न भावलेला ’आषाढातील एक दिवस’

कविकुलगुरु कालिदास हा भरतखंडातील कविश्रेष्ठांचाही मेरुमणि. त्याच्या मेघदूताने देशकालाच्या, भाषेच्या सीमा ओलांडून अनेकांना भुरळ घातली, आकर्षित केले. अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने एकेक  दृष्टीकोन घेऊन त्यातील सौंदर्य, त्यातील छंदशास्त्र, त्यातील भूगोल उलगडण्याच्या यथामती प्रयत्न केला, काही कविंनी आपल्यापुरते आपले ‘मेघदूत’ लिहून काव्यक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. (मराठी भाषेत

साप गिळतोय सापाला

साप गिळतोय सापाला

               बळी तो कान पिळी किंवा मोठे मासे लहान मास्याला गिळतात, यासारख्या म्हणी बर्‍याचदा ऐकायला मिळाल्या होत्या मात्र आज सकाळी ८ च्या सुमारास शेतात चक्क एक भला मोठा विषारी नाग एका बिनविषारी सापाला गिळताना बघायला मिळाला.

             एक अतिजहाल विषारी गव्हाळ्या नाग एका बिनविषारी लांबलचक धामण जातीच्या सापाला गिळण्याचा प्रयत्न करत होता. गव्हाळ्या नाग कात टाकण्याच्या अवस्थेत (कोषी आल्याने) त्याची हालचाल बरीच मंद होती. बिळातून २ फ़ूट बाहेर तोंड काढून त्याने आपले भक्ष पकडलेले होते. धामण बरीच लांबलचक असल्याने नागाला सहजासहजी आपले भक्ष्य गिळंकृत करता येत नव्हते. लढत काट्याची होईल असे स्पष्ट जाणवत होते.

             छायाचित्र घेण्यासाठी हवी तशी जागा उपलब्ध नसल्याने हवा तसा फ़ोटो मोबाईलने घेता आला नाही.
शिवाय मला अन्य कामासाठी शेत सोडून जायचे असल्याने पुढे काय झाले ते पाहता आले नाही.

snake

Filed under: प्रकाशचित्र Tagged: शेती आणि शेतकरी

सेल्युलॉईड

सेल्युलॉईड… या वर्षीचा सर्वोत्तम मल्याळम चित्रपट…!!! केरळमध्ये तयार झालेल्या पहिल्या चित्रपट निर्मितीची ही कहाणी होय. जे. सी. डॅनियल या उत्साही व धडपड्या तरूणाने ’विगतकुमारन’ या पहिल्या मल्याळी चित्रपटाची निर्मिती सन १९२८ मध्ये केरळात केली होती. त्याची कहाणी (शोकांतिका!) सांगणारा चित्रपट म्हणजे… सेल्युलॉईड!

चित्रपटाच्या फिल्मला इंग्रज लोक सेल्युलॉईड म्हणत. डॅनियलने बनविलेल्या पहिल्या चित्रपटाची प्रिंट उपलब्ध नसल्याने तो अनेक वर्षे ’Pioneer of Malayalam Cinema’ म्हणून ओळखला गेला नाही. परंतु, एका सिनेपत्रकाराने त्याची कहाणी उजेडात आणली. ती दिग्दर्शक कमलने अप्रतिमरित्या पडद्यावर सादर केलीय! चित्रपटाच्या सुरूवातीलाच नंदू माधव यांचे दादासाहेब फाळके म्हणून दर्शन होते. त्यांच्या एका मराठी चित्रपटाचे चित्रिकरणही यात दाखविण्यात आले आहे. डॅनियलची धडपडी वृत्ती, त्याला त्याची पत्नी जॅनेटची मिळालेली साथ, अभिनेत्री मिळविण्यासाठी झालेला संघर्ष व दलित असल्याने तीची झालेली शोकांतिका, उतारवयातील डॅनियल, मूळचा तमिळ असल्याने केरळ सरकारने त्याची केलेली हेळसांड या सर्वांची सुंदर मांडणी या चित्रपटात दिसते.

