संत बसवेश्वर


लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर

आज क्रांतीकारक आणि महान समाजसुधारक संत बसवेश्वर यांची जयंती आहे. बाराव्या शतकात या महान विचारवंताने जी क्रांती केली त्याची दखल जगभरात घेतली गेली. लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक असलेले बसवेश्वर समता वादी होते. तत्कालीन सनातनी हिंदू धर्मावर बसवेश्वरांनी आसूड ओढले. अंधश्रद्धेने ग्रस्त झालेल्या तत्कालीन समाजाला पुनर्जिवन देण्याचे काम महात्मा बसवेश्वर यांनी केले. 

संत बसवेश्वर यांचा जन्म इ.स.११३२ मध्ये कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे वै. शु. अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे बसवेश्वरांना लहानपणापासून समाजातील असमानतेबद्दल प्रचंड चीड होती. दलितांवर हिंदू उच्चवर्णींयांकडून होणारे अत्याचार बसवेश्वरांना सहन होत नव्हते म्हणूनच वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपली मुंज करून घेण्यास स्पष्ट नकार दिला व आपल्या पालकांना अट घातली की जर दलितांची, शूद्रांची मुंज होत असेल तरच मी माझी मुंज होऊ देईन. एवढ्या लहान वयात बसवेश्वरांनी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते.  सामाजिक समता हाच बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा होता. मी जेव्हा जेव्हा संत बसवेश्वरांच चरित्र वाचतो तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो. शेकडो वर्षापूर्वी ज्याकाळी अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा प्रचंड पगडा जनमानसावर होता. शूद्रांवर अनन्वीत अत्याचार होत होते. त्याकाळात बसवेश्वरांनी जे धाडस केल त्याने मी पूर्ण प्रभावित झालोय. एक व्यक्ती या सर्वांविरुद्ध उभा राहतोय आणि एक यशस्वी लढा देतोय ह्याची कल्पनाही करवत नाही. संत बसवेश्वरांनी जे काही कार्य केले ते कार्य सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवलेला इतिहास झालाय. अवघ्या ३५ वर्षाच आयुष्य (११३२ ते ११६७) आणि या अल्प आयुष्यात बसवेश्वरांनी बहुजन जनतेसाठी प्रचंड कार्य केले. माणूस आणि माणुसकी हा बसवेश्वरांचा मूलमंत्र होता. त्यांनी अस्पृश्यता, जातीयवाद, कर्मकांड, अनेक देवतावाद, स्त्री – पुरुष भेदाभेद ह्या विरुद्ध लढा दिला.

११४१ मध्ये बसवेश्वरांनी ‘अनुभव मंडप’ या पहील्या लोकशाही संसदेची स्थापना केली. या संसदेची रचना समाजातील सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी होती. पहिल्या संसदेत मांग, महार, शिंपी, बहुरूपी, मेंढपाळ, धनगर, धोबी, कोळी, शेतकरी, न्हावी, गुराखी, महिला असे सर्व समाजाचे प्रतिनिधी सामील झाले. जातीयता नष्ट करणे हे संत बसवेश्वरांचे पहिले उद्दिष्ट होते. या संसदेत स्त्रीयांसाठी विशेष आरक्षण होते. संत बसवेश्वरांनी विधवापुनर्विवाहास पूर्ण मान्यता दिली त्याचवेळी बालविवाहास विरोध केला. शेकडो वर्षापूर्वी जातीयता नष्ट करण्यासाठी संत बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. एवढ करून ते थांबले नाहीत. त्यांनी स्वत: अनुभव मंडप संसदेत एका ब्राम्हण मुलीचा विवाह एका अस्पृश्य मुलाशी करून आंतरजातीय विवाहाची मुहूर्तमेढ रोवली. ते अनेक वेळा अस्पृश्यांच्या घरी जेवण करत असत. अस्पृश्यांना स्वत:च्या घरी मुक्त प्रवेश देत असत.

