फसवणूक…

            माझ्या आजीला मागे अर्धांगवायूचा झटका आला होता तेव्हाची गोष्ट. साधारण २०००-२००१ मधली. …

"The Artist" – घडाघडा बोलणारा ’शब्देविण संवादू’

वरचं चित्र बघुन अनेकांना RK studio च्या लोगोची किंवा सरळ सांगायचं तर “बरसात” च्या पोस्टरची थोडिशी आठवण होईलहि. परवाच उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेत्यासह ५ “ऑस्कर” पटकावणर्‍या “द आर्टिस्ट” फिल्म मधला हा फोटो आहे. आणि ते मिळालं नसतं तरच नवल होतं. २०११-१२ साली चक्क “ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट” (मराठीत कृष्ण-धवल) चित्रपट काढायचा हे मोठं धाडस आहे. हां अर्थात १९९३ साली स्पीलबर्गने देखिल “ऑस्कर शिंडलर” या जर्मन बिझनेसमची दुसर्‍या महयुध्दातील सत्यकथा “शिंडलर्स लिस्ट” या चित्रपटात मांडली होती हा चित्रपट देखिल ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होता आणि पठ्ठ्याने चक्क ७ अ‍ॅकेडमी अवॉर्ड मिळवुन “ऑस्कर शिंडलर्सच्या” लिस्ट मध्ये ७ “ऑस्कर” जमा देखिल करुन दाखवले. पण तो चित्रपट “मुक-चित्रपट” नव्हता. हा द आर्टिस्ट संपूर्ण मुक चित्रपट देखिल आहे. आणि ज्यांनी चार्ली चॅप्लीन किंवा त्या काळचे चित्रपटाचे दृष्य आणि मग संवादांची पाटि अश्या धाटणीचे चित्रपट बघितले असतील त्यांना हा चित्रपट कसा केलाय हे लगेच समजेल.  “मुक- चित्रपट” काढून ५ ऑस्कर खिशात घालण्यावरुन चित्रपट काय उंचीचा आहे हे आपसूक सिध्द झालंच आहे.

हि कथा आहे त्या काळाच्या एका अभिनेत्याची ज्याने मुक – चित्रपटांचा जमाना गाजवला आहे. तो प्रसिध्दिच्या शिखरावर आहे पण तरीहि सर्व सामान्यांशी तो सहजपणे वागतो. चित्रपटाची संपूर्ण कथा सांगत नाहि, परंतु अचानक भेटलेल्या गर्दितल्या एका सर्व सामान्य मुलीला तो तिच्या नृत्यातले कसब बघून आपल्या बरोबर काम करण्याची एक छोटि संधी देतो. त्याच दरम्यान चित्रपट “बोलायला” लागतो पण हा निर्मात्याच्या तोंडावर हसतो आणि हे काय चालणार? म्हणत चालता होतो. त्याच वेळि “ती” मुलगी इतर चित्रपटात लहान लहान रोल करत एक स्टार बनते तर दुसरीकडे आपला हेका सोडायला तयार नसलेला “तो” अगदि आपल्याकडचे सगळे पैसे घालून एक नवा “मुक चित्रपट” बनवतो आणि चित्रपट साफ कोसळुन तो कंगाल बनतो. पुढे शेवट व “ट्वीस्ट” अर्थात “सुखद” आहे. पण तो शेवट बघण्यात खरी मजा आहे. पैसा – नाव नसलं कि कसे सगळे पाठ फिरवतात व त्यानंतर स्वत:चा परिस्थितीशी न जुळवुन घेण्याचा हट्ट व त्याचवेळि काल पावतो जे आपल्याला मुजरे झाडत होते त्यांसाठी आपण “संपलो”  हि घुसमट “जुआन दुजारदाँ” याने जबरदस्त ताकदिने दाखवली आहे. इतकि कि आपली अस्वस्थतेने चुळबुळ सुरु होते. पण त्या घुसमटित ’अगतिकता आणि करारीपणा’ यांच्या एकमेकांवर कुरघोडि करणार्‍या अनेक छटा त्याने फार बोलक्या केल्या आहेत. त्याचा कुत्राहि फारच मिश्किल घेतला आहे. कुत्र्यालाहि एखादं अवॉर्ड द्यावं इतकं मजेदार काम त्याने केलय!

