तो हलकाच

मेणबत्त्या पेटवत राहील्या

तरी ती जळतच आहे

तीला कोण जाळतो

त्या वरून मेणबत्तीचं जळणं

ठरतं आहे.

तोरणा ते राजगड ( तोरणा किल्ला ) – भाग १


पावसाळा संपला,दिवाळी संपली आता हिवाळा सुरु होत असल्याने तोरणा ते राजगड या ट्रेकचे  आयोजन केले.मित्रमंडळी जमली दोन दिवसात करण्याचे ठरले.  गुरुवारी मुंबईहून निधून पुण्यात शुक्रवारी पहाटे पोहोचलो. स्वारगेटहून   ‘वेल्हे’   या   एसटीने  प्रवास   करीत  ‘वेल्हे ‘ गावात पोहोचलो.तेथून चहापाणी करून      ‘ शिवाजी महाराज कि जय  ‘ या धोषणा देत मोहीमेला सुरुवात केली.  थंड वातावरणा मावळे जोशात चढाई करीत होते.समोर आव्हान उभे आहे.इतिहासाची उजळणी करीत गप्पा गोष्टी
चालल्या होत्या.
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर.

कानदखोऱ्यात हा गड आहे. खूप उंच उंच उंच. तोरण्याइतका उंच गड तोरणाच. डोंगरी किल्ल्यांत त्याचे स्थान वडीलपणाचे. तोरणा जसा उंच तसाच रुंदही आहे. गाडला दोन माच्या आहेत 

        छत्रपती शिवरायांनी सुरुवातीच्या कालखंडात जिंकलेल्या किल्ल्यापैकी तोरणा किल्ला आहे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून छत्रपतींनी स्वराज्याचे 

तोरण उभारले होते.


     छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेला हा किल्ला पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे “प्रचंडगड’ असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्‍यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत 
                                                                बिनीव्दार  

बाजुचा परिसर पाहण्यात गुंतलो.थोडी विश्रांती घेतल्यानतंर उभी चढाई करीत ‘बिनी दरवाजा’ शिरलो.

                                                                कोठीव्दार      

       बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण थेट बालेकिल्ल्यातच शिरतो. 


 हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुनहा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.1470 ते 1486 च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5 हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करू न आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

                                                                     झुंजार माची


झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल खोल कडे आहेत. महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंगतीत तोरणाचा मान पहिला .

हनुमान बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते.तोरणाला बिलगून खालच्या बाजूस असणार्‍या डोंगराच्या सोंडेवर बांधलेली ही माची निव्वळ अप्रतिम.

झुंजार माचीकडे जाण्याकरिता येथून एक छोटीसी शिडी उतरवून जावे लागते. आणि पुढे एक rock patch आहे तो पार केला कि ( येथून जरा सांभाळून उतरावे लागते नाहीतर थेट खाली पडण्याची शक्यता ) आपण पोहोचतो झुंजार माची वर.झुंजार माचीचा बांधकाम नावाप्रमाणेच शोभून दिसतं. या रस्त्यावर सदरेचे उद्वस्त अवशेष आहेत.

झुंजार माचीवरून गडाचा गड राजगड रुबाबदार पणे उभा दिसला, अस वाटत होत की तो पण आम्हाला बोलवत आहे. 

                                                तोरणा वरचा सुर्यास्त 
                                                              बाजुला बुधला माची


                                                            मेंगाई देवीचे मंदीर
बुधला माचीच्या मध्यभागी एक डोंगराचा सुळका उभा आहे व त्या वर एक प्रचंड आकाराचा दगड अनेक शतकांपासून आजही आहे. त्यामुळे तो लांबून एखादया तेलाच्या बुधल्या सारखा म्हणजे रांजणासारखा दिसतो. म्हणून या चिंचोळ्या माचीला बुधला माची म्हणतात.


                                                                      बुधला माची


बुधला माचीकडचा परिसर बघायचा होता… या माचीकडे जाणार्‍या वाटेने कोकण दरवाज्यापाशी आलो नि थांबलोच.. इथून तोरणाची एक महत्त्वाची नि वैशिष्ट्यपुर्ण असलेली बुधला माची संपुर्णपणे नजरेत भरत होती.

हा तोरणा अत्यंत बळकट, बिकट गड आहे. काळेकभिन्न, ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजे,  काळ्या सापासारखी वळणे घेत सळसळत जाणारी तटबंदी, अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला असे तोरणाचे रांगडे सौंदर्य शिवरायांच्या नजरेत भरले.

                                                                 कोकण दरवाजा                               बुधला माचीला मागे ठेवून खाली उतरण्यास लागलो.


                                                           तोरणा किल्ल्याचा नकाशा

अभिनिवेश

क्षितिजावर अडला आहे
उत्तुंग नभाचा पूर
वा सहनशीलतेअंती
उधळले कुणी चौखूर

की पायदळाच्या तुकड्या
ह्या दबा धरुन बसलेल्या
घेरून, गराडा घालुन
हल्ल्यासाठी टपलेल्या

रंजला कुणी विद्रोही
बांधून मनाशी गाठ
देणार कदाचित आता
तो उद्रेकाला वाट

हे सगळे सगळे दिसते
मी तरी उदासिन, निश्चल
राखतो चेहरा माझा
पण आतुन अस्थिर, चंचल

हृदयाच्या पटलावरती
शब्दांनी खरवडतो मी
डोळ्यांच्या लालीने मग
कवितेला पेटवतो मी

मी षंढ,

प्रकाशासाठी….!

माझ्यासमोर खडा 
भरभक्कम
अंधाराचा सरळसोट
पहाड
चारी बाजुंनी होणारे त्याचे
ओंगळ स्पर्श
बेभान विचकट 
हसणारी
उपेक्षांची वादळे
कधीही रसातळाला 
पाठवू शकतील मला
अशी
पण मी प्रयत्न करतोय
चढायचा
तो अंधाराचा
भिषण कडा
हात चेमटत असले तरी
पाय सोलवटत असले तरी
ठेवून जातो शरीरातील
वाहता
रक्तमय प्रकाश
माझ्यासारख्या वेड्यांना
मी पोहोचलो तरी होतो
कुठवर हे समजण्यासाठी…!

कोसळलो जरी मी मधेच
खाईत अंधाराच्या
माझे प्रकाशमय रक्त
खुणावत राहील
अंधारकड्यापारच्या
प्रकाशाला
स्वच्छ आणि तेजोमय
पण
जोवर थकून कोसळत नाही मी
चढत राहिलेच पाहिजे…
कासाविस वेदनांना
अंधारात लपवलेच पाहिजे…

प्रकाशासाठी….!

वडार समाजाचा इतिहास

वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नांवे मिळालेली दिसतात. उदा. महाराश्ट्रात वडार म्हणत असले तर कर्नाटकात त्यांनाच वड्डर म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला वड्डोल्लु वा ओड्डर असे म्हटले जाते तर तमिळनाडूत ओट्टन नायकन वा ओड्डर म्हणुन ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यात त्यांना ओड अथवा ओडिया म्हणून ओळखले जाते.