बसवेश्वर यांच्या यां कार्यामुळे तत्कालीन धर्म कट्टरवादी चिडले. बसवेश्वराना बहिष्कृत करण्यात आले. त्यांना पंतप्रधान पद सोडाव लागले. अनेक भ्रष्टाचाराचे खोटे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. चौकशी अंती त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध झाला आणि संत बसवेश्वरांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली.  बसवेश्वर यांची अनुभव मंडप ही संसद भारतात लोकप्रिय होत गेली. अनेक लोक या क्रांतीत सहभागी झाले. मंडपात येणाऱ्या मागासवर्गीय लोकांनाही बसवेश्वरांनी देवाच्या पूजेचा आणि धार्मिक शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्यासाठी बसवेश्वर यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी सुतक आणि विटाळ यां प्रथा नाकारल्या. वेश्या आणि विधवांचे पुनर्विवाह लावून दिले. स्त्रीयांसाठी साक्षरता केंदांची निर्मिती संत बसवेश्वर यांनीच केली. परिश्रम हीच खरी पूजा असे संत बसवेश्वरांना वाटायचे. त्यामुळे कष्टाचे महत्व त्यांनी सामान्य जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला.  
      
संत बसवेश्वर यांनी जातीयता मोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बाराव्या शतकात जातीयतेची निरर्थकता समाजाला पटवून दिली. सनातनी धर्मांध लोकांकडून हीन वागणूक मिळूनही बसवेश्वर खचले  नाहीत. ईश्वरप्राप्ती साठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही हाच संदेश बसवेश्वर यांनी दिला. व्यक्तीच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कार्यावरून त्याची ओळख निर्माण होते हे बाराव्या शतकात लोकांना पटवून देणे सोप नव्हत पण बसवेश्वरांनी ते साध्य केल. संत बसवेश्वरांकडे प्रचंड दूरदृष्टी होती. संपत्तीचे योग्य वाटप कसे व्हावे, स्त्रियांना कसे योग्य स्थान दिले जावे, जातीभेद कसा नष्ट केला जावा या आणि अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी अनुभव मंडपात मार्गदर्शन केले. आजही बसवेश्वरांनी दिलेल्या शिकवणीची समस्त मानवी समाजास गरज आहे. भारतीय समाजात क्रांतीच बीज पुरणारया या महामानवास विनम्र अभिवादन.

वा महागुरू !

खरे पाहता मी “मराठी” मालिकांपासून १० हात दूरच असतो ! आजकाल च्या मराठी मालिका या बघण्यालायक नसतात असेच माझे ठाम मत होते जेव्हा पासून मी ” दिल्या घरी तू सुखी राहा” चा १ भाग चुकून पहिला ! त्यामुळे उरला – सुरला क्षणी सुद्धा मी मराठी वाहिनीवर फिरकत नसे ! असेच एकदा चुकून माझ्या नजरेस “मी मराठी” या वाहिनी वरील ” बोले तो मालामाल” हा कार्यक्रम नजरेस आला .. ! बघण्याचे कारण म्हणजे त्यात मी ” महागुरू – सचिन पिळगावकर ” यांना बघितले . आणि रिमोट खाली ठेवून तो कार्यक्रम बघू लागलो ! वास्तविक मला या कार्यक्रमाची कल्पना मुळीच माहित नव्हती , तरी बघता बघता समजले कि “टिटवाळा ” येथील १ कुटुंब आले होते ज्यांचा मुलगा हा प्रचंड आजारी होता.. तरीसुद्धा ते कुटुंब आपल्या मुलासाठी – त्याच्या औषधोपचारासाठी धडपड करत होते ! खरेच ते पाहून मन थक्क झाले! आता कल्पना अशी होती कि महागुरू सचिन पिळगावकर हे त्या कुटुंबाच्या दुकानात जाऊन एका दिवसासाठी ते जो व्यवसाय करणार तोच करणार,.. आणि मुद्देमालाची रक्कम वजा करून + तसेच फोटो + स्वाक्षरीचे पैसे पकडून त्यांना १०० ने गुणून ती रक्कम त्या कुटुंबास देणार ! 

ठरल्याप्रमाणे सचिन पिळगावकर हे आधी टिटवाळा येथील गणेश मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनास गेले व “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात तेथून ते तडक त्या दुकानात व्यवसाय करण्यासाठी गेले ! त्यांच्या दुकानात त्यांना १ मदतनीस देण्यात आला ! आणि त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला ! खरे पाहता सुरवातीला त्यांचा व्यवसाय होण्याआधी लोक नुसते त्यांना पाहण्यात गुंग झाले ! तेव्हा त्यांनी काहीश्या “करड्या” स्वरात लोकांना सांगितले ” नुसते बघायला म्हणून येथे उभे राहू नका किवा हात मिळवू नका ” तेव्हा भानावर येऊन लोकांनी सुद्धा पटापट आपल्या सामानाची खरेदी केली ! 


सचिन यांच्या कडून अनेकांनी मंदिरातील पूजेचे साहित्य त्याचप्रमाणे तसबिरी + मूर्ती इत्यादी गोष्टी खरेदी केल्या ..त्याच प्रमाणे त्यांच्या सोबत फोटो काढण्या साठी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली ! येथे सांगण्याचा मुद्दा असा कि १ वाहतूक पोलीसही या कामात मदत करून गेला ! आता मात्र सायंकाळ होत आली ..! परतीचा प्रवास सुरु करायचा होता.. परंतु जाता जाता या चांगल्या कामाला तेथील काही पोलीसानमुळे गालबोट लागले ! परंतु जाता जाता सचिन देखील समाधानी अंतकरणाने जात होते !
                                              
आता व्यवसाय झाला होता.. मुद्देमाल ची रक्कम वजा करून जवळ जवळ १००० रुपयांचा नफा झाला होता आणि त्याला १०० ने गुणून त्या कुटुंबाला जवळ जवळ १ लाख रुपये मदत म्हणून मिळाले ! सचिन पिळगावकर सुद्धा या प्रसंगी आपले भाव लपवू शकले नाहीत ! २००९ साली मी स्वत “सचिन पिळगावकर ” यांना  एका कार्यक्रमा दरम्यान बघितले आहे… खरेच एखाद्या गरजूला मदत करण्या साठी एक सुपरस्टार असे देखील करू शकतो हे माझ्या साठी खरेच नवीन होते ! 
जाता जाता सचिन पिळगावकर यांचे एक वाक्य जे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले ते म्हणजे,
” मी सेलीब्रीटी आहे ! म्हणजे कोणी मोठा माणूस नव्हे , तर असा माणूस ज्याच्या सोबत तुम्ही नेहमी कोणताही क्षण हा सेलीब्रेट करू शकता !  “

रोखठोक – ३

परवाच पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तान चे राष्ट्रपती असिफ आली झरदारी यांच्यात भेट झाली ! वास्तविक पाकिस्तानी राष्ट्रपती हे  भारताच्या एका दिवसाच्या खासगी यात्रेवर होते , त्यात सांगायचा मुद्दा असा की संपूर्ण देशा चे लक्ष्य लागले होते कि २६/११ चा आरोपी हाफिज सैद याला भारताच्या स्वाधीन केव्हा करणा या प्रश्नावर ! तेव्हा एका वृत्तवाहिनीवर मी या संदर्भात चर्चा पाहत होतो ! त्यात तेथील संवादाता + भारतातील रक्षा तज्ञ तसेच पाकिस्तानातील प्रमुख मीडिया नेटवर्क पैकी १ असणार्या जियो न्युज चे संपादक “हमीद मीर” यांची चर्चा ऐकत होतो ! 


यात भारतीय तज्ञांनी “हाफिज सईद” ला भारताला सुपूर्द करण्याचा प्रश्न उपस्थित केला ! तर त्यावर त्यांचे उत्तर ऐकून मला जरा आश्चर्य वाटले ! त्यात हमीद मीर म्हणत होते की भारतात प्रचंड जोरात फोफावणार्या “हिंदू दहशतवादाला ” प्रथम त्यांनी रोखावे व पुन्हा पुन्हा समझोता ब्लास्ट ची आठवण करून दिली ! सांगायचा मुद्दा येथे असा की आपल्याच धर्मातील काही चुकीच्या लोकांमुळे सगळ्या हिंदू लोकांचे नाव खराब होत आहे ! आपला हेतू तसेच उद्देश्य सध्या करण्या साठी निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या अश्या नराधमांचा मला प्रचंड राग येतो ! त्यांना शासनाने कठोर शिक्षा केली पाहिजेच !


