सुट्टी आणि मी : भाग ०२

मुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली […]

पासपोर्ट टू प्लुटो – २

मागील भाग “पासपोर्ट टू प्लुटो ” मध्ये आपण प्लुटो या (बटू) ग्रहाचा शोध कसा लागला , कोणी लावला व त्याच्या छायाचित्रांचा रोमहर्षक प्रवास याबद्दल माहिती घेतली. आता पासपोर्ट टू प्लुटो या लेखमालिकेच्या द्वितीय भागात आपण प्लुटो सोबत होणाऱ्या पहिल्या भेटीची माहिती घेऊ. ( जर आपण मागील भाग ” पासपोर्ट टू प्लुटो ” वाचला नसेल तर येथे क्लिक करा)

                                           

मागील भागात सांगितल्या प्रमाणे प्लुटो या ग्रहाचे आपल्या कडे आजदेखील एकसुद्धा संपूर्ण छायाचित्र नाही. वास्तविक इंटरनेट वर आपण गुगल केले तर आपल्याला प्लुटो ची अनेक छायाचित्रे आढळतील परंतु ती सर्व खोटी आहेत. मानवाने अजून पर्यंत ” प्लुटो हा ग्रह” दिसायला कसा आहे हे जाणून घेतले नाही. कारण प्लुटो हा आकाराने अतिशय छोटा व अतिदूर आहे , म्हणून आज देखील आपण फक्त निरीक्षणांच्या सहाय्याने केवळ अंदाजच लाऊ शकतो कि प्लुटो हा ग्रह दिसायला कसा असेल किवा त्याच्या पृष्ठभाग कसा असेल, किवा त्याचं वातावरण कसे असेल, किवा तो कोणत्या रंगाचा दिसत असेल, या सर्व गोष्टींचा आपण सध्या फक्त अंदाजच लाऊ शकतो

अमेरिका या देशाच्या टपाल खात्याने प्रत्येक ग्रहाच्या मानवाच्या  पहिल्या भेटीचे महत्व लक्ष्यात घेऊन टपाल तिकीट छापले आहे, त्यात त्या ग्रहाचे अस्सल छायाचित्र, त्याचप्रमाणे त्या ग्रहाला कोणी भेट दिली व  सबंध मानव जाती साठी त्या ग्रहाचे पहिले अस्सल छायाचित्र हस्तगत केले याचा उल्लेख आहे. प्लुटो बाबतीत मात्र हे अगदी उलटे आहे. कारण आजपर्यंत प्लुटो वर कोणतेही यान पाठवण्यात आले नाही. पण याचा अर्थ असा नाही कि कधी कोणी प्रयत्नच केला नाही, वॉयेजर –  २ हे यान प्लुटो ला भेट देणार होते ! असे झाले असते तर आपण ७० ते ८० च्या दशकातच प्लुटो चे पहिले वहिले अस्सल छायाचित्र घेतले असते परंतु  अचानक त्याचा मार्ग वळवण्यात आला व त्याने प्लुटो ऐवजी शनि ग्रहाचा उपग्रह ” टायटन” ला भेट दिली. खगोल अभ्यासकांच्या मते “टायटन” ने  त्यांना प्लुटो पेक्षा जास्त आकर्षित केले कारण तेथे पृथ्वीशी मिळते जुळते वातावरण आढळले. वॉयेजर –  २ ने सुद्धा आपले काम चोखपणे बजावत टायटन ला भेट दिली, त्याचे छायाचित्र हस्तगत केले व अनेक निरीक्षणे नोंदवून ते यान आपल्या अनंत काळाच्या प्रवासाला निघाले ( आज २०१५ मध्ये देखील वॉयेजर –  २ या यानाचा प्रवास चालू आहे व ते पृथ्वीवर संदेश परत पाठवत आहे ).

या सर्व घडामोडींमुळे २००५ पर्यंत आपण प्लुटो चा माग  काढण्यात अयशस्वी होतो.  प्लुटो चे १ वर्ष हे पृथ्वीच्या २४८ वर्षांच्या बरोरीचे आहे, त्यामुळे जर का प्लुटो वर लवकरच यान पाठवले नाही तर प्लुटो ला भेट देण्या साठी अजून २४८ वर्षे थांबावे लागले असते . म्हणूनच अमेरिका च्या नासा ने  “न्यू होरायझन्स”  या यानाला प्लुटो वर पाठवायचा निर्णय घेतला , २००६ साली सुरु झालेला या यानाचा प्रवास आज देखील चालू आहे. वास्तविक प्लुटो हा ग्रह पृथ्वी पासून प्रचंड लांब आहे त्यामुळे एवढा लांब प्रवास जलद गतीने  करण्या साठी खगोल अभ्यासकांनी प्रचंड मेहनत घेतली, न्यू होरायझन्स आजपर्यंत चे सर्वात प्रगत त्याचप्रमाणे सर्वात जलद प्रवास करणारे यान ठरले आहे, त्याने आपल्या पृथ्वीच्या चंद्राची कक्षा केवळ ९ तासात ओलांडली ( अपोलो या चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमेला चंद्रावर पोचायला ३ दिवस लागले होते ! ) तसेच मंगळ व गुरु यांच्या मधला लघुग्रहांचा पट्टा पार करून न्यू होरायझन्स फक्त १३ महिन्यात गुरु जवळ पोहोचले ( गलिलिओ यानाला गुरु जवळ पोहोचायला ६ वर्ष लागलेली ) म्हणजे आपल्याला कळून येईल कि न्यू होरायझन्स हे किती जलद रित्या प्रवास करत आहे. एवढा जलद प्रवास करून देखील आपल्याला प्लुटो जवळ पोहोचण्यासाठी ९ वर्षाहून अधिक कालावधी लागला !

एवढ्या जलद वेगाने जाऊन देखील न्यू होरायझन्स  १४ जुलै २०१५ ला प्लुटो जवळ पोहोचणार आहे. या यांबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी आपण जाणून घेऊ.

१) न्यू होरायझन्स  इतक्या जलद वेगात प्लुटो जवळ जात आहे , कि एखाद्या छोट्याश्या दगडाच्या तुकड्याच्या टकरीने    देखील संपूर्ण यान नष्ट होऊ शकते !

२) न्यू होरायझन्स  प्लुटो ला जरी भेट देणार असले तरी सुद्धा ते प्लुटो च्या वातावरणात फार कमी वेळ राहणार आहे, कारण न्यू होरायझन्स  या यानाचा वेग आता आपण वाढवू शकतो परंतु कमी करू शकत नाही , त्यामुळेच आपल्याला अतिशय योजनाबद्ध पद्धतीने प्लुटो चे निरीक्षण  करून , त्याची जमेल तितकी छायाचित्रे ( हाय डेफिनेशन ) मध्ये काढून , सर्व महत्वाची  माहिती  गोळा  करावी लागेल , व हा अमुल्य माहितीचा खजिना पृथ्वीकडे परत पाठवावा लागेल.

  ३) सर्वात महत्वाचे म्हणजे न्यू होरायझन्सने सर्व माहिती + निरीक्षणे + छायाचित्रे घेतल्यावर  देखील जमा केलेली सर्व माहिती पृथ्वीवर परत पाठवली पाहिजे.

४)सूर्याचा प्रकाश प्लुटो वर पोहोचायला तब्बल ४.५ तासांचा कालावधी लागतो ( पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोचायला तब्बल ८ मिनिटे लागतात ) न्यू होरायझन्स पृथ्वीवर प्रकाशाच्या वेगाने संदेश पाठवणार आहे.

५) म्हणजेच न्यू होरायझन्स चा एक संदेश पोहोचायला  साढे चार तास लागतील ( ४.५ तास ) , त्याचप्रमाणे यानाला पृथ्वीवरून संदेश पाठवायला साडे चार तास लागतील . म्हणजेच साधारण न्यू होरायझन्स सोबत १ संभाषण पूर्ण करण्या साठी ९ तास लागणार.