मूळ व मूळस्थान:

आजवर जे लिखित संदर्भ सापडलेले आहेत त्यावरून ओडिसा हे वडारी समाजाचे मुलस्थान आहे असे विविध संशोधकांनी सिद्ध केले आहे.  १८७१ सालच्या जनगणणेच्या अहवालात “देशाच्या विविध भागात सापडणारे वड्डा(र) हे मुळचे ओडिसा व आंध्र प्रांतातील आहेत.” असे नमूद करुन व्यवसायानिमित्त ते इतरत्र पांगले असे नोंदले आहे. “वड्डा” या शब्दाचा शब्दश: अर्थ होतो “ओड्र देशाचा. म्हणजे ओडिसाचा” असे १९०९ मद्धे थर्स्टनने नोंदवले आहे. ओड शब्दातुनच ओडिया, ओड्ड, वोडे, वडार, वड्डर, ओटन, वोड्डे ई. हे शब्द प्रांतनिहाय प्रचलित झाले.  ओडिया लोक राजपुतानामार्गे पंजाबमद्धे विस्थापित झाले असे हयवदन राव यांनी पुराव्यांनी दाखवून दिले आहे. (१९२७) हे झाले इंग्रजकाळातील वडार समाजाबाबतचे संशोधन.

आपण अजून मागे गेल्यास “ओड” “आंध्र” ही नांवे औंड्र या पुरातन मानववंशापासुन आली आहेत असे दिसून येते. औंड्र हा भारतातील एक पुरातन मानवगण आहे. या गणाचे वास्तव्य प्राचीन काळापासुन ओडिसा, आंध्र व काही प्रमाणात महाराष्ट्र हे राहिले आहे. ऐतरेय ब्राह्मणानुसार हे विश्वामित्राचे पुत्र होते व त्याने “शूद्र व्हाल व दक्षीणेत राज्ये वसवाल” असा शाप दिला होता. महाभारतानुसार औंड्र, पुंड्र हे बळीराजाचे पूत्र होते. त्यांनी स्थापन केलेली राज्ये त्यांच्या नांवावरुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील साडेचारशे वर्ष सत्ता गाजवणारे सातवाहन घराणेही औंड्र उर्फ आंध्र जातीचे होते.

थोडक्यात ओड उर्फ वड्डर, ओडर, वडार यांचे मुळ औंड्र या अतिप्राचीन मानवगणात जाते. ती ओळख व नांवाची खुण वडार समाजाने जतन करुन ठेवली आहे.

महाभारत व ऐतरेय ब्राह्मणातील अतिशयोक्तीचा भाग सोडून दिला तरी हा एक पुरातन मानवगण होता याबाबत शंका राहत नाही. आजचे वडार हे याच मानवगणाचे अंश होत असे म्हनणे वावगे होत नाही. औंड्र/पुंड्र हे मानवगण शिवभक्त होते त्यामुळेच कि काय आंढ्र-ओडिसामद्धे आजही विपूल प्रमाणात पुरातन शिवमंदिरे आढळतात.

मुळ व्यवसाय:

वडारांच्या व्यवसायाचे मूळ शोधायला गेलो तर आपल्याला लाखो वर्ष मागे जावे लागते. मानवी संस्कृतीच्या प्रवासात अनेक युगे अवतरली, त्यातील एक म्हणजे पाषाणयुग अथवा अश्मयुग होय. आदीमानवाने पाषाणांपासुन विविध हत्यारे तयार करायला सुरुवात केली तेथेच या युगाचा उदय झाला. दगडांपासून हातकु-हाड, तासण्या, पाटे-वरवंटे ई. बनु लागले तर गारगोट्यांपासुन बाणांची टोके, टोचे ते अगदी सुयासुद्धा बनू लागल्या. हे काम कष्टाचे असणार यात शंका नाही. जेथे उत्तम प्रतीचा दगड मिळत असे तेथे अशी हत्यारे व अन्य मानवोपयोगी वस्तु बनवण्याचे लघुत्तम कारखानेच सापडले आहेत. महाराष्ट्रात धुळे, नेवासे, बोरी, चिरकी येथे अशी हत्यारनिर्मिती केंद्रे उत्खननांत सापडली आहेत. याचा अर्थ असा होतो कि पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तु बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. किंबहुना याला आद्य व्यवसाय म्हणता येईल.

पुढे शेतीचा शोध लागला. माणुस स्थिर झाला. घरे बांधु लागला. उत्तरेत गाळाच्या मातीचे प्रमाण जास्त असल्याने घरबांधणीसाठी दगडाऐवजी कच्च्या व नंतर पक्क्या वीटांचा तर काही ठिकाणी लाकडाचा उपयोग होऊ लागला. सिंधू संस्कृतीतील सर्व घरे आपल्याला वीटांत बांधलेली दिसतात तर दगडाचा उपयोग फारच कमी व मर्यादित दिसतो. मात्र दक्षीणेत वेगळी स्थिती होती. दक्खनचे पठार व सह्याद्री बेसाल्ट जातीच्या पाषाणाच्या विपूलतेसाठी प्रसिद्ध आहे. पाषाणकार्यात तरबेज लोक दक्षीणेतच अधिक प्रमाणात विकसीत होणे स्वाभाविक होते. वडार समाजाच्या अधिकाधिक वसत्या दक्खनेत त्यामुळेच बनल्या असाव्यात.

जाते हे साध्या प्रकारचे दळण्याचे यंत्र. याचा शोध इसपू १००० च्या आसपास लागला. नेवासे येथे असे पुरातन जाते मिळुन आले आहे. पाटा-वरवंट्यावर धान्य बारीक करण्याऐवजी लोक जात्यांचा वापर करु लागले. वडार समाजातील एक शाखा त्यात प्राविण्य मिळवून एक पोटजात बनली.

वडार समाज हा मुळचा पाथरवट समाज. पत्थरांशी नाळ जोडलेला. घरे-नगर-किल्ले यांची बांधकामे ते लेण्यांची रचना-खोदकाम यात निष्णात. महाराष्ट्रात आजवर हजारापेक्षा अधिक लेणी सापडलेली आहेत. सातवाहन काळात लेणी खोदण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली. बौद्ध-शैव-जैन लेण्यांची समृद्धता पाहून आजही चकित व्हायला होते. खडकाच्या अखंडतेचे अंदाज बांधणे, संकल्पचित्र ठरवणे व त्यांना प्रत्यक्ष खोदून आकाराला आणणे हे आजही सोपे काम नाही. त्यावेळीस मर्यादित साधनांच्या मदतीने असे शिक्ल्पवैभव निर्माण केले गेले ते या वडार समाजाच्या पाषाणकौशल्याने.

सातवाहन काळात वडारांना सेल वढकी अथवा वढकी असे म्हटले जात असे.अनेक शिलालेखांत ही नांवे पाथरवटाचा पर्यायवाची म्हणून हा शब्द आला आहे. किल्ल्यांची रचनाही याच काळात सुरु झाली. त्यासाठी लागणारे पत्थर घडवणे, गवंड्यांच्या मदतीने त्यांची रचना करत अभेद्य असे बुरुज व तटबंद्या निर्माण करणे या कामात मध्ययुगापर्यंत हा समाज अग्रेसर होता.

