कोकणदिवा

कोकणदिवा
एखादा रविवार पकडून बाईक पिदडवत कुठेतरी भटकून यायचे म्हणून यावेळी कोकणदिवा जायचा प्लान केला. याधीच्या रविवार भर दिवाळीत सारसबागेतील हिरवळ डावलून लिंगाणा आणि रायलिंग पठारावरची हिरवळ बघायला एकटाच गेल्याने जरा सोलो ट्रेकिंग करायचा कॉन्फिडन्स वाढला होता. 
यावेळीही सकाळी जास्त लवकर उठण्याचे कष्ट न घेता निवांत ८ वाजता उठून निघालो. थोडेसे पाणी आणि खायला घेऊन बाईक मारत खडकवासला-> शिवणे-> कोंढवे धावडे ->कुडजे -> निलकंठेश्वर-> पानशेत-> घोल ->गारजाई पर्यंत पोहोचलो.
पानशेत पर्यंत जाताना, निलकंठेश्वर फाटा फुटतो तेथे एक पांडवकालीन शिवमंदिर आहे. मंदिर खूप काही खास नसले तरी शिवलिंग आणी मंदिराबाहेरील विरगळ मात्र बघण्यासारखी आहे.

येथून पानशेत जवळपास ६ किमी असून मध्ये एक छोटा तलाव लागला. बरेच बगळे व तत्सम पक्षी जमले होते. आजूबाजूला डोंगररांगा, निर्मनुष्य रस्ता एकदम निरव शांतता.

मी गाडी लावताच अर्धे पक्षी उडून गेले. मोठी लेन्स नसल्याने फोटोसाठी जास्त प्रयत्न न करता काही बळच क्लिक मारले.

सुमारे ४ तासात मी “घोल” या कोकणदिवा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी पोहोचलो. पानशेत पासून रस्ता बरा असला तरी आजूबाजूला मस्त हिरवागार डोंगररांगांच्या कुशीतून वळणे घेत जाताना बाईक दामटवायला मजा येते.

‘घोल” पासून “गारजाई” गाव जवळपास ७-८ किमी असून घोळ पासून आधी पायवाटेने चालत जावे लागे. आता नुकताच कच्चा रस्ता झाल्याने बाईक जाऊ शकतात.
बाईक पंक्चर वैगरे झाली कि मात्र मजा आहे. ८ किमी ढकलून घोल गावात आणून मग दुसर्या दिवसाच्या ST ची वाट बघून त्यात गाडी टाकून पानशेत लाच पंक्चर काढून मिळते. सो टायर चांगले असतील तरच हुशारी करण्यात अर्थ आहे .

गारजाई गावातून रस्ता विचारून निघालो खरा, पण ३-४ तास शोधूनही काही सापडले नाही. GPS चालू केला पण कुठे आहोत आणि कुठे जायचे काहीहिऊ पत्ता लागेना. शेवटी ३ वाजले आणि आहे तेथून परतीची वाट पकडली.

उत्तुंग डोंगररांगा आणी पूर्णतः निर्मनुष्य प्रदेश. कुत्रे सुध्दा नाही कुठे. बराच भटकलो. एका खिंडीत जेवण करून परत वाट शोधायला निघालो पण २-३ तास भटकत कुठेतरी तिसरीकडेच चाललो होतो. शेवटी एकट्याला भीती वाटायला लागली सो गप निघालो परत. येऊ परत पावसाळ्यात आता.

कोकणदिव्यावर न जायचा/जाणारा एक रस्ता मला माहित झाला. आता किल्ल्यावर जायचा पुढच्या वेळी शोधू.

घोल गावातील काही बायका काहीतरी चाळत होत्या. काय चाळत होत्या ते मात्र कळले नाही. जाताना मात्र मला थांबवून त्यांनी विचारले कि या कच्या रस्त्यांनी का गाडी घेऊन गेलास? गाडी खराब झाली तर काय करशील अश्या ठिकाणी?
मी नुसताच हसलो पण जाताना आणि येताना मनात प्रचंड धाकधूक होती.

कर्दळीचा फड जमला होता.

