ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट्स कॉपीराईट ट्रेडमार्क पुस्तकाचे प्रिंट व्हर्जन आता बाजारात उपलब्ध !

खुशखबर !! ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट्स कॉपीराईट ट्रेडमार्क पुस्तकाचे लेटेस्ट प्रिंट व्हर्जन आता बाजारात उपलब्ध !

पुस्तकाचे वैशिठ्य:

 • पेटंट्स,कॉपीराईट, ट्रेडमार्क याबद्दल सविस्तर माहिती सोप्या पद्धतीने.
 • चित्रांचा, आकृतींचा व प्रोसेस फ्लो चार्ट यांचा अचूकपणे वापर.
 • सर्व तांत्रिक व कायदेशीर माहिती सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत.
 • तरुणसंशोधक घडवण्यासाठी मी संशोधक बनणारच ही १७ पायऱ्यांची मार्गदर्शक लेखमाला.
 • संशोधक व कायदेतज्ञांचीखास मुलाखत व त्यांचे सविस्तर मार्गदर्शन.
 • भारतात व युनायटेड स्टेट्समध्ये पेटंट व कॉपीराईट फाईल करण्यासाठीची प्रोसेस,फॉर्म व फी यांची माहिती.

पुणे वितरण केंद्र :

 • हिंद लॉ हाउस ,आप्पासाहेब बळवंत चौक पुणे.020-24453920
 • अजित बुक डेपो ,जोगेश्वरी मंदिराजवळ पुणे.020-66034697
 • गणराज बोक सेंटर ,बुधवार पेठ बालाजी मादिराजवळ पुणे.9637111280
 • उज्वल ग्रंथ भांडार , आप्पासाहेब बळवंत चौक पुणे 020-24462268
 • इनबी लॉ बुक एजन्सी आप्पासाहेब बळवंत चौक पुणे:020-24458424

सांगली वितरण केंद्र :

 • संकपाळ बुक सेलर्स ,कापड पेठ सांगली.0233 – 2326447
 • मिर्जी बुक सेलर्स विश्रामबाग सांगली.
 • प्रसाद वितरण ग्रंथदालन ,सराफ कट्टा सांगली.0233-2621515

ऑनलाईन विक्री :

सप्लायर्स :

 • हाय टेक ईझी पब्लिशिंग ,बालेवाडी पुणे. 9421359187
 • श्रीरत्न ,स्फुर्थी चौक ,विश्रामबाग सांगली. 9421126757

 पुस्तकाचा कव्हर फोटो :

Gyan Hich property book

Gyan Hich property book

 • पुस्तक : ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क
 • प्रकाशक : हाय टेक ईझी पब्लिशिंग .
 • लेखक :महेश संभाजी जाधव.

विद्यार्थी,संशोधक,कलाकार,लेखक,शिक्षक,डिझायनर, कायदेतज्ञ,उद्योजक यांच्यासाठी उपयुक्त संग्रह करण्याजोगे पुस्तक.
आजच आपली प्रत खरेदि करा व शिका अनमोल गोष्टी आपल्या भाषेत  !! मर्यादित प्रती उपलब्ध !!

धन्यवाद !!

Filed under: Knowledge is property

सावली

इरा आणि मीरा नावाच्या दोन बहिणी होत्या. कॅनडातल्या छोट्याशा गावात त्याचं घर होतं.  शाळेतून घरी आल्या की सारख्या व्ही. डी. ओ गेम्स खेळत असायच्या. वेळ उरला की बडबड करायच्या नाही तर मग भांडायच्या. आजही तसंच झालं. आई कंटाळून गेली. बाबाला म्हणाली,
“जरा ओरड की रे त्यांना.” बाबाने आवाज चढवला,
“सारख्या नुसत्या बटणं दाबत असता. दोरीच्या उड्या मारा, पकडापकडी, लपाछपी असलं काही तरी खेळा.”
“आणि किती बोलता गं दोघी. तोंड कसं दुखत नाही?” आईचा राग अजून तसाच होता.
“च्याव, च्याव, च्याव. च्यावऽऽ, च्यावऽऽ, च्यावऽऽ…” अमित दादा होताच तिथे.  इरा त्याला मारायलाच धावायची. मीरा तिच्या मागून. पुन्हा गोंधळ. हे अगदी रोजचंच झालं. रविवारी घर जरा शांत राहावं म्हणून आईने त्यांना मराठी शाळेत पाठवायचं ठरवलं,
“आम्हाला नाही जायचं मराठी शाळेत. अभ्यास करावा लागेल. ” इथे मात्र दोघी एका सुरात म्हणाल्या.
“अगं एक दिवस जाऊन तर बघा. आवडली शाळा तर जा. पण आता नकार घंटा बंद करा. “
“बरं” दोघी पाय आपटत म्हणाल्या. बाबाने डोळे वटारले. दोघी तिथून धूम पळाल्या.

एक रविवार गेला, दुसरा रविवार गेला. हळूहळू दोघींना मराठी शाळा आवडायला लागली.  इराला फक्त आवडत नव्हतं ते मीराचं वागणं.
“काय झालं? काय करते मीरा? ” आईने विचारलं.
“ताईगिरी करते. शाळेत जाताना तिचं बोट धरायला लावते. वर्गात पण माझ्या बाजूला बसते. मावशीने काही विचारलं की, उत्तर दे, उत्तर दे करुन मागे लागते. ” इराने बोलता बोलता मीराच्या हातातलं पुस्तक ओढलं. मीराने इराचे हात ओढून पुस्तक काढून घेतलं. आई रागावलीच.
“गप्प बसा दोघी. किती आरडाओरडा चाललाय तुमचा. ” आईच्या आवाजाला दोघी घाबरल्या. चेहरा रडवेला करुन तिच्याकडे पाहायला लागल्या. आईने समजावून सांगितलं.
“इरा, अगं मीरा सावलीसारखी असते तुझ्याबरोबर. “
“म्हणजे? “
“तुझी सावली कधी तुला सोडून जाते का? “
“नाही. “
“मग तसंच आहे. मीरा तुला सावलीसारखी सोबत करते. “
“पण नको असली तरी ही सावली का येते बरोबर?  मला नकोच ती सावली. ” चिडून इरा खोलीत जाऊन झोपली. रात्रभर सावली नको म्हणून ती देवापाशी प्रार्थना करत राहिली.