कामाचे स्वरूप असे असल्याने हा समाज साहजिकच एक काम संपले कि दुस-या कामासाठी दुसरीकडे विस्थापित होत होता. भटकेपण या समाजाला चिकटले ते या समाजाची अपरिहार्यता म्हणुन. पाषाणकार्यात अनेक प्रकार आल्याने त्या त्या कामात प्राविण्य मिळवणा-यांच्या पोटजाती बनु लागल्या. मण्ण अथवा माती वडार हे मृत्तिकाकार्यात कुशल. गाडीवडार हे दगडाची खाण करुन दगड वाहण्यात तसेच विहिरी-तळी खोदणारे, पाथरवट हे लेणी-मंदिरे ई. कामांत कुशल. कल्ल वडार हे जाती, पाटे, वरवंटे यात कुशल.

मुळात या व्यवसायात जितके कौशल्य हवे असते तितकेच ते काम कष्टाचेही. मोठमोठे पाषाणखंड तोडुन चिरे घडवणे ते दगडी वस्तु बनवण्यासाठी शारीरिक शक्तीचीही तेवढीच आवश्यकता. त्यामुळेच कि काय महाबली बजरंग या समाजाचे आराध्य न बनता तरच नवल. या समाजात स्त्रीयांनाही बरोबरीचे स्थान. स्त्रीया पुरुषांइतकीच कष्टाची कामे करत असत.

या समाजाने आजवर निर्माण झालेल्या महाकाय वास्तू, लेणी, किल्ले, वाडे, सामान्य घरे ते रस्ते, तळी, विहीरींच्या निर्मितीचे काम केले आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे, अत्यंत मोलाचा आहे…किंबहुना आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या काळांचा इतिहास समजतो तो याच समाजाने बांधकाम केलेल्या वास्तुंच्या अवशेषांतुन. त्यांचे कौशल्य किती उच्च दर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी ठायी मिळतात. दुर्दैवाने ज्या राजांनी अथवा धनिकांनी बांधकामे करवून घेतली त्यांच्या नोंदी मिळत असल्या तरी वडा-यांबाबतच्या नोंदी मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे आपल्याकडे तशी प्रथा नाही. निर्माणकर्त्यांची नांवे सहसा कोठेही मिळत नाहीत. पण काहीही असले तरी समाजसंस्कृती घडवण्यात या समाजाचा मोठा वाटा होता हे नाकारता येत नाही.

पुराकथा:

भारतातील प्रत्येक समाजाचा स्वत:चा असा पुरा-इतिहास आहे व तो त्यांनी पुराकथांतून जपला आहे. आपापल्या व्यवसायाचा-सामाजिक स्थितीचा, सामाजिक अवस्थेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत कधीतरी या पुराकथा निर्माण झाल्या. वडार समाजही त्याला अपवाद नाही.
वडार समाजातही अनेक पुराकथा आहेत.येथे आपण काही मोजक्या पुराकथांचा मागोवा घेऊ.

१. शिव-पार्वती एकदा भूलोकी संचार करायला आले. नेमका तेंव्हा कडक उन्हाळा होता. प्रचंड उष्म्यामुळे दोघांना तहान लागली. शिवाने आपल्या घर्मबिंदूंतून कुदळ-फावड्यासहित एक माणुस निर्माण केला. पार्वतीच्या घर्मबिंदूंतून एक स्त्री घमेल्यासह निर्माण झाली. या जोडप्याला शिव-पार्वतीने विहिर खोदायला सांगितली. जोडप्याने काही वेळात विहिर खोदली. विहिरीतील पाणी पिउन शिव-पार्वती तृप्त झाले. त्यानंतर शिव-पार्वतीने जोडप्याला अमूल्य उपहार दिले. पण जोडपे खूष झाले नाही. यावर शिव संतप्त झाला व त्याने शाप दिला कि “तुम्हाला पोट भरण्यासाठी घामच गाळावा लागेल…”

आपले काम कष्टाचे आहे या जाणीवेतून ही शापकथा कधीतरी निर्माण केली गेली हे उघड आहे. पण त्याच वेळीस आपली निर्मिती शिव-पार्वतीपासून झाली आहे हा शैव असण्याचा अभिमानही त्यातून जपला गेला आहे.

२. प्रचंड दुष्काळ पडल्याने भगिरथाचे भाऊ पाण्याच्या शोधात पृथ्वी खोदू लागले. खोदत खोदत ते पार पाताळापर्यंत जाउन पोचले. तेथे एक मुनी ध्यानस्थ बसलेले होते…पण या खोदाईने त्यांची समाधी भंग पावली त्यामुळे ते संतप्त झाले. मुनीने त्यांना केवल कृद्ध नजरेने जाळुन टाकले. व “तुमचे वंशज खोदकामच करत राहतील…” असा शाप दिला. इकडे आपले भाऊ दिसत नाहीत म्हटल्यावर भगिरथ त्यांना शोधत पाताळात येऊन पोहोचला. आपले भाऊ जळून खाक झालेले आहेत हे पाहून तो दुक्खी झाला व मुनीची करुणा भाकली. मुनी म्हनाला, “जर तू गंगा पाताळात आणली तर गंगेच्या स्पर्शाने तुझे भाऊ जीवंत होतील.” भगिरथाने पुढे गंगा पृथ्वीवर आणली व त्याचे भाऊ जीवंत झाले. हेच आपले पुर्वज होत असे ही पुराकथा सूचित करते.

३. रासमाल या ग्रंथात वडारांसंबंधी एक कथा येते. गुजरात नरेश सिद्धपाल जयसिंहाने पाटण येथे सहस्त्रलिंग तलावाच्या निर्मितीचे काम वडारांना दिले. वडार स्त्रीयांपैकी जस्मा या सुंदर स्त्रीवर सिद्धराजाचे मन गेले. पण ती त्याला वश होईना. एकदा कामातूर सिद्धराज तिला महालात नेण्याचा हट्ट करू लागल्यावर जस्मा पळत सुटली. राजाने तिचा पाठलाग केला व आदवे यणा-या वडारांनअ ठार मारले. मग जस्माने आत्महत्या केली. मरतांना तिने सिद्धराजाला शाप दिला कि, “तुझ्या तलावात कधीही पाणी साठनार नाही.” आणि वडारांना ती म्हणाली कि, “यापुढे वडारांत सुंदर स्त्रीया निपजनार नाहीत.”

वडार स्त्रीया मुळातच पुरुषांइतकीच कष्टाची कामे  उन्हातान्हात करत आल्या असल्याने तसेही सुखवस्तू नागरस्त्रीयांत असणारा नाजूकपणा त्यांच्यात असणे अशक्यच होते. मानवी मन हे अत्यंत गहन आहे आणि ते आपल्या वास्तवाचे कारण शापकथांत-पुराकथांत शोधत असते आणि मनाची समजूत काढून घेत असते. सर्वच मानवी समुदायांनी अशाच पद्धतीने पुराकथांची निर्मिती केली आहे हे आपल्या लक्षात येईल.

