लडाख प्रवास अजून सुरू आहे – पुस्तक परिक्षण लोकसत्ता

लोकसत्ता दैनिकाच्या दि.  २८/०७/२०१३ च्या समीक्षा या सदरात ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या आमच्या पुस्तकावर खालील प्रमाणे परिक्षण आलं आहे.

लडाखमध्ये भ्रमंती करताना तेथील स्थानिक व्यक्ती, समाज, त्यांची जीवनशैली, संस्कृती आणि ऐतिहासिक संदर्भ जाणवले त्याचे वर्णन आत्माराम परब आणि नरेन्द्र प्रभू यांनी या पुस्तकात केले आहे. त्या प्रवासाचा थरारही पुस्तकात ओघवता भेटतो. त्यांचा गिर्यारोहणाचा

दाभोळचा गॅस

दाभोळच्या गॅस जेटीबद्दल पूर्वी लिहिले होते. त्या जेटीवर गॅसची जहाजे आता लवकरच लागूं लागतील. दाभोळपासून बंगलोरपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम चालू आहे. ही पाइपलाइन अर्थातच महाराष्ट्राच्या तीनचार जिल्ह्यांतून जाईल मात्र वाटेतल्या कोणत्याहि शहराला त्यातून गॅस मिळण्याची सोय असणार नाही. कर्नाटकात मात्र त्या लाइनवरील इतर छोट्यामोठ्या शहरांना गॅस मिळणार आहे. एक पॉवरस्टेशनहि गॅसवर चालणार आहे. एकूण सर्व गॅस कर्नाटकात जाणार आहे. कोची येथे अशीच एक गॅसजेटी बनते आहे. तेथे येणारा गॅसहि केरळ व कर्नाटकातच वापरला जाणार आहे. आंध्रच्या किनार्‍यावरील एका छोट्या बंदरातहि लिक्विडगॅस आयातीची मोठी सोय बनते आहे. त्या गॅससाठी आंध्र, तामिळनाडु, कर्नाटक वाटणी मागत आहेत. कुडनकुलम येथील पॉवरस्टेशन सर्व मतलबी विरोधाला न जुमानता अखेर सुरू झाले. त्यासाठी जयललिताने सहकार्य केले, त्याची किंमत म्हणून तेथे निर्माण होणार्‍या पॉवरचा मोठा वाटा तामिळनाडुला मिळणार आहे व उरलेल्या साठी आंध्र-कर्नाटकानी मोर्चेबांधणी चालवली आहे. या सार्‍यात महाराष्ट्र कोठे आहे? आम्हाला काही नकोच आहे! दाभोळची वीज महाग म्हणून नको. गॅसहि नको (वाटा मागितल्याचे वाचनात नाही). एन्रॉन समुद्रात बुडवण्याचे काय झाले? पर्यावरणाचे काही नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही. गुहागर परिसराचे काही नुकसान झाल्याचेहि ऐकिवात नाही. गॅस आयातीची सोय उद्या वाढेलहि पण आम्हा महाराष्ट्रियाना काय त्याचे? गॅस जमिनीखालून कर्नाटकात गेला तर गेला! गोव्यालाहि पाहिजे तर द्या! आम्हाला नकोच. जैतापुर? नको नको. ७०% वीज महाराष्ट्राला देणार असाल तर जैतापुर चालेल असे कोणाला म्हणावेसे वाटत नाही. महाराष्ट्र गाढ झोपला आहे. क्षुद्र कुरघोडीचे राजकारण व भ्रष्टाचार सर्वाना हवा आहे. जनता अमर आहे.

काही नि:शब्दकथा

(कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत
व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी
जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी
नोंदवणारा अर्ज करता येईल.)

प्राचीन:
एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात
आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. “तू
माझ्या

प्रेम आणि गालावरचे खड्डे

मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या बातम्या दूरदर्शन वर येत होत्या, माझ्या एका मित्राने या बाबत मला काही प्रश्न विचारले. त्याच्या मनातले बहुतेक प्रश्न आपण सर्वांच्याच मनात डोकावत असेल. म्हणून विचारलेल्या प्रश्नांचे समाधान कारक उत्तर देण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे.

पहिला पाऊस पडल्याबरोबरच मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. हिरव्यागार वस्त्रांनी नटलेली धरती, हिरव्या शालू नेसलेली भारतीय परंपरेत वाढलेल्या नववधू सारखी दिसते. पतिदेवांच्या  पहिला-पहिला स्पर्श होताच, आपली भारतीय नववधू लज्जेने चूर-चूर होते. तेंव्हा तिच्या गालावर सुंदर-सुंदर खड्डे पडतात. खड्डे पडलेल्या सुंदर, मोहक आणि मादक पत्नीस पाहून, पतीदेव तिच्या वर प्रेमाचा वर्षाव करणारच.  त्याच बरोबर गालावर लज्जेचे खड्डे ही अधिक पडणारच.  
आपले रस्ते ही आपल्या भारतीय परंपरेला जपणारे आहेत. कितीही डाबर किंवा सिमेंट कांक्रीटनी बनलेले असो, पाऊसाचा प्रथम प्रेमळ स्पर्श झाल्या बरोबरच, नववधू सारखे रस्ते लज्जेने चूर-चूर होतात आणि त्यांचा गालावर खड्डे पडतात. रस्त्याचं हे सुंदर मोहक रूप पाहून, प्रेमाचा पूर हा रस्त्यावर वाहणारच आणि मोठ्या संख्येने रत्यावर खड्डे ही पडणारच. त्यात नवल काय?  पुन्हा प्रश्न उभा राहतो, आपल्याच देशात रस्त्यांवर खड्डे का पडतात? पाश्च्यात देशांत का नाही? उत्तर सोपे आहे, पाश्चात्य देशांत, जिथे लोकांना सार्वजनिक प्रेम प्रदर्शन करण्याची मुभा आहे. तिथली नववधू पहिल्या रात्रीत लाजत नाही आणि तिच्या गालावर खड्डे ही पडत नाही. मग प्रेम वर्षावाचा प्रश्नच येत नाही. प्रेमाच्या अभावी त्यांचा संसार ही फार काळ टिकत नाही.(हा वेगळा भाग आहे). मुद्दा हा, तिथले रस्ते ही तिथल्या स्त्रीयांसारखे लज्जेहीन असतात,  मग त्यांच्या गालांवर खड्डे पडणार तरी कसे?
माझ्या मित्राने पुहा प्रश्न विचारला, पाऊसाचे आणि रस्त्यांचे प्रेम बीम हे सर्व ठीक आहे. पण त्यांच्या प्रेमाचे परिणाम आपल्याला का भोगावे लागतात? दरवर्षी कित्येक वाहने खड्यात पडतात, कित्येक लोक जखमी होतात, कित्येकांची तर थेट  रवानगी देवाघरी होते. शिवाय दररोज होणारऱ्या ट्राफिक जाम मुळे कार्यालयात पोहचायला उशीर होतो व घरी यायला ही.

मी उतरलो, दोन जीव प्रेमात मग्न असताना, त्यांना त्रास देणे योग्य नाही. अशा वेळी रस्त्यांवर जाणे म्हणजे त्यांचा प्रेमात बाधा उत्पन्न करणे होय. प्रेमी जीवांना त्रास देणाऱ्यांना देव क्षमा करत नाही. अश्या लोकांना परिणाम भोगावेच लागतात. त्यात रस्त्यांचा काय दोष. पाऊस सुरु असताना चक्क दांडी मारून घरी बसावे हेच योग्य. म्युनिसिपाल्टी ने किती ही खड्डे बुजविले तरी ही प्रत्येक पाऊसात रस्त्यांच्या गालावर खड्डे हे पडणारच कारण पाश्चात्य स्त्रियांप्रमाणे आपल्या रस्त्यांनी लज्जा सोडलेली नाही. पाऊस आल्यावर त्यांचा गालावर खड्डे हे पडणारच उगाच म्युनिसिपाल्टी किंवा रस्त्याला शिव्या देण्यात अर्थ नाही. प्रारब्धाचा स्वीकार करावा हेच योग्य. असो

आशीर्वाद

आपली व्यक्ती नेहमीच मनापासून आशीर्वाद देते, पण जेव्हा कुणी परकी, रक्ताचं नातं नसलेली व्यक्ती मनापासून आशीर्वाद देते तेव्हा त्याच्या आठवणी आयुष्यभर ताज्या राहतात.