“आज मी एकटीच जाणार आहे शाळेत.  मीरा नको बरोबर माझ्या. “
“अगं मीराला आज खूप अभ्यास आहे. ती नव्हतीच येणार आज मराठी शाळेत. ” इराने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. कालचा राग अजून गेला नव्हता. आईने परवानगी दिली तशी टम्म फुगलेले गाल अजून फुगवत इरा मराठी शाळेत जायला निघाली, एकटीच. घरातून ती बाहेर पडली. रस्त्यावर आली. आणि आश्चर्याने थांबलीच. आज तिची सावली रस्त्यावर नव्हतीच.  इराला  खूप आनंद झाला. उंच उडीच मारली तिने रस्त्यावर. तिने रस्त्यावरच्या मुलांकडे पाहिलं.  बाकीच्या मुलांची सावली त्यांच्याबरोबरच होती. म्हणजे देवाने तिची प्रार्थना ऐकली होती तर. ती खूश झाली. आनंदाने इराचा चेहरा खुललाच. तीन चार पावलं ती चालली आणि  सावली कधीच परत आली नाही तर? असा विचार इराच्या मनात आला. तिला एकदम रडायलाच यायला लागलं. डोळ्यातलं पाणी बाहेर यायच्या आधीच  शाळा आली. इरा गुपचुप वर्गात जाऊन बसली. मावशीने काहीतरी विचारलं तसं सवयीने इराने बाजूला पाहिलं. मावशी हसली, म्हणाली,
“अगं, विसरलीस? मीरा आज आलेली नाही. ”  मीराला आता मात्र रडू आवरेचना. तिला आताच्या आता इरा पाहिजे होती. इरा लागली जोरजोरात रडायला आणि ओरडायला,
“देवा, माझी सावली मला परत दे. मीरा माझी सावली आहे असं आई म्हणते. मला माझी  सावली पाहिजे. आताच्या आता. रस्त्यावरची आणि घरातली. दे ना रे बाप्पा माझी सावली परत. “

“इरा, ऊठ ऊठ. काय झालं? मीरा इराला हलवून हलवून जागं करत होती. इरा गडबडून उठली. डोळे चोळत ती सगळ्यांकडे पाहायला लागली. आई, बाबा, दादा सगळेच तिच्या आजूबाजूला उभे होते. इराने पुन्हा डोळे चोळले आणि ती सगळ्यांकडे बघायला लागली.
“आई, मला माझी सावली पाहिजे. आता मी कधीच म्हणणार नाही मला सावली नको म्हणून. मला पाहिजे माझी सावली. ” डोळे पुसत इराने आईला मिठी मारली. इराने स्वप्नात काय पाहिलं ते कुणालाच माहीत नव्हतं. पण ते उद्या विचारता आलं असतं.  सगळे इराच्या बाजूला बसले. इराची आई  तिला थोपटीत राहिली. आणि  इरा पुन्हा शांत झोपून गेली.


’बालकथा’ – या अंतर्गत मी लहान मुलांसाठी लिहिलेल्या या कथा असतील. परदेशात (कदाचित आता भारतातही) मुलांना  गोष्टी  सांगायच्या म्हटल्या तरी खूपशा त्यांनी इंग्रजीतून वाचलेल्या/पाहिलेल्या (पंचतंत्र, रामायण…) असतात त्यामुळे त्यांना त्या मराठीतून ऐकण्यात रस नसतो. आणि पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवताना त्यातले शब्द, वाक्य, वातावरण हे सारंच त्यांना फार नवीन असतं. 
मुलांची कल्पनाशक्ती, नावीन्यांचा ध्यास आणि त्यांच्या हाती येणारी इतर साधनं पाहता त्यांना मराठी गोष्टी ऐकण्यात गुंग करणं ही परीक्षा असते. त्यामुळे आपण नेहमी वापरतो ते शब्द, छोटी वाक्य यांचा वापर करुन सध्या  छोट्या छोट्या  कथा लिहिते आहे.  तुमच्या सूचनांचं स्वागत आहे.

मध गोळा करणारा भुंगा


अजाण भुंगा एका दिवशी बागेमध्ये भ्रमरत होता.जाभळी रंगाची नाजुक सुंदर फुले बागेत फुलली होती.एक भुंगा सारखा गुणगुण करत फुलांभोवती रुंजी घालतो.भुंगा भलमोठा आणि अक्राळविक्राळ वाटला तरी तो मधमाशीचाच मोठा भाऊच आहे. मधमाशांसारखाच तो पण फुलांना मधा करता सतत भेटी देऊन मध जमवतो.भुंगे दिसायला जरी अगदी काळेकुट्ट असले तरी जर का आपण त्यांना जवळून न्याहाळले तर आपल्याला कळेल की त्यांचे पंख अतिशय चमकदार असतात आणि त्यावर हिरव्या, निळ्या रंगाच्या अनेक छटा आढळून येतात. त्यांचे डोळे मोठे आणि उजळ राखाडी रंगाचे असतात. पाठीवर जाड काळ्या केसांचीच लव असते. पुढचे पायसुद्धा केसाळ असतात.

ई-बुक प्रकाशन : सी प्रोग्रँमिंग भाषेची झटपट उजळणी. Quick revision of C programming.[English version]

समस्त वाचकांना अभिवादन ,

आधुनिक शिक्षण पद्धत अधिक रुचकर व आनंददायी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आमचा विश्वास आहे की कोणतीही प्रोग्रँमिंग भाषा सोप्या पद्धतीनेसुटसुटीतपणे आनंद घेवून शिकता आली पाहिजे.

आज मला तांत्रिक विभागातील नविन पुस्तक आपल्या समोर सादर करताना आनंद होत आहे.आम्ही प्रयोगातून आणि प्रयत्नातून प्रोग्रामिंग भाषा सोप्या पद्धतीने शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये सुधारणा करत आलो आहे आणि आज सर्वात बेसिक व महत्त्वाच्या भाषेपासून सुरवात करत आहोत.

पुस्तकामध्ये सी प्रोग्रामिंग बद्दलच्या कन्सेप्ट्स लॉजिकल चित्रांचा वापर करून सांगितल्या आहेत.आपण फक्त चित्रे पाहून प्रोग्रामिंग भाषेची उजळणी करू शकता.

तसेच पुस्तकात सर्व कन्सेप्ट्स पद्धतशीरपणे सी प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट्स लवकर समजतील अशा भाषेत सांगितल्या आहेत.

मजेशीर गोष्ट ही आहे की पुस्तकात प्रत्येक प्रोग्राम बरोबर आवश्यक तितकीच माहिती लॉजिक बॉक्स या बॉक्समध्ये दिलेली आहे.तसेच प्रोग्राम चे आउटपुट हे प्रत्यक्ष आउटपुट विंडोच्या चित्राच्या रुपात दिले आहे.

हे पुस्तक हाय टेक ईझी प्रकाशनाच्या माध्यमाने गुगल प्ले स्टोअर ,गुगल बुक्स व अमेझोन वर ई पुस्तक रुपात प्रकाशित होत आहे.

ठराविक पण महत्त्वाचे प्रोग्राम्स,चित्रांपासून शिक्षण,जसेच्या तसे आउटपुट विन्डोचे स्क्रीन शॉट हे या पुस्तकाला इतर पुस्तकापासून वेगळे बनवते.

या पुस्तकाचा वाचकांना आपल्या कन्सेप्ट बिल्ड करण्यास व लॉजिक डेव्हलप करण्यास फार उपयोग होईल यात शंकाच नाही.

ठळक वैशिष्ट्ये :

 • सी प्रोग्राम ची उजळणी झटपट आणि सोप्या भाषेत.
 • सी प्रोग्रामिंग च्या कन्सेप्ट्स छायाचित्रांचा वापर करून दर्शविल्या आहेत.
 • शिकण्यास व समजण्यास सोपी पद्धत.
 • अनेक महत्त्वाचे प्रोग्राम आउटपुटसह. 
 • प्रोग्रामची माहिती लॉजिक बॉक्समध्ये.