अवनतीचा कालखंड

मध्ययुगात, विशेषत: बाराव्या शतकानंतर, वेठबिगारीची प्रथा सुरु झाली. वेठ म्हणजे राजसत्तांनी फुकटपणे निर्मानकर्त्यांना आपली कामे करण्यासाठी जवळपास फुकटात राबवून घेणे होय. एक शिवराय आणि संभाजीराजांचा काळ सोडला तर ही प्रथा इंग्रजांचे राज्य येईपर्यंत सुरु होती. यामुळे वडा-यांपासून ते चांभार, लोहार, मातंग ई. निर्माणकर्ते समाजघटक पुरते नागवले जायला सुरुवात झाली. म्हणजे कौशल्यांत कमी पडायचे तर नाही पण मोबदला काहीच नाही. यामुळे इतर समाजांप्रमाणेच वडार समाजावर औदासिन्य न येते तरच नवल. त्यात आधी व्हायची तशी भव्य कामे होईना झाली कारण राजकीय अस्थिरता. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकत आणि दुस-या सहस्त्रकात हा खूप मोठा फरक दिसून येतो. शिवाय मुस्लिम राजवटीत तर आपण बांधून घेतलेल्या वास्तूसारख्या दुस-या वास्तू पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून निर्माणकर्त्यांचे हात तोडने ते ठार मारणे असे उद्योग करत. हे आपण ताजमहालाच्या बाबतीतील दंतकथांत पाहु शकतो. याची परिणती कौशल्ये विकसीत करणे सोडा, आहे ती कौशल्येही मागे सारली जाऊ लागली. वडार समाजही त्यात मागे राहिला नाही.

पुढे आले इंग्रजांचे राज्य. ही एक वेगळीच आफत ठरली. त्यांनी अनेक क्षेत्रंत आधुनिक तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली. परंपरागत कौशल्ये मागे पडू लागली. त्यांचे वास्तुरचना शास्त्र आल्याने वडा-यांचा रोल फक्त ताशीव दगड घडवणे व माती आणने एवढ्यापुरताच मर्यादित झाला. उखळ, जाती, पाटे-वरवंटे यांचे मार्केट तसे मर्यादित कारण दगडाचे असल्याने त्यांचे आयुष्य मोठे…फारतर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. त्यासाठी भटकंती. रेल्वे-रस्ते-घरे यासाठी दगडफोडी, तळी-विहीरी खोदने एवढेच सामान्य दर्जाचे काम वडा-यांना उरले. पिढ्या-दर-पिढ्या कौशल्ये विस्मरणात गेली. एके काळी भव्य आणि कलात्मक लेणी-किल्ले-वास्तू-मंदिरे निर्माण करणारे वडार सामान्य मजूर बनले. दगडांच्या खाणी त्यांच्या हातून जात ठेकेदारांच्या उदरात जायला लागल्या.

याची अपरिहार्य परिणती म्हणजे ढासळलेली आर्थिक स्थिती. बकालपणा. यातुनच येणारे वैफल्य. त्यातून या समाजाला उदरभरणासाठी व्यवस्थेचे कायदेही मोडावे लागले. इंग्रज सरकारने सारी जमात गुन्हेगारांच्या यादीत घालून टाकली. दमन करना-या इंग्रजी राजवटीत ते अपरिहार्यच होते. आपण स्थानिक लोकांच्या कला-कौशल्यांचा आणि पारंपारिक व्यवसायांचा अंत घदवत आहोत याची जाण परकी सत्तांना येणे शक्यच नव्हते.

आज तरी परिस्थिती काय आहे? स्वातंत्र्य आले आहे पण भटक्या समाजांना स्थिर करण्यासाठी आपले सरकारही कृतीहीन आहे. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलले गेले आहेत. प्रचंड इतिहास असलेला हा समाज आज आधुनिक तंत्रज्ञाने आल्याने कोणाच्या खिजगणतीतही नाही. आपल्या आस्तित्वाच्या शोधात असलेला हा समाज आपले पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करत आहे.  त्याला सुयश लाभो या शुभेच्छा!

देवराय (१)

