…. शोध ….

मी शोधत असतो भूतकाळातले संदर्भ मी तपासात असतो वर्तमानातील नोंदी मला खुणावतात उत्खनन न होऊ शकलेल्या कित्तेक वर्षापासून भूगर्भात आपलं,अस्तित्व हरवून आणि रहस्य दडवून असलेल्या वास्तूमाझ्याकडे आशेनं पाहतात विद्रोह मांडू न शकलेल्यामाझ्याच घरातील कित्तेक अबोल वस्तू.तसा मीही शोधतच असतो विसंगतीना सामोरं जाणारं उपेक्षित जगकित्तेक वर्षांपासून पेटून उठण्यासाठी बेमालूमपणेधुमसत राहणाऱ्या काळजातली धग.मला

धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग! 1. धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग!

  भारतात पुरातन काळी जसे धर्म निर्माण झाले तशीच धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानेही निर्माण झाली. म्हणजे धार्मिक कर्मकांडे (मुर्तीपूजा अथवा यज्ञ) यांना डावलत मानवी जीवनाचा चैतन्यवादी आणि जडवादी पद्धतीने विचार करणारे जे तत्वज्ञान निर्माण झाले त्याला आपणे शुद्ध अथवा धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान म्हणू शकतो. या तत्वज्ञानांत प्राचीन मानली गेलेली १२ उपनिषदे, सांख्य-वैशेषिकादि दर्शने आणि लोकायत/बार्हपस्त्य अथवा चार्वाक नावाने ओळखली जाणारी तत्वज्ञाने सामील होतात. अजित केशकंबल, मंस्खली गोशालादि स्वतंत्र विचारवंतही या परंपरेत होऊन गेले. चार्वाक तत्वज्ञान सांख्यांप्रमाणेच निरिश्वरवादी असले तरी पुढील काळात ते मात्र पुर्णतया अव्हेरले गेले…तर बाकीच्या तत्वज्ञानांवर सोयीप्रमाणे अन्य धर्मांनी डल्ला मारला. म्हणजे भारतात पुढे निर्माण झालेल्या धर्मांवर या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तर राहिलाच पण केवळ “आस्तिक” आहेत या समजातून वैदिक धर्मियांनी लोकायत वगळता औपनिषदिक व अन्य दर्शनांतील तत्वज्ञाने आपल्या धर्मग्रंथांचा एक भाग बनवली.

  खरे तर वेदांनी जे विचार सांगितले त्यापेक्षा वेगळेच नव्हे तर वेदविरोधी विचार प्राचीन उपनिषदांत आढळतात. सृष्टीच्या मुळाशी उपनिषदकारांनी एक तत्व कल्पिले व त्या तत्वाला “ब्रह्म” हे नांव दिले. याचा कोणत्याही देवतेशी, वर्णाशी अथवा धर्मसंकल्पनेशी संबंध नाही. ब्रह्म-आत्मा यांचा एकमेकांशी संबंध, पंचमहाभुते, शरीर-मन-ईंद्रिये, नैतिक संकल्पना, माणसाची मरणोत्तर गती, पुनर्जन्मादि संकल्पनांचा तत्वविचार ज्यात केला गेला आहे ती उपनिषदे होत. वेदांनी पुरस्कारिलेली यज्ञीय संस्कृती त्यांनी सर्वस्वी नाकारली असून यज्ञीय कर्मकांडाचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर यज्ञादि कर्मे करणा-या पुरोहितांची रांग ही आंधळ्या माळेप्रमाणे असते असे मुंड्क व कठोपनिषदात म्हटले आहे. वेद हे फुटक्या नांवांप्रमाने आहेत असाही वेदनिषेध उपनिषदांनी केला आहे.

  असे असले तरी औपनिषदिक तत्वज्ञान उच्च दर्जाचे आहे अथवा सुसंगतीने मानवी जीवनविचार करणारे आहे असे नाही. सर्वच उपनिषदे परस्परविरोधांनी आणि आंतरविरोधांनी भरलेली आहेत. असे असले तरी भारतीय तत्वज्ञानाचा उदय उपनिषदांपासून सुरु झाला असे मानता येईल एवढेच पुरावे आपल्याहाती आहेत.

  दर्शनांपैकी सांख्य, वैशेषिक आणि मीमांसा ही तीन दर्शने निरिश्वरवादी आहेत. पण मीमांसा वेद आणि यज्ञ यांना केंद्रीभूत ठेवुनच रचली गेली असल्या त्यांतील तत्वज्ञानाला सर्वस्वी अवैदिक म्हणता येत नाही. पण तिन्ही दर्शने नास्तिक आहेत, ते ईश्वराला अथवा ब्रह्माला निर्मितीकारण मानत नाहीत हे येथे महत्वाचे आहे. सांख्य आणि वैशेषिक तत्वज्ञाने नुसती निरिश्वरवादी आहेत असे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोनाकडून मानव आणि विश्वाकडे पाहनारी ती तत्वज्ञाने आहेत.

  वरील सा-या तत्वपरंपरा भौगोलिक दृष्ट्या एकाच भागात निर्माण झालेल्या नाहीत. एकाच काळात अथवा एकाच कोणत्या समाजानेही त्यांना निर्माण केलेले नाही. उपनिषदांचेच घ्यायचे तर त्यांची रचना जवळपास सहा-सातशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात झाली असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. भुगोलाचे म्हणाल तर गंगेच्या खो-यापासून ते दक्षीणेतील नर्मदेपर्यंत त्यांचा भौगोलिक विस्तार आहे. या प्रदिर्घ काळातील असंख्य ग्रंथ आज अप्राप्य आहेत अथवा कालौघात नष्ट झालेले आहेत. परंतू मानवी जीवन, सृष्टीनिर्मिती आणि त्या सा-याचे मुलकारण तपासत, जीवनाचे गूढ शोधत धर्मनिरपेक्ष वृत्तींनी ही तत्वज्ञाने निर्माण झाली आहेत यात शंका नाही.

  या सर्व तत्वज्ञानांत ख-या अर्थाने प्रखर बुद्धीवादी विचार मांडले असतील तर ते चार्वाक अथवा लोकायतिकांनी. या तत्वज्ञानाचा प्रभाव बुद्धपुर्व काळापासून असल्याचे संकेत बौद्ध वाड:मयात मिळतात. विनयपिटकात बुद्धाने भिक्षूंना लोकायतशास्त्र शिकण्याची बंदी घातली होती असे उल्लेख मिळतात. (भा. सं. कोश आणि “In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India’s Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)) म्हणजे बुद्धकाळापर्यंत लोकायतिक तत्वज्ञानाचा बराच प्रसार झाला होता असे लक्षात येते.