लेखकाला पुस्तकाच्या बाबतीतील प्रतिक्रिया व सूचना अवश्य कळवा.पुस्तक सी प्रोग्रामिंग वापरणाऱ्या कम्युनिटी पर्यंत नक्कीच पोहचवा.

पुस्तकाचे मुखपृष्ठ : 

Quick Revision of C programming

Quick Revision of C programming

पुस्तक गुगल वरून घेण्यासाठी येथे टिचकी मारा.

Google play store Link : https://play.google.com/store/books/details?id=8pGkBQAAQBAJ

Google Books: http://books.google.com/books/about?id=8pGkBQAAQBAJ

Google Books 2

पुस्तक अमेझोनवरून घेण्यासाठी येथे टिचकी मारा.

Link:http://www.amazon.in/Quick-revision-programming-Easy-Fast-ebook/dp/B00TX99HLM/ref=sr_1_sc_1?ie=UTF8&qid=1424786081&sr=8-1-spell&keywords=quick+revision+of+c+programing

book on amazon c programming

book on amazon c programming

 

प्रकाशक :

logo5.jpg

धन्यवाद !

MJ  🙂

Filed under: Quick Revision of C programming, x-All Tablets

इंग्लिश शिकण्यासाठी एक मस्त अॅप

अँड्रॉईड फोनचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार करत
असतो. कुणाला गेम खेळण्यात मजा वाटते, तर कुणी संगीत ऐकण्याचा आनंद घेतात, तर काही
जण सतत इंटरनेटशी कनेक्ट रहाणे पसंत करतात. पण मनोरंजनासोबतच या…

पुढे अधिक वाचा… >>

बजेटच्या निमित्ताने …….

  बरेच दिवसात येथे काही लिहीलेले नाही मात्र २८ ता. ला सादर होणारे बजेट ही लिखाणाची चांगली संधी चालून आलेली आहे. केन्द्रात नवीन सरकार आल्यापासून व खरेतर त्या आधीपासूनच बाजाराने मोठी घोडदौड केली आहे. त्यामध्ये खनिज तेलाच्या घसरलेल्या किंमती पासून ते सरकार कडून उद्योगक्षेत्राला असलेल्या अपेक्षा आणि पंतप्रधान मोदींनी परराष्ट्रातून होणा-या गुंतवणूकीसंबंधात केलेल्या वेगवान हालचालींचा वाटा होता. मात्र  दिल्ली निवडणूक निकाल आणि एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांच्या प्रतिकूल प्रतिक्रियेनंतर एकीकडे सरकारवरील दडपण वाढलेले आहे, आणि बाजाराला अनुकुल असे बजेट देण्याची जबाबदारीही वाढलेली आहे. त्यामुळे थोडीशी अनिश्चिततेची परिस्थिती असुन बाजारानेही उलटसुलट दिशा दाखविण्यास सुरुवात केलेली आहे. कदाचित बजेटच्या प्रतीक्षेमुळेच बाजाराची गती रोखली गेली असून, बजेटनंतरच बाजार आपली पुढील चाल स्पष्ट करेल असे दिसते आहे.

        अशा परिस्थितीत सामान्य ट्रेडरला एकीकडे बजेटनंतरच्या संभाव्य तेजीचा मोह पडतो तर दुसरीकडे जर बजेट बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नसले तर होणा-या पडझडीच्या शंकेने तो आपला आत्मविश्वास गमावून बसतो. काहीजण तर सरळ बजेटच्या आठवड्यात बाजारापासून दूर रहाणे पसंत करतात. त्यांचे अगदीच चुकते असे मी म्हणणार नाही, कारण बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांच्या वाक्यावाक्यासरशी बाजारात तेजीमंदीच्या लाटा येत असतात. त्यात ट्रेडींग करणे नक्कीच धोक्याचे असते.
याउलट स्थिती म्हणजे, बजेट सादर झाल्यावर बाजार कोणत्यातरी एका दिशेला मोठी हालचाल दाखवेल अशी शक्यता असते व या मोठ्या हालचालीचा फायदा उठविण्यासाठी ऑप्शन बायर्स उत्सुक असतात. खरे सांगायचे तर बजेटच्या आधी, मोठ्या प्रमाणावर कॉल आणि पुट अशा दोन्हीमध्ये झालेल्या खरेदीमुळे  प्रिमिअम ब-यापैकी वाढल्याने अशी खरेदी महागडी ठरते. उदा. निफ्टी ९००० असताना बजेट सादर होणार असेल तर लॉन्ग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजीला अनुसरून ९००० चे कॉल व पुट अशा दोन्ही ऑप्शनमध्ये , किंवा यापेक्षा थोडा स्वस्त पर्याय हवा असेल तर ९१०० चे कॉल ऑप्शन्स आणि ८९०० च्या पुट ऑप्शन्समध्ये  बजेटनंतर मिळणा-या फायद्याच्या आशेने खरेदी होतच असते. मात्र अशा वाढलेल्या प्रिमिअम मुळे महाग झालेल्या दोनही ऑप्शन्सच्या किंमती या,  वोलॅटिलिटी जशी कमी होत जाते तशा वेगाने रोडावत जातात. तेव्हा बजेट नंतर थोड्या कालावधीतच बाजाराने कुठलीतरी एक दिशा राखून मोठी झेप घेतली तरच फायदा होतो. अन्यथा महिना अखेरीची वाट बघत न बसता, वेळीच उरलासुरला प्रिमिअम विकण्यावर समाधान मानावे लागते. या सा-या जर-तर च्या गोष्टी आहेत आणि शेवटी फायदा मिळणे हे ज्याच्या त्याच्या अंदाजावर आणि नशीबावर ठरते असेच मला वाटते.
तेव्हा असे ऑप्शन खरेदी करणे अगदीच चुकीचे नसले तरी प्रत्येकाने ऑप्शन बायर्स सारखाच विचार करण्याची काही आवश्यकता नाही.
तेव्हा मार्केट कुठे जाईल याचा अंदाज बांधत न बसता आपण थोडा वेगळा विचार करूया.  
खरे तर बजेट सादर झाल्यानंतरही ते नेमके कसे आहे यावर कुणातच एकमत नसते. शेवटी बाजारच ते ठरवेल असे म्हणावे, तर बजेटनंतरही आठवडाभर बाजारात प्रचंड वोलॅटिलिटी असल्याचा पुर्वानुभव आहे.
अशा परिस्थितीत निश्चित असे काही असलेच तर ती असते बाजारात येणारी वॉलॅटिलिटी ! कदाचित उद्याच्या सोमवारीच बाजाराच्या वेगवान हालचालींना प्रारंभ होईल. बजेटच्या दिवशी तर वॉलॅटिलिटी कळसाला पोचेल व नंतर कमी होत जाईल. या वाढलेल्या वोलॅटिलिटीचा काही फायदा उठवता येइल का ?
अर्थातच येइल. थोडेसे निरीक्षण आणि योग्य स्टॉपलॉस लावण्याची सावधगिरी बाळगली तर हे शक्य आहे. बजेटच्या दिवशी मार्च महिन्याच्या कॉल आणि पुट ऑप्शन्सच्या अवास्तव वाढलेल्या प्रिमिअमचा फायदा घ्यायला हरकत नाही. उदा. बजेटच्या दिवशी वा त्यानंतरच्या सोमवारी निफ्टी ९००० असेल, तर वाढलेल्या वोलॅटिलिटी मुळे ९५०० किंवा ९६०० चे कॉल्स तसेच ८५०० किंवा ८४०० चे पुट असे दूरचे ओटीएम ऑप्शन्ससुद्धा ब-यापैकी महाग झालेले असतील. असे महाग झालेले ऑप्शन्स विकून त्याचा प्रिमिअम खिशात टाकता येईल. ( कृपया लक्षांत घ्या कि ही माझी शिफारस नसून आपल्या विचारांना चालना देण्यासाठी दिलेले फक्त एक उदाहरण आहे. प्रत्यक्षात त्यावेळच्या परिस्थिती प्रमाणे स्ट्राईक प्राईजेस ची निवड करावी लागेल.)
बजेट नंतरच्या आठवडाभरातच या ऑप्शन्स च्या किंमती उतरत जाण्याची शक्यता आहे. अगदी दूरच्या शक्यतेत समजा निफ्टी एकाच दिशेने सतत जात राहिला तर त्या परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून स्टॉपलॉस लावावा लागेल. असा स्टॉपलॉस हा नेमका कधी लावायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे, मात्र प्रत्यक्ष ट्रेड करण्याच्या आधीच ते ठरवून ठेवावे.
या व्यतिरिक्त निफ्टी फ्युचर्स मध्ये ज्यांच्या पोझिशन्स असतील त्यांनी मात्र त्यांच्या पोझिशन्सना अनुकुल अशी स्ट्रॅटेजी निवडावी लागेल. काही जणांच्या मते बजेट नंतर मार्केट मध्ये एक डीप येईल व त्यावेळी खरेदी करण्याची योग्य संधी असेल. तर काही जणांच्या मते मार्केट तशी खरेदीची संधी न देता बजेटनंतर वेगाने वाढत जाईल. दोनही मतांमध्ये तथ्य असले तरी एका गोष्टीवर मात्र बहुतांशी एकमत असलेले आढळते ते म्हणजे बाजाराची दिशा ही मध्यम कालावधीसाठी वरचीच राहील. तेव्हा बजेटचा विचार बाजूला ठेवला तरी आपल्याजवळ आधीपासून असलेले उत्तम शेअर्स मात्र विकण्याची घाई करू नका. आणि मार्केट वाढलेच तर एक डोळा सतत निफ्टी पी/ई रेशोवर ठेवून द्या !
सर्व वाचकांना बजेट निमित्ताने मनापासून शुभेच्छा !
HAPPY TRADING !!


