मार्गदर्शक गुगल मॅप

  काही दिवसापूर्वी मित्रमंडळीस ’सांधण व्हॅली’  येथे जाण्यास रात्री बारा सुमारास खाजगी वाहनाने ठाण्याहून निधाले.गप्पा करीत करीत इगतरपूरी पर्यत प्रवास हायवेने सुरु केला.रात्र असल्याने रस्ता दाखवण्यास कोणीच नव्हते.मग मोबाईलवरील गुगल मॅपवर ’साम्रद’ ह्या ’सांधण व्हॅली’ जवळील गावाची  नाव नोंद केली.’नेट’ व ’जीपीआरएस’ सुरु केले.मोबईलवरील या अ‍ॅपने मार्ग दाखवण्यास सुरुवात केली.नाशिक हायवे सोडून ’भंडारदरा’च्या मार्गाकडे वळण्याची पहिली सुचना मिळाली.पुढे प्रत्येक वळणावर पूर्वसुचना मिळत होती.गाडीच्या वेगात ’साम्रद’ या गावी किती वाजता पोहचणार व अजून किती अंतर कापायचे आहे याची माहीती मिळत होती.

 किर्र रात्र होती.रस्त्याला चिटपाखरु दिसत नव्हते.चालकाला रस्त्याची माहीती नसल्याने त्याला मोबाईल पाहून रस्त्याची माहीती देत होता.रस्त्याच्या बाजुला असलेल्या काही ठिकाणांची माहीती दाखवण्यात येते.यावरून आपण आपला मार्ग योग्य दिशेने जात असल्याची खात्री करु शकतो.चालकालाही रस्त्यावरच्या छोट्याछोट्या नोंदी पाहून आश्चर्य वाटले.पुढे येणा-या गावाची नोंद व अंतर याचीही माहीती दिली जाते.यावरून आपला प्रवास योग्य दिशेन सुरु आहे याची खात्री पटते.रस्ता दोन भागात विभागत असेल तर  आपण कोणत्या मार्गाने जायाचे याची पूर्व सुचना शंभर मीटर अगोदर दिली जाते.  

  या अ‍ॅपच्या साहाय्याने आम्ही सगळे चार वाजता ’साम्रद’ गावी सुखरुप पोहचलो.पोहचल्यावर आपण सांगितलेल्या ठिकाणी पोहचला आहात असे सांगितले गेले.मोबाईलवरील या अ‍ॅपची मदत झाली नसती तर रस्त्याच कोठेतरी थांबून पहाटे प्रवास करावा लागला असता.रात्री रस्ता शोधणे कठीण झाले असते.गावातल्या मंडळी इतक्या रात्री कसे काय पोहचलात याची पिचारपूस केली.

 गुगल मॅप या अ‍ॅपने निर्धास्त प्रवास करु शकतो याची प्रचिती आली.खूप जणांनी हे  अ‍ॅपच्या मदतीने प्रवासही केला असेल.पण ज्या मंडळीना यांची माहीती नसले त्यांच्यासाठी ही माहीती पुरवली आहे.

  आपल्या ट्रेकर मंडळीना एक विंनती आहे या ’गुगल मॅप’वर गडाच्या ठिकाणांच्या नावाची नोंद केल्यास तेथे जाण्यास सर्व ट्रेकरना मदत होईल. 

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

शेतकरी नेते मा. शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९८० पूर्वी शेतकर्‍यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्‍यांची संघटना होणार नाही” असे त्या काळी म्हटले जायचे. पण शरद जोशी नावाच्या एका ज्ञानेश्वराने शेतकर्‍यांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा मुका असलेला शेतकरी समाज ज्ञानेश्वराच्या रेड्याप्रमाणे बोलायला लागला. नुसताच बोलायला लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा शेतकरी चक्क मूठ आवळून रस्त्यावर उतरला. सरकारशी दोन हात करायला सज्ज झाला. शेतकरी संघटनेने शेतकर्‍याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. शेतीत गरिबी आहे याचे कारण शेतीतला माल स्वस्तात स्वस्त भावाने लुटून नेला जातो, हेही शिकविले.

जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही निसर्ग शेती करा, सेंद्रिय शेती करा,  कमी खर्चाची शेती करा, जास्त खर्चाची शेती करा, पारंपरिक शेती करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा. शेती कशीही करा; जोपर्यंत शासनाचे शेतकरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतकर्‍याचे मरण अटळ आहे. कोरडवाहू शेती केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि ओलिताची शेती केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.

शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भाव मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणवून घेत असले तरी शेतीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.

शिवाय या स्वनामधन्य शेतीतज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही.  कुणी म्हणतो निसर्गशेती करा, कुणी म्हणतो झिरो बजेट शेती करा, कुणी म्हणतो मार्केटिंग करायला शिका तर कुणी म्हणतो प्रक्रिया उद्योग उभारा. आता तर काही लोकं मानवी मूत्र वापरायचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण शेतमालाचे भाव म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.

निसर्गशेती म्हणजे काय? आमचे बाप-आजे निसर्गशेतीच तर करत होते. रासायनिक खते वापरत नव्हते, कीटकनाशके फवारत नव्हते, संकरित बियाणे लावत नव्हते आणि घरी संडास नसल्याने संडासला शेतातच जात होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही जनतेला जाऊ द्या; त्या शेतकर्‍यालाच पोटभर खायला अन्न मिळत नव्हते. धान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, ओलिताची व्यवस्था निर्माण झाली, फ़वारणीसाठी किडीनुरूप कीटकनाशके निर्माण झाली आणि चमत्कार झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यामागे रासायनिक खतांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर थांबवला तर देशाचे शेतीतील उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे.  निसर्गशेतीचा सल्ला देणार्‍यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!

झिरो बजेटशेती हा शब्द ऐकला की मला ओकार्‍या व्हायला लागतात. झिरो बजेट शेती हा शब्द मला काही केल्या पचवून घेताच आला नाही. शून्य खर्चाची शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे? शेतीला बियाणे लागले ते चोरून आणायचे का? गोड गोड बोलून खतं उधारीत आणायची मग त्याचे पैसे बुडवायचे का? खर्च शून्य करायचा म्हटलं तर शेतकर्‍यांनी वस्त्र परिधान करणे सोडून झाडाच्या वल्कली अंगाभवती गुंडाळाव्यात का? मजुरांकडून फुकटात काम करून घ्यायचे म्हटले तर मग या देशात वेठबिगारी व गुलामगिरीची पद्धत नव्याने सुरुवात करायची का? कसली आली बोडक्याची शून्य खर्चाची शेती?

अनेकदा शेतकर्‍यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात. शेतीमध्ये सुद्धा जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो. शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्‍याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्‍यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक आमच्या शेतीतज्ज्ञांना कळत नाही, ही अद्भूतआश्चर्याच्या तोडीची बाब आहे.

तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्‍याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्‍या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्‍यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ शेतकर्‍यांना जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात मार्केटिंगसारखा बोजड शब्द वापरून शेतकर्‍याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.

