WordPress.com 5 years ago!

ॐ                दिनांक 31.10 ( अक्टोबर ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

वसुधालय ब्लॉग लिखाण मी लिहित आहे.
पांच ५ / 5 वर्ष झाली आहेत.

त्याची नोंद word press यांनी घेतली आहे.

                     ॐ               

                  ACHIEVEMENT

Happy Anniversary with WordPress.com!

You registered on WordPress.com 5 years ago!

Thanks for flying with us. Keep up the good blogging!

5 Year Anniversary Achievement

img_05761

अनेक भाषांचे पितृत्व असलेली वैदिक भाषा

     ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन धार्मिक साहित्य मानले जाते हे खरे नाही. गाथांची रचना ऋग्वेदपुर्व आहे असे भाषाविद मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले आहे. त्याहीपुर्वी इसपू २४०० मधील पिर्यमिडमद्ध्ये कोरलेले “पि-यमिड टेक्स्ट”  (Piramid Texts) हे सर्वात प्राचीन व लिखित स्वरुपात असलेले धार्मिक साहित्य आहे. उलट ऋग्वेद व अवेस्त्याचा तसा पुरातनत्वाचा लिखित पुरावा काहीएक उपलब्ध नाही. ऋग्वेदाची भाषा ही  मुळची होती तशीच उरलेली नसून तीवर अनेक वेळा संस्कार झालेले आहेत. त्याकडे वळण्याआधी वैदिक भाषेबद्दल विद्वानांची विविध मते काय आहेत हे आपण प्रथम पाहू.

१) ऋग्वेदाच्या भाषेचे अवेस्त्याच्या भाषेशी निकटचे साम्य असून काही ध्वनी बदलले कि त्याचे सरळ वैदिक संस्कृतमद्ध्ये रुपांतर होऊ शकते. ….ऋग्वेदातील दहावे मंडल वगळता उर्वरित भागाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि त्यावर अनेक संस्करणे झालेली असून ती उणे केली तर एकाच कोणत्यातरी शुद्ध भाषेचा संबंध लागतो. ऋग्वेदाच्या संपादकांनी अन्य धार्मिक साहित्याच्या भाषेला काही प्रमाणात तरी आपलेसे केलेले दिसते. अशा भाषिक उधारीची अनेक उदाहरणे ऋग्वेदात आहेत. ऋग्वैदिक व्याकरणही अशा भाषिक प्रदुषनाने दुषित असल्याचे अनेक संकेत मिळतात. वैदिक भाषा ही पाश्चिमात्य भाषा होती, जशी अवेस्त्याची ज्यात र आणि ल हे वर्ण मिश्र होऊन जातात.  ऋग्वेदातील व्याकरणही दोन भाषांचा संघर्ष दाखवते असा जे. ब्लोख यांच्या वैदिक भाषेबद्दलच्या कथनाचा सारांश आहे.

२) प्राकृत भाषांना कोणत्याही एकाच उगमापर्यंत नेता येत नाही. त्या किमान संस्कृत भाषेतून तर नक्कीच उगम पावलेल्या नाहीत, ज्याप्रमाणे भारतीय विद्वान आणि होप्फर, लास्सेन, ज्यकोबी वगैरे समजतात. वैदिक भाषेचा शब्दसंग्रह आणि व्याकरण हे प्राकृत प्रकृतीशी मिळते, अभिजात संस्कृतशी नाही, त्यामुळे संस्कृतमधुन प्राकृत भाषा विकसित झाल्या हे मत मान्य करता येत नाही असे रिचर्ड पिशेल स्पष्टपणे, अनेक उदाहरणे देत नमूद करतो.

३) प्राकृत भाषांतील अनेक शब्द व प्रत्यय संस्कृतपेक्षा वैदिक भाषांशी अधिक मेळ खातात. प्राकृत जर संस्कृत भाषेतून उत्पन्न झाली असती तर असे झाले नसते. वैदिक भाषा व प्राकृत भाषा पुरातन प्राकृतातुनच उत्पन्न झाल्या असाव्यात कारण त्याशिवाय असे साम्य आढळून आले नसते. वैदिक भाषेत ऋकाराऐवजी उकार, (वृंदऐवजी वुंद) अनेक ठिकाणी होणारा वर्णलोप (उदा. दुर्लभ ऐवजी दुलह) इत्यादि. वैदिक भाषा ही संस्कृताशी समकक्ष नसून प्राकृताशी समकक्ष अथवा प्राकृतसमान आहे असे हरगोविंददास टी. सेठ सप्रमाण दाखवून देतात.

४) अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या भाषेमद्ध्ये तर ध्वनीशास्त्रदृष्ट्या पुष्कळ साम्य आहे. यज्ञ- यस्न, असूर-अहूर, देव-दएवा, सोम – हओम, सप्त – हप्त, मित्र- मिथ्र, मगवन- माघवन इत्यादि देवतानामांत तर साम्य आहेच पण अनेक मंत्रही ध्वनी बदलुन जसेच्या तसे वैदिक भाषेत रुपांतरीत करता येतात. मात्र इ व ओ या स्वरांचे अनेक प्रकार अवेस्तनमद्ध्ये होतात तसे ते वैदिक भाषेत होत नाहीत. फरक आहे तो वाक्यरचनेच्या व शब्दसंग्रहाच्या बाबतीत. शब्द समान असले तरी अर्थ विभिन्न झालेले दिसतात. सायनाच्या भाष्यानुसार जेंव्हा ऋग्वेदातील अनेक शब्दांचा अर्थ लावायला अडचण भासू लागली तेंव्हा पाश्चात्य विद्वानांनी अवेस्त्याच्या भाषेची मदत घेतली. अवेस्त्याची भाषा वैदिक भाषेला अधिक निकटची आहे याबाबत आता कोणाही विद्वानाच्या मनात शंका नाही. किंबहुना अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या धर्मकल्पनांतही कमालीचे साम्य आहे.

५) अवेस्त्याची भाषा ही वैदिक भाषेपेक्षा अधिक पुरातन आहे असे मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले असून ऋग्वेदाच्या मुळ भाषेवर किमान पाच संस्कार झाले असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

६) ऋग्वेदातील १०. ७१.१-२ या ऋचांवरुन स्पष्ट दिसते कि वैदिक ऋषींनी नवीनच भाषा बनवली. जसे धान्य पाखडले जाते त्याप्रमाणे शब्द पाखडून भाषा बनवली असे ऋषी या ऋचांत म्हणतो. अनेक बोलीभाषांतून शब्द घेत ही नवी भाषा बनली असल्याचे निर्णायक पुरावे ऋ. ८.१.५.५ आणि ८.९५.५ या ऋचांतही मिळतात. पाश्चात्य विद्वानांनी संस्कृत आधी व प्राकृत बोलीभाषा हा क्रम दिला तो चुकीचा आहे असे मत डा. प्रमोद पाठक यांनी मांडलेले आहे.

७) म्यक्समुल्लर म्हणतात, “ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसूक्त हे भाषा आणि आशयाने खूप नंतरचे आहे. वसंत, ग्रीष्म हे ऋतू ऋग्वेदात अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत. शूद्र शब्दही अन्यत्र येत नाही.” (A History of Ancient Sanskrit Literature”, by F. Max Muller, 1859, page 570) याचा अर्थ एवढाच कि या सुक्ताची रचना वैदिक लोक/प्रचारक भारतात आले व वैदिक भाषेत सुधारणा करण्याच्या अंतिम टप्प्यात, ती अधिक सुडौल बनवल्यानंतर झाली आहे. कोलब्रुकसुद्धा म्हणतात कि या सुक्ताची रचना वैदिक भाषेला अधिक संस्कारित व शुद्ध बनवल्यानंतर ही रचना झाली आहे. (Miscellaneous Essays, Volume 1, By Henry Thomas Colebrooke, see footnote, 1837, page 309)

८) ऋग्वैदिक भाषेत जवळपास ६% शब्द हे द्रविड, मुंड च कोल भाषेतून आलेले आहेत.

वरील अल्प विवेचनावरून लक्षात येणारी महत्वाची बाब म्हणजे वैदिक भाषा ही संस्कृत नाही तर प्राकृताप्रमाणेच, पण एक स्वतंत्र, अनेक भाषांचा आधार घेत बनलेली भाषा आहे. सेठ म्हणतात त्याप्रमाणे ती भाषा कोणा एकाच प्राकृत भाषेतून निर्माण झालेली नाही, परंतु या भाषेवर स्थानिक प्राकृतांचा प्रभाव निश्चयाने आहे. परंतू ऋग्वेदाच्या धर्मकल्पना आणि ऋग्वेदाची भाषा यावर उत्तर अफगाणिस्तानात स्थापन झालेल्या पारशी धर्म व धर्मग्रंथाच्या भाषेचाही निकटचा संबंध असल्याने ऋग्वेदाची मुळ भाषा ही अवेस्त्याच्या निकटची, समकक्ष असणार हे उघड अहे. विट्झेल म्हणतात त्याप्रमाणे मुळ ऋग्वेदाच्या भाषेत अनेक वेळा बदल केले जात शेवटचे संस्करण हे इसपूच्या तिस-या शतकात किंवा त्याहीनंतर झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच ऋग्वैदिक भाषा ही मुळची अवेस्त्याच्या समकक्ष व भारतात आल्यानंतर त्यात मुर्घन्य वर्णांचा समावेश होत प्राकृत व्याकरण व शब्दसंग्रह घेत अनेक संस्करणांतुन गेलेली आहे. त्यामुळे वैदिक भाषेला आपण एकार्थाने मिश्र भाषा म्हणू शकतो.