विशेषतः आपल्यातल्या काही चुकीच्या लोकांमुळे सर्व जगा समोर आपल्याला शरमिंदा व्हावे लागते . तसेच आयुष्यभर आता आपल्याला पाकिस्तान समझोता ब्लास्ट बद्दल ऐकवत बसणार ! वास्तविक दुसर्या माणसांचा जीव घेताना अश्या लोकांना काही वावगे वाटत कसे नाही ? त्यांचा हात कसा कापत नाही ? मी हिंसेचा समर्थक नाही , परंतु आत्मरक्षेचा आहे , आत्म रक्षा करत असताना जर कोणी हिंसा केली तर ती हिंसा होत नाही तर स्वतःची त्या संकटा पासूनची रक्षा होते ! परंतु येथे मात्र याचा सुतराम संबंध नाही ! जे लोक “आम्ही धर्माच्या रक्षणा साठी असे करतो ” इत्यादी इत्यादी बोलतात त्यांना मी पहिले हे सांगू इच्छितो की कृपया सर्व प्रथम आपल्या हिंदू धर्मात असलेल्या काही अनिष्ठ चालीरीतींचा नाश करावा , तसेच जुन्या परंपरा तेसेच उच्च- निच्च भेदभाव कायमचा नष्ट करण्या साठी प्रयत्न करावा ! आपला धर्म जास्तीत जास्त चांगला कसा बनवता येईल येथे लक्ष्य द्यावा ! कारण “धर्म सुधारणा” हेच खरे धर्म रक्षण आणि धर्म संवर्धन आहे ! 
तरीसुद्धा असे लपून छपून हल्ले करून आपल्याला काय मिळणार आहे ! फक्त “बदनामी” ! 

संस्कार?

           

            शेजारच्या काकू रविवारी आईशी गप्पा मारायला आल्या होत्या. त्यांना गप्पांना …

जंगलवाटांवरचे कवडसे – ८ (उपसंहार)

हे जग हा एक नरकच आहे.

“या तिघांपैकी कोणाची साक्ष अधिक विश्वासार्ह वाटते तुला?” हा तिसर्‍या
माणसाने विचारलेला प्रश्न हा चित्रपटाचा गाभा आहे. मुद्दा आहे तो प्रत्येक
साक्ष देणार्‍याची विश्वासार्हता निश्चित करण्याचा नि त्या आधारे
प्रत्येकाच्या साक्षीतील सत्यांश शोधून त्याच्या आधारे निवाडा करण्याचा.
निवाड्यासाठी आधी कळीचे प्रश्न निश्चित करावे लागतील नि साक्षींच्या,
अन्वेषणाच्या आधारे त्यांची

जंगलवाटांवरचे कवडसे – ७ (लाकूडतोड्याची साक्ष)

 
न्यायालयातील साक्षींचा तपशील तिसर्‍या माणसाला सांगून संपलेला आहे.
राशोमोन द्वारावर लाकूडतोड्या अस्वस्थपणे फेर्‍या घालतो आहे. भिक्षू नि तो
माणूस खाली बसून त्याच्याकडे पाहत आहेत. लाकूडतोड्या अस्वस्थपणे द्वाराच्या
आतल्या बाजूला चालत जातो, अचानक वळतो नि म्हणतो “हे खोटं आहे. तिथे खंजीर
नव्हताच. त्याची हत्या तलवारीने झाली.”