पानशेत धरणाचे काही फोटो काढायला थांबलो. मस्त निळेशार पाणी होते. वाळलेले गवत पायाने मोडत पुढे चाललो होतो. एका ठिकाणी थांबून खालचा फोटो काढला अन तोच मागे काहीतरी सळसळ आवाज झाला. मागे बघतो तर भलामोठा घोणस ऊन खात पडलेला होता आणि माझ्यामुळे त्याची वामकुक्षी खंडित झाली होती.

“सळसळ” या आवाजाची मी प्रथम अशी अनुभूती घेतली. अजूनही तो आवाज कानात बसलाय. तो इतक्या झपकन निघून गेला पण मी मात्र असा टरकलो की जी काय बाईक काढली तेथून ते डायरेक्ट कोथरूड.

हा ब्रिज मस्त आहे. कुद्जे गावाहून पुढे आहे थोडा.

सुर्यनारायण आपली ड्युटी संपवून आपला अल्टरनेटीव ला handover देऊन चालले होतो. पण एक मस्त फोटो आला.

बाकी खूप खास लिहिण्यासारखे नाही. चेहेरा काळा पडायला या ट्रेक ने अजून थोडी मदत झाली आणी पुढच्या आठवड्यासाठी औताला जुंपून घ्यायला फ्रेश होऊन नव्या दमाने आम्ही सज्ज झालो.

कविवर्य बा भ बोरकर जन्म दिवस

                          ॐ              कोल्हापुर
                                  30 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                           रविवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

कविवर्य बाभ बोरकर यांचा जन्म दिवस

मी पूर्वी त्यांच्या कविता लिहिल्या आहेत त्याची लिंक
वाचण्यास देत आहे किती साहित्य आहे माझ्या कडे लगेच सापडते

बाकि ठिक छान
                                     वसुधालय

http://vasudhalaya.wordpress.com/2011/12/03/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/

 

 

 

                        

http://vasudhalaya.wordpress.com/2011/12/01/%E0%A4%95%E0%A5%88-%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/

1385451_354930318017078_4089414954825879198_n img_379011

ओरायन अवकाशयान

एकाच आठवड्यात अमेरिकेतील नासा ओरायन नावाचे नवीन अवकाशयान चाचणी साठी अवकाशात पाठवील. ह्याचे थेट प्रक्षेपण नासा टीवी वर ४ डिसेंबर ला सर्वजण बघू शकतील.

ओरायन ह्याची अवकाशात पाठ्वण्यापुर्वी ची तयारी पूर्णत्वाला येत आहे. ह्यात कोणीही मनुष्य नसेल व साडेचार तासात यान पुन्हा पृथ्वी वर आणले जाईल.

वीस हजार फुटांवरून हे यान पृथ्वीच्या कक्षेत परत येताना प्रचंड उर्जा उत्पन्न होइल. अगदी शेवटी एक प्याराशुट उघडून यानाला प्यासिफिक महासागरात उतरवले जाईल. त्याचा हा युट्युब वरचा व्हिडीओ.


रविवार ९ मार्गशीर्षशुक्लपक्ष

                               ॐ                       कोल्हापुर
                                                         30.11 ( नोव्हेंबर ) 2014
                                                                   रविवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० -७१ इसवी सन २०१४ – १५
दक्षिणायन हेमंत ऋतु नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग हर्षण वज्र करण बालव
चंद्र राशिप्रवेश नं . मीन कल्पादि रविवार ९
           मार्गशीर्ष शुक्लपक्ष

फुल खाली पडलेली घरी आणली तांब याचे गंगाळ मध्ये ठेवली
फोटो काढले मस्त घर दिसते फुल गंगाळ आणि स्वत : सर्व मी
केले याचा उच्छाह  मूळे घर सुंदर देखण दिसत

बाकि छान ठिक
                                       वसुधालय

IMG_4466[1] IMG_4469[1]

उकडलेले अंड

                                    ॐ                   कोल्हापुर
                                                    30 . 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                                                   रविवार         

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

उकडलेले अंड

पाच ५ / 5 रुपये ला एक अंड आणले पातल्यत भरपूर पाणि घातले
त्यात अंड ठेवले गयास पेटवून पातले ठेवले भरपूर उकळू दिले
गार करण्यास ठेवले साल काढले छोट्या ताट मध्ये ठेवले दोन भाग
उलथने यानि केले sos घातला मस्त गरम गरम sos बरोबर
पिवळा बलक सह उकडलेले अंड खाल्ले