एक फिरतीची नोकरी करणारा तरुण एका अनोळखी शहरात कामानिमित्त जातो, पंचविशीतला हा तरुण घरापासून खुप दुर असतो. बोलका, मनमिळाऊ स्वभाव त्यामुळे ओळखी सहज होतात आणि लक्षात देखील राहतात. सुरवातीला तो त्या शहरात क्वचितच जात असे, पण नंतर वारंवारता वाढते आणि मग आठवड्यातून २-३ दिवस त्याला तिथेच राहावे लागते. मोबाईल फोन गरजेची वस्तु नसुन चैनीचे गोष्ट होती त्या काळची ही घटना.

आता जवळ जवळ तो त्या शहरात राहु लागला होता. कारण क्लायंट च्या व्हिजिट साठी प्रवास खर्च आणि प्रवासातला थकव्या पेक्षा तिथे लॉज वर राहणे सोयीस्कर होते. त्याकाळी मोबाईल फार महागडे होते. कार्यालयीन कामं पोस्ट अथवा कुरीअरने व्हायची. फार महत्त्वाचं असेल तर फोन. दिवसातून एकदा तरी त्याला हेड ऑफीस ला फोन करावा लागत असे, त्यासाठी पर्याय होता STD-PCO.

पहाटे सकाळी लवकर उठायचं, चहा नाश्त्यासाठी बाहेर पडायचं. रोजचा पेपर घेउन पुन्हा रुमवर येऊन क्लायंट कडे जाण्यासाठी तयार व्हायचं. बाहेर पडलं एका STD-PCO वर जाऊन हेड ऑफीसला फोन करायचा आणि पुढे कामाला जायचे. थोड्याच दिवसात त्या STD-PCO वर काम करण्या-या बाईंची आणि त्याची ओळख झाली. कामाचं फोन वर बोलुन झालं की ५ मिनिट का होईना तो त्यांच्याशी बोलतं असे. भाषेतल्या लहेज्यातुन त्यांनी लगेच ओळखलं की, तरूण या शहरातला नाही.

सुरवातीला बोलण्याचा विषय म्हणजे, थोडीफार चौकशी, कुठे काम करता, काय काम करता इथ पर्यंतच होता. पण हळु हळु ही ओळख वाढतं गेली आणि त्याला त्या बाईंबद्दल कळु लागलं, वयाने चाळिशी मधे असलेल्या त्यांना तो आता काकी म्हणु लागला. काकी विधवा होत्या, त्याच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. कमी शिक्षण, घरातून नसलेला पाठिंबा अशा परिस्थिती मध्ये त्या बाहेर पडल्या. सुरुवातीला मजुरीच कामं केली आणि आता या STD-PCO वर ऑपरेटरच काम करत होत्या. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. मोठ्या मुलीने प्रेम विवाह केल्याने नातेवाईकांनी सर्व मदत नाकारली. अशा परिस्थिती मधे आयुष्य काढणाऱ्या काकींच्या सर्व आशा त्यांचा मुलगा रोहित वर टिकून होत्या.

रोहित १७ वर्षाचा पो-या… प्रत्येक “टीन-एज” असतो तसाच. पण त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पण बरेच पैलु होते. परिस्थितीची जाणीव असणे म्हणजे काय असते हे रोहितला पाहुन त्याला समजले. काकी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत STD-PCO सांभाळायच्या. ७ नंतर तेच काम रोहित ११ वाजेपर्यंत करायचा.

आता त्याची आणि काकीची चांगली ओळख झाली होती. काम लवकर संपले अथवा रुम वरती कंटाळा आला तर तो त्यांच्याशी गप्पा मारायला येत असे. काकींना पण त्याची सवय झाली होती. एखाद्या दिवशी उशीर झाला तर त्या खुप काळजीने त्याची चौकशी करायच्या. थोड्याच दिवसात दोघांमध्ये एक अनाम असं नातं निर्माण झालं होत.

७ नंतर काकी घरी गेल्या की तो रोहित शी गप्पा मारयला येत असे. रोहित अत्यंत शांत आणि मेहनती मुलगा होता. त्याच्याशी गप्पा मारतांना त्याला त्याच्या कॉलेज चे दिवस आठवायचे… ज्या मध्ये खुप खुप फरक होता.

रोहित सकाळी लवकर उठून कॉलेज ला जायचा, दिवस कॉलेज मध्ये अभ्यास केला की, ४ ते ७ पिग्मी गोळा करायची आणि ७ ते ११ STD-PCO. रोहितशी पण त्याची चांगली गट्टी जमली. तो रोहितशी नियमीत गप्पा मारायचा. अभ्यास कसा सुरु आहे चौकशी करायचा. ही गट्टी, मैत्री इतकी घट्ट झाली की रोहित त्याला दादा म्हणु लागला. तो ही रोहितला मग खुप जपु लागला कारण त्याचं वय…

ते वयच असं असतं ज्या मधे आपलं मन चंचल असतं, जगाच्या चकाचौंध प्रकाशाकडे आपण ओढले जातो. कधी मार्ग चुकु शकतो… तसा रोहित खुप समजुतदार होता. पण मित्रांसोबत राहुन प्रत्येक “टीन-एज” मुलाला कराव्या वाटणाऱ्या गोष्टी त्याला ही कराव्या वाटतं असे. पण परिस्थिती मुळे रोहित मन मारायचा. रोहित त्याला नेहमी विचारायचा की “दादा, महिन्याला पैसे कमी पडतात, मी आणखी एक नोकरी करु का? कॉलेज एक दोन तास कमी केले तरी मी पास होईल मी” त्यांची कौटुंबिक परिस्थिती माहिती असुनही त्याने स्पष्ट नकार दिला… आणि रोहितनेही तो मान्य केला.

रोहितशी झालेल्या गप्पा तो क्वचितच काकींना सांगत असे पण काकींना सर्व कळत असे. कारण रोहितच्या बोलण्यात त्याचा उल्लेख वारंवार होतं असे.

एक दिवस काकी सकाळी जरा नाराज मुड मधे बसल्या होत्या, तो फोन करायला आला तरी चौकशी नाही केली. त्याला लगेच काहीतरी घडलं आहे याचा अंदाज आला. फोन झाल्यावर कामाला जाण्याऐवजी त्याने खांद्यावरची बॅग खाली ठेवली आणि विचारले,

“काकी, काय झालं?”
त्या शांतच होत्या.

त्याने परत विचारलं, “काकी??”

त्या थोड्या वैतागल्या होत्या, आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“तुम्हाला तर आमची परिस्थिती माहिती आहे, कसं बस धकत आमचं… रोहित आता मोठा होतं आहे. त्याचं पण एक जग आहे, त्याचे मित्र आहेत. मला माहिती आहे की खुप समजुतदार आहे पण कुणी तरी त्याच्या मनात कुत्रा पाळायचं घातलं आहे आणि तो हट्ट धरुन बसला आहे, मी नाही म्हणाले तर दोन दिवस झाले जेवला नाही. बोलत पण नाही माझ्याशी.”

काकींना रडु आलं, ते अश्रु रोहितच्या हट्टामुळे नव्हते तर त्यांच्या परिस्थिती मुळे होते. रोहित अल्लड होता. मित्रांमध्ये राहुन अशा गोष्टी सहज मनामधे घर करुन जातात.