तो माणूस तुच्छपणे हसून ‘आता हे
अपेक्षितच होते’ अशा नजरेने

जंगलवाटांवरचे कवडसे – ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)

सामुराईच्या आत्म्याला आवाहन केले जात आहे

सामुराईचा आत्मा सांगू लागतो. “तिच्याशी संग केल्यानंतर तो डाकू
तिच्याशी लाडीगोडीने बोलू लागला.  तो म्हणत होता की ’जंगलात अशा
परपुरुषाबरोबर राहिल्याने तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले असल्याने
आता ती पतीबरोबर राहू शकत नाहीच. असे असेल तर तिने तिच्या दुबळ्या पतीला
सोडून त्याच्याशीच लग्न का करू नये?’ त्याने तिच्यावर अत्याचार केला तो ही
त्याच्या

जंगलवाटांवरचे कवडसे – ५ (स्त्रीची साक्ष)

न्यायासनासमोर पालथी पडून ती स्त्री विलाप करते आहे. स्थान तेच पण पार्श्वभूमीमधे थोडा बदल आहे. पूर्वीच्या तीन साक्षींच्या वेळी मागील साक्षीदारांना पुढच्या साक्षीच्या वेळी पार्श्वभूमीवर बसवले होते. त्यामुळे भिक्षूच्या साक्षीच्या वेळी लाकूडतोड्या नि ताजोमारूच्या साक्षीच्या वेळी लाकूडतोड्या आणि भिक्षू पाठीमागे बसलेले होते. लाकूडतोड्या, भिक्षू आणि शेवट पोलिस हे तिघे तुकड्यातुकड्याने आपापले अनुभव

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे – 2

दोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे “सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे” या विषयावर चर्चा चालली होती. मला तर फारच विचित्र अनुभव झाले. अश्या ठिकाणी मुलगी पहावयास गेलो जिथे साधी बसण्यासाठी पण जागा व्यवस्थित नसेल. घराच्या पहिल्या द्वार पासून तर शेवटच्या द्वार पर्यंत नुसती धूळ उडतांना दिसते. कावळे एका खिडकीतून दुसर्या खिडकीद्वारे उडताना दिसायचे …. बसावेसे पण वाटत नाही. मुलगी जरी नुसती बारावी पास होती. पण मुलीचे पालक आणि नाते वाईक, जणू त्या मुलीने मोठाच पराक्रम केला असेल अशा पद्धतीने तिचा परिचय करून देतात. आणि त्या परिचय मध्ये पण मुलाला त्याचे हलक्या प्रकारचे स्टेटस आहे तसे दर्शवितात. आणि सरकारी नोकरी आहे का ? त्याच ओळीवर जास्त भर देतात.  अशा वेळेस मन तर फार वैतागले होते, मनात वाटायचे कुठे जंगला मध्ये मुलगी पहावयास येवून गेलो. या लोकांना बारावी च्या पुढे आणि सरकारी नोकरी शिवाय पण काही तरी असते ते माहीत आहे का ?. स्वतः वर संताप पण येत होता कि   येण्या अगोदर कमीत कमी चौकशी करायला हवी होती. माझा एक मित्र , विनोद जो कोल्हापूर ला आहे , बिचारा असाच कंटाडून गेला होता या सरकारी नोकरीच्या भूता मुळे , सर्व काही असून हि त्याला पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. नेहमी एकच प्रश्न समोर येत होता “सरकारी नोकरी आहे का?” जवळ जवळ एकाद वर्ष तो मुलीच्या शोधात होता. पण काही नाही. मग शेवटी त्याने ठरवले कि या सरकारी नोकरीच्या भुताला कसे हाताळायचे. तो सुरत मध्ये म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये कंत्राटी धोरणाने जल विभागात नोकरी वर लागला. सर्व काही त्याने प्लानिग नुसार केले. चार ते पाच महिन्यात त्याने खालचे वरचे जे कोणतेही अधिकारी असतात त्यांना खिस्यात केले. अर्थात पैस्याची लाच देवून त्यांना तयार केले. आणि परत एक वर्ष नंतर त्याच ठिकाणी गेला जिथे त्याला मुलगी आवडली होती. मोठ्या तोर्याने त्याने त्याचा काका आणि मामा बरोबर जावून मुलीच्या पालकाशी लग्नाची गोष्ट केली. या वेळेस मात्र सरकारी नोकरी माझ्या मित्राला असल्या कारणाने त्यांनी नकार दिला नाही(जी खरोखर नव्हती). त्यांनी सुरत म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये चौकशी केली. आणि त्यांना खरे वाटले. शेवटी  सासर्याने सर्व काही लग्नाचा खर्च केला कारण त्याला सरकारी नोकरीवाला नवरा मुलगी साठी पाहिजे होता आणि तो मिळाला देखील.दीड वर्ष तो सुरत मध्ये राहिला, पण त्याला भीती देखील वाटत होती कि जर मुलीच्या बापाला माहित झाले तो फ्रोड चा केस दाखल करेल. त्यामुळे त्याने लग्न झाले असून हि कोर्ट मेरीज केले. आणि लग्नाचे प्रमाणपत्र मिळवून घेतले.तेथे  सही करण्यासाठी माझे मित्र हजर राहिले होते. पण तसे काही झाले नाही जशी त्याला भीती होती. मुलगी सुखात होती. कोणतेही टेन्शन नव्हते. आणि बराबर दीड वर्ष नंतर तो कोल्हापूर परत स्वतः च्या घरी स्थायी झाला. सासर्यास माहित झाले. पण करणार काय  ?  त्याला मुलगी आनंदात दिसली. सर्व काही ठीक ठाक दिसले. शेवटी जी परिस्थिती होती ती त्याने मान्य केली. आज हि त्यांचा संसार सुखात चाललेला आहे. त्यांची लग्नाची एनिवर्सरी असली की त्या दिवशी ते आठवण करून मला फोन जरूर करतात. थोडक्यात, असे लोक पण सरकारी नोकरी चा भूत पळविण्यासाठी जवाबदार म्हणता येतील. हे गोविंदाच्या “कुली नंबर वन” नावाच्या चित्रपटात होते तसे झाले. पण प्रत्येकाचे तसे नशीब नसते. नाव त्याचे विनोद होते, पण त्याने गंभीर विनोद करून सुखद अंत आणला.  कित्येक मुलीचे पालक फसून हि जातात. डोळ्यावर सरकारी नोकरीचा लालचचा  काळा पट्टा असल्या कारणाने.  

