बाईच्या जन्माला आली तू.. तिथंच घात झालाय..

काय सांगू बाई तुले.
बाईच्या जन्माला आली तू.
तिथंच घात झालाय.
कुणाकुणापासून वाचवू तुले
किती कुंपणं न् किती भिंती
अन् कुठल्या कणगीत झाकू तुला.
घरातला काळोखही असतो हल्ली आसक्त
बाहेरच्या अंधारालाही असतात नख्या
आणि उजेडात तर तुझ्या प्रत्येक देहरंध्राला
टोचायला सज्ज हजारो सुया.
कितीही झाकली काया
हैवानांना नसते दया
हेच असतं खरं.
काहीच होणार नाही
निषेधफे-या आणि निदर्शनांच्या धडका मारून
ही वस्ती कधीच मेलीय
तरारलेल्या श्वापदांचा उन्मादी थयथयाट
आणि सगळी दारे बंद

मध गोळा करणारी मधमाशी.

मधमाशी हा एक कीटक आहे.मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात.
 ती मध गोळा करण्यास या फुलावरून त्या फुलावर नृत्य करणे या सार्‍याच गोष्टी अजब आहेत.
  एक छोटासा कीटक माणसाच्या किती उपयोगी पडू शकतो हे मधमाशीच्या जीवनक्रमावरून कळते.
    मधमाशीला त्रास दिल्यास ती चावल्यावर व्यक्तीला तीव्र वेदना होतात.

     मधमाशी,मधमाशी,मधमाशी गुण गुण करशी
      भिर भिर फिरशी दम दम दमशी एका जागी बैस जराशी
       मधमाशी,मधमाशी,मधमाशी एकटी दुकटी तू मधमाशी  मधाच्या बाटल्या भरतेस कशी ?

  
  
     भिरभिरणा-या मधमाशीला कँने-यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रस्थापित (४)

भाग १, भाग २भाग ३ इथे वाचा!
बिनफ्रेमच्या चष्म्याची नजर दीनवाणी  नव्हती. तो हिरमुसून घड्याळात बघत दूर जाऊन उभा राहिला आहे हे शिरीषनं डोळ्याच्या कोपर्‍यातून बघून घेतलं. चष्मेवाला घड्याळात बघत उभा राहिला.
मग पाच मिनिटांनी झटका आल्यासारखं वळत शिरीष नाट्यगृहाचा तो लांबलचक जिना चढू लागला. चार- पाच पायर्‍या चढल्यावर त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यातला बल्ब पुन्हा पेटला. चष्मेवाला चूपचाप त्याच्यामागे चालू लागला होता. चष्मेवाला जिना चढतोय याची खात्री झाल्यावर मगच शिरीषनं मागे न बघता, उलटा पंजा मागे नेऊन हाताची बोटं हलवून आपल्या मागोमाग येण्याची खूण केली. चष्मेवाल्याचा पडलेला चेहेरा बघायची त्याला आता गरज नव्हती.
शिरीष नंतर बुकींगजवळ गेला. नेहेमीप्रमाणे आत वाकून बघितलं. प्लानवर. हाताची बोटं उंचावून पासांची खूण केली. एका ओळखीच्याने थांबवलं. त्याच्याशी बोलला. मागचा चष्मेवाला प्रत्येकवेळी जर्क बसून थांबत होता. अडखळत होता. पास किती ठेवायचे हे बुकींगला सांगितल्यानंतर मगच शिरीषनं चष्मेवाल्याकडे बघून ’बसणार का’ असं अत्यंत कोरड्या आवाजात विचारलं. चष्मेवाला अर्थातच नाही म्हणाला. आपलं काम घेऊन आलेला माणूस पहिल्या भेटीतच फ्री पासवर नाटकाला बसणार नाही, याची शिरीषला खात्री होती.
नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताना द्वारपालाचा सलाम घेऊन शिरीषनं वेग वाढवला. चष्मेवाला फरफटल्यासारखा त्याच्या मागे. या सगळ्या प्रवासात कामाचं काय बोलायचं ते बोलून शिरीष प्रामाणिकपणे चष्मेवाल्याला वाटेला लावू शकला असता. पण शिरीषनं ’काय कसं काय?’ अशा पद्धतीचं बोलणंही टाळलं. शिरीष काही केल्या बोलत नाही म्हणून तो मर्यादापुरूषोत्तम चष्मेवाला शिरीषचा माग काढण्यातच धन्यता मानत होता. एखादा आगाऊ बोलबच्चन असता तर त्यानं शिरीषला एव्हाना हैराण केलं असतं.  पुढे जाऊन आपल्याला अडचणीचं ठरेल असं काहीही करायची चष्मेवाल्याची तयारी दिसत नव्हती. ’काढू दे अजून कळ!’ असं स्वत:शी म्हणत शिरीष वाटेतल्या कॅन्टीनजवळ थांबला. वडा कधी, कसा पाठवायचा हे त्यानं आवर्जून नक्की केलं. पुढे चाललेल्या कलाकाराबरोबर डिसकस केलं आणि थोडा वेग वाढवून त्यानं तो उभा पॅसेज पार केला.
आडवा पॅसेज पार करून दोन-तीन दारं पार करत तो रंगपटात पोहोचला. वाटेतल्या दारांना वर चाप लावले होते. मागून येण्यार्‍यासाठी दार उघडून धरण्याचीही शिरीषला आवशकता नव्हती. चाप लावलेली दारं फटाफट बंद होत होती. ती पुन्हा उघडत जाऊन चष्मेवाला रंगपटाच्या दाराशी येऊन घुटमळला. आत नेहेमीचे यशस्वी, त्याना भेटायला आलेले काही तुलनेने अयशस्वी, काही लोंबते अशी सगळी फौज जमली होती.
आत गेल्यावर उपचार म्हणून तरी शिरीषनं ’आत या’ असं म्हणावं ही चष्मेवाल्याची अपेक्षा असावी. घुटमळून, वाट बघून चष्मेवाला शेवटी रंगपटात शिरला. तो आला आहे याची खात्री झाल्यावर शिरीष त्याला ’या’ म्हणाला. बसा म्हणाला नाही. चष्मेवाला बसला. त्याने अपेक्षेने शिरीषकडे बघितलं. शिरीषने ताबडतोब त्याची नजर टाळून चष्मेवाल्याच्या बाजूला बसलेल्या खुळचट हसणार्‍या माणसाकडे मोर्चा वळवला. काहीतरी गंभीर घडल्यासारखी जुनीच घटना नव्याने सांगू लागला. खुळचट हसणारा मांडीवरच्या ऍटॅचीवर हाताचे दोन्ही कोपरे टेकवून मोबाईलवर खेळत आणखी खुळचट हसत ते सगळं ऐकत होता.

मग त्या खुळचटचं लक्ष चष्मेवाल्याकडे गेलं. ’अरे तू कसा काय इकडे?’, असं विचारून खुळचट तोंड पसरून हसला. शिरीष लगेच सावध झाला, “चला, चला आपण आपलं-” घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला उठवलं. ओळख बिळख म्हणजे नस्तं काहीतरी चालू झालं असतं.
घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला कपडेपटात आणलं. नेहेमीप्रमाणे खुर्च्यांमधे कपडे.
“द्या! द्या! आणलंय नं तुम्ही?” जरा तावदारल्यासारखं करतच शिरीषनं पुन्हा घाई केली…   (क्रमश:)  


होकार…!

         
फ्रेंड्स , आज पहिल्यांदा काल्पनिक कथा लिहितेय . या आधी सत्य कथा खूप लिहिल्या . पण काल्पनिक कथेतल हे माझ पाहिलं पाऊल. I hope तुम्हाला हि गोष्ट आवडेल. 
                                     ………………………………………….. …………………………

           अभी आणि प्रियाची ओळख तशी फार जुनी नव्हती. ते दोघ एकमेकांना गेली २ वर्ष कॉलेजमध्ये  बघत होते ……
 अभी तसा शांत स्वभावाचा, उंच, देखणा, हुशार.कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्याने प्रियाला पाहिलं. प्रिया दिसायला साधीच होती. बडबडी, नेहेमी हसणारी.
          पण अभिच्या आयुष्यात प्रिया वेगळीच जादू करून गेली. रोज तिला कॉलेजला पाहन हा अभिचा सर्वात आवडता कार्यक्रम बनला होता आता! तीच हसण, तिची बडबड, तीच अगदी सहज सगळ्या मित्र-मैत्रीणीना समजून घेण …. तिची प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची.
          तस पाहिलं तर अभी आणि प्रिया एकमेकांसाठी अगदीच अनोळखी नव्हते . कॉलेज मध्ये काही कामा निमित्त त्याचं बोलन व्हायचं. बाकी वेळा प्रियाशी अगदी मोकळेपणाने बोलणार्या अभिला मात्र प्रियाला आपल्या मनातली गोष्ट सांगायची भीती वाटायची ! ”ती नाही  नाही म्हणाली तर!”या विचारानेच तो बेचैन व्हायचा. अभिला प्रिया आवडते हि गोष्ट अर्थातच अभिच्या सगळ्या मित्रांना माहिती होती. ( ते म्हणतात ना कि मुलाला एखादी मुलगी आवडली म्हणजे ती मुलगी सोडून हि गोष्ट बाकी सगळ्यांना माहिती असते .)
           पण हे अस किती दिवस चालायचं म्हणून शेवटी एकदाचा अभी तयार झाला प्रियाला सगळ सांगायला !
           अभी कॉलेजला पोहोचला तेव्हा प्रिया library त जायला निघाली होती. कॉलेज मध्ये नेहेमी मैत्रिणींच्या गोतावळ्यात असणारी प्रिया फक्त library मधेच एकटी असायची. अभी प्रियाच्या मागे library मध्ये गेला तेव्हा प्रिया तिला हव ते पुस्तक शोधण्यात गुंतली होती. 
         ” हाय प्रिया ” अभी.  
           ”हाय” – प्रिया. 
 थोडा वेळ असाच शांततेत गेला आणि अभी म्हणाला ,
” प्रिया , माला बोलायचय तुझ्याशी काहीतरी.” 
 ”…… हो , बोल ना ” प्रिया. 
प्रियाने अभी कडे पाहिलं तेव्हा तो शब्द जुळवण्यात गुंतला होता. 
” काय रे , बोल ना!” प्रिया. 
” प्रिया , मी …… म्हणजे ……. माला तू आवडतेस, माझी life partner बनायला आवडेल का तुला ?” अभी सगळ एका दमात बोलून मोकळा झाला तेव्हा प्रिया त्याच्याकडे बघून हसत होती . 
       तिला तस हसताना बघून अभी गोंधळला तस प्रियाला अजूनच हसू यायला लागल . 
” अरे अभी, किती उशीर लावलास तू हे सांगायला!” प्रिया हसू आवरत म्हणाली. 
 ” …पण तू सांगितल नाहीस तरी तुझ्या डोळ्यांनी मला हे कधीच सांगितल होत. मला फक्त हे तुझ्या तोंडून ऐकायचं होत ………. ”
प्रिया बोलत होती तेव्हा अभी तिच्या कडे बघतच राहिला. 
      एव्हाना बराच वेळ झाला तरी प्रिया अजून आली नाही म्हणून अनु, प्रियाची मैत्रीण तिला शोधत library मध्ये येउन पोहोचली होती . 
         अनु आणि प्रिया library च्या दाराशी येउन पोहोचा तेव्हा प्रियाने वळून अभिकडे बघितल आणि ती हसली……
            तिच्या त्या हसण्यामध्ये अभिला तिचा होकार मिळाला होता ……… 

मोर पंखी कावळा

एक  काळा कावळा,  मोरांच्या देशी  गेला.
मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला.
‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली.
पोरांसाठी  वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली.
जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली.
पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती.
त्यागण्या’ साठी बांधले,  टॅायलेट चकाकी.
सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट
आवडत होते त्याला,  त्याचेच  शिवाम्बू
कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले?
मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली?
तुज्याच पूर्वजाने, केली होती विहीर अशुद्ध.   
तोडले होते तेंव्हा, त्याचे हात नी पाय.
कावळ्या वर ही करू, अनुशास्नात्मक कार्यवाही.
वाळीत त्याला टाकू, तबाह करू करिअर.
काळ बदलला, मुखौटे बदलले
रूप बदलूनी, मोरपंख लाविले

मानसिकता मात्र, बदलली नाही.  
उच्चाधिकारी झाले, कालचे ब्राम्हण.

हिरवे हिरवे गार गालिचे – हरीत तृणांच्या मखमालीचे……..

हिरवे हिरवे गार गालिचे – हरीत तृणांच्या मखमालीचे……. हिरवे हिरवे गार गालिचे – हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ती खेळत होती, गोड निळ्या वातावरणात – अव्याज मने  होती डोलत, प्रणयचंचल त्या भृलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी, याहूनी ठावे काय तियेला? – साध्या भोळ्या त्या […]

जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

              या आधीच्या लेखांकामध्ये मी साप-विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचारपद्धती कशी असते, या विषयी लिहिले. ह्या उपचारपद्धती जश्या आहे तशाच स्वरूपात पिढोनपिढ्या चालत आल्या असाव्यात. उपचार करणार्‍या व्यक्ती स्वतः प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या नसल्याने व रोगी त्याचे म्हणणे ऐकत नसल्याने त्याने “हे मी करत नाही, माझ्या हातून देव करून घेतो” अशी भूमिका घेऊन उपचाराच्या सोबतीला पुजा-अर्चा करण्याचा देखावा निर्माण केला असावा. रोग्याची श्रद्धा देवावर असल्याने रोग्याला मानसिक बळ यातून आपोआपच मिळून उपचार अधिक प्रभावी होण्यास नक्कीच मदत झाली असावी.

              हे पारंपरिक उपचार आहेत. त्यात बदलत्या काळानुरूप संशोधन झालेले नाही. प्रयोगशीलता नसल्याने हे शास्त्र अविकसित राहिले. जे शास्त्र काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, ते फार काळ स्वतःचे उपयोगमुल्य शाबूत राखू शकत नाही. आज अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेने पारंपरिक उपचार शास्त्र मागे पडले किंवा प्रभावहीन झाले, त्याचे प्रयोगशीलता नसणे, हेच प्रमुख कारण आहे. साप चावला तर पारंपरिक उपचार पद्धतीचा उपयोग करणे धोकादायक आहेच, मात्र याचा अर्थ असाही नाही की सर्पदंशावर वैद्यकियशास्त्र फारच प्रभावी आहे. साप चावलेला रोगी ताबडतोब दाखल होऊन वेळेच्या आत उपचार सुरू झाले नाहीत तर रोग्याला हमखास वाचवू शकेल असे औषध आधुनिक वैद्यकशास्त्राकडे नाही. येथे औषधीपेक्षा आणि उपचारपद्धतीपेक्षा रोगी वेळेच्या आत उपचारस्थळी दाखल होणे, हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सर्पदंश झाला तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये वैद्यकीय उपचार हाच एकमेव पर्याय परिणामकारक आहे, यात दुमत नाही. आधुनिक वैद्यकियशास्त्र आता सर्वमान्य झालेले आहे पण सर्पदंश झाला तर इस्पितळात पोहचण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तेथे जो कोणता पर्याय उपलब्ध असेल तो स्वीकारणे रोग्याची अपरिहार्यता असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे वैद्यकियशास्त्र वगळता अन्य पारंपरिक उपचार करून घेण्याचे व्यक्तीचे पर्यायस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. या कलमामुळे विनामूल्य पारंपरिक उपचार करणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार होईल आणि काळाच्या ओघात ही पारंपरिक उपचार पद्धती नामशेष होईल. सरकार जर जनतेला आहे त्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर उपलब्ध असलेला पर्याय हिसकावून घेण्याचा हक्क सरकारला असूच नये आणि तो जनतेने मान्य करू नये. 

हास्यास्पद कलम : जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, “कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे.” येथे “यासारखे उपचार करणे” हा शब्द फारच संभ्रम निर्माण करणारा आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार वगळता अन्य सर्व उपचार कायद्याने बेकायदेशीर ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. कुणी कितीही म्हणोत की हा कायदा केवळ बळजबरीने अघोरी उपचार करणार्‍या मांत्रिकासाठी आहे, तर त्यात अजिबात तथ्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कलमाच्या संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की, “घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून” हे शब्द निव्वळ कुचकामी आहेत, कारण कोणताही मांत्रिक हातात तलवार, कट्यार, बिचवा, चाकूसारखे धारदार शस्त्र किंवा AK-47 अथवा स्टेनगनचा धाक दाखवून ज्याला दंश झाला आहे त्याव्यक्तीस बळजबरीने अडवून (बलात्कार करावा तसा) मंत्रतंत्र, गंडेदोरेचा उपचार करणार नाही तोपर्यंत “रोखणे/प्रतिबंध करणे” या सारखे कलमच लागू पडणार नाही, त्याअर्थी या कायद्यातले हे कलम हास्यास्पदच म्हणावे लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा अपराध्यास शिक्षा करत नाही, न्यायाधीश करत असते. शिक्षा न्यायाधीशाच्या स्वमर्जीने ठरत नसते, तर ते वकिलांच्या ऑर्ग्यूमेंटवर ठरत असते. कायदा किंवा कायद्याचे कलम अस्पष्ट किंवा संदिग्ध असेल तर न्यायप्रक्रियेत जो वकील अधिक चांगल्यातर्‍हेने युक्तिवाद करेल त्याच्या पक्षाने न्याय झुकण्याची शक्यता असते. कायदा किंवा कायद्याच्या कलमाच्या अस्पष्ट किंवा संदिग्धपणामुळेच निष्णात वकील न्याय आपल्या बाजूने झुकवून घेण्यास यशस्वी ठरत असतो. 

उपद्रवी कलम : या कलमान्वये कायदेशीर कारवाई करूनही पुरावे गोळा करणे अशक्य आहे असे पोलिस खात्याला वाटले आणि कायदेशीर कारवाई करूनही पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयात खटला दाखल करणे उपयोगशून्य आहे अशी खात्री झाली तर लाचलुचपत घेऊन तिकडेच निपटारा केला जाईल. त्यामुळे पोलिस खात्याचा अशा केसेसमध्ये उपद्रव वाढीस लागेल.

सूडबुद्धीने वागणारे कलम :  कलम ११ (क) बघा “स्वतःत विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःत पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे”

या तर्‍हेची वर्तणूक करणार्‍याला शिक्षेची कायद्यात तरतूद असणे समर्थनीयच आहे पण;

– तुला माझ्या संस्थेत नोकरी देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी संस्थाचालक लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून शिक्षणमहर्षी घोषित करायचे? 

– एखादा राजकीय नेता तुला निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी तो राजकीय पुढारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून मंत्रिपद देऊन त्याचे हात अधिक मजबूत करायचे? 

– एखादा प्रशासकीय कर्मचारी तुझे काम करून देतो असे सांगून, जर एखाद्या गरजू स्त्री सोबत तो कर्मचारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून राष्ट्रपतिपदक देऊन त्याचे सत्कार करायचे? 

              गुन्हा जर समान असेल तर असा गुन्हा करणार्‍यापैकी निवडून एखाद्याला शिक्षा देणारा कायदा बनविणे, हे “समान न्याय तत्त्वाला” छेद देणारे ठरते. अशा स्वरूपाच्या कायदा निर्मितीमुळे कायदा आपल्याशी समान न्यायाने नव्हे तर सूडबुद्धीने वागतो, अशी भावना काही निवडक जनवर्गाच्या मनात उत्पन्न होऊन त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडून कायद्याबद्दल चीड आणि द्वेष उत्पन्न होऊ शकते. हा फार गंभीर धोका आहे.

अव्यवहार्य कलम 

माझा या कायद्याच्या कलम नऊला विरोध आहे कारण;

१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते.

२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही.

३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल.

४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे.

              हा कायदा केवळ शहरी किंवा जेथे वैद्यकीयसेवा सहज उपलब्ध आहे अशा शहराच्या आसपासच्याच जनतेसाठीच लागू नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर जनसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथे अजून पिण्याचे पिण्यायोग्य पाणीसुद्धा पोचलेले नाही. काही गावात रस्तेच नाहीत. अनेक दुर्गम भाग असे आहेत की, जेथे बारमाही संचार सुविधा उपलब्ध नाही. पावसाळा सुरू झाला की काही गावात पायदळ चालत जाणे ही एकमेव संचार सुविधा उपलब्ध असते. पुर आला की काही गावांचा अन्य गावांशी आणि शहरांशी संपर्क तुटून जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर असे दिसेल की शेतात जायला पक्के रस्ते नाहीत. केवळ पांधनरस्ते, शीवरस्ते किंवा पायवाटाच आहेत. पावसाळाभर चप्पल नावाची वहाण जेथे चालत नाही तेथे अन्य वाहने चालण्याचा प्रश्नच येत नाही. गावाकडून शहराकडे जायला शेतक्र्‍यांजवळ स्वतःचे वाहन नाही. बर्‍याच गावांना अजून एसटीचे दर्शन झालेले नाही. ज्या गावात एस टी जाते तेथे एक किंवा दोनच टायमिंग आहेत. आपण २०१३ मध्ये जगत असलो तरी खेड्यातील रोग्यास घ्यायला अ‍ॅम्बुलन्स येणे, ही सुविधासंस्कृतीच अजून जन्माला यायची आहे.

              सर्पदंश झालेल्या व्यक्तीस अत्यंत तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. अनेक गावांची स्थिती अशी की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात पोचवायला किमान ४-५ तास लागू शकतात. समजा जेथे सर्पदंशावर वैद्यकसेवा उपलब्ध आहे अशा आरोग्य केंद्रापासून ७०-८० किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावात श्याम नावाच्या व्यक्तीला गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावरील शेतात सर्पदंश झाला तर दवाखान्यात न्यायचे वाहन उपलब्ध होईपर्यंत श्यामने किंवा त्याच्या नातेवाइकाने काय करायचे? जर वैद्यकीय उपचार उपलब्धच नसेल तर अन्य पर्यायी उपचार नाही करायचे? देवाचा धावा केल्याने मरणारा माणूस वाचत नाही, हे माहीत आहे म्हणून “देवा वाचव” असा धावा करण्यास मनाई करायची? पारंपरिक उपचार करायचेच नाहीत? 

              चावा घेण्यासाठी साप माणसावर चाल करून बाहेर मोकळ्या जागेत येत नसतो. झुडुपात, जमिनीच्या भेगांत, कचरा टोपलीत, कचर्‍याच्या ढिगात किंवा एखाद्या वस्तूच्या खाली बुडाशी बसलेला असतो. माणसाच्या ज्या भागाचा स्पर्श त्याला होईल त्या भागाला तो चावा घेत असतो. कधी कधी तो दिसतच नाही. अंधार असेल तर अजिबातच दिसत नाही. अशावेळी साप विषारी की अविषारी हा मुद्दाच गौण असतो. साप विषारी असेल तरीही त्याने किती मात्रेत विष शरीरात टाकले, हे कसे ठरवणार? सापाचे वजन, दंश झालेल्या व्यक्तीचे वजन यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. अशावेळी दंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार दिला तर तो कदाचित वाचेल सुद्धा. आमच्या भागात डोम्या नाग व गव्हाळ्या नाग प्रसिद्ध आहेत. हे साप चावले तर माणसाला “पाणी सुद्धा मागू देत नाही” अशी म्हण आहे. या प्रजातीचा मोठ्या आकाराचा साप चावला तर दोन तासात सर्वकाही संपून जाऊ शकते. वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत जर त्याच्यावर पारंपरिक उपचार केले तर कदाचित हा काळ आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे म्हणून काय अशा प्रसंगी हातावर हात ठेवून बसायचे? वेळेच्या आत वैद्यकीय सेवा जर उपलब्ध झालीच नाही तर डोक्यावर हात ठेवून त्याला मरताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे? 

              अनेकजण यावर युक्तिवाद करतात की, पारंपरिक उपचारांना बंदी घातलेली नाही. पण माझ्या मते ही बंदीच आहे. समजा श्यामवर पारंपरिक उपचार सुरू केले आणि श्याम दगावला. त्याला दोन मुले आहेत एक पुण्याला आणि एक मुंबईला. ते दोघेही येणार पण तो पर्यंत बाप मेला असणार. या मुलांनी जर का बापाच्या मृत्यूपश्चात ठाण्यात तक्रार नोंदवली की, माझ्या बापावर मांत्रिकाने जबरदस्ती करून उपचार केले तर पुढे काय होईल कल्पना करा. शिवाय प्रत्येक गावात गटबाजी असते. ते अशावेळी एकमेकावर सूड उगवू शकतात. सत्ताधारी पक्ष गैरफायदा घेऊ शकतो.

              वास्तवाची एवढीशी जाणीव नसणे हा दुर्गम भागातील ग्रामीण लोकजीवनाशी राज्यकर्त्यांची नाळ तुटली असल्याचा पुरावा आहे. राजकारणाबाहेरील व्यक्तींना समाजसुधारणा करायची असेल तर त्यांनी प्रबोधन करावे, सक्ती करणे म्हणजे विचारसामर्थ्याचा पराभव मान्य करण्यासारखे आहे. सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने विचार केला तर ज्यांना स्वतःच्याच विचारावर भरवसा नाही तेच सक्तीची भाषा वापरत असतात, असेही म्हणता येईल. 

सरकारला जर खरेच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू थांबवायचे असतील तर;

१) प्रत्येक गावात पक्का रस्ता तयार करावा.

२) प्रत्येक गावात अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी.

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.

४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)

कायदाच करायचा असेल तर असा करावा;

“सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल.”

              या तर्‍हेचा कायदा जर अस्तित्वात आला आणि लागू झाला तर पुरोगामी महाराष्ट्रातील बर्‍याचशा अंधश्रद्धा संपुष्टात येतील. डॉक्टर नेमणुकीच्या प्रक्रियेत अंधश्रद्धा निर्मूलनाला स्वेच्छेने उत्सुक आणि कटिबद्ध असलेल्या डॉक्टर मंडळींना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम आणखी गतिमान करता येईल.

                                                                                                                           – गंगाधर मुटे
——————————————————————————————————————-
(समाप्त)

Filed under: अंधश्रद्धा, वाङ्मयशेती Tagged: जादूटोणा, शेती आणि शेतकरी, My Blogs

तुंडा पुराण

.
 खतरनाक अतिरेकी , जिहादी तुंडा ला खालावत्या  तब्येतीमुळे   पाकिस्तानात आत्मघाती केंद्रात प्रशिक्षण देणे शक्य नसल्याने आय एस आय ने त्याला नारळ दिला ,
आता निवृत्त तुंडा ला  जगण्यासाठी उत्कृष्ट वैद्यकीय सेवेची नितांत गरज होती जी पाकिस्तानात त्याला मिळणे अशक्य होते ,    आय एस आय त्याला दुबई किंवा आखतात उपचारासाठी पाठवणे शक्य नव्हते .लंगडे घोडे पे कौन पैसा लगायेगा .  
त्यातच .आपले काम प्रामाणिकपणे व इतबारे करणाऱ्या तुंडाला त्याच्या संघटनेत वरिष्ठ अधिकारी कमांडर लख्ख्वी कडून मानहानी सहन करावी लागली .भारताने अटक केलेला दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याने चौकशीदरम्यान लष्करे तय्यबाचा कमांडर झाकी उर रेहमान लख्वी याच्याविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. काश्‍मिरपर्यंतच मर्यादित असलेल्या संघटनेला अखिल भारतीय स्वरूप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्या नंतरही लख्वीने संघटनेत उच्च स्थानी पोचण्याच्या माझ्या मार्गात अडथळा आणल्याचे टुंडाने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले.
म्हणूनच गड्या  आपला गाव बरा  ह्या उक्तीनुसार व स्वदेस हा शिनेमा सलग ३ वेळा न झोपतां पहिल्याने तुंडा च्या मनावर परिणाम होऊन त्याने मनाशी एक निर्णय केला.
 तुंडा ने डोके चालवले
व भारत सरकार च्या स्वाधीन झाला , ह्याची गोड फळे त्याच्या लगेच पदरात पडली , त्यावर त्वरीत वैद्यकीय उपचार सुरु झाले. त्याच्या पाषाण , निष्ठुर हृदयाची काळजी घेण्यासाठी 

शरीरात  पेसमेकर बसविला गेला.  एम्स’ रुग्णालयात हृदयात शनिवारी “पेसमेकर’ बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने डॉक्टरांनी टुंडावर “पेसमेकर’ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता,
त्याच्या रोजच्या जेवणात चिकन चा समावेश आहे
अधून  मधून बिर्याणी सुद्धा मिळेल
हे सर्व पाहून दाउद  सुद्धा एकेदिवशी भारताच्या स्वाधीन होईल
म्हणजे त्याची तिसरी बायपास जसलोक मध्ये करता येईल
मग 

वन्स अपॉन तैम  इन मुंबई दोबारा  live   
  ताजा कलम
नुकतीच ही  बातमी वाचली .
संमतीने शरीरसंबंध गुन्हा नाही
 तुम्ही पण वरील    बातमीवर टिचकी
मारून ती  वाचून घ्या , हेच मत फार आधी मी मांडले होते.

“नीलांगिनी”…..

                   ..“नीलांगिनी”….   स्मिता पोतनीस लिखीत आणि मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ..“नीलांगिनी”…. हे पुस्तक नुकतेच वाचले..खरतर ही कादंबरी द्रौपदीच्या सुडाच्या पूर्तीचा प्रवास आहे. तिच्या दृष्टीकोनातुन महाभारत आहे..जसे कर्णाच्या दृष्टीकोनातुन राधेय, कौंतेय आहे तसे हे ’निलांगिनी’.. खर बघायला गेलेतर हा द्रुपद राजाच्या सुडाचा प्रवास म्हणायला हरकत नाही.कारण वारंवार त्याचा उल्लेख या पुस्तकात होत रहातो. आपल्या सुडाच्या […]

जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)
                   कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, “कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे.” एखादा निबंध, कविता किंवा एखादी म्हण वाचत जावे तसेच हे कलमही वाचले तर या कलमात गैर काय आहे? असा साहजिकच कुणालाही प्रश्न पडतो. शिवाय रुग्णाला त्याच्या मनाविरुद्ध बळाचा वापर करून जर एखादा मांत्रिक रोखत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे उचितच आहे, असे वाटून बस्स एवढाच तर अर्थ आहे या एका ओळीच्या कायद्याचा. मग त्यालाही जर कोणी विरोध करत असेल तर तो विरोध करणारा स्वतः:च मांत्रिक असावा, किंवा धर्मवेडा तरी असावा, तेही नसेल तर अंधश्रद्धा बाळगणारा, अनपढ, गवांर, गावंढळ, बुद्धू, बिनडोक वगैरे तरी नक्कीच असावा, असे बर्‍याच लोकांना वाटायला लागते, आणि नेमकी येथेच फसगत होते.
                  पण या कलमात “वैद्यकीय उपचार” हा एकमेवच पर्याय दिल्याने ही “सक्ती”च झाली आहे. “वैद्यकीय उपचार” म्हणजे “ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार.” असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व “पारंपरिक उपचार” देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला “वैद्यकीय उपचार” किंवा “मंत्रतंत्र, गंडेदोरे” हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास “रामबाण उपचार” आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर “पर्फेक्ट” नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात?
                  सध्या प्रचलित उपचार पद्धती मध्ये ग्रामीण जीवनाच्या आवाक्यात असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रमुख तीन उपचार पद्धती आहे. त्यातही लोकप्रियतेत सिंहाचा वाटा एकट्या अॅलोपॅथीचा आहे. वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि बहुतांश रोगांच्या बाबतीत वैद्यकशास्त्राला पर्यायच नाही. पण काही रोग असेही आहेत की, अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेने वैद्यकशास्त्र पिछाडीवर आहे. खुद्द वैद्यकशास्त्रालाही ते मान्य आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मान्य केले आहे. उदा.
१) सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.
२) स्पॉन्डिलाइटिस सारख्या विकारावर वैद्यकशास्त्रापेक्षा योगाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते. असे म्हणतात.
३) काविळसारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.
                  या संदर्भात एक उदाहरण देतो, हे माहितीस्तव उदाहरण आहे, समर्थन नाही. माझ्या एका गोपाल नावाच्या मित्राला काही वर्षापूर्वी कावीळ झाला होता. त्याने सुरुवातीचे काही दिवस खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण कावीळ आणखी वाढतच होता. खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून तो थेट नागपूर मेडिकलला दाखल झाला. १५ दिवस लोटले खर्चही खूप झाला पण आराम नव्हता. डोळे, नखे वगैरे पिवळे आले होते. आरामच होईना म्हणून त्यांनी स्वमर्जीने इस्पितळ सोडले आणि एका घरगुती सेवाभावी नि:शुल्क औषध देणार्‍या ग्रामीण व्यक्तीकडून औषध घेतले. आराम मिळाला. 
                  ग्रामीण भागात अनेक लोकांना अनेक रोगांवर खात्रीने दुरुस्त होऊ शकेल अशी वनस्पती औषधे माहीत आहेत, याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. दु:खद बाब एवढीच की, आपले महत्त्व कायम राहावे म्हणून ही मंडळी अशी माहिती स्वतः:जवळच जपून ठेवतात. इतरांना अजिबात सांगत नाही. त्यामुळे या औषधोपचाराची चिकित्सा आणि संशोधन होत नाही. माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्‍हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली.
तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी.
शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खायला द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्‍या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी.
पथ्य – आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही.
हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे. 
३) वात, लकवा, अर्धांगवायू सारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, हा माझा अनुभव आहे.
                  दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अ‍ॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर तिथून नागपूरला रेफ़र करण्यात आले. तिथे भरती केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा, तुमचा आग्रह असेल तर भरती करून घेतो, आपण प्रयत्न करू पण काही उपयोग होईल असे वाटत नाही. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून १६ किलोमीटरवर एक तिगाव आहे. तेथे एक हकीम आहे, मग त्याच्याकडे नेले. त्याने फक्त २०० रुपयात काही जडीबुटीची भुकटी आणि तेल दिले. २४ तासातच आराम दिसायला लागला. तीन महिन्यात आई तंदुरुस्त झाली, एवढी की तिला घेऊन वैष्णोदेवीला गेलो. १६ किलोमीटर डोंगर चढणे व १६ किलोमीटर डोंगर उतरणे आणि तेही वयाच्या ७० व्या वर्षी! लीलया आव्हान पेलले माझ्या आईने मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर. आजही ती स्वस्थ आहे.
मृत्यूच्या दाढेतून परत आलेली माझी आई
                  हे लिहिण्यामागे वैद्यकशास्त्राला कमी लेखण्याचा किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न नाही पण या तर्‍हेने उपचार घेणे म्हणजे अंधश्रद्धा असते, औषध देणारा म्हणजे भोंदूच असतो, असे वगैरे काही नसते. १७ वर्ग शिकणे, १८ पुस्तके वाचणे म्हणजेच ज्ञान असते, उरलेले सगळे अज्ञान असते, असेही नसते, याचेही भान असणे गरजेचे असते. 
                                                                                                                – गंगाधर मुटे
———————————————————————————————————
(…..अपूर्ण….)

Filed under: अंधश्रद्धा Tagged: अंधश्रद्धा, जादुटोणा, Poems

आत्माची शंभरावी लडाख सफर

मित्र हो…!  आज माझा प्रिय मित्र ‘आत्मा’ आपल्या शंभराव्या
लडाखवारीवर चाललाय. एका लडाख बाहेरच्या माणसाने लडाखला शंभरवेळा जाणं हा एक विक्रम
असावा. पर्यटकांना घेवून लडाखला जायचं असा ध्यास घेतल्यापासून त्याच्या स्वत:च्या
शंभर वार्‍या झाल्या आहेत, असा योग फार क्वचीतच येतो, या भटक्याच्या आयुष्यात तो
आलाय. आज हजारो पर्यटक लडाखला ‘ईशा टुर्स’ बरोबर जावून आलेत, काही आता चाललेत तर काही जायची तयारी

कैलास

कैलासीचा राणा

भेट घडे आज

विराट ते रुप

दिसे मज

निर्मळ जलाचे

मानसरोवर

जन्मभर आस

असे वारंवार

दर्शन घडले

हात मी जोडले

भरून वाहीले

दोन्ही डोळे

पवित्र तीर्थाचे

स्नान आज घडे

पाप ताप झडे

सर्वकाळ

माझा विठूराया

शंभो शिव माया

एक झाली काया

त्यांच्या संगे

अफाट दर्शन

ज्योतींचे नर्तन

माझे तनमन

त्यात रंगे

कैलास पर्वत

त्याची परिक्रमा

आनंदाची सीमा

नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा


ब देशाचा राजा: तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात.
अ देशाचा राजा: आपले कारीगर , आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू.
कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले.
कारीगराने नाणे बनविले, ब देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते.
आता ब देशाला अ देशाच्या एका नाण्यासाठी ४ नाणे द्यावे लागतात.
ज्याला कळला कथेचा अर्थ
तोच असेल खरा अर्थतज्ञ.

आयुष्य अगदी …

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं…
काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात…
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं.
 -जीवा

जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) 
                          कोणताही विषय नेमकेपणाने समजून घ्यायचा असेल तर त्या विषयांची शक्यतो सर्व अंगांनी माहिती करून घेणे आवश्यक असते. ज्यांना या पारंपरिक उपचार पद्धतींबद्दल अजिबात माहिती नसेल त्यांना या उपचार पद्धतीविषयी माहिती व्हावी म्हणून लेखमालेच्या पहिल्या भागात म्हणजे लेखांक-१ मध्ये साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचार पद्धती कशी असते, ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. तीन लेखांकामध्ये हा विषय पूर्ण करायचा विचार होता. परंतू पुस्तक किंवा ही लेखमाला मी वृत्तपत्रासाठी लिहीत नसून आंतरजालावर लेखन करत आहे याचे भान आल्याने व काही आततायी प्रतिसादकांकडून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर हिणकस आरोप करणारे प्रतिसाद लिहिले जाण्याची शक्यता बळावल्याने, मग प्रत्येकाला स्वतंत्रपणे उत्तर देऊन स्वतःची दमछाक करून घेण्यापेक्षा या लेखांकात आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून नाईलाजाने स्वतःबद्दल व्यक्तिगत माहिती मी लिहायचे ठरवले आहे. माझ्याविषयी संक्षिप्त माहिती अशी-
१) माझा माझा पूर्ण पत्ता विपूमध्ये लिहिलेला आहे. माझ्या गावातील २५ पेक्षा जास्त मंडळी फेसबुकवर आहे. हा लेख मी फेसबुकवर सुद्धा टाकत असल्याने मी देत असलेल्या माहितीबद्दल वाचकांनी विश्वास बाळगावा. याला संतोषीमातेचे पत्र समजू नये.
२) मी व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सरकारची कमीतकमी ढवळाढवळ असावी, असे मानतो. 
३) मी विज्ञानाचा पदवीधर असून विज्ञानाचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा कट्टर समर्थक आहे.
४) मी स्वतःमूर्तिपूजां करण्याचे टाळतो पण इतरांना मनाई करत नाही. 
५) भविष्य शास्त्रावर माझा विश्वास नाही पण विश्वास असणार्‍यांचा अनादर करत नाही. 
६) मी सनातनी, प्रतिगामी किंवा पुरोगामी या शब्दांपासून स्वतःला वाचवतो. कालबाह्य न झालेले व उपयोगमुल्य शाबूत असलेले जुने ते “सोने” समजतो आणि मला नवे ते “हवेहवेसे” वाटते.
७) जेथे विज्ञानाचे हात टेकतात आणि बुद्धीसुद्धा हतबल होते तिथून श्रद्धेची कक्षा सुरू होते. श्रद्धा ही श्रद्धा असते, डोळस किंवा आंधळी अजिबात नसते. श्रद्धेच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष वेगवेगळ्या असू शकतात, यावर माझा विश्वास आहे.
८) कालबाह्य परंपरा व रुढी नष्ट झाल्या पाहिजेत पण त्याऐवजी ज्या नव्या प्रथांचा अंगीकार करायचा आहे त्याचीही कारणमीमांसा झाली पाहिजे, डोळे झाक करून ते स्वीकारायचे नाही मग ते कितीही अद्ययावत का असेना, असे मी मानतो.
९) देवापुढे प्राण्यांचा बळी द्यायचा नाही, याचा मी समर्थक आहे. आमचे घरात दरवर्षी फ़रिदबाबाची पुजा म्हणून बोकड कापून नैवद्य दाखवायची परंपरा होती, मी घरच्या सर्व वडिलधार्‍यांचे मनपरिवर्तन करून ही प्रथा मोडीत काढली.
१०) मजूरवर्गाला सायंकाळी/रात्री मजुरीचे पैसे देऊ नये, असा आमचेकडे समज आहे. त्याला छेद म्हणून गेली २६ वर्ष मजुरांना सायंकाळी/रात्रीच पैसे देत असतो.
११) एका भविष्यवेत्त्याने मला आठवा गुरू असताना लग्न करू नकोस असे सांगितले होते. मग मी मुद्दामच आठव्या गुरूत असतानाच लग्न केले. 
१२) मद्यप्राशनाला माझा कट्टर विरोध आहे पण सक्तीने दारूबंदी करायलाही विरोध आहे.
१३) १९८७ मध्ये गावात राहायला गेलो तेव्हा सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मारुतीच्या पारावर आणून पारंपरिक उपचार करायची पद्धत होती. या पद्धतीपेक्षा वैद्यकीय पद्धतीने त्यावर उपचार व्हावेत म्हणून त्या काळी समवयस्क मुलांना गोळा करून याविषयी सतत जनजागृती केली. स्वखर्चाने दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली, मात्र कुणावर कधीही सक्ती केली नाही. बराच काळ लागला पण यश मिळाले. आता सर्पदंश झाल्यास सर्वच थेट दवाखान्याचा रस्ता धरतात. मागील दोन महिन्यात माझ्या गावात ३ शेतकर्‍यांना सर्पदंश झाला आहे. त्यापैकी एका सर्पदंश झालेल्या शेतकर्‍याला माझ्या छोट्या भावाने स्वतःच्या चारचाकीने व स्वखर्चाने त्या व्यक्तिला दवाखान्यात नेऊन भरती केले. तीनही शेतकरी वाचले आहेत.
१४) दोन वर्षापूर्वी गावातील एका इसमाला कर्करोग झाला होता. पण तो नागपूरला मेडिकलमध्ये जाण्याचे टाळून वैद्याकडून जडीबुटीचे औषध घेत होता. मी खूप प्रयत्न केले पण तो मेडिकलमध्ये जायला राजी होत नव्हता. मी त्याला समजावत होतो मात्र सक्ती करत नव्हतो. मग मी पहिल्यांदा त्याच्या कुटुंबीयांना राजी केले. शेवटी रोगीही राजी झाला. मग अडचण आली पैशाची. माझ्यासमोर नाईलाज होता. खर्च मी करायचे मान्य करून त्याला नागपूरला भरती केले. कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोचल्याने ऑपरेशन झाले पण ६ महिन्यानंतर तो दगावला. आता त्याचा मुलगा दारूचा आहारी गेला आहे व माझे पैसे परत करू शकत नाही, असे त्याने मला स्पष्टपणे कळवले आहे. माझे पैसे परत मिळतील अशी आशा मावळली आहे. चाळीस हजार रुपये सोडून देण्याइतपत मी श्रीमंत नसलो तरी माझा नाईलाज आहे. मात्र त्या पोराला मी एका वाईट शब्दाने देखील बोललेलो नाही माझे पैसे परत करावे म्हणून सक्ती केली नाही, करणार नाही.
१५) एक वर्षापूर्वी एका पेशंटला आजार झाला. त्याने काही दवाखाने केले पण त्याला आराम मिळेना म्हणून तोही वैद्याकडून जडीबुटीचे औषध घ्यायला लागला होता. मी स्वतः त्याला विशेषज्ञ डॉक्टरकडे नेले आणि त्याला हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. दीड लाख रुपये खर्चाची बाब होती. त्याची ऐपत नव्हती म्हणून त्याला “जीवनदायी आरोग्य योजना” आणि अन्य संस्थांकडून सव्वा लाख रुपयाची मदत मिळवून दिली. पेसमेकर इन्प्लँटेशनचे ऑपरेशन यशस्वी झाले. मात्र यासाठी मी माझ्या गाडीचा एकूण दहा हजार रुपयापर्यंत आलेला डिझेल खर्च पेशंटकडून घेतलेला नाही. यावेळी अनेकदा डॉ. कैलास गायकवाड यांनी मला फोनवरून ऑपरेशन संदर्भात बरीच मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
१६) सहा महिन्यापूर्वी एका महिलेला “जीवनदायी आरोग्य योजना” आणि अन्य संस्थांकडून दीड लाख रुपयाची अशीच मदत मिळवून देऊन तिचे दोन्ही व्हॉल्व्ह्चे (एक रिप्लेसमेंट आणि एक रिपेअर) ऑपरेशन करून घ्यायला लावले. याकामी सुद्धा माझे स्वतःचे दहा हजार रुपये खर्च झाले आणि मी ते पेशंटकडून घेतलेले नाही.
मला असे वाटत आहे की, जे लिहिले तेच भरपूर झाले. यापेक्षा आत्मस्तुतीपर लिहिण्याची गरज नाही. आता पुन्हा मूळ लेखाकडे वळतो आणि उर्वरित लेखाचा भाग लेखांक-३ आणि लेखांक-४ मध्ये पूर्ण करतो.
                                                                                                                        – गंगाधर मुटे
———————————————————————————————————

Filed under: अंधश्रद्धा Tagged: शेती आणि शेतकरी, My Blogs