पूर्वी गावागावात बाराबलुतेदारांचे व्यवसाय चालायचे, गावागावात तेलघाण्या होत्या. गुळाची गुर्‍हाळं होती, हातमाग होते, कवेलू बनविण्याच्या भट्ट्या होत्या, कुंभारांचा कुंभारवाडा होता. तेलबियांपासून तेल, तूर-चण्यापासून डाळ, धानापासून तांदूळ, ज्वारी-बाजरी-गव्हापासून पीठ गावातच तयार होत होते. ही तेव्हाची शेतमाल प्रक्रियाच होती ना? आता शासकीय धोरणांच्या कृपेने गावात पिठाची चक्की हा एकमेव कुटीरोद्योग उरला आहे. बाकी सारंच शहरात-महानगरात पळालं आहे. हा बदल आपोआप घडलेला नाही. याला शासनाची इंडियाला पूरक आणि भारताला मारक शेतकरीविरोधी धोरणेच जबाबदार आहेत.  इस्रायली शेती, शेतकरी व त्यांचं तंत्रज्ञान या विषयी बोलणारे चिक्कार आहेत. रस्त्याने चालायला लागलं की जागोजागी ठेचा लागतात इतके मार्गदर्शक गल्लोगल्ली झाले आहेत पण; इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणाविषयी कुणीच “माईचा लाल” बोलायला तयार नाही. शेतीविषयात भरारी घेण्यात इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. तिथले शेतीधोरण शेतीला पूरक आहेत भारतासारखे मारक नाहीत, हे मात्र जाणीवपूर्वक मांजरीच्या शेणासारखे या तज्ज्ञाकरवी झाकून ठेवले जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शेतमाल स्वस्तात लुटून नेणारी धोरणे राबविली गेली त्यामुळे गावात बचत निर्माण होणे थांबले आणि खेडी भकास होत गेली. शेतमाल स्वस्तात मिळाल्याने आणि पक्का माल महाग विकण्याची मुभा मिळाल्याने शहरात-महानगरात बचत निर्माण झाली. बचत निर्माण झाली म्हणून शहरात कारखानदारी वाढली आणि शहरे फुगत गेली. जेथे बचत निर्माण होत नाही तेथे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकत नाही. गाव ओसाड झाले आणि गावात प्रक्रियाउद्योग निर्माण होत नाही याचे कारण येथे दडले आहे. आमचे शेतकी तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते शेतकर्‍यांना दोष देत फ़िरत असतात. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांना घेता येत नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क शेतकरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.

मी निसर्गशेती, कमी खर्चाची शेती, पारंपरिक शेती, सेंद्रीयशेती वगैरे कोणत्याही शेतीपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट शेतकर्‍यांसमोर शेती पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. शेतकर्‍याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या खिशाला परवडणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या शेतीत करोडो रुपयाचे उत्पन्न येईल आणि तू मालामाल होशील, अशी बतावणी करून फीच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्‍यांची लूटच करून जातात. शेतकरी देशोधडीला लागतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र शेतमाल लुटीच्या व्यवस्थेबद्दल ही मंडळी तोंडामध्ये चक्क बोळे कोंबून असतात, यावर माझा आक्षेप आहे.

पगारी शेतीतज्ज्ञांचे तर बरे असते. काही वर्ष रासायनिक खतांचा वापर करा म्हणून सांगत सुटतात, त्याचाही ते पगार घेतात. मग रासायनिक खतांचा वापर टाळा म्हणून सांगत सुटतात. त्याचाही पगार घेतात. यातच त्यांच्या नोकरीचे आयुष्य निघून जाते. पण पुन्हा मरेपर्यंत पेन्शन आहेच. कर्तृत्व काय तर एकदा ’करा’ म्हणून सांगीतले आणि एकदा ’टाळा’ म्हणून सांगितले. मला असे वाटते की शेतकर्‍यांना आता सल्ले वगैरे देण्याची अजिबात गरज उरलेली नाही. शेतमालाच्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवून अन्य उपचार करण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. जर तुम्हाला शेतीच्या भल्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असा आव आणायचा असेल तर निदान शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली निघेपर्यंततरी सर्वांनी मिळून आपले लक्ष्य शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरच केंद्रित केले पाहिजे.

मी एक उदाहरण सांगतो. ४  वर्षापूर्वी माझा एक जवळचा नातेवाईक आजारी पडला होता. आजार तसा साधा होता. पण त्याला सतत ताप यायचा. ताप आला की १०५ डिग्री सेल्सियसच्याही पुढे जायचा. ताप चढला की पॅरसिटॉमालसहित कुठल्याही औषधाने उतरतच नव्हता. फक्त गार पाण्याच्या कापडीबोळ्याने अंग पुसून काढले की ताप उतरायचा पण तोही तात्पुरताच. काही मिनिटातच पुन्हा चढायचा. सर्व उपचार केलेत पण यश येत नव्हते. १५ दिवस लोटले पण काहीच सुधारणा होत नव्हती. हिंगणघाटचे डॉक्टर झाले, वर्ध्याचे शासकीय रुग्णालय झाले, सेवाग्राम इस्पितळात उपचार करून झाले पण ताप उतरायचे नावच घेईना उलट आजार आणखी गंभीर होत गेला. शेवटी पेशंट घेऊन आम्ही नागपूरला एक्स्पर्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर आजवर केलेल्या औषधोपराची माहिती घेतली आणि म्हणाले की जितका औषधोपचार करायला तेवढा करून झाला आहे. आता मी आणखी कुठले औषध देऊ? काहीही द्यायचं बाकी राहिलेलं नाही. हे ऐकून आम्ही अक्षरश: हादरलोच. मग थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे. आम्ही म्हणालो, काय खर्च येईल तो येऊ द्या साहेब चिंता करू नका पण उपचार कराच. त्यावर डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे “उपचारच न करणे.” पुढील ७२ तास रुग्णाला अजिबात औषधच द्यायचे नाही. मला खात्री आहे की पेशंटवर तोच एकमेव उपचार आहे. आम्ही होकार दिला. औषधोपचार बंद केल्याने कदाचित जर काही अघटित घडले तरी आम्ही डॉक्टरला दोष देणार नाही, असेही लेखी स्वरूपात लिहून दिले.

रुग्णाला औषध देणे बंद केले आणि पाच-सहा तासातच ताप उतरायला लागला. १५ दिवसापासून न उतरलेला ताप सातव्या तासाला ताप पूर्णपणे उतरला. पुन्हा फिरून ताप आलाच नाही. रुग्ण पूर्णपणे बरा झाला तो सुद्धा औषधी देणे थांबवल्याने. शेतीचेही तर असेच होत नाही ना? गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शेती नावाचा पेशंट एकच आहे आणि त्यावर औषधोपचार करणारे तज्ज्ञ आहेत लक्षावधी. संपूर्ण भारतवर्षात शेतीचे मुख्य दुखणे एकच आहे आणि तेही सार्वत्रिक समान आहे मात्र सुचविण्यात येणारे इलाज नाना तर्‍हेचे आहेत. जो येतो तो शेतकर्‍याला वाटेल तसा डोज पाजूनच जातो. शेतीची मुख्य बिमारी एकच; शेतमालास योग्य भाव न मिळणे. पण इलाज मात्र भलतेच चालले. कदाचित नको त्या उपचारानेच तर शेती व्यवसाय आणखी दुर्दशेकडे ढकलला जात नाही ना? याचाही प्रामुख्याने विचार करायची वेळ आली आहे.

शेतकरी हा मुळातच उत्पादक आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच शेती कशी करायची याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. बीटी आली तेव्हा संशोधकांचे म्हणणे असे होते की, देशभरात बीटी वाण लागवडीखाली यायला वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर बीटीवाणाचा प्रसार झाला. त्यासाठी शासकीय पातळीवरून काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता शेतकर्‍यांना निसर्गानेच दिलेली आहे.

उत्पादन कसे घ्यावे, हे शेतकर्‍यांना सांगायची गरजच नाही. फक्त शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेतीत सुबत्ता येऊन बचत निर्माण करायची असेल तर सर्व शेतकरी हितचिंतकांनी “शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

                                                                                                                           – गंगाधर मुटे

——————————————————————————————————————

दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख

Filed under: वाङ्मयशेती Tagged: वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र, My Blogs

सिंधुदुर्ग किल्ला

हल्लीच कोकण दौरा केला त्या दौ-यात सिंधुदुर्ग या जलदुर्गात जाण्याची संधी मिळाली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतकेउभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.

किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे किल्ला अगदी उठून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
     छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य व अजिंक्य जलदुर्ग बांधला तोच सिंधुदुर्ग होय.
चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे,हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले.

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे.येथे जाण्य़ास मालवणहून बोटीने प्रवास करावा लागतो.पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर मालवण जेटी वरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात . किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे. 
तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे.  प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर लागते. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.तटाच्या आत आले की मुख्य रस्त्यावर राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही.

वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. ह्या बुरुजाचा उपयोग टेहाळणी करीता केला जात असे.बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे. 

बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात. ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत. 
गाईडने किल्ल्याची माहिती चांगल्या प्रकारे दिली.इतिहास डोळ्यासमोर उभा केला.   

                                 सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या डागडुजीचे काम सुरु होते.

 भवानी मंदिर
सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.”फोर्ट ऑगस्टस” कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.हा भव्य जलदुर्ग पाहून आनंद झाला.  

