धरणांमधले पाणी आणि दुष्काळ

हल्लीच उजनी आणि जायकवाडी या दोन धरणांसाठी वरच्या बाजूस असलेल्या धरणांमधून पाणी सोडण्याबाबत कोर्टांनी आदेश दिले आणि नाइलाजाने सरकारने तसे पाणी अखेर सोडले अशा स्वरूपाच्या बातम्या आपण सर्वानी वाचल्या आहेत. कोर्टाच्या बेअदबीचा धोका न पत्करतां याबद्दल काही विचार वाचकांसमोर ठेवावेसे वाटतात. १. नद्यांवरील धरणे बांधताना वरचीं आधी व खालचीं मागून (वा त्याचे उलट) असा काही नियम नाही. प्रत्येक धरण बांधताना, त्याचे वरचे बाजूस पडणार्‍या पावसाचे प्रमाण, ज्या क्षेत्रफळात पडणारे पाणी त्या धरणात जमू शकेल याचे माप, वरच्या अंगास पूर्वीच धरण असेल तर त्यात किती पाणी अडेल याचा हिशेब, हे सर्व पूर्णपणे विचारात घेऊन मगच या धरणात पाणी जमेल किती व त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी व इतर कामासाठी कसा उपयोग करावयाचा याचे आराखडे मांडले जातात. हे सर्व तांत्रिक काम आहे, कायद्याचे नव्हे. २. या वर्षी पाऊस कमी पडला आणि मराठवाड्यात फारच तुटपुंजा पडला हे सर्वज्ञात आहे. ३. अशा परिस्थितीत, विषेशेकरून दुष्काळी वर्षात, पावसाळा अखेर निरनिराळ्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन, त्याच्या वापराचे शास्त्रशुद्ध नियोजन करणे हे शासनाच्या संबंधित खात्याचे काम आणि कर्तव्यहि आहे. वरच्या बाजूच्या कोणत्या धरणातून सगळे उपलब्ध पाणी अडवून न ठेवतां काही प्रमाणात ते खालच्या धरणांसाठी ‘वेळीच’ सोडणे हे त्यांचेच काम आहे. ४. खालच्या धरणातील पाण्याचे लाभार्थी आणि वरच्या धरणाचे लाभार्थी यांचेपैकी कोणाचे हक्क अधिक हे कसे ठरवणार? एकाचे बाजूने कोर्टाचा निर्णय झाल्यास दुसर्‍या पक्षाने वरिष्ठ कोर्टाकडे धाव घ्यायची काय? कोणत्या कायद्यांचे आधारावर हक्कांची क्रमवारी ठरणार? आधी बांधलेल्या धरणाच्या लाभार्थींचे हक्क आधी निर्माण झाले तेव्हां त्यांचा क्रम वरचा मानावयाचा? ५. हल्लीच पाणी सोडण्याबद्दल जे दोन आदेश दिले गेले ते या अनेक प्रश्नांचा विचार करून दिले गेले काय? कायद्याचे ज्ञान हेच ज्यांचे मुख्य बळ त्या वकील आणि न्यायाधीशांनी असे निर्णय घेणे कितपत युक्त? प्रत्यक्षात सोडलेल्या पाण्यापैकी निम्मेच पाणी खालच्या धरणापर्यंत पोचू शकणार आहे हेहि स्पष्ट दिसत होते. मग या पाण्याच्या अपव्ययाला जबाबदार कोण? ६. अशा तांत्रिक विषयांबाबत कोर्टाने बंधनकारक आदेश देण्यापेक्षा प्रश्न सरकारी वा खासगी तंत्रज्ञांवर सोपवणे उचित नव्हे काय? देशाचे शासन कोण चालवतो आहे असा कधीकधी प्रश्न पडतो? आपणाला काय वाटते?

नाती

काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली, तरं काही सहज तोडलेली
काही जिवाभावने जपलेली
तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली.!

काही नितळ प्रेमासाठी जगलेली
तर काही बांन्डगुळा सारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली.!
काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली
तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली.!

काही मैत्रीच नाव दिलेली
तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली.!
काहि ओझ्यासारखी वाहीलेली
तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली.!

काहि नकळत मनाशी जुळलेली
तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली.!
काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली
तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली.!

काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली
तर काही मान-अपमानाच्या ओझ्या खाली दबलेली.!
काही मोत्याहुन अनमोल ठरलेली.
तर काही भंगारा सारखी विकाया काढलेली.!

काय असतात ना ही नाती काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली…..

पानिपत

पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.

इतिहास
या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते पांडुप्रस्थ तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की हि युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.
पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.
पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.

पानिपत चे तिसरे युद्ध बुधवार, १५ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे “भाऊ” आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-“दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य”. खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला

आपला अक्साई चीन !