एक दिवस………………

आज घराच्या खिडकीत बसून……….
एकटच हसत काही तरी लिहावस वाटत .गरम गरम चहाचे गोडगोड सुस्कारे घेत .मुक्त पाने डोळे मिठून तल्लीन होत .दीर्घ श्वास घेत.काही तरी अस जे खरच खूप छान असेल.वेड लावणार असेल .जे मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला एका प्रकारच समाधान आनंद देईल आणि लाजून हसायला लावेल .आज खूप छान वाटतं आहे आणि मी हसत लिहायला सुरवात केली .तो आला  दबक्या पावलांनी आणि माझे डोळे हाताने मिठून शांत उभा राहिला .मी त्याला चटकन म्हणाले “आलास तू …”

आणि तो नेहमी प्रमाणे “शीsssssssssssss ……!”
आज पण ओळखलस .असं म्हणत तो माझ्या जवळच्या खुर्चीत बसला .म्हणाला.”तुला आधीच  कळालं होत मी आल्याच .पाहिलं अशील खिडकीतून.म्हणून ओळखलस न….”
“नाही …..”म्हणत मी मान  नाकारार्थक  डोलावली “मग कस ओळखलस .हे कस जमत तुला ..”
त्याच्या कडे पाहत म्हणाले .”शब्दान पेक्षा स्पर्श जास्त बोलका असतो राजे आणि आपल्या माणसाची चाहूल कशी हि लागते .तू आत आलास तशीच जाणीव झाली मला तुझी …”
मला टपली मारत हात जोडत म्हणाला “ओ…………वेडा बाई भाषण नको प्लीझ पोटात  कावळे  ओरडतात “मी त्याच्या हातांवर हात जोडत म्हणाले .”बरं ए पण आज तू लवकर कसा..”
“असंच..!” म्हणत तो ………शर्ट ची बटण खोलत बेडरूम कडे वळला .चालता चालता थांबून “मी फ्रेश होवून येतो “अस म्हणाला .
“ठीक आहे .मी जेवण वाढते “
तो आला “लवकर वाढ प्लीज मला खूप भूक लागली आहे ” 
इकडे तिकडे पाहू लागला……….
“काय  झालं काही हवं का तुला ?”
“हो……मी माझा फोन बेडरूम मध्ये विसरलो घेऊन येतेस का प्लीज.”
“हो आलेच हं ……..”
मी आत गेले तर खोलीत काळोख होता .मी  दिवे  लावले .बेडवर काही तरी ठेवलेलं होत………
मी थोडस हसून पुढे गेले …….गिफ्ट आणि एक चिट्टी होती  …………   
मी चिट्टी उघडली ……………
प्रिय
……………
                               आज मी खूप खुश आहे कारण आजच्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस आज मी तुला पहिल्यांदा पाहिलं होत . आणि तुझ्या वर जीव जडला .आजचा हा दिवस माझ्या दीर्घ काळ किंव्हा चिरंतर लक्षात राहील . म्हणूनच हि  छोटीशी भेट तुला नक्कीच आवडेल .
                                                                                                          तुझा
                                                                                                           …………..

