पुस्तक परिक्षण: जॉनी गॉन डाऊन

नमस्कार मंडळी, मध्यंतरी प्रोजेक्ट प्रेसेंटेशनसाठी बेंगलोरला आम्ही गेलो होतो तेव्हा माझा मित्र अजित उपाध्येने हे पुस्तक खरेदी केले. त्यादिवशी महाराष्ट्र मंडळात बसुन पुस्तक सहज चाळलं. प्रोलॉग जरा प्रॉमिसिंग वाटला म्हणून अजितला पुस्तक “वाचून देतो” अशी रिक्वेस्ट केली आणि ती त्याने अगदी झटक्यात मान्य केली. त्यामुळे सर्वप्रथम अजितला धन्यवाद! 🙂 या पोस्टपासून मी या ब्लॉगवर, वाचलेल्या पुस्तकांची परिक्षणे देखिल लिहिणार आहे. हा नवा प्रयत्न कसा वाटला हे नक्की कळवा

पुस्तक परिक्षण: जॉनी गॉन डाऊन
लेखक: करण/न बजाज
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Harper Collins

“किप ऑफ द ग्रास” या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणजेच करण/न बजाजचे हे दुसरे पुस्तक. वर म्हटल्या प्रमाणे प्रोलॉग अगदी प्रॉमिसिंग आहे. एखाद्या इंग्रजी सिनेमा असल्यासारखं पुस्तक कथेच्या मध्यातुन सुरू होतं. एक हात गमावलेला, अंगावर अगदी मळके कपडे असलेला कथेचा नायक भारतीय रेल्वेतुन प्रवास करत असतो. सहजच रेल्वेतील सहप्रवाशांशी गप्पा होतात. कथेचा नायक अगदी शांत, कदाचित “जीवनाच्या परम सत्यापर्यंत” पोहचल्यासारखा गंभीर असा वर्णीला आहे. रेल्वेतील संभाषणात तो “फ़ॉरेन रिटर्न” आहे हे सहप्रवाशांना पटत नाही. इतकी दयनीय अवस्था पाहता हे शक्यच नाही असा काहींचा समज होतो तर एक गृहस्थ, “बघा, परदेशात जाऊन ही अवस्था होत असेल तर त्यापेक्षा भारतच बरा” असा टोमणाही मारून जातात. पण नायकाला त्याची फिकिर नसते. तो अलिप्त असतो. त्याच्या क्वचितच बोलण्यात तो स्वतः “MIT” या जगविख्यात इंजिनिअरिंग कॉलेजचा ग्रॅज्युएट असल्याचे सांगतो आणि तेथुन पुढे कथा सुरुवातिला येते.

कथेची सुरुवात आणि प्रोलॉगची स्टाईल नकळतच चेतन भगतच्या “फाईव्ह पॉईंट समवन”ची आठवण करून देते. साधारण त्याच धाटणीची लेखन शैली, त्याच पद्धतीचे “कॉलेज लाईफ” संवाद, वाचायला मिळतात. फरक एवढाच आहे की या पुस्तकात “फ”काराने सुरू होणार्‍या शिव्या आणि नंतर ब्राझीलमध्ये नायक वास्तव्याला असताना टिपिकल माफ़िया स्टाईलच्या लेखनामुळे आलेले भरपुर “सेंसॉर्ड” शब्द मुक्त हस्ताने वापरले आहेत. त्यामुळे  “जेंटलमन” वाचक वर्गाला कदाचित ते पचणार नाही. 😉

तर कथेची सुरुवात MIT च्या कॉन्व्होकेशन सेरेमोनीत होते. कथेचा नायक निखिल आणि लंगोटीयार सॅम यांचे भन्नाट संवाद खरोखर मजा आणतात.या दरम्यान ते कंबोडियाला सुट्टी एंजॉय करायचा प्लॅन करतात. कंबोडिया का तर स्वस्त आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे तेथे व्हिसा लागत नाही म्हणून. दरम्यान निखिल NASA मध्ये सिलेक्ट झालेला असतो तर सॅम GE (General Electric)मध्ये. थोडक्यात दोघेही मोठ्या कंपनीत सिलेक्ट झालेले असतात.

