2013 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog. Here’s an excerpt: The concert hall at the Sydney Opera House holds 2,700 people. This blog was viewed about 25,000 times in 2013. If it were a concert at Sydney Opera House, it would take about 9 sold-out performances for that many […]

चोरी झाल्याचा आनंद

घरी चोरी झाली तर आपल्याला दु:ख होते. चोरी का झाली? चोरी टाळता आली असती का? आपली लापरवाही अथवा लापरवाहीचे खापर घरातल्या कुणाच्या तरी डोक्यावर आपण फोडतोच. घरच्या सर्वाना चोरीपेक्षा चोरीचमुळे वाव-विवादांचा  त्रास जास्त होतो. शिवाय पोलीस, शेजारी, मित्र-मंडळी इत्यादीचा ही त्रास होतोच. शेजार-पाजार्यांना फालतू चर्चे साठी एक विषय मिळतो.

पण कधी-कधी असे ही होते, घरी चोरी झाल्याचा त्रास होण्याऐवजी, त्याचा आनंद होतो. असाच, चोरीचा एक किस्सा आहे. गुप्ताजी आणि शर्माजी दोघांचे घरलागून होते. तो महिन्याचा शेवटचा दिवस होता, नेहमीप्रमाणे सकाळी गुप्ताजी आपल्या दुकानात आणि शर्माजी आपल्या ऑफिसात वं त्यांची मुले शाळेत गेलेली होती.  वर्माजींच्या घरी पूजा आणि पाठ होता, दोघांच्या ही घरच्या स्त्रियातिथे गेल्या होत्या.  दिल्लीत कुठे ही पूजा-पाठ असेल लाउडस्पीकर हा जोरात वाजविला जातो. पूजेपेक्षा, घरात पूजा-पाठ आहे, हे सर्वांना कळणे महत्वाचे. (दिल्लीकरांची दिखाऊ प्रवृत्ती). भुरट्या चोरांना ही याचा फायदा मिळतो. अशीच संधी-साधून एक भुरटा चोर गुप्ताजींच्या घरी शिरला. हा चोर फक्त नगदी चोरायचा. त्यास गुप्ताजींच्या घरी वीस-पंचवीस हजार रुपये भेटले. तिथून तो गच्ची वर गेला. शर्माजींचा गच्चीवरचा दरवाजा उघडा होता. चोर उडी मारून शर्माजींचा घरात शिरला. आता आपले शर्माजी सरकारी कारकून त्यात ही केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणारे (दुसर्या शब्दात मजबूरीने इमानदार असलेले). त्यांचा एक तृतीयांश पगार (१/३) पोरांच्या शिक्षणात खर्च होता. (दिल्लीत अधिकांश शाळा निजी मालीकीच्या आहे, पहिलीची फीस ही दोन हजाराचा खाली नसते). उरलेल्या पगारात कसे-बसे घरचा खर्च चालविणारे.  महिना अखेरी “ठणठण गोपाल” ही परिस्थिती त्यांच्या घरी नेहमीचीच. चोराला घरात काही चिल्लर नोटां शिवाय काहीच सापडले नाही. उगाच वेळ व्यर्थ गेला म्हणून त्यांने वैतागून एका कागदावर खरडले ‘ओय कंगले, इमरजेंसी वास्ते हजार- दो हजार तो घर में  रख्खा कर’ (भिकारडया, घरात कमीत-कमी इमरजेंसी साठी हजार-दोन हजार तर ठेवत जा) आणि एक हजाराची नोट त्या सोबत ठेउन तो निघून गेला अर्थातच गुप्ताजींच्या घरून चोरलेली. 

चोरानी एका रीतीने शर्माजींच्या थोबडातच मारली होती. साहजिकच आहे, ही चोरी गल्लीत चर्चेचा विषय झाली. शर्माजी सरकारी बाबू आहेत, ते इमानदार आहेत. कदाचित शर्माजींची बायको खर्चिक असावी. तसे शर्माजी सीधे-साधे  सरळमार्गी दिसतात पण कदाचित त्यांना कसलंतरी व्यसन असावं. त्यातच त्यांचा पगार खर्च होत असेल अन्यथा हजार-दोन हजार घरात असतातच. लोक शंकेच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघू लागले. काही ही म्हणा,  लोक व्यवहारी असतात. असल्या कंगल्या माणसाकडून आपल्याला काहीच फायदा नाही. उलटपक्षी काही मागण्याची भीती. शर्माजींचा दुआ-सलाम ही कमी झाला. दुसऱ्या शब्दांत त्यांची इज्जत कमी झाली.
दुसरी कडे, गुप्ताजींची इज्जत वाढली. वेळी-अवेळी हा माणूस आपल्या कामी येऊ शकतो, आपल्याला मदत करू शकतो, असे शेजारी-पाजार्याना वाटणे साहजिकच होते. त्याची दुआ-सलाम ही वाढली, मोहल्यातील सर्व लोक गुप्ताजींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले. ते ही चोरीची घटना गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून सांगू लागले. अरे, उस दिन घर में लाख-डेढ़ लाख पड़ा था, भला हो उस मूर्ख चोर का, जिसे पडौसी शर्मा के घर जाने की जल्दी थी. अरे, उसका पूरा का पुरा घर खोद डालता तब भी उस कंगले के यहाँ कुछ नहीं मिलता.  भगवान जो करता है, अच्छा ही करता है. हा! हा! हा!”  

मला ही आत्ता असाच अनुभव आला. दोन-तीन दिवसांपूर्वी मला कळले माझ्या ब्लाग वर लेख छापण्या पूर्वीच दोन महाभागांनी तो लेख आपापल्या ब्लागांवर त्यांचा नावाने प्रकाशित केला. मला आश्चर्य वाटले. सौभाग्याने तो लेख आधी  मराठीसृष्टी या वेबसाईट मी टाकलेला होता. त्याची लिंक सापडली. पण मानसिक त्रास हा झालाच. काल ऑफिसात गेलो होतो. आमच्या कार्यालयात सर्वाना इंटरनेट उपलब्ध नाही आहे. भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्या वेबसाईट वर ‘माझे लेख’ या जागेवर जाऊन आपल्या सर्व लेखनाची डिटेल (पाच-सहा पाने) कापी करून घेण्याचे ठरविले. 

माझ्या मित्र सुनीलच्या  सेक्शन मध्ये इंटरनेट सुविधा होती. लंच टाईमला त्याचा कडे गेलो. तसा सुनील ही ऐक वेगळाच औलिया आहे. मुक्ताफळे तर त्याच्या तोंडावर खेळत असतातच. सुनील, काही प्रिंट घ्यायचे आहे. तो  म्हणाला ‘भाई कविता हो तो चुपचाप लेके पिछली गली से खिसक जा. आज कान में रखने के लिए रुई नहीं है, सुनाएगा तो खूप मारूंगा’(कवितेचे प्रिंट घेउन चुपचाप खिसक, ऐकविण्याचा प्रयत्न केला तर खूप मारीन). मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्या वर तो उद्गारला ‘तेरे जैसे टुच्चों को कोई छापने वाला मिलता नहीं है, बस वेबसाइट लिखकर अपनी खुरक मिटाकर खुद को लेखक समझ रहे हैं(तुझ्यासारखे फालतू लोक, वेबसाइ वर लिहून, आपली खाज मिटवितात आणि स्वत:ला लेखकु समजतात). अरे, पण आता तुला खुश व्हायला पाहिजे. मी म्हणालो, यात खुश होण्यासारखे काय आहे.  सुनील म्हणाला, अरे ज्या वस्तूला काही किंमत असते त्याची चोरी होऊ शकते. भले ही किंमत चार आणा-आठाना का असेना. सॅारी, या पेक्षा छोटा सिक्का आजकाल मिळत नाही, तशी कविता इत्यादींची  किंमत त्या पेक्षा निश्चित कमी असेल.

माझ्या डोक्यात प्रकाश पडला, गुप्ताजींची आठवण झाली. गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून चोरीची कहाणी ऐकवितात.  आपली नसलेली छाती फुलते आहे, असा भास मला झाला.   सुनीलने  माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्या मुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.    

