कच्छच्या रणात नौकानयन / Navigation in the Rann of Kachchh

कच्छ हा गुजरातमधील भारताच्या पश्चिम टोकाला असलेला एक जिल्हा. भारतातील जिल्ह्यांमध्ये आकाराने सर्वात मोठा – ४६ हजार चौरस कि.मी. व्यापणारा पण सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. भारताची पूर्वोत्तर राज्ये, जम्मू-काश्मीर आणि जैसलमेरनंतर कमी लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांमध्ये याचाच क्रमांक लागतो – दर चौ.कि.मी. मागे केवळ ४६ लोकसंख्या असलेला. गुजरातेतील सुरतमध्ये ही लोकसंख्येची घनता दर

…….

तुम्ही एकटे असता म्हणून तर लिहिता. आणि लिहिता म्हणून तर एकटे असता . तुम्हाला लिहायचं असतं म्हणून तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला एकट्याला असायचं असतं म्हणून तुम्ही लिहिता . तुम्ही एकटे होत जाता जसजसे लिहिता तसे आणि लिहित जाता जसजसे एकटे होता तसे ……… 
                                                                                                   एकम (मिलिंद बोकील)

राहूल गांधींची मुलाखत …

गेल्या दहा वर्षात प्रथमच राहूल गांधींनी अर्णब गोस्वामींना ८० मिनिटांची प्रदिर्घ मुलाखत दिली आणि मोदी भक्तांनी आणि मिडियाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या मंडळींना मोदी करण थापरच्या मुलाखतीतून पळून जावे लागले ह्पोते हे मात्र सोयिस्करपणे विसरले गेले. राहुलला अडचणीत आनणारे प्रश्न वारंवार विचारले जावुनही त्यांनी तसे केले नाही. राजकीय नेता म्हणून राहुल गांधी अजुन गेंड्याच्या कातडीचे झाले नाहीत हे मात्र सिद्ध झाले. (आणि होऊही नये…)
अर्नब जानीवपुर्वक मोदी विरुद्ध राहुल असे द्वंद्व पेटवण्याच्या प्रयत्नांत असतांना रहुलनी फक्त तीन वेळा त्यांचे नांव घेतले. अर्नब पत्रकार आहे व त्यांना टी.आर.पी. हवा आहे हे उघड आहे. परंतु हा संघर्ष राहुल विरुद्ध मोदी हा नसून दोन विचारधारांमधील आहे हे राहुलनी अधोरेखित केले. भाजपची विचारधारा सत्तेच्या केंद्रीकरणाकडे जात असून आपल्याला सत्तेचे विकेंद्रीकरण हवे आहे असे राहूल म्हणाले. किंबहुना हाच खरा आधुनिक भारतासमोरील व लोकशाहीसमोरील कळीचा मुद्दा आहे हे अर्णब यांनी लक्षात घेतले नाही. आम आदमी पक्षाचे यश हा याच जनभावनेचा संदेश आहे हे उघड आहे. भारतीय लोकशाहीला सत्तेचे केंद्रीकरण परवडनारे नाही, हे आपण आणिबाणीच्या काळात अनुभवले आहे.
पुर्वी या बाबत कोन्ग्रेसने काय केले हा खरे तर गैरलागू प्रश्न आहे. पिढ्या बदलतात तसे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचेही विचार कालानुरुप बदलतात. राहूल जर बदलाचे सुतोवाच आणि तशी कृती करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे.
अर्णबनी शिख हत्याकांड आणि गुजरातचा नरसंहार एकाच तराजुत मोजला. शिख हत्याकांड सर्वस्वी वाईटच होते पण ते सरकार प्रायोजित नव्हते आणि कोंग्रेसने शिख समुदायाची त्यासाठी जाहीर माफी मागितली आहे, तसे भाजपने केलेले नाही. गुजरातमधील दंग्यांच्या केसेस अन्य राज्यात चालवाव्या लागल्या एवढी नामुष्की होऊनही ज्यांना त्यांचे समर्थ करावे वाटते त्यांनी खुशाल करावे.
राहुल गांधींचा मुख्य भर महिला व तरुनांचे सबलीकरण, सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्रामीण भारताचा व एकुणातीलच देशाचा विकास यावर होता. ते वारंवार तेच सांगत होते. परंतु पत्रकारांना सहसा विकासाबाबत बोलायचे नसते. माहिती अधिकार, पंचायत राज, अन्नसुरक्षा, लोकपाल, रोजगाराचा हक्क इत्यादी जमेच्या बाजू सध्याच्या केंद्र सरकारकडे आहेत. गेल्या दहा वर्षात जेवढ्या राजकारण्यांवर, उच्च-पदस्थ अधिका-यांवर खटले भरले गेले, जेलयात्रा करावी लागली ती तशी तत्पुर्वी झाली होती काय या प्रश्नाचा विचार करण्याचे तारतम्य राहुल अथवा कोंग्रेसच्या टीकाकारांत नाही, हे कशाचे लक्षण आहे?
आज भारत हा जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे आणि नव्या पिढीच्या आकांक्षा साकार व्हायच्या तर राजकारणातील त्यांचा सहभाग वाढणे आवश्यकच आहे. राहुल गांधी त्यासाठीच प्रयत्न करत आले आहेत. कार्यकर्त्यांनीच आपला उमेदवार निवडावा यासाठी त्यांनी १५ लोकसभेच्या जागाही मुकर्रर केलेल्या आहेत. या जागा कमी आहेत याबद्दल कुचेष्टा करतांना इतर पक्षांनी याबाबत काय केले हा प्रश्न नाही काय?