तो खाली बसला… त्याला त्याचा भुतकाळ आठवला, तो पण असाच होता. अल्लड… शांत पणे विचार करुन तो म्हणाला “काकी मी रोहितशी बोलतो, तुम्ही काही काळजी करु नका”

हे बोलुन तो कामावर निघुन गेला. दिवसभर त्याच्या डोक्यात तोच विचार संध्याकाळी काय करायचं

संध्याकाळी STD-PCO वर गेला, रोहित आला होता. त्याच्यासाठी हा खुप कठीण प्रसंग होता. त्याने कधीच कुणाची समजुत काढली नव्हती. रोहित लहान होता पण हा विषय दादाला का सांगितला म्हणुन आई वर चिडला असता.

गप्पांना सुरुवात झाली, इतर गप्पा झाल्यावर पेपर मधील कुत्र्याची पिल्लं विकणे आहे ही जाहिरात त्याने रोहित ला दाखवली. रोहित एकदम फुलला, आनंदाने त्याने सांगायला सुरुवात केली. दादा मी पण पाळणार आहे कुत्रा…
 लक्षात आले आता आपण बोलु शकतो. त्याने त्याच्या (आर्थिक) परिस्थितीचा कुठेही उल्लेख न करता बोलायला सुरुवात केली

“रोहित मला सांग, तु आणि आई सकाळीच बाहेर पडता. दिवसभर घरात कुणी नाही. तु रात्री उशीरा घरी जातो. मग कुत्रा सांभाळणार कोण? अरे मित्र आता कुत्रा देतील आणुन पण सांभाळणार आहेत का? तो तुलाच सांभाळावा लागणार.”

रोहित ने विचार केला, दोन तीन पर्याय पण सांगितले पण दादा चा मुद्दा त्याला पटला.

दुस-या दिवशी सकाळी काकी STD-PCO मध्ये आल्या. त्याला बघितल्या बघितल्या स्मित हास्य त्यांच्या चेह-यावर खुललं. त्याने विचारायच्या आत काकी म्हणाल्या…

“तुम्ही रोहितला समजावुन सांगितलेलं दिसतंय”

“हो… का? काय झालं?” तो म्हणाला.

काकी म्हणाल्या, “रोज मी घरातुन बाहेर पडतांना रोहित मला नमस्कार करतो, दोन दिवस झाले केला नव्हता. कारण तो नाराज होता, आज ही तो नमस्कार नाही करणार ह्या भावनेने मी बाहेर पडत होते तर त्याने मला थांबवलं आणि वाकुन नमस्कार केला…”

हे ऎकुन त्याला खुप आनंद झाला…

काकी बोलतं राहिल्या… “तुम्हाला सांगते ही बाब खुप शुल्लक होती. पण मी समजुत काढु शकत नव्हते, अहो ’वाईट विचार एखाद्याच्या मनात पेरणे खुप सोपं असतं, पण चांगला विचार पेरून तो रुजवणे खुप कठीण असतं…’ आणि तुम्ही ते केलं. तुम्ही जगात कुठेही जा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत”

तो समाधानाने तिथुन बाहेर पडला… आता तो एकटा नव्हता, एका आईचा आशीर्वाद त्याच्या सोबत होता.

चॅनल माझ्या चष्म्यातुन..

आजकाल मिडीयाला चघळायला काही ही चालते. कुणी तरी एकजण उठतो आणि पोळी भाजीची किंमत करतो… की लागलीच मिडीयावर चॅनलवाले त्यावर परिसंवाद घेतात.. आणि कोणता ही एक विषय घेतात यावर आपले मत काय?????/एकाही व्यक्तीला पूर्ण बोलु देत नाहीत…मधेच दुस-याला, तिस-याला….अरे! काय चाललय हे…. उद्या कुणी शिकंले किंवा …….तरी आपणास काय वाटते या बद्द्ल ??????म्हणुन परिसंवाद किंवा […]

जागतिक आणि भारतीय जनतेची भ्रष्टाचार बद्दलची मते व आलेख ( 2013 )…!! ट्रान्स्परन्सी इंटरन्यशनल  ह्या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगातील १०७ देशांचा भ्रष्टाचारा संबधी  विचारलेल्या प्रश्नाच्या  आधारे एक  जागतिक आलेख आणि रिपोर्ट  सदर केला .ते प्रश्न असे होते. भारतीय जनतेची मते टक्केवारीत दर्शविली आहेत. 


१) राजकीय पार्टी आणि नेते मंडळी भ्रष्टाचारी आहेत ?
   

 ५१  देशातील जनतेनी हो असे उत्तर दिले.


 ( अमेरिका, क्यानाडा , म्याक्सिको ,अल साल्व्होडोर, कोलंबिया, ब्राझील , उरुग्वे, अर्जीनटीना , चिले, नॉर्वे , फिनल्यांड ,लाट्विया, इस्टोनिया, युनाईटेड किंग्डम, जर्मनी, झेक रिपब्लिक, बेल्जियम, फ्रांस, स्पेन, पोर्तुगाल,इटली, स्विझरल्यांड, साईप्रास ,कोरेटीया ,लक्झम्बर्ग जमैका ,सोल्व्हीनिया,हंगेरी,रुमानिया, सर्बिया, बोस्निया, म्यासिडोनिया,ग्रीस, तर्की, इराक, प्यालेस्टीन, इजराईल, यमन, नैजेरीया, ट्युनेशिया , सिनेगल, भारत, नेपाल, थाईल्यांड, साउथ कोरिया, जपान,तैवान, ऑस्ट्रेलिया .नुझील्यांड . वानूअटू   ) 

भारतीय मत … ८ ६ % 


२) पार्लीमेंट आणि लेजिस्लेचर भ्रष्टाचारी आहेत का ?


    ७  देशात जनमत हो असे आले. 


 ( पुरुग्वे ,कोलंबिया , लिथुनिया, इंडोनेशिया , तैवान,जपान )

भारतीय मत …६ ५ % 


३ ) तुमच्या देशातील मिलिटरी भ्रष्ट आहे असे तुम्हास वाटते ?

   शून्य देशातील लोकांनी ह्यास नकार दिला .

भारतीय मत …. २ ० %


४) काय NGO भ्रष्टाचारात गुंतलेत का ?

      शून्य देशातील लोकांनी ह्यास नकार दिला .

भारतीय मत ……. ३ ० %


५) मिडिया भ्रष्टाचारी आहे का ?

      ४  देशातील लोकांनी समती दर्शक “,हो ” असे दिले.


 ( आस्ट्रेलिया ,इजिप्त,उनाईटेड किंगडम,  न्युझिल्यांड ) 


भारतीय मत ……. ४ १ %


६)धार्मिक  संस्थात भ्रष्टाचार होतो ?

     ३ देशांतील जनतेने होकार भरला. ( डेन्मार्क, सुदान, साउथ सुदान )

भारतीय मत …… ४ ४ %


७) खाजगी आणि व्यापारी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे का ?

    ३ देशातील  लोक हो असे म्हणाले ( अल्जेरिया, नॉर्वे, )

भारतीय मत …… ५ ० % 


८) शिक्षण  क्षेत्रांत  भ्रष्टाचार आहे का ?

       शुन्य  देशातील लोकांनी ह्यास नकार दिला .

भारतीय मत …… ६ १ % 


९) न्यायदान प्रक्रियेत भ्रष्टाचार आढळतो का ?

   २० देशातील लोकांनी न्यालालायंत भ्रष्टाचार आहे असे नमूद केले


 ( पेरू, मादागास्कर, टांझानिया, कांगो, अल्जेरिया, बल्गेरिया, कोरेशिया, सरबिया , अलाबनिया, स्लोवाकिया, युक्रेन, मोल्डोवा, जॉर्जिया, अझारबेजान ,  अफगानिस्तान, कजाकिस्तान, कंबोडिया ,लिथुनिया, आर्मेनिया, कासावो, )

भारतीय मत ……. ४ ५ % 


१०) स्वाथ्य सेवा आणि औषधी सेवांत भ्रष्ट प्रकार होतात का  ?

      ६ देशांनी हो होतो असा उत्तर दिले ( अझरबेजान आर्मेनिया, अल्बानिया, सर्बिया, मोरक्को , इथोपिया. )

भारतीय मत ……. ५ ६ % 


११) पोलिस खाते भ्रष्ट आहे का ?