ह्याची स्टोरी लाईन आपल्याकडच्या “द डर्टि पिक्चर” बरोबर जुळते नव्हे जवळपास समांतरच जाते. अर्थात विषयाचा गाभा वेगवेगळा आहे. असो, तर शब्देविण असलेला हा संवादू कदाचित शब्दांसकट देखिल इतका प्रभावीपणे मांडता आला नसताअसं राहून राहून वाटतय. त्यात “जुआन दुजारदाँ” ची वाहवा आहेच पण काहि ठिकाणी दिग्दर्शक (मिशेल आझानाविसीअस) या कसलेल्या अभिनेत्याच्याहि वरणात झालाय. म्हणजे ३-४ प्रसंगात तर दिग्दर्शकच खरा हिरो ठरलाय इतके प्रभावी शॉट्स “मिशेल आझानाविसीअस” यांनी घेतले आहेत. त्यासाठी सलाम!!!

moral of the story – मुक्यानेच भरपूर काहि सांगणारा “द आर्टिस्ट” बघितलाच पाहिजे!

 – सौरभ वैशंपायन.

मराठी भाषा दिन

श्री स्वामी समर्थ ..
नमस्कार दोस्तहो…

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी 
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी 
एव्हढ्या जगात माय मानतो मराठी 


 मराठी भाषा दिन : आजचा दिवस सर्वत्र मराठी दिन साजरा केला जातो.
आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन.
पहिल्या विश्व मराठी संमेलनात जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना आकारास आली . ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मानवंदना देण्यासाठी २७ फेब्रुवारीला या कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला जागतिक मराठी भाषा दिनाचे कोन्दण लाभले.
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.
शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे.

सोनेरी भूतकाळ पण भविष्यकाळ ??
              अमृतातेही पैजा जिंकेल अशी आपली मराठी भाषा आहे.. परंतु भाषेचा भूतकाळ जेवढा चांगला , तेवढाच भविष्यकाळ चांगला राहील याची खात्री आपण देऊ शकू का ??मराठी भाषेवरील प्रेम वेगळं आणि ती उत्तम बोलणं वेगळं.आज मराठीमध्ये हिंदी आणि इंग्रजी शब्द घुसत आहेत.. काही इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द नाहीत.मान्य… पण बव्हंशी आपण शब्दांची भेळ करतो.आजच सकाळी एकाने मला “happy marathi bhasha day” अस ऐकवलं… खरच सांगतो तळपायाची आग मस्तकात गेली..दोन मुस्कटात वाजवाव्याश्या वाटल्या..

अरे! काय हे ??हि कुठली पद्धत झाली ?
आज कॉन्व्हेंट मध्ये मुलं जाताहेत.जावं..पण त्यामुळे त्याची आणि मराठीची नाळ तुटता कामा नये याची खबरदारी त्या आई-वडीलांनी घेणे क्रमप्राप्त आहे.जी घेतलेली दिसत नाही.
त्यामुळे होता काय कि पोराला च्रीस्ती प्रार्थना येते पण रामरक्षा,गणपती स्तोत्र येत नाही .वरून चारचौघात पालक कौतुकाने सांगतात .. “आमचा बाब्या किनई कॉन्व्हेंट मध्ये जातो नं..तिथे काय preyer असते .त्याला बाकी श्लोक बिक येत नाहीत….”यावर हसावं का रडावं तेच कळत नाही .
   एकाबाजूला हे चित्र असताना दुसरीकडे अशीही माणस आहेत की जी मराठीचे संस्कार उत्तम पद्धतीने पुढील पिढीकडे संक्रमित करताहेत.


एकूणच आपल्यात उत्साह आहे . मराठी भाषेवर अतोनात प्रेम आहे .पण भाजी घेताना मराठी भाजीवाला जरी असला तरी, “भैया ,कांदा कैसा दिया?” असं आपण का बोलतो याचा विचार प्रत्येकाने (बोलत असल्यास!! )करायला हवा!! रामराम !

