देर से आए पर दुरुस्त आए

आज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस बोलावले होते. जेवण करता करता रेल्वेचा टाईम टेबल पाहू लागलो. पाहतो तर फक्त २० मिनिटे बाकी होती ट्रेन सुटायला. मग मला जेवण सोडून द्यावे लागले. घाईतच कपडे बदलले , बूट घातले काळा चष्मा लावला आणि निघालो. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रिक्षेत बसलो. रीक्षा चालकाला त्वरेने नेण्यासाठी मी विनंती केली. पण तो जशी बैल गाडी चालते तशी रिक्षा चालवत होता. मी त्याला दोन वेळा विनंती केली. पण तेच. शेवटी कंटाळून ती रिक्षा सोडली आणि दुसरी रिक्षेत बसलो.त्याने वेगाने चालवली रिक्षा, पण ट्राफिक मुळे उशीर झाला. स्टेशन च्या गेट पर्यंत पोहचलो तेवढ्यात तर गाडी प्लेटफोर्म वर आली. सूदैवाने तिकीट विंडो वर गर्दी नव्हती. पटकन तिकीट काढले आणि दोन नंबरच्या प्लेटफोर्म कडे धाव घेतली. धावत असतांना मी विसरलो कि मी रेल्वे ट्रेक क्रॉस करून पडत होतो. आणि त्याच ट्रेक वर मुंबई (विरार) – भरूच शटल वेगाने येत होती.ते दृश्य पाहून दोन्ही प्लेटफोर्म वरचे लोक जोराने ओरडू लागले. तेव्हा माझे समोर येणारी ट्रेन वर लक्ष गेले. आणि समय सूचकता वापरून ट्रेक वरून बाजूला झालो.मी फार काही तरी अनुभवले त्या एक क्षणात. मला वाटले जीव गेला आणि परत आला त्या एका क्षणात. मी स्तब्ध होतो. जवळचे रेल्वे पोलीस माझ्या कडे आले. आणि हाथ धरून समोरच्या प्लेटफोर्म वर घेवून गेले व बाक वर बसवले. त्यांनी मला सांगितले कि हा चमत्कार आहे कि तू वाचला. पुढे असे करू नको. तुझी गाडी सुटत असेल तर सुटू दे, सुटलेली गाडी परत मिळेल पण शरीरातील जीव नावाची गाडी जर एकदा जीवनाच्या प्लेटफोर्म वरून गेली तर कधी परत येत नाही.मी त्यांचा आभार व्यक्त केला आणि समोर उभी असलेल्या गाडीत जावून बसलो. या घटने मुळे सर्व लोकांची दुर्ष्टी माझ्यावरच होती. मधेच शाळेतील एक शिक्षक भेटले त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यात. अर्धा तास नंतर माझे stop आले मी उतरलो.रोटरी आय हॉस्पिटल जाण्यासाठी रिक्षेची वाट पहिली. पण एक पण रिक्षा चालक ४० किवा ५० रुपया खाली बसवायला तयार नव्हता.जिथे जाण्यासाठी किमान ५ रुपये लागतात तेवढ्या जागे साठी ५० रुपये ? मी पायीच निघालो. 
     जवळ जवळ २० मिनिटांनी तेथे पोहचलो.केस पेपर काढला आणि क्लिनिक मध्ये शिरलो पाहतो तर एक हि डॉक्टर नाही. त्यांची  Conference  चालली होती त्यामुळे मला वाट पहावी लागली.आणखी दोन तास झाले तेव्हा ते डॉक्टर आले. माझ्या अगोदरच काही पेशंट येवून बसलेले होते. ते एक एक करून मध्ये बोलावल्यावर जात होते.मी मात्र माझा नंबर कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. मध्ये मध्ये च दुसरे पेशंट येत होते. ते हि आत जात होते. मी विचार केला नंतर येणार्यांना आत बोलावत आहे मला का बोलावत नाही ?आत वार्ड रूम मधेय जावून  नर्स ला दोन वेळा विचारले. दोन्ही वेळा तिने सांगितले “डॉक्टर बोलावतील तुम्हास ..थोडे थांबा.” परत बाक वर जावून बसलो.समोर एक सतरा – अठरा वर्षाची मुलगी आणि ३५ ते ३६ वर्ष  वयोगटातील स्त्री येवून बसली. दोन्ही एन आर आई होते. त्या मुलीच्या आई ला गुजराती बोलता येत होते पण मुलीला अजिबात गुजराती समजत नव्हते आणि बोलता पण येत नव्हते म्हणून ते इंग्लिश मधून संभाषण करत होते. मी काळा चष्मा घातला होता म्हणून त्यांना वाटत होते कि माझे लक्ष त्यांचावरच आहे.कदाचित ती स्त्री माझा तिरस्कार करत होती. माझ्या कडे पाहून ती स्त्री तिच्या मुलीला स्थानिक लोका विषयी बरे वाईट सांगू लागली.मला तर रागच आला होता. पण काही न बोलण्याचे योग्य वाटले आणि बसून राहिलो.माझा नंबर आला आत गेलो.तपासणी झाली , औषध घेतली आणि निघालो स्टेशन कडे. त्या दोन्ही एन आर आई माय लेकी देखील माझ्या मागे निघालेत. योगानु-योग त्यांनाही स्टेशन जावयाचे होते म्हणून एकाच रिक्षेत बसलो. त्या स्त्रीला वाटले मी गुजराती असावा म्हणून तिने मला प्रश्न केला “तमे गुजराती  छो ?”(तुम्ही गुजराती आहात का ?) मी प्रत्युत्तर दिले “हु भारतीय छु.” (मी भारतीय आहे.) आणि मी स्थानिक व्यक्ती आहे. त्या स्त्रीला अपमानास्पद वाटले आणि तिने बोलणे बंद केले. तिच्या मुलीला माझ्या विषयी बरे वाईट इंग्रजी तून सांगू लागली.मी फक्त ऐकत होतो. स्टेशन आले. रिक्षे चे पैसे दिले आणि पुढे निघालो.तिच्या कडे सुटे पैसे नव्हते म्हणून रिक्षा चालक डोके लावू लागला. मी मागे वळून तो प्रकार पाहिला आणि स्वतः समोर जावून त्या दोघांचे हि  दहा रुपये रिक्षा चालकाला दिले. आणि घाईत  प्लेटफोर्म कडे निघालो. त्या दिवशी मला तर असे वाटले कि माझ्या नशिबाच्या रेघा मधून त्या दोन्ही व्यक्ती निघणार नव्हती. कारण ज्या ट्रेन मध्ये मी बसलो त्याच ट्रेन वर ते पण मागो माग आले. मी दहा रुपये जरी दिले तरी ती स्त्री (मुलीची आई) मला थेंक यु म्हणायला पण तयार नव्हती.. गच्च गर्दी असल्याने लोक एक मेकांना लोटत होते. आणि त्यांना भारतातील अशी धक्का बुक्कीची सवय नव्हती.मी त्या मुलीला माझ्या जागेवर बसण्याचा इशारा केला.अगोदर तिने नाकारले .थोड्या वेळाने गर्दी जास्त वाढली , मी परत इशारा केला, तेव्हा ती मुलगी येवून बसली. मी मात्र उभा राहिलो.पंधरा मिनिटे झाली माझे स्टेशन येणारच होते. मी त्या स्त्री जवळ गेलो आणि म्हटले “which ever place you go to visit, never ever insult of there local people. There will not be always a gujarti to help you. there will be only an indian and that indian means a local people. at lest don’t teach your child to wrong things about local people. you also belongs to same locality before being a foreigner.” ती स्त्री अवाक च झाली होती. तिने देखील काळा चष्मा घातला होता . तो चष्मा डोक्या वर करून तिने खाली मान घातली. तेव्हा ती मुलगी मला मात्र “thanks” म्हटली.मी वेल कम म्हटले आणि उतरलो. कदाचित त्या स्त्रीला चुकी कळली असेल त्या मुळे तिने खिडकी मधूनच “बाय” चा इशारा केला. तेव्हा वाटले कि आता ती स्त्री कोणाचाही अपमान करणार नाही.चलो कोई बात नाही “देर से आये पर  दुरुस्त आये”                                                 

॥ कणिकांजली॥ 2012-01-29 11:16:00

भाकरी, चपाती, भाजी, पिठले, भात-
अन सणासुदीला पक्वानांचे ताट
आयुष्य असे हे घासांमागुनी घास…
आयुष्य असे हे लक्ष- शेंकडो घास
अन अंती होऊन जाणे एकचि घास….जाना था जापान , पहोच गए चीन !!