ही बाब मान्य केलीच पाहिजे कि हा दोन विचारधारांमधील संघर्ष आहे…व्यक्तींमधील नाही. व्यक्तिकेंद्रीत राष्ट्रीय राजकारण करण्याचे व राबवण्याचे दिवस संपले आहेत. भाजपाची विचारधारा (जनस्मरण कमी असले तरी) काय आहे हे आणि ती खरोखरच लोकशाही मुल्यांना जपणारी आहे काय या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहित आहे. कोंग्रेस (केवळ पक्ष म्हणून नव्हे) ही एक विचारधारा आहे. या धारेत स्वातंत्र्योत्तर कालात चढ-उतार झाले असतील, आणि आता ती लोकशाहीची मुल्ये जपत नव्या परिवर्तनाला स्वीकारत असेल तर तिचे स्वागत करायला हवे.

राहूल अट्टल राजकारणी नाही आणि हीच त्यांच्या जमेची बाजू आहे. संवेदनशील राजकारणी असे त्यांचे वर्णण करता येईल. त्यांने सरकारला अनेक निर्णय फिरवायला कोंग्रेसच्या व्यासपीठाचा उपयोग केला याला अनेक लोक “नौटंकी” म्हणून हीणवतात. वस्तुस्थिती अशी आहे कि कोंग्रेसमद्धेच आता जुने नेते आणि राहुलमुळे नव्या पिढीचे नेते अशी दुफळी झालेली आहे. जुन्यांना आपली सत्ताकेंद्रे व त्यामुळेच आलेली मनमानी सोडायची नाहीय. ती सोडायला भाग पाडण्यासाठी राहूल कोंग्रेसच्याच व्यासपीठाचा उपयोग करत असतील आणि त्याचा फायदा आम्हाला-तुम्हालाच होणार असेल तर त्याला हास्यास्पद ठरवणा-यांच्या बुद्धीचा विचार करायला हवा.
अलीकडच्याच चाचण्यांमुळे आज चित्र असे दिसते कि संधीसाधु पक्ष आणि त्यांची काहीही होवो—सत्तेतच रहायचे अशा मनोवृत्तीची नेतृत्वे भाषा बदलू लागली आहेत. अशाच संधीसाधुंमुळे देशाचे वाटोळे झालेले आहे. त्यांना कसे हटवायचे व नवी सत्ता-विकेंद्रित अवस्था कशी आनायची हे नागरिकांसमोरील मोठे आव्हान आहे. पंचायत राजमुळे सत्तेचे वितरण झाले पण ते अधिक सक्षम करायला हवे याबाबत दुमत असायचे कारण नाही. भ्रष्टाचाराची अधिकाधिक प्रकरणे माहितीच्या अधिकारामुळेच उजेडात आलीत. तत्पुर्वी प्रकरणे उजेडात येत नव्हती म्हणून भ्रष्टाचार होत नव्हता असे आहे कि काय? अधिक प्रकरणे उजेडात आली म्हणून ब्रष्टाचार-भ्रष्टाचार ओरडण्यापेक्षा यामुळेच भविष्यातील भ्रष्टाचार नियंत्रणात येईल हे आपण लक्षात घ्यायला हवे.
मी राहूल अथवा कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. पण विचारधारा महत्वाची आहे. लोकशाही समृद्ध होईल अशाच विचारधारेला समर्थन देणे ही आजच्या उद्रेकी आणि विक्षोभी काळाची गरज आहे.