सॉंग ऑफ द डे

जीवनाचं, जगण्याचं जर गाणं झालं पाहिजे तर संगीतासारखा
सोबती नाही. कळायला लागायच्या आधीच हे संगीत आपल्या अवती-भवती निनादत असतं. पक्षाची
शीळ, खळाळता झरा, पानांमधून होणारी वार्‍याची कुजबुज, समुद्राची गाज, छुम-छुम
वाजणारे पैंजण या सर्वांमधून एक नादमधूर असा स्वरांचा गोफ आपल्या कानी येतच असतो.
हे संगीत ऎकताना त्यातल्या मधुर्याकडे आपलं लक्ष जातच असं नाही, पण जेव्हा एखादा
संगीतकार त्याचाच वापर

गांधार विजय/ महाभारत (शकुनि आणि गांधारीची शेवटची भेट)

(मध्य रात्रीची वेळ , शकुनि आपल्या तंबूत एका कोपऱ्यात मंचकावर ठेवेल्या चतुरंगचा पटाकडे पाहत विचारात मग्न होता. शकुनि, या आवाजाने विचार शृंखला भग्न झाली).
शकुनि :ताई, अशी मध्य रात्री तू इथे कशी आणि तुझ्या डोळ्यांत अश्रू का? त्या आंधळ्याच्या पुत्रांसाठी तर नाही ना?
गांधारी: शकुनि, तुझी गांधारी एवढी दुर्बल नाही, गांधार सोडताना आपण घेतलेला प्रण, अजूनही माझ्या लक्षात आहे. कौरव जरी माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत, हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या साठी मी अश्रू नाही ढाळनार. आज रणांगणात शल्याचा वध झालेला आहे. युद्धाचा शेवट जवळ आलेला आहे आता… (हुंदका देत) शेवटची भेटायला आली आहे रे तुला, उद्या रणभूमी वर कदाचित…
शकुनि: (तिचे वाक्य मध्ये तोडत म्हणाला), हा! हा! हा!, मी जिवंत राहणार नाही, एवढेच नां, युद्धाचा सुरुवातीपासूनच हे सत्य तुला आणि मला चांगलच ठाऊक आहे. त्यात रडायचं कशाला ताई. या भारतीय युद्धात कोणी ही जिंको, पण सत्य एवढेच, अठरा अक्षोहणी भारतीय सैन्य या युद्धात कामी आलं. भारतीय सैनिकांच्या तीन पिढ्या नष्ट झाल्या. आपल्या गांधारचे काय नुकसान झाले, तुझ्या माझ्या सहित केवळ बोटावर मोजण्या इतकेच सैनिक. असं, कधी पूर्वी इतिहासात घडलं आहे? आता गांधारला, पुढच्या कित्येक पिढ्यातरी भारतापासून काही भीती नाही. कुणा भीष्माचे सैन्य आता गांधारात प्रवेश करणार नाही किंवा कुणा गांधारीला आपल्या आयुष्याचे बलिदान द्यावे लागणार नाही. (तिच्या खांद्यावर हात ठेवत, चतुरंगच्या पटावरचा अश्व हातात घेऊन हत्तीला चिरडत) गांधारी, हे बघ आपला नातू गांधारच्या सिंहासनावर बसला आहे. आपली अश्वसेना तैयार आहे, आज्ञाची वाट पाहत आहे, बघ, आपल्या अश्वसेनेनी कसे भारतीय हत्तीला पायदळी तुडवले आहे. गांधारी, आपला प्रण पूर्ण झाला आहे, आपण विजयी झालो आहे. डोळ्यांतील अश्रू पूस, आनंदाचा क्षण आहे हा.
गांधारी: डोळ्यांतील आसवेंपुसत, खरंच! असे होईल.
शकुनि: गांधारी असंच होईल नाही झालेलं आहे. उद्याचा युद्धासाठी, मला आशीर्वाद दे.
गांधारी: गांधार विजयी भव:
दोघही, गांधारचा विजय असो.

भासशी तू शीतल छाया

तुला पाहूनी विचार आला माझ्या मनी
जीवन भासते उन्हापरी अन
भासशी तू शीतल छाया

आज पुन्हा अंतरी प्रबळ इच्छा आली
अन समजावीले मी माझ्या मना
जीवन भासते उन्हापरी अन
भासशी तू शीतल छाया

तुला गमवूनी विचार आला माझ्या मनी
काय साधीले गमवूनी तुला
जीवन भासते उन्हापरी अन
भासशी तू शीतल छाया

जमले नाही गुणगुणणे तुझ्या कानी
का मग काळाने गीत गाईले
जीवन भासते उन्हापरी अन
भासशी तू शीतल छाया

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

१७७. यष्टी

परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत.
गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले.
आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात.
राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात.
आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ”
“अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली.
चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता.
मान्सं तमाकू थुकत व्हती.
बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली.
ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते.
जोरात आवाज आला. डोंगरावर कायतरी चमाकलं.
“यष्टी” समदे वराडले.
आण्णा हसत व्हते.
तेस्नी मला खांद्यावर बशिवलं.
लई लई दिसांनी.