  सत्यशोधन श्रद्धेने होऊ शकनार नाही हा लोकायतिकांचा पहिला सिद्धांत…जो सर्वच विज्ञानांचा मुलाधार आहे. श्रद्धा हे आंधळ्या धार्मिकांचे काम. श्रद्धेने सत्य सापडत नसून ते फक्त बुद्धीवादी तर्कानेच सापडू शकते या मुलाधारावर उभा राहिलेला हा विचार. या विचाराच्या विविध शाखा/आचार्य यांनी मिळुन जे तत्वज्ञान रचले ते लोकायतीक अथवा चार्वाक दर्शन म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने या दर्शनाला सर्वच धर्मियांनी पराकोटीचा विरोध केल्याने ही शाखा पुढे लूप्त झाली आणि ग्रंथही. पण सातव्या शतकातील आदी शंकराचार्यांपर्यंत सूत्रकारांना चार्वाक मताचे खंडण करणे अपरिहार्य झाल्याचे दिसते. यावरून चार्वाकांचा प्रभाव किमान सातव्या शतकापर्यंत भारतात होता असे अंदाजिता येते. या खंडण प्रक्रियेसाठी पुर्वपक्ष म्हणून चार्वाकांची मते घेऊन उत्तरपक्षात त्यांचे खंडण केले जात असे. अशा खंडणप्रक्रियेसाठी म्हणून जेथे जेथे चार्वाकांची मते आली आहेत त्यावरून आज आपल्याला पुर्ण नसला तरी चार्वाक दर्शनाचा अंदाज येतो.

  काय आहे चार्वाक दर्शन?

  चार्वाक दर्शन नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी सुत्ररुपाने आपण हे तत्वज्ञान समजावून घेऊयात.

  १. या दर्शनात धर्माला, पाप-पुण्याच्या संकल्पनांना, परलोकाला स्थान नाही. येथेच जन्म आणि येथेच मृत्य़ु ही यांची धारणा असून “मूळ तोडले असता वृक्ष पुन्हा वाढत नाही, तद्वतच मनुष्य मेला कि त्याचा पुनर्जन्म होणे शक्य नाही.” असे हे दर्शन सांगते. त्यामुळे मृत्योत्तर लोक अथवा जीवन साहजिकच नाकारले जाते. मृत्यू म्हणजेच मोक्ष अशी या तत्वज्ञानाची धारणा आहे. “जे काही आहे ते याच लोकात” म्हणून या तत्वज्ञानाला लोकायतिक हे नांव पडले. ईश्वर म्हणून कोणीही नसून परलोकाला जाणारा जीव दिसत नसल्याने परलोकही नाही असे सिद्धांतन आहे.

  २. हे दर्शन पुर्णतया निरिश्वरवादी असून भौतिक सुखवाद/ईहवाद हा या तत्वज्ञानाचा पाया आहे. “काम” आणि “अर्थ” (म्हणजे जीवनावश्यक आहार-विहार-मैथुनादि) हेच पुरुषार्थ असून अन्य सर्व, धर्म आणि मोक्ष, हे पुरुषार्थ त्याने नाकारले आहेत. लोकायतिकांच्या दृष्टीने मानवी स्वातंत्र्य हाच मोक्ष असून पारतंत्र्य हे बंधन मानले आहे. त्याच वेळीस जगात धर्मच नसल्याने अधर्मही नाही असे हे तत्वज्ञान मानते व “स्वभाव” हेच जगताचे कारण आहे असे ते सांगते.

  ३. हे तत्वज्ञान वैदिक धर्मविरोधी (वेदांचा उघड निषेध करते म्हणून) असल्याने चातुर्वर्ण्यादी कल्पना व श्राद्धादि सर्वच कर्मकांडे धुडकावते. अग्निहोत्र, भस्मचर्चन ही बुद्धी आणि पौरुष यांनी हीन असलेल्या लोकांच्या उपजिविकेची साधने होत असे हे दर्शन मानते.
  भंड, धूर्त व निशाचरांनी तीन वेद निर्माण केले असून जर्भरी-तुर्फरी असले निरर्थक शब्द उच्चारणे हेच पंडितांचे काम होय. वेद हे अप्रमाण आहेत, ते अपौरुषेय नसून ईश्वरच नसल्याने ईश्वरकृतही नाहीत आणि त्यांना स्व-प्रामाण्यही नाही असेही लोकायतिक म्हणतात.

  ४. प्रत्यक्ष हेच खरे प्रमाण असून अनुमान हे प्रमाण होऊ शकत नाही. लोकप्रसिद्ध अनुमान (सर्वमान्य) मानायला मात्र लोकायतिकांची हरकत नाही.

  ५. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी ई. उपायांनी पैसे कमवून शहाण्यांनी नेहमी जगात सुखोपभोग घ्यावा. असेही जमले नाही तर कर्ज करावे पण सुखाने जगावे असेही हे तत्वज्ञान सांगते. (शेवटच्या भागाला अतिरेकी प्रसिद्धी देऊन लोकायतिक मताला बदनाम करण्यासाठी वापरले हे उघड आहे.)

  ६. ज्याची उपयुक्तता उघड दिसते, तो राजा म्हणजेच परमेश्वर होय!

  ७. दंडनिती हीच खरी विद्या, अर्थ आणि गांधर्व (गानविद्या) हेच खरे वेद. प्रत्यक्षानुभवाला येत असल्याने अर्थ-काम शास्त्र असलेले लोकायतशास्त्र हेच खरे शास्त्र होय.

  ८. मुखादि अवयव हे सर्वांच्या शरीरात असतांना वर्णभेद मानणे योग्य नाही.

  ९. पातिव्रत्यादी संकेत बुद्धीहीन लोकांनी निर्माण केले आहेत. येथे लोकायतिक स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करतात.

  १०. दु:खाच्या भयाने सुखाचा त्याग करणे हा मुर्खपणा असून सुखार्थी माणसाने तांदळातून आपण तुस काढून तांदुळ वापरतो त्याप्रमाणे दुख्खद भाग वगळून सुख घ्यावे. आप्तजनांवरही अंधश्रद्धा ठेवू नये. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही. अज्ञात गोष्टींचा पाठपुरावा करण्याऐवजी ऐहिक जीवन सुखकर कसे होईल ते पहावे. व्रत-तप-उपवास करून शरीराचे हाल करुन परलोकातील अज्ञात जीवनाची कामना त्याज्ज्य आहे.

