प्रश्नांचा सौदागर Frederick Forsyth

Frederick Forsyth
कधीकाळी तो बातमीदार होता.. आता केवळ तडाखेबंद खपाचाच नव्हे तर ‘प्रश्न पाडणारा’ लेखक आहे. त्याची एखादी कादंबरी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत नव्यानं दाखल होणारे क्रमिक पुस्तकासारखी वाचतात, पण याच यंत्रणेच्या क्रौर्याचं चित्रण करणारी त्याची दुसरी कादंबरी ब्रिटिश सरकारलाही या क्रौर्याची कबुली द्यायला लावते.. जगातले बारकावे टिपणारा, तपशिलात वर्णन करणारा फ्रेडरिक फोर्सिथ प्रत्यक्ष भेटीत ‘मी लेखकबिखक नाही’ म्हणाला, त्यात थोडंफार तथ्यही आहे. पण याला जग कळतं. इतरांपेक्षा लवकर कळतं. म्हणूनच, वाचणाऱ्याला प्रश्न पडतात!आपल्याकडे कादंबरी लेखनाचा, म्हणजे अर्थातच लेखकाचा, परीघ ठरलेला असतो. गाव, जिल्हा.. फारच म्हणजे एखादी सिंहासन वगैरे आली तर, राज्य. त्यापुढे काही आपण जात नाही. झेपतच नाही आपल्याला. तीच तीच माणसं, त्यांच्या त्याच त्या व्यथा. मग त्यांच्यातल्या नातेसंबंधांच्या मनोव्यापाराचा आढावा आपले लेखक घेतात. मग ते झाल्यावर उरलेले लेखक मनोव्यापाराचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम आपल्या लेखनात मांडतात. मग ते वाचून आपण टाळय़ा वगैरे वाजवतो आणि मराठी कादंबरी किती खोल वगैरे गेल्याचे एकमेकांना सांगू लागतो.
आपल्या कादंबरीची इयत्ता कंची हा प्रश्न स्वत:लाच विचारून घ्यायचा असेल तर फ्रेडरिक फोर्सिथ वाचणं, हे राष्ट्रीय कर्तव्य मानायला हवं. एक तर त्याचे विषय. कधी त्यात जैविक युद्ध असतं. जनरल द गॉल या फ्रान्सच्या सर्वोच्च सेनानीची हत्या असते. एकात स्फोटकं घेऊन जाणारी बोटच्या बोट किनाऱ्यावर उत्पात घडवणार असते, तर कधी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारात अमली पदार्थानी घडवलेला हाहाकार असतो. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोविएत रशिया एकमेकांची पिकं कशी संपवतात याचीही तितकीच चित्तथरारक कथा फोर्सिथ रंगवतो. तितक्याच ताकदीनं. त्याच्या कादंबऱ्यांत एक प्रकरण व्हाइट हाऊसमधे घडतं. पुढचं युरोपीय राष्ट्रांच्या मुख्यालयात ब्रसेल्सला, तिसरं प्रागमध्ये. चौथं मॉस्कोत. पाचवं लंडनमध्ये. त्यात मध्येच कोणीतरी दिल्लीला वगैरे येऊन गेलेला असतो. आणि हे सगळे शेवटच्या दोनेक प्रकरणांत एकमेकांच्या सहवासात येतात आणि त्याची महाकादंबरी आपल्याला अचंबित करून संपते. यातला महत्त्वाचा भाग असा की ही गावं नुसती यायची म्हणून येत नाहीत. त्यातील बारीक सारीक तपशिलासह ती रंगवलेली असतात. म्हणजे कोणत्या नाक्यावर कसलं दुकान आहे, कोणतं कार्यालय आहे. त्यात काय होतं. वगैरे संपूर्ण तपशील.
मुळात मोठे इंग्रजी लेखक खूप, खूप तपशिलासह लिहितात. ललित वाङ्मय आहे म्हणून ठोकून देतो ऐसाजे असा प्रकार नाही. आणि यात फोर्सिथ इतरांपेक्षा मोठा का? तर त्याच्या व्यक्तिरेखाही खऱ्या असतात. म्हणजे त्याच्या कादंबऱ्यांत बिल क्लिंटन असतात. मार्गारेट थॅचर असतात. सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, क्युबातल्या छळछावण्या, डोनाल्ड रम्सफेल्ड.. असे सगळे खरे खरे असतात आणि फोर्सिथचं लिखाण नाकारणं त्यांनाही जमत नाही. आसपास जिवंत असलेल्या मंडळींवर लिहायचं तर खूप अभ्यास लागतो. फोर्सिथ तो करतो. आपल्याकडे अभ्यास हा रंजकतेच्या मुळावर येतो, असं मानायची पद्धत आहे. असं ज्यांना वाटतं त्यांनी फोर्सिथ वाचणं ही काळाची गरज समजावी आणि अधिक वेळ न दवडता फोर्सिथ वाचायला सुरुवात करावी. याचा तपशिलाचा अभ्यास इतका असतो की, ब्रिटनच्या एमआय-फाइव्ह या सरकारी गुप्तहेर यंत्रणेत दाखल होणाऱ्यांना क्रमिक पुस्तकं म्हणून फोर्सिथ वाचायला लावतात. यावरनंच त्याचा विषयांचा आवाका आणि अभ्यासाची बैठक लक्षात येऊ शकेल.
फोर्सिथ सुरुवातीला ब्रिटनच्या हवाई दलात पायलट होता. नंतर ते झाल्यावर छोटय़ामोठय़ा वर्तमानपत्रांत वार्ताहरी केली. पुढे तर रॉयटर्ससाठी झेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, फ्रान्स अशा अनेक ठिकाणी तो बातमीदार होता. शीतयुद्धाच्या तापत्या झळांनी जगाला वेढलं होतं तो काळ. चांगला बातमीदार असल्यानं आसपासच्या घटना तो सजगपणे टिपत गेला. त्यातूनच त्याची कादंबरी जन्माला आली ‘द डे ऑफ द जॅकल’. तिच्यावर सिनेमाही आल्यानं ती बऱ्यापैकी माहिती असते. पण फोर्सिथच्या पुढच्या अनेक कादंबऱ्या जॅकलपेक्षा कितीतरी उंचीच्या आहेत. जगाच्या राजकारणाचा थरार ज्यांना अनुभवायचा असतो त्यांच्यासाठी फोर्सिथसारखा दुसरा आनंद नाही. द ओडिसा फाइल्स, द डॉग्ज ऑफ वॉर, द फोर्थ प्रोटोकॉल, द निगोशिएटर, द डिसीव्हर, द डेव्हिल्स आल्टरनेटिव्ह.. अशा किती सांगता येतील. याच्याही नंतरची माझी प्रचंड आवडती म्हणजे द फिस्ट ऑफ गॉड. इराकच्या सद्दाम हुसेन याने तयार केलेली अण्वस्त्रं इस्रायली बाँबफेकी विमानं जाऊन नष्ट करतात, या सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी अशावेळी हाती आली की, मी तेलाच्या राजकारणात पिंपभर बुडालो होतो. फिस्ट ऑफ गॉड सलग वाचून, एकाच बैठकीत संपवावी लागते. तशी मी ती संपवली आणि फोर्सिथ घरी जमा व्हायला लागले. द फिस्ट ऑफ गॉड इतकी परिणामकारक आहे की, त्यानं ती आधी लिहिली आणि मग इस्रायलनं त्याप्रमाणे कृती केली असं वाटावं.
शिष्यवृत्तीच्या निमित्ताने १९९८ साली लंडनला सहा महिने राहायला मिळालं. त्यावेळी करायच्या कामात एक काम होतं फोर्सिथला भेटायचं. एका रविवारी त्याच्या घरी धडकलो. लंडनच्या उत्तरेला हर्डफोर्डशायरला त्याचं घर आहे. घर कसलं, हवेलीच ती. जवळपास तिनेकशे र्वष जुनी. आणि आत प्राणिसंग्रहालय. अगदी गाढवसुद्धा. त्याचं नाव आइन्स्टाइन का असंच काहीतरी. त्याचा विक्षिप्तपणा लक्षात येईल असं. पहिल्या भेटीतच तो सांगून जातो, ‘मी लेखकबिखक नाही’ आणि आपल्याला धक्काच बसतो. आपण म्हणजे त्याचे चाहते वगैरे असतो आणि हा तर म्हणतो मी लेखकच नाही. प्रश्न त्यामुळे त्याचं काय होणार हा नसतो, तर आपलं काय झालं हा असतो. तर फोर्सिथ त्याची लेखनप्रक्रिया उलगडून सांगतो.
तेव्हा जाणवतं की त्याला ठाम अशी राजकीय, परराष्ट्र राजकारणातली मतं आहेत आणि लेखक म्हणून तो भूमिका मांडायला अजिबात घाबरत नाही. म्हणजे पंतप्रधान म्हणून टोनी ब्लेअर अगदीच कुचकामी आहेत आणि इराक युद्धावरनं त्यांच्यावर महाअभियोग चालवून त्यांना हाकलून लावायला हवं.. इतक्या स्वच्छपणे त्यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या लिखाणातही ही भूमिका लपत नाही. म्हणजे त्याच्या एका कादंबरीत (द डिसीव्हर) त्याच्या एका गुप्तहेरास ब्रिटन निर्घृणपणे मारतं. यातली मेख अशी की मारला गेलेला गुप्तहेर आयरिश रिपब्लिकन आर्मीचा म्हणजे ‘आयआरए’चा असतो आणि त्याचवेळी ब्रिटन आणि आर्यलड यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झालेले असतात. यातला धक्कादायक भाग असा की, हे पुस्तक आलं त्याचवेळी आयआरएचा एक हेर गूढ अवस्थेत मेलेला आढळला होता. त्याच कादंबरीत फोर्सिथनं लिहिलेलं असतं : मारल्या गेलेल्या आयआरए बंडखोरांच्या अंत्यविधीप्रसंगी जमलेल्यांत काय चर्चा होते आहे हे कळावं म्हणून शवपेटय़ांतून सुद्धा ब्रिटनने हेरगिरीची यंत्रणा कशी ठेवलेली होती, हे छापून आल्यावर फोर्सिथला बऱ्याच निषेधाला तोंड द्यावं लागलं. परंतु नंतर ब्रिटिश सरकारला मान्य करावं लागलं- शवपेटय़ांत ट्रान्समीटर होते ते. फोर्सिथ बीबीसी रेडिओवरही दर शनिवारी कार्यक्रम करायचा. कमालीची लोकप्रियता लाभलेल्या या कार्यक्रमात त्याची मतं नेहमीच्याच परखडपणे समोर यायची. तो सांगतो की कादंबरीत फक्त मुख्य कट, त्याची आखणी, मांडणी त्याची असते. म्हणजे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेत वगैरे मुख्य शल्यक कसा हृदय बाहेर काढताना आणि परत आत ठेवून चालू करण्याचं काम करतो- बाकीची फाडाफाडी वगैरे छोटीमोठी कामं त्याचे सहायक डॉक्टर करतात- तसं फोर्सिथचं आहे. पुस्तकासाठी लागणारी बाकीची जुळवाजुळव त्याच्या पदरी असलेले लेखक करतात. एकदा का ती झाली की फोर्सिथ आणि त्याचे हे लेखक त्याच्या मालकीच्या बेटावर जाऊन राहतात.
..आणि मग तिथून जन्माला येते एक नवी कादंबरी. एक नवी सत्यकथा. त्याला भेटल्यानंतर त्याची दोन पुस्तकं आली. द अफगाण आणि कोब्रा. ‘नाइन इलेव्हन’मध्ये विमानं जाऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींना धडकतात. ‘द अफगाण’मधे अख्खीच्या अख्खी, महनीय व्यक्तींनी भरलेली बोट. तिच्यावरचं संकट टाळतो कर्नल माइक मार्टिन. ओसामाच्या कळपात शिरून त्याची संपूर्ण यंत्रणा माइक समजावून घेतो आणि त्याच्या रूपानं फोर्सिथ ती आपल्यासमोर मांडतो. फोर्सिथ चाहत्यांचा माइकशी चांगला परिचय असतो. कारण द फिस्ट ऑफ गॉडमध्ये त्यानेच महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. वाईट एवढंच की हा माइक आता परत भेटणार नसतो. अफगाणमध्येच त्याचा शेवट होतो.
अलीकडेच त्याचं ताजं पुस्तक आलंय. द कोब्रा. अमली पदार्थाची निर्मिती, त्याचा व्यापार याचं हिंस्र जग या पुस्तकातून समोर येतं. आणि कळते त्या जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेली देशोदेशींची चढाओढ. फोर्सिथची सगळी वैशिष्टय़ं यातही आहेत. साहजिकच जन्माला येताना त्याची पुस्तकं पहिली आवृत्ती पंधरा लाखाची, वगैरे असं मिरवत येतात.
पण तरीही फोर्सिथ रूढ अर्थानं लेखक नाही. एका अर्थानं बरंच आहे ते. फोर्सिथला एकच माहितीये. आपल्या वाचकांना प्रश्न पडला पाहिजे- याला आधीच कसं काय कळलं, हा!
तो प्रश्न त्याची पुस्तकं आजही पाडत असतात.

 गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com

[ Frederick Forsyth, CBE (born 25 August 1938) is an English author and occasional political commentator. He is best known for thrillers such as The Day of the Jackal, The Odessa File, The Fourth Protocol, The Dogs of War, The Devil’s Alternative, The Fist of God, Icon, The Veteran, Avenger, The Afghan and The Cobra.]

जंगलची खरीखुरी लेकरं

 

अरुणाचलमधील ‘पाक्के’ जंगलातील १२ गावांतील
आदिवासींनी एकत्र येऊन धोरा आबे सोसायटी स्थापन केली. तीत जंगल विभाग आणि
गावकरी मिळून एकत्रितरीत्या काम करतात. गावकऱ्यांनी शिकार करणे सोडून दिले
आहे. शिकारीची हत्यारे सरकारजमा केली आहेत. आता जंगलातील हॉर्नबिल(Hornbill)
पक्ष्यांचे संरक्षण करण्याचे व इथे येणाऱ्या निसर्गप्रेमींना मार्गदर्शक
म्हणून हे निशी आदिवासी काम करतात आणि त्यातून मिळणाऱ्या

येरे येरे पावसा…………..

येरे येरे पावसा……………….
तुला देतो………..पैसा………
पैसा झाला खोटा…………….
पावूस आला मोठा ………..
पावूस पडला झिम झिम झिम………
आंगण झाले ओले चिंब………
पावूस पडतो मुसळधार……..
रान होईल हिरवे गार……..
ये……..गं ……..ये …………..गं ………..सरी ……………..
माझे मडके भरी ……………
सर आली धावून ……………
मडके गेले वाहून ……………

पावसाळा सुरु झालाच………मग आजच्या पावसात होड्या सोडल्या कि नाही मित्रानो ……..आता मज्या येणार सर्वत्र थंडगार हिरवळ होणार.रिमझिम रिमझिम पावूस ,थंड थंड हवा ,गरमागरम भजी आणि चहा ,मातीचा सुवास ,कागदाच्या होड्या ,धबधब्याची सुरवात ,सकाळच धुकं ,गवतावरच दव,हवेतील ओलावा ,नदीनाले अगदी खळखळून वाहणार , आणि मोर…..मोर तर अक्षरशा नाचणार. आज खूप पावूस पडला अगदी आजी म्हणते नं ……..धो धो …….तसाच आणि विजही गडगडली. आमचीच काय तर सगळ्या आज्या आभाळातील विजेला गंमत म्हणून गडगडनारी म्हातारी म्हणतात.लहान मुलं पावसात भिजून आजारी न पडण्यासाठी हा गंमतशीर उपाय असतो.म्हणजे लहान मुलं  घाबरून बाहेर जात नाही आणि घराच्या  आडोशालाच राहतात . आजीकडून आईकडे आईकडून आपल्याकडे  आलेला हा उपाय…….बरेचसे लोक येरे येरे पावसा …..म्हणत पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या  सोडण  पसंत करतात . तस लहानपणी आपल्या आई बाबांनी , शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला हस्तकला म्हणून रुमालाच्या घडी नंतर होड्या बनवायला शिकवले आणि घड्यांचा सराव म्हणून दहा वेळा तीच होडी करून घेतली  ह्या होड्या पावूस आला कि पावसाच्या पाण्यात सोडायच्या हं ……..असे सांगितले .आणि आपण………आपण अस करतो देखील हा वारसा वर्षोन वर्ष चालत आलेला आहे .के.जी मधील मुलांना रेन रेन गो अवे ……….असे जरी शिकवले तरी मुलंच नाही तर एकंदरीत सारेच जण  पावूस आला कि उड्या मारत टाळया वाजवाट ये रे…..ये रे…पावसा म्हणत होड्या बनवायला सुरवात करतात .होडी पाहिली कि पावसाची आणि पावूस पाहिलाकी होडीची आठवण येण स्वाभाविक आहे .आणि आपण हा उत्कुष्ट खेळ अगदी निरागसतेने खेळत असतो कधी आई वडिलान बरोबर तर कधी मित्र मैत्रिणीन बरोबर तर कधी हाताच बोट इवल्याश्या हातात अगदी घट्ट पकडून इवलीशी पावलं टाकत तुरु तुरु चालणाऱ्या गोड हसणाऱ्या आपल्या  बाळा बरोबर .आणि हि वेळ सगळ्यांवर येते .पावसाच्या पाण्यात होड्या सोडन हा पारंपारिक खेळ झाला पाहीजे अस नाही का वाटत तुम्हाला ? झाला पाहिजे काय……….मला तर तो आहे असाच वाटत . काही जणांना तर खिडकीत बसून पावूस पाहत हातावर पावसाचे थेंब जेलण्याची खूप हौस आणि काहीना पावूस आला कि भजी आणि चहा पिण्याची ,काहीना भिजण्याची . गावची मंडळी तर………काही काम करत असतील आणि पावूस आला तर  पावसाच गाण देखील म्हणतात म्हणजे जशी ओवी असतेना तसाच हा प्रकार .हे मी ऐकलेलं आहे हं ……….
उब  र……………उब  र……………पावसा
तुझ्या बायका गेल्या ताका …………
तिकड लगोऱ्या …………….
इकड उबोऱ्या………….

मग साक्षात चमत्कारच जणू……………..चक्क पावूस जातो .पावूस हा सगळ्यांना किती आवडीचा आणि आपलासा वाटतो नं . म्हणूनच दर वर्षी  काहीही  झाल तरीही आपण नव्याने पावसासाठी उत्साही असतो . आणि दर वर्षी प्रमाणे
येरे येरे पावसा……………….
तुला देतो………..पैसा………
पैसा झाला खोटा…………….
पावूस आला मोठा ………..
ये……..गं ……..ये …………..गं ………..
सरी ……………..
माझे मडके भरी ……………
सर आली धावून ……………
मडके गेले वाहून ……………

म्हणत पावसाच स्वगत करतो ………………….
ऋतू पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ………………..
मग या वर्षी हातात होड्या घेऊन आपणही म्हणायचं नं ……………….

ये रे ये रे पावसा …………….
चैताली कदम

पुन्हा एकदा शाळे मध्ये………

 उन्हाळ्याची सुट्टी संपवून……………………..
फिरून गाव पालत घालून .आंबे ,काजू , फणसाने  तृप्त होऊन . आणि कडाक्याच उन सोसून , घामाच्या  झळा झेलून ,सारेजण शाळेच्या खरेदीस लागले ,नवीन नवीन वस्तू जसे  कपडे , चकचकीत शूज , नवीन बॅग , नवी कोरी पुस्तक ,  पावसाळी कपडे छत्र्या अगदी विविध आणि निरनिराळ्या रंगाच्या  तसेच पट्टी ,पेन्सील पासून वह्या पुस्तकांच्या कवर पर्यंत.सगळ्या गोष्टींची खरेदी एकदम मजेत आणि उत्साहाने सुरु  झालीये …………..बाजारात अगदी नवीन नवीन प्रकारच्या वस्तुकी  देखील आल्यात  तशीच  पावसाची हि उत्सुक्ता अवर्णनीय आहे .
शाळेत असताना…………..सुट्टीची……..विविध ठिकाणी फिरण्याची………………
मज्या करण्याची.गावाला जाण्याची.नातेवाइक मित्र मंडळीना भेटण्याची.आंबे ,काजू ,फणस खाण्याची.जंगलात फिरण्याची.झाडावर चढण्याची.आणि सुट्टी असताना.शाळेची.शाळेतील मित्र मैत्रिणींची.मधल्या सुट्टीची.डब्याची.डब्यातील खाउची.ऑफ तासाची.आवडत्या शिक्षकांची.ग्रुप मधल्या  गप्पांची .खिशातल्या चण्याची.गेट बाहेरील चिंचांची.कँटींनच्या सामोस्याची.शाळे बाहेच्या कट्ट्याची.अलारामच्या  बेलची  ओढ् लागते.आणि कधी एकदा शाळेत जातो असे वाटू लागते.
एवढ्या…….दिवसांच्या सुट्टी नंतर मज्या करून भटकंती करून एकदाची शाळा सुरु होणार…….सगळे मित्र मैत्रीण आपल्याला परत भेटणार खूप धमाल मस्ती मज्या पावूस…………. आणि तो दिवस जवळ आला..मी खूप उत्साहाने उठून तयारी केली .झाल नेमका पाउस आला..! 
अरे बापरे……….आजचं  जाण बोंबलत  कि काय ? हा प्रश्न पडला पण लक्षात आल मग केलेल्या खरेदीच काय.चढवला रेनकोट आणि घर सोडल .मस्त पावूस पडत आहे .मध्ये मध्ये काही मित्रमैत्रिणी भेटत होत्या…..उत्साह हि वाढत होता शेवटी पावसाचा  आनंद लुटत शाळा गाटली शाळेच्या आवारात पोहोचताच मन अगदी प्रसन्न वाटू लागले असे वाटत होते कि शाळा हि खूप खुष आहे . आम्ही परत आल्या बद्दल आणि आमच स्वागत करत आहे . खर म्हणायच तर शाळा म्हणजे आपली आईच म्हणायला हवे कारण सगळा अभ्यास , संस्कार , नाती , खेळ , स्पर्धा , जेवण आपण तिच्याच देखरेखी खाली आणि तिच्या आवारातच करत असतो मुळात . आयुष्यातील अर्ध्याहून  जास्त वेळ आपण आणि शाळा एकत्र काढतो . म्हणून आपण शाळेला कधीच विसरू शकत नाही ………………… आम्ही सगळे शाळेच्या आवारातच उभे होतो .प्रार्थना सुरु झाली  आणि  मनाला वाटल चला………….पुन्हा एकदा शाळे मध्ये …………..

………….पुन्हा एकदा शाळे मध्ये …………..
चैताली कदम

कधी कधी

उधळून मुक्त दाने द्यावी कधी कधी

हिंडून गाव भिक्षा घ्यावी कधी कधी

बहरात या ऋतूच्या, कोमेजलो असा
वाटे समोर तू ही यावी कधी कधी

वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी

जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी

ते वाहती फुलांचे, निर्माल्य सागरा
त्यानेहि भावसरिता, प्यावी कधी कधी

-काव्य सागर

Maj. Gen. Vikram Ramaji Khanolkar

I.A. 421, Maj. Gen. Vikram Ramji Khanolkar, 11th Battalion, The Sikh Regiment

Article by  – Sagat Shaunik Original Link – Click here

Purpose of this article 
The General has been forgotten in history, owing to the turbulent times of the young nation during the time of his demise. My endeavour is to pay a small tribute to the sacrifices and hard work of my great grand father by writing an article about him, lest his memory be forgotten.

I.A. 421, Maj. Gen. Vikram Ramji Khanolkar

Lineage -Grandson of Dhondaji Sakharam Khanolkar (British Indian Army, Rank Unknown); Son of Rai Bahadur Ramji Dhondaji Khanolkar (British Indian Army, Indian Medical Department, Died in the earthquake of Quetta, 1935)


Brothers: Dr. Vasant Ramji Khanolkar, Padma Bhushan (1955), Padma Shri (1954)
                    Vinod and Vijay Ramji Khanolkar (Died in the earthquake of Quetta, 1935)
Birth Quetta, 1905

Education B.Sc at Wilson College, Bombay

Alumnus Royal Military Academy, Sandhurst

Military Career

• Began his career as a Y-Cadet in the 1st Battalion of the 4th Bombay Grenadiers (now 2nd Guards, Indian Army) on 2nd November 1927

• Graduated from the Royal Military Academy, Sandhurst in 1929 and was commissioned in the East Lancashire Regiment.