मला यष्टी आवडली. 

राधा ही बावरी (झी मराठी) – १० सप्टेंबर २०१३

मित्रांनो,

‘झी मराठी’वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ मध्ये माझा एक सहभाग होता.
दि. १० सप्टेंबर २०१३ चा गणपती विशेष भाग ‘राधा..’च्या टीमने खूप वेगळ्याप्रकारे केला. कथानक असं होतं की, मालिकेतील कुटुंबाच्या घरी गणपती आहे आणि त्या निमित्त त्यांच्या काही कविमित्रांचा कविता सादरीकरणाचा एक कार्यक्रम त्यांनी घरीच आयोजित केला आहे. ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, निसर्गकवी नलेश पाटील आणि आजच्या

प्रस्थापित (६)

भाग १, भाग २भाग ३, भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा!
शिरीष समोरच्या चष्मेवाल्याशी आपलं नेहेमीचं डोळ्याला डोळा न भिडवण्याचं तंत्र चालू ठेऊनच होता. त्यानं आपल्या बॅगेतला हात बाहेर काढला.
“हे बघा- ही दोन-“
“मला कल्पना आहे हो-” चष्मेवाला सौम्य हसत म्हणाला.
“बघा ना- या संहितेबरोबर असलेल्या या पत्रावरची तारीख- सहा महिने होऊन गेलेत. या आणखी दोन संहिता. आधी आता या घेऊन बसायला-“
“मला पूर्ण कल्पना आहे त्याची. माणसं बिझी असतात. तुम्ही माझं पुस्तक चाळलं का?”
“हो ना! हो! हो!” शिरीषनं ठोकून दिलं.
“मग त्याच्या मलपृष्ठावर माझा बायोडेटा आहे. मी यातच होतो हो इतके दिवस. तुमच्यासारख्या भूमिका केल्या प्रायोगिक- व्यावसायिकला- अर्थात तुमच्यासारख्या यशस्वी नसतील त्या- मला माहितेय. माणसं बिझी असतात. त्यांना अजिबात वेळ नसतो. परवा आलो तेव्हाच माझ्या लक्षात आलंय!”
अजिबात न हालता शिरीष हातातल्या संहितांकडेच बघत राहिला.
“नाही- बघा ना- आता हे ह्यानी- सहा महिने आधी-“
“आरामात हो! मला अजिबात घाई नाही. आरामात वाचा. माझं पुस्तकही सवडीने वाचा- आणि मला सतत फोन करून, सतत भेटायला येऊन त्रास द्यायला खरंच आवडत नाही. इरिटेट होतो हो समोरचा माणूस. मला कल्पना आहे!”
“नाही- काय आहे- मला जर फोन करून आठबण केली नाहीत नं तर-” शिरीषनं नेहेमीचा धोबीपछाड टाकला. फोन नाही केलास ना तर तुझंच नुकसान आहे चष्मेवाल्याऽ- तो मनात म्हणाला.
“सतत नाही करत मी फोन. बिझी माणूस वैतागतो. वाचा तुम्ही सावकाश. चला. थॅंक यू!” चष्मेवाला निघाला. मेकपमनला, व्यवस्थापकाला हात करून तो निघाला आहेहे शिरीषनं नजरेच्या कोपर्‍यातून बघितलं, पण संहिता परत बॅगेत ठेवताना बॅगेत घातलेलं डोकं त्यानं अजिबात बाहेर काढलं नाही. चष्मेवाल्याच्या थॅंक यू लाही त्याने अर्थातच प्रतिसाद दिलाच नाही. गेला *****! असं मनाशी म्हणत त्यानं खर्रकन बॅगेची चेन ओढून बंद केली. चेहेरा अतिशय शांत ठेवून.
प्रयोग एक्च्यूअली सुरू व्हायला अजून अर्धातास तरी सहज होता. ऑफिशयल पंधरा आणि वर पंधरा मिनिटं. इस्त्री करून ठेवलेले कपडे बघून ठेवणं, तोंड धुणं, गप्पा मारणं इत्यादी प्रयोगाआधीची कामं यांत्रिकपणे करत तो रंगपटात स्थिरावला. काहीतरी त्याला खुटखुटायला लागलं. ते मनाच्या मागे ढकलून तो निग्रहाने हास्यविनोद करत राहिला. शेवटी वेळ झाल्यावर आरशासमोर बसला. आज मेकपमनला थांबवून त्यानं स्वत:चा मेकप स्वत:च करायला सुरवात केली. स्वत:चा चेहेरा रंगवताना त्याला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. मगासारखं… खुटखुटल्यासारखं… कॉन्फिडन्ट वाटत नाहीए आपल्याला आज? हं!… पावणेचारशेवा प्रयोग… यंत्र झालंय आता सगळं… वाचेचं, चेहेर्‍यावरच्या रेषांचं, हातवार्‍यांचं, हातचालींचं, विनोदाच्या जागाचं, लाफ्टरसाठी थांबण्याचं… तो स्वत:शीच हसला. पूर्ण एकाग्र होऊन, मेकपकडे लक्ष देऊन खुटखुटणं विसरण्याचा प्रयत्न करू लागला…     (क्रमश:)