देवरायनं मांडी मोकळी केली. पाठ ताठ केल्यावर जरा बरं वाटलं. पायाची बोटं सुन्न झाली होती. दुखत तर होतीच. गुडघा चांगलाच सुजला होता. आसन जरासं बदलून त्यानं पुन्हा सुरवात केली. बाजूला पोस्टकार्डांचा छोटासा ढीग. हाताखालचं कोरं पोस्टकार्ड ओढून, नीट पॅडवर ठेऊन त्यानं पुन्हा लिहायला सुरवात केली: “दु:खद निधन, आमच्या मातोश्री…” मधेच त्याने आजूबाजूला बघितलं. सगळे सुस्ताऊन पडलेले. तहान लागली म्हणून दुखर्‍या पायाने उठून पार्टीशन पलिकडच्या पाण्याच्या टाकीकडे जावं तर या अस्ताव्यस्त शरीरांना ओलांडावं लागणार! तो तसाच बसून राहिला. ढोसून धाकट्याला उठवावं, पायाची बोटं त्याच्याकडून ओढून घ्यावीत तर तो आपला पालथा पडून, हात छातीजवळ मुटकून ढाराढूर! उठवलं असतं तरी, “काय च्यायला!” म्हणून तोंड आणखीनच लादीत घुसवून पडून राहिला असता…
चहाची तलफ आली तशी देवरायला रहावेना. तो सावकाश उठला, लंगडत लंगडत पार्टीशनच्या मागे आला. पाणी प्याला. चहाचं आधण ठेवलं. दोंदावर बांधलेली धोतराची लुंगी आणखी घट्ट केली. खांद्यावरच्या नॅपकीननं खसाखसा तोंड आणि आंग पुसलं. दारातून हवेची झुळूक आली तसा तो दाराच्या फळीजवळ आला. लंगडा पाय सावकाश उचलत फळी ओलांडून पॅसेजमधे आला. नॅपकीन हलवून वहाणार्‍या वार्‍याला अंगावर झेलू लागला…
सगळं कसं शांत झालेलं… सततचा एस्टीचा प्रवास, जागरणं, वाचन, विचार सगळं काही पूर्णपणे थांबल्यासारखं… आतून विचारमग्न, पण बाहेर मात्र हसरा, आनंदी, येण्याजाणार्‍याची चौकशी, मदत, गप्पागोष्टी, मस्करी करणारा… आता स्वत:लाच आतून अगदी ब्लॅंक झाल्यासारखं, निर्वात पोकळी…
तिसर्‍या चवथ्या दिवशीपासून एकेक जण भेटायला यायला लागलेला. दोन तीन दिवस गप्प असलेला फोन खणखणायला लागलेला… तसं त्याला बरं वाटलं. सांत्वन करायला लोकं यायला लागली. सांत्वन करता करता त्यांची गाडी स्वत:च्याच चिंता, अडीअडचणी, अनुभव यावर… पूर्वी त्याला गंमत वाटायची पण मग तो नेहेमीच बोलणार्‍याला उत्साहित, प्रोत्साहित करायला लागला. समोरच्याचं बोलणं ऐकून घ्यायला लागला. या- सांत्वनाच्या परिस्थितीतही तो भेटायला आलेल्याला सल्ला देऊ लागला. लोक तो घेण्यासाठीच आल्यासारखे. एरवीही आणि ह्यावेळीही… हे त्याचं नेहेमीचंच होतं. त्यात आताही काही फरक नव्हता…
चाळीतली लोकं एकमेकांशी स्पर्धा करत घरात घुसायला लागली. ही एक सुवर्णसंधी असल्यासारखी. कुणी गेल्याचं दु:ख, त्यामुळे निर्माण झालेले, होणारे किंवा सुटलेले प्रॉब्लेम्स वगैरे गौण… संधी साधायची कधी एकदा हाच विचार… तो सगळ्यांशी अगदी मनमोकळेपणाने बोलला, वागला. माणसं त्याला प्रिय. मग त्यांच्या इतर गोष्टींच्या पलिकडे तो गेलेला…
पुष्पी येऊन बसली तेव्हा देवराय दुखवट्याची कार्ड पोस्ट करायला गेला होता. कार्डाचा गठ्ठा त्याने धोंगडेच्या हातात दिला. त्याला बजावून, बजावून सांगितलं. आता यात बजावून सांगण्यासारखं काय होतं? पण कामाची पद्धत हिच. एखाद्यानं कुणालातरी पेटीत टाकायला सांगितली असती कार्डं किंवा स्वत: पेटीत सारून झाला असता मोकळा… एवढी पत्रं अर्थातच नुसत्या नातेवाईकांना नव्हतीच. त्याचा परस्परसंवादावर भयंकर विश्वास. कम्युनिकेशन… प्रत्येक गोष्टीने तो जनमनाशी संबंध दृढ करायला बघे. एखादा धोंगडे हातात गठ्ठा पडल्यावरच कपाळाला आठ्या पाडता झाला असता पण या धोंगडेला, साहेबाना आपल्याविषयी आपुलकी आहे हे माहित होतं. त्याच्या गावातल्या कित्येकाना साहेब ओळखत होते. शेवटी मोकळं हसून देवराय बाहेर पडला, नेहेमीसारखा…
पोस्टाबाहेर आल्यावर त्याला एकदम उन्हाचा तडाखा जाणवला. जाड फ्रेमच्या चष्म्याआडचे डोळे किलकिले झाले. टोपी सारखी करून तो चालायला लागला. नाक्यावरून आत वळला आणि “वाऽ वाऽ छान! छान!” असं मनातल्या मनात म्हणत, मान डोलवत चालायला लागला. समोरच्या पानाच्या टपरीशेजारी, बंद दुकानाच्या दाराला रेलून, एक हात लेंग्याच्या खिशात घालून, थोरला हवेत धूर काढत उभा होता… शेजारी चट्टेरी पट्टेरी शर्ट घातलेला मित्र, कोंबडा काढलेला, चार पाच दिवसांचा पारोसा वाटणारा, इकडे तिकडे चोरासारखा बघत, गुपित सांगत असल्यासारखा… थोरला हवेतल्या वर्तुळांकडे बघत हसतोय… “याला एकदा घेतला पाहिजे!” असा विचार देवरायच्या मनात आला आणि दुसर्‍याच क्षणी, “या सुतकात तरी नको!” म्हणून त्याने मान झटकली. दुखर्‍या पायांनी चाळीच्या लाकडी जिन्याच्या कठड्याचा आधार घेत घेत, हाशऽहुश करत पायर्‍या चढायला लागला…
मोरीत हात पाय स्वच्छ धुऊन नॅपकीनला पुसत पुसत आत आला तर पुष्पी आणि मोठी वहिनी बोलत बसलेल्या. हुऽऽश्श करत तो तिथल्याच एका स्टुलावर बसला आणि, “काय? कसं काय?” असं पुष्पीला मोठ्या आवाजात विचारत हसता झाला…
पुष्पी त्याच्याकडे पहात राहिली…     (क्रमश:)

निसर्गरम्य देखावे

कास पठार परिसरात विविध रंगछटांच्या नयनरम्य फुलांचे देखावे पाहायला मिळतात.

      हया परिसरात निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते.आल्हाददायक वातावरणात 

              निसर्ग सौंदर्याने नटलेल्या छ्टा पाहिल्या व कँमे-यात बंदीस्त केल्या. 

सयाजीराव आणि यशवंतराव

Published in Loksatta- Saturday, March 9, 2013.