• In 1931, he was posted to the 5th Battalion (Duke of York’s Own) of the 11thSikh Regiment and served mostly at the N.W.F.P.(North West Frontier Province)

• As a Captain, he was sent to the Travancore State to command the 2nd Nayar Infantry garrisoned at Trivandrum and subsequently became the Commandant of the Travancore State Forces.
• After a year he returned to help raise the 14th Battalion of the 11thSikh Regiment.

• From there he was sent to Singapore in 1942.

• After the fall of Singapore he returned unattached to any regiment

• In May 1936, violence brewed in Palestine between the Arabs and the Jews. The British had to restore law and order using the military and so he was sent  as part of a military contingent to Egypt then Syria and later Lebanon.

• In 1943, Captain Khanolkar, the Second-in-Command of a Sikh battalion served in the Middle East and the Central Mediterranean (Sicily and the Italian Campaign under FM Montgomery’s British Eight Army)

• On neutralization of Italy he was transferred to Burma

• On 2ndNovember 1944 he was promoted to Major.

• Soon he was promoted to Lt. Colonel and appointed Commanding Officer of the 6th Battalion of the 11th Sikh Regiment in Waziristan (N.W.F.P.).

• On his promotion to Colonel, he was appointed President of the 54th S.S.B (Service Selection Board) at Belgaum. Thereafter promoted to Brigadier, he relocated 54th SSB to Bangalore.

•Under him, the 54 th S.S.B was taken overseas to screen wartime Emergency Commissioned Officers (ECO) for permanent commission. This step was taken as it was not practical for occupation forces to revert back to India for screening. Among his port of calls was Singapore and Tokyo where the famous 268 Indian Infantry Brigade was deployed.


• On his return to Bangalore, he was appointed as the commandant of the refugee camp at Kurukshetra in 1947.
He assumed command of Sub Area, Jalandhar, where interestingly his spouse Savitri Bai Khanolkar (Eva Maday)  became the first Indian woman to earn a flying license.

• In 1948, he commanded an Infantry Brigade in the Jammu and Kashmir Operations. After relinquishing command, he was appointed as the Brigadier of Administration of the H.Q. Jammu And Kashmir Force.

• After the war he returned to the Punjab Area, prior to his appointment to the prestigious Delhi Area as General Officer in Command (G.O.C). The appointment included the entire area of Uttar Pradesh, Madhya Pradesh and Rajasthan in those days.
For reasons unknown he changed the formation sign (insignia) of H.Q. Delhi Area from a Leopard to a Taurus. His old and original Taurus car pennants  photographs are displayed above.
 
• He had the unique distinction of being G.O.C Delhi Area during the first Republic Day Parade of Independent India on 26thJanuary 1950. In fact, the first Indian Flag hoisted during this occasion found its way to his personal collection of artifacts, that was later presented by his son-in-law (Lt Gen Surindra Nath Sharma P.V.S.M. A.V.S.M.) to the Officers Mess H.Q. Delhi Area.
In 1950 there was a change amongst the infantry regiments when the princely states were amalgamated with the Indian Union. The Bikaner Sadul Light Infantry and the Jodhpur Sardar Infantry joined the Rajput Regiment and became 19th and 20th Rajput respectively. (Jodhpur Sardar Infantry was raised in 1922. During World War 2 it was in Eritrea and then it was part of the American 5th Army when it landed at Salerno in Sept. 1943. Afterwards as part of the 10th Indian Division it operated along the Adriatic coast. During these operations it won 1 DSO, 1 MC, 3 MMs and 17 Mentioned-in-Despatches). Maj Gen Khanolkar was the G.O.C of Delhi Area when the area of Rajasthan was included as a Sub-Area under Delhi. The pictures below show him taking the salute  from the Jodhpur Sardar Infantry and some other pictures of Rajasthan Sub-Area.
In 1952, he took command of the 20th Infantry Division, Calcutta as well as Bengal Area. 
Approved for promotion to Lieutenant General to command the corps at Udhampur (Jammu & Kashmir), he died in harness before taking on his new assignment. The General  had the unique honour and distinction of being the First Indian Colonel Of the Sikh Regiment. 
 
General Service Medal with Jammu and Kashmir Clasp, 1948
• India Independence Medal, 1947
• India General Service Medal 1908-1935 with N.W.F.P. Clasp
• General Service Medal 1918-1962
• India General Service Medal with North West Frontier 1937-39 Clasp and Waziristan Clasp 1936-1939
• 1939-1945 Star
• Africa Star
• Burma Star
• Italy Star
• 1939-1945 War Medal
The Story After


The General passed away in 1952, survived by his wife Savitri Bai Khanolkar, daughters Kumudini Sharma, Mrinalini Rao and son Mahesh Khanolkar.

Savitri Bai Khanolkar is remembered for designing the War Time Gallantry Award series- Param Vir Chakra, Maha Vir Chakra and Vir Chakra. She also designed the Peace-time Gallantry Award series- The Ashok Chakra, which was to be awarded in  three classes viz I, II or III. Later these were renamed the Ashok Chakra, Kirti Chakra and Shaurya Chakra. Her eldest son Ashok Khanolkar died in infancy and it was in his memory that she named the highest peace-time gallantry awards as the “Ashok” Chakra Series. She was requested to design these medals by Major General Hira Lal Atal (the first Indian Adjutant General) as replacement to the existing British gallantry medals (VC, DSO, MC). She has also authored many Sanskrit texts and is an alumnus of the famous Nalanda University.
Kumudini  did her schooling at Shanti Niketan in West Bengal. Later she married IC- 1475 W Maj Surindra Nath (Tindi) Sharma in 1953. Surindra was the youngerbrother of Maj Som Nath Sharma (The First Param Vir Chakra of Independent India). Surindra retired as the Engineer in Chief in 1981 and had been awarded the Param Vashisht Seva Medal (P.V.S.M) and Ati Vashisht Seva Medal (A.V.S.M), the highest military decorations for distinguished service. Kumudini’s son IC-40761N Col Gautam Shaunik is the last army officer from this great legacy of warriors.

Mahesh  – Settled in Kochi, leads a happy retired life.

Mrinalini  married Shri Gopal Rao an engineer with the Indian Railways.

After the generals demise, the family was relocating from Pune to New Delhi when a trunk containing all his service records, medals, certificates and uniforms was lost in transit never to be found. All the information that I have is from a few photographs, magazine articles and notifications of The London Gazette. Thankfully, a few service flags of the General remained. He has been forgotten in history owing to the difficult times of  young India at that time. 

तेरी याद साथ है

“आई लवकर नाष्टा दे ग ! मला जायचंय”
रोज सकाळी ११ वाजले तरी सूर्याचं तोंड ही न पाहणाऱ्या आपल्या लेकीचा आवाज ऐकून आई उठली. आणि भल्या पहाटे तिच्यासोबत प्रितीही !
आईच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून smile देणाऱ्या आपल्या दीदीला पाहून ती अचंबित झाली. रोज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या घर डोक्यावर घेणारी आपली दीदी शांतपणे smile देतेय हे पाहून खर तर ती चक्रावून गेली होती. इतक्यात तिच्या डोक्यात प्रकाश पडला,
‘अभी ! येस्स अभी येणारेय आज. म्हणून मॅडम इतक्या खुष आहेत तर’
“काय ग आज एवढ्या लवकर….”
आईचं वाक्य पूर्ण होण्या आधीच प्रितीनी खुलासा केला,
“अग आई आज अभी येणारेय ना. मग कशी झोप लागेल त्याच्या रियाला? “
आणि पुढच्या क्षणी तिच्या पाठीत धपाटा पडला
“hey dont you dare to call me Riya. मला फक्त अभीच रिया म्हणू शकतो. कळलं?”
“हो हो कळलं हं !”
‘आज पहिल्यांदा भेटतील हि दोघ!’
वेडावून पळणाऱ्या प्रीतीकडे पाहून रियाच्या मनात विचार आला.
“काय खाणारेस ग? आणि कशी जाणारेस? काय विचारतेय मी? अगं कार्टे लक्ष दे कि जरा. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ! आधीच हिला घरात लक्ष द्यायला नको आणि त्यात आता अभी येणारेय म्हणाल्यावर तर ‘आज पाव जमीन पार नाही टिकते मेरे’ च झालाय हीचं! घरी घेऊन ये गं त्याला “
आईची अखंड बडबड चालू होती. पण आईकडे लक्ष द्यायला रियाचं मन तिथ होतच कुठं? ते तर आधीच एअरपोर्ट वर पोहचल होत.
‘कसा येईल हा? पोहचेल ना व्यवस्थित? मी मुंबईलाच जायला हव होत.पण ममा-पप्पा एकटीला जाऊ देतील तर ना. ‘
अभीच्या ममा-पप्पांना रिया पण ममा-पप्पाच म्हणायची.
झाल अस होत की अभीची फ्लाईट मुंबईला येणार होती आणि रियाला त्याला घ्यायला जायचं होत. पण मुंबईला जायला कुणी काही केल्या परवानगी देईना. मग खूप आकांतांडव केल्यावर तिला लोहगावला जायची परवानगी मिळाली. रिया आयुष्यात पहिल्यांदा एकटी इतक्या दूर जाणार होती. तेही अभीला आणायला. म्हणूनच की काय अभीला घरी नीट घेऊन जाणं ही रियाला तिची जबाबदारी वाटत होती.
अर्थात फक्त हेच कारण नव्हतं ! आज तिला अभी भेटणार होता. तब्बल १० वर्षानंतर !
“आई मी अभीकडेच राहीन ग आज. उद्या येते. काळजी करू नकोस. पोहचल्यावर फोन करते. ठिकेय ना?”
आईच्या उत्तराची जराही वाट न पाहता रिया पळाली देखील.तिच्या मनाची चाकं आता गाडीच्या चाकांपेक्षा वेगात धावत होती. दोन तासाच्या प्रवासात ती कित्येकदा भूतकाळात जाऊन आली. हजारदा तिने या १० वर्षाची उजळणी केली. अभीला सांगायच्या अनेक गोष्टी तिने हजारदा मनात घोकल्या.
तसंही काय सांगायचं राहील होत अभीला?
“रोज तर सारखी सारखी बोलते याच्याशी.पप्पांचा सगळा पगार फोनबिल भरण्यातच संपत असेल”.
हा विचार मनात येताच रियाला हसायला आलं. अगदी १००% नाही पण बऱ्याच अंशी खर होत ते ! अगदी ‘आज मी कुठल्या कलरचा ड्रेस घालू रे?’ हे असले निर्णय पण ती अभीला विचारून घ्यायची.
आणि एकदाची गाडी एअरपोर्टला पोहचली.अगदीच ऑनटाईम पोहचली होती ती ! तिकडे अभीची फ्लाईट आणि इकडे रियाची गाडी एकाच वेळी एअरपोर्टला land झाली होती. “जिथे तिथे माझ्यासोबतच पोहचतो हा !” . रियाला स्वतःच्या विचारांचं हसायला आलं.
मनात हुरहूर घेऊन,एन्ट्रीपास घेऊन रिया आत गेली. अनाउन्स केलेल्या गेटकडे आतुरतेने पाहत असलेल्या रियाच्या डोळ्यात एक नाराजी पसरली…
अभी आलाच नव्हता.
घाईघाईने तिने अभीला फोन लावला. पण तोही switched off !
“कस शक्य आहे हे?” रिया रडायचीच बाकी होती आता. या एका क्षणासाठी ती कित्येक रात्री जागली होती. या दिवसाची तिने डोळ्यात प्राण आणून वाट पहिली होती.
“पण नेमक झालं काय? गेला कुठे हा? याच्या फ्लाईटला तर काही झालं नसेल ना !”
मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काही खोटं नाही. इतक्यात मागून कुणीतरी तिला मिठी मारली. त्यासरशी रियाने झटकन मागे वळून पाहिलं आणि समाधानाचं स्मित तिच्या चेहऱ्यावर पसरलं.
अभी !
त्याला पाहताच रियाने त्याला घट्ट मिठी मारली.त्या मिठीची आर्तता त्यावेळी त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात आली असेल.
‘ही जोडी कधीच तुटू नये !’
प्रत्येकाला वाटावं असा तो क्षण !
“अभिनव अमोघ कुलकर्णी” , रियाचं एक छोटसं विश्व ! रियाची दुनिया !
आणि ही त्यांची एक छोटीशी गोष्ट !…….
________________________________________________________________