दोन शब्द मराठीत …

( वरील छायाचित्र इंटरनेट वरून घेतलेले आहे )

आज मराठी दिन आहे , म्हणून खास मी College वरून आल्यावर त्याबाबतीत २ शब्द का होईना लिहीन असे जरूर ठरवले होते ! खरे सांगू तर मराठी मधला पहिला शब्द जो मी बोलायला शिकलो तो नक्कीच ” आई ” हाच होता ! म्हणजे माझ्या जन्मा पासून ते मरणा पर्यंत माझ्या तोंडी मराठी हीच भाषा राहील याचा मला खरेच प्रचंड अभिमान आहे ! आज आपण आपल्या रोजच्या जीवना मध्ये आपल्याच भाषेचा कमी वापर करतो ! परंतु १ चकित करणारी गोष्ट सांगतो www.youtube.com वर जाऊन आपण जरासे शोधले तर आपल्याला अनेक विडीयो बघावयास मिळू शकतात कि परदेशी लोक हे आपली मराठी भाषा शिकत आहे म्हणून तसेच नुसती रट्टा मारून नव्हते तर समजून घेऊन ! म्हणजे आपल्या भाषेचा प्रसाच + प्रचार करण्याची जवाबदारी आपल्या खांद्यावर आहे हे तर निश्चितच ! म्हणून ब्लॉग च्या माध्यमातून का होईना आज मराठी भाषेचा विस्तार होत आहे आणि यात माझा देखील खारीचा वाट आहे याचा मला अभिमान आहे ! 😀
माझ्या मराठीचीया बोलू कौतुके !
परी अमृताते हि पैजा जिंके !

विरह………

तुझ्या साठी थोडी
जागा शिल्लक होती
मला काय माहित तिची
शोभा त्यातच होती
मला खूप वाटल  
तू ती भरून काढावीस  
ती जागा भरायला
नवीन आठवण आणावीस 
आठवणी तू आणल्यास 
डोळे ओले करणाऱ्या 
मनातल्या  त्या  जागेला
तसच  अपुरं ठेवणाऱ्या 

  

चैताली कदम

स्वातंत्रवीर सावरकर

महान क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्य सेनानी, बुद्धीवादी समाज सुधारक, तत्वज्ञ, भाषासुधारक, कवी, लेखक,तेजोनिधी, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी
ज्यावर साक्षात सरस्वतीचा कृपाहस्त होता त्या युगपुरुषाला माझा साष्टांग नमस्कार.
देहरुपाने जरी आज तुम्ही नसलात तरी तुमचे शब्द,तुमचे विचार आमच्याकडे आहेत.
त्यातला प्रत्येक शब्द तुमच्या अमरत्वाची साक्ष देतो.
तुमची जाज्वल्ल्य देशभक्ती , त्याग विस्मरणात गेलेले नाहीत आणि आम्ही ते जाऊ देणार नाही.

———————————————————————————–


अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।


सखे कशाला

सखे कशाला फिरायचे चांदण्यात जग थांबले असावे
तुला पाहण्या अधीरला चंद्रमा ग्रहण लांबले असावे

नभात ज्या तारका पहुडती जळून गेल्या तुझ्या रुपावर
उगा न उल्का अशा विखुरती कुणी नभी भांडले असावे

कशा कुणा ना कधी गवसल्या तुझ्या पदांकीत पायवाटा
नभांगणातून नक्षत्रांचे सडे धरी सांडले असावे

असे नको भासवू प्रिये की तुला तुझी आयुधे न ठावुक
मला न शंका तुला बघोनी कुणी सुखे नांदले असावे

तसे तुझ्या कौतुका लिहाव्या कितीक गझला, कथा किती गे
उधार घेऊन शब्द कविने मनातले मांडले असावे