हाश !! संपली मुलांची परीक्षा. कालच बारावी च्या मुलांची  कम्प्युटर विषयाची परीक्षा संपली. दोन दिवस चालली. गुण देण्यासाठी सकाळ पासून दुपारचे बारा वाजेपर्यंत एका लेब मधून दुसर्या लेब मधेय चकरा मारत होतो. आता थोडा विसावा मिळाला आहे.तरी अधून मधून मेनेजमेंट मुलाकडून प्रोजेक्ट तयार करवून घेण्यासाठी रोज रोज टोमणा मारत आहेत. कॉम्प्युटर चा हेड फोनमध्ये बिघाड झाला आहे. त्याला सर्विस सेन्टर वर घेवून जावयाचे आहे. मित्राचे जुने कॉम्प्युटर घरी आणून ठेवले आहे त्याचे दुरुस्तीकरण बाकी आहे.इतर वर्गामध्ये अजून बरेच धडे पूर्ण करायचे राहिले आहेत.त्या बद्दल प्रिन्सिपल माझी लेफ्ट राईट  करवून घेत आहे . रोज नवीन काही न काही काम निघत आहे. माझे स्वतः चे कामे अजून राहिली आहेत ते पूर्ण करायला वेळ मिळत नाही. तीन आठवड्या पूर्वी आमचे जुने हेड अमेरिके हून परत आले  तेव्हा पासून शाळा सुटल्या वर हि दोन दोन तीन तीन तास मीटिंग करत बसत आहे. काय करायचे काही सुचत नाही. हे झाले .. लगेच तीन दिवसा पूर्वी पूर्ण फेमिली गावाला गेली आहे. मग काय ? अहो.. घरातील सर्व …म्हणजे सर्वच काम करावे लागत आहे. भांडी , कपडे , बाजार , पाणी भरणे पासून सर्व काही. असे वाटते ना कि लोक जगण्यासाठी काम करतात पण मी कामा साठी जगात आहे. नुसती कृत्रिम लाईफ झाली आहे. आजचा दिवसच विचित्र होता. आज गुगल वर सर्च करून साधी खिचडी कशी बनवतात ती कृती शोधली आणि कागदावर लिहून घेतली.बस त्या लिहिलेल्या कृती नुसार सुरवात केली. पण तांदूळ उकडत असतांना मला समझले नाही कि अजून किती पाणी ओतावे लागेल. चुकीने माझ्या ने जास्त पाणी टाकले गेले. दहा ते पंधरा मिनिटे ते जास्ती चे पाणी बाष्प बनून जात नाही तो पर्यंत वाट पाहिली. पाणी चे बाष्प तर झाले पण तेथे खिचडी च्या ऐवजी दुसराच कोणत्या तरी प्रकारचा पदार्थ तयार झाला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले “झाले कल्याण ….जाना था जापान पोहोच गये चीन” खिचडी च्या एवजी पिवळ्या रंगाचा चवदार गुंदर तयार झालेला दिसत होता !!. मला भीती हि वाटली कि बाबा आले तर नक्कीच बोलतील. मग आता काय पर्याय ? फेकू तर शकत नव्हतो. काय करायचे ? घराच्या बाहेर निघून गाय शोधू लागलो. म्हटले दिसली तर टाकून देणार. पण तेही दिसत नव्हती. तरी वाटले एकाद तासाने रोड वर ईकडे तिकडे फिरताना एखादी गाय तर नक्की दिसेल. दोन तास पसार झाले पण गाईचा काही पत्ता नाही. शेवटी पाच वाजता गाय दिसली तेव्हा ते गाई समोर ठेवले. तो पर्यंत मेगी वर टाइम पास केला.चांगलीच फजिती झाली आज. बघू ..उद्या जर आई लवकर परतली. तर परत अशी फजिती होणार नाही. नाही तर परत दुपारी मेगी आणि संध्याकाळी चाइनीस च्या स्टोल वर चाइनीस. पण एक गोष्ट लक्षात आली कि जेवण बनवणे म्हणजे काही तोंडाचा खेळ नव्हे.शाळेला उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्यात का आई कडून नक्कीच काही तरी बनवायचे शिकून  घ्यावयाचे आहे.  