“अभी नको ना रे जाऊस मला सोडून”
“मी येईन ना परत. लवकरच”
“नक्की ?”
“नक्की”
“Promise ?”
“Promise “
हमसून हमसून रडणार्‍या ९ वर्षाच्या अभी-रियाकडे पूर्ण चाळ ओल्या डोळ्यांनी पाहत होती.
……………..
रियाला साधारण १० वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. आणि ती अभीला आणखीनच बिलगली.
“काय झालं गं राणी?”
“अभी तू लवकर परत येईन म्हणाला होतास. चक्क १० वर्षांनी परत आलायेस”
“आता आलोय ना पण परत? कायमचा ! तुझ्यासाठीच तर आलोय”
“आता जाणार नाहीस ना कध्धीच?”
“नाही गं”
“नक्की?”
“नक्की”
“Promise ?”
“Promise “
१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग दोघांनाही जसाच्या तसा आठवला तसे दोघही खळखळून हसले.
……………..
‘अभी आणि रिया !’
असं म्हणलं जातं की देव गाठी स्वर्गात बांधतो.
फक्त लग्नाच्याच नाही तर इतरही सगळ्याच नात्यांच्या ! खरच असेल ते. नाही तर अभी-रियासोबत घडलेल्या या सगळ्या घटनांना फक्त योगायोग म्हणुन कसं चालेल?
……………..
१० नोव्हेंबर १९८९, हॉस्पिटल मध्ये दोन नर्स दोन बाळांना घेऊन त्यांच्या आयांपाशी आल्या. किर्तीला मुलगा आणि प्राजक्ताला मुलगी झाली होती. विशेष म्हणजे दोघांच्याही जन्मवेळा एकच !
किर्तीने प्राजक्ताच्या आणि प्राजक्ताने किर्तीच्या बाळाच नाव ठेवलं. रिया आणि अभिनव!
ही आनंदाची बातमी राजेशला कळवण्यासाठी केल्या गेलेल्या फोनवर किर्तीला एक वेगळीच बातमी कळली. दैवाने किर्तीच्या पारड्यात एका मुलाचं दान घातल्यावर दुसर्‍या पारड्यातुन कर्त्या पुरुषाचं दान सहज काढुन घेतलं होतं. राजेशला देव स्वतःकडे घेउन गेला खरा पण त्या धक्क्यातून किर्ती सावरू शकली नाही. आणि राजेशसोबत सार्‍याच वाटा चालण्याचे वचन घेतलेली किर्ती त्याच्याच मार्गाने निघुन गेली. अगदी काही तासातच!
राजेशने कीर्तीशी घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं होतं आणि म्हणूनच दोघांच्याही घरच्यांनी त्यांची साथ कायमची सोडली. वर्षभरात त्यांच्या संसारवेलीवर एक फुल उमललं खरं पण ती वेल त्याक्षणी कायमची तुटली. राजेश आणि किर्तीचं बाळ जन्माला येताचक्षणी जगात एकटं पडलं होतं.
अन दैवाने पुन्हा त्याचं रुप दाखवलं.
प्राजक्ताला पाहिला आलेल्या अमोघ-अभिलाषाचं मुल जन्मताच दागावायाचं. अनेकदा प्रयत्न करूनही फळ न मिळाल्याने त्यांनी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या.कीर्तीची कहाणी ऐकल्या ऐकल्या अभिलाषाने तिकडे धाव घेतली. रडणार्‍या त्या जीवाला पाहून तिला भरून आलं आणि तिने त्याक्षणी त्याला छातीशी कवटाळलं ते पुन्हा कधीही दूर न करण्यासाठी !
काही क्षणांपूर्वी अनाथ झालेल्या त्या जीवाला आता नवीन नाव मिळालं होत.
“अभिनव अमोघ कुलकर्णी !”
चाळीमध्ये आता दोन जीवांचं आगमन झालं होत. रिया आणि अभीची गाठ तिथेच बांधली गेली. जन्मापासून एकत्र असणाऱ्या त्या दोन जीवांना आता कुणाचीच नजर लागणार नव्हती. अगदी दैवाचीही नाही!
……………..
बघता बघता ९ वर्ष सरली आणि अमोघला UK ला जायची संधी मिळाली. संपूर्ण चाळ आनंदून गेली होती.अभिलाषा मात्र द्विधा मनस्थितीत होती.एकीकडे UK खुणावत होतं तर एकीकडे ही जिवाभावाची माणसं सोडून जाण्याचं दु:ख . पण UK ला जाण्याचं अमोघने फिक्स केलं. आणि चाळीने जणू सोहळा साजरा केला. आनंदाच्या या सोहळ्यात सगळे मग्न असताना दोनच जीव मुसमुसत होते.
“मी येईन गं परत”
अभी त्याच्या रियाला समजावत होता आणि अभीची रिया त्याला बिलगून हाताशपणे विनवत होती
“नको ना रे जाऊस अभी “
……………..
कुलकर्णी कुटुंबाला भारत सोडून १० वर्ष झाले होते. यथावकाश चाळीतुन एक एक जण बाहेर पडत गेले आणि केवळ आठवणीतच राहिले.पण प्राजक्ता आणि अभिलाषाची गोष्टच निराळी होती. दोन देशातल्या अंतराने त्यांच्या नात्यात मुळीच अंतर पडलं नव्हत. कलेकलेने वाढणाऱ्या आपल्या फुलांची खबरबात दोन्ही कुटुंब एकमेकांना देत होते. आणि ही फुल देखील एकमेकांसाठीच बनली होती जणू !.
“अभी आज की नाही मी chocolate खाल्लं ” हा रियाने अभीला केलेला पहिला फोन, आणि “तुझ्यासाठी खूप सारे chocolates घेऊन येतोय गं” हा अभीने रियाला केलेला काही तासांपूर्वीचा शेवटचा फोन. आणि मधले असेच असंख्य फोनकॉल्स…. अभी-रिया च्या नात्याचं हेच तर खरं टॉनिक होत. आज रिया-अभी १० वर्षांनी भेटत होते. पण त्या भेटीमध्ये जराही नवखेपणा नव्हता.१० वर्षातला प्रत्येक क्षण ते सोबत असल्यासारखाच जगले होते.
पण आज अभीला मारलेल्या मिठीतून रियाला एका गोष्टीची जाणीव झाली.
‘नुसतं बोलण्यात आणि प्रत्यक्षात अभीच्या जवळ असण्यात खूप फरक आहे. खरचं आज खूप मोठ्ठा आधार असल्यासारखा वाटतय.अभीशिवाय जगच नाही. आता अभी सोडून गेला तर मी नाहीच जगू शकणार.’
……………..
गाडी घराजवळ पोहचत आली. आणि रियाची मगापासून चालू असलेली अखंड बडबडही थांबली. तसा अभी म्हणाला,
“रिया एक सांगायचं होत”
“बोल ना मग ठोम्ब्या permission कसली घेतोयेस??”
“मी तनुला प्रपोज केलं इथे यायच्या आधी . खर तर ती एक formality होती म्हण ना!, coz she loves me and I knew that “
“…….”
“बोल ना ग काहीतरी. अर्थातच तुझ मत खूप important आहे रिया. तू तनुला ओळखतेसच. तुला ती पसंत नसेल तर I won’t move forward “
“…….”
“मला माहित आहे तू काय विचार करतेयेस.मी खरच timepass वैगेरे करत नाहीये तिच्यासोबत. भारताबाहेर वाढलो असलो तरी मम्मा – पप्पांनी प्रेमाचा अर्थ शिकवलाय मला खूप नीट.I am damn serious about her Riya but your opinion matters altos to me”
काय बोलावं ते न कळल्यामुळे रिया फक्त डोळे विस्फारून अभीकडे पहात राहिली.
________________________________________________________________
रियाची ही प्रतिक्रिया न समजल्यामुळे अभी पुर्णपणे गोंधळुन गेला होता. खर तर त्याच्यासाठी ही प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित होती.
“रिया अग बोल ना…..”
“नालायक, मुर्ख, बावळट”
अभीच वाक्य पुर्ण होण्याआधीच रियाने त्याला फटकवायला सुरुवात केली.
“दोन दिवस झाले प्रोपोज करुन आणि आज सांगतोयेस मला? लाज तरी वाटते का? आणि डायलॉग्स कुठून शिकलास इतके सारे? तुला प्रेमाचा अर्थ माहित आहे हे मला सांगतोयेस तू? आता मात्र हद्द झाली हं अभी ! वर तोंड करुन मलाच म्हणे तुला पसंद नसेल तर I wont move forword. अरे गाढवा तुझ्या चॉईसवर माझा पुर्ण विश्वास आहे. तुला आवडली म्हणजे एकदम मस्तच असेल ती. मला भेटव ना तिला. आणि किती रे चालू आहेस तू? तुला ती आवडते हे मला नाही सांगितलस ते कधी. आता Explanation देऊ नकोस काही. मला भेटायचय तनुला. कधी भेटवशील???”
“next month मध्ये येतेय ती इथे. खास तुला भेटायला.”
“really? मस्तच !”
“रिया”
“हं?”
“तू खुष आहेस ना?”
अभीच्या या प्रश्नावर एक सेकंद शांतता पसरली खरी पण पुढच्याच क्षणी अभीला मिठी मारुन अभीच्या रियाने उत्तर दिलं,
“नक्कीच ! तू खुष आहेस ना? मग मी पण असणारच ना? I am damn happy ! Finally You got your own world “
“Thats not true honey ! you are my world. & you will be forever !”
रियाने अभीला तोंड भरुन स्माईल दिली.
अगदी शर्ट खरेदी करताना पण “रिया ब्रॅण्ड कुठला घेऊ?” अस विचारणार्‍या अभीनी आज त्याची लाईफ पार्ट्नर निवडली होती. रियाला या गोष्टीची जराही कल्पना न देता. हे खर कारण होतं रियाच्या नाराजीचं. पण एका क्षणापुरतच !. पुढच्या क्षणाला रियाचं मन आनंदाने भरुन गेलं होत. रियाच्या अभीला त्याची तनु मिळाली होती. अगदी त्याला हवी तशीच. आज रियापेक्षा आनंदी व्यक्ती जगात शोधुन सुद्धा सापडली नसती.
आणि अभी…
साता समुद्रापलीकडे असुन सुद्धा रिया थोडीशी जरी दुखावली गेली तरी अभीला लगेच कळायचं. आता तर ती त्याच्या समोर होती. रियाचं दुखावलेलं मन आणि त्यामागचं कारण अभीला लगेच समजलं. त्यानी हे मुद्दाम केल नसलं तरी रिया hurt झालीच होती. त्याला स्वतःचाच राग आला. एका क्षणासाठी का होईना पण आज त्यानी त्याच्या रियाला दुखावलं होतं.
दोन नात्यांमधली घट्ट वीण इथेच दिसुन येते नाही? स्वतःची नाराजी विसरुन पुढच्याच्या आनंदात रममाण होणं आणि स्वतःचा आनंद विसरुन पुढच्याच्या नाराजीचा विचार करणं….
खरं प्रेम म्हणजे अजुन नेमक काय??
रिया आणि अभी बनलेच होते एकमेकांसाठी…….
……………..
कोण म्हणतं एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र असु शकत नाहीत?
रिया आणि अभी होते. त्यांच्यातल्या नात्याला एकच नाव होतं. मैत्री! निखळ मैत्री ! निरागस, निर्मळ, शुद्ध, पवित्र ! म्हणाल तर ईश्वरापेक्षाही जास्त ते आपल्या मैत्रीला मानत होते. पुजत होते.
अभीसाठी रिया आणि रियासाठी अभी एक विश्व होतं. त्यांच्या या विश्वात सगळ्यांना प्रवेश होता पण कुणाच्याही येण्या-जाण्याने त्या विश्वात कधीच काहीच बदल झाला नव्हता.
……………..
तनु आली. तन्वी ! अतिशय गोड ! नावाप्रमाणेच सुंदर ! परदेशात जन्मुन तिथेच वाढली तरी संस्काराने पुर्णपणे भारतीय ! रियावर अभीइतकच प्रेम करणारी. त्यांच्या मैत्रीला त्यांच्या इतकचं पुजणारी. बर्‍याचवेळा ऐकलं होतं की दोन मुली एकमेकांवर जळतात. पण रिया-तनुच्या बाबत हा प्रकार कधीच घडला नाही.
अभीच्या आयुष्यात इतर कोणापेक्षाही रियाला importance जास्त आहे हे तनु १० वर्षांपासुन पाहत होती. त्यामुळेच की काय तिने अभीला रियासकट स्विकारल होतं. रियाबद्दल कुठलाही आकस न ठेवता.
आणि इथे रिया तर ‘सातवे आसमानपर’ होती. आधी अभीकडुन तिने तनुबद्दल बरचं काही ऐकल होतं. पण तनुला प्रत्यक्षात भेटल्यावर तर ती अजुनच निश्चिंत झाली.
‘अगदी अशीच पार्टनर मिळायला हवी होती माझ्या अभीला!’