ऋग्वेद हा पठणपरंपरेने जसाच्या तसा जपला गेला असता तर हे भाषिक वैविध्य व तेही प्राकृत व अवेस्त्यासमान, पण प्राकृतही नव्हे किंवा संस्कृतही नव्हे, अशा वैदिक भाषेत आले नसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात कि वैदिक भाषेत जे शब्दवैविध्य व रचनासैलत्व आहे ते पाणिनीच्या संस्कृतातून गायब झालेले आहे. वैदिक भाषेवर अवेस्त्याची भाषा, भारतातील तत्कालीन प्राकृत भाषा यांचा एकत्रीत प्रभाव स्पष्ट दिसतो. स्वभावत:च दोन्ही भाषांतील शब्दही ध्वनीबदल करत वैदिक भाषेत आलेले असल्याने शब्दवैविध्यही दिसते. म्हणजेच वेळोवेळी ऋग्वेदाच्या भाषेवर संस्कार करण्यात आले आहेत. ही भाषा स्वतंत्र नाही. तिचे पितृत्व अनेक भाषांकडे जाते.

थोडक्यात अवेस्तन समकक्ष भाषेचा पाया घेत त्यावर इतर अनेक अन्य प्राकृत व द्रविड/मुंड/कोल या भाषांचे संस्कार करत जी अत्यंत वेगळी  बनवली गेली ती (व नंतर वैदिकांनाही समजायला अवजड जायला लागली ती) सर्वस्वी नवीन व अर्वाचीन भाषा म्हणजे वैदिक भाषा!

      त्यामुळे ऋग्वेद निर्मितीपासून होते तसेच्या तसे पाठांतराने जतन केले गेले या दाव्याला काही अर्थ नाही.

गणपति बाप्पा

                     ॐ                 दिनांक 30. 10 ( अक्टोबर ) 2015.
                                            आश्र्विन कृष्णपक्ष चतुर्थी
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष

प्रणव चिवटे यांनी काढलेला गणपती आहे. .
आज संकष्ट चतुर्थी आहे. शुक्रवार आहे. .
गणपति बाप्पा प्रणव नां पाव !

गणपति ला माझा नमस्कार.
बाकि ठिक.  छान.
वसुधालय

 

aca1f8502b4ebf0e18dd9e09

करक चतुर्थी

                    ॐ            दिनांक 30. 10 ( अक्टोबर ) 2015.
                                              आश्र्विन कृष्णपक्ष

शुक्रवार ३ / ४ संकष्ट चतुर्थी करक चतुर्थी

करक चतुर्थी नवरा याचे आयुष्य वाढावे चंद्र पाहून जेवावे करतात.
महाराष्ट्र मध्ये हरतालिका चांगला नवरा मिळावा साठी करतात.
जेष्ठ पौर्णिमा नवरा याचे आयुष्य वाढावे जन्मो जन्मी हा चं
नवरा मिळावा साठी उपवास वृत्त करतात.
मला तर ह्या १० / १५ वर्ष मध्ये करवा चोर करक चतुर्थी
माहित झाली आहे.

मी संकष्ट चतुर्थी केल्या आहेत चंद्र पाहून जेवले आहे पण
करक चतुर्थी म्हणून कधी उपवास वृत्त केले नाही.

तरी माझे आयुष्य सफल संपूर्ण झाले आहे.
ह्यांनी माझ्या सर्व ईच्छा पूर्ण केल्या आहेत.
मूल झाली. घर झाल.
महाराष्ट्र मधील चार ४ देवी शक्ती पीठ झाली.
पत्नी बाई म्हणून सर्व ईच्छा पूर्ण झाल्या आहेत.
वट पौर्णिमा वृत्त याला मी जास्त मानते असो
करक चतुर्थी ला सर्व मना सारखं झाल साठी
मी माझ्या आयुष्य याला नमस्कार करत आहे.

बाकी ठिक. छान.
वसुधालय.

IMG_4399[2]IMG_4470[1]

ॐ देव व गुरुं ची भक्ती !

ॐ                दिनांक 29. 10 ( अक्टोबर ) 2015.
                          गुरुवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार

ॐ देव व गुरुं ची भक्ती !

कोल्हापूर येथील राजाराम पुरी आठवी ८ गल्ली रोड
येथील दत्त देऊळ ! मंदिर आहे तेथे मी नेहमी जात असते.
दत्त यांना नमस्कार

देव असो गुरुं असो नुसतं रूप फोटो पाहून मन भरत.
मनाला एक प्रकारे तेज याने उच्छाह येतो.
सर्व देव किंवा गुरुं बद्दल माहिती पाहिजे असं नाही दर्शन
पाहून पाहून मन त्यात भरून रमून जात व सारखं सारखं पहावस वाटत
आपण देव दर्शन गुरुं दर्शन करतो घरी काही गुरुं चे फोटो रूप
असतात रोज नमस्कार करतो व मंत्र जप करतो वर्षा नं वर्ष करत आलेले असते
मन त्यात नक्की च रमत
नमस्कार दत्त देव यांना ! व सर्व गुरुं यांना पण नमस्कार !

img_38451img_04911

dscf3513dscf35141

वेद आणि वेदाज्ञा

खरे तर वेद तीनच आहेत. सामवेदाला स्वतंत्र वेद मानता येत नाही कारण तो ऋग्वेदातील ऋचांचे गायन करण्याबाबतचा वेद आहे. अथर्ववेद तसे पहायला गेला तर ऋग्वेदविरोधीच आहे. तो विशेषकरून जादु-टोण्याची वेद आहे. या वेदात यतुकर्मे असून यज्ञोपयुक्त सुक्ते आजीबात नाहीत. ऋग्वैदिक देवतंचे स्थानही यात अध:पतीत झालेले आहे. यजुर्वेद मात्र पुर्णतया याज्ञिक कर्मकांडाने भरलेला आहे. यज्ञ ही वैदिकांची मुख्य धर्मसंस्कृती मानली तर अथर्ववेद त्यात मुळीच बसत नाही. आणि या वेदाला चवथा वेद उशीरापर्यंत मानले जातच नव्हते यातच या वेदाला वैदिकच किती मानत होते हे दिसते. अथर्वन ब्राह्मण भारतात आजही अत्यल्प आहेत एवढे सांगितले की पुरे.

भारतात वेदाज्ञा, वेदमान्यता याचे स्तोम मध्ययुगात तरी खूप होते असे दिसते. किंबहुना भारतातील कोणत्याही विचारधारेला वेदमान्यतेचे नाटक करावे लागे. त्याखेरीज तत्कालीन विद्वान त्या तत्वधारेला महत्वच देत नसत!

प्रत्यक्षात कोणत्या वेदमान्यता आहेत हे मात्र तपासून पहायचे कष्ट तत्कालीन विद्वानांनीही घेतलेले दिसत नाहीत.

कारण-

१) ऋग्वेदात समाजरचनेबाबत कसलेही दिग्दर्शन नाही. अगदी वर्णव्यवस्थेचेही.
२) सामाजिक नीतिनियमांबाबत ऋग्वेद प्रचंड परस्परविरोधी आहे. म्हणजेच नैतिकतेचा मापदंडही ऋग्वेद नाही.
३) ऋग्वेदात अन्य विरोधी समाजघटकांबाबत अत्यंत हिंसक आणि विद्वेषी घोषणांची/कृत्यांची रेलचेल आहे.
४) ऋग्वेद सांख्य, वैशेषिक आदि तत्वज्ञानांच्या विरोधात आहे.
५) ऋग्वेद मुर्तीपुजेच्या विरोधात आहे.
६) यजुर्वेदात मुर्तीपुजेचा ठाम विरोध आहे.
७) ऋग्वेदात विवाह आणि अपत्यजन्म (त्यातही पुत्रजन्म) महत्वाचा आहे. संन्यास ऋग्वेदाला मान्य नाही.

यापुढे जाऊन ऋग्वेद अथवा अन्य कोणताही वेद जे सांगत नाहे त्या धर्माज्ञा वेदमान्य म्हणून वैदिकांनी कोणत्या वैदिक अधिकाराने काढल्या हा खरा प्रश्न आहे. गुरू ही संकल्पना खुद्द वेदांत नाही. आश्रम संकल्पनाही वेदांत नाही. मग या संकल्पना वेदमान्य का मानल्या गेल्या?

केवळ वैदिकांनी सांगितल्या म्हाणून?

त्या नंतरच्या वैदिक धर्मातील सुधारणा असू शकतात असे आपण म्हणू. पण वेदमान्यता आहे तर वेदांतच मुळात त्याला आधार काय बरे?

तो त्यांनी गुह्यसुत्रे ते स्मृत्यांतही दिलेला नाही. श्रौत हे वेदांनाच आधारस्तंभ मानणारे कडवे वैदिक तर स्मार्त हे स्मृत्यांनाच मुख्य आधारस्तंभ माननारे वैदिक! स्मार्तांनी पंचायतन घेतले तो त्यांचा नाईलाज. पण तात्विक आधारस्तंभ काय तर स्मृत्या. याबद्दल सविस्तर मी क्रमश: लिहिणंच…पण मुख्य प्रश्न हा आहे कि वेदमान्यता या गोष्टींत कोठे आहे?

ऋग्वेदात जाती नाहीत. ऋग्वेदात वर्ण नाहीत. बरीचशी उपनिशदे वैदिक नाहीत तर वेदविरोधी आहेत. दर्शनांचीही तीच गत आहे. आणि ते तात्विक विरोध दूर ठेवले तरी अमुकला मान्यता तमुकला नाही असे वेदांत कोठेच नमूद नाही. मग वेदमान्यता ही यांची कल्पनाशक्ती होती काय यावरही विचार करायला हवा.

हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. ज्या बाबींचा मुळात उल्लेखच वेदांत नाही त्या वेदमान्य कशा? वेदमान्य म्हणून वैदिकांसाठी अनुकरनीय कशा? आणि वैदिकांनीच वेदांत जे मान्य आहे ते अव्हेरले असेल (उदा. गोमांसभक्षण) तर ते तरी वैदिक राहिलेत काय?

विचार करा. वैदिकतेचे स्तोम या देशात खूप माजवले गेलेले आहे. त्या स्तोमाने वैदिकांसह सर्वांचाच होम केला आहे.

विचार करा!

मार्क्स आणि मार्क

कम्युनिझमचा जनक कार्ल मार्कस् चे आयुष्य ओढगस्तीत गेले. सोशल मिडिया सम्राट, फेसबुककर्ता मार्क झुकरबर्गचा मात्र जगातल्या शंभर श्रीमंत माणसात समावेश होतो! भांडवलशाहीचे स्वरूप उघडेनागडे करणारा कार्ल मार्क्स जगभर गाजला. त्याने मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या बळावर अर्ध्या जगावर कम्युनिस्टांचे राज्य आले. ते अर्धशतकाहूनही अधिक काळ चाललेदेखील! मार्क झुकरबर्गने 2004 साली सुरू केलेल्या सोशल साईटमुळे जगातील शंभर कोटी (एकावर 12 शून्य) लोकांवर वैचारिक सत्ता स्थापन झाली. भारतातल्या 1 कोटी 12 लाख लोकांचाही ह्या शंभर कोटीत समावेश आहे. गेल्या खेपेस नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर गेले तेव्हा त्यांनी मार्क झुकरबर्गची त्याच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली होती. ह्या पार्श्वभूमीवर मार्क झुकरबर्ग चा दौरा गाजत आहे. मार्क झुकरबर्गने दिल्ली आय आय टीत घेतलेल्या सभेत केलेल्या भाषणात जे मुद्दे मांडले त्यांची वर्तमानपत्रांनी जांगलीच दखल घेतली. परंतु त्याने मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना प्रसिद्धी मिळली नाही. ज्याला फार तर ह्युमन इंडरेस्टचा मुद्दा म्हणता येईल त्या मुद्द्यांना मात्र भलतीच प्रसिद्धी मिळाली. तुम्ही ज्या प्रकारच्या चुका करू शकतात त्या सर्व प्रकारच्या चुका मी केलेल्या आहेत’  ह्या त्याच्या मुद्द्याला मात्र मिडियाने भरमसाठ प्रसिद्धी दिली.
2004 साली फेसबुक इनकॉर्पोरेट स्थापन झाल्यापासून कंपनीचा नफा आणि भागभांडवल सतत वाढत असून 2014 साली कंपनीचे भांडवल 207 कोटीहून अधिक झाले. 29 ऑक्टोबर रोजी ह्या कंपनीच्या शेअरचा भाव 104.20  डॉलर होता. 2004 साली फेसबुक कंपनी स्थापन झाली तेव्हा कंपनी चालवण्यासाठी पैसा उभा करण्याची समस्या त्याच्यापुढे होती. हिटस् वाढवण्यासाठी साईटवर अश्लील सदरात मोडेल असे साहित्य, छायाचित्रे मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या सहका-याने टाकून पाहिली. पण साईटचे हिटस् काही वाढले नाही. ह्या गिमिकचा उपयोग होणार नाही असे लक्षात येताच त्याने फेसबुकला सामाजिक स्वरूप दिले. त्यानंतर 2013 साली फोसबुकच्या व्यापारात 55 टक्के वाढ होऊन भांडवल 787 कोटींवर गेले.
आज घडीला दररोज फेसबुक साईट उघडून किमान लाईक करणा-यांची संख्या वाढतच चालली आहे. खातेदारांची वाढती संख्या, वाढते लाईक्स, वाढत्या पोस्टस्, वाढते फोटो हाच ह्या कंपनीचा माल आहे. खाते उघडण्यासाठी तुमच्याकडून कुठलीही फी आकारली जात नाही की तुम्ही ज्या पोस्ट लिहीता त्यासाठी तुम्हाला कुठलंही मानधन दिले जात नाही. फेसबुकला अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांकडून जाहिराती मिळतात. जाहिरातींचे उत्पन्न हेच ह्या कंपनीचे नफे मिळवण्याचे साधन. फुकट मिळालेली माहिती वाचण्यासाठी किंवा स्वतःला अभिव्यक्त होण्यासाठी तुम्ही जेव्हा कीबोर्ड हिट करता तेव्हा कंपनीच्या लोकप्रियेत भर पडत जाते. लोकप्रियता हा जाहिरातींच्या दराचा निकष आहे हे ओळखून भारतातल्या बाजारपेठेचे मार्क झुकरबर्गला आकर्षण वाटत असेल त्यात त्यात काही चूक नाही.
जगातला सर्वात मोठा लोकशाही देश असल्याने आणि भारत हा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भृप्रदेश असल्याने येथे फेसबुकला हिटस् वाढवायला भरपूर वाव आहे हे मार्क झुकरबर्ग ओळखून आहे. जगातल्या लोकांचा एकमेकाशी संपर्क राहिला पाहिजे आणि एकमेकांच्या विचारांची अदानप्रदान सुरू राहिली पाहिजे ह्या शब्दात फेसबुकचे ध्येय त्याने स्पष्ट केले. परंतु फेसबुक बाहेरही मोठे जग असून त्या जगाचा काय परिणाम होतो तिकडेही लक्ष दिले पाहिजे अशी पुस्ती जोडायला तो विसरला नाही. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. भारतातले हिटस् वाढले की त्याला जगातल्या जाहिरातदारांकडून जास्त पैसा काढता येईल!
मार्क झुकरबर्ग हा आधुनिक भांडवलशाहीच्या काळातला तर कम्युनिझमचा जनक कार्ल मार्कस् हा एकोणीसाव्या शतकातला स्वप्नदर्शी विचारवंत. त्याच्याकडे विद्यापिठाची डॉक्टरेटची पदवी होती. तो  कम्युनिस्ट विचारसरणीचा शिल्पकार खरा; पण पैसे संपले की पैशासाठी आईला पत्र लिहीण्याखेरीज त्याच्याकडे अन्य मार्ग नव्हता! आईकडून पैसे मिळेपर्यंत उधारउसनवारी करता करता त्याचा जीव मेटाकुटीला यायचा. तो फ्री लान्सर पत्रकार म्हणून काम करत होता. सिव्हिल वार सुरू झाले तेव्हा अमेरिकेपुढे भीषण आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे न्यूयॉर्क ट्रिब्यूनने त्याला युरोपच्या वार्ताहरपदावरून काढून टाकले. त्या काळात कार्ल मार्कसची अवस्था कशी झाली असेल ह्याची कल्पना केलेली बरी!
रशियाचे विघटन झाल्यानंतर जगातल्या बहुतेक देशांत चालू असलेले डावेउजवे राजकारण संपले. किंबहुना राजकारणच संपले. बहुतेक सगळ्या देशआंना अर्थव्यवस्था नियंत्रणमुक्त करावी लागली. त्याच सुमारास जगात संगणक क्रांती झाली. जगभर भांडवलशाही आणि संगणक एकाच वेळी अवतरला. भारताने भांडवलशाही आणि संगणकाचा स्वीकार केला. भारतातल्या पांढरपेशांना संगणकतंत्रज्ञानाचा नवा व्यवसाय उपलब्ध झाला. काही वर्षांतच सॉफ्टवेअर क्षेत्राने भारताच्या जीडीपीला भरभक्कम हातभारही लावला. भारत ही टेलिकॉमची मोठी बाजारपेठ ठरेल असा अमेरिकेचा होरा होताच. त्यानुसार भारतात मोबाईलची बाजारपेठ वाढलीय आता डिजिटल सेवेचा काळ सुरू झाला आहे. अमेरिकन उद्योगधुरीणांच्या भारताच्या वा-या वाढल्या. बिल गेटस्, बिल क्लिंटन ह्यांनीही भारताचे दौरे केले. त्या दौ-यामागची प्रेरणा बनियाबुद्धीची होती. मार्क झुकरबर्गच्या दौ-याच्यामागेही बनियाबुद्धीचीच प्रेरणा आहे. सुपर पॉवर तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय कराल, ह्या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे. तो म्हणाला, तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा फायदा असतो. तो म्हणजे तुम्ही स्वतःच जगात सुपर पॉवर निर्माण करू शकता. सध्या इंटरनेटचा वेग लक्षात घेता तुम्ही लहान पडद्यावर टू डी व्हिडिओ पाहू शकता. येत्या पाचदहा वर्षात तुम्ही जो व्हिडिओ पाहाल तेव्हा वास्तव घटना जवळून पाहता असे तुम्हाला वाटेल! सध्याच्या इंटरनेट माध्यमापुढील समस्यांची मार्कला चांगली जाण असल्याचे त्याच्या ह्या उत्तरावरून स्पष्ट झाले. मोबाईलवर अथवा लॅपटॉपवर चांगला व्हिडिओ पाहायचा असेल तर चांगले कॅमेरे, चांगले तंत्रज्ञ हवेच. म्हणजे सध्याचे कॅमेरे बाद करण्याची वेळ येऊ घातली आहे हे स्पष्टपणे सांगायलाच पाहिजे का?
आतापर्यंत झालेल्या तांत्रिक प्रगतीकडे त्याचे लक्ष असल्याचा आणखी एक पुरावाः नेट न्युट्रिलिटीसंबंधी त्याने केलेले भाष्य. नेटन्युट्रिलिटीसंबंधी जगातल्या राष्ट्रांचे धोरण अजून असंदिग्ध आहे. इंटरनेटवरील वाढता व्यापार पाहून इंटरनेट कंपन्यांच्या प्रमुखांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. म्हणून वेगवेगळ्या नेटसेवांचे वेगवेगळे दर ठरवून इंटरनेट वापरदार कंपन्यांकडून जास्त पैसा खेचण्याचा फंडा शोधण्याच्या उद्योगाला टेलिकॉम कंपन्या लागल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी मार्क झुकरबर्गने वेगळीच शक्कल लढवली. नेटन्युट्रिलिटीला नेटन्यूट्रिलिटी न संबोधता तो फ्री बेसिक्ससंबोधू इच्छितो. पाणी, वीज वगैरे ज्याप्रमाणे मूलभूत गरजा आहेत तशीच इंटरनेटची गरज मूलभूत मानली पाहिजे, असे त्याचे मत. फेसबुकमध्ये वेगवेगळ्या सेवांची भर घालण्याच्या त्याच्या योजना आहेतच. म्हणूनच फेसबुकमुळे इंटरनेटच्या सर्व गरजा पु-या होतील, अशी पुस्ती त्याने जोडली आहे. ह्याचा अर्थ फेसबुकला ब्रॉडबँडसारख्या अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळावा हेच त्याला अभिप्रेत आहे. एकदा का हा दर्जा मिळाला आणि उद्या खरोखरच अधिक वेग आणि वहनक्षमतेच्या जास्त खर्चाच्या सेवेसाठी फेसबुकला जास्त पैसा मोजावा लागणार नाही. नेटन्युट्रिलिटीला जगात पाठिंबा वाढता असला तरी तेथील सरकारांचा भरवसा नाही. ऐन वेळी सरकार निर्णय कसा फिरवतील हे सांगता येत नाही. जास्त वेगाची सेवा पाहिजे, जास्त पैसा मोजा, अशा प्रकारचा निर्णय घ्यायला टेलिकॉम कंपन्या सरकारला भाग पाडू शकतात! म्हणजे नेटन्युट्रिलिटीचे तीनतेरा वाजल्यात जमा. ह्या पार्श्वभूमीवर मार्क झुरबर्गचा भारतदौरा अर्थपूर्ण आहे. नेटन्युट्रिलिटीसंबंधी कायद्याचे त्याला अभिप्रेत असलेले स्वरूप सत्ताधा-यांच्या गळी उतरवण्याचा त्याचा सुप्त हेतू असू शकतो. ओबामांची आणि मोदींची मते त्याच्या मताशी जुळणारी आहेत हा निव्वळ योगायोग नाही!
रमेश झवर
www.rameshzawar.com

वैदिक टोळ्यांतील आंतरिक संघर्ष

वैदिक धर्माची सुरुवात एकाच टोळीत/जमातीत झाली नाही. ऋग्वेदाचा व त्यातील दैवतकल्पनेचा विकास हा अनेक टोळ्यांच्या दैवत संकल्पना पण यज्ञकेंद्रित होत एकत्र होत झाला. या ३०० ते ५०० वर्षांच्या काळात वैदिक टोळ्यांचेही आपापसातील संबंध बदलत राहिले. मित्र असलेल्या टोळ्या शत्रू बनत आपासात झगडलेल्या दिसतात. ऋग्वेदात एकंदरीत जवळपास ४८ टोळ्या शत्रू अथवा मित्रभावाने अवतरतात. ऋग्वेद मित्र टोळ्यांचा उल्लेख पंचजन असा करतो, पण या पाच टोळ्या नेमक्या कोणत्या हे कोठेही स्पष्ट नाही. यदू, तुर्वश, अनु, द्रुह्यु आणि पुरू या त्या पाच टोळ्या असाव्यात असा तर्क केला जात असला तरी या टोळ्या एकत्र अथवा आसपास राहत होत्या असे दिसत नाही. उदाहरणार्थ यदू-तुर्वंश यांचा नेहमी एकत्र उल्लेख येत असून या टोळ्या फार दुरुन वैदिकांच्या सहाय्यार्थ येत असत असे उल्लेख मिळतात. शिवाय दाशराज्ञ युद्धात या टोळ्या सुदासाच्या विरुद्ध लढलेल्या आहेत. तुर्वश/तुर्वायण नंतरच्या काळात वैदिक साहित्यात विद्वेषानेच उल्लेखले गेले आहेत. तुर्वश अर्थात तुराणी लोक वैदिकांच्या दृष्टीने नंतर शापित झाले याचे कारण त्यांनी सुदासाविरुद्ध युद्ध पुकारले असे म्यक्समुल्लेरही नोंदवतो.

पर्शुंचीही हीच गत आहे. पर्शु (पर्शियन) टोळ्यांनी वैदिक टोळ्यांना अनेकदा आश्रय दिला आहे. ऋषींना दानेही दिली आहेत. (ऋ. ८.६.४६) परंतू हेही लोक नंतर सुदासाविरुद्ध उभे ठाकलेले दिसतात. फार कशाला, पुरू म्हणवणारी टोळीही सुदासाच्या विरोधात गेली. सुदास हा तुत्सू टोळीचा. बहुदा त्याच्या काळात वैदिक धर्माचा तोच आश्रयदाता होता. त्याने दाशराज्ञ युद्धात या सर्व टोळ्यांचा पराभव केला. खंडण्या वसूल केल्या. या युद्धानंतर पुरुंचाही उल्लेख वैदिक साहित्यातून गायब होतो. शतपथ ब्राह्मण तर पुरुंना राक्षस व असूर म्हणुन निंदते. महाभारतात पुरुचे नांव अवतरते, पण टोळीचे म्हणून नव्हे तर ययाती-शर्मिष्ठेचा मुलगा म्हणून. या पुरुचा ऋग्वेदातील पुरू टोळीशी संबंध नाही.

पुरू – पौरु हे पुरातन शब्द असून त्यांचा अर्थ पुष्कळ, पुरातन, पहिला माणूस वगैरे होतो. पुरु हे जसे टोळीनाम होते तसेच अनेकांच्या नावातील ते विशेषणही होते, मग ते वैदिक असोत कि अवेस्तन. उदा. पुरुमिळ्ह, पुरु आत्रेय, पुरुहन्म अशी नांवे ऋग्वेदात जशी येतात तशी अवेस्त्यातही येतात. उदा. झरथुष्ट्राच्या वडिलांचे नांव पौरुषास्प होते. पौरु-दाक्ष्ती, पौरु-बंघ, पौरु-चिस्त, पौरु-जिर वगरे पुरु-केंद्रित नांवे अवेस्त्यात अवतरतात. सोल लेव्हिन या भाषाविदाने पुरु-पौरु हे शब्द अतिपुरातन असल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे. दोहोंचा अर्थ एकच!

पुरु एके काळी ऋग्वैदिक धर्माचे आश्रयदाते होते, जसे यदू-तुर्वश वगैरे. परंतू नंतर हे संबंध पुर्ण बदललेले दिसतात. दाशराज्ञ युद्धामागे धार्मिक वर्चस्वतावादाचेच कारण होते असे काही विद्वान मानतात. उदाहरणार्थ हे दाशराज्ञ युद्धातील सुदासशत्रू “अयाज्ञिक” होते असे ऋग्वेदच सांगतो. शिवाय या दहापैकी पाच टोळ्या आर्य तर पाच अनार्य होत्या असेही नमूद आहे. येथे आर्य हा शब्द वंशवाचक नही हे स्पष्ट आहे. अग्नीपुजक लोक हे आर्य होते तर अन्य व्रत करणारे, इंद्राला अथवा देवांना न मानणारे ऋग्वैदिक लोकांच्या दृष्टीने अनार्य होते. तुर्वश हे सुरुवातीच्या काळात देवाच्या बाजुने होते. म्हणून ते वैदिक टोळ्यांचे मित्रही होते. तुर्वंश लोकांनीच झरथुष्ट्राचा खून केला हाही इतिहास आहे. ही घटना दोन्ही धर्मग्रंथांत नोंदली गेलेली आहे. हेच तुर्वश नंतर ऋग्वैदिक सुदासाच्याही विरुद्ध अन्य टोळ्यांबरोबर उभे ठाकले हाही इतिहास आहे.

मग झरथुष्ट्राच्या मृत्युनंतर तुर्वश, अनू वगैरे टोळ्यांच्या धर्मभावनांत काही बदल झाला का? कि या युद्धाचे कारण धार्मिक नसून सर्वस्वी राजकीय होते? ऋग्वेद याबाबत काही भाष्य करत नाही. ही घटना झरथुष्ट्राच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी झालेली असल्याने अवेस्ता तर या युद्धाचा उल्लेखही परत नाही.

असे असले तरी ऋग्वैदिक धर्माचा विकास सहजासहजी झाला नाही. ऋग्वेदरचना सलग चालू राहिली असेही दिसत नाही. सुरुवातीला ऋग्वैदिक धर्म यज्ञकेंद्रित असला तरी त्यातील कर्मकांडेही साधी होती. त्यांत अवडंबर नव्हते. ब्रह्मन, क्षत्र व विश हे शब्द अवतरत असले तरी ते वर्णवाचक नव्हते. मंत्रकर्ता कोनीही असो तो त्याक्षणी ब्राह्मण असे तर लढावे लागे तेंव्हा तो क्षत्रीय असे. विश म्हणजे ग्रामीण वसाहती व त्यात राहणारे लोक. अशी रचना अवेस्त्यातही होती. उदा. ब्राह्मण शब्दाऐवजी अग्नीपुजा करणारा तो अथ्रवण. योद्धा असेल तो रथेस्ट्रा. बाकी लोक दास. पण हे जन्माधारित नव्हते.

याचे कारण म्हणजे ऋग्वैदिक धर्म हा टोळ्यांनी निर्माण केलेला धर्म. लोकसंख्याच मुळात मर्यादित होती. त्यात कर्मप्रधान अथवा जन्मप्रधान कायमचे वाटप करता येणे सर्वस्वी अशक्य होते. शिवाय या धर्माला आश्रय देणा-या टोळ्याही काळानुसार बदलत गेल्या. झरथुष्ट्राचा धर्म नंतर राजाश्रय मिळत गेल्याने झपाट्याने पसरतही गेला. अशा स्थितीत या धर्माचा निभाव लागणे प्राचीन इराणात सोपे राहिलेले नव्हते. त्या स्थित्यंतराकडे आपण नंतर जावू. पण ऋग्वैदिक काळात हा धर्म तुलनेने अत्यंत साधा होता हे येथे लक्षात घेऊ. इतर वैदिक संस्कारांपैकी फक्त तीन संस्कार या काळात जन्माला आलेले दिसतात. ऋग्वेदातील तत्वज्ञानही प्रचंड विरोधाभासने भरलेले दिसते.

आधी श्रेष्ठ असनारा असूर वरून आपले स्थान गमवत इंद्र श्रेष्ठस्थानी पोहोचलेला दिसतो. वैदिकांना रुद्र, मरुत, विष्णू, भारती वगैरे शेकडो नवीन देवता सामाविष्ट कराव्या लागलेल्या दिसतात. आणि याच वेळेस देव विविध असले तरी अंतता: त्या एकच आहेत असे तात्विक समाधानही करून घ्यावे लागल्याचे दिसते. यात वैदिक ऋषींतील आंतरसंघर्षही डोकावत राहतो. अगस्त्याने मरुत व इंद्र यांच्यातील हवीचा फार मोठा संघर्ष कसा सोडवला याचे विवेचन मागील लेखात मी केलेलेच आहे. प्रदिर्घ काळात विविध मनोवृत्तीच्या व विविध धर्मांची पार्श्वभुमी असलेल्या लोकांनी बनवलेल्या धर्मात हा आंतरिक संघर्ष असणे स्वाभाविकच आहे.

आता हा प्रश्न पडतो कि प्राचीन इराण (दक्षीण अफगाणिस्तान) येथे अशी काय स्थिती उद्भवली कि वैदिक धर्माला अन्यत्र आश्रय शोधावा लागला? अनेक विद्वान आर्य आक्रमण अथवा सामुहिक विस्थापनामुळे वैदिक धर्म भारतात आला असे मानतात, ते खरे आहे काय? काही लोक वैदिक धर्म भारतातच स्थापन झाला असे म्हणतात, त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? वैदिक वंशावळ व महाभारतातील वंशावळ का जुळत नाही? अनेक प्रश्न आहेत. पण आपण एकामागून एक प्रत्यक प्रश्नाचा विचार करुयात!

ऋग्वैदिक स्थित्यंतरे: असुरांकडून देवांकडे!

वैदिक धर्माचा मुख्य स्त्रोत म्हणजे ऋग्वेद. तो आज ज्या क्रमाने आणि ज्या मंडलांत आपल्यासमोर उपलब्ध आहे त्या क्रमाने मुळात तो रचला गेलेला नाही. आजचा ऋग्वेद दहा मंडलांत असून त्यातील तिसरे ते सातवे मंडल प्राचीन असल्याचे मानले जाते. बाकी मंडले मध्यकालीन व उत्तरकालीन मानली जातात. उदाहरणार्थ दहावे मम्डल उत्तरकालीन आहे. प्रत्येक मंडलातही प्राचीन, मध्यकालीन व उत्तरकालीन दाखवता येतील अशी सुक्ते व मंत्र आहेत. थोडक्यात ऋग्वेद कालानुक्रमानुसार आपल्याला उपलब्ध नाही. शिवाय त्यात विस्मरणात गेलेला/नष्ट झालेला भागही भरपुर आहे. वेदव्यासांनी विस्मरणात जाऊ लागलेली वेदराशी प्रयत्नपुर्वक गोळा करून तिची संगतवार  मांडणी चार भागात केली असे वैदिक परंपरा मानते.

ऋग्वेदाचे रचना सुरू होऊन ती संपायला सरासरी तिनशे ते पाचशे वर्ष लागली असावीत असे विद्वान मानतात. हा धर्म एकाएकी, कोणा प्रेषिताने निर्माण केलेला नसून तो क्रमश: दैविक/कर्मकांडीय पद्धतीने विकसीत होत गेलेला धर्म आहे. ऋग्वेदाला किमान दहा ऋषीकुटुंबातील सुमारे साडेतिनशे मंत्रकर्त्यांनी पिढ्यानुपिढ्या हातभार लावलेला आहे. मुख्य दहा कुटुंबातील ऋषीही एकाच जमातीतून आलेले नाहीत. भृगू, काण्व, अगस्त्य सारखे ऋषी स्वतंत्र धर्म परंपरेतून येत वैदिक परंपरेत आपल्याही परंपरांचे मिश्रण करत सामील झालेले दिसतात. याबाबत सविस्तर चर्चा आपण स्वतंत्र लेखात करु.

मुळात वैदिक धर्माची सुरुवात झाली त्याआधी कोणता ना कोणता धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राचा धर्म नवधर्म नसून जुन्या असूर धर्माचे एकेश्वरी प्रकटन होते. हा धर्म देव संप्रदायाच्या विरोधात होता. असूर-मेघा (अहूर-माझ्दा) हाच सर्वश्रेष्ठ पुजनीय तर देव हे वाईट अशी त्या धर्माची झरथुस्ट्राने रचना केली. याचा अर्थ असूर धर्म व देव धर्मही झरथुस्ट्राच्या पुर्वीही विस्कळीत स्वरुपात का असेना विद्यमान होता. दोन्ही धर्मपरंपरांत संघर्षही होता. त्यांची कर्मकांडेही भिन्न होती. याशिवायही इतर अनेक धर्म होते. त्याबद्दलची त्रोटक माहिती अवेस्ता आणि ऋग्वेदातून मिळते. ती माहिती अशी…यज्ञ न करणारे. अन्य व्रत करणारे, इंद्राला देव न मानणारे, लिंगपुजा करणारे अशा लोकांची अस्पष्ट माहिती ऋग्वेद देतो. या लोकांचा द्वेष वैदिक लोक करायचे. अवेस्त्यातही झरथुस्ट्राच्या धर्माचा द्वेष करणारे, अग्नी न पुजणारे, देवांना पुजणारे, तुराण्यांसारखे समाज येतात. तुराणी म्हणजे तूर प्रांतात राहणारे लोक. ऋग्वेदात हेच लोक तुर्वश नांवाने व त्याच अर्थाने येणारे लोक. हे तुराणी झरथुस्ट्राचे प्रकांड शत्रू होते. अनेक युद्धात वैदिक टोळ्यांसोबत हे सामील दिसतात तर दाशराज्ञ युद्धात हे वैदिक टोळ्यांचे शत्रू बनलेलेही दिसतात. झरथुस्ट्राचा अग्नीत जाळ्य़्न खून तुराण्यांनीच केला व त्याचे वर्णन जसे अवेस्त्यात आहे तसेच ऋग्वेदातही आहे.

येथे मुद्दा हा कि देव आणि असूर या दोन विरोधी धर्मांचे प्राबल्य ऋग्वेदापुर्वीही अस्तित्वात होते. सोबत दुसरेही धर्म प्रवाह होतेच. ऋग्वेदात देवधर्म आणि असूर धर्म या दोहोंचे मिश्रण दिसत असले तरी सुरुवातीला वैदिक धर्मावर असूर धर्माचा प्रभाव होता. उदा. ऋग्वेदात आधी असूर वरुण ही देवता सर्वश्रेष्ठ मानली जात होती. ऋग्वेदात वरुणाला वारंवार अत्यंत आदराने “असूर वरुण” असे तर संबोधले जात होतेच पण अग्नी, इंद्र व मित्रालाही “असूर” ही आदरार्थी संबोधने लावलेली आहेत. “जो प्राण देतो, म्हणजे असू: देतो तो असूर” हा असुराचा मुळचा अर्थ. असूर वरूण म्हणजेच अहूर माझ्दा असे विद्वान मानतात. त्याबद्दलचा वाद बाजुला ठेवला तरी ऋग्वेदातच वरुणाचे माहात्म्य घटत ती जागा देव इंद्राने  घेतली. ही ऋग्वैदिक धर्मातील मोठे क्रांती म्हटले तरी चालेल. देव हेच असूर (देवानां असूरा:…) ते असूर दुष्ट हा प्रवास ऋग्वेदातच दिसून येतो. याचे कारण तत्कालीन देव मानणारे विरुद्ध असूर मानणारे या दोन संप्रदायांतील संघर्षात पहावा लागतो.

एकच धर्मात दोन विरोधी मुलतत्वे मिसळत जावीत हे फक्त ऋग्वेदात दिसते. असूर वरुणाचे माहात्म्य घटत इंद्राचे माहात्म्य वाढले. इंद्राचे असूर हे संबोधन गळालेले दिसते. असे असले तरी समकालेन जगात असूर संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे प्रबळ असल्याचे दिसते. उदाहरणार्थ अस्सिरियन संस्कृती. ही संस्कृती असूर तत्व प्रधान असून राजेही स्वत:ला अशूर हे संबोधन लावून घेत असत. हे असूर संस्कृती पालत असले तरी ते मुर्तीपुजक होते. झरथुष्ट्राच्या अहूर (असूर) संप्रदायाप्रमाने अग्नीपुजक व एकेश्वरवादी अमूर्त दैवत मानणारे नव्हते. ऋग्वेदावरील सुरुवातीचा असूर वर्चस्वाचा भाग गृहित धरला तर ऋग्वैदिक लोकही वेदकाळ सुरु होण्यापुर्वी असूर धर्म/संस्कृतीचेच पाईक होते असे म्हणावे लागते.

अवेस्त्याचा धर्म आणि ऋग्वेदाचा धर्म यातील साम्य म्हणजे हे दोन्ही धर्म मुर्ती/प्रतिमा पुजा मानत नाहीत. “न तस्य प्रतिमा अस्ती” हे यजुर्वेद ठासून सांगतो. यज्ञात दिल्या जाणा-या हवीमार्फत अमूर्त देवतांची पूजा करणे हे दोन्ही धर्मातील मुख्य साधर्म्य.

झरथुस्ट्राचा गाथा (अवेस्त्याचा प्राचीन भाग) आणि ऋग्वेदाच्या प्राचीन रचना या समकालीन आहेत. ऋग्वेद रचना व्हायलाच ३०० ते ५०० वर्ष लागली. हा काळ थोडा नव्हे. या काळात ऋग्वैदिक धर्मातही स्थित्यंतरे घडली. अनेक वेगवेगळ्या टोळ्यांतील लोक या धर्माचे पाठीराखे अथवा शत्रू बनत गेले. दानस्तुती सुक्तांतून याची माहिती आपल्याला मिळते. ज्या टोळ्या पाठीराख्या झाल्या त्यांची दैवतेही ऋग्वेदात सामील होत गेली. त्यांना हवी द्यायचा कि नाही यावरचेही वाद होत ते शेवटी तडजोड करत सामील होत गेले. उदा. अगस्ती हा ऋषी वेदरचनेत नंतर सामील झाला. त्याने जादुटोण्याचे मंत्र निर्माण केले जे ऋग्वेदात काण्वांशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. अगस्ती हा आर्यच नव्हता असे क्युपर म्हणतो. काण्व हेही मुळचे वैदिक परंपरेतील नाहीत. सुत्र साहित्यात काण्वांना “अ-ब्राह्मण” म्हटले गेलेले आहे, कारण तेही जादूटोण्याचे समर्थक. मरुत आणि रुद्र दैवतांचाही समावेश ऋग्वेदात ही दैवते मानणा-या टोळ्यांमुळे झाला. अगस्ती त्यातील प्रमूख. त्यानेच मरुतांना (वादळाची प्रतीक-दैवते) यांना यज्ञात हवी द्यायचा कि नाही हा वाद मिटवला. (ऋ. 1.165, 1.170 आणि 1.171) भृगुही ऋग्वेदरचनेत सर्वात उशीरा सामील झाले.

याचा अर्थ असा कि ऋग्वेद रचला जात असतांनाच तो अनेक स्थित्यंतरांतून गेला. अनेकविध टोळ्यांनी त्यात सहभाग घेतला.  त्या त्या टोळ्यांची दैवते ऋग्वेदात सामील होत होत ऋग्वैदिक देवतांचे संख्या ६४५ पर्यंत गेली. या काळात रचला गेलेला सर्व ऋग्वेद उपलब्ध आहे असे मात्र नाही. आज उपलब्ध आहे तो संपादित, क्रम बदललेला ऋग्वेद. त्याची भाषाही मुळची उरलेली नाही. पण प्रतिपाद्य विषयाबद्दल खालील मुद्दे स्पष्ट होतात ते असे:

१) ऋग्वेद रचनेआधीही वैदिक लोकांचाही कोणता ना कोणता  धर्म होता. त्याला आपण असूर प्रधान अथवा अन्य दैवते प्रमूख मानणारा  धर्म म्हनू शकतो.
२) हे लोक प्रतिमापुजा करत असावेत जे त्यांनी या धर्माची स्थापना करतांना टाळले व “त्याची प्रतिमा असू शकत नाही” असे म्हटले. याचा अर्थ प्रतिमा पुजकांचाही धर्म होता जो ऋग्वैदिकांनी समूळ अव्हेरला.
३) झरथुष्ट्र असूर धर्माची प्रतिमापुजक विरहित, अग्नीकेंद्रित रचना करत असतांनाच याही धर्माची जवळपास तशीच, पण वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली. दोन्ही धर्मातील दुष्ट शक्ती व सृष्ट शक्ती यांची नांवे (विरोधी अर्थाने झाली असली तरी) समान आहेत. ऋग्वैदिक धर्म आधी असूरकेंद्रितच होता, जो नंतर देवकेंद्रित झाला.
४) स्वाभाविकपणेच झरथुस्ट्राचा धर्म व वैदिक धर्म यात संघर्ष निर्माण झाला. त्याचे प्रतिबिंब देवासूर कथांत पडलेले आहे.
५) दोन्ही धर्मांची सुरुवात तत्पुर्वी अस्तित्वात असलेल्या धर्मकल्पनांतुनच झाली. एका अर्थाने दोन्ही धर्म प्राचीन धर्मात सुधारणा घडवनारे होते. सर्वस्वी नवीन नव्हते.
६) हे दोन्ही धर्म अस्तित्वात येत असतांना समकालीन अजुनही अनेक धर्म होते जे स्वतंत्र अस्तित्व प्राचीन इराणमद्ध्ये  (आताचा अफगाणिस्तान धरून) टिकवून होते. त्यांच्यात रक्तपाती संघर्ष वर्चस्वासाठी होत होते. ही युद्धे ऋग्वेदाने व अवेस्त्याने नोंदवलेली आहेत.

याचाच अर्थ असा कि ऋग्वेद-धर्म अचानक निर्माण झाला नाही. त्याची धर्मतत्वे त्याच्या पुर्ण रचनेपर्यंत बदलत राहिली. त्या अर्थाने ऋग्वैदिक धर्माला एकजिनसी म्हणता येत नाही. याला आपण एकाच धर्मातील बहुविधता म्हणू शकतो. या बहुविधतेची कारणे अनेक आहेत व ती दानस्तुतींवरुन स्पष्ट दिसतात. त्यावर आपण नंतर चर्चा करुच. पण वेदांपुर्वी इराणमद्धेही कोणताच धर्म नव्हता व वेदरचनाकारांचाही तत्पुर्वी दुसरा धर्म नव्हता असे मानायचे काही कारण नाही. 

अशाच एका कातरवेळी…

कधी कधी एखाद्या कातरवेळी उगाच मनावर मळभ दाटून येते. मनात उगाचच नको त्या विषयांची कालवाकालव होते. सगळे जुने… नवीन विचार घुसळणीत टाकल्या सारखे घुसळत मनाच्या कप्प्यातून तरंगत वरती येत राहतात. मनावर आणि मेंदू वर एक वेगळाच विचारांचा तवंग निर्माण करतात. त्या तवंगाला दुसरे काही विचार भेदु शकणार नाही अशी काहीशी बिकट अवस्था होऊन जाते. उगाचच कशाची तरी ओढ लागल्यासारखे होते. दूर कुठेतरी लता किशोर मुकेशची दर्दी गाणे कानावर आदळत असल्या सारखे वाटू लागते. दूर कुठल्या तरी प्रवासाला चाललोय आणि महत्वाची एखादी वस्तू घ्यायची राहून गेलीय असे उगाच वाटू लागते.
जुन्या चाळीच्या व्हरांड्यात बसून मावळतीची उन्हं अंगावर घेत हातातला गरम चहा थंड होण्याची वाट बघतोय असे भासतेय…कुठेतरी एकटक नजर लावत स्वत:ला विसरून जावेसे वाटतेय…’ये आकाशवाणी है…और आप सून रहे है…’असे काहीतरी कानावर येतेय पण लक्ष तिकडे नाहीये. कशाच्या तरी अनामिक ओढीने मन भरून गेलेय….मोठी काठी घेऊन सगळे तरंग विस्कटून टाकावे असे आतून वाटतेय….पण उगाच नक्षी मोडेल म्हणून जीव घाबराघुबरा होतोय.
उगाचच बालपणीचे दिवस आठवल्या सारखे होतात. ती शाळेतून घरी जाण्यासाठी लागलेली ओढ आठवायला लागते. पाठीवर भले मोठे दप्तर सांभाळत मी धावत सुटतोय. संध्याकाळच्या फिक्कट पिवळ्या केशरी उजेडाचे काळ्या रात्रीत रुपांतर होताना पाहून जीवाची घालमेल वाढू लागते. मी घरी जाण्यासाठी धावतोय की त्या क्षितिजा कडे धावतोय…काही समजत नाहीये…हा रस्ता जिथे पर्यंत दिसतोय… तिथ पर्यंत धावायचे आहे…..रक्त धमन्यांमधून जोरात पळत हृदयाला धडकू लागते. हृदय पण नेहमीपेक्षा जोरात फडफडू लागते. त्याचे धडकणे आपल्याच कानाला जाणवू लागते. तिकडे मुकेशचे गाणे हृदयाला अजून पिळवटत असते. हृदय छातीतून बाहेर येईल की काय असे वाटू लागते…ओठ शुष्क पडलेत…कपाळावरून घर्मबिंदू टपकतोय..
तेवढ्यात दूर क्षितिजावर नजर जाते. सुर्य जवळपास पूर्णपणे मावळतीला गेला असतो आणि रात्र हळूहळू आपले काळे हात पसरू लागते. स्वतची लांब झालेली सावली सुद्धा सोडून जायला तडफडत असते. चुलीवरच्या चहाच्या आंदणाला उकळी फुटल्यागत विचित्र भावनांचा कल्लोळ मनात कालवाकालव करू लागतो. एक अनामिक ओढ मेंदूतून शरीरभर नाचू लागते. पण कसली ओढ?? कशाचा थांगपत्ता लागतच नाहीये….मन सांगतेय पुढे काहीतरी विपरीत… नको असलेले घडणार आहे…..’हे कुठे तरी थांबवा’ असे कानावर हात ठेवून बेंबीच्या देठा पासून ओरडावेसे वाटतेय…पण ऐकणारे कोणी जवळपास दिसत नाहीये….तिकडे क्षितिजावर अजून मारामारी चालू आहे. मला जीवाच्या आकांताने धावावेसे वाटतेय. क्षितिजावरच्या उरल्या सुरल्या उजेडाला मदत करायला…..पण हे काय? पाय का असे गोठून गेलेत? उचलले का जात नाही? कसले वजन बांधल्या सारखे का वाटताहेत? 

अचानक प्रेयसीची आठवण का येतेय? आज तिने शेवटचे भेटायला का बोलावले होते? ‘शेवटचे’ का म्हणाली होती? मला तिकडे जायला पाहिजे होते का? मला तिचीच तर ओढ लागली नाहीये ना??…. नाही!!….क्षितिजावरून कोणी तरी बोलावतेय…..ते कोणी वेगळेच आहे… मला तिकडे गेले पाहिजे..तिकडे माझी खरी गरज आहे…मी जीवाच्या आकांताने पळायचा प्रयत्न करतोय.,…कसे बसे माझे पाय उचलले गेले आहेत..पण पाहिजे तसे पळत नाही आहेत…त्या टेकडी कडे चाललेल्या काळ्या डांबरी रस्त्यावरून मी धावतोय….धावतोय कि चाललोय…तो रस्ता क्षितिजा कडे चाललाय….दूरवर रस्त्याच्या कडेला एकच झोपडी दिसतेय…कोणीतरी चुरगळून टाकलेल्या कागदासारखी….मी बहुतेक तिकडेच पळतोय आणि माझी सावली माझ्या विरुद्ध दिशेला पळतेय…पण मला मागे वळून तिच्याकडे बघायलाही फुरसत नाहीये…

‘अगला नगमा आप के लिए पेश है महंमद रफी के दर्दभरी आवाज मे…’ अरे यार!! आता हा रडवणार बहुतेक मला……थांब बाबा!! मला क्षितिजाकडे पळायचे आहे….पण झाडाआडून कोणीतरी हात धरून थांबवलेय मला….तो ओळखीचा सुगंध पूर्ण मनातून आणि शरीरातून दरवळलाय….सकाळी तळ्याकाठी जेव्हा ती भेटायची आणि हात हातात धरून चालायची तेव्हा जसा तिच्या धुतलेल्या केसांचा सुगंध आसमंतात आणि मग माझ्या रोमरोमांत दरवळायचा तसाच हा सुगंध आहे…..हो बहुतेक झाडामागून तीच आली आहे…..आवेगाने मारलेल्या मिठीने माझा तोलच गेलाय…मी स्वत:ला सावरून घ्यायचा प्रयत्न पण करत नाहीये… डोळ्यासमोर प्रेयसीने सोडलेला काळेभोर केशसंभार येतो आहे…..तिच्या पदराने की ओढणीने माझे घर्मबिंदू टिपले जाताहेत….मी नको नको म्हणताना तिने मला जवळ ओढलंय….माझे डोके तिच्या मांडीवर ठेवून ती माझ्या शुष्क ओठावरून हाथ फिरवतेय….मी उगाचच हात पाय झटकून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय….आणि ती माझ्या ओठांवर तिचे लांबसडक बोट ठेवून डोळ्यांनी मला गप्पं राहण्यास खुणावतेय….मी पण हळू हळू निष्क्रिय होतोय….तिच्या चेहऱ्यावर एक कणव असलेले हास्य येतेय….खूप काही दडलंय त्या नाजूक हास्यामागे….पण मी जाणीवेच्या पलीकडे चाललोय…..
तिच्या डोळ्यात मला क्षितिजावरच्या फिक्कट पिवळ्या केशरी रंगाची झाक दिसतेय….एक अनामिक ओढ दिसतेय…सगळंच्या नजर चुकवून गर्दीत जशी ती मला बघायची आणि नेमके त्याचवेळी मी तिला बघायचो आणि तिची कळी खुलायची तसेच काहीसे भाव मला तिच्या डोळ्यात दिसताहेत…… नाही… नाही…. हे तर दु:खाचे भाव आहेत..पण कसले दु:ख??……नाही..नाही….हे तर समर्पणाचे भाव आहेत…कोणाचे समर्पण…माझे तिला कि ती स्वत:ला मला समर्पित करतेय…..अरे! मला ह्याचीच तर ओढ नाही न लागलीय…काही समजेनासे झालेय….नक्कीच काहीतरी गोधंळ चाललाय… भंजाळून चाललोय मी…. 
मला तिला काहीतरी सांगायचे आहे…पण काय? हातातला चहाचा कप थंड होतोय की…पाठीवरचे दप्तर कुठे तरी गळून पडलेय की….क्षितिजावर कोणी तरी वाट पाहतेय…की अजून काही? ……तेवढ्यात तिने मनातले सगळे भाव ओळखल्यासारखे मला एकदाच पापण्यांची उघडझाप करून शांत होण्यास सांगितले….आणि ती मला अजून जवळ ओढायचा प्रयत्न करतेय…..अरे!! तिला समजत का नाहीये?? आज ती नेहमीसारखे माझ्या मनातले ओळखत का नाहीये?? माझ्या मनात लाटा उसळल्या आहेत…..त्या किनाऱ्यावर फुटल्याशिवाय नाही गप्प होणार…पण ती ऐकतच नाहीये…आणि मला हि तिच्या बंधनातून सुटता येत नाहीये…
ती एका हाताने तिच्या केसांना बांधलेला रुमाल सोडतेय..आणि तिचा सगळा केशसंभार माझ्या चेहऱ्यावर येउन आदळतोय…क्षणार्धात नजरेसमोर सगळा काळोख झालाय…जो, काळोख होऊ नये म्हणून एवढा वेळ धडपडत होतो….तोच समोर येउन उभा ठाकलाय….पण त्याबरोबर माझ्या आवडीचा एक मंद सुगंधही आसमंतात दरवळलाय…..हा तिच्या सुंदर केसांचा सुगंध आहे कि पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध आहे…काय झालेय मला आज? मला काहीचं का उमगत नाहीये? गालावर गरम श्वास जाणवताहेत…..हळू आवाजात कुजबुजलेले तिचे उच्चार जाणवताहेत पण मेंदू ते पर्यंत का पोहचत नाहीये….गरम श्वास अजून जवळ आल्यासारखे वाटताहेत…..त्यांची गती वाढलेली जाणवतेय…आणि एका सुखद क्षणी ओठांवर ओलसर स्पर्श जाणवतोय….एक वेगळीच चव ओठांवर पसरलीय…हातातल्या चहा पेक्षाही अप्रतिम अशी चव…एक वेगळीच अतुलनीय चव…..भेगा पडलेल्या शुष्क मातीवर पाण्याचा अमर्यादित वर्षाव झाल्यासारखे वाटतेय…दूर वर ओल्या मातीतून फुटलेला एक कोंब ही आनंदाने मान डोलावतोय…शुष्क पडलेले माझे ओठ प्रेयसीच्या चुंबनाने भिजून गेलेत….. तिची लांब सडक बोटे माझ्या केसांमधून फिरताहेत …. त्या सोबत एक वेगळीच शांतता मेंदूवर पसरत चाललीय…. लाटा शांत होऊन परतीला लागल्या आहेत…तरंगांची नक्षी न विस्कटता बाजूला होतेय…नितळ पाणी दिसू लागलेय…आसमंत स्वच्छ झाल्यासारखा वाटतोय…
पण..पण हे सगळे क्षणभंगुर आहे….असे एक मन आतमध्ये पण खूप खोलवर…दूरवर कोठे तरी बजावतेय…पण त्याचे कोणी ऐकत नाहीये…आत्ता मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदापासून मुकु नकोस असे सगळे ओरडून सांगताहेत आणि मी पण त्यांचे ऐकतोय….आवेगाने तिला जवळ ओढतोय….तीही विरोध न करता एखादे सुंदर फुल स्वत:हून कुस्करावे तशी माझ्या मिठीत कुस्करत चाललीय… पण दुरवर कुठे तरी त्या दुसऱ्या मनाची कीव पण येतेय…तोच बहुतेक त्या क्षितिजावर उभा आहे…..माझा हितचिंतकच आहे तो… हे समजतेय मला…पण नाईलाज आहे माझा….मी गोठून गेलोय…एवढ्यात दात लागल्यामुळे ओठांमधून एक कळ येतेय..मी डोळे किलकिले करून तिला डोळ्यांनीच विचारतोय… “का?”..ती कानात कुजबुजतेय….माझी आठवण पुन्हा पुन्हा येत राहावी म्हणून…ओठांतून आलेला रक्ताच्या थेंबाची चव हृदयापर्यंत..मनापर्यंत पोचली…मी परत डोळे मिटून धुंद होऊन पडलोय…असा किती वेळ धुंद होऊन पडलोय मलाच माहित नाही.
डोळ्यावर कसला तरी उजेड येतोय…मी परत त्याच डांबरी रस्त्यावर आलोय बहुतेक…ती समोरची टेकडी आता पूर्णपणे काळोखात बुडालीय…क्षितीज कधीच त्या काळोखात हरवून गेलाय…रस्त्यावरच्या दिव्याचा केशरी उजेड माझ्या चेहऱ्यावर पडलाय…माझी धुंदी अजून उतरली नाहीये….एक बस समोरून लांबच्या प्रवासाला निघालीय….खिडकीतून कोणी तरी हात हलवून निरोप घेतंय…

अरररे!!! हि मला सोडून कुठे निघाली……होय! ती म्हणाली होती की मला ‘शेवटचे’ भेटायचे आहे?  म्हणजे हि शेवटची भेट होती तर…अरेssssदेवाss!!!! डोळ्यातून एक थेंब माझी परवानगी न घेता घाईघाईने गालावर ओघळून आलाय….मी हि त्याला थांबवले नाही…तिच्या दोन्ही डोळ्यातून आलेले मोत्या सारखे थेंब मला त्या रस्त्यावरच्या दिव्यात स्पष्ट दिसताहेत…मला निरोपाचा हात हि हलवता येत नाहीये….मी हात हलवून तिचा निरोप घेणार नाही हे तिलाही माहिती आहे… त्यासाठी ती रागावणार सुद्धा नाहीये…तेवढी समजुतदार नक्कीच आहे ती …… डोळ्यातल्या पाण्यामुळे दूर गेलेली ती बस अजून फिक्कट झालीय. टेकडीवरील एका वळणावर तिचे मागून दिसणारे लाल लाईट्स एक छोटा ठिपका होत अदृश्य झालेत. क्षितिजावरचे ते दुसरे मन ओरडून सांगतोय की मी तुला सांगितले होते की हे सगळे क्षणभंगुर आहे तू माझ्या कडे ये…पण तू आलास नाही…आता का डोळे वाहावतोयस…आता हयातून तुझी सुटका नाही…

मला काही सुचतच नाहीये….दूरवरच्या त्या झोपडीत आता दिवा लागलेला दिसतोय…तिथेच बहुतेक तो रेडीयो लागलाय…आता त्याच्यावर आशा गातेय…

‘ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है 
हद-ए-निगाह तक जहां गुबार ही गुबार है 
ये क्या जगह है दोस्तों….’ 
रस्त्यावरच्या दिव्याचा दहा पाऊले पुढे असलेला चहाचा टपरी वाला पोऱ्या माझ्याकडे ‘साहेब ! सुट्टे पैसे द्या..सुट्ट्यांचे जाम वांदे आहेत बघा’ म्हणून सांगतोय…मी पन्नास ची नोट काढून त्याचा हातात ठेवतोय आणि बाकीच तुला ठेव अशी खुण करतोय…..संध्याकाळ पासून किती चहा झाल्या माहित नाहीत….मी इथे कसा आलोय…. कधी आलोय…माहित नाही…कसल्या धुंदीत इथे उभा आहे माहित नाही…काहीच आठवत नाहीये…मन बधिर झालेय…सुन्न झालेय…ती गेलीय हेच एक अबाधित सत्य आहे…..मनाची ओढाताण अजून चालूच आहे….मगाशी काही तरी विसरल्याची जाणीव होत होती आता काहीतरी महत्वाचे हरवल्याची जाणीव होतेय…..मुठीतून जीव निघून चाललाय….आशा अजून राग आळवतेय…
‘बुला रहा क्या कोई चिलमनों के उस तरफ़ 
चिलमनों के उस तरफ़ 
मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है 
उदास बेक़रार है 
‘ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है…..’
हि बेचैनी आता कधी संपणार नाही बहुतेक…अश्या एका कातरवेळी, एकांतात परत ती उफाळून येणार आहे…..आता ह्यातून माझी सुटका नाही…..”न जिसकी शकल है कोई, न जिसका नाम है कोई………..इक ऐसी शै का क्यों हमें अज़ल से इन्तज़ार है….ये क्या जगह है दोस्तों,………..” भणभणतय डोकं सगळं……आतमधून हातोड्याचे घाव बसत आहेत……माझ्या ओठांवर परत आलेला रक्ताचा थेंब बघून तो चहाच्या टपरीवरचा पोऱ्या मनातल्या मनात उगाच हसतोय….
आता ह्यातून सुटका नाहीच… 

आश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा

ॐ              दिनांक 26.10( अक्टोबर ) 2015.
                     आश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

कोजागिरी पौर्णिमा च्या शुभेच्छा !
आश्र्विन पौर्णिमा ला
रात्री लक्ष्मी व इंद्र पूजन करतात. आकाश दिवा दान करतात
जेष्ठ पाहिल मुल मुलगा असो किंवा मुलगी असो
त्यांना ओवाळतात.
लक्ष्मी व इंद्र यांनी रात्र भर दुध मध्ये चंद्र याचे किरण
पाडून जागरण करून ते दुध प्यालेले आहेत साठी
लक्ष्मी व इंद्र याची पूजा करतात.

पाऊस संपलेला असतो चंद्र चा प्रकाश चांगला पडलेला असतो.
चंद्र याची किरण स्वच्छ असतात ते दुध पिल्याने नैसर्गिक ता येते
साठी चंद्र याचे किरण पाडून दुध पितात. खर तर रात्र भर दुध
चंद्र याचे किरण पडायला हवे म्हणतात.

मी  चंद्र       दुध मध्ये पाहते नैवेद्द दाखविते.
बाकि छान. ठिक.
वसुधालय

 

 

आश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा

ॐ              दिनांक 26.10( अक्टोबर ) 2015.
                     आश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

कोजागिरी पौर्णिमा च्या शुभेच्छा !
आश्र्विन पौर्णिमा ला
रात्री लक्ष्मी व इंद्र पूजन करतात. आकाश दिवा दान करतात
जेष्ठ पाहिल मुल मुलगा असो किंवा मुलगी असो
त्यांना ओवाळतात.
लक्ष्मी व इंद्र यांनी रात्र भर दुध मध्ये चंद्र याचे किरण
पाडून जागरण करून ते दुध प्यालेले आहेत साठी
लक्ष्मी व इंद्र याची पूजा करतात.

पाऊस संपलेला असतो चंद्र चा प्रकाश चांगला पडलेला असतो.
चंद्र याची किरण स्वच्छ असतात ते दुध पिल्याने नैसर्गिक ता येते
साठी चंद्र याचे किरण पाडून दुध पितात. खर तर रात्र भर दुध
चंद्र याचे किरण पडायला हवे म्हणतात.

मी चंद दुध मध्ये पाहते नैवेद्द दाखविते.
बाकि छान. ठिक.
वसुधालय