६) केवळ हेच नाही , डाऊनलोडिंग  स्पीड २ केबी/ प्रती सेकंद  (2Kbps )असा असणार आहे जो अतिशय कमी आहे. त्यामुळे न्यू होरायझन्स जरी १४ जुलै २०१५ ला प्लुटो ला भेट देणार आहे तरी देखील त्या भेटी दरम्यान जमा केलेली सर्व माहिती पृथ्वीवर परत यायला तब्बल १ वर्ष लागणार !

७) न्यू होरायझन्स ची अन्टेना हे पृथ्वीकडे रोखलेली नसल्याने माहिती पाठवणे खगोल अभ्यासकांसाठी तारेवरची कसरत असणारे. १४ जुलैला संध्याकाळ पासून डाऊनलोड लिंक उपलब्ध होईल ज्याच्या पासून आपल्याला माहिती उपलब्ध होण्यास सुरवात होईल, व प्लुटो कसा दिसतो या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

८) न्यू होरायझन्स ने २००६ साली आपला प्रवास सुरु केला, त्या सुमारास प्लुटो ला केवळ १ चंद्र आहे अशी सर्व साधारण माहिती उपलब्ध होती, परं २०११ ला हबल अंतराळ दुर्बिणीचा रोख प्लुटो कडे वळावल्यावर त्याला अजून २ चंद्र आहेत असे समजले, तसेच आतागायात २०१५ ला प्लुटो ला एकूण ५ चंद्र आहेत असे आपल्याला माहित आहे. जर न्यू होरायझन्सने आणखीन  काही चंद्र शोधले तर त्या चंद्राच्या कक्षा ठरवून यानाला आपला मार्ग बनवावा लागेल ( लक्ष्यात घ्या पृथ्वीसोबत यानाला  १ संपूर्ण संभाषण पूर्ण व्हायला तब्बल ९ तास लागणार आहेत!!!!)

९) प्लुटो चे पृथ्वीपासून चे अंतर हे ४.७६  बिलिअन किलोमीटर्स   (२.९६ बिलिअन मैल ) इतके आहे म्हणजेच ” सुर्य पृथ्वी ” या अंतराच्या ३२ पट आहे. हे अंतर पार करायला न्यू होरायझन्स ला ३,४६२ दिवस लागतील ( १९ जानेवारी २००६- १४ जुलै २०१५ )

 १०) २ डिसेंबर २०११ पर्यंत प्लुटो पासून सर्वात  जवळ असलेली मानव निर्मित वस्तू ” वोयेजर -१” होती , परंतु आता ती न्यू होरायझन्स यान झाली आहे , त्याचप्रमाणे ते प्लुटो कडे अधिक वेगाने झेपावत आहे .

११)न्यू होरायझन्स  पहिले असे  यान आहे ज्याच्या मध्ये कोलेज च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले धुलीकण गोळा  करणारे ” विनिषा ” नावाच्या उपकरणाचा समवेश आहे. विनिषा नावाच्या मुलीने सर्वप्रथम ” प्लुटो” हे नाव सुचवले होते त्यामुळे तिच्या स्मृतीप्रित्यर्थ उपकरणाला हे नाव ठेवण्यात आले

१२) न्यू होरायझन्स RTG (radioisotope thermal generator) चा वापर करून उर्जा निर्मिती करते, कारण प्लुटो सूर्या पासून अतिदूर असल्याने ( सूर्यप्रकाश पोहोचायला ४.५ तास लागतात )  सौर उर्जेवर हे यान इतक्या दूरवर चालू शकत नाही.

१३) १४ जुलै २०१५ ला प्लुटो च्या भेटी दरम्यान न्यू होरायझन्स हे प्लुटो च्या जमिनी पासून केवळ ९,६५० किलोमीटर लांब असेल ! म्हणजेच आपल्याला प्लुटो चं जमिनी पासून ९,६५० लांब अंतरावून प्लुटो कसा दिसतो हे देखील छायाचित्राद्वारे दिसू शकेल !    

 १४)प्लुटो चा वेध घेतल्या नंतर न्यू होरायझन्स बाह्य सूर्यमाला मध्ये त्याचे मार्ग तयार करण्यासाठी तो यानाला अतिरिक्त गती चालना देण्यासाठी प्लूटोचे गुरुत्वाकर्षण वापरेल, व २०२० पर्यंत प्रवास कारण राहील, 2026 ला अधिकृतरीत्या हे मिशन संपेल.

प्लुटो व त्याचे चंद्र ! 
प्लुटो व शरोन चे रंगीत छायाचित्र 

कलेवर

ते होतं शहर गुलामांचं…
तिथे मूठभर मालक नि ढीगभर गुलाम.