आणि माझ्या डोळ्यात पाणी आले …..त्याला आमची पहिली भेट अजून आठवणीत आहे मी ते गिफ्ट उघडून पाहिले त्यात एक सुंदरशी साडी होती मी ती घेऊन मागे वळणार तोच तो माझ्या मागे उभा  त्याने मला मिठीत  घेतले .आपण आज बाहेर जाऊया तू पटकन तयार हो ……………….
आज एक छानसा  मूवी  आणि डिनर करूया ……………
लग्ना नंतर  खूप  दिवसा नंतर  आपण कुठे तरी बाहेर जातोय …………..

चल चल………………………..
पटापट तयार हो आता वेळ नको दवडू .मी हि फ्रेश होतो आणि तयारी करतो …………….
आज  बार्थ्ररुम  मधून 
अभी न  ……………… 
जाओ …………..छोड कर…………. 
के दिल…………. अभी…………..भर नाही …………….
अशी शीळ घालत केस पुसत तो बाहेर आला .मी तयारी करून आरशात स्वतःला निहाळतच होते कि तो माझ्या मागे येऊन उभा राहिला अरशातूनच हसून हाताच्या खुणांनी छान दिसतेस अस म्हणाला. आज स्वरींचा मूड भलताच खुश होता आमच्यावर.त्याने मला जवळ घेतले……………….
माझ प्रमोशन झाल आहे ……………..
ओ………..हो ………….म्हणजे हा आनंद प्रमोशनचा आहे तर…….म्हणून आज खुश आहे का …………..
नाही …………माझ्या खांद्यावर दोनी हात ठेवत तो हसत म्हणाला दोन्ही पण गोष्टी त्याच दिवशी झाल्या .म्हणजे …………….तू माझ्या साठी खूप लक्की  आहेस ग ………………
त्या वेळी पण तू आयुष्यात आलीस आणि सगळ बदल आणि आज याच दिवशी मला प्रमोशन मिळाल ………………दारावरची बेल वाजून पोस्ट्मेम ने एक लिफाफा आत टाकला मी तो अगदी आतुरतेने उघडला ……ती चिट्ठी कवटाळली  डोळ्यातून पाणी वाहू लागले ……तो माझ्या जवळ आला घाबरून मला विचारू लागला काय झाल का रडतेस…….काही नाही ……अग बोल न ……………
माझ हि प्रमोशन झाल आणि  तुझ तर हे दुसरं प्रमोशन ……………..
म्हणजे ……….काही समजल नाही मला …………
दुसरं प्रमोशन कोणत ……….
बाबांच्या जागेवर बडती मिळाली सर तुम्हाला …………….
आणि मी ते रिपोट त्याचा हातात दिले …………………
तो आतुरतेने वाचू लागला ………………
आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी माझ्या कडे पाहत मला खूप घट्ट मिठी मारत म्हणाला …….
प्रमोशनच्या हार्दिक शुभेच्छा होणाऱ्या आई साहेब …………….
देवासमोर गोड ठेऊन आम्ही दोघ निघालो बाहेर ……………….
हा क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस त्याने माझी खूप काळजी घेतली…………माझ्या सगळ्या इच्छा पुरवल्या मला मुलगा झाला त्याच नाव आम्ही अंश ठेवल .आणि काही दिवसांनी त्याच दिवशी त्यावेळी मी जे लिहायला घेतल ते पुस्तक प्रकाशित झाल …………………..
तोच हा एक दिवस………

चैताली कदम

आव्हान पश्चिम घाटाच्या निसर्गरक्षणाचे!