तनु आल्यापासुन अभी आणि रियाच्या भेटी थोड्याश्या कमीच झाल्या होत्या. त्यातही कॉलेज, क्लासेस आणि नेहमीच्या कामांमुळे अभीला १००% वेळ देणं रियाला जमत नव्हतं.तरी त्यांचे फोन चालु असायचे.एके दिवशी अभीला सरप्राईज म्हणुन भेटायला गेलेल्या रियाला एक नविन सरप्राईज मिळालं. तनु आणि अभी दार्जिलिंग बघायला निघाले होते. रियाच्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट नसली तरी तिला वाईट नक्कीच वाटलं.
‘अभीनी एकदा विचारायचं तरी ! मी नसते गेले पण तरिही ! तनुमुळे अभी दुरावतोय आपल्याला हे मात्र अगदी खरयं!…’
“रिया? अगं लक्ष कुठाय?”
तनुच्या प्रश्नावर रियाची तंद्री भंगली.
“तुझी बॅग कुठेय??”
“माझी बॅग कशाला गं?”
“मग? आपण तिघंही जातोय.”
“हे कधी ठरलं? तुम्ही मला काहीच सांगितल नाहीत.”
“त्यात सांगण्यासारखं काय आहे?? ते तर बाय डिफॉल्ट आहे ना??? एकवेळ आम्ही सगळी ट्रीप कँसल करु पण तुला सोडुन आम्ही जाणं शक्य आहे का?”
रियाच्या मनात आलेल्या या विचारांची तिला त्याचक्षणी लाज वाटली. तिने शरमुन अभीकडे पाहिलं. अभी फक्त तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत होता..त्या नजरेत अजुन एक भाव होता..’वेडे मी तुला दुरावणं खरचं शक्य आहे का गं? ते ही तनुमुळे???’
खरचं अभीने अगदी योग्य लाईफ पार्टनर निवडली होती.
रियाच्या मनातलं तनुचं स्थान कितीतरी पटीने उंचावलं गेलं होतं.!
आणि तनुला या दिवसांमध्ये एक गोष्ट खुप व्यवस्थित समजली होती, ‘अभी-रिया आता एकमेकांशिवाय राहु शकणार नाही. आणि आता अभीचं पुन्हा UK ला परतणं imposible आहे. तिने इथे स्थाईक होण्याचा निर्णय मनोमनी घेउन टाकला.
……………..
बघता बघता २ महिने निघुन गेले. तनुची जायची वेळ आली होती. पण ती काही महिन्यातच परतणार होती. कायमची ! तनुने तिचा निर्णय सगळ्यांना सांगितला. सगळीकडे आनंदी आनंद होता.
पण अस ऐकलय की सगळं काही सुरळीत चालू असताना काहीतरी विपरीत घडण्याची तयारी चालू असते.
पुन्हा एकदा दैवाने खेळ खेळला…
१९ वर्षात एकदाही न घडलेली गोष्ट घडली..
रिया-अभी चा अबोला !
भारतात येण्याआधी अभीने UK मध्येच एका जॉबसाठी अप्लाय केलं होतं. जगातल्या नावाजलेल्या कंपनीजपैकी ती एक कंपनी होती.कित्येकांचा dream job ! पण रियाला त्यानी या गोष्टीची अजिबात कल्पना दिली नव्हती कारण त्याला माहित होतं ती त्याला पुन्हा जाऊ देणार नाही. आणि आज अभीला joining letter मिळालं. अभीला आता जावचं लागणार होतं. ते ही ३ दिवसातच. त्यानी निर्णय घेतला. रियाच्या मनाविरुद्ध.
पुन्हा एकदा प्रचंड मोठी ताटतुट ! पण यावेळी फक्त शरिरानेच नाही तर मनानेसुद्धा. रिया काहीही समजुन घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती.ती खुप दुखावली गेली होती.खुप समजावुनही काही ऐकायला तयार नव्हती. कशी ऐकणार? अभीच्या जवळ असण्याची सवय झाली होती तिला. इतके वर्ष राहिली ती अभीपासुन दुर, पण आता त्या आधाराची सवय आणि गरज निर्माण झाली होती. पुन्हा त्या अधाराशिवाय जगणं? शक्यच नाही!
अभीशिवाय जग असतं हे रिया विसरुन गेली होती.अभीपासुन पुन्हा दुरावणं? त्यापेक्षा मरण परवडलं.
……………..
“तू जायचं नाहीचेस अभी ! मी नाही येणार तुला भेटायला. तू पण येऊ नकोस.”
१३-मार्च-२००८,
अभी पुन्हा एकदा रियाला एकटं सोडुन निघाला होता. सगळ्यांनी अभीसाठी एक फेअरवेल पार्टी आयोजित केली होती. रियाने त्या पार्टीला यायला ठाम नकार दिला होता.
“तू निघालायेस ना पुन्हा? मला सोडुन?”
“रिया २ वर्षाचीच तर गोष्ट आहे. मी लगेच पुन्हा येईन गं. Promise”
“तू मुळीच कुठलीही प्रॉमिसेस देवू नकोस अभी आता. तु ९ वर्षापुर्वी सुद्धा प्रॉमिस तोडलस आणि आता सुद्धा तोडतोयेस”
“रिया समजुन घे गं. खरच हा जॉब खुप महत्त्वाचा…”
“आणि मी? मी नाहिये महत्त्वाची तुझ्यासाठी?”
“अग पण माझ्या इथे असण्या नसण्यानी आपलं नात बदलणार आहे का? की प्रेम कमी होणार आहे? तसं असतं तर….”
“काही बोलु नकोस अभी. मला अजिबात समजावू नकोस. मी ऐकणार नाहीये. तुला जायचय ना? जा तू पण मी नाही येणार तुला भेटायला आता.”
“अस नको करुस ग रिया. दोनच दिवस राहिलेत आपल्याकडे. मी परवा निघतोय. आता नाही आलीस तर परत नाही भेटणार मी तुला”
“नकोच भेटुस अभी. तेच बेटर आहे”
फोन कट झाला. दोन्हीकडे दुखावलेली मने!
पुर्ण दिवस रियाची नुसती धुसफुस चालू होती. सकाळी बोलणं झाल्यावर अनपेक्षितरित्या अभीनी रियाला एकही फोन केला नव्हता. रियासाठी खुप मोठ्ठा धक्का होता हा. तिनेही फोन करायचाच नाही अस ठरवलं. रिया रडुन रडुन तापली होती. संपुर्ण दिवस तिने पाताळेश्वराच्या मंदिरात बसुन काढला. कुणाशी बोलायची तिची इच्छा नव्हती. सकाळी कॉलेजला म्हणुन बाहेर पडलेल्या रियाला आता घरी जायची इच्छा राहिली नव्हती.कशी फेस करणार होती ती आईला?
“कुणात इतकं गुंतू नये बाळा. अभीशिवाय जग असत.पहायला शिक. इतकी सवय लावुन घेऊ नकोस की त्याच्याशिवाय श्वास घेणही जमायचं नाही “
रियाला आईचे शब्द आठवले.
पण नाही! अभीवर विश्वास होता. “तो कधीच मला सोडुन जाणार नाही. पण आज?? एकही फोन नाही. इतका स्वार्थी झाला हा? की स्वतःच्या आनंदापुढे माझी आठवणही नाही? पण असं होणं शक्य नाही. मी चांगलीच ओळखते माझ्या अभीला. पण मग अजुन फोन कसा नाही केला यानी?? काही झालं तर नसेल ना त्याला?”
रिया मनातुन चरकली.
“पण त्याला काही झालं तर सगळ्यांत आधी मला सांगतील मम्मा-पप्पा…काही नाही. असले विचार करायचे नाहीत. बिझी असेल तो.”
रियानी स्वतःला समजावलं पण आता मात्र ती तडक घरी निघाली.
……………..
“अगं होतीस कुठे तू? मुर्ख मुली! फोन का switched off आहे तुझा सकाळपासुन? तुला फोन करुन करुन जीव जायची वेळ आली. कुठे गं जातेस अशी निघुन? कसा कॉन्टॅक्ट करायचा तुझ्याशी? नाही नाही ते विचार येत होते डोक्यात”
आई रागाने बोलता बोलता थरथर कापत होती.
रियाला आठवलं मीच तर सकाळी रागाने फोन switched off केलेला आणि उगाच अभीला शिव्या दिल्या.
“चल पटकन अभीकडे जायचयं.”
“आई तू जा. मी नाही येणार.”
“ऐकायला शीक जरा. पटकन आवर”
“आई एकदा सांगितल ना. मला त्रास होईल तिथे जाऊन. मी येणं खरच तितकं गरजेचं आहे का?”
“हो ! तू येणं खुप गरजेचं आहे. अभीचा accident झालायं”
पायाखालची जमिन सरकणं काय असतं ते कळलं रियाला. कष्टाने रंगवलेलं चित्र एका क्षणात पाणी सांडुन खराब व्हावं तसं काहीसं झालं होतं.रियाच्या मेंदूने काम करणं बंद केलं होतं.
तडक निघाली रिया….तिच्या अभीकडे….
पण
“आता आली नाहीस तर मी परत भेटणार नाही रिया”
हे वाक्य अभीनी खरं करुन दाखवलं होतं.रिया पोहचायच्या आधीच अभी तिला सोडुन गेला होता. पुन्हा एकदा.
पण यावेळेस कायमचा ! पुन्हा कधीही न परतण्यासाठी.!
“तू माझा श्वास आहेस रिया”
रियाला ती संध्याकाळ आठवली.
तनु येण्याच्या आदल्या दिवशीची संध्या़काळ. रिया अभीला चिडवत होती.
“उद्या काय बाबा कुणीतरी खूप्प महत्वाची व्यक्ती येणारेय. मग कोण विचारतयं आम्हाला!”
“तू माझा श्वास आहेस रिया. ज्यादिवशी माझ्यापासुन दुर जाशील त्यादिवशी मी या जगात नसेन.”
अभीनी खरं करुन दाखवलं होतं त्याच वाक्य.
रियाला दैवाशी खेळायला आवडायचं. मी दैवालाही हरवू शकते ही घमेंड होती तिची.
आज रियाला दैवाने हरवलं होत.
त्यादिवशी तिला सावरण्याची हिम्मत अगदी देवाकडेही नव्हती.
रियाच्या आयुष्यातल्या एका कहाणीचा अंत झाला होता.
……………..
२०-मार्च-२०११
सकाळी फोनची रिंग वाजली. पप्पा होते.
“तनुनी sucide केलयं रिया. आपण कमी पडलो.”
तनु पुन्हा UK ला निघुन गेली होती.तिच्यावर मानसिक परिणाम झाला होता.ती कोणालाच ओळखत नव्हती.एक शब्दही बोलत नव्हती.तिची नजर बर्‍याचदा शुन्यात असायची.इतरवेळी सतत काहीतरी शोधत रहायची.कदाचित अभीला !
……………..
रियाला अभी गेला ती संध्याकाळ आठवली.
त्या दिवशी तनु शेवटचं वाक्य बोलली होती.
“रिया शेवटी तुझ्या अभीला मीच तोडलं तुझ्यापासुन. मला वाचवायला गेला तो आणि त्यालाच गाडीनी धक्का दिला. मला माफ कर. मी तुझी गुन्हेगार आहे.”
……………..
तनु UK ला गेली त्यानंतरही रिया तनुशी रोज बोलायची.जितकं अभीशी बोलली असती तितकंच. पण तनुनी कधीच काही रिप्लाय दिला नाही.रियाने तनुला माणसात आणायचा खुप प्रयत्न केला पण तनु खुप दुर गेली होती. रिया तिला जिवापाड जपायाची. कारण तनु हे एकच कारण होतं ज्यामुळे रियाला अभीचा आभास निर्माण होईचा.
रियासाठी आज सगळं काही संपल होतं. तनुचं प्रेम नक्कीच श्रेष्ठ ठरलं होतं. तनु आज खुप खुष असेल कारण ती आता तिच्या अभीकडे गेली होती.
रियासाठी एक खुप मोठं पर्व संपल होतं. आता अभीच्या फक्त आठवणी तिच्यासोबत असणार होत्या.
आज रियाची गोष्ट पुर्णपणे संपली होती.
……………..
१३-मार्च-२०१२
आज चार वर्ष झाली या गोष्टीला. दैवाचे खेळ आता रिया शांतपणे पाहते. ‘dont you dare to call me Riya’ असं आता तिला कुणालाच सांगावं लागत नाही. कारण तिला रिया म्हणणार कुणी आता राहिलंच नाहीये.
आजही ती उठल्यापासुन झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी अभीला सांगते. जोडल्या गेलेल्या मनांना मृत्युही तोडु शकत नाही हे मात्र अगदी खरं !
अभीशिवाय ही जग असत हे शाश्वत सत्य तिने आता स्विकारलयं पण तिच आयुष्य बदललय हे मात्र नक्की. अभीशिवाय रियाचं आयुष्य म्हणजे एक प्राण नसलेलं शरीर! असुनही नसल्यासारखं ! एक तडजोड. दैवाशी केलेली.
अभी म्हणायचा “श्वास घेणं म्हणजे जीवन नाही तर श्वास जगण म्हणजे जीवन.”
रियाला अभीनी श्वास जगायला शिकवलं होतं..पण आता ती फक्त चालु आहे म्हणुन श्वास घेतेय श्वास जगणं तिनं सोडुन दिलयं.
रियाची सकाळ आता खळखळत्या हस्याने होतं नाही पण एक छोटसं स्मित नेहमी तिच्या चेहर्‍यावर असतं कारण अभीचा अनमोल ठेवा आजही तिच्याजवळ आहे, अभीच्या आठवणी !
अभी जग सोडुन गेला पण रियाच्या जगातुन अभी जाणं शक्यच नाहीये. त्याचं स्थान आजही तिच्या मनात्,आयुष्यात आहे तसच आहे.
‘अढळ ! ध्रुवासारखं !’
-समाप्त…..
________________________________