‘मूलाँ रूज’:अभ्यासू लालित्य जपणारी चरित्रकादंबरी

पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही. या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते.
मराठीजनांच्या चित्रकलाप्रेमाची राजधानी कोल्हापूर असेल, तर पॅरिस ही जगातल्या चित्रकलाप्रेमींची राजधानी म्हटली पाहिजे. विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक चित्रकलेवर अधिराज्य असलेल्या या कलानगरीने आज मात्र त्याकाळच्या जिवंत कलेतिहासाच्या राजधानीचे स्वरूप घेतले आहे. पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते. आपल्याला तुलूज लोत्रेकची चित्रे माहीत असतीलच असे नाही. किंवा ती चित्रे पाहिली तरीही हे असेच का आहे, इतक्या भगभगीत रंगांत वा घाईने केल्यासारखे का रंगवले आहे, असे प्रश्नही आपल्याला पडू शकतात. अज्ञानाचे काही हक्क असतात, त्यातला हा. पण या अज्ञान-प्रदेशातून कुणीतरी आपल्याला तुलूज लोत्रेकच्या जन्मगावी नेते आहे, त्याला पॅरिसलाच का जावेसे वाटले याची चाहूल देऊन न थांबता पॅरिसमध्ये त्याच्या काळात नेते आहे, हे लक्षात आल्यावर आपणही- या चित्रकाराला लहानपणीचा आजार झाल्यावर त्याची वाढ कशी खुरटली आणि तो ठेंगू, कुरूप कसा राहिला, त्याचे रूप स्त्रीआसक्तीच्या आड कसे येत गेले, आणि त्याने केलेले प्रेम विफल कसे झाले, मग तो ‘अ‍ॅब्सिंथ’ नामक घातक दारूच्या व्यसनात कसा बुडाला, असायलममधून बरा होऊन परतल्यावरही दारू जवळ केल्याने अल्पायुषी कसा ठरला.. याची गोष्ट आवडीने वाचू शकतो.
मात्र, हा अल्पायुषी शोकनायक एक चित्रकार आहे. त्याचे संदर्भ आपल्या माहितीपेक्षा कदाचित निराळेही आहेत. विख्यात चित्रकार व्हॅन गॉग हा त्याचा सहप्रवासी; तर एदगर देगा, कामिय् पिसारो आणि पॉल गोगँ हे ज्येष्ठ समकालीन. त्यावेळचे अनेक बिगरविख्यात चित्रकार, कॅफेतल्या त्यांच्या चकाटय़ांचे विषय, त्यांच्या फ्रेंच आसक्तीला मिळालेली मॉडर्न कलेने दिलेल्या नव्या स्वातंत्र्यभानाची जोड.. अशा तपशिलांचा अड्डा ही कादंबरी जमवते. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ अशी तुतारी फुंकून अखेर इम्प्रेशनिझमच कुरवाळत बसणारे हे बाकीचे बिगरविख्यात नवचित्रकार खंगले कसे, आणि तुलूज लोत्रेकला (पैशाची चणचण नसल्याने असेल, पण) मुद्राचित्रणासारखे नवे तंत्र शिकण्याची आणि ते काही दिवस हाताळल्यानंतर रंगचित्राइतक्याच ऐवजाचे मुद्राचित्र तयार करण्याची संधी त्याच्या आयुष्यातील घटनाक्रमाने कशी दिली,  ती त्याने कशी घेतली, आणि पुढे तो मोठा मुद्राचित्रकार कसा झाला, याचीही उत्तरे ही कादंबरी देते.
लोत्रेकची आठ चित्रे या कादंबरीत रंगीत प्लेट घालून छापली आहेत. प्रत्येक प्लेटमागे त्या चित्राचे थोडक्यात वर्णन आहे. या साऱ्या मेहनतीचे श्रेय अनुवादकाच्या प्रयत्नांना जाते! हे मराठीतले वर्णन मराठी ‘वाचकां’च्या कलाभानाला साजेल असे आहे. चित्रकार वा चित्रे माहीत असलेले ‘प्रेक्षक’देखील इतक्या सुगम भाषेत चित्रांबद्दलचे नवे तपशील मराठीत आले म्हणून सुखावतील! चरित्र वाचून चित्र कळण्याची शक्यता लोत्रेकबद्दल होतीच; पण ही चित्रे अनुभवात भर घालतात.
मूळ कादंबरीकाराने- पिएर ल मूर यांनी कादंबरीत लोत्रेकच्या ज्या-ज्या चित्रांचे उल्लेख आले आहेत, ती कुठकुठल्या संग्रहालयांत आहेत, याबद्दलच्या तळटीपा दिल्या होत्या. पण मूळ पुस्तक आहे १९५० सालचे. अनुवादकाने या तळटीप-संदर्भाचा फेरआढावा घेऊन, आज (एकविसाव्या शतकात) ती चित्रे जिथे आहेत, त्यांचे संदर्भ दिले आहेत. मराठीत हे ताजे संदर्भ तळटीपेत न ठेवता मजकुराच्या मध्येच येतात, त्यामुळे ते वाचकाच्या नजरेआड होत नाहीत.
पिएर ल मूर यांनीही ही कादंबरी केवळ चित्रकाराच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी न ठेवता ती रंजक केली होती. पॅरिसला आयफेल टॉवर उभा राहत होता त्यावेळचे वर्णन, संवादांवर भर आणि हेन्री द तुलूज लोत्रेक या शोकनायकाची चित्रे तरुणपणीच लूव्र संग्रहालयाने घेतल्याच्या प्रसंगाशी दु:खद  घटनेचाही चटका- अशी तिची मूळ रचना आहे. मराठीत ती आणताना संवादभाषेत वैविध्य आणण्याचा अनुवादकाचा प्रयत्न यशस्वी म्हणावा असा आहे.
या पुस्तकातील चित्रांपैकी पहिले चित्र आहे हेन्री द तुलूज लोत्रेक यांच्या आईचे. आईच हेन्रीचा आधार होती. अख्खे बालपण तिच्यावर विसंबणे, तिनेही  उमराव घराण्यातली असूनही आजारी मुलाची शुश्रूषा स्वत: करणे, हेन्री  शिकू इच्छितो आहे, मोठा होतो आहे म्हणून तिनेच त्याची केलेली पाठराखण, पुढे एका नववर्षरात्री माय-लेकरांना आपले जीवनमार्ग निरनिराळे असल्याची जाणीव होणे.. या प्रसंगांतून कादंबरीभर आई आणि तिचा कलावंत मुलगा यांच्या नात्याचे पदर दिसतात. जीवनदर्शनाची ही एकमेव लेखकीय संधी कादंबरीकाराला होती असेही जाणवते; कारण बाकीची पात्रे इतिहासात जे घडले, त्याबाहेर फार कमी बोलतात, वागतात.
या कादंबरीतून अभ्यास आणि लालित्य यांचा जो गोफ पिएर ल मूर यांनी विणला होता, तो याच कादंबरीवर सही सही बेतलेल्या आणि त्याच नावाच्या चित्रपटामध्येही दिसला असेलच असे नाही. पण भाषांतरात मात्र हे अभ्यासू लालित्य प्रकटले आहे. कारण अनुवादकानेही अभ्यास आणि लालित्य यांच्या मार्गावर अनुगमन केले आहे!
-विबुधप्रिया दास


मूलाँ रूज

मूळ लेखक- पिएर ल मूर,
स्वैर रूपांतर- जयंत गुणे, 
लोकवाङमय गृह प्रकाशन,
पृष्ठे : ३२४, मूल्य : ३०० रुपये.

॥ कणिकांजली॥ 2012-01-25 09:27:00

तो आला होता कोठुनी, कळले नाही
तो गेला कोठे, तेही कळले नाही
तो आला होता-एकचि होते सत्य!!
तो आला होता, कसे वदावे सत्य?
तो आला होता, होता केवळ भास….

‘-अन स्वर्गामधुनि ईश्वर तो येईल,
येईल आणखी रूप नवे घेईल
संस्थापन करण्या नूतन युगधर्माची!!’
यावरी नको रे विसंबूस तू आता-
हो हरि-हर तूची, घेउनि त्रिशूळ-चक्रां!!!

‘कवितेने दिधले तुजला लौकिक, नाव-
कवितेने दिधले बहुत मानसन्मान
त्वां काय दिले रे, कवितेला-’ मी पुसता
तो वदला, ‘अवघे जीवन दिधले तिजला
संकल्प-

अर्धे वर्ष सरत आले तरी
अजून मी वाचले नाही
माझे राशीभविष्य !!
विश्वास नाही, असे नाही
पण सवडच मिळाली नाही
कार्यव्यापात बुडून गेलेल्या या वर्तमानात
आता मी एक केला आहे संकल्प
संपूर्ण राशीभविष्य वाचून काढण्याचा
निदान नूतन वर्ष सुरू होण्यापूर्वी तरी…