     ३६ देशातील जनतेने राजनीतिक नेत्याच्या खालोखाल पोलिस भ्रष्ट आहेत असा कौल दिला. 


( म्याक्सिको, अल साल्व्हाडोर, जमैका, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, मोरक्को, सिनेगल, सिरा लिओन, लिबेरिया, घाना,क्यामरून, नैजेरीया, साउथ आफ्रिका, मोझांबिक, झाम्बिया, झिम्बग्वे, मलावी,टांझानिया, बुरुंडी,रवांडा, युगांडा, केनिया, इथोपिया, इजिप्त, पाकिस्तान, बंगला देश, श्री लंका, कझाकिस्तान, किर्गीस्तान , थाईल्यांड , वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, न्यू गियाना,   )

भारतीय मत …… ७ ५ %


१२ ) सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात  सर्व थरातील कर्मचारी भ्रष्ट आहेत का ?

      ७ देशातील लोकांचे मत आहे कि हो.  ( लिबिया, पाकिस्तान  , सर्बिया, रशिया, आर्मेनिया, मंगोलिया,  किर्गीस्तान , )


भारतीय मत …… ६ ५ %आलेख ————

 अश्याच काही प्रश्नावर भारतीय जनतेची मते घेतली त्यावर त्यांची ठोस मते . खालील प्रश्न आणि आलेली उत्तरे बघा.


१) गेल्या दोन वर्षात देशात भ्रष्टाचार कमी झाला का ?  
              
          अ ) ४०% लोकांच्या मते अति  वाढले.
          ब )  ३१ %  लोक म्हणतात कमी वाढले. 
         क ) २३ % लोकांचे मत आहे तसेच आहे        
          ड ) १ % लोक म्हणतात कमी झाले. 


२)सार्वजनिक उद्योगांतला भ्रष्टाचार प्रगतीत अडचणीचे झाले आहे का?                                                     अ) ४७% लोक म्हणतात अति गंभीर बाब आहे.
                                                                                   .
 ब) ३३% लोक  गंभीर बाब आहे. .
      
क) १७% लोक इतकी गंभीर बाब नाही. 
                           
ड) १% लोक म्हणतात अजिबात गंभीर बाब नाही .


३) काही मोजकेच व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करतात का ?


   अ) २०% लोकांच्या मते ” हो “
                      
    ब)  ३९% लोक मानतात ” हो मर्यादपलीकडे ‘                      
                                           
    क) २८% लोकांच्या मते थोडे आहे.
                                           
     ड) १२% लोक म्हणतात कमी  प्रमाणात आहे.  
                                                                                                   इ) २% लोकांच्या मते अगदीच  नाही.

४) तुम्हास काय वाटते कि तुमचे सरकार जी पावले उचलत आहे  भ्रष्टाचार निपटण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होणार आहे ?
                                                 

 अ )   २६% लोक म्हणतात काहीच ना                                                                             
ब) ४२% लोक म्हणतात होणार नाही.

                                                      
 क) २३% लोक म्हणतात प्रभावी परिणामकारक
                                                     
 ड) २% परिणामकारक आहेत. 
                                                       
 इ) २% अतिशय परिणामकारक आहेत. 

५)  तुम्ही किवा तुमच्या घरातील व्यक्तींनी कधी लाच देवून आपले काम करून घेतले का ?


४ ८ % लोक शिक्षण क्षेत्रात लाच दिली. 
३ ६ % लोक न्याय व्यावेस्थेत लाच दिली. 
३ ४ % स्वास्थ्य व दवाखाने मध्ये लाच दिली. 
६ २ % लोक पोलिसांना लाच दिली .
६ १ % रजिस्ट्री,परमिट ह्या कामासाठी लाच दिली. 
४ ८ % युटीलिटी सर्विसेस साठी.
४ १ % ट्याक्स आणि रेव्हेन्यू  मध्ये लाच दिली. 
५ १ % ल्यांड सर्व्हिसेस मध्ये लाच दिली. 

६) आपणास काय वाटते कि सामान्य जनता हा भ्रष्टाचार थांबवू शकेल?


१ ९ % लोक  संपूर्ण  सहमत नाहीत. 
२५ % लोक संपूर्ण सहमत आहेत. 
३० % लोक सहमती दर्शवितात. 
२६ % लोक असहमती दर्शविली आहे. 


——————————————————————————– 
ट्रान्स्परन्सी इंटरन्यशनल ह्यांनी सदर केलेल्या रिपोर्टच्या साह्याने लेखन केले. 

विद्या ताई

प्रिय विद्याताई ,
माझ्या अभिव्यक्तीचं ‘कविता’ हे माध्यम तुम्ही मला शोधून दिलंत. माझ्यासाठी तुमचं ‘असणं’ खूप महत्त्वाचं आहे. ही  कविता तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून समर्पित… 

एक सृजनाचा स्पर्श 
लाभे असा अवचित,
पेरूनिया जाई स्वप्ने 
कसा हसऱ्या डोळ्यांत.. 


काही बोलावे- सांगावे
कधी उगीच भांडावे,
गुरुशीच मैत्रीचे हे 
नाते आगळे जडावे.. 

नाही अडकली कला 
चित्रकलेच्या तासात,
उधाणल्या पाखरांच्या 
रंग भरले मनांत.. 

माणसात धुंडाळला 
नवा पोत, नव्या रेषा;
कितीकांना शिकविली 
बोलायाला नाट्यभाषा!

सारे बोलणे अबोल 
मनी आभाळाची माया ,
मन हिरवे अजुनी 
झिजे चंदनाची काया .. !!

– स्पृहा.      


तुझं माझं जमेना…

(बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या (BMM) स्मरणिकेतील माझा विनोदी लेख)

 “आई  रात्रभर गाडीत राहायचं? कसली मज्जा येईल.”
“अगं हरवलो आहोत आपण. मजा कसली सुचते आहे तुला.” माझ्या सुरावरून नूराची कल्पना आलीच तिला. तितक्यात फोन वाजला. न पहाता नवर्‍याचाच असणार या खात्रीने नेहमीप्रमाणे खेकसले,
“काय हेऽऽऽ? किती वेळा फोन केला.”
“मॅम…”
“ऑ…?” नवरा नाही हा. माझे पुढचे शब्द घशात अडकले.
“कॉलिंग फ्रॉम एटी. अ‍ॅन्ड टी.” कोणतीतरी नवीन योजना असणार.
“धिस इज नॉट द राइट टाइम टू कॉल मी.” मी घाईघाईत म्हटलं.
“मॅम…” आवाजातल्या गोडव्याला दाद देण्याची मन:स्थिती नव्हतीच.
“सर, आय अ‍ॅम नॉट इंटरेस्टेड.” धाडकन फोन आपटला.
“आई, तू बाबाशी बोलतेस तशी ओरडलीस त्या काकावर.”
“बरोबर, त्या काकालापण वाटलं असेल, चुकून बायकोला फोन केला की काय.” मुलगी खदखदून हसली.
आरशातून तीक्ष्ण कटाक्ष फेकला तसं तोंड वाकडं करत तिने खिडकीकडे नजर वळवली.
दोन मैलाऐवजी बावीस मैल प्रवास करून शेवटी चुकून दोघी आपोआप घरी पोचलो.
“जी. पी. एस. न्यायचा. स्मार्ट फोन घे म्हणून कधीचा सांगतोय.” नवर्‍याचं हल्लीचं नवीन अस्त्र बाहेर आलं. ते न लागल्यासारखं केलं, पण नकळत मन पार मागे, नकाशे घेऊन गाडीत बसायचो तिथपर्यंत पोचलं.