-काव्य सागर

आंधळ्या घुबडाची सावली:’The blind Owl’ by Sadegh Hedayat


फ्रान्समध्ये शिकलेले इराणी लेखक सादिक हिदायत यांच्यावर काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात- आणि विशेषत:
‘द ब्लाइंड आऊल’ या कादंबरीत ठळकपणे आढळते. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी कादंबरीचा मानदंड समजली जाते. आधुनिकतावादी इराणी कादंबरीची खरी सुरुवातही
‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली.
काही पुस्तकं वाचताना गुंतवून ठेवतात. स्थळ-काळाचं भान नाहीसं करतात. आपण त्यांच्या संपर्कात असेपर्यंत इतर कसलाही विचार करू शकत नाही. इतर कुठल्याही गोष्टीत गुंतू शकत नाही. मात्र, वाचन संपलं की त्यांचा अंमल ओसरायला सुरुवात होते. त्यांनी दिलेल्या आनंदाची फिकट चव शिल्लक उरते. तीही काही दिवसांनी विरून जाते. ती पुस्तकं इतर पुस्तकांच्या मांडीला मांडी लावून आपल्या संग्रहात बसून राहतात. पण त्यांना पुन्हा उचलायची इच्छा होत नाही. कालांतरानं ती आपल्या संग्रहातून हद्दपार होतात.
काही पुस्तकांचा प्रकार वेगळा असतो. ती वाचताना गुंतवून ठेवतातच असं नाही. उलट, त्यांचं वाचन ही त्रासदायक प्रक्रिया असते. त्यातून जाताना आपण सतत बेचन असतो. आपण वाचन अध्र्यावर थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते शक्य नाही, हे लक्षात येतं. आपण पुस्तकाच्या पुरते कब्जात गेलेले असतो. आता ते नेईल तिथे जाण्यावाचून पर्याय नसतो. ही पुस्तकं वाचून झाल्यावर खऱ्या अर्थानं सुरू होतात. ती आपल्या जगण्यात रुजतात. वाढतात. बहरतात. त्यांची सावली कायम आपली सोबत करते. अशा पुस्तकांनाच ‘अभिजात’ हे विशेषण लावता येतं.
सादिक हिदायत (Sadegh Hedayat) या इराणी लेखकाची ‘द ब्लाइंड आऊल’ (The blind Owl) ही या प्रकारात मोडणारी कादंबरी. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी (Persian) कादंबरीचा मानदंड समजली जाते. इराणी कादंबरीची खरी सुरुवातही ‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली. तोपर्यंत इराणमध्ये केवळ मनोरंजक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. आपल्याकडच्या नाथमाधव किंवा दातारशास्त्रींप्रमाणे! ‘द ब्लाइंड आऊल’नं इराणी वाचकाला खडबडून जागं केलं. त्याला पहिल्यांदा कादंबरी या वाङ्मयप्रकाराच्या ताकदीची कल्पना आली. इराणमधील रझा राजवटीत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीवर तिथे अगदी काल-परवापर्यंत बंदी होती. आता मात्र ही कादंबरी नवइराणी साहित्याचा मानदंड समजली जाते.
या कादंबरीची संहिता दोन भागांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या भागाचा निवेदक एक चित्रकार आहे. तो पेनच्या आवरणांवर चित्रं काढत असतो. हे चित्र कायम एकच असतं. एक दाढीवाला भारतीय पोशाखातला म्हातारा झाडाखाली उभा. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या तरुणीला तो तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याची खूण करतो आहे. चित्रकाराला हे चित्र वारंवार स्वप्नात दिसतं. झपाटून टाकतं. मात्र, त्याचा अर्थ कळत नाही. एक दिवस चित्रातली तरुणी थेट त्याच्या दारातच अवतरते. तो तिला घरात घेतो. घरात तिचा गूढ मृत्यू होतो. त्यानं तो बावचळून जातो. मात्र, त्याला तिचं चित्र काढण्याचा मोह आवरत नाही. त्यानं चित्र काढायला सुरुवात केल्यावर ती जिवंत झाल्यासारखी डोळे उघडते आणि पुन्हा प्राण सोडते. तो तिच्या प्रेताचे तुकडे करून ट्रंकेत भरतो आणि दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेतो. तिथला म्हातारा रखवालदार दफनासाठी खड्डा खणतो. त्यात एक प्राचीन सुरई सापडते. तिच्यावरचं चित्र नायक पेनच्या आवरणावर काढत असलेल्या चित्रासारखंच असतं. म्हातारा ती सुरई नायकाला भेट देऊन टाकतो. नायक घरी येतो. त्या रहस्यमय तरुणीची आठवण त्याला बेचैन करत राहते. ती विसरण्यासाठी तो भरपूर अफू घेतो आणि बेशुद्ध पडतो. कादंबरीचा पहिला भाग इथे संपतो. दुसऱ्या भागात नायक शुद्धीवर येतो, तो एका वेगळ्याच विश्वात.
इथे तो चित्रकार नसून लेखक आहे. त्याचं लग्न झालेलं आहे आणि बायको आपल्याशी प्रतारणा करत असल्याच्या संशयावरून हय़ानं तिचा खून केलेला आहे. तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याचे हात रक्तानं माखलेले असतात आणि आतल्या खोलीत बायकोचं प्रेत पडलेलं असतं. त्याच्या घराबाहेर बसलेला भिकारी अगदी पहिल्या भागातल्या म्हाताऱ्याची आठवण करून देणारा. कादंबरीत यापुढे अनेक उपाख्यानं एकमेकांत गुंतून येतात. शेवटी नायक आरशात बघतो तेव्हा आपला चेहरा अगदी त्या म्हाताऱ्यासारखाच झाला आहे असं त्याला वाटतं.