मैत्रिण आणि गर्लफ्रेंड

आजच महेंद्रच्या काय वाटेल ते…. ह्यांच्या ब्लॉग वर मैत्रिण हि पोस्ट वाचली आणि डोक्यात एक भन्नाट विषय सुचला आणि लगेचच लिहायला बसलो. माझ्या मनात अगधी शाळे पासूनच मैत्रिण आणि गर्लफ्रेंड या बद्दल भरपूर गोधळ होता. आता असा गैर समज करू नका की मी लहान पणा पासूनच मुलींन वर लाईन मारत फिरत होतो असं काही नाही. फक्क्त अनेक प्रश्न मनात घर करून बसले होते आणि अजूनहि आहेत. सुदैवाने शाळेमध्ये असताना  नवी-दहावी तरी आमच्या वर्गातील मुलांचा वर्गातील मुलींशी अगधी छत्तीस चा आकडा होता. काय ठाऊक कशा वरून कदाचित आम्ही फार मस्तीखोर असू म्हणून . कारण मला आठवतय की शाळेत असताना आम्ही जवळ जवळ सर्वच मुलांच्या आणि मुलींच्या वडिलांचा उद्धार केला होता. वर्गात एखाद्या मुलाच किंवा मुलीच नाव आठवणार नाही, पण त्याच्या किंवा तिच्या वडिलांनच नाव मात्र लक्षात असे. समजतंय ना तुम्हाला मला काय म्हणाय च आहे ते असो… पण बाकीच्या वर्गात मात्र मुलमुली अगधी गुण्यागोविंदाने नांदायच्या अगधी पी.टी. च्या लेक्चरला जरी मैदानात सोडल तरी गार्डन मध्ये बसून गप्पा रंगत असत. त्यामुळे शाळे मध्ये तरी मैत्रिण हा प्रकार तेवढासा जाणवला नाही. पण तरी देखील मला पेंटिंग ची आवड असल्याने सर्व मुलींशी बोलणं मस्करी हा प्रकार व्हायचा. मला आठवतंय की मी इंटरमिजीएंट ला असताना एका मुलीला भरपूर लाईक करायचो. सुदैवाने ती आमच्या शाळेतली नव्हती. ती तेव्हा कॉलेज करत होती आणि तेव्हा मी शाळेत होतो फक्क्त परीक्षेला बसण्या पुरता ती दर रविवारी शाळेत इंटरमिजीएंट चे क्लास अटेंड करायची त्या नंतर आमची चांगली मैत्रि देखील झाली होती. आणि माझे मित्र देखील तिच्या नावाने माझी भरपूर खेचायचे पण नंतर परीक्षा झाली आणि हा चॅप्टर यथेच क्लोस झाला नंतर तीही कधी दिसली नाही आणि मी हि कधी तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही.
पण आता जरी मित्रांमध्ये असलो आणि तिचा विषय निघाला तरी एकदम चेहर फुलतो. मित्रांवर बाहेरून राग व्यक्त करतो पण मनातूण अगधी बर वाटत. पण मनात साला एक प्रश्न पडतो ते प्रेम होत की मैत्रि होती ??? नक्कीच मैत्रि तरी नसावी कारण माझ्या मनात तिच्या बद्दल ज्या भावना होत्या त्या मैत्रि पलीकडच्या होत्या. पण आता वाटत ते निव्वळ एका मुलींबद्दल वाटणार आकर्षण होत आणि ते असतच त्या वयात प्रत्येक मुलामध्ये. कारण तेव्हा कशाचीच अक्कल नसते ना कमवायची ना खायची. त्या नंतर काय मंग पुढे कॉलेज चा प्रवास. कॉलेज मध्ये तर प्रत्येक सुंदर मुलगी हि देवाने आपल्या साठीच बनवली आहे असं वाटू लागत आणि मंग प्रत्येक मुलीवर चातका सारखी नजर फिरू लागते. मंग लेक्चर असो, लॅब्ररी असो, कॅन्टीन असो फक्त मुलीच्या शोधात मन फिरत राहत. हि नाही तर ती आणि मंग मुद्दाम च फ्रेंडशिप डे च्या दिवशी तिच्याशी जाऊन मैत्रि करायची आणि वॅलेंटाईन-डे ची वाट पाहायची कारण हीच मैत्रिण उद्याची गर्ल-फ्रेंड होणार की नाही, हे त्याच दिवशी ठरणार असते. जर “ हा ” बोलली तर गर्ल-फ्रेंड नाही तर मैत्रिण किती साध सिम्पल गणित आहे ना ? हे म्हणजे एका तीरात दोन पक्षी मारण्यासारखा झाल.
पण ह्याला मैत्रि म्हणतात का प्रेम ? माझ्या मते तरी काहीच नाही. धड प्रेम हि नाही आणि मैत्रिण हि नाही हि फक्त तिच्याशी केलेली कमिटमेंट असते आणि आपला साधलेला हेतू. आधी निखळ मैत्रि करून फुढे जाऊन प्रेम करण्यात काय अर्थ आहे. मी कॉलेज मध्ये पण भरपूर जणांच्या तोंडातून ऐकल आहे की ‘अरे हि मुलगी मला फार आवडते रे. जरा फ्रेंडशिप करून देना, तु तिचा चांगला फ्रेंड आहेस ना ??’ ह्याला मी पण काही अपवाद नाही. नाही तर मंग आहेच की फेसबुक किंवा ऑरकुट तिची कुंडली शोधायला. पण आता तुमच्याच मनाला विचारून बघा हि खरच मैत्रि होती का ? आणि जरी ती आपली मैत्रिण झाली च तर आपण तिच्याशी तितके प्रामाणिक राहु का? जितके आपण आपल्या खऱ्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी राहतो, मुळीच नाही. कदाचीत ह्याच कारणांनमुळे एखदा मुलगा किंवा मुलगी सख्खे मित्रमैत्रिणी होऊ शकत नाही किंवा समाज म्हणून ती मैत्रि स्वीकारत नसावा. म्हणूनच कॉलेज मध्ये असणासरी एखादी सख्खी मैत्रिण सुधा बॉयफ्रेंड बरोबर जाताना अगधी बिनधास्थ जाईल. पण एखाध्या मित्रा बरोबर साध देवळात जाताना देखील थोडासा विचार करेल किंवा एखादा मित्र जर आपली जास्तच केअर करायला लागला असं कोणत्या मुलीला वाटू लागल की त्या मुलीची संशयाची सुई आपसूकच मान वर करू लागते आणि मंग ती सख्खी मैत्रिण पण ग्रुप मध्ये असूनसुद्धा आपल्याशी नसल्या सारखी वागते, आपल्यापासून हळूच दूर होते आणि कधी बोलायची बंद्द होते. हे देखील समजत नाही, असं का होत ???? आपण तिची इतरांन पेक्षा जास्त काळजी घेतकी म्हणून की आपणच कुठे त्या मैत्रि चा वेगळा अर्थ घेतला म्हाणून. हे ज्याच त्याने शोधाव, उत्तर तुमच तुम्हालाच मिळेल. त्या साठी एक सख्खी मैत्रिण असावी लागते, की जिच्यावर फक्त आपण एका मैत्रिणी प्रमाणेच प्रेम केल असावा आणि एक गर्लफ्रेंड की जिच्या वर फक्त आपण लाईफ पार्टनर म्हणूनच प्रेम केल असाव. तुम्ही एवढे हुशार असलाच की मला काय बोलायचं आहे हे तुम्हाला समजल असेलच. मी जरा स्पष्ट लिहत नाही कारण ब्लॉग आहे.नाही तर तुम्हाला माहिती आहेच की मुलांमध्ये असलो की आपण कोणत्या प्रकारच्या कमेंट मारतो मुलीना बघून आणि जर त्यातल्या त्यात कोणता मुलागा म्हणालाच की “ अरे बस.. रे किती बोलशील त्या मुली बद्दल ” असं म्हंटल की एकच उत्तर असत. तुझी गर्लफ्रेंड आहे, बहिण आहे नाही ना ?? मंग सोड ना आणि मैत्रिण आहे असं म्हटलं तर माझी सेटिंग लाव ना. अशी काहीशी उत्तर ऐकावी लागतात. आणि जर त्याला म्हटलं की “ अरे ती तुझ्या टाईप ची नाही ती माझी चांगली मैत्रिण आहे उगाचच पाठी लागू नको ”. “ हा मंग तु मांगे लागलेला दिसतोयस ” असं देखील ऐकवा लागतात म्हणजे इकडे आढ तिकडे विहीर, अशातील गत धड हा पण नाही म्हणू शकत आणि नाही पण नाही. कधी कधी असं देखील होत अगधी जवळच्याच मैत्रिणी च्या नावावरून उगाचच मित्र आपली खेचत बसतात आणि आपल्याला पण त्याची सवय होऊन जाते आणि उगाचच मनात तिच्या बद्दल काही हि भावना नसताना ते प्रेमाचे बिज जबरदस्तीने आपल्या मनावर बिंबवण्यात येते आणि आपण नकळतच आपल्याच सख्या मैत्रिणीच्या प्रेमात कधी पडतो हे देखील आपल्यालासुद्धा समजत नाही. शेवटी आपल मन आपल्या पेक्षा इतरांच जास्त ऐकत असत म्हणून कदाचित असं असाव. कॉलेज मध्ये असताना सर्वांशी बिनधास्थ पने बोलणारे, मस्करी, मजा करणारे आपण लग्न झाल्यावर बायकोसोबत असताना सख्खी मैत्रिण भेटलीकी तिच्याशी नजर मिळवताना आपली नजर नकळतच खाली जाते.  
म्हणून माझ्या मते तरी मैत्रिण आणि गर्लफ्रेंड ह्यामध्ये गल्लत करू नये. मैत्रिण असेल तर तिला गर्लफ्रेंड च रूप देण्याचा प्रयत्न करू नये. नाही तर ती खरी मैत्रिण कधीच होऊ शकत नाही. कारण मैत्रिण आणि गर्लफ्रेंड ह्या दोन्ही वेगवेगळ्या कॉनसेप्ट आहेत आणि उगाचच या दोघांची गल्लत करून आयुष्यात आपण एखाद्या चांगल्या मैत्रिणीच्या मैत्री पासून मुकतो. शेवटी एकच सांगावेसे वाटते की …..
एक तरी मैत्रीण अशी हवी 
जरी न बघता पुढे गेलो तरी 
मागून आवाज देणारी 
आपल्यासाठी हसणारी 
वेळ आलीतर अश्रुही पुसणारी 
स्वताःच्या घासातला घास 
आठवणीने काढून ठेवणारी 
वेळेप्रसंगी आपल्या वेड्या मित्राची 
समजूत काढणारी 
वाकड पाऊल पडताना मात्र 
मुस्काटात मारणारी 
यशाच्या शिखारांवर 
आपली पाठ थोपटणारी 
सगळ्यांच्याच घोळक्यात 
आपल्याला सैरभैर शोधणारी 
आपल्या आठवणीनं 
आपण नसताना व्याकूळ होणारी 
खरच! अशी एक तरी जीव भावाची 
    ‘मैत्रीण’ हवी जी आपणास मित्र म्हणवणारी ….. 
   Smiley FaceSmiley FaceSmiley Faceवरील कवितेसाठी गुगल चे आभार!!!Smiley FaceSmiley FaceSmiley Face