नऊ चे बारा

नऊ चे बारा

युवराज : थँक्यू मोईली अंकल.

मोईली : थँक्यू कशासाठी युवराज?

युवराज : मी नऊच्या ऐवजी बारा म्हटलं आणि तुम्ही ते
लगेच जाहीरही करुन टाकलंत म्हणून.

मोईली : त्यात काय मोठं युवराजजी, इटस्…

पुढे अधिक वाचा… >>

किरणोच्छाव सोहळा कोल्हापुर

                      ॐ

किरणोत्सव किरणोच्छाव सोहळा  कोल्हापुर

IMG_1124[1]

IMG_1123[1]

          ॐ
दिनांक तारिख Date ३१. १.( जानेवारी ) २०१४ साला वेळ p . M ५. २४ / 5.24

भेटी 180,000 / १८०, ०००
एक लाख ऐंशी हजार ;  000

भेटी आहेत

Aakash Patil 2014-01-31 07:43:00

Yellow

Yellow Marathi Movie“अभ्यास कर म्हणून सांगितलं तर कधी आमचं ऐकलं आहेस का तू?? सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग? त्यापेक्षा आधीच संग ना नाही जमणार म्हणून, कशाला आमचा वेळ आणि पैसा फुकट घालवू तुझ्यासाठी. माझचं चुकलं. कशाला विश्वास ठेवला काय माहित. काय करायचं ते कर आता, कानाला हात या पुढ.” 

ऑक्टोबरला पण बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर पप्पांचं लांबलचक आणि कधी न संपणार भाषण.अपेक्षा भंग.

आजकाल प्रत्येक व्यक्ती कुणावर तरी अवलंबून असतोच. एकट्याने करायचं धाडस नसेल कदाचित म्हणून अनेकांना सोबत घेत असेल. पण जेव्हा तो आपला विश्वास, आपली अपेक्षा, आपला वेळ एखाद्यावरती खर्च करत असेल तर तेवढंच परत मिळण्याची हमी सुद्धा तो मागत असतो.
काही जन देतात हमी, आणि त्या तितक्याच कसोशीने आणि आत्मियतेने पूर्ण करतात. आपल्यावरच विश्वास सार्थ ठेवतात.
पण काही जन नाही करू शकत पूर्ण, त्याच कारण काही का असेना पण कधीकधी सगळ्या गोष्टी पूर्ण करण जमत नाहीत. एकावेळी अनेक गोष्टी नाही जमत त्यांना. सोप्या भाषेत म्हणजे ते multitasker नसतात. 

पण यामुळे त्यांच्यावरती अपेक्षा लावून बसलेले कित्येक जनांचा मात्र सपशेल अपेक्षाभंग होतो. एखाद्याने आपला विश्वासघाताच केलाय जणू असा त्यांचा अविर्भाव असतो.

आपला अपेक्षाभंग झाला तर त्रास होन स्वाभाविक आहे, पण आपण अपेक्षा बाळगल्याच नाही तर.

आपण आपलं बघायचं. मी कसा वागतोय, माझं कुठे काही चुकतंय का, बस, विषयच संपला.

जे आहे ते चांगल अस म्हणा कि राव, जगुद्या समोरच्याला पण. मान्य आहे चुकतोय तो, पण तुम्हीच त्याला हाड तुड केली तर बाकीच जग तर खाऊन टाकेल त्याला. 

त्याच्यावर आपला विश्वास टाकण्यापेक्षा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढवायला मदत करा.

सोडा सगळ त्याच्यावर, काय हव ते करू द्या, तुम्ही फक्त चांगल मार्गदर्शन करा.

मुळात मुलांकडून काही expect करण्यापेक्षा त्यांना accept करायला शिका.

(वरचा संवाद जरी खरा असला तरी माझे बाबा मला पहिल्यापासून support करतच आले आहेत, त्यामुळे तो संवाद फक्त विषय मांडणी करता आहे. )

कडधान्य

                 ॐ
कडधान्य

उसळी चवळीलाल हरबरे हिरवे मुग व कच्चे शेंगदाणे
सर्व दिवस /  रात्र पाणी मध्ये पातेले घालून भिझत ठेवले झाकण ठेवले
दुसरे दिवस ला पाणी सर्व काढले परत धुतले पांढरे स्वच्छ कपडा मध्ये
घातले बांधून ठेवले  रात्र /  दिवस परत ठेवले मस्त मोड आली
तिखट मीठ कच्चे तेल बरोबरखाल्ले कांही परतून काढले असे पण मस्त लागतात
बसल्या बसल्या चरायला खावयाला वामकुक्षी

 

IMG_0833[1] IMG_1049[1]

IMG_1056[1] IMG_1080[1]

डोळ्यांना या …..

डोळ्यांना या पापण्यांना सोपवावे लागते.
आसवांना पाप
ण्यांशी थोपवावे लागते.

मी म्हणावे शब्द माझा हरवला आहे जरी 
ही कविता काळजाची प्राणाइतकी आहे खरी 

बोलायचे नसतानाही मी बोलतो आहे जसा 
काय वाट्टेल ते वाटो, मी आहे हा असा 

संपेल ही मैफिल जेंव्हा खंत ना राहो अशी 
झोपताना आसवांनी भिजवायची राहिली उशी.

– गजानन मुळे
२९/०१/२०१४

गांधी म्हणजे …

गांधी म्हणजे तुमच्या आमच्या बापांचा बाप,
गांधी म्हणजे हिंसेवर ओढलेला चाप.

गांधी म्हणजे संयम आणि कणखरतेचा कणा,
गांधी म्हणजे जगत्गुरु तुकोबाची वीणा.

गांधी म्हणजे लोकशाहीत शांततेचा दूत,
गांधी म्हणजे स्वावलंबी चरख्यावरच सूत.

गांधी म्हणजे त्याग आणि सहिष्णुतेची मूर्ति,
गांधी म्हणजे सत्य आणि सत्याग्रहाची स्फूर्ति.

गांधी म्हणजे शांती आणि क्रांतीचा आधारस्तंभ
गांधी म्हणजे तिरंग्यातील तो़च शुभ्र रंग.