 

मनमौजी

आकाशाची छत्री करतो, गातो गाणी रस्त्याने तो चालत असतो उडवत पाणी कुठे जायचे, काय खायचे, नसते चिंताडोक्यामध्ये नसते काही, नसतो गुंता !पाठीवरती घेतो काही, भटकत फिरतोत्यात कधी तो झाडांसाठी पाणी भरतोपाहाल तर सोडून दावी ते नेटानेआणले म्हणतो पक्षांसाठी चारच दाने !वाट चालते त्याच्यासंगे मार्गक्रमायाअन वाऱ्याशी सख्य जमवले, दिशा ठरवण्याथकल्यावरती तरु पाहुनी अडवा होतोडोक्याखाली दगड घेवूनी झोपी जातो !घड्याळ

गोत्र आणि त्याची मर्यादा


दोघ एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांना ठार मारण्यात आले. दरवर्षी विशेषतः प. भारतात अश्या ५-६ घटना तरी घटतात. पिढ्यांपासून एका दुसऱ्याशी नात नसणारे, एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांच्या विवाहाला समाज किंवा जात पंचायती कडून विरोध होतो. विरोधाला न जुमानता जर मुलगा आणि मुलगी घरातून पळले, तर त्यांची हत्या ही ९९% होतेच. किंबहुना प्रतिष्ठेपायी घरच्यांना करावीच लागते. हे या भागातील कटू सत्य आहे. ‘गोत्र’ या बाबतीत समाजात पसरलेली अज्ञानता, या हत्यांना कारणीभूत आहे.
हे तर स्पष्ट आहे, गोत्राचा संबंध स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या नात्याशी आहे. आता गोत्र म्हणजे काय, याचा उगम कसा झाला आणि गोत्राची मर्यादा काय आणि नवीन गोत्र निर्माण होतात का? असे कित्येक प्रश्न मनात येतात. वेद, उपनिषद, पुराण इत्यादी केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे तर त्यात आपल्या भारतीय सभ्यतेच्या विकासाचा इतिहास ही दडलेला आहे. यात डोकवून मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
ऋग्वेदात एक आख्यान आहे, यौवनात आलेली ‘यमी’ आपल्या सहोदर भावास अर्थात ‘यमास’ शरीर संबंधाची याचना करते. त्या वेळीस यम तिला म्हणतो: आपल्या दोघांचा जन्म एकाच आईच्या उदरातून झाल्या असल्या मुळे, तुझी याचना मी स्वीकार करू शकत नाही. तू दुसरा अन्य पुरुष शोध आणि त्याच्याशी शरीर संबंध जोड. त्या वेळच्या विद्वान मनिषिंचे लक्ष विकृत संतीती का पैदा होतात या कडे गेले असेलच आणि त्यावर उपाय शोधण्याच प्रयत्न ही सुरु केला असेल. त्यांना ‘जीन संबंधित विकृती’ काय असतात हे माहीत नसेल. पण त्यांच्या हे लक्षात आले असेल, अरण्यात कळपात राहणारे जनावरे ही किशोर/ युवावस्थेतल्या पिल्लांना कळपातून हाकलून देतात आणि त्यांच्या संतती स्वस्थ राहतात. एकाच गर्भातून उत्पन्न झालेल्या संतीतीने शारीरिक संबंध ठेऊ नये म्हणून या आख्यानाची रचना ऋषींनी केली असेल.
काळ पुढे गेला मानव जीवनात स्थिरता येऊ लागली होती. लोक शेतीला सुरुवात झाली होती, लोक एका ठिकाणी राहू लागले होते. त्या वेळी एक स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवत असे आणि पुरुष ही अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवत असतीलच. जन्म घेणाऱ्या संतानांमध्ये विकृती आणि जनावरांप्रमाणे स्त्रियांसाठी होणारे विवादांकडे ही मनिषिंचे लक्ष गेले असेलच. वेदांमध्ये एक आख्यान आहे, श्वेतकेतू ऋषी आपल्या आईस, दुसऱ्या पुरुषांसी संबंध ठेवण्यास मनाई करतो. अश्या रीतीने समाजात ‘विवाह संस्था’ उदयास आली. भावी पिढीला आई किंवा वडिलांच्या नावाची/ वंशाची ओळख मिळावी म्हणून ‘गोत्र’ संस्था ही उदयास आली. दुसर्या शब्दात आपल्या पूर्वजांची आणि वंशाची ओळख ही गोत्र या विरुदावली मुळे आपल्याला कळते.