“कॉम्प्रमाईज विथ देम”
“सॉरी, नो कॉम्प्रमाईज. इफ यू वॉट यू कॅन कॉल द अ‍ॅथॉरिटी”  मोटेल व्यवस्थापक आणि टॅक्सी चालकाचा वाद चालू होता. सॅनफ्रनस्किस्को ते सॅटारोझा असं टॅक्सीचं भाडं दोनशे डॉलर्स झालं होतं. चालक दिडपड मागत होता तर मोटेलचे व्यवस्थापक नियमाप्रमाणे घ्यायला सांगत होते.  दोनशे म्हटल्यावर माझ्या पोटात खड्डा पडला, त्याचे  दीडपट… मनातल्या मनात हिशोब चालू झाला.  भांडण ऐकायचं की हिशोब करायचा? त्यात त्या दोघांच्या  उच्चाराची प्रचंड गंमत वाटत होती. भारतात आम्ही  बिल क्लिंटनचं भाषण लागलं की अपूर्वाईने  ऐकायला बसायचो (नुसतंच पाहायचो) तेवढाच माझा अमेरिकन इंग्लिशशी संबंध त्यामुळे  ’कसे इंग्लिशमध्ये भांडतायत बघ…’ अशा  नजरेने मी नवर्‍याकडे पाहत होते. तो आपला पाकिटातले डॉलर्स पुन्हा पुन्हा तपासत होता.  पाचच मिनिटात पोलिसांची गाडी हजर झाली. आता त्यांच्या ऐटदार पोषाखाकडे पाहत मी मंत्रमुग्ध. हे सगळं असंच चालू राहावं असं वाटायला लागलं.  पण मी कुरकूर न करता उभी आहे हे पाहून नवर्‍याला काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झाली.  बायको नक्की कशावर भाळली आहे  या  कोड्याने त्याच्या कपाळावर एक आठी उभी राहिली. आठ्या एकाच्या दोन  आणि दोनाच्या काहीपट व्हायच्या आत सगळं आटोपलं आणि वेगवेगळ्या अर्थी आम्ही तिघांनी निःश्वास सोडले.

अमेरिकन  भूमीवरच्या या पहिल्या प्रसंगाची उजळणी करत मोटेलच्या मऊ  गाद्यांवर अंग टाकलं. सकाळी खिडकीतून बाहेर पाहिलं. कार्ट पडलेली दिसली.  अमेरिकेत गाड्या जुन्या झाल्या की रस्त्यावर टाकून देतात हे  लहानपणी ऐकलं होतं तेव्हापासून आपण त्यातली एखादी उचलून आणावी असं वाटायचं. मी नवर्‍याला जोरात हलवलं.
“काहीतरी हातगाडी सारखं पडलंय बघ. आपण आणू या?”
“अं…काऽऽऽय?” असं काहीसं पुटपुटत त्याने कूस वळवली.
” इकडे लोकं गाड्या टाकून देतात ना, तशी गाडी असावी असं वाटतंय. जरा वेगळीच आहे पण आणते मी.”  त्याचं घोरणं म्हणजे मूक संमती असं माझं सोयीस्कर गृहीतक. कुणी बघत नाही हे पाहून पहिली ’चकटफू’ गाडी मोटेलच्या दारासमोर लावली.  त्याने ती पाहिली आणि हबकलाच,
“अगं ही सामानाची गाडी आहे. तुला कसं बसता येईल यात? आणि ते फुकट बिकट सोडा आता.”  तो चांगलाच चिडलेला.
“मग सामान आणू यातून.” वैतागाने त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना. राग आला, नक्की काय करावं ते कळत नसलं की तो मूक धोरण स्वीकारतो. कार्ट घेऊन आमची वरात थोड्याच वेळात बाजारात  निघाली.

रस्त्यात माणसं फार नव्हतीच पण गाडीतली लोकं कुतहलाने आमच्याकडे पाहतं होती.
“भारतीय नसावेतच इथे. सगळे पाहतायत.” मला एकदम माधुरी दीक्षित झाल्यासारखं वाटत होतं. नवर्‍याला असं कधी कोणासारखं झाल्यासारखं वाटत नाही. तो कायम तोच असतो.
“तू  भुरळल्यासारखी चालू नकोस. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो परदेशात येऊन हे विसरू नकोस.”
 “चालते आहे की नीट.”
“हवेत असल्यासारखी चालते आहेस.”
“मी नेहमी तशीच चालते, शाळेत उड्या मारत चालते म्हणायचे मला.”
“इथे नका मारू तशा उड्या.”
“आधी माहीत होतं ना कशी चालते ते? मग…” विषय वेगळ्या दिशेने वाहू लागला तो पर्यंत  दुकानापाशी आलो म्हणून थांबावं लागलं आणि त्या नजरांमधला छुपा अर्थ कळला. इतर लोकं कार्टमधून सामान आणून गाड्यांत भरत होते. जिथे तिथे कार्ट आवाराच्या बाहेर नेऊ नका असं लिहिलेलं. मग ती कार्ट आमच्या मोटेलपर्यंत कशी पोचली? कुणीतरी माझ्यासारखंच…..?

कार्ट सोडून देताना जड झालं मन. परत निघालो तेव्हा लक्षात आलं की रस्त्यात तुरळक दिसणारी माणसं तोंडभरून हसतात.  इकडे तिकडे बघत आपलं लक्षच नाही असं भासवत ओळखीच्या लोकांनाही टाळण्याची स्वदेशातली कला इथे उपयोगी पडणार नाही. आधी अवघडल्यासारखं, मग जिवणी ताणून चेहर्‍यावर मोकळं हास्य ठेवत मोटेलमध्ये पोचलो. पण तोपर्यंत तोंड इतकं दुखायला लागलं की हुप्प करून गप्प राहावंसं वाटायला लागलं.  नवरा मात्र एकदम खूश होता. सारखं आपलं, रस्त्यावर रस्त्यावर चल… सुरू झालं त्याचं.

दुसर्‍या दिवशी नवर्‍याचा मित्र आला. तोही नवीनच होता  पण जुना झाल्यासारखा वागत होता.  रस्ता ओलांडायचा धडा देणार होता. आम्ही, आणि त्याने पकडून आणलेले एक दोन नवखे त्याच्या मागून निघालो. रस्ता ओलांडण्याच्या जागी आलो आणि त्याने कॉग्रेसच्या पुढार्‍यासारखा हात वर केला ‘थांबा’.  सगळे पावलांना ब्रेक दाबल्यासारखे जागच्या जागी खिळले.
एकदम पावलं जड झाली. भरधाव वेगाने धावणार्‍या मोटारी, रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखा माणसांचा शुकशुकाट आणि लाल, पिवळा, हिरवा असे झटपट बदलणारे दिवे; रस्ता फक्त वाहनांसाठीच चा सूर लावून दटावतायत असंच वाटत होतं. यातून पलीकडे जायचं कसं? मित्राने खाबांवरचं बटण दाबलं.  माणसाची आकृती दिसायला लागली. टेचात, त्याने आता निघा अशी खूण केली. मी लांब उडीच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखी रस्त्यावर उडी टाकली. माझ्या मागून बाकीच्यांनी चार पावलं टाकली आणि भयाने  थरकाप उडाला. लाल हात डोळे मिचकावल्यासारखा थांबण्याची खूण करायला लागला. नजर टाकू तिथे  चारी बाजूने खदखदा हसणार्‍या गाड्या आमच्याकडे पाहतं उभ्या. आता काय करायचं? मागे जायचं की पळत पुढे? आमच्यातले निम्मे आले तसे मागे गेले, उरलेले धावत पुढे. मी थोडं मागे पुढे केलं आणि  नवर्‍याच्या मागून पुढे धावले. पलीकडे जाऊन मागे गेलेले परत येतील याची वाट पाहत उभे राहिलो, तितक्यात पाहिलं की आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली  अमेरिकन माणसं हलत डुलत मजेत येत होती.
त्यांच्या त्या हलत डुलत चालीचं रहस्य कळायला मात्र बरेच दिवस लागले. तोपर्यंत वॉकिग सिग्नल दिसला  की अरे, चलो, चलो म्हणत आम्ही सगळे धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखं पळत सुटायचो. कधीतरी  वाहन चालनाचा परवाना वाचताना  कळलं की लाल हात डोळे मिचकावायला लागतो ते रस्त्यावर पाऊल न टाकलेल्यांसाठी. हे कळल्यावर मग आम्हीही कुणाच्या बापाचं काय जातं थाटात……चालायला लागलो.

मोटेलचे दिवस संपले आणि अपार्टमेंटमध्ये राहायला आलो. मोठा प्रश्न पडला, या घरात कपडे वाळत कुठे घालायचे? इथली माणसं काय करतात कोण जाणे. सारखी मेली स्विमिंग पुलामध्ये धपाधप उड्या मारताना तर दिसतात. यांच्या ओल्या कपड्याचं काय? बाल्कनीतून स्विमिंग पुलाजवळ अर्धवस्त्र नार्‍यांकडे बघत मी विचारात गुरफटले. तितक्यात ’ हे ’ आलेच.
“स्विमिंग पूल बघायचाय?” माझा खोचक प्रश्न.  पण तो माझ्या बाजूला उभा राहून  निसर्ग सौंदर्य पाहण्यात इतका मग्न झाला की प्रश्न त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. ती संधी साधून म्हटलं,
“कपडे धुवायचे आहेत.”
“मी आणतो ना धुऊन.”
“तू?” मी नुसतीच अवाक होऊन पाहत राहिले. स्विमिंग पूल  दारूसारखा चढला की काय?
“अगं पुलाच्या बाजूलाच असतं यंत्र कपडे धुवायचं. तिथे येतात धुता.”
“तरीच” मी माझ्या नजरेत ’तरीऽऽऽच’  मधला भाव आणला.
“अरे पण पैसे, आय मीन डॉलर्स?”
“पंचाहत्तर सेंट मध्ये कितीही कपडे धुता येतात.”
“बाप रे, मग रांगच असेल मोठी”
“यंत्र नाही गं यंत्रे असतात तिथे.”
“बरं बरं कळलं.” असं म्हणत मी भारतातून आणलेली सगळी पोतडी रिकामी केली.
“एवढे कपडे?” तो दचकलाच ढीग पाहून.
“७५ सेंट मध्ये कितीही धुता येतात ना?” तो कपडे घेऊन घाटावर म्हणजे… यंत्राच्या दिशेने गेला.

मी जेवणाच्या तयारीसाठी आत वळले.  पोळीसाठी कुणीतरी ऑल परपज फ्लॉवर मिळतं ते वापरायचं म्हणून सांगितलं होतं. आम्हीही बिनदिक्कत पोतंच आणलं. मी खा किती खायच्या त्या पोळ्या या थाटात आणि नवरा घे गं बाई तुझी एकदाची कणीक या आनंदात.  त्याच उत्साहात मी ते पोतं उघडलं.
’अगं बाई इकडची कणीक पांढरीशुभ्र असते की काय?’ अमेरिकेचं सगळंच बाई पांढरं या कौतुकात मी पिठाकडे पाहत राहिले, विचारायला कुणी नव्हतं म्हणून पिठालाच विचारल्यासारखं. पाणी घातलं तर त्या पिठाचं पिठलं झालं. पोळ्याऐवजी आंबोळ्या मिळाल्या आणि आम्ही आपले, नाहीतरी आंबोळ्या होतच नाहीत फारशा तर खाऊया आता असं दोन महिने ते पीठ संपेपर्यंत म्हणत राहिलो.

घरात रुळलो तसे काही वर्षांनी बाहेरच्या जगात रुळायचा ध्यास लागला आणि मी अमेरिकेतल्या शाळेत बदली शिक्षक (Substitute) म्हणून शिकवायला जायचा बेत जाहीर केला. खिजवल्यासारखा हसला नवरा. तिकडे केलं  दुर्लक्ष पण मुलगा म्हणाला,
“आई, तू गणित शिकवणार शाळेत जाऊन?”
“मग? शिकलेली आहे मी भारतात.”
“पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?”
“तुला कुणी सांगितलं?”
“मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला.”
“हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?”
“पण मग कशाला बघतेस चित्र?”
“तुला काय करायचं आहे?”
“क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो.”
 पहिले धडे नाण्याचे घ्यावे लागणार हे लक्षात आलं. नाणी पुठ्ठ्यावर चिकटवून खाली नावं लिहिली. मुलांसमोर फजिती नको.

पहिला दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच? मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
“हसू नको. नीट सांग काय ते.”
“लेप्रीकॉन आहे ते” वर म्हणाला, “तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते.”

निमूटपणे मी त्याचा वर्ग टाळला. दुसर्‍या दिवशी थेट संगीताच्या वर्गावर.  सारेगमप ही मला कधी सुरात म्हणता आलं नाही तिथे मी काय संगीत शिकवणार आणि तेही इंग्लिशमध्ये.
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
“आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही.”
धक्काच बसला, माझं काम वेळ मारून नेणं होतं.  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुण्णाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची.
रागारागातच वर्गात  सूर लावला. दिवसभर भारंभार मुलं येत होती संगीत शिकायला.  आऽऽऽऽ लावता लावता थकून जायला झालं.  कुणी काही विचारलं की थातूर मातूर उत्तरं देऊन भागत नाही, उलट सुलट विचारत राहतात ही पोरं. एकदा बिंगं फुटतंय असं वाटलं तसं एका मुलाला वर्गाच्या बाहेर काढलं. तो हटून बसला.
“मिस, मी का जायचं वर्गाच्या बाहेर?”
“मला तोंड वर करून विचारतो आहे कार्टा. जा म्हटलं की व्हायचं बाहेर.”  तो हटूनच बसला. कारण सांगितलं तसा शेवटी गेला बाहेर. थोड्यावेळाने एक उंच शिडशिडीत माणूस दारावर टकटक करत.
’हा शिक्षक की पालक?’ विचार मनात येतोय तोच तो म्हणाला,
“बरं दिसत नाही मूल बाहेर, आत घे त्याला.”
‘बरं दिसायला काय ती झाडाची कुंडी आहे?’  हे मनातल्या मनात
मी घरात नाही पण बाहेर जरा टरकूनच वागते. तू कोण सांगणारा वगैरे न विचारता मुकाट्याने त्याला आत घेतलं. नंतर कळलं की शाळेचा प्रिन्सिपॉल होता तो किडकिड्या.

त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी, कारण इतकं सगळं होऊनही त्या शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली होती. मुलं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
“तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?” मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले.

सगळी गोरी मुलं मला तरी सारखीच दिसतात.  त्यामुळे एखाद्या भारतीय मुलाला मी माझं ’लक्ष्य’ बनवायची मैदानावर जाताना.  तिथेही थोडाफार गोंधळ होतोच. सगळी दाक्षिणात्य मुलंही मला एकसारखीच वाटतात.  त्या दिवशी मुलांना खेळायला घेऊन गेले मैदानावर. कसं कोण जाणे पण बाहेर जाताना नेलेली मुलं आत येताना बदलली. ती सुद्धा मुकाट्याने, चलाऽऽऽ म्हटल्यावर रांग करून उभी राहिली आणि आली आपली माझ्याबरोबर. वर्गापाशी पोचल्यावर कुणाचं तरी धाडस झालं,
“मिस….”
“मिस एम” माझ्या नावाची आठवण करून दिली मी.  नुसतं मिस काय…., आदर  म्हणून नाही कार्ट्यांना.
“आम्ही तुमच्या वर्गातली मुलं नाही.”
“ऑ?” मला पुढे काय बोलावं ते कळेना. दातखिळी बसल्यागत विचारलं,
“मग माझा वर्ग कुठे आहे? आणि तुमच्या शिक्षिकेला कळलं नाही तुम्ही माझ्याबरोबर निघालात ते?”
“ती सुद्धा तुमच्यासारखीच आहे.”
काळजातली धडधड लपवीत विचारलं,
“म्हणजे बदली शिक्षक का?”
“हो.”
 हुऽऽऽऽश
आम्ही दोघी बदली शिक्षिकांनी परत मुलांची अदलाबदल केली.