  पृथ्वी, आप, वायू व तेज ही चार तत्वे लोकायतिक मान्य करतात व त्यांच्या समुदायाने देह बनतो (इंद्रिये व विषय) असे म्हणतात. या तत्वांच्या संयोगाने चैतन्य निर्माण होते व चैतन्य विशिष्ट देह म्हणजे शरीर होय असेही हे तत्वज्ञान मानते.

  आता आपण लोकायतिक मताचे नीट आलोकन केले तर लक्षात येईल हे मत अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धीवादी आणि इहवादी आहे. अन्य अवैदिक/निरिश्वरवादी तत्वज्ञानापेक्षा ते जास्त प्रत्यक्षवादी…जडवादी आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्यामुळे एकार्थाने हा विचार विज्ञानवादीही आहे. सर्वदर्शन संग्रहात “चार्वाकवाद्यांचे विचार हे सर्वांना समजण्यासारखे असल्याने ते खोडुन काढणे कठीण आहे.” असे म्हटले आहे. यातच “चार्वाक मताचा स्वीकार केल्याने बहुजनांचे कल्याण होईल. चार्वाक मत सुखवादी असले तरी ते उच्छृंखल भोगवादाला थारा देत नाही.” असेही या ग्रंथात म्हटले आहे.

  चार्वाक मताची धास्ती वैदिक धर्माने तर घेतलीच पण शैव, बौद्ध व जैन या अवैदिक धर्मांनीही घेतली होती यावरून ते मत किती लोकप्रिय असेल हे अंदाजिता येते. याचे कारण म्हणजे चार्वाकांनी वैदिक मतांचे अथवा मुर्तीपुजकांचेच खंडण केले असे नव्हे तर जैन व बौद्ध आगमांवरही त्यांनी हल्ले चढवले. लोकायतिक मुळात धर्मच मानत नसल्याने त्यांनी कोणत्याही अस्तित्वातील धर्मांवर हल्ले चढवणे स्वाभाविकही होते. त्यांच्या तर्कवादापुढे अन्य धर्मियांची किती पंचाईत झाली असेल हे आपण त्यांच्या वरील तत्वज्ञानावरुनच पाहू शकतो. रामायणात भरताजवळ रामाने लोकायतिकांची भरपूर निंदा केलेली आहे तर महाभारतात एका चार्वाकाला राक्षस म्हणून ब्राह्मणांनी जाळून भस्म केल्याचे शांतीपर्वात नोंदले आहे तर शल्यपर्वात एक चार्वाक दुर्योधनाचा मित्र होता असा उल्लेख आहे. विनयपिटकात बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख आहे तर जैन ग्रंथांत या दर्शनाला “मिथ्यादृष्टीचा एक आविष्कार” म्हटले आहे. वैदिक व शैवांतील जवळपास सर्वच पंडितांनी चार्वाक मताचे खंडण करण्यात हिरिरीने भाग घेतलेला दिसतो. त्यामुळे गेल्या हजार-बाराशे वर्षांत हे तत्वज्ञान जनमानसातुनही पुसले गेले.

  चार्वाक मताची निर्मिती ही उपनिषदांच्या समकालीनच झाली असावी कारण चार्वाकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न बृहदारण्यकोपनिषदांसारख्या काही उपनिषदांत आले आहेत. उपनिषद्काल हा सनपूर्व सातवे-आठवे शतक गृहित धरला तर इ.स. च्या सातव्या शतकात झालेल्या आदी शंकराचार्यांच्या काळापर्यंत तरी निश्चितपणे या मताचे प्राबल्य होते असे म्हनता येते. या प्रदिर्घ, जवळपास एक हजार वर्षांच्या काळात अर्थातच या मताचे अनेक आचार्य/तत्वज्ञ झाले असतील. परंतू त्यांचे ग्रंथच “लोप” पावल्यामुळे त्यांची नांवे आपल्याला माहित नाही. जी मते आज उपलब्ध आहेत ती लोकायतिकांची जेवढी मते खंडनासाठी वापरली गेली तेवढ्यापुरती.

  या तत्वज्ञानाचा मुळ निर्माता कोण हे आपल्याला ठाऊक नाही. चार्वाक ही व्यक्ती नसून लोकायतिक मताचे पर्यायी नांव होते हे तर सिद्धच आहे. या मताला बार्हपस्त्य मत असेही क्वचित संबोधले गेले होते पण तेवढ्यामुळे बृहस्पती हा या मताचा जन्मदाता होता
  हेही सिद्ध होत नाही. फार तर एखादा बृहस्पती नांवाची व्यक्ती या प्रदिर्घ कालातील एखादी आचार्य होऊन गेली असावी.

  परंतु या तत्वज्ञानाच्या जन्मदात्याची एवढी चवकशी करण्याचे कारणही नाही. कोणत्याही मानवी समुदायात जेंव्हा धार्मिक स्तोमे माजू लागतात तेंव्हा त्यांतील वैय्यर्थता जाणवणारे व्यक्तिसमुदायही पुढे येतात व तर्कबुद्धीने त्या स्तोमांचा निषेध करत असतात. जीवनाकडे परलोकवादी दृष्टीने न बघता ईहवादी द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असतात. तर्काने, प्रत्यक्ष अनुमानाने जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. ख-या अर्थाने हे प्रबोधनपर्वाचे अग्रणी विचारक असतात. त्यांचे तत्वज्ञान रुढी-परंपरा व धर्मांची गारुडे असणा-यांना मानवणे शक्य नसते. त्यांची चौफेर निंदा होणे स्वाभाविकच असते. लोकायतिकांचेही तसेच झाले.

  “यावज्जीवेत सुखंजीवेत ऋणं कृत्वा-घृतं पिबेत” या चार्वाक वचनाचा सोयिस्करपणे “लोकायतिक हे अनीतिमान आहेत.” हे जनमानसावर ठसवण्यासाठी वापरले गेलेले विधान. पण लोकायतीक आधी शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी आदि मार्गाने धन मिळवावे व सुखाने जगावे असे सांगत जेंव्हा त्याचा अभाव असेल तर कर्जही काढायला हरकत नाही असे म्हणतात हे मात्र टाळले गेले हे येथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. फेडण्याची क्षमताच नसेल तर चैनीसाठी कोणी यावज्जीव कर्ज देणार नाही हा साधा विचार लोकायतिक मताच्या खंडणकर्त्यांना सुचला नाही. परंतू एखादे मत नष्टच करायचे ठरवले तर धर्मपंडित ज्या पद्धतीने आपली प्रतिभा (?) पणाला लावतात तसेच पुढे लोकायतिकांच्या बाबतीत झाले असे म्हणता येईल.