काळ आणखीन पुढे गेला, सभ्यतेचा विकास आणि जगण्यासाठी अधिक ज्ञानाची गरज भासू लागली. भावी पिढीला ज्ञान देण्यासाठी ‘गुरुकुलांची’ स्थापना होऊ लागली. ज्या प्रमाणे स्त्री आपल्या गर्भात वाढणाऱ्या बालकाचे मायेने रक्षण करते त्याच प्रमाणे गुरु ही शिष्याला सांभाळेल याचे प्रतीक म्हणून ‘आश्रमात आलेल्या मुलांचा यज्ञोपवीत विधी केला जात होता. अर्थात गुरूच्या रूपाने शिष्यांना दुसरी आईच मिळत होती. महाभारतात एक आख्यान आहे, देवयानी ही गुरु शुक्राचार्य, यांची कन्या होती, तिचे देवगुरु ब्रह्स्पती यांचे पुत्र कच या वर प्रेम जडले. तिने आपले प्रेम व्यक्त केले आणि विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण दोघ एकाच पित्याची संतान आहोत (विवाह संबंधातून जन्मास आलेली देवयानी आणि यज्ञोपवीत विधी द्वारा पुत्र झालेला कच) आपला विवाह संभव नाही, असे म्हणत तिच्या प्रेमाचा अस्वीकार केला. .. एकाच गुरूच्या आश्रमात शिकणारे स्त्री आणि पुरुष बंधू आणि भगिनी असतात, हा निर्णय त्या वेळच्या न्यायाचार्यानी घेतला असावा त्याचेच प्रतीक म्हणून ही कथा. आश्रमातून शिकलेले शिष्य आपल्या गुरुचे नाव ही विरूद म्हणून आपल्या नाव पुढे लाऊ लागले असतील तर नवल नाही. ( आपल्या समाजातील अधिकांश गोत्रे ऋषी मुनींच्या नावाची आहेत).
एकदा नावाच्या मागे लागलेलं गोत्र हे विरूद नेहमीसाठी असते किंवा कालांतराने गोत्र हे बदलता येते. माझ्या वडिलांचे श्राद्ध होते. भाताचे तीन पिंड बनविले होते. एक आजोबांच्या नावाचे, दुसरे पणजोबांच्या नावाचे आणि तिसरे खापर पणजोबांच्या नावाचे. पुढे ब्राह्मण म्हणाला या पुढे श्राद्धाच्या वेळी खापर पंजोबानासाठी वेगळे पिंड गरज नाही त्यांची जागा तुमच्या वडिलाने घेतली आहे. अर्थात खापर पणजोबा पूर्वजांच्या यादीतून वगळल्या गेले होते. खरेच आहे, खापर पणजोबांच्या वडिलांचे नाव आमच्या वडिलाना ही माहीत नव्हते. असो.
घरी येऊन विचार केला. मुलांमध्ये आई वडिलांचे ५०% टक्के जीन मुलांना वारसा म्हणून मिळतात. आता, खापर पणजोबांचे ५०% ‘जीन’ पणजोबांकडे, २५% आजोबांकडे, १२ १/२% वडिलांकडे आणि ६१/४% माझ्याकडे आले. ६ १/४% टक्के ची मालकी असलेला कंपनीचा मालिक बनू शकत नाही, त्या प्रमाणे मी ही खापर पणजोबांना आपला पूर्वज का म्हणावे व त्यांचे गोत्र का लावावे हा विचार मनात आला. निश्चितच जो विचार माझ्या मनात आला तो पूर्वीच्या लोकांच्या मनात आला असेलच.
राजा ययातीला देवयानी पासून यदू आणि तुर्वसू हे दोन पुत्र प्रत्येकांनी आपल्या नावानी नवीन वंश सुरु केला. यदुच्या वंशात पुढे सात्वत नावाचा राजा झाला त्याला वृष्णी, अंधक, महाभोज इत्यादी सहित सात पुत्र होते. या पुत्रांनी ही आपल्या नावाचा वंश(गोत्र) सुरु केले. वृष्णी वंशात पुढे भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला. ययातीला शर्मिष्ठे पासून पुरू. पुरू वंशात – कुरु- दुष्यंत भरत – युधिष्ठिर आणि दुर्योधन इत्यादी झाले. भागवतात विभिन्न वंशांचा इतिहास दिला आहे, ते वाचल्यावर जाणवले प्रत्येक तीन चार पिढी नंतरच्या वंशजांनी आपल्या नावाने गोत्राची सुरुवात केली होती.
नवीन वंश आणि गोत्रांच्या रचनेची प्रक्रिया आपल्या देशात सतत होत राहिली आहे. दोन तीन पिढ्यानंतर जनसंख्या वाढत असे, आपसात भांडणे ही. कुणी घर सोडून दूर निघून जात असे, नव्या ठिकाणी, जंगल स्वच्छ करून शेती सुरु करत असेल एक दोन पिढ्यांनी नवीन गाव आणि नवीन वंश तिथे तैयार होत असे आणि हे असेच चालत राहत असेल. (मी रहात असेलेल्या बिंदापूर एक्स ही कॉलोनी बिंदापूर गावाजवळ आहे, या गावात जाट समाजातल्या सर्वांची नाव ‘अहलावत’ हीच आहे). गेल्या काही एक-दोन शतकांपासून नवीन गोत्र निर्माण होण्याची प्रक्रिया थांबून गेली आहे. सहा-सात पिढ्या होऊन गेल्या तरी लोक एकच गोत्र लावीत आहे. त्या मुळे एक गाव नव्हे तर आजू-बाजूच्या १०-२० गावांपर्यंत एकाच गोत्राचे लोक राहतात. त्या मुळे प्रेमात पडलेल्या स्त्री आणि पुरुषांचे एक गोत्र असण्याची शक्यता ही वाढते आणि त्या मुळे होणारे निर्दोष स्त्री पुरुषांचे वध ही.
लग्नाच्या वेळी गोत्र हा विषय येतोच. आपण नवीन गोत्राची सुरुवात नाही केली यात आपल्या पूर्वजांचा दोष नाही. लग्नासाठी तीन-चार पिढ्यांपेक्षा जास्त गोत्राची मर्यादा नसावी. समान गोत्र असले तरी तो आपल्या वंशाचा नाही, हे स्वीकार करणे जास्त रास्त. गोत्रांची ही मर्यादा आपण मानली तर अनेक तुटणार लग्ने या मुळे जुळतील आणि समाजात व्याप्त गोत्र विषयक अज्ञानता मुळे खोट्या प्रतिष्ठेसाठी होणारे ‘प्रेमिकांचे वध’ ही टळतील.