रडत खडत मी बदली शिक्षिकेचं कार्य पार पाडत होते. घरी आले की नवरा आणि मुलगा जादूच्या गोष्टी ऐकायला तयार असल्यासारखी सज्ज असायची. नवरोजी चहाचा आयता कप हातात देत श्रवण भक्तीला तयार. रोज एका चहाच्या कपावर इतकी करमणूक?  त्यांना त्याची फार सवय व्हायला लागली तसा त्यांचा तो आनंद माझ्या पचनी पडेना त्यामुळे एक दिवस हे शिकवण्याचं महान कार्य सुरू केलं तसंच ते बंदही केलं ते दुसर्‍या साहसाला सुरुवात करण्यासाठी.

चाचपडत पावलं टाकायला सुरुवात केलेली ही भूमी आता आम्हाला आमचीच वाटते. नवर्‍यासारखं नातं आहे माझं आणि अमेरिकेचं. म्हणजे, तुझं नी माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना….आम्ही अमेरिकेला ढीग नावं ठेवू पण भारतातले नातेवाईक, मित्रमंडळी  अमेरिकेबद्दल वेडंवाकडं बोलले की नकळत मुलांची कड घेतो तशी या ही देशाची घेतली जाते. असे हे इथले ऋणानुबंध, मायदेशाइतकेच घट्ट!

पैचान कौन

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला की डान्स बार वर असलेली बंदी बेकायदेशीर असून महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा सुद्धा एका अर्थी बेकायदेशीर आहे. तेव्हा डान्स बार खुले करण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता   अनेक नव्या जुन्या ,बदनाम  मुन्नी ,शीला  , जलेबी बाई व अनारकली डिस्को जाण्यासाठी आपली हलकट जवानी रसिकांना दाखवण्यास उतावळ्या होत आहे. त्यांचे फोटो अगदी फेविकॉल ने  ओठांशी चिटकवून ठेवण्यास रसिक आतुर आहेत.  आणि आबांचे आपले काहीतरीच …   प्रत्येक आंतरराष्ट्रीय महानगरात अनेक स्तरीय लोक  अनेक कारणांसाठी लघु किंवा दीर्घ वास्तव्यासाठी येतात , त्यांच्यासाठी प्रौढ मनोरंजन हे प्रत्येक शहरात असते. ते कायद्याच्या कक्षेत असल्याने सामान्य लोकांच्या जीवनात त्याचा प्रादुर्भाव होत नाही , मात्र सरकारचे त्यांच्यावर लक्ष असते , व त्यांना नियमित महसूल मिळतो . भारतात गर्भ श्रीमंतांसाठी
  पब्स डिस्को असतात , तेथून ड्रग्स किंवा पिक अप कोर्नेर हे प्रकार घडतात किंवा त्यांच्या परकीय संगीतावर  धुंद , बेधुंध होऊन कृष्ण लीला चालतात , अश्याच एका प्रसिद्ध पब्ज मध्ये माझ्या उमद्वारीच्या दिवसात मी कामाला होतो  उद्योगपती व त्यांच्या भोवती रुंजी घालणाऱ्या ब व क श्रेणीच्या  अभिनेर्त्री
अनेक मोडेल्स ह्यांचे चाळे  पाहत भांडवलशाही युगात मी वयाच्या   २०व्य वर्षीच पदार्पण केले.
 
 
, एकदा काम संपवून शेवटच्या लोकल मध्ये काही बारबाला बसलेल्या होत्या ,
नेहमी नेहमी आमच्या डब्यात त्या येत असल्याने आम्ही त्यांना ओळखत असलो तरी बुजून असायचो ,
पुढे त्यांनी आमच्याशी गप्पा मारायला सुरवात केली.
कितीतरी जणांची गावाकडे परिवार असतो , सर्व भावंडांचे शिक्षण व लग्न त्या पैसे घरी पाठवून करत असतात.
एकीचा भाऊ इंजिनियर झाला पण त्याच्या लग्नाचा खर्च करून सुद्धा त्याने आपली बहिण बारबाला आहे म्हणून तिला लग्नाला बोलावले नाही , तिने तिच्या बहिणीची लग्न लावून
स्वतः मात्र  अविवाहित राहिली कारण आई बाबा तिच्या गळ्यात मारून तिचे बहिण भाऊ मोकळे झाले होते.
अश्या कितीतरी जणींच्या कर्म कहाण्या चकीत करणाऱ्या होत्या.
 
सर्वोच्च न्यायालय म्हणत की डान्स बार वर बंधन  घटनाविरोधी आहे. मुळात ह्या बार वर  कायद्याने अनेक बंधन आणता येतात , वेळेचे बंधन किंवा एखादा अमाप पैसा उडवत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळवले किंवा पोलिस व इन्कम टेक्स  अधिकाऱ्यांची संयुक्त टीम निर्माण करून डान्स बार वर लक्ष ठेवणे ह्यातून काळे पैसे वाले अनेक मोठे मासे गळाला लागू शकतात.
एका रात्रीत एक कोटी उडवणारा हा कोण म्हणून चौकशी केली तर तेलेगी पोलिसांच्या डोळ्यात भरला म्हणूनच पुढे त्यांचा करोडोंचा घोटाळा उघडकीस आला.
आता लोकांना बेन्कोक मध्ये विक एंड घालवायला जावे लागणार नाही. पैशाची उधळण  मुंबई ची रात्र  उजळून टाकणार त्या उजेडात मुंबईच्या  झोपड्यांच्या दारिद्र्याचा  अंधकार असा विरोधाभास सुद्धा दिसणार . मुंबई श्रीमंत आहे ,पण मुंबईकर श्रीमंत नाही आहेत. हेच खरे
मधल्या काळात भारतात अनेक शहरात अनेक कोट्यधीश वाममार्गाने झाले आहेत त्यामुळे त्यांची सूज आलेली ही संपत्ती मुंबईत येणार म्हणजेच मुंबईत  कोट्यधीश  लोकांच्या आता रांगा लागणार , हेही उघड आहे. मुंबई काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था उभारण्याच्या आत कायदे झाले पाहिजेत
मात्र  मुंबईकरांच्या स्मार्ट फोन वर आवाज घुमणार
पैचान कौन

सुसला / Susalaa

<Scroll down for the recipe in English>


नव्याने कळलेला पदार्थ, सुसला 🙂


परवा माझ्या मोठ्या काकूने घरी बनवलेल ताजं मेतकूट दिलं. वास्तविक मला मेतकूट ह्या प्रकाराबद्दल फारसं प्रेम नाही. म्हणून मी सहज म्हणाले कि अगं जास्त देऊ नकोस. ती पट्कन म्हणाली कि सुसला करुन बघ. मला हे नावच नविन होतं. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच recipe सांगितली. कर्नाटक side ला बनणारा हा पदार्थ. साधी सोप्पी recipe with मेतकूट touch ताबडतोब बनवून चाखला आणि माझ्या आवडत्या पदार्थ यादीत भर पडली 🙂
कदाचित ब-याच जणांना माहित असलेला आणि कदाचित ब-याच जणांना माहित नसलेला सुसला इथे share करत आहे. नक्की करून बघा. हो पण त्यासाठी काकूने बनवलेलं चविष्ट मेतकूट हवंच हवं 🙂


साहित्यः
५ वाट्या भडंग चुरमुरे
२ कांदे
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीनुसार
४ tp sp मेटकूट


कृती:
१. आपण पोहे करतो तशीच हि कृती आहे. कढई मध्ये तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरची अशी सुरेख फोडणी करावी.
२. फोडणी मध्ये चिरलेला कांदा घालावा. किंचित मीठ व साखर घालून झाकण ठेवून वाफ काढावी.
३. एका चाळणी मध्ये चुरमुरे धुवुन घ्यावेत व पाणी निथळू द्यावे. कांदा शिजला कि त्यात हे चुरमुरे घालावे. चविनुसार मीठ, साखर घालून चांगले ढवळावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
४. आता त्यात मेतकूट घालावे. ते छान एकत्र करुन परत झाकण ठेवावे व परत एक वाफ काढावी.