आणि कथेला कलाटणी मिळते जेव्हा ते कंबोडियात येतात. कंबोडियाची सध्याची राजकीय परिस्थिती न पाहता ते तेथे दाखल होतात आणि मग सर्व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. कंबोडियात राजकिय अस्थिरता असते आणि ज्यामुळे नव्याने हुकुमशाहा उदयास आलेला असतो. जो त्याच्या वाटेत येईल ते सर्व उध्वस्त करत सुटलेला असतो. आणि अशा बिकट स्थितीत हे दोघे तेथे जातात. लवकरच स्थितीचे गांभीर्य़ त्यांच्या लक्षात येते. केवळ सॅमच्या हट्टापायी ते येथे आलेले असतात ज्यामुळे सॅमला प्रचंड मनस्ताप होतो. बर्‍याच गोष्टी घडतात. मग ते मदतीसाठी अमेरिकन एंबसीत जातात आणि तिथे लक्षात येते की निखिलचाच पासपोर्ट NASA ने अमेरिकी नागरिक म्हणून केलेला असतो तर GE ने अजुन सॅमला तसा पासपोर्ट दिलेला नसतो. आणि भारतीय एंबसीच तेथे नसते.  तेव्हा निखिल मनाचा मोठेपणा दाखवून आणि उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत सॅमला स्वतःचा पासपोर्ट देतो आणि त्याला अमेरिकेला परत पाठवतो आणि स्वतः  इतर नॉन अमेरिका पासपोर्ट धारकांबरोबर जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो.

तो कंबोडियन हुकुमशाही सैनीकांकडे पकडला जातो. १० वर्ष त्याचे भयानक हाल केले जातात. केले गेलेले हाल वाचताना अंगावर काटा येतो. तरिही तो त्यातुन पळ काढण्यात यशस्वी होतो. दरम्यान त्या छळात तो स्वतःचा एक  हातही गमावतो. नंतर तो रात्रंदिवस पळत-पळत थायलंडला पोहोचतो. तेथे तो बुद्ध धर्मगुरू होतो. ७-८ वर्ष धर्माची शिकवण घेतली तरी त्याचे मन त्यात रमत नाही. ते सर्व सोडून तो ब्राझील मधे जातो. तेथे त्याची भेट ड्रग माफिया मार्कोशी होते. एका कठीण प्रसंगी तो मार्कोचा जीव वाचवतो आणि लवकरच त्याचा पक्का मीत्र बनतो. बुद्धीच्या जोरावर तो मॉर्कोला नवा बिजनेस तयार करून देतो ज्यामुळे मॉर्को श्रीमंतीची शिखरे सर करतो. हळू हळू तो नकळत ब्राझीलमध्ये एक डॉन/माफिया म्हणून ओळखला जाऊ लागतो. माफिया बनल्यामुळे साहजीकच सतत जीवाशी खेळ. बर्‍याच गोष्टी घडतात ज्यामुळे त्याला ब्राझील सोडावे लागते व अमेरिकेत पुन्हा पळ काढावा लागतो. दरम्यान त्याला त्याचे प्रेम मिळते, मुल होते पण त्यांना सोडून त्याला अमेरिका गाठावी लागते.

मनावर सतत झालेला छळ, मिळालेली धर्मगुरूंची शिकवण आणि मनुष्यप्राण्याची पाहिलेली नवी रुपे त्याला गंभीर, घाबरट बनवतात. अमेरिकेत तो एका कंप्युटर गीक/किडयाला भेटतो. हळू हळू प्रोग्रामिंग शिकतो.पुन्हा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर करोडो रुपये मिळवता येतिल अशी वेबसाईट बनवतो पण पुन्हा स्वतः कही प्रॉफिट न घेता ती साईट त्या कंप्युटर गीकला सोपवून तो भारतात “मरण्याच्या” उद्देशाने येतो. बर्‍याच गोष्टी घडतात, आणि एक दिवस तो पुन्हा सॅमला भेटतो……

नंतर काय होते ते मी सांगत नाही. कारण बरच मी आधीच सांगितलं आहे. पण ओव्हरऑल एक छान पुस्तक आहे.

का वाचावे

-पुस्तक स्टार्ट-टु-एंड वाचकाला खिळवुन ठेवते. “पुढे काय” असा सतत प्रश्न वाचकाला पाडण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

-एका भारतिय लेखकाने लिहिलेले माझ्या वाचनात आलेले हे सर्वोत्तम इंग्रजी पुस्तक आहे. वापरलेल्या वाक्यरचना, शब्द खरोखरच जेफ्री आर्चर वगैरे दिग्गज इंग्रजी लेखकांची आठवण करून देतात. तितकेही मुरलेले लेखन नाही पण मी तरी या लेखनावर इंप्रेस झालो.