अकाश

 

                                           

डॉ  P . H . D .  अकाश

अकाश

IMG_0816[1]  Akash


हा अकाश हा अकाश चं

ब्लॉग पोस्ट १, ४७४

                         ॐ
दिनांक तारिख Date 30. 1 ( जानेवारी ) 2014 साल ला
                                 ३०. १ ( जानेवारी ) २०१४ साल ला 
                                   तिस जानेवारी दोन हजार चौदा साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ४७४
                                   1, 474
एक हजार चारशे चौर्याहत्तर चौऱ्या हत्तर वां ब्लॉग पोस्ट होता आहे

प्रतिक्रिया ६७७ / 677 सहाशे सत्त्याहत्तर

भेटी

एकलाख एकूणऐंशी हजार पाचशे ऐंशी
१७९ , ५८० / 179, 580

आपण सर्वांना धंयवाद धन्यवाद

आभारी आहे

IMG_0975[1]

एकलाख एकूणऐंशी हजार पाचशे ऐंशी
१७९ , ५८० / 179, 580

 

IMG_0601[1] IMG_0827[1]

                                          ॐ मी व माझा भाच्चा

                                                     अकाश

                                            मि लग्न च्या आधी चि

पौष अमावास्या

                                                ॐ

                      पौष अमावास्या शाकंभरी महिना

 

                 IMG_1083[2]

IMG_1019[1] IMG_0931

IMG_0995[2] IMG_0985[1]

IMG_0950[1] IMG_0860[1]

IMG_0616[1] IMG_0996[1]

IMG_0891[1] IMG_0960[1]

IMG_0914[2] IMG_1006[1]

IMG_0797[1] IMG_0605[1]

                       ॐ भुर्वव स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धिमही धियो यन: प्रचोदयात्    

IMG_0543[1] IMG_0983[2]

                      DSCF3602

गुण गाईन आवडी

लेख खरंतर उशिरा येतो आहे. डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली तेव्हा यायला हवा होता पण तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या मिडियामध्ये जयजयकाराच्या घोषणा दुमदुमत होत्या. मागच्या लेखामध्ये आलेला एक धागा याही लेखात आहे – व्यक्तिपूजा आणि निरपेक्ष मूल्यमापन. साधारणपणे राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या कारकीर्दीचं वेळोवेळी मूल्यमापन होत असतं. गांधी-नेहरू यांनी कोणत्या चुका केल्या, सचिनच्या पुलशॉटपासून त्याने निवृत्त व्हावं की नाही याच्या चर्चा, सिनेमाची समीक्षा तर नेहमी होतच असते. यात काही गैर नाही उलट प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याला सामोरं जावंच लागतं. पण या अग्निपरीक्षेतून एक वर्ग अलगदपणे सुटला आहे आणि ते कुणाच्या फारसं लक्षातही आलेलं दिसत नाही. वर्तमानपत्रात वेळोवेळी झळकणाऱ्या ‘जगप्रसिद्ध’ शास्त्रज्ञांची यातून सुटका झाली आहे. यामागे अर्थातच वेगवेगळी कारणे आहेत. एकतर शास्त्रज्ञ म्हणजे कुणीतरी ‘लार्जर दॅन लाईफ’, विसराळू, प्रयोगशाळेत तासनतास काम करणारा प्राणी अशी जनमानसात (यात संपादकही येतात) प्रतिमा असते.  त्यामुळे शास्त्रज्ञांनी कोणतंही विधान केलं तर ते तपासून न बघता हेडलायनीत टाकायचं हा शिरस्ता असतो. दुसरं म्हणजे शास्त्रज्ञाच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करण्यासाठी संशोधन नेमकं कसं चालतं याची किमान तोंडओळख असणं गरजेचं असतं. लोकांकडे इतका वेळ किंवा इच्छा नसते त्यामुळे जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञाने कुठलातरी शोध लावला अशी बातमी वाचली की संपादक, वाचक सगळे खूश होतात आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातात. शोध नेमका काय आहे, जागतिक पातळीवर त्याचं स्थान काय या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं.