 सध्या वर्तमान पत्रांमध्ये आपण चीन ने भारताची सीमा रेषा ओलांडली याबाबतीत अनेक बातम्या वाचत आहोत!  भारताचा काही भूभाग हा चीन सारखा लबाड देश ५० च्या दशक पासून ताब्यात घेऊन बसला आहे! मनुष्याची विरळ वस्ती असलेला भाग खरेतर खूपच सुंदर आहे ! म्हणूच या सुंदर अश्या प्रदेशाबाबत जाणून घायची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली ! काय आहे तेथील परिस्थिती ? आपल्या भारताचा भाग असेलेल्या त्या प्रदेशा बद्दल खरेच खूप काही जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली ! भारताच्या या भागाचे नाव आहे ” अक्साई चीन” . भारताचे चीन बरोबर जे युद्ध झाले होते ते याच भागात आणि याच भाग साठी!
                                             नकाशात दाखवल्या प्रमाणे तुम्ही हा भाग ओळखला असेल ! . इयत्ता ५ वी पासून आपण भूगोल मध्ये हा भाग जम्मू – काश्मीर या राज्याचा भाग म्हणून पाहतो! परंतु या प्रदेशावर  सध्या चीन चे नियंत्रण आहे.  खरेतर अक्साई चीन हा लडाख जवळील प्रदेश आहे ( हो हो!! ३ इडीय्ट्स मधलेच लडाख) त्यामुळे आपल्याला हा प्रदेश किती सुंदर असेल याची थोडी फार कल्पना तर नक्कीच आली असेलच. सर्वप्रथम या प्रदेशाच्या नावाचा अर्थ सांगतो अक्साई हा भारतीय किवा चीनी शब्द नाही तर तो चक्क तुर्की शब्द आहे! झालात न चकीत ! परंतु अक्साई ची तुर्की मधली फोड “अक” आणि “साई” अशी होते , त्याचा मराठीतील अर्थ अक म्हणजे “सफेद” आणि साई म्हणजे ” दरी अथवा घाट” म्हणजेच “सफेद दरी अथवा सफेद घाट”. तसेच “चीन” हा शब्द “चीराना” या तुर्की शब्दाचा अपभ्रंश आहे . या चीराना शब्दाचा मराठीत अर्थ होतो ” उजाड जागा ” . परंतु चीन चे सरकार मात्र भारताच्या या प्रदेशावर आपला अवैध हक्क दाखवण्यासाठी या प्रदेशाचा नावाचा पण गैरवापर करते व या प्रदेशाच्या नावाचा अर्थ ” चीन चे उजाड सफेद वाळवंट” असा काढते !
                                                

भौगोलिक दृष्ट्या हा भाग तिबेट च्या पठारी भागात मोडतो ! अक्साई चीन मध्ये एक नदी आहे त्याचे नाव देखील “अक्सेचीन” असे आहे! येथे हिमवर्षाव नाही होत तसेच येथे पाऊस देखील नाही पडत ! अतिशय उंच असलेला हिमालय पर्वतामुळे! या भागात मनुष्याची वस्ती नाही. भारत किवा चीन यापैकी कोणत्याच देशातील लोक येथे राहत नाही. हा भाग निर्मनुष्य आहे. परंतु येथे सतत अस्तित्व असते लष्कराचे.या प्रदेशात बहुदा प्रवासासाठी सायकल चा वापर सुद्धा करण्यात येतो ! येथूनच चीन भारताची एल. ओ. सी. भंग करतो. नुकताच चीन ची काही हेलिकॉपटर अक्साई चीन भागातून भारतीय हद्दीत घुसली तसेच तेथून जेवणाचे पाकिटे तसेच काही पत्रकांचे पाकिटे भारताच्या हद्दीत टाकून निघून गेले. नंतर काही दिवसांनी बातमी आली ( जी आपण सध्या वाचत आहोत) कि चीनी सैन्य भारताच्या हद्दीत १० किमी भागात घुसले आहे ते देखील या प्रदेशाची सीमा मोडून ! व आता येथून मागे जायलाच तयार नाही. दोन्ही सैन्यामध्ये वरिष्ठ लोकांची या विषयी चर्चा झाली परंतु काहीही तोडगा निघाला नाही ! चीन शेवटपर्यंत असेच म्हणत होता कि त्यांही सीमा ओलांडली नाही ! 