‘लुच्चे दिन’ आले : नागपुरी तडका

‘लुच्चे दिन’ आले : नागपुरी तडका

सच्चे दिन’ म्हणता म्हणता ‘लुच्चे दिन’ आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ….॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ….॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्‍यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ….॥

दुष्काळाच्या वार्‍यापायी शेंगा नाही झोंबल्या
ज्या काही झोंबल्या त्या भावापायी लोंबल्या
चाळीस रुपये किलोवर कापूस रांगत नाही
सोयाबिनच्या इज्जतीले व्यापार हुंगत नाही
काय करू काय नाही, समजत नाही मले ….॥

कास्तकाराचे हाल भाऊ, कुत्रे पुसत नाही
काय पेरावं यंदा, काही मार्ग सुचत नाही
ना सुलतानाची हमी, ना कायदोबाचे ’अभय’
म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय”
आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ….॥

– गंगाधर मुटे ‘अभय’
——————————————————

Filed under: अच्छे दिन आनेवाले है, कविता, वाङ्मयशेती Tagged: कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, शेतीचे अनर्थशास्त्र, Poems, Poetry

एक केवळ बाप तो

एक केवळ बाप तो

तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

– गंगाधर मुटे ‘अभय’

———————————————-

Filed under: गझल, मार्ग माझा वेगळा Tagged: कविता, गझल, मराठी गझल, वाङ्मयशेती, My Gazal, Poems, Poetry

मितवा – भाग २

प्रिय मितवा,

तसा तुझ्यासोबतचा संवाद माझ्या मनास नवा नाही, इतका तू मनात वसतोस, प्रत्येक क्षण असतो तुझ्यासह जगण्याचा, आनंदाचा! तुझ्यासोबत घालवलेले क्षण ही फक्त त्या क्षणांची गोष्ट नसते रे.... पुन्हा पुन्हा माझ्या मनात दरवळणारी कुपी असते, आनंद, सुख प्रेमरूपी अत्तराची. आज त्यात थोडा बदल करत थोडा प्रवास अव्यक्ताकडून व्यक्त होण्याचा. थोडे हे अत्तर कुपीतून बाहेर दरवळू देण्याचा. मनात शिरता शिरता कसा तू अवघे मन व्यापून उरलास ते कळलेच नाही. मनाचा काही क्षणांचा विरंगुळा म्हणत सुरु झालेले मनातले हे गूज कसे आयुष्यभरासाठीचा आनंद ठेवा बनून गेले ते माझे मलाही समजले नाही. चराचरात देव असतो म्हणतात त्याप्रमाणे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात तू असतोस. मनाच्या सर्व दिशा व्यापूनही दशांगुळे उरतोस असा तू माझा मितवा. 

तुला लिहिलेल्या कवितांचा हा पुढील भाग. कारण हा कवितांरुपी संवाद हे माझे तुझ्यासाठीचे मनोगत असले तरी ते मनातल्या मनातच आता न राहू द्यायचे ठरवल्याने सर्वांपर्यंत पोचवलेले. हे लिखाण म्हणजे माझे स्वत:शीच व्यक्त होणे, माझीच क्षितिजे विस्तारणे, माझे फुलणे, उमलणे. तुझ्या सोबतच्या या संवादाने काय दिले तर एक स्वप्नसखा, एक स्वप्नवत आयुष्य, आयुष्याकडे पाहण्याची, ते शक्य तितक्या आनंदाने जगण्यासाठीची नवी दृष्टी जी मलाच नव्याने गवसू पाहत आहे. मनातली तुझ्यासोबतची मी म्हणजे जणू “फिरुनी नवी जन्मेन मी” असं म्हणत जिचा पुनर्जन्म झालाय अशी मी.

नाते तुझं नी माझे…..

कसं गुंफलं गेलंय 
पौर्णिमा अमावस्येच्या
खेळासारखं नातं तुझं नी माझं
तुझी भेट जणू रात पुनवेची
मातलेल्या चांदव्याची 
प्रेमास उधाणाची

सकाळ होताच तू मावळलेला
दिवस कलेकलेने मला विझवणारा
दाही दिशांतून काळोखणाऱ्या  

अवसेकडे पुन्हापुन्हा नेणारा

मनाच्या अवकाशात गच्च
अंधारून आले की मग
कुठुनसा तू मनात हसणारा
मी येतोय असे सांगणारा

कलेकलेने आस लावणारा
पौर्णिमा अमावस्येचा खेळ
तुझं नी माझे नाते
नित्य फुलवत ठेवणारा

तुझ्या आठवणी……
अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा

आठवणी तरी कशा?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात

३) अंतर …..
दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे काहूर 
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 

४) तुझ्यामुळेच सखया ………
तुझ्यामुळे पसरू लागले मनाचे इंद्रधनू पुन्हा
तुझ्यामुळे ऊमलू लागली गालांवरती कुसुमे पुन्हा

तुझ्यामुळे परतू आले ओठांवरी हास्य पुन्हा
तुझ्यामुळेच गवसू लागले माझ्यातील मी पुन्हा

तुझ्यामुळे लाभला जगण्यास अर्थ पुन्हा
तुझ्यामुळेच जाणला त्यातला मोद पुन्हा

तुझ्यामुळे जागला अंतरीचा भाव पुन्हा
तुझ्यामुळेच दरवळला माझ्यातला गंध पुन्हा

तुझ्यामुळे पसरला मनी चांदणसडा पुन्हा
तुझ्यामुळेच उगवला प्रितीचा चांद पुन्हा

५) तू माझा होता …
तू माझा होता
शब्द मला दुरावले
ओठातून परतले
डोळ्यांतून ओसंडू लागले 

तू माझा होता
मन माझ्याशी भांडले
मला सोडून वेडे
तुझे होऊन राहिले 

तू माझा होता
चंद्राला चांदणे गवसले
प्रीतीच्या सागरावर
ते उधाणू लागले

तू माझा होता
साऱ्या जगाला विसरले
उघड्या मिटल्या डोळ्यांनी
फक्त तुलाच पहिले

तू माझा होता
सारे सारे मिळाले
प्रेमवेड्या मीरेला
जणू कृष्णसखा गवसले

६) इतुकेच मागणे सखया ……
माझं जग माझं जग
म्हणजे तरी काय असावे
तुझ्यापासून सुरू होऊन
तुझ्यापाशीच येऊन थांबावे

स्वप्ने तुझी बघोनी
पहाटेस जाग यावी
स्वप्नातल्या सख्याची
प्रत्यक्ष भेट व्हावी

नको वाटती सुर सनईचे पहाटेे
सुरेल कोकिळाही आता मला न भावे
साद तुझी ऐकण्यास सखया
अखंड मन हे धावे

सहस्र जलधारांसम  प्रेम तुझे लाभावे
भरल्या ओंजळीने माझ्या रिते न कधी व्हावे
आषाढ मेघ बनूनी तू आवेगे बरसावे
शांत क्लांत धरेसम मी तृप्त तृप्त व्हावे

नको तुळशीचे पान, नको गंगेचे जल
हाती हात तुझा असता व्हावा संधीकाल
सारे काही तू देऊनही मागणे तरी ऊरेलच
हा जीव शांत व्हावा सखया तुज पहातच

७) सहजीवन…
तुझे माझे सहजीवन म्हणजे
दोघांनी मांडलेली भातूकली
थोडा खेळ, थोडे भांडण
तरीही तुझ्या माझ्याशिवाय न रंगणारी 

तुझे माझे सहजीवन म्हणजे
विणायला घेतलेली पैठणी जरतारी
वीण जमून आलेली सुबक नक्षी
तुझे माझे अंतरीचे धागे घेऊन विणलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
दारातली सुबक रांगोळी
संगती जुळून आलेली
तुझे माझे रंग घेऊन रेखाटलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
अखंड सुरेल मैफल
सदैव बहारदार रंगलेली
तुझ्या माझ्या सुरांनी सजलेली
या सात कविता म्हणजे माझ्या मनातील त्याच्या सोबतची सप्तपदीच जणू. त्याच्यासोबतचे हे प्रत्येक पाऊल म्हणजे मैत्र, प्रेम, विश्वास, स्वप्ने, सहजीवन,आठवणी आणि एकरूपतेचे एक एक पाऊल त्याच्यासह मी मनात अगदी “ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता” असे म्हणत टाकलेले. फक्त आज हा मनमोराचा पिसारा त्याच्या पुरताच न ठेवता या ब्लॉगरुपी मन:पटलावरून सर्वांपर्यंत पोचवलेला. 