नोव्हेंबर महिना थोडी थंडी आहे नऊ 9 / ९ उन्ह मध्ये फिरून आले कि खाते
छान पोट भारत ताकद येते
दुपारी बारा वाजता जेवण

बाकि छान ठिक
                                                वसुधालय

IMG_4474[1] IMG_2906[1]

IMG_4475[1] IMG_2965[2]

वसुधालय ब्लॉग पोस्ट २. १४२ / 2,142

                                ॐ                  कोल्हापुर
                                                30 .11 ( नोव्हेंबर ) 2014
                                                       रविवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

वसुधालय ब्लॉग पोस्ट २. १४२ / 2,142

दोन एकशे बेचाळीस वां होत आहे

भेटी 227,857 / २२७,८५७
दोन लाख सत्ताविस हजार ,आठशे सत्तावन्न

आपण सर्वजन ब्लॉग वाचन करता मी आभारी आहे
खर तर आणि ब्लॉग वाचन व्हावयाला पाहिजे
तरीपण जे वाचतात त्यांना धंयवाद !धन्यवाद !

मिखुप खुश आहे एवढे लिखाण रांगोळ्या कागद कालाकृती
पाककृती तीच ती असली तरी परत करणे लिहिणे काम आहे

अभिनंदन !अभिनन्दन !
            बाकि ठिक छान
                                                वसुधालय

दहीवडे

                                      ॐ                         कोल्हापुर
                                                             30. 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                                                  रविवार
    ब्लॉग वाचक यांना नमस्कार
         विनंति विशेष

दही वडे

उडीद डाळ रात्र भर भिजत टाकली सकाळी मिक्सर मधून बारीक केली
पाणी काढून . गरम तेल घातले हळद मीठ लाल तिखट घातले
मस्त हलविले चमच्याने तापलेले गरम तेल मध्ये तळून काढले
काही वाडे दही मीठ मध्ये घातले तिखट साखर घातली नाही

मस्त गरम तेल मुले व नुसती उडीद डाळ मुले वाडे कुरकुरीत झाले

बाकि छान ठिक
                                वसुधालय

IMG_4489[1] IMG_4484[1]

IMG_4493[1] IMG_4490[2]

मुग तांदुळ खिचडी

                     ॐ              कोल्हापुर
                                     30 . 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                     रविवार

राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष

मुग तांदुळ खिचडी

अर्धी वाटी तांदूळ एक वाटी मुग डाळ घेतले
जवस चटणी तिळ चटणी दोन दोन चमचे मीठ अर्धा चमचा
दोन लाल मिरच्या देठ सगट थोड लाल तिखट जीर तेल मोहरी

ग्यास पेटवून कुकर ठेवला तेल मोहरी जिरे ची फोडणी केली
धुतलेले तांदूळ मुग डाळ घातले सर्व मसाला घातला
चार वाट्या पाणी घातले कुकर झाकण लावले शिट्टी लावली ४ / ५ शिट्ट्या
दिल्या ग्यास बंद केला मस्त तांदूळ मुग खिचडी तयार झाली

पातेले मध्ये काढून सादुक तूप घातले मस्त खाल्ली खर पापड असतो
राहिला असो

बाकि छान ठिक
                                         वसुधालय

 

IMG_4099[1] IMG_4100[1]

IMG_4101[1] IMG_4102[1]

प्रकाशाची…

 

माझ्याकडॆ ओंजळभर प्रकाश आहे….
पुर्वसुरींनी दिलेला
माझ्या बोटांतून तो निसटण्याआत….
तुम्ही हातात घ्या….
पुढे द्या…
सर्वांनाच प्रकाशाची…
क्षणमात्र का होईना…
पण गरज आहे…!

पाक मधील पुऱ्या

                                             ॐ             कोल्हापुर
                                                           29 . 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                                                 शनिवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

पाक मधील पुऱ्या

तेल मीठ घालून पाणी मध्ये कणिक भिजविली घट्ट भिजविली
छोटे छोटे लाट्या केल्या पाच केल्या ग्यास पेटवून तेल कढई
तापाविलेल्यात टाळून पुऱ्या तळून काढल्या
एका ग्यास वर पाणी साखर याचा पाक केला त्यात तळलेल्या पुऱ्या
घातल्या
मस्त चांदी च्या ताट मध्ये ठेवल्या राहिलेला पाक पुरीत घातला
मस्त गोड पुऱ्या गरम गरम च खाल्या मी
मस्त चव आली यम यमा

बाकि ठिक छान
                                            वसुधालय

IMG_4472[1] IMG_3594[3]

शनैश्चरम्

                      ॐ           कोल्हापुर
                                 29. 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                         शनिवार

शुभ प्रभात शुभ दिवस

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – नमामि ७१ इसवी सन २०१४-१५
दक्षिणायन हेमंत ऋतु नक्षत्र शततारा योग व्याघात करण विष्टि
चंद्र राशिप्रवेश कुंभ दुर्गाष्टमी दग्ध २६।२६नं ,भद्रा १५।३६प
शनिवार ८
                       मार्गशीर्ष   शुक्लपक्ष
                      ॐ
निलांजन समाभांस रविपुत्र यमाग्रजम् |
चायामार्तंड संभूतं तं शनैश्चरम् ||

बाकि छान ठिक ठीक 
                                    वसुधालय

 

तांदुळ याचा महादेव

                      ॐ                         कोल्हापुर
                                             29. 11 ( नोव्हेंबर ) 2014

राजमान्य राजश्री नमस्कार

तांदुळ याचा महादेव

आपण रोज भात खातो पण महादेव करित नाही
श्रावण महिना मध्ये शिव मुठ  साठी थोडे तांदूळ वापरतात
मी तांदूळ चांदी चे ताट मध्ये घातले ठेवले महादेव चा  आकार दिला
काळा दगड ओटा यात तांदूळ पसरून हाताने बोट
यांनी महादेव तयार केला किती छान कल्पना आहे हल्ली निवडणे कमी
आहे सर्व  बाजार मध्ये निवडून मिळते ताट परात सूप वापरणे कमी आहे साठी
मी असे महादेव करून धान्य धान्य पसरविते घरभर राहते

बाकि छान ठिक

                               वसुधालय

IMG_4096[1] IMG_4098[1]

IMG_4065[1] IMG_4035[1]

दळण आणि वळण!

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. फडणविसांचा मुख्यमंत्रीपदासाठी समारंभपूर्वक शपथविधी झाला. फडणवीस सरकारचा विश्वासनिदर्शक ठरावही संमत झाला. विरोधी पक्षनेतेपदाची माळही शिवसेना नेते एकनाथ शिंदे ह्यांच्या गळ्यात पडली. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. राज्यपालांचे रीतसर अभिभाषण झाले. आणि फडणविसांचा राज्यकारभार सुरू झाला. आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. तत्पूर्वी आणखी दहा मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचा बातम्याही प्रसृत झाल्या! विधानसभेच्या एकूण जागांपैकी निम्म्या निम्म्या जागा पाहिजे तरच युती अन्यथा स्वबळावर निवडणूक ह्या हुद्द्यावरून थांबलेल्या वाटाघाटी आता मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही ह्यावरून सुरू झाल्या. त्या थांबल्या. आता घाम पुसून पुन्हा वाटाघाटींचे जाते फिरवायला सुरुवात झाली! जाते फिरू लागले तरी पीठ पडणार की नाही हे जाते फिरवणा-या दोघांपैकी कोणालाच माहीत नाही! नवी ओवी मात्र जरूर ऐकायला मिळेल! 
देवेंद्र फडणवीस मात्र ह्या वाटाघाटीत सामील झालेले नाहीत. जसे नाना फडणीसांना बखरकार अर्धा शहाणा समजून चालले तसे देवेंद्र फडणविसांनाही  भाजपा नेतृत्व अर्धा शहाणा समजत असावेत.  हा सगळा प्रकार पाहिला तर शर्थीने राज्य राखणारा नाना फडणीस पुन्हा अवतरला तर तोही चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाही! शिवसेना राजरोसपणे विरोधी पक्षात बसलेली. राज्यातल्या भीषण दुष्काळाविरूद्ध उद्धव ठाकरे ह्यांनी आवाज उठवला; इतकेच नव्हे तर राज्यपालांना भेटून शिवसेना नेते ह्या नात्याने राज्यपालांना दुष्काळी परिस्थिती निपटण्याचा आदेश सरकारला देण्यविषयी विनंती करणारे निवेदन दिले. ह्या सा-या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातले मंत्री चंद्रकांत पाटील ह्या दोघा नेत्यांना मातोश्रीवर भाजपापने पाठवून दिले आहे. हा भाजपाचा चिव्वट आशावाद की सरकार वाचवण्यापुरता तरी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याची भाजपाची खटपट?
शिवसेनेच्या अटी मान्य करणे ह्याचा अर्थ जी मंत्रिपदे मागितली जातील ती शिवसेनेला देणे हे भाजपा उमगून आहे. 1 डिसेंबर  रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मंत्रिमंडळाचे बौद्धिक घेतले जाणार आहे. ह्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे मन वळवण्याचा प्रयत्न करून करून पाहा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून देण्यात आलेला असू शकतो. शिवसेनेकडून मंत्रिमंडळात सामील होण्यास अनुकूलता दिसली तर फडणवीस सरकार येत्या नागपूर विधानसभेत आकस्मिक कोसळण्याचे संकट टळू शकेल हे उघड आहे. सगळे मानापमान, रुसवेफुगवे बाजूला सारून प्रसंगी नमते घ्या असा आदेश धर्मेंद्र आणि पाटील ह्या दोघांना देण्यात आला असावा. वाटाघाटी पुढे रेटण्याच्या दृष्टीने प्रसंगी नमते घ्या माघारनृत्याची भाजपाला गरज आहे.
सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणविसांना पुरेसे बहुमत नव्हते तेव्हा आवाजी मतदानाची क्लृप्ती योजून विश्वासनिदर्शक ठराव तर संमत करून घेण्यात आला. पण ह्या ठरावाची संजीवनी फार काळ पुरणार नाही हे आता भाजपा नेत्यांच्या लक्षात आले आहे. नव्हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या लक्षात आणून दिलेही आहे. विश्वासनिदर्शक ठराव्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ होता, असे अलिबाग शिबिरात सांगण्यात आले. राष्ट्रवादीचा हा खुलासा शरद पवारांच्या नमुनेदार रणनीतीत चपखल बसणारा आहे. अर्थात विश्वासनिदर्शक ठराव मतास टाकण्यात आला असता तर राष्ट्रवादी काँग्रेसने नेमकी कोणती भूमिका घेतली असती हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कदाचित सरकार वाचवण्यासाठी त्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केलेही असते. किंवा सभात्याग केला असता.  बिनशर्त पाठिंबा ह्याचा अर्थ असा की प्रत्येक वेळी न मागता पाठिंबा असा नाही. औपचारिक विनंतीखेरीज पाठिंबा नाही असा त्याचा खरा अर्थ आहे हे भाजपा नेते ओळखून आहेत.
शिवसेना हा महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा म्हणण्यापेक्षा भाजपा सरकारचा उघड शत्रू आहे. शिवाय एकनाथ खडसे आणि मुनगंडीवार हे देवेंद्र फडणवीस सरकारचे त्यांच्याच सरकारमध्ये दोन नैसर्गिक शत्रू आहेत. देवेंद्र फडणविसांची नेतेपदासाठी निवड होण्यापूर्वी नितीन गडकरींनी नेतेपदासाठी त्यांचे घोडे दामटले होते. परंतु देवेंद्र फडणविसांना संघप्रमुख मोहन भागवत ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि नरेंद्र मोदींचीही अनुकूलता लाभली. हे चित्र पाहून नितीन गडकरींनी हुशारीपूर्वक नेतेपदाच्या निवडणुकीतून पाय काढून घेतला. अर्थात गडकरी स्वस्थ बसणा-यातले नाही. मुनगंटीवारांचे नाव पुढे येण्यामागे नितीन गडकरींचा ब्रेन असू शकतो. एकनाथ खडसेंना महसूल खाते देण्यात आल्यामुळे तूर्तास तरी देवेंद्र फडणविसांच्या मार्गातले अडथळे मोकळे झाले हे त्यांचे सुदैव!
अजूनही फडणविसांच्या मार्गातले अडथळे संपूर्णपणे संपलेले नाहीत. अमित शहांची धोंड अजून आहे! हाही अडथळा दूर करणे संघाला सहज शक्य आहे. निदान तसे चित्र सकृतदर्शनी दिसत आहे. हरयाणात बहुमत मिळाले तरी ते महाराष्ट्रात मिळालेले नाही. झारखंड, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपाच्या ताटात काय वाढून ठेवलेले असेल हे कोणालाच माहीत नाही. भाजपाच्या नशिबाने प्रतिकूल चित्र निर्माण झाल्यास भाजपाचा ताकद निश्तितपणे कमी झालेली असेल. फडणविसांच्या सुदैवाने नागपूर अधिवेशन अजून लांब आहे. पण ते तितके लांब नाही. देवेंद्र फडणविसांना नागपूर अधिवेशनात निसरड्या फर्शीवरून  चालण्याचा प्रसंग आला तर काय? आधीच फडणवीस सरकार राजकारणामुळे पीडित आहे. शिवसेनेला वठणीवर आणले अशी शेखी अमित शहा मिरवत शकत नाही हे खरे. परंतु अमित शहांना जे लोकसभा निवडणुकीत जमले ते त्यांना विधानसभा निवडणुकीत जमले नाही. ही राजकीय वस्तुस्थिती भाजपाला उमगलेली नाही असे नाही. उमगूनही आता त्याचा उपयोग नाही. बॉल इज नाऊ इन उद्धवस् कोर्ट!  
शिवसेना मंत्रिमंडळात सामील झाली तरी आणि न झाली तरीही शिवसेनेचे राजकीय वजन वाढवणार आहे. भाजपाधार्जिण्या मिडियाने शिवसेनेची यथेच्छ बदनामी केली. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या तशा त्या शिवसेनेच्याही वाढल्या हे कसे नाकारणार? भाजपाला मिळालेल्या जास्तीच्या जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्यांच्या कापल्या गेल्या हे वास्तव आहे. राष्ट्रीय पक्ष स्वतःला फार मातब्बर समजतात. परंतु राज्यात त्यांना निरंकुश सत्तामिळवता आलेली नाही, मग तो काँग्रेस पक्ष असो वा भाजपा! प्रादेशिक पक्षांची क्तीही हेटाळणी केली तरी त्यांना गृहीत धरता येत नाही. तमिळनाडू, पश्चिम बंगाल आ ओडिशा ह्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्षाची पकड घट्ट होत चालली आहे. ह्या अर्थाने शिवसेनेकडे पाहिले तर भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाला शिवसेनेने दणका दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचे वळण निश्चितपणे बदलणार असे चित्र समोर आले आहे.

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक लोकसत्ता

चंद्रकोर

                          ॐ          कोल्हापुर
                                   28. 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                      शुक्रवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
चंद्रकोर

दिनांक २७,नोव्हेंबर २०१४ ला आकाश स्वच्छ होत मी
चंद्र चंद्रकोर चा फोटो घेतला आहे सध्या पौर्णिमा येई पर्यंत
छान चंद्रकोर दिसेल बघू मला किती फोटो चंद्रकोर चे मिळतात ते

बाकि ठिक छान
                                              वसुधालय

 

IMG_4470[1] IMG_4325[2]

IMG_4399[2]IMG_4320[1]

मुग डाळ याचा महादेव

                              ॐ                       कोल्हापुर
                                              28. 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                                       शुक्रवार
राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष

मुग डाळ याचा महादेव
पावशेर मुग डाळ आणली चांदी चे ताट मध्ये ठेवली
महादेव चा आकार आकार दिला परत काळा ओटा वर
पसरून महादेव हाताने केला
वेळ व धान्य पसरणे घर भर राहणे साठी ब्लॉग साठी
सर्व  करीत आहे

बाकि छान ठिक
                                    वसुधालय

 

IMG_4094[1] IMG_4095[1]

IMG_4063[3] IMG_4092[3]