“अभी,तुझ्यासाठी तुझ्या रियाकडुन ही श्रद्धांजली. मला माहित आहे श्रद्धांजली या शब्दाचं तुला नेहमी विशेष वाटायचं. श्रद्धांजली हा कसला शब्द आहे? जिवलग लोकांवर प्रेम असत, श्रद्धा काय…! हो ना? पण तुझ्या जाण्यानंतर मला कळलं की ते प्रेम हीच श्रद्धा असते. तू जवळच आहेस ही श्रद्धा, तू मला पहातोयेस ही श्रद्धा ! तू आजही माझाच आहेस ही श्रद्धा! हो श्रद्धाच ! विश्वास आणि श्रद्धेमध्ये काय फरक आहे अस विचारलं होतस ना मला? तेंव्हा उत्तर माहित नव्हतं पण आज कळालं, विश्वास कशावरही असु शकतो पण श्रद्धाही फक्त पवित्र गोष्टींबद्दलच असते.आपलं प्रेम,नातं आणि मैत्री तितकीच पवित्र आहे.!

केह्नेको साथ अपने एक दुनिया चलती है
पर छुपके इस दिल मे तनहाई पलती है
तेरी याद साथ है !

Miss you so much !”
-तुझीच  रिया

 ________________________________

(ही कथा माझ्या मनाच्या खुप जवळची आहे. त्यामुळे सत्य की काल्पनिक त्याने फारसा फरक पडत नाही.)
________________________________

(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

नेताजींचे गूढ !

(प्रस्तुत लेखात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या गूढ मृत्यू विषयची माहिती अनेक इंटरनेट साईट्स चा आधार घेऊन खास करून मराठी मध्ये आपल्या पर्यंत पोहोचवण्यात आली आहे! )

“नेताजी!”

पुन्हा एकदा या विषयाबद्दल लिहायला खूप बरे वाटत आहे ! प्रत्येक भारतीयाच्या मनात नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या बद्दल १ आदराचे स्थान आहे! खरचं तर त्यांच्या विषयी लिहिण्या सारखे खूप आहे! परंतु सर्वात मोठे दुर्दैव मला असे आढळून आले की जर आपण इंटरनेट वर मराठी भाषेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी काही शोधायला गेलात तर आपल्याला प्रचंड मेहनत करून सुद्धा जास्त काही हाती लागणार नाही! कारण मी सुद्धा तसा प्रयत्न करून बघितला आहे! सध्याच्या आकडेमोडीच्या अनुसार नेताजींच्या “गूढ मृत्यू” विषयी आज प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्सुकता आहे आणि त्यामुळेच सहजच तो इंटरनेट च्या मध्यम कडे वळतो! आणि बहुतांश माहिती हि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने तो शोध करायचा थांबून जातो! आपण स्वत एकदा प्रयत्न करून पहा ! म्हणूनच मी असा निश्चय केला की नेताजींच्या मृत्यू विषयी ची जास्तीत जास्त माहिती मी आपल्याला ” मराठी भाषेतून ” उपलब्ध करीन ! आणि त्याचाच हा १ छोटासा प्रयत्न आहे!

“भारतरत्न” !

या लेखाची सुरवात करण्यापूर्वीच इंटरनेट च्या माध्यमातून मला अशी माहिती मिळाली की १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे. खरेच मला हेय पाहून फार वाईट वाटले! एकाद्या देशभक्ताला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळू नाही शकत!

“भारत शेवट पर्यंत टिकला” !
१९४५ साली जपान ने शरणागती पत्करल्या नंतर सगळ्या जगात फक्त भारत आणि त्याची ” आझाद हिंद फौज होती जिने अमेरिका इंग्लंड च्या तकदी समोर शरणागती पत्करली नव्हती ! यातूनच सुभाषबाबुंचे देश साठीशेवटपर्यंत लढण्याची जिद्द आपल्याला दिसून येते! महायुद्धात आपणच सगळ्यात शेवट पर्यंत महा सत्तेचा मुकाबला करत होतो!
 “काय झाले होते १८ ऑगस्ट १९४५ ला ?”

सर्वात आधी नेताजी हे आपल्या कर्नल हबीबुर्रहमान, कर्नल प्रीतम सिंह, एस.ए. अय्यर तसेच जपानी दुभाषी निगेशी नावाचा व्यक्ती एवढे सगळे जण एका विमानातून बँगकॉक साठी रवाना होतात ! आणि  त्यांच्या मंत्री मंडळाचे अन्य सदस्य कर्नल गुलजारा सिंह, मेजर आबिद हसन, श्री देबनाथ दास हे दुसऱ्या विमानातून त्यांच्या सोबत येत असतात ! आता बँगकॉक मध्ये नेताजी हे आपल्या काही महत्व पूर्वक गोष्ठी करतात तसेच तेथील भारतीयांच्या भेटीगाठी करतात आणि ठीक ५ वाजता झोपतात !

                                     
१७ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी पुन्हा विमानात बसून सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेल्या प्रवास नंतर सकाळी ११ वाजता ३ तासाच्या प्रवास नंतर “सायगाव” येथे पोचतात ! सायगाव ( मराठीत याला सायगाव असे म्हणतात) या शहराला अनेक नावानी  ओळखले जाते! हिंदीत या शहराला “सायगन” असे म्हणतात तर सध्याचे याचे नाव “हो-चि-मिन्ह” असे आहे! अधिक माहिती साठी गुगल MAPS च्या आधारे पहा हे शहर कोठे आहे ते फक्त येथे क्लिक करा !

                                

सायगाव  येथे पोचून ते भारतीय अधिकार्याच्या घरी विश्राम करावयास जातात , एका  तासाच्या विश्रांती नंतर त्यांना भेटायला जपानचा संपर्क अधिकारी “कियोनो” हा येतो व  तो त्यांना सांगतो कि “फक्त नेताजींना” नेण्या साठी १ विमान हवाई तळावर उभे आहे! तसेच कियोनो नेताजींना असेही सांगतो कि विमान कोहे जात आहे ते आम्ही आपल्याला सांगू शकत नाही कृपया आपण चालावे कारण हे स्थिती फार गंभीर आहे! हेय कियोनो  चे बोल ऐकून सुद्धा नेताजी कोणत्याही “अज्ञात” स्थळी जाण्यास नकार देतात! हेय ऐकून कियोनो चा नाईलाज होतो व तो आपल्या वारीस्था अधिकार्यांना म्हणजे जनरल ईशोदा, श्री हाचैया आणि फील्ड मार्शल तेराउचि यांच्या अधिकार्याला घेऊन येतो! यांच्या सोबत नेताजींची तातडीची बैठक एका बंद खोलीत होते! खोलीत असे ठरते कि नेताजींनी त्वरित “मंचुरीयाला” रवाना व्हावे! मगाशी उल्लेख केल्या प्रमाणे नेताजींचे सहयोगी  एस.ए. अय्यर यांनी देखील आपल्या पुस्तकात असा उल्लेख केला आहे , माझ्या कडे सुद्धा ते पुस्तक आहे (मराठी अनुवाद- कथा आझाद हिंद सेनेची)  , या गुप्त बैठकी मध्ये जपानी सैनिक अधिकारी फक्त नेताजीनाच विमानात जाण्यास सांगतात परंतु नेताजींच्या विनंती नुसार आता कर्नल हबिबूर रेहमान सुद्धा आता नेताजींच्या सोबत “त्या” प्रवासाला जायला निघतात ! एवढे होते न होते तोवर नेताजी आणि हबीब गाडीमध्ये बसून विमानतळाकडे कूच करतात !

“त्या” प्रवासाला सुरवात !

सध्याच्या उपलब्ध माहिती च्या आधारे त्या विमानात एकूण १३ लोक होते त्या पैकी दोघांची योग्य नावे मला सापडली नाहीत! त्या प्रवासात विमानात बसलेल्या त्या व्यक्ती पुढीलप्रमाणे , 
१. मेजर ताकिजावा, 3र्ड एयर फोर्स, पायलट
२. वोरान्त ऑफिसर आयोगी, असिस्टेण्ट पायलट
३. सार्जेण्ट ओकिता, नेवीगेटर
४(नॉन कमीशंड ऑफिसर) तोमिनागा, रेडियो ऑपरेटर
५. अजून १ एक एन.सी.ओ
६. लेफ्टिनेण्ट जेनरल सिदेयी, चीफ ऑव स्टाफ, बर्मीज आर्मी कमाण्ड
७ .लेफ्टिनेण्ट कर्नल साकाई, स्टाफ ऑफिसर
८ .लेफ्टिनेण्ट कर्नल शिरो नोनोगाकी, स्टाफ ऑफिसर, जापान एयर फोर्स
९. मेजर तारो कोनो, स्टाफ ऑफिसर, जापान एयर फोर्स
१०. मेजर ईवाओ ताकाहाशी, स्टाफ ऑफिसर
११.कैप्टन केयिकिची अराई, एयर फोर्स इंजीनियर
१२. नेताजी सुभाषचंद्र बोस अझाद हिंद फौज प्रमुख
१३.  कर्नल हबिबुर्रहमान खान, आझाद हिंद फौज

हे विमान आता १३ जणांना घेऊन निघते वर ७:३० च्या सुमारास “तुरेन” येथे पोहोचते. रात्री सार्वजन हॉटेल मध्ये आराम करतात तसेच सायगाव येथून निघण्यापूर्वी विमानात खूप समान ठेवलेले असते आता हे समान या ठिकाणी काढून विमान “हलके” करण्यात येते! येथून विमान तैपई येथे जाते व तीठेय विमानात इंधन भरण्यात येथे! याच सुमारास विमानात बसलेल्या त्या प्रवास्यांना “नष्ट ” उपलब्ध करून दिला जातो! विमानात इंधन भरून झाल्यावर आता ते उडण्या साठी सज्ज असते आणि त्या विमानाची आणि सुभाष बाबूंची यात्रा सुरु होते! यानंतर २ तथ्य जागा समोर  आले कि नेताजींचा या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला किवा ते सुखरूप मांचुरिया ला व तेथून रशियाला पोहोचले! आपण आता दोन्ही संभावना तपासून पाहणार आहोत!