सखया जे होते तुझे ते तुलाच अर्पण……

रथचक्र कोण उद्धणार?

मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु सरकारची प्रचाराची भाषा संपलेली नाही. परदेशात जाहीर सभांचा नरेंद्र मोदींना कंटाळा आला असेल म्हणून म्हणा किंवा टीकाकारांना गप्प करण्यासाठी म्हणा, आता देशात जाहीर सभांचा सुकाळ सुरू होणार आहे. जाहीर सभा घेण्याची मुळी घोषणाच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ह्यांनी केली आहे. म्हणजे पुन्हा वाचाळ प्रचार!  गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला गेला नाही असे झाले नाही असे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला की देशात वाट्टेल ते परिवर्तन घडवून आणता येतं असा अफलातून समज मोदींनी करून घेतला असावा!  देशाची प्रगती? बाएं हाथ का खेल!
गेल्या 60-65 वर्षांत केंद्रीय आणि राज्यांच्या मंत्रिमंडळात लाखों निर्णय घेतले गेले असतील. 60-65 वर्षांचे जाऊ द्या. 2004 ते 2014 पर्यंतच्या दहा वर्षांच्या काळात घेतल्या गेलेल्या असंख्य निर्णयांचा जरी विचार केला तरी भारतभूमी वंदे मातरम् गीतात म्हटल्याप्रमाणे सुजलाम् सफलाम् झाली असती! रोजगार निर्मिती होऊन तरुणवर्ग नोक-यासाठी हिंडताना दिसला नसता. उलट, नोक-या देणा-या बड्या बड्या उद्योगपतींना नोकरी करू इच्छिणा-यांचा शोध घेत फिरावे लागले असते.  विकासाचे गाडे इतके सुंसाट सुटले असते की ते उधळले तरी लक्षात आले नसते.  शेतक-यांच्या आणि भूमीहीन शेतमजुरांच्या आयुष्यात दररोज दिवाळीची पहाट फुटली असती. महागाई कुठल्या कुठे पळाली असती आणि दुकानदारांनी लोकांच्या घरासमोर माल विकण्यासाठी रांगा लावल्या असत्या. गंगाच नव्हे तर देशातल्या यच्चयावत् सर्व नद्या एव्हाना शुद्ध झाल्या असत्या! केवळ मुंबई शहरात लोकल प्रवासच नव्हे तर देशातला एकूण रेल्वे प्रवास आनंददायक झाला असता. पोस्टाने पाठवलेली मनीऑर्डर दुस-या दिवशी देशाच्या कान्याकोपरात मिळाली असती. बँकांतले शाखाप्रमुख खातेदारांच्या स्वागतासाठी दारातच उभे राहिले असते. बेकारांचे तांडे मुंबई शहरात यायचे थांबले असते. काँग्रेस राजवटीतच देश अमेरिकेच्या कितीतरी पुढे निघून गेला असता!  मुख्य म्हणजे अधीचे काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार जाऊन मोदी सरकार देशात आलेच नसते. नव्हे, सत्तांतर घडवून आणण्याची जनतेला गरजदेखील भासली नसती!
सरकार केंद्रातले असू द्या नाहीतर राज्यातले, जनतेचा अनुभव असा आहे, सरकारी काम सहा महिने थांब!’ ह्या अनुभवात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून बदल झाला का?  सुदैवाने बहुसंख्य जनतेचा केंद्र सरकारशी संबंध पोस्ट ऑफिस आणि रेल्वे एवढ्यापुरताच येतो. काही नशिबवान मंडळींचा संबंध बँकेत पेन्शन जमा झाली की नाही एवढ्यापुरताच येतो तर काही कमनशिबी लोकांचा संबंध इन्कम टॅक्सचा रिफंडचा चेक त्यांच्या खात्यात जमा होण्यापुरता येतो. लाखो लोकांना मुळात नवा उद्योग स्थापन करण्याची इच्छा किती जणांना असते?  त्यामुळे उद्योग खात्याला भेट देण्याचा प्रसंगही त्यांच्यावर सहसा येत नाही. मुठभर लोकांना मात्र मंत्र्यांना भेटण्यासाठी दिल्लीच्या वा-या कराव्या लागतात! ह्यांच्याकडूनच म्हणे मंत्र्यांना आणि त्यांच्या स्टाफला फार मोठ्या रकमा मिळतात. अशी मंड़ळी हल्ली दिल्लीत फिरकत नाही. लाच देणे-घेणे हा गुन्हा असल्याचे एकाएकी त्यांच्या ध्यानात आले असे नाही. काँग्रेस सरकारच्या काळात लाच देण्यासाठी दिल्लीत जावे लागत होते. परंतु गेल्या वर्षभरात अनेक जण आपला प्रस्ताव घेऊऩ दिल्लीत गेले नसावेत. कोणी लाच न दिल्यामुळे मोदी सरकारच्या वर्षभरात एकही स्कॅम घडले नाही असे सहर्ष जाहीर करण्यात आले आहे!
ज्या अर्थी भाजपाचा प्रत्येक नेता हे सांगत आहे त्याअर्थी ते खरेच असले पाहिजे. परंतु शंकेखोर लोकांचा समज असा आहे की हातात पत्र मिळाल्यावर म्हणजेच काम झाल्यावर लाच दिली जाते. केंद्र सरकारच्या किती परवानापत्रे एका खिडकीतून दिली गेली ह्याची आकडेवारी उपलब्ध नाही. मुळात चालू कारखान्यांच्या भांडवलवाढीसाठीही कुणी प्रयत्न केल्याची आकडेवारी कुठे प्रसिद्ध झाली नाही. सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे वारंवार जाहीर करण्यात आले आहे. आधीच्या सरकारचे सर्व कार्यक्रम, योजना नाव बदलून राबवण्यात येत असल्या तरी निर्गुंतवणूक प्रस्तावांबद्दल सरकारने संपूर्ण मौन पाळले आहे. सरकारला मौन पाळावेच लागणार. कारण, परदेशी गुंतवणूकदारांच्या शंभर टक्क्यांच्या फाईलींखेरीज अन्य फाईलीत पंतप्रधानांचे कार्यालय तूर्त लक्ष घालत नसावे. पंतप्रधानांकडे फाईल पाठवून उपयोग काय अशी भावना अन्य मंत्र्यांची झाली तर नसेल? कोणत्या कारखान्यास कोणते कौशल्य लागेल हे कळल्याखेरीज आणि त्यासाठी सुरू करावयाच्या अभ्यासक्रमासाठी सरकारचा वाटा किती आणि शंभर टक्के गुंतवणूक करू इच्छिणा-या कंपनीचा वाटा किती हे अजून कुठे ठरले आहे? त्यामुळेच स्मृति इराणी अभ्यासक्रमात कोणते बदल करायचे ह्यासारख्या कामात त्या गुंतल्या आहेत.
बँकांनी मात्र जनधन खाती उघडण्याचा सपाटा लावला. जनधन खात्यांची संख्या 15 कोटींवर गेलीसुद्धा. आता चिदंबरमना कर्ण-द्रोणाचार्यांची भूमिका बजवायची असल्यामुळे त्यांनी 24 कोटी खाती तर आमच्याच काळात उघडली गेल्याचा दावा केला आहे. मोदी सरकारची राहूल गांधींनी तर सुटाबुटातले सरकार अशी खिल्ली उडवली. एवढ्यावरच काँग्रेसची मंडळी थांबली नाही. बहुप्रतिष्ठित भूमिअधिग्रहण विधेयक राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रसने चिकीत्सा समितीकडे सोपवण्यास सरकारला भाग पाडले. एकदोन विधेयकांना काँग्रेसचा मुळात विरोध नव्हता. ती विधेयके काँग्रेसने संमत होऊ दिली.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे शिवसेनेत असतानापासून गेल्या काही वर्षें नरेंद्र मोदींसाठी कार्य करत आहेत. बॅलन्सशीटमधील तिढे सुतासारखे सुरळित करण्यात वाकबगार असलेल्या सुरेश प्रभूंइतका कार्यक्षम सहकारी मोदींना मिळाला नसता. म्हणून रेल्वेसारखे खाते सुरेश प्रभूंकडे सोपवून नरेंद्र मोदी मोकळे झाले. मोदी मोकळे झाले तरी सुरेश प्रभू मात्र रेल्वे बोर्डाच्या सापळ्यात अलगदपणे अडकलेले दिसतात. अनेक प्रवासीविरोधी योजनांनाही प्रभूंनी मंजुरी देऊन टाकली आहे. रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणा-यांना अद्दल घडवण्याऐवजी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत प्रभूंनी प्रिमियम दर आकारून रेल्वे तिकीट विकण्याची योजना तर अमलात आणलीच; खेरीज आगाऊ तिकीट आरक्षणाची मुदत दोन महिन्यांऐवजी चार महिने केली. म्हणजे आणखी काळा बाजार करणा-यांची सोय!
महागाई कमी झालेली नसताना अर्थमंत्री अरूण जेटली रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखांना व्याज दर कमी करायला सांगत होते. कां? तर म्हणे व्याजदर जास्त असल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक किफायतशीर ठरत नाही. घाऊक निर्देशांक शून्याच्या खाली गेला असला तरी ग्राहकोपयोगी मालाची महागाई मात्र मुळीच कमी झालेली नाही. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुडचे भाव खाली आल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले. पण पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले तरी मालवाहतुकीचे दर मात्र मुळीच कमी झाले नाहीत. भाजीपाला, दूध वगैरे माल महागच होत गेला आहे. त्यात तूर डाळीची भर पडली. तूर डाळ सव्वाशे रुपयांच्या घरात गेली. पुन्हा नव्याने फिरू लागलेले महागाई चक्र थांबवण्याच्या दृष्टीने सरकारकडे काही उपाययोजना नाही. डाळी-कडधान्यांची महागाई रोखण्यासाठी काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने व्यापा-यांना बोलावून धडाधड आयातीचे परवाने दिले. म्हणून मूग, चणा वगैरे कडधान्याचे भाव आटोक्यात राहत असत. मोदी सरकारला त्यावर लगेच काही उपाययोजना सुचली नव्हती.  परंतु दोन दिवसांपूर्वीच संबंधितांना जाग आली. डाळ आयातीचा निर्णय घेण्यात आला.
ह्या परिस्थितीत नरेंद्र मोदींना असे वाटू लागले की दिल्लीतले सत्तेचे चक्रव्यूह भेदणे वाटते तितके सोपे नाही. महाभारतातल्या अभिमन्युला तर आठच चक्रे भेदावी लागली. परंतु दिल्लीत सत्तेची शेकडो चक्रे आहेत. मी वर्षभरात सर्व सत्ताचक्रे भेदून टाकली आहेत. सत्तेच्या दलालांना हटवण्यात मला यश मिळाले आहे असे मोदी मथुरेच्या प्रचारसभेत बोलले. त्यांची सुशासनाची घोषणा दिल्लीतल्या सत्ताचक्रापुरतीच आहे का?  नेहमीप्रमाणे कलेक्टर कचेरीत रुतणारे सत्ताचक्र कोण वर काढणार? आल्यागेल्यांना कलेक्टर किंवा तत्सम अधिकारी एवढेच सांगतात, अजून मला वरून आर्डर्स नाहीत.
जिल्ह्याचे मोदी राज्याचे हे रथचक्र कोण उद्धरणार?