का वाचू नये

-कथेत नायकाच्या जिवनाला मिळणार्‍या कलाटण्या, भरपूर योगायोग, जेम्सबॉंड स्टाईलने अशक्य अशा संकटांवर होणारा विजय, इत्यादी गोष्टी पटत नाहीत. एक कथा म्हणून ठीक आहे पण “इमॅजनरी” लेखन असल्याने ह्या उणीवा राहिल्या आहेत.

-वर म्हटल्याप्रमाणे “फ”कारार्थी आणि सेंसॉर्ड शब्दांचा मुक्त हस्ताने वापर काही क्षणी विनाकारण केल्यासारखा वाटतो.

ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. एकवेळ आवश्य वाचण्यासारखे आहे. माझ्या मते मी या पुस्तकाला रेटिंग देईन:

 

गंध

गेल्या महिन्यात घरी रंगकाम चालू होतं, मला तो रंगाचा विशिष्ट वास फार आवडतो. दमेकरी लोकांना त्रास होतो म्हणून आजकाल स्मेललेस – गंधरहित रंग येतात. ज्यांना त्रास होतो त्यांच ठिक आहे, पण आठवडाभर घरात तो नव्या कोर्‍या पेंटचा वास आला नाहि तर रंगकाम झालय हे डोळ्यांना दिसलं तरी मनाला पटत नाहि. काहितरी कमी आहे असं वाटत राहतं.

“गंध” हि सजिवांना मिळालेली किती सुंदर गोष्ट आहे? विचार करता करता लक्षात आलं कि आपलं रोजचं आयुष्य सुध्दा किती गंधाळलेलं आहे. किती म्हणून गंध मोजाल? नव्या कोर्‍या पुस्तकांचा तो विशिष्ट वास? आणि नव्या दप्तरचा, छत्रीचा, रेनकोटच्या रबराचा किंवा प्लास्टिकचा नवा नवा वास …. शाळेत असतानाचा जूनचा सुरु झालेला पाऊस आणि या सगळ्यांचा एकत्रीत गंध मी कधीच विसरु शकत नाही.

पावसावरुन आठवलं उन्हाने रापून तडे गेलेल्या जमीनीवर पहिल्या सरी पडल्या कि वातावरणात एक सुखावणारा मातीचा गंध पसरतो. त्या वासाला दुसर्‍या कशाचीहि सर नाहि, कॉम्पिटिशन तर नाहिच नाहि. का ते माहित नाहि पण कालिदासाच्या मेघदूताचे नाव निघाले कि आपसूक हा गंध नाकाजवळ पिंगा घालतो, स्वर्गिय काव्य तितकाच स्वर्गिय गंध त्यामूळेहि असेल कदाचित. तो मातीचा वास अंगभर माखून घ्यावासा वाटत राहतो.

डोंगर दर्‍यात व त्यातुनही दाट जंगलातून फिरताना तुडवल्या गेलेल्या रोपट्यांचा – गवताचा एक टिपिकल वास आपली सोबत करत असतो. पावसाळा असेल तर पचपचीत झालेल्या ट्रॅकपॅन्टला गुडघ्यापर्यंत तोच वास असतो. त्याच डोंगर दर्‍यांतल्या गुहांमध्ये – लेण्यांमध्ये रात्र काढा कधीतरी, वटवाघुळांनी – पाकोळ्यांनी भरलेल्या त्या गुहांतला तो उग्र दर्प किंवा सरळ दुर्गंधच म्हणायला हरकत नाहि, छातीभरुन श्वास घेऊच देत नाहि. हां नाहि म्हणायला गड किल्यांवरच्या मंदिरात जिथे गावकरी नेमाने दिवा-बत्ती करतात तिथे तेलाचा, खांबांना पुसलेल्या शेंदुराचा मिक्स वास असतो. त्या वासानेहि अंधार्‍या रात्रीत आपसूक सुरक्षित वाटतं.

हे झालं डोंगर दर्‍यांच, पण प्रत्येक गावाला – शहराला स्वत:चा गंध असतो. एप्रिल महिन्यात कोकणात एखाद्या आमराई जवळून संध्याकाळी चक्कर मारा बरं. आंबेमोहराचा घमघमाट आणि कोकण हे समिकरण डोक्यात कसं आपोआप फिट्ट बसेल. किंवा एखाद्या गोठ्याजवळून जाताना शेण – गवत यांचा एक थंडगार गंध परत परत घेत रहावासा वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसात, सकाळिच शेणाने सारवलेल्या पडवीत करकरणारी काथ्याच