अक्साई चीन हा भारताचाच भाग आहे यात शंका नाही. फाळणी होण्यापूर्वी ब्रिटीश अधिकार्यांनी नकाशाचे मापन करताना हा प्रदेश भारताच्या ताब्यात दिलेला आहे. परंतु आफ्रिदी लोकांनी १९४८ मध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये काश्मीरचा  काही भूभाग हा त्यांचा ताब्यात गेला आहे जो आज आपण पाक व्याप्त काश्मीर या नावाने ओळखतो.व उरलेल्या काही भागावर म्हणजेच अक्साई चीन वर सध्या चीन चे नियंत्रण आहे! विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन चा “खास” मित्र असलेल्या पाकिस्तानला अक्साई चीन हा प्रदेश चीन च्या ताब्यात असणे याबाबतीत फारशी उत्सुकता नाही , ते असेच पकडून चालतात की काश्मीर मध्ये हा प्रदेश नाही आहे तो चीन चा ( तिबेट) चा प्रदेश आहे!  (अर्थात याच्या मोबदल्यात त्यांना चीन कडून प्रचंड प्रमाणात मदत मिळते !)  

                            

अक्साई चीन हा भारताचा प्रदेश जरी निर्मनुष्य असला तरीपण सुंदर आहे, येथील वातावरण तसेच अनेक भौगोलिक गोष्टी खरेच खूप छान आहे! परंतु आपले दुर्दैव की आपल्या स्वतःच्या देशाचा हा भाग असूनही आपल्याला येथे जाता येत नाही ! मला देखील एकदा येथे जायला नक्की आवडेल ! परंतु सध्या तरी लष्करी परिस्थिती मुळे ते शक्य होणार नाही ! पण तरी सुद्धा मी माझी हौस YouTube द्वारे पूर्ण केली आहे. अक्साई चीन हा भारताचा भाग असलेला प्रदेश कसा आहे यावर अनेक YouTube video उपलब्ध आहे!  सध्या तरी दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंध शांततेच्या मार्गाने कसे सुधारतील हे पाहणेच आपल्या हातात आहे! 🙂
   
                                                   

Free Economy & Maoism!
Globalization is becoming a boon for underdeveloped countries like India and so to those developed countries who can book up more profits by utilizing cheapest resources coming from the undeveloped countries. And hence it has been welcomed from all segments of the society and nations barring few thinkers. The immediate fruits are sweet and abundant to those who have mounted the rising tide timely. Free Trade…free economy are the buzz words among new generation. Everyone wants to progress. Nothing bad about it as it has been an innate human nature since time immemorial.
Globalization has become a tool of blending global cultures to give rise to a new culture that can be said being a true Global culture. Isn’t it a need to have a global culture if all mankind belongs to same source of the origin? Yes, there certainly is a need of global culture. Understanding each culture and adopt good from one another is a process of the blending of the cultures.
Entire world shares same history though it was not understood properly by the masters of the recent past. Even in those times when travelling from one to other country was a perilous experience, still people from all over the earth traded and exchanged cultural thoughts as well. Blending of the cultures is not new phenomena, though it was a slow process in ancient past for the restrictions imposed by the facilities.
But now with Internet era, all modern transportations world has come closer and so the cultures. Or at the least it is thought so. In a way this is a good time to form a single Government can erase all the artificial boundaris thus uniting the whole mankind under one shelter.
But are we really moving towards that ultimate aim?
I do not think so.
This is because the economic policies those have been existent in the world are in eternal conflict. The interests are varied and so the means to achieve those aims.

Free economy demands boundary-less functioning. Free economy cannot be a tool to erase National boundaries as free economy or globalization is not meant for one world one nation. If such happens the foundation of free economy concept will shatter as having numerous nations present is a key to the success of the free economy. Otherwise how can they exploit the resources to their benefit? 
Free economy always is capital-centric and thus profit oriented. Human being cannot be a matter of focus in this system. This system sees human being in the form of mere a consumer. Is always tending to produce more than the demand and thus govern human needs in an artificial way. So much so that the human is bound to forget what actually does he need!
Right from sentiments to the dreams this system wants to control and apply every possible force to achieve so.
Free economy is nothing but other extreme form of the communism. The basic elements are same. To govern and control human life in every respect is a sole motto of both the systems. In a way both stand against each other to reach the same goal.
Turning into the emotional machines as programmed by the system is what life is bound to become in coming future. We need to introspect and see the future dangers before we become the final prey to the mechanism that is working out so far very well.
As free economy and thus globalization will rise up in this decade, Communism will become more aggressive in the form of the Maoism or other. In fact this is happening though not much discussion on this take place. In Europe Maoists are finding hiding holes to promote their ideas. India has become a great Red Corridor via Nuxalite movement that is violent and against capitalistic and democratic system. Nepal has fallen to communism. The process will speed up in nearest future because:

1.     Free economy is bound to create socio-economic divide among every society as free economy does not mean to accommodate and give equal opportunities to all the members of the society.
2.     Free economy means that it shall work for the chosen individuals…not society as a whole.
3.     Social good cannot be in any way a goal of free economy. It is bound to work for the good of the few and fewest of the corporate entities.
4.     In free economy/globalization, governments too are necessarily forced to minimize their role even from the public duties, such as education, health and infrastructure. This is happening and will gather more momentum in nearest future.
If such is a condition that we have jumped in that warrants some reaction from those social segments those are not partners in the progress or receiving minor share of the progress that cannot fulfill their wants. May they be the farmers or the people engaged in traditional miniscule businesses for survival and all those who cannot find any place in the new economy.
Not to forget that the immediate close ideology to them will be Maoism. In fact it is and such instances are jumping up almost everywhere all around globe, no matter how one try to neglect them.
Capitalism, as it is easier for the beneficiaries to adopt and take the different path from the society they belong, Communism is other path that is left open for the deprived and downtrodden by the new economic system.
We are, may be knowingly or subconsciously, are seeding the greater divide between two classes to flare up a violent conflict of the future.  
Free economy is curse where human being is not a center of the thinking. Maoism (or Communism) is another curse that world do not want to confront anytime.
Our economy needs to change perspective. We need to follow the path of sustainable economy that is not destroying natural resources as well as human respect.
-Sanjay Sonawani

How original meanings are lost?

To see how words lose their original meaning in the course of the time is an interesting thing in itself.  The words, names or even epithets those were used in the past find completely opposite meaning in today’s vocabulary. The changes can be attributed to the socio-cultural strife taking place intermittently in the human history and to the changing faiths with the time. Let us go through few examples to make our point:

1.  Asur: we use this word as a synonym for demon or evil being. Indian mythology contains hundreds of the stories of eternal warfare between Deva’s (Gods) and Asura’s. Per mythology Deva’s and Asura’s were brothers but took separate path opposing each other over rule on the earth and fought incessantly.

In pre-Rig Vedic period, Asur didn’t mean anyway an evil being. Original meaning of “Asur” is Full of the Life, gallant or supreme Power. The highly revered Vedic God Varuna’s main epithet in the beginning was “Asura”. Same epithet is used respectfully for Agni, Indra and Mitra sometimes in ancient body of Rig Veda. In a way Rig Vedic Asura’s are exalted God’s!

Then how come that the very term “Asura” took opposite meaning in the later times is a question that needs to be answered.

Vedic religion was originally an offshoot of the Asura culture that had flourished in Indian sub-continent. Asura’s were prominently Shaivait whereas Vedic religion was centered about the sacrificial fire worship. However, as no new religion immediately can cut off its past links from which it has emerged, few faiths are retained, as seen with Judaism and Islam. Hence Asura term was retained with its original meaning, but as strife grew between old and new faiths and Asura became sworn enemies of the Vedic’s it was but natural that they started defaming Asura’s and dropped the epithet in new compositions of the Veda’s.

                                             (Asura’s as depicted in the sculptures) 


This is how “Asur” word took entirely opposite meaning in later literature of the Vedic people. However this word in Avestan form “Ahur” (Asur) maintained same divine position throughout.

In course of the time, people belonging to Asura culture, though retained their Shaivait faith, too accepted new meaning of the term because hoards of Vedic literature denounced Asura’s in every possible mythical story. 

Still the fact remained that Asura’s were devotees of Lord Shiva, received various boons after sever penance from him and destroyed sacrificial fires of the Vedic people as much as possible.

So change in the meaning of the term “Asura” gives us insight in the cultural conflict that took place in India in historic times. However, we need to rethink on the term as Vedic rituals have been seized since at least last two millenniums. Shaivait tradition still is in its full force, then why we should not take original meaning of Asura and pay homage to our forefathers instead of defaming them taking opposite meaning of the Asura?

If we look at the history of Asura Kings like Maha Bali, Jarasangha, Banasura etc. we find them powerful emperors spreading their culture in Central North-East Asia. They were just kings having their original Shaivait faiths.  Philosophers like kapil, Shukracharya and many others (including many Upanishadik seers) were from Asura clan. Even today we can find most of the Shiva temples are named after Asura’s. It was a distinct culture that is retained even today…and still if we are associating “Asura” with bad elements then it is our grave mistake. 

2. Durodhana, Dusshasana etc.: Duryodhana and his brothers are painted in dark shades in Mahabharata. All blames for causing Great War of Mahabharata are showered upon them, especially Duryodhana. I have discussed Duryodhana here, so let’s go to the meaning of Duryodhana and also of Dusshasana. 

a.     Duryodhana originally means “Impossible to win over”
b.     Dusshaasana originally means “Impossible to rule over”

Now if we look at the original meaning of the names, what is bad about it?