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

www.rameshzawar.com

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

नमस्कार मित्रहो,

        आज माझ्या “वाङ्मयशेतीचा” ४ था वर्धापनदिन. मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, सकाळी ८.२९ वाजता http://www.baliraja.com आणि http://www.gangadharmute.com संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.
      मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे या दोन्ही संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.

पिढ्यान्-पिढ्यापासून शेतकर्‍यापर्यंत जो-जो आला तो-तो शेतकर्‍याला सल्ला द्यायला किंवा अक्कल शिकवायलाच आला. एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करणार्‍याला शुद्र व बेअक्कल गाढव समजून त्याला कोणी बोलुच दिले नाही, त्याचे ऐकण्याची तर गोष्टच दूर…! सर्व मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे शेतीच्या शोषणाची समर्थकच असल्याने त्याला प्रसारमाध्यमात स्थान मिळाले, तेही नगण्यच. पण आता इंटरनेट शेतकर्‍यांचा मदतीला आलंय. या माध्यामाने सर्वांना एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय.

नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. एका सार्वजनिक संकेतस्थळावर १-२ लेख लिहिल्या नंतर तेथे घमासान चर्चायुद्ध झ इंटरनेटसुद्धा शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही. माझ्या आंतरजालावरील वावराला आता उणेपुरे साडेपाच वर्ष होत आहेत.या साडेपाच वर्षात माझे शेतीविषयक लेखन २० लाखापेक्षा जास्त  वाचकापर्यंत पोचले आहे, ही फ़ार समाधानाची बाब आहे.

     मी आंतरजालावर लेखन सुरू केले तेव्हा मला स्पष्ट जाणीव होती की मी ज्यांच्यासाठी लिहिणार आहे तो आंतरजालावर उपस्थित नाही. तो आपल्या शेतात घाम गाळत शेतीकाम करण्यात गुंतलेला आहे आणि जो आंतरजालावर उपस्थित आहे तो बहुतांशी बिगरशेतकरी आहे. सातबारा नावाने असणे आणि प्रत्यक्ष शेतीवर पोट असणे या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. दोन्ही अवस्थांचे हितसंबंध जवळजवळ परस्पर विरोधी आहेत. शहरात अथवा खेड्यात राहून शासकिय, निमशासकीय, खाजगी कंपंन्यामध्ये नोकरी करणारा अथवा व्यापार, उद्योग करणारा शेतकर्‍याचा मुलगा असला तरीही त्याला सुध्दा बिगर शेतकरी समाजासारखेच एका रुपयाला चार किलो कांदे, एका दिवसाच्या वेतनात वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढे अन्नधान्य मिळाले तर हवेच असते. शेतीत पिकणारा माल स्वस्तात स्वस्त मिळवणे हा आपला निसर्गदत्त अधिकार आहे, हीच त्याचीही मनोभावना असते.
     अशा विपरित स्थितीत शेतमालाच्या रास्त भावाला मध्यवर्ती स्थानी ठेवून केलेले लेखन फ़ारसे पसंत केले जाणार नाही, याची मला खात्री  होती पण माझे लेखन पसंत केलेे जाते किंवा नाही यापेक्षा शेतकर्‍यांचे गार्‍हाणे आणि शेतीचे अर्थकारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे जास्त महत्वाचे आहे, माझे लेखन केवळ लेखन नसून प्रबोधनयज्ञ असणार आहे, याचीही मला जाणीव असल्याने माझा वैचारिक किंवा भावनीकगोंधळ उडाला नाही. त्यामुळे माझ्या लेखनाचे समर्थन आणि टीका मला स्थितप्रज्ञपणाने स्विकारता आल्या.   या प्रवासात माझ्या gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला २०१० आणि २०१२ चा सलग दोनदा स्टार/एबीपी TV चा विश्वस्तरीय “ब्लॉग माझा” पुरस्कार मिळाला.

माझा साडेपाच वर्षाचा लेखाजोखा :-

माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या खालीलप्रमाणे :-

०१) http://www.baliraja.com  बळीराजा डॉट कॉम – (२,८५,७१०)

०२) http://www.gangadharmute.com   माझी वाङ्मयशेती – (२,७५,८४२)

०३) gangadharmute.wordpress.com – रानमोगरा – (८८,४००) – सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.

०४) www.sharadjoshi.in – योद्धा शेतकरी – ( ७३,०२५)

०५) baliraja.wordpress.com – बळीराजा – ( ८३,३३८ )

०६) gangadharmute.blogspot.com – शेतकरी विहार – ( ३६,९४७ )

०७) gangadharmutespoem.blogspot.in – माझी कविता – (१६,६३४)

०८) marathigazal.wordpress.com – माझी मराठी गझल – ( १६,९११ )

०९) shetkari-sanghatana.blogspot.com – शेतकरी संघटना – (६,७९६)

१०) ranmewa.blogspot.in – रानमेवा – (३,५२२)

एकूण वाचन संख्या – ८,८७,०९७

खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही. मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे उघड आहे.