॥ कणिकांजली॥ 2012-01-22 14:30:00

मंदिरे पाडुनी बांधियल्या मसजिदी

मंदिरे बांधिली पाडुनिया मसजिदी
दिन-रात घुमतसे घोष ऋचा-कलमांचा!
परि भिंतींमधल्या दगडां पडतो प्रश्न
कोणता आपुला धर्म, कोणता पंथ?

कॉपी-पेस्ट

एकदा एका वक्त्याने आपल्या भाषणात सांगितले कि,
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे हि ज्या बाईच्या बाहुपाशात गेली ती स्त्री माझी पत्नी नव्हती
त्यांच्या ह्या वाक्याने श्रोते स्तब्ध झाले. सर्वत्र शांतता पसरली.

“तर ती माझी आई होती “

ह्या त्याच्या नंतरच्या खुलाशाने सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात आणि हास्य सागरात बुडून गेले.

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने हा किस्सा संध्याकाळी त्याच्या घरी सांगण्याचे योजले.
३-४ पेग झाल्यावर ,रात्री त्याने स्वयंपाकघरात असलेल्या त्याच्या बायकोला हा किस्सा जरा मोठ्या आवाजातच सांगायला सुरुवात केली.कि,

“माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे हि जिच्या बाहुपाशात गेली आहेत ती स्त्री तू नाहीये, तर …. “
हे बोलून तो स्तब्ध झाला,
वातावरणात अचानक एक विचित्र शांतता पसरली.
उठून उभे राहायचा प्रयत्न करत,किश्श्याचा पुढील भाग आठवायचा त्याने खूप प्रयत्न केला,पण त्याच्या त्या वेळच्या अवस्थे मुळे,काही केल्या तो त्याला आठवेना शेवटी बरळत-बरळत  त्याने सांगितले कि, 
“त्या दुसऱ्या बाईचे नाव मला, आत्ता मात्र आठवत नाहीये “
जेव्हा तो शुद्धीवर  आला तेव्हा त्याने स्वतःला उकळत्या पाण्यामुळे भाजलेल्या जखमांमुळे हॉस्पिटल मधील कॉटवर बघितले.
  तात्पर्य:
 don’t copy ,if you can’t paste    

फोटो सौजन्य : Avery Carlton,www.flickr.com  


ह्या पोस्टचे सौजन्य सौ.सुजाता ह्यांचे कडून मला आलेला एक मेल.

॥ कणिकांजली॥ 2012-01-19 17:24:00

रस्त्याला लागुन दुकान छॊटॆ आहे

बरणीत सुपारी कात-चुनाही आहे
तो देतो बांधुन पट्टी विविध तर्हेची
जन येती आणिक पान-तमाखु खाती
पिचकारी पहिली तिथेच मारुनी जाती…
मी होतो तेव्हा बादशहा निद्रेचा
जी आणित होती नजराणा स्वप्नांचा!
स्वप्नांचा श्रावण अखंड बरसत होता
परि हाय! आज ती एकही ना दे स्वप्न
निद्राच जाहली आहे आता स्वप्न…

पतंग उडाने का मौसम…

मकरसंक्रांत आली की सर्वत्र पतंग बाजी सुरु होते. पतंग उडविणे हा खेळ लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळेच उत्साहाने खेळतात. मला पाचवीत हिंदीच्या पुस्तकात “पतंग उडाने का मौसम” असा एक धडा होता. खरं सांगु का… या धड्यातील मला एक अक्षर ही आठवत नाही. तरी माझ्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या झाल्या त्याच तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.

लहानपणी “पॉकेटमनी” हा प्रकार नव्हता, घरात सगळे लाड व्हायचे मात्र “फालतू लाड” काहीच नाही. जालना शहरात विजयादशमीच्या वेळी पतंग उडविण्याची प्रथा आहे तर औरंगाबाद मध्ये मकर संक्रांतीला. आम्ही दोघं भावंडात मिळून पतंगासाठी ₹ पाच मिळायचे. त्यातूनच आमचा संपूर्ण पतंगबाजीचा सण पुर्ण करावा लागायचा. मला ₹ २ पुरायचे, ₹ १ ची संकल आणि ५०-५० पैश्यांचे २ पतंग.
 
पतंग उडविण्यासाठी लहानपणी लागणारे साहित्य म्हणजे, पतंग, मांजा, संकल, चक्री (नसेल तर डब्बा) आणि मुठभर भात. चक्री असणे म्हणजे एक प्रतिष्ठेची गोष्ट. भात कश्यासाठी तर, पतंग जर फाटला तर चिटकविण्यासाठी. विकतचा मांजा घेणे हे सगळ्यांनाच परवडत नसे, म्हणून मग घरीच मांजा तयार केला जायचा. मला खात्री आहे आम्ही लहानपणी केलेले उद्योगांचा विचारही आजची पिढी करू शकणार नाही.
 

घरी मांजा बनविणे म्हणजे “मांजा सुतणे” हा एक सहकारी तत्त्वावर चालणारा कार्यक्रम होता. त्यासाठी लागणारे साहित्य जमा करणे हेच खुप मोठ्ठं काम होतं, सगळ्यात पहिले “शिरस” (शुद्ध भाषेत सांगायचे तर “कोरफड”) शोधणे. एक निकामी बल्ब, कारण बल्बची काच पातळ असते. तो बल्ब फोडून त्या काचेची बारीक पावडर तयार करणे हे एकाचे काम. एक जण पांढरी संकल दोन टोकाला बांधेल. एक जण मगं थोडं पीठ, शिरस (चिकट द्रव), काचेची पावडर आणि हवा असलेला रंग (न मिळाल्यास हळद-कुंकू ही चालायचं) एकत्र करून गोळा बनवायचा. मग त्या संकलवर हा गोळा फिरवायचा आता ही संकल सुकली की झाला मांजा तयार. मग हा मांजा वाटून घ्यायचा अथवा आपण दुस-या मांजा बनविण्यास मदत करायची.

बरं या पतंगाचे ही भरपूर प्रकार आणि तेवढीच कमालीची नावं… फर्रा, कव्वा, चौकडा, एक आख्या, दो आख्या, आधा चांद, पुरा चांद… मला विशेष आवडायचा तो “परी” हा नावाप्रमाणेच दिसायला पण खुप सुंदर तर “गिलोरा” हा माझा लक्की पतंग होता आणि हे दोन प्रकारचे पतंग अत्यंत दुर्मीळ, हे मिळण्यास नशीबच लागायचे.

जसे मांजा बनविणे एक उद्योग आहे तसेच पतंगाला कण्णी लावणे ही एक कला आहे. ती अवगत व्हायला बराच वेळ लागला, अगोदर दादा मला त्यासाठी मदत करायचा. घराला खुपच मोठ्ठी गच्ची होती मात्र आमचे पराक्रम पाहता तिथे जाण्यासाठी वडिलांनी जिना बांधून नव्हता घेतला, म्हणुन आम्ही मग मैदानावर पतंग उडवायला जायचो. मोठ्या मुलांना अथवा मोठे पतंग उडविण्याचे वेगळे मैदान असायचे तेथे लहान मुलांना प्रवेश नसायचा.  

