भिमाशंकराचे दर्शन

भिमाशंकर मंदिर भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील बारा लिंगा पैकी सहावे ज्योतिलिंग भिमाशंकर आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा. 

  

भीमाशंकर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक नयनरम्य ठिकाण, इथे उन्हाळा सोडून कोणत्याही रुतुत येऊ शकता.परिसर अतिशय रम्य आहे.


भगवान शंकराचं मुख्य स्थान हिमालयातील कैलास जरी असलं तरी पश्चिम घाटाच्या डोंगररांगाही त्याला प्रिय आहेत. सह्यादीतल्या अशा कितीतरी सुरम्य…

 

दाट रानांनी वेढलेल्या ठिकाणी त्याच्या वास्तव्याच्या जागा आहेत. या दुर्गम जागांच्या भोवती परंपरेने अनेक कथा गुंफलेल्या आहेत.

अशीच एक पौराणिक कथा… एका अरण्यात भीमक नावाचा राजा उग्र तप करत होता. त्याच्या तपावर श्रीशंकर प्रसन्न झाले व त्यांनी राजाला दर्शन दिलं. त्या वेळी शिवाच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या. राजाने त्या धारांची नदी होऊ दे. अशी शिवाजवळ प्रार्थना केली. शिवाने ‘ तथास्तु ‘ म्हटलं… आणि भीमेचा उगम झाला. स्थळाला नाव पडलं… भिमाशंकर.

इथल्या संपन्न निसर्ग… घनदाट जंगल… भरपूर कोसळणारा पर्जन्य… मेघांनी वेढलेला आसमंत… साहजिकच परिसर मंतरलेला. मनातली देवाची कल्पना वृद्धिंगत करणारा… त्यातच शंकराचं बारा ज्योतिलिंगापैकी एक देऊळ… यामुळे मराठी श्रद्धाळू मनाचा ओढा इथे पूवीर्पासून आहे.

कोकणातून भिमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचा वळण आहे. खांडसहून भिमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील वर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर मिळतात. एक मार्ग ‘ गणपतीघाट ‘ या नावाने ओळखला जातो. हा रस्ता थोडा वळण घेऊन जाणारा असला तरी अतिशय निधोर्क आहे.

दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगरभटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. पहिल्या पठारावर जाणारा हा मार्ग एका उभ्या कड्याच्या कपारींमध्ये काढलेल्या असल्याने पावसाळ्यात पूर्णपणे निसरडा होतो व बहुतेक टप्पे दरीच्या बाजूने असल्याने धोकादायक आहेत. असं जरी असलं तरी नेहमीच्या सराईत भटक्यांना या साहसी मार्गाने जाण्याची ओढ असते. तरुणांच्या सहज प्रवृत्तीप्रमाणे त्यांना थरार अनुभवायला आवडतोच. पण जरा जपूनच गेलं पाहिजे.अनेक वाटांवर भरकटण्याची शक्यता दाट आहे.तसेच दाट धुके असल्याने खांडसहून स्थानिक माणूस घेणं अत्यावश्यक आहे.

दगडी कोरीवकाम केलेले सुंदर मंदिर आहे मंदिर हेमाडपंथी बांधनीचे आहे.

मंदिर थोडं खालच्या बाजूला असल्याने पाच मिनिटं दगडी पायऱ्या उतराव्या लागतात. मंदिराची बांधणी साधी असून गाभारा मोठा आहे. मंदिरासमोर भल्यामोठ्या दगडी खांबांना लटकवलेली प्रचंड घंटा आहे.

भिमाशंकरच्या पुरातन देवळाच्या दर्शनी बाजूला गणेशाची पुरातन सुंदर मूर्ती आहे.  

                                       भिमाशंकर परीसरात दिसणारी खार ‘शेकरु’

भिमाशकंर ट्रेकची मजा काय वेगेळीच आहे.

Thrilling Harihar fort

The district of Nashik (Maharashtra) is very well known for the forts, especially mountain forts. The glory of Nashik district lies in the natural forts. These forts were created in various monarchies as well as empires which ruled the ancient and medieval Maharashtra. Very few forts of Nashik are well known to the general citizens even the citizens of this district too. One of the well known forts of Nashik is Harihar fort, which is situated in Trimbakeshwar taluka.
Harihar Fort from Base
 I have seen this fort for the first time when I visited the Bramhagiri or Trimbak gad. It is well known place for the bhakts of lord Shiva. Harihar is situated back of the Trimkakeshwar mountains. I saw this place from the top of the trimbak fort, when I visited there. I searched the information about the fort from Internet also. There are many trekkers and bloggers who has wrote about this fort in Marathi. So I got the exact idea about it. As it was a summer, we started traveling early in the morning at 6 am from Nashik city. Harihar is nearly 15 kilometers away from the city of Trimbakeshwar. We have to go through Javhar road of Trimbakeshwar. On this road, nearly three kilometers away we got a board showing sign of “Dugarwadi Waterfalls”. Dugarwadi is very well known waterfall of Nashik. It is nearly 7 kilometers away from Javhar road. After leaving Sapegaon behind we traveled about 10 kilometers on the road. It is very beautiful and greeny though it was the summer season. I thought of rainy season, how beautiful it would be looking! After crossing two beautiful hills road, we reached to the Harihar fort. The Nirgudpada is the village at the base of Harihar fort. We reached there nearly at 8 am and started walking towards the fort. It looked like very high hills fort from this side. We have taken the help of nearby villagers to find the path towards the steps of the fort. After walking and finding the ways towards the fort we reached the basement of the steps. The steps of the forts are created directly carving the rocks of it. But, it is very difficult to climb as general though these steps. We need to use our hands to catch every step to climb it! Steps are created nearly at fifty percent region of the fort. We used our hands to climb the fort’s steps. The work is very creative. After climbing nearly 50 steps we reached at the main door of the fort. It is still very good in position. There is very windy atmosphere near the main door or Mahadarwaza. The rocks again carved to create the way after this door. We have to lean down to cross this road. It is a thrilling experience! After this road again the rock carved steps are created. The architecture of these steps are similar to the previous one. Climbing these steps is very very thrilling. We have to take care while climbing through these steps. We got one tunnel at the top of all these steps and finally the top door of the fort. There is no any step which is created by putting rocks from outside! 
 
I am at the start of the steps
 The top of the fort is a good plateau. Two temples are created here. Only debris can be seen of the top of Harihar fort. We can see Trimbak fort, Bhaskar Gad fort and Utwad fort for here. In the summer season also the complete area nearby the fort looks very greenish. Rainy season would be very much interesting for this fort. 
 
Bhaskar Gad from Harihar fort
 If you want to see a good place to make your day thrilling and beautiful, you must visit this place at least once!
Steps of the fort (But you don’t need helmet!!!)

Tunnel after the steps

Berry’s the base of the Harihar fort.

Greeny roads in the summer.

Top of the Harihar fort.

फेडोरा: हरपल्या श्रेयाची आस – भाग ६

“आज ना उद्या हे असंच घडणार होतं बहुधा. पण तिने हा मार्ग निवडला कारण तिला माझ्यावर सूड घ्यायचा होता. माझा – फेडोराचा – चेहरा आयुष्यात दुसर्‍यांदा विद्रूप झालेला पहायला मिळावा असा हेतू असावा तिचा.” फेडोरा म्हणते.  इतके सारे गमावूनही तिचा विचार स्वतःपलिकडे जात नाही. भयाण  बंदिवान आयुष्य भिरकावून देऊन त्यातून मुक्त होऊ पाहणार्‍या अन्तोनिआच्या मृत्यूमधेही तिला अन्तोनिआने आपल्या वर घेतलेला सूड दिसत होता. फेडोरा अजूनही तितकीच आत्मकेंद्रित होती. “पण मी ही अशी हार मानणार नव्हते. कॉस्मेटिस सर्जरी करणार्‍या डॉक्टरांच्या दोन टीम्स अहोरात्र काम करत होत्या नि एका दिवसात त्यांनी तिचा चेहरा पूर्ववत केला.”
इथे विलावर फेडोरा ऊर्फ काउंटेस सॉब्रियान्स्की’ने अना कारेनिनाने मृत्यूला बोलावण्यासाठी निवडलेल्या मार्गाबाबत नोंदवलेला आक्षेप आठवतो. जवळजवळ नार्सिसस कॉम्प्लेक्स म्हणावा इतकी ती आपल्या चेहर्‍याच्या प्रेमात होती. तो चेहरा तिचे सर्वस्व होता. लोकांच्या मनावर तो कायम ठसलेला रहावा हीच तीची इच्छा आहे. ते साधण्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची तिची तयारी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने आपल्या मृत्यूनंतर आपल्या पार्थिवाचे फोटो वृत्तपत्रातून, माध्यमातून प्रसिद्ध होणार हे तिला ठाऊक आहेच. तेव्हाही आपला चेहरा तितकाच सुंदर, तितकाच आकर्षक नि पाहणार्‍याच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा असावा असा तिचा हट्ट आहे. याच कारणासाठी ‘अना कारेनिना’च्या आत्महत्येबाबत तिची प्रतिक्रिय अतिशय प्रतिकूल आहे. ‘कोणतीही स्त्री हा मार्ग स्वीकारणार नाही.’ असे म्हणताना खरंतर ती फक्त स्वतःबद्दलच बोलते आहे. फेडोराचा मृत्यू – आपाततः का होईना – याच मार्गाने झाल्याने ती संतापलेली आहे. फेडोराच्या विरुप झालेल्या चेहर्‍याचे दर्शन तिच्या चाहत्यांना होऊ नये अशी तिची इच्छा आहे नि आपल्या या दुराग्रहासाठी तिने आपल्या सर्व सर्जन मंडळींना कामाला लावले आहे.
दोन वाजत आले आहेत. जेवणाच्या सुटीला गेलेले वायोलिनवादकांनी पुन्हा आपली जागा घेतली आहे. फेडोरा फ्रान्स्वाला बोलावून दुपारच्या अंत्यदर्शनासाठी सज्ज होण्याची सूचना करते. तो अनेकांकडून आलेली पुष्पचक्रे हॉलमधे मांडण्याची सोय करतो नि त्याबरोबर आलेल्या शोकसंदेशांची कार्डस एका तबकात ठेवून काउंटेससमोर आणून ठेवतो. त्यात असतात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक फेडेरिको फेलिनी, प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ ज्याँ पॉल सार्त्र आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्ती. लहान बुके हटवून फक्त मोठे बुके मांडून ठेवण्याची सूचना केली जाते, फेडोराचे मेकअपमन फेडोरा ऊर्फ अन्तोनिआच्या चेहर्‍यावरचा मेकअप पुन्हा एकवार ठीकठाक करू लागतात. फेडोराची शवपेटी हलवून हॉलच्या मधोमध आणली जाते, जेणेकरून वरच्या घुमटातून येणारा दुपारचा उजेड थेट तिच्या चेहर्‍यावर यावा नि तो अधिकच तेजःपुंज दिसावा.
सारे काही सूचनेबरहुकूम चालू असलेले पाहून निवांत झालेल्या फेडोराला बॅरी गाठतो. “एखाद्या मृत्यूचाही सोहळा कसा करावा हे तुझ्याकडून शिकावे.” “शेवट अतिशय महत्त्वाचा असतो मि. डेटवायलर. कारण प्रेक्षक तोच अधिक लक्षात ठेवतात. शेवटची एग्झिट नि अंतिम क्लोज-अप!” “अगदी त्यासाठी तुम्हाला डमी वापरायची गरज पडली तरी!” बॅरी उत्तरतो. ‘Legends must go on.’ फेडोरा म्हणते. “तू तर या व्यवसायात बराच काळ आहेस. तुला हे सारे स्पेशल इफेक्ट्स, बॅकड्रॉप्स, ग्लिसरिनचे अश्रू यांची ओळख आहेच. मी एक गर्विष्ठ म्हातारी आहे असं तुला वाटंत असेल नाही, डच?” फेडोरा विचारते. तिच्या तोंडून ‘डच’ हे संबोधन ऐकून बॅरी चकित होतो. “तू आत्ता मला डच म्हणालीस?”  तो विचारतो. ‘म्हणजे तुला आपली भेट आठवते तर.” “मग? तुला मी विलावर बोलावून घेतलं ते कशामुळे असं तुला वाटलं? तू आज कसा दिसतोस ते मला पहायचं होतं.”
इथेही तिचे कुतूहल त्याच्या दिसण्याबाबत, बाह्य रूपाबाबत आहे. ते ही कदाचित तिच्या विवस्त्र सौदर्यासमोर जांभई देणारा, तिच्या अभिमानाला धक्का देणारा पुरूष म्हणून. कदाचित वाढल्या वयाचे लोक समवयस्कांची अवस्था पाहून ‘आपण एकटेच नाही.’ अशी आपलीच  समजूत घालतात तसाही काही हेतू असेल.
इतक्यात मुख्य दार उघडून आत आलेला काउंट “वरच्या सज्ज्यात जायची वेळ झाली. एलेवेटर तुझ्यासाठी थांबवून ठेवला आहे.” अशी सूचना करतो. “गुडबाय, मि. डेटवायलर.” असे म्हणून ती त्याचा निरोप घेते. “गुडबाय काउंटेस(!)” असे म्हणून तो ही तिचा निरोप घेतो. “आणि हे सारे तू आपल्यापुरतेच ठेवशील असे वचन दे मला.” फेडोरा त्याला  म्हणते. “ठीक आहे. पण मला वाईट वाटलं. कारण यावर मी आणलेल्या स्क्रिप्टपेक्षाही उत्कृष्ट चित्रपट निर्माण होऊ शकतो.” बॅरी खोट्या निराशेने म्हणतो. “शक्य आहे. पण तू मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री कुठून आणशील?” फेडोरा विचारते नि आपला झिरझिरीत बुरखा चेहर्‍यावर ओढून घेते. खुद्द फेडोरा अपंग झाली नि तिचे प्रतीरूप असलेली अन्तोनिआ काळाच्या पडद्याआड गेलेली असताना ‘फेडोरा’ची भूमिका साकारायला इतर कुणी लायक नाही ही तिची आत्मप्रौढी, तिचा अहंकार अजूनही तितकाच तीव्र आहे.
दोन वाजले आहेत. प्रासादाच्या पुढच्या दोन दारांपाशी उभ्या असलेल्या गार्डस् ना दरवाजे उघडायची आज्ञा फ्रास्न्वा देतो आणि दुपारचा ‘शो’ सुरू होतो. घाईघाईने आत येणार्‍यांच्या रांगेच्या विरुद्ध दिशेने बाहेर जाण्याच्या दरवाजाकडे जाणारा बॅरी दिसतो. दिवाणखान्याचा दाराशी ठेवलेल्या ’विजिटर्स बुक’ मधे तो आपले नाव लिहितो ’डच(!)’ आणि बाहेर पडतो. आत येणाऱ्या  रांगेत मृत फेडोरासाठी गुलाबपुष्प घेऊन आलेला मायकेल यॉर्क दिसतो.  फेडोरा ऊर्फ अन्तोनिआच्या आयुष्यात उसळलेल्या नि तिच्या अंतास कारणीभूत ठरलेल्या वादळाचे निमित्तकारण ठरलेल्या त्याला त्याची जाणीवही नाही.  
फेडोराच्या मृत्यूनंतर सहा आठवड्यांनी काउंटेस सॉब्रियान्स्की झोपेतच शांत मरणाला सामोरी गेली. स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या चार ओळीच्या बातमीखेरीज जगातील इतर कोणत्याही प्रसिद्धीमाध्यमाने तिची दखलही घेतली नाही. बॅरीने तिच्या नावे पाठवलेले विजेने गरम होणारे ब्लॅंकेट विलावर डिलिवर करता न आल्याचा शेरा घेऊन परत आले.
(समाप्त) << मागील भाग

संपूर्ण चित्रपट (दुवा): http://www.youtube.com/watch?v=htiHemmLt5U

 _____________________________________________________________________________
 थोडे अवांतर:
‘फेडोरा’ हा चित्रपट तसा फारसा गाजलेला नसावा, कदाचित त्यातील शब्दबंबाळपणामुळे.  मला या चित्रपटाबद्दल समजले ते शांताबाई शेळक्यांनी लिहिलेल्या ‘चित्रकथा’ या पुस्तकामुळे. त्यात त्यांनी  ‘फेडोरा’सह  काही निवडक चित्रपटांच्या कथा दिलेल्या होत्या. ती कथा वाचून हा चित्रपट पहायचाच असे ठरवले होते. प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर मात्र प्रथम अनेक धक्के बसले. कारण  शांताबाईंचा लेखातील तपशिलाच्या अनेक चुका.  वानगीदाखल इथे काही देतो आहे. 
१. बॅरीच्या विलाच्या पहिल्या भेटीच्या वेळी दरवाजातून त्याला हाकलून लावणारा क्रीतोस आहे, शांताबाईंनी म्हटल्याप्रमाणे कुणी मोलकरीण (मेडचे अतिशय वाईट भाषांतर) नव्हे.
२. डॉक्टरांबरोबरच्या बॅरीच्या – बारमधील – पहिल्या भेटीच्या वेळी शांताबाईंनी लिहिल्याप्रमाणे डॉक्टर स्वतःहून बॅरीला बरोबर येण्याचे आमंत्रण देत नाहीत (विलावरील डॉ. सकट सार्‍यांचे वर्तन पाहता हे अशक्यच दिसते.) ते फोनवर बोलत असताना बॅरी हळूच त्यांच्या खिशात ते स्क्रिप्ट सरकवून देतो. नंतर विलावरून त्याला बोलावणे येते, क्रितोस स्वतःच त्याला गाडीने घेऊन जातो. यात बॅरीचे नाव वाचून फेडोराला ओळख पटल्याची शक्यता असल्यानेच हे घडलेले असते (शेवटी फेडोरा त्याला तसे सांगतेही.) यात डॉक्टरांच्या सहृदयतेचा काही हात नसतो.
३. विलावरून आलेल्या आमंत्रणाला मान देऊन बॅरी तिथे पोहोचतो तेव्हा तिथे फक्त काउंटेस सॉब्रियान्स्की ऊर्फ फेडोरा, डॉक्टर आणि मिस बाल्फोर (आणि अर्थातच त्याला घेऊन येणारा क्रितोस) एवढेच हजर असतात.  शांताबाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे काउंट सॉब्रियान्स्की तिथे हजर नसतात त्यामुळे डॉक्टरांनी बॅरीची नि त्यांची ओळख करून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थात जर  तसे घडले असते तर पुढे जेव्हा बॅरी डॉ. वॅन्डो असल्याची  बतावणी करून काउंटशी फोनवर बोलतो तेव्हा कदाचित त्यांनी त्याचा आवाज ओळखला असता अशी शक्यता राहते. तेव्हा काउंट नि बॅरीची भेट न होणे अधिक सयुक्तिक वाटते. (काउंट नि बॅरीची भेट थेट फेडोरा ऊर्फ अन्तोनिआच्या अंत्यदर्शनाचे वेळी होते. तेव्हा इतर तिघांना ओळखत असल्याने त्यांना अभिवादन करून तो काउंटला ‘आपली ओळख झालेली नाही.’ असे म्हणत स्वत:ची ओळख करून देतो.) 
४. विलावरच्या भेटीनंतर फेडोरा जेव्हा बॅरीकडे पळून येते तेव्हा तिला घेऊन जायला येतात ते डॉक्टर आणि क्रितोस. ती मेड – तिचेही नाव जीनी वा जॅनेस  नव्हे मिस बाल्फोर आहे – गाडीतच बसलेली असते, शांताबाईंनी म्हटल्याप्रमाणे बॅरीच्या खोलीत डॉक्टरांबरोबर शिरत नाही.
५. फेडोरा व इतर विला सोडून जातात तेव्हा बॅरी मागचे दार उघडून आत प्रवेश करतो तो केवळ पायाच्या आघाताने जोर लावून, धोंड्याने कुलूप तोडून नव्हे. मागचे दार असल्याने त्याला बाहेरून कुलूप नसतेच.
६. आपल्या डोक्यावर प्रहार करणारा क्रीतोस आहे हे बॅरीला ठाऊक असतेच.  शांताबाईंनी लिहिल्याप्रमाणे कोणीतरी प्रहार करतो हे उगाचच रहस्यमय करणे आहे. विला हा मुख्य भूमीपासून दूर असतो, तिथे बोटीनेच जाता येते. तेव्हा बॅरीची होडी क्रितोसने पाहिल्याचे आपण प्रेक्षकांनीच नव्हे तर खुद्द बॅरीनेही पाहिलेले आहे. क्रितोस मागच्या उघड्या दारातून सरळ बॅरीसमोरच येऊन उभा राहिलेला आहे. उसन्या अवसानाने चल आपण दोघेच आहोत इथे तर डॉक्टरांच्या कोन्याकचा आस्वाद घेऊ असे म्हणत तो कपाटातली ती बाटली काढण्यासाठी वळतो तेव्हाच क्रितोसने त्याच्या डोक्यावर प्रहार केलेला आहे. तेव्हा प्रहार करताना जरी बॅरी बेसावध होता तरी तो कोणी केला हे त्याला नक्की ठाऊक आहे.
७. फेडोराच्या मृत्यू लंडनमधे झाला असे शांताबाईंनी लिहिले आहे. ते ही चुकीचे आहे. तिचा मृत्यू फ्रान्समधील मॉर्टसर्फ (Mortcerf) स्टेशनवर (चित्रपटात अन्तोनिआच्या मृत्यूपूर्वी ती स्टेशनचे नाव असलेल्या बोर्डखालीच मायकेलची वाट पहात उभी असलेली आपल्याला दिसते) झालेला आहे.  तसेही ‘काउंट’ ही पदवी इंग्लंडमधे नसतेच. तिथे सगळे लॉर्ड असतात, ड्यूक असतात. फ्रेंच ’काउंट’ची समकक्ष इंग्रजी पदवी म्हणजे ’अर्ल’.  तेव्हा काउंट सॉब्रियान्स्की  हे फ्रेंच आहेत हे उघड आहे.  त्यामुळे फेडोरा ऊर्फ अन्तोनिआला लंडनला नेण्याची शक्यताही तशी कमीच.
८. अंत्यदर्शनासाठी फेडोराचे शव सिसिलीमधे नव्हे तर तिच्या पॅरिसमधील प्रासादात ठेवण्यात येते.
इतक्या ढोबळ चुकांची जंत्री पाहता हा चित्रपट खरच त्यांनी पाहिला होता (शांताबाई चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य होत्या.) की न पाहताच ही कथा लिहून काढली असा प्रश्न पडावा. दुसरी शक्यता अधिक संभाव्य असलेली, ती म्हणजे दुसऱ्याच कुणी हे पुस्तक लिहून (शॅडो लेखक) शांताबाईंच्या नावे छापले असावे. 