०१) www.facebook.com/gangadharmute

०२) www.youtube.com/gangadharmute

०३) www.shetkari.in

०४) sharad-anant-joshi.blogspot.in

०५) www.twitter.com/gangadharmute

०६) www.facebook.com/groups/kawita

०७) www.facebook.com/my.net.farming

०८) www.facebook.com/groups/baliraja

०९) www.maayboli.com/user/26450/created

१०) www.misalpav.com/user/8199/track

११) www.mimarathi.net/user/382/mytrack

१२) www.sureshbhat.in/user/1099/track

      एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.

Thank you Mr Internet!

– गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

Filed under: वांगमय शेती, वाङ्मयशेती Tagged: वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र

झलक

गेल्या ८ महिन्यांपासून मी मराठी वर्ग घ्यायला सुरुवात केली. खेळ, अभिनय, भेंड्या या  पद्धती वापरुनच मुलांना मराठीची गोडी लावायची हे सुरुवातीपासूनच नक्की केलं होतं. वेगवेगळ्या खेळांमधून शिक्षण हे माझं शिकवण्याचं सूत्र कसोशीने गेले ८ महिने पाळलं त्यामुळेच सुरुवातीला आई – बाबांमुळे आलेली मुलं नंतर नंतर  उत्साहाने स्वत:हून यायला लागली.

मुलांनी रंग, आकडे, वार म्हणून दाखवले. दोन प्रवेश स्वत:च्या कल्पनेने सादर केले. चंपक मधील पंख्याची गोष्ट कधीतरी वर्गात सांगितली होती त्यावरुन मुलांनी मराठीतून अतिशय सुंदर प्रवेश सादर केला. दुसरा प्रवेश  एका विद्यार्थ्याच्या मनातील कल्पना होती. त्या कल्पनेला मूर्त रुप मुलांनीच दिलं. खूप छान वाटलं सर्व मुलांना आत्मविश्वासाने मराठी बोलताना पाहून.  अर्थात पालकांचींही मराठी टिकवण्याची धडपड त्या मागे आहेच. त्यामुळे मुलांचं कौतुक आणि पालकांचे आभार!

या वर्षीच्या शेवटच्या दिवशी मुलांनी आपलं ’मराठी’ त्यांच्या आई – बाबांना दाखविलं.

पर्णिकाने देखील विनोदी किस्से सांगत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक.

प्रचारक पंतप्रधान

पंतप्रधान हाच खरा परराष्ट्रमंत्री असतो असा जगातल्या लोकशाही देशात समज आहे. तो समज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरा करून दाखवला. त्यांच्यापूर्वी पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनी परराष्ट्र खाते काही काळ का होईना स्वतःकडे ठेवले होते. दोघा पंतप्रधानांनी अनेक देशांचे दौरे केले. तेथल्या नेत्यांशी मैत्रीचे संबंधही प्रस्थापित केले. त्या संबंधांमुळे युनोच्या सुरक्षा मंडळात भारताविरूद्धचे ठरावही संमत होऊ शकले नाही. विदेशी नेत्यांच्या मनातली भारताविषयीची अढी दूर करण्याचा प्रयत्न केला. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा पायंडाही नेहरूंनीच पाडला. त्यांच्या काळात परराष्ट्र खात्यातल्या अधिका-यांकडून कामे करवून घ्यावी लागायची. नेहरूंनी ती करवून घेतली. नेहरूंच्या नेतृत्वास अफाट लोकप्रियतेची जोड लाभली होती तर इंदिरा गांधींच्या नेतृत्वास आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या आकलनाची धारदार किनार होती.
पूर्व पंतप्रधानांनी केलेले परदेश दौरे आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या दौ-यांची तुलना होऊ शकत नाही. नरेंद्र मोदींनी नेहरूंकडून काय घेतले असेल तर परदेश दौरे! मात्र, नेहरूंच्या काळात भारत हा जसा नवस्वतंत्र देश होता तसा तो आज नाही. त्या काळात भारताविषयी जगभरात जितके गैरसमजही होते तितके ते आज नाहीत. नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा अमेरिकेत तर भारताविरूद्ध जहरी प्रचार केला जायचा. का? तर त्यांचे धोरण कम्युनिस्टधार्जिणे म्हणून. आज भारताची स्थिती पूर्वीसारखी मुळीच नाही. हे सगळे लिहीण्याचे कारण 26 मे 2015 रोजी मोदींच्या कारकीर्दीला  वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मोदी सरकारच्या कार्याचा आढावा घेण्याचा उद्देश आहे. नरेंद्र मोदींचे परदेश दौरे हा पहिला विषय आहे.
सबका साथ सबका विकास, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली. पण जनतेला अजून त्याचा प्रत्यय यायचा आहे!  सबका साथ अशी घोषणा देणा-या पंतप्रधानास कोणताही उद्योगपतीही सहजासहजी भेटू शकत नाही, मग लघु मध्यम उद्योगातली माणसे कुठून भेटू शकणार!  मोदी शेतक-यांना भेटत नाहीत अशी टीका राहूल गांधी ह्यांनी केली होती. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या उद्योगांच्या भरवशावर ते देशाचा विकास करायला निघाले आहेत त्या उद्योगपतींना तरी भेटायला त्यांना वेळ आहे का?  फक्त अदानी-अंबानी ह्यांच्या सेवेसाठी नरेंद्र मोदी तत्पर असल्याची अनेकांची भावना आहे!  लोकांच्या ह्या भावनेत अजिबात तथ्य नाही असा खुलासा त्यांनी अजून तरी केलेला नाही.