पिच्चर बघू काय ? "होय महाराजा !" – (Narbachi Wadi – Marathi Movie Review – नारबाची वाडी)

नारळाचं झाड जरासं नाठाळ असतं. ते सुरुवातीला अगदी हळूहळू वाढतं.. बहुतेकदा तर मालकाचा अगदी अंत पाहतं. वाटतं हे झाड काही उपयोगाचं नाही. पण मग, एकदा ही सुरुवातीची वर्षं सरली की फणा काढलेल्या नागासारखं डौलात उभं राहातं… उंचच उंच ! मग त्याच्या नाठाळपणाचा अनुभव हवेला येतो. कितीही जोरदार वारं वाहिलं तरी काहीही फरक पडत नाही. बरं कित्येक फूट वाढलं, तरी झाडाचा बहुतेक भाग खोडच! नारळ काढायचे म्हणजे झाडावर

पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन धम्माल पुन्हा पुन्हा..

‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे.
‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे. कुठल्या ना कुठल्या मूव्ही चॅनेलवर चार चित्रपटांच्या या मालिकेतील कुठला ना कुठला चित्रपट सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री, उत्तररात्री कधी ना कधी सुरूच असतो. आणि आपण या चॅनेलवर उशिरा जरी पोहोचलो असलो, चित्रपट अध्र्या वाटेवर पुढे सरकला असला तरी उर्वरित चित्रपट पूर्ण होईतो ते चॅनेल बदलण्याची वा टीव्ही बंद करण्याची इच्छा होणे अशक्यच असते..
‘कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल’ हा या मालिकेतील पहिला चित्रपट. २००३ मध्ये झळकलेल्या या चित्रपटाबद्दल खुद्द निर्माते आणि स्टुडिओही चित्रपट कितपत चालेल याबद्दल साशंक होते. म्हणून प्रारंभी फक्त ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ एवढेच नाव ठेवण्याची स्टुडिओची तयारी होती. पण कुठल्या तरी बैठकीत कुणीतरी भविष्याचे शुभसंकेत दिल्यासारखी एक सुशंका उपस्थित केली.. ‘चित्रपटात जॉनी डेपसारखा स्टार आहे, भन्नाट कथा आहे, पडद्यावर तरी सारं मस्त धमाल जुळून आल्यासारखं दिसतंय. मग चित्रपट चालला तर? दुसराही भाग काढता येईल की..’, अशी सगळी चर्चा झाल्यावर मग मूळ नावाला ‘कर्स ऑफ दी ब्लॅक पर्ल’ जोडण्यात आलं. चित्रपट प्रदर्शित झाला. कॅप्टन जॅक स्पॅरो, ओरलँडो ब्लूमचा विल टर्नर, छान निरागस दिसणारी किआरा नाइटलेने साकारलेली एलिझाबेथ सगळ्यांना प्रेक्षकांनी फुल्ल मार्क्‍स दिले. बॉक्स ऑफिसवर खणखणाट करणा-या या चित्रपटानं धमाल उडवली. त्या वर्षी तब्बल पाच ऑस्कर पुरस्कारांसाठी या चित्रपटाची शिफारस झाली होती. कॅप्टन जॅक स्पॅरोसह सा-याच व्यक्तिरेखांची वेशभूषा, रंगभूषा, ध्वनी संकलन, स्पेशल इफेक्ट्स सारं सारं जबरदस्त होतं. या प्रत्येक किमयागारीसाठीच ऑस्कर शिफारस झाली होती हे वेगळे सांगायची गरज नाही. प्रेक्षकांवर या चित्रपटानं त्या वेळी इतका प्रभाव टाकला की पुढचा भाग कधी येणार, अशी विचारणा प्रेक्षकांकडून होण्याआधीच दिग्दर्शक गोर व्हर्बिन्स्की आणि त्याच्या टीमने, निर्मात्यांनी पुढच्या भागाची तयारी सुरू केली होती.