फेडोरा: हरपल्या श्रेयाची आस – भाग ५

त्या पारितोषिक-प्रदान प्रसंगी मि. फोंडा यांच्याबरोबर आलेल्या अकॅडमीच्या फोटोग्राफरने काढलेली फेडोराची छायाचित्रे अनेक मासिकातून, फॅशन नियतकालिकातून प्रसिद्ध होतात. सर्वत्र एकच चर्चा असते ‘फेडोरा ही आजही तितकीच सुंदर दिसते. ती चिरतरुण आहे.’ ते पाहून फेडोराच्या मागे चित्रपट-प्रस्तावांची रीघ लागते. पुन्हा एकवार फेडोरा रुपेरी पडद्यावर पहायला लोक उत्सुक होतेच, पण त्या निमित्ताने दुसरा डाव खेळायला आता फेडोराचीही हरकत नसते. आणि इथून अन्तोनिआने फेडोराचा मुखवटा परिधान केला नि मूळ फेडोरा कायमची बुरख्याआड राहून विलाच्या भक्कम दाराआड राहू लागली. “हे इतकं सहज झालं? तुला यात आपण काही गैर करतो आहोत, तिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतो आहोत असं वाटलं नाही?” बॅरी फेडोराला विचारतो. “हे अति होतंय मि. डेटवायलर.” फेडोरा संतापाने गरजली. “तुम्ही सांगा मला, आपले आयुष्य पुन्हा नव्याने जगायची संधी मिळत असेल तर त्यासाठी तुम्ही काय किंमत मोजायला तयार व्हाल? Come on Mr. Detweiler, what would you give to be reborn?”
“What would you give to be reborn?” आपले आयुष्य पुन्हा जगता यावे यासाठी तुम्ही काय किंमत मोजायला तयार व्हाल? असा प्रश्न जर कुणी तुम्हाला विचारलाच तर – विचारणारा खरंच ते देऊ शकतो हे क्षणभर गृहित धरलं तर  – बहुतेक सर्वच जण त्याबाबत गांभीर्याने विचार करू लागतील.  जगून झालेले आयुष्य पुन्हा जगता आले तर कदाचित ते आपण अधिक चांगल्या प्रकारे जगू शकू कारण इंग्रजीत ज्याला ’हाईंडसाईट’ म्हणतात त्याचा फायदा घेऊन आयुष्याच्या विविध टप्प्यावर घेतलेले निर्णय बदलून काही चुका टाळू शकू, काही चुकीची वा कमी उपयुक्त (less delivering) वळणे न घेता अधिक – परिस्थितीचे अधिक नेमके ज्ञान असल्याने (informed choice)    उपयुक्त असलेले एखादे दुसरे वळण निवडू शकतो. कदाचित त्यातून आपल्या आयुष्याचा आलेख एका वेगळ्या दिशेने आपल्याला घेऊन जाऊ शकेल. आपल्याला अधिक चांगले आयुष्य जगण्याची संधी घेता येईल. या उलट ज्यांना हवे तसे आयुष्य जगण्याची संधी आधीच मिळाली आहे परंतु काळाच्या ओघात, वाढत्या वयामुळे म्हणा, घटत्या कुवतीमुळे म्हणा वा बदलत्या परिस्थितीने म्हणा त्यांना त्यांचे श्रेयस वा प्रेयस गमवावे लागले आहे त्यांनाही काळाचे काटे उलट फिरवून ते आयुष्य तसेच पुन्हा जगण्याची संधी हवी असेल, कदाचित आपल्या त्या श्रेयस अथवा प्रेयसाच्या संगतीत व्यतीत केलेला काळ अधिक लांबवता येईल.  मग ते श्रेयस/प्रेयस एखादी जिवाभावाची व्यक्ती असेल, आयुष्यातील संस्मरणीय असा एखादा कालखंड असेल,  भौतिक आयुष्यात कमावलेले आर्थिक, व्यावहारिक, कलात्मक, सत्ता यांस्वरूपातील यश असेल. ते श्रेयस/प्रेयस तुमच्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग होऊन राहिले असेल की त्याला आपल्या आयुष्याच्या भाग बनवण्यासाठी – अथवा त्या व्यक्तीला त्या व्यवस्था/वातावरणाचा लाभ पुन्हा होण्यासाठी – आपण वाट्टेल ती किंमत द्यायला तयार होऊ असे वाटावे इतके ते हवेसे होऊन राहिलेले असते. अगदी रणजित देसाईंच्या ‘राधेय’ मधला कर्ण जसा ’लहानपणीचे ते दिवस आपल्या जैविक मातेबरोबर व्यतीत करता यावेत यासाठी आयुष्यातील बहुतेक संचिताचे दान करावयास तयार आहोत’ म्हणतो ना तसे.
इथे मला आठवले ते ऑस्कर वाईल्डचा ‘डोरियन ग्रे’, टॉलस्टॉयची ‘अना कारेनिना’ आणि ग’टेचा फाउस्ट! ग’टेच्या किंवा ऑस्कर वाईल्डच्या ‘डोरियन ग्रे’ ला ‘टू बी रिबॉर्न’ म्हणावे अशी संधी मिळतेही. (ते दोघेही तिचा वापर करून मिळालेल्या आयुष्याचा कसा वापर करतात त्याचे मूल्यमापन हा साहित्यिक-समीक्षकांच्याच नव्हे तर ललित-कलांच्या इतर शाखांच्या कलाकार/अभ्यासकांच्या, वाचकांच्याही कुतूहलाचा, अभ्यासाचा विषय होऊन राहिला आहे.) हाच प्रश्न एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली हॉलिवूड अभिनेत्री फेडोरा बॅरी डेटवायलर या हॉलिवूड निर्मात्याला विचारते. तिच्यापुरते या प्रश्नाचे उत्तर तिने शोधले आहे नि त्याची किंमतही मोजली आहे. ती वाजवी होती की नाही, फेडोरा ही स्वार्थलोलुप म्हणावी का हे प्रश्न  ग’टेच्या, वाईल्डच्या नायकांप्रमाणेच ज्याने त्याने आपापली उत्तरे शोधण्यासाठी उभे आहेत. बिली वाईल्डर या दिग्दर्शकाच्या ‘फेडोरा’मधून या अभिनेत्रीचा जीवनपट आपल्यासमोर उलगडतो आहे.
जर्मन दंतकथेतला डॉ. फॉस्टस अथवा फाउस्ट हा आत्मा विकून त्या बदल्यात ज्ञान मिळवू पाहतो (ज्यावर आधारलेले ग’टेचे ‘फाउस्ट’ हे साहित्यिक इतिहासात एक मैलाचा दगड ठरले आहे), वाईल्डचा ‘डोरियन ग्रे’ त्याला मिळालेल्या अशाच संधीचा वापर फक्त भोगलोलुप आयुष्य जगण्यासाठी करून घेतो नि अखेर ज्या मित्रामुळे ही संधी त्याला मिळाली त्याचा आपल्या हातून रागाच्या भरात झालेल्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याइतपत निर्ढावलेपण स्वतःमधे रुजवतो नि एकाकी राहून अधःपाताच्या गर्तेत कोसळत जातो.  अना कारेनिना ही देखील आपली कौंटुंबिक जबाबदारी, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा पणाला लावून प्रीत मिळवू पाहते, पण ती डोरियन, फाउस्ट किंवा फेडोराप्रमाणे ठाम निर्णय करू न शकल्याने तिची ’न घर का ना घाट का’ अशी त्रिशंकू अवस्था होते नि त्यातच तिचा दुर्दैवी अंत होतो.  डोरियन बेगुमानपणे भौतिक सुखाना भोगत जगतो त्यासाठी वाटेत येणाऱ्या  प्रिय मित्र नि चित्रकार बेसिल हॉवर्ड, प्रेयसी सिबिल सकट  प्रत्येकाला बेदरकारपणे चिरडत जातो.  एका क्षणी त्याला त्याच्या आयुष्याच्या वास्तवाची जाणीव होते  नि ज्या मार्गाने त्याला हे सारे सुखलोलुप आयुष्य जगता येते ते मोडून तोडून फेकू इच्छितो. पण त्या चित्राचा शेवट हा – लाक्षणिक अर्थाने – त्याचाही शेवट असतोच.
या कथा-दंतकथातल्या व्यक्तींचेच काय पण आपल्या आसपासच्या बहुसंख्य आई-वडिलांमध्ये एक फेडोरा लपलेली असते, आपल्या मुलामुलींमध्ये स्वतःला पाहणारी, त्यांच्याकरवी आपली स्वप्ने साकार करू पाहणारी, त्यांच्या यशातील आपला वाटा मागणारी; ‘आम्हाला मिळालं नाही ते सारं तुला देतोय’ किंवा ‘आम्हाला जमलं नाही, निदान तुला तरी साधावं’ अशी अपेक्षा करताना आपण निवडलेल्या मार्गाने आपल्या पुढच्या पिढीने वाटचाल करावी असा आग्रह नाही तरी अपेक्षा धरणारी. हे सारे फेडोराइतके टोकाचे स्वार्थप्रेरित नसेल कदाचित – स्वार्थ/वात्सल्याचे गुणोत्तर कमी जास्त असेल – पण सर्वस्वी निस्वार्थ असते असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
बॅरी आणि फेडोराची अन्तोनिआच्या आयुष्याबद्दल चर्चा चालू असताना बाहेर डोकावून आत आलेले डॉक्टर “बाहेर पहा. कमीत कमी दोन हजार माणसे तरी दार उघडण्याची वाट पहात ताटकळत बसलेली आहेत.” “मग उद्या आपण येणार्‍या सर्वांसाठी कॉफीची व्यवस्था करायला हवी. आणि हो… आणखी काही पोलिसही बोलवावे लागतील.” फेडोरा सराईत व्यावसायिकतेने बोलते. “बघा हे सारं. मी सार्‍या प्रकाराच्या मुळात विरोधात होतो.” काउंट आपली कैफियत मांडू पाहतो. “पण अन्तोनिआला ही कल्पना आवडली. तिच्या दृष्टीने  हा एक खेळ होता…   म्हणजे जर आम्ही व्यवस्थित पार पाडू शकलो असतो तर! तिने रात्रीचा दिवस करून माझे सारे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले. माझी शैली, माझे शब्दोच्चार, माझे हावभाव, माझी ऐट, सारे सारे आत्मसात केले. अर्थात तेवढेच पुरेसे नव्हते. कारण तिला केवळ माझ्यासारखे दिसून भागणार नव्हते, तिला तिच्या मूळ वयापेक्षा वयस्कर दिसणेही आवश्यक होते. त्या दृष्टीने डॉक्टरांनी आवश्यक ते सारे प्रयोग तिच्यावर केले. तिच्या दातांची रचना बदलली, तिच्या केसांची ठेवण, त्यांचा रंग बदलला, चेहर्‍याची ठेवणही मांसपेशींच्या बदलांतून ‘फेडोरा’च्या चेहरेपट्टीला मिळतीजुळती बनवली. जेव्हा ती आपल्या भूमिकेसाठी तयार आहे असे आम्हाला वाटले तेव्हा प्रथम एका इटालियन चित्रपटातील – द मिरॅकल ऑफ सॅन्टा क्रिस्ती – रोल तिने स्वीकारला. आणि त्या चित्रपटाने इतिहास घडवला, फेडोरा पुन्हा एकवार स्टार बनली.”
“अर्थात ती आपल्या आईइतकी समर्थ अभिनेत्री नव्हती.” मिस बाल्फोर प्रथमच अर्थपूर्ण वाक्य बोलते.  मिस बाल्फोर आणि डॉक्टर वॅन्डो हे दोघेही फेडोराला आयुष्यभर साथ करत आले आहेत. अमेरिकेत चित्रपट-व्यवसायात रमलेल्या फेडोराला काउंट आणि अन्तोनिआचा पुरेसा सहवास कधीच मिळालेला नाही (तिला त्याची फारशी फिकीर असावी असेही नाही.) डॉक्टरांचा नियमित सहवासही मिळतो तो फेडोरा चे काउंटेस सॉब्रियान्स्की मधे रूपांतर झाल्यावरच. त्यानंतरची त्यांची निष्ठा वादातीत असली तरी त्यात तिच्या या अवस्थेला आपणच जबाबदार असल्याचा अपराधगंडही मिसळलेला आहे. परंतु अशा कोणत्याही गंडाशिवाय, स्वार्थाशिवाय फेडोराला साथ दिली ती मिस बाल्फोरने. सारे आयुष्य ती फेडोराची सावली बनून राहिली आहे, तिने सतत फेडोराच्या उत्कर्षाची, तिच्या भावनांची, हित-अहिताची काळजी वाहिली आहे. अगदी तरुण अन्तोनिआचे हित आणि गलितगात्र फेडोराचे हित यातही तिने कोणत्याही संभ्रमाशिवाय फेडोराची निवड केली आहे. स्वार्थाच्या पुसट भावनेनेही तिला उगवता सितारा बनू पाहणार्‍या अन्तोनिआची बाजू घेणे शक्य झाले असते. परंतु शेवटपर्यंत तिच्या निष्ठा फेडोराच्या चरणी वाहिलेल्या असतात. बरे फेडोराकडून जरी हे नाते मालक-नोकराचे असले तरी मिस बाल्फोरच्या दृष्टीने फेडोराचे सुखदु:ख हे तिचेही सुखदु:ख होते. म्हणूनच तर ऑस्कर प्रदान प्रसंगी फेडोराला तो सन्मान, ते ईप्सित अखेर साध्य झाले म्हणून आनंदी व्हावे की तिला स्वत:ला तो स्वीकारता न आल्याने तिला वाटलेला विषाद जाणून दु:खी व्हावे अशा दुहेरी पेचात सापडलेली मिस बाल्फोर कधी नव्हे ती भावनाविवश झालेली दिसते.
मिस बाल्फोरने अन्तोनिआच्या अभिनयकौशल्याला फेडोराच्या तुलनेत उणे ठरवूनही फेडोरा फारशी खूष झालेली नाही. “हा: अभिनयाला विचारतो कोण आता. एकदा देखणा चेहरा तुमच्याकडे असेल नि कॅमेरा त्याच्या प्रेमात असेल तर बाकी काही आवश्यक नसते, आणि अन्तोनिआ तर तो चेहरा घेऊनच जन्माला आलेली होती.” फेडोरा किंचित आढ्यतेखोरपणे म्हणते. “तिच्या पुढच्या चित्रपटात -ड्रॅगन फ्लाय – ती आणखी एक पाऊल पुढे गेली. त्यानंतर….”फेडोराची स्मृती तिला दगा देते. “..बिटर हार्वेस्ट, स्पेनमधे चित्रिकरण झाले होते त्याचे.” मिस बाल्फोर तिला आठवण करून देते. “मिस बाल्फोर सतत सावलीसारखी तिच्याबरोबर असे, तिचे पत्रकारांपासून आणि जुन्या फेडोराच्या मित्र/परिचितांपासून तिला दूर राहण्यासाठी मदत करी.”  “आम्हाला फारसा त्रास कधी झालाच नाही, म्हणजे त्या मायकेल यॉर्कबरोबर लंडनला चित्रीकरण झालेल्या चित्रपटापर्यंत.” मिस बाल्फोरही आता आपल्या कोषातून बाहेर येऊन या संवादात भाग घेऊ लागलेली आहे. (एका प्रकारे हे गमावलेल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणींची केलेली उजळणीच आहे.)
 “त्यात तिने एका जनरलच्या पत्नीची भूमिका साकार केली होती, जी आपल्या सावत्र मुलाच्याच प्रेमात पडते. चित्रपटाचे शीर्षकही विलक्षण ‘प्रॉफेटिक’ होते.” मिस बाल्फोर सांगते. पडद्यावर त्या चित्रपटाची एल.पी. फिरू लागते नि आपल्याला त्या चित्रपटाचे नाव वाचता येते, ‘द लास्ट वॉल्झ१’   खास नृत्यासाठी असतो तसा कृत्रिम नि स्वर्गीय भासणारा सेट लावलेला आहे. त्यावर काही कृष्णवस्त्र  परिधान केलेले पुरूष, शुभ्रवस्त्रा स्त्री जोडीदारांबरोबर ‘वाल्झ२’ करताहेत.  दोन कॅमेरे विरुद्ध दिशेने हळूहळू सरकत या सार्‍या नृत्याचा वेध घेत आहेत. अचानक दिग्दर्शक ‘कट्’ असे ओरडून चित्रिकरण थांबवतो.  तो कॅमेर्‍याच्या अँगल्सबाबत समाधानी नाही. तो ओरडून कॅमेरामनला सांगतो ‘माझ्याकडे अतिशय महागडे चेहरे आहेत या नृत्यासाठी, ते जास्तीतजास्त प्रेक्षकांसमोर रहायला हवेत.’ सहायक दिग्दर्शक  ताबडतोब धावत येतो नि सर्व नृत्य करणार्‍या जोड्यांना पहिल्या स्टेपपाशी परत जाण्याची विनंती करतो. सेट, कॅमेरा वगैरे गोष्टी दिग्दर्शकाच्या मनासारख्या होईतो वेळ इकडे फेडोरा ऊर्फ अन्तोनिआ सहअभिनेता मायकेल यॉर्कशी गप्पा मारते आहे. तो तिच्याशी तिच्या चित्रपटांबद्दल बोलतोय, त्यातले कुठले सीन आवडले,  कुठे तिचा अभिनय आवडला वगैरे उत्साहाने सांगतो आहे. अगदी तिच्या एका भयपटाच्या वेळी – जेव्हा तो सहा वर्षांचा होता – तेव्हा एका भयप्रद सीनच्या वेळी आपण आपली ‘चड्डी ओली केली होती’ ही आठवणही तो तिला  सांगतो आहे. ती आठवण ऐकून ती खळखळून हसते, त्याच्या मनमोकळेपणाला दाद देते.  त्यांचा संवाद वाजवीपेक्षा लांबलेला पाहून मिस बाल्फोर पुढे येते नि तिला कॉफी देऊ करते. पण अन्तोनिआ आपल्या संवादात खंड  पडू नये म्हणून चटकन नकार देते. इतक्यात ती संधी साधून मायकेलचा मेकअपमनही पुढे होऊन त्याचा मेकअप ठीकठाक आहे या याची खातरजमा करू लागतो. पाठोपाठ फेडोराची मेकअप-लेडीदेखील आपले काम करू लागते.  पण अन्तोनिआ मेकअप होत असताना तिरप्या नजरेने मायकेलची छबी आपल्या नजरेत साठवून ठेवत असते. इतक्यात ‘शूट’ची घोषणा होते.  अन्तोनिआ ऊर्फ फेडोरा आणि मायकेल इतर जोड्यांबरोबर वॉल्झच्या संगतीत  थिरकू लागतात. नृत्य चरमसीमेवर पोचताना सेटच्या  अन्तोनिआ-मायकेल त्या लयीत दोन गिरक्या घेऊन एका कमानीतून बाहेर जातात. नृत्य थांबते. दोघेही एका हाताच्या अंतरावर उभे राहून हात हातात घेतात, एकमेकांना  विश करतात नि पुढे होऊन मिठीत बध्द होतात. त्यांच्या चुंबनाने दिग्दर्शकाला ‘हवे ते दृश्य’ मिळाल्याने कॅमेरा अगदी समोर येऊन ते दृश्य टिपतो नि ‘कट्’ची घोषणा होते. पण त्या दोघांना भानावर आणण्यास  ती पुरेशी नसते.  शॉट संपल्याच्या फ्लॅपच्या आवाजानेच दोघे भानावर येतात. या सार्‍या घटनाक्रमाची दखल मिस बाल्फोरने घेतलेली असतेच.
घडल्या प्रसंगाने मिस बाल्फोर जरी चिंतित दिसत असली तरी तारुण्यसुलभ भावनेने अन्तोनिआ मात्र प्रफुल्लित झाली आहे. चित्रिकरण संपल्यावर गाडीकडे जात असताना ती उत्साहान मिस बाल्फोरला विचारते “मायकेलबद्दल तुझं काय मत आहे?” “पस्तीशीच्या आतबाहेर वय असेल त्याचं. पण त्याचं काय?” ती ‘फेडोरा’ आणि मायकेल यांच्या वयातील तफावतीकडे अन्तोनिआचे लक्ष वेधू पाहते. पण अन्तोनिआ हसते “मला तेव्हा त्याचा चेहरा पहायला आवडेल, जेव्हा…” ती हलकेच हसते. ती काय म्हणते आहे हे अर्थातच मिस बाल्फोरला ठाऊक आहेच. “तेव्हा म्हणजे केव्हा?” तिचा स्वर कठोर होतो. “जेव्हा त्याला समजेल की मी त्याच्यापेक्षा तरुण आहे तेव्हा.” पुन्हा एकवार हलकेच हसून अन्तोनिआ नजर जमिनीकडे वळवते नि स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करू पाहते. “आणि हे त्याला कसं समजेल?”  मिस बाल्फोर तिला विचारते. थोडक्यात समजू शकत नाही किंवा समजणे योग्य ठरणार नाही याची जाणीव ती अन्तोनिआला करून देऊ पाहते आहे. “त्यात काय. चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर मी सांगेन त्याला.” तरुण अन्तोनिआने पुढचे पाऊल टाकण्यासाठी जमीन शोधून ठेवली आहे. “हं. म्हणजे तू चित्रपटाच्या प्रीमियर पर्यंत कळ काढशील. त्या प्रीमियरच्या वेळेस मग तू त्या पांढर्‍या पडद्याआडून एन्ट्री घेशील नि म्हणशील ‘सभ्य स्त्री पुरुषहो,  जगातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्री, सर्वात सुंदर स्त्री, पडद्यामागची खरीखुरी फेडोरा आज मी तुमच्यासमोर आणली आहे.’ मग त्याच पडद्याआडून सुरकुतलेल्या चेहर्‍याच्या,  व्हीलचेअरवरील तुझ्या आईला तू मंचावर घेऊन येशील. हो नं?” मिस बाल्फोर तिरसटपणे विचारते. तिच्या स्वरातील विखार जाणवून अन्तोनिआ हतबुद्ध होते नि आपले वास्तव प्रथमच रखरखीतणे तिच्या समोर झळकून जाते. “म्हणजे… म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की हे सारं असंच चालू राहणार… तिच्या मृत्यूपर्यंत?”  ‘नाही. “फेडोरा’च्या मृत्यूपर्यंत!”  मिस बाल्फोरचे हे शब्दही अतिशय प्रॉफेटिक म्हणावेत असेच.  कारण प्रथम मृत्यू येतो तो ‘फेडोरा’ या अभिनेत्रीला, मग अन्तोनिआ नावाच्या फेडोराचा बुरखा परिधान करून राहिलेल्या तरुणीला नि सरतेशेवटी ‘काउंटेस सॉब्रियान्स्की’आड लपलेल्या फेडोरा या व्यक्तीला.
अन्तोनिआच्या दृष्टीने फेडोरा बनून रुपेरी पडद्यावर अवतीर्ण होणे हे अनेक अर्थांनी हवेसे असेल. आपल्या आईच्या ची भूमिका साकारणे, तिचे भौतिक नाही तरी पडद्यावरील आयुष्य जगणे यातील भावनिक बाजू असेल, दुसर्‍याच व्यक्तीच्या भूमिकेत वावरून अनेकांना फसवून त्यांची गंमत पाहण्याचा एक तारुण्यसुलभ खेळ असेल, किंवा आईच्या रूपात मिळालेल्या शिडीचा वापर करून त्या झगमगत्या जगातील सारा स्ट्रगल वगळून थेट उच्चासनावर विराजमान होण्याची संधी घेणेही असेल. आयते मिळालेले ते श्रेय, त्याचा मोह तिला पडला नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. फक्त यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाची किंमत मोजावी लागेल याची तिला कल्पना आली नसावी. फेडोराचा पुनर्जन्म हा अन्तोनिआचा मृत्यूच आहे याचे भान तिला फेडोरा म्हणून पडद्यावर पदार्पण करताना नसावे. पण हाडामासाच्या अन्तोनिआच्या भावनांना प्रतिसाद मिळायला हवा असेल तर फेडोराचा बुरखा/मुखवटा दूर करावाच लागेल हे तिच्या ध्यानात आले. मिस बाल्फोरने ही शक्यता खोडून काढल्याने ती उन्मळून पडली, हरवलेल्या अन्तोनिआच्या ध्यासाने झुरू लागली, ड्रग्जच्या आहारी गेली, भरकटली.  जेव्हा मायकेल चे प्रेम तिच्या आयुष्यात येते तेव्हा त्या श्रेयसाचा आणि प्रेयसाचा संघर्ष तिच्यासमोर उभा राहतो. पण ते श्रेयस तिचे एकटीचे नसल्याने त्यातून एकतर्फी निवड करण्याचे स्वातंत्र्य तिला नाही. आता ही कथा एकमेकांच्या आधारे काही स्वार्थ साधणार्‍या दोन व्यक्तींची (स्त्रियांची असे मुद्दामच म्हणत नाही कारण यात स्त्रीत्व हा मुद्दाच नाही.) कथा आहे. आईच्या प्रसिद्धीचा, आधीच कमावलेल्या कीर्तीचा वापर प्रसिद्धीच्या  थेट उतरण्यासाठी अन्तोनिआ शिडीसारखा करते आहे तर फेडोरा बिरबलाच्या माकडिणीच्या गोष्टीतल्या त्या माकडीणीप्रमाणे स्वत:च्या पिलाच्या डोक्यावर उभे राहून आपली मूळची उंची परत मिळवू पाहते आहे. जसे फेडोरा अंतोनिआचा वापर करून आपली हरपले श्रेय परत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे त्याचवेळी अंतोनिआ नवे – आयते – श्रेयस त्यातून मिळवते आहेच.
रंगमंचावरील/रुपेरी पडद्यावरील समरसून केलेली भूमिका नटाला बंदिवान करून ठेवते असे म्हटले जाते. अन्तोनिआने वास्तवातील फेडोराची स्वीकारलेली भूमिकाही तिला बंदिवान करून ठेवते आहे, अन्तोनिआला तिने फेडोराच्या मुखवट्याआड आता कायमचे बंदिवान केले आहे.  “दुसर्‍या दिवशी मी तिला झोपेतून जागे करायला गेले तेव्हा ती बेशुद्ध असल्याचे मला दिसून आले. तिने झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेतला होता.” मिस बाल्फोर सांगते. “अखेर तो चित्रपट बासनात बांधून ठेवावा लागला. आणि ती पुन्हा चित्रपटातून काम करू शकली नाही.” फेडोरा विषादपूर्वक म्हणते.
“अन्तोनिआकडून असल्या भरकटल्या वर्तनाची अपेक्षा मी ठेवली नव्हती.” फेडोरा म्हणते. “मग काय अपेक्षा होती तुझी, अं? काय अपेक्षा होती तुझी?” सहनशक्तीचा अंत झाल्याने म्हणा किंवा त्याच्या जगण्यातील सर्वात प्रिय तेच गमावल्याने म्हणाम त्यांच्या आयुष्यात कदाचित प्रथम काउंट तिला आक्रमकपणे  जाब विचारतो आहे. “तू तिची ओळखच तिच्यापासून हिरावून घेतलीस, तिचे तारुण्य हिरावून घेतलेस.” “मी तिच्याकडून काहीच घेतलं नाही, उलट तिला सारं काही दिलंच आहे.मी तिला ‘फेडोरा’ बनवले. पण ती मात्र ते स्वीकारताना कमजोर ठरली. मि. डेटवायलर, तुम्ही चित्रपटनिर्माते आहात. तुम्हाला ठाऊक आहे स्टार बनण्यासाठी किती अपार कष्ट करावे लागतात, स्ट्रगल करावा लागतो.” “अर्थातच. Sugar and spice; underneath that cement and steel!” बॅरी म्हणतो. “अगदी बरोबर. पण ती मात्र मेणाची निघाली, कमकुवत मनाची नि हळव्या, भावुक मनोवृत्तीची.”  हे ऐकून आपल्या मुलीचे ते गुण आठवणार्‍या अन्तोनचा – काउंट सॉब्रियान्स्कीचा -बांध फुटतो नि प्रथमच तो आपल्या मृत मुलीसाठी शोक करू लागतो. पण संपूर्ण व्यावसायिक वृत्ती अंगात भिनलेली फेडोरा त्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला सांगते.
“आता तुला समजलं असेल की कोर्फूमधल्या त्या विलामधे आम्ही तिला बंदिवान केलेलं नव्हतं. आम्ही तिला लोकांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होतो… ड्रग्जपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिला नेहमीच नवा ‘सप्लायर’ भेटत असे.’ (हा एक प्रकारे बॅरीवर केलेला दोषारोपच आहे.) म्हणून आम्ही मग शेवटी तिला माझ्या पॅरिसमधल्या क्लिनिकमधे नेले. तिथे मी शक्य ते सारे उपचार केले. पण ती उपचारांना प्रतिसाद देत नसे. तिने आमच्याशी बोलणेही टाकले होते.” फेडोरा म्हणते. “ती मायकेल यॉर्कला लांबचलांब प्रेमपत्रे लिहित असे नि तिच्या नर्सला लाच देऊन ती पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असे. मग आम्ही त्या क्षणी करता येण्याजोगी एकमेव गोष्ट करण्याचा निर्णय घेतला.” “एकमेव गोष्ट?’ काउंट पुन्हा एकवार उसळतो. “ती सर्वात क्रूर वर्तणूक होती तुमची. कधीही क्षमा न करता येण्याजोगी.”
क्लिनिकच्या खिडकीवर जमलेल्या दवांमधे आपले नाव ‘अन्तोनिआ’ पुन्हा पुन्हा लिहिताना दिसते. जणू आपली हरवू पाहणारी ओळख, आपले व्यक्तित्त्व या निमित्ताने निदान आपल्या तरी स्मृतीतून जाऊ नये असा आटापिटा करते आहे. इतक्यात एक नर्स हळूच दार उघडून आत येते. तिच्या हाता टेलेफोन आहे. अतिशय हलक्या आवाजात ती अन्तोनिआला तिच्यासाठी फोन आल्याचे सांगते. अन्तोनिआचा विश्वास बसत नाही. “लंडनहून आहे.” नर्स पुढे सांगते. “काऽय, लंडनहून?” नकळत अन्तोनिआचा आवाज चढतो. नर्स तिला हळू बोल, तुमचे बोलणे बाहेर इतरांना ऐकू जाता कामा नये असे सांगते. या सार्‍या खबरदारीमुळे तो फोन कोणाचा आहे हे तिला सांगायची आवश्यकता रहात नाही. तो फोन असतो मायकेल यॉर्कचा. पण त्या काळी आंतराष्ट्रीय कॉल्स हे ट्रंक-डायल असल्याने प्रथम ऑपरेटर फोन करणार्‍याचे नाव नि स्थान सांगत नि मग लाईन जोडून देत. इथे खुद्द मिस बाल्फोरच ऑपरेटर असल्याची बतावणी करून लंडनहून मायकेल यॉर्कचा फोन असल्याचे सूचना देते नि लाईन जोडून देते. डॉ. वॅन्डो हेच मायकेल म्हणून तिच्याशी बोलू लागतात. कदाचित मायकेलचा तिच्याशी संवाद होऊ लागला तर ती पुन्हा पूर्ववत होईल या हेतूने हा डाव खेळला जात असतो. डॉक्टर अन्तोनिआशी बोलत असताना त्यांच्या समोर बसलेल्या फेडोराच्या डोळ्यात प्रथमच अश्रूंचे अस्तित्व जाणवते.  अन्तोनिआ ‘मायकेल’ला भेटण्याचा आग्रह करते. तो बिजी शेडयूलचे कारण सांगून टाळू पाहतो, पण “विकेंडस् ला तुझे शूटिंग नसेलच ना. तेव्हा तर आपण भेटू शकतो. विकेंडला तू लंडनहून पॅरिसला येऊ शकतोस. आणि दर तासाला  पॅरिस ते मॉर्टसर्फ रेल्वे धावते.” ती त्याला खोड्यात टाकते. तेव्हा आपण शक्य तितका प्रयत्न करू असे आश्वासन मायकेल ऊर्फ डॉक्टर देतात नि त्याबदली नीट औषधोपचार घेऊन लवकर बरी होण्याचे आश्वासन तिच्याकडून मिळवतात. अन्तोनिआ फोन आणून देणार्‍या नर्सला कृतज्ञतेपोटी आपल्या गण्यातले पेंडंट भेट देते. क्लिनिकजवळच्या मॉर्टसर्फ स्टेशनमधून कानावर येणारी रेल्वेशी कर्कश कि़ंकाळी आता तिला हवीहवीशी वाटू लागते.
“ज्या क्षणी आम्ही हा उपाय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला कुठे ठाऊक होते की आम्ही  असा खेळ चालू केला आहे जो आम्ही कायम नियंत्रणात ठेवू शकणार नाही.” फेडोरा आयुष्यात प्रथमच आपल्या कुवतीची मर्यादा मान्य करते आहे.  एके दिवशी रात्री अन्तोनिआ क्लिनिकमधून गायब होते. अर्थात तिथून ती कुठे जाणार याचा तर्क करणे काही अवघड नसते. स्टेशनवर काळ्या शिरोवस्त्राने चेहरा पूर्ण झाकून येणार्‍या गाडीची वाट पाहणारी अन्तोनिआ दिसते. गाडी येतेही. अतिशय अधीरपणे ती गाडीतून उतरणार्‍या प्रवाशांच्या घोळक्यावर नजर टाकते. पण त्यात तिला अपेक्षित असणारा मायकेल काही दिसत नाही. इतक्यात बाहेर जाणार्‍या प्रवाशांच्या विरुद्ध दिशेने स्टेशनकडे चालत येणारी मिस बाल्फोर दिसते. प्लॅटफॉर्मवर येऊन ती अन्तोनिआला शोधू लागते. एका खिडकीजवळ उभी असलेली अन्तोनिआ तिला दिसते. तिच्याजवळ जाऊन विचारते “तू कुणाची वाट पाहते आहेस का? आणि ती व्यक्ती मायकेल असेल तर तो येणार नाही.” मिस बाल्फोर तिला परावृत्त करू पाहते. “नाही, तो नक्कीच येईल. मी त्याच्याशी फोनवर बोलले आहे.” अन्तोनिआ तिला जुमानत नाही. “खरंच?” मिस बाल्फोर विचारते. इतक्यात गाडीची शिट्टी वाजते नि मायकेलशिवाय आलेली ती गाडी निघून जाते. “ही पॅरिसकडून येणारी आजची शेवटची गाडी होती. चल घरी.” मिस बाल्फोर तिला घेऊन जाऊ पाहते. “तो म्हणाला होता की तो प्रयत्न करेल. कदाचित पुढच्या विकेंडला येईल तो.” मिस बाल्फोर तिला समजावू पाहते. पण हे समजावणेच तिचा घात करते. याचा अर्थ आलेल्या फोनबाबत तिला ठाऊक आहे, तिने आपले संभाषण ऐकले आहे याची जाणीव अन्तोनिआला होते. संतापाने ती मिस बाल्फोरला शिव्यांची लाखोली वाहते. “तू त्या पत्रांमधे आपल्या आईबाबत जे काही लिहिलेस ते अगदीच कृतघ्नपणाचे होते.” मिस बाल्फोर पुढे सांगते, आपल्या पिशवीतून ती पत्रे काढून दाखवते. ती सांगते “कदाचित तुला तुझ्या आईची कदर नसेल पण मला आहे.” आता साराच प्रकार अन्तोनिआसमोर उघड झालेला आहे. तिची एकमेव आशा, अन्तोनिआ म्हणून जगण्याची एकमेव आशा आता संपून गेली आहे. “तू आता अन्तोनिआ नाहीस, फेडोरा आहेस. अन्तोनिआ आता अस्तित्वात नाही.” मिस बाल्फोर एकामागून एक घाव घालत राहते. समोरच्या खिडकीच्या काचेत तिचा चेहरा दाखवून म्हणते “आसपास कुणालाही विचार, प्रत्येकजण सांगेल हा चेहरा फेडोराचा आहे, कुण्या अन्तोनिआचा नव्हे. यातून आता तुझी सुटका शक्य नाही.” अतीव दु:खाने वेडीपिशी झालेली अन्तोनिआ तिच्याबरोबर बाहेर जाण्याचा दाराकडे जाताना “मला माझा चेहरा परत हवाय, परत हवाय” असे आक्रंदत राहते.
 इतर कुणी लादलेली भूमिका वठवणार्‍या अन्तोनिआला पाहून ‘सत्यजित रें’च्या  ‘देवी’ मधील ‘दयामयी’ आठवली. जवळच्या व्यक्तींनी लादलेले आयुष्य जगणे दयामयीला अन्तोनिआला इतकेच अवघड गेले असेल का? समोर भक्तांची रांग लागलेली दया नि चाहत्यांच्या गराड्यात आपली ओळख विसरून जाऊ पाहणारी अन्तोनिआ यांचे भागधेय एकच. ती लादलेली भूमिका मूळ व्यक्तीपेक्षा अधिक श्रेयस्कर, मानाचे आयुष्य घेऊन येते, परंतु परतीचा मार्ग मात्र पूर्ण बंद करून ठेवते. अन्तोनिआला मुळातच या भूमिकेला नाकारणे शक्य होते, दयामयीला ती संधीही मिळत नाही. दयाच्या बाबत एक मात्र चांगले होते ते म्हणजे तिचा आयुष्याचा जोडीदार त्या अवस्थेत नेहमीच तिच्याबरोबर होता, तिला बाहेर पडण्यास मदत करत होता. या उलट अन्तोनिआला असे कुणीही नव्हते. फेडोराच्या इच्छेविरुद्ध जाऊन अन्तोनिआला तिचे मूळचे आयुष्य परत देण्याची धमक तिचा बाप असलेल्या काउंट सॉब्रियान्स्कीमध्येही नव्हते. पण दया पेक्षा अन्तोनिआची केस थोडी वेगळी आहे. जसे दयाला देवीपण नि त्यातून आलेला मान आयता मिळाला तसेच अन्तोनिआला फेडोराचा चेहरा नि तिचे शिखरावरचे स्थानही अनायासेच मिळाले. फक्त दयाच्या पाठीशी तिचा जोडीदार भक्कमपणे उभा राहूनही स्वतःच्या मनातील द्वंद्वावर मात करता न आल्याने तिला मृत्यू जवळ करावासा वाटला तर अन्तोनिआच्या बाबतीत असे तिचे पाठीराखे कुणी नव्हतेच. तेव्हा सख्ख्या आईच्या कचाट्यातून आणि आपणच उभ्या केलेल्या आपल्या प्रतिमेशी जेव्हा वास्तवाचा संघर्ष झाला तेव्हा तिलाही मृत्यूला कवटाळण्याखेरीत पर्याय उरला नाही.
इतक्यात दूरवरून गाडीची शिटी ऐकू येते. ती ऐकून अन्तोनिआ अचानक स्तब्ध होते. येणार्‍या गाडीकडे डोकावून पाहते. ही गाडी येत असते विरूद्ध दिशेने. तेव्हा इथून ती जाणार असते पॅरिसला, जिथून तिला लंडनला जाणे शक्य झाले असते. एक निर्वाणीचा प्रयत्न म्हणून ती मिस बाल्फोरचा हात झिडकारते नि त्या येणार्‍या गाडीकडे धावत सुटते. दचकलेल्या मिस बाल्फोरची ‘फेडोरा’ (इतक्या रामायणानंतरही तिला सार्वजनिक ठिकाणी हाक मारते वेळी मूळ  नावाने हाक न मारता ‘फेडोरा’ म्हणूनच हाक मारणे हे तशा हातघाईच्या प्रसंगीदेखील मिस बाल्फोर पूर्ण भानावर असल्याचे दर्शवते.) ही हाक ऐकते नि आवेगाने स्वतःला त्या गाडीसमोर झोकून देते.
_____________________________________________________________________________
१. ‘द लास्ट वॉल्झ’ ही दिनांक २५ नव्हेंबर १९७६ मध्ये ‘द बँड’ या नावाच्या एका सुप्रसिद्ध बँडची सॅन-फ्रॅन्सिस्को मधे झालेली अखेरची कॉन्सर्ट. यानंतर ‘द बँड’ विसर्जित करण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी’ याने या कॉन्सर्टचे चित्रीकरण करून त्यावर एक नितांतसुंदर डॉक्युमेंटरी बनवली आहे .योगायोगाने ही डॉक्युमेंटरीदेखील फेडोरा ज्या १९७८ साली रिलीज झाला त्याच वर्षी रिलीज करण्यात आली.
२. ‘वाल्झ’ हा एक बॉलरूम नृत्याचा प्रकार आहे.

