एक अफगाणी, त्याची कहाणी

 .

तो प्रसंग अजूनही आठवला की गंमत वाटते. जेवत असताना आमच्या टेबलावर तीन अफगाण, दोन पाकिस्तानी व मी एकटा हिंदुस्थानी जेवायला बसलो होतो. आणि अचानक एका अफगाणाने “आप कहाँ से हो?” असा प्रश्न विचारला. “मुंबईसे” असे मी म्हटल्यावर तो क्षणभर चकित झाला. मला सगळ्यांसमोर प्रश्न विचारला, “आप क्या रॉ के आदमी हो?” त्याच्या ह्या अकस्मिक प्रश्नावर टेबलावरील सर्व सज्जन गृहस्थ माझ्याकडे रोखून पाहायला लागले.

 मी हसून त्याला म्हणालो, “नाही रे, पण तुला असे का वाटले?” त्याने मला सांगितले की, तो पाकिस्तानमध्ये कुठे राहत होता, सध्या तेथे काय परिस्थिती आहे. त्यावर त्याचे काय मत आहे, हे गेला आठवडाभर मी त्याच्याकडून सविस्तर जाणून घेतले. त्याला मी कराचीचा वाटलो, आणि मी मुंबईचा आहे असे आता अचानक कळल्यावर त्या १८ वर्षीय पठाणाने मला हा भाबडा प्रश्न विचारला. मग मी त्याला म्हणालो, “जर मी खरेच गुप्तहेर असतो, तर मी मूळचा मुंबईचा असे चारचौघात सांगितलेच नसते.” ह्या युक्तिवादाने त्याचे समाधान झाले अन माझा जीव भांड्यात पडला.
युरोपला मंदीचे चटके बसायला लागले व बुडत्या जहाजातून सर्वप्रथम उंदीर बाहेर पळतात, ह्या न्यायाने मी माझ्या पत्नीसह लंडन सोडले आणि अबुधाबी येथे आलो. तेथे सर्व काही सुरळीत चालले होते. पण माझ्या पत्नीला मात्र येथे तिची मायभूमी जर्मनी व अबुधाबी ह्यांच्यात एक लोकशाही व राजेशाही असलेल्या देशातील फरक जाणवायला लागला आणि आम्ही युरोपात परतण्याचा निर्णय घेतला.
युरोपात जर्मनीने मंदीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले व त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही माझ्या बायकोच्या देशी जायचे नक्की केले. माझ्यासाठी भाषेची प्रमुख अडचण होती, कारण मला जर्मन येत नसले तरी इतके दिवस इंग्रजी भाषेतून आमचा संवाद चालायचा. मात्र जर्मनीत हे चालत नव्हते. जर्मन भाषेची प्राथमिक जाण असणे हे जर्मनीत दीर्घकाळ वास्तव्य करण्याची मनीषा बाळगणार्‍या परकीय नागरिकांना सक्तीचे आहे.
म्हणून मी प्रथम मुंबईत आलो आणि दीड महिन्यात जर्मन भाषेचा पहिला स्तर उत्तीर्ण झालो. काळा घोड्याजवळ जर्मन दूतावासाच्या अनुदानावर गटे ही जर्मन भाषेची संस्था अल्प दरात जर्मन भाषा शिकवते. जगभर ह्या संस्थेचा दर्जा समान असतो. येथून जर्मन भाषेची प्राथमिक, जुजबी तोंडओळख करून घेऊन मी जर्मनीला आलो. मी आणि माझी पत्नी पंचतारांकित हॉटेलात आधी काम करत असल्याने साहजिकच जर्मनीत आमचा मोर्चा तेथे वळला. माझ्या पत्नीस मनाजोगता जॉब मिळाला. माझे मात्र भाषेवरून अडू लागले. अशात एका हॉटेलातून मला चक्क बोलावणे आले. माझ्या कामाचे स्वरूप हे ट्रेनिंग आणि अजून बरेच होते. माझ्या कामात माझे शिक्षण व अनुभव धरून भाषा – प्रामुख्याने इंग्रजी, उर्दू येणे महत्त्वाचे होते. ह्याचे कारण तेथील हाउसकीपिंगचा ९० टक्के स्टाफ अफगाण, श्रीलंकन (तामिळ निर्वासित), पाकिस्तानी व उरलेले दहा टक्के इराक, इराण, व आफ्रिकेतील काँगो, युगांडा, अशा देशातील होता. जर्मनीमधील फ्रँकफर्ट येथे माझे वास्तव्य होते. माझ्या मते जर्मनीमध्ये जगभरातील सर्वात जास्त निर्वासित राहतात. हे निर्वासित आपल्या मायभूमीला पारखे झालेले असतात. मात्र निर्वासित असल्याचे पारपत्र त्यांच्याकडे असल्याने हे युरोपात कोठेही जाऊ शकतात. कमी पैशात जास्त काम करण्याची त्यांची तयारी असल्याने हे लोक युरोपातील बहुतांश हॉटेलात श्रमाची कामे करतात. ह्यांना हॉटेल स्वतः कामावर घेत नाही, तर एका मध्यस्थ कंपनीतर्फे घेतात. ही कंपनी बहुधा एखाद्या तुर्की, अफगाणी किंवा पाकिस्तानी माणसाची असते. ही कंपनी ह्या लोकांना ताशी साडेपाच युरो देते आणि जर्मनीत कमीत कमी वेतन ताशी ८ ते ९ युरो आहे. तेव्हा हॉटेलला स्वतःचा कायमस्वरूपी स्टाफ ठेवणे खर्चीकच ठरेल. म्हणून त्यांना ह्या कंपन्यांचा पर्याय परवडतो. जर्मनीत कर्मचार्‍यांसाठी एक महिना भरपगारी रजा व इतर अनेक सोयी असतात, त्या ह्या कंपन्या निर्वासितांना देत नाहीत. अशा कंपन्यांचे सर्व रेकॉर्ड सांभाळणे, त्यांच्याशी संवाद साधणे (कारण त्यांची भाषा मी सफाईने बोलू शकतो), त्यांना आवश्यक ते ट्रेनिंग देणे, अशा प्रकारचे माझे काम होते.
संध्याकाळी जर्मन भाषेचा वर्ग आणि सकाळी नोकरी, असा माझा दिनक्रम ठरला होता. असेच एके दिवशी मी हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर खोल्यांसमोरून जात असताना, माय नेम इज खान ह्या सिनेमातील शाहरूखचे डायलॉग एका खोलीतून माझ्या कानावर पडले. तेथे जाऊन पाहतो तर पाच ते दहा अफगाण कामधाम सोडून जमिनीवर फतकल मारून बसले होते, आणि अगदी आय.एन.टी. एकांकिकेमध्ये जसे जीव तोडून संवाद म्हणतात त्या थाटात हा १८ वर्षाचा पठाण मुलगा ते संवाद म्हणत होता. मला पाहताच तो एकदम गप्प बसला. मी विचारले, “नाव काय तुझे?” त्यांने सांगितले, “शेर खान” आणि तो मूळचा कंधारजवळचा असून पाकिस्तानात अटकजवळ त्याचे लहानपण गेल्याचे सांगितले. अटक हा शब्द कानावर पडला आणि अटकेपार झेंडे लावलेली मराठी फौज आठवली. येथे माझी आणि शेरखानची पहिली भेट झाली आणि पुढे आमची गट्टी जमली. ह्याचे कारण म्हणजे त्याचे बॉलिवूडवर निस्सीम प्रेम आणि ह्या सर्व लोकांमध्ये तो एकटा जर्मन युनिवर्सिटीत संध्याकाळी जात होता. त्यामुळे ह्या सर्व लोकांमध्ये तो बराच पुढारलेला आणि सुशिक्षित होता. त्याला हाताशी धरल्याने तो पश्तून किंवा डारी भाषेत अफगाण लोकांना काही महत्त्वाची माहिती सांगायचा. पश्तून ही प्रमुख भाषा असली तरी संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये डारी भाषा बहुतेकांना समजते. उझबेक व तुर्कमेनिस्तानी भाषासुद्धा तेथे बोलल्या जातात. जशी पाकिस्तानात उर्दू राष्ट्रभाषा असली तरी पंजाबी भाषेचा तेथे पगडा आहे, तसे अफगाणिस्तानमध्ये पश्तून आणि डारी भाषेचे आहे. ही भाषा प्रामुख्याने इराणलगतच्या अफगाणी भागात बोलली जाते, कारण इराणी भाषा ह्या भाषेच्या अत्यंत निकट आहे. त्यामुळे अफगाण डारी भाषेत सर्व संवाद करत असल्याने इराणी लोकांना आमच्या हॉटेलात ते विनासायास समजायचे. लंडन आणि अबुधाबी येथे माझा पाकिस्तानी लोकांशी कामानिमित्त संबंध आला होता. राजकारण ते सर्व विषयावर चर्चा करताना त्यांची मते, त्यांच्या आपल्याविषयीच्या कल्पना व आपल्या त्यांच्याविषयीच्या कल्पना, असे माहितीचे आदानप्रदान व्हायचे. एक अफगाणी, त्याची कहाणी, त्याच्याच जबानी तो प्रसंग अजूनही आठवला की गंमत वाटते.
शेर खानचे कुटुंब पाकिस्तानात अटकजवळ राहते असे त्याने मला सांगितल्यावर त्याच्याशी गप्पा मारताना माझ्या तोंडातून पेशावर, हिंगोरा दक्षिण, उत्तर वझिरीस्तान अशी नावे किंवा चर्चा करताना बलुचिस्तान ते अगदी कराचीमधील लेहेरी (म्हणजे त्यांची धारावी) परिसरात उसळलेल्या अफगाण विरुद्ध मुजाहीर लोकांच्या दंगली असे विषय असायचे. ह्यामुळे मी बहुधा कराची शहरातील रहिवासी असावा, अशी त्याची समजूत होती. कितीतरी पाकिस्तानी लोकांशी बोलताना मी भारतीय आहे हे पहिल्यांदा स्वतःहून सांगत नाही. कारण जेव्हा आमच्या चर्चेचा रोख भारतावर किंवा राजकारणावर येतो, तेव्हा त्यांची मते, त्यांचे समज, मानसिकता ह्यांचा थांगपत्ता लागतो. शेर खानच्या गावाजवळ तालिबान व रशियन ह्यांच्यात तुंबळ युद्ध झाले, तेव्हा त्याचे घर व काही नातेवाईक पैगंबरवासी झाले. तो पंधरा वर्षाचा असताना तालिबान व अमेरिकन सैन्य यांच्या युद्धात त्यांच्या अर्ध्या गावावर अमेरिकन धार्जिणा असल्याचा ठपका बसला. तेव्हा त्या लोकांना काही काळ तालिबानी हल्ले सोसावे लागले व शेवटी पाकिस्तानातील निर्वासितांसाठी बनवलेल्या छावणीमध्ये त्यांची रवानगी झाली. तेथून त्याचे व त्यांच्या भावाचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाटोच्या अधिकार्‍यांच्या कामी आले. त्याचा भाऊ दुभाषी म्हणून काही काळ कार्यरत होता. मात्र त्यांच्या कुटुंबाला तालिबानकडून पहिली वॉर्निंग मिळाली आणि दुसर्‍या वॉर्निंगनंतर त्यांना जर्मनीमध्ये पाठविण्यात आले. आता शेर खानने हे तालिबानी वॉर्निंग प्रकरण थोडक्यात असे सांगितले : त्याचा उस्ताद, जो त्याला अफगाण शाळेत तालीम द्यायचा, तोसुद्धा काही काळ नाटोच्या अधिकार्‍यांचा दुभाषी होता: त्यास जर्मन, इंग्रजी ह्या भाषा येत होत्या व महिन्याला काही हजार डॉलर इतका त्याचा पगार होता. मात्र तालिबानकडून त्यास पहिली, दुसरी वॉर्निंग आली की, हे काम सोडून दे. पण ह्यावर उत्तर म्हणून त्याची पगारवाढ करण्यात आली व उस्तादने आपले काम चालूच ठेवले. एके दिवशी तालिबानकडून त्याचे अपहरण करण्यात आले व त्याच्या मानेवरून सुरी फिरवण्यात आली. स्थानिक भागात सीडी वाटप करून ह्याचे चित्रीकरण दाखविण्यात आले.
हे ऐकून माझी वाचा बंद झाली होती, पण काहीतरी विचारायचे म्हणून उगाच अवसान आणून मी त्याला विचारले, “अरे, सुरी ही नेहमी गळयावरून फिरवतात. मग हे मानेवरून का बरे?” ह्यावर शेर खान म्हणाला, “गळा चिरला की काम लगेच तमाम, मानेवरून सुरी फिरली की तडफड…”
अफगाणिस्तान, आपली मातृभूमी आपल्याला कायमची तुटली ह्याबद्दल खोल वेदना त्याचा बोलण्यातून जाणवत होती. त्याचा भाऊ ह्याच हॉटेलात काम करायचा. त्याने ह्याच्या बॉलिवूड प्रेमाबद्दल सांगितले. शाहरूख, सलमान खान हे पाकिस्तानात आवडते कलाकार. विशेषतः ते पठाण म्हणून ह्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शाहरूख खानला एकदातरी पाहावे ह्या हेतूने भारतीय व्हिसा घेण्यासाठी शेर खान घरातून चक्क पळाला. पाकिस्तानातील भारतीय दूतावासाच्या बाहेर कितीतरी दिवस रांगेत होता. खिशात पाकिस्तानी दोन हजार रुपये. शेवटी त्याला कसेबसे समजावून घरी आणले.
शाहरूखला प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो बर्लिनला जाऊन आला. ओम् शांती ओम् च्या प्रीमियरसाठी शाहरूख तेथे आला होता. सलमान आणि कतरिना ह्यांच्या ब्रेकअपची न्यूज वाचून ह्यांचा जीव तडफडला. सगळेच पठाणांना स्वतःच्या कामासाठी वापरून मग वार्‍यावर सोडतात. सलमानचा वापर करण्यात आला आहे, अशी त्याची ठाम समजूत व त्यास सहानुभूती.
ह्या लोकांच्या डोक्यात कधी काय येईल हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र तेथे मी एक गोष्ट अनुभवावरून शिकलो होतो : चर्चा राजकारणावर असो किंवा इतर कोणत्याही भाकड विषयावर, ती वादविवाद स्पर्धा आहे असे समजून मी कधीही वाद घालत नाही किंवा प्रतिवाद करत नाही. वाक्यात शक्यतो साखरपेरणी करत एखादा शालजोडीतील हाणून ह्या लोकांना त्यांच्या वाक्यातील फोलपणा किंवा त्यांच्या चुका दाखवतो. वादासाठी वाद करणे म्हणजे सशस्त्र हिंसक कृत्यांना आमंत्रण देणे.
ह्या लोकांचे विश्व वेगळे, ह्यांची मानसिकता व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. शाहरूखचा माय नेम इज खान हा चित्रपट शेर खानने जर्मनीत सात वेळा थेटरात जाऊन पहिला, तेही युरोमध्ये दक्षिणा देऊन.
ह्यामागील कहाणीसुद्धा अशीच रोचक आहे. त्याच्या क्लासमधील जर्मनीत जन्मलेल्या तुर्की मुलीशी त्याची ओळख झाली. शाहरूखच्या सिनेमाला येतेस का? असे तिला त्याने विचारले तर हा अफगाण नागरिक असल्याचे तिला कळले. तेव्हापासून तिने ह्याच्याशी बोलणे टाकले. जर स्वधर्मीय अशी वागणूक देत असतील, तर इतरांकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्न त्याला पडला. हा सिनेमा पहिल्यांदा पाहिल्यावर त्याने दुसर्‍या दिवशी भर वर्गात त्या तुर्की मुलीला, “माय नेम इज खान, अँड आय एम नॉट अ टेररिस्ट” हे जर्मन भाषेत सुनावले. अफगाणिस्तानमध्ये भारतीय विकास कामे करत आहेत, ह्यांचे त्याला कौतुक वाटते. त्याच्या चुलत भावाला रात्री अचानक ताप आला, तेव्हा भारतीय डॉक्टरने त्याला रात्री दवाखान्यात भरती करून त्यांचे प्राण वाचवले, ही गोष्ट आजही त्याच्या मनात घर करून राहिली. म्हणूनच की काय, त्यांच्या छावणीत नामांकित पाकिस्तानी संस्थांचे काही मुल्ला जेव्हा किशोरवयीन मुलांना जन्नतमध्ये जायचा राजमार्ग दाखविण्यासाठी आले होते, तेव्हा त्याने त्या गोष्टीकडे पाठ फिरवली होती.
आपल्या सरकारने अफगाणिस्तानच्या रस्त्यावर प्रवासासाठी काही भारतीय बसेस दिल्या आहेत. त्यावर अफगाणी भाषेत ‘फ्रॉम इंडिया विथ लव्ह’ असे लिहिलेले असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे अफगाणी जनतेत भारतीयांविषयी चांगली भावना आहे. आय.एस.आय. आणि पाकिस्तानी सरकारची मात्र ‘किराये के कातिल’ अशी संभावना करतात.
गंमत म्हणजे तेथील तालिबान असो किंवा हक्कानी नेटवर्क, भारतीय विकास कामाच्या शक्यतो मध्ये येत नाहीत, कारण ह्या सुविधांची फळे त्यांनासुद्धा चाखायला मिळतात. उर्वरित जग त्यांच्यावर आकाशातून बाँबवर्षाव करत असते.
सतत युद्धाच्या छायेत राहून त्यांच्या पिढीला मानसिक नैराश्य आलेले त्याच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे.
तालिबानी हल्ल्यात तुटलेला एक पूल भारतीय लष्कराने काही दिवसात पूर्ववत केला.
कामाचा हा तडाखा पाहून गोरे लोक स्तिमित झाले. इति शेर खान.
मला भारतीय लष्कराबद्दल अभिमान वाटला, त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर भारतात लोकशाहीत आमच्या कुर्ल्याचे व सांताक्रूझचे उड्डाणपूल राजकीय दबाव व इतर कारणास्तव ५ वर्ष अर्धवट अवस्थेत पडल्याचे चित्र दिसत होते.
पुढे एका इराकी माणसाशी त्याचा भावाचे कडाक्याचे भांडण झाले. त्या दिवशी अरब व अफगाण भाषेतून अनेक शिव्या कानावरून गेल्या आणि ह्या दोन्ही भावांनी हॉटेल सोडले. भविष्यात डॉक्टर होण्यासाठी मी त्याला शेवटच्या दिवशी शुभेच्छा दिल्या. पुढे फ्रँकफर्ट सोडून आम्ही म्युनिचला राहायला आलो, पण ह्या कामानिमित्त जगभरातील निर्वासित व त्यांच्या विलक्षण कहाण्या माझे अनुभवविश्व समृद्ध करून गेल्या. ह्याच विश्वाचा एक भाग असलेल्या शेर खानच्या आठवणी आज माझ्याकडून लिहिल्या गेल्या.