“त्या अपघातानंतर” 

यानंतर मी अनेक ठिकाणी पाहणी केल्यावर मला आढळून आले कि सायगाव वरून नेताजी जेव्हा निघाले तेव्हापासून ते निघाल्याच्या वेळेच्या योग्य नोंदी करून ठेवलेल्या नाहीत! अनेक लोक अनेक पुरावे सदर करतात! आता नेताजींची विमान यात्रा सुरु झाली आहे धावपट्टीवरून विमान उडल्यावर विमानात स्फोट होतो आणि विमान जमिनीवर आपटते हा अपघात विमानतळा जवळच होतो , विमानतळा पासून जवळच असलेल्या इस्पितळात ज्याचे नाव “नानमोन” सैन्य रुग्णालय आहे तेथे नेताजींना तसेच त्या विमान अपघातात जखमी झालेल्या लोकांना पाठवण्यात येते! मी एके ठिकाणी वाचले आहे कि नेताजी विमानात ज्या ठिकाणी बसले होते त्याच्या मागेच इंधनाची टाकी होती त्यामुळे अपघात झाल्यावर ते इंधन नेताजींच्या अंगावर पडले व ते जास्त जखमी झाले असे हबिबूर रेहमान यांनी नोंदवून ठेवले आहे , त्यांना रुग्णालयात “डॉ. टी सुरुता” यांच्या मार्गदर्शना खाली औषधोपचार केला जात आहे तसेच येथील एक  “नर्स डॉ. योशिनि” सुभाषबाबूंवर “ट्रेसिंग” करत आहे! सुरवातील इस्पितळातील कर्मचार्यांना सांगितले जाते कि हे “कट काना” ( जपान मधील सुभाष बाबूंचे नाव) आहेत यांना वाचवायचा पूर्ण प्रयत्न करावा अश्या प्रकारे औषधोपचारा नंतर सुभाषबाबूंना जरा बरे वाटते तसेच त्यांना एका जपानी अधिकार्याचे रक्त देखील चढवण्यात येते  त्यांना व हबिबूर रेहमान या दोघांना एकत्र त्या रुग्णालयाच्या दोन नंबर च्या वॉरड मध्ये ठेवण्यात येते!  याच दरम्यान नेताजींना सुद्धा येते व ते सतत पाणी मागतात तसेच त्यांना इस्पितळातील जपानी कर्मचार्यान सोबत बोल्याण्या साठी १ दुभाष्याची सुद्धा व्यवस्था केली गेली होती त्याचे नाव होते “नाकामुरा” ! परंतु एवढे सगळे करून सुद्धा नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू होतो! या बाबतीत  डॉ. योशिनी यांनी नेताजींच्या मृत्यू ची वेळ हि रात्रो ११ वाजता अशी नोंद केली आहे! 

“विमानातील बाकीच्या लोकांचे काय झाले ? “

मागे मी विमानातील १३ लोकांचा उल्लेख केला होता जे त्या विमानात प्रवासी म्हणून होते त्या पैकी  लेफ्टिनेण्ट जेनरल सिदेयी आणि पायलट मेजर ताकिजावा यांना घात्नास्थालीच मृत्यू येतो तसेच वारण्ट ऑफिसर आयोगी आणि ते दोघे ज्यांचे नाव मला सापडले नाही या तिघांचाही पुढे उपचार दरम्यान इस्पितळात मृत्यू होतो  म्हणजेच नेताजींच्या शिवाय आणखीन ५ लोक या अपघातात मृत्यू मुखी पडतात व ७ लोक जिवंत राहतात , हबिबूर रेहमान यांच्या अनुसार नेताजींच्या पैण्ट मध्ये आग लागली होती व ती सर्व शरीरभर पसरत गेली, हबिबूर यांनी स्वतःच्या हाताने ती विझवली ज्यात त्यांचे हात पण भाजले. तसेच बाकीच्या लोकांना सामान्य जखमा ( ?) होतात ! 

                                

नेताजींचे “मृत्यू प्रमाण पत्र”  

नंतर जपान सरकार नेताजींचा मृत्यू गुप्तः ठेवण्याची तसेच त्याचं संदर्भातला कोणताही प्रकारचा माहिती अहवाल कोठेही प्रसिद्ध करत नाही अत्यंत गुप्तता बाळगली जाते ! नंतर सुभाषबाबूंचा अंतिम संस्कार करण्या साठी त्यांना तऐपोई नगरपालिकेत “मृत्यू च्या ” प्रमाणपत्र साठी आणले जाते तेव्हा त्यांच्या सोबत हबिबूर रेहमान सुद्धा असतात! मी हे आपल्या ब्लॉग च्या वाचकांसाठी पुढे जोडलेले आहे  
१. आश्चर्य म्हणजे या मृत्यू पत्रात सुभाष बाबूंच्या निधनाचा उल्लेख हा दुपारी ४ ला केला आहे तर आधी सांगितल्या प्रमाणे   डॉ. योशिनी यांनी तो रात्रो ११ असा केला होता 
२. येथे सुभाष बाबूंचे नाव इचिरो ओकुरा असे आहे ! वास्तविक नगरपालिकेतील अधिकार्यांना हेच “काटा काना” ( म्हणजे जपानी मध्ये सुभाषचंद्र बोस) हे माहित नव्हते त्यामुळेच अंतिम संस्काराचं वेळेस सुद्धा कोणीही हेय जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही 
३. सुभाष बाबूंना “सैनिक, टेम्पोररी, ताईवान गवर्नमेण्ट मिलिटरी ” या ओळखीच्या आधारे मृत्यू पत्र दिले गेले होते म्हणजेच १ साधारण जपानी सैनिक 
४. मृत्यू चे कारण हे आजारपण आहे असा उल्लेख आपणास येथे पहावयास मिळतो 


आता मृत्युपत्र मिळाल्यावर २ जपानी अधिकारी त्याची ओळख त्याचप्रमाणे इतर गोष्टींची पडताळणी करण्या साठी २ जपानी अधिकार्यांना पाठवतात तेठेय त्यांना खरे सांगण्यात येते कि हा जपानी सैनिक इचिरो ओकुरा नसून ” काटा काना” ( म्हणजेच जपानीत सुभाष चंद्र बोस) आहेत तसेच गुप्तता म्हणून त्यांच्या मृत्यू ची कोणतीही बातमी आम्ही उघडपणे जाहीर करत नाही आहोत ! अश्या प्रकारे अधिकाऱ्यांचे असे बोलणे ऐकून जपानी अधिकारी सुद्धा “अधिक” भानगडीत पडत नाही तसेच ते अंतिम संस्कारासाठी पुढे पाठवले जातात ! अश्या प्रकारे नेताजींचे अंतिम संस्कार होऊन त्यांच्या अस्थी जपानच्या ” रेन्कोजी मंदिरात ” ठेवल्या जातात ! आजतागायत त्या तेथेच ठेवल्या गेल्या आहेत ! रेन्कोजी मंदिराच्या बाबतीत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा ! तसेच रेनकोजी मंदिर कसे आहे तसेच त्याचा आजुपाजूचा परिसर कसा आहे इत्यादी जाणून घेण्यासाठी या वीडीओ वर क्लिक करा !
पुढील लेखात आपण नेताजींच्या बाबतीतल्या अनेक गोष्टींबद्दल पाहू ! 

बाल्ड ईगलच्या देशात!

Source:baldeagleinfo.com

 

 पाश्चिमात्य देशांमधील वन्यजीव अभ्यासकांची स्वत:ला झोकून देऊन काम
करण्याची प्रवृत्ती डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांनी
जनमानसापर्यंत पोहोचवली. ‘निसर्गात असंही असतं’ असं वाटावं, अशा कितीतरी
घटना लोकांना ‘याची देही याची डोळा’ घरबसल्या बघता आल्या. लोकांना हे अनोखं
निसर्गदर्शन आवडायला लागलं. ‘वाईल्डलाईफ’ या क्षेत्राची आपल्याकडे तशी
क्रेझ कमी, पण आताशा

पांढर्‍यावरचे काळे…

मनुष्य आपल्या कर्माने मोठा होतो. अनेकदा त्याचे कार्य हे इतके मोठे असते कि कालपटावरचा त्याचा विस्तार हा मती गुंग करणारा असतो. अशी मती गुंग करणारे कार्य दिसले कि कालांतराने आपसूक त्या भोवती नवनवीन काव्यपिसारे फुलतात, ते चूकहि नसते, मात्र याच कवी कल्पना ह्या इतिहास म्हणून घेतल्या कि गोची होते. मग त्यांना “चमत्कार” येऊन चिकटतात. आणि आपण त्या व्यक्तीला कधी देव्हार्‍याबाहेर येऊच देत नाहि. “देव” या संकल्पनेबाहेर आपण त्यांना बघत नाहि, बघू शकत नाहि. त्यांना “अवतार” ठरवल्याने मग त्यांनी केले ते अवतार कार्य म्हणूनच. त्यावर फालतू प्रश्न विचारायचे नाहित. देवच तो, त्याने काहिहि केले तरी कारण विचारायचे नाहि, कारण नियतीचा संकेत होता. ह्याने आपण समाजाची विचारशक्ती कुंठित करतो. त्यांच्या चांगल्या वाईटाला देवत्वा खाली माफ करुन टाकतो. वास्तविक देवत्वाखाली आपण आपली विचारशक्ती तर झाकतोच पण त्या व्यक्तीच्या कार्याला आपल्या नकळत कमीपणा आणतो असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणजे “देव” म्हणून त्याच्या चरणाचेहि तीर्थ घेऊ, पण ते कार्य जर ’देव’ करतोय म्हंटलं कि त्याच्यासाठी सहज साध्य असते पण तेच ’माणूस’ समजून घेतले तर त्याकाळि ते कार्य कसे केले असेल? ह्याचे आश्वर्य वाटून आपले आदर्श जास्त बळकट करता येतात हे कोणीच लक्षात घेत नाहि.

फेसबुकवरती एका ग्रुपवरील चर्चेत मुद्दा श्रीरामावरती चर्चा होत होती एक गट वर म्हणालो तसा “तीर्थ” संप्रदायातील होता तर दुसरा  रामाने चुका कश्या केल्या ह्यांचा घडाघडा पाढा वाचणारा होता. म्हणजे “श्रध्दा” व “बुध्दिवाद” या दोन पांढर्‍यावरील काळ्या शब्दांमध्ये श्रीरामांची ओढाताण सुरु होती. मी काहि मते मांडली त्यावर मुख्यत: श्रध्दावानांनी माझ्यावर हल्ला चढवला (सुदैवाने अहिंसक हल्ला होता, म्हणजे गांधीजींच्या “चामड्याच्या” चपला जितक्या अहिंसक होत्या तितकाच!).

यातला बुध्दिवाद्यांचा प्रश्न मला पटला – “जर दैवी संकेतानुसार जसं ठरलं होतं तसंच कैकयी – मंथरा वागल्या असतील तर त्यांना का दोष द्यावा?”  यावर मग श्रध्दावानांची सहाजिक गोची झाली. मग लोकांना दाखवण्यासाठी देवाने केलेला खेळ वगैरे  – “वत्सा अजाण आणि बाळबोध आहेस अजून!” धाटणीची नेहमीची उत्तरं सुरु झाली. माझ्या विचारानुसार कैकयी ही सामान्य स्त्री खचित नव्हती. मी चुकत नसेन तर जी २ वचने आपण कैकयीने दशरथाला मागितली असे म्हणतो ती वचने तीने भर रणांगणावरती दशरथांचा जीव वाचवून मिळवली होती व नंतर कधीतरी मागेन असे म्हणून पुढे रामचा राज्याभिषेक करायचे जाहिर केले तेव्हा मागितली. याचा अर्थ कैकयी एक लढवय्या स्त्री होती. पुढची गोष्ट दशरथाला शाप होता कि पुत्र वियोगाने तुलाहि मृत्यु येईल. मग पुत्र वियोग २ प्रकारे – एक तर रामाचा मृत्यु किंवा रामाचे दिर्घकाळ दूर रहाणे. शाप वगैरे कथा सत्य मानली तर उलट रामाला दूर पाठवून तीने रामाचा जीवच वाचवला ना? दशरथ व राम असे २ जीव जाण्याऐवजी एकच जीव गेला.