वर्षभरात त्यांनी अमेरिका, फ्रान्स, चीन, कॅनडा, जर्मनी दक्षिण कोरिया, जपान इत्यादी अनेक देशांचा दौरा केला. प्रत्येक दौ-यात त्यांनी त्या त्या देशांबरोबर करार केले. बहुतेक करारांचे स्वरूप केवळ परराष्ट्र खात्याच्या अधिका-यांना माहीत असून संबंधित मंत्र्यांना मात्र अजून त्या कराराचे स्वरूप माहित असेल की नाही ह्याबद्दल शंका आहे. संरक्षण मंत्री असूनही मनोहर पर्रीकरांचा फ्रान्सच्या दौ-यात समावेश नव्हता. सुषमा स्वराज ह्या पराष्ट्र मंत्री. पंतप्रधानांच्या प्रत्येक    दौ-यात सुषमा स्वराज ह्यांचा समावेश केला जाणे हा वस्तुतः त्यांचा हक्कच आहे. परंतु त्यांचे परराष्ट्रमंत्रीपद दिखाऊ असावे. त्यांचे खरे पद राज्य मंत्र्याचेच! अनेक दौ-यांत त्या पंतप्रधानांसमवेत नव्हत्या! त्यांचा समावेश का करण्यात आला नाही ह्या प्रश्नाची चर्चा संसदेतच होऊ शकते. त्याचप्रमाणे परदेश दौ-यात करण्यात आलेल्या करारांसंबंधी संसदेत निवेदन करण्यात येईल. तेव्हाच त्या करारांचे खरे स्वरूप स्पष्ट होईल. तूर्त एवढेच सांगता येईल की सगळे करार दोन देशांच्या सरकारांत आहेत. अजून ते उद्योगपतींच्या पातळीवर आले नाहीत. करारांमुळे जेवढी परदेशी गुंतवणूक भारतात यायला हवी होती तितकी ती अजून आली नाही असे चिनी वृत्तपत्राने लिहीले आहे. हे धक्कादायक आहे. बव्हंशी करार हे अणुइंधन, वीजनिर्मिती, अति वेगवान गाड्या, संरक्षण खात्यास लागणारी सामग्री वगैरेंसाठी करण्यात आले आहेत. जगभरात इंधनोपयोगी युरेनियमचे साठे पडून आहेत. बहुतेक अणुउत्पादक देश ग्राहकांच्या शोधात आहेत. संरक्षण सामग्रीच्या बाबतीतसुद्धा हीच स्थिती आहे! संरक्षण सामग्रीच्या खरेदीत भारताचा क्रमांक जगात दुसरा-तिसरा आहे.
मोदींच्या मते शस्त्रसामग्री, अणुभट्ट्या, रेल्वेचे डबे वगैरे मालांचे देशात उत्पादन झाले पाहिजे. आपल्या विचारसरणीला अनुरूप अशी मेक इन इंडिया’  अशी आकर्षक घोषणाही त्यांनी दिली.  विदेशी कारखानदारीला शंभर टक्के गुंतवणूक करू देण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. परंतु बहुतेक गुंतवणूकदारांना स्थानिक गुंतवणूकदार आणि बँकांचेही सहाय्य हवेच असते. हे वास्तव मोदी सरकारच्या नजरेतून निसटले आहे. भारतातल्या अनेक उद्योगपतींना परदेशात उद्योग स्थापन करायचे आहेत. काही परदेशी उद्योग त्यांना टेकओव्हरही करायचे आहेत. अशा किती उद्योगपतींना पंतप्रधान कार्यालयाने सहाय्य केले? आपले सरकार स्वकीय उद्योगपतींना चौकशीच्या भोव-यात अडकवते ते परदेशी उद्योगपतींसाठी पायघड्या घालायला निघाले आहे. ज्यांचे उद्योग भारतात येणार आहेत ते त्यांच्याच दुय्यम कंपन्यांकडून सुटे भाग खरेदी करतील की तो बिझिनेस भारतातल्या उद्योगांना मिळणार हे अजून स्पष्ट नाही. त्याचप्रमाणे आधुनिक उद्योगांना अलीकडे मजुरवर्गाची गरज राहिलेली नाही. अवघ्या तीसचाळीस तंत्रज्ञांच्या जोरावर मोठे कारखाने सहज चालवता येतात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांना कुणीतरी समजावून सांगायला हवे. जनतेनेही ते नीट समजून घेतले पाहिजे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी ह्यांना काँग्रेसविरोधी प्रचार करणे आवश्यक होते. भाडोत्री यंत्रणेच्या मदतीने तो त्यांनी केलाही. अजूनही नरेंद्र मोदींचा काँग्रेसविरोधी प्रचाराचा खाक्या सुरूच आहे. ज्या देशात ते गेले त्या देशात त्यांनी तिथल्या भारतीयांना बोलावून जाहीर सभा घेतल्या. अशा प्रकारच्या बैठका नरसिंह रावदेखील घेत होते. ह्या बैठका सामान्यतः दूतावासांच्या हॉलमध्ये घेतल्या जातात. त्या बैठकांना हजर राहण्याचे निमंत्रणही काटेकोरपणे दिले जात होते. नरेंद्र मोदींनी अशा बैठका घेतल्याचे वृत्त नाही. त्यांनी सभा घेतल्या त्या तिथल्या मैदानांवर, पार्कमध्ये. परदेशात सभा आयोजित करण्यासाठी तुफान खर्च करावा लागतो हे उघड गुपित आहे.
पूर्वीचे पंतप्रधान वार्ताहरांना घेऊन जात. ते काही वर्तमानपत्रकारांवर मेहरबानी करण्यासाठी म्हणून नव्हे. पंतप्रधानांच्या दौ-यासाठी चार्टर्ड फ्लाईटच्या तत्त्वावर एअर इंडियाकडून विमान घेण्यात येते. त्या विमानात भरपूर रिक्त आसने असतात. अर्धे विमान रिकामे नेण्यापेक्षा पत्रकारांना निःशुल्क तिकीट देण्याची कल्पना फार पूर्वीच्या काळी केव्हा तरी रूढ झाली.  हॉटेल मुक्काम, जेवण, नास्तापाणी इत्यादि खर्च पत्रकार स्वतः करायला तयार असतील तर त्यांना पंतप्रधानांबरोबर विमानात घेऊन जाण्यास हरकत नाही ह्या भावनेतून ही प्रथा सुरू झाली. पत्रकारांबद्द्लची ही भावना जगभर रूढ आहे. अगदी ख्रिश्चन धर्मप्रमुख पोपही पत्रकारांना बरोबर घेऊन जात असतात. विमानप्रवासात पंतप्रधानाशी आमनेसामने बोलण्याची संधीही पत्रकारांना मिळत असते. क्वचित नेत्यांची संयुक्त वार्ताहर परिषदाही घेतल्या जातात. (नरसिंह रावांबरोबर मी स्वतःही एका दौ-यात सहभागी झालो होतो. म्हणूनच हा तपशीलवार मी देऊ शकलो.) जनतेत मात्र असा प्रचार करण्यात येत आहे की सरकारला उगाच भुर्दंड पडू नये अशी म्हणे मोदींची इच्छा आहे. परंतु पत्रकारांचा दौ-यात सहभाग न करण्याचे कारण न कळण्याइतके पत्रकार मूर्ख नाहीत. ह्या दौ-यांचा आणखी एक आक्षेपार्ह भाग म्हणजे परदेशात घेतलेल्या जाहीर सभातून  विरोधी पक्षांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी मोदींनी सोडली नाही. हा सरळ सरळ औचित्यभंग आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा डागळते ह्याचे भान प्रचारक पंतप्रधानांना उरलेले दिसत नाही.