महाइब्लिस, महाअतरंगी असा कॅप्टन जॅक स्पॅरो, त्याला साजेसे असे त्याचे बदमाश साथीदार, त्यांचे जहाज ब्लॅक पर्ल, जॅकशी खुन्नस असणारा जेफ्री रशचा कॅप्टन बाबरेसा, खवळलेल्या समुद्राला भेदून वर येणारे भुताळी जहाज ‘द फ्लाइंग डचमन’, या जहाजावरील अर्धमृत खलाशी, भरसमुद्रात या चाच्यांच्या आणि ब्रिटिश आरमाराच्या ताफ्याशी होणा-या चकमकी, चाच्यांनी दडवलेल्या खजिन्याच्या प्रचंड राशी.. वाढत्या वयातही मनाच्या कुठल्या तरी कोप-यात खोडकर मुलासारखं दडून राहिलेल्या शैशवाला भुलवणारं, साहसी, स्वप्नाळू भाववृत्तीला उत्तेजित करणारं, गुंगवून टाकणारं असे हे कथानक. जॅक स्पॅरोच्या करामती मग डेड मॅन्स चेस्ट, अ‍ॅट वर्ल्डस् एन्ड, ऑन स्ट्रेंजर टाइड्स या पुढच्या भागांमधून प्रेक्षकांसमोर आल्या आणि हे सर्व चित्रपटही तितकेच चालले, गाजले. अपवाद म्हणावा तो चौथ्या भागाचा. तो रॉब मार्शलने दिग्दर्शित केला होता. अनेकांना या संपूर्ण मालिकेतील हा चित्रपट बराचसा बोअर, कंटाळवाणा वाटला आणि तो आलाही ब-याच उशिरा.
जेरी ब्रुकहेइमर फिल्म्स आणि वॉल्ट डिज्नी पिक्चर्स यांनी या चित्रपटांमुळे चिक्कार पैसा कमावला. व्हीडीओ गेम्सही आले. अनेक गाजलेल्या चित्रपटांचं मूळ एखाद्या कादंबरीत वा कथेत असतं. इथे तसं काहीच नव्हतं. डिज्नी पिक्चर्सला ही सगळी आयडीयाची गम्मत सुचली ती त्याच्या डिज्नीलँड पार्कातील पायरेट्स राइडमुळे. या आयडियाचं पुढे पटकथाकार आणि संवादलेखकांनी सोनं केलं. चटपटीत संवादांचाही चित्रपटाच्या यशात मोठा सहभाग असतो हे पायरेट्सच्या संवादांनी विशेषत: जॅक स्पॅरोसाठी लिहिल्या गेलेल्या संवादांनी सिद्ध केले.
या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी ताटकळलेल्या चाहत्यांसाठी खूशखबर अशी की या चित्रपटमालिकेतील पुढचा म्हणजेच पाचवा भाग ‘डेड मेन टेल नो टेल्स’च्या निर्मितीचे काम सुरू आहे. ‘कोन-टीकी’ चित्रपट बनवणा-या जोकीम रॉनिंग, एस्पेन सँडबर्ग या दिग्दर्शकद्वयीकडे पाचव्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ‘नाही-नाही’ म्हणणारा जॉनी डेप, ‘आता हा भाग शेवटचाच’ म्हणत पुन्हा जॅक स्पॅरोची पायरेट हॅट डोक्यावर चढवून त्याचा इरसालपणा दाखवणार आहे. जॅक स्पॅरोच्या अतरंगीपणासह इतर व्यक्तिरेखांचेही अंतरंग खुलवणारा पटकथाकार टेड एलियट या नव्या कथानकासाठीही व्यक्तिरेखांना आकार-उकार देणार आहे. येथे जॅक आहे, बाबरेसा आहे, चेटकिणी, भुतेखेते आहेत, जॅकसाठी नवी नायिका आहे आणि एक नवी जोडीही आहे. बम्र्युडा त्रिकोणाच्या रहस्याचा पायरेट्स स्टाइल पर्दाफाशही या नव्या कथानकातून होईल, अशी खबर आहे.एवढया सगळ्यासाठी २०१६ उजाडायची वाट बघावी लागणार आहे. एवढेच काय ते पायरेट्स आणि जॉनी डेपच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग करणारे आहे.