फेडोरा: हरपल्या श्रेयाची आस – भाग ४

तुला माझा हा चेहरा नि ही माझी व्हीलचेअर याबाबत काही प्रश्न असतील तर ते डॉ. वॅन्डोंना विचार.” फेडोरा बॅरीला सांगते. “जाऊ दे ना फेडोरा. जुनी भुतं का जागी करते आहेस पुन्हा?” डॉक्टर हताशपणे म्हणतात. “सुमारे वीस वर्षे मी डॉक्टरांच्या क्लिनिकची वारी करत असे. जसे… जसे याचक एखाद्या देवाच्या दारी जातात तसे. आणि हो डॉक्टरांनी मला कधीच निराश केले नाही. पण एका वर्षी – बहुधा १९६२ असेल नाही डॉक्टर – माझ्या कातडीखाली एका खास औषधाचा डोस इंजेक्शनद्वारे देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. असा प्रयोग या आधी कधीही झालेला नव्हता…”
एक नर्स घाबर्‍या घाबर्‍या डॉक्टरांच्या नावाचा पुकारा करत धावत येते.  ती जितक्या ठिकाणी, जितक्या खोल्यांमधून त्यांना शोधत जाते त्यावरून ते क्लिनिक बरेच मोठे नि श्रीमंत असावे असे दिसून येते. धावत आलेल्या डॉक्टरांना मिस बाल्फोर सांगते की ती अतिशय उत्तेजित झालेली आहे, बहुधा तिच्या चेहर्‍यावर अतिशय वेदना होत असाव्यात. डॉक्टर फेडोराच्या चेहर्‍यावरचे बँडेज कापून काढतात. त्याकडे पाहताच त्या खोलीतल्या तिघांच्या प्रतिक्रियांवरून आपल्या चेहर्‍याबाबत काहीतरी भयंकर घडले आहे याची फेडोराला कल्पना येते. ती धावत जाऊन आरशात पाहते नि जोरात किंचाळी फोडते.
इतका वेळ दोषारोप करणार्‍या बॅरीचा आवेश विस्मयचकित करणारे हे सत्य सामोरे येताच गळून गेला आहे. तो पुढे होऊन फेडोराची सिगरेट शिलगावतो. “त्यांचे घाव केव्हाच बुजले, माझे मात्र अजून ताजे आहेत.” ती डॉक्टरांना टोमणा मारते. “मी तुला सावध केलं होतं फेडोरा. पण तू निव्वळ वय वाढण्याची प्रक्रिया थांबवण्यावर खूष नव्हतीस. तुला ती उलट फिरवायची होती, अधिक तरुण दिसायला हवं होतं.” डॉक्टर उलट वार करतात.  ‘मी माझं सारं ज्ञान पणाला लावलं होतं. पण कुठेतरी इन्फेक्शन झालं नि सगळं उलटं पालटं झालं. त्यातच (या दारुण अपेक्षाभंगाने, आणि आपल्यासमोर दिसू लागलेल्या अंधकारमय भविष्यकाळामुळे) तिला मानसिक धक्का बसला. त्यातून ती सावरायला बराच वेळ गेला.’ डॉक्टर पुढील तपशील पुरवतात. “त्यानंतर गेले पंधरा वर्ष मी या खुर्चीला खिळून आहे.” फेडोरा विषादाने सांगते. “म्हणजे त्यानंतरच्या सार्‍या चित्रपटातून फेडोरा म्हणून वावरलेली स्त्री ती ही होती तर.” शवपेटीतल्या मृत व्यक्तीकडे बोट दाखवून बॅरी अर्धवट प्रश्नार्थी, अर्धवट स्वतःशीच बोलतो.
(अधेमधे येणार्‍या फुलांच्या गुच्छांसाठी अटेंडंट फ्रास्वा आत येतो त्याला फेडोरा बाहेरच ठेवण्याची सूचना देते. थोडक्यात या संवादात अडथळा येऊ नये अशी तिचीही इच्छा दिसते.) शवपेटीतील स्त्रीकडे निरखून पहात असलेल्या बॅरीला फेडोरा विचारते “आमच्या दोघीमधील इतके साम्य पाहून तुला आश्चर्य वाटले असेल नाही?” “तुला कुठे सापडली ही?” बॅरी कुतूहलाने विचारतो. “ते काही फार अवघड गेलं नाही. ती माझी मुलगी होती.” बॅरी दचकून तिच्याकडे पाहतो. “आमची मुलगी…”बाजूला उभा असलेला काउंट खुलासा करतो. “त्या काळात तुम्हाला सहा नवरे असलेले चालत पण एक अनौरस मुलगी म्हणजे पदरातला निखाराच होती. आज उलट सहा मुले असू शकतात, तरीही तुम्हाला नवरा असायची गरज नाही. कुणी त्याची फिकीर करत नाही हल्ली.” फेडोरा कडवटपणे म्हणते. “युद्धापूर्वीच्या उन्हाळ्याचे दिवस होते ते. आम्ही दोघे नॉर्मंडीमधे भेटलो. त्यानंतर आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे तीन महिने आम्ही रिविएरावर व्यतीत केले. आम्ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होतो…” काउंट जुन्या स्मृतींना उजाळा देऊ पाहतो. “…आणि आम्ही निष्काळजीही होतो.” फेडोरा पुस्ती जोडते. “मला जेव्हा समजलं की फेडोरा गर्भवती आहे तेव्हा मी तिला लग्नाची मागणी घातली, तिची पुष्कळ मनधरणी केली. पण तिने माझी विनंती धुडकावून लावली.” काउंट आपली बाजू मांडू लागतो.  “कोणत्याही उच्चकुलीन माणसाबाबत मी हे होऊ दिलं नसतं. एखाद्या चित्रपट अभिनेत्रीचा पती होऊन तिची वॅनिटी केस नि विविध विग्स सांभाळण्याचे काम करणे त्याच्या दृष्टीने शोभादायक नव्हते.” फेडोरा स्पष्टीकरण देते. “पुढच्या वर्षी वसंताच्या आगमनाबरोबरच अन्तोनिआचा जन्म झाला तो स्वित्झर्लंडमधे. फेडोरा तिथून ताबडतोब अमेरिकेला निघून गेली.” काउंट किंचित तक्रारीच्या सुरात बोलतो. “मला जावंच लागणार होतं. मी स्टुडिओशी करारबद्ध होते. गेले नसते तर त्यांनी मला कोर्टात खेचलं असतं.” फेडोरा नवजात मुलीला सोडून जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करते. “एकामागून एक चित्रपट करताना फेडोराला आपल्या मुलीसाठी वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे माझ्या आईलाच अन्तोनिआचा सांभाळ करावा लागला.” काउंट पुढचा तपशील पुरवतो.  “एखाद्या बेजबाबदार आईच्या रुपात तू मला पाहू नकोस. तेव्हा युद्ध चालू होतं. आणि ते संपल्यावर मी तिला दरवर्षी भेटायला येत होते.” फेडोरा चिडून म्हणते.  “ओ हां. तू डॉ. वॅन्डोंच्या क्लिनिकला भेट देण्यासाठी युरपमधे यायचीस तेव्हा विमानतळावर दोन फ्लाईट्सच्या मधल्या वेळात, एखाद्या रेस्तरांमधे किंवा ती लंडनला शाळेत असताना मिस बाल्फोरकरवी परस्पर तुझा होटेलच्या खोलीत बोलावून तिथे काही काळापुरती भेट घ्यायचीस.” काउंटच्या स्वरात उपहास नि त्रागा यांचे मिश्रण आहे.
मिस बाल्फोर दहा-बारा वर्षांच्या अन्तोनिआला घेऊन होटेलमधे आलेली आहे. फेडोराच्या खोलीत तिची प्रेस-बरोबर मुलाखत चालू आहे. तिकडे चाललेल्या अन्तोनिआला मिस बाल्फोर थांबवते नि शेजारच्या खोलीत घेऊन जाते. इकडे फेडोराला  ‘तिच्या हिरोंपैकी एखाद्याबरोबर संसार थाटावा असे तिला कधीच वाटले नाही का?’ असा – बहुधा नेहमीचा – प्रश्न कुणी पत्रकार विचारते. ‘नक्कीच. अनेकदा. पण पहिलं बिल कुणी सेटल करायचं नि लग्नाचं पहिलं आमंत्रण कुणाला द्यायचं यावर आमचं कधीच एकमत होऊ शकलं नाही.’ ती सराईतपणे तो प्रश्न थट्टेवारी टाळून देते. इतक्यात मिस बाल्फोर तिथे येऊन मिस सॉब्रियान्स्की आलेल्या असल्याची वर्दी देते. ताबडतोब फेडोरा पत्रकारांशी संवाद आवरता घेते. पत्रकार बाहेर पडताच दोन खोल्यांमधे असलेला दरवाजा उघडून अन्तोनिआच्या खोलीत प्रवेश करते. अन्तोनिआनेही आपल्या आईचे गुपित सांभाळले आहे. फक्त शाळेत तिच्या मैत्रिणीने ‘विवियन ली’  ही जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे (पक्षी: फेडोरापेक्षाही) असे म्हणताच न राहवून तिला एक ठोसा लगावते. फेडोरा तिला कुठे जेवायला जायला आवडेल ते विचारते आणि मिस बाल्फोरला त्या होटेलमधे दोन व्यक्तींसाठी टेबल बुक करण्यास सांगते. इतक्या दुरून, इतक्या काळानंतर आलेल्या नि कदाचित यानंतर बराच काळ भेटण्याची शक्यता नसलेल्या आईबरोबर काही काळ घालवण्याच्या कल्पनेनेच अन्तोनिआ उत्साहाने फुलली आहे. तिच्याशी बोलत असतानाही फेडोरा समोरच्या स्टँडवरील ड्रेस आपल्यासमोर धरून त्यातला कोणता घालावा याची चाचपणी करते आहे. मिस बाल्फोर बाहेर फोनवर बुकिंग करत असताना ती संधी साधून अन्तोनिआ खुशीत येऊन तिला म्हणते “बरं झालं तू तिला आपल्याबरोबर यायला आमंत्रण दिलं नाहीस ते. इतकी बोऽऽऽर आहे ती.” फेडोरा एक क्षण थांबते नि तिला सांगते “तुला लक्षात येत नाही अन्तोनिआ. तू मिस बाल्फोरबरोबर डिनर घेणार  आहेस. मी तुझ्याबरोबर बाहेर येऊ शकत नाही.” तिचे सारे काही आउटसोर्सड, अगदी  सख्ख्या मुलीबरोबरच्या जेवणालासुद्धा तिची ‘रिप्रेजेंटिटिव’ जाणार, ती नाहीच. ते ऐकून अन्तोनिआ म्हणते “तुला माझ्या बरोबर बाहेर कुणाच्या दृष्टीस पडायचे नाही ना, हरकत नाही. आपण इथेच होटेलच्या  खोलीत डिनर घेऊ शकतो.  मग तर कुणी आपल्याला पहायला येणार नाही?” “ते ठीक आहे डिअर. पण माझा मित्र नोएल कॉवर्ड उद्या जमैकाला जाणार आहे. मला त्याला भेटायलाच हवे. गेले सहा महिने मी त्याला भेटू शकलेले नाही.” “तू मला गेलं वर्षभर भेटलेली  नाहीस!” अन्तोनिआ संतापाने म्हणते. फेडोरा क्षणभर निरुत्तर होते पण लगेच विषय बदलते नि तिला आणलेल्या प्रेजेंट्स बाबत बोलू लागते.  पण अन्तोनिआ  तिला धुडकावून लावते. ती म्हणते “तू मला फक्त वस्तूंच्या भेटी देत असतेस.  मला त्या नकोत.”  इतक्यात मिस बाल्फोर आत  येऊन म्हणते की “ते होटेल बुकिंग घेत नाही. मी सरळ तिला घेऊन….” “… माझ्या शाळेत सोड.” अन्तोनिआ मधेच म्हणते. मी आता पुन्हा तुला भेटणार नाही नि शाळेत मला माझ्या  आईबाबत  विचारलेच कुणी तर मी खरं सांगेन…”  “अन्तोनिआ…” मिस बाल्फोर तिला दटावू पाहते. “… सांगेन की माझी आई मेली म्हणून.” मागे वळून अन्तोनिआ दार उघडून बाहेर चालती होते. त्यानंतर पुढे दहा वर्षे ती फेडोराला भेटत नाही. त्यांची भेट होते ती फेडोराबाबत घडलेल्या त्या वैद्यकीय अपघातानंतरच.
“पुढे अन्तोनिआ भरकटत गेली. तिने शाळा सोडली, अनेक वेगवेगळ्या नोकर्‍या, व्यवसाय बदलले आणि बॉयफ्रेंड्सही. शेवटी मला ती भेटली तेव्हा अ‍ॅमस्टरडॅममधील एका झोपडपट्टीतल्या छोट्या खोलीत ती कुण्या शिल्पकाराबरोबर …की  संगीतकाराबरोबर… की अशाच कुण्याबरोबर रहात होती.” काउंट खंतावल्या स्वरात सांगतो. “मी तिला तिच्या वाढदिवसाला, ख्रिसमसला भेट म्हणून चेक्स पाठवत असे, पण तिने ते कधीच वटवले नाहीत.” फेडोरा पुढे म्हणते. “एकच अपवाद, जेव्हा तिला गर्भपातासाठी पैसे हवे होते. कारण तिला आपले मूल असे रस्त्यावर जन्माला यायला नको होते” काउंटेस सांगतो. “जेव्हा मी तिला तिच्या आईबाबत झालेल्या त्या घटनेबाबत सांगितलं तेव्हा मला वाटलं होतं ती म्हणेल ‘ मरे ना का ती. मला काय त्याचे? पण तिने माझा होरा चुकीचा ठरवला. ती आली. अखेर ती एक सॉब्रियान्स्की होती, एक खानदानी स्त्री.”  हा उमरावी अहंकार! कदाचित आता आपली आई कायम घरातच असणार ही भावनिक बाजू नि आयुष्यात अनेक ठेवा खाल्ल्यानंतर  आपल्या आईकडे असलेल्या अमाप पैशाची किंमत आता तिला समजल्याने तिने आईकडे येण्याचा निर्णय घेतला असणेही शक्य आहे. शिवाय अनौरस असलेली स्त्री देखील केवळ बाप काउंट असल्याने अनायासेच खानदानी ठरते हे एक सनातन हास्यास्पद तर्कशास्त्र, तथाकथित जन्मश्रेष्ठत्वाच्या असल्या समर्थकांकडून वारंवार वापरले जाणारे.  “त्या वाईट प्रसंगातून हे एक चांगलं निष्पन्न झालं, ते म्हणजे मला माझी मुलगी परत मिळाली.”  फेडोरा म्हणते. “मी त्या क्लिनिकमधे बंदिवान होऊन पडले होते. मला बाहेर कोणालाही भेटणं शक्य नव्हतं. पण ती मात्र मला रोज भेटायला येई.  आम्हाला पुष्कळ काही भरून काढायचं होतं.”  “मी पुन्हा एकवार फेडोराला लग्नाची  मागणी घातली.  पण तिने पुन्हा एकदा मला नकार दिला.” “पहिल्या वेळी तो निर्णय घेण्यात फार घाई होत आहे असं मला वाटलं होतं, नि दुसर्‍या वेळी त्याला फार उशीर झाला होता”  फेडोरा म्हणते. “मी त्याची पत्नी होऊ शकत नव्हते.  मग  मी त्याची आई असल्याची बतावणी करून राहू लागले.” “पण तुमच्या पत्नीचे काय?” बॅरी मधेच विचारतो. “या अपघाताच्या सुमारासच तिचाही मृत्यू झाला होता. पण आम्ही ती बातमी जाहीर केली नाही. तिची  इच्छा होती की तिचे दफन आपल्या मूळ भूमीत – पोलंडमधे – व्हावे. त्यासाठी आम्हाला बरीच खटपट करावी लागली. पण आज ती आमच्या पूर्वजांच्या भूमीत – वॉर्सामधे- चिरविश्रांती घेते आहे.”  “आणि  मी कोर्फूमधल्या तिच्या विलामधे  तिची  जागा घेऊन राहिले. स्थानिक लोकांना वाटलं की म्हातारी उतारवयात धकाधकीच्या जीवनापासून दूर निवांत जागी येऊन राहिली आहे.  आणि मग आम्ही त्या ठिकाणी राहू लागलो, उंच भिंतीच्या आड, शेजाराविना,  प्रश्न विचारू शकणार्‍या  कोणत्याही व्यक्तीपासून अगदी दूर. ते आमच्या दृष्टीने खूपच सोयीचे ठरले.”
विलामधल्या आरशासमोर फेडोरा बसली आहे. तीन भागातल्या त्या आरशात आपले प्रतिबिंब पाहताना अर्धाअधिक चेहरा तिने झाकून घेतला आहे. इतक्यात मिस बाल्फोर पुढे येते नि तो आरसा घडी करून कायमचा बंद करून टाकते. पण जुन्या काउंटेसलाही आपल्या सौंदर्यांचा अभिमान असावा. त्या विलामधे असे अनेक आरसे जागोजागी लावलेले होते. फेडोरा सांगते, “आम्हाला सुमारे त्रेसष्ट आरसे हटवावे लागले. पण जसजशी मी स्वतःला अन्तोनिआमधे पाहू लागले तशी ‘तीच माझा आरसा होऊन गेली’. आणि माझा चाहत्यांचे नि निर्मात्यांचे म्हणाल तर त्यांआ इतकेच समजले होते की फेडोराने कारकीर्दीच्या सर्वोच्च स्थानी असतानाच निवृत्ती स्वीकारली आहे. हळूहळू स्टुडिओंचे प्रतिनिधी आणि एजंट्स फेडोराला विसरून गेले.”
अशातच एक दिवस हॉलिवूडमधून फेडोराच्या नावे एक तार येते. ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेस’ तर्फे फेडोराला ‘लाईफटाईम अचिवमेंट’ अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित करणार येत असल्याची सुवार्ता घेऊन ती आलेली असते. अन्तोनिआ ती बातमी ऐकून हर्षभरित होते, पण फेडोरा मात्र तुच्छतेने “हं, ते आता भरपाई करू पाहत आहेत. खरंतर मला १९३५ मधे ’मादाम बोवारी’च्या भूमिकेबद्दलच ऑस्कर मिळायला हवे होते…” असे म्हणून त्या बातमीची संभावना करते. “…किंवा १९४७ मध्ये, जेव्हा त्या हिला ते मिळालं… काय नाव तिचं?” ती डॉक्टरांना विचारते. “त्या क्षयी ननचे काम करणार्‍या त्या अभिनेत्रीला१.”  अहंकार इतका तीव्र की सारे काही ध्यानात असूनही आविर्भाव असा की जणू ती अभिनेत्री इतकी क्षुद्र आहे की तिचे नावही ध्यानात राहू नये. डॉक्टरही फेडोराला पुरे ओळखून असल्याने ते विजेत्या अभिनेत्रीचे नाव उच्चारत नाहीतच. अन्तोनिआ तेवढी या सार्‍या आटापिट्यामागचा तिचा अहंकार हलकेच हसून जणू एन्जॉय करते. आपण तो सन्मान स्वीकारण्यास तयार आहोत असे फेडोरा  मिस बाल्फोरकरवी कळवण्याची व्यवस्था करते. अर्थात काहीतरी बहाणा करून ते आपण स्वतः तिथे उपस्थित राहून स्वीकारणे शक्य नाही हे कळवून तो  आपल्याला पोस्टाद्वारे पाठवावा अशी विनंती करण्यास सांगते. “तसेही ते चार पदकांसारखे एक पदक, धूळ साफ करण्याच्या वस्तूंच्या यादीत आणखी एक भर.” फेडोरा आपला तुच्छतेचा आव काही सोडत नाही. खरंतर ते तिला अतिशय हवंहवंसं वाटणारं काही आहे. परंतु अशा विरूप स्थितीत आपल्या चाहत्यांसमोर जाणे म्हणजे त्यांच्या मनातील आपली सौंदर्यप्रतिमा आपल्याच हाताने पुसून टाकणे आहे याची तिला जाणीव आहे. या मर्यादेमुळे आयुष्यातील कदाचित सर्वोच्च आनंदाचा तो क्षण ती प्रत्यक्षात अनुभवू शकत नाही या विषादातून आलेले वैफल्यच तिला असे कडवट बनवते आहे.
“माझ्या दृष्टीने तो विषय तिथे संपला होता. पण इथेच आमच्या आयुष्यातील सार्‍या विपदांची सुरुवात झाली.” एक महिन्यानंतर अकॅडमी अध्यक्षांचा फोन येतो नि ते स्वतः कोर्फूमध्ये येऊन ते पारितोषिक त्यांनी स्वहस्ते फेडोराला प्रदान करावे असा अकॅडमीने घेतलेला निर्णय मिस बाल्फोरच्या कानी घालतात. ती बरीच कारणे देते परंतु पोस्टाद्वारे हे पारितोषिक न पाठवता ते अकॅडमी प्रतिनिधीद्वारेच देण्याचा त्यांचा आग्रह कायम असतो.  आणि पुढच्याच आठवड्यात ते कोर्फूला भेट देऊन हे पारितोषिक प्रदान करणार असल्याचेही निश्चित झाल्याचे त्यांना सांगण्यात येत. आता निरुपाय असतो. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला कसे तोंड द्यावे या विचारात फेडोरा आणि मिस बाल्फोर असतानाच अन्तोनिआ आपला बेदिंग सूट घालून काही गुणगुणत पोहोण्याच्या तलावाकडे निघालेली दिसते. जाताजाता ती या दोघींना अभिवादन करते. अचानक फेडोराच्या मनात काही विचार चमकून जातो. आपला चष्मा उचलून ती पाठमोर्‍या अन्तोनिआला बारकाईने न्याहाळते, क्षणात निर्धाराने काही निर्णय घेते नि मिस बाल्फोरकरवी अकॅडमी अध्यक्षांचा धन्यवाद देऊन आपले कोर्फूमधे स्वागत करण्यास सज्ज असू असा निरोप देण्यास सांगते.
पुढील आठवड्यातील तो नियोजित भेटीचा दिवस उजाडतो. डॉक्टर अधीरपणे वरच्या मजल्यावरील गॅलरीत उभे राहून अध्यक्षांच्या बोटीची वाट पाहताहेत.अध्यक्षांना घेऊन येणारी बोट जशी धक्क्याला लागते तसे ते आत येतात. नेहमीच्या पेहरावात फेडोरा आपल्या व्हीलचेअरवर बसलेली आहे. तिला ते अदबीने विचारतात “मादाम, मी आपल्याला अकॅडमी पारितोषिकाच्या समारंभाला घेऊन जाऊ शकतो काय?” “अर्थातच, तुम्हाला तशी परवानगी आहे.” ती खोट्या औपचारिकतेने म्हणते. डॉक्टर तिची खुर्ची ढकलत तिच्या खोलीच्या खिडकीजवळ नेतात. त्या खिडकीतून तिला विलाच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या वेलींच्या मांडवापाशी घडणार्‍या घटना दिसू शकतात. मिस बाल्फोर अकॅडमी अध्यक्ष ‘हेन्री फोंडा’ यांना घेऊन तिथे पाठमोर्‍या उभ्या असलेल्या फेडोरा ऊर्फ अन्तोनिआकडे घेऊन येते. औपचारिक ओळखीनंतर फेडोरा (अन्तोनिआ) मि. फोंडा यांना इथवर येण्याची तसदी घेतल्याबद्दल धन्यवाद देते. याउलट या कामासाठी कुणी जायचं याबाबत अकॅडमीमधे चढाओढ लागलेली होती असे सांगून तो सौजन्याची परतफेड करतो. एकमेकांच्या कारकीर्दीबाबत माफक स्तुती केल्यानंतर फेडोरा फोंडा यांच्या हातातील काळ्या पिशवीकडे बोट दाखवून विचारते. “हे काय ते?” “हेच ते!” मि. फोंडा होकार देतात. “मग त्या बिचार्‍या छोट्या माणसाने गुदमरून जाण्यापेक्षा तू त्याला बाहेर का काढत नाहीस.” तिच्या विनंतीला अनुसरून ती जगात अनेकांना हुलकावणी देणारी ती बाहुली ते बाहेर काढतात. एक छोटेसे औपचारिक पारितोषिकाचे भाषण करतात. ती बाहुली म्हणत असते “तीस वर्षांच्या जिच्या कारकीर्दीने रुपेरी पडद्याला जिच्या अभिनयाने मान आणि आदर मिळाला त्या फेडोराला…” संपूर्ण चित्रपटभर करड्या वृत्तीने वावरणारी मिस बाल्फोर या प्रसंगी मात्र भावुक होते. तिच्या इतक्या वर्षांच्या सहप्रवासिनीच्या आयुष्यातील हा परमोच्च क्षण आपण अनुभवू शकलो हा भाग तर यात आहेच पण त्याचबरोबर जिच्यासाठी हा सन्मान दिला जातो आहे तिला मात्र तोंड लपवून आडोशाने केवळ साक्षीभावाने हे सारे अनुभवावे लागते आहे याचा विषादही त्यात मिसळलेला असावा. “या पारितोषिकाने माझा मोठाच सन्मान झाला आहे.” फेडोरा (अन्तोनिआ) एका वाक्यात आभार मानते. वरच्या खिडकीच्या आडोशाने हा क्षण अनुभवणारी फेडोराही तिच्या आयुष्यात प्रथमच प्रसन्न दिसते. ती म्हणते “पस्तीस वर्षे मी या क्षणाचा पाठलाग केला. त्यासाठी भाषणही तयार ठेवले होते. पण आज तिला ते सादर करण्याची संधी मिळते आहे.” पण केवळ ही संधीच नव्हे तर फेडोराचे उरलेले आयुष्य जगण्याची संधीच इथून पुढे अन्तोनिआला मिळते.
_______________________________________________________________________________
१. इथे तपशीलात थोडी गफल दिसते. १९४७ मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे  ऑस्कर  ‘ऑलिविया हॅविलँड’ला ‘टु ईच हिज ओन’ साठी मिळाले. ही भूमिका ननची नव्हती. बहुधा इथे १९४३ साली जेनिफर जोन्स ला ’द सॉन्ग ऑफ बर्नादेत’ बद्दल मिळालेल्या ‘ऑस्कर’चा संदर्भ असावा.

