प्रिय ऑर्कुट..

प्रिय ऑर्कुट,

आज हा आपला अखेरचा संवाद.
मला आठवतंय, माझी तुझी ओळख ताईमुळे झाली आणि तुझ्यामुळे मला एक नवीन ओळख मिळाली. नवी कसली, जी काही आहे ती ओळख तुझ्यामुळेच मिळाली.
कुठे मालवाहतुकीचा नीरस, रुक्ष आणि खोटा किरकोळ धंदा करणारा मी एक व्यावसायिक, जो ड्रायव्हर, क्लीनर, हमाल, भंगारवाले वगैरे अभिरुचीहीन लोकांच्यात स्वत:चे परग्रहवासीपण समजुनही मन रमवायचा आटोकाट प्रयत्न करत होता आणि कुठे तुझ्यामुळे मला

कुंपण

झोपताना काही लोकांना एक ‘कंफर्टेबल पोझिशन’ सापडेपर्यंत झोप येत नाही. आणि ही सापडली की क्षणभर स्वर्गसुखाचा आभास होतो. झोपण्याची स्थिती शोधणं सोपं आहे, पण ‘डावे की उजवे’, ‘सोशलिस्ट की कम्युनिस्ट’,’आरडी की रहमान’, ‘लता की आशा’, ‘अ‍ॅपल की विंडोज की लिनक्स’ असे प्रश्न सतत समोर असताना ‘कंफर्टेबल पोझिशन’ कठीण असतंच, शिवाय गोची अशी की एकदा तुम्ही एक पोझिशन घेतली की सतत तिच्या बचावार्थ तयारीत राहावं लागतं. एकदा तुमची पोझिशन कळली की विरोधक प्रत्येक मुद्द्याचा कीस काढून ती कशी चूक आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. मग एकदा एका पोझिशनला आपलं म्हटलं की तुमचा इगो त्याबरोबर जोडला जातो त्यामुळे प्रत्येक वेळी तिच्या विरुद्ध मुद्दा आला की थेट तुमच्या इगोलाच धक्का पोचतो आणि लोक आक्रमक होतात.

यावर उपाय काय? उपाय म्हटलं तर सोपा आहे पण सुरुवातीला स्वीकारायला कठीण जाऊ शकतो. पण जर स्वीकारला तर सवय झाल्यावर हे सगळे वाद व्यर्थ वाटायला लागतात आणि लोक यात इतका वेळ का घालवतात असा प्रश्न पडतो. उपाय आहे – कुंपणावर बसणे. गेल्या अनेक वर्षांत प्रत्येक राजकीय पक्षाने जे गोंधळ घातले आहेत ते पाहून हा उपाय सुचला. याचा अर्थ असा – कोणत्याही पक्षाला, विचारसरणीला, व्यक्तीला पूर्ण (आणि आंधळं) समर्थन न देता त्या-त्या परिस्थितीत योग्य वाटेल तो विचार करून तात्पुरतं समर्थन देणे. काही लोकांना हे पटणार नाही – विशेषतः तत्त्वाला पक्के वगैरे असतात त्यांना. पण थोडा विचार केला तर असं लक्षात येतं की यात तात्पुरता संधीसाधूपणा वाटला तरी दीर्घकालीन तत्त्वनिष्ठपणा असू शकतो.

हे फार अ‍ॅबस्ट्रॅक्ट झालं, उदाहरणे दिली तर सोपं होईल. नुकतंच राजू भारतन यांचं ‘अ जर्नी डाउन मेलडी लेन’ हे पुस्तक वाचलं. हिंदी चित्रपट संगीतातील प्रमुख व्यक्तींवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन आहे. गेली अनेक दशके पत्रकार म्हणून काम करताना भारतन यांनी ओ पी नय्यरपासून आरडीपर्यंत सगळ्यांच्या सहवासात काम केलं आहे. अनेक वेळा गाणं तयार होत असताना ते हजर होते, या सर्वांची त्यांना जवळून ओळख आहे. त्यामुळे हे लेख वाचताना आपल्या दिवाळी अंकात नेहमी येणारे स्तुतिपर लेख खर्‍या परिस्थितीपासून किती दूर आहेत याचा प्रत्यय येतो.