अत्यंत गुंतागुंतीची संरचना असलेल्या या कादंबरीचा हा केवळ ढोबळ आराखडा. तिचं खरं रूप वर्णन करणं जवळजवळ अशक्य आहे. स्वप्न आणि भास यांच्या संधिप्रकाशातलं निवेदन, निवेदकाची अविश्वसनीयता, दोन्ही भागांचीप्रतिबिंबासारखी  रचना आणि संपूर्ण कादंबरीत पसरलेलं पलूदार प्रतिमांचं जाळं.. या सगळ्यांमुळे ही कादंबरी वाचकाला सतत सतर्क राहायला भाग पाडते. काही प्रतिमा आणि पात्रं दोन्ही भागांत वेगवेगळ्या रूपांत येतात. म्हातारा पहिल्या भागात स्मशानाचा रखवालदार असतो. त्याच भागात आधी आलेलं लेखकाच्या काकांचं वर्णनही याच म्हाताऱ्याशी जुळणारं, तर दुसऱ्या भागात हाच म्हातारा निवेदकाच्या घरासमोर भीक मागताना दिसतो. पहिल्या भागात नायक पेनवर काढत असलेलं चित्र त्याला स्वप्नात दिसतं. त्यातला म्हाताराही याच प्रकारचा. पहिल्या भागातली गूढ तरुणी आणि दुसऱ्या भागातली लेखकाची बायको यासुद्धा अशा एकमेकींच्या प्रतिबिंबा सारख्या. पहिल्या भागात म्हाताऱ्यानं नायकाला दिलेली सुरई आणि दुसऱ्या भागातल्या म्हाताऱ्या भिकाऱ्यानं दिलेला वाडगा हेही अशा  प्रतिबिंबित  प्रतिमेचं उदाहरण.
कथासूत्रातली संदिग्धता हे लेखकाचं कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोहचविण्याचं साधन असावं, असं ‘द ब्लाइंड आऊल’ वाचताना वाटत राहतं. पहिल्या भागात शुद्ध हरपलेला नायक दुसऱ्या भागात शुद्धीवर येतो. पण दुसऱ्या भागाचं स्वरूपही स्वप्नवत असल्यामुळे वास्तव काय आणि स्वप्न कोणतं, हे वाचकाला नीट कळत नाही. कदाचित दोन्ही स्वप्नं असून, वास्तव तिसरंच असू शकेल, किंवा दोन्ही एकाच वेळी घडणारी समांतर वास्तवं असतील. ते ठरवण्याचं स्वातंत्र्य वाचकाचं. लेखक ते हिरावून घेत नाही.
स्वतच्या उत्कट भावनांचा आविष्कार कोणत्याही वाङ्मयीन संकल्पनेपेक्षा महत्त्वाचा मानणं, हे जर अभिव्यक्तीवादाचं मुख्य सूत्र असेल, तर ही कादंबरी नक्कीच अभिव्यक्तीवादी आहे. हिदायत ज्या काळात लिहीत होता, तो युरोपमध्ये अभिव्यक्तीवादी लेखनाला प्रोत्साहक असा काळ होता. काफ्काच्या साहित्यानं तरुण लेखकांना प्रभावित करायला सुरुवात केली होती. फ्रान्समध्ये शिकलेल्या हिदायतवरसुद्धा काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात, आणि विशेषत: या कादंबरीत ठळकपणे आढळते. हिदायतनं काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’चा फारसी अनुवादही केलेला आहे. तो स्वतला काफ्का आणि पो यांचा वंशज मानायचा. या दोघांची गुणसूत्रं त्याच्या साहित्यात सापडतात हे खरं. त्यामुळे हिदायत हा केवळ युरोपियन प्रभाव आत्मसात करून लिहीत होता, असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. हिदायतचा इस्लामपूर्व इराणी संस्कृतीचा खोल अभ्यास होता. अकराव्या शतकातला फारसी कवी मानुचेहरी याच्या कवितेचे संस्कारही हिदायतच्या साहित्यावर झालेले होते. ‘द ब्लाइंड आऊल’मधलं नायकानं काढलेलं चित्र मानुचेहरीच्या ‘मुसम्मत’ या दीर्घकवितेतल्या एका प्रसंगाचं आहे. व्यवस्थेविरोधातली बंडखोरी आणि नव्या वाङ्मयीन परंपरेचं प्रवर्तन हे या दोघांना जोडणारे आणखी काही दुवे. मानुचेहरीनं फारसी दरबारी कवितेचं स्वरूप संपूर्ण बदललं. ‘राजाचा स्तुतिपाठक’ ही कवीची ओळख पुसून त्यानं तत्कालीन सामाजिक वास्तव पहिल्यांदा कवितेत आणलं. हिदायतनं इराणी कादंबरीत नवीन प्रवाह सुरू केला. तो पुढे वाढला आणि समृद्ध झाला. त्यातूनच पुढे इराणी नवकादंबरीची ठिणगी पडली.
‘द ब्लाइंड आऊल’विषयी आपल्याला जिव्हाळा वाटेल अशी आणखी एक गोष्ट आहे. १९३७ ते १९३९ या काळात हिदायत मुंबईत मुक्कामाला होता. याच काळात त्यानं ‘द ब्लाइंड आऊल’ लिहून पूर्ण केली आणि तिची मर्यादित प्रतींची आवृत्ती मुंबईतच प्रकाशित केली. या प्रतींवर ‘नॉट फॉर सेल इन इराण’ असा शिक्का मारलेला आहे. ती इराणमध्ये प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला.
हिदायतच्या मुंबईतल्या वास्तव्यात त्याला हिंदू,तसंच बौद्ध संस्कृतीविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याचे पडसाद ‘द ब्लाइंड आऊल’मध्येही उमटलेले दिसतात. कादंबरीच्या पहिल्या भागात नायकाची आई हिंदू नर्तकी असल्याचा संदर्भ येतो. दुसऱ्या भागात लेखकाच्या खोलीत बुद्धाची मूर्ती असल्याचा उल्लेख येतो. कादंबरीच्या द्विदल रचनेत द्वैतवादाच्या खुणा आढळतात.
हिदायतचं आयुष्य मानसिक अस्थैर्यानं ग्रासलेलं होतं. उत्तरायुष्यात तो अफूच्या आहारी गेला. निराशावाद तर त्याच्या स्वभावातच होता. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यानं पॅरिसमध्ये स्वतला गॅसनं बंद केलेल्या खोलीत कोंडून आत्महत्या केली. या घटनेमुळे ‘द ब्लाइंड आऊल’ अशुभ आहे, अशी समजूत अनेक वर्षांपर्यंत इराणमध्ये प्रचलित होती. वाचकाला झपाटण्याची या कादंबरीची ताकद पाहता ती खरी असावी, असं मानायला जागा आहे.