११ मार्च रोजी बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या १५०व्या जयंती वर्षांची, तर १३ मार्च रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने आधुनिक भारताच्या इतिहासात असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या या दोन समाजपुरुषांचं स्मरण करणं समयोचित आणि न्यायोचित ठरेल. एक ‘न्यायी राजा’ मानला गेला, तर दुसरा ‘जनतेचा राजा’ मानला गेला. दोघंही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. सयाजीराव गुराख्याचं पोर, तर यशवंतराव शेतकऱ्याचं पोर. सयाजीराव बडोदा संस्थानचे राजे झाले, तर यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. एकाचा काळ स्वातंत्र्यपूर्व, तर दुसऱ्याचा स्वातंत्र्योत्तर. एकाचा नियंत्रक ब्रिटिश, तर दुसऱ्याचा हायकमांड. पण दोघांनीही आपल्या कुशल नेतृत्वाने, बहुजनवादी राजकारणाने, संघटन कौशल्याने कालच्या-आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांसाठी आदर्शाचे मानदंड उभे करून ठेवले आहेत.
या दोघांनाही तळागाळातल्या जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण होती. बहुजन समाजाला बरोबर घेत, अभिजनांचा आदर करत केवळ बेरजेचंच राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला. यशवंतरावांचं राजकारण सयाजीरावांसारखंच बहुजनवादी होतं. असं राजकारण करण्यासाठी आयडिऑलॉजी असावी लागते. सयाजीरावांची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती, तर यशवंतराव रॉयिस्ट होते.
विचारवंत, कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ व संशोधक यांचा योग्य मानसन्मान करण्याचं, त्यांची कदर करण्याचं सांस्कृतिक भान दोघांकडेही होतं. ‘राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे’ अशी यशवंतरावांची तळमळ होती आणि सयाजीरावांचं तर ते जणू ब्रीदवाक्यच होतं. राजकारण हा समाजकारणाचाच भाग असतो. सर्वसमावेशक राजकारण करण्यासाठी कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि समाजभान यांची चांगली जाण असावी लागते. त्याचा प्रत्ययही या दोघांमध्ये येतोच.
आपल्याला आखून दिलेल्या चौकटीतही चांगलं काम करता येतं. एवढंच नव्हे तर आतून ढकलून ढकलून ती चौकट रुंदावताही येते, याचं उत्तम उदाहरण म्हणूनही सयाजीराव आणि यशवंतराव यांच्याकडे पाहता येतं. सयाजीरावांनी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा यांची पायाभरणी केली, तर यशवंतरावांनी साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ यांसारख्या संस्थांची निर्मिती केली. पण नुसत्या चांगल्या संस्था उभारून भागत नाही. त्या योग्य माणसांच्या हातीही सोपवाव्या लागतात. त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यावं लागतं. सयाजीराव आणि यशवंतराव यांनी अनुक्रमे दामोधर सावळाराम यंदे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची निवड केली, त्यांनीही त्या संस्थांना लौकिक मिळवून दिला. सयाजीरावांनी हरहुन्नरी व कल्पक यंदे यांना महाराष्ट्रातून बडोद्याला बोलावून घेऊन त्यांना छापखाना व प्रकाशन संस्था सुरू करण्यास सांगितली. यंदे यांनी ‘सयाजी विजय’ हे वर्तमानपत्र चालवलं, ‘ग्रंथमाला’, ‘श्रीसयाजी साहित्यमाला’, ‘श्रीसयाजी-बालज्ञानमाला’ प्रकाशित करून अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची, ‘व्यायामकोशा’सारख्या कोशांची निर्मिती केली. ‘श्यामची आई’ हे आज अभिजात मानलं जाणारं साने गुरुजी यांचं पुस्तक यशवंतरावांच्या शिफारशीमुळेच ‘इंद्रायणी साहित्य’कडून प्रकाशित होऊ शकलं. सयाजीरावांमुळे डॉ. आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकले. स्वत: त्यांनीही इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, आफ्रिका या देशांचे दौरे करून तेथील आधुनिक बदल समजावून घेतले. सयाजीरावांनी १९३२ साली कोल्हापूरमध्ये भरलेल्या अ.भा.म.साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, तसंच १९३३ साली शिकागो इथं झालेल्या दुसऱ्या  जागतिक धर्म परिषदेचं उद्घाटनही केलं. यशवंतरावांनी १९६५च्या हैदराबादमधील साहित्य संमेलनाचं उद्घाटकपद तर १९७५च्या कराडमधील साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवलं. कराडच्या साहित्य संमेलनात सरकारचा प्रतिनिधी म्हणून दुर्गा भागवत या नैतिक तोफखान्यापुढे आपल्यावर नामुष्की ओढवली जाणार, याची पूर्ण कल्पना असतानाही यशवंतराव त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि ती परिस्थिती सावरून घेऊन त्यांनी संमेलन निर्विघ्न पार पडू देण्याचा उमदेपणाही दाखवला!
यशवंतराव अनेक साहित्य संमेलनांना हजर राहत. व्यासपीठावर जाऊन स्वत:चाच सत्कार-समारंभ घडवून आणण्याऐवजी श्रोत्यांत बसून संमेलनाचा आस्वाद घेत. स्वत:च्या अंगावरची सत्तेची झूल अशी सहजतेनं उतरवता येणं, हे सयाजीराव-यशवंतरावांना जमायचं. सयाजीरावांनी बडोदा संस्थानात वस्त्रोद्योगाची स्थापना केली. बालविवाह बंदी, अस्पृश्यता निर्मूलन, घटस्फोट याविषयीचे कायदे केले. ग्रंथालयं काढली, शाळा-कॉलेजेस काढली. विद्यापीठाची स्थापना केली. तर यशवंतरावांनी सहकार उद्योगाची पायाभरणी करतानाच त्याची सत्ता एकवटू नये यासाठी त्याच्या  विकेंद्रीकरणावर भर दिला.  सयाजीरावांचं वैभव आणि राजेपण यामुळे सामान्य जनता त्यांच्याकडे आकर्षित व्हायची, तर यशवंतरावांना तळगाळातल्या प्रश्नांची कल्पना असल्याने ते कुणाशीही सहजतेनं संवाद करू शकायचे. लोकांनाही त्यांच्याबद्दल आपलेपणा आणि विश्वास वाटायचा. संवदेनक्षम मन आणि मनमिळाऊ स्वभाव ही दोघांचीही वैशिष्टय़ं होती. त्यामुळेच त्यांच्या वाटय़ाला आलेलं जनतेचं प्रेम, विलोभनीय होतं.
गेल्या वर्षी दोघांवरही दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, त्या सामान्य वकुबाच्या आहेत ही गोष्ट वेगळी. दोघांच्याही भाषणांचे-लेखांचे संग्रह प्रकाशित झाले. याआधीही सयाजीरावांना केवळ ब्रिटिशांचे मांडलिक ठरवणारं आणि त्यांचा भाबडेपणाने उदो उदो करणारं लेखनही झालं आहे, तसंच यशवंतरावांविषयीही अभिनंदन, गौरवपर लेखन जसं कमी नाही, तसंच अकारण अभिनिवेशी आणि पूर्वग्रहदूषित लेखनही कमी नाही. पण दोघांचीही चिकित्सक, सत्यान्वेषी आणि तटस्थ पण सविस्तर चरित्रं मात्र अजून प्रकाशित होऊ शकलेली नाहीत. सयाजीराव-यशवंतराव यांच्यासारख्या समाजपुरुषांची पुन:पुन्हा चरित्रं लिहिली जाणं, त्यांच्या कामाचं पुन:पुन्हा मूल्यमापन  होणं, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यथायोग्य मूल्यांकन करण्यासाठी गरजेचं असतं. आणि भावी पिढय़ांसाठीही. पण तसे समर्थ चरित्रकार अजूनपर्यंत या दोघांनाही मिळालेले नाहीत. यापुढच्या काळात तरी मिळावेत आणि आपला बौद्धिक आळसही संपावा, अशी आशा करू या. ‘विचारांची, माणसांच्या मनांची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्वाच्या कसोटय़ा असतात’ असं यशवंतरावांनी म्हटलं आहे. ते या दोघांनाही लागू पडतं.

अनुभूती

कितीदा मनाला उभारी दिली मी
कितीदा नवी जिद्द मी बाणली
तरी सांज प्रत्येक घेऊन येते
निशेची निराशामयी सावली

इथे एकदा काळजाने झरावे*
जशी पाझरे पश्चिमा सावळी
निळाई मुक्याने जरा सावळावी
भरावी जरा लोचनांची तळी

तळातून गहिऱ्या उफाळून यावे
जुने साचलेले तरी सोवळे
मनातून माझ्या कुणी व्यक्त व्हावे
जरा मुक्त व्हावीत ही वादळे

कुणी हारले सर्व काही तरीही
मला जिंकवाया पडावे कमी
दिसे फक्त आनंद ओसंडता पण
स्वतःशीच

Interesting articles from Balsanskar.com for you !

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

दानशूर कर्ण

Posted: 08 Jun 2010 04:00 AM PDT

कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती…..

छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड

Posted: 13 Jun 2011 04:00 AM PDT

वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली.

देश अन् धर्म यांचेसाठी प्राण देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई !

Posted: 26 Oct 2013 04:00 AM PDT

राणी लक्ष्मीबार्इ यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरूद्ध शेवटच्या श्वासापर्यंत प्रखर लढा दिला. त्यांच्या या पराक्रमाची आठवण आपल्याला खालील लेख वाचून येर्इल.

आयुर्वेद म्हणजे प्राचीन ऋषीमुनींची अनमोल देणगी !