  लोकायतिक मत हे सुखवादी आहे, भोगवादी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या गोष्टीचा (आत्मा, ईश्वर, परलोक ई) प्रत्यक्ष अनुभव येत नाही, येऊ शकत नाही त्यासाठी देह झिजवण्याला त्यांचा ठाम विरोध आहे. लोकायतिक भारतातील एकमेव इहवादी विचारधारा होती असे म्हणण्यास काहीएक प्रत्यवाय नाही.

  इहवादी विचारधारेतुनच विज्ञानाचा रस्ता मोकळा होतो हे एक सत्य. युरोपातील प्रबोधनकाळ इहवादातुनच निर्माण झाला व त्यातून औद्योगिक क्रांती घडली हे एक वास्तव आहे. खरे तर भारतात इहवाद-सुखवाद लोकायतिकांनी सर्वात आधी आणला. परंतू त्याची तार्किक परिणती जी ऐहिक संसाधनांचे नवनवे शोध लागण्यात अथवा वैज्ञानिक संकल्पनांचा तार्किक पातळीवर लागण्यात व्हायला हवी होती तशी ती झाली नाही हेही एक वास्तव आहे. खरे तर या तत्वज्ञानात प्रबोधनाला अत्यावश्यक असलेले सारे तत्वज्ञान ठासून भरलेले आहे.

  पण सुखवादी तत्वज्ञानाची भोगवादी, चंगळवादी अशी हेटाळणी सर्वच धर्मग्रंथांनी, पुराणांनी व शंकराचार्यांसारख्या प्रकांड विद्वानांनी केल्याने आधी अनेक शतके लोकप्रिय असणारे तत्वज्ञान मागे फेकले गेले. वैदिकांनी आपलेच म्हणून घोषित केल्यावर सांख्य-वैशेषिकांच्या वैज्ञानिक आणि मुळात अनिश्वरवादी-जडवादी असलेल्या तत्वज्ञानाचेही तेच झाले. हे आपल्या भारतियांचे दुर्दैव होय.

  लोकायतिक केवळ तर्ककर्कश बंडखोर होते असे नाही. ते बुद्धीवादी होते. त्यांचा मानवी जीवन व्यवहाराकडे पहायचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ होता. त्यांनी वर्णभेद-जातीभेद या आजच्या समाजालाही ग्रासणा-या बाबींचा निषेध प्राचीन काळापासुनच केला. स्त्रीयांना बंधनात ठेवणे त्यांना मान्य नव्हते. जीवनात दु:ख असले तरी ते बाजुला सारून केवळ सुखच निवडावे असा समतोल विचार त्यांनी मांडला. म्हणजे जीवन मुळात सुख-दु:खाचे संमिश्रण आहे हे त्यांना मान्य होते. एकांगी विचार लोकायतिकांनी केल्याचे आढळत नाही.

  राजसत्ता ही प्रत्यक्ष असल्याने तिच श्रेष्ठ आहे असे म्हणत त्यांनी ही सत्ता विवेक आणि न्यायाने परिपूर्ण असली पाहिजे असे वास्तवदर्शी व बुद्धीप्रामाण्यवादी विचार त्यांनी मांडले.

  आणि सर्वात धाडसी पण सार्वकालिक होऊ शकनारा सिद्धांत त्यांनी मांडला…तो म्हणजे त्यांनी धर्मांची आवश्यकताच नाकारली. खरे तर हा अत्यंत बंडखोर विचार होय. धर्मांनी समस्त मानवी जीवन जखडून टाकले असता मानवी स्वातंत्र्य हाच एकमेव मोक्ष होय असे उच्चरवाने सांगणारे चार्वाक/लोकायतिक आजही कालसुसंगत आहेत. अनुकरणीय आहेत. कारण आजही आपण धर्मांनी, भेदभावयुक्त धर्मतत्वांनी प्रचंड घेरलो गेलेलो आहोत. धर्ममय जग म्हटले तर आज कोणता धर्म समस्त जगाचे कल्याण करू शकेल यावर प्रचंड वितंडे आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पुराणता आणि श्रेष्ठत्वाच्या घमेंडीत आहे आणि त्यातून अगदी हिंसकही संघर्ष जगभर उद्भवत आहेत हे आपण नित्य पाहतो. धर्मांतर्गतही विवाद आहेत.

  अशा परिस्थितीत लोकायतिक मत हे खरा मार्ग दाखवते. धर्म आणि ईश्वरी सत्ता नसलेले…फक्त मानवी स्वातंत्र्याचे मानवासाठीच असलेले जग ही आपली खरी गरज आहे. आणि लोकायतिक मत हे आपल्याला आजही मार्गदर्शक ठरू शकते

महादेव

ॐ महादेव महाशिवरात्रि ला माती चा पण महादेव करतात मि पूर्वी वाळु चा महादेव केलेला आहे यंदा धान्य घुंगरु रंगीत दगड यांचे महादेव केलेले आहेत व ॐ / ओम /OM लिहून पण केलेले आहे घुंगरु आवाज साठि वापरले आहेत सर्व करतांना मन एकाग्र होत बोट यांना हालचाल होते बसणे उभे रहाणे हयात शरीर एक चित्त होते ह्या वय याला पण सर्व क्रिया होणे साठि करणे आवश्यक आहे आणि मला ते सर्व जमलं आहे शक्ति देवा चि ! मनाची ! मि पूर्वी गाणगापुर येथे महादेव गणपति ला अभिषेक केलेला आहे मि विचारले तर गुरुजिं मंत्र हात याने ! पूजा करून घेतली उपवास मन ताब्यात रहने साठि करतात मि प्रणव यांनी उपवास केला आहे सर्व क्रिया घडून येणे फार महत्व पूर्वक आहे सर्व झाल्या नंतर त्यात काय सोप नाहि ॐ ओम OM महाशिवरात्रि

IMG_1320[2]   IMG_1304[1] dscf2847  IMG_1319[1]

वसंत

झाडाची फांदी फांदी वर पान पानात भरलय हिरवे रान हिरव्या रानाचा हिरवा चुडा मातीत मिसळलाय फुलांचा सडा फुलाची पाकळी पाकळीचे रंग फुलांच्या प्रेमात वाराही दांग रानातले तळे तळ्यातली कमळे चिखलात उभे ध्यानस्थ बगळे आकाशात मेघ त्याची शाल निळी निळी पहाटेच्या किरणांना कड सोनसळी रानातल्या वाटेवर वाजते पाउल कोवळ्या पालवीच्या आड देतो वसंत चाहुल.

संपला वनवास

संपला वनवास

चौदा वर्षाचा वनवास

बारा वर्षात खलास

भाजपच्या कमळात

लोजपचा रामविलास

पुढे अधिक वाचा… >>

विद्यार्थ्यांसाठी खास लेखमाला – अभ्यास कसा करावा ? ( अपयशावर मात करण्याच्या उपायांसह )


You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

झाड याची सावली सांज वात

                  ॐ

झाड याची सावली व शुभं करोति

आमच्या घरात कसे कसं छान उन्ह येथे बघा मि फोटो काढला आहे
सांज वात संध्याकाळी कसे दिवा लावतात व रस्ता रोड मध्ये कसा प्रकाश आहे बघा
हल्ली सोसायटी त पण ट्युब लावतात अंगणात

                                      ॐ
      गायत्री मंत्र
ॐ भू :| ॐ भुव : | ॐ स्व : | ॐ मह : | ॐ जन : | ॐ तप : | ॐ सत्यम् |
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि | धियो यो न : प्रचोदयात् |
ॐ आपो ज्योती रसो s मृतं ब्रह्मभूर्भुव : स्वरोम् |

ॐ असे पण लिहीतात

ॐ भूर्वव स्व : ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि | धियो यो न : प्रचोदयात् ||

                              ॐ
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् घनसंपदा   सत्रु बुद्धी दृष्ट बुध्दी विनाशाय दिपज्योत्ति नमस्तुते नमोस्तुते
दिवा दिवा दिप्तकार कानिकुंडल मोतिहार दिवा लावला देवा पाशी माझा नमस्कार सर्व देवा पाशी

 

IMG_1269 IMG_1283   1794556_255158254660952_232423273_nimg_05761_thumb

IMG_1256 img_10471

img_02051_thumb img_01512_thumb

दिसामाजी काहीतरी उत्तम वाचीत जावे…………………

एकंदरीतच वेगवेगळे दिवस अती उत्साहात साजरे करण्याची आपल्याला फार आवड! साहजिकच उत्साह जितका अती, तितकाच तो विरून जाण्याची प्रक्रियाही वेगवान! सगळे वरवरचे दिवस साजरे करण्याने होते तरी काय? मूळ उद्धेश अशा या दिवसांपासून लांबच असतात, दिन साजरा करण्याचा हेतू साध्य होत नाहीच  मग  तो  मराठी भाषा दिन साजरा असो,  महाराष्ट्र दिन वा प्रजासत्ताक दिन! 

असे दिवस साजरे करतानाही, आपल्याकडील विरोधाभास असा की आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालणार, स्वत: घराबाहेर पडल्यावर हिंदी नाहीतर इंग्रजीचा आधार घेत बोलणार  आणि असा हा एक दिवस साजरा करून आपण किती मराठीभाषेवर आपले किती प्रेम आहे याचे कवतिक करत राहणार, ते ही कसे तर फेसबुक, whatsapp, ट्वीटरवर कोणाकडून तरी आलेल्या मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा एकमेकांना पाठवून, अशाने कशी ती भाषा वाढावी, फुलावी? अशा शुभेच्छा पाठवणारे कितीजण किमान हा दिवस एखादे मराठी पुस्तक विकत घेऊन, नुसतेच विकत घेऊन नव्हे तर ते वाचून, किंवा आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला किंवा मुलीला  एखादी उत्तम, कथा, कविता किंवा एखादा ललित लेख वाचून दाखवून किंवा वाचावयास लावून साजरा करतात? ज्या योगे पुढील पिढीस मराठीच्या समृद्धतेची कल्पना यावी? 

आपले मूल जन्माला येण्यापूर्वीपासूनच  आपण स्वप्ने पहाणार ती त्याच्या इंजिनीअर, डॉक्टर बनून खोऱ्याने पैसे कमावण्याची. क्रीडा प्रकार साऱ्या देशात एकच त्यामुळे जर चुकून आपण त्याने क्रीडापटू स्वप्न पहिलेच तर आपली इच्छा त्याने  सचिन तेंडूलकर बनावे हीच. आजतोवर मला अभावानेच कोणी आई बाप भेटलेत ज्यांचे स्वप्न आपल्या मुलाने साहित्यिक व्हावे असे  होते. त्यातल्या त्यात सोयीची भूमिका आपण घेतो ती म्हणजे “तिला/ त्याला स्वत:च्या आवडीने काय ते करिअर घडवू देत”. पण शेवटी जे आदर्श समोर ठेवतो किंवा ज्या प्रकारच्या पुढील आयुष्यातील जीवनशैलीची गोडी लावतो त्या अपरिहार्यतेने मुले मळलेल्या वाटाच जवळ करताना दिसतात. 

आपली शैक्षणिक पद्धत ही अशी की हुशार ( मार्क मिळवण्यात ) मंडळी विज्ञान शाखेकडे वळावीत, थोडी कमी हुशार यांनी आपले कॉमर्सला जावून उत्तम नोकरी कशी मिळेल ते पाहावे, उरलेला सारा भार, आपण जमेल तसा कला शाखेत धाडून द्यावा, त्यांच्यातूनच मग डी एड, बी एड  वगैरे करून मंडळी जावीत पुन्हा शिक्षकी पेशात! बरं, त्यांना आपले सरकार पद कोणते देणार तर म्हणे “शिक्षण सेवक” ! आता अशा रीतीने मारून मुटकून शिक्षक बनलेल्या व्यक्तीकडून आपण उत्तम विद्यार्थी किंवा साहित्यिक घडवण्याची  अपेक्षा करणार, म्हणजे जे आडातच नाही ते आपल्याला पोहऱ्यात मिळावे ही आपली अपेक्षा. आता असा शिक्षक साहित्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करेल कसा ? 

भाषा, साहित्य म्हणजे विज्ञानातील, तंत्रज्ञानातील  एखाद्या शोधाप्रमाणे नसते ना की लागला एखादा महत्त्वाचा शोध आणि सारी क्षितीजेच बदलून गेली! भाषा, ती रूजावी लागते. तिची मशागत व्हावी लागते. आणि घडते ते उत्तम निर्मिती मुल्ये असलेले लेखन, इतर भाषांतून अनुवादाच्या माध्यमातून होणारे संस्कार याचा पाया, बोली भाषेची समृद्धता तिचा सतत आणि सहज वापर, शालेयच नव्हे तर उच्च शिक्षणही या भाषेतून देण्याची  सोय आणि त्या साठीचे सातत्याचे प्रयत्न, त्याच बरोबर खोलवर रुजलेली वाचन संस्कृती यातून.  इतक्या साऱ्या बाबी वर्षानुवर्षे जुळून याव्यात तेंव्हा कुठे आपण विचार करू शकू ना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत एक समृद्ध वारसा पोहचवण्याचा!

एक बरे आहे, जन्माला येताना जसे नाक कान डोळे घेऊनच येतो तशी वाचनाची गोडी किंवा नावड सोबत घेऊन येत नाही हे! त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर  वाचनाची नसलेली  गोडी लागण्याची शक्यता तरी किमान कायम राहते! 

पण तरीही आपण जाणीवपूर्वक ही आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. कोणत्याही भाषेमुळे असोत, जाणीवा समृद्ध होणे महत्त्वाचे असे आपण म्हणत नाही. रोजच्या जगण्यात हजारो रुपये विविध गोष्टींवर खर्च करणारे आपण कितीजण सहजपणे हजारभर रुपयांची पुस्तके आणून आपल्या मुलासमोर ठेवून,” बाबारे, तुला  टी व्ही, मोबाईल, आय पॅड, मित्र मंडळ यातून वेळ मिळाल्यावर तरी  हे वाच” असे सांगतात? एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी भेटवस्तू च्या रुपात उत्तम साहित्यकृती देतात? किंवा एखाद्यास एक वर्षाची पुणे मराठी ग्रंथालयाची किंवा ब्रिटीश कौन्सिल ची  वर्गणी भरून त्याच्या हाती ठेवतात? 

दिसामाजी काहीतरी लिहिणे नाही जमणार कदाचित पण “दिसामाजी काहीतरी उत्तम वाचीत जावे” हे तर शक्य होवू शकते ना आपल्याला? चला, नुसत्या “मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा” एकमेकांना  देण्यापेक्षा तिच्या वैभवात भर पडेल याकरिता एक पाऊल टाकूयात. माझ्या सर्व मित्र मंडळीना याकरिता अनेकोत्तम शुभेच्छा!

Interesting articles from Balsanskar.com for you !

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

महाशिवरात्री

Posted: 26 Feb 2013 03:00 AM PST

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांनीच ‘शिव’ या देवाविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या देवतांची होणारी टिंगल आणि चेष्टा थांबवणे, ही खरी देवाची भक्ती करण्यासारखे आहे.

जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ० ।।

Posted: 09 Apr 2010 04:00 AM PDT

श्री शिवपन्चाक्षरस्तोत्र

Posted: 21 Feb 2011 03:00 AM PST

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मान्गरागाय महेश्वराय |

१२ ज्योतिर्लिंगे

Posted: 15 Feb 2011 03:00 AM PST

सोमनाथ , मल्लिकार्जुन , महाकालेश्वर , अमलेश्वर , वैद्यनाथ , भीमाशंकर , रामेश्वर , नागेश्वर , काशीविश्वेश्वर , त्र्यंबकेश्वर , केदारेश्वर , घृष्णेश्वर……..

शिवविषयक प्रश्नमंजुषा – २

Posted: 23 Feb 2013 03:00 AM PST

– शिवाच्या उपासनेत कोणते अत्तर वापरतात ? – शिवाकडे असणारे परशू हे कशाचे प्रतीक आहे ? – ५२ अक्षरांचे मूळ ध्वनी कोणत्या नादातून निर्माण झाले ?

02google0405http://www.balsanskar.com/android/Inline images 1Inline images 2Inline images 1
Inline images 3Inline images 3


You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

आर्य सिद्धांत आणि प्राकृत

“सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती.” असे विधान करुन वा. वि. मिराशी “सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप” या ग्रंथात पुढे म्हणतात कि, “आर्य लोक भारतात आले तेंव्हा त्यांची भाषा वैदिक पद्धतीची संस्कृत होती यात संशय नाही. पण तिच्यातील क्रियापदांचे दहा प्रकार, तीन भुतकाळ, दोन भविष्यकाळ, नाम-सर्वनामांची विविध प्रकारची विभक्ति-प्रत्ययांत रुपे इत्यादि बारकावे त्यांच्याशी व्यवहारात संबंध आलेल्या आर्येतरांना पेलने शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातील संस्कृत भाषेत परिवर्तन होऊन प्राकृत भाषा अस्तित्वात आल्या. आर्यांनाही त्यांच्याशी व्यवहारात त्यांचा उपयोग करावा लागला.”

मिराशींनाच नव्हे तर गेल्या शतकातील सर्वच विद्वानांनी आर्य आक्रमण सिद्धांत हे केंद्रीय ग्रुहितक ग्राह्य धरलेले आहे. १९ व्या शतकापासून “आर्य” वंश संकल्पनेने अकल्पित विस्तार केला. या संकल्पनेचा जन्मदाता म्यक्समुल्लरने “आर्य हा कोणी वंश मानतो तो मोठेच पाप करतो…” असे म्हणुनही या संकल्पनेने नाझीवाद आणि फ्यसिस्ट विचारांना जन्म घातला. यामागे वंशश्रेष्ठ्त्वाची भावना होती हे उघड आहे. भारतही या विचारांपासून अलिप्त राहिला नाही. “आर्क्टिक होम इन वेदाज” हा ग्रंथ लिहून टिळकांनी त्यात भरच घातली. उत्तरेतील आर्य व आर्यभाषा व दक्षीणेतील द्राविड व द्राविडभाषा यात वैचारिक व राजकीयही संघर्ष पेटला. आजही त्याचे निराकरण झालेले नाही. वंशवादी लोकांनी आजही मुलनिवासी विरुद्ध आक्रमक युरेशियन अशी मांडनी कायम ठेवली आहे व त्याचे प्रतिबिंब दोन्ही बाजुंच्या वैचारिक साहित्य, संशोधने व वैचारिक लेखनांवर पडलेले आढळून येते. त्यामुळे सत्याप्रत जान्याचे मार्ग दोन्ही बाजुंनी बंद करून ठेवले आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे.

या वादात न शिरता जिनेव्हा (युनेस्को) येथे मानववंश शास्त्रज्ञ आणि जनुकीय शास्त्रज्ञ यांनी जुन १९५१ मद्धे एक मताने जारी केलेल्या निवेदनापासून या प्रश्नाकडे पाहुयात. संदर्भ: The Race Question in Modern Science: The Race Conceipt- Results of an Inquiry, युनेस्को प्रकाशन)

खाली या निवेदनातील मुद्दे थोडक्यात दिलेले आहेत.

१. संपुर्ण मानवजात होमो सेपियन या एकच एक मानवगटातून विकसीत झालेली आहे. एकाच गतातील मानसांचे जगभर वितरण नेमके कधी आणि कसे झाले हे मात्र सांगता येणार नाही.
२. मानवी समाजांत आज दिसनारे शारीरीक (रंग/जबड्यांची ठेवण इ,.) अनुवांशिकी घटना आणि विविध भुभागांतील पर्यावरनीय घटकांमुळे दिसतात.
३. राष्ट्रीय, धार्मिक, भौगोलिक, भाषिक, आणि सांस्कृतिक विभेदांचा व वेगळ्या वंशाचे असण्याचा काही संबंध नाही.
४. आजवर वंशशास्त्रज्ञांनी शरीरमान/रंगाच्या आधारे कितीही गट पाडले असले वा कल्पिले असले तरी एका विशिश्ढ्ट शरीरलक्षनावरून (उदा. रंग) एक गट दुस-या गटापेक्षा वेगला आहे असे नाही. या गटांत वांशिकी कारनावरून एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ (Superior) आहे अशी जी सध्याची लोकप्रिय संकल्पना आहे ती निराधार आहे.
५. बहुतेक वंशशास्त्रज्ञ मानवी गटांची विभागणी करतांना बौद्धिक क्षमतेचा त्यात अंतर्भाव करत नाहीत. मानवाच्या (कोनत्याही वंशाचा असला तरी) बौद्धिक क्षमता या जन्मजात व तो ज्या समाजव्यवस्थेत राहतो (मानवी पर्यावरण) त्यावर अवलंबून असतात. मानसिक क्षमतेवरून दोन गट पडत नाहीत.
६. संस्कृती आणि सांस्कृतिक उपलब्धी ही जनुकीय फरकांवर अवलंबून नसते.
७. “शुद्ध रक्ताचा वंश” ही संकल्पना सिद्ध करनारा एकही पुरावा पुढे आलेला नाही.

यानंतर आपण Center for Cellular & Molecular Biology  हैदराबाद, University of Tartu, इस्टोनिया,  Chettinad Academy of Research and Education, चेन्नई आणि बनारस हिंदू विद्यापीठाने भारतातील जनसंख्येचे जे व्यापक जनुकीय सर्वेक्षण केले त्यांच्या निष्कर्षाकडे वळुयात.

या निष्कर्षाप्रमाने गेल्या किमान साडेतीन हजार वर्षांपासून भारतात युरेशियन जनुकीय प्रवेश आढळुन येत नाही. भारतातील जनुकीय वैविध्य हे युरेशियापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. युरेशियातून आर्य अथवा आर्यभाषा बोलणारे लोक कधीकाळी आले मत हे जनुकीय पुराव्यांवर टिकत नाही.  “It is high time we re-write India’s prehistory based on scientific evidence. There is no genetic evidence that Indo-Aryans invaded or migrated to India or even something such as Aryans existed”. असे मत  डा. लालजी सिंग यांनी व्यक्त केले असून ते Center for Cellular & Molecular Biology  चे संचालक होते. हा अहवाल २०११ मद्धे प्रसिद्ध झाला.

वरील बाबींवरून दोन बाबी सिद्ध होतात.
१) आर्य नांवाचा वंश अस्तित्वात नव्हता, हे वंशशास्त्रज्ञांच्या व आताच्या जनुकीय संशोधनाने सिद्ध केले आहे. सध्याच्या ऋग्वेदात १०१२८ ऋचांपैकी फक्त ३४ ऋचांत आर्य हा शब्द ३६ वेळा येतो. हे आदरार्थी संबोधन असून हे संबोधन विशेषता: सुदास राजाला आणि इंद्रादि देवतांना वापरलेले आहे.
२) आर्य अथवा कोणी युरेशियन मानव गट भारतात प्रवेशला हे पारंपारिक मत कोणत्याही आधारावर टिकत नाही.

या नवीन शास्त्रशुद्ध संशोधनांनंतर टिळक, वा. वि. मिराशी ते सर्वच भारतीय विद्वानांची आर्यांविषकची मते बाद होतात हे ओघाने आले. जर आर्य अस्तित्वात नव्हते तर त्यांची संस्कृत भाषा आर्येतरांना पेलत नव्हती म्हणून अशुद्ध झाली आणि  त्यातून प्राकृत भाषा जन्माला आल्या हे मिराशींचे वरचे मतही बाद ठरते. उलट मिराशी येथे अजून एक अत्यंत मोठा विरोधाभास जन्माला घालत आहेत. तो म्हणजे “उच्च थरांमधील लोकांमद्धेही संस्कृत भाषाप्रचारात नव्हती.” हे त्यांचे विधान. येथे मिराशींना उच्च थर म्हनजे “त्रैवर्णिक” म्हनायचे आहे हे उघड आहे. मिराशी येथे हे विसरले आहेत कि वैदिक धर्मात तिन्ही वर्णांत वेद/वेदांगे/शिक्षा/व्याकरण इ. गुरुगृही जावून शिकणे अनिवार्य आहे. जर वेद संस्कृतात असतील तर स्वाभाविकपणेच या तिन्ही वर्नांतील लोकांना संस्कृत येणे अनिवार्य आहे. शिवाय सातवाहन हे ब्राह्मण होते, तत्पुर्वीचे शृंग व काण्व ही राजघरानीही ब्राह्मण होती असे त्यांचेच दावे आहेत. सातवाहनांनी केलेल्या श्रौत यज्ञांचे वर्नण त्यांनी प्राकृतात लिहिल्याबद्दल त्यांना आश्चर्यही वाटत आहे. अजय मित्र शास्त्री यांनी “महाराष्ट्र ग्यझेटियर: इतिहास: प्राचीन काळ” मद्धेही असेच वर्णण केले आहे. एकीकडे प्राकृत ही सामान्य जनांची भाषा होती आणि हालाच्या गाथा सप्तशतीतील गाथा या जनसामान्यांची काव्ये होत असे विधान करतांना स. आ. जोगळेकर (गाथा सप्तशतीचे संपादक) विसरतात कि गाथा सप्तशतीतील हाल, आढ्यराज, प्रवरसेन ई. हे गाथा रचनाकार राजे व सामंत होते. जनसामान्य नव्हते.
 