फेडोरा: हरपल्या श्रेयाची आस – भाग ३

सारे मार्ग संपलेला बॅरी बार मधे मद्याच्या संगतीत काही काळ घालवून परत होटेलमधे परततो. बारमधे आजूबाजूला नाचगाण्याचा जल्लोष चालू असतो. पण त्याने आपला ग्लासही पुरा संपवलेला नाही. एवढेच नव्हे तर बिल देऊन निघताना तो ते स्क्रिप्टही तिथेच विसरून जाऊ लागतो. बारटेंडर त्याला ते नेण्याची आठवण करून देतो. होटेलमधील आपल्या खोलीचे दार उघडतो नि त्याला धक्काच बसतो. खुद्द फेडोराच आत उभी असते. ती घाबरून घाईने त्याला दार लावून घेण्याची विनंती करते. ती घरच्या साध्या गाऊनवरच आलेली असते. पण तरीही तिचा गॉगल आणि ते हातमोजे मात्र ती विसरलेली नसते.  वारंवार खिडकीतून खाली पहात तिच्या पाठलागावर कुणी येत नाही याची खात्री करून घेत राहते. त्याने दार लावताच ती समोर येते नि एक छोटी पेटी त्याला देते. “ही मी तुझ्यासाठी आणली आहे.” ती पेटी तिच्या हातून घेतानाच तिचे तळहात रक्ताळलेले दिसून येतात. त्याबाबत तिला विचारणा करता आपण स्वतःच डिंगी चालवत आलो नि त्याची सवय नसल्याने ते हात खरचटले असे ती सांगते. तो तिला हातमोजे काढून जखमा नीट धुवून घेण्यास सांगतो. पण ती चटकन हात पाठीमागे नेते नि हातमोजे काढण्यास नकार देते. फेडोरा त्याला ती पेटी उघडण्यास सांगते. त्यात असतात तिला आलेली सारी प्रेमपत्रे. बॅरी म्हणतो ‘मी इतरांची पत्रे वाचत नाही, तसे करणे सभ्यपणाचे लक्षण नाही.’ पण ती म्हणते मी स्वतःच तुला देते आहे तर तुला वाचायला हरकत नसावी. तो पत्रे वाचत असता ती मात्र कायम खिडकीतून खालच्या रस्त्यावर नजर ठेवून असते. जॅक बेलमाँट, हेमिंग्वे, पाब्लो (पिकासो), विन्स्टन चर्चिल इ. बड्या बड्या व्यक्तींकडून आलेली ती पत्रे पाहून बॅरी चकित होतो. “याचे मी काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे?” तो विचारतो. “मला ती पत्रे विकायची आहेत. हल्ली न्यूयॉर्क वगैरे ठिकाणी अशा पत्रांचा लिलाव होतो असे मी ऐकले आहे, खरे ना? तिथे यांचा लिलाव कर. मला पैशांची फार गरज आहे.” बॅरी बुचकळ्यात पडतो. “पण तू तर गर्भश्रीमंत आहेस, तुला पैशाची काय गरज?” “ओह्, स्वित्झर्लंडमधे माझे करोडो फ्रँक्स पडलेले आहेत. पण मी साधा चेकही लिहू शकत नाही त्यावर. ते मला तसे करू देत नाहीत.” “का बरं? ते कोण आहेत तुझे, गार्डियन, पालक की आणखी कोण?” बॅरी पुन्हा तिच्या आयुष्याचे गूढ समजून घेऊ पाहतो. इतक्यात फोन वाजतो. ती त्याला फोन उचलू नये म्हणून विनवते. कारण फोन कुणाचा आहे याची तिला खात्रीच आहे. ती सांगते “ते मला फोन करू देत नाहीत, पत्र पाठवू देत नाहीत, भेटू तर मुळीच देत नाहीत.” “पण कुणाला?” बॅरी विचारतो. “मायकेल यॉर्क!” ती सांगते. “पण ही काय मोठी गोष्ट आहे. तू सरळ आपल्या मर्जीने निघून जा, तुला ते कसे काय अडवू शकतात?” “तसा प्रयत्न मी केला होता. पण त्यांनी मला विमानतळावरच गाठले आणि माझा पासपोर्ट काढून घेतला.”  आता आपला चित्रपट तयार होऊ शकणार नाही हे निश्चित झाले आहे असल्याने बॅरी आधीच वैतागलेला आहे. त्यातच या सगळ्या उलटसुलट माहितीने तो उखडतो नि तिला विचारतो “मला एक खरं सांग. हा सगळा बनाव तू्च रचून तर सांगत नाहीयेस?” खिडकीतून रस्त्यावर नजर ठेवून असलेली फेडोरा दचकून वळते, चिडून तरातरा त्याच्यापर्यंत येते नि खस्सकन उजव्या हाताची बाही कोपरापर्यंत सरकावून तो हात त्याच्यासमोर धरते. त्यावरील अनेक काळे डाग वारंवार टोचलेल्या इंजेक्शन्सच्या खुणा मिरवित असतात. “ते मला सतत औषधांच्या अंमलाखाली ठेवतात.” ती तक्रार करते. आता प्रकरण गंभीर असल्याचे बॅरीला उमगते. तो म्हणतो “तू पोलिसांना का सांगत नाहीस.” “नको नको, पोलिस नको.” ती घाबरून म्हणते. “मी तुला आता त्या विलावर परत जाऊ देणार नाही.” बॅरी म्हणतो. तो मॅनेजरला फोन करू पाहतो पण तो डेड झालेला असतो. (इतक्यातच तो वाजला होता नि आता डेड झालेला आहे! तेव्हा तो ’डेड’ झाला म्हणण्यापेक्षा डेड ’केला’ असण्याची शक्यताच जास्त दिसते.) तेव्हा मी खाली जाऊन मॅनेजरला बोलावतो तू इथून हलू नकोस अशी तंबी तो तिला देतो.
आपल्या खोलीचे दार उघडतो तोच समोरुन डॉक्टर आणि क्रितोस येताना दिसतात तो दार परत बंद करू पाहतो पण ते दोघे मिळून त्याला ढकलून आत घुसतात. क्रितोस बॅरीला जागचे हलू देत नाही तर डॉक्टर खुनशीपणे तिला म्हणतात “तू आम्हाला का सांगितलं नाहीस की तू मि. डेटवायलर यांना भेटायला जाते आहेस म्हणून. आम्हाला तुझी उगाचच काळजी लागून राहिली होती. आजचा दिवस फारच धामधुमीचा गेला. हे असं इतकं उत्तेजित होणं तुझ्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे.” असे म्हणत ते आपल्या बॅगमधून इंजेक्शनचे साहित्य काढतात. पण बॅरी अचानक मधे घुसून ते फेकून देतो. पण क्रीतोस पुन्हा एकवार त्याला पकडून दूर नेतो. “चल. आम्ही तुला घरी न्यायला आलो आहोत.” भेदरून अंग चोरून खिडकीजवळ उभ्या असलेल्या फेडोराला डॉक्टर म्हणतात. “तू तिला कुठेही नेणार नाहीयेस.” बॅरी ओरडतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टर पुन्हा फेडोराला सांगतात “तू तुझ्या या मित्राला कृपा करून समजावून सांग की आपण एका होटेलच्या खोलीमधे आहोत. इथे आणखीही खोल्या असतात नि त्यात इतर माणसे राहतात. अशा ठिकाणी कोणताही तमाशा करणं तुला परवडणारं नाही. तू कोण आहेस हे विसरलीस का? तू आहेस फेडोरा!” शेवटच्या एका शब्दाने भेदरलेली फेडोरा अचानक शांत होते, तिच्या चेहर्‍यावर एक निश्चय दिसतो. ती ताठ उभी राहते नि डॉक्टरांना म्हणते “अर्थातच. ते मी कसं विसरेन.” जाता जाता ती बॅरीला झालेल्या त्रासाबद्दल त्याची माफी मागते. तो पुन्हा एकवार तिला मदत देऊ करतो पण त्याला नकार देऊन ती जाऊ लागते. इतक्यात तिला त्या पत्रांची आठवण होते. मागे जाऊन ती पेटी उचलून निघताना ती डॉक्टरांना सांगते “मी त्याला मला आलेली प्रेमपत्रे दाखवत होते. ओल्ड लेडी शोईंग हर मेडल्स!”
तिच्या हाताला धरून क्रितोस तिला बाहेर घेऊन जातो. इकडे डॉक्टर बॅरीकडे तिने काय सांगितले याची चौकशी करू लागतात. “काय सांगितलं तिने?” “बरंच काही!” बॅरी चिडून उद्गारतो. “की आम्ही तिला जबरदस्तीने डांबून ठेवतो, कुठे जाऊ देत नाही, सतत औषधांच्या अंमलाखाली ठेवतो, तिचे पैसे हडप करण्याचा प्रयत्न करतो वगैरे.” डॉक्टर नेमके चौकशी करू लागतात. “हे आणि आणखी बरंच अधिक.” बॅरी छोटासा सूड उगवू पाहतो. डॉक्टर क्षणभर उसंत घेतात नि शांत स्वरात त्याला म्हणतात “ही सारी लक्षणे… कुठल्याही मानसशास्त्राच्या पुस्तकात डोकावून पहा. ते सांगेल तुला याला काय म्हणतात ते, पॅरानॉईड डिल्यूजन्स! मी तुला दुपारीच सुचवू पहात होतो, पण तुला समजले नाही. हे सारे तेव्हापासून सुरू झाले जेव्हा तिने तो अखेरचा चित्रपट अर्धवट सोडला. त्या चित्रपटा दरम्यान ती प्रेमात पडली होती, आपल्याहुन अर्ध्या वयाच्या पुरुषाच्या…” “…मायकेल यॉर्क?” बॅरीचा तर्क अचूक असतो.  “अर्थातच यातून काही चांगलं निष्पन्न होणार नव्हतंच. तसंच झालं. तिने आत्महत्त्येचा प्रयत्नही केला. आणि त्यानंतर आता ती चित्रपटातून काम करू शकत नाही अशी स्थिती आहे. आमच्यापुरते आम्ही एवढेच करू शकतो की तिला सर्वसामान्यांपासून दूर ठेवून त्यांच्या मनातील त्या ‘द ग्रेट फेडोरा’च्या इमेजला धक्का लागू नये याची काळजी घेतो. आता तूच काय ते ठरव.” बॅरीला अभिवादन करून आणि परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन डॉक्टर निघून जातात.
‘मायकेल यॉर्क’ हा एक समान दुवा वगळला तर डॉक्टरांच्या नि खुद्द फेडोराने सांगितलेल्या माहितीत तफावत दिसते. एका प्रसिद्ध नि श्रीमंत अभिनेत्री असलेल्या फेडोराला अशा तर्‍हेने विजनवासात ठेवण्याचे कारण ‘मायकेल यॉर्क’ या समान दुव्याने निश्चित झाले. फेडोराचा दावा खरा मानला तरी इतकी प्रसिद्ध, श्रीमंत स्त्री तिला विजनवासात ठेवू पाहणार्‍यांना विरोध करू शकत नाही, त्यांच्यापासून सुटका करून घेत नाही, घेऊ शकत नाही हे अनाकलनीय आहे. बॅरीने तिला पोलिसांकडे जाण्याचे सुचवले होतेच, मग ती ते का टाळते आहे. तिने त्या चौकडीविरोधात जाण्यासाठी मदतीचा हात मागितला तर तिला मदत करू पाहणारे हजारो हात उभे राहिले असते. मग हा तिच्या स्वतःमध्येच असलेला कमकुवतपणा म्हणायचा का? म्हणजे मग डॉक्टर म्हणताहेत ते खरे असावे का? जरी हे खरे मानले तरी डॉक्टर, काउंटेस ही मंडळी कोणत्या अधिकाराने फेडोराच्या आयुष्याचे निर्णय घेताहेत, ते नियंत्रित करू पाहत आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे.
दुसर्‍या दिवशी बॅरी पुन्हा एकवार मॅनेजरकरवी बोट भाड्याने घेऊन विलाकडे येतो. आश्चर्य म्हणजे विलाचे फाटक उघडेच असते. दारातून आत पाऊल टाकताच समोरच असलेल्या डॉग-हाऊस जवळ दोन्ही अल्सेशन कुत्रे झोपलेले असतात. त्यांना चाहुल लागू न देता दबत्या पावलांनी बॅरी मुख्य दरवाजाकडे येतो. मधेच त्याच्या पायाखाली काहीतरी चिरडून तुकडे झाल्याचा आवाज ऐकून तो खाली वाकून ती वस्तू उचलतो. तो असतो फेडोराचा ट्रेडमार्क बनून गेलेला गॉगल. त्याची एक काच आता भग्न झालेली असते. फेडोराच्या खोलीची खिडकी सताड उघडी असते. बॅरी तिला हाका मारू लागतो. आतून काहीच प्रतिसाद येत नाही. फक्त बॅरीच्या हाकांनी ते कुत्रे जागे होऊन जोरजोरात भुंकू लागतात. पुढचे दार घट्ट बंद असते, तेव्हा मागच्या दाराकडे येऊन बॅरी ते उघडण्याची खटपट करू लागतो. दोन-चार धडका मारताच आतला कोयंडा निसटतो नि बॅरी आत घुसतो. पण आत पूर्ण शांतता असते. मुख्य दिवाणखान्यातील सर्व फर्निचर कपड्यांनी झाकून ठेवलेले दिसते. फेडोराच्या खोलीचे दारही उघडेच असते. ती संधी साधून बॅरी तिच्या खोलीमधे शिरतो. तिथे तिच्या बेडला दोन भक्कम पट्टे जोडलेले दिसून येतात. त्यांच्या सहाय्याने तिला बहुधा त्या बेडला बांधून ठेवले जात असावे. बेडच्या पायथ्याशी जमिनीवर कॅमेरा रोलचे ते तीन खोके पडलेले असतात. बॅरी वैतागाने त्यातील एकाला लाथ मारतो. ते नेमके तिथल्या थ्री ड्रावर चेस्ट वर जाऊन आदळते. ते कपाटही उघडेच दिसते. बॅरी वरचा ड्रॉवर उघडतो. तो पांढर्‍या हातमोजांच्या जोड्यांनी गच्च भरलेला असतो. मागच्या बाजूच्या ड्रेसिंग टेबलजवळच्या खणात बॅरीला अनेक डायर्‍या सापडतात. त्यात असंख्य वेळा ‘फेडोरा’ हा एकच शब्द लिहिलेला आढळतो! तिथेच उजव्या बाजूच्या भिंतीवर एक मोठा रंगीत कागद लावलेला दिसतो. त्याचा एक कोपरा फाटलेला असतो नि त्यातून एका पुरुषाचा फोटो डोकवत असतो. पुढे होत बॅरी तो सारा कागदच फाडून काढतो. सुमारे पाच फूट बाय सहा फूट लांबीच्या त्या तुकड्यावर एकाच तरुणाच्या अनेक फोटोंचा कोलाज तिथे बनवलेला दिसतो. (हा ‘मायकेल यॉर्क’ आहे हे समजायला कोणत्याही तर्काची गरज नसते.) इतक्याच तिथला फोन वाजतो. बॅरी उचलण्यासाठी धावत जातो. पण तो फोन एका जाळीच्या कपाटात ठेवलेला असतो. जवळच्या एका सळीने त्याचे दार उचकटून काढेतो रिंग बंद होते.
इतक्यात एक होडी विलाकडे येत असल्याचा आवाज येतो. बॅरी सावधपणे दाराआड उभा राहून कानोसा घेतो. पण होडीतून क्रीतोस एकटाच उतरतो. कुत्रे भुंकून गोंधळ घालतात. त्यावरून काहीतरी गडबड असल्याचे त्याला जाणवते. आजूबाजूला शोधत असतानाच धक्क्याच्या दुसर्‍या बाजूला उभी केलेली बॅरीची होडी त्याला दिसते. आपण पकडले गेलो हे ध्यानात येताच बॅरी त्वरेने मागच्या दाराने निसटू पाहतो, इतक्यात फोन पुन्हा वाजतो. इतक्या हातघाईच्या क्षणीही तो उचलण्याचा मोह बॅरीला आवरत नाही. पलिकडून ऑपरेटर सांगते की डॉ. वॅन्डो यांच्यासाठी लॉन्ग-डिस्टन्स कॉल आहे. आपण डॉ. वॅन्डोच बोलत असल्याची बतावणी बॅरी करतो. पलिकडून काउंट सॉब्रियान्स्की बोलत असतो. तो म्हणतो “बरं झालं तुम्ही अजून तिथून निघाला नाहीत ते. मी इकडच्या अधिकार्‍यांशी बोललो आहे. तुम्हाला इथे मुख्य टर्मिनलपासून दूरवर उतरवून घेण्याची व्यवस्था झालेली आहे. तिथेच मी अ‍ॅम्ब्युलन्सचीही सोय केली आहे, जेणेकरून तुम्ही तिला थेट हॉस्पिटलमधे घेऊन जाऊ शकाल.” ” कुठल्या क्लिनिकमधे?” बॅरी चुकून बोलून जातो. “कुठल्या म्हणजे, तुझ्या क्लिनिकमधे.” काउंट वैतागाने म्हणतो. दुसर्‍याच क्षणी त्याला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते. तो विचारू लागतो तू कोण आहेस, कोणाशी बोलतोय मी?’ इतक्यात मागच्या दारातून आत शिरलेला क्रितोस बॅरीच्या समोर येऊन उभा राहतो. नाईलाजाने फोन ठेवून बॅरी त्याच्याशी उसन्या धीराने बोलू लागतो. पण एकाच फटक्यात तो बॅरीला आडवा करतो.
बॅरी जागा होतो तो होटेलमधील आपल्या खोलीतच. मॅनेजर बॅरीला सांगतो की तू त्या माझ्या मेव्हण्याच्या होडीत बेशुद्धावस्थेत सापडलास त्याला, ही घटना घडली त्याला एक आठवडा उलटून गेलेला आहे. ‘आणि हो तू मला त्याचे चाळीस डॉलर देणं लागतोस.’ मॅनेजर आपले घेणे विसरत नाही. जागा झालेला बॅरी आता सारा घटनाक्रम आठवू पाहतो. त्याला आठवते की डॉ. वॅन्डो यांच्यासाठी एक फोन आला होता, तो आपण उचलला होता नि पलिकडून तो माणूस तिला कुठल्याशा क्लिनिकमधे नेण्याबद्दल बोलत होता. तो ताडकन उठतो नि धडपडत बॅग भरू लागतो. मॅनेजर तुला अजून विश्रांतीची गरज आहे, तुला चक्कर येऊन तू पडशील म्हणून सावध करू पाहतो. पण बॅरी ऐकत नाही. तो म्हणतो “मला तिला शोधून काढलंच पाहिजे.” “कोणाला?” “अर्थात फेडोराला” बॅरी वैतागून म्हणतो. “म्हणजे तुला काहीच ठाऊक नाही?…  अरे खरंच की, तुला कसे ठाऊक असणार म्हणा. तू तर इथे बेशुद्धावस्थेत पडलेला होतास.” “अरे पण काय ठाऊक नाही?” बॅरी उतावीळपणे ओरडतो. मॅनेजर खिशातून वर्तमानपत्राची एक सुरळी बाहेर काढतो नि उलगडून बॅरीसमोर धरतो. मुख्य पानावरच फेडोराचा मोठा फोटो असतो नि ठळक अक्षरात – अर्थात तिच्याबाबतच – काही बातमी छापलेली दिसते. पण अमेरिकन बॅरीला इटालियन भाषेतील ती बातमी वाचता येत नाही. “काय आहे ते?” तो पुन्हा ओरडतो. मॅनेजर क्षणभर थांबतो नि हलक्या आवाजात सांगतो “फेडोरा इज डेड…”
फेडोराच्या मृत्यूची बातमी ऐकून बॅरी क्षणभर हतबुद्ध होतो. लगेच उसळून म्हणतो ‘त्या हलकटांनी अखेर ठार मारलं तिला.’ (यात आपला मार्ग आता कायमचा बंद झाला या वैफल्यातून केला जाणारा दोषारोप हे एक कारणही दिसते.)
चित्रपट पुन्हा एकवार पॅरिसमधील फेडोराच्या प्रासादाकडे येतो. मुख्य दिवाणखान्यात ठेवलेल्या फेडोराच्या शवपेटीजवळ उभा असलेला बॅरी दिसतो. वरच्या सज्ज्यात बसलेल्या काउंट, काउंटेस, डॉ. वॅन्डो आणि मिस बाल्फोर या चौकडीकडे तो तीव्र नजरेने पहात असतो. इतक्यात दुपार झाली असल्याने उरलेल्या चाहत्यांना आता दोन वाजल्यानंतर येण्याचे आवाहन करीत मगाचा तो अटेंडंट रांगेपुढे साखळी लावून बंद करतो नि आधीच आत असलेल्यांना लवकर बाहेर पडण्याचे आवाहन करतो. ते चौघे बसलेल्या सज्ज्याच्या विरुद्ध दिशेस असलेल्या दुसर्‍या सज्ज्यात इतका वेळ वायोलिनवर शोकधून वाजवणारे कलाकारही आपले वादन थांबवून निघून जातात. शेवटचा माणूस बाहेर पडताच अटेडंट दार लावून घेतो. आतल्या दिवाणखान्याचा दारावर इतका वेळ चित्रासारखे स्तब्ध उभे असलेले गार्डस् देखील आपल्या टोप्या नि हातमोजे उतरवत निघून जातात. या दरम्यान तिथल्या भल्यामोठ्या पडद्याआड लपलेला बॅरी अटेंडटला दिसतो. अटेंडंट त्यालाही दुपारी दोन वाजल्यानंतर यायला सांगतो. पण बॅरी त्याला तिथेच थांबण्याचा इरादा जाहीर करतो. अटेंडंट अर्थातच त्याला नकार देतो. इतक्यात “असू दे फ्रान्स्वा, त्याला थांबू दे. मि. डेटवायलर आमचे एकप्रकारे मित्रच आहेत असं म्हणायला हरकत नाही.” असे म्हणत काउंटेस इतर तिघाबरोबर मुख्य दिवाणखान्यात येते. बॅरीपाशी पोचल्यावर ती त्याला म्हणते “मला ठाऊक होतं तू नक्की येशील.” “वेल्, माझी चुकामूक होता होता राहिली.” बॅरी म्हणतो. मिस बाल्फोर आणि डॉ. वॅन्डो यांना अभिवादन करून तो फेडोराच्या पाठीमागे उभ्या असलेल्या काउंटला म्हणतो “आपला परिचय झालेला नाही.” काउंट पुढे होऊन आपला औपचारिक परिचय करून देतो. ‘आपण  काही दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, तुमचा तो लॉन्ग-डिस्टन्स कॉल…’ बॅरी आठवण करून देऊ पाहतो. इतक्यात काउंटेस आपली व्हीलचेअर ओढत फ्रान्स्वापाशी जाते नि त्याला “पुष्कळ कामे पडली आहेत, ती उरकून घे.” असे म्हणून एक कामांची यादी देते. हा उघडच त्याला तिथून जाण्याचा इशारा असतो. या सार्‍या कामांची यादी घेताना तो स्वतःहून “… आणि त्या टीवी केबल्सदेखील हटवायला सांगतो.” अशी भर घालतो. त्यावर काउंटेस घाईघाईने “नको नको, त्यांना राहू दे. ते फेडोरावर सीबीएस एक तासाचा खास प्रोग्राम करणार आहे.” असे सांगते. या मधल्या ‘विश्रांतीच्या’ काळात पुन्हा एकवार मेकअपमनला बोलावणे पाठवले जाते, काउंटेसच्या मतानुसार ‘मळलेले’ फेडोराचे हातमोजे बदलले जातात, सारे कसे सतत प्रेजेंटेबल असावे याची दक्षता घेतली जात असते. काउंटकडे वळून ती त्यालाही त्या म्युजिशियन्सना गाठून दुपारच्या सत्रात ते वाल्झ ट्रिस्ट (Waltz Triste) वाजवू नये म्हणून तंबी देण्यास सांगते. ते पुरेसे शोकात्म होत नाही अशी तक्रार करते.
तिच्या वाल्झबाबतच्या या टिप्पणीवर डॉक्टर आश्चर्य व्यक्त करतात. मी ती  त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून अतिशय हुकमी आवाजात त्याऐवजी इतर अधिक परिणामकारक संगीत वाजवण्याची सक्त ताकीद देते. “दिवसाचे किती शो’ज लावणार आहेस तू?” बॅरी मधेच उपरोधाने विचारतो. “दोन? तीन… की आणखी एखादा मध्यरात्रीचा स्पेशल शो, हुं?” काउंटेस संतापाने बॅरीकडे वळून म्हणते. “मी तुमच्यावर अतिशय संतापले आहे मि. डेटवायलर. तुमच्या मुळे आम्हाला पुष्कळच त्रास सहन करावा लागला आहे.” “माझ्यामुळे????… अं?” बॅरी प्रतिप्रश्न करतो. “तुम्ही तिच्या डोक्यात नसती कल्पना भरवून दिलीत, एक प्रकारे त्या गाडीसमोर लोटून दिलंत.” “हा:, तुम्ही… तुम्ही मारलंत तिला नि उलट माझ्यावर आरोप करताहात. चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात.” बॅरीदेखील चिडून प्रत्युत्तर देतो. काउंटेस क्षणभर थांबते नि म्हणते “तिने आत्महत्त्या केली…” “…पण तुम्ही तिला भाग पाडलंत.” बॅरी थेट आरोप करतो. “मी काही आंधळा नाही की मूर्खही. जे काही घडलं त्याचा मीही साक्षीदार होतोच.”  “फेडोराला आपल्या मतानुसार वागायला कुणीही भाग पाडू शकत नव्हतं. ती अतिशय कणखर, अतिशय शिस्तीची स्त्री होती.” काउंटेस त्याचे म्हणणे खोडून काढते.  “हो आणि म्हणूनच ती या इथं आहे आता, मृत!” बॅरी तिरकसपणे म्हणतो. “तुला काहीच ठाऊक नाही. नीट माहिती न घेता तू अशा अफवा पसरवू लागलास… ” मिस बाल्फोर तिला थांबवू पाहते. तिला हातानेच झिडकारून ती आपले बोलणे सुरूच ठेवते. “…  तर मात्र मी म्हणेन तू नुसता आंधळाच नाही तर मूर्खही आहेस. कारण… कारण त्या शवपेटीतली ती स्त्री फेडोरा नाही.” “फेडोरा नाही?” फेडोराबाबतच्या कहाण्यांमधे आणखी एक भर पडलेली ऐकून वैतागलेला बॅरी म्हणतो “तिचा चेहरा पहा, सारं जग ओळखतं तिला.” “चेहर्‍याकडे पाहू नकोस, तिचे हात जरा निरखून पहा.” याचवेळी मिस बाल्फोर शवपेटीतल्या त्या स्त्रीच्या हातावरचे  मोजे काढून घेते. दुसरी जोडी त्यावर नवी मोज्यांची जोडी चढवण्यापूर्वी त्यांच्या आड नेहमी दडून राहिलेले ते  सुकुमार कोवळे हात बॅरीला दिसतात. “हे हात तुला सदुसष्ट वर्षांच्या म्हातारीचे वाटतात का? ते मोजे तिने तिचे वार्धक्य लपवण्यासाठी परिधान केले नव्हते, तर आपले तारुण्य लपवण्यासाठी ती ते वापरत असे.” काउंटेस एकेक शब्द निश्चयपूर्वक उच्चारताना दिसते. बॅरी आता चांगलाच गोंधळात पडला आहे. “ही तीच स्त्री आहे जिला मी कोर्फूमधे भेटलो, बरोबर ना?” काउंटेस होकार देते. “आणि इतके दिवस ही फेडोरा म्हणून मिरवत होती?” बॅरी अजूनही संशयग्रस्तच आहे. “पण का? आणि खरी फेडोरा कुठे आहे मग? तिचे काय झाले?” काउंटेस एक दीर्घ  श्वास घेते नि आपल्या चेहर्‍यावरचे अवगुंठण हलकेच दूर करते नि म्हणते “हे असं झालं तिचं.” त्या आडचा पांढुरका निस्तेज, सौंदर्यहीन चेहरा पाहून बॅरी आश्चर्यचकित होतो. “तू… तू… फेडोरा आहेस?” बॅरी अविश्वासाने विचारतो. “होते, मी फेडोरा होते!’ काउंटेस ऊर्फ फेडोरा म्हणते.