लेख लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतंच डॉ. राव यांनी आयआयटी मद्रास येथे बोलताना काही विधानं केली. कलाकार, लेखक यांची विधाने तर्कसंगत नसतील तर समजू शकतो, शास्त्रज्ञांचं सगळं आयुष्य मोजून-मापून विधाने करण्यात गेलेलं असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून भोंगळ विधाने आली तर आश्चर्य वाटतं. डॉ. राव यांचा पहिला मुद्दा होता की शास्त्रज्ञांनी ‘सेफ’ विषयात काम करू नये, त्याऐवजी जास्त संशोधन न झालेल्या वाटा चोखाळाव्यात. “In research, we must not want to do safe work.” सल्ला उत्तम आहे पण खुद्द डॉ. राव यांच्या कारकीर्दीकडे पाहिलं तर काय दिसतं? डॉ. राव यांच्या संशोधनामध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली असं संशोधन ‘हाय टेंपरेचर सुपरकंडक्टिव्हिटी’ आणि ‘नॅनोपार्टीकल्स’ या दोन विषयात होतं. हे दोन्ही विषय त्या-त्या काळात सर्वात लोकप्रिय होते. विज्ञानात तत्कालीन लोकप्रिय विषयात संशोधन करण्याचा फायदा हा की संशोधनासाठी निधी चटकन मिळू शकतो. हे अर्थातच डॉ. राव यांनाही चांगलंच ठाऊक असणार. मुद्दा हा की डॉ. राव यांनी अनवट वाटा चोखाळून किती संशोधन केलं? मी रसायनशास्त्रज्ञ नाही त्यामुळे या मुद्द्यावर इतर मते जाणून घ्यायला आवडेल.

पुढचा मुद्दा. हा तर सिक्सरच आहे. शास्त्रज्ञांनी निधी किंवा नोकरी यांच्याकडे लक्ष न देता निरलसपणे काम करावं. “He emphasised the importance of working without seeking benefits, money and grants, calling to mind exemplary scientists such as Newton and Faraday.” इतकं विनोदी वाक्य बरेच दिवसात ऐकलं नव्हतं.  आणि जर असं असेल तर खुद्द डॉ. राव यांनी हा सल्ला अमलात का आणला नाही? सी. व्ही. रामन यांनी एक स्पेक्ट्रोमीटर घेऊन जे जागतिक दर्जाचं संशोधन केलं तसं डॉ. राव यांनी का केलं नाही? त्यांना प्रचंड निधी, अनेक सहकारी, पोस्टडॉक्स, विद्यार्थी यांची गरज का पडावी? आजपर्यंत डॉ. राव यांनी संशोधनासाठी जो निधी मिळवला तो करदात्यांच्या पैशातून आला होता. बंगलोरमध्ये डॉ. राव यांनी ‘जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. त्यासाठीही सरकारकडून निधी मिळाला होता. मग इतरांनी हे करू नये असा सल्ला ते कसा देऊ शकतात? प्रयोगशाळा, संगणक इ. न वापरता आजच्या काळात न्यूटनसारखं संशोधन शक्य आहे का? आणि पैशाचा मोह न बाळगता संशोधन करायचं तर शास्त्रज्ञ आणि त्याच्या कुटुंबीयांनी खायचं काय? नोबेलविषयी बोलताना डॉ. राव म्हणाले, “If you want to get a Nobel prize, you must live very long, as long as you can,” म्हणजे काय? दीर्घायुष्य = नोबेल हे समीकरण कोणत्या तर्कात बसतं? उलट बहुसंख्य शास्त्रज्ञांनी त्यांच्या तरुणपणी केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल मिळालं आहे. नोबेलसाठी जे गुण आवश्यक असतात त्याचा डॉ. राव यांनी उल्लेखही करू नये याचं आश्चर्य वाटतं.

वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या संशोधनाच्या बातम्या आणि प्रत्यक्षात चालणारं संशोधन यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. डॉ. राव यांनी १५०० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले याचा उल्लेख प्रत्येक बातमीत आला होता. अधिकाधिक निबंध = सर्वोत्तम संशोधन हा निकष बहुतेक वेळा फसवा असतो. याचं एक उत्तम उदाहरण फ्रेडरिक सॅंगर याचं आहे. (जॉन बार्डीनही चालू शकेल.) बायोकेमिस्ट्रीमध्ये संशोधन करणाऱ्या सॅंगरने आयुष्यभरात राव यांच्या तुलनेत फारच कमी निबंध प्रकाशित केले पण या संशोधनातून त्याला दोन वेळा नोबेल पारितोषिक देण्यात आलं. संशोधनामध्ये सध्याचं स्पर्धात्मक युग बघता ‘पब्लिश ऑर पेरिश’ याला तरणोपाय नाही. पण केवळ संख्येवर लक्ष केंद्रित केलं तर गुणवत्ता खालावते हे कटू सत्य आहे.

डॉ. राव यांचा गौरव करताना सगळीकडे त्यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ असं संबोधित करण्यात येत होतं. यात एक ग्यानबाची मेख आहे आणि ती फक्त या विषयातील शास्त्रज्ञांनाच कळू शकेल. नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय? आपल्याला डोळ्यांनी जी लहानात लहान वस्तू बघता येते तिचा आकार सुमारे ५० मायक्रॉन असतो. १ मायक्रॉन म्हणजे एका मीटरचे दहा लाख भाग केले तर त्यातील एका भागाची लांबी. आपल्या केसाची जाडी साधारण ५० ते २०० मायक्रॉन असते. एक मीटर लांबीचे शंभर कोटी भाग केले तर त्यातील एका भागाच्या लांबीला एक नॅनोमीटर असं म्हणतात. या नॅनो पातळीवरचं जग आपल्या नेहमीच्या जगापेक्षा बरंच वेगळं असतं. ‘ऍलिस इन वंडरलॅंड’मध्ये फिरताना ऍलिस जशी पावलोपावली आश्चर्यचकित होते तसंच या नॅनोजगतात फिरताना आपणही भांबावून जातो. तिथे जायचं झालं तर तिथली सृष्टी, तिथले नियम यांची ओळख करून घ्यावी लागते. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने या अतिसूक्ष्म जगाचं नुसतं निरीक्षणच नाही तर त्या जगात मनसोक्त विहार करता येणंही आता शक्य झाले आहे. यासाठी जे तंत्रज्ञान आणि ज्या संकल्पना वापरल्या जातात त्यांना एकत्रितपणे ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ असं नाव दिलं गेलं आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, नवीन औषधांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. डॉ. राव रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नॅनोपार्टीकल्स या विषयात बरंच संशोधन केलं आहे. पण नॅनोपार्टीकल्स हा नॅनोतंत्रज्ञानाचा एक भाग आहे. नॅनो तंत्रज्ञानामध्ये नेहमी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक ‘स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप’ आपल्या पुणे विद्यापीठात तयार करण्यात आला. नॅनोतंत्रज्ञानामध्ये ज्या अनेक शाखा येतात आणि ज्यावर भारतातील अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत त्यांच्याशी डॉ. राव यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. अशा परिस्थितीत डॉ. राव यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ म्हणून संबोधित करणे फक्त अतिशयोक्तीच नव्हे तर साफ चूक आहे. डॉ. राव यांच्या विकीवरील पानात नॅनोटेक्नॉलॉजी हा शब्दही सापडत नाही.

डॉ. राव यांनी नेहमीच भारतीय राजकारण्यांची विज्ञानाबद्दलची उदासीनता आणि भारतातील विज्ञानाची खालावलेली पातळी यावर प्रखर टीका केली आहे. टीका योग्य आहेच पण इथेही एक तळटीप आहे. डॉ. राव यांनी आजपर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. यापैकी एक म्हणजे पंतप्रधानांना वैज्ञानिक सल्ला देणाऱ्या समितीचं अध्यक्षपद. इंदिरा गांधी, राजीव गांधी, देवेगौडा, गुजराल आणि मनमोहन सिंग या सर्वांच्या कार्यकालात डॉ. राव यांच्याकडे हे पद होतं. दर वर्षी बजेटमध्ये कुठल्या संशोधनाला किती निधी द्यायचा, देशाचं वैज्ञानिक धोरण ठरवायचं यासारख्या कामांमध्ये डॉ. राव यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. (ते एकटेच नव्हे, त्यांच्याबरोबर काम करणारे समितीमधील सर्व शास्त्रज्ञ.) याखेरीज देशाचं वैज्ञानिक भवितव्य ठरविणाऱ्या असंख्य कमिट्यांवर डॉ. राव यांनी काम पाहिले आहे. याचा अर्थ काय होतो? आज भारतीय विज्ञानाची जी परिस्थिती आहे त्याला काही अंशी तरी डॉ. राव जबाबदार आहेत. आता डॉ. राव यांनी यावर टीका करणं म्हणजे घरमालकाने आपलंच घर किती अस्ताव्यस्त आहे असं म्हणण्यासारखं आहे. फक्त राजकारण्यांवर सगळा दोष ढकलणे कितपत योग्य आहे?

संशोधन मुख्यत्वे दोन ठिकाणी चालत असतं. संशोधन संस्था आणि विद्यापीठं. संशोधनासाठी कुणाला किती निधी द्यायचा हे डॉ. राव ज्या कमिट्यांवर असतात त्या कमिट्या ठरवितात. यात बहुतेक वेळा विद्यापीठांना सावत्र वागणूक मिळते. विद्यापीठात संशोधन करण्यासाठी निधी मिळवणे किती दुरापास्त असतं हे तिथल्या प्राध्यापकांना चांगलंच ठाऊक असतं. संशोधनातील हे नाजूक कंगोरे कधीच समोर येत नाहीत पण त्या-त्या वर्तुळांमध्ये हे सुपरिचित असतं. भारतातील विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये कमीत कमी निधीमध्ये, अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत उत्तम संशोधन चालतं पण दुर्दैवाने याला मिळायला हवी तेवढी प्रसिद्धी कधीच मिळत नाही.

“With great power comes great responsibility.” देशाच्या विज्ञानाचं भवितव्य अनेक वर्षे हातात असताना या जबाबदारीचा नेमका कसा वापर केला गेला याचं शक्य तितक्या निष्पक्षपणे मूल्यमापन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्याची ‘गुण गाईन आवडी’ संस्कृती बघता हे शक्य नाही हे ही तितकंच खरं आहे. कदाचित आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर एकही नोबेल का नाही याचं एक कारण या दृष्टिकोनामध्ये दडलं असावं.

द्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद

() चश्मा
डोळे झाले माझे अधू
दिखती नहीं है दिल्ली.
मिळेल कुठे तो जादूचा चश्मा
दिखाए मुझे जो लालकिला.
() उम्मीद
झाले शरीर जरी म्हातारे
दिल अभी जवान है.
वरेल का मला ती षोडसी

उम्मीद अभी कायम है

Fwd: Interesting articles from Balsanskar.com for you !

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to My Site

तक्षशिला विद्यापीठ : हिंदूंची छाती गर्वाने फुलवणार्‍या प्राचीन भारतीय विद्यापिठांपैकी एक !

Posted: 02 Jul 2012 04:00 AM PDT

‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, मदुरा, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती.

चारधाम

Posted: 01 Apr 2011 04:00 AM PDT

बद्रिनाथ (उत्तरांचल), रामेश्‍वरम (तामिळनाडू), द्वारिका (गुजरात), जगन्नाथपुरी (उडीसा).

चारकुंभ

Posted: 23 Jun 2011 04:00 AM PDT

हरिद्वार (उत्तरखंड), प्रयाग (उत्तर प्रदेश), उज्जैन (मध्य प्रदेश) ,नाशिक (महाराष्ट्र)

सप्त चिरंजिव

Posted: 23 Feb 2011 03:00 AM PST

अश्वत्थामा बलि व्यास हनुमंत

नवरत्ने

Posted: 18 Feb 2011 03:00 AM PST

हिरा मोती प्रवाळ गोमेद


You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.