ठाणे वज़्रेश्वरी ठाणे- बुलेट सफारी.

ठाणे वज़्रेश्वरी ठाणे
बुलेट घेतल्यापसून कुठे तरी बाहेर पिकनिक ला जायचा खूप विचार चालू होता. पण तशी संधी आणि वेळ मिळत नव्हता. शेवटी 25/26 जानेवारी ची सुट्टी लागून आली त्यामुळे जवळ कुठे तरी फिरून यायाचा प्लान ठरत होता. ठाण्यापासून जवळ असलेली सगळी ठिकाणे बघून झाली होती. त्यामुळे कुठे जायचा हा प्रश्न होता. अशातच वज्रेश्वरी चे नाव समोर आले.  खूप लहान असताना म्हणजे 20 वर्षेपूर्वी वज्रेश्वरीला गेलो होतो. त्याच्या धूसर आठवणी डोळ्यासमोर होत्या. ठाण्यापासून घोडबंदर मार्गे वसई विरार करत गेलो तर गूगल मॅप प्रमाणे ते अंतर 62 किमी होते. आणि भिवंडी मार्गे अंदाजे 45 किमी होते. विचारांती असे ठरले की जाताना घोडबंदर मार्गे जायचे.

मेदुवडा सांबर 
सकाली 7.15 निघलो.. बुलेट दोन दिवसपूर्वीच सर्विस करून आणली होती त्यामुळे तो आपल्याच खुशीत चमकत होती. एकाच किक मध्ये स्टार्ट होऊन तिने आपली पसंती दर्शवली. सातशे रुपयाचे पेट्रोल घालून तिचे पोट भरून घेतले. मग तर ती अजून खुश झाली. घरातून निघताना किलोमीटर ची नोंद करून ठेवली होती….2292 किमी दाख

वत होते. सुजीतला पिक अप करून पुढे मानपाड़ा नाक्यावर जिगरला भेटलों. दोघे पण स्वेटर/जैकेट घालून आले होते. आणि मी दीड शहण्यासारखे हाल्फ़ पेक्षा पण हाल्फ़ स्लिम फिटिंग चे शर्ट घटले होते. आधी थंड हवा चांगली वाटली पण जसे शहर संपुन घोडबंदर चे जंगल चालू झाले तशी थंडीची लहर अंगातून घुसून अंगभर नाचायला लागली. मध्ये मध्ये कोवळे उन अंगावर पडले की बरे वाटत होते. घोडबंदर संपुन पुढे अहमदाबाद हायवेला लागलो. आजूबाजूचे निसर्ग बघत हॉटेल शोधायला चालू केले. नाश्ता आणि चहाची खूप गरज होती. बहुतांशी हॉटेल आणि ढाबे अजून उघडले नव्हते. एक सव्वा तासाचे रनिंग झाल्यावर एक बरयापैकी गर्दी असलेले हॉटेल दिसले. आम्ही सहसा गर्दी वालेच हॉटेल बघतों कारण तिथे ताजे अन्न मिळते. अपेक्षेप्रमाणे नाश्ता चांगला होता. मिसळ पाव, इडली वडा सांबर आणि मैसूर डोसा खाऊन एक स्पेशल चाय पिउन पोटाच्या टाक्या फूल केल्या. पण नेमके हॉटेल चा फोटो काढायला विसरलों. हॉटेल चे नाव अन्नपूर्णा- व्हेज हॉटेल.

मिसळ पाव


वज्रेश्वरी ला जायचा रस्ता
गूगल मॅप चेक केले आणि किती अंतर बाकी आहे ते बाघितले…अजून खूप पल्ला गाठायचा होता. स्पीड वाढवायचे ठरवले. पुढे गाड्या सुस्साट पळवल्या. बरेच अंतर मागे टाकल्यावर तुंगारेश्वर फाटया जवळ उजवी कडे वळून वज्रेश्वरीचा रस्ता पकड़ला. विना द्विभाजक असलेला ह्या रोड वर गाड़ी टाकताच शहरी हवा संपुन गावची शुद्ध थंडगार हवा अंगाला जाणवू लागली. ह्या रस्त्यावर बुलेट पळवायला जी मजा आली ती हायवे वर येत नाही. बुलेट सफारीचा खरा आनंद ह्या रस्त्यावर भेटला.  ह्या रस्त्याला समांतरच तानसा नदी वाहत असते त्यामुळे हवेत थंडपणा आणि वेगळाच ताजेपणा होता. मुख्य हाइवे पासून अंदाजे 14 किमी अंतर कापल्यावर गणेशपुरीला जायचा रास्ता येतो. तिथे सिद्धपीठचे दर्शन घेऊन पुढे नित्यानन्द महाराजांच्या समाधि जवळ गेलो. शिवलिंगचे दर्शन घेऊन पाण्याचे गरम कुंड बघायला गेलो. तिथे असलेली गर्दी पाहून काढता पाय घेतला. परत 2 किमी मागे येऊन वज्रेश्वरी मंदिरचा रस्ता पकड़ला. मंदिरासमोर असलेल्या छोट्या रस्त्यावर आधीच ट्राफीक जमले होते. एका हार वाल्याच्या दुकानात गाड्या पार्क करून मंदिरात गेलो. दर्शनसाठी ही भली मोठी रांग होती. देवालयाला बाहेरुन प्रदिक्षिणा घातली मंदिरच्या मागे झाड़ाखली निवांत बसलों. 

वज्रेश्वरी ला जायचा रस्ता

नित्यानंद स्वामीचा मठ

नित्यानंद स्वामीचा मठ

श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान

श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराच्या पायऱ्या 

पूजा सामानाचे दुकान 

शिवलिंग

वज्रेश्वरी देवीची मंदिर 

वज्रेश्वरी देवीचे मंदिर. 

शिवलिंग 

शिवलिंग 

शिव 

जय हनुमान

शिवलिंग 

वज्रेश्वरी मंदिराच्या पायऱ्यावरून 
निघताना मंदिराच्या बाहेरच एक पड़का वाडा होता. कधी काळी त्या वाडयाने नक्कीच वैभव पहिले असणार आज तो पडिक होऊन जीर्ण अवस्थेत उभा असला तरी त्याच्या अंगाखांद्यावर गतवैभवाच्या खाणाखुणा दिसत होत्या. तो पडिक वाड़ा पाहून उगाचच नोस्टाल्जिक झाल्या सारखे वाटले. पुढे मागे जर स्वत:चे मोठे घर कधी बनवायाला भेटले तर नक्कीच असे घर बनवेन. 

पडका वाडा 
बाजारातून लाल टप्पोरी बोरे घेतली. उसाचा रस प्यायलों आणि परतीचा रस्ता धरला. जाताना तुंगारेश्वर जंगलातून निघून भिवंडी रोड मार्गे परतायचे ठरले. देपिवली गावात मित्राचा एक प्लॉट होता तिथे एक ब्रेक घेऊन ठाण्याच्या रस्त्याला लागलो. रस्त्याची हालत अगदीचं बेकार होती. गाड़ी 30 च्या वरती पळवता येत नव्हती. एक तास गाड़ी पळवल्यानंतर एका वळणावर  एक मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत विसावलो. पाणी ढोसून फ्रेश झालो. थोड़े फोटो सेशन केले आणि पुढच्या प्रवासाला लागलो.  हा रोड तुमचे 15 ते 20 किमी चे रनिंग वचावतों. पण रस्ता खराब असल्याकारणामुळे कमीत कमी पाउण तास जास्त लागतो. जस जसे तुंगारेश्वर नॅशनल पार्क मधून बाहेर येतो तस तसे भिवंडी चा औद्योगिक एरिया चालू होतो…. शुद्ध हवेतून एकदम अशुद्ध हवेत प्रवेश होतो. भिवंडीच्या ट्रक आणि टेम्पो च्या ट्राफीक मधून बाहेर पडत काल्हेर कशेली चा रस्ता पकड़ला. पुढ़च्या 20 मिनिटात ठाण्यामध्ये एका हॉटेल समोर गाड्या उभ्या केल्या….4.30 वाजले होते. हॉटेल मध्ये जेवणाचा  बंदोबस्त होईल का विचारले आणि पोट्भर जेवून घेतले.
लाल टपोरी बोरे 

उसाचा रस 

बुलेट 

वटवृक्ष 


घरापासून घरापर्यंत 128 किमीचे रनिंग केले. बुलेट सफारीचा मस्त आनंद लूटला. कॉंक्रीटच्या रस्त्यापासुन, डांबराचे, मातीचे, दगड़ाचे सगळ्या प्रकारचे रस्ते अनुभवायाला मिळाले. प्रवासचा पूर्ण आनंद घेतला.

२२२. शिकाम्बा-मशाम्बा

कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही.
त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं  ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं.
पालकांचा आणि पर्यायाने समाजाचा शिक्षणव्यवस्था सुधारण्यात सहभाग वाढावा, शाळेने कार्यक्रम आखताना आणि राबवताना समाजाचा सहभाग घ्यावा आणि या माध्यमातून “सर्वांसाठी (प्राथमिक) शिक्षण” हे उद्दिष्ट साध्य व्हावे असा मोझाम्बिक सरकारचा प्रयत्न. या स्कूल कौन्सिलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी असतात, काही शिक्षक असतात आणि काही पालक. दर तीन वर्षांनी स्कूल कौन्सिलची निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच लोक आहेत. पण तो आजचा विषय नाही. मुलींच्या शिक्षणाशी संबंधित एका प्रकल्पावर मी सध्या ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करते आहे. त्यामुळे या कौन्सिलचं प्रशिक्षण पाहणं; त्याचा आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल सुचवणं; ते अमंलात येतील हे पाहणं – हे माझं (अनेक कामांपैकी) एक काम. 
या गावात जाताना जेव्हा मुख्य रस्ता सोडून आम्ही उजवीकडे वळलो; तेव्हा डाव्या बाजूला ‘शिकाम्बा’ नामक नदीवर बांधलेलं धरण असल्याची आणि त्या धरणाला ‘शिकाम्बा लेक’ म्हटलं जातं अशी माहिती उत्साही सहका-यांनी दिली होती. “आज वेळ नाही आपल्याकडे, पण पुढच्या भेटीत जमवू आणि जाऊ थोडा वेळ तरी ‘शिकाम्बा लेक’ परिसरात” असंही आमचं आपापसात बोलणं झालं. त्यामुळे ‘शिकाम्बा’ शब्द मेंदूत रुजला. 
आज माझ्या सोबत स्थानिक एनजीओचे जे सहकारी आहेत, त्यांच्यातल्या कुणालाच इंग्रजी भाषा समजत नाही. त्यामुळे मी पोर्तुगीज भाषा किती आत्मसात केली आहे याची आज कसोटी आहे. प्रशिक्षण सुरु झालं आणि पहिल्याच मिनिटात माझ्या लक्षात आलं की मला स्थानिक लोकांचं ‘पोर्तुगीज’ नीटसं समजत नाहीये. चौकशी केल्यावर स्थानिक भाषा ‘शुटे’ (Chute) असल्याचं कळलं. मग लोक काय बोलतात ते मला पोर्तुगीजमध्ये अनुवाद करून सांगायची आणि माझं पोर्तुगीज लोकांना त्यांच्या भाषेत सांगण्याची जबाबदारी बेलिन्या आणि किटेरिया या दोघींनी घेतली आणि फार अडचणी न येता माझा लोकांशी संवाद सुरु झाला. 
लोक काय काम करतात; शेती आहे का; त्यात काय उगवतं; ते पुरतं का कुटुंबासाठी; कुणाकुणाच्या मुली या शाळेत आहेत; माध्यमिक शिक्षणासाठी मुली पुढे कुठे जातात; प्राथमिक शाळेतून मुलींची गळती मोठ्या प्रमाणात होण्याची कारणं; कुटुंबात साधारण किती लोक असतात; स्त्रियांचं आरोग्य ….. असंख्य प्रश्न. मी भारतीय असल्याचं त्यांना सुरुवातीलाच सांगितलं आहे मी; त्यामुळे (मी पाहुणी असल्याने) आमची मस्त चर्चा चालू आहे. 
एक सत्र संपून दुसरे सुरु होताना एखादा खेळ  घ्यावा म्हणून बेलिन्या पुढे येते. पण स्थानिक स्त्रिया (ज्या स्कूल कौन्सिलच्या सदस्य आहेत) त्या बेलिन्याला थांबवतात आणि माझ्याकडे हात दाखवत काहीतरी म्हणतात – त्यावर सगळा समूह हसत तत्काळ सहमत होतो. मी प्रश्नार्थक नजरेने किटेरियाकडे पाहते. “भारतातल्या मुली खेळतात असा एखादा खेळ तुम्ही घ्या आमचा” अशी त्या लोकांची मागणी आहे. 
एक क्षण मी विचारात पडते. प्रशिक्षणात दोन सत्रांच्या मध्ये घेतले जाणारे हे खेळ छोटे आणि गमतीदार असतात. लोकांचा कंटाळा घालवायचा हाच त्याचा मर्यादित उद्देश असतो. आता इथं त्या खेळाचा अनुवाद करत बसले तर मजा जाणार. मला एकदम ‘शिकाम्बा लेक’ची आठवण येते.
मी पुढं येते. सगळ्यांना गोलात उभे राहायला सांगते. ‘शिकाम्बा सगळ्यांना माहिती आहे का’ ते विचारते – अर्थात ते त्या सगळ्यांना माहिती असतं. मी जे शब्द बोलेन त्यानुसार कृती करायची हे मी समजावून सांगते आणि मग मी ‘शिकाम्बा’ शब्द उच्चारून पुढे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. मग मी म्हणते ‘मशाम्बा’ आणि मागे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. सगळे हसतात. मी ‘शिकाम्बा’ म्हटलं की सगळे पुढे उडी मारतात आणि मी ‘मशाम्बा’ म्हटलं की सगळे मागे उडी मारतात. खिडकीतून अनेक लहान मुलं कुतूहलाने पाहताहेत आमच्याकडं – विशेषत: माझ्याकडं!
दोन चार उड्या झाल्यावर मी ‘मशाम्बा’ म्हणत पुढे उडी मारते ….अनेकजण माझं अनुकरण करतात.
मग हास्याची एक लाट. 
आम्ही पुढे काही मिनिटं खेळतो.
“शिकाम्बा–मशाम्बा” म्हणजे आपलं  “तळ्यात-मळयात”.
पोर्तुगीज भाषेत ‘मशाम्बा’ म्हणजे शेत.  
संध्याकाळी मी तिथून निघते तेव्हा शाळेचा आवारात काही मुलं “शिकाम्बा-मशाम्बा” खेळताहेत. 
लहानपणी मी ज्या गावात होते तिथल्या तळ्याची मला फार आठवण येते.
आता लवकारात लवकर ‘शिकाम्बा लेक’ला जायला हवं….

ऑफिस आणि गाणं

“ओSSSSSS  अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS रीS बहका, मन क्यों बहका री बहका, आ…

या झोपडीत माझ्या

रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात
              फ्रेम फ्रेम या सदरात  ’या झोपडीत माझ्या’ या
                                विषयावरची मी काढलेले फोटो प्रसिध्द झाले आहे.

"सुपर हीट" आत्मचरित्र !

 खूप दिवसांपूर्वी यु ट्यूब वर मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या अभिनय कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्या बद्दलचा सोहळा बघितला. नुसते मराठीतीलच नव्हे तर हिंदी मधील अनेक दिग्गज सोहळ्याला उपस्थित होते. याच कार्यक्रमा दरम्यान सचिन पिळगावकर यांनी आपले आत्मचरित्र ” हाच माझा मार्ग ” दस्तुरखुद्द “सचिन तेंडूलकर” याच्या हस्ते प्रकाशित केले. मराठीतील एवढ्या दिग्गज अभिनेत्याचे आत्मचरित्र वाचण्याचा योग मला नुकताच आला. सचिन यांचा पहिला चित्रपट “हा माझा मार्ग एकला ” यावरूनच त्यांनी या आत्मचरित्राचे नाव “हाच माझा मार्ग” ठेवले आहे. पुस्तकाच्या सुरवातीलाच सचिन सांगू इच्छितात, की हे पुस्तक त्यांना कोणाला अर्पण करायचे आहे ते climax लाच कळेल. त्यामुळे पहिल्या प्रकरणा पासून ते शेवटच्या प्रकरण पर्यंत वाचकाची उत्सुकता वाढत जाते.

                                               

वयाच्या सुरवातीला आलेला अभिनयाचा प्रसंग , स्वतः लहान वयात दिग्दर्शित केलेला स्वतः चा पहिलावहिला फोटो , अभिनयाची सुरवात असे विविध पैलू उलगडत जातात. मनात कायम असलेली “दिग्दर्शक” बनायची स्वप्ने याच दरम्यान सुरु होतात. मास्टर सचिन ते अभिनेता सचिन असा प्रवासाला प्रारंभ होतो. अगदी लहान वयात मराठीमधील दिग्गज अभिनेते तसेच हिंदीमधील देव आनद संजीव कुमार यांच्या सारख्या दिग्गजांसोबत अभिनयाची संधी मिळाल्यावर मनाची स्थिती कशी होते याबद्दल चे वर्णन ऐकून खूप उत्सुकता वाढत जाते. लहान वयात हिंदीत काम मिळू लागल्यावर त्या वेळेसचे मित्र, बालकलाकार, इत्यादींचा उल्लेख सचिन आवर्जून करतात.पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार, पंडित नेहरूंनी स्वतः  मांडीवर बसवून केलेले कौतुक व बक्षीस म्हणून स्वतःच्या कोट वर लावलेले त्यांचे आवडते गुलाब भेट दिलेला प्रसंग, मीना कुमारीमुळे उर्दू ची लागलेली गोडी, आचार्य अत्रे  सोबतचा सहवास, रंगभूमी वरील कारकीर्द,  एवढेच नव्हे तर अगदी लहान वयात उर्दूवर मिळवलेले अफलातून प्रभुत्व यामुळे चक्क कादर खान यांनी केलेली प्रशंसा अश्या गोष्टी वाचून आश्चर्य वाटते.

            

मास्टर सचिन चा आता हळू हळू अभिनेता सचिन व्हायला सुरवात होते, राजश्री कडून तशी ऑफर येते , चित्रपट सुपर हीट  होतो.  तसेच सचिन यांनी “शोले” सारख्या चित्रपट बद्दल आवर्जून लेखन केले आहे, तसेच “शोले” मधला ट्रेन चा प्रसंग सचिन यांच्या युनिटच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शित झाला आहे या गोष्टी अगदी पहिल्यांदा कळतात. अभिनेता म्हणून कमावलेले नाव , दिग्दर्शनाची चाहूल, मराठी मध्ये पदार्पण अश्या अनेक गोष्टी या दरम्यान घडतात, संजीव कुमारच्या आकस्मिक जाण्याने त्यांना धक्का बसतो. हिंदी मध्ये जम बसल्या नंतर मराठीमध्ये सुद्धा सचिन यांचा खेळ सुरु असतो, याच दरम्यान ज्येठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सोबत सुरु केली फिल्मी कारकीर्द, “अशी ही बनवा बनवी” ची संपूर्ण कथा , या मराठी चित्रपटाचा २५ आठवडे चालल्याचा सोहळा, दिलीप कुमार यांची उपस्थिती, पुढे अनेक सुपर हीट चित्रपटांची रांग, इत्यादी गोष्टी यात नमूद केल्या आहेत. याच दरम्यान राजेश खन्ना, शमी कपूर यांसारख्या ” खवय्या” लोकां सोबत केलेली मेजवानीचे देखील किस्से आहेत. राजेश खन्ना सोबत “अवतार” या चित्रपट केलेल्या भूमीकेबद्दल सचिन खुलून लिहितात. राजेश खन्ना नाव आले म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचे देखील अनेक किस्से आहेत, सचिन एकदा रागावलेले असताना अमिताब बच्चन यांनी स्वतः काढलेला सचिन यांचा फोटो देखील त्यांनी दिला आहे. सत्ते पे सत्ता यात सचिन अभिताभच्या सर्वात लाडक्या भावाची भूमिका करत होते , खऱ्या आयुष्यात पण याची पुनरावृत्ती होते

                        

                         
१९९५ नंतर हळू हळू सचिन आपला रोख मोठ्या पडद्या वरून छोट्या पडद्या कडे वळवतात, “तू तू मै मै” सुपर हीट होते, त्या जमान्यात स्टार प्लस ही इंग्रजी वाहिनी होती त्यावर फक्त ” तू तू मै मै” हीच हिंदी मालिका दाखवली जायची याबद्दल सचिन आजदेखील आठवण काढतात. छोट्या पडद्या वर एक यशस्वी दिग्दर्शक बनल्यावर सचिन मराठीत पुरागमन करतात. एका वाहिनी सोबत वाईट वर्तणूक दिल्यामुळे  “माझा चित्रपट टी वी वर प्रसारित करण्याचे हक्क  तुम्हाला ३० लाखांना विकेन ते पण फक्त ५ वर्षासाठी ”  असा निश्चय करून चित्रपटनिर्मिती साठी पुन्हा सुरवात करतात, चित्रपट ठरतो ” नवरा माझा नवसाचा”. कोल्हापूर पुणे येथे चित्रपट सुपर हीट होतो व मुंबई तो चित्रपटगृहात लावण्या साठी वितरकांची गर्दी होते, व सचिन नंतर या चित्रपटाचे  टी वी वर प्रसारित करण्याचे हक्क खरेच “३० लाखांना व फक्त ५ वर्षासाठी त्याच वाहिनीला विकतात”. त्या नंतरच्या प्रकरणात १ नाट्यमय मोड येतो ” नच बलिये ” च्या रूपाने. या वयात देखील स्वतःपेक्षा तरुण असेलेल्या जोड्यांना हरवून ते या पहिल्या पर्वाचे विजेते बनतात, नुसत्या महाराष्ट्रातून नाही तर अख्या देशभरातून त्यांना ७० % पेक्षा अभिक मते मिळतात, याच नच बलिये दरम्यानचे किस्से सचिन यांनी खूप चांगले रंगवले आहे.

                              

                            

नंतर त्यांनी मराठी मध्ये नृत्य संदर्भात ” एका पेक्षा एक” कार्यक्रम सुरु केला, यात “महागुरू” ही  संकल्पना आपली नाही लेखकाची आहे हे ते प्रांजळपणे कबूल करतात. वेळप्रसंगी गुणी कलावंताना स्वतः मार्गदर्शन केले. मित्र जुनिअर मेहमूद साठी देखील मैत्री खातर एका चित्रपटात विनामूल्य काम केले . त्या नंतर आलेले चित्रपट, आयुष्यातले बाकी किस्से याने लिखाण सुरु राहते. अनेक कलावंताना त्यांनी पहिली संधी दिली मग ती अभिनयाची असो किवा इतर. त्यांनी संधी दिलेल्या लोकांमध्ये आज अनेक सुप्रसिद्ध लोकांचा समावेश आहे.

                                                            

यातच सचिन आपल्या परिवाराबद्दल विस्ताराने लिहितात, सुप्रिया यांच्याशी झालेली ओळख, लग्न, मुली बद्दल असलेली काळजी , जीवापाड प्रेम या सर्व गोष्टी वाचून मन थक्क होते! “क्युंकी सास भी कभी बहु थी”  या मालिकेचे टायटल सचिन पिळगावकर यांच्या नावावर रजिस्टर होते, जितेंद्र यांच्या मैत्री साठी त्यांनी ते विनामूल्य दिले कोणतीही अट न घालता, असेच “यमला पगला दिवाना” या टायटल चे हक्क देखील  सचिन पिळगावकर यांच्या नावावर रजिस्टर होते ते देखील त्यांनी धर्मेंद्र यांना दिले.

                                 

एकूणच इतके प्रामाणिक आत्मचरित्र माझ्या वाचण्यात तरी अजून आले नाही. सचिन प्रत्येक प्रकरणात विस्ताराने आणि खऱ्या मनाने बोलतात. त्यांचे आत्मचरित्र आवर्जून  वाचण्या सारखे झाले आहे. आपल्याला कोणत्याच प्रकरणात कंटाळा येत नाही किवा अतिशयोक्ती वाटत नाही. त्यांचे हे आत्मचरित्र त्यांच्या चित्रपटा  प्रमाणेच सुपर हीट आहे!

                                      

आम आदमी करतो सुपडा साफ????

मतदार राजा टोकाचा कौल देऊ लागला आहे…
आदिकाली पर्यायी पक्षच नव्हता… मग विरुद्ध पक्षांमधे प्रत्येकी एखाददुसरं नेतृत्व तयार झालं. आणिबाणीनंतर विरोध्यांना सत्तेची चव कळली. ती लगेच उलटली. पुन्हा मतदारराजानं आणिबाणीवालीचीच लाट आणली… आपल्याकडचा लोलक चांगलाच झुकतो.
राजकीय मृत्यू हे अपघात असतात, कारस्थानांची फलितं असतात, की दहशतवादाची?…
पुन्हा प्रेमाची लाट येते… साऊथला कटाऊटस्, मंदिरं, आत्महत्या असे विशेष मतदारराजा दाखवतो. त्याचीच जराशी पातळ प्रतिमा देशपातळीवर दिसते?…
हे आवर्ती होतंय म्हणून की काय धर्म ह्या मुद्याचे पद्धतशीर आणि संवेदनाहीन राजकारण आणले जाते?… चेहेरा, दाखवण्याचा वेगळा, मुळातला वेगळा… पाडापाड, दंगली, जाळपोळ… अजूनही दंगलीनंतरची छायाचित्रं आठवली, स्त्री, भृणहत्यांच्या बातम्या आठवल्यावर सामान्यातला सामान्य मतदार चरकतो? की ‘आपलं’ बरोबर आहे, ‘त्याना’ असंच शासन पाहिजे हे त्याच्या जाणिवरुपी अस्तित्वात मुरुन गेलंय?
राजकारणातलं वेगळं वळण आणि शेजारी शत्रू या दोघांमुळे पराकोटीचा दहशतवाद माजला, की कुणा एकामुळे?… यात सगळ्यात जास्त सर्वतोपरी हानी कुणाची झाली?…
मग पुन्हा जोरदार पलटी… त्या आधीची काही त्रिशंकू मध्यंतरं… कसरती, सारवासारव्या…
मतदारराजानं पुन्हा घराणेशाही, परित्यक्तासमान विधवेबद्दल सहानुभूती अशी जुनीपुराणी मतं कवटाळली? त्या विजयाला सत्ताधारिणीने त्यागाचं कोंदण घालून स्वप्रतिमा उजळवली? वर त्याला मुस्काट दाबलेला, सज्जन विकासाचा चेहेरा दिला? ज्या चेहे-यानं परंपरागत विकसनशील देश विकसित जगात पाय रोवू लागला होता, त्याच चेहेर्‍याला वापरुन घेऊन? अशा प्रतिभा, कर्तृत्ववान चेहेर्‍यानं मंद, निब्बर दगडी कवचाआड स्वत:ला वापरुन देऊन देशाला कुठे आणून ठेवलं?….
सामान्यातला सामान्य राजा सगळंच स्वीकारतो?…
पैसे खा पण आमची कामं करा… हे सगळे येतात ते तुंबडी भरायलाच हो… असं दर राज्यकर्त्याला म्हणतो…
धोरणलकव्याने तरी किंवा दुहीच्या बीजाने तरी आल्टूनपाल्टून रसातळाला दोन बोटं उरताहेत…
लकवा खूपच मारलाय आता जालिम डोस शोधायला लागला मतदार राजा. लकवेकर खूब दिला लकवा म्हणून माजात होते आणि कथित दंगल, जाळपोळीचा कथित सूत्रधार, कथित बनावट चकमककिंग वगैरे बिरुदावली मिळालेला अंडरडाॅग हळूहळू उभा राहिला. आपला मतदार राजा हुशार, चाणाक्ष. त्याने काट्यावर नायट्याचा हिशोब केला. प्रचंड विजयामुळे, त्या विजयाअलिकडच्या पलिकडच्या भल्याभल्यांच्या प्रतिक्रियांपुढे मतदार राजा समूहात काहीशी भांबवाभांबवी झाली का? की नाही? रोगापेक्षा इलाज भयंकर असं वाटून?….
पुढचं तर अगदी अलिकडचं… नमोंकीत सूट इत्यादी… महर्गता, वेतनकरार, सवलती… यात काही अनुकुलता?
मतदार राज्याचं सुपडा साफ करण्याचं व्रत चालूच आहे…
राज्य पातळीवर नवनिर्माणाचंच खळ्ळं खट्याक करत आता तर तो सोन्याचा झाडू हातात घेऊन राजधानीवरच उभा आहे…
‘सुसा’ट मतदार राजा आणि अप्पलपोटे राजकारणी यांतला हा विळ्याभोपळ्याचा खेळ केवळ खेळाचा आनंद देत-घेत रहाणार की आपली लोकशाही, पोरखेळातून बाहेर पडून सज्ञान होणार? की सरळ ठोकशाहीच येणार?…
केंद्रात ज्याचं सरकार आहे त्याची शत्रूसरकारं राज्यात आली की प्रगतीच प्रगती, हे पुस्तकी राजकारण अजून मतदार राजाचा कब्जा घेऊन आहे?… सत्ताधीश, त्यांचे कथित स्पाॅट इत्यादी नाना काही वेगळे उजले रंग दाखवणार?….
असा हा सामना दोन राजांमधला…  हे कलगीवाले आणि तुरेवाले दोघेही, तटस्थ निरीक्षकाला सारखेच अनप्रेडिक्टेबल- अनाकलनीय वाटतात?….
मुळात ताटस्थ्य इत्यादी खिजगणतीत आहे?
नाही… एक मॅगसेसे विजेता, भूतपूर्व आदर्श नोकरशहा, सुवर्णपदकविजेता, मुख्यमंत्रीपदी असतानाही चौकात धरणं धरुन बसणारा… राजधानीद्वारी सोनियाचा झाडू धरुन शड्डू मारता झाला आहे… या पार्श्वभूमीवर या सगळ्याच प्रश्नांचं मूल्य काय आहे?…
उद्या महासत्ता होण्याच्या दिशेवरचा सोपान दृगोचर झालाच तर… म्हणून विचारतोय…
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

ज्ञानपिठ…

प्रेषिताचेच काय
प्रत्येकाचेच पाय मातीचे
कुणी काय करायचं
ते आणखी कुणीतरी ठरवायचं
कोणात नक्की केवढं आहे तेही
एखादा वांड मुलगा असतो
मला वाटेल, पटेल ते मी
त्या त्या वेळी करीन
काय करायचं ते घ्या करुन म्हणतो
प्रत्येकाचा एक काळ असतो
वेळ असते
पाणी अमुक वळणावरच जातं
शिमगा जातो, कवित्व उरतं
विचार पक्के हवेत
विरुद्ध विचार पक्के हवेत
एकमेकांबद्दलचा आदर चिरंतन रहावाच
गळ्यात गळे, तत्व वेगळी
वर्ग की वर्ण संघर्ष डोकं वर काढत रहावा
अंतर्विरोध का काय तो असतोच
झुक्या… त्याला किती लवकर कळलं
पार नाहीसे झाले 
लोकलमधे चावडी कसली 
घुसमट शरीरांची, श्वासांची, प्रसंगी प्राणाची
वर्तमान पत्र बाद, संजयी वाहिन्या उद्बोधक
व्यक्त होण्याची, लढत रहाण्याची असोशीच असोशी
झुक्यानं सगळं घरात आणलं, हातात दिलं
त्याला किती लवकर समजलं
आयुष्य…