फेडोरा: हरपल्या श्रेयाची आस – भाग २

होटेलमध्ये बसलेला बॅरी फेडोराला पत्र लिहितोय.
‘प्रिय फेडोरा,
काळ माझ्यापेक्षा तुझ्यावर अधिक मेहेरबान असावा. म्हणूनच कदाचित  तू दुपारी मला ओळखलं नसावंस….’
त्या पत्राद्वारे तो तिला आपल्या भेटीची आठवण करून देऊ पाहतो. सुमारे १९४७ च्या सुमारास ‘लीडर इन द स्वान’ नावाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची भेट झाली होती. बॅरी तेव्हा ‘सेकंड असिस्टंट’ म्हणून काम करत असे. फेडोरासारख्या मुख्य अभिनेत्रीची इतक्या दुय्यम सहकार्‍याशी ओळख असणे फारसे संभवत नव्हते. एका तलावातील सीनचे चित्रीकरण चालू असते. त्यातच तिची कामावरची निष्ठा म्हणा वा अतिशय एकारलेल्या आयुष्यात अन्य बाबी दुय्यम वाटत असल्याने म्हणा तिला कामाशिवाय फालतू सलगी पसंत नसावी. अगदी चित्रीकरणासाठी सेटवर पोचलेल्या तिला “कशी आहेस तू, जेवण वगैरे झाले का?” विचारत औपचारिक स्वागत करणाऱ्या दिग्दर्शकालाही ती “मी तुला कशी हवी आहे ते सांग.” म्हणत फटकारते.
स्टुडिओतच बनवलेल्या एका लहानशा तलावाच्या मध्यभागी विवस्त्र फेडोरा पहुडलेली असते. पार्श्वभूमीवर ल्यूटचे मादक स्वर ऐकू येत असतात, अवघ्या वातावरणात आसक्ती भरून राहिलेली असते. इतक्यात कॅमेर्‍यातून सार्‍या दृष्याचा अंदाज घेऊ पाहणार्‍या दिग्दर्शकाला काही ध्यानात येते. मागे वळून तो आपल्या सहाय्यकाला म्हणतो ‘आपल्याला इथे सेन्सॉरचा ताप होईल बहुतेक.’  नक्की कशाबाबत ते त्याच्या सहाय्यकाला ठाऊक आहेच. तो ताबडतोब त्याच्या एका सहकार्‍याला पाचारण करतो नि त्याला ही ‘समस्या’ ताबडतोब दूर करण्याची तंबी देतो. हा त्याचा दुय्यम सहकारी – बॅरी – त्या तलावात उतरतो. दोनचार वॉटरलिलीची फुले घेऊन तो तिच्याजवळ येतो नि प्रथम एक जोरदार जांभई देतो. पाणलिलींच्या सहाय्याने तो फेडोराची ‘समस्या’ झाकू पाहतो. या सार्‍या कृतीदरम्यान तो समोर विवस्त्र पहुडलेल्या स्त्री देहाबाबत अतिशय उदासीन असल्याचे भासते. तिच्या इतक्या जवळ असून, वातावरणातील सार्‍या मादकतेचा त्याच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. अतिशय निर्विकारपणे तो आपले काम करताना दिसतो. आपल्या अवगुंठित सौंदर्यानेदेखील अनेकांना घायाळ होताना पाहणार्‍या फेडोराच्या दृष्टीने हा मोठाच धक्का असतो. चित्रीकरण संपताच त्याने आपल्या भेटण्याचा निरोप ती त्याला पाठवते.
ग्रीनरूममधे तो तिला भेटायला आलाय. इतर सर्व मदतनिसांना ती बाहेर जाण्यास फर्मावते. त्याचे नाव विचारल्यानंतर ती थेट त्याला “तू होमो आहेस का?” असा प्रश्न करते. तो अवाक्. ती पुन्हा तोच प्रश्न विचारते. “कोण, मी?” तो विचारतो. “तर काय? एरवी इतर कोणताही पुरूष माझ्यासारख्या सुंदरीच्या – ती ही विवस्त्र असताना – समवेत असता अशी जांभई देणार नाही.” “ओह्, मी जांभई दिली?” त्याच्या लक्षातही आलेली नाही ती गोष्ट. “काय झालं, काल रात्री माझी रात्र फारच धामधुमीत गेली…” एरवी आपण कसे इथल्या स्त्रियांमधे अगदी पॉप्युलर आहोत नि बहुतेक स्त्रियांना आपण कधी ना कधी भुरळ घातलेली आहे अशी बढाई तो मारतो. “तरीही तुला माझे देहसौष्ठ्व अगदीच बोरिंग वाटले तर.” ती अजूनही त्याला सुखासुखी सोडायला तयार नाही. “नाही नाही…” तो घाईघाईने म्हणतो, “…तुझा देह सुंदर आहे.” “नाही! माझा देह ’अप्रतिम सुंदर’ आहे.” ती आढ्यतेखोर दुरुस्ती करते. “तू मला प्रत्येक बाबतीत निरुत्तर करते आहेस.” तो हसून म्हणतो. तिच्याशी संभाषण करत असताना तो वारंवार घड्याळात पाहतो आहे हे तिच्या लक्षात आले आहे. “तुला काही महत्त्वाचे काम आहे, कुठे जायचे आहे का?” ती विचारते. “नाही… म्हणजे… आज माझी डेट आहे.”
त्याच्या आयुष्यातील या बाजूबाबत ती अधिकच कुतूहलाने चौकशी करत राहते. ‘डेट’ म्हणजे काय असतं, ते नाईट क्लब मध्ये जातात, दोघांपैकी एकाच्या घरी भेटतात की अन्य कुठे;  भेटी कशा ठरवतात, त्या भेटीदरम्यान काय बोलतात या सार्‍याबाबत तिला कुतूहल आहे.  कदाचित आयुष्याच्या त्या वळणावर पोहोचण्याआधीच  तिला प्रसिद्धीच्या वलयांनी घेरून टाकले असावे. कदाचित तिच्या आयुष्यात हे असे हळवे, हवेसे पण चोरटे, असोशीने जगावे, शेअर करावेत असे क्षण आलेच नसावेत. तेव्हा त्याने पुरवलेल्या तपशीलांच्या आधारे ती त्या क्षणांची कल्पना करू पहात असावी. या सार्‍या चर्चेचा, भेटीचा शेवट एका बीचवर होतो.  निळ्या रंगाच्या विविध छटा दाखवणार्‍या सायंकालीन ढगांच्या साक्षीने, हलके हलके एकेक लाट जोजवणार्‍या समुद्राच्या सान्निध्यात उभ्या असलेल्या बॅरीच्या गाडीतून त्याच्या तृप्त गाण्याचे स्वर आसमंतात मिसळत राहतात.
पहाट उमलते. फेडोरा प्रथम जागी होते, प्रथम आपला ट्रेडमार्क गॉगल प्रथम डोळ्यावर चढवते नि मग तिच्या खांद्यावर डोके ठेवून निजलेल्या बॅरीच्या हातावरील घड्याळात वेळ पाहते नि गाडीचा हॉर्न वाजवून त्याला जागे करते. ‘आपलं आजचं शेड्यूल काय आहे?’ त्याला विचारते. तो समोरील कागद वाचून तिच्या आजच्या दिवसाची आखणी तिला सांगतो, कागद घडी करून ठेवतो नि हसून तिला ‘गुड मॉर्निंग’ करतो. पण ती प्रति-अभिवादन करत नाही! तो मान किंचित कलती करतो, हलकेच स्वत:शीच हसतो नि गाडी सुरू करतो. दोघेही काही क्षणांच्या आपल्या जगातून आपापल्या जगात परत जातात.
“…मला वाटतं, एखादा जेंटलमन आपल्या जुन्या अफेअरची स्मृती अशी जाहीर लिहिणार नाही. पण हरकत नाही, मी काही जेंटलमन नाही….” त्याच्या पत्राचा उत्तरार्ध सुरू होतो. “माझी अलिकडची परिस्थिती पाहता मला जेंटलमन रहाणं परवडत नाही. तेव्हा मला असं वाटलं होत की निदान फॉर ‘ओल्ड टाईम्स सेक’….” तो अडखळतो, किंचित वैतागाने त्या सार्‍या कागदांचा चोळामोळा करून हातातल्या लायटरने पेटवून ते जाळून टाकतो आणि पुन्हा नव्या कागदावर ‘डिअर मॅडम फेडोरा…’ अशा औपचारिक मायन्याने सुरुवात करून आपल्या स्क्रिप्टबाबत नवे पत्र लिहू लागतो.
यात एकाहुन अधिक शक्यता असू शकतात. पहिली म्हणजे त्याने प्रथम आव आणला तसा तो निर्ढावलेला वगैरे नसावाच, ही मे बी ए जेंटनमन आफ्टरऑल. किंवा फेडोराचा करारीपणा पाहता अशा क्षणिक, तात्कालिक संबंधाचा गैरफायदा तो घेतो आहे असे समजून ती उलट त्याच्याबाबत अधिकच कडक भूमिका घेईल अशी भीतीही त्याला वाटली असावी. कदाचित इतक्या जुन्या काळातील  क्षणांची आठवणही तिच्या मनात शिल्लक नसेल नि आपण काही रचून खोटेच सांगतो आहे असा तिचा समज होऊन ती नाराज होऊ शकते असेही त्याला वाटले असावे. किंवा आपण त्या क्षणांचा उल्लेख करताना इमोशनल ब्लॅकमेलिंगचा आधार घेत आहोत की जुन्या नात्याला उजाळा देऊ पहात आहोत हे त्याचे त्यालाच नीटसे उमगले नसावे. आणखी एक शक्यता तिच्यासारख्या श्रेष्ठ अभिनेत्रीने आपल्यासारख्या सामान्य कलाकाराला त्या अनमोल क्षणांची जी भेट दिली ती उल्लेख केल्याने डागाळावी असे वाटत नसावे.
अखेर ते पत्र लिहून पुरे होते. पण हे पत्र – आणि स्क्रिप्ट – फेडोरापर्यंत पोचवावे कसे अशा संभ्रमात पडतो. विलावर जाऊ शकणार्‍या त्या मेडला वा खाटकाला विनंती करून पहावी का अशा विचारात तो असतानाच खुद्द डॉ. वॅन्डो कोन्याकचा आपला रोजचा ‘डोस’ घेण्यासाठी होटेलमधे प्रवेश करतात.  बॅरी थेट त्यांनाच गाठतो नि त्यांच्याबरोबर टेबल शेअर करण्याची परवानगी मागतो. विलावरच्या माणसांच्या स्वभावानुसारच डॉक्टर त्याची विनंती साफ धुडकावून लावतात. पण बॅरी त्यांच्याभोवती खुशामतीचे जाळे विणू लागतो. त्यांच्या संशोधनाबद्दल ते किती हळवे आहे ते त्याला चांगलेच ठाऊक आहे. तेव्हा अशा उच्च संशोधनाबद्दल त्यांना कितीतरी आधीच नोबेल मिळायला हवे होते असे तो म्हणतो. “ते स्टॉकहोममधील सगळे एकजात खुशामत करणार्‍यांचे पक्षपाती आहेत.” जाताजाता तो त्यांनाही शालजोडीतला ठेवून देतो. डॉक्टर किंचित हसतात नि त्याला आपल्यासोबत बसण्याची परवानगी देतात. पहिला डाव व्यवस्थित पार पडल्याने थोडासा सैलावलेला बॅरी ताबडतोब एका ‘स्कॉच ऑन द रॉक्स’ ची ऑर्डर देतो.
या प्रसंगापासून पुढे चित्रपट सर्वस्वी शब्दबंबाळ होत जातो. कथा उलगडते ती प्रामुख्याने संवादातून. तो चित्रपट आहे म्हणूनच केवळ त्याला सादरीकरणाचे ठिगळ जोडल्यासारखे वाटते. एरवी घटना नि घटनास्थळे कमी नि संवाद अधिक अशा स्वरूपातील पुढचा भाग एखाद्या नाटकाला अनुकूल असा फॉर्म म्हणता येईल. त्या अर्थी चित्रपट म्हणून, एक दृक् श्राव्य माध्यम म्हणून ‘फेडोरा’ कोसळला आहे, किंवा असं म्हणू की ही कथाच त्या माध्यमाला अनुकूल नाही. तेव्हा इथून पुढचा भाग हा प्रामुख्याने कथा वाचल्याप्रमाणे प्रेक्षकाला वाचावा लागतो. हा दोष नजरेआड करून ‘फेडोरा’ची पुढचा चित्रपट पहावा लागेल. मुळातच तरुण हिरो नि तरुण हिरोईन नसल्यामुळे चित्रपट ‘करमणूक’ म्हणून पाहणार्‍या नि त्या दोघांमध्ये आपले तथाकथित ‘रोल मॉडेल’ शोधणार्‍यांच्या दृष्टीनेही हा चित्रपट ‘बोऽरिंग’ चा शिक्का घेऊन उभा राहतो. (गंमत म्हणजे ह्याचेच एक उदाहरण आयएमडीबी’वर सापडले. एका रिव्यू लेखकाने ‘बॅरी’चे काम करण्यासाठी निवडलेला विल्यम होल्डन फारच वयस्कर वाटतो’ असा शेरा मारला आहे. मूळ कथेतला बॅरी हा साठीच्या आतबाहेरचाच आहे हे विसरून हिरो तरुणच असला पाहिजे हे गृहितक घेऊन चित्रपट पाहिल्याचा हा परिणाम.) परंतु पुढची कथा एक अतिशय वेगळे वळण घेऊन जाते, आपल्यासमोर जगण्याचे काही नवेच वास्तव मांडून जाते.
डॉक्टरांसोबत कोन्याक’चा आस्वाद घेत बसलेला बॅरी त्यांच्या कामाची तो स्तुती करणे चालूच ठेवतो. “आता कालच पहा. मी फेडोराला भेटलो. प्रथमच तिला पाहणारा कोण सांगू शकेल की तिचे वय ६२ आहे म्हणून.” “बासष्ट नव्हे सदुसष्ट…”डॉक्टर अभिमानाने दुरुस्ती करतात. मोठ्या आत्मविश्वासाने ते आपल्या ट्रीटमेंटबद्दल बोलू लागतात. बोलता बोलता कोन्याकचा घोट घेण्यापुरते ते क्षणभर थांबतात, त्याचा फायदा घेत बॅरी विचारतो “पण यातले किती खरे आहे?” “‘सगळेच!” डॉक्टर अभिमानाने सांगतात. “माझे पेशंटस मला जीनियस मानतात तर माझे व्यवसायबंधू एक ढोंगी. कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात तेच खरं. या सार्‍या मूर्खांच्या बडबडीला कंटाळून मी माझं क्लिनिक बंद केलं. आता माझ्याकडे फक्त एकच पेशंट आहे, फेडोरा!”  ते सांगतात नि समोरचा कोन्याकचा ग्लास रिता करतात. “पण हे कसले बोरिंग आयुष्य आहे डॉक्” बॅरी म्हणतो. “खरं आहे. हा दुर्गम विला, तीन अरसिक, अप्राप्य स्त्रिया आणि दारुला बंदी.” ते वैतागाने म्हणतात. ते आता चांगलेच खुलले आहेत हे पाहून बॅरी आणखी जवळ सरकतो नित्या तिघींबाबत  अधिक सलगीने चौकशी करू लागतो. “तू फारच प्रश्न विचारतोस बघ. यात तुझा काय इंटरेस्ट?” डॉक्टर थोडे संशयाने विचारतात. “का? फेडोराइतकी इंटरेस्टिंग स्त्री दुसरी कुठली असू शकेल.” बॅरी आणखी सलगी दाखवतो. हा मुद्दा डॉकना लगेच मान्य होतो. “त्या तिघी चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यांना जोडणारा दुवा म्हणजे काउंटेस सॉब्रियान्स्की यांचा मुलगा काउंट सॉब्रियान्स्की. ते सारेच पोलिश आहेत हे तुला ठाऊक आहेच.” “मी का विचारलं सांगू, फेडोरा काल म्हणाली की तिला मित्र-मैत्रिणी नाहीत.” बॅरी खडा टाकून पाहतो. “तू तिचे म्हणणे फारसे गंभीरपणे घेऊ नकोस.” डॉक्टर घाईघाईने तिचे म्हणणे उडवून लावतात. “पण तिला असं वाटतं की तिच्या आसपासचे लोक तिच्याशी खोटे बोलतात, तिच्यापासून बरेच काही लपवून ठेवतात.” बॅरी चिकाटीने मुद्दा लावून धरतो.  “हॅ! हे खरं नाही.” डॉक्टर बॅरीचा दावा खोडून काढतात. “तसं असेल तर मग हे स्क्रिप्ट तिच्याकडे घेऊन जाण्यास तुमची काही हरकत नसावी.” बॅरी त्यांना अचूक शब्दाच्या जाळ्यात अडकवतो. “पण ती हल्ली स्क्रिप्ट्स वाचत नाही की फिल्मस् पहात नाही.” ते सुटका करून घेऊ पाहतात. “पण हे स्क्रिप्ट ती नक्की वाचेल.” बॅरी ठामपणे म्हणतो. ‘The Snows of Yesteryears’ त्या स्क्रिप्टचे शीर्षक वाचून ते म्हणतात “हा:,  नेहमीचा हॉलिवूड कचरा.’ ते आणखी एकदा सुटकेचा प्रयत्न करू पाहतात. ‘नाही. हे ’अना कारेनिना’वर आधारित आहे. मूळ कथानकाशी पूर्ण एकनिष्ठ राहून केलेले रूपांतर आहे.’ बॅरी सांगतो. ‘आह्‌ , खरा जीनियस… अम्म… आणि हो त्यालाही नोबेल मिळालेच नाही.” डॉक्टर आता पुरते अडकले आहेत. पण तरीही ते स्क्रिप्ट नेण्यास ठाम नकार देतात. इतक्यात विलावरून डॉक्टरांसाठी फोन येतो. ते फोनवर बोलत असताना पलिकडून पुरवल्या गेलेल्या माहितीने अतिशय क्षुब्ध होतात. “काय??? पण ते तिला कुठून मिळालं. असं करा… मी येईपर्यंत तिच्यापासून हलू नका.” इकडे डॉक्टर होटेल काउंटवरच्या फोनवर बोलत असताना ती संधी साधून बॅरी ते स्क्रिप्ट त्यांच्या टेबलजवळच अडकवलेल्या कोटाच्या खिशात सरकवून देतो. डॉक्टर घाईघाईने येतात, कोट उचलून तरातरा निघून जातात.
बाहेर पाऊस कोसळतो आहे. पावसात बाहेर पडता येत नसल्याने अस्वस्थ झालेला बॅरी होटेलमधील आपल्या खोलीत मॅनेजरने दिलेल्या तथाकथित ’लकी’ समजल्या जाणार्‍या मण्यांच्या माळेशी चाळा करत पडलेला आहे. फोन वाजतो. होटेलचा मॅनेजर त्याला खुषखबर ऐकवतो. विलावरून बॅरीला बोलावणे आलेले असते. मॅनेजर फोनवर बोलत असतानाच उतावीळ झालेला बॅरी इकडे कपडे चढवत चढवत होटेलबाहेर पडतोसुद्धा. बाहेर फेडोराची गाडी त्याच्यासाठी उभी आहे. क्रितोस (फेडोराचा तो करारी चेहर्‍याचा ड्रायवर) बॅरीला आदराने आपल्या छत्रीतून गाडीपर्यंत घेऊन जातो. इतका पाऊस आहे की बग्ग्यांचे घोडे नि त्यांना जोडलेल्या बग्ग्याही रेनकोट सदृश प्लॅस्टिकचे आवरण घेऊन उभे असतात. एरवी फेडोराखेरीज इतर कोणासाठीही वापरात न येणारी, धक्क्यावर झाकून ठेवली जाणारी गाडी बॅरीला विलावर नेण्यासाठी त्याच पावसात धावत असते.