अपेक्षा

                          एखाद्याकडून अपेक्षा करणं चूक  कि बरोबर?नात्यामध्ये एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादू  नये ,कसलीही अपेक्षा न करता समोरच्यावर निखळ ,निर्व्याज्य प्रेम करावं असं  सहसा म्हटलं जातं . पण खरंच आपल्या रोजच्या जीवनात शक्य होतं का हे सर्व ?फळाची कसलीही अपेक्षा न करता आपण आपलं कर्म करत जावं ,असं श्रीकृष्णाने म्हटलंय गीतेत . पण खरंच वागतो का आपण असे ?हे सर्व आदर्श झालं हो . पण आपणा सामन्यांसाठी असतात का हे असले आदर्श ????
                             अपेक्षा  …………. मग नातं कुठलंही असो अपेक्षा या असतातच . मग समोरच्याकडून या नात्याबद्दल काही अपेक्षा धरणं चांगलं कि वाईट ?आई -वडील ,पालक आणि मुलं ,मित्र -मैत्रीण ,नवरा -बायको या सर्वच नात्यांत अपेक्षा असतात . आणि काही अंशी त्या रास्तही धरल्या जातात . 
                           माझ्या मते एखाद्याकडून काही अपेक्षा करणं चूक न्हवे . म्हणजे आपल्या माणसाकडून प्रेमाची ,आपलेपणाची अपेक्षा करण्यात कसली आलेय चूक ?आपण जर एखाद्याची काळजी करतोय ,त्याला जीवापाड जपतोय तर त्या माणसाकडून दोन प्रेमाच्या ,आपुलकीच्या शब्दांची परतफेड व्हावी अशी इच्छा करणं काही गैर नाही . नातं हि टू वे प्रोसेस असायला हवी . निदान भावनांच्या बाबतीत तरी . मग आपण जर काही देत असू तर समोरूनही तितकंच यावं हे अपेक्षित नाही ,पण त्याची सुरुवात तरी दिसावी . इतकंच . अपेक्षा करणं काही चूक नाही पण हा,या अपेक्षा अवाजवी असता कामा नयेत . अपेक्षा कराव्यात पण त्या अपेक्षांची किंमत ते नातं असू नये इतकंच …… 
                                       -मानसी ब्रीदभटकंती : लाडघर बीच : निसर्गरम्य नयनरम्य कोकणी बीच

दापोलीच्या जवळच १० किलोमीटरवर एक मस्त एकांतात रिमोट बीच आहे.. निखळ समुद्रकिनारा आणि आजूबाजूला जंगल अगदी इंग्रजी “U” शेप असलेले….. लाडघर बीच म्हणजे सुट्टीचे नवे हॉट डेस्टीनेशन झालेले आहे …

कोकण किनारपट्टीवर अनेक बीच च्या रांगा आहेत…दापोली शहराच्या जवळपास ही भरपूर मस्त बीच आहेत…रोजच्या धावपळीच्या दगदगीच्या गर्दीच्या जीवनातून विश्रांती घेवून एका शांत निवांत निर्मनुष्य ठिकाणी निर्भयपणे वावरताना खरोखर शरीरातील आणि मनातील थकवा लांब पळून जातो….फार कटकट करून एखाद्या बीच वर पोहचावे तर तेथे ही लोकांची गर्दी वॉटर स्पोर्ट्स करून थकून जाणे मग काही ट्रीप करून अजून थकून जातो याला पर्याय म्हणून साध्या ऑफ सिझन,रिमोट लोकेशन्स,नवीनतम ठिकाणे हेच जास्त पसंतीचे ठरत आहेत…असेच सध्या लोकांच्या पसंतीस उतरलेले लाडघर बीच सर्व बेसिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनत चाललेले आहे तरीही त्याचा मूळ ढंग गुण कायम ठेवून…हे विशेष!!

लाडघर बीच : रेड सी

लाडघर बीच : रेड सी

तर कसे जायचे येथे:

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात….मुबई गोवा हायवेला लागून दापोलीत प्रवेश करणे…दापोली मध्ये नाक्यावर पोलीस चौकीजवळून रस्ता आत जातो तो पकडावा आणि १० किलोमीटर च्या अंतरावर लाडघर…मस्त रस्ता आहे …नंतर एका बाजूला बरचसे बोर्ड लावलेले दिसतात लाडघर हॉटेल्सचे….तेथून कच्चा रस्ता पकडून आत येणे …रस्ता कच्चा असला तरी आत १६ सिटर बस ही आरामात जाते..येथे गुगल नकाशा काका पण काम करायचे थांबतात….मुख्य रस्ता न सोडता पुढे गेले की गर्द झाडीतून रस्ता जातो…..जणूकाही आपण बीच च्या जवळपासही नाही आणि जंगलातून जात आहे असे वाटते….गाडी अचानक वळण घेते आणि आपल्या डोळ्यासमोर आकस्मित पणे सुंदर बीच येते…त्या रस्तावर अनेक घरात घरगुती हॉटेल्स ची सोय आहे सगळी घरे एकदम सी फेसिंग…किनारा आणि घरे यांच्या मधून आपला रस्ता जाते…

काय पाहाल :

लाडघर हा एक पवित्र बीच मनाला गेला आहे..या बीच चे वैशिष्ट्य म्हणजे इथली बीचची रेती लाल आहे त्यामुळे येथे पाण्याचे लाल रंगात रिफ्लेक्शन दिसते म्हणून या बीचच्या भागाला लाल समुद्र असेही म्हणतात…बीच स्वच्छ आणि सुरेख आहे लांबच लांब समुद्र किनारा यावर मस्त फिरायला पाण्यात पोहायला एक नंबर मजा येते आणखी म्हणजे जास्त गर्दी दंगा नाही सगळे वातावरण शांततामय….

मध्ये बीच आणि आजूबाजूला दाट जंगल गर्द झाली नारळाच्या बागा…एकीकडे समुद्र दुसरीकडे जंगल आणि मध्ये किनाऱ्यावर आपण असे झकास वातावरण…..

बीच वर रंगलेला सामना

बीच वर रंगलेला सामना

आम्ही किनाऱ्यावर मस्त क्रिकेट खेळला…नंतर स्वीमिंग केले..सनसेटचे फोटोसेशन झाले……रात्री किनाऱ्यावर गाण्यांची मैफिल रंगली….तसेच किनाऱ्याजवळ गार वाऱ्यात शेकोटी पेटवून काही ग्रुप्स घोळका करून त्या भोवती बसलेले…..

सकाळी उठून फ्रेश हवेत किनाऱ्यावर फिरत होतो…किनाऱ्यावर सकाळी काही वेळ तारा मासा स्टार फिश ही आढळून येतात…समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला डोंगरावर दत्ताचे जुने मंदिर आहे तर दुसऱ्या बाजूला देवीचे मंदिर आहे…आम्ही चालत दत्ताच्या मंदिराकडे निघालो जवळच डोंगर पायथ्याजवळ नवनवीन शैवालखडक आणि तशा वनस्पती दिसल्या त्यांचे फोटो काढून डोंगर चढला….

डोंगरावर जुने लाकडी मदिर आहे….मंदिरासमोर लाकडी मंडप आहे …..तेथे दर्शन घेवून मंदिराच्या मागील बाजूस आलो तेथून समुद्राचा मस्त व्हू होता …फोटोसेशनला स्कोप भरपूर….

शैवाल जन्य वनस्पती

शैवाल जन्य वनस्पती

तेथून मग आजूबाजूच्या बीच ला भेट देवू शकत जसे की हरणे बीच ,महाड बीच ,सुवर्ण दुर्ग किल्ला, अंजीर्ले बीच,करडे बीच .. पण तसे सगळे बीच सारखेच आहेत..

लाडघर च्या जवळच करडे  बीच आहे..बीच थोडे खडकाळ आहे जवळ मोठे हॉटेल्स आहेत..ठीक आहे…थोडे लांब गेले की हरणे बीच येते…तेथे राहण्याची काही सोय नाही पण टाइमपास करायला मस्त ठिकाण आहे…जवळच समुद्रातील सुवर्ण दुर्ग किल्ला आहे किल्ला लहान आहे तेथे मासेमारी करणाऱ्या बोट आपणस सोडू शकतात…हल्ली तेथे किल्ल्यावर हॉटेल चालू झाले आहे अशी बातमी कानावर आली आहे…अंजीर्ले बीच पण मस्त आहे…तसे वॉटर स्पोटर्स साठी महाड फेमस बीच आहे तेथे सिझनला अनेक खेळ असतात आणि खास किनाऱ्यावर चालवायच्या मोटार बाईक ची पण सोय आहे…

काही हॉटेल्सचे पत्ते :

  • पालवी हॉटेल,लाडघर,दापोली,रत्नागिरी ,महाराष्ट. :९६७३१६८८५५ :९६३७१८५४३४
  • चैतन्य निवास लाडघर :९८२३९४८५२० : ९८२३९४७५५१

लाडघर बीच खासियत :

लाडघर हा सुंदर बीच नैसर्गिक विविधता व रिफ्रेशिंग बीच असून हा “तामस तीर्थ” या पवित्र नावाने ही ओळखले जाते.यामुळे येथे स्नानासाठी धार्मिक लोक ही येतात..जवळच नदी समुद्राला मिळते…बीच चा काही भाग शंख शिंपले,दगड लाल रेती यांनी भरलेला आहे..सूर्यास्ताच्या वेळी किनारा अप्रतिम सुंदर दिसतो…लाल रंगाच्या अनंत छटा संपूर्ण किनाऱ्यावर पडतात…

बीच वरील दोन पुरातन मंदिर पैकी एक शंकराचे मंदिर आहे वेलेश्वर या नावाने ओळखले जाते तर दत्ताचे मंदिर डोंगरावर आहे …आपण १५ मिनटात मंदिराकडे दत्त पोहचू शकतो….याच डोंगरामुळे करडे बीच आणि लाडघर बीच हे वेगळे झालेले आहेत….बीच च्या एक टोकाला खडकाळ रेती  तर दुसऱ्या टोकाला मऊ माती असे मस्त  ट्रान्झिशन पाहायला मिळते.

नकाशा :

दापोलीकडे

दापोलीकडे

खानाखजाना :

लाडघर आणि दापोली म्हणजे मासे खाणाऱ्यांची पर्वणीच….सुरमई,पापलेट,झिंगे,काय काय आहे ते मासे….