मराठी माणसाचे काही ‘सॉफ्ट कॉर्नर’ आहेत. काही नावांचा उच्चार जरी केला तरी ‘डोळ्यात टचकन पाणी’ वगैरे येतं. लता, आशा, सचिन ही यातली काही नावं. या नावांचं कर्तृत्व मोठं आहे हे कुणी सांगायची गरज नाही, पण ते कर्तृत्व साजरं करताना मराठी माणूस स्वतःला इतका झोकून देतो की ती व्यक्ती माणूस आहे याचाच विसर पडतो. आपल्याकडचे नेहमीचेच यशस्वी गोड मुलाखतकार आणि त्यांनी घेतलेल्या अतिगोड मुलाखती बघितल्या तर असं लक्षात येतं की मराठी भाषेत या कलाकारांचं परखडपणे मूल्यमापन फारसं झालेलंच नाही. प्रत्येक मुलाखतीत भरपूर नॉस्टाल्जिया, मोठ्या नावांच्या आठवणी याशिवाय फारसं काही नसतं, झालंच तर आशाताईंच्या आवडत्या पाककृती वगैरे. हे ‘गुण गाईन आवडी’ एका मर्यादेपर्यंत ठीक असतं पण नंतर असह्य व्हायला लागतं. याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपला आवडता कलाकार त्याच्या कारकीर्दीत माणूस म्हणून वागला हे त्याच्या भक्तांना पटायला तयार नसतं. भारतन यांनी इंग्रजीत परखडपणे लिहिलं तरी ‘चंदेरी’साठी जेव्हा त्यांनी मंगेशकरांवर लिहिलं तेव्हा ते स्तुतिपर होतं कारण मराठी वाचकांना हेच आवडतं असं त्यांना सांगण्यात आलं. मग ‘ऐ मेरे वतन के लोगों’ आधी आशा आणि लता दोघी गाणार होत्या पण नंतर सरकारी हस्तक्षेप आणि लताबाईंचा आग्रह यामुळे आशाला डावलण्यात आलं किंवा ‘बिनाका गीतमाले’त आपलं गाणं यावं (किंवा फिल्मफेअर पुरस्कार मिळावा) यासाठी तेव्हाच्या संगीतकारांनी किती राजकारणं केली यासारख्या गोष्टी बाहेर येत नाहीत किंवा आल्या तरी त्यांची चर्चा होत नाही. हे फक्त आवडत्या कलाकारांच्या बाबतीतच होतं असं नाही. दर वर्षी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी अनेक गौरवपर लेख येतात पण १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये चव्हाणांसकट सर्व नेते मान खाली घालून गप्प होते हे कुठेही लिहिलं जात नाही. त्यासाठी कुलदीप नय्यर यांचं ‘बियाँड द लाइन्स’ वाचावं लागतं. महाराष्ट्रात सिंहाची छाती असणारे नेते दिल्लीत गरीब गोगलगाय होतात हे बोलून दाखवलेलं कुणालाही आवडत नाही.

मराठी माणसाला नोस्टाल्जिया आवडतो हे अर्धसत्य आहे. याबरोबरच त्याला ‘सिलेक्टिव्ह अम्निशिया’चाही रोग आहे असं वाटतं. गेली एक्-दोन वर्षे मी सातत्याने आणीबाणीविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. यात कुलदीप नय्यर, नानी पालखीवाला यासारख्या लोकांनी उत्तम नोंदी ठेवल्या आहेत. मात्र मराठी भाषेत या विषयावर अत्यंत तुटपुंजी माहिती मिळते. आपली वर्तमानपत्रे, मासिके दर २६ जानेवारीला तेच ते चर्वितचर्वण करतात पण १९७५ साली याच प्रजासत्ताकाची काय परिस्थिती होती हे कुणालाही आठवत नाही. सामान्य लोकांच्या आठवणीतूनही हा भाग विसरला गेला आहे असं वाटतं. मुक्तपीठात ६३ साली खांसाहेबांचा षड्ज कसा लागला होता हे आठवतं पण ७५ मध्ये कशी मुस्कटदाबी झाली याची कुणालाही आठवण काढावीशी वाटत नाही.

हे थोडं विषयांतर झालं पण मुद्दा हा की कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीकडे शक्यतो पूर्वग्रहरहित नजरेनं बघितलं तर गोष्टी बर्‍याच सोप्या होतात. मग नेहरू वाइट असं म्हणण्यापेक्षा त्यांनी आयआयटीपासून इस्रोपर्यंत अनेक सुधारणा केल्या पण परराष्ट्र धोरण आणि विशेषतः काश्मीर आणि चीन प्रश्नांची अत्यंत बेजबाबदारपणे हाताळणी केली असं म्हणायला सोपं जातं. किंवा ताजं उदाहरण म्हणजे मोदी यांची अमेरिका यात्रा. हे शक्तीप्रदर्शन आहे हे उघड आहे, कार्यक्रमात ‘स्टार वॉर्स’सारखे कोट्स भोंगळ वाटतात हे खरं आहे पण याला दुसरी बाजूही आहे. (ओबामा साधा बर्गर खातानाही ‘अमेरिका यंव, अमेरिका त्यंव’ करतात, थोडं आपल्या पंतप्रधानांनी ‘शायनिंग’ केलं तर काय बिघडलं?) आंतरराष्ट्रीय बाजारात आपली पत गेल्या चार महिन्यात वाढली आहे. शेवटी तत्त्व वगैरे बोलायला कितीही छान असली तरी आर्थिक पत सर्वात प्रभावी आहे हे कटू असलं तरी सत्य आहे. मोदी विरोधकांची एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे विरोधासाठी विरोध. मोदींच्या १०० दिवसांच्या कारकीर्दीवर प्रखर टीका करायला अजिबात हरकत नाही पण मग तेच नियम गेल्या दहा वर्षांच्या मनमोहन सिंगांच्या कारकीर्दीलाही लावावेत. कट्टर डावे कधीही काँग्रेसवर अशी टीका करताना दिसत नाहीत – ‘कोलगेट’पासून वध्रापर्यंत कोणत्याही विषयावर. मोदी आले म्हणजे कॉर्पोरेटचं राज्य येईल असं म्हणणारे स्वतः कॉर्पोरेट जगापासून किती लांब असतात? आयफोन किंवा सामसुंग यांच्या फॅक्टरीमधील कामगारांना दिल्या जाणार्‍या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ किती लोक या उत्पादनांवर बहिष्कार घालतात? किंवा ओबामांच्या परराष्ट्र धोरणावर किती लोक टीका करतात? सगळेच लोक सोयीचं असेल तेव्हा आपल्या तत्त्वांना मुरड घालत असतात.

व्यक्तिशः मलातरी आतापर्यंत मोदींच्या विरोधात जावं असा एकही निर्णय दिसलेला नाही. मोदींची शैली ‘ऑटोक्रॅटीक’ आहे असं म्हणणार्‍यांना सोनिया गांधींची शैली लोकशाहीधार्जिणी वाटते का? (कॉग्रेस समर्थकांनी लोकशाहीविषयी बोलावं याहून मोठा विनोद नसेल.) इतिहास अभ्यासक्रमात बदल ही बाब गंभीर आहे हे मान्य पण इथे एक विनोदी मुद्दा असा की योग्य इतिहास शिकवूनही मोदी समर्थक इतिहासाचे तारे तोडतच असतात त्यामुळे पाठ्यपुस्तकात जे शिकवलं जातं त्यावर लोक कितपत अवलंबून राहतात हा प्रश्नच आहे. (सुशिक्षित लोकही ‘क्लायमेट चेंज’ नाकारतात तेव्हाही हेच दिसतं.) मोदी यांच्या जागी राहुल किंवा केजरीवाल असते तर काय झालं असतं याची कल्पना करा. स्वच्छ रस्ते, स्वच्छ नद्या याला कुणाचाही विरोध असेल असं वाटत नाही.

कुंपणावर बसण्याचा हा फायदा असतो – मोदींमुळे प्रगती झाली तर त्यांची स्तुती करायला जड जात नाही. आणि उद्या त्यांनी रथयात्रा काढली तर निषेध करणारा लेख लिहायलाही अवघड जाणार नाही. माझ्या मते सर्वात चांगली गोष्ट ही की सर्व विरोधाला न जुमानता मनमोहन सिंगांनी मंगळयानाला हिरवा कंदील दाखवला आणि मोदी यांनी पाठिंबा दिला. इस्रोसारख्या संस्था हे आपलं खरं यश आहे.

—-

१. “When I went to meet Y. B. Chavan and Jagjivan Ram at their homes on 26 June, I found intelligence officials noting down their car registration numbers and names of people coming to visit them. Chavan was afraid to meet me and Jagjivan Ram, who met me for a minute, looked nervous.” Beyond the Lines, pp. 226.