बास.. गरमागरम सुसला ताव मारण्यासाठी तय्यार आहे 🙂


Ingredients:
5 cups of ‘Churmura’ (the bigger variety of it)
2 Onions (Chopped)
For Tadka: Mustard Seeds, Hing (Asafoetida), Curry Leaves, Turmeric Powder and Green Chillies
Salt and Sugar as per taste
4 Tb Sp ‘MetkooT’
Commonly found in any grocery store; Metkoot is a powder of :- Urad daal, Chana daal, asafoetida, chilli powder, turmeric, nutmeg, dry ginger powder, mustard seeds, cumin seeds, green cardamom, coriander seeds, cloves, rice


Method:
It is similar to that of ‘Pohe’. Heat oil in a pan. Once it is hot enough, add Mustard Seeds, Hing (Asafoetida), Curry Leaves, Turmeric Powder and Green Chillies for a nice Tadkaa. After a minute, add chopped onion. Add a little bit of salt and sugar, put a lid on and bring the mixture to a nice steam.

Wash Churmuras, and keep it in a netted pan to drain the water. Once the onions are fairly cooked, add the washed churmuras to it. Add salt and sugar to taste and cook it for a while. Now add the ‘MetkooT’ to it, mix it well and bring the mixture to a nice steam again. Thats it ! Hot and tangy Susalaa is ready to be enjoyed.


चीन विश्वासपात्र नाही

चीन विश्वासपात्र नाही

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

“खावू लुटून मेवा” हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही

स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही

अख्त्यार भावनेच्या जगतो ‘अभय’ असा ‘मी’
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही

                              – गंगाधर मुटे
————————————————

Filed under: कविता, गझल, मार्ग माझा वेगळा, वाङ्मयशेती Tagged: कविता, गझल, मराठी गझल, वाङ्मयशेती, My Gazal, Poems, Poetry

झी मराठी..

“संयम अवश्यक” झी मराठीवर चालू असलेली “तुझं माझं जमेना”…ही सिरीयल सुरुवातीस खुप छान वाटली…पण आता गेले ३/४ एपिसोड अगदी भंकस चालली आहे.. भाऊ कदम या व्यक्तीला मांजरेकरांनी एवढे काय डोक्यावर घेतले आहे कळत नाही…चोंबड्या नामक पात्र तो साकारतोय..घरच्या नोकराला आपण इतके महत्त्व खरच देत असतो का?…पटत नाही..खरतर या सिरीयलमध्ये एकापेक्षा एक कलाकर असताना त्यांच्या कडे […]

कविता, मीटर आणि मी

आडले

माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला,आजकाल आमी बी कविता करू लागलोआहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर? असे म्हणत ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ या धर्तीवर’ तो कवितेची चोपडी चाळू लागला. मी ही कान टवकारून, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानी तो उद्गारला, लेका, कविता छान आहे, आवडल्या (?), पण एक ही कविता मीटरमध्ये नाही, आणि खरंच सांगतो, बिना मीटरच्या कवितेची मार्केट वेल्यू नसते, कवीला प्रतिष्ठा ही मिळत नाही आणि मोबदला ही, असे म्हणत एखाद्या खलनायका प्रमाणे माझ्या कडे पाहत, तो खदा-खदा हसू लागला. त्या वेळी त्याचा चेहरा, मला चक्क ब्रूटस सारखा वाटला, ‘ब्रुटस तुम भी’ एवढेच म्हणायचं काय ते राहिलं. पण एक खरं त्याचा घाव जिव्हारी लागला. त्या दिवसापासून एक ही कविता सुचली नाही.
कवितेच मीटर म्हणजे काय, हा एकच प्रश्न सतत डोक्यात घोळू लागला. आज सकाळी विजेचे बिल आले. आजकाल विजेचे बिल पाहून हादरा हा बसतोच. किती ही कमी वीज वापरली तरी बिल दीड-दोन हजारापेक्षा कमी येत नाही. विजेचे निजीकरण झाल्याचा परिणाम. कंपनीने जुने मीटर बदलले, नवीन डिजीटल मीटर आले, ते वेगाने पळतात. ऊर्जा मंत्रालयात काम करणाऱ्या एक सहकर्मिला, या बाबतीत विचारणा केली होती. तो म्हणाला, मीटरच्या अचूकते बाबत काही प्रतिशत (+, -) ची सूट निजी कंपन्यांना मिळाली आहे, त्याचा गैरफायदा या कंपन्या घेतात. सर्वच मीटर (+) असतात. निष्कर्ष- मीटर आहे म्हणून आपण विजेचे बिल देतो, ‘मीटर वेगाने पळतात, आणि आपल्याला वीजेसाठी जास्त पैसा मोजावा लागतो’. दिल्लीत आटो, पूर्वी कधीच मीटरने पळत नसे, आजकाल मीटरने जायला तैयार राहतात. कारण नवीन मीटर आटोपेक्षा ही जास्तवेगाने पळतात. गेल्या रविवारी कुठे बाहेर जायचे होते, गल्लीत एक आटो उभा होता, आटोवाल्याला विचारले, तो म्हणाला साहब मीटर खराब है, मीटर ठीक होने तक सवारी नाही बिठा सकता, मी- बिना मीटर के चल. तो- ‘बिना मीटर के में मुफ्त में भी किसी को नही ले जा सकता, चलान कट जायेगा’. माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली, प्रकाश पडला, एक – बिना मीटर आटो ही रस्त्यावर धावू शकत नाही, दोन- ‘मीटर असेल तरच मोबदला मिळतो’.
त्याच संध्याकाळी, एका कवी/ गीतकारची मुलाखत दूरदर्शन वर पहिली. तो म्हणत होता, त्याला संगीतकाराच्या चालीवर गाणे लिहिणे जास्त सौपे वाटते, कविता पटकन मीटरमध्ये बसविता येते. कविता आधी लिहिली असेल तर चालीनुसार मीटरमध्ये बसविणे कठीण जाते. हा त्याचा अनुभव. मीटर मध्ये बसणाऱ्या कविता लिहिणाऱ्या गीतकाराला नक्कीच भरपूर मोबदला मिळत असेल. खरंच जिथे मीटर तिथे मोबदला/ पैसा. मग विजेचे मीटर असो, आटोचे असो किंवा कवितेचे.
डोक्यात गोंधळ माजला, अनेक प्रश्न उभे राहिले, विवेक पटाईत तुम्ही मीटर मध्ये कविता लिहू शकतात का? हृदयातून उत्तर आले – शक्य नाही. बिना मीटरच्या कवितेला बाजारात किंमत नाही, मग तुम्हाला आयुष्यात कधी प्रतिष्ठा आणि नाव मिळेल का? प्रतिष्ठा व नाव नसलेल्यांना कविसंमेलनात कुणी बोलवतो का? कुणी कविता छापतो का? माझ्या एका दिल्लीकर कवी मित्राने स्वत:च्या खर्चाने नागपूर हून आपले दोन-तीन कविता संग्रह प्रकाशित केले आहे (५००च्या आवृतीचे, १५ ते वीस हजार खर्च येतो असे तो म्हणाला होता). पुस्तके किती विकल्या गेली त्यास माहीत नाही. कारण रॉयल्टी त्याला कधीच मिळाली नाही.
आपण काय विचार करतो आहे, या विचाराने मला माझेच हसू आले. तुलसीदासाला कुठल्या ही राजाच्या दरबारी ‘राजकवीचे’ पद सहज मिळाले असते. पण तुलसीदासाने काशीच्या घाटावर, स्वांत सुखाय ‘रामचरितमानस रचले’ होते, कुठल्या ही मोबदल्याचा विचार न करता. त्या वेळी आत्मशून्य झालेल्या लोकांना राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हाच रामचरितमानस रचण्याचा त्यांचा कदाचित उद्देश्य असेल. शेवटी स्वत:लाच म्हणालो, विवेक पटाईत, आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करू थोडे ही यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.