिक्त अशुचीबाबत कसलेही विधान केलेले नाही. परंतू ततित्तिरिय संहितेत नंतर कहे भाग घुसवत एक मिथक निर्माण करण्यात आले. ते असे:

इंद्राने त्वष्ट्याचा पुत्र असलेल्या विश्वरुपाची तीन मस्तके उडवून ब्रह्महत्या केली. याबाबत निंदा होऊ लागल्यावर इंद्राने आपले १/३ पाप पृथ्वी व झाडंना दिले व उरलेले पाप स्विकारण्याची  त्याने स्त्रीयांच्या एका समुहला विनंती केली. त्यावर स्त्रीयांनी वर मागितला. रजोदर्शनाचा काळ संपल्यावर आम्हाला अपत्यप्राप्ती होऊ दे! मग इंद्राच्या पापाने रज:स्वला स्त्रीचे रुप घेतले. म्हणून रजस्वला स्त्रीबरोबर संभाषण करू नये, तिच्याजवळ बसू नये, तिच्या हातचे अन्न खाऊ नये कारण ती इंद्राच्या पापाचा रंग असलेले रक्त टाकत असते.

आता ही भाकडकथा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. इंद्राने आपले पाप त्यांना देईपर्यंत त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती का? त्यांना रजोदर्शन होतच नव्हते का? आणि हे झाले एका स्त्री समुहाबाबत…अन्य स्त्रीयांचे काय? रजोदर्शन अमंगळ आहे हे सांगण्यासाठी कोणी मुढाने ही कथा बनवली आहे हे उघड आहे.

रजोदर्शनापुर्वी मुलीचे लग्न करावे असे मनु सांगतो. पण अन्य स्मृती त्याच्याही पुढे जातात आणि रज:स्वलेने तीन दिवस कसे वागावे याबाबत अगदी बारीक-सारीक नियम घालतात. तिने स्नान करु नये, केस विंचरू नये, दात घासू नयेत, तिन्ही दिवस हातात घेऊन अन्न खावे, कोणाला, अगदी रज:स्वलेने रज:स्वलेलाही स्पर्श करू नये, एकवस्त्रा असावे वगैरे. यातील एक जरी नियम जरी तिने मोडला तर तिला होणारा पुत्र चोर, रोगी, नपुंसक, वेडा वगैरे होतो अशी भिती दाखवायलाही हे वैदिक धर्मशास्त्रकार चुकलेले दिसत नाहीत.

ततित्तिरिय ब्राह्मणात तिला या काळात याज्ञिक धर्मकृत्येही निषिद्ध सांगितली आहेत. हे नियम अर्थातच वैदिक स्त्रीयांनाच कटाक्षाने लागू केले गेले हे उघड आहे. ्स्त्रीयांचे उपनयनही थांबले आणि तिचा वेदाधिकारही काढला गेला तो स्मृतीकालातच. तत्पुर्वी वेदाध्ययन जरी केले गेले नसले तरी विवाहाआधी तिचे उपनयन करण्यात येत असे. पण तीही परंपरा नंतर वैदिकांनी का सोडली याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यांच्या स्त्रीया या सर्व पातकांचे द्वार बनल्या हे मात्र खरे.

खरे म्हणजे हे वैदिक परंपरांच्याच विरोधात जाते. वेदाज्ञा म्हणाल तर याबाबत अशी एकही आज्ञा वेदांत मिळत नाही. म्हणजेच स्त्रीयांबाबतचे असे अन्यायी नियम करणे हेच मुळात वेदविरोधी होते, हे वैदिकांनी समजावून घेत मुळचे वैदिक स्त्री माहात्म्य पुन्हा प्रतिष्ठापित करण्याची आवश्यकता आहे.

इस्लाम

इस्लाममद्ध्ये (भारतात) काही ठिकाणी मशिद-दर्ग्यांत स्त्रीयांना प्रवेश नाही असे मी लेखारंभीच सांगितले आहे. हेही कुराणविरोधी आहे असे म्हणायला प्रत्यवाय नाही. कुराणनुसार स्त्रीयांना मशिदीत जाण्याचा, नमाज अदा करण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी स्त्रीयांसाठी मशिदीत वेगळी व्यवस्था असते. पण असे असले तरी स्त्रीयांनी घरीच नमाज पढावा यासाठी अधिक दक्षता बाळगली जाते व स्त्रीया मशिदींत मुळात जाण्याचा प्रयत्नही करत नाही असेही चित्र आहे. काही ठिकाणी तर बंदीच आहे. कुराणात पैगंबर म्हणतात, स्त्रीयांना कोणी मशीदीत जाण्यापासून रोखू शकत नाही. पण त्याला नंतरच्या धर्मशास्त्र्यांनी दिलेली जोड अशी कि “पण घर हीच त्यांच्या नमाजासाठी योग्य जागा आहे.”

पैगंबरांनी स्त्रीयांबरोबर लहान मुले असतात व ते रडून नमाजात व्यत्यय आणतत म्हणून स्त्रीयांसाठी स्वतंत्र खोली व दरवाजा असावा असे म्हटले. असे असले तरी मासिक धर्मातील स्त्रीया व अपवित्र लोक यांच्यासाठी सामुदायिक नमाज पैगंबरांच्याच पत्नीमुळे, आयेशामुळे, नाकारला गेला असे इस्लामी पंडित सांगतात. अर्थात याला कुराणात दुजोरा मिळत नाही. हदिसने अनेक बाबींचा विपर्यास केला आहे हे स्पष्टच दिसते. कुराणवर विश्वास ठेवणा-या मुस्लिमांनी मुळ कुराणातच स्त्रीयांबाबतचे नियम पाहिले तर आपल्या वेडगळ समजुते टाकाव्या लागतील.

थोडक्यात धर्मांनी मुळातील बाबी व स्त्रीयांबाबतचा उदारमतवाद कसा धिक्कारला आहे हे आपण वैदिक व इस्लामबाबत पाहू शकतो. स्त्रीयांना दुय्यम स्थान देणे हा एकमेव हेतू त्यामागे होता यात शंकाच नाही. मुळ धर्मही बाजुला ठेवत स्वार्थासाठी, स्त्रीयांवरील व अन्यांवरील वर्चस्व गाजवण्यासाठी धर्मालाही तिलांजली दिली.

आज आपण आधुनिक काळात आहोत. समतेचे मुलतत्व आपण घटनात्मक पातळीवर स्विकारले आहे. त्यात स्त्री-पुरुष समता सर्वोपरी आहे. अनेक हिंदू धर्मातील वैदिक पुरोहितांनी हट्टाने वैदिक नसलेले, उत्तरकाळात बनवलेले, अगदी स्मृतींतही नसलेले अनेक नियम देवस्थान कायद्यांत घुसवले आहेत. धर्माच्या बाबतीत मुस्लिम सर्वस्वी मुल्ला काय अर्थ काढतो यावरच अधिक अवलंबून आहेत. खरे म्हणजे, अगदी धर्मात असले तरी, ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशात असले बाष्कळ नियम फेकून द्यायची गरज असतांना “धर्म’..धर्म” करत स्त्रीच्या निसर्ग धर्माचा अवमान करत आपण समस्त मानूसकीला काळिमा फासत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. मशिद असो कि मंदिर, यज्ञ असॊ को पुजा, स्त्रीला समान अधिकार हवेत. ते पाळायचे कि नाही, धर्मस्थली जायचे कि नाहे ही बाब व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. पण कोणी त्यांना जायचे असुनही आडकाठी करत असेल तर धर्मस्थळ कायदे, लिखित-अलिखित नियम, पंरपरादिंच्या नांवाखाली त्यांना रोखत असेल तर ते घटनात्मक स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकारावर गदा आणनारे आहे. असे कायदे अघटनात्मक असल्याने ते बेकायदेशिर आहेत.

स्त्रीयांनाच यात व्यापक प्रबोधनासाठी, स्वत:चे स्वातंत्र्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मासिक धर्म अपवित्र नाही. ती वेडगळ समजूत आहे. पुरातन काळापासून या धर्माला प्रतिष्ठा होती. ती गमावली असेल तर ती पुन्हा मिळवायला हवी. आणि समस्त पुरुषांनीही डोळे उघडून पुरुषी वर्चस्वतावादाच्या सरंजामशाही मानसिकतेतून दूर होत आपल्याइतकेच्ध स्त्रीयांनाही स्वातंत्र्य आहे, त्या गुलाम नाहीत याचे भान ठेवले पाहिजे…!

कार्तिक कृष्णपक्ष चतुर्थी १९३७मन्मथनाम

                                ॐ

कार्तिक कृष्णपक्ष चतुर्थी

शक १९३७मन्मथनाम संवत्सर.

साल २९ . २०१५ नोवेंबर वार रविवार

. कोल्हापूर येथील महालक्ष्मी देऊळ येथील साक्षी गणपति नमस्कार

सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर

 सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर

सॉलीट्युड हौसेचे दुसरे व्हर्जन म्हणून सासवडला प्रयाण केले. सकाळी ७ ला उठलो, चहा पाणी झाल्यावर आईला शाळेत सोडायला निघालो. “जवळच पुढे कुठे तरी जाऊन येऊ ” असा विचार करून एक पाण्याची बाटली आणी थोडा खाऊ पाठीवर पाठ -पिशवीत टाकले आणी निघतानाच घरी सांगितले की संध्याकाळी घरी येईन थोडा फिरून.
सासवड मधली शिवमंदिरे व लोणी भापकर येथील यज्ञवराह याबद्दल बरेच वाचले होते अंतरजालावर . सो ‘सॉलीट्युड’च्या हौशी प्रमाणे ऐनवेळी ठरलेली भटकंती आणी ऐनवेळी ठरलेले ठिकाण हे समीकरण जुळून आले. कोथरूड पासून वारजे ला निघालेलो मी, पुढे सासवड, मोरगाव, जेजुरी, लोणी भापकर असा फिरत फिरत येताना त्यातही हौस म्हणून एक छोटेखानी किल्ला पण करून ९ च्या आत घरात आलो. 

कात्रजला कात्रज डेअरी मध्ये जाऊन ४ पिशव्या फ्लेवर्ड मिल्क/ पिस्ता स्वादाचे दुध घेतले आणि गाडीला टांग मारून पोहोचलो बोपदेव घाटात. २ पिशव्या तेथे फस्त केल्यावर अजून उत्साहाने पुढे सरकलो. सकाळी साडे सातला निघालो घरातून ते वारजे, कात्रज कोंढवा रोड ने सासवड पर्यंत येताना १० वाजले होते.

पहिले डेस्टीनेशन होते संगमेश्वर मंदिर. भर सासवड गावात, सासवड-चौफुला फाट्यापासून ३-४ किमी अंतरावर नदीच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर बरेच प्रसिद्ध आहे.

आजूबाजूचा मस्त शांत परीसर. त्या शांततेत फक्त कपडे धुणाऱ्या बायकांचा कलकलाट. मंदिरात माझ्याखेरीज अजून कोणीच नव्हते. एक छोटासा पूलाने आपण मंदिराच्या समोर पोहोचतो. थोड्या पायऱ्या चढून आपण मंदिराच्या सभा मंडपात पोहोचतो.
पूर्ण मंदिर दगडातून बांधलेले असल्याने भर उन्हातही आत मस्त थंडगार वाटत होते.

पोहोचताच थेट गाभाऱ्यात जाऊन शंकराचे दर्शन घेतले. बाहेर पडून मग मंदिराची प्रदक्षिणा मारताना त्यावरची शिल्प आणी त्याचा इतिहास याचा सांगड घालण्याचा प्रयत्न सुरु झाला.

मंदिर एकाच दगडात कोरून काढले असावे असे वाटले. याचा कळस सोडला तर मुख्य मंदिराची रचना बरीच साध्यर्म असलेली वाटली. येथूनच उजवीकडे एक छोटी वाट खाली जाते तेथेही छोटी छोटी मंदिरे आहेत.

कळसावर केलेले मुर्तीकाम वा कातळकला लक्ष वेधून घेत होती.

येथे कळसावर खूप पक्षी बसले होते आणी सगळे एकत्र मिळून ओरडत होते. तो एक कलकलाट. पण हा मात्र हवाहवासा वाटणारा होता. रोज पारवे बघणाऱ्या नजरांना तेवढाच हिरवागार चेंज. असो.

हे महाशय बराच वेळ कळसावर फुटलेल्या एका झाडावर बसून टेहळणी करत होते.

एकटाच असल्याने यथेच्च फोटो काढत काढत फिरताना घड्याळाकडे लक्ष गेले आणी एकदम पुढचा लोणी भापकर पर्यंतचा बाकी असलेला प्रवास दिसू लागला. 
चला आता येथून पाने घ्यायची वेळ झाली. येथून पुढे ‘चांगवटेश्वर’ मंदिरात जायचे होते. कसे जायचे याची खात्रीजमा झाल्यावर दम खात बसलेल्या गाडीला टांग मारली आणी निघालो.

मंदिरासमोरच्या पुलावरून काही फोटो काढले त्यातला हा खालचा. मंदिरापासून संगमावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत तेथे हा गणपती आहे. एरवी वरून दिसला नसता.

थोडीशी पेटपूजा करून निघालो ‘चांगवटेश्वर’ मंदिरात.संगमेश्वर मंदिरापासून १० मिनिटांवर चांगवटेश्वर आहे.
हे सुद्धा पूर्णतः दगडात कोरलेले मंदिर असावे. तेथील पुजारी काकांनी येथे बरीच डागडुजी केलेली आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यापासून त्यांनी त्यांच्या कुल-पुजारी म्हणून मन असलेल्या या मंदिराचा इतिहास जाणून घेऊन स्व-हस्ताक्षरात एक माहिती फलक लिहिलेला आहे.

आत आजूबाजूला बरीच छोटेखानी मंदिरे आहेत. त्यांचीही थोडी पडझड झाली असली तरी मुख्य मंदिर सुरक्षित आहे.

येथील प्रत्येक खांबांवर यथेच्च शिल्पकला केलेली आहे. भुलेश्वर मंदिराप्रमाणे येथेही महाभारतातील काही युद्धाचे वा द्वंदाचे प्रसंग कोरलेले आहेत.

सभा मंडपापासून ते गाभारा आणी पूर्ण मंदिरभर कातळ कलेचे अप्रतिम दर्शन येथे घडते. मंदिराच्या उजव्या बाजूस मोठ्ठे बकुळीचे झाड आहे. दुसर्या वेळेस पावसाळ्यात तेथे गेलो तेव्हा ते झाड पूर्ण पांढऱ्या फुलांची शाल पांघरून उन खात पहुडलेले होते.

येथे फोटो काढायची परवानगी घ्यावी लागते. पुजारीकाकानी लगेच परवानगी दिली पण जाताना दानपेटीत स्वइच्छेने काहीतरी देण्याच्या बोलीवर.  असो. एकंदर आजूबाजूचा स्वछ परीसर पाहून देणगी देताना काही वाटले नाही. ( नाहीतरी आम्ही देऊन देऊन किती ती देणगी देणार? पण असो फुल न फुलाची पाकळी.)

येथेही अज्जिबात गर्दी नव्हती. मी, पुजारीकाका आणी एक नुकतेच लग्न ठरलेले दोघे. माझा कॅमेरा बघून “त्याने” मला तेवढ्यातल्या तेवढ्यात “त्यांचे” सोनेरी क्षण टिपण्याच्या बिनपगारी कामास लावले.

आता जवळपास बारा वाजले होते. येथून डबा खाऊन पुढे जाणार होतो पण मला जेवण लोणी-भापकरलाच करायचा होता म्हणून मग उरलेल्या दोन पिस्ता मिल्क पाठीवरून पोटात ढकलले आणी निघालो पुढे मोरगाव …
मोरगावला पोहोचलो ते डायरेक्ट मंदिराच्या मुख्य दरवाज्यापर्यंत गाडी घेऊन. एकदोन “भक्त” मंडळी डाफरली पण “जल्दी जानेका हय रे बाबा मेरेकू.”
येथे तुरळक गर्दी होती. अष्टविनायक टाईप पब्लिक आलेले होते. गणपती सोडून त्यांना बाकी सगळ्यात इंटरेस्ट होता. काही “महान” भक्तांनी रांगेत उभे असल्याचा त्रास रिफ्लेक्ट करत गणपतीला मोबाईलवर गाणी लाऊन साद घातली होती. अश्या लोकांचे पाप उदरात घेणारा धन्य तो लंबोदर ! प्रणाम !
रांगेत वैगरे उभे राहणे शक्यच नव्हते. लांबूनच नमस्कार केला आणी थोडावेळ बसून तिकडची स्पेशल अंजिरे पोटात ढकलली.

आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता पोहोचलो लोणी-भापकर.

यज्ञवराह पाहिला आणी वाटले ….. वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!

त्याबद्दल पुढील भागात :
सासवडचीये नगरी : लोणी भापकर
सासवडचीये नगरी :मल्हारगड / सोनोरीचा किल्ला

वाचत राहा.

पासवर्ड

रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टींना पासवर्ड असतो तसा तो आपल्या जगण्याला, आपल्या आयुष्यालाही असतो. प्रत्येक टप्प्यावर तो वापरल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर ” जाऊ दे, सोडून दे” किंवा “शांत रहा”, “काळजी नको”, किंवा “खूष रहा”, “झालं ते झालं” असे अनेक…. जशी व्यक्ती तसा हा परवलीचा शब्द.
बाकी पासवर्ड विसरले जातात, तेंव्हा ते नव्याने मिळवण्याची सोय असते. पण आयुष्याचे पासवर्डस ना विसरण्याची सोय, ना परत दुसरा मिळवण्याची सोय.
ते विसरले तर पदोपदी अडेल, पदोपदी ठेच लागेल, आयुष्याचे परिमाणच बदलून जाईल.
अनेकदा सिंगल साईन ऑन असावे तसे एखाद्या नात्यात हा परवलीचा शब्द बाकी अनेक गोष्टी करतो. म्हणजे एखादवेळी “जाऊदे, सोडून दे” म्हणत सहज मनाने नात्यात एखादी गोष्ट विसरली, माफ करून टाकली तर अनेकदा पुढचा प्रवास सोपा सुकर होतो.

अनेकदा दुसऱ्यांनी वापरलेला असा एखादा परवलीचा शब्द जादू घडवतो. “मी आहे, काळजी करू नकोस”. अनेकदा योग्य व्यक्तीकडून आलेला हा दिलासा जादू घडवतो. मनातून सारा भार हलका होतो आणि पंखात बळ येतं.

पासवर्ड ला जशी स्ट्रेन्थ असते तशी ती आयुष्याच्या पासवर्डला देखील असते. नुसती असतेच असे नाही तरी सकारात्त्मक किंवा नकारात्त्मक अशा परिणामासह ती असते. वर उल्लेखलेले परवलीचे शब्द जसे आयुष्य सोपे, सुकर, आनंदी करू पाहतात, तर “नाही म्हणजे नाही” , ” मीच का?”, “माझ्या नशिबातच नाही”. सारे नकारात्मक प्रवाह असे परवलीचे शब्द निर्माण करत राहतात. दरवाजे बंद करायचे काम ते करतात. प्रत्येक वेळी त्यांच्या वापरासोबत आयुष्य त्याची लवचिकता हरवून बसते, सुखाचे क्षण पाहणे विसरते.

शब्दात परिणाम करण्याची खूप मोठी ताकद असते हे खरेच, स्वत:साठी किंवा अनेकदा दुसऱ्या व्यक्तींसाठी कोणते असे परवलीची शब्द वापरायचे हे शेवटी आपल्या हाती.

रवा आणि कणिक लाडू

साहित्य:
३ वाट्या रवा
२ वाट्या गहू पीठ/कणिक
 १ कप तूप/ चित्रात दाखवलेल्या २ कांड्या
१ वाटी साखर
१ चमचा वेलदोड्याची पूड
चिमूटभर मीठ

कृती:
रवा आणि कणीक पाव कप तूपात मंद आचेवर हलका तपकिरी रंग येईपर्यत भाजा (साधारण १५ मिनिटं)
गार झाल्यावर साखर घालून एकत्र करा. साखर एकदम न घालता थोडी थोडी घातली तर गोडाचा अंदाज येईल. मी करते ते फार गोड करत नाही.
मीठ आणि वेलदोडे पावडर घालून मिश्रण चांगलं मिसळून घ्या.
पातळ तूप घालून लाडू वळा. साधारण छोट्या आकाराचे ४५ लाडू होतात.

सूचना: तूप घालताना मी भाजलेलं मिश्रण थोडं वेगळं घेऊन त्यात थोडसं तूप घालून लाडू करते. उरलेलं रवा, कणिक आणि साखर घातलेलं मिश्रण बंद डब्यात ठेवून देते. त्यामुळे कधीही आयत्यावेळी पटकन थोडेसे लाडू करता येतात.

वगेरे

.

असू दे जरा आवर्षण वगेरे नको रोज देवूस दर्शन वगेरे.

तुझी ओढ केवळ विजातीयतेचीधृवाचे – धृवाशी …

ॐ शनैश्चरम्! मारुती!

                               ॐ
शनैश्चरम्

निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रग्रजम् |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ||

 

                              ॐ सुपारी मारुती औरंगाबाद

 

 


संवाद कमी, आरोपप्रत्यारोपच जास्त !

 बाबासाहेब आंबेडकरांच्या सव्वाशेवे जयंती वर्ष आणि यंदाच्या वर्षांपासून पाळण्यास सुरूवात झालेल्या घटना दिवसाचे औचित्य साधून लोकसभेत घटनेवर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली. 26 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली दोन दिवसांची ही चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या उत्तराने संपली. नेहमीप्रामाणे नरेंद्र मोदींच्या भाषणाचा रोख देशातल्या सामान्य लोकांना जिंकण्याचाच होता. त्यांनी सोनिया गांधींच्या भाषणातील मुद्द्याचा हवाला दिला आणि त्यांच्याशी सहमती दर्शवली. लोकसभेत हे पहिल्यांदाच घडले. खर्गेंचाही त्यांनी उल्लेख केला. सहमतीचे सूर आळवण्यामागे राजकारण आहेच. बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी हा सूर आळवला हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारणाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित करून कोणत्याही व्यवस्थेत स्वतःला आपोआप सुधारून घेण्याचे सामर्थ्य असते, असा युक्तिवाद केला. त्यांच्या भाषणातील ह्या मुद्द्यामुळे बहुतेक खासदारांना बरे वाटले असेल. शपथविधीनंतर संसदेत पहिल्यांदा जेव्हा प्रवेश केला तेव्हा नरेंद्र मोदींनी संसदभवनाच्या पायरीवर मस्तक टेकले होते. मत्था टेकण्याची परंपरा असलेला देश त्यांच्या ह्या लहानशा कृतीने हरखून गेला होता. लोकसभेत त्यांनी केलेल्या भाषणामुळेही लोक निश्चितपणे हरखून जाणार!
घटनेवरील प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या निर्णयामुळे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर ह्यांना वाहिलेली आदरांजली उचितच ठरली. दोन दिवस चाललेल्या ह्या चर्चेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात बसून संपूर्ण चर्चा लक्षपूर्वक ऐकली ह्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. सतत व्यासपीठावर भाषणे देत फिरणा-या मोदींना श्रवणभक्ती करताना सभागृहात पाहणे हा एक दुर्मिळ योग घटनेवरील चर्चेने मिळवून दिला!  काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे ह्यांनी ह्यावरूनही त्यांना टोला मारला तो भाग अलाहिदा. मात्र, चर्चा ही घटनेवरच असल्यामुळे ती मुद्देसूद व्हावी अशी अपेक्षा जर कोणी बाळगली असेल तर फोल ठरली असे म्हणणे भाग आहे. चर्चेची पातळी उच्च ठेवण्याच्या बाबतीत सगळेच खासदार कुठे तरी कमी पडले. ह्या चर्चेत राजकारण्यांचा सहभाग असल्याने ती वकिलवर्गात चालणा-या तालेवार चर्चेसारखी काटेकोर होणार अशी अपेक्षाच नव्हती. नव्या पिढीचे खासदार अभ्यासात कमी पडले. त्यांच्या वक्तृत्त्व कलेचे दर्शनही फारसे घडले नाही.
घटनेवरील चर्चा ही बरीचशी पक्षसापेक्ष व व्यक्तीकेंद्रीत झाल्याचे स्पष्टच दिसून आले. घटनेत काय त्रुटी आहेत ह्यावरच अनेकांनी भर दिला. चर्चेची सुरूवात करताना गृहमंत्री राजनाथसिंह ह्यांनी सेक्युलर शब्दाच्या अर्थावरून घोळ घातला. सेक्युलरॅलिझमचे तत्त्व घटनेत समाविष्ट करण्यात आला ह्यावरच  त्यांनी आक्षेप नमूद केला. अर्थात त्यांच्या युक्तिवादाला पुरस्कार वापसी आणि असहिष्णुतेच्या मुद्द्याची पार्श्वभूमी आहे. वाढत्या असहिष्णुतेच्या प्रश्नावर स्वतंत्र चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवल्यामुळे हा मुद्दा त्यांना त्यावेळी घेता आला असता. संसदेबाहेर उत्तर देण्याची संधी अरूण जेटली घेतच आले आहेत. असहिष्णुतेच्या प्रश्नावर स्वतंत्र उत्तर देण्याची संधी राजनाथसिंगांना मिळणारच होती. ह्यावेळी सेक्युलॅरिझमचा मुद्दा घेण्याची गरज नव्हती. बरे, घेतला तर घेतला! तो त्यांनी अशा पद्धतीने घेतला की त्यायोगे मोदी सरकारचा बचाव होण्याऐवजी मोदी सरकारच्या अडचणीच वाढण्याची शक्यताच अधिक! सेक्युलॅरिझमच्या तत्त्वाचे सरकारला कळलेला अर्थ घटनेत समाविष्ट करण्याइतके संख्याबळ सरकारकडे नाही. दोनतृतियांश बहुमताभावी भाजपा आणि भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्पनेनुससार भारत साकार करणे तूर्त तरी मोदी सरकारला शक्य नाही ह्याचे भान राजनाथसिंगांनी बाळगू नये ह्याचे आश्चर्य वाटते.
राजकीय वास्तवेचे भान सहसा सुटू न देण्याची एक परंपराच काँग्रेसने निर्माण केली आहे. अर्थात काँग्रेसला हा वारसा पूर्वसूरींकडून मिळाला आहे. त्या वारशाशी काँग्रेस पक्षाने फारकत घेतली तेव्हा काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे. असे नुकसान होऊ नये म्हणून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधूभाव ह्या चार तत्वांचा घटनेस भरभक्कम आधार देणा-या घटना समितीला नेहरूंनी जास्तीत जास्त पाठिंबा दिला होता. भिन्न धर्म, भिन्न भाषा, टोकाच्या विचारप्रणाली , परस्परविरोधी संस्कृती आपल्या देशात सुखनैव नांदत आल्या आहेत. भारताचे हे बहुरंगी बहुढंगी चित्र सांभाळले नाही तर नवजात स्वातंत्र्य धुळीस मिळू शकते ह्याची घटनाकारांना जाणीव होती. विश्वमान्य चार तत्वांचा उद्घोष घटनाकारांनी केला नसता तर देशात अराजक माजायला वेळ लागला नसता. आणि देशाचे तुकडे तुकडे व्हायला वेळ लागला नसता!  चार सर्वमान्य तत्त्वांचा उद्घोष घटनेत केला गेला तरच देशात खंबीर लोकशाही सरकार स्थापन होऊ शकते.  राजकीय स्थैर्य नांदू शकते अशी त्यांची ठाम धारणा होती. स्थैर्याशिवाय देशाच्या प्रगतीचा मार्ग निर्वेध राहिला नसता. त्याचप्रमाणे असे सरकार स्थापन करण्याचे ठरले की सरकार तर लोकशाही असले पाहिजे, आणि त्या सरकारची ताकद मात्र एखाद्या हुकूमशाहासारखी असली पाहिजे !  सर्वे सुखिनः भवन्तु ह्या वैदिक काळापासून चालत आलेल्या आपल्या प्राचीन संस्कृतीशी तडजोड करायची नसेल तर धर्माच्या पायावर भारत राष्ट्र उभे करण्यापेक्षा खंबीर धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या पायावर उभे केले तरच आपल्याला यश मिळू शकेल. तेही लोकशाही शासनव्यवस्थेच्या साह्याने हे एक आव्हान होते. ते आव्हान घटनाकारांनी स्वीकारलेही.
वास्तव आणि आदर्श ह्यांत मेळ कसा बसवायचा हे नेहमीच आव्हान असते. त्याखेरीज भारतविशिष्ट परिस्थितीचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. ते स्वीकारताना जगात काय चालले आहे ह्याचाही मागोवा घटनाकारांनी घेतला. घटना समितीत अनेक वकील, विद्वान, शास्त्रवेत्ते, शेती, उद्योग व्यवसायाचा गहन अभ्यास केलेल्यांचा भरणा होता. तीच परंपरा नेहरूंच्या पंतप्रधानपदावर असतानाच्या काळात कायम राहिली. आणीबाणीच्या काळानंतर मात्र देशाच्या सर्वोच्च सत्तातंत्रात थोडा बदल होताच फार मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतरच्या काळात अभ्यासू खासदारांचा लोकसभेत मोठी वानवा भासू लागली. सोळाव्या लोकसभेत तर ठोकळेबाज विधाने करण्याची स्पर्धाच सुरू आहे की काय असा भास होतो.
सध्याच्या काळात लोकशाहीला घटनेपेक्षा परमतसहिष्णुतेचाच मोठा आधार आहे ह्याचाच अरूण जेटली आणि राजनाथसिंगांना विसर पडलेला दिसतो. पूर्वी मंत्र्यांना त्यांचे सचिव भाषणे लिहून देतात अशी टीका होत असे. लिहून दिलेले भाषण करण्याचा त्यांना कधी संकोच वाटला नाही. कारण भाषण करता येणे हे काही एकच एक बलस्थान असू शकत नाही. प्रत्येक राजकारण्यांची स्वतंत्र बलस्थाने असतात. एके काळी  भाषणे करणे हे भाजपा नेत्यांचे बलस्थान होते. अगदी वाचाळतेचे त्यांना वरदान लाभले आहे की काय असे वाटावे इतपत ते बलस्थान होते. गेल्या महिनाभरात भाजपा नेत्यांचे भाषणप्रेम असे काही उफाळून आले की बस्स! सार्वजनिक वक्तव्य करताना तपशिलाचा किंवा नावानिशी कोणाचा उल्लेख करण्याची गरज नसते. पण आमीरखानाच्या उद्गारावर भाजपातल्या ऐ-यागै-यांनी देखील तोंडसुख घेतले. ह्याउलट काँग्रेस नेत्यांची स्थिती आहे. त्यांना मुळी बोलताच येत नाही. मल्लिकार्जुन खर्गे ह्यांना म्हणायचे होते एक अन् तोंडातून निघाले भलतेच. गरीबवर्गाला आणि अल्पसंख्यांकांना देण्यात आलेले घटनात्मक संरक्षण काढून घेतल्यास देशात रक्तपात होईल, असे ते म्हणाले. त्यांच्या ह्या उद्गाराला धमकीचे स्वरूप असल्याचे वेंकय्या नायडूंनी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन ह्यांच्या लक्षात आणून देताच खर्गेंचे शब्द कामकाजातून काढण्याचे आश्वासन सुमित्रा महाजनांनी दिले. खरे तर रक्ताचे पाट वाहण्याची भीती त्यांना व्यक्त करायची होती. ह्यापूर्वी लोकसभेत भाषण करताना अनेकांनी अशी भीती व्यक्त केली असून ती पूर्ण संसदीय होती. खर्गेंनीही भीती व्यक्त करायची होती. पण त्यांच्या बोलण्यातून धमकी ध्वनित झाली. भाषेतले बारकावे मुळातच समजत नसतील तर संसद चालणार कशी?
वास्तविक लोकभावनांचा आवाज  उठवून सरकारला त्यात लक्ष घालण्यास भाग पाडणे हे विरोधकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी रोडमॅप स्पष्ट पाहिजे. पण भविष्य काळातल्या रोडमॅपच्या कल्पनांचे चित्र  ह्या चर्चेत खासदारांना रेखाटता आले नाही हे सखेद नमूद करावे लागते. न्यायालयीन निर्णय आणि संसद तसेच सरकार ह्यांच्यात संघर्ष उभे राहण्याचे प्रसंग गेल्या काही वर्षात उभे राहिले आहेत. पण ते कसे टाळावेत ह्याची पक्षातीत भूमिकेतून खासदारांना चर्चा करता आली असती. परंतु खासदारांनी ती संधी वाया दवडली असे म्हणणे भाग आहे. घटनेवरील चर्चा ती आरोपप्रत्यारोपांच्या गतानुगतिक वळणाने पुढे जात राहिली. संवादापेक्षा आरोपप्रत्यारोपांची राळच अधिक प्रभावी ठरली. संदीय चर्चेबद्दल एकच चांगले म्हणता येईल. ते महणजे खासदारांची कळकळत्यांची कळकळ शंभर टक्के खरी होती. हेही नसे थोडके!

रमेश झवर
www.rameshzawar.com

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड

कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्‍या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.

या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा.रं. उर्फ़ रावसाहेब बोराडे भूषविणार असून संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार श्री सुरेश द्वादशीवार यांचे हस्ते संपन्न होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार व शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी जबाबदारी स्वीकारली असून उद्‍घाटन सत्राला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. अगदी साहित्यक्षेत्र सुद्धा याप्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे आढळून येत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण, मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव, शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय, शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून, शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान, चालू दशकातली शेतकरी कविता, शेतीच्या मुक्तीसाठी मार्शल प्लॅनची गरज अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक मा. बाबाराव मुसळे, डॉ शेषराव मोहिते, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संजय पानसे, शेतकरी नेते रवी देवांग, गुणवंत पाटील, सरोज काशीकर, प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, कडुआप्पा पाटील, संजय कोले, शेतीविषयाचे गाढे अभ्यासक डॉ दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. डी.एन राऊत, गोविंद जोशी अजित नरदे, अनिल घनवट इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.

नवसाहित्यिकांना शेतकरी आत्महत्यांच्या दाहक वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून “शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून” हा विशेष परिसंवाद ठेवण्यात आला असून परिसंवादात विदर्भातील ज्येष्ठ, व्यासंगी व अनुभवी पत्रकार भाग घेणार आहेत. हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.

संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. ज्ञानेश वाकुडकर भूषवतील. या संमेलनात शरद जोशी विशेषांक, प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह व गंगाधर मुटे लिखित नागपुरी तडका या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. रात्री १०.०० वाजता नवनाथ पवार लिखित, स्वप्नील शिंदे दिग्दर्शित व स्वप्न, पुणे व्दारा निर्मित तुला कसला नवरा हवा ही एकांकिका सादर केली जाईल.

या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा मला विश्वास आहे.
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********

Filed under: शेतकरी साहित्य संमेलन, शेती विषयक, समारंभ, साहित्य चळवळ Tagged: शेती आणि शेतकरी, शेती विषयक

फेस बूक Happy Thanksgiving, Vasudha!

             ॐ

फेस बूक

 

Happy Thanksgiving, Vasudha!

 

No matter what’s on your table or who’s gathered around it, may everyone’s hearts and bellies be full.

 

https://video-atl3-1.xx.fbcdn.net/hvideo-xfa1/v/t43.1792-2/12303578_1716518801911160_192900145_n.mp4?efg=eyJybHIiOjE1MDAsInJsYSI6MTAyNCwidmVuY29kZV90YWciOiJzdmVfaGQifQ%3D%3D&rl=1500&vabr=123&oh=eb8016acccc7c996008c770d13eefc72&oe=5657BCE0

 

 

सकाळचा नाश्ता : अरबी(अळू) परांठा, स्पेशल रेड सूप आणि आंवळा चटणीकाल संध्याकाळी लेक माहेरी आली.    तिचे सासरे नुकतेच हिमाचलच्या आपल्या गावातून दिल्लीला परतले होते. लेकी सोबत एक पिशवीभर अरबी आणि आले (त्यांच्या सीढ़ीदार शेतातले – शुद्ध नेसर्गिक) पाठविले होते. आज सकाळी उठल्यावर ती म्हणाली आज सकाळचा नाश्ता मी बनविणार. (लेकी माहेरी आराम करायला येतात, पण माहेरी आल्यावर काम करायचा उत्साह का संचारतो, कधीच कळत नाही) असो. पराठा, सूप आणि चटणी असे करायचे ठरले.

घरात दुधी होती, टमाटर महाग असल्यामुळे १/२ किलोच आणले होते. पण लाल सुर्ख लौह तत्वाने भरपूर बिट्स हि घरात होते. सूप म्हंटले कि लाल रंग हा पाहिजेच.  तिने सर्व वस्तू एकदम बनवायला सुरुवात केली (कसे जमते तिला, मला कधीच कळले नाही) .

आंवळा चटणी (साहित्य): साहित्य  आंवळे ५-६, कोथिंबीर, हिरवी मिरची २, आले  १/ इंच, लसूण ५-६ पाकळ्या, जिरे १/२ मोठा चमचा, १/२ काळीमिरी पूड, हिंग १/२ लहान चमचे, गुळ एक लहान तुकडा, ओले खोबरं २ चमचे आणि मीठ स्वादानुसार.


प्रथम आवळ्यांच्या बिया काढून चिरून घेतले. नंतर  खोबर, कोथिंबीर, आले, लसून, चिरे, हिंग, गुळ आणि मीठ इत्यादी सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घेतले.  आवळ्याची चटणी तैयार झाली.

स्पेशल रेड सूप (साहित्य) : अर्धा किलो दुधी भोपळा, १/२ बिट्स (चुकुंदर), २ टोमाटो, २ आवळे, गाजर २ लहान. या शिवाय  आले १/२ इंच, (१/२ चमचे जिरेपूड, १/२ चमचा काळी मिरी पूड, हिंग १/२ छोटा चमचा, मीठ स्वादानुसार.

कृती: दुधी भोपळा, गाजर, बिट्स, आवळा, टमाटरचे तुकडे करून १ गिलास पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घेतले. कुकरचे झाकण उघडून त्यात १ गिलास थंड पाणी टाकले. घरी हाताचे मिक्सर असल्यामुळे कुकरमध्येच फिरवून घेतले.    सूप जास्त पातळ करायची गरज नाही किंवा गाळून घेण्याची हि नाही. नंतर त्यात आले किसून जिरे, काळी मिरी आणि हिंगाची पूड हि टाकून कुकर गॅस वर ठेऊन एक उकळी काढून घेतली.   

अरबी परांठा (साहित्य) : अर्धा किलो अरबी, १/२ बिट्स (चुकुंदर),२ कांदे, ५-६ लसणाच्या पाकळ्या, ३-४ हिरव्या  लसणाच्या दांड्या, कोथिंबीर  १/२ जुडी, ३-४ हिरव्या मिरच्या  (मोठा चमचा: १/२ चमचे जिरे, १ ओवा, १०-१५ काळीमिरी दाणे यांची पूड करून घेतली), १ चमचा धने पूड, १ चमचा अमचूर, २ चमचे चाट मसाला, १/२ चमचे हळद, १/२ चमचे तिखट  आणि मीठ स्वादानुसार.

शिवाय तीन वाटी कणिक. पराठ्यांसाठी.          

कृती: (पराठ्याचे सारण): प्रथम गॅस वर अरबी उकळून घेतली. थंड झाल्यावर अरबीचे साल काढून, अरबी किसून घेतली. बिट्स हि किसून घेतले. कांदा, कोथिंबीर, हिरवे लसूण, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. सर्व मिश्रण एकत्र करून त्यात धने, अमचूर, चाट मसाला, जिरे-ओवा-काळीमिरीची पूड आणि  हळद टाकून मिश्रण एकजीव केले.  (तिखट खाणारे  जास्त तिखट हि टाकू शकतात).  हे झाले पराठ्याचे सारण.

आता जसे बटाट्याचे पराठे करतो त्याच प्रमाणे कणकीच्या गोळ्यात भरपूर सारण भरून, पोळी लाटून तव्यावर तेल/ तूप सोडून खरपूस परांठे भाजून घ्या.