Still the names are taken as the bad names. Bhishma, it is said in some epical versions, preferred to address Duryodhana as “Suyodhana”.

And we praise Bhishma for his so-mush-so kindness. But the phrase Suyodhana means “Easy to conquer”. Isn’t in fact the term defames Duryodhana?

How could, none asked, Royal parents would name their off springs that has bad meaning?  

No. Dhritarashtra and Gandhari were intelligent enough how to name their kids. They had named them with right names that had glorious meaning.

But as Kaurava’s had to be proven villains from every aspect, meaning of their names were inferred quite opposite than what it originally meant!  

Similar thing has happened with the term “Raksasa”.

For over two millenniums Raksasa has become synonym of Demon, an evil being having tremendous mysterious powers that harms human life.

But actual meaning of the word “Raksasa” is “Protector” or He, who saves!

Change in the meaning of this term finds its roots in the cultural history that we have seen in case of the Asura’s.

 This is how words remain same but the meaning attached to it changes over the time because of socio-cultural strife and what is implied by the mythical and other literature over and again, thus original meaning is lost!

-Sanjay Sonawani

कृष्ण-कर्ण संवाद – भाग २

कृष्ण उपप्लव्याहून शिष्टाईसाठी निघाला त्यादिवशी ‘रेवती’ नक्षत्र होते असा उल्लेख आहे. मार्गात एकच रात्र कृष्णाने मुक्काम केला व दुसर्‍या दिवशी तो हस्तिनापुराला पोचला असे म्हटलेले आहे. त्या दिवशी दुर्योधनाचे आतिथ्य नाकारून तो विदुराकडे मुक्कामाला राहिला. तिसरे दिवशी कौरवदरबारात शिष्टाई झाली. संध्याकाळपर्यंत ती अयशस्वी ठरून कृष्ण विदुराकडे परत येऊन कुंतीला भेटला व मग पांडवांकडे परत निघाला. या दिवशी ‘भरणी’ नक्षत्र असणार कारण रोज एक नक्षत्रातून चंद्र पुढे जातो. हा कार्तिक मास होता हे गृहीत धरल्यास अमावास्येला चंद्र ‘ज्येष्ठा’नक्षत्रापर्यंत पोचणार होता. (पौर्णिमेला-शिष्टाईच्यादुसर्‍या दिवशी-तो कृत्तिका नक्षत्रात पोचणार होता कारण हा कार्तिकमास). ‘भरणी’ पासून ‘ज्येष्ठा’पंधरा नक्षत्रे पुढे आहे! तेव्हां शिष्टाईच्या या दिवसापासून आठच दिवसानी अमावास्या येणे शक्यच नाही! तेव्हां जर कृष्णाने ‘आठ दिवसांनी अमावास्या आहे त्या दिवशी युद्ध सुरू करूं’ असे कर्णाला म्हटले असेल तर हा संवाद झाला त्या दिवशी ‘मघा’ किंवा ‘पूर्वा’ नक्षत्र असले पाहिजे होते जे शिष्टाईच्या दिवशीच्या भरणी नक्षत्रानंतर ७-८ दिवसांनी येणार होतें! तोंवर कृष्ण हस्तिनापुरात होता कोठे? तो केव्हाच परत गेला होता! कृष्ण शिष्टाईच्याच दिवशी परत गेला असला पाहिजे असे दुसर्‍या संदर्भावरूनहि निश्चित ठरते. पांडवांकडे तो परतल्यावर मग शिष्टाईबद्दल सर्व चर्चा झाली, युद्ध अटळ आहे हे स्पष्ट झाले, मग पांडवपक्षाच्या सर्व वीरांची बैठक झाली, चर्चेअंती धृष्टद्युम्नाला सेनापति नेमले गेले, पांडव वीर व सैन्य कुरुक्षेत्रावर पोचले, रुक्मीने येऊन सहाय्य देऊ केले ते पांडवानी उडवून लावले व तो निघून गेला वगैरे घटना घडल्या. मग बलराम शिबिरात आला व युद्ध होणारच हे कळल्यावर,‘मला हे युद्ध पहावयाचे नाही म्हणून मी तीर्थयात्रेला जातो’असे कृष्णाला व पांडवाना म्हणून लगेच शिबिर सोडून गेला. येथे नक्षत्राचा उल्लेख नाही. तो नंतर भीम-दुर्योधन गदायुद्ध १८व्या दिवशी झाले तेव्हां उपस्थित झाला. त्याने तेव्हां मात्र म्हटले कीं ‘मी पुष्य नक्षत्रावर निघालो होतो तो आज श्रवण नक्षत्रावर (४२ दिवसानी) परत येतो आहे.’अर्थ इतकाच कीं पुष्य नक्षत्राच्या बलराम-पांडव भेटीच्या व आधीच्या पांडवशिबिरातील वर वर्णन केलेल्या सर्व घटनांच्या दिवशीहि कृष्ण पांडवांच्या शिबिरात होता. ‘भरणी’ नक्षत्राच्या शिष्टाईच्या दिवसापासून या सर्व घटनांमध्ये ४-५ दिवस गेले होते. मग कृष्ण कर्णाला भेटला असेलच तर यानंतर दुसर्‍या वा तिसर्‍या दिवशी, मघा वा पूर्वा नक्षत्राच्या दिवशीं, गुप्तपणे भेटला काय?

आहेस तू

आहेस तू सावरायला म्हणून पङायला आवङते,

आहेस तू हसवायला म्हणून रङायला आवङते,

आहेस तू समजावयला म्हणून रुसायला आवङते,
आणि

आयुष्यात आहेस तू सोबत म्हणून जगायला आवङते….

खुप प्रेम करते.. ती.♥

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…
एरवी अगदी खळखळून हसते…

पण मी हात पकडला की गोड लाजते
जीन्स टी शर्ट regularly घालते…

पण पंजाबी ड्रेस वर
टिकलीही न चुकता लावते..
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते

पण मोबाइल मधे फोटो
काढतो म्हणालो तर
‘नाही’म्हणते…

पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते…

लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त
same 2 u च म्हणते…

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते…

बोलून दाखवत नसली
तरी नजरेने
खुप काही सांगते

एवढ नक्की सांगतो
माझ्यावर खुप
खुप प्रेम करते…♥

रोज मी एक कविता करतो

रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो…
अन हळूच भरलेले डोळे पुसतो…
आई ने विचारलं,”काय झाल?”,
तर तिला काहीतरी थाप मारतो…
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो…
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो…
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो…
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो.

Shunga dynasty and Sanskrit….

  
Pushyamitra Shunga is respectfully applauded by Vedic people for his greatest ever achievement that he revived Vedic religion that was almost vanished from India because of dominance of Buddhism. As per Punanik texts he conducted two horse sacrifices to revive Vedic rituals after coming into the power. This fact also evidenced by Kalidasa’s famous play “Malavikagnimitra”. Chief protagonist of the play Agnimitra was immediate successor of Pushyamitra, probably his son.

Pushamitra was General of Mauryan King Brihadratha. He assassinated Brihadratha and assumed power. Many scholars state that he had complete apathy towards Buddhism, so much so that he mass-massacred thousands of Buddhist monks and destroyed many monasteries.

Even if considered above being sheer exaggeration of the facts, there has been no doubt among any historian that Pushyamitra was anti-Buddhist and reviver of almost dead Vedic religion.

If this is a fact it poses few questions:

First, if Pushyamitra was reviving Vedic religion, which language he would have chosen to be his Court language?

In all probabilities answer will be “Sanskrit.”

Sanskrit is thought to be very ancient language. The language Vedic people revere for its being divine and perfect one! Supposing, since Ashoka was follower of the Buddhism, he chose Prakrit as official language of his Court, wouldn’t Pushyamitra do naturally quite opposite?

Wouldn’t he select divine Sanskrit over Prakrit to be his official language as he was reviving ancient Vedic religion?

But this is not a case at all!
  
Pushyamitra came into the power in 185BCE and acted as defacto King (he never assumed title of the king, continued his previous title “Senapati”…i,e. Commander of Army.) till his death! (149 BCE)

 During his reign of almost 36 years had he used Sanskrit as his official language wouldn’t be there some proofs in the form of any inscription? There is no such proof!

His contemporary kings, like Kharvela, still were using Prakrit and ample proofs are available to support this fact, like Hathigumpha inscriptions. Prakrit still was dominant language of social and royal communication.

Agnimitra, who succeeded Pushyamitra in the year 149 BC, struck his own coins. Pushyamitra may not have circulated his coins because he never assumed title of the king in his life. But his son Agnimitra’s some coins have been found in Mathura region.

The coin gives startling proof! The name “Agnimitra” punched on the coin is “Agi Mittasa”. This is Prakrit form of the name!

This does only imply that Agnimitra too used Prakrit as his official language.

This may not be enough. Other king from the lineage of Shunga dynasty, Danabhuti, (he is also thought to be a feudatory of Shunga, not king himself) too have used Prakrit form of his name. In Bharhut inscription, in mention to a donation his name appears as “Vacchiputa Dhanabhuti”. Also in another Bharhut inscriptions Shungas are mentioned as “Sugana raaje” (During the period of Shunga’s), in Prakrit language. 

Now let us deal with other proof. We know that Heliodorus was a Greek ambassador appointed in Shunga court. Bhagabhadra was ruling king of those times. Heliodorus, near Shunga capital Vidisha, erected a Garuda pillar in honor of Vasudeva in 110 BCEThere are two inscriptions on the pillar engraved in Prakrit language using Bramhi script.  

Since a royal emissary used Prakrit language in the inscription, it does mean that the official language of Shunga dynasty was Prakrit and none else.  Otherwise a foreign Ambassador wouldn’t have used that language.

 Shunga’s at one hand are called reviver of Vedicism and at other they do not apply Sanskrit of any form as their royal language raises a serious question, did Sanskrit exist then?

This is because till 160 AD, no Sanskrit inscription is to be found throughout the country. There is no trace of any kind of Sanskrit (Chandas or Bhasha) being part of social or political life till middle of second century AD.

Then another question arises, if Pushyamitra conducted Horse Sacrifice as per Vedic ritual, in which language were Veda’s then? We always have been told that Veda’s and Vedic literature was preserved by oral tradition through millenniums in itself becomes a lie. Entire absence of any Sanskrit or Sanskrit-like language, even in the reign of Vedic dynasty points out to this startling fact.

Then why after 160 AD gradually from hybrid sanskrit to classical Sanskrit inscriptions and written literature starts floating, dominating even Prakrit languages?

The answer is because Sanskrit was still in making during this period! It didn’t exist prior to, at least, first century AD. As sanskrit was developed it started getting royal patronages and gradually became language of inscriptions and literature during Gupta period…still in the beginning inscriptions were engraved in both the languages, i.e. Prakrit and Sansktrit. Inference can be drawn that Sanskrit was still a new language to the people hence needed bilingual texts.   

-Sanjay Sonawani
Ref.: 1. Coins of Ancient India:From the earliest Times Down to the Seventh Century- By Alexander Cunningham
2. Between the Empires : Society in India 300 BCE to 400 CE- By  Austin Patrick Olivelle Alma Cowden Madden 

-See also: http://ssonawani.blogspot.in/2013/05/ancient-indian-coins-and-symbolism.html

ग्रील्ड मशरुम पास्ता

साहित्य:
१ – पास्ता पाकिट
१ – डबा (कॅन) क्रिम ऑफ मशरुम सॉस
किसलेलं (श्रेडेड) चीज भुरभुरवून टाकण्यासाठी
७-८ –  मशरुम चिरुन, ब्रोकोलीची फुलं मुठभर, १ भोपळी मिरची उभट        चिरुन किंवा
१ कप –   कोणत्याही फ्रोझन भाज्या

कृती:
पास्ता उकळत्या पाण्यात घालून ९ ते १२  मिनिटं किंवा मऊसर होईपर्यंत शिजवा किंवा पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे
चाळणीतून गाळा आणि गार पाण्याखाली धरा. पाणी निथळून घ्या.
पातेल्यात एक चमचा तेल गरम करुन चिरलेल्या भाज्या दोन मिनिटं परता त्यात कॅनमधील अर्ध मशरुम सॉस थोडं पाणी घालून घाला. चवीपुरते मीठ घालून सगळं नीट परता आणि पास्ता घालून चांगला गरम करा. यामध्ये भारतीय चव आणायची असेल तर चाट मसाला, पाव भाजी मसाला एक चमचा घातला तर चांगला लागतो.
बेंकिंग ट्रे मध्ये वर तयार झालेलं मिश्रण पसरा. किसलेले चीज त्यावर पसरा. ओव्हन ब्रॉईलवर लावा. पास्ता असलेला बेकिंग ट्रे  ब्रॉयलरखाली तीन ते चार मिनिटं ठेवा.
बाहेर काढून गरम गरम खा.

Whole Grain Penne Pasta

“असंभव” (एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>भाग-5

‘असंभव’ भाग:=>4 पासून पुढे़… *ब्रेकिंग न्युज* सकाळची, चर्चगेट वरुन सुटणार्‍या लोकल ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आणि त्याचवेळी बरोबर 9:45 ला, विरारहून येणारी चर्चगेट फास्ट ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. ती प्लॅटफॉर्मवर थांबते न थांबते तोच ट्रेनजवळ, चढणार्‍या आणि उतरणार्‍या प्रवाशांची एकच झुंबड उडाली. या प्रवाशांच्या गर्दीतुन कशीबशी वाट काढत, आणि खांद्यावरील आपली ब्लॅक कलरची छोटीशी पर्स संभाळत एक […]

मी टिळा का लावतो ??

मी टिळा का लावतो ?? टिळा लावून गेलो कि कॉलेज मध्ये नेहमी मला “राज” सारखा दिसतोस , एकदम वास्तव style बनून आला आहेस असं बोलतात .. पण मी कधी उत्तर देत नाही त्यावर …. हे जरूर वाचा.. पटल तर तुम्ही पण सामील व्हा !

हिंदू टिळा का लावतात…??

उत्तर – हिंदु अध्यात्म ची खरी ओळख टिळा(तिलक) ने होते. टिळा लावल्याने
समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. हिंदु धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा
लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.

उदा. हळदी,कुंकू,केशर,भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे.
पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते…??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि,संगमाच्या किनार्यावर “गंगा स्नान” केल्यानंतर
साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते.कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक
महत्व आहे.आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे.जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना “चक्र” असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो,तिथे आज्ञाचक्र असतो.
हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे.इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन
नाड्या

१) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला “त्रिवेणी” किवा “संगम” पण
म्हणतात.

हे गुरु स्थान आहे.इथूनच पूर्ण शरीर संचालन होते.हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण
आहे.याला मनाचे घर पण म्हणतात.यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे.
योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते.टिळा लावल्याने स्वभावात चांगले
बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.टिळा काही खास प्रयोजना साठी
पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर
तर्जनी ने,धनप्राप्ती हेतू मध्यमा नी आणि शांती प्राप्ती साठी अनामिका नि टिळा लावला जातो.

साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.
तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त
लपलेले असते.म्हणून प्रत्येक हिंदूने टिळा जरूर लावावा.हिंदु प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे.

टिळा हिंदु संस्कृती ची ओळख आहे.टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे

कैरीचे पन्हे / Kairi Panhe

मे महिन्याची सुट्टी लागली की माझा आणि माझ्या धाकट्या भावाचा एक अत्यंत आवडता कार्यक्रम असायचा तो म्हणजे I Love you Rasna म्हणत रसना चे सरबत बनवणे 🙂 आम्ही दोघेजण यासाठी प्रचंड उत्सुक असायचो. सरबत पिण्यापेक्षा ते बनवण्याचा उद्योग जास्त enjoyable असायचा. आई रसना चा pack घेऊन यायची. Orange हा all time favorite. कधीतरी कालाखट्टा हि करायचो.  सक्काळी सक्काळी आंघोळ करून तयारीला लागायचो. 

मोठ्ठ पातेलं, त्यात मापून पाणी, मोजून साखर घालायची आणि ढवळत बसायचं. पाण्यातून साखर अदृश्य कधी होते याकडे आम्ही डोळे लावून असायचो. नंतर त्या pack मधील powder आणि concentrated liquid पाण्यात घातलं की सूर्यगोळा  जणू सकाळीच आमच्या सरबतात येउन बुडायचा आणि आमचं सरबत त्याच्या रंगात रंगवायचा. एका आगळ्याच आनंदात आम्ही सरबत बाटलीत भरायचो. त्यातील सांडवासांडवी, चिक्कट हात, रंगलेली फरशी सगळीच मज्जा! fridge मध्ये ती बाटली अशा थाटात विराजमान होई जणू एखादी राजकन्याच! 
हि सगळी सरबत कहाणी आठवण्याच कारण म्हणजे आजची आपली recipe “कैरीचे पन्हे”. चला…. उन्हाळ्यातील हे  घरगुती स्वादिष्ट cold drink बनवूया. 

साहित्य: एक मोठ्ठी कैरी (साधारण ४५० ग्रॅम), दुप्पट साखर, चवी पुरते मीठ, वेलची पूड, केशर
साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील घालू शकता. 

कृती: १) कैरीचे साल काढून घ्यावे. सगळा हिरवा भाग काढावा. नंतर ती कैरी cooker मध्ये ३ शिट्या होईपर्यंत वाफवावी. 
२) कैरी गार झाली की त्याचा गर काढावा व mixer च्या भांड्यात घालावा. साखर आणि थोडेसे पाणी घालावे व mixer वर वाटून घ्यावे. 
३) कैरीच्या paste मध्ये चवीनुसार मीठ घालावे. स्वादाला वेलची पूड घालावी आणि परत एकदा mixer वर वाटून घ्यावे. 
४) हा झाला concentrated pulp तयार! fridge मध्ये हा pulp छान टिकतो. पन्हे बनवायचे असेल त्या वेळी २ मोठे चमचे pulp glass मध्ये घ्यावा आणि त्यात तिप्पट गार पाणी घालून चमच्याने ढवळावे. त्यात केशराच्या काड्या घालाव्यात आणि serve करावे.

 काही महत्वाचे: १) कैरीची साल पूर्णपणे काढून घ्यावी. कैरीला जर साल राहिली तर ती mixer वर नीट वाटली जात नाही.
२) कैरीच्या आंबटपणानुसार  साखरेचे किंवा गूळाचे प्रमाण कमीजास्त करावे.