ती, एक परागंदा राणी…
अवतरली तिथे, त्यां…

चार देवीयां

नरेंद्र मोदी सरकारच्या रथाचे चाक जमिनीत रूतण्यास सुरूवात झाली असून भ्रष्टाचारमुक्त कारभाराची नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत केलेली घोषणा आता हवेत विरून गेली आहे. भाजपाच्या चार उच्चपदस्थ चार देवीयांनी हे चित्र देशात तयार केले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मनुष्य बळ विकास मंत्री स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे ह्यांच्याकडे देशभरातल्या लोकांची नजर अहे. त्यांचा बचाव करण्यासाठी राजनाथसिंग आणि अमित शहा कामाला लागले आहेत. पंकजा मुंडे ह्यांचा बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना पुढे यावेच लागणार आहे. ह्या चौघींनी घेतलेल्या निर्णयांचे समर्थन करण्याची मोदी सरकारची डोकेदुखी निश्चितपणे वाढलेली आहे. चौघींनी जे केले ते चूक की बरोबर हा मुद्दा निराळा, पण मोदी सरकार बोलल्याप्रमाणे चालले नाही असा बट्टा भाजपाला लागल्याशिवाय राहणार नाही. उक्ती आणि कृती ह्यात अंतर वाढत चालल्यामुळे येत्या संसदीय अधिवेशनात नरेंद्र मोदी सरकारची अब्रू पणास लागणार हे निश्चित!
इंग्लंडला स्थायिक होण्याच्या आणि तिथून अन्यत्र पळून जाण्याच्या माजी क्रिकेट कमिश्नर ललित मोदी ह्यांचा इरादा होता की नाही हे स्पष्ट नाही. परंतु ललित मोदींच्या हालचाली पाहता संशयाची सुई त्यांच्याभोवती फिरते आहे हे नक्की. म्हणूनच पोलिस रेकॉर्डनुसार ललित मोदी हे फरारी असून ते पकडले गेले तर पोलिसांना हवे आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजना हे माहीत नव्हते असे नाही. तरीही त्यांनी ललित मोदींना पोर्तुगालचा व्हिसा मिळवून दिला. आपण  मानवतावादी दृष्टिकोनातून ललित मोदींना मदत केली असा खुलासा सुषमाजींनी केला आहे. ! गुन्हेगारी जगात मानवतावादी भूमिकेचा अर्थ लहान मुलासही माहीत आहे. भ्रष्टाचाराचे सर्वच व्यवहार हे नेहमीच मानवतावादी भूमिकेतून चालतात. अशाच मानवतावादी भूमिकेतून उद्या दाऊदलादेखील सोडून द्याल का? ह्या प्रश्नाचे उत्तर सुषमा स्वराज ह्यांच्याकडे नाही.  ललित मोदींची अडचण दूर करण्याची शिफारस राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे ह्यांनी सुषमा स्वराज ह्यांना केली होती. मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि ललित मोदींचे काय साटेलोटे आहे त्यांचे  त्यांनाच माहित! मुख्यमंत्री वसुंधरा राजे ह्यांनी ललित मोदीसाठी काये केले ह्याचा पुरावेच वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायला सुरूवात झाली आहे. ह्या प्रकरणी अजून तरी नरेंद्र मोदींनी महामौन पाळले आहे. आता दोघींच्या संदर्भात नरेंद्र मोदींना जी भूमिका घ्यावी लागेल ती खुद्द त्यांच्या भूमिकेला छेद देणारी ठरेल! म्हणूनच मोदी काय बोलतात करतात, काय करतात  इकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. तूर्तास गृहमंत्री राजनाथसिंग आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा ह्यांच्यावर सरकारचा चेहरा डागळणार नाही ह्याची काळजी घेण्याची कामगिरी सोपवून मोदी मोकळे झाले आहेत.  ह्या दोन देव्यांकडून गुन्हा घडलेलाच नाही; त्यामुळे  त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे राजनाथसिंग आणि अमित शहा ह्यंनी जाहीर केले आहे. नरेंद्र मोदी ह्या दोघींच्या पाठीशी उभे आहेत का? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सुषमाजी त्यांच्या विरोधात होत्या. त्यामुळे सुषमाजींवरील कारवाईस राजकीय आकसाचा वास येत राहणार. नरेंद्र मोदी न खाऊंगा न खाने दूंगा’  ही घोषणा करून बसले आहेत. संसद अधिवेशनात हे प्रकरण लावून धरलण्याची नामी संधी काँग्रेसला चालून आली आहे. ह्या पार्श्वभूमीवर मोदी तोंड उघडणार नाहीत. मोदींनी तोंड उघडावे ह्यासाठी काँगग्रेस जंग जंग पछाडणार हे उघड आहे!
मनुष्बळ विकास मंत्री स्मृति इराणी ह्यांच्या पदवी प्रकरणी प्रथमदर्शनी केस दाखल करण्याइतका पुरावा असल्याचा निकाल दिल्लीच्या कोर्टाने दिल्यामुळे स्मृति इराणी त्या निकालास स्टे मिळवण्यासाठी त्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील. परंतु कोर्टाकडून त्यांना स्थगिती मिळाली तरी त्यांच्यावर हकालपट्टीची टांगती तलवार राहणारच. तिघींची प्रकरणे गाजत असतानाच महाराष्ट्रात पंकजा मुंडे ह्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराची भानगड सुरू झाली. त्यांनी वर्ष संपता संपता एकाच दिवशी 206 कोटी रूपयांच्या खरेदीची कंत्राटे बहाल केली. पंकजा मुंडे ह्यांचा कामाचा झपाटा नजरेत भरण्यासारखा आहे! आपण नियमबाह्य काहीच केले नाही असा खुलासा पंकजांनी केला असला तरी काँग्रेसने त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात रीतसर तक्रार दाखल केल्यामुळे लाचलुचपत खात्याच्या महासंचालकांना ह्या प्रकरणाची रीतसर चौकशी नाही; पण अनौपचारिक विचारणा करणे भाग पडले आहे. तशी ती त्यांनी विचारणा सुरूदेखील केली आहे. त्यातून काय निष्पन्न होईल ह्याबद्दल तूर्तास तरी अंदाज बांधता येणार नाही. विनोद तावडे ह्यांचे पदवीप्रकरण सध्या देशात गाजत असलेल्या अन्य प्रकरणांपुढे किरकोळ ठरले आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्यापुढे नाही. मात्र, खरी समस्या राहील ती फडणविसांपुढे आहे तो पंकजा मुंडे ह्यांच्याचीच.
अशा प्रकारच्या आरोपांना तोंड देण्याचा प्रसंग पंकजा मुंडे ह्या काही पहिल्याच मंत्री नाहीत. सामान्यतः अशा प्रकरणी मंत्र्याचा राजिनामा घेण्य़ाची पद्धत काँग्रेस कारकिर्दीत किती तरी वेळा अवलंबण्यात आली आहे. अगदी गेंड्याची कातडी असलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी मुख्यमंत्र्यांनी  केल्याच इतिहास आहे. खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यासही दिल्लीने पद सोडण्यास भाग पाडले आहे. मात्र, फडणविसांना हे प्रकरण श्रेष्ठींच्या सल्ल्यानुसारच हाताळावे लागणार आहे. मुख्यमंत्री ह्या नात्याने त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पंकजा मुंडे ह्यांना राजिनामा द्यायला लावण्याचे राजकारण सुरू होण्यापूर्वी त्या अन्य मागासवर्गियांच्या नेत्या असल्यामुळेच त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा डाव आहे असा प्रचार पंकजांच्या गोटात सुरू झाला आहे. ह्या राजकारणामुळे केवळ फडणवीस ह्यांचेच हात बांधले जातील असे नाही तर दिल्लीतल्या भाजपाश्रेष्ठींचेही हात बांधले जाऊ शकतात.
मोदी सरकारला अडचणींत आणण्याचा हेतू सुषमा, वसुंधरा, स्मृति आणि पंकजा ह्या चार देवींचा मुळीच नाही. परंतु त्यांच्या अनुनभवी कारभाराचा फटका मोदींना बसणार आहे. आपल्या कारभारास युतीआघाडीच्या सत्तेमुळे मर्यादा पडल्या असे विधान माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांनी केले होते. आता नरेंद्र मोदींना मात्र कोणती सबब सांगण्यास वाव नाही.

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता  
www.rameshzawar.com

एकांकिका

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकांकिकांची तयारी जोरात सुरु आहे. पाहायला आलात तर नक्की आवडेल.

वेषांतर:
तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?
कलाकार : रणजित गुर्जर, मेघनाकुलकर्णी, सुप्रिया गरुड, मोहना जोगळेकर, बोस सुब्रमणी.

धोबीपछाड – कुस्तीमधला एक डाव. काळ बदलला, साधनं बदलली तसं डावपेचांचं स्वरुप बदललं. रंगमंचावरचा धोबीपछाडही असाच. या डावात कुस्तीपटू आहेतस्वत:ला यम म्हणविणारे दोघं. हे दोघं रंगमंचावरच शड्डू ठोकून उभे ठाकतात. सावित्री- सत्यवान भूमिका करायची की नाही या संभ्रमात पडतात. तेवढ्यातदुसरा यमदूतही उभा ठाकतो. नाटकातलं नाटक रंगायला लागतं. अखेर कोण होतं चितपट? यम की यम? आणि कोण होतं यमदूत…? विनोदी एकांकिका – धोबीपछाड.
कलाकार: संदीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, प्रशांत सरोदे, प्रिती सुळे, चिन्मय नाडकर्णी, गिरीश भावठाणकर.
अधिक माहिती:

मी आणि तु ….(भाग ५)

“आज्या आज तुझी वहिनी आली नाही वाटतं?”, मी हळूच आज्याला डिवचलं. त्याला थोडावेळ लागला समजायला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की मी “सारिका” बद्दल विचारतोय. 
“नाही”, त्यानं डोळे वटारून मला उत्तर दिलं.
मुग्धाही होतीच आमच्यासोबत. आता बरेच दिवस झाले होते आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळे अशा गमती-जमती आमच्यात चालायच्या. पण ही चेष्टा बहुदा मुग्धाला आवडली नाही. तिनेही माझ्याकडे रागाने एक नजर टाकली.
तेवढ्यात मिहीरने नोटिस बोर्डवर exam schedule लागल्याची बातमी सांगितली. Engineering मधली पहिली exam असल्याने आम्ही सगळे excited पण होतो आणि nervousही.
बघता-बघता PL सुरू झाली. PL म्हणजे जरी Preparation Leave असली तरी ती Engineering मधला सुवर्णकाळ मानली जाते. या दिवसांत “Preparation” कमी “Leave” जास्त असते. निवांत झोपणे, सिनेमे बघणे, क्रिकेट खेळणे आणि कधी कंटाळ आलाच तर अभ्यास. असा हा आमचा दिनक्रम सुरू होता. PL असल्यामुळे कॉलेजला जाऊन जवळ जवळ २० दिवस झाले होते. आम्ही मुलं जवळ जवळ राहायचो त्यामुळे मुग्धा सोडली तर आम्ही सगळे रोज भेटायचो. पण तिला भेटुन बरेच दिवस झाले होते आणि तिला आम्ही कोणी भेटलो नव्हतो, त्यामुळे तिला कसे वाटत असेल याची कल्पना आम्हा कोणालाही नव्हती. किंबहुना आम्ही तर जणू तिला विसरलोच होतो.