Posted: 08 Jan 2012 03:00 AM PST

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. यासाठी आयुर्वेद हे एक प्राचीन काळापासून उपयोगात आणलेले परिणामकारक माध्यम आहे.

भूमीवंदन

Posted: 28 Sep 2011 04:00 AM PDT

‘कराग्रे वसते लक्ष्मी: …’ हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे.

Email delivery powered by Google


You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

ताटकळत रहाण्याच्या वेळेबद्दल थोडं.

“कुणाकडे,कुठे नवीन नवीन काय शिकायला मिळेल ह्याचा भरवंसा नाही.”

वार्षिक चेकअप असल्याने मी माझ्या डॉक्टरकडे गेलो होतो.बरेच पेशंट आले होते.डॉक्टर मला बोलवेतोपर्यंत काहीतरी वाचत बसून वेळ काढावा म्हणून स्टुलावरच्या 
मासिकांच्या ढिगातून एक मासिक काढून वाचत बसलो होतो.काही पेशंट आपल्या आयफोनवर “पीट पीट” करीत बसले होते तर काही पेशंट आपल्या आयपॅडवर लिहीत 
किंवा वाचत बसले होते.

तेव्हड्यात माझ्या जवळच्या खुर्चीवर एक तरूण पेशंट येऊन बसला.अगदी स्वस्थ बसला होता.थोड्यावेळाने उठून तो पण माझ्यासारखं एखादं मासिक घेऊन वाचत बसेल 
असं मला वाटलं.पण स्टुलावरची सर्व मासिकं वाचण्यासाठी कुणी ना कुणी उचलली होती.माझं मासिक वाचून आणि चाळून झाल्यावर मला असं वाटलं की त्याला माझ्या 
हातातलं मासिक वाचायला पुढे करावं.आणि तसं मी केलं.पण तो मला म्हणाला,
“नो थॅन्क्स”

मी ते मासिक परत स्टुलावर नेऊन ठेवलं.तो रिकामा बसलेला पाहून निदान त्याच्याशी गप्पा कराव्या म्हणून त्याच्याशी संवाद साधण्याच्या मी प्रयत्नात होतो.तेव्हड्यात तोच मला म्हणाला
“मी स्वस्थ बसून वाट बघत बसलो असलो तरी, ज्या गोष्टीची वाट पहात होतो त्यात डॉक्टरना भेटण्याच्या आतुरतेत नव्हतो,तर माझ्या मनातून मला एका गोष्टीचं 
प्रकटीकरण करायचं होतं.आणि अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी अगदी शांत राहून ते करायचं होतं.डॉक्टरांची वेटींगरूम अगदी त्यासाठी अतीशय अनुकूल अशी आहे असं 
मला वाटलं.”

मी कुतूहलाने त्याला म्हणालो,
“मला तुम्ही काय म्हणता ते समजलं नाही.”
त्यावर तो मला म्हणाला,
“मला ताटकळंत रहाण्याच्या वेळे विषयी म्हणायचं आहे.
माझ्या चटकन लक्षात आलं की आपलं हे आधुनीक जीवन किती गडबड-घोटाळ्याचं, किती गुंतागुंतीचं झालं आहे.वेटींगरूममधे ठेवलेली निरनीराळ्या विषयावरची मासिकं, 
आणि इंटरनेटवर जाण्याची वाय-फायची सोय असूनसुद्धा नुसता रिकामा आणि ताटकळत मी इथे बसलो आहे. 

पण मी अगदीच रिकामा बसलेलो नाही.माझ्या मनात विचारांचं काहूर चाललंय. आणि हेच विचार करण्य़ाचं काम अलीकडे मी विसरलो होतो.आतापर्यंत जरा का वेळ मिळाला की मी माझा फोन काढून,माझ्या मलाच व्यस्त होण्यात वेळ घालवायचो.पण त्याचा अर्थ मी काही तसा खूपच व्यस्त असतो अशातला प्रकार नाही,किंवा व्यस्त रहाण्याची मला जरुरी असायची अशातलाही प्रकार नाही,फक्त एव्हडंच की ते मी करू शकत होतो.

काहीकरून अलीकडे ह्या फोन सारख्या सुविधामुळे,उपकरणामुळे आपल्याकडे असलेली वेळ आपण पार वापरून टाकलेली आहे असं मला वाटतं.सुपरमार्केटमधे जा,पोस्टात 
जा,एअरपोर्टवर असा,किंवा बॅन्केत असा,आपली बारी येण्याची वाट पहात असताना मधली मिळालेली वेळ आपण आणि इतर लोक मान खाली करून या असल्या 
उपकरणांच्या स्क्रिनवर नजर लावून असतो.

पण अलीकडे मात्र मी,लाईनमधे असताना म्हणा किंवा असंच वाट बघत असताना म्हणा,ही उपकरणं खिशात ठेवून किंवा पिशवीत ठेवून मी माझ्या मलाच माझ्या 
मनाशी जोडून टाकतो.माझ्या लक्षात आलं आहे की अशी वाट बघत बसण्यात जात असलेली वेळ,खूपच मोलाची असते,ध्यानस्थ होण्यात,काही गोष्टींचा विचार करण्यात, 
माझ्याच मनाला भटकत ठेवण्यात मी मला व्यस्त ठेवतो.आणि आतातर वाटबघत बसण्याच्या वेळीची मी नफरत करण्य़ाचं सोडून दिलं आहे.मी उलट अशीवेळ मजेत 
घालवतो.

मी अलीकडेतर निरनीराळ्या कार्यक्रमात फारच व्यस्त असतो.आणि त्यात जरका अशीच एखादी वाट बघण्याची पाळी आली तर मी ती एक पर्वणीच आली असं समजतो. ही अशी लहानशीच गोष्ट पण त्याने खूपच फरक पाडला आहे.मोठमोठ्या लाईनीत उभं राहून ताटकळत रहाण्यात माझं मस्तक मी गरम करायचो,पण आता मी,निराळ्याच मनस्थितीत लाईनीत उभा असतो.तसंच माझा उरलेला दिवसही उत्तम जातो.कारण आता मी माझ्या मनातूनच स्विकारलं आहे की ह्या ताटकळत उभं रहाण्याच्या वेळेकडे मी निराळ्याच दृष्टीकोनातून पहायला लागलो आहे.ही ताटकळंत रहाण्याची वेळ म्हणजे कसली तरी वैताग आणणारी वेळ नव्हे,तर ह्या व्यस्त असणार्‍या जीवनात ही वेळ म्हणजे एक परवणीच असावी.विचाराच्या विश्वात जाण्याची एक परावणी,दीवास्वप्न पहाण्याची एक परवणी किंवा आपल्या मेंदुला पूर्ण तटस्थ ठेवण्याची परवणीच आहे.

ताटकळत रहाण्याची वेळ कुणाच्याही जीवनात असतेच असते.पण मी मात्र ठरवलंय मला तरी, ही वेळ म्हणजे फुकट जाणारी वेळ आहे, असं समजायचं सोडून दिलं आहे.
पुन्हा ह्या ताटकळत रहाण्याच्या वेळेबद्दल बोलायचं झाल्यास……पुढच्या आठवड्यापर्यंत कोण वाट बघणार आहे.मला कोकणात जाण्यासाठी तिकीट काढायला जायचं आहे आणि तीथे प्रचंड लाईनीत ताटकळत उभं रहायचं आहे.”