कादंबरी:‘द ब्लाइंड आऊल’(The blind Owl)
लेखक : सादिक हिदायत(Sadegh Hedayat) 

हे पुस्तक सध्या मराठीत उपलब्ध नाही.अद्याप  त्याचा मराठीत अनुवाद कोणी केलेला  नाही
Buy The Blind Owl (Imported Edition:English) from Here

[This review of the novel ‘The Blind Owl’ :Author Sadegh Hedayat,is written by Mr.Nikhilesh Chitre for Loksatta daily]

My Father When I Was……………………..

( I don’t remember who was the author of this beautiful article. but i think it was noted from “Chicken soup” series.)

4 years old: My daddy can do anything.

5 years old : My daddy knows a whole lot.

6 years old : My daddy smarter than your dad.

8 years old : My daddy doesn’t know exactly everything.

10 years old : In the olden days when my dad grew up,things were sure different.

12 years old : Oh, Will, naturally, father doesn’t know anything about that. He is too old to remember his childhood.

14 years old : Don’t pay any attention to my father. He is so old fashioned!.

21 years old : Him? My lord, he’s hopelessly out of date.

25 years old : Dad knows a little bit about it but then he hould because he has been around so long.

30 years old : May be we should ask dad what he thinks. After all he’s had lot of experience.

35 years old : I ‘m not doing a single thing until I talk to dad.