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?

चित्र – प्रदीप म्हापसेकर

हिंदीतील मान्यवर कवी (कै.) मुक्तिबोध आपल्या मित्रांना, तरुण साहित्यिकांना, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” हा प्रश्न विचारत. भेटायला येणाऱ्या अनेकांना ते हा प्रश्न विचारत. तो काळ होता साठीचा. त्यानंतर नव्वदोत्तरी काळ आला आणि तोही संपला. सध्या निष्कि्रयोत्तरी काळ सुरू झालेला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिकच्या काळात हिंदीमध्ये मुक्तिबोधांच्या या वाक्याला ‘कोटेबल कोट’चं रूप आलेलं आहे. कुणाच्याही भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित करायचा झाल्यास, कुणाच्याही भूमिकेची चिकित्सा करायची झाल्यास या विधानाचा संदर्भ दिला जातो. मग, ते साहित्यिक असोत वा पत्रकार असोत. आणि ते योग्यच आहे. हा प्रश्न प्रत्येकाला पुन्हापुन्हा विचारायला हवा. सध्या तर त्याची नितांत निकडीची गरज आहे. असं म्हणतातच की, प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळतं आणि उत्तरातून हुशारी कळते.
मुक्तिबोध यांचा हा प्रश्न म्हटलं तर साधासुधा आहे. सूचक आहे आणि तितकाच मर्मभेदक-खोचकही आहे. कारण ‘राजकारण’ या शब्दाविषयी आपल्याकडे भयानक आणि भयंकर असे समज-गैरसमज आहेत. हा शब्द भारतीयांनी इतका बदनाम करून ठेवला आहे की, तो आता जवळपास तुच्छतेनेच वापरला जातो. अर्थात, इथं ‘राजकारण’ या शब्दाचा इतिहास, वर्तमान किंवा त्याची व्युत्पत्ती आणि मूलार्थ हा प्रतिपाद्य विषय नाही. त्यामुळे ती चर्चा इथेच थांबवू. मुक्तिबोध ‘पॉलिटिक्स’ हा शब्द कोणत्या अर्थानं वापरतात, ते समजून घेऊ. ते ‘रोल’ वा ‘भूमिका’ या अर्थाने हा शब्द वापरतात. म्हणजे, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” याचा अर्थ, “मित्रा, तुझी नेमकी (राजकीय) भूमिका काय आहे?”
…या एका प्रश्नातच समोरच्याची दांडी उडवता येते. त्याला कोंडीत पकडता येतं; पण बहुतेक लोकांनी- त्यात पत्रकार-लेखक-संपादक-प्राध्यापक-वकील-डॉक्टर-सामाजिक कार्यकर्ते असे सर्व आले- याचा कधी विचारच केलेला नसतो. स्वत:ला सतत प्रश्न विचारण्याची आणि स्वत:ची सतत समीक्षा करण्याची ‘सवय’ अनेकांना नसते, ती त्यांच्या अंगवळणी पडलेली नसते. अशी ‘सवय’ लावून घेतली पाहिजे, याचाही त्यांनी कधी विचार केलेला नसतो. त्यामुळे “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेलच याची पुरेशी खात्री नसते. कारण विचार आणि व्यवहार यातली तफावत कमीत कमी ठेवण्यासाठी धडपडणारे लोकही कमीच असतात… आणि म्हणूनच हा प्रश्न सतत समोरच्याला विचारत राहून, त्याला त्यावर विचार करण्यासाठी उद्युक्त करणं गरजेचं असतं, आहे. भलेही तो योग्य प्रतिसाद देईल न देईल. मुक्तिबोधांसारखा संयम पूर्ववत ठेवत आपणही हा प्रश्न आपल्या आजूबाजूच्यांना सतत विचारत राहिलं पाहिजे.
पण मग पॉलिटिक्स म्हणजे नेमकं काय? जॉर्ज ऑर्वेल हा ब्रिटिश लेखक म्हणतो, “राजकारण हा शब्द शक्य तितक्या उदारपणे घ्यावा. जगाला एका विशिष्ट हेतूनं ढकलणं, हाही राजकीय हेतूचा/धोरणाचाच भाग असतो.” थोडक्यात, राजकारण म्हणजे आपली जगाबद्दलची-जगण्याबद्दलची भूमिका काय आहे, हे ठरवणं. ही भूमिका कशी ठरते? वा ठरवायची? लोकशाही ही फक्त केवळ शासनप्रणाली नसून ती जीवनप्रणाली आहे, असं म्हणतात, तसंच भूमिकेचं असतं. ती जीवनप्रणाली असावी लागते, तरच तिचं महत्त्व कळू शकतं. शिवाय, ती तुम्ही कुठे जन्म घेता, बालपण-जडणघडणीच्या वयात तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे आणि तुमचे शिक्षक-मित्रमैत्रिणी कोण असतील, यावर अवलंबून असतं; पण निसर्गानं आईवडील, आजूबाजूचं वातावरण व लोक आणि शिक्षक-प्राध्यापक यांच्या प्रभावातून बाहेर पडायचा पर्यायही आपल्याला दिलेला असतोच. त्याचा सुयोग्य वापर करून घेण्याची संधी फारच कमी जण घेतात, तो भाग वेगळा!
माणसाला जगण्यासाठी धर्माची गरज असते की, नाही; धर्माशिवाय माणूस सुखा-समाधानाने जगू शकतो की, नाही हा नेहमीच विवादाचा विषय राहिला आहे. त्यामानाने माणसाला जगण्यासाठी आयडियॉलॉजीचा किती उपयोग होतो, आयडियॉलॉजीमुळे माणसाचं जगणं किती सुखकर, समृद्ध बनू शकतं, याविषयीही वाद झाले आहेत. आयडियॉलॉजी प्रमाण मानून जगणारे स्वत:च्या संपन्न आयुष्याची उदाहरणं देऊन तिचं समर्थन करतील, तर विरोधक आयडियॉलॉजी प्रमाण मानूनही ज्यांचं आयुष्य विपन्नावस्थेत गेलं, त्याची उदाहरणं देऊन प्रतिवाद करतील. आयडियॉलॉजी ही भौतिकतेशी संबंधित गोष्ट नाही, ती बौद्धिकतेशी संबंधित गोष्ट आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी विचारसरणी गरजेची असतेच. “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा तुझी आयडियॉलॉजी नेमकी काय आहे, कोणती आहे, हेच अभिप्रेत असतं.
कुठली तरी एक आयडियॉलॉजी प्रमाण मानून आयुष्यभर तिच्याशी प्रामाणिक राहणारे, त्यासाठी कुठलीही तडजोड न करणारे लोक आपल्याला आजूबाजूला असतात. आपल्या देशात हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट हे आपापली आयडियॉलॉजी प्रमाण मानणारे लोक आहेत. आयुष्यभर आपल्या आयडियॉलॉजीला चिकटून राहणारे तिच्या विरोधात बोलणाऱ्यांशी सतत पंगा घेत राहतात; पण आयुष्याच्या उत्तरार्धात आक्रमकता कमी झाली की, गडबड होते. काही सुविद्यांना आपल्या आयडियॉलॉजीमधील वैगुण्य दिसायला लागतात. मग, ते तिचा त्याग करतात. काहींच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उजागर होऊन त्यांना वैफल्य येतं. ते बाजूला होतात. काही मात्र या आयडियॉलॉजीचा सरळसरळ त्याग करून दुसऱ्या आयडियॉलॉजीचा स्वीकार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप किंवा कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडलेले लोक त्याविषयी नंतर अत्यंत कडवटपणे बोलतात, लिहितात. मराठीमध्ये कम्युनिस्टांनी लिहिलेल्या अशा आत्मचरित्रांची संख्या बरीच आहे.
या दोन्ही आयडियॉलॉजी ‘प्रेम आणि द्वेष’ (Love and Hate) या संकल्पनेवर आधारलेल्या आहेत. हिंदुत्ववादी मुस्लिमांचा द्वेष करतात, जातीयवादाचं समर्थन करतात, तर याच कारणांसाठी कम्युनिस्ट त्यांचा तिरस्कार करतात. ते भांडवलदारांचा आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या सर्वांचा द्वेष करतात. त्यांना दीनदलितांबद्दल प्रेम वाटतं. कारण कामगार मुख्यत: याच वर्गातून येतात. शिवाय, क्रांती नेहमी खालच्या वर्गातून सुरू होते, हा सिद्धांत मार्क्सनं सांगून ठेवलाय. तो १०० टक्के अजून तरी कसोटीला उतरला नसला, तरी कम्युनिस्ट मार्क्सला अभिप्रेत असलेली क्रांती जगात होणारच, असा दुर्दम्य विश्वास बाळगून असतात. भारतात हिंदुत्ववादीही हा देश केवळ हिंदूंचा देश होणार, असा दुर्दम्य विश्वास बोलून दाखवत असतात. सध्या तर ते या दिवास्वप्नाच्या वेडाने झपाटून गेले आहेत.
या दोघांचंही स्वप्न पूर्ण होणार की नाही, भारतात ते शक्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत आणि तो वेगळा विषय आहे; पण एक खरंच आहे की, या दोन्ही आयडियॉलॉजी काहीशा आक्रमक आणि वास्तवाशी विसंगत ठरणाऱ्या आहेत. दोन्हींमध्ये ‘प्रेम आणि द्वेष’ हा फॉर्म्युला असल्याने त्यांना भारतात व्यापक जनाधार आजवर तरी मिळवता आलेला नाही.
पण म्हणून या आयडियॉलॉजी संपलेल्या आहेत, असं नाही. तशी कुठलीही आयडियॉलॉजी संपत नाही. फार तर तिची पिछेहाट होते.
बर्लिनची भिंत पडली, तेव्हा आता आयडियॉलॉजीचा अंत झाला आहे, अशी जगभर चर्चा सुरू झाली. फ्रान्सिस फुकुयामा यांनी तर ‘द एंड ऑफ द हिस्ट्री अँड द लास्ट मॅन’ असं पुस्तकच लिहिलं; पण त्याआधी डॅनिअल बेल यांनी १९५०मध्ये ‘द एंड ऑफ आयडियॉलॉजी – ऑन द एक्झॉशन ऑफ पॉलिटिकल आयडियाज इन द फिफ्टीज’ असं पुस्तक लिहून आयडियॉलॉजीचा अंत या विचाराला सुरुवात केली होती. या पुस्तकांवर जगभर खूप चर्चा झाली. त्यावर अनेक लेख, पुस्तकं लिहिली गेली. सध्या भांडवलवादाची सरशी आणि साम्यवादाची पिछेहाट झालेली दिसते. मध्यमवर्ग हा भांडवलदारांचा सांगाती असतो. आर्थिक उदारीकरणाच्या गेल्या २५ वर्षांत मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवूनच भारतीय राजकारण घडतं-बिघडतं आहे. हिंदुत्ववादाचा अश्व मोदी सरकारच्या कृपेनं चौखूर उधळला आहे, त्यामागे हाच मध्यमवर्ग आहे. त्या वावटळीत भारतातील सुशिक्षित बुद्धिवादी, बुद्धिजीवी, लेखक-पत्रकार असे सारेच सापडले आहेत. त्यांच्याकडे, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” या प्रश्नाचं उत्तर मागायलाच हवं.