Exam च्या ४ दिवस आधी Hall Ticket घेण्यासाठी कॉलेजला जायचा योग आला. कमानितुन आत जातो तोच मुग्धा आम्हाला दिसली. बहुदा बराचवेळ आमचीच वाट पाहात होती. आम्हाला बघुन झालेला आनंद तिच्या चेहर्‍यावर साफ दिसत होता. Hi-fi झाल्यानंतर तिने एक जोरदार फटका माझ्या हातावर मारला. मला काही समजायच्या आत रोह्या अन आज्यालाही प्रसाद मिळाला.

“तुम्ही मला विसरलात किनी?” तिने बॉम्ब टाकला.

“खर सांगा. १५-२० दिवस झाले भेटुन. कोणालाच आठवण नाही ना झाली माझी?” तिने पुन्हा जाब विचारला.

“अग तसं नाही. खरतर विसरलेलो तसे, पण तुला आत्ता बघितल्यावर परत आठवण झाली”, मी हळूच तिची खोड काढली.

चेहर्‍यावर आलेलं हसू दाबत, “अजून मी चिडले आहे”चा आव आणण्याचा निष्फळ प्रयत्न करत तिने पुन्हा मला एक जोरात फटका लावला. Hall ticket घेतल्यानंतर आम्ही कॅंटिनला चहा घ्यायला गेलो.

“ए यार कोणितरी मला Basic Mechanical Engineering शिकवारे. मला काहिच झेपत नाहिये”, मुग्धा तोंडाचा चंबु करून बोलली.

“अगं खुप सोप्प आहे. Physics च्या पेपरवेळी मी तुला माझ्या नोट्स देतो.”, रोह्या बोल्ला.

“रोह्या ही गद्दारी? तु कधी नोट्स काढल्यास?” मी रागाने रोह्याला विचारलं आणि सोबत आज्याचीही साथ मिळाली.

“तुम्ही तो कुठला डब्बा ’ओम शांती ओम’ बघायला गेला होतात ना, तेव्हा.”, रोह्यानं जोरदार उत्तर दिलं.

“ए वॉव. कसा आहे रे सिनेमा. मलाही बघायचा आहे.”, मुग्धा बोलली.

“घ्या. तुम्ही सगळे एकसारखेच. अरे ४ दिवसावर exam आली आहे आणि सिनेमांवर काय बोलताय? बोलायचय तर First Law of Thermodynamics वर बोला किंवा Stress-strain वर बोला.”, रोह्या त्रासिक आवाजात बोलला.

“ए रोह्या. एबग. माज्या फुडं तुज़ा नंबर आहे. कायपन झालं तर मला exam मदे दाखवायचं” आज्यानं रोह्याला तंबी दिली.चहा-नष्टा घेऊन आम्ही आपापल्या घरी परतलो.

रोह्यासारखा “शिक्षक” असताना आम्हाला exam मधे काहीच अडचणी आल्या नाहीत. पेपरच्या आदल्या रात्री रोह्या आम्हाला आमच्या आग्रहास्तव “Passing” पुरतं सांगायचा. आणि मग आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावर तिखट-मीठ, मिर्चमसाला टाकून उत्तर लिहून यायचो. Seniors नी सांगितलेला एकच गुरूमंत्र आम्ही लक्षात ठेवलेला, “भावांनो. आपल्या युनिव्हर्सिटीत मार्क मजकुराच्या ‘लांबी X रूंदी ’ वर मिळतात. जेवढ लिहिता येइल तेवढ लिहा. नसेल माहित उत्तर तरी जे माहितिये ते लिहा. Be creative!“.

बघता बघता exam संपली अन results ही लागले. अपेक्षेप्रमाणे रोह्याने टॉप केले आणि आमचा सगळा ग्रुप चांगल्या गुणांनी पास झाला. आम्ही TTMM म्हणजेच “तुझं तु, माझं मी” तत्वावर एक छोटिशी पार्टीही केली.दिवस मस्त सुरू होते. चेष्टा मस्करीही सुरू होती. या सगळ्यात मुग्धा मात्र विचित्र वागू लगली होती. बाकी कोणी एखाद्या मुली बद्दल काही छान बोललं, comment केली तर ती हसत घ्यायची, पण तेच मी बोललो तर माझ्याकडं रागाने बघायची आणि कधी कधीतर जोरात मारायचिही.

हा तिच्यातला बदल बहुतेक आज्या अन रोह्याच्या लक्षात आला असावा. असकाही घडलं की ते दोघे माझ्याकडं बघुन “खट्याळ” हसायचे. मलाही थोडं विचित्र वाटायच पण कारण काही कळत नव्हतं. असं बर्‍याचदा घडल्यानंतर एकदा मात्र माझं डोकं सटकलं.

“आई शप्पत. आज्या बघं तुझी वहिनी आज कसली मस्त दिसतिये”, मी नेहमीच्याच पद्धतिने त्याची खोड काढली. आणि अपेक्षेप्रमाणे मुग्धाने मला जोरात फटका मारला. आज मात्र मी चिडलो.

“काय ग तुझ दरवेळी? माझ्यावरच का कायम चिडतेस? हे बाकिचे बोलतात, comment करतात तेव्हा तु काही बोलत नाहीस. उलट हसतं घेतेस आणि मी कधी काही बोललो तर चिडतेस अन मारतेसही. काय आहे हा प्रकार?”, रागाच्या भरात माझा आवाज कधी चढला माझं मलाच समजलं नाही. माझ्या या अनपेक्षित reaction मुळे मुग्धाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं अन ती तिथुन निघुन गेली.

मिहीर तिला थांबवायला, तिची समजुत काढायला तिच्या मागं धावला. बाकी आज्या, रोह्या आणि सौर्‍या माझ्याकडे रागाने बघत होते.

“माझ्याकडं काय बघताय. माझं काय चुकलं सांगा यात. चायला दरवेळेचं आहे. हे” मी आजुन माझं बोलण संपवायच्या आत आज्या बोल्ला,

“ए नळकांड्या. पहिले गप बस. तु तिला सगळयांसमोर चिडून बोल्लास हे तुज चुकलं. शांतपने पन सांगु शकला असतास. आनि तुझ्या नसलेल्या बुद्धीला जरा चालव आनि स्वतःलाच विचार की ती तुलाच का असं करत असेल ते.”, एवढं बोलुन तिघेही निघून गेले. मी मात्र कारणं शोधत तिथेच बसलो.

दुसर्‍या दिवशी मी थोडा उशीरा कॉलेजला गेलो. लांबुनच मी ग्रुपमधे मुग्धाला पाहिलं. नेहमी सारखी ती हसत खेळत नव्हती. माझं मलाच वाईट वाटल. मी धाडस केलं अन सगळ्यांसमोर तिची कान धरून माफी मागितली. प्रसंगी कान धरून दोन उठा-बशा पण काढल्या आणि ती हळूच हसली.

मी तिला बाजूला बोलावलं,

“मुग्धे सॉरीकी गं. खरच मला तुला दुखवायच नव्हत”

“It’s okay रे. होतं कधी कधी”

“पहिले सांग मला माफ केलस की नाही”

“जा बाळा. मी तुला माफ केलं. जी ले अपनी जिंदगी” असा डायलॉग टाकून ती नेहमीसारखी हसू लागली. तिला परत हसताना पाहून मलाही बरं वाटलं.