 सदर लेख  मिसळपाव  ह्या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रदर्शित झाला आहे. तेथे माझे वास्तव्य निनाद  मुक्काम पोस्ट जर्मनी ह्या नावाने आहे,

कांदा मुळा भाजी…….

लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की …..नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती. ढीगभर भाजी घरी घेऊन येण्यात, तिच्या ताजा वास श्वासात भरून ठेवणेच इतके आनंददायी असते की हा त्रासाचा विचार ठेव्हा मनात कधी येतच नसे.
 
अजूनही ही गोष्ट तितकीच आवडीची आहे. भाजी मंडईत जावे, ताज्या ताज्या भाज्या बघितल्या की काय घेऊ अन काय नको असे होऊन जाते. दिवसाचे १०/१२ तास ऑफिसमध्ये जिचे जातात तिला रोज जाता येता भाजी घेणे शक्यच नाही. त्यामूळे आठवड्याची भाजी एकदमच हा शिरस्ता गेली अनेक वर्षे आमच्याकडे आहे. अशारितीने भाजी आणणे, निवडून वेगवेगळ्या प्लास्टिक मध्ये ठेवणे म्हणजे आठवडाभर आज काय भाजी करावी ही चिन्ता मिटते. मात्र वीकेंड मधल्या कोणत्या दिवशी भाजी आणायची, किती आणायची, तिची उस्तवार करायला कशी जमणार आहे याचा आधी विचार करावा लागतो, पण म्हणून काही  त्यातली मजा कमी होत नाही. त्यातून हा ऋतुच आनंदाचा ठेवा असावा असा ताजा तवाना. 
 
रविवारी सकाळीच मंडईत शिरावे. कोणत्या नव्या भाज्यांचे आगमन झाले आहे याचा अंदाज घ्यावा. तुरीच्या शेंगा, गाजर, मटार आणि मेथीच्या ताज्यातवान्या गड्ड्या दिसू लागणे ही माझ्या मंडईत जाण्याच्या आनंदाची परिसीमा असते. उंधियो, मेथीचे विविध प्रकार जसे की ठेपले, भरपूर लसूण  घालून केलेली सुकी भाजी, मेथी गोटे, गाजर हलवा, मटार करंजी, मिक्स भाज्यांचे सूप, लोणचे असे विविध प्रकार मनात डोकावू लागतात. त्यामुळे भाज्या घेत घेतच माझा आठवडाभराचा मेन्यू मनातल्या मनात तयार होतो. आत शिरल्याबरोबर मिरची, आले लसूण याचा गाळा असतो. थंडी पडू लागलीये, थोडे आले जास्त घेवूया म्हणजे वड्या करता येतील. लसूण ही घ्यायला हवा, थोडी सुकी चटणी करून ठेवायला हवी. मग पुढचा गाळा असतो रसरशीत टोमाटोचा. रविवारी पुलाव आणि सार करावे का? कोणी पाहुणे येणार आहेत का, कोणता सण आहे का, एखादा खास पदार्थ बरेच दिवसात झाला नाही अशी घरच्या दोन थोर व्यक्तींकडून तक्रार येण्याची शक्यता आहे का  या आठवड्यात हे एकदा आठवून पाहावे आणि त्या नुसार भाज्या घेत जावे. किती पालेभाज्या आपल्याचाने निवडून होतील याचा अंदाज घेत त्यांना ही पिशवीत जागा करून द्यावी. मग स्वीट कॉर्न मला न्या म्हणत मागे लागतो, म्हणून त्यास घ्यावेच लागते. आजकाल लाडावलेल्या मुलासारखा तो झाला आहे. उपासाचे दिवस असतील तर मग रताळी कुठे दिसतात का ते पाहावे लागते, म्हणजे एकादशीची सोय होईल, रताळ्याच्या गोड काचऱ्या, तिखट कीस, हे पदार्थ साबुदाण्याचे  वडे किंवा थालीपीठ  सोबत तांबड्या भोपळ्याचे भरीत, ओल्या नारळाची चटणी  असले की उपासाचे ताट कसे भरल्यासारखे वाटते नाही?  
 
तुरीच्या शेंगा दिसल्या की उन्दियोच्या इतर भाज्या जसे की कंद, सुरती पापडी, कच्ची केळी  आल्यात का हे पहावे, सगळ्या पाव पाव किलो घेत घरी जावून उंधियो बनवावा आणि पुढचे २/३ दिवस मनसोक्त त्यावर ताव मारावा  नाहीतर तुरीच्या शेंगाना घरी नेवून मीठ हळद घालून उकडून टेबलवर ठेवून द्याव्यात, बघता बघता संपून जातात. भाद्रपदात मिळणाऱ्या मावळी काकड्या दिसल्या की मग हळदीची पाने कुठे मिळतील ते पाहावे म्हणजे गोड पानग्या करता येतील. भरपूर कोथिंबीर आली की मग एकदा वड्या झाल्याच पाहिजेत. छान केशरी दळदार भोपळा आहे, तो  घारगे बरेच दिवसात झाले नाहीत अशी आठवण करून दिल्याखेरीज राहात नाहीत. मटार चांगला आला आहे, भरपूर घरी न्यावा, एकदा मटार उसळ आणि पाव हा बेत, कधी मटार भात तर कधी मटार करंजीचा बेत करावा. फेब्रुवारी संपता संपता फणसाच्या कुयऱ्या दिसतात का याचा शोध घ्यावा किंवा आसपासच्या कोणत्या घरी फणसाचे झाड आहे ते लक्षात ठेवून त्यांना सांगून ठेवावे. आजकाल मला वर्षभर ओले काजू सुकवून ठेवता येण्याची पध्दत कळली आहे, त्यामुळे फणस आणि ओले काजू याची भाजी, त्याला वरून लाल मिरचीची फोडणी म्हणजे सुख! तसा नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ म्हणजे या सुखाचा परमावधी. इतक्या प्रकारच्या भाज्या या दरम्यान उपलब्ध असतात की काय घेऊ आणि काय नको असे मला होऊन जाते. घरी नेलेल्या भाज्यांची उस्तवार करता यावी आणि विविध चवींचे खास पदार्थ बनवता यावेत म्हणून न या कालावधीत वीकेंड २ नाही तर ३/४ दिवसांचा असावा अशी फार इच्छा आहे…. 🙂 

आवळे घरी न्यावेत, किसून सुपारी, थोडा मोरावळा करून ठेवावा. थोडे लोणचे करावे त्यात थोडी आंबे हळद जी ओली मिळते या काळात, ती घालावी. लिम्बांचे गोड लोणचे बनवून ठेवावे, उन्हाळ्याची बेगमी म्हणून सरबताची सोय करून ठेवावी. पालक वर्षभर मिळतो, पण या काळात तो जास्तच ताजा टवटवीत वाटतो, त्याच्या पुऱ्या कराव्यात. भरली वांगी किंवा खानदेशी वांग्यांचे भरीत करावे, सोबत गरमागरम भाकरी आणि ताजे लोणी. किंवा भरपूर लसूण आणि तेल घालून केलेली आंबाडीची भाजी …. आहाहाहा….. एरवी जास्त न आवडणारे पावटे पण या काळात कधीतरी उसळ करून चविष्ट लागतात. नवरात्रात कधी काकडीसारखी लांबसडक जांभळी वांगी मिळतात, त्यांचे काप करावेत, डाळीचे पीठ, मीठ तिखट लावून थोड्या तेलावर भाजले की किती खातो हेच कळत  नाही, तीच गत सुरणाच्या कापांची.

थोडी शोधाशोध केली तर लसणीची पात मिळते कधी…थोडी कधी आमटीत टाकावी नाहीतर कधी छानशी चटणी करावी. इतर कोणत्याही सिझन मध्ये मिळणारा मुळा या ऋतूत मला नेहमीच चविष्ट वाटत आलाय. जवळपास चक्का वाटावा इतकं घट्ट दही घ्यावे, त्यात ओला नारळ, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची मिठाबरोबर वाटून,सोबत चिमुटभर साखर…सही लागते ही कोशिंबीर!
 
याच काळात फळे ही भरपूर येतात यामुळे चिकू शेक, स्ट्राबेरी किंवा सफरचंद शेक, फ्रुट सलाड हे ओघाने आलेच. (दूध आणि फळे एकत्र करून खावू नये या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून) नुकती नुकतीच दिसू लागलेली द्राक्षे, स्ट्राबेरी संत्री यांचा घरी वावर वाढतो तो थेट आंब्यांचे घरी आगमन होई पर्यंत. फळांची रेलचेल मग कधी इतकी होते की मग कोबीच्या कोशिम्बीरीत द्राक्षे दिसू लागतात, काकडीसोबत घट्ट दह्यात मीठ मिरची लावून डाळिंबाचे दाणे जावून बसतात तर कधी सफरचंद, डाळिंब, काकडी, अननस आणि थोडे अक्रोड चुरून घातले की थोड्या मीठ मिरपुडीने सुरेख सलाड तयार होते. कधी सफरचंदाचा कधी अननस घालून केलेला शिरा जेवणाची  लज्जत वाढवतो. तर कधी क्रीम मध्ये थोडी साखर घालून फेटले आणि भरपूर स्ट्राबेरी त्यात घातल्या की एक सुंदर डेझर्ट तय्यार!
 
बघता बघता हा हिरवागार सीझन संपू लागतो, हळू हळू मंडई रुक्ष भासू लागते. त्याच त्या ४/५ भाज्या दर आठवड्याला घरी नेतोय की काय असे वाटू लागते. थोडा पाराही चढा होवू लागतो. जेवण तितके आनंददायी वाटेनासे होते. मग फळांचा राजा पुन्हा अवतरतो आणि सारा रुक्ष नीरसपणा दूर करतो. पानात रोज सकाळ संध्याकाळ आमरस असला गरमागरम पोळी किंवा भातासोबत की मग कोणती भाजी आहे किंवा नाही याने काही फरक पडेनासा होतो. आंबा, फणस, जांभळे, करवंदे, चेरी, खरबूज, कलिंगड ही फळे मात्र दिवस रसदार करतात आणि उन्हाळा थोडा सुखाचा जातो. याच उन्हाळ्यात थोडी पावसाळ्याची बेगमी म्हणून थोडे सांडगे, भरल्या मिरच्या, थोड्या कुरडया (भाजी साठी) करून ठेवाव्यात. पावसाळ्यात मंडईत जाणेच नकोसे होते. कसेबसे ते दिवस ढकलून मी मनापासून वाट पाहत राहते या हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिवसांची!


(त्याचं काय आहे की एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य…त्यामुळे सर्व फोटो आंतरजालावरून साभार.)

21 Dec. 2012 – Myths & Truth ………


First of all let me thank god giving me life to write this post & these words.
Today, Dec 21st, 2012 passing quietly & calmly.  There were stories about World will end on this date based on ancient Maya Culture Calender.

Maya culture was pretended to exist before 5ooo years & were expertise among astrological science. Myths & rumors said their calender has 21st Dec. 2012 as a last date of world. However, today news bulletins focused was not so & their calender exists till 4772 yr ; where we are just in 2012. NASA statement supports the view.

Proud to say , Mohan Date, Panchang Creater of Date Panchanga gave a statement on Zee 24 taas news channel saying NASA & Indian astrology are ultimately based on science & mathematics. Even Indian Astrology says there are 4 crore years of kaliyug where we are just in 5ooo year of the same. There is much more time to go for our dear mother earth. Brahma dev who is responsible for LIFE on earth has 50yrs of life which are not earth years. These 50 yrs of life are equivalent to many crore years of we human beings.

Conclusively, 2012 was little terrifying , more disastrous year begint with Japan-Tsunami on the very first day of the year. This year was a bad patch / slag for many of us across the word. We came across many financial & corruption problems in this year. We lost many gems of Bollywood.
Let me wish you all a very happy, healthy & wealthy year ahead. * Rather years, I must say !! 🙂

नांदूर मध्यमेश्वरला परदेशी पक्ष्यांची संख्या ३० टक्क्य़ांनी वाढली(Migrated birds to Nandur Madhyameshwar)

थंडीच्या गुलाबी वातावरणाने नांदूर मध्यमेश्वरचा परिसर बहरून गेला असतानाच
देशी-विदेशी पक्ष्यांच्या झालेल्या आगमनाने या परिसराचा नूरच पालटला आहे.
देशी -परदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र या
वर्षीपासून वनविभागाने पर्यटकांसाठी ठराविक शुल्क आकारण्याचा आदेश काढला
आहे. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात सैबेरिया, मध्य आफ्रिका, मध्य
आशिया, मध्य युरोप, इराण, मध्य प्रदेश, जम्मू

विवाह लवकर जमावा म्हणून उपाय : कट्यायनी देवीचे व्रत आणि इतर

A. अनुरूप, मनासारखा वर मिळावा म्हणून मुलीने करावयाचे उपाय :

  1. Om hareeng kumaraye namah sawaha  हा जप १ लाख २५ हजार वेळा करणे.
  2.
“Hey gauri shankaradhan yatha twam shankarpriya
Tatha man kuru kalyani kantkantan sudurlabham”

 रोज ५ माळा जप सलग २१ दिवस करणे .
  3.

“Om katyayani mahabhage mahayoginy adhishvarim
Nand gop sutam devi patiam me kurute namah”

एकांत आणि शांत जागी मुलीने पश्चिमेस  तोंड करून ५ माळा  रोज जपाव्यात. सकाळी सकाळी करावे. सलग ४१ दिवसांनी शुक्ल पक्षातील सोमवारी किवा शुक्रवारी ९ माता पार्वतीची पूजा करून ; लहान मुलींना आणि ३ लहान मुलांना भोजन आणि मुलींना ओढणी / रुमाल व मुलांना काहीतरी कापड दान करावे. ब्राह्मणास  यथेच्य दान करावे.

4. कट्यायनी देवीचे व्रत : ( १६ डिसेम्बर-१४ जानेवारी २०१२ )

कट्यायनी व्रत हे देवी रुक्मिणीने श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते , असा पुराणात उल्लेख आहे.
संदर्भ: भागवत पुराण , देवी महात्म्य, तैत्रेय्य अरण्यका, कृष्ण याजुर्वेदाचा काही भाग आणि स्कंद पुराणात हे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी सांगितले आहे.

  ——————-
साहित्य : कट्यायनी देवीचा फोटो , षोडशोपचारे पूजा करण्यास लागते ते नेहमीचे साहित्य ( हळद – कुंकू -उदबत्ती-फुले-पान-सुपारी -पंचामृत -प्रसाद  वगरे ) , लाल रंगाचा पोशाख पूजा करतानाचे वेळीस. तांबडे वस्त्र, मंगळसूत्र .  कट्यायनी व्रताच्या कहाणीचे पुस्तक ( धार्मिक पुस्तकांच्या दुकानात सहज मिळते .) 
कधी करावे: सलग ७ मंगळवार करावे. दक्षिण भारतात हे व्रत धनू मासात करितात. सौर कॅलेंडर नुसार मार्गशीर्ष महिना धनू मास समजला जातो . २०११-२०१२ मध्ये हे व्रत १६ डिसेम्बर ला चालू होईल ; आणि १४ जानेवारीला समाप्ती असेल.
पूजेचे विधी : . पहाटे / सकाळी आंघोळ झाल्यानंतर लाल / तांबडे पोशाख घालून देवीचा फोटो देवात / पवित्र ठिकाणी ठेऊन षोडशोपचारे पूजा करावी. नंतर कहाणी / स्तोत्राचे  करावे. नैवेद्य दाखवावा. मनोभावे पूजा करावी. कुलदेवता, आद्य देवतांचे स्मरण करावे. दिवसभर उपास करावा. रात्री दुध्फ्लाहार करावा.
उद्यापन : ८ व्या मंगळवारी ७ सुवासिनींना बोलावून त्यांना प्रसाद, गोडधोड , लाल खण द्यावा.

5. गंधर्व साधना : गंधर्व हे प्रेम, सौंदर्य , विवाह याचे दैवत मानले जाते.
कोणी करावी :
विव्हेछुक मुलींनी, प्रेम प्रकरणात अडथळे असणार्या मुलींनी, घरातील मंडळींनी घरातील मुलीच्या विवाहासाठी मुलीच्या वतीने केल्यास चालेल. ( केवळ स्त्रियांसाठी . पुरुषांनी करावे कि नाही याचा खुलासा नाही. तरी मुलांनी चांगली बायको मिळण्यासाठी हे करू नये  !!!!! 🙂 )
कधी करावी:  रात्री .
कशी करावी: एका सोमवारी सुरु करून पौर्णिमेच्या दिवसापर्यंत करावी. रात्रीचे वेळी स्नान करून लाकडी आसनावर पिवळे वस्त्र टाकून त्यावर बसावे. खालील मंत्र १० वेळा म्हणावा.

|| Om Kleem Vishvaasu Naam Gandharvah Kanyaah Naamaadhipatih Labhaami Dev-dattaam Kanyaam Suroopaam Salaankaaraam Tasmei Vishvaav-sarva Namah ||

रोज एक वेळा याप्रमाणे सोमवार ते पौर्णिमेपर्यंत आवर्तने वाढवावीत. पौर्णिमेचे दिवशी याच जपाची पाच अधिक आवर्तने करून सिध्द झालेला ताईत मुलीच्या दंडाला 
बांधावा. सिध्द यंत्र देवघरात ठेऊन याची पूजा करावी.

वि . सु.
१. सर्व उपाय आपल्या गुरुजींना / घरातील वडीलधार्यांना विचारून करावेत.
२. कट्यायनी व्रत आपण महाराष्ट्रीयन लोक हरितालिका करतो त्याप्रमाणे आहे. तरी देखील विचारून केलेलच बरे.
३. गंधर्व व्रत – विवाह झाल्या नंतर ताईत / यंत्र  विसर्जन करावे की तसेच ठेवावे याचा मला संदर्भ मिळालेला नाही. तरी संपूर्ण माहिती शिवाय अर्धवट काहीतरी करू नये.
काही माहिती मिळाल्यास अवश्य कॉमेंट करणे. बाकी इच्छुकांना झाला तर फायदाच होईल . मॉडरेशन नंतर अशा कॉमेंट नक्कीच पब्लिश केल्या जातील. 

हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.

सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष  काढले  जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण  इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या  बहुदेव वादाची कल्पना  स्वयं ऋग्वेदच करतो.
ज्याला लोक इंद्र, मित्र, वरुण असे संबोधितात ते सर्व एकच आहेत .त्यांची ऋषिमुनी वेगवेगळ्या नावाने आराधाना करतात. वास्तविक पाहता पुराण तर वेगवेगळ्या पंथांच्या निर्माणात गुंतला गेला आहे.
पण ह्याच पुराणात काहीं श्लोक ईश्वराच्या एकत्वाची स्पष्टता करतात जसें…सत्त्वं रजस्तम इति प्रकृतेर्गुणास्तै-

र्युक्त: पर: पुरुष एक इहास्य धत्ते
स्थित्यादये हरिविरंचि हरेति संज्ञा:

 श्रेयांसि तत्र खलु सत्त्ववतनोर्नृणां स्यु: ।प्रकृतीचे तीन गुण आहेत सत्व, रज, तम, ह्यांचा स्वीकार करूनच संसारात स्थिती, उत्पत्ति आणि प्रलय ह्या करता अद्वितिय परमात्मा विष्णु, ब्रम्हा आणि रुद्र अशी  नावे धारण केली आहेत.

वरवर बघता आपणास असे दिसते कि हिंदू हें वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य ह्या संप्रदायांत वाटला गेला आहे. सत्य हे आहे कि हिंदू विष्णु (सर्वव्यापी ईश्वर), शिव (कल्याणकर्ता ईश्वर), दुर्गा (सर्वशक्तिमान ईश्वर), गणेश (परम बुद्धिमान वा  सामूहिक बुद्धिचा  द्योतक ईश्वर) ह्यांची उपासना करतो. सर्व हिंदू विष्णु, शिव,दुर्गां व काली  मंदिरांत जाऊन श्रद्धा युक्त होऊन नतमस्तक होतो. म्हणून सर्व हिंदू एक आहेत मग तो काणत्याही संप्रदायाचा असो असे यावरुन निश्चित आहे.

उपनिषीधात खरें तर ” एकत्व ” जोडण्याच प्रयत्न केलेला दिसतो आणि ज्ञानी लोकांनी असा निष्कर्ष काढला कि जीवात्मा आणि परमात्मा या दोहोत अग्नी आणि त्याची दाहकतेचा जसा संबंध असतो तसाच संबंध आहे. ईश्वर कुठेही दुसरीकडे नाही अपितु तो आपल्या हृदयांत वसलेले आहे. सर्वत्र तो आहे व तो सर्वव्यापी परमात्माच सर्व काहीं आहे. म्हणूनच त्याची स्तुती आणि प्राथना केली जाते.


तेजो सि तेजो मयि धेहि, वीर्यमसि वीर्य मयि धेहि, बलमसि बलं मयि धेहि, ओजोसि ओजो मयि धेहि ।     (यजुर्वेद १९-९)

हे भगवन तुम्ही तेजोपुंज आहात माझ्यात तेज स्थापीत  करा ,आपण वीर्य रूप आहात मला वीर्यवान बनवा, आपण बालरूप आहात माला बलवान बनवा, आपण ओज स्वरूप आहात मला ओजस्वी बनवा अशी प्रार्थना व स्तुती केली आहे.

वेदात वैश्वीकरणावर अधिक बळ  देऊन  म्हंटले आहे …
अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ।हे माझे आणि ते त्याचे आहे असा विचार कोत्या मनाचे लोक करतात पण उदार व चारित्र्यवानासाठी तर हें जगच  एक कुटुंब आहे.
सामाजिक ऐकताचा  संदेश पण यांत आहे तो असा—

सह नाववतु सह नौ भुनुक्तु । सह वीर्य करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै । शान्ति: शान्ति: शान्ति: ।
हें देवा आम्ही परस्परांची रक्षा करावे, सर्वांनी मिळून उपभोग घ्यावा, एकमेकांच्या साह्याने सामर्थ्य व तेजस्वी बनु, विद्या, बुद्धी वृधिंगत होऊन विद्द्वेषा पासुन दूर राहु अश्या प्रकारे सर्वत्र शांति नांदो .

सार्वभौम भ्रातृत्व व सार्वभौम कल्याणणासाठी पण यांत उलेख आहे तो असा—-
सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत् ।सर्व सुखी होवोत,सर्व निरोगी राहोत, सर्वांनाच आपले शुभ दर्शन होवो आणि त्यांचे दु:ख हरो.

—————————————————————————————————–
( मुळ लेखन ( इंग्रजी ) श्री विवेक मिश्र यांचे चे हें भाषांतर आहे.)

बायको पाहिजे – भाग 1

जुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, “लग्न केले कि नाही?” किवा “किती मुले आहेत तुम्हास ?”. या प्रश्नाचे उत्तर देवून मी पण कंटाळलो आहे. किती वेळा परत परत तेच उत्तर देत राहायचे ? शेवटी नाईलाजाने मित्र वर्तुळा पासून दूर राहिलो आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसे पाहिजे तसे स्थळ मिळत नाही . आणि समजा मिळाले तर तिथे एक अथवा दोन कारणाशिवाय जमत नाही. एक तर मुलगी जास्त शहाणी असेल किवा आई वडील व नाते वाईक दीड शहाणे असतील. दोन वर्ष झाले आहे पण ज्या सुंदरी च्या शोधात आहे ती काही अजून काही मिळालेली नाही. मागे, मला झालेल्या अनुभवाची नोंद ” सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे भाग एकदोन ” मध्ये केली आहे. या वर्ष दरम्यान देखील मला नवीन अनुभव झाला.खानदेश भागात “नंदुरबार ” म्हणून जिल्हा आहे. त्या ठिकाणी मुलगी पाहण्यासाठी गेलो होतो. मुलीने बारावी नंतर डी एम एल  टि केले होते आणि त्या बेस वर सरकारी हॉस्पिटल मध्ये जोब वर होती. अर्थात सरकारी नोकरी वर होती.जवळच्या नाते वाईकाने मला तिथे पाहण्यासाठी बोलावले.पण माझ्या मनात तर होतेच कि ते नक्की सरकारी नोकरीवाला नवरा शोधात असतील. म्हणून आपले जाणे योग्य नाही. मी टाळले. परत चार महिन्या नंतर दुसर्या नातेवाइका कडून त्याच मुली साठी बोलावाले गेले. मनातल्या मनात विचार आला कि मुलगी काही माझ्या कुंडळि  मधून जात नाही आहे. आपण नक्की गेले पाहिजे. माझ्या शाळेतील एका शिक्षक  मित्रा कडून माहिती मिळाली कि ते मुलगी च्या  वडिलाना ओळखतात. जेव्हा ते (मुलीचे वडील ) बस ड्राइवर होते तेव्हा ते नेहमी त्या शिक्षांना भेटत असत (त्यांचा कोलेज च्या रूट वर तीच एक बस होती ). व्यक्ती चांगले आहेत म्हणून आपण गेले पाहिजे असे मला वाटले. 

     नंदुबार ला आलो , त्या ठिकाणी सर्व प्रथम जुन्या विस्तारत जिथे ते राहत होते तिथे त्याचा विषयी माहिती गोळा केली. पण आश्चर्य !! कोणी हि मला त्यांच्या स्वभाव व वर्तणूक विषयी चांगले सांगितले नाही.पण तरी  माझ्या शिक्षक मित्राचे शब्द माझ्या लक्ष्यात होते. तेच डोक्यात ठेवून पुढे गेलो.
     बाजार पेठात त्यांचे दुमजली जुन्या टाईपचे घर होते , बाहेरून ते घर, माधव राव पेशवे यांच्या काळातले वाटत होते. घराची अवदशा पाहून वाटले नक्की यु एन ने त्या घराला इंडिअन हेरीटेज मध्ये सामील  करायला हवे.आत गेलो, बसलो, समोर च एकी कडे आई व दुसरी कडे बहिण बसली. मी एका पलंगावर बसलो. माझ्या डाव्या हाता कडे त्या दरवाज्यात  मुलीची आई उभी होती. आणि उजव्या हाता कडे वडील एका खुर्ची वर बसले होते.काल रात्री गली मध्ये लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून मुलगी थकलेली होती. त्यामुळे तिला तयार होवून चहा पाणी घेवून येण्यासाठी बराच वेळ लागला. तो पर्यंत मुलीचे वडील नाते वाईक विषयी एक दोन गोष्ट करू लागले. जवळ जवळ पंधरा मिनिटा नंतर  चहा आणि पाण्याचा ट्रे हातात घेवून मुलगी पांढर्या साडीत सुसज्ज होऊन आली. मुलेचे वय जवळ पास एकोणतीस ते तीस च्या जवळ पास होते पण मुलगी सुंदर होती त्यामुळे मी वय ईग्नोर केले..तिने प्रेमाने  मला , आई व बहिणीस चहा दिला. 
     दोघांनी एक दुसर्याचा परिचय करवून घेतला.नाव , गाव, शिक्षण,इच्छा वगैरे विषयी चर्चा झाली.  वीस मिनिटे  पसार झाली , पण मुलीची आई अजून काही बसलेली नव्हती.मुलीच्या मागे दरवाज्यात  उभीच राहिली. मला हे समजत नव्हते कि त्या मुलीच्या आईला बसायला काय झाले होते ?…अहो तब्बल वीस मिनिटा पासून जे काही गोष्टी होत होत्या त्यात ते उभे राहूनच हो कार आणि नकार देत त्यांचे मत मांडत होते. या चित्रा वरून तर एकच निष्कर्ष मला काढता आला कि येथे घरात मुलीच्या आईचे वर्चस्व आहे, वडील बिचारे नुसते औपचारिकता म्हणून असतील. पण पुढच्याच क्षणाला त्यांनी चांगल्याच पद्धतीने स्वतः चा परिचय करवून दिला.
     कारण समोरून अश्या काही स्टेटमेंटचा मारा त्यांनी केला कि मला तर फक्त ऐकतच राहावे लागले.
त्या पैकीचे काही विधाने या प्रमाणे होती.
“आमचे अमुक व्यक्ती (काका – मामा ) हे नाशिक शिक्षण बोर्डात अधिकारी आहेत “
     
“माझी मुलगी समग्र राज्यात अमुक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.”

“माझ्या मुलीला फोरेन मध्ये आमक्या गोष्टी साठी बोलावण्यात आलेले , पण आम्ही पाठवले नाही “

“औरंगाबाद हून एम बी ए झालेली व्यक्ती मुली साठी आली होती पण आम्हास आवडले नाही”


     आता राम जाणे एवढ्या विधान पैकी किती सत्य होते. त्यांनी मला अट  घातली कि मी जर मुलीला लेब उघडून देण्यास तयार असेल तर ते लग्नासाठी तयार आहेत. जर तसे नसेल तर मुलाला सरकारी नोकरी असली पाहिजे. मला सरकारी नोकरी नव्हती आणि लेब उघडणे म्हणजे खेळ नव्हे. साधारण लेब ठीक आहे पण कोम्प्लेक्ष लेब उघडणे थोडे अवघड असते. कारण बरेच पैसे गुंतवावे लागतात. आम्ही लवकरच तुम्हास कळवतो एवढे बोलून मी सुरत कडे वाट धरली. रात्रभर मी calculate  करत राहिलो कि आपल्याने होणार का ? दुसर्यादिवशी सकाळी, माझा एका मित्रा कडे लेब ची माहिती घेतली . मला समजले कि काही अवघड बाब नाही.म्हणून दुसर्याच दिवशी त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. मनात होते कि घरी आल्यावर त्यांना लेब ची माहिती देवू. पण इथे फोन केल्या नंतर मुलीच्या आई कडून उत्तर मिळाले कि मुलीचे मामा पुढच्या आठवड्यात नाशिक हून  नंदुरबार येणार आहेत तेव्हा ते कळवतील. पहिला आठवडा गेला. मी परत फोन लावला जवळच्या नातेवाईकास तपास करण्यास सांगितले ,पण  परत तेच उत्तर, दुसरा आठवडा आला, मी परत फोन केला , आणखी तेच उत्तर …..तिसरा आठवडा आला…….पण तेच. मला मात्र अनावर राग आला होता कि यांना नसेल करावयाचे तर नुसता समोरच्या व्यक्तीचा वेळ का घालवतात ? कोणत्या मनोवृत्तीचे माणसे असतील कि ज्यांना एका शब्दात हो किवा नाही म्हणणे पण अवघड जाते ?

आपणास काय वाटते ?
तिथे गर्व दिसून येत नाही का ? पण कशाला एवढे अभिमान ??????

एका क्षणा साठी वाटले कि मला पण एक बेनर  बनवायला हवे कि
“बायको पाहिजे”
“फक्त माणुसकी असलेल्यांनी संपर्क करावा”

पण विडंबना आशी आहे कि नुसते बेनर लावून चालत नाही.स्वत: हून त्या अपमानाला तोंड द्यावे लागते.

हि सत्य कथा फक्त एका स्थळा विषयी आहे.अशीच दुसरी घटना आता चार दिवसा पूर्वी घडली आहे.त्या कथेत सध्या intarval  आहे. picture  क्लीअर झाल्यावर लवकरच आपल्या समक्ष सादर होणार ….
चला परत मुलगी पाहण्यासाठी धुळे निघायचे आहे..तो घटनाक्रम परत आल्यावर …….लवकरच

क्रमश:  

धावांचा पंचकार


क्रिकेटमध्ये मोठे फटके मारुन अर्थात चौकार व षटकार मारुन मिळणाऱ्या धावा ह्या चार व सहा होत. शिवाय फलंदाजाने धावून काढलेल्या तीन धावाही खुप मानल्या जातात. या सर्व धावांच्या गणितामध्ये पाच ही संख्या राहूनच जाते. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर पाच धावा कधी मिळतात का?  या प्रश्नाचे उत्तर होयअसेच आहे.
      चार धावांना चौकार आणि सहा धावांना षटकार म्हणतात. तसे आपण पाच धावांना पंचकार म्हणूया. क्रिकेटमध्ये काही अपवादात्मक परिस्थितीत पाच धावा मिळवता येतात किंवा बहाल केल्या जातात. सन २००० मध्ये आयसीसीने क्रिकेट मध्ये नियमावलीत काही महत्त्वपुर्ण बदल केले. क्रिकेटची जन्टलमन्स गेमही प्रतिमा अबाधित राहण्यासाठी हे बदल गरजेचेच होते. यापुर्वी केवळ एका अपवादात्मक परिस्थितीत धावांचा पंचकार दिला जायचा. आज जवळपास दहा विविध नियमांन्वये पाच धावा काढता येतात!
      फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षक वा यष्टीरक्षक हे बहुतांश वेळा हेल्मेट चा वापर करतात. एका ओव्हर नंतर फलंदाज व गोलंदाज बदलला तर क्षेत्ररक्षक स्वतःचे हेल्मेट काढून ठेवतो. हे हेल्मेट मैदानावरच विकेटकिपरच्या मागे ठेवलेले असते. त्यामुळे त्याला चेंडूचा स्पर्श होणे, हे दुर्मिळच होय. या हेल्मेटला चेंडू लागल्यास पंचकार देण्याचा आयसीसीचा नियम आहे. चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून गेला असल्यास पाच धावा ह्या फलंदाजाच्या खात्यात जमा होतात व बॅटला लागला नसल्यास या पाच धावा अवांतर म्हणून संघाच्या धावसंख्येत जमा केल्या जातात. सन २००० पुर्वी केवळ याच परिस्थितीत पंचकार दिला जात होता. परंतु, कालांतराने आयसीसीने काही कडक नियम सादर केले व त्या साठी पाच धावा बहाल करण्याची योजना तयार केली.
      आज क्रिकेटमधील बहुतांश पंचकार हे पेनल्टी धावायाच प्रकारांत गणले जातात. फलंदाजी करणाऱ्या संघाला किंवा फलंदाजाला खाली दिलेल्या परिस्थितीत पाच धावा बहाल करण्याचा नियम आहे-
  • क्षेत्ररक्षकाने आपल्या शरिराव्यतिरिक्त टोपी वा शर्टचा वापर क्षेत्ररक्षणासाठी केल्यास.
  • गोलंदाजाने किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाने चुकीच्या मार्गांचा वापर करुन चेंडुची गोलाई वा आकार बदलविण्याचा प्रयत्न केल्यास.
  • क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जाणूनबुजून फलंदाजाला फलंदाजीस अडथळा आणल्यास. चेंडु टाकत असताना एखाद्या क्षेत्ररक्षक वेगाने आपली स्थिती बदलत असल्यास पंचानी त्याला तशी ताकीद देणे गरजेचे आहे. तरीही पुन्हा अशी घटना घडली तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा बहाल करण्यात येतात.
  • क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जाणूनबुजून चेंडु सीमारेषेबाहेर घालविल्यास. (इच्छित फलंदाज पुढच्या षटकात फलंदाजीसाठी यावा, यासाठी क्षेत्ररक्षक ही क्लृप्ती वापरतात.)
  • अनेकदा ताकिद देऊनही क्षेत्ररक्षकाने वा गोलंदाजाने खेळपट्टीवर धावण्याचा प्रयत्न केल्यास.
 वरील सर्व स्थितींमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा दिल्या जातात. तर काही अपवादात्मक परिस्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघालाही पंचकार बहाल केला जातो. विशेष म्हणजे यासाठी अंपायरचे संकेत मात्र निरनिराळे आहेत. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे अम्पायरने डाव्या हाताने संकेत केल्यास पाच धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला व उजव्या हाताने संकेत केल्यास ह्या धावा गोलंदाजी करणाऱ्या संघास मिळतात! खाली दिलेल्या परिस्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला पंचकार बहाल करण्याचा नियम आहे.
  • फलंदाजाने क्षेत्ररक्षकांस अडथळा आणून चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केल्यास.
  • फलंदाजाने वारंवार सूचना देवुनही निष्कारण वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केल्यास.
  • फलंदाजाने व फलंदाजी करणाऱ्या संघाने अम्पायरने इशारा दोनदा देवुनही खेळपट्टीवरुन धावण्याचा प्रयत्न केल्यास.
  • गोलंदाजी करणाऱ्या संघाला दिलेल्या धावा ह्या त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये समाविष्ट केल्या जातात किंवा पुढे येणाऱ्या इनिंगमध्ये समाविष्ट केल्या जावू शकतात!
      अगदी नजीकच्या काळात पंचकार दिली जाण्याची घटना ३ जानेवारी २०१० रोजी केप टाउन येथे घडली होती. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ग्राहम स्वाचा एक चेंडू इंग्लंडचा विकेटकिपर मॅट प्रार याच्याकडून निसटून थेट त्याच्या मागच्या हेल्मेटवर आदळला होता!
    तुषार भगवान कुटे

५५. जी. ए. कुलकर्णी – प्रवासी

जी. . कुलकर्णींच्या कथा म्हणजे एक अनामिक, अनोळखी, गूढ पण तितक्याच रम्य विश्वातला प्रवास वाटतो. गुढ व्यक्तिमत्वे आणि गुढ प्रतिकांमधून धावणारी पण वास्तवाशी जवळचं नातं सांगणारी कथा असं कांहीसं वर्णन करता येईल. कवितेच्या प्रांतात कवी ग्रेस आणि आरती प्रभू तसे कथांच्या प्रांतात जीए.
जी. . कुलकर्णींच्याच रमलखुणाया कथासंग्रहातल्या प्रवासीया कथेतला हा काही भाग आपल्यासाठी . .
. . . दूर अंतरावर प्रकाश दिसताच त्याला फार धीर आला. पाण्याचा शिडकावा झाल्याप्रमाणे त्याचे अंग ताजे झाले व झपाझपा पावले टाकत तो प्रकाशाकडे आला. पण जवळ येताच मात्र त्याला फार निराश वाटले. त्याला वाटले, आजचा दिवसच असा कुजलेला आहे! मी जिवंत माणसाकडे जरी धावत आलो, तरी मला तेथे सांगाडाच भेटेल !
कारण त्याला दिसलेला प्रकाश एका पेटलेल्या चितेचा होता. तिच्याशेजारी केवळ त्या हलत्या प्रकाशाचे वस्त्रच अंगावर घेऊन एक अतिशुष्क, नग्न बैरागी बसला होता. त्याच्या बाजूला जमिनीत एक उंच त्रिशूल खोचलेला होता व त्यावरील ज्वालेच्या प्रकाशामुळे त्यातून तीन बोटे उभारल्याचा भास होत होता. प्रवाशाने जवळ येऊन फरशी बाजूला ठेवली व जमीनीवर अंग टाकले, तरी बैराग्याने त्याच्याकडे पाहीले देखील नाही.
येथून गाव किती दूर आहे ?” प्रवाशाने विचारले. “आज दुपारपासून मी अन्नाचा कण देखील खाल्ला नाही.”
तुला खायला हवं ? तर मग तू अगदी वेळेवर आलास.” बैरागी चितेकडे बोट दाखवत म्हणाला. ” कांही क्षणांतच गोळे भाजून होतील.”
प्रवाशाने बावरून चितेकडे पाहिले. बैराग्याने पिठाचे सातआठ गोळे तिच्यात भाजत ठेवले होते. पण त्यापलीकडे अद्याप जळत असलेले प्रेत पाहून त्याला एकदम पोट उलटल्यासारखे झाले व त्याची भूकच मेली.
म्हणजे तुला अद्याप खरी भुकच लागली नाही, नाहीतर तू चेहरा असा वेडावाकडा केला नसतास !” बैरागी म्हणाला. “तसली खरी भूक येते, त्या वेळी आतडी कुरतडत येते. त्या वेळी माणसाकडे नुसतं पाहताना देखील त्याच्या मांसात आपले दात रुतत असतात. मी एकदा अठरा दिवस स्वत:ला गुहेत कोंडून घेतलं होतं, त्या वेळी मला तशी भूक लागली होती. मला समोर एका रानझुडपांच्या पानाचा झुबका दिसला, तेव्हा ती कडवट पाने मुंग्याकिड्यांसकट मी हपापून खाऊन टाकली होती. वास्तविक हे गोळे तू खायला हरकत नाही. ही चिता माझ्या पत्नीचीच आहे. आयुष्यभर तिनं आपल्या शरीरानं अनेकांना अनिर्बंध सौख्य दिलं; मेल्यावरही शरीरानं हे सुख द्यायला ती हरकत घेणार नाही.”
प्रवासी बैराग्याकडे अविश्वासाने पाहात राहीला व त्याने हळूच फरशी जवळ घेतली. “पण येथून गाव किती दूर आहे ?” त्याने पुन्हा विचारले.
गाव किती दूर आहे, याचाच शोध घेत मी जन्म घालवला, पावलं झिजवली, पण अद्याप मला बोध झाला नाही !”
प्रवासी उगाच राहीला. अंधार जाण्याला अद्याप बराच अवधी होता व आता विसावू लागलेले शरीर पुन्हा लगेच श्रम सोसण्यास तयार नव्हते. त्याने एक नि:श्वास सोडला व बैराग्याची सोबत स्विकारली.
तू कोण आहेस ?” बैराग्याने विचारले.
मी एक प्रवासी आहे. यात्रा करत आहे.” त्याने थोडा विचार करत म्हटले.
फरशी घेऊन ?”
तुझा त्रिशूल तशी माझी फरशी !” तो तुटकपणे म्हणाला.
बैराग्याने मान डोलावली. तो म्हणाला, ” तू अवश्य यात्रेला जा, शहाणा होशील. पवित्र ठिकाणं किती अपवित्र असतात, एकशेआठ उपाधी चिकटलेले आचार्य किती उथळ असतात आणि त्या ठिकाणी गर्दी करणारी माणसं किती क्षुद्र, मुर्ख असतात, याचं तुला दर्शन होईल. आणि स्थान जेवढं प्राचीन, तेवढी मलीनता अधिक ! जा, तू अवश्य जा. तुझा लाभच होईल !”
प्रवासी तसाच जाळाकडे पाहात राहीला. त्याची भूक आता दडपून गेली होती, पण डोळ्यावरची ग्लानी उतरेना. त्याने अंगावरील एकवस्त्राची उशी केली. फरशी अगदी अंगाशी ठेवली व त्याने जमिनीवर ऐसपैस अंग पसरले.
तुला कसाही पहाट होईपर्यंत वेळ काढलाच पाहिजे, तेव्हा मी तुला काही कथा सांगू का ?” बैराग्याने विचारले.
कथा नवी आहे की जूनी आहे ? तिला काही अर्थ आहे का ?” फारशी उत्सुकता न दाखवता प्रवाशाने पडल्यापडल्या विचारले.
हे बघ, कथा काय आहे हे सांगणायाइतकच ऐकणायावरही अवलंबून असतं. आणि अर्थाविषयी म्हणशील तर सगळ्याच कथा अर्थपूर्ण असतात किंवा अगदी वेडगळ, अर्थहीन असतात. ऐकून तरी बघ.”
. . . बाकीची कथा वाचण्यासाठी कथेचे नाव प्रवासीपुस्तकाचे नाव रमलखुणा

कसाबला फाशी

अखेर एकदा कसाबला फाशी झाली. ती होणारच होती मात्र त्याची वेळ साधण्यात सर्व प्रकारचे राजकारण दिसत आहे. लोकसत्ताचा अग्रलेख ह्या दृष्टीने वाचनीय आहे. बातम्यांवरून असे दिसते कीं फाशीची तारीख कोर्टाने आधीच ठरवली होती. सरकारच तसे म्हणते. मात्र त्यातून एक प्रष्न उद्भवतो. कसाबच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतीनी ६ नोव्हेंबरला फेटाळला. मग त्यापूर्वीच फाशीची तारीख कशी ठरली? अर्ज नाकारला जाणार आहे असे आधीच ठरले होते काय? असे काही वक्तव्य करण्यापूर्वी मंत्र्यांनी थोडा विचार केला असता तर बरे झाले असते! कसाबची फाशी हा एक आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय होऊ शकतो याचे भान ठेवणे आवश्यक होते. लोकसत्तेच्या अग्रलेखात अफझल गुरु, राजीव गांधींचे मारेकरी व बियांतसिंगचा मारेकरी यांच्या प्रलंबित फाशीसंदर्भात दीर्घकाळ चाललेल्या राजकारणावर टीका केली आहे. हे असे का होऊ शकते याच्या मागच्या कारणाकडे मला लक्ष्य वेधावयाचे आहे. कोणे एके काळी न्यायव्यवस्थेने गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली तर अखेरचा दयेचा अधिकार राजाकडे असे. ‘राजा हा ईश्वराचा अंश’ ही भावना कदाचित त्यामागे असेल. आपल्या घटनेत तो अधिकार राष्ट्रपतीलाला दिलेला आहे. मात्र त्यात मेख अशी आहे कीं राष्ट्रपति हा अधिकार वैयक्तिक सारासार विचाराने वापरत नाही तर प्रस्थापित सरकारच्या सल्ल्याने वापरतो! म्हणजे अंतिम निर्णय मंत्रिमंडळाकडे जातो! त्यामुळे तेथून पुढे तो राजकीय निर्णय बनतो! वास्तविक पहातां सेशन कोर्ट, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट या तीन ठिकाणी खटला चालतो व मगच फाशीचा निकाल कायम होतो. सुप्रीम कोर्टाने ‘Rarest of Rare Case’ असे गुन्हयाचे स्वरूप असेल तरच फाशी देता येईल असा ठाम निकष ठरवला आहे. सुप्रीम कोर्टाकडे Review Petition, Mercy Petition करण्याची संधि असते. असे सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यावरच न्यायव्यवस्थेतर्फे फाशी कायम होते. मग त्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करण्याची तरतूद हवीच कशाला? Judiciary च्या डोक्यावर Executive चे आक्रमण कशाला? त्यातूनहि, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर, आरोपीला एक अंतिम दयेची याचना करण्याची संधि ठेवावयाची असेल तर ती राष्ट्रपतिपदावरील सन्माननीय व्यक्तीकडे वैयक्तिकपणे निर्णयासाठी असावी पण मंत्रिमंडळाला त्यात कोणतेहि स्थान असू नये. अशी घटनादुरुस्ती केली तर फाशीचे राजकारण थांबेल! फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीने सरकारच्या राजकीय सोयीसाठी अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडणे हेहि अन्यायाचेच नव्हे काय?

कसाब ( चोरी चोरी ,चुपके चुपके )

कसाब कसा मेला म्हणजे फाशीच्या दोरी मुळे की डासामुळे ह्यावर सध्या पब्लिक चर्चा करत आहे. त्यांच्या आणि लादेन च्या मृत्यू बाबत असे गूढ वलय निर्माण झाले आहे हा योगायोग की अमेरिकन सरकार व आपले प्रशासन आजकाल मित्र असल्याने ,,,, असो . मह्त्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला फाशी देण्याची बातमी सरकारने मस्त रंगवून दिली आहे . एकदम गुप्तहेर कथेप्रमाणे गोपनीय , पण कल्पना करा जर त्यांची फाशीची शिक्षा सरकारने १ आठवडा आधी जाहीर केली असती कदाचित लोकांच्या मनात शंका निर्माण झाली नसती पण प्रसार माध्यमांनी मात्र जो काही धुमाकूळ घातला असता त्यांची मी कल्पना केली

 प्रत्यक्ष फाशीच्या दिवशी  सकाळी सात वाजल्यापासून काही वृत्त निवेदक आर्थर रोड च्या बाहेर जमले असते आणि मग मिनिटा मिनीटाला तीच तीच बातमी परत परत जाहिरातीच्या मध्ये सांगत राहिले असते ,
 आता कसाब ने आंघोळ केली 

,आता त्याने जेवण केले 

( ब्रेकिंग न्यूज कसाब ने आज शेळी चे दुध प्यायले .)

 कसाब ने लाल रंगाचा शर्ट काळ्या रंगाची विजार घातली आहे. 

आणि कसाब च्या फाशीच लाइव्ह प्रक्षेपण प्रायोजित बाय ,,,,,, अश्या जाहिरीती चा वर्षाव झाला असता. अश्या बातम्या चालू असतांना मग ह्या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या घरी प्रसार माध्यमे घुसून घुसून , ( आता तुम्हाला काय वाटतंय ? ) असे विचारून त्यांच्या जखमेवरची खपली काढली असती.
 मग फाशी कशी देतात , त्या दोरीची लांबी ,रुंदी ह्याच्याबद्दल मौलिक माहिती मग जल्लाद ची मुलाखत , मग भारतात फाशी किती दिल्या गेल्या ह्यावर एक रटाळ पण उद्बोधक माहितीपट असे अजून बरेच काही चालले असते. सामान्य प्रेक्षकाला त्यात अजिबात इन्ट रेस्ट नसतो , त्याचे सारे लक्ष ह्या कार्यक्रमाच्या मध्ये कोणत्या जाहिराती कितीवेळा दाखवणार ह्याकडे लागून राहिले असते.

कहर म्हणजे कसाब ला भर चौकात फाशी द्यावी का ह्यावर एस एम एस वर मत मागवली असती. मग चार राजकीय पक्षांच्या प्रवक्ते बोलवून त्यांच्यात कलगी तुरा रंगवला असता. मग ह्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी भांडणे केली असती. अनेक उत्साही लोक जेल बाहेर जमून घोषणा देत बसले असते. अनेक क दर्जाचे अभिनेते जे एरवी नियमित पणे कर सुद्धा भरत नाहीत त्यांनी मुलाखती देऊन देश प्रेमावर आमच्या मनोज कुमार ला न्यून गंड यावा इतके मोठे भाषण दिले असते.
 इंग्रजी प्रसार मध्यम महेश भट्ट , अरुधात्ती राय ह्यांची अमूल्य मत जनतेला दाखवत असती. 

संयुक्त राष्ट्रे, दि. २० (वृत्तसंस्था) – मृत्युदंड-ाची शिक्षा कायमस्वरूपी हद्दपार करावी अशा आशयाच्या संयुक्त राष्ट्र सभेत (युनो) मांडलेल्या प्रस्तावाला हिंदुस्थानसह ३९ देशांनी कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक देशाला आपापले कायदे ठरविण्याचा अधिकार आहे, असा जोरदार युक्तिवाद हिंदुस्थानने युनोच्या आमसभेत केला. या प्रस्तावाला ११० देशांनी पाठिंबा दर्शविला असून ३६ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले आहे. आताच्या प्रगत युगात गुन्हेगारांना मृत्युदंडासारखी रानटी शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सर्व देशांनी या शिक्षेबाबत फेरविचार करून ती रद्द करावी असा ठराव युनोच्या आमसभेत आज मांडण्यात आला. ११० विरुद्ध ३९ अशा मतांनी तो मंजूरही केला. मात्र प्रस्तावाची अंमलबजावणी बंधनकारक नसून स्वैच्छिक असली तरी त्याच्यासाठी जागतिक जनमताचा दबाव विरोध करणार्‍या देशांवर पडणार आहे………………………… ही  आजच्या सामन्यामध्ये बातमी आली आहे ,

 तेव्हा फाशी हवी की नको ह्या विषयावर बौद्धिक हस्त मैथुन करण्यात आले असते. आणि हे करण्यात सो कोल्ड विचार जंत जमले असते.

 आबा तुम्ही हे काय केले ?
 त्या बिचार्या प्रसारमाध्यमांच्या हातातून एवढी सोन्याची अंड देणारा इव्हेंट तुम्ही चोरी .चोरी चुपके चुपके उरकला त्यांचा टी आर पी बुडाला आता अशीच अफजल गुरुची गोड बातमी शिंदे साहेबांनी द्यावी.

 त्यांचे एक वक्तव्य आज प्रकाशित झाले आहे. अफजल ची फाईल माझ्या टेबलावर आली . तर ४८ तासात तिच्यावर मी सही करेन तो सोनियाचा दिवस उजाडला   

 की मात्र ह्या बिचाऱ्या प्रसार माध्यमांना नक्की कळवा, क्या करे गंदा हे पार धंदा हे ये.

शतकानिमित्त संवाद…..

हे मात्र अगदी ठरवूनच होते. १००वी पोस्ट कशी असावी याचा विचार साधारण ९६/९७ वी पोस्ट ब्लॉगवर टाकतानाच सुरु झाला होता. आवडीच्या विषयावरच असावी हे नक्की झालं होतं. लिहिताना आवडीचा विषय म्हणजे खादाडी. तसंही “इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है” 🙂 पण झालं काय की मधल्या २/३ पोस्ट साठी काही लिहिणेच होईना. हे म्हणजे कसं की “९६ वर असताना १०० वी रन कशी घ्यायची हे नक्की करायचे, पण मधल्या ३ धावा घेतानाच इतके चाचपडत खेळायचे की कधीही आउट होईल” असे झाले.

तसा मी ब्लॉग सुरु केला तो २००९ मध्ये. काय आणि कसं लिहायच याचा फारसा अंदाज आणि आराखडा नव्हताच. नंतर मी माझ्या कामात आणि अभ्यासात इतकी व्यस्त होऊन गेले की या गोष्टी जवळपास विसरूनच गेले. त्यामुळे आरंभशूरपणा या गटात हा ब्लॉगही लगेचच सामील झाला. याचे दुसरे कारण म्हणजे इन्फी बीबी आणि इन्फी ब्लॉग ज्यामुळे व्यक्त होण्यासाठी इतर कशाची गरजच नाही उरली.

त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ब्लॉगवर कधी लिहू लागले तर ते २०११च्या एप्रिल-मे महिन्यात. तो कोण वाचतय, नाही वाचत आहे, याकडे सुरुवातीला फारसे माझे लक्षही नव्हते. फेसबुकवर पण मी त्याचसुमारास अवतरले त्यामुळे तशा दोन्ही गोष्टी अपरिचितच…… मग परिचय होण्याचा सुरुवातीच्या काळात असतो तसा बुजरेपणा आणि एक प्रकारचे अवघडलेपण तेंव्हाही होतेच. नावाप्रमाणेच हा ब्लॉग माझे मला असाच होता. थोडा लोकांपासून अलिप्त असा. अनेक दिवस काही न लिहिता जात, ज्याचे फार काही वाटतही नसे. नंतर कधीतरी मराठी-ब्लॉग विश्वावर हा जोडला आणि खऱ्या अर्थाने ह्या जगाशी माझी ओळख झाली. तत्पूर्वी काही ब्लॉगर मित्र मैत्रिणी होत्या जसे की श्रीयुत धोंडोपंतांचा ब्लॉग त्यांचाच दुसरा सांजवेळ, अजून एक मित्र आनंदचा ब्लॉग आणि अजून काही निवडक.

मुळात मी आळशी जमातीतली. नेटाने एखादी गोष्ट करण्यासाठी तितकंच मोठं कारण हवे. यावेळी ते कारण माझे मीच होते त्यामुळे हा प्रवास किती चालू राहील याबद्दल साशंक होते. तरीही मी खऱ्या अर्थाने लिहिती झाले. कोणी वाचतंय किंवा नाही, हे न पाहता व्यक्त होण्यातला आनंद घेवू लागले. खरतर हे अशा प्रकारे व्यक्त होणे याला मर्यादा आहेत, याची जाणीव असूनही हा प्रवास १००व्या पोस्ट पर्यंत चालू राहिला. याचे श्रेय आपणा सर्वाना. सहज,उस्फूर्त असे जेवढे लिहिणे जमेल तेवढेच लिहायला आजतरी मला आवडते आहे. त्यामुळे ठरवून काही लिहिणे थोडे अवघडच जाते. मग  ती कविता असो, किंवा इतर लिखाण असो अगदी कोणावर टीका असो, नाहीतर आठवणीना उजाळा. याच ब्लॉगने काही नवीन मित्र-मंडळही मिळवून दिले. त्यांच्या या ब्लॉगवर किंवा मेल, फेसबुकवर मिळणाऱ्या प्रतिक्रिया मला लिहिते ठेवत गेल्या, आणि मी लिहित गेले. या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार!

१०० व्या पोस्टनंतर आता असे वाटते की स्वत:च्या जगापलीकडे जाऊन आता लिहिता आले पाहिजे. म्हणजे अट्टाहास नाही पण तरी देखील. नाव जरी मी….माझे…..मला असले तरी त्यापलीकडचे पण एक विशाल असे जग जे आहे त्याला या ब्लॉगवर माझ्या नजरेतून वाचता यायला हवे. “मी”ला वगळून लिहिता यायला हवे. खादाडीवर लिहायला हवे. पण सध्यातरी रेसिपी शेअर करणे हा हेतू नाहीये. त्याकरिता अनेक उत्तम असे ब्लॉग्स, उत्तम अशी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मी त्यापेक्षा वेगळं काय लिहू शकते? सर्वसाधारण नाही तरीदेखील किमान “अनघास्पेशल” अशातरी रेसिपी या ब्लॉग वरून शेअर व्हायला हव्यात, स्वयंपाक या कलेविषयी लिहायला हवे, विविध प्रदेशातील खाद्य परंपरा, त्यांची वैशिष्ट्ये या बद्दल लिहायला नक्कीच आवडेल. मुळातच भारतीय खाद्य परंपरा मला खूप भावते कारण त्यामागे केलेला विचार, त्यातील वैविध्य मला मोहून टाकते. पण अजून अंदाज येत नाहीये की हे लिहिणे कसे आणि किती दूरपर्यंत पेलवेल?

तरीही हा ब्लॉग माझ्यासाठी एक सेतू बनला “virtual” जगाशी जोडले जाण्याचा. जितके आनंददायी आहे स्वत:कडून सशक्त असे काही लिखाण घडणे, तितकेच आनंददायी आहे ते इतरांचे असेच ब्लॉग वाचणे. अनेकजण इतके सुंदर आणि सकस लिहितात की, त्यांच्या नवीन लिखाणाची मी वाट बघत असते. वेळ मिळेल तसे वाचूनही काढते. दिवसातून एकदातरी, त्यांच्यापैकी कोणी काही नविन लिहिले कि नाही ते पाहते. धोंडोपंत, महेंद्रकाका, वटवट सत्यवान हेरंब, तन्वीचा सहजच, अनघाचा ब्लॉग, जागेची टंचाई असण्याच्या काळात शब्दांना अब्द अब्द जागा करून देण्याऱ्या साविताताई, अपर्णाची माझिया मना म्हणत घातलेली साद, आनंदचा White lily, संवादिनी, अजूनही फळ्यावर लिहिणारे विसुभाऊ (गुरुजी होते का हे पूर्वी?), भानस, चकली प्रमाणेच मस्त असा वैदेहीचा ब्लॉग असे अनेक. यांच्यापैकी अनेकांशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही. पण अनेक वर्षांचा परिचय असावा अशी ओळख त्यांच्या ब्लॉगमुळे वाटते. मी मागे म्हंटल्या प्रमाणे “संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जपायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच “आपुला हा संवाद आपणाशी” असाच चालू राहो.”


सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात.

 सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात 
. मिसळपाव ह्या मराठी संकेत स्थळावर वर एका माजी सभासदाने बहुदा नाना असावा ह्याने हे वाक्य लिहले होते. साहेबांच्या अंत्ययात्रा थेट प्रक्षेपित करत असतांना काही मराठी वृत्त निवेदक मग ते इंग्रजीतून असो किंवा मराठीतून अत्यंत निकृष्ट , हलक्या , दर्जाचे वृत्त देत होते. त्यांनी घेतलेल्या मुलाखती असो किंवा वृत्त निवेदन ह्यात हिंदू हृदय सम्राटाला आदरांजली कमी व इतर बरीच जळजळ दिसून येत होती. पोटातील आम्लयुक्त जळजळ इनो ने दूर करता येते. मात्र वैचारिक जळजळ झाल्याने विखारी पत्रकारिता करणाऱ्या ह्या प्रसारमाध्यमांना कोणता डोस द्यावा ह्या विचार मला पडला आहे. 
मुंबईत एका मुस्लिम युवतीने फेसबुक वर बाळासाहेबांच्या साठी अपशब्द वापरले आणि तिच्या हिंदू मैत्रिणीने ते लाईक केले ह्यासाठी त्या दोघींना अटक होऊन कोर्टाने दिवसाची सजा सुनावली. मात्र ह्या प्रसारमाध्यमांना कोण आवरणार ?
 कार्पोरेट संस्कृतीचा पगडा राजकारणावर पडला आहे. ह्यामुळे राजनेते हे उद्योजक तर उद्योजक हे राजनेते बनले आहेत. ह्याचा परीसस्पर्श कार्यकर्त्यांना सुद्धा झाला आहे. म्हणूनच मिनरल पाण्याच्या बाटल्या, हातात मोबाईल. असा आधुनिक कार्यकर्त्यांचा थाट असतो. आता नुसत्या वडापाव वर आंदोलन करणारे , पोलिसांचा लाठीमार व ससेमिरा चुकवत भूमिगत आंदोलन करणारे कार्यकर्ते व त्यांच्याशी भावनिक नाते असणारे नेते हा भूतकाळ झाला आहे. पण काल तोच भूतकाळ काळाच्या सीमा ओलांडून शिवतीर्थावर जमला होता. आत्मियता , आंतरिक ओढ मनात आपल्या दैवता बद्दल अपार श्रद्धा , निष्ठा , जिव्हाळा मनात ठेवून २० लाखाचा जनसमुदाय मुंबईत रस्त्यावर दिसला होता.
 हे पाहून दिल्लीमधील काही नेते व त्यांची लटांबर असलेले प्रसारमाध्यम व त्यांचे हुजरे वृत्त निवेदक एरंडेल तेल पिऊन आल्यागत तोंड वाकडे करत ( खरे तर ही गर्दी पाहून त्यांचा तोंडाचा आ वासला होता.) बातम्या देत होते. जगभरातील प्रमुख प्रसारमाध्यम साहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसारित करत होते. मी इंटरनेट वरून आपली मराठी ह्या साईट वरून आय बिन एन लोकमत ह्या वाहिनी द्वारा अंत्ययात्रा लाइव पाहत होतो. डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला मुंबई दंगलीचा जो मी चेहरा पुस्तकावर लगेच चढवला.
 दंगलीच्या वेळी मी मुंबईतील आमच्या बटाट्याच्या चाळीत होतो. आमच्या बाहेर सर्व मुसलमान वस्ती असूनही स्थानिक मुसलमानांकडून कोणतीही आगळीक घडली नाही. ह्याचे कारण लेखात उल्लेख आहे तसा शिवसैनिक आमच्यासाठी तेथे हजर होता. पण जेव्हा वांद्र्याच्या बेहेराम पाड्यांतून लांडे चाळ जाळायला आले. तेव्हा चाळीतील पोर शिव सैनिक असे मिळून हे आक्रमण आम्ही परतवून लावले. शाळकरी वयातील तो रोमांचित अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही, तेव्हा अवघा भगवा रंग एक झाला होता. साहेब होते म्हणून मुंबईत मराठी माणूस टिकून होता- आता मुंबई मध्ये मराठी माणुस पोरका झाला.
 नुकतेच काही दिवसांपूर्वी आझाद मैदानात ह्याच लांड्यांनी जो धुमाकूळ घातला तो पाहता देव न करो परत जर मुंबईत दंगल उसळली तर मराठी माणसाला वाली कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. बाळासाहेबांचा अनेक वर्ष इलाज करणारे डॉक्टर मुस्लिम धर्मीय होते. किंबहुना यांच्या शेवटच्या आजारपणात मुस्लिम डॉक्टर त्यांच्या सेवेस होते. ह्याबाबत साहेबांचे मत साधे होते की ह्या मातीत जन्माला त्याच्याशी इमान राखले म्हणजे मतभेद निर्माण होणार नाहीत.
 लहान वयात घरात लोकप्रभा , चित्र लेखा , मार्मिक अधून मधून यायचे. तेव्हा मार्मिक मधील आंतरराष्ट्रीय राजकारणावर साहेबांचे मार्मिक व्यंग चित्र यायचे.गल्फ वॉर वर  त्यांचे सद्दाम हुसेन वर अमेरिकन सैन्य असे सुरेख व्यंग चित्र आले होते. एक व्यंगचित्र १००० शब्दांहून जास्त परिणामकारक असते. ह्यातून आंतरराष्ट्रीय राज कारणाविषयी
गोडी वाचली. सामान्य जनतेला जगातील परिस्थितीची जाणीव करून देणारा दुसरा व्यंग चित्रकार मी पुढे कधीही पहिला नाही.  
. मी स्वतः कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही , पण एक गोष्ट नक्की साहेबांचे विरोधक असो किंवा समर्थक किंवा तटस्थ मराठी माणुस त्यांच्या जाण्याने एक क्षण का होईना हळहळला. एक युग संपले , एक अवतार संपला , एक पर्व संपून आता पुढे काय ह्यांची चर्चा आता सुरु आहे. माझा ह्या महा नेत्याला , महानायकाला सादर प्रणाम व विनम्र आदरांजली साहेब अर्थाने महाराष्ट्राचे फादर ऑफ स्टेट होते, बाकी कोणाचे राष्ट्रीय स्तरावर मारून मुटकून जनतेच्या माथी मारलेले बाप व त्यांचे माहात्म्य मी मानत नाही.</p>

साहेब

रुद्राक्षाची माळ धरलेला ’तो’ हात उगारलेल्या बोटासकट वर झाला की मुंबई सारखं आंतराष्ट्रिय शहर दोन दिवस बंद व्हायचं. साधारण ८-९ वर्षांचा असेन, तेव्हा त्या घटानेचाचा अर्थ समजण्या इतका मोठही नव्हतो, पण मला इतपत स्वच्छ आठवतय की बाबरी पतन झाल्यावरती त्याबाबत जेव्हा सगळे खुसरपुसर करत बोलायचे, किंवा सोयीस्कर मौन घ्यायचे, तेव्हा शिवाजी पार्कवरती फक्त एकच आवाज जाहीरपणे घुमला होता “होय! आम्हीच पाडली बाबरी!”. त्यामागचे तत्कालिन राजकिय, सामाजिक, धार्मिक संदर्भ व निवडणूकांतले फायदे तोटे यांच्या निकषांसकट असे जाहिर बोलणे देखिल फार जड होते. पण हेच जाहिरपणे सांगणारा दुसरा कोणी हरीचा लाल निघाला नाही हे देखिल तितकेच खरे.

खोटं कशाला बोला? ’राजकारण’ म्हणजे काय ह्याची बर्‍यापैकि जाणीव होईपर्यंत मी बाळासाहेब ठाकरे यांचा “भक्त” होतो, लहानपणी “सामना” या नावाखालती असलेले “बाळ ठाकरे” हे नाव, त्या भोवतीचं वलय, लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारी भाषणाची शैली हे सगळं माझ्याकरता अप्रुप होतं. पण मग वाढत्या वयानुसार शिंग फुटली शेकडो गोष्टि नव्याने पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, समजून घेतल्या तशी राजकिय जाणीवांची व गरजांची क्षितीजं थोडी रुंदावली. आपोआप मी “भक्त” कॅटेगरीतून ’चाहता’ कॅटेगरीत आलो. त्यांची एखादि गोष्ट नाही पटली तर नाहि पटली हे सकारण सांगायचो. पण कॅटेगरी बदलली तरी त्यांच्याबद्दलचा आदर मात्र तोच होता, मी मनापासून चाहता नक्कीच होतो. माणूस दिलखुलास होता. आपली ताकद काय व कशात आहे ह्याची जाणीव असलेला नेता होता. ताकद असल्याने आपसूक एक बेदरकारपणा येतो तो देखिल भरपूर होता. बोलायला लागले कि भाषणं अनेकदा सभ्यपणाची पातळी ओलांडायचं. (त्यातून वाजपेयी – अडवाणी ऐकणार्‍यांना ते बोलणं अब्रह्मण्यम होतं. कदाचित संयुक्त महाराष्ट्रानंतरच्या पिढ्यांना अत्रे फारसे किंवा अजिबातच ऐकायला मिळाले नाहीत म्हणून असेल, पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र या भाषेनी दचकायला कधी पासून लागला?) पण अत्रे म्हणाले होते तसंच बाळासाहेबांनी “आयुष्यात सगळं केलं, फक्त ढोंग केलं नाही”, (अर्थात राजकारणात याला अपवाद ठेवावा लागतोच.) जे काही आहे ते तोंडावरती. जे बोललो त्याची सगळी जबाबदारी घेऊन. “मला तसं बोलायचं नव्हतं” हे वाक्य नंतरची सारवासारव करावी लागते तेव्हा अनेकजण वापरतात, बाळासाहेबांवरती ही वेळ आल्याचं मला आठवत नाही.

एकच पक्ष, एकच नेता, एकच ठिकाण, एकच दिवस आणि थोडि थोडकी नव्हे तर तब्बल सलग साडेचार दशकं … लाखो लोकं त्याच ओढीने लाखांच्या संख्येने जमत, जगात दुसरं उदाहरण असेल तर दाखवावं. तुम्ही अनेकांना थोडावेळ, कींवा थोड्यांना बराचवेळ मुर्ख बनवू शकता पण अनेकांना नेहमीच मुर्ख बनवू शकत नाही. त्या माणसात असं काहितरी नक्किच होतं की सामान्य माणूस रस्त्यावरती उतरायचा. त्या सामान्य माणसात पोट भरलेला पांढरपेशा उच्च मध्यम वर्गिय किंवा एकंदरच मध्यमवर्गिय किती हा प्रश्न अलाहिदा, तसा तर तो कुठल्याच पक्षाच्या पाठी नसतो. मुश्किलीने एखादि सभा गाजली तर ठीक होतं पण ४५-४६ वर्ष तुम्ही दारु प्यायला देऊन, पैसे वाटून लाखोंची गर्दि नाहि खेचू शकत हे कुणीही मान्य करेल. साहेबांवरती लोकांच अफाट प्रेम होतं. त्यांना हिंदुहृदयसम्राट वगैरे म्हंटलं की काही सो कॉल्ड उच्च शिक्षित आणि ओपन माइंडेड लोकं कुत्सित हसतात, पण ९३ च्या दंगलीत मुंबई २ दिवसात कुणी शांत केली? ६ दिवस मार खाणारा हिंदू नंतरच्या २ दिवसात कसा उसळला होता? शिवसेना भवनात झालेल्या मिटींग मध्ये “तुम्ही हातात बांगड्या भरल्यात का?” ह्या साहेबांच्या एकाच प्रश्नाचा तो परीणाम होता हे नाकारु शकत नाही हे देखिल तितकच खरं. आजही शिवसैनिक रस्त्यावरती तलवारी घेऊन उभे राहिले आणि आम्हांला सुरक्षित वाटलं, आमच्या घरची माणसं आता नीट घरी येतील याची खात्री पटली हे सांगणारी अनेक माणसं भेटतील. परवा १३ नोव्हेंबरला देखिल “बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक आहे” हे ऐकून वडापाव विकणार्‍यापासून ते बड्या धेंडांपर्यंत मातोश्रीवरती रीघ लागली. परत सांगतो दोघांची कारणं वेगळी असतीलही पण त्यामागे “ताकद” होती, मग ती प्रेमाची असेल कींवा राजकिय असेल.

अनेक जण विचारतीलही की काय केलं त्यांनी, की इतका पाठींबा देता? तर याचा अर्थ एकच त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीतले त्यांचे काम माहित नसावे, किंवा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावरती देखिल मराठी माणसाचे गुदमरलेपण ’मार्मिक’ च्या माध्यमातून कसं बाहेर आणलं. त्या मार्मिकच्या फटकार्‍यांनी अनेक जण विव्हळले होते हे त्यांच्या लक्षात नसेल. आज “मराठी” हा मुद्दा घेऊन आज दुसरे देखिल उभे राहिले आहेत पण अजूनही मराठी माणसाला मुंबईत कुणी हक्क दिला, त्याची अस्मिता कोणी जागृत केली? ह्या प्रश्नाचं उत्तर एकच “बाळ ठाकरे”. दुसरी गोष्ट – प्रबोधनकारांचा वारसा असेलही पण सेनेत जात बघितली गेली नाही. बाकिच्या पक्षात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री बसावा व त्याबदल्यात दुसर्‍या जातीचा उपमुख्यमंत्री बसवून मांडवली करावी, असं शिवसेनेत कधी दिसलं नाही. मुळात शिवसेना – भाजपा सत्तेत आली ती बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे. ९० सालच्या मंडल आयोगाला विरोध करुनही ९५ साली ते निवडून आले ह्यावरुन काय ते समजावं. सत्तेत न रहाता रीमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणे फार कमी लोकांना जमते, त्याची सुरुवातही बाळासाहेबांनीच केली म्हणा ना. म्हणजे मुख्यमंत्रीपदापेक्षा शिवसेनाप्रमुखपद मोठं होतं (अर्थात ही चांगली गोष्ट नाही हे माझेही मत आहे पण ती घडून गेलेली गोष्ट आहे जे आज नाकारता येत नाही.), हे बाळासाहेबच करु जाणे. मग ह्याला कोणी हुकूमशाही म्हणेल, कुणी झुंडशाही म्हणेल, कोणी आंधळा अनुययही म्हणेल, कुणाला तो पक्ष फक्त गुंडांचाही वाटतो, पण संपूर्ण मुंबई बंद करुन दाखवायची ताकद शिवसेनेत तेव्हढी होती हे देखिल तितकेच खरे. बरं ज्यांना विरोध व्हायचा त्या विरोधकांना ठाकरी भाषेचे सपकारे बसून देखिल विरोधक कधी दात-ओठ खाऊ बाळासाहेबांवरती तुटून पडले नाहीत उलट राजकारणाबाहेर सगळ्यांशीच त्यांचे संबध चांगलेच राहिले. पवार आणि मी बीअर प्यायला बसतो हे भर सभेत सांगणारे बाळासाहेबच.

शिवसेनेची कार्यपद्धती सगळ्यांहुन वेगळी होती. लहान लहान शाखांतून त्यांनी पक्षाची केलेल्या बांधणीने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवले. अनेक चेहरे नसलेल्या लोकांना त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार बनवले. कदाचित लोकांची नस त्यांनी ओळखली होती. घरात उदंड लेकरं असली की वेळ पडल्यास बाहेर घराची पडती बाजू सावरायला त्यात एखादं वांड पोरगं असावं म्हणतात. बाळासाहेबांची “शिवसेना” तशी होती. बाळासाहेबांची शिवसेना अश्या करता कारण साहेब स्वत: सगळं बघत होते तोवर आलबेल होतं. नंतर वयोमानाने किंवा इतर कारणांनी शिवसेनेच्या रोजच्या कामातून त्यांनी लक्ष कमी केलं त्यानंतर शिवसेनेतुन अनेक जण अनेक कारणांनी बाहेर पडले, कुठली कारणं कोण बाहेर पडलं ते इथे लिहित बसण्याचे प्रयोजन व वेळ नाही. खुद्द बाळासाहेबांना अखेर “या चिमण्यांनो परत फिरा रेऽ” म्हणावं लागलं होतं. पण बाहेर पडलेल्या लोकांतही भाषणांत साहेबांवरती पलटवार करण्याची धमक नव्हती. त्यामागे नवीन ’ठाकरी’ टोला येण्याची “भीती” तर होतीच पण बाळासाहेबांना उलट उत्तर देणं हे एकूण महाराष्ट्राच्याच कल्पनेबाहेरचं होतं. मात्र इथे एक कडवट गोष्ट मांडावी लागते आहे की सध्याच्या शिवसेनेचा ’दरारा’ संपलाय, कारण तो असता तर मुळातच CSTची दंगल करण्याची कुणाची छाती झालीच नसती. कींवा आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्यातील भाषणात साहेबांनाही “म्हातारी उडता नयेची तिजला…” चालीवरती आर्जवे करत “उद्धव – आदित्यला सांभाळा” हे सांगण्याची वेळ आली नसती. आयुष्यभर केवळ आदेश देणार्‍या साहेबांचे, ते काहितरी मागणारं चित्र न बघवणारं होतं इतकं शेवटी मी नमुद करु इच्छितो.

आज तरी दूर दूरपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या इतका भक्कम नेता दिसत नाही. २०१४च्या निवडणूकांचे निकाल काय असतील ते माहीत नाही पण २०१४ च्या निकालांवरती १७ नोव्हेंबर २०१२ चा ठसा असणार आहे हे नक्की.

उद्याच्या महाराष्ट्रात बाळ ठाकरे नाहीत ही एकंदरच अस्वस्थ करणारी बाब आहे. ती राजकिय पातळीवरची जितकी आहे तितकी वैयक्तिक पातळीवरची देखिल आहे. आणि ही माझीच नाही तर करोडो मराठी माणसांची भावना आहे. आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे गल्लीबोळातून भाऊ, भाई, दादा वगैरे उगवत आहेत. अधून मधून एखाद्या नावामागे साहेब देखिल लावले जाते, पण कुठलही नाव न घेता केवळ “साहेब” म्हंटलं की एकच नाव डोळ्यापुढे यायचं आणि येईल.

बाळासाहेबांसारखा माणूस गेल्यावरती राहुन राहुन दासबोधातला मृत्युनिरुपणाचा समास आठवतो –
“मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥
मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥१३॥

कारण आज हे पुन्हा लोकांना सांगावं लागतय असा माणूस गेलाय!

 – सौरभ वैशंपायन.

अखेरचा हा तुला दंडवत !!

बाळासाहेबांनी हे काय केले? का अचानक सोडून गेले? दिवाळी पासूनचं कसे तरी वाटत होते..मन उदास होते होते. पण काल साहेबांची प्रकृती सुधारते ऐकून बरे वाटले होते. आणि आज अचानक ते सोडून गेले. खूप कसेसेच झाले..शब्दात न सांगता येण्यासारखे. दसऱ्याच्या भाषणात जेव्हा त्यांनी जय महाराष्ट्र केला तेव्हाच मनात शंकेची पाल चूकचुकली होती. कधी न कधी ते जाणार होते पण मन मानायला तयार नव्हते. तो जय महाराष्ट्र त्यांचा शेवटचा जय महाराष्ट्र असेल असे वाटले नव्हते.
बाळासाहेब!!!! कोण आहेत ते? का त्यांच्याबद्दल एवढी आस्था वाटावी. काय केले त्यांनी असे की त्यांची काळजी वाटाला वी. त्यांची आठवण यावी? ह्या प्रश्नांची उत्तरे आयुष्यभर सापडणार नाहीत? खरच खूप वाईट वाटतेय. घरातकोणी जवळचा नातेवाईक गेल्यासारखे. मन खूप बेचैन झाले आहे. खूप कोंडमारा होतोय. जीव अडकल्यासारखा झालाय. लवकर निचरा नाही झाला तर हालत खराब होईल…..पण निचरा होणेहि शक्य नाही. खरचं बाळासाहेब गेलेत. एवढे दिवस फक्त अफवा येत होत्या. आज खरचं साहेब गेलेत, तेच ते शिवसेनाप्रमुख, तेच ते व्यंगचित्रकार, तेच ते फाटक्या तोंडचे, तेच ते निर्भीड राजकारणी, तेच ते जहाल हिंदुत्ववादी, तेच ते आयुष्यभर पाकड्यांना शिव्या घालत आले….तेच ते….तेच ते…आज सोडून गेलेते. अजून हि विश्वास नाही बसत आहे. 
सात वाजल्यापासून सर्व टीव्ही ची चानेल्स बघून झाली पण कोणीच सांगत नाही आहे की बाळासाहेबांची प्रकृती आता स्थिर आहे. सगळेच सांगताहेत की बाळासाहेब गेलेत. सर्वाना सोडून…आता पर्यंत एकच असा राजकारणी आहे…ज्याच्यासाठी मला खरच रडावेसे वाटतेय. अगदी धाय मोकलून रडावेसे वाटतेय. माझ्यासाठी ते पहिले राजकारणी असतील आणि कदाचित शेवटचे राजकारणी ज्यांचासाठी माझ्या डोळ्यात अश्रू येतील. त्यांचासारखे महामानव एकदाच जन्माला येतात. शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर नंतर ते एकच असे नेते असतील ज्यांच्या जाण्यामुळे समाज खऱ्या अर्थाने अनाथ झाला असेल. खरच पोरके झाल्यासारखे वाटतेय. अगदी रिते रिते झालाय. प्रवासातून येताना काही तरी महत्वाची गोष्ट मागे गाडीत राहून गेली आणि ती परत मिळण्याची शेवटची आशा हि संपल्यावर जसे वाटते तसेच काहीतरी आता वाटतेय. उद्या त्यांचे ह्या पृथ्वीतलावरचे उरले सुरले अस्तित्वही नष्ट होणार. नाही सहन होत आहे हि कल्पना.
चार / पाच तास टीव्ही बघून शेवटी चादर ओढून झोपायला घेतले तरी झोप येत नव्हती. बेचैनी वाढत होती…कोणाशी तरी बोलावेसे वाटत होते. मन मोकळे करावेसे वाटत होते. म्हणून उठलो आणि रात्री साडे बारा वाजता लिहायला बसलोय. मी असे कुठल्या राजकारणी नेत्यासाठी एवढा बैचेन होईन असे कधी वाटले नव्हते…पण इथेच बाळासाहेबांचे प्रेम आहे. बाळ नावाचा बाप माणूस होता. मी राज ठाकरेच्या काय भावना/ मनस्थिती असेल ते समजू शकतो, शिवराय गेल्यावर मावळ्यांची काय मनस्थिती झाली असेल ती मी आता अनुभवतोय. स्वराज्य नसेल तरी बाळासाहेब राजे होते, सम्राट होते. देव माणूस होते.
देवांचे बोललेले शब्द जसे कधी बदलत नसतात. तसे बाळासाहेबांचे शब्द होते. मला नाही आठवत ते कधी असे बोलले असतील कि मी हे वाक्य कधी बोललोच नाही किंवा माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला आहे. ते जे काही बोलले त्याबद्दल कधी त्यांना माफी मागावी लागली नाही, त्यांना कधी आपले शब्द मागे घ्यावे लागले नाही. निधड्या छातीचे वाघ होते ते. एकदा डरकाळी फोडली कि फोडलीच. तो मी नव्हेच असे कधी त्यांच्या बाबतीत झालेच नाही. पोलीस, कायदा, सरकार कश्या कश्याला ते घाबरले नाहीत. किडकिडीत बांध्याच्या शरीरात अपार मानसिक ताकत होती. तीच ताकत त्यांनी मराठी माणसात ओतली. बाबरी मशीद पाडल्यावर जेव्हा मशीद कोणी पडली ह्याची चौकशी चालू झाली आणि भाजपचे सर्व नेते मूक गिळून बसले होते.. तेव्हा हा ढाण्या वाघ बांद्र्यात बसून डरकाळी फोडत होता. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे..गर्व आहे. “गर्व से कहो हम हिंदू है” हे त्यांचे वाक्य त्यांनी सार्थ करून दाखवले. असे होते माझे बाळासाहेब.
शिवसेना उभी करायसाठी घेतलेले त्यांनी मेहनत, रेषांवरचे त्यांचे प्रभुत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, मराठी माणसासाठी त्यांची लढाई, कधीही लिहून न आणलेली खणखणीत आवाजातली त्यांची भाषणे, एक उत्कृत्ष्ट वक्ता, एक प्रेमळ नेता, एक श्रेष्ठ हिंदू नेता हे सगळे सगळे कायमचे संपले आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तुमच्या दारी आलेला कधीच रिकाम्या हाताने परत गेला नसेल अगदी यमराजाला पण तुम्ही दोन दिवस थांबवून ठेवले पण जाता जाता त्याची इच्छा पूर्ण केली. आज देशातल्या कोणी नेत्याने जर मराठी किंवा हिंदू वर आरोप केले तर आपल्या अग्रलेखातून त्याला सडेतोड उत्तर देणारे कोण नसेल. पाकिस्तानच्या नावाने शंख करणारा कोणी नसेल. आता बीसीसीआय न भिता पाकिस्तान बरोबर सामने खेळवू शकेल आणि आम्ही मुर्दाडा सारखे बघत राहू. आमच्या चेतना जागवणारा, रक्त उसळवणारा आमचा लाडका नेता नसेल. 
एक भयाण पोकळी निर्माण झालीय आणि कोणीतरी जोर जोरात पाय पकडून त्या पोकळीत खेचतय….हतबल झालोय… शरीराची आणि मनाची ताकत दोन्हीही संपत चालल्या आहेत. बाळासाहेब…तुम्हीच बाहेर काढू शकता होता ह्यातून आणि तुम्हीच सोडून गेलात वाऱ्यावर…का ?? हा हक्क तुम्हाला कोणी दिला? आता खिडकीतून हात कोण दाखवेल तुमच्या शिवसैनिकांना? आमच्या हक्कासाठी कोन नडेल?  आयुष्यात एक खंत नक्कीच राहील की तुम्हाला प्रत्यक्ष्यात कधी पाहू शकलो नाही. माझ्या पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू शकणार नाही की मी शिवरायांसारखा एका महान नेत्याला बघू शकलो नाही. 
आयुष्यभर हि खंत राहील…..आयुष्यातली हि पोकळी कधीच भरणार नाही. एक नक्की की स्वर्गातील इंद्रदेव ही घाबरला असेल. पृथ्वीवरचा महान नेता….महाराष्ट्राचा सम्राट येतोय. तिथेही तुम्ही भगवा फडकवाल ह्यात शंका नाही. महादेव तुमच्या आत्म्याला शांती देवो. 
जय महाराष्ट्र !!!!