एकविसाव्या शतकातील महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या खंडप्राय देशापुढे आधुनिक विकासाची विविधांगी आव्हाने आहेत. विशेषत: हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या बहुरूपी प्रदेशांमधील निसर्ग आणि पर्यावरणाचा तोल राखत हा विकास साधणे जास्त अवघड काम आहे. त्यातूनच काही वेळा विकास की पर्यावरण, असा द्वैताचा आभास हितसंबंधी गटांकडून निर्माण केला जातो. त्यामुळे परिस्थिती जास्त गुंतागुंतीची बनते

जंगलवाटांवरचे कवडसे – ४ (ताजोमारूची साक्ष)

ताजोमारू सांगू लागतो. “ती दिवसांपूर्वीची गोष्ट. रणरणत्या दुपारी एका विशाल वृक्षातळी मी विश्रांती घेत पडलो होतो. समोरून एक पुरूष घोड्यावर बसलेल्या एका स्त्रीला घेऊन येत होता. मला पाहताच तो थांबला. त्याच्या चेहर्‍यावर भय दिसले. नकळत त्याने आपल्या तरवारीला हात घातला. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपी जाण्याच्या प्रयत्नात होतो. ते पाहून तो थोडा आश्वस्त झाला. एक नजर माझ्यावर ठेवून तो पुढे

जंगलवाटांवरचे कवडसे – ३

राशोमोन द्वार

“क्योटो: बारावे शतक,  दुष्काळ आणि लढाया यांनी उद्ध्वस्त झालेली राजधानी”*

धुवांधार
पाऊस कोसळतोय. कधीकाळी भक्कम वाटावेत असे वासे असलेले छप्पर शिरी घेऊन एक
वेशीसारखे द्वार उभे आहे. पण ते छप्पर आता विवर्ण झाले आहे. त्यातील
छिद्रातून, भगदाडातून तो पाऊस बेलगामपणे आत घुसतो आहे. आजूबाजूला मोडून
पडलेले वासे दिसतात नि शबल झालेल्या भिंती. कधीकाळी या वैभवशाली असलेल्या
द्वाराला

पावती

कित्ती पावत्या झाल्यात या डर्ॉवरमध्ये

ही ‘वैशाली’तल्या पार्टीची 
च्यायला किती लुटलं होतं ग्रुपनी एकदाचच मला.

हां ही ती हट्ट करून घेतलेल्या
दिवाली गिफ्टच्या मंगळसूत्राची.

हे बाबांच्या हॉस्पिटलचं बिल
मेडिक्लेम आहे म्हणून बरय.

अर्रे हे मोबाईलचं बिल इथे पडलाय होय?
तेव्हाच मिळालं असतं तर वॉरंटी पिरियडमध्येच दुरुस्त झाला असता ना.

ही एक पावती एकावर एक फ्रीवाल्या पुस्तकं प्रदर्शनाची
कुठे ठेवलीयेत हीनं पुस्तकं देव जाणे.

ही ‘स्वीकार’मधल्या कॉफीची
टाकून द्यावी. शंकेला कहार.

हे नवीन फ्रीज आणि वॉशिंग मशिनचं बिल
होऊन गेलं एकदाचं बरं झालं.

हा लकी ड्रॉ टूर्स आणि टर्ॅवल्सचा २५००० रुपयांचा
जाम गंडलो राव. तरी असू देत.

ही फ्रेम, ही चपला, ही पडदे , ही हॉटेल,
ही पण हॉटेल आणि ही पण हॉटेल.

छ्या वेळच्या वेळीच आवरायला हवं सगळं

ओह ही…
‘मला विसरून जा’ लिहिलेली

एकमेव प्रेमाची एकमेव पावती.