“बर आता मला सांग की तु अशी का वागत होतीस. I mean की माझ्या बोलण्यावरच तु चिडायचीस. असं का?”

“तुला खरच नाही कळालं आजुन की तु तसा बनाव करतोयेस?”

“खरचं नाही कळालं मला. काल स्वतःला प्रश्न विचारून विचारून वेडा झालो पण तु माझ्या बाबतीत एवढी possessive का आहेस हेच कळेना”

“आता तुला कसं सांगू. खरच मंद आहेस तु.”

“अगं बोल ना. नाहितर आजपण झोप नाही येणार मला”

“अरे मंदा. मला तु आवडतोस. I Love You”.

——————————————————————————–

(दुसर्‍या दिवशी)
“अरे रोहित. विकी कुठय?” मुग्धाने विचारलं.

“अग काय झालय त्याला काय माहित. काल तुझ्याशी बोलल्यानंतर जो गायब झाला तो सरळ रूमवर जाऊन झोपला. काल पासून तापाने फणफणलाय. डॉक्टरकडे पण जायला तयार नाही. खुपच ताप होता काल. त्याला एक क्रोसिन देऊन झोपवलाय. दुपारी जाऊन बघुन येइन परत बर आहे का ते. नाहीतर डॉक्टरकडे घेऊन जाईन. बर ते सोड, मला सांग काल काही बोलला का तो तुला? म्हणजे बरं नाही वाटत वगैरे?”

“नाही रे. आमच बोलणं झाल्यानंतर तो निघून गेला”

“मी पाहिलयं त्याला तुमच बोलनं झाल्यावर फास्टात जाताना. काय बोल्लीस त्याला?” आज्याने रागाने मुग्धाला जाब विचारला.

“अरे काही नाही. माफी मागितली त्याने. मी माफ केलं. बस्स एवढच बोलण झालं “
======================================================================================
मी आणि तु कथेचा हा पाचवा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,

-अद्वैत कुलकर्णी

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

जुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते
शेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते
शोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे
तीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे
शेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते?

उठसूठ होयनोय पाखुरा करते
‘मुक्या’च्या चुलीपाशी झाडलोट करते
गावातला ‘मुका’ इथं फास घेऊन मरते
पोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते
‘अभय’तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते?

– गंगाधर मुटे ‘अभय’
————————————————

Filed under: कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य Tagged: कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, Poems, Poetry

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

जुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते
शेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते
शोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे
तीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे
शेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते?

उठसूठ होयनोय पाखुरा करते
‘मुक्या’च्या चुलीपाशी झाडलोट करते
गावातला ‘मुका’ इथं फास घेऊन मरते
पोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते
‘अभय’तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते?

– गंगाधर मुटे ‘अभय’
————————————————

Filed under: कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य Tagged: कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, Poems, Poetry

अंबरनाथचे शिवमंदीर

अंबरनाथचे शिवमंदीर


अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर
जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे
उन – पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले 
स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “अंबरनाथचे शिवमंदिर”.
अंबरनाथचे शंकराचे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याने बांधलेले
हे मंदिर आज महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत उभे आहे.

ट्रेकिंगमध्ये सावधानता बाळगावी.

        
     पावसाळा सुरु झाल्या झाल्या भटके  सह्याद्रीत जाण्यास 
उत्सुक  असतात. पावसाच्या  आगमनाचा  सर्वात आंनद या 
भटक्यांना होतो.आंनदाच्या भरात सुरक्षितता न बाळगल्याने
काही अपघात झाले आहे.निसर्गाच्या विपरीत धाडस प्राणांवर 
बेतू   शकते    याचे भान  प्रत्येक ट्रेकरने राखणे गरजेचे आहे.
नवख्या भटक्यांना सह्याद्रीतली माहिती नसल्याने अपघात 
होतात.विशेष  करून   पावसाळ्यात नवखी मंडळी उत्साहाने 
बाहेर  पडतात, तेव्हा धोका वाढतो. काही दुर्घटना तर अगदी 
क्षुल्लक   कारणांमुळे घडल्या आहेत. आपल्यातल्या क्षमता 
ओळखायला   हव्या.सुरक्षितता न  बाळगता धाडस केल्यास 
ते जीवावर बेतू शकते. प्रत्येकाने  आपली व आपल्या बरोबर 
आलेल्या  प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे.निसर्गाचा मान 
राखून    जर तुम्ही वावरलात तर ट्रेक करताना सहसा काही 
त्रास  होत नाही. निसर्गाच्या कुशीत आपण त्याने उधळेल्या 
सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जातो आहोत,त्याच्याशी स्पर्धा 
करायला नाही हे नेहमी लक्षात ठेवावे.   

काही दिवसापूर्वी पनवेलजवळील ईर्शाळगडावरून पडल्याने 
चेंबूर   येथील   सिद्धार्थ   आर्य (२९) या गिर्यारोहकाचा मृत्यू 
झाला, असे    त्याच्या    मित्रांकडून,  तसेच स्थानिकांकडून 
सांगण्यात    आले.  सिद्धार्थ   आर्य हा आपल्या मित्रांसोबत 
ईर्शाळगडावर   गेला होता. साधारण १० जणांचा त्यांचा गट 
होता. रविवारी    सकाळी     आठच्या   सुमारास त्यांनी गड 
चढण्यास   सुरुवात  केली. गडावरील सुळका ते कोणत्याही 
सुरक्षा  साधनांशिवाय चढले व उतरले होते. त्यानंतर पुन्हा 
हा सुळका चढत असताना सिद्धार्थ खाली पडला. 

  परवाच   ’चंदेरी ’ वर जाताना एका गिर्यारोहकाचा संशयीत 
मृत्यु झाला आहे.अशा बातम्या वाचण्यात येते आहेत. 

 


 सुळके कोणत्याही साधनांशिवाय चढाई करणे धोकादायक 
असून    जीवाशी खेळ    ठरु    शकते.    सुळख्यांवर चढाई 
करण्यासाठी    प्रस्तारोहणाचे    प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. 


     एखादी     भटकंती     कमी  झाली  तरी चालेल, एखाद्या 
भटकंतीमध्ये छायाचित्रण करायला नाही मिळालं तरी चालेल 
पण  तुम्ही    जसे    गेलेलात   तसेच परत यायला हवे, इतर 
कुठच्याही     गोष्टीला    स्वतःच्या    आणि  तुमच्या सोबत 
भटकंतीला आलेल्या मित्राच्या सुरक्षेपेक्षा कमी महत्व द्या.


  बॅग भरताना, जास्तीचे जेवण- मुबलक पाणी- प्रथमोपचार 
पेटी    आणि  विजेरी न चुकता घ्यावी. “जेवण तिथे मिळेल, 
पाणी   गडावर असेल, दिवसा-उजेडी परतू” अश्या हिशोबात 
राहू नये. 

  ज्याठिकाणी     जाणार     आहोत, त्या ठिकाणची माहिती 
जाण्य़ापूर्वी   गोळा  करायची.यासाठी इंटरनेट, पुस्तके किंवा 
माहितीगार     असेल    तर त्याला विचारून त्या ठिकाणची 
टिप्पणे काढावीत. या   माहितीमध्ये  तेथील रस्ते,  वाहतूक, 
पाण्याची सोय,    राहण्याची सोय, जेवणाची सोय, हवामान, 
धोका,  आपत्कालीन  मदत व गाड्य़ांच्या वेळा या गोष्टींचा 
समावेश    असावा.अगोदर    जाऊन आलेल्यांकडून माहीती 
जमवावी.   जेथे   जाणार आहोत त्याचा एक कच्चा नकाशा 
जवळ ठेवावा.

  आपण   ट्रेकला कुठे जाणार आहोत हे   आपल्या घरच्यांना 
माहित असणे   गरजेचे आहे.आपल्या सोबत  येणाऱ्या दोन – 
तीन    मित्रांचा   नंबर घरी दिला तर त्यांना संपर्क करण्यास 
सोईचे   होईल.

    मुख्य     म्हणजे पावसाळ्यात   सगळ्या वाटा निसरड्या 
झालेल्या असतात. तेव्हा   तीव्र  स्वरूपाचा उतार असेल,उंच 
कडा असेल तर अशा ठिकाणी जास्त सावधगिरी बाळगावी. 

  ट्रेकिंगमध्ये   कुणाचीही कुणाशी स्पर्धा नसते. एखादा मागे 
राहिला तर त्याला हिणवू नये.वेगात पुढे जाण्याच्या स्पर्धेला 
अजिबात प्रोत्साहन देऊ नये.

    जर    एखाद्या     ठिकाणी    चालणे अवघड वाटत असेल, 
रस्ता धोकादायक वाटत असेल तर अशा ठिकाणाहून माघारी 
परत फिरणे हे    शहाणपणाचे  ठरते. अपघात  होऊन जखमी 
होण्यापेक्षा माघारी   येऊन    निसर्गाचा    आनंद लुटता येतो. 
एक लक्षात   ठेवावं   की,   डोंगरात        अपघात झाला, तर 
त्याठिकाणी     बचाव   कार्य करणं खूप अवघड गोष्ट असते. 
वैद्यकीय   सुविधा वेळेवर पोहचवणं शक्य होत नाही, तेव्हा 
आपणच काळजी घेतलेली बरी. 

    काही वेळेला तुम्ही एखादा ओढा किंवा नदी सहजपणे पार 
करून   जाता  पण परतताना पाऊस नसतानासुद्धा पाण्याचा 
प्रवाह  वाढताना  दिसतो. वरच्या भागात जोरदार पाऊस सुरू 
असेल    तर   असे प्रवाह ओलांडताना काळजी घ्यायला हवी. 
पाणी    कमी    आहे  म्हणून अती धाडस करू नये. अचानक 
ओढय़ाचे  किंवा नदीचे पाणी वाढण्याची शक्यता असते.

   एखादा    ट्रेक ग्रुपमधील कोणीच केला नसेल तर गावातील 
माहितीगार सोबत नेल्यास सोईचे ठरते तसेच वाट चुकण्याचा 
प्रश्नच उरत नाही.

  शक्यतो जास्त मळलेली पायवाट धरावी, अनावश्यक शोर्टकट 
टाळावेत.   काही   वेळा धुक्यामुळे वाट सापडत नाही अशावेळी 
गोंधळून   न  जाता काही खुणा (पाटी, बाण,वगैरे दिशा सूचक ) 
दिसतात का ते पाहावे. 

     अवघड ट्रेकमध्ये अवजड कॅमेरे आणि लेन्सचे साहित्य नेवू 
नये. ते साहित्य सांभाळण्याचा त्रास होतो.

   डोंगरात     रात्री     मुक्काम   असेल तर अंधार होण्याआधी 
मुक्कामाची जागा निवडावी.  झोपायला टेंट असेल तर उत्तम, 
विंचू  –   काट्याची      भीती     राहत   नाहीत, टेंट नसेल तर
मुक्कामासाठीच्या    जागेचा   प्रत्येक   कोपरा काठी आपटून 
तपासून घ्यावा, साप- विंचू- गोम किंवा तत्सम विषारी प्राणी 
असू शकतो. 

   तहान लागल्यास प्रथम पाठीवरची बॅग काढून ठेवावी अन 
खाली बसून (व्यवस्थित जागा पाहुन) एक / दोन घोट पाणी 
प्यावे.दम लागल्यास तर श्वास हळू होउ दया मग पाणी प्या.

    दीर्घ    पल्ल्याचे  ट्रेक एक तर पहाटे सुरुवात करावी.नाही 
जमल्यास अंधार   पडायच्या   आत सुरक्षित जागी पोहचावे. 
  
     प्रथमोपचार   किट बरोबर नेहमी ठेवावे.त्यामध्ये डेटॉल,
बोरोलीन,    रेलिस्प्रे,   विक्स ,   कॉटन अन बैंडेज पट्टी असे 
छोटेखानी कीट प्रत्येक भटक्याने ठेवावे. ब्लीडिंग झाल्यास 
ते रोखायला लगेच कापूस लावू नका ,पहिले जखम स्वच्छ 
पाणी ने धुवा ,झऱ्याच पाणी सुद्धा चालेल. 


    अतिघाई संकटात नेई.ग्रुप मध्ये अशी टाळकी असतातच 
की नेते बनायला जातात. त्याना रोखा.


  चालताना पायाने दगड   खाली ढकलू नका.वरुन एखादा दगड 
पायाने     निसटला  तर  “watch out!” म्हणायला विसरु नका. 
उगाच बोम्बलू नका.

   जंगली      सरपटणाऱ्या     प्राणी – कीटकांची योग्य माहिती 
असल्याशिवाय    हातात  घेवून छायाचित्रण करू नये. सापांचे 
छायाचित्रण अगदी जवळ जाऊन करू नये.

 पावसाळ्यात पायवाटा आणि हिवाळ्यात दव पडल्याने वाळलेलं 
गवत     कमालीचं     निसरडं   होतं. तेंव्हा पावसाळयात आणि 
वाळलेल्या गवतावर अगदी जपून चालावं. 

   चांगल्या ग्रीपचे बूट भटकंतीमध्ये खूप महत्वाचे.
 
   चहा-जेवण्यासाठी चूल किंवा शेकोटी पेटवताना आसपास मोहोळ 
नाही ना याची शहानिशा करून घ्यावी,धुराने चिडलेल्या मधमाश्या 
हल्ला करू शकतात.जेवण बनल्यावर    चूल व्यवस्थित विझवावी,
चुलीत आग धुसमसत   असेल  तर वाऱ्याने ठिणगी उडून अघटीत 
घटना घडू शकते.

    प्रत्येक भटकंतीमध्ये किमान ५०-६० फुटी दोर बाळगावा,५०-६० 
फुटी छोटे वाटणारे कडे सुद्धा    धोका  देऊ शकतात. असे कडे चढून 
गेल्यावर    काही     ठिकाणी    अडकता. पुढे किंवा मागे फिरणे ही 
अश्यक्य होऊन जाते आणि अपघात घडतात. छोटा दोर असेल तर
असे कडे पार करायला फारसा त्रास होत नाही. 

   सगळ्यात महत्वाचे दारू किंवा कसलंही व्यसन कधीही वाईटचं, 
डोंगरात   तर ते सर्वात वाईट.नशेत अपघाताचे प्रमाणे कित्त्येक 
पटीने  वाढते. डोंगरात कसलंही व्यसन करू नका, करू देऊ नका. 

  सगळ्यात महत्वाचे डोंगरवाटेवर शक्यतो आपला ग्रुप   सोडू नये. 
अशा काही खबरदारीच्या गोष्टी करणे सहजशक्य आहे. 

  अपूर्ण माहिती,अतिउत्साह टाळला व खबरदारी घेतेली तर आपला 
ट्रेक  नक्कीच आनंददायी आणि अविस्मरणीय राहील. ट्रेकिंगमध्ये 
सावधानता बाळगल्यास ट्रेकिंगची मजा घेता येते.  

एक SMS करेल तुमचे ईमेल अकाउंट हॅक

अनेक वेबसाईटस्, ईमेल अकाऊंटस्, विविध सोशल साईटस् वरील अकाऊंटस् हॅक केल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. यातच आता तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करुन तुमचे ईमेल अकाऊंट हॅक करण्याच्या एका नव्या पध्दतीची भर…

पुढे अधिक वाचा… >>

सरकारी ‘योगशॉपी’

योगविद्येला योगशॉपी संबोधून भारताच्या प्राचीन योगविद्येला नावे ठेवण्याचा हेतू नाही. परंतु युनोतर्फे दि. 21 जून रोजी साजरा होणा-या योग दिवसानिमित्त केंद्र सरकारच्या पुढाकाराने आणि सहभागाने योगदिवसाला आलेले स्वरूप योगशॉपीपेक्षा वेगळे नाही. दिल्ली येथे होणा-या सरकारी कार्यक्रमास योग दिवस म्हणण्यापेक्षा ड्रिल दिवस तर युनोच्या मुख्यालयात होणा-या कार्यक्रमास योगशॉपी म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. वास्तविक योग हा काही निव्वळ मनःस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्यासाठी नाही. योगाची संकल्पना व्यापक असून ईश्वराशी युज्य होणे हा योगाचा खरा अर्थ आहे. योगाच्या संकल्पनेबद्दल शास्त्रकारांत तीव्र मतभेद आहेत हे सर्वश्रुत आहे. देशभरातल्या आध्यात्मिक आखाड्यात त्यावर एकमत होण्याची सुतराम शक्यता नाही. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी खटपटीलटपटी करून युनोला योग दिवस साजरा करण्यास प्रवृत्त केले. 21 जून 2015 हा युनोतर्फे साजरा होणारा पहिलाच योगदिवस आहे.
अध्यात्मप्रेमींच्या मते पतंजलींनी लिहीलेले योगसूत्र सोडले तर तोंड वेडेवाकडे करून सर्कस सदृश हालचालींना योग म्हणणे ही योग शब्दाची घोर विटंबनाच आहे! रामदेवबाबांसारख्या आधुनिक योग गुरूंचे टीव्हीवरील योगासनाचे वर्ग पाहताना तर जनसामान्यांना असे वाटू लागते की योग योग म्हणताता तो हाच! ह्या योगात हातपाय, कंबर दुमडण्याला किंवा मान वेडीवाकडी करण्याला महत्त्व आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास रामदेवबाबा शिकवतात ती योगासने म्हणजे त्यांच्या आयुर्वेदिक मालाची जाहिरात करण्यासाठी हुषारीपूर्वक सुरू करण्यात आलेला स्टंट आहे. रामदेवबाबांच्या योगासनांना हटयोग प्रदीपिका ह्या प्राचीन ग्रंथाचा ठोस आधार आहे ह्यात शंका नाही.  योगशास्त्रावर घेरंडसंहिता किंवा योगवासिष्ट ह्यासारखे प्राचीन ग्रंथही आहेत. अजूनही बुद्धीवान वाचकांवर पडलेली त्यांची पडलेली मोहिनी संपलेली नाही. परंतु योगाचा विचार योगासनांहून कितीतरी खोल आहे ह्याची जाणीव सामान्य माणसाला झालेली नाही.  ती होणारही नाही कारण बहुतेक पुस्तके ह्या ना त्या पुस्तकातल्या उचलेगिरीवर आधारलेली असून चित्रवाण्यांवर चालणा-या चर्चेतही तीच ती बडबड सतत चाललेली असते. वास्तविक योग हा गीता-भागवत ह्या सर्वमान्य ग्रंथांनुसार ईश्वराप्रत नेणारा, नव्हे स्वतःत आणि अवघ्या प्राणीमात्रात साक्षात् ईश्वरदर्शन घडवणारा आहे
महाराष्ट्रात भक्ती ही योगाचीच दुसरी बाजू आहे असे मानले जाते. ज्ञानेश्वरांना नाथ परंपरेकडून योगदीक्षा मिळाली होती. तीच दीक्षा त्यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या संतमंडळीला दिली. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात आपल्याला मिळालेल्या समाधीधनाचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला आहे. सर्व प्रांतातल्या होऊन गेलेल्या बहुतेक संतमंडळाची योगाच्या संदर्भात हीच भूमिका आहे. सगळ्या संतांनी योगापेक्षा भक्तीला का महत्त्व दिले?  एक ज्ञानेश्वर वगळता कोणाही अन्य संतांना योगमार्गाची दीक्षा मिळालेली नाही. म्हणून त्यांनी भक्तीचा पुरस्कार केला. परंतु ज्ञानेश्वरांनी योगमार्गाचा प्रसार का केला नाही? ह्याचे कारण योग मार्ग अत्यंत अवघड असून योगाच्या निसरड्या कड्यावर जाताना पाय घसरून पडण्याची शक्यताच अधिक! म्हणून हटयोगापासून ही सगळी मंडळी स्वतःही लांब राहिली असावी. भाळ्याभोळ्या लोकांना त्यांनी योगासनाच्या भानगडीत न पडण्याचाच आडवळणाने केलेला उपदेश केला आहे असे वाटते.
भारत ही योगभूमि असूनही बहुसंख्य माणसे योगापेक्षा भक्ती का श्रेष्ठ मानतात हा एक गूढ प्रश्न आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या पुष्पिकेत योगशासस्त्राचा उल्लेख केला आहे. योगाची ही सुप्त परंपरा पाहता अलीकडे अचानक योगाचे महत्त्व कसे वाढले?  ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. योगामुळे अष्टमहासिद्धी प्राप्त होतात, कोणताही चमत्कार करून दाखवणे योग्याला शक्य आहे, योग्याला पाण्यावरूनदेखील चालता येते, मुसमुशीत तारूण्य योग्याचे दास्य पत्करायला केव्हाही सिद्ध असतो. धंडी ऊनवा-याचापासून कसलाही त्रास होऊ शकत नाही, त्याला हवे ते आणि हवे तसे मिळवता येते असा  शिष्यांचा दृढ समज योगगुरूंनी त्यांच्या करून दिला. परंतु संतांनी मात्र चमत्कारापेक्षा कर्मयोगावर आणि कर्मे करता करता नैषकर्म होण्यावर भर दिला आहे. अर्धशिक्षित शिष्यांचा एकवेळ तसा समज झाला असेल तर ते समजू शकते. परंतु उच्च्पदस्थ अधिकारी, राजकारणी, मोठमोठे धनिक वगैरेंचाही तात्कालिक फायद्यावरच डोळा आहे. आज साजरा होत असलेला योग दिवस हे त्याचे बोलके उदाहरण आहे.
योगाबद्दल लोकांच्या भोळसट कल्पनांची सरकारमधील जाणत्यांना कल्पना नाही असे नाही. परंतु नरेंद्र मोदी ह्यांच्यापुढे कोणाचे चालत नसावे! सर्व महत्त्वाचे कूटनीतिक कामकाज बाजूला सारून योगदिवस साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व दूतावासांना कामाला लावणारे परिपत्रक परराष्ट्र खात्याने काढले.  परराष्ट्र खात्याने सुरू केलेल्या ह्या दुकानदारीला रमजानच्या पवित्र महिन्याचा अपशकुन होतो की काय अशी साधार भीती राजकीय वर्तुळात वाटू लागली आहे. भारतात साजरा होणा-या योगदिवसात सामील होण्यास अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला असून सूर्य नमस्कार हा योगासानाचा भाग इस्लामच्या तत्त्वाला धरून नाही आहे असे त्यांचे म्हणणे. परंतु भाजपाशी घरोबा केलेल्या काही चारदोन मुस्लिम संघटनांनी सूर्य नमस्कार घालताना नमाज पढताना जे मंत्र म्हणतात त्या मंत्रांचा उच्चार केला किंवा अल्लाचे स्मरण करावे अशी तोड काढली.
जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियाने भारताच्या योग दिनास विरोध केलेला नाही. कारण तेथला धर्म मुस्लिम असला तरी तेथली संस्कृती ही पूर्णतः हिंदू म्हणता येईल अशी आहे. बाली बेट तर हिंदूंचे बलस्थान म्हटले तरी चालेल. त्यामुळे भारतीय दूतावासातर्फे साजरा होणा-या योग दिवसास इंडोनेशियाचा बिल्कूल विरोध नाही. उत्तर आफ्रिका, मध्य आशियातील मुस्लिम देशांचा योग दिवसाबद्दल बरेच उत्साहाचे वातावरण आहे. पण हा उत्साह दुकानात गि-हाईकाने पाय ठेवताच दुकानदारात जसा उत्साह संचारतो तसा आहे.
भारताबरोबर व्यापार वाढला तर आपला फायदाच आहे असे कदाचित् ह्या देशांना वाटत असेल तर त्यात काही चूक नाही. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया ह्यांच्यासह 10 देशांचा मात्र योग दिनाला सुरूवातीपासून विरोध होता. युनोत योग दिनाचा प्रस्ताव जेव्हा  भारतातर्फे मांडण्यात आला तेव्हाच त्यांनी ह्या प्रस्त्वाचे सूचक म्हणून सहभागी होण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे हा योगदिववस ह्या देशातील भारतीय दूतावासांना योग दिवस घरगुती स्वरूपात म्हणजे दूतावासापुरताच साजरा करावा लागणार आहे. योगात इस्लामविरोधी असे काहीच नाही हा भारतातर्फे सुरू झालेल्या युक्तिवाद अर्थात त्यांच्या गावी नाही. इंडोनेशियात योगाचा उदोउदो करण्यास मात्र भारताला भरपूर वाव आहे. मलेशियात योग दिवस कसा आणि कितपत साजरा होईल ह्याबद्दल संदिग्धतता असून ह्या संदर्भात सरकारलाही अंदाज नाही.
योग इस्लामी तत्त्वांशी विरोधी आहे की नाही ह्याबद्दल सौदी अरेबियाला काही देणेघेणे नाही. मक्का मदिना ही इस्लामची मूळ भूमि असून ती सौदीच्या ताब्यात आहे. त्यामुळे हिंदूंची योगाप्रसाराचीची खटपट त्यांना मुळातच मान्य नाही. रोमन कॅथालिक वा ज्यू इत्यादींनी योगदिवसाबद्दल सावध मौन बाळगलेले दिसते. मुस्लिम जगाप्रामणे ख्रिश्चनांच्या विश्वात फारशी प्रतिक्रिया दिसली नाही. अर्थात त्यांच्या मौनात योगाला पाठिंबा की विरोध आहे हे स्पष्ट नाही. परंतु ख्रिश्चन धर्माच्या संदर्भातली युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील रोमन कॅथालिकांना पोपखेरीज कोणाला फारसे मानत नाहीत. त्यामुळे ते योगाच्या वाटेला जाणार नाहीत.
अमेरिकेत मात्र युनोच्या योग दिवस जाहीर करण्याच्या पूर्वीपासूनच योग लोकप्रिय आहे. योगदिवस साजरा करण्याची भारताने करण्यापूर्वी अमेरिकेत स्वामी विवेकानंद, योगानंद ह्यांच्यामुळे योगविद्येच्या प्रसार झाला होताच. नुसताच प्रसार झाला असे नव्हे तर कुबडी, आसन, पंचा, गुरुशर्ट, नेति जलधोती वगैरे योग अन्सिलरीजची तुफान विक्री अमेरिकेत सुरू आहे. समाधीत प्रवेश कसा करावा ह्याचा डेमो, प्रार्थना वगैरेंच्या ध्वनिमुद्रित सीडीजदेखील अमेरिकेत उपलब्ध असून त्या ब-यापैकी खपतात. अमेरिका हा शेवटी व्यावसायप्रधान देश असल्यामुळे तेथे कोणता व्यवसाय केव्हा भरभराटीला येईल ह्याचा नेम नाही. चीनच्या शॅव्हलॉन स्कूनलवरील सिनेमाने प्राचीन चिनी विद्येबद्दल अमेरिकेत अफाट कुतूहल निर्माण झाले. ते ओसरलेही. ह्या पार्श्वभमीवर दि. 21 जून रोजी साजरा होणा-या योग दिवसास अफाट प्रतिसाद मिळाला तरी तो कितपत टिकेल ह्यात शंका नाही.

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
www.rameshzawar.com

औंदाची शेती – २०१५

औंदाची शेती – २०१५

               १९-०६-२०१५
भल्याभल्यांचे, थोरामोरांचे सारे अंदाज वावटळीत उडवून यंदा पावसाने शेतीस योग्य अशी दमदार सुरुवात केली आहे. धोंड्याचे वर्ष (अधिकमासाचे) शेतीसाठी अनुकूल असते असा पारंपारिकपणे शेतकर्‍यांनी बाळगलेला समज खरा ठरावा, अशी आशादायक स्थिती आजच्या दिवसापर्यंत तरी खरी ठरली आहे.
औंदाची शेती

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

 *****************************************

औंदाची शेती

 

कपाशीची लागवड करण्याचा दिवस उजाडला आणि आपल्या लहानसान मुलाबाळासह शेतकरी आपल्या कर्तव्याला तत्पर झाला.
बालमजुरी कायद्याचं आमच्या लेकराबाळांना संरक्षणही नाही.
आणि
शेतकर्‍याची लहान लेकरं शेतावर राबली तरी शेतकर्‍यांचं काही वाकडं करण्याची ऐपतही कायद्यात नाही.
 (त्यांना स्वस्तात शेतमाल पाहिजे ना? मग शेतकर्‍याची मुलं शेतात फ़ुकटात काम करत असेल तर ते सार्‍यांना हवेहवेसेच आहे.)
*****************************************

औंदाची शेती

पेरते व्हा!
पेरते व्हा!
*****************************************

औंदाची शेती

 याला आमचेकडे फ़साटी म्हणतात.
तुमच्याकडे काय म्हणतात.
शेतकी पुस्तकात याला काय पर्यायी शब्द आहे?
*****************************************

Filed under: छायाचित्र, बळीराजा, वांगमय शेती, हवामान Tagged: वांगमय शेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेती विषयक

औंदाची शेती – २०१५

औंदाची शेती – २०१५

               १९-०६-२०१५
भल्याभल्यांचे, थोरामोरांचे सारे अंदाज वावटळीत उडवून यंदा पावसाने शेतीस योग्य अशी दमदार सुरुवात केली आहे. धोंड्याचे वर्ष (अधिकमासाचे) शेतीसाठी अनुकूल असते असा पारंपारिकपणे शेतकर्‍यांनी बाळगलेला समज खरा ठरावा, अशी आशादायक स्थिती आजच्या दिवसापर्यंत तरी खरी ठरली आहे.
औंदाची शेती

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

 *****************************************

औंदाची शेती

 

कपाशीची लागवड करण्याचा दिवस उजाडला आणि आपल्या लहानसान मुलाबाळासह शेतकरी आपल्या कर्तव्याला तत्पर झाला.
बालमजुरी कायद्याचं आमच्या लेकराबाळांना संरक्षणही नाही.
आणि
शेतकर्‍याची लहान लेकरं शेतावर राबली तरी शेतकर्‍यांचं काही वाकडं करण्याची ऐपतही कायद्यात नाही.
 (त्यांना स्वस्तात शेतमाल पाहिजे ना? मग शेतकर्‍याची मुलं शेतात फ़ुकटात काम करत असेल तर ते सार्‍यांना हवेहवेसेच आहे.)
*****************************************

औंदाची शेती

पेरते व्हा!
पेरते व्हा!
*****************************************

औंदाची शेती

 याला आमचेकडे फ़साटी म्हणतात.
तुमच्याकडे काय म्हणतात.
शेतकी पुस्तकात याला काय पर्यायी शब्द आहे?
*****************************************

Filed under: छायाचित्र, बळीराजा, वांगमय शेती, हवामान Tagged: वांगमय शेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेती विषयक