या विवेचनाचा संक्षिप्त अर्थ एवढाच निघतो कि संस्कृतातून आर्येतरांना झेपली नाही म्हणुन प्राकृत निर्माण झाली हे मत चुकीचे आहे कारण कोणताही युरेशियन मानवगट भारतात संस्कृत वा तत्सम भाषा घेऊन आला होता हे मतच मुळात निराधार आहे. त्याला कसलेही (अगदी ऋग्वेदांतर्गतही) पुरावे उपलब्ध नाहीत.

आणि दुसरी बाब म्हनजे उच्च थरही प्राकृतच बोलत होता कारण अन्य भाषा अस्तित्वात नव्हती. त्रैवर्णिक जेही वेद शिकत होते ते संस्कृत भाषेत असने शक्य नाही कारण तसे असते तर संस्कृतचा पुरेपूर अभाव आपल्या चर्चेत असलेल्या प्रदिर्घ कालात दिसला नसता. उलट सातवाहनांच्या लेखांत ४६० वर्षांच्या कालावधीत प्राकृत संस्कृतात उत्क्रांत होत असल्याचे संकेत कसे मिलतात हे पुढील लेखात पाहु.

माघ कृष्णपक्ष महाशिवरात्र

                                                           ॐ

                      महाशिवरात्र

               दिनांक तारिख Date 27. 2. ( फेब्रुवारी ) 2014 साल

                 माघ कृष्ण पक्ष १३ महाशिवरात्री

                                              ओमं

                                              ॐ

                           ॐ       ओमं नमो शिवाय

                               ॐ       ओमं नम: शिवाय

                             ॐ     ओमं नमो मार्तंड मार्तण्ड   भैरवाय

                      जेजुरी चे शेवट चे आहे महादेव चं मंत्र आहे

 

IMG_1284[1] IMG_1285[1]

IMG_1286[1] IMG_1289[1]

IMG_1290[1] IMG_1300[1]

IMG_1302[1] dscf3909

IMG_1304[1] IMG_1307[1]

IMG_1309[1]IMG_1313[1]

IMG_1316[1] IMG_1314[1]

IMG_1312[1] IMG_1318[1]

IMG_1319[1] IMG_0606[1]

IMG_1320[1] IMG_1325[1]

IMG_1332[1] IMG_1333[1]

IMG_1338[1] IMG_1339[1]

महाशिवरात्रि

                                                          ॐ

                                  महाशिवरात्रि

                             तिळ यांचा महादेव  तिळ यांचा ॐ

                         साबूदाणा यांचा महादेव साबूदाणा यांचा ॐ

                              मणि यांचा महादेव मणि यांचा ॐ

 

IMG_1352[2]  IMG_1354[2]

IMG_1356[1] IMG_1355[2]

IMG_1350[1] IMG_1325[2]

IMG_1333[1] IMG_1336[1]

IMG_1343[1] IMG_1319[1]

IMG_1328[1] IMG_1313[2]

मराठी भाषा

                                                                ॐ

                          मराठी भाषा

दिनांक तारिख Date 27. 2. ( फेब्रुवारी ) 2014 साल ला

                                 २७. २ . ( फेब्रुवारी ) २०१४ साल ला

सत्ताविस .   २. ( फेब्रुवारी ) दोन हजार चौदा साल ला
आज
वसुधालय ब्लॉग पोस्ट १ , ५ १ ५ / 1, 5 1 5

एक येक हजार पाचशे पंधरा वां होत आहे

मला खूप चं खूप उच्छाह वाटत आहे खूष खुष खूश आहे

एवढे फोटो लिखाण माझ्या ब्लॉग मध्ये आहे

आणि हो ! आज चं मराठी भाषा दिन दिवस आहे आणि हो !

माझा ब्लॉग पोस्ट मराठी भाषा संगणक कांपूटर मध्ये

ब्लॉग पोस्ट १, ५ १ ५ वां होत आहे काय किमया ! महिमा

मराठी भाषा संगणक म धी ल  यांचा यांची !

आभारी आहे मी आपण सर्व मराठी भाषा वाचन करून

भेटी प्रतिक्रिया Like करतां या बध्दल बद्दल बद्धल

अभिनंदन ! धन्यवाद

भेटी ८५ , ३८५ / 85 , 385

प्रतिक्रिया 666 / ६६६


185 , 623 . १८५ , ६२३

एक एक लाख पंच्चाऐंशी हजार , सहाशे तेविस तेवीस

IMG_1284[1] IMG_1344

ghanta Snapshot_20140225

मराठी भाषा दिवस

                     ॐ

दिनांक तारिख Date 27. 2. फेब्रुवारी

मराठी भाषा दिन दिवस साजरा करतात

ज्ञानपीठ कुसुमाग्रज शिरवडाकर यांचा वाढ  असतो

मराठी भाषा संस्कृत भाषा प्राचिन काळ पासून आहे सर्वांना चं माहित आहे
एक येक दिवस सरकार मान्य केलेला आहे
त्याचे स्वागत करणे लक्षात ठेवणे मराठी भाषा यांनी स्वीकार करणे आवश्यक आहे

आता मराठी भाषा लिखाण संगणक मध्ये पण लिहिले जात आहे
त्याचा वापर मराठी भाषा निं वापर करायला पाहिजे आहे
             ॐ
मी स्वत: मराठी भाषा संगणक मध्ये वापरत आहे
मासिक वर्तमान पत्र श्र्लोक पोथी संग्रह लिहिली आहेत
मला स्वत : स्वाभिमान वाटत आहे मी एवढियेवढि   मराठी भाषा लिहिली आहे
इंग्रजी शब्द  पेस्ट करून तयार करतं आहे महत्व पूर्वक काम चालु चालू आहे माझे
मराठी भाषा दिन दिवस ला शुभेच्छा अभिनंदन !

                                 ॐ        

              IMG_1257[1]     

                  ॐ
कविता एकी कडून श्री कुसुमाग्रज आहे व एकी कडून श्री शिरवाडकर

 

IMG_1260[1] IMG_1258[1]

IMG_1261[1] IMG_1259[1]

IMG_0791[1] IMG_0550[1]

IMG_1083[3] IMG_0433[2]

IMG_1200vasudha[1] 

IMG_0927[1] IMG_0844[1]

IMG_0841[1]dscf2226_thumb

dscf3824_thumb2 dscf3821_thumb2

IMG_1285[1] IMG_1284[1]