विलावर पोहोचतात डॉ. वॅन्डो त्याला दारातच भेटतात. कदाचित यांच्याच शिफारसीमुळे आपले काम झाले असावे अशी समजूत करून घेऊन प्रसन्न स्वरात बॅरी ‘हाय डॉक्’ म्हणून त्याला अभिवादन करतो. पण डॉक् कोरडेपणे त्याला पाय पुसूनच आत पाऊल टाकण्याची तंबी देतात. आत येता येता बॅरी त्यांना स्क्रिप्ट फेडोरापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद देऊ पाहतो. पण तिकडे दुर्लक्ष करून ते त्याची हॅट घेऊन स्टँडवर ठेवतात नि त्याला आपल्यामागून येण्यास फर्मावतात. तो अधिक सलगीने तिला ते स्क्रिप्ट आवडले का याची चौकशी करू पाहतो. इतक्यात काउंटेस सॉब्रियान्स्कीचा घोगरा, पुरुषी आवाज हुकमी आवाजात ही कुजबूज थांबवण्याची आज्ञा करतो. फायरप्लेसजवळही दोन हीटर्स लावून बसलेली कृत्रिम नि पांढर्‍या पडलेल्या चेहर्‍याची काउंटेस बॅरीला तिच्याकडे येण्यास फर्मावते. आपल्याला विलावर येण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल बॅरी आभार मानू पाहतो. पण त्याला मधेच तोडून ती म्हणते “तुला इथे बोलावलं कारण तुझ्या वारंवार इथे डोकावण्याचा आम्हाला अतिशय त्रास होतो आहे. आम्ही आमच्यापुरती इथे थोडी प्रायवसी हवी आहे. तेव्हा आमच्या खासगी आयुष्यात  असे वारंवार डोकावून तू आम्हाला त्रास देऊ नयेस अशी आमची इच्छा आहे. बस खाली.” ती जवळच्या कोचाकडे आपल्या काठीने निर्देश करते. चुकून तो जिथे उभा असतो त्या मागच्या खुर्चीवरच बसू लागतो. तेव्हा ती वैतागाने “तिथे नाही, ती आमच्या मांजरीची खुर्ची आहे.” असे सांगत पुन्हा एकवार कोचाकडे निर्देश करते.
‘अतिशय त्रासदायक दिवस आहे नाही.’ इतक्या कुंद पावसाळी हवेत फायरप्लेसजवळही दोन दोन हीटर लावून बसलेली ही बया नक्कीच त्या हवेने त्रस्त असणार हा होरा बांधून तो धागा पकडून बॅरी संवादाची सुरुवात करतो. “अमेरिकेमधे  हल्ली विजेवर गरम होणारी ब्लँकेट्स बनवू लागले आहेत असं मी ऐकते.” “हो तर. मी अमेरिकेत पोहोचताच तुला एक पाठवून देईन.” बॅरी लगेच मदतीचे आश्वासन देऊन वातावरण आपल्याला अनुकूल करण्याचा प्रयत्न करतो. काउंटेस आपल्या मिस बाल्फोरला हाक मारते नि चहा घेऊन येण्यास फर्मावते. “दुधाबरोबर घेणार की लिंबाबरोबर” या मिस बाल्फोरच्या प्रश्नाला बॅरीचे  उत्तर असते “त्यापेक्षा ब्रँडीबरोबर घेणे मी अधिक पसंत करीन.” हा डाव डॉक् साठी आहे नि डॉक् त्याला नेमके बळी पडतात.  “आमच्याकडे ब्रँडी नसते.” या मिस बाल्फोरच्या ठाम नकारापाठोपाठ घाईघाईने डॉक्टर “पण आमच्याकडे कोन्याक मिळेल.” अशी दुरुस्ती करतात.  या विलामधे मद्याची बाटली आहे हे ऐकून त्या दोघीही अवाक्  झालेल्या दिसतात. “एखाद्या डुकरापासून मका लपवण्यासारखे  आहे हे” काउंटेस शेरा मारते.  डॉक्टर ती बाटली लपवलेली जागा सांगून मिस बाल्फोरला ती घेऊन येण्यास सांगतात. फायरप्लेसच्या वर एक पोर्ट्रेट असते, तिकडे बोट दाखवत बॅरी विचारतो “ती तू आहेस ना काउंटेस?” “होय. अन्तोन, माझ्या मुलाबरोबर. हे पोर्ट्रेट वॉर्सामधे चितारले होते, युद्ध समाप्तीनंतर लगेचच.” “पहिल्या महायुद्धानंतर…” डॉक् खुलासा करतात. “त्या काळात अशी युद्धांची आकड्यांनी मोजदाद होत नव्हती…” काउंटेस फटकारते “… आम्ही त्या युद्धाचा उल्लेख ‘द ग्रेट वॉर’ असाच करत असू.”  पोर्ट्रेटच्या खाली फायरप्लेसवरच्या वर  एका  कोपर्‍यात ऑस्करची बाहुली विराजमान झालेली दिसते. एवढ्यात डॉक् ने लपवलेली ती बाटली घेऊन मिस बाल्फोर परतते. सर्वजण आपापले कप हाती घेतात.
“तुमचे ते स्क्रीप्ट…” काउंटेस अखेर विषयाला हात घालते “… आम्ही ते सगळे वाचले आहे. अगदी शेवटच्या पानापर्यंत. तुला त्याबाबत आमचे मत ऐकायची उत्सुकता असेल ना?” “अर्थातच…” संवादाची सुरुवात कुठून करावी या विवंचनेत असलेला नि  तिच्याकडूनच संभाषणाची सुरुवात झाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकून बॅरी म्हणतो. “थोडक्यात सांगायचं तर आम्हाला त्यात काडीचाही रस नाही.” ती त्याच्या उत्साहावर विरजण टाकते. ” या ‘आम्ही’च्या व्याख्येत ‘फेडोरा’ देखील येते?” बॅरीची चिकाटी दाद देण्यालायक असते. “अर्थातच… म्हणजे माझी तशी खात्री आहे की तिलाही असंच वाटंत असणार.” काउंटेस म्हणते.  “तसं असेलही. पण तुमची हरकत नसेल तर मला तिच्याशी स्वतः त्याबाबत बोलायला अधिक आवडेल.” आपला प्रस्ताव फेडोरासमोर मांडण्याची ही संधी बॅरी हातातून निसटू देणार नसतो. “पण दुपार ही तिची विश्रांतीची वेळ आहे. त्यात अडथळा आणलेला तिला अजिबात आवडत नाही.” डॉक्टर मधेच बोलतात. “हरकत नाही. तिची विश्रांती पुरी होईपर्यंत मी थांबेन.” बॅरी आपला हेका सोडायला तयार नाही. “तू तुझा वेळ उगाच फुकट घालवत आहेस.” काउंटेस म्हणते. “फेडोराने चित्रपटाच्या पडद्यावरून कायमची एग्जिट घेतली आहे हे तुझा कानावर आले असेलच.” “यापूर्वीही तिने चित्रपटसृष्टीला अलविदा केला होता. पण ती पुन्हा आली ती पूर्वीपेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक उंच अभिनेत्री म्हणूनच.” बॅरी म्हणतो. “एक्केचाळीस चित्रपट केलेत तिने, एवढे पुरेसे नाही का?” काउंटेस उद्वेगाने विचारते. “जर एखादा अद्वितीय चित्रपटाची ऑफर आली नाही तरच” एका हाताने आपले स्क्रिप्ट उचलून तो संकेत देतो. “आह. ‘अना कारेनिना’ची कथा काही अद्वितीय नाही.” काउंटेस झिडकारते. “गार्बोने दोनदा अना स्क्रीनवर साकारली आहे१.”  “सो व्हॉट? दिस टाईम वी कॅन डू इट राईट.” बॅरीचा प्रतिसाद किंचित गर्विष्ठपणाकडे झुकणारा. “वाईड स्क्रीन, रंगीत चित्रपट, अस्तित्वहीन सेन्सॉरशिप, आपण यातून एक सर्वश्रेष्ठ प्रीतीकथा सादर करू शकतो.” तो पुढे म्हणतो. (थोडक्यात तो कथेपेक्षाही, तांत्रिक बाजूंबाबत अधिक आशावादी असावा. तसेच चित्रपट प्रसिद्ध व्हावा, त्याने धंदा करावा  यासाठी आवश्यक असलेल्या कलाबाह्य गोष्टींबाबतही. यावरून तो स्वत: एक सर्वसाधारण, प्रवाहपतित असा निर्माता असावा किंवा नाईलाजाने बनू पाहत असावा अशी शक्यता दिसते. )  “हा: तो केवळ रशियन सोप ऑपेरा आहे.”  काउंटेस त्या कथेची संभावना करते. “आणि तो शेवट…? एक स्त्री आपल्या प्रिय व्यक्तीकडून झिडकारली गेलेली… चक्क रेल्वेखाली आत्महत्या करते म्हणे. किती हास्यास्पद.” “टॉलस्टॉय… आणि… हास्यास्पद?” बाटलीतली उरलेली कोन्याक आपल्या कपात ओतत डॉक्टरही या चर्चेत उडी घेतात. “त्याला स्त्रियांबाबत काही समजत नव्हतं.” काउंटेस अजूनही आक्रमक आहे. “लिओ…निकोलायविच… टॉलस्टॉय…?” एकेक शब्दावर जोर देत डॉक्टर काउंटेसला डिवचतात. “एका आत्महत्त्या करणार्‍या स्त्रीच्या मनात त्याही वेळी असा नक्कीच असा विचार येईल की तिच्या मृत्यूनंतर ती इतरांना कशी दिसेल. तेव्हा ती गोळ्या खाऊन आत्महत्त्या करेल, नस कापून घेईल, गळ्यात धोंडा बांधून पाण्याचा तळ गाठेल किंवा अगदी स्वतःलाच शूट करून आयुष्य संपवेल. पण काहीही झालं तरी ती स्वतःला चालत्या गाडीखाली अशी झोकून देणार नाही.” (अनाच्या मानसिकतेबाबत, तिच्या आत्महत्त्येमागच्या कारणमीमांसेबाबत खुद्द काउंटेसच किती अनभिज्ञ होती, नि टॉलस्टॉयला स्त्री-स्वभावाचे किती अचूक ज्ञान होते याचा प्रत्यय तिला यथावकाश येणारच असतो.) पण मृत्यूनंतरही आपण विद्रूप दिसू ही कल्पनाही तिला सहन होणार नाही.” खरंतर काउंटेसचे स्वतःचेच  विचार असे ‘अना’च्या निमित्ताने बाहेर पडतात. तिच्या आवेशाने अस्वस्थ झालेला बॅरी तिची नजर चुकवतो नि दुसरीकडे पाहू लागतो. इतक्यात वरच्या सज्ज्यात त्याला हालचाल जाणवते. पाठोपाठ “मला ते स्क्रिप्ट आवडलं.” असा अभिप्राय ऐकू  येतो. सामोरी येते ती खुद्द फेडोरा.  “खास करून तो शेवट.” ती पुढे म्हणते. “तो किती हळवा, कातर नि अपरिहार्य होता नाही?” तिच्या अचानक सामोरे येण्याने बाकीचे तिघे अस्वस्थ होतात. मिस बाल्फोर तर “तू बिछान्यातून का उठलीस?” असे म्हणत तिच्याकडे धावत जाऊ पाहते. पण काउंटेस हातानेच तिला थांबवते नि फेडोराला खाली येण्याची अनुमती देते.
फेडोरा जिना उतरून खाली दिवाणखान्यात येते. केवळ घरात वापरण्याचा एकवस्त्र गाऊन तिने परिधान केला आहे. पण घरातही तिने ते पांढरे हातमोजे घातले आहेत नि डोळ्यावरचा गॉगलही. “मि. डेटवायलरना तर तू ओळखत असशीलच.” काउंटेस म्हणते “माझ्या माहितीप्रमाणे काल गावातल्या बाजारात तुमची भेट झाली होती.” बॅरी पुढे होऊन रीतीनुसार तिच्या हाताचे चुंबन घेऊन अभिवादन करू पाहतो. ती चटकन हात मागे घेते नि म्हणते “माफ करा. मला हातात हे मोजे परिधान करावे लागतात. डॉ. वॅन्डोंसारख्या ‘मिरॅकल मॅन’ला देखील वयस्कर स्त्रीचं हातावर दिसणारं वयं लपवू शकला नाही.” ती खळखळून हसते. “हात हे नेहमीच त्रासदायक असतात…आणि हो गुडघेही.” नेहमीप्रमाणे डॉक्टरांचा तिरकस प्रतिसाद. तिकडे साफ दुर्लक्ष करून ती बॅरीला विचारते “तू कधी सुरू करणार आहेस हे पिक्चर?” “तू होकार दिलास की लगेच. हॉलिवूडमधील जवळजवळ प्रत्येक स्टुडिओ यासाठी उत्सुक आहे. स्पॉन्सर्स तयार आहेत. पॅरिस, लंडन, रोम तू म्हणशील तिथे आपण शूटिंग करू शकतो. आणि तुला हवा तो दिग्दर्शक तू निवडू शकतेस, ते सगळेच तुझ्याबरोबर काम करण्यास कायम उत्सुक असतातच.”  बॅरीची ही ऑफर ऐकून फेडोरा अतिशय खूष होते. काउंटेसकडे वळून ती म्हणते “मला चित्रपटातून अजूनही मागणी आहे ही जाणीव किती सुखद आहे नाही.” आनंदाच्या त्या आवेगात ती त्या सार्‍याची कल्पना करू लागते, मधेच थांबून विचारते “व्ह्रॉन्स्कीच्या२ भूमिकेसाठी कुणाला घ्यायचा तुझा विचार आहे?” तसं अजून  काही ठरवलं नाही मी. पण आपण कुणालाही घेऊ शकतो, जॅक निकल्सन, वॉरन बेऽटी, स्टीव मक्विन…” “तू मायकेल यॉर्कला ओळखतोस?” ती मधेच घाईघाईने विचारते. “हम्म. मी एका चित्रपटात त्याला पाहिले होते.” “तो या भूमिकेसाठी एकदम पर्फेक्ट आहे. मी त्याच्याबरोबर काम केले आहे एकदा….” ती अतिशय उत्तेजित होऊन बोलू लागते. “तिने यापूर्वी केलेला शेवटचा चित्रपट… जो तिने पुरा केला नाही.” काउंटेस मधेच बोलते. ते ऐकून फेडोरा क्षुब्ध होते. “मी तो चित्रपट का पुरा केला नाही हे तू मि. डेटवायलरना का सांगत नाहीस?” “बास्स. फेडोरा, आता तू पुन्हा चित्रपटात काम करता येतील इतक्या सक्षम मनःस्थितीत नाहीस.” काउंटेस विषय तोडून टाकते. फेडोरा चिडते, पण काउंटेस डॉक्टरला मधे घालते. “तू तिला चित्रपट करायला परवानगी देशील?” ती डॉक्टरांना विचारते. “नक्कीच नाही.” डॉक्टर ठामपणे म्हणतात. “तसं करणं तिच्याबाबतीत हितकारक ठरणार नाही…आणि तुझ्याबाबतही.” बॅरीकडे वळून डॉक्टर म्हणतात. फेडोराचा संताप अनावर होतो. ती आपल्या मानसिक स्थितीबाबत आपल्या जवळच्या त्या व्यक्तींना दूषणे देऊ लागते. आपण इथून या दुर्गम विलापासून दूर माणसात गेलो तर आपण निरोगी आयुष्य जगू शकू असा तिचा दावा आहे.अनावर झालेल्या फेडोराला मिस बाल्फोर वर तिच्या खोलीत नेऊ पाहते. पण फेडोरा तिला झिडकारते. आता काउंटेसही चिडते नि हा तमाशा थांबव म्हणून सांगते. “मि. डेटवायलर जेव्हा हॉलिवूडला परत जातील तेव्हा त्यांनी अशा त्रागा करणार्‍या मानसिकदृष्ट्या अस्थिर स्थितीतील फेडोराला पाहिले असे त्यांनी तिथे सांगावे अशी तुझी अपेक्षा आहे का?” हताशपणे मुसमुसत राहिलेली फेडोरा पुन्हा पुन्हा तिची माफी मागत राहते.
काउंटेस बॅरीकडे वळून म्हणते “आता तरी तुम्हाला पटले असेल  मि. डेटवायलर. तुमच्या चित्रपटासाठी तुम्ही दुसरी एखादी अभिनेत्री शोधावी हेच योग्य होईल.”  “हे इतकं सोपं नाही.” बॅरी आता थोडा निराश झालेला दिसतो. “का बरं.  तुझे स्क्रिप्ट तयार आहे, तुझ्याकडे कडे अनेक स्टुडिओ रांग लावून आहेत, पैसे आहेत. तुला हव्या त्या अभिनेत्रीला घेऊन तू ती फिल्म करू शकतोस.” काउंटेस म्हणते. “नाही. आता ते शक्य नाही. आता ते सारे जग बदलले आहे. दाढीवाल्या पोरट्यांच्या हाती आता सगळा धंदा आहे. स्टुडिओला, निर्मात्याला, दिग्दर्शकाला कोणी कुत्रं विचारत नाही. चित्रपट आता अभिनेत्यांच्या नावावर चालतात. त्यांना स्क्रिप्ट वगैरेशी काही देणेघेणे नसते. ज्याला लेन्स आहे म्हणून कॅमेरा म्हणायचं असा हॅन्ड-हेल्ड कॅमेरा घेऊन आता चित्रपट काढले जातात. मी गेली दोन वर्षे या स्क्रिप्टवर काम केले आहे. आज माझ्या हातात सुदैवाने संधी आहे. पण फक्त फेडोराला मी अनाची भूमिका करण्यास राजी करू शकलो तरच! अन्यथा माझ्या हाती मोठे शून्य उरणार आहे.” “पण तो तुझा प्रश्न आहे.” काउंटेस झटकून टाकते. “माझे सर्वस्व मी यात ओतले आहे. मला अजूनही लेखकांचे पैसे देणे आहे. इथे येण्यासाठी मी माझ्या माजी पत्नीकडून दोन हजार डॉलर उसने घेतले आहेत…” काउंटेस मिस बाल्फोरला आपले वॉलेट आणण्यास सांगते. बॅरी थबकतो, उसळून म्हणतो “मी तुमच्याकडे पैसे मागायला आलेलो नाही.” “मी फक्त फेडोरा तुला जे देणं लागते तेच पैसे तुला देणार आहे.” काउंटेस म्हणते. “कुठले पैसे?” फेडोरा धास्तावून म्हणते. “त्या गिफ्ट शॉपमधे बॅरीने तुला उसने दिलेले.” काउंटेस शांतपणे म्हणते. फेडोरा प्रक्षुब्ध होते. संतापाने ती ओरडू लागते “मला एखाद्या लहान मुलीसारखं वागवत आहात तुम्ही. मला स्वातंत्र्य हवं आहे, माझं स्वत:च आयुष्य हवं आहे.” ती ओरडत असतानाच मिस बाल्फोर तिला पकडून तिच्या खोलीकडे नेऊ पाहते. पण फेडोरा तिच्या हातून आपली सुटका करून घेऊन स्वतःच धावत जाऊन खोलीत बंद करून घेते. “हुं:, ती नेहमीच असा नाटकीपणा करत असते.” काउंटेस तुच्छतेने म्हणते.  त्याचे शंभर डॉलर देताना काउंटेस त्याला विचारते की तिने त्या पैशाने काय विकत घेतले? “कॅमेरा फिल्म” तो सांगतो. ती आश्चर्यचकित होते, डॉक्टरही. कारण फेडोराकडे कॅमेराच नसतो. डॉक्टर मागे वळून मिस बाल्फोरला खूण करतात, ती ताबडतोब फेडोराच्या खोलीकडे धाव घेते. काउंटेस क्रीतोसला हाक मारून बॅरीला परत सोडून येण्याची आज्ञा देते. “तुला फुकटची फेरी पडली याचं मला अतिशय वाईट वाटतंय.” असं म्हणत काउंटेस आपला हात अभिवादनासाठी पुढे करते. “हम्म. सॅम गोल्डविन म्हणाला होता ‘You have got to take the bitter with the sour.”असे म्हणत बॅरी तिचा निरोप घेतो. “जाताना ते स्क्रीप्ट नेण्यास विसरू नकोस…”काउंटेस आठवण करून देते.”…आणि हो त्या विजेवर गरम होणार्‍या ब्लँकेटबाबत तू जो वायदा केला होतास तो ही.” बॅरी तसे आश्वासन तिला देतो.
तो परतत असतानाच मिस बाल्फोर वरच्या मजल्यावरील फेडोराच्या खोलीचे दार जोरजोरात वाजवताना दिसते. पण फेडोरा ओरडून तिला निघून जाण्यास सांगत राहते. निरोप देण्यास आलेल्या डॉक्टरांना बॅरी विचारतो “तिला नक्की काय त्रास होतो.” “त्या ट्रीटमेंट्सचा परिणाम!  साईड-इफेक्ट्स कधीतरी समोर आल्याशिवाय कसे राहतील.” डॉक्टरांचा निरोप घेऊन बाहेर पडलेला बॅरी होडीत बसत असतानाच फेडोराच्या खोलीतून त्याला तिची कि़ंकाळी ऐकू येते. पाऊस अजूनही धुवांधार पडतोच आहे. त्या धूसर वातावरणात होडी बॅरीला त्या विलापासून दूर घेऊन जाते.
________________________________________________
१. १९२७चा चित्रपट ‘लव’आणि १९३५ चा ‘अना कारेनिना’
२. टॉलस्टॉयच्या ‘अना कारेनिना’चा प्रियकर.