सज्ज्नगड किल्ला

सन १६६३ मध्‍ये शिवाजी महाराजांनी परळी आणि सातारा असे दोन किल्‍ले मिळवले.त्‍यांनी त्‍यांचे गुरु श्री समर्थ रामदास स्‍वामी यांना परळीच्‍या किल्‍ल्‍यावर रहाण्‍याची विनंती केली होती.कालांतराने त्‍या किल्‍ल्‍याचे नामकरण सज्‍ज्‍नगड असे झाले.

गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ असे म्हणतात. हे द्वार अग्नेय दिशेस आहे.

दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात.

२ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगड. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्ज्नगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

                                             ३३५० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.

                      समोरच किल्ल्याचा तट आहे येथून सभोवतालचा परिसर पारच सुंदर दिसतो.

                                                           धाब्याच्या मारुतीचे मंदिर

                                                      गडावरुन दिसणारा रमणीय परिसर

                             सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

                                                          श्रीरामाचे मंदिर

                                                       गडावरील इमारतीचे अवशेष

                                                     गडावरचे  रामदासांचे अनुयायी

                                                   पेठेतल्या मारुतीचे मंदिर


गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्ज्नगड (सेवा मंडळाच्या) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.गडावर जेवण्याची सोय होते. बारामही पिण्याचे पाणी आहे.