आम्ही दापोलीला  “सी वूड हॉटेल’ मध्ये जेवण केले पंजाबी व्हेज नॉनव्हेज,मासे अशा जेवणासाठी मस्त हॉटेल आहे हे…

लाडघारला आपल्याला कोणते मासे हवे याची अगोदर कल्पना ज्या हॉटेल मध्ये थांबलोय त्यांना द्यावी लागते मग ते दापोलीवरून हवे ते मासे व समान ,बाटल्या विकत आणतात…

आम्ही रात्री पापलेट माशाचा प्लान केला आणि मग थाळीत पापलेट ,तांदळाची भाकरी ,झिंगे यावर तुटून पडलो….काहींनी ओपनर मागवले….जेवण एकदम झकासच…..

माशाचा बेत..

माशाचा बेत..

नंतर महाड बीच वर शिंदे नावाची फेमस खानावळ आहे दत्ताच्या मंदिराजवळ मेन गावाच्या चौकात..तेथे काय जेवण होते म्हणता…तळलेले सुरमई मासे...गरमागरम चपाती, काटा किर्र रस्सा ,सोलकढी……आत्मा तृप्त…..

…..महाड बीचला किनाऱ्यावर टपऱ्या आहेत तेथेही तळलेले मासे एक नंबर मिळतात…

….समुद्र किनाऱ्यावर लाटाकडे पाहत लाकडी बेंच वर किंवा आराम खुर्चीवर बसून चहा, पोहे यांचा आस्वाद नक्की घेणे..चहा अमृततुल्य लागला नाही तर विचारा……..उत्कृष्ट जेवणाबरोबरच वातावरण ही सुंदर असलेकी जेवणाची गोडी दसपटीने वाढते यात नवल कोणते.

….बीच वरून जाऊन आल्यावर मन एकदम शांत प्रसन्न निर्मल होऊन जाते…कौटुंबिक सहल असो वा मित्राची पार्टी किंवा जोडीदाराबरोबर रिलॅक्सेशन असो….सेलिब्रेशन करायला लाडघर सारखी अप्रतिम जागा दुसरी नाही…..आपणही आता नकीच भेट देऊन या… 🙂

हा सागरी किनारा...

हा सागरी किनारा…

धन्यवाद–MJ 🙂

Filed under: Ladgar Beach, Ladghar Beach, x-All Tablets

जीर्णनगरी मुशाफिरी :पांडवकालीन कुकडेश्वर मंदीर


जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर 

कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. 

इतिहास : 
शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते.
ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.
साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडले नाही. बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची या राजांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी.

जायचे कसे : 
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघर ला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किमी वर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. पण ते २ तास चालणेही वर्थ आहे असे ते पांडवकालीन मंदिर पाहिल्यावर वाटते.
गावाचे नाव ‘पुर ‘ असून कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे. 
जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे. 
बसच्या वेळा : जुन्नर ते कुकडेश्वर 
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

सद्यस्थिती : 
मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेलं आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन किर्तीमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही खूपच भारी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.

हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीवकाम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा गावात निर्णय झालाय. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीवकाम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.

आमची मुशाफिरी : 
कुकडेश्वर मंदिरात पोहोचायला जवळपास ७ वाजले होते. जवळपास अंधार पडत आला होता त्यामुळे तिथे पोहोचूनही काही बघायला मिळेल की नाही असे वाटले.
सूर्य नारायण जाता जाता काही राहिले तर नाही ना? म्हणून टॉर्च मारून बघत असावा असे वाटले.
 


आणि जाताना आकाशाला गिफ्ट म्हणून मावळतीचे रंग देऊन जात असावा.  

पश्चिमाभिमुख शिवमंदिर : 

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार :
उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम  पूर्वी कधी पहिले नव्हते. 

मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर असून त्यात काय आहे ते कळू शकले नाही. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.(अंधार असल्याने आणि ट्राय पॉड नसल्याने याचे फोटो काही धड आले नाहीत. )
प्रवेशद्वारावरील शिल्पे :

मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. थोडीही जागा रिकामी अशी सोडलेली नव्हती. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. असेच सेम शिल्प खांबाच्या इतर दोन्ही बाजूस आहे. त्याखाली ढोल वाजवतानाचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य काहीतरी असावे. यालाच वेलबुट्टी म्हणत असावेत कदाचित. 

 

त्याच्या पुढच्याच/समोरच्या  खांबावर नृत्य शिल्प कोरलेले आहे आणि त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी.  हे काय कोरले आहे याची कुठेतरी माहिती असावयास पाहिजे होती. गावात काही जुनी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा इतिहास माहीत आहे.

 हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.

 महादेव पिंड :

उशिरा तेथे पोहोचल्याचा एक मात्र फायदा झाला की कॅमेराचे काही गोष्टी ज्या आजपर्यंत प्रयत्न केला नव्हत्या त्या कळल्या. अंधारात लॉग एक्स्पोजर / शटर स्पीड कमी करून काही फोटो काढले.
रात्री ८ वाजता एकही लाईट नसताना गडद अंधारात काढलेला फोटो : 

एव्हाना आठ वाजत आले होते. जुन्नर पासून साडेसातला सुटणारी आणि अंजानावळ येथे मुक्कामी जाणारी शेवटची गाडी आम्हाला घाटघरला, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी सोडणार होती. ती पकडण्यासाठी परत ३ किमी चालत जाऊन फाट्यावर उभे राहायचे होते.

आमच्या सुदैवाने आम्ही उभे होतो तेथे एक दुधाची गाडी आली. गाडीतली माणसे आजूबाजूच्या गावातील गावकऱ्याकडून त्यांच्या गाई-म्हशींचे दूध घेतात, त्याचा हिशेब ठेवतात. मग ते दूध एकत्र करून घरी येऊन मोठ्या फ्रीज मध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरी ला विकतात आणि हिशेबानुसार लोकांना पैसे देतात. हेच दूध डेअरी मधून प्रक्रिया होऊन ( घट्ट दुधात पाणी घालूनही ) पुणे आणि आजूबाजूच्या गावास जाते. ओह्ह मला वाटायचे की, चितळ्यांच्या गायीच्या दुधाच्या पिशवीत चितळ्यांनीच  पाळलेल्या गायीचे दूध असेल. असो. गाय कोणाचीही असो, शहरात गायीच्या दुधाच्या पिशवीत गायीचेच दूध येतेय हे हि नसे थोडके !

तर त्या दुधाच्या गाडीने आम्ही ५ मिनिटात फाट्यावर आलो. आता एकदम गडद अंधार पडला होता. आजूबाजूला वस्ती नसल्याने आणि पर्यायाने एकही दिवा नसल्याने सारे नभांगण तारकांनी भरून व्यापले होते. या आधी मान वर करून आकाशात तारे कधी पाहिले हे आठवण्यात काही क्षण गेले. मग आठवले की २ वर्षापूर्वी हरिश्चंद्राला गेलो होतो तेव्हा असेच तारे पाहत बसलो होतो.

मधल्या काळात ताऱ्यांनी खुणावलेच नाही का ? का ते बघण्याएवढी मान कधी वरच आली नाही ?
हॉल च्या छताला लावलेले रेडियम चे तारे जास्त जवळचे वाटले? का हातात अख्खी ‘गॅलेक्सी’ आल्यामुळे ताऱ्यांचे वेडच नाहीसे झालेय?  असो.

पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी हे विचार एकदम तोडले. एकमेव असलेला विजेरी दिवा पेटवला आणि त्या प्रकाशात डबा उघडून जेवण चालू केले. आजूबाजूला गर्द अंधार, निरव शांतता, दूरवर मिणमिण करणारे दिवे, जोडीला हा कंदील आणि डब्यात गोड शिरा. अहाहा ! त्या दिवशी ‘कॅण्डल लाईट डिनर’ चा खरा अर्थ कळला.

जेवण होऊन थोडावेळ एका गावकऱ्याशी गप्पा टाकल्या. थोडा वेळात दोन पिवळे दिवे भयंकर आवाज करत, अंधारातून माग काढत आमच्या दिशेने आले आणि थांबले. मग कळले की ती ST होती. गाडीत बसलो आणी गाडी घाटघर दिशेने पळू लागली. त्यानंतर घाटघरपर्यंत जो काही रस्ता आहे, त्याला ‘कच्चा रस्ता’ म्हणणे  म्हणजे कुत्र्याला गेंडा म्हणणे आहे. फक्त आणि फक्त ‘हमर’ घेऊन जाण्यासाठीच तो रस्ता असून हा ड्रायवर उगाच त्यावर ST चालवतो आहे का काय अशी शंका येते. येथे ST मधून उतरताना ड्रायवर, कंडक्टर आणि ST महामंडळ तिघांनाही सलाम ठोकावासा वाटतो. आम्ही ठोकलाही!

घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला. 

राहायची व्यवस्था :
गावात कोणाकडे तरी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्या समोर मोठी ओसरी आहे. १५-२० लोक तेथे झोपू शकतात. 

अजून काही : 
१. महाराष्ट्र सरकारने हे शिवालय  तीर्थक्षेत्रे बनवून त्याचा विकासकाम (?) हाती घेतले आहे. 
२. कुकडेश्वर मंदिर हे ‘क- वर्गीय’ मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे.            गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘पूर’ गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो ( नदीचा उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
३. पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
४. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबाला हि जाऊ शकतो.

जुन्नर तालुक्यातील क- वर्गीय तीर्थक्षेत्रे :

श्रीक्षेत्र पारूंडे जुन्नर
श्रीक्षेत्र आळे ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र ओतूर चैतन्य महाराज समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र आणे, रंगदास स्वामी महाराज  समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र लेण्याद्री जुन्नर
श्रीक्षेत्र ओझर जुन्नर
श्रीक्षेत्र कुकडेश्वर जुन्नर
श्रीक्षेत्र वडज खंडेराय देवस्थान जुन्नर
श्रीक्षेत्र नारायणगाव मुक्ताबाई व काळोबा मंदिर जुन्नर

पुढचे लेख :

जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
जीर्णनगरी मुशाफिरी : निमगिरी
जीर्णनगरी मुशाफिरी : दुर्ग ढाकोबा
जीर्णनगरी मुशाफिरी : हरिश्चंद्रगड

दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

       अपेक्षेप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्याचबरोबर विधानसभेच्या त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता काही काळापुरती का होईना पण संपल्याचे संकेत मिळत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानायला हवे. बदलती राजकीय स्थिती आणि प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे देशात वारंवार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणे आता यापुढे नित्याचेच ठरणार आहे. त्यावर वारंवार निवडणुका हा काही पर्याय असू शकत नाही. विभिन्न विचाराचे आणि प्रचंड राजकीय वैचारिक विरोधाभास असला तरी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, हाच यावर एकमेव इलाज आहे. अशा बिकट प्रसंगी जर अपरिहार्यतेने विरोधाभासी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असेल तर याला संधीसाधूपणा म्हणता येणार नाही.

       केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याने आता त्यांना जनतेला दिलेले महागाई व कांद्याचे भाव वगळता अन्य अभिवचन पूर्ण करणे फारसे कठीण नाही, कदाचित शंभर टक्के यश मिळणार नाही पण एक पारदर्शक आणि “लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य” असे म्हणण्याइतपत चांगले सरकार ते नक्कीच देऊ शकतात. त्यामुळे लोकाभिमुख राज्यकारभाराचा एक अत्यंत चांगला पायंडा पडण्यास सुरुवात होण्याची नक्कीच शक्यता आहे.

       मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाइलमध्ये एक “महात्मा” दिसत होता. ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. पण सध्यातरी माझा भ्रमनिरासच झाला आहे कारण सत्तेच्या माध्यमातून लोकनेता होणे आजवर कुणालाच शक्य झाले नाही. केजरीवालांना शक्य होईल, हेही शक्य वाटत नाही त्यामुळे आता ’महात्मा’ व ’युगपुरुष’ होण्याची त्यांनी संधी गमावलीच आहे. मात्र त्यांना चांगला ’राजकारणी’ होता आले तर ती भारतीय लोकशाहीला कलाटणी देण्याची लोकाभिमुख सुरुवात ठरेल.

       केजरीवाल उत्साही आहे, मेहनती आहे आणि विषय समजून घेण्यासाठी अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे. सोबत साधी राहणी आणि निर्धोकपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. देश घडवण्यासाठी लागणारी कळकळ आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी परिणामास सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र त्यांचा धूर्तपणा यात सर्वात मोठा अडसर ठरेल असे मला वाटते. दिनांक १७/१२/२०१३ च्या फेसबुकवरील एका पोस्टमध्ये मी असे म्हटले होते की, “कोणाचा पाठिंबा घेणार नाही, कोणाला पाठिंबा देणार नाही” या डावपेचामागे भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सूत्र संचलन आपल्या हातात घेणे, हा उद्देश केजरीवालांचा आहे, आणि नेमके तेच आज ते खरे झाले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर

       ’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरीवालांच्या रूपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणाला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरीवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सद्देगिरीच्या तुलनेत धूर्तपणाच्या होत्या, यात मुत्सद्देगिरी खचितच नव्हती. त्रिशंकू विधानसभेत “आप” निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भूमिका लोकशाहीला पोषक नव्हती. आपची ही भूमिका प्रामाणिकपणाची नव्हती तर भाजपला रोखून स्वतःचे सरकार स्थापन करण्यायोग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी खेळलेली ’आप’मतलबी व धूर्तपणाची खेळी होती, असे माझे स्पष्ट मत आहे.

       निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वात जास्त जागा जिंकून दिल्ली विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला होता. प्रचलित व्याख्येनुसार जनादेश भाजपला मिळालेला होता. भाजपने सरकार स्थापन करणे व इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा देणे, हा सरळसोपा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग होता. मात्र कॉग्रेसच्या मुत्सद्देगिरीने आणि केजरीवालांच्या धूर्तपणाने हा डाव उधळला गेला. याच कारणाने माझ्या नजरेत केजरीवालांचा प्रामाणिकपणा संशयाच्या भोवर्‍यात आला आहे. पण एवढ्याशा कारणाने त्यांच्या डोक्यावरील गांधीटोपीला गालबोट लागले, असे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या डोक्यावर गांधीटोपी काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावरील टोपीपेक्षा जास्त उठावून दिसते, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.

       केजरीवालांना आणि भारतीय शोषित जनतेला अपेक्षित असलेले व्यवस्था परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही व्यवस्था परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. नाहीतर भारतीय जनतेचा परिवर्तनवादी चळवळीवरीलच विश्वास डळमळीत होईल.

       सध्या देशात भ्रष्टाचारविरोधी वातावरण तापवण्यात केजरीवालांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला यश आल्यामुळे देशासमोरील एकमेव समस्या म्हणजे भ्रष्टाचार असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. या गदारोळात शेतमालाच्या भावाचा प्रश्न पार मागे ढकलला गेला आहे. दिड दशकापूर्वी जेव्हा व्ही.पी. सिंग यांनी बोफ़ोर्सच्या मुद्द्यावरून रान उठवले आणि देशात उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला तेव्हा देशात संतापाची लाट उसळली आणि सत्ताबदलाचे वारे वाहू लागले होते. तेव्हा शेतकरी संघटनेने कुशलतेने कर्जमुक्तीचा मुद्दा रेटून ऐरणीवर आणला होता. परिणामत: व्ही. पी. सिंग पंतप्रधान होताच संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना दहा हजारापर्यंतची कर्जमुक्ती मिळवून देण्यास शेतकरी संघटना यशस्वी झाली होती.

       सध्या देशात जे बदलाचे वारे वाहात आहे त्यात शेतीसाठी फ़ारसे आशादायक चित्र दिसत नाही. केजरीवालांचे विचार शेतीच्या अर्थकारणाच्याबाबतीत फ़ारसे उपयोगाचे नाही. कांदा दिल्लीकरांना स्वस्त मिळावा, अशी एकंदरीत मांडणी आहे. मात्र ते जसजसे भ्रष्टाचाराच्या आणि दिल्लीतील जनतेच्या सिमा ओलांडून देशातील शेतीबाबत विचार करायला लागतील तेव्हा शेतकरी संघटनेची शेतीविषयक विचारधारा समजून घेणे फ़ारसे कठीन जाणार नाही. सद्यस्थितीत राहूल गांधी, नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारेंचा विचार केला तर तुलनेने अरविंद केजरीवाल जास्त उपयोगाचे ठरू शकतात. शेतकरी संघटनेचा अर्थवाद पुढे नेण्यासाठी व्ही.पी. सिंगांसारखा अरविंद केजरीवाल यांचा वापर शेतकरी संघटनेने करून घ्यायला हवा.

       सध्यातरी देशात केजरीवाल वगळता राष्ट्रीय पातळीवर दुसरा कोणताही अन्य आशेचा किरण उपलब्ध नाही, त्यामुळे परिवर्तनवादी घटकांनी अरविंद केजरीवालांना सक्रिय समर्थन देण्याची सक्त गरज निर्माण झाली आहे. ही ऐतिहासिक संधी आपण गमावता कामा नये. महाराष्ट्रात आम आदमी पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ संयुक्त कृती समिती, काही रिपब्लिकन पक्ष व आणखी काही संघटना एकत्र आल्यास राज्यात एक ताकदवान दबावगट निर्माण होऊन व्यवस्था-परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले जाऊ शकते, एवढी मला नक्कीच खात्री आहे.

                                                                                                                          – गंगाधर मुटे
—————————————————————————————————–

Filed under: भ्रष्टाचार, भ्रष्टाचार मुक्ती Tagged: अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, राजकारण, My Blogs

राजगड किल्ला


अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड ! राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.


या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.


   राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. 
                                                                     राजगड किल्ला

                                                            बालेकिल्ल्याच ते रांगड रूप                                                                     संजीवनी
                                                            गडावरुन पाहिलेला सुर्यास्त 

                                       दरवाजाचे हे शिल्प म्हणजे उभ्या कातळातील एक सुरेख कोंदण! 