“शेपूट लावुन पतंग उडविणे हे भ्याडपणाचे लक्षण मानले जायचे.”

मांजा चा वापर मुख्यत: “पेच” लावण्याकरिता व्हायचा. दादा पेच लावण्या माहिर होता, मी मात्र या भानगडीत पडायचो नाही. दादा म्हणजे पेच लावणे, ठरवून पतंग कापणे, पतंगात पतंग अडविणे हे प्रकार करण्यात एक्सपर्ट होता.

पतंग कटला, फाटला की मग नविन पतंग मिळणे थोडं अवघडच असायचं कारण पैसे संपलेले असायचे आणि आणखी पैसे मागायची हिंम्मत नसायची. मग काय करायचे तर कटलेले पतंग पकडण्याचा प्रयत्न… हे एक धाडसी काम असते. कटलेला पतंग कुठे पडणार याचा प्रथम अंदाज घेणे, त्या ठिकाणी सर्वांच्या आधी पोहोचणे आणि ’पतंगाला’ काहीही इजा न होता पकडणे. पतंगाला कोणतीही इजा टाळताना स्वत:ला झालेल्या इजांचा विचार केला नाही जायचा. जर १० मुलांमध्ये हा पतंग आपल्याला भेटला तर त्या आनंदाला मोल नसायचा.

मी पतंग पकडण्याच्या नादात संपूर्ण चिखलात पडुनही स्वच्छ घरी येण्याचा कारनामा केलेला आहे.

कटलेला पतंग मी कसा पकडला, कसा धावलो, गण्या, मुन्ना, ह-याला कशी हुल दिली असे किस्से मग चालायचे. लहानपणी एक किस्सा हा दरवेळी सांगितला जायचा, तो म्हणजे “अरे तो सिध्दी दादा आहे ना.. त्याचा पतंग इतका उंच गेला, इतका उंच गेला, इतका उंच गेला की बारीक टिकली एवढा दिसायला लागला. एकदम त्याची “ठिल” तुटली आणि त्याचा पतंग ’अंबड’ ला सापडला.” माहिती नाही की या गोष्टीचा लेखक कोण होता पण आमच्या बाल मनात ही अश्या प्रकारे बसली होती की ती कधीच खोटी वाटायची नाही.

आज एक्स-बॉक्स आणि प्ले स्टेशन वर विटी दांडु आणि पतंग हे दोन गेम मिळतात, पण खरं सांगा त्यात ही मजा असणार आहे का???

आज सगळं काही आहे गच्ची, मैदान, बरेलीचा मांजा, चकरी आणि “परी” आणि “गिलोरा” पतंग. गृहपाठ ही नाही आणि घटक चाचणी ही नाही. पण काय करणार वेळ नाही.

सबकुच है यारों, फिर भी लगता है कुच कम
आप ही बोलो कब वापस आयेगा हमारे लाईफ में

“पतंग उडाने का मौसम”
हा लेख आवडला असेल तर फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak


– नागेश देशपांडे

 


मी एक हौशी लेखक

त्रिवेणी- दारू

तुझी नशा अफाट होती 

या दारूपेक्षा सरसच तू
.
.
.
.
तू विकली जात नाहीस हे किती बरे आहे!

*************************

मला माणसांची किंमत कळते
दारूची तेवढी कळत नाही
.
.
.
.
चष्म्याचा नंबर वाढलाय बहुतेक!

************************

ग्लासात देशी आहे की इंग्लिश
याचा विचार करत नाही मी 
.
.
.
.
जाती-धर्माच्या विरोधातच आहे मी!

*************************

ग्लास अर्धा भरलाय असंही म्हणता येतं
ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं 
.
.
.
.
म्हणा काहीही, हा ग्लास बाटलीचा गुलाम आहे !

**************************

पुन्हा भेटशील तेव्हा जाब विचारेन तुला
तू दिलेल्या दु:खाचा हिशोब लिहून ठेवलाय
.
.
.
.
बियर बारच्या मालकाकडे रेकॉर्ड आहे सगळा!

-काव्य सागर

सई…………

                   सर्वत्र हिरवळ पसरलेली…..हिरवळ…..ओली…..मन तृप्त करणारी ….हलका हलका पाउस …..सारं काही हलकस पुसठ दिसत होत .समोर असलेला तो धबधबा अगदी तृप्त होऊन नदीच्या मिठीत झेप घेत होता .पांढरा शुभ्र……मनात कसलाही क्लेश नसलेला ….

                  वातवरन  अगदी छान आनंदी होऊन .घुंगरांचा साज करून नाचत होत वाजत  होत……गार वाऱ्याने  अंग अगदी शहारून येत होतं .ओठांची ती होणारी थरथर……डोळ्यांची उघडझाप……तिचे ते ओले काळे  भोर केस चेहर्‍याला अगदी घट्ट मिठी  मारत होते .ओंजळीत पडणारा तो पाऊस कधी साठून ओंजळीतून ओघळून जात होता ,ते हि  कळत  नवतं . पण त्याच्या होणाऱ्या स्पर्शाची माज्याच काही निराळी होती .चेहर्‍यावर पडणारे ते पावसाचे थेंब …….खूप …..खूप छान दिसत होती ती .तिची ती भिजलेली उजळ कांती अस्सल मोल्यवान हिऱ्या सारखी लख्खं चमकत होती .तो  जांभळा रंग तिच्यावर खूप  उठून दिसत होता .तितक्यात मागून एक हाक आली. “सई?ए सई……..”

                   ती पटकन मागे फिरली . तिचे ते ओले केस तिच्या चेहेऱ्यावर पसरले आणि  त्याने  तिला  मिठीत घेतल . ती  काहीहि  बोली नाही .तशीच स्तब्द उभी  राहीली .जणू  काही  हरवलीच  त्याच्या मिठीत  . आज काहीस वेगळं वाटलं तिल . तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि आल्या आल्या तिच्या शोधात इथपर्यंत येऊन पोहोचला होता . कारण त्याला माहित होता ,सई त्याला  तिथेच  भेटेल .तिने अलगत मिठी सोडवली . पण तिचे डोळे वर पाहण्याची अनुमतीच देत नवते .कसंबसं ती  केस नीट करत हसत म्हणाली .”आता आलास ?मी कधीची वाट पाहते तुझी…….”


तो : – “रागावली  अशील न ? हो पण कंटाळली अशील  असं मी चुकूनही नाही  म्हणणार .कारण हा पाऊस हा निसर्ग……तुझा पहिला  मित्र………..हो नं ?सई …..बाई ?
ती :- “जा नं रे ?तुला किती वेळा सांगितलं आहे .सई बाई  नाही……… म्हणायच म्हणून ?”
तो :- “ओके…….मग ……बाई  म्हणू न ?”
ती :- “ए ! नाही हं !हे हि नाही म्हणायचं !”

तो :- “बर…..रुसुबाई !नका गाल फुगून बसू आता  . आणि भिजतेस कशाला ग ? सर्दी झाली कि रडत बस मग हं ?”

ती :- “भिजणार आणखी भिजणार …..”

तो :- “भिज…….आणि मग पड आजारी आणि बस रडत. “

                           दोघांनी  थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग तो तिला घरी घेऊन आला  . मस्त बाईक वरून…….