40 years old : I wonder how dad would have handled it. He was so wise and had world of experience.

50 years old : I’d given anything if dad were here now, so I could talk this over with him. Too bad I didn’t appreciate how smart he was. I could have learned a lot from him.

पाऊल

” जपुन टाक पाऊल…
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपुन ठेव विश्वास…
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपुन घे निर्णय…
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो
जपुन ठेव आठवण…
इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो
जपता जपता एक कर..
जपुन ठेव मन कारण… ते फक्त आपलं असतं…….;)

शापित

तुझे अबोल डोळे काय बोलून गेले,
आसे कोणते प्रश्न मांडून गेले?

बोले तुझे ते, हृद्य छेडून गेले,
तुझं सागू कसे, मज माझे प्रारब्ध बाधून गेले.

हा दोष माझा , शापित मी
मज माझे, कर्तव्य शापून गेले.

तूच दिलास, शब्दांना आकार माझ्या,
त्या शब्दाचे, इमान राखीत गेले.

घे उभा असा, गुन्हेगार तुझा,
वर्षाव अश्रूचा, तुझं टाळीत गेले.

का भेटलो, या वळणार,
मन माझे, आश्रुत वाहून गेले.

     – सतीश दंताळ.

फेसबुक चा पंचनामा

रात्रीचे दहा वाजलेले आहेत, समोरच सत्संग चा कार्यक्रम असल्या मुळे लौड स्पीकर चा मोठ्याने घोंघाट  होत आहे. आज बारा ते एक वाजे पर्यंत काही झोप लागणार नाही. अगदी खिडकीच्या समोरच्या दिशेला तो लाउड स्पीकर लावलेला आहे. इ मेल चेक केले, फेसबुक वर थोडा हिंडलो. पण कंटाळा आला. काही नवीन नाही. तीच लबाड गोष्ट दिसते. एखादी मुलगी एखादे फोटो अपलोड करते आणि मध माश्या प्रमाणे मुळे कमेंट करण्यासाठी तुटून पडतात. त्या फोटो मध्ये जरी काही आकर्षक नसेल तरी बेफाम पणे “wow”, “nice”, “chhaan” वगैरे सारख्या शब्दाचा प्रेम पूर्वक वर्षाव होतो.घरात असलेले फ्रीज आणि फेसबुक यांच्यामध्ये एक साम्म्यता आहे. ती म्हणजे आपण नेहमी अधून मधून फेसबुक उघडून बघत असतो. कोणी कमेंट केली तर नाही न ? कोणी मेसेज तर नाही केला ना ? पण तिथे नवीन काही नसते. तसेच फ्रीज च्या संदर्भात आहे आपण परत परत उत्सुकतेने दरवाजा उघडून पाहतो पण नवीन काही नसते. होय , पण एक अपवाद म्हणावा लागेल. तो अपवाद म्हणजे लबाडी. अशी विधाने हामखास पणे फेसबुक वर पहावयास  मिळतात. पण एक गोष्ट तर स्वीकारावीच लागेल कि जिथे मुली असतील तेथे गर्दी असेलच. दोन आठवड्या पूर्वी माझ्या एका मैत्रिणीला फेसबुक वर एका दिवसात २०३ फ्रेंड्स request मिळाल्यात. फेसबुक च काय ..ओर्कुट मध्ये देखील तसेच. असे वाटते ना कि मुली साठी अर्धे जग रिकाम टेकडे आहे. एक  वेळ होता शालेय मुला मुलींच्या हातात जास्तकरून अभ्यास विषयक साहित्य असायचे . आता फक्त मोबाईल फोन दिसतो.आणि त्यात हि ते फेसबुक वर चिकटलेले दिसतात. अहो  चालू वर्गात देखील !!!…
आज माझ्या BSNL च्या conection  मधेय प्रोब्लेम असल्याने फोन कॉम्पुटर शी जोडून इंटरनेट सर्फिंग करत होतो. वाटले आज छान स एखादा टोपिक लिहिणार पण………… …हत्ती च्या !!!??!  पावर कट झाला आहे. बेटरी आवाज करत आहे.कॉम्पुटर बंद करावे लागणार. पण समोर जनरेटर वर परत घोघाट सुरु झाला आहे त्यामुळे   कानात कापूस खुपसावा लागणार .. चलां, नंतर कधी आपण चर्चा करू. भेटू मग…शुभ रात्री.