अंगामी योध्ये

ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख :  

आसाम-मणिपुरमध्ये चहाच्या बागांमधल्या उत्पादनाकडे तत्कालीन
ब्रिटीश सरकारचं लक्ष गेलं तेव्हा त्यानी तो भाग आपल्या अधिपत्याखाली घेण्याचं
ठरवलं. सुनियोजित आराखडा आणि सैनिकी बळ यांचा वापर करून तो भाग आपल्या अधिकारात
येईल आणि स्थानिक जनतेला चहाच्या मळ्यात कामगार म्हणून राबवता येईल हा ब्रिटीशांचा
मानस मात्र इथे सहज यशस्वी झाला नाही. या सर्वाला कारण होते

काकडी ची कोशींबीर

                       ॐ

काकडी ची कोशींबीर

पाचं / ५ / 5 रुपये ला एक काकडी आणली धुतली
साल काढले सुरीने पोळ पाट वर जाड सर चिरले डबा मध्ये भरले
आलं किसल काकडीत घातले दही शेंगदाणे भाजलेले कूट घातला
मीठ घातले तेल मोहरी ची फोडणी दिली हळद घातली सर एकत्र केले
मस्त चं काकडी कोशिंबीर तार केली जेवतांना खाल्ली जाईल .

IMG_3299[1] IMG_3306[1]

IMG_3307[1] IMG_3124[1]

ईशान्य राज्यातील पर्यटन समज – गैरसमज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर
संसदेत भाषण करताना ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असा आग्रह धरला. भारतात
असलेल्या तीस हजार महाविद्यालयातून दरवर्षी शंभर विद्यार्थी जरी पुर्वांचलाच्या
सफरीवर गेले तरी तीथल्या पर्यटनात खुपच वाढ होईल आणि त्या रांज्यांमधील जनतेला
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची मदत अशा पर्यटनातून घडेल यावर पंतप्रधानांनी सभागृहाचं
लक्ष वेधलं. केंद्र सरकार

पंचमी जयनाम १९३६=२०१४

                                                  ॐ                                   

                                                    

                                                  ॐ                                  
 
                   पुढारी दिनांक  तारिख Date २९ . ९ ( सप्टेंबर ) २०१४                                       

                                        वर सोमवार                                                                          

                                                ओम ॐ                                                     

                           स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जय नाम संवत्सर                                  

                               दक्षिणायन शरद ऋतु ५ पंचमी सोमवार                                                   

                                पंचरात्रोछवारंभ                                                       

                                      आश्र्विन शुक्लपक्ष                                              
                         

पुढारी दिनांक२९सप्टेंबर २०१४

                                     ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
सोम पंचमी ललिता पंचमी आश्र्विन शुक्लपक्ष
तसेच
पुढारी  दिनांक तारिख Date दिनांक २९  .   ९ (सप्टेंबर ) २०१४

IMG_3465[1] IMG_3466[1]

IMG_3462[1] IMG_3461[1]

पालक भाजी टम्याटो तुरडाळ

               ॐ

पालक भाजी टम्याटो भाजी तुरडाळ

पालक भाजी १५ / पंधरा रुपये / 15 रुपये ला आणली पोळपाट मध्ये सुरिने चिरली
धुतली टम्याटो 2  दोन चिरले पातेल्यात तुरडाळ घेतली पालक व टम्याटो चिरलेले
घातले कुकर पाणी घालुन शिजविण्यास ठेवले चार पाच ५ शिट्टी दिल्या
गार करून कुकर झाकण काढले लोखंडी कढई त तेल मोहरी फोडणी केली
त्यात शिजलेले पालक तुरडाळ टमाटो घातले तिखट मीठ हळद शिजत असतांना घातलेली
सर्व छान उकळू दिले
पोळी कुस्करून त्यात पालक तुरडाळ भाजी घातली चमचा भर सादुक तूप घातले देव यांना दिले
मी चमचाने सर्व खाल्ले मस्त पोट भरलं

IMG_3269[1] IMG_3270[1]

IMG_3272[1] IMG_3287[1]

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

                                     ॐ
                      – ओम् श्रीअरविंद मीरा –              दिनांक
                                                              १७  – ९ – २०१४
          माननीय पंतप्रधान – श्री नरेंद्र मोदी – सादर प्रणाम
१७ सप्टेंबर आपला – जन्म – दिवस – या शुभ समयी आपले
सहर्ष हार्दिक अभिनंदन . अनेक शुभेच्छा .

निवडणुकी नंतर – आपला विजय झाला त्यावेळे पासून
आपल्याला पत्र लिहिण्याची इच्छा होती पण वेळ किंवा
  मुहूर्त आला तो आपल्या जन्म दिनी .