सुसाट गोड आणि थंड गार वाऱ्या बरोबर गप्पा मारत ,भिजत पावसाचा आनंद घेत . खर तर हे दोघही लहानपणापासूनचे मित्र मैत्रीण एकमेकांच्या कुटुंबची हि छान ओळख होती .आज  ते  सगळे चहाला एकत्र जमले होते  . हे दोघ घरी येताच सगळे  त्यांच्या कडे एक चिडवणारया स्मित हास्याने पाहू लागले .त्या दोघांना हि काही कळालं नाही . ते दोघ हि फ्रेश होऊन आल्यानंतर  त्यांच्यासह चहा प्यायला बसले . तेवढ्यात बाब म्हणाले “तुम्हा दोघांशी आम्हाला एक विषयावर बोलायचं आहे .आम्ही अस ठरवल आहे कि तुम्ही दोघही छान मित्र मैत्रीण तर आहातच . मग आयुष्यभाराचे सोबती बनायला काय हरकत आहे ? एवढा छान ओळखताच न एकमेकांना ?मग आता लग्न ही उरकून टाकू अश्याने मुलगी ही जवळ राहील आणि तुमची मैत्रीही कायम राहील .” दोघही एक मेकांन कडे पहायला लागले काहीच काळात नवतं पण सार काही विचित्र वाटू लागलं होतं . हो म्हणायचं कि नाही म्हणायचं हे हि कळात नवतं .सर्व खुश होते .सई च्या मनाची चांगलीच घाल मेल झाली होती आणि ती राजन ला कळात हि होती .तो हाच विचार करत होता कि मी तिच्या जवळ जावं ,तिला जवळ घेऊन समजवावं ,पण अस करू शकत नवतं हे हि तितकाच खरं होत .सई तिथून उठून तिच्या खोलीत निघून गेली आणि जाऊन खिडकी पाशी उभी राहिली .बाहेर आता सार काही शांत झाल होतं .पण हवेत तो गारवा तसाच होता . संध्याकाळचे ६ :३० वाजले होते .झाडांवर तो ओलावा ,हवेत तो धुंद मातीचा सुगंध,ओला गारवा  आणि थोडा अंधार ही .वातावरण खूप छान होतं अगदी रमणीय .आणि तितक्यात तो मागून आला .त्याने तिच्या खंद्यावर हात ठेवला . ती दचकली .तिने चटटकन मागे पाहिलं आणि त्याच्या कडे न पहता थोडा वेळ मागीतला  .

                  त्याने हि तसाच केलं , तोही निघून गेला तिथून .कारण तिला खरच गरज होती एकांताची .रात्र भर विचार केला या विषयावर  आणि……आणि  दोघांनी हि दुसऱ्या दिवशी होकार दिला लग्नासाठी . त्याला तसाही हे नात मान्य होतं . कारण ती आपली मैत्रीनच आहे . ती आपल्याला आणि आपण तिला छान समजून घेऊ शकतो ,मग हे लग्न झालं तर काही हरकत नाही . पण तिच्या मनात हा विषय खूप घोळ घालत होता . तिला काही सुचेनास झालं होतं . आई बाबांच्या म्हणण्याला तिने हि होकार दिला खरा .तरी हि तो आपला मित्र आहे ,मग आपण त्याला आपला नवरा म्हणून कस काय स्वीकारायचं ?हेच समजत नवतं . ती थोडी चिंतेतच होती.


                ती परत  माळरानावर निघून गेली . जेणे करून थोडा एकांत मिळेल . तिथे तिची मैत्रीण  गंधा भेटली .ती हि गावातील तिची एक छान मैत्रीण .तीने तिला अचानक विचारल कि ,”काय झालं ग !अशी चिंतेत का दिसतेस ?”


ती :- “गंधा माझ  लग्न ठरलं ग……”
गंधा :- “अया……खूप छान ग ! कधी ….?कुठे….?कोणा सोबत…..?”
ती :- “राजन !”
गंधा :- “कधी आहे  लग्न ? ए !पण तू या करणा मुले काळजीत आहेस का ?आग तो तुझा छान मित्र आहे न ?मग किती छान !जास्त टेंशनच  नाही न ?खूप छान जमेल तुमच .तो चुकला ,तर तू सांभाळ आणि तू चुकलीस ,तर तो सांभाळेल आणि तस पण तुमच्या कुटुंबच चांगलाच  जमत न ?मग काय?”
ती :- “पण ………पण तो माझा चांगला मित्र आहे आणि हे सगळ………”
गंधा :- “अग ! वेडा बाई !तेच तर म्हणते न मी ?कि तो तुझा  छान मित्र आहे . मग त्याच्या व्यतिरिक्त तुला जास्त कोण समजू शकेल आणि अनोळखी व्यक्तीबरोबर आयुष काढणारच आहेस न ?मग ओळखीच्या  व्यक्ती बरोबर काढायला काय  हरकत आहे ?जरी काही प्रोब्लेमस असतीलच ना ?तर त्याच्या बरोबर बोल आणि सोडव .तस हि तू तुझा बेस्ट फ्रेंड म्हणतेस  न त्याला ?त्याच्या शिवाय आता तुला जास्त समजून घेणार कोणी नाही ग !सई ? सई माझ ऐक त्याच्या बरोबर बोल या विषयावर .”
ती :- “तस  तू बरोबर म्हणतेस ग !मी बोलेन या विषयावर त्याच्याशी .”
गंधा :- “अंहं ?आता पासून त्यांच्याशी म्हणायचं हं सई “

                   सई  छान हसली आणि तिने ठरवल कि ती राजन शी बोलेल या विषयावर . ती निघाली तिथून तिच्या प्रश्नच उत्तर मिळाल्याप्रमाणे आणि दोघी ही गप्पा मारत घरी निघून गेल्या.

                    संध्याकाळी घरी पोहोचल्यावर अचानक तो दिसला .आज त्याला पाहून तिच्या हृदयाची धडधड का होत होती कुणास ठाऊक .पण ती…….ती  धड धड छान होती .ती जाणीव काही वेगळीच होती .ती  त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाली “मला काही बोलायचं आहे तुझ्याशी .”आणि सरळ तिथून निघून तिच्या खोलीत गेली .त्या खिडकीत जाऊन उभी राहिली त्याची वाट पहात .तो आला .तिला त्याची चाहूल लागताच तिने सुरवात केली . 

ती :- “राजन !हे  जे काय होतंय ,ते मला नाही काळात आहे रे !आपण छान मित्र-मैत्रीण आहोत.मग………. अचानक ?हे असं लग्न ?”
तो :- “सई मी तुझा मित्र आहे आणि तूच म्हणतेस न ?….कि माझ्या शिवाय तुला कोणी नाही समजू शकत ?मग आपण हे लग्न करूया .आणि तस हि आपल्याला एकमेकान साठी भावना आहेत . पण त्या आपल्याला नाही समजल्यात आजून .आपण त्या भावनांना  वेळ दिला पाहिजे . आपल्यात ती ताकत आहे समजून घेण्याची आणि आपलं नातं छान बनवण्याची .आणि सई…..दुसऱ्याबरोबर लग्न करण्यापरीस तुझ्या राजनशीच कर न ?…..मला माहित आहे . कि……मला नवरा म्हणून स्वीकारायला वेळ लागेल ,पण सुरवात मैत्रीने करूया न ?”

                  त्याने तिचा हात धरून तिला जवळ घेतल . आज ती हसत होती .राजन ने समजावलेल  कळंले बहुतेक .सार काही सोप्प झाल्या सारख वाटत होत .

                  दुसऱ्या दिवशी त्यांची कुंडली जुळवण्यात आली आणि  लग्नाची तारीख ही ठरली .लग्न  आता काही दिवसांवर होत घरात अगदी गोंधळ झाला होता पाहुण्यांचा .

“हे आणल का ? ते आणल का ?  वस्तू बरोबर आहेत न ?”
“आज हळद आणि हा गोंधळ अशा प्रकारे?”
आई :- “रुकवत तयार झाली का ? साड्या आहेत न बरोबर ?मान पाण चुकला नाही पाहिजे  बाई कोणाचा……”
बाबा :- “हो न ! नाही तर जावई  आणि  सई च्या  घरातले रुसायचे आमच्यावर ?”
आजी :- “अग आधी नारळ पत्रिका देवा समोर ठेऊन हळद कुंकू वहा बर !”
बहिण :- “अया ! मेहेंदी हि आणायची राहिली ग ?आधी मी जाते आणायला…..”
आत्या :-“अग !आजून  हळद नाही तयार झाली का ?”
मावशी :- “सगळ  समान भरलं न तुझं ?काही राहिलं नाही न ?”
ती :- “अरे बापरे !आई…..बाबा…….मी लग्न करून कुठे परदेशी  नाही चाले  हो ! इथेच आहे .? 

        आणि तिने आपल्या बाबांचा हात धरून अंगणात आणलं .
      “आपल्या अंगणातून समोर पहिला न ? की  ४ -५  माड्या सोडून जो गावातील सर्वात मोठा चिरेबंदी वाडा आहे न ?तो आमचाच हं बाबा !”

                  बाबा ती आणि  सर्व घरातील मंडळी कौतुकाने हसू लागले .पण तितक्यात बाबांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले .”बाळ इवलीशी होतीस गं !बोट धरून या अंगणात छोट्या छोट्या पावलांनी इथून तिथे  पाळायचीस आणि  मागे  आई ……..जेवनाच ताट घेऊन  आणि आज…. किती हि झाला तरी तुझं लग्न होणार आणि आमची सई कायमची दुरावणार………”

                  सई ने बाबा  ना घट्ट मिठी मारली आणि रडू लागली .पण बाबा तिची  समजूत काढून घरात घेऊन गेले  आणि तितक्यात अंगणातून  हाक आली .”कासार आला गं !या सगळ्यांनी !” आणि तो क्षण विसरून परत सगळे तयारीला लागले .                  लग्न उरकलं आणि  सई चा  गृहप्रवेश  हि  झाला .लग्ना नंतरच्या सगळ्या विधी म्हणजे , नावं घेण्यापासून ते तबकातून अंगठी शोधून काढण्या पर्यंतचे सगळे खेळ उरकून सर्वजन झोपण्याच्या तयारीला लागले .बरीच रात्र ही झाली होती . पण जागा नवीन असल्या कारणाने सईला काय झोप येईना . नंदा जावा सगळ्या मस्करी करत कधी झोपी गेल्या हे हि कळाल नाही . आणि हलक्या पावलांनी कोवळी किरण घेऊन पहाट आली . सगळे उटले काम उरकली .

                   राजन च्या खोलीतून अचानक आवाज आला .”आई………ए आई !…..माझा चहानाष्टा वरच पाठव ग !मी खाली नाही येत .”

                  आणि आईने हाक मारली सईला .”सई !अग राजन ला चहानाष्टा घेऊन जा बर !”

              ती आईन जवळ आली .तिने  ते  चहाच  आणि नाष्ट्याच ताट उचल आणि शिड्यानी हळू हळू वर जाऊ लागली राजन नवता खोलीत अंघोळीला गेला होता .तिने ते ताट जवळच्या टेबलावर ठेवल  तितक्यात तिला  फुलांचा सुगंध आला  तिने  वर  पाहिलं  खिडकीतून   दिसणार  ते  सोनचाफ्याच भलं मोठ बहरलेल फुलेल  झाड सूर्याच्या कोवळ्या किरणांनी चमकत होत  . सर्वत्र त्याचा सुगंध दरवळत होता वातावरण अगदी आनंदी झाल होत .ती खिडकीत जाऊन उभी राहिली . तिच्या चेहेऱ्याव त्या दरवळनारया  हवेच्या  वातावरणाचा आनंद होता .


              तितक्यात राजन बाहेर आला त्याने मागून येऊन तिला  मिठीत  घेतल आणि हनुवटी तिच्या खांद्यावर ठेऊन  तिच्या कानात हळूच फुंकर घातली आणि म्हणाला “तू आज खूप छान दिसतेयस  गं …!”


ती :- (ती त्याला खांद्याने  धक्का देत म्हणाली )”राजन तू हे काय करतोयस .कामाला नाही जायच का ?”
तो :- “काय म्हणतेस तू ?एवढी छान बायको सोडून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कोणी कामाला जाईल का सई ?”
                ती दचकली पण राजन ने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं .तिचा श्वास वाढला आणि धड धड हि लाज हि तितकीच वाटत होती . पण आपला मित्र असा हि असेल ,त्याच्या स्वभावाचा हा पेहेलू काही वेगळासा ,विचित्र ,पण हवा हवासा वाटला .


ती :- “राजन !सोड न मला……….. आज पूजा आहे सत्यनारायणाची  तयारी हि करायची आहे “आणि त्याची मिठी सोडून ती खाली आली . ती लाजली होती थोडी .

                  जस  ती  लग्ना  आधी चिंतेत होती या नात्याला घेऊन तसं काही हि तिला वाटलं नाही त्याचा स्पर्श छान होता……लाजवणारा . तो मित्र हि होता …..पण नवरा असल्याची भावना आपोआप मनात कधी आली ,हे काळालच नाही .


                   संध्यकाळचे ७ वाजले होते .पूजाही उरकली होती आणि कामंही .पूजेला आलेल्या सर्वांनी सई च पोट भरून कौतुक केल होतं .तिला भरभरूण आशीर्वाद दिले होते .सार काही नीट आणि छान पणे पार पडलं होत .सई आता त्यांच्या खोलीत बसली होती सगळ्यांबरोबर गप्पा मारत पण राजन नवता घरी .बाहेर गेला होता .गप्पान मध्ये इतकं रंगले होते कि जेवणाची वेळ कधी जवळ आली कळालच नाही .राजन हि परतला होता तो खोलीत आला फ्रेश व्हायला .तितक्यात आईंनी हाक मारली जेवणा साठी . सगळे जमले जेवणही  झाल गप्पा झाल्या झोपायची वेळ हि जवळ आली सगळे एक एक करून आपापल्या खोलीत निघून गेले .आता आई सईकडे बघू लागली तिच्या चेहेऱ्यावर एक हसू होता


आई :- “सई !जा बाळा तु ही झोप जाऊन राजन वाट पाहत असेल .”

                सईला विचित्र हि वाटत होत आणि लाज हि वाटत होती .ती खोलीच्या दिशेने जाऊ लागली मनाची  हृदयाची धडधड होत होती ती आत आली राजन खिडकी जवळ उभा होता तिने त्याला हाक मारली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारली . 

                   राजन पूजे नंतर अचानक  कुठे  गेला ते तिला काळालच नाही ती शोधात होती त्याला तिला तो दिसलाच नवता . त्याने  ही तील प्रतीसाद  दिली  आज सई ला झालेला स्पर्श आणि माळरानावर त्याने मारलेला त्या मिठी नंतर वाटलेली ती जाणीव आज तिला कळत होती तो स्पर्श एकसारखाच होता  . आज तो पावसा सारखाच भासला असावा गार  अंगावरती  शहर  आणणारा . हवा  हवा सा  वाटणारा .

                     “पण हे  अस का वाटत आहे आज  . तो तर माझा मित्रच  आहे न मग हे असं वाटण्याच कारण  काय ?” 

                    आज कारण भेटल  तिला . तीच  त्याच्यावर आणि त्याच तिच्यावर आसलेल प्रेम जे त्यांना कळाल नाही पण आई बाबांना कळाल होत .

                                                 

                                                   पहाट  झाली  सूर्याची ती नाजूक कोवळी सोनेरी किरण  तिच्या आणि त्याच्या  चेहेऱ्यावर  पडली  सई ला जाग आली ती राजन च्या कुशीतच  होती . आज सई ला खूप  गाढ झोप लागली होती . प्रसंन  ही वाटत होत .तिने राजन कडे पाहिलं तो गाढ झोपेत होता . तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याची  एक छान शी  पा घेतली आणि राजन हळूच हसला त्याने डोळे उघडले . तो जागाच होता फक्त काय होतंय याची वाट पहाट होता .सई उठली त्याने तिचा हात धरला ती फक्त मान हलून नाही म्हणाली . आणि तिच्या चुरगळलेल्या साडीचा पसारा आवरत ………नीट  करत . अंघोळी साठी निघून गेली . आज कळल कि हे नक्की काय होत ? राजन बद्दलच  प्रेम जे तिला प्रत्येक वेळी त्याच्या जवळ ठेवायचं . आणि त्याची जाणीव हि झाली आज .
लग्न झालं ,पण नात आजून घट्ट झाल .
चैताली कदम