फेडोरा: हरपल्या श्रेयाची आस – भाग १

एक रेल्वे प्लॅटफॉर्म. त्यावर एकच मिणमिणता दिवा. अंधार सार्‍या आसंमताला वेढून राहिलेला. प्लॅटफॉर्म किंचित वक्राकार नि त्याला समांतर रहात अंधारात गडप होऊन गेलेले रेल्वेचे दोन मार्ग. अंधारातूनच गाडीची शिटी ऐकू येते. पाठोपाठ गाडीचे रुळावरील धडधडणे ऐकू येते. समोरून अंधारात चमकणार्‍या एखाद्या जनावराच्या डोळ्यांप्रमाणे दिसणारे दोन दिवे दिसतात नि पाठोपाठ धूर ओकत धडधडत येणारे एंजिन दिसू लागते. इतक्यात शिरोवस्त्र घेतलेला एक चेहरा दिसतो. त्यावर ताण दिसतो. ती स्त्री प्लॅटफॉर्मवरून धावत येत असता त्यावरील दिव्याचा प्रकाश तिच्या चेहर्‍यावर पडतो नि त्यावरील प्रचंड भीतीचे भाव स्पष्ट दिसतात. बहुधा ती अतीव भयाने अथवा धावल्याने झालेल्या श्रमाने जोरजोरात श्वासोच्छ्वास करते आहे. समोरून प्लॅटफॉर्मलगतच्या लाईनवरून येणारे एंजिन नि कसल्याशा भयाने आकांताने प्लॅटफॉर्मवरून धावत सुटलेली ती एकमेकांच्या दिशेने धावताहेत. मागून हाक ऐकू येते ’फेडोरा…’ ती स्त्री मागे वळून पाहते, क्षणभर थबकते नि वळून थेट स्वत:ला समोरून येणार्‍या एंजिनाखाली झोकून देते.  चित्र बदलते. समोर दूरचित्रवाणीची निवेदिका दिसते, तिच्या पाठीमागे असलेल्या स्क्रीनवर भलामोठा गॉगल घातलेल्या नि फेल्ट हॅट परिधान केलेल्या एका स्त्रीचे छायाचित्र दिसते. वृत्तनिवेदिका पहिले वाक्य उच्चारते ’फेडोरा इज डेड…’ निवेदिका सांगते की हा चेहरा चित्रपटाच्या पड्द्यावर तब्बल चाळीस वर्षे अनभिषिक्त सम्राज्ञीचा होता. मादाम बोवारी, जोन ऑफ आर्क सारख्या अविस्मरणीय भूमिका साकार करणारी ही पोलिश अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या दृष्टीने नेहमीच एक गूढ होऊन राहिली आहे.
सामान्यपणे अभिनेत्रीच्या आयुष्याबद्दल सांगणारा चित्रपट अथवा कथा काय सांगणार याबाबत आपण अगदीच अनभिज्ञ नसतो. चित्रपट क्षेत्रातील गळेकापू स्पर्धा, त्यात यशस्वी होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्या दरम्यान तिला सामोरे जावे लागते ते शोषण, अनेकदा स्त्रीत्वाचा यशाची शिडी म्हणून करून घेतलेला किंवा करावा लागणारा वापर, मिळालेले यश टिकवण्यासाठी करावा लागणारा आणखी वेगळ्या प्रकारचा संघर्ष, यशापयशाच्या या लढाईत हरवलेले स्वत्व, अति उंचीवर असल्याने आलेल्या एकटेपणातून किंवा न मिळालेल्या यशातून आलेले वैफल्य, त्या वैफल्याचे वा पचवता न आलेले यश यांचे बोट धरून आयुष्यात शिरणारी व्यसनाधीनता, या सार्‍या धामधुमीत कौटुंबिक, भावनिक बाजूची झालेली परवड नि या सर्वात शेवटी उमेदीचा काळ संपून गेल्यावर येणारे भयाण हरवलेपण! जुन्या काळच्या सितारा, अभिनेत्री या चित्रपटांपासून अलिकडेच आलेल्या ’इति मृणालिनी’, डर्टी पिक्चर पर्यंत बहुतेक बहुतेक चित्रपट अथवा कथा यापैकी एक वा अधिक पैलूंच्या आधारे सामोरे येत असतात. फेडोराची कथा यातील एखाद्या मुद्याला स्पर्श करीत असली तरी एकुणात वेगळ्याच मार्गाने जाते.
चित्रपटातला हा पहिलाच प्रसंग पाहून/वाचून साहित्याच्या वाचकांना आणखी एका मनस्विनी स्त्रीची आठवण होणे अपरिहार्य आहे. आणि ती स्त्री म्हणजे लिओ टॉलस्टॉयने निर्माण केलेली अजोड व्यक्तिरेखा अना कारेनिना. वयाने बर्‍याच मोठ्या असलेल्या उच्चभ्रू समाजातील नवर्‍याकडून प्रीतीची, स्नेहाची, आपुलकीची  अपेक्षा पुरी न झाल्याने एका चंचल वृत्तीच्या जनरलच्या प्रेमात पडलेली स्त्री. सामाजिक स्थान की प्रीती या द्वंद्वात भरकटत गेलेली नि अखेर त्या द्वंद्वाचा ताण असह्य होऊन रेल्वेखाली आत्मघात करून घेणारी. हा एक प्रसंग वगळता (आणि हा प्रसंगही एका अर्थाने ‘फेडोरा’ या स्त्रीचा अंत नाहीच. कसे ते पुढे येईलच.) फेडोरा नि अना या व्यक्तिरेखांमधे काही किरकोळ साम्य दाखवता येत असलं तरी फेडोरा नि अना यांच्या व्यक्तिमत्त्वांमधे बराच फरक आहे. अना हवे ते मिळवू पाहणारी, पण ते मिळवत असताना आपण सामाजिक संकेतांना पायदळी तुडवत आहोत, व्यवस्थेच्या विरोधात पाऊल टाकतो आहोत याचा अपराधगंड बाळगत अखेर त्याचीच शिकार झालेली, नवर्‍याला सोडून आपल्या प्रीतीपात्राबरोबर राहताना त्याच्याकडून होऊ शकणार्‍या संभाव्य वंचनेबाबत सतत भयकंपित राहणारी, संवेदनशील – कदाचित कमकुवत – मनाची स्त्री. याउलट फेडोरा ही अतिशय कणखर वृत्तीची आहे. हरपल्या श्रेयाला पुन्हा एकवार हस्तगत करू इच्छिणारी नि त्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी नि त्या वाटेवर तुडवल्या जाणार्‍या कोणाच्याही दुरवस्थेबाबत कणभरदेखील अपराधगंड न बाळगणारी एक निरर्गल स्वार्थी स्त्री. अर्थात असे एकतर्फी निवाड्याचे, निर्वाणीचे मूल्यमापन करणेही तितकेसे योग्य नाही. पण अना आणि फेडोरा यांच्या प्रवृत्तीमधे मूलभूत फरक आहे एवढे मात्र नक्की.
फेडोराच्या पॅरिसमधील तिच्या प्रासादतुल्य घरात चाहत्यांची रीघ लागली आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला निरोप देण्यासाठी सारे येऊन जात आहेत. विविध टीव्ही चॅनेल्सच्या ओबी व्हॅन्स उभ्या आहेत. त्यांच्या टपावर कॅमेरे घेऊन सज्ज असलेले कॅमेरामन फेडोराची अंत्ययात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यास सज्ज झालेले आहेत. पुष्पचक्रांनी सजवलेली एक व्हॅन येऊन प्रासादासमोर थांबते. आता आपण प्रासादाच्या अंतर्भागात येतो. सहा ते आठ पुरूष उंच छत असलेला हा प्रासाद ऐश्वर्याच्या सार्‍या खुणा मिरवतो आहे. उंची पडदे, पुतळे, झुंबरे यांची रेलचेल आहे. मुख्य हॉलमधे मध्यभागी फेडोराची शवपेटी ठेवण्यात आली आहे. उजव्या बाजूला असलेल्या सज्ज्याच्या खाली तसेच डाव्या बाजूलाही तिच्या चाहत्यांनी  अखेरच्या भेटीसाठी आणलेली पुष्पचक्रे मांडून ठेवली आहेत. वरच्या सज्ज्यात काही कलाकार वायोलिनवर कुठलीशी शोकधून वाजवत आहेत.
याच वेळी कॅमेरा आपल्याला त्या हॉलच्या सद्यस्थितीचे दर्शन घडवत पुढे सरकत असतो. आत येणारा प्रत्येक जण – ज्यात अगदी लहान मुलेदेखील आहेत – आपले निरोपाचे दोन शब्द तिथे ठेवलेल्या वहीत आवर्जून नोंदवत आहेत.  दिवाणखान्याचा मध्यभागी ठेवलेल्या शवपेटीच्या पायाच्या बाजूने  एका बाजूने चाहत्यांची रांग आत येते आहे नि तिच्य डोक्याकडून वळसा घालून दुसर्‍या दिशेने पुन्हा बाहेर पडते आहे.  एका उग्र चेहर्‍याचा माणूस – हा तिथला अटेंडंट फ्रान्स्वा – अशा शोकाकुल वातावरणातही सिगरेट फुंकत आलेल्या एका चाहत्याच्या तोंडातील सिगरेट खस्सकन ओढून काढतो नि उंची मखमलीची बैठक असलेल्या खुर्चीवर उभे राहून फोटो काढणार्‍या छायाचित्रकाराला हुसकावून लावतो.  इतक्यात एक रुंद कपाळ असलेला गॉगल लावलेला पन्नाशी उलटलेला एक गृहस्थ आपले लक्ष वेधून घेतो. तो तिच्या चेहर्‍यासमोर येताच क्षणभर थांबतो, गॉगल काढतो नि तिच्याकडे निरखून पाहतो. आता कॅमेरा प्रथमच आपल्याला शवपेटीतला तो सुंदर चेहरा दाखवतो. क्षणभर विचारात पडलेला तो गृहस्थ म्हणतो ‘तिचा मृत्यू ज्या प्रकारे झाला ते ध्यानात घेतलं तर त्यांनी तिच्या चेहर्‍यावर खूपच मेहनत घेतलेली दिसते.’
हा आहे ‘बॅरी डेटवायलर’ हॉलिवूडमधील एक स्वतंत्र (म्हणजे कोणत्याही एका हॉलिवूड स्टुडिओशी संलग्न नसलेला) चित्रपट निर्माता, आपला निवेदक नि चित्रपटातील एक प्रमुख पात्रही.  यापुढील चित्रपट तो आपल्यासमोर उलगडू लागतो. ’… हे सगळे वैभव, ही आरास, ते संगीत. जणू एखाद्या चित्रपटाचा प्रीमियरच जणू.’ प्रासादाच्या वरच्या सज्जात बसलेली असते काउंटेस सॉब्रियान्स्की – फेडोराची ती गूढ सहकारी – आणि तिचा मुलगा आणि त्यांच्याबरोबर असतात डॉ. वॅन्डो. ’ओल्या आधाशी  नजरेचे, हलकट लोक.’ आपला निवेदक शेरा मारतो. ‘पण ते मला क्षणभरासाठीही मूर्ख बनवू शकत नाहीत.’ फेडोराकडे पुन्हा एकवार नजर टाकून तो म्हणतो ‘बिचारी फेडोरा. कदाचित तिचे आयुष्य वेगळ्या वळणावर गेले असते, कदाचित ती आज जिवंत असती, जर मी तिच्या शोधात तिथे कोर्फूला गेलो नसतो तर.’  आता तो या सार्‍या घटनाक्रमाचा पूर्ववृत्तांत आपल्याला सांगू लागतो…
कोर्फू शहरातील एका होटेलात चेक-इन करणारा आपला निवेदक दिसतो. इथला मॅनेजर एकदम बोलघेवडा नि फटकळ. एअरकंडिशनिंग म्हणजे डोक्यावर फिरणारा पंखा, ज्याच्या वार्‍यापेक्षा आवाजच जास्त जाणवणारा. बाथरुममध्येही गरम पाण्याच्या आश्वासनापलिकडे काही नाही. आणि होटेलमधे इंग्रजी समजणारा मॅनेजर हा एकटाच नमुना किंबहुना सार्‍या चित्रपटभर त्या होटेलमधे होटेलची कर्मचारी म्हणावी अशी ती एकच व्यक्ती दिसते. एकुण अतिशय साधारण दर्जाचे होटेल, अगदी लॉज म्हणावे असे.  हॉलिवूडच्या निर्मात्यांना, कलाकारांना असलेली ‘एक्स्पेन्स अकाउंट’ची चैन त्याच्याकडे नसल्याने स्वतंत्र निर्माता असलेल्या बॅरीने त्याला परवडण्याजोगे होटेलच त्याने निवडले आहे. बॅरी कोर्फूमध्ये आला आहे तो सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री फेडोरा हिची भेट घेण्यासाठी.  चित्रपटसंन्यास घेतलेली ही फेडोरा कोर्फूजवळच्या एका लहानशा विलावर कुण्या काउंटेस सॉब्रियान्स्की नावाच्या वृद्ध स्त्री समवेत रहात असल्याची पक्की बातमी त्याने काढली आहे. तिला आपल्या चित्रपटात काम करायला राजी करण्याचे लक्ष्य त्याच्यासमोर आहे.
बॅरीच्या विनंतीवरून मॅनेजर काउंटेस सॉब्रियान्स्की यांना फोन लावतो. पलिकडून बोलणार्‍या स्त्रीला बॅरी आपली ओळख देतो नि आपण आपली जुनी मैत्रीण फेडोरा हिला सहज, जाताजाता भेटून जाण्याची इच्छा प्रदर्शित करतो. परंतु तिकडून ती स्त्री अशी भेट होणे शक्य नसल्याचे सांगते. बॅरी तिला आपली नि फेडोराची हॉलिवूडमधील जुनी ओळख/मैत्री असल्याचे पटवू पाहतो.  परंतु ‘मॅडम फेडोरा सध्या येथे नाहीत.’  असे सांगत ती स्त्री पुन्हा एकवार भेट होणे शक्य नसल्याचे सांगते. बॅरीला ती हे सांगत असतानाच वरच्या गॅलरीला जोडून असलेल्या दारातून तून फेडोरा गॅलरीत प्रवेश करते.  फेल्ट हॅट, पांढरा शुभ्र पायघोळ झगा, डोळ्यावर अतिशय रुंद काचांचा अपारदर्शक गॉगल आणि दोन्ही हातात पांढरे हातमोजे या तिच्या एव्हाना प्रसिद्ध झालेल्या  पेहरावात ती बाहेर येते नि फोनवरील संभाषण ऐकू लागते. फोनवर बोलणारी स्त्री बधत नाही म्हटल्यावर बॅरी थोडा अधिक खुलासेवार बोलू लागतो. तो इथे आलाय तो सहज म्हणून नव्हे, तर काही निश्चित कामासाठी, जे फेडोरासाठी नि त्याच्यासाठीही महत्त्वाचे आहे. परंतु ती स्त्री फेडोरा इथे नाही हा आपला धोषा चालूच ठेवते. एवढेच नव्हे तर त्याला तिच्या पॅरिसमधल्या वा युरपमधल्या अन्य घरी संपर्क करून पाहण्याचा सल्ला देऊन त्याची दिशाभूल करू पाहते. पण ती इथेच आहे याची बॅरीला पक्की खात्री आहे. तो चिकाटीने आपले म्हणणे तिच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो म्हणतो ‘मला ती इथे काउंटेस सॉब्रियान्स्की यांच्याकडे ती रहात आहे अशी पक्की माहिती मिळालेली आहे.’ ‘तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली आहे मिस्टर.’ ती स्त्री त्याला निर्वाणीचे सांगून फोन बंद करते. ‘कोण होता तो?’ इतका वेळ हे संभाषण ऐकत असलेली फेडोरा विचारते. ’कुणी अमेरिकन टूरिस्ट आहे.’ ती फेडोराला सांगते.
कुण्या काउंट सॉब्रियान्स्की यांच्या मालकीचा असलेला ’विला कॅलिप्सो’ कोर्फू बेटांजवळच एका अगदी लहानशा बेटावर स्वतंत्रपणे वसलेला आहे. कोर्फूच्या मुख्य भूमीपासून तिथे केवळ नावेनेच जाता येते. कोर्फूमधील लोकांच्या माहितीनुसार खुद्द फेडोरा व्यतिरिक्त तिथे आणखी तीन व्यक्ती रहात असतात. पहिली म्हणजे काउंट सॉब्रियान्स्की यांची व्हीलचेअरबद्ध असणारी वृद्ध आई (काउंटेस सॉब्रियान्स्की), दु्सरी म्हणजे या स्त्रीची गवर्नेस, कंपॅनियन, नर्स वगैरे सर्व काही असणारी मिस बाल्फोर (जिचा उल्लेख कोर्फू मध्ये ’ती इंग्लिश स्त्री’ असा केला जातो)  आणि तिसरे त्या वृद्ध स्त्रीचे डॉक्टर, डॉ. वॅन्डो. अशा विजनवासात असताना डॉ. वॅन्डोचा एकमेव विरंगुळा म्हणजे कोन्याक(Cognac). तो रोज संध्याकाळी बॅरी रहात असलेल्या होटेलमधील बार मध्ये येतो नि एक अख्खी बाटली कोन्याक रिचवतो. याशिवाय त्या विलामधे प्रवेश करू शकणारे एकुण चौघे जण आहेत. फेडोराच्या गाडीचा ड्रायवर क्रीतोस (ही गाडी कायम विलापासून येणारी होडी कोर्फूच्या ज्या धक्क्यावर येते त्या धक्क्यावर कायम पार्क केलेली असे) , आठवड्यातून तीनदा घरकाम करायला जाणारी मेड-सर्वंट (तिलाही खुद्द फेडोराच्या खोलीत पाऊल टाकण्यास सक्त मनाई आहे), विलावर पत्रे पोचवणारा पोस्टमन आणि मांसाचा पुरवठा करणारा एक स्थानिक खाटिक. या चार जणांशिवाय इतर कोणालाही विलाचा दरवाजा कधीही उघडला जात नाही. एक फोटोग्राफर फेडोराचे काही एक्स्क्लुसिव फोटो मिळवावेत या उद्देशाने आपण सर्जन असल्याची बतावणी करत डॉ. वॅन्डो यांना भेटण्याचा बहाण्याने तिथे घुसला होता. पण विलावर असलेल्या दोन भक्कम अल्सेशन कुत्र्यांनी त्याचा चांगलाच पाहुणचार केलेला पाहून त्यानंतर तिथे जाण्याचे धाडस कुणीही केलेले नव्हते.
मॅनेजरच्या मदतीने बॅरी तिथे जाण्यासाठी एका बोटीची तजवीज करतो. विलाजवळ पोचताच त्याची चाहूल लागल्याने सावध झालेल्या कुत्र्यांच्या भुंकण्याने नि विलाच्या मुख्य दारावरच्या “Keep Out” या पाटीने त्याचे स्वागत होते. फोनवरील संभाषणावरून आपले इथे स्वागत होणार नाही हे ओळखून असलेला बॅरी दार वाजवण्याच्या वा हाका मारायच्या फंदात न पडता कुंपणाच्या बाजूबाजूने जाऊन आत शिरण्याची जागा शोधू लागतो. त्याला थेट आत जायची संधी जरी मिळाली नाही तर एक वळसा घालून तो विलाच्या पाठीमागच्या बाजूला समुद्राच्या बाजूला बाहेर येतो. आता तिथे असलेल्या एका उंच टेकाडावरून त्याला तारेच्या कुंपणाच्या आतील गोष्टी सहज दिसू शकतात. तिथे एका विखुरल्या वेलींच्या मांडवाखाली दोन स्त्रिया बसलेल्या दिसतात. पैकी व्हीलचेअरवर बसलेल्या एकीच्या डोक्यावर छत्री आहे, तिने नखशिखांत काळा पेहराव केला आहे, एका हाताने हातातील काठीशी चाळा करते आहे तर दुसर्‍या हाताने लांब होल्डरमधे बसवलेली सिगरेट ओढते आहे. ही आहे काउंटेस सॉब्रियान्स्की, त्या विलाची मालकीण. बाजूला लाकडाच्या साध्या खुर्चीवर बसलेली दुसरी स्त्री – मिस बाल्फोर –  तिला काही वाचून दाखवते आहे. बाजूलाच एक लहानसे टेबल मांडून ठेवले आहे. मांडवाच्या एका खांबाला बांधलेल्या हॅमॉकमधे चेहर्‍यावरून वेताची टोपी ओढून घेतलेली व्यक्ती दिसते. ती हातातल्या (माशा मारण्याच्या पंख्याने) अंगावर बसणार्‍या माशा वारीत आहे. पण तो पुरुष आहे, अजूनही बॅरीला तिथे फेडोरा दिसत नाही. तो थोडासा निराश होतो. इतक्यात त्याच्या डाव्या बाजूने तीच ती फेल्टहॅटमधील फेडोराची परिचित आकृती त्याला येताना दिसते.  त्या टेबलवर ठेवलेला फोनोग्राफ ती उघडते, बाजूला पडलेली वायरच्या दुसर्‍या टोकाला असलेली पिन उचलते नि खांबावर आधीच एक पिन लावलेल्या सॉकेटमधील पिन काढून तिथे लावते. ती पिन काढताच त्या व्हीलचेअरवरील काउंटेसच्या जवळ ठेवलेला हीटर बंद पडतो. ती खवळते. ‘माझा हीटर बंद करण्याची परवानगी तुला कोणी दिली.’ ती चिडून विचारते. ‘तू आत जाऊन का बसत नाहीस.’ फेडोरा प्रत्युत्तर देते. ‘त्याऐवजी तूच आत जाऊन का रेकॉर्ड ऐकत नाहीस.’  काउंटेसचा आवाज लक्षणीयरित्या घोगरा नि पुरुषी आहे. अखेर चिडून ती फेडोराला म्हणते ‘हे माझे घर आहे हे तू विसरू नकोस.’ ‘इथून बाहेर पड म्हणालीस तर मी आनंदाने इथून जाईन.’ फेडोरा उद्धटपणे प्रत्युत्तर देते. अखेर सहनशक्ती संपलेली काउंटेस व्हीलचेअर ओढत तिथवर जाते नि रागारागाने त्या रेकॉर्डवर आपल्या हातातल्या काठीने प्रहार करून ती फोडून टाकते. त्याबरोबर फेडोरा संतापाने बेभान होऊन तिच्यावर धावून जाते. मिस बाल्फोर हातातले पुस्तक टाकून धावत जाऊन मधे पडते नि त्यांचे भांडण सोडवते. हॅमॉकवर पहुडलेला तो  पुरुष – डॉ. वॅन्डो –  धावतो नि फेडोराला काउंटेसपासून दूर नेता नेता तिला म्हणतो ‘असं उत्तेजित होणं तुझ्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही.’ संतापलेली फेडोरा त्याच्याबरोबर जात असतानाही ‘मी तिला ठार मारीन, ठार मारीन मी तिला.’ असे ओरडत राहते. फेडोरा विलामधे आहे याची खात्री झाल्यामुळे  बॅरी पुन्हा एकवार वळसा घालून समोरच्या बाजूला येतो नि मुख्य दारावरची बेल वाजवतो. दाराचरच्या ’पीपिंग विंडो’ मधून एक उग्र चेहरा – क्रीतोसचा –  डोकावतो. बॅरी त्याला आपण फेडोराला भेटू इच्छितो असे सांगतो. ’ती इथे नाही.’ प्रश्न संपण्यापूर्वीच उत्तर पोचलेले असते. ’खोटे बोलू नकोस, मी आताच तिला इथे पाहिले.’ बॅरी वाद घालू लागतो. पुन्हा एकवार ’ती इथे नाही.’ हे उत्तर देऊन दरवाजा बंद होतो. निरुपाय होऊन बॅरी परततो.
दुसरे दिवशी समुद्रकिनारी एका रेस्तरांमधे बसून बॅरी पुढील शक्यतांचा विचार करीत बसला असतानाच  त्याला  एरवी धक्क्यावर झाकून ठेवलेली फेडोराची ती गाडी जाताना दिसते. ताबडतोब तो धावत जाऊन तिचा पाठलाग करतो. त्याच्या सुदैवाने जवळच्याच एका दुकानापाशी ती थांबते. त्यातून ड्रायवरच्या सीटवरून उतरतो तो क्रीतोस, विलाच्या दरवाजावर ‘ती इथे नाही.’ असे ठामपणे सांगत बॅरीच्या तोंडावर दार लावून घेणारा. त्याच्याकडे पहात असताना, पार्श्वभूमीवर पलिकडील दारातून बाहेर पडते खुद्द फेडोरा. क्रीतोसला हूल देऊन ती तिथला एक जिना चढून जाते नि वरच्या दुकानातील गर्दीत मिसळून जाते. तिच्या अचानक हूल देण्याने भांबावलेला तो तिथेच खिळून राहतो. हीच संधी साधून बॅरीही तिचा पाठलाग करू लागतो. पहिल्या मजल्यावरून पुढे पुढे धावणार्‍या फेडोरावर एक नजर ठेवून तो रस्त्यावरून धावू लागतो. अखेर तिला एका दुकानात घुसलेली पाहून आपला वेग वाढवतो नि पुढचा जिना चढून तिला गाठतो.  ती घाईघाईने तिथल्या काउंटरवरच्या माणसाला – थिओ – ला हाक मारते, पण तो आधीचे गिर्‍हाईक जाईपर्यंत तिला थांबवून घेतो. ते जाताक्षणीच ती अधीरपणे विचारते ‘मी ऑर्डर केलेली गोष्ट तुला मिळाली का.’ तिच्या प्रश्नाने तो दचकतो. ‘हळू बोला. आजच मिळाली आहे.’ असे म्हणत मागच्या ड्रॉवरमधून तिला एक वस्तू काढून देऊ लागतो, क्षणभर थांबतो नि तिला म्हणतो तू मला तीनशे (पेसो?) देणं आहेस. ती म्हणते मी तुला नंतर पैसे देईन. पण तिने यापूर्वीही दोनवेळा असा वायदा केलेला आहे. तो नकार देतो. ती त्याला आपले किंमती घड्याळ देऊ पाहते, पण त्याला फक्त रोख रक्कमच हवी आहे. (कदाचित मामला चोरीचा असल्याने हे साहजिकच आहे.)  अखेर तिच्याकडे पैसे नाहीत हे पाहून ती वस्तू तो परत ड्रॉवरमधे ठेवून देतो. निरुपाय झाल्याने परतू पाहणार्‍या फेडोराला बॅरी अडवतो, ‘मी बॅरी डेटवायलर. ओळखलंस का मला?’ पण तिने त्याला ओळखलेले नाही. ‘हॉलिवूडमधे १९४७ मधे मी एमजीएम’ मधे मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो. तिथे मला ‘डच’ नावाने ओळखत असत.’ ती उगाचच काही आठवल्याचा अभिनय करते नि चटकन विचारते ‘तुझ्याकडे काही पैसे आहेत?’ त्याच्याकडून १०० डॉलर घेऊन त्याआधारे थिओकडून आपली ’ऑर्डर’ ताब्यात घेते.
हवी ती वस्तू हाती आल्यावर घाईने परतू पाहणार्‍या फेडोराला बॅरी पुन्हा सामोरा जातो. ‘आपण बरोबर काम केलंय असं तू म्हणालास नाही का.’ ती औपचारिक संभाषण सुरू करते. ‘आता तर तो स्टुडिओ अस्तित्वात नाही म्हणे, हो ना?’ ‘हो म्हणजे आता असंच म्हणायला हवं.’ तो उत्तर देतो. संभाषणाचा हा धागा पकडून एमजीएम त्यातील अनेक गोष्टी, घटना, व्यक्ती यांच्याबद्दल बोलून तो तिला आपल्या जुन्या परिचयाचे स्मरण देऊ इच्छितो. तिथे झालेले बदल, दिवंगत झालेले काही सहकारी, अभिनेते यांच्याबद्दल सांगतो. ‘हम्म, काळासमोर कोणाचेच काही चालत नाही.’ ती म्हणते. ‘इतरांचे माहित नाही, पण तुझ्यासमोर काळाचे काही चालत नाही असे दिसते. तू आजही तितकीच तरुण दिसतेस.’ तो खुशामतीची संधी साधून घेतो. ‘तुला तो बीच आठवतो, सान्ता मोनिकाचा…?’ तो काही आठवण करून देऊ पाहतो. पण ‘हम्म त्याला बराच काळ लोटला आता.’ असे म्हणून ती लांबू पाहणारा संवाद थांबवण्याचा प्रयत्न करते, त्याचा निरोप घेऊ पाहते. पण तो पुन्हा एकवार तिला थांबवतो. आपण कॅलिफोर्नियाहुन खास तिला भेटण्यासाठीच आलो आहोत नि आपण आता स्वतःच चित्रपटनिर्मिती करत असल्याचे तिच्या कानावर घालतो. त्यातील एका चित्रपटाला तीन (ऑस्कर) नॉमिनेशन्स मिळाल्याचेही तो आवर्जून सांगतो. ‘मी आता फिल्मस् पहात नाही.’ ती पुन्हा विषय टाळू पाहते. पण ‘मी एक नवीन चित्रपट हाती घेतोय. त्यात एक उत्कृष्ट स्त्री भूमिका आहे, खास तुझ्यासाठी लिहिलेली.’ बॅरी चिकाटीने विषय पुढे नेतो. ‘खरंच?’ ती आश्चर्यचकित. ‘मी तुला स्क्रिप्ट पाठवलं होतं’ तो आठवण करून देतो. ‘पण मला तर ते कधीच मिळालं नाही.’ ’खरंतर मी तुला तीन प्रती पाठवल्या होत्या, एक तुझ्या पॅरिसच्या पत्त्यावर, एक तुझ्या युरपमधल्या दुसर्‍या घरी  आणि तिसरे या इथल्या पत्त्यावर.’ आता तो ही आश्चर्यचकित झालेला. ‘ते माझ्यापासून बर्‍याच गोष्टी दडवून ठेवतात…’ ती विश्वासात घेतल्याच्या दबक्या आवाजात त्याला सांगते. ’कोण ते?’ त्याला उत्सुकता आहे. ’…ते माझ्याशी नेहमीच खोटं बोलतात नि कायम माझ्यावर पाळत ठेवतात.’ ’ते विलामधले लोक? पण ते तर तुझे मित्र आहेत.’  ’मला कोणी मित्र नाहीत.’ फेडोरा सांगते. हे संभाषण चालू असतानाच क्रितोस आणि मिस बाल्फोर तिथे दत्त म्हणून उभे राहतात. त्यांना पाहताच ‘मला आता जायला हवे.’ असे म्हणत ती घाईघाईने तिथून निघू पाहते. पण मिस बाल्फोर चांगलीच घुश्शातच आहे, ‘मी तुला गाडीत बसूनच  वाट पहा म्हणून सांगितलं होतं.’ ती दटावते. ‘पण मी तर फक्त काही मासिके खरेदी करण्यासाठी इथे आले.’ असे म्हणत हाती येतील ती चार मासिके उचलून फेडोरा चालू लागते. मासिकांचे पैसे देऊन परतण्यापूर्वी ती मिस बाल्फोर बॅरीकडे एक तीव्र कटाक्ष टाकून झाल्या प्रकाराबद्दल आपली नापसंती व्यक्त करते.
फेडोरा ही एक जगप्रसिद्ध अभिनेत्री. अनेक चित्रपटांतून तिने रुपेरी पडदा गाजवलेला, अनेक चाहत्यांना आपल्या केवळ दर्शनानेच घायाळ केलेले. प्रसिद्धी नि पैसा तिच्या पायाशी लोळण घेतो आहे. युरपमधे पॅरिससह काही महत्त्वाच्या शहरातून तिची प्रासादतुल्य घरे आहेत. पण ते सारे सोडून ती इथे कॉर्फूमधे राहते आहे ते ही कुण्या दुसर्‍याच स्त्रीच्या मालकीच्या विलावर. ते का? बरं त्यांचे संबंध स्नेहाचेही दिसत नाही. शक्य झाल्यास इथून निघून जाण्याची तिची इच्छा आहे. मग इतक्या श्रीमंत, प्रसिद्ध नि आत्मनिर्भर व्यक्तीला तिथे बांधून ठेवणारे असे काय बंध आहेत तिथे?  एवढी श्रीमंत पण तिच्या हाती तिचे पैसे नाहीत, तेव्हा ते ही कुण्या दुसर्‍याच्याच हाती असावेत नि कदाचित तिला हवे तेव्हा दिले जात नसावेत. तिला स्वतंत्रपणे कुठेही जाण्याची परवानगी नाही. मिस बाल्फोरची कडक नजर कायम तिच्यावर रोखलेली. पण ती अशी कोण आहे की जिच्या धाकात फेडोराने रहावे? थिओकडून फेडोरा नक्की काय खरेदी करू पाहते जे तिचे जबरदस्तीने पालक बनू पाहणारे ते विलामधील लोक तिला देत नसावेत? विलाची मालकीण असलेली ही जी काउंटेस आहे तिच्यात नि फेडोरात सतत संघर्ष होत असावा असा तर्क करता येऊ शकतो. असे असताना फेडोरा हे असे आयुष्य का जगते आहे, त्या कोणत्या अदृश्य साखळ्या आहेत ज्यांनी तिला तिथे बांधून ठेवले आहे? बॅरीच्या आणि चित्रपट पाहणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात हे नि असे अनेक प्रश्न नक्कीच उभे राहिले असणार. या प्रश्नांचा वेध घेत बिली वाईल्डरचा ‘फेडोरा’ आपल्यासमोर उलगडू लागतो.
(क्रमश:) । पुढील भाग >>