मी pondicheery येथे राहणारी एक सामान्य मामुली व्यक्ती
आहे श्री अरविंद आश्रम याची एक भक्त आहे योगी अरविंद यांच्या
जन्म भारत मातेच्या स्वतंत्र ते साठी झाला हे जगात विख्यात आहे

माझे माझ्या मातृभूमी वर प्रेम आहे अखंड भारतावर प्रेम आहे
आपण एक मोठे कवी आहात मी तुमचे पुस्तक पाहिले आहे
मी पण छोट्या मोठ्या कविता करते

माझा देश सारा माझा अखमद भारत प्यारा
जेथे ठेवीन पाय मी तेथे माझी माती
जेथे घेईन पाणी ओंजळीत अर्धे तेथे हाती
भटकत जाईन दाही दिशांना माळराना सारा
माझा देश सारा माझा अखंड भारत प्यारा

आपण एक अनोखी व्यक्ती आहात आपल्या सारखा
सुपुत्र प्राप्त झाल्या बद्दल आपली जन्मदात्री आई
धन्य झाली आहे आणि भारत माता  प्रसन्न जाली आहे
राम अवताराने – रामाने समाजाला खूप खूप दिलेले आहे
नायक किंवा नेता प्रजाव छल असावा . जनसमुहाला एकत्र घेऊन –
एकात्म होवून चालणारा असावा आपण हे गुण घेऊन चं जन्माला
आलेले आहात आपला सदैव विजय च असो हीच माझी शुभकामनाय –
शुभ जन्म दिनी पुन : एकदा निनम्र हार्दिक अभिनंदन

विनम्र – सौ सुनीती रे . देशपांडे
१७. ९. २०१४

IMG_3463[1] IMG_3464[1]

व्हॉटॅन आयड्या सर्जी!

स्थळ : बारमधला एक निवांत कोपरा
वेळ : निवडणूकीतल्या रात्रीची
चार-पाच विविध पक्षांचे कार्यकर्ते बारमध्ये एकाच टेबलवर बसून घोटासह चकण्याचा मजा घेत गप्पा मारण्यात मग्न.
पहिला : काय बी म्हना राव, पन ह्या…

पुढे अधिक वाचा… >>

चोकलांगन – एक अस्पर्श गाव

ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख : 

तिथे जायला गाडी रस्ता आहे पण तो नावालाच. पस्तीस किलोमीटर
गाडीरस्ता पार करायला तीन-साडेतीन तास लागतात. 
जवळच्या नोकलॅक या शहरवजा खेड्याला जोडणारा हा रस्ता तयार झाला तोच मुळी 2010
साली. अगोदर हाच पल्ला पार करायला नवू दहा तास लागायचे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं
आणि ब्रम्हदेशाला (म्यानमार) लागून असलेलं हे गाव म्हणजे चोकलांगन. एका अर्थाने
बाहेरच्या जगाचा

पुढारी 28 . 9 ( सप्टेंबर ) 2014

                                               ॐ                                                     

                               पुढारी 28 . 9 ( सप्टेंबर ) 2014                                    

                                          ॐ                                                                                     

                          स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६जयनाम संवत्सर    

                               दक्षिणायन शरद ऋतु वार रविवार ४विनायकी  चतुर्थी                            

                                      आश्र्विन शुक्लपक्ष                                                 

                               तसेच दिनांक तारिख Date २८. ९ ( सप्टेंबर ) २०१४                             

                                               वार रविवार                                                                                            

                                               ॐ                                                    

                               पुढारी 28 . 9 ( सप्टेंबर ) 2014                                   

                                          ॐ                                                                                    
                          स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६जयनाम संवत्सर   
                         
                               दक्षिणायन शरद ऋतु वार रविवार ४विनायकी  चतुर्थी                           

                                      आश्र्विन शुक्लपक्ष                                                
 
                               तसेच दिनांक तारिख Date २८. ९ ( सप्टेंबर ) २०१४                            

                                               वार रविवार                                                                                           
                                                                             
 
IMG_3459[1] IMG_3460[1]
IMG_3450[4] IMG_3451[1]

२११. दिसली समद्यांना

आयने हाक मारली, लगीच उटले आज.
शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने.

साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली.
परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले.
गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले.
पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले.

अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी.

गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय. आज तिला कविता म्हणायला सांगू.”
म्या पुडं आले, कविता बराबर बोल्ली.
जाग्यावर जाऊन बसली.

मंग रडू यायलं.
गुर्जींना काई समजना.

मंग खाल मानेनं म्या हळू माज्या रिबनीचं फूल ओडलं.
“ओ गुर्जी, आन्जीची नवी रिबन बगा, कसली लाल हाय…” राज्या म्हन्ला.
समदे आले भवती.

कवाधरनं ती दावत व्हते!
दिसली आता समद्यांना!  
* शतशब्दकथा