                                        बालेकिल्ल्याचा महादरवाल्यातून सुवेळा माची
                                              बालेकिल्ल्याहून दिसणारी  संजीवनी माची                                                                   सुवेळा  माची

                                                                      राजदरवाजा

                                                                             म्यान दरवाजा

मोबाईल वाली ती

रस्त्याच्या काठावर एका झाडाखाली बेंच वर बसलो होतो. येणारी-जाणारी *हरियाली निहारीत डोळ्यांना तृप्त करत होतो.  तेव्हड्यात तिच्याकडे लक्ष गेलं. कानात हेडफोन, हातवारे करीत कुणाशी गुलगुल बोलत होती. निरखून बघितले ती गुलाबाच्या कळी सारखी सुंदर दिसत होती. बोलताना सारखी हसत आणि खिदळत होती. प्रेमाचा रंग तिच्या गालावर खुलून  दिसत होता. रस्त्याच्या पलीकडे तिचा प्रियकर असावा. कदाचित त्याचाच स्वप्नात दंग,  ट्रफिकची  चिंता न बाळगत बेपर्वा ती तिच्याच धुंदीत रस्ता पार करू लागली. 

अरररे… अचानक मी किंचाळलों. डोळे बंद केले.  क्षणभर शांतता, मगच एकच गदारोळ. एक गुलाबाची कळी पायाखाली चुरगळली होती. 

हरियाली निहारना : एका जागेबर बसून एका तरुण मुलीना बघण्याचा छंद (टिपिकल दिल्लीची भाषा) किंबहुना   इंडिया गेट वर हिवाळ्याच्या दिवसांत लंच मधला बाबूंचा टाईम पास 

(दिल्लीच्या एक मेट्रो स्टेशन वर मोबईल वर बोलता-बोलता एक मुलगी अशीच ट्रेन खाली आली होती) 

नववर्ष ३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करून हिंदु संस्कृती जोपासूया !


You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

१८३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १८: मोक्षविचार (भाग २)


मी आणि माझे हेच साया दु:खाचे मूळ होय. मालकीच्या भावनेतून स्वार्थ उदभवत असतो आणि हा स्वार्थीपणा दु:खाला जन्म देतो. स्वार्थीपणाची प्रत्येक क्रिया, स्वार्थीपणाचा प्रत्येक विचार आपल्यात त्या त्या वस्तूविषयी आसक्ती उत्पन्न करतो आणि लगेच आपण त्या वस्तूचे गुलाम बनून जातो. पण ज्याच्या मनात मुक्तीची इच्छा निर्माण झाली आहे तो या गुलामीत अडकणारच नाही.

ही मुक्ती मिळणार कोठे?  The Song of Sanyasin या त्यांच्या कवितेत स्वामीजी म्हणतात,
तू कुठे शोधिसी? नाही कधी मित्र रे,
मुक्तता लब्ध ही मर्त्य लोकी।
अन्य लोकांतही ग्रंथी की मंदिरी,
शोध तुझा असे हा व्यर्थ की।।

आत्मशोधाच्या विविध अवस्था आहेत. त्यातील टप्पे विभिन्न आहेत. त्यात खरे-खोटे, चांगले-वाईट काही नाही. मुक्तीचा शोध हा सर्व धर्मांचा प्रयत्न आहे. निसर्गाचे नियम मोडू शकेल अशा कोणत्यातरी आदर्शाच्या शोधात मानवजात नेहमी आहे. आपले देव बघा! हवेतून उडतात, पाण्यावर चालतात, वाघ-सिंह-सर्पावर बसतात. त्यांनी मनात आणले तर ते भूक नियंत्रित करु शकतात. माणसाला जे जे काही अशक्य आहे ते ते सारे त्याचे देव करतात. पण आत्म्याचा हा शोध काहीही झाले तरी ठरतो मात्र बाहेरचाच! कारण आपण पूर्ण मुक्त होऊ शकणार नाही असेच तेंव्हा माणसाला वाटत होते.

नंतर हळूहळू त्याला असे वाटू लागले की, या देवता भिन्न नसून त्यांच्यात एकत्व आहे, आणि या देवत्वाशी सर्व माणसांचे अगदी जवळचे नाते आहे. या देवता म्हणजे त्याचे स्वत:चेच प्रतिबिंब, हेही नंतर त्याच्या ध्यानात आले. त्यातूनच अंतरात्म्याची कल्पना त्याच्या हृदयात उगम पावली. जो अनंत परमात्मा आहे तोच सान्त जीवात्मा आहे असे ज्ञान होणे हा या शोधाचा सर्वोच्च आणि अंतिम टप्पा होय. पण त्यामुळे इतर टप्पे कनिष्ठ दर्जाचे अथवा खोटे ठरत नाहीत, हे विवेकानंदांचे म्हणणे आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवे. सर्वांना मुक्तीची आशा आहे. सर्वजण या प्रवासाच्या कोठल्या ना कोठल्या वळणावर आहेत. त्यामुळे कोणीही निराश व्हायचे कारण नाही, खचून जायचे तर अजिबात कारण नाही. प्रत्येकाने प्रवासास प्रारंभ केलेला आहेच. मुक्कामी कोणी आज पोहोचेल, कोणी उद्या, कोणी कालांतराने – पण पोहोचणार तर  प्रत्येकजणच आहे. आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति  सागरम् – आकाशातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जसा अंती सागरालाच जाऊन मिळणार आहे तसा प्रत्येकच जीव मुक्तावस्थेला पोहोचणार आहे. मुक्तीच्या या परिक्रमेची गती वाढविणे नक्कीच त्या त्या जीवाच्या हाती आहे.

विवेकानंद म्हणतात, जाणता किंवा अजाणता या मुक्तीचा शोध घेणे म्हणजेच प्रत्येक मनुष्याचे जीवन होय….. ज्ञानी मनुष्य जाणीवपूर्वक याचा शोध घेतो तर अज्ञानी मनुष्य अजाणताच शोध घेतो. एखाद्या सूक्ष्म अणूपासून ते एखाद्या विशाल तायापर्यंत प्रत्येकाची मुक्त होण्याची धडपड चालू असते.  ज्ञान हे आपले अंतिम लक्ष्य नाही तर मुक्ती हे आपले अंतिम लक्ष्य आहे याची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे.

काहीजणांना वाटते की, आपण काहीही केले तरी आपण मुक्त होणारच आहोत. विवेकानंदांच्या वेदान्तानुसार सर्वांना मुक्ती आहे. मग आपण काही साधना केली किंवा न केली तरी काय फरक पडतो? आहे ते जीवन यथेच्छ उपभोगून घेऊ या. मुक्ती काय आहेच नंतर! कोठे जाते आहे ती?

पण आपण विसरतो की या जगात निखळ चांगली अशी गोष्टच नाही. जग हे सुखदु:खांचे मिश्रण आहे. या जगात गुंतताना आपण कर्माची शृंखला वाढवत असतो. आसक्तीने केलेले कोणत्याही प्रकारचे कर्म – मग ते चांगले असो का वाईट – आपल्याच दु:खाला कारणीभूत ठरत असते. धुळीने माखलेला चेहरा आपण धुळीनेच पुसत नाही. आसक्तीने कर्म करुन आपण मुक्तीचा मार्ग स्वत:साठी अधिकच अवघड करुन घेतो. वाटेल तसे आचरण करुन तुम्हाला मुक्तीची अपेक्षा करता येणार नाही. मुक्तीचा मार्ग प्रत्येकासाठी खुला असला तरी तो तितका सोपा नाही. या मार्गावरुन वाटचाल करण्यासाठी त्यागाची अगदी जरुरी आहे. हा त्याग बाह्यरुपाने नव्हे तर आतून हवा. जनकासारखी, श्रीकृष्णासारखी, शुकासारखी वृत्ती हवी. बाह्य पातळीवर सारे सुखोपभोग घेताना त्यांच्या मनावर कशाचाही परिणाम घडून येत नव्हता. कर्मातून अधिक कर्म निर्माण होऊ न देण्याची युक्ती ज्याला कळली तो मुक्तच आहे. सा तु अस्मिन् परमप्रेमरुपा अमृतस्वरुपाच अशी भक्ती जो करु शकतो तो मुक्तच आहे. ज्याला नेति नेति म्हणत केवळ ब्रह्मच आकळले आहे तोही मुक्तच आहे. आणि ज्याने स्वत:च्या चित्तवृत्तींचा पूर्णत: निरोध केला आहे तोही मुक्तच आहे!

जीवन्मुक्ती आणि विदेहमुक्ती असे मुक्तीचे दोन प्रकार विवेकानंद मानतात. जीवन्मुक्त परमेश्वरी इच्छेनुसार कार्य करीत राहतो. या जगात त्याची स्वत:ची, स्वत:साठी म्हणून काहीही इच्छा नसते. या ठिकाणी श्रीमद्भगवदगीतेतील स्थितप्रज्ञाची वाचकांना आठवण येणे स्वाभाविक आहे. यदा संहरते चायं कूर्मोङानीव सर्वश:। इन्द्रियाणीनिद्रयार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।। असाच हा जीवन्मुक्त असतो.

मुक्ती म्हणजे रुक्षता, कशाबददलच काहीही न वाटणे – अशी भिती काहीजणांना वाटते – अशी  उदासीन अवस्था काय कामाची? पण विवेकानंद म्हणतात की, ही मुक्ती रुक्ष भावावस्था नसून आनंदाची सर्वोच्च स्थिती  आहे. आशिष्टो दृढिष्टो बलिष्ठ:। यस्येयं पृथिवी सर्वं वित्तस्य पूर्णास्यात’ अशा युवकाच्या आनंदापेक्षा हा आनंद शतपटींनी अधिक आहे. (उपनिषदांच्या नेमकया शब्दांत सांगायचे तर १0 च्या १८व्या घाताइतका मोठा आनंद!) लहान मुले जगातील प्रत्येक वस्तूचे मूल्यमापन त्या वस्तूपासून किती मिठाई मिळेल या मापदंडातून करत असतात. आपलीही मुक्तीची अपेक्षा इन्द्रियसुखांच्या आनंदासारखी स्थिती’ अशीच असेल तर मग आपण बालिश बुद्धीचे आहोत असे समजावे.

मुक्तावस्थेचे काही लोकांना भयही वाटते. आपण ब्रह्मरुप झाल्यावर मग आपल्या व्यक्तिमत्वाचे काय होणार याची त्यांना धास्ती वाटते. मी मोठा झाल्यावर माझ्या बाहुल्यांचे काय होईल?असा प्रश्न केवळ लहान मुलेच विचारतात. स्वत:ची, कुटुंबाची, गावाची, तालुक्याची, जिल्हयाची, राज्याची, देशाची, खंडाची, विश्वाची …… अशी तुझी जाणीवेची कक्षा विस्तारत गेली तर त्यात तुझ्या व्यक्तिमत्वाचे काय बिघडले? खरोखर संकोच झाला का त्याचा?

आणि अखेर तुझे स्वतंत्र व्यकितमत्व म्हणजे तरी काय? मी-माझे म्हणत तुझ्या अहंकाराने जमवलेले, जपलेले, घटट पकडून ठेवलेले सारे संस्कारच ना? सारे आहेत का खरेच तुझे? तू तरी तुझा आहेस का? मग कसले भय? कसली भीती? मुक्तावस्थेत आपले परके असे भेदच नसतात, मग कुठला अहंकार? कुठले व्यकितमत्वदुसरे असणारच काय त्या अवस्थेत अखंड, एकरस जाणिवेशिवाय?

श्री अरविंद आणि डा राधाकृष्णन यांच्यासारखे तत्त्वचिंतक नंतरच्या काळात सर्वमुक्तीची (Masss Liberation) संकल्पना मांडतात. त्या दोघांच्या मते व्यक्तिगत मोक्ष हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय नसून सार्वजनीन मुक्ती होईपर्यंत प्रत्येक जीवाला पुन:पुन्हा जन्म घ्यावाच लागतो.

पण विवेकानंदांना हे मत मान्य असल्याचे दिसत नाही. बोधिसत्वाप्रमाणे जीवन्मुक्त इतरांसाठी काम करीत राहील. इतरांच्या मुक्तीसाठी तो त्यांना दिशा दाखवेल हे खरे. पण इतर सर्वजण मुक्त झाल्याविना त्याची मुक्ती पक्की होत नाही असे म्हणणे जरा विचित्र वाटते. ज्या भेदांवरुन आपण जीवांच्या विविध भावावस्था पाहतो ते भेदच मुळी प्रातिभासिक आहेत असे विवेकानंदांचे मत आहे. सर्व जीवांचा जर आपण विचार केला तर मग मानवप्राण्यात मनसुद्धा विकसित व्हायला नकोच होते – कारण पाषाणांमध्ये, जडद्रव्यांमध्ये चेतनेचा इवलासाही विकास दिसून येत नाही. सर्वजण मुक्त होऊ शकतात – नव्हे ते मुक्तच आहेत – अशा अर्थाने सर्वमुक्तीची कल्पना त्यांना मान्य आहे. पण समष्टि अवस्थेस व्यष्टि अवस्था बांधून ठेवणे मात्र त्यांना मान्य नाही!
क्रमश: 

O Lord Rama….

ही बालकविता इंग्रजी मी नर्सरी -हाइम्सला वैतागुन लिहुन संगीतबद्ध केली होती. ही कविता वाचुन आणि संगीत ऐकून हिंदुत्ववाद्यांना आनंदाच्या उकळ्या फुटु शकतील किंवा रामद्वेष्ट्यांना पोटशूळ उठू शकेल…मला मात्र सामान्य जनमानसांतला राम या कवितेत अभिप्रेत आहे…खालच्या शब्दांसोबत जोडलेले संगीत ऐका…

(Chorus “Oh Ram Oh Ram)

I pray to you
I bow before you
O Lord Rama
O lord Rama…(2)

Give me the strength
To seek the truth
The purity of mind
To change the world
Bless me O Lord
O Lord Rama….
I Pray to you…

I wish to make
The world beautiful
free of evil
And Violence
Give me courage
O Lord Rama
I Pray to you…
I bow before you
O Lord Rama…

http://yourlisten.com/sonawani/o-lord-rama

प्रकाशाची मला भिती वाटतेय….

कोठेतरी सारे व्यर्थ
नि उदास वाटतंय
तुडूंब भरलेल्या
काळोखी हृदयाला
घनकाळोखात डुबवावे वाटतंय
एकही लकेर रसरशित
शिरू न शकावी
असल्या कुहरात शिरावसं वाटतंय…

पुन्हा धरित्रीच्या मूक
गर्भाशयात जावंसं वाटतंय!

या कोणत्या वेदना आहेत?
हे कोणते आक्रोश आहेत?
ज्याला काही प्राप्तच करायचे नव्हते
त्याच्या वाट्याला आलेले
हे कोणते प्राप्तन आहे?
मृत्युच्या शवाशी
संभोग करणारे
हे कोणते प्रेत आहे?

काहीही समजत नाही…
काहीही उमगत नाही
चौबाजुंनी उसळनारे उद्रेकी
आक्रोश थांबत नाहीत
व्यर्थतेला सार्थ बनवणारे
हात नाहीत
स्वत:च स्वत:ला
गाडत न्यावे
त्याला पर्याय नाही…

प्रकाशाची मला भिती वाटतेय
त्याच्या स्पर्शातील
एकाकीपणा सोसण्याची
हिंमत हरपतेय……
काळोखही साथ नाकारतोय
अवचित पाठीत खंजिर
खुपसणा-या
विश्वासघातकी
मित्रासारखा…
मृत्युसारखा!

प्रेमात पडल्यावर

प्रेमात पडल्यावर 

पहिला सगळं ठरवायचं असतं
व्यवस्थित, विचारपूर्वक करायचं असतं
खुपदा भेटून बोलायचं असतं
एकमेकांची मनं जुळवायचं असतं
आवडी-निवडी जपायचं असतं
विशावासाचं नातं विणायचं असतं
कारण एकदा प्रेमात पडल्यावर
पुन्हा मागे वळायचं नसतं

#mimarathiap

हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय?

मित्रहो,
संस्कृतीचा आदिम वारसा मिरवणा-या गोमंतभूमीत भरणारे हे शेकोटी साहित्य संमेलन आधुनिक काळातील साहित्य-संस्कृतीच्या प्रकाशाचा, उर्जेचा आणि चेतनेचा उत्सव आहे. शेकोटी या शब्दातच मानवाच्या पुरातन गाथेचा समग्र इतिहास सामावला आहे. अग्नीचा शोध माणसाला लागला ही आदिमानवाच्या जीवनात क्रांती घडवणारी घटना होती. मानवी टोळ्यांनी अग्नी सतत प्रज्वलीत रहावा यातून पहिली शेकोटी पेटवली त्याला आता कदाचित लाखावर वर्ष झाली असतील. मानवी टोळ्यांनी स्थलांतर जरी केले तरी एखादे तरी जळते लाकूड दुस-या स्थानी नेले जायचे. तेथे पुन्हा शेकोटी पेटायची. या शेकोटीचा भवताली बसून टोळीमानव आपल्या आदिम भाषेत गूज करायचा. शेकोटीभोवतीच पुरातन काव्ये स्फुरली. भाषेचा विकास शेकोटीभोवतीच होत गेला. शेकोटीनेच अनेक धर्मांना जन्म घातला. वैदिक धर्मियांचे यज्ञ हे शेकोटीचेच उत्क्रांत रुप. अग्नीत हविद्रव्ये देत ते त्यांच्या अमूर्त देवतांना आवाहने करायचे. पारशी धर्मही पुर्णतया अग्नीभोवतीच फिरणारा. मुर्तीपूजक (पेगन) शैव, ग्रीक, इजिप्शियन धर्मांत मंदिरांत होम पेटायचे. अग्नी सर्वात पवित्र मानला गेला कारण त्याने नुसतीच माणसाची सोय केली नाही तर त्याच्या सांस्कृतीक जीवनात क्रांती घडवून आणली. 
गोमंतभुमीत मानवाच्या संस्कृतीचे किमान चाळीस हजार वर्षांपुर्वीचे पुरावे आहेत. ते पुरावे म्हणजे कुशावती नदीच्या काठी पुरामानवाने खडकांत कोरलेली चित्रे. ही चित्रे जशी त्याच्या कौशल्याची साक्ष आहेत तशीच त्याच्या गूढ धर्मकल्पना आणि जीवनसौंदर्याच्या जाणीवेचे प्रगल्भ दर्शन घडवनारी आहेत. त्यात आदिमातेचे जसे चित्रण आहे तसेच नाचणारी युवती व पशु-पक्षांचेही चित्रण आहे. हे चित्रण करणारा मानव, आपला पुर्वज कोणत्या भाषेत बोलत होता हे आपल्याला माहित नाही…त्या भाषेत त्याने कोणती कवने रचली हे आपल्याला माहित नाही…पण त्या गीत-संगीत तालावर ते नाचत होते…आणि ते नृत्य शिकार करुन आलेल्याला थकव्याला मिटवण्यासाठी, जीवन सौंदर्य खुलवण्यासाठी शेकोटीभोवतीच नाचत होते हे आपण निश्चयाने म्हणु शकतो. आज आपण येथे जी शेकोटी पेटवली आहे आणि त्याभोवती हा साहित्य-संस्कृतीचा जागर सुरू झाला आहे तो मला थेट त्या काळात नेतोय.
संस्कृतीचा प्रवाह अव्याहतपणे जीवंत ठेवण्यासाठीचा हा साहित्य संमेलनाचा उपक्रम मला अभिनंदनीय, अनुकरणीय वाटतो तो त्यासाठीच!
वर्तमानात येतांना मात्र आपल्याला अधिक गंभीर व्हायला लागते. आपण सारे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी आहात. किंबहुना आपण आहात म्हणून साहित्य संस्कृती जीवंत आहे. पण जीवंत असने म्हणजे नेमके काय? आपण कसे जीवंत आहोत? रसरशितपणे जीवंत आहोत कि गलितगात्र जीवंत आहोत? आपली साहित्य संस्कृती कोणत्या प्रकारे जीवंत आहे याचे नीट अवगाहन केल्याखेरीज आपल्याला योग्य निदान करता येणार नाही. आपण त्यावर जर गंभीरपणे चर्चा केली नाही तर साहित्य संस्कृतीचे भवितव्यही आपल्याना नीट ठरवता येणार नाही. या शेकोटीच्या साक्षीने आपण त्यावर चर्चा करुयात.
मराठी साहित्याला पुरातन इतिहास आहे. हालाची गाथा सप्तशती आज उपलब्ध असलेला सर्वात जुना पण कालजेयी पुरावा आहे. गाथा सप्तशतीत इसवी सनाच्या पहिल्या शतकातील मानवी जीवनाचे जे मनमोकळे आणि मनोरम चित्रण झाले आहे तसे दुर्दैवाने नंतरच्या साहित्यातून गायब झालेले दिसते. गाथा सप्तशतीत आठव्या शतकापर्यंत भर पडत राहिली हे येथे लक्षात घेतले पाहिजे. गाथा सप्तशतीतील एक गाथा येथे सांगण्याचा मोह आवरत नाही कारण आपले संचित काय आहे हे समजायला त्यामुळे उपयोग होईल.
“तुह मुहसारिच्छं ण लहै त्ति संपुण्णमंण्डलो विहिणा
आणामां व्व घडइउं वि खण्डिज्जइ मिअंको…”
अर्थ असा आहे…पौर्णिमेचा पुर्ण चंद्रही तुझ्या रुपाशी स्पर्धा करु शकत नाही म्हणून चिडलेला विधाता नवीन चंद्र घडवावा यासाठी या चंद्राचे कलाकलांनी तुकडे करतो आहे.
गाथा सप्तशतीतील सर्वच गाथा नितांत रमणीय आहेत. आपल्या भाषेचे प्राचीन रुप त्यातून दिसते. ही माहाराष्ट्री प्राकृत चक्रधरांच्या…नंतर ज्ञानदेवांचा मराठीत कशी बदलत गेली यावरून मराठीचा प्रवाहीपणा दिसतो आणि बदलत्या काळाबरोबर बदलणारी भाषा कशी चिरकाळ टिकते हेही यातून स्पष्ट होते. मध्ययुगातील भाषा ते आजची भाषाही परिवर्तन स्वीकारत आली आहे. या भाषेने जसे इतर हजारो शब्द उधार घेतले तसेच हजारो शब्द इतर भाषांना दिलेही. आपली माय मराठी प्रगल्भ झाली ती यामुळेच.
पण भाषा वैभवशाली असली तरी आम्ही आधुनिक काळात तिच्यावर साज चढवण्यात कितपत यशस्वी ठरत आहोत हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मुद्दा आहे. मराठी साहित्यावर परपूष्ट असल्याचा आरोप वारंवार होत असतो. म्हणजे मूळ म्हणता येतील अशा कृती मराठीत अत्यल्प आहेत. र. वा. दिघेंसारखे, उद्धव शेळकेंसारखे काही ओरिजिनल साहित्यिक आपल्याकडे दुर्लक्षीत राहिले तर जे उचलेगिरी करत लिहित राहिले ते मात्र “सारस्वत” म्हणून मिरवत राहिले असे आपल्याला दिसते. आपले साहित्य आपल्या मातीचे हवे, आपल्या शैलीचे हवे, आपल्या आशा-आकांक्षा-जीवनस्वप्ने-जीवनशोध त्यातून प्रखरपणे आणि प्रगल्भपणे व्यक्त करणारे हवे ही अपेक्षा साहित्याकडून असायला हरकत नाही. पण गत शतकाने अपवाद वगळता आपली निराशाच केली आहे हे जर तटस्थपणे पाहिले तर आपल्या लक्षात येईल. 
साहित्य हे मानवी संस्कृतीचा उद्गार असते. समाजाच्या रचनेचा, एकुणातील व्यक्तिगत तसेच समष्टीच्या अंतर्गत कलह-विजय-अपुर्णता-पुर्णत्वाची ओढ इत्यादिंचा एकुणातील जो सारगर्भ याला साहित्यातून जीवंत केले जात असते. त्यासाठी साहित्यिकाला…कवीला प्रत्यक्ष जीवनाशी भिडावे लागते. अनुभवसंपृक्त व्हावे लागते. वैश्विक दृष्टीकोनातून समग्र जीवनाकडे पहावे लागते. मग एका सामान्य शेतक-याची साधी गोष्टही वैश्विक बनू शकते. उध्वस्त वृक्षावरील एखादी दहा ओळींची कविताही महाकाव्याचा अनुभव देवू शकते. मी येथे पाश्चात्य लेखक-कवींची उदाहरणे देत नाही. काही प्रयोजनही नाही. कारण आपल्याला आपल्या स्वप्रतिभेने अजून खूप मजल मारायची आहे. त्यांचे जीवन बेगळे, संस्कृती वेगळी, सामाजिक संदर्भ वेगळे आणि त्यांना उपलब्ध असलेले अवकाशही वेगळे. आपला प्रश्न हा आहे कि आम्ही आमचे अवकाश शोधण्यात कमी तर पडत नाही ना? 
आम्ही आमची संस्कृती नीट शोधण्यात, समजण्यात, सामाजिक अनुबंध जाणन्यात कमी तर पडत नाही ना?
आपण मोठे साहित्यिक असलो तरी हा प्रश्न विचारला पाहिजे, सातत्याने, व प्रश्नांची उत्तरेही शोधली पाहिजेत…सातत्याने, कारण आज आपल्या जगाला कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. हा वेग भोवळ आणनारा आहे. त्यामुळे साहित्यिकांसमोरील आव्हानेही तेवढीच वाढली आहेत.
गत शतकातील आढावा घेतला तर हजारोंनी लेखक-कवी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. पण ज्ञानेश्वरांची-नामदेवांची ते तुकोबांची उंची ओलांडुन जाईल…पुढेही टिकेल, कालातीत होईल अशी एकही साहित्यकृती मराठीत निर्माण झालेली आपल्याला दिसून येणार नाही. ज्ञानेश्वर-नामदेव-तुकोबा टिकले ते केवळ त्यांच्या आध्यात्मिक लेखनामुळे असे म्हणता येणार नाही कारण आध्यात्मिक लेखकांची तर फार मोठी मांदियाळी होऊन गेली आहे. जीवनाचे दर्शन हा त्यांच्या लेखनाचा मुलगाभा होता. आमचे साहित्यिक तेथेच कमी पडले हे वास्तव स्वीकारायला हवे. 
मी पारितोषिकांवरून साहित्याची उंची मोजत नाही. मी एखाद्या लेखकाच्या कृतीची समिक्षा किती झाली यावरुनही त्याची उंची मोजत नाही. मी एखादे पुस्तक किती खपले यावरुनही त्या पुस्तकाचा दर्जा ठरवत नाही. साहित्याची उंची आणि खोली मोजायचे एकच साधन असते म्हणजे त्यातील जीवनदर्शन किती प्रत्ययकारी आहे यावरून! तसे असले तर आज वाचक दहा आहेत कि दहा लाख…ते भविष्यात कोट्यावधी होतातच याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. अन्यथा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे साहित्यिकाच्या हातात असतेच. Old Man and the Sea ही अवघ्या शंभरेक पानांची कादंबरी…तिलास नोबेल मिळाले… पण ती हेमिंग्वेने ३२ वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढली होती हे आम्ही विसरतो. 
साहित्यनिष्ठा हा साहित्यिकाचा प्राण असतो. पण मी आजकालच नव्हे तर प्रकाशक झाल्यापासून बघतो…१९९२ सालापासून कि लेखकाला प्रसिद्ध होण्याची अकारण घाई झालेली असते. संपादकीय संस्कार, पुनर्लेखन हे प्रकार अपवाद वगळता लेखकांना आवडत नाहीत. काही लेखक तर मी असे पाहिलेत कि पुस्तक प्रकाशित होण्याआधीच पुरस्कारांची फिल्डिंग लावून आलेले होते. एका नव-लेखकाच्या शोधलेखनात खरेच दम होता…पण अप्रोच बदलला तर ते लेखन एक माइलस्टोन ठरु शकले असते. पण त्यांना आहे तसेच प्रकाशित करायचे होते. कोणी प्रकाशक भेटला नाही तर ते स्वत: खर्च करून प्रकाशित केले. मला आता त्या लेखकाचेही नांव आठवत नाही…आठवतो फक्त विषय. 
म्हणजे आपणच विस्मृतीत जाण्यासाठीच लेखन करतो काय? केवळ पुस्तक यावे व एखादा पुरस्कार मिळावा हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय? मला वाटते आपण हा प्रश्न मनोमन विचारायला हवा. आपापली कृती अधिकाधिक निर्दोष आणि अधिक सखोल जीवनदर्शन घडवणारी होईल याबाबत सजग रहायला हवे. असे म्हणतात लेखनाची एखादी कल्पना स्फुरते तोच प्रतिभेचा क्षण असतो…पुढची कारागिरी असते. पण कारागिरीलाही वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी कल्पना स्फुरण्याचा जो प्रतिभाशाली क्षण होता तेवढीच प्रतिभा पुन्हा पुन्हा पणाला लावावी लागते. 
ज्येष्ठ समिक्षक शंकर सारडा नेहमी म्हणतात कि मराठीत नोबेल पारितोषिक मिळण्याच्या योग्यतेची कविता-कथा-कादंबरी यायला हवी. त्यांचे बरोबर आहे. नोबेल मिळणे हे काही साहित्यकृती श्रेष्ठ असण्याचे लक्षण नाही. गांधीजींना नोबेल मिळाले नाही पण त्यांच्या शिष्याला मिळाले. गांधीजींची योग्यता कधीच कमी झाली नाही. नोबेल समितीला त्याबद्दल खेद व्यक्त करावा लागला. असाच खेद प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण होईल अशा कृती निर्माण करायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?  
असो. आपण आज ज्या जगात जगत आहोत ते कसे आहे? 
आज जागतिकीकरणामुळे जीवनाचे संदर्भ झपाट्याने बदलत चालले आहेत. मानवी नातेसंबंधांची मोडतोड होत त्यांची नव्याने फेरबांधणी होत आहे. त्याचा परिणाम आपल्या संस्कृतीवरही होत आहे. किंबहुना एवढ्या वेगाने सांस्कृतिक-सामाजिक अभिसरण होऊ शकते याची कोणी कल्पनाही केली नव्हती. जागतीकीकरण गोयंकरांना तसे नवे नाही. पुरातन कालापासून विविध संस्कृत्यांचे मानवी समूह येथे आले आहेत. सर्वात आधी तीन-चार हजार वर्षांपुर्वी आले ते सुमेरियन. नंतर जसे हबशी आले तसे शिद्दीही. काही टिकले तर काही पुन्हा स्थलांतरीत झाले. पुढचा इतिहास आपल्याला माहितच आहे. किंबहुना गोवा…ही कोकणची अवघी किनारपट्टी जागतीक संस्कृत्यांसाठी एक पुल बनला. पण आताचे जागतिकीकरण वेगळे आहे. ते चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असू शकतो. मतमतांतरे असायलाच हवीत. पण हे जे संक्रमण होते आहे त्याचे जीवंत चित्रण करणे हे आपणासमोरचे मोठे आव्हान आहे.  
दुसरे महत्वाचे असे की मराठी साहित्यात एक नवाच चातुर्वर्ण्य निर्माण झालेला आहे. म्हणजे शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, ओबीसी साहित्य, प्रादेशिक कादंब-या इत्यादी. समिक्षक अशा कोणत्या ना कोणत्या क्यटेगरीत साहित्य ढकलत त्याचे त्या क्यटेगरीप्रमाने समिक्षण करत असल्याने, व त्यालाही पाश्चात्य साहित्यिक मापदंड लावत असल्याने एक विचित्र स्थिती झालेली आहे. ही स्थिती साहित्यिकांसाठीही विघातक आहे. प्रदेशाचे, जातीयतेचे परिमाण लावून त्या साहित्याकडे पाहिले तर साहित्याचा जो मुलगर्भ हेतू…वैश्विकता कसा साध्य होईल? महात्मा फुले सामाजिक संदर्भात म्हनाले होते…एकमय समाज निर्माण झाल्याखेरीज नेशन…म्हणजे राष्ट्र निर्माण होत नसते. यालाच पुढे नेवून म्हणता येईल कि साहित्यातील सर्व प्रवाहांना एकमयतेच्या दृष्टीने जर आपण पाहू शकलो नाही तर ते मराठी साहित्याला विघातक ठरेल…नव्हे ठरतेच आहे. र. वा. दिघेंच्या कादंब-यांना ग्रामीण कादंबरी किंवा प्रादेशिक कादंबरीचे लेबल चिकटवल्यामुळे पानकळासारख्या अभिजात साहित्यकृतीचे नुकसान झाले आहे हे आपण विसरता कामा नये. 
साहित्यकृती एकतर उत्कृष्ठ असते किंवा चांगली किंवा वाईट…साहित्य हे साहित्यच असते याचे भान समिक्षकांनी ठेवले पाहिजे.
आपल्या साहित्य व्यवहाराच्या अन्य अंगांकडे जरा दृष्टी टाकुयात. आज आपला साहित्य संस्कृतीचा व्यवहार अत्यंत विखंडित झाला आहे असे आपल्या लक्षात येईल. तसा तो सुरुवातीपासुनच आहे. विदर्भातला लेखक पश्चिम महाराष्ट्राला माहित होता होता त्याचे उमेदीचे वय निघून जाते. परराज्यांतील लेखकांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. प्रकाशक मिळणे, त्याची व्यापक समिक्षा होणे हे प्रकार कमीच आहेत. सर्वदूर मराठी भाषकांपर्यंत एखाद्या लेखकाला पोहोचता येईल असे दुर्दैवाने एकही माध्यम नाही. साहित्य विषयाला वाहिलेल्या पुरवण्या आटत चालल्या आहेत. एक-दोन पाने देणारी वृत्तपत्रे आता जाहिरातीच जास्त आणि चतकोर मजकूर अशा अवस्थेला आली आहेत. मग साहित्य प्रचार-प्रसार कसा होणार? नवीन लेखकांना व्यासपीठ कसे मिळणार?
महाराष्ट्रातील साहित्य संस्थाही कृपण बनलेल्या आहेत. परराज्यांतील लेखकांना, समिक्षकांना, विचारवंतांना आपण निमंत्रीत करायला हवे, त्यांची ओळख साहित्य रसिकांना व्हायला हवी यासाठी काही उपक्रम नाहीत. उलट परराज्यातील संस्था मात्र महाराष्ट्रातील लेखक-कवींना आवर्जून बोलवत असतात. त्यांचे मन लावून ऐकत असतात…सन्मान देत असतात. पण आपलेही काही उत्तरदायित्व आहे याचे भान महाराष्ट्रातील संस्थांनी ठेवलेले नाही याबाबत खंत व्यक्त केलीच पाहिजे. 
साहित्य संस्कृतीचे विकसन व्हायला, लेखक-कवींना मोकळे व्ह्यायला, अभिव्यक्त व्हायला साहित्य संमेलनांची, साहित्यिक कार्यक्रमांची, व्याख्यानांची आवश्यकता असते. गोवा हे त्या दृष्टीने श्रीमंत राज्य आहे असे म्हनावे लागेल. मराठी भाषेला अधिष्ठान देण्यात गोव्याने नेहमीच हातभार लावला आहे. किंबहुना गोव्याची संस्कृती घडवण्यात मराठीने मोठा हातभार लावला आहे. बा. भ. बोरकरांसारखे महान कवी याच भुमीने दिले आहेत. असे असतांनाही गोवा शासन मराठीला मात्र प्रशासकीय भाषेचा दर्जा देत नाही ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर हे घटनाविरोधी आहे. घटनेचे कलम ३०, ३४५, ३४७ आणि ३५० (अ व ब) नुसार एखाद्या राज्यातील किंवा त्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात राहणा-या एखाद्या अल्पभाषक गटाने जरी मागणी केली तरी त्यांच्या भाषेला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला पाहिजे. खरे तर घटनेत “राजभाषा” हा शब्दच नाही…आहे तो प्रशासकीय भाषा आणि एखाद्या राज्यात अशा अनेक प्रशासकीय भाषा असू शकतात. हे असे असूनहे मराठी भाषेला गोवा शासन प्रशासकीय भाषेचा दर्जा इतकी वर्ष मागणी करुनही देत नसेल तर ही बाब घटनेच्या विरोधात जाते. सर्वांनी घटनेचा सन्मान ठेवायला हवा. गोवा शासनही ठेवेल अशी मला आशा आहे.  
आजवर दिग्गजांनी भुषवलेल्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यंदा आपण माझी निवड केली याबाबत मी संयोजकांचा आणि आपणा सर्वांचा कृतज्ञ आहे. ही शेकोटी अशाच धगधगत राहो…आपल्या चिरंतन प्रकाशाने साहित्य संस्कृती तेजालत राहो…सर्वांसाठी एक दीपस्तंभ बनो आणि आपल्या सर्वांचे…मग साहित्यिक असोत कि साहित्य रसिक…जीवन समृद्ध करो ही शुभकामना. 
धन्यवाद.