चविष्ट जग

अमेरिकेत आल्यावर गेली पंधरा वर्ष आवर्जून आम्ही वेगवेगळ्या देशातले पदार्थ खायला  रेस्टॉरंट धुंडाळत असतो. सुरुवातीला सगळं काही रुपयात बदलून हिशोब करायचो पण जिभेचे चोचले पुरवताना हिशोब मोकळा सोडलेला असायचा.

रेस्टॉरंटमध्ये आवडलेला पदार्थ घरी करुन बघायला फार गंमत वाटायची. पण त्यासाठी पाककृती मिळवणं पंधरा वर्षापूर्वी सोपं नव्हतं. पाककृती संकेत स्थळावर सहज उपलब्ध नव्हत्या. मग वाचनालयातून पुस्तकं, मासिकं आणून,  प्रतिक्षालयात पडलेल्या अंकातून किंवा त्या त्या देशातील व्यक्तींना गाठून पाककृती मिळवायला लागायची.

प्रथम जशास तशी, नंतर हळूहळू  जिभेला अधिकाअधिक रुचेल त्याप्रमाणे पाककृतीत बदल केले. कोणत्या ना कोणत्या समारंभात किंवा कुणाच्या घरी खाल्लेला पदार्थ आवडला की तो करुन पाहिल्याशिवाय अजूनही चैन पडत नाही. त्यातूनच आत्तापर्यंत देशोदेशीचे खूप वेगवेगळे माझ्या स्वंयपाकघरात शिजले.

बकलावा,  ग्रील्ड मशरुम पास्ता, आरगुला बेझिल पेस्तो सॅडविच, स्पिनॅच पास्ता विथ ॲसपॅरगस पेस्तो, तिरामिसु असे वेगवेगळे पदार्थ केले की  देशाबाहेर नव्याने पाऊल टाकणार्‍यांना ते आवडतात पण आधी कुठे खाल्लेले नसतात त्यामुळे नावंही माहित नसतात. मग ते कसे करायचे आणि साहित्य कुठे मिळेल असे प्रश्न पडतात. कृती ऐकली, सोपं आहे असं लक्षात आलं की करुन पहायचं असतं.

मैत्रीणींना या पाककृती सांगताना, इ मेल करताना वाटलं की अमेरिकेत माझ्या चविष्ट जगात प्रवेश करुन, पाककृती मिळवून नव्याने आलेल्यांना पण हे पदार्थ करुन पाहता येतील. पहा करुन नक्की आणि मला सांगाही कसे झाले हे पदार्थ.

हे माझं चविष्ट जग नक्की डोकावा त्यात

’मोसम’ ला जसा प्रतिसाद दिलात तसाच या पदार्थांना  मिळेल अशी अपेक्षा  

आठवण येणार नाही

नं तुझे राहिले काही 
नं माझे राहिले
तुटले माझे हृदय होते 
पण पाणी डोळ्यातून वाहिले 

त्या क्षणाची आठवण म्हणून
कोवळीशी फुंकर घाल येउन
या तुटलेल्या हृदयाला हातात घे
आणि जाळ कुठेतरी  नेउन

म्हणजे तुझी आठवण येणार नाही
चैताली कदम 

कायदा आणि गणित

कायदा गाढव असतो असे सर्वजण मानतात. पण कायद्याला गणित समजत नाही असेहि दिसते! इटलीमधील एका केस मध्ये असे दिसून आले कीं न्यायाधीशाना गणित येत नाही व समजतहि नाही त्यामुळे एका केसमध्ये आरोपीची शिक्षा अपिलात रद्द करण्यात आली होती. आता वरच्या कोर्टाने तो निर्णय रद्द ठरवून केस पुन्हा चालवण्याचा आदेश दिला आहे. ही एक गाजलेली केस आहे म्हणे. २००७ साली अमान्डा नॉक्स आणि तिचा मित्र राफाएल सोल्लेसिटो यांच्यावर मेरेडिथ कर्चर नावाच्या ब्रिटिश स्त्रीच्या खुनाचा खटला चालला. कर्चर ही नॉक्सची रूम पार्टनर होती. त्या दोघाना शिक्षा झाली. पुराव्याचा महत्वाचा भाग म्हणजे सॉल्लेसिटोच्या घरात सापडलेला एक सुरा. त्याचेवर रक्त होते व DNA टेस्ट्नंतर ते रक्त मेरेडिथचे असल्याचे सिद्ध झाले. मात्र रक्ताचे सॅंपल फार अल्प असल्यामुळे थोडी अनिश्चिततेला जागा होती. कारण त्यावेळपर्यंत DNA टेस्ट्ची पद्धत तशी नवीन होती. या केसवर निदान १० पुस्तके लिहिली गेली आहेत त्यातले एक खुद्द नॉक्सनेच लिहिले आहे. २०११ साली जेव्हा नॉक्सचे अपील सुनावणीस आले तेव्हां सरकारपक्षातर्फे अशी मागणी करण्यात आली कीं पुन्हा एकदा डीएनए टेस्ट करावी कारण जरी सॅंपल लहान असले तरी टेस्टिंगच्या पद्धती खूप सुधारल्या आहेत तेव्हा विश्वसनीय निर्णय आता शक्य आहे. मात्र ही मागणी नॉक्सचे वकील व न्यायाधीश यानी नाकारली. मूळच्या टेस्टची शंकास्पद विश्वसनीयता हाच अपिलाचा मुख्य आधार असल्यामुळे वकिलानी तसे करणे नैसर्गिकच होते. पण न्यायाधीशानी असे कां केले? त्याने असा प्रश्न केला कीं मूळ टेस्ट केली तेव्हां जर सर्व जाणकारांचे मते निर्णय काहीसा अविश्वसनीय होता तर आता पूर्वीपेक्षाही लहान सॅंपलवर केलेली तीच टेस्ट निर्णायक कशी ठरेल? या कारणास्तव दुसरी टेस्ट न करतां मूळच्या टेस्टची संदिग्धता विचारात घेऊन व संशयाचा फायदा देऊन दोन्ही आरोपीना मुक्त केले गेले. न्यायाधीशानी टेस्ट करण्याच्या पद्धतीतील सुधारणा तर विचारात घेतल्या नाहीतच पण गणितशास्त्र समजून घेतले नाही कीं तीच टेस्ट तशाच पद्धतीने केली तरीहि जर मूळचाच निर्णय पुन्हा मिळाला असता तर त्याची विश्वसनीयता गणितशास्त्राप्रमाणे अर्थातच वाढली असती! विरुद्ध निर्णय मिळाला असता तर मात्र दोन्ही वेळचे निर्णय अविश्वसनीय मानावे लागले असते! आता अचानक वरिष्ठ कोर्टाने हा निर्णय फिरवून दोन्ही आरोपींवर पुन्हा केस चालवली जावी असा आदेश दिला आहे. यामागे नक्की कारण काय हे कळलेले नाही पण दुसरी टेस्ट नाकारणार्‍या न्यायाधीशाचे गणितशास्त्राचे अज्ञान हेच बहुधा कारण असावे. आकडेशास्त्राच्या अज्ञानापोटी कोर्टाने चुकीचे निर्णय घेतल्याची अनेक उदाहरणे बातमीत दिली होती. त्यातील एक तर विलक्षणच आहे. ल्युसिया बर्क नावाच्या एका डच नर्सला अनेक पेशंटांच्या मृत्यूला कारण झाल्याचे ठरवून सहा वर्षांची शिक्षा झाली होती. सहा मुले व इतर काही पेशंट तिच्या वॉर्डमधे मेले होते. यात खरे तर तिचा दोष काहीच नव्हता व सुरवातीला ते सर्व मृत्यु नैसर्गिकच ठरवले गेले होते. मात्र तिच्या वॉर्डमध्ये अनेक मृत्यु झाले व असे आपोआप होण्याची गणिती शक्यता सरकारपक्षाच्या एका गणितज्ञाने ३४ कोटीत एक अशी ठरवली होती! या गणितात अर्थातच खूप चुका होत्या पण गणिताच्या अज्ञानामुळे जज्जाने हे प्रमाण ग्राह्य मानून बर्कला दोषी ठरवले. अपिलांमध्ये अनेक गणितज्ञांनी सरकारी गणितातील अनेक चुका दाखवून दिल्या आणि इतर काही पुरावा नसताना निव्वळ तिच्या वॉर्डात अनेक मृत्यु झाले यासाठी तिला गणिताने दोषी ठरवणे अन्यायाचे असल्याचे दाखवून दिले व अखेर ते मान्य करावेच लागले. ज्याना कायदा कळतो त्याना गणित कळत नाही त्याला काय करणार?

उखाणा

बंडू आणि चिंगीच लग्न झालं,
तेव्हा बंडूने चिंगीसाठी घेतलेला उखाणा…..
“गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
माझी बायको आहे मोठी लुच्ची…..”
हे ऎकुण मग चिंगी ने रागवून नाव घेतले…….
“झेंडूचे फुल हलते डुलू डुलू,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलू…..”

Filed under: उखाणे, विनोदी चुटकुले

बकलावा

बकलावा हा नक्की कुठून आलेला पदार्थ आहे याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. मध्यपूर्वेतील देशांना बाकलावा हा त्यांचा पदार्थ वाटतो. पण  असूर त्याचे  खर्‍या अर्थी त्याचे मालक आहेत. सणासुदीला हा पदार्थ करण्याची प्रथा होती. श्रीमंताची चैन म्हणून बाकलावाची ओळखला जाई.

नंतर हळूहळू मुळ पाककृतीत थोडा थोडा बदल होत गेला. आता ग्रीक आणि टर्कीश दोघंही बाकलावावर आपला हक्क सांगतात. टर्कीमध्ये तर म्हण प्रचलित आहे, “बकलावा रोज रोज खाण्याइतकी श्रीमंत नाही आपल्याकडे.”

 फिलो डोव हा  शब्द  पान या ग्रीक शब्दापासून आला आहे. पानासारखं पातळ या अर्थी.

 साहित्य:  
१ पाकिट – (16 ounce) फिलो डोव (phyllo dough)  त्यातील एक गुंडाळी (Roll) (कोणत्याही दुकानात फ्रिझर भागात मिळतं)
३ वाट्या पिस्ते, अक्रोड, बदाम, पिकॅन्स (आवडीप्रमाणे एकच किंवा एकत्रित)
१ बटर स्टिक
१ चमचा दालचिनी कुटून
१ कप पाणी
५ चमचे साखर
१ चमचा व्हॅनिला अर्क/ वेलची पावडर
१/४ कप मध
६ लवंगा
   लिंबू
  किंचित मीठ

कृती:
फिलो डो पाकिटावरील सूचनेप्रमाणे बाहेर काढून ठेवा. (रात्रभर फ्रिजमध्ये)
अक्रोड, बदाम, पिस्ते कॉफी ग्राईंडर मधून सरबरीत करा. बारीक बारीक तुकडे रहायला हवेत. दालचिनी आणि ३ लवंगांची पावडर घालून मिश्रण एकत्र करा.
बटर स्टिक मायक्रोव्हे्वेबल भाड्यांत घालून १ मिनिटं गरम करा. तूप पातळ व्हायला पाहिजे.
फिलो डो पाकिटातून काढून सुकू नये म्हणून ओलसर फडक्याने झाकून ठेवा.
बेकिंग ट्रे मध्ये फिलो डोच्या चार पट्ट्या घाला. ब्रशने तूप लावा. एक ते दोन चमचे अक्रोड, बदाम, पिस्ता, पिकॅनचं मिश्रण फिलो डोच्या पट्ट्या वर पसरा.
एकू्ण आठ थर व्हायला पाहिजेत. पट्ट्या, बटर, मिश्रण असा प्रत्येकवेळेला क्रम ठेवा.
शेवटी सर्वात ८ पट्ट्या असायला हव्यात.
धारदार सुरीने चौकोनी किंवा पाहिजे त्या आकारात तुकडे कापा. (चित्र पहा)
३० ते ४० मिनिटं किंवा बाकलावाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत ३५० डिग्री फॅरेनहाईट्वर भाजा.

बकलावा तयार होईपर्यंत साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर विरघळली की व्हॅनिला आणि मध घाला, लिंबाचे एक दोन थेंब आणि अगदी किंचिंत मीठ. २० मिनिटं मंद आचेवर राहू द्या.

बकलावा झाला की ओव्हनमधून काढून ताबडतोब तयार झालेला मधाचा रस चमच्या चमच्याने त्यावर घाला. थंड होऊ द्या. बेकिंग ट्रे झाकू नका. थंड झाल्यावर बाकलावाचा आस्वाद घ्या.

साधारण 24 बकलावा तयार होतात.

कधी कधी मला ही वाटतं..

कधी कधी मला ही वाटतं
माझं ही कुणीतरी असावं
मीठी मध्ये तिच्या
तासन तास बसाव
तिच्यावर इतक प्रेम करावं
की जगातलं सर्व सुख तिला द्यावं
अन तिच्या डोळ्यात आपलं
प्रेमाचं जग पाहावं
तिच्याबरोबर पावसात एकत्र फिरावं
एकत्र नदीकाठी बसावं
तिच्या सहवासात
स्वताला विसरावं
सुख दुखात तिच्या
असं सामील व्हावं
की रुततील काटे तिच्या पायाला
आणि लागतील माझ्या काळजाला घाव
मिळेल का अशी प्रियसी
नेहमी शोधात फिरावं…
मिळेल अशी कोणी तरी
या आशेवर जगत राहावं..