तेव्हड्यात मला डॉक्टरनी भेटायला बोलवलं आणि मी ह्या तरूणाचा निरोप घेऊन उठलो.सर्व प्रकृती चेक झाल्यावर घरी जाताना मी त्या तरूणाच्या म्हणण्याचा विचार 
करत होतो.कुणाकडे,कुठे नवीन नवीन काय शिकायला मिळेल ह्याचा भरवंसा नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

प्रश्नेलिका

(१)

ऊस शेतातला आता
कडू सगरा झाला
पण सागर सम्राटांना
मधुमेह कसा झाला?

(२)

(दिल्लीत दहावीचा निकाल ९८% पेक्षा जास्त लागला)

दहावीच्या परीक्षेत
सगरे झाले पास.
पण देवी सरसुती
कशाला हो रुसली?

गाण्यांची वही हरवली आहे..

आजकाल मी मोजकीच गाणी गात असतो,
जी मला पाठ आहेत,
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

अनेक शब्द माझ्याभोवती पिंगा घालतात
अर्ध्या-मुर्ध्या ओळी डिवचत राहतात
गाऊ शकणार नसताना अचानक काही गाणी आठवतात
शब्द, ओळी आणि सूर चकवा देऊन जातात
काहीच हातात उरत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

पूर्वी माझ्याकडे खूप वेळ होता
प्रत्येक गाण्याचा एक असा एकसष्टावा क्षण

अळीवाचे लाडू / Garden Cress sweet

<Scroll down for the recipe in English>
थंडीने तिचा गुलाबी रंग दाखवायला सुरुवात केली नाही तर इथे आम्हा खवय्यांची season special list तयार होऊ लागली. अहो काय काय यादी करावी तितकी कमीच. त्यात आवडत्या अळीवाच्या लाडवांचा क्रमांक प्रथम. करायला सोप्पा खायला त्याहून सोप्पा आणि एकदम healthy अशा या लाडवाने यादीची सुरुवात करूया.

साहित्य:
१ वाटी खवलेला नारळ
३/४ वाटी चिरलेला गूळ
१/४ वाटी अळिव
२ छोटे चमचे वेलची पूड

कृती:

१. अळीव नारळाच्या पाण्यात अथवा साध्या पाण्यात ४-५  तास भिजवावेत. साधारण अळीव भिजतील इतके पाणी घालावे व झाकून ठेवावे.
२. भिजवलेले अळीव, गूळ आणि नारळ एकत्र करावे व मंद आचेवर शिजण्यास ठेवावे. अधे मधे ढवळावे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही.
३. सर्व मिश्रण छान एकजीव झाले कि गॅस बंद करावा.
४. गार झालेल्या मिश्रणामध्ये वेलची पूड घालावी व त्याचे लाडू वळावेत.


काही महत्वाचे:
गुळाच्या गोडीनुसार त्याचे प्रमाण कमी जास्त करावे.

Ingredients:
1 cup grated coconut
3/4 cup chopped jaggery
1/4 cup aleev or garden cress seeds
2 tsp cardamom powder

Method:

1. Soak the garden cress seeds for 4-5 hours in coconut water or normal water. the water should be filled till a level just above the seeds. Cover it with a lid.
2. Now the seeds will be double in size. Mix the soaked garden cress seeds with jaggery and coconut.
3. Put the mixure on low flame. Stir in at regular intervals so as to avoid it from getting burnt.
4. After the ingredients of the mixture blend with each other well, get the mixture off the flame and allow it to cool.
5. Add cardamom powder and shape into small balls called as laddus.

Important:
please check the sweetness of jaggery which you have, and adjust the quantity accordingly.

नातं …

                                       

             नातं म्हणजे नक्की काय ? खरतरं  नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू  दे,ते सहज असावे . नात्यातील  सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या  कदाचित आपल्याकडून  ही  हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि …
             अशी  हि सहजता जपणारी नाती निभावताना मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त मोलाचं असतं . आपण चुकलो ,धडपडलो तरी आपल्याला सावरणारं ,आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते . आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं असतं . नातं नेहमी निःस्वार्थी असावं. निखळ  असावं . दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव ,श्रीमंतीचा बडेजाव,उपकारांची भाषा यांना थारा नसावा . कारण जेव्हा त्या नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी कळत -नकळत घडतात तेव्हा ते नातं ,नातं न राहता ओझं वाटू लागतं . या ओझ्याखाली समोरची व्यक्ती मात्र दबून जाते . नात्यांच्या या भिंतीला पहिली भेग ही इथेच जाते . अजून पुढे जाऊन निर्माण होणार्या समज – गैरसमज,तुलना ,इर्षा यामुळे ही भेग वाढत जाऊन नात्यांची हि भिंत दुभंगते . जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळून येते तोपर्यंत फार मोठं नुकसान झालेलं असतं. मग आश्वासनं ,वचन ,माफी यांचं कितीही प्लास्टर केलं तरी ही नात्यांची भिंत काही पूर्वीप्रमाणे राहत नाही . 
                एकदा का नात्यातला एकसंधपणा लयास गेला कि त्या नात्याचा पूर्वीचा बाज कधीच परत येत नाही . नात्यातला हा दुभंग टाळण्याकरिता नात्यांना कायम प्रेम आणि विश्वास यांच्या भक्कम धाग्यात दोन्ही व्यक्तींनी समानपणे बांधून ठेवणे आवश्यक असते . कारण नातं  हे दोन्ही बाजूंनी तितक्याच समानतेने ,सहजतेने सांभाळावं लागतं. दोन्ही बाजूंनी तितकंच प्रेम,विश्वास,आपुलकी असणं हे नात्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे . त्यामुळे लादलेली नाती फार तकलादू ठरतात .मुळात नाती अशी लादता येतात का ?आपण जन्म घेतल्या क्षणापासूनच बरीच नाती आपल्याला येउन चिकटतात . पण केवळ रक्ताने जोडलं गेलोय आपण म्हणून आपलं नातं झालं असं असतं का?माझ्या मते नाती जुळण्यासाठी ‘रक्त ‘पेक्षा ‘मन ‘जुळणं जास्त महत्वाच ठरतं . अशी मन जुळलेली नाती दीर्घायुषी असतात . लादलं जातं ते नातं नसतंच मुळी . ती असते तडजोड …. काहीतरी मिळवण्यासाठी,स्वार्थासाठी,काहीतरी उद्दिष्ट ठेऊन केलेली .नातं हे लादायचं नसतं ते जपायचं असतं . जगायचं असतं . तरच आयुष्याचा प्रवास सुंदर बनतो . 
                आणि आयुष्याचा प्रवास म्हणजेच काय ?…. तर प्रेम आणि विश्वासाने नाती जपणं आणि जपता जपता जगणं …नाती आणि आयुष्यही ……………. !!!!!
                                                                  -मानसी ब्रीद