आता श्रीरामाच्या मुख्य कार्याकडे बघू – “रावणवध”.  रावणाला हरवणं हि म्हणाल तर नविन, जगावेगळी वा अशक्य गोष्ट अजिबात नव्हती. सहस्रार्जुनाने, वालीने इतकेच कशाला? तर स्त्री राज्यातील स्त्रीयांच्या सैन्यानेहि रावणाला हरवले होते. पण आधी दंडकारण्यात येऊन मोठं सैन्य उभं करणं, ते लंकेपर्यंत घेऊन जाणं आणि रावणासारख्या बलाढ्य राजाला हरवल्यानंतर (मग तो वध असेल किंवा कैद असेल) ते राज्य योग्य हातात देणं. व रावणाचे पाठिराखे परत डोकं वर काढणार नाहि अशी व्यवस्था लावुन आर्यवर्त पुन: निष्कंटक करणं हे मोठं काम होतं. इथे रामरायाने केलेली राजकारणे, राबवलेली धोरणे फार विचार करण्यासारखी आहेत. श्रीराम हा पट्टिचा राजकारणी होता. केवळ मर्यादा पुरुषोत्तम – मर्यादा पुरुषोत्तम करुन आपण श्रीरामाचा “चॉकलेट हिरो” बनवून टाकला आहे. ती आवरणं झटकली कि श्रीरामाच्या कार्याचे विचारहि करु शकणार नाहि इतके विराट स्वरुप आपल्या समोर येते मती गुंग करुन टाकते. आणि हि आवरणं झटाकायला ना श्रध्दा सोडायची गरज आहे ना बुध्दिवादाच्या नावाखाली उभे आडवे छेद देत जाण्याची. फक्त त्या विराट रुपाचे दर्शन झाल्याने मती गुंग झाली कि त्याला “चमत्कार” म्हणून लेबल चिकटवले जाऊ नये आणि मुळ रामकथेत किंवा प्रक्षेप म्हणून मागुन आलेल्या कथांचा चोथा करुन रामाने हिच चूक केली होती तीच चूक केली होती हे हातोडिचे घाव घालून मोकळे व्हावे तसे आरोप करुन मोकळे होऊ नये.

अजून एक, रामायण वाचता – बघताना बिभिषण म्हणजे “बुळ्या”, मिळमिळित” असं चित्र उभं रहातं तर तसं नाहिये. बिभीषण उत्तम लढवैय्या होता. रामाच्या सेतुचे लंकेच्या बाजूने रक्षण करण्याची जबाबदारी बिभीषणाने पार पाडली होती. रामाने दक्षिण आर्यवर्तातील रावणाचा हस्तक्षेप मोडून काढायला बिभीषणाला कसे वापरले याचं मला फार कौतुक वाटतं. बिभीषणाची राजकारणाची महत्वकांक्षा रामरायाने अचूक हेरली म्हणजे त्याचे – सुग्रीवाचे हेरखाते किती उत्तम असेल? वरुन ह्याच्याशी मैत्री ठेवली तर दंडकारण्याच्या खालच्या भागात परत शांतता नांदेल ह्याचीहि हमी मिळवली. श्रीराम – श्रीकृष्णांमधली समानता म्हणजे दुसर्‍यांचे राज्य त्यांनी हिसकावून घेतले नाहि. त्या – त्या ठिकाणच्या/वंशजांच्या हाती तो कारभार सोपवला. यात दातृत्व व राजकारण यांचा उत्तम संगम दिसून येतो. त्या महामानवांकडून शिकायच्या त्या या गोष्टि.

पण त्यांच्या महान कार्यांना थेट देवपण दिलं कि ते करतील ते सगळं बरोबर होत जातं. त्या काळि त्यांनी जे निर्णय घेतले ते एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून हे मान्य केलं तर उलट त्यांनी केलेली सत्कार्ये हि हजार पटींनी मोठी होतात. मानव असून इतके अवाढव्य काम कसे केले याचे आदर्श अजून बळकट करता येतात आणि आपण ’आत्ता २०१२ मध्ये ज्यांना “चूका” म्हणतो त्यावर “मानवाने” केलेली चूक व समाजाची त्यावेळची मानसिकता व पालनकर्ता – समाजाचा सर्वात वरच्या फळितला घटक म्हणून श्रीरामांना सीतेचा करावा लागलेला त्याग यांचा सरळ संबध लावता येतो.(मुळात उत्तर रामायण हा ’प्रक्षेप’ आहे हे माझे वैयक्तिक मत आहे. मुळ रामायणात श्रीराम परत आल्यावर “त्यांच्या अनेक पिढ्यांनी पुढे सुखाने राज्य केले” इथे रामायण संपवले आहे.) 

श्रीराम हा भारताचा – हिंदु धर्माचा प्राण आहेत ह्यात अजिबात शंका नाहि. श्रीरामा सारखा आदर्श राजा/माणूस हजार वर्षातून एकदा होत असावा. मी हे सुध्दा सांगतोय कि मला स्वत:ला रामनाम आवडते. घरात लहानपणापासून रामनाम ऐकत मोठा झालोय. आणि इथे श्रध्दा इतकि प्रभावी आहे कि हजारो वर्ष त्या रामनामावरती आशा-श्रध्दा-भक्ती-भावना-वाणी एकवटून त्याची कोटिच्या कोटि आवर्तने होऊन खरोखर त्याला मानसिक आधाराचे किंवा अजून स्पष्टपणे सांगायचे तर कवचाचेच रुप आले आहे. माझाहि रामनावार संपूर्ण विश्वास आहे. संकटांवर मात करण्याची अफाट स्फुर्ती रामनाम देते ते त्यावर गेली हजारो वर्षे भक्ती व वाणीचे जे “संस्कार” होत आहेत त्यामुळे. भक्ताने देवाला मोठं केलं, देवाने भक्ताला सांभाळलं. भक्त आणि त्याचे श्रध्दास्थान एकमेकांना आधार देतात – मोठे होतात हे दाखवण्यासाठी याहुन सुंदर व गोड उदाहरण नाहि. 🙂

श्रध्दा आणि बुध्दिवाद या दिसायला विरुध्द असल्या तरी पुरक गोष्टि आहे. श्रध्दा हि डोळसच असावी. आणि बुध्दिवादाला देखिल श्रध्देचे अधिष्ठान असावे. “सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।” श्रध्दा आणि बुध्दिवाद सहज एकत्र नांदू शकतात सर्वात मोठे उदाहरण – शिवछत्रपती आणि स्वामी विवेकानंद. कुठल्याहि गोष्टिवरती मग अगदि ती चांगलीहि का असेना सहज विश्वास ठेवला कि बुध्दिवादाला टोचणी लागते आणि अडचणीत आणणारे प्रश्न विचारले कि श्रध्दावानांना त्रास होतो. मुळात आपले अध्यात्म हे प्रश्नांमुळेच निर्माण झाले आहे. “स्वकियांशी कसा लढू?” या प्रश्नाने गीता निर्माण झाली. हल्ली प्रश्न विचारला कि श्रध्दावान म्हणवणारे तुटुन पडतात. मुळात श्रध्दा हि ’संयमानेच’ दृढ होत जाते. समोरच्याच्या एका वाक्यावरुन तलवारी परजायला सुरुवात केली धर्म हे वैचारीक डबकं होतं. त्याचं तालिबानीकरण होतं. सुदैवाने हिंदु धर्मात विचारावर कधीच बंधनं नव्हती इथे चार्वाक सुध्दा “हिंदूच” म्हणवले जातात. जगात दुसरा असा कुठलाहि धर्म नसेल कि ज्यात एकमेकांच्या विरोधी जाणारी शेकडो मते असूनहि तो भक्कमपणे उभा आहे. भक्कम तंबू उभा करायचा असेल तर चार वेगवेगळ्या दिशांना जाणार्‍याच दोर्‍या असाव्या लागतात. तंबू माझ्या एकट्य़ामूळे उभा आहे असं तो मधला खांब नाहि म्हणू शकत ना विरुध्द दिशेने जाणार्‍या दोर्‍याहि.

श्रध्दा ठेवताना प्रश्न विचारु नका हे मला पटत नाहि. विवेकानंदांसारखा अध्यात्मिक अधिकारी पुरुष एखाद्या “गुरु” करताना तुमचे समाधान होईतो अखंड प्रश्न विचारा असाच सल्ला देतो. हा खरा बुध्दिवाद आणि या बुध्दिवादाची पुढची पायरी श्रध्दा आहे. असा बुध्दिवाद आणि अशी श्रध्दा असेल तर राष्ट्र प्रगती पथावर जाईल. अन्यथा दुसर्‍याला “हे शरीर नाशिवंत आहे बालका, सोने नाणे यांचा मोह नको!” म्हणत स्वत:चे मोठे श्रीमंती आश्रम उभारणारे, “खास” भक्तांसाठी हवेतून साखळ्या काढणारे किंवा ’संभोगातून समाधीकडे’ नेणारे भोंदू देशाला विनाशाच्या गर्केत नेतील.

मी लिहिलय ते पटणं अथवा न पटणं हे ज्याच्या त्याच्यावर सोपवलं आहे.

मी स्वत:ला बुध्दिवादि समजतो. तर्काला न पटणार्‍या धार्मिक कर्ममकांडांची ची उत्तरे मिळाली नाहि तर मी बेचैन होतो. दुर्दैवाने “श्रध्दा” रुढी यांच्या नावाखाली मोठ्यांकडून ’असंच असतं’ हे कधीच न पटणारं उत्तर मी अनेकदा ऐकलं. आणि त्यातून माझा बुध्दिवाद अजून वाढत गेला. कदाचित माझ्याही काही अजून उत्तर न मिळालेल्या श्रध्दा – अंधश्रध्दा माझ्या नकळत मी जोपासत असेन, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहेच.

लोकं देवाला शब्दश: “घाबरतात”. उठसुठ देवाला घाबरणे मला कधीच पटले नाहि. देवाला तुम्हि “माऊली” म्हणता तर घाबरता का? किडुक मिडुक कारणां वरुन देवाचा कोप होतो??? हे लॉजिक मला पटत नाहि. हां आता तुम्हि कोणाचे तळपटाच करायला जात असाल तर देवाने शिक्षा केली नाहि तरच आश्चर्य आहे.

उपवासाच्या दिवशी चालणार नाहित म्हणून औषधे न घेणारी लोकं पाहिली आहेत मी. माझ्या समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे हि. अरे मरायला टेकल्यावर कसले उपास? आणि औषधे नाकारायचा अट्टाहास का? देव नाहि सांगत माझ्यासाठी शरीराला त्रास दे म्हणून. अध्यात्माच्या नावाखाली अनेक अनाकलनिय गोष्टि बेमालूम दडपल्या जातात. ते बघून त्रास होतो. अजून एक देवाला नेवैद्य दाखवताना त्याची चव घेतली गेली तरी मला चुकिचे वाटत नाहि. घरात लहान मुलांना भूक लागली असते आणि केवळ पुजा होऊन देवाला नेवैद्य दाखवायचा बाकि आहे म्हणून त्या इवल्याश्या जीवाला थांबवुन ठेवले जाते, हे मला कधीच पटाले नाहि. मला विचाराल तर खुशाल त्या मुलाला जेवू घालावे. मुलत: नेवैद्य हा उपचार फक्त अन्न ग्रहण करण्यापुर्वी देवाची आठवण व चांगली मनस्थिती तयार व्हावी यासाठी असतो.

उदाहरणा दाखल ही माझी वैयक्तीक मते आहेत. अनेकांना ती पटत नाहित. पटवून घ्यावीत हा अट्टाहास नाहि पण ती चूक आहेत असे कोणाला वाटात असेल तर “का?” या प्रश्नाचं सविस्तर आणि पटणारं उत्तर हवय. यालाच मी बुध्दिवाद समजतो.

संयम नसला कि ना बुध्दिवाद कामाला येतो ना श्रध्दा. अन्यथा उरतात ते केवळ “बुध्दिवाद” व “श्रध्दा” असे दोन पाढर्‍यावरचे काळे शब्द!

 – सौरभ वैशंपायन.

शोध तुकारामाचा

तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव – निदान विशी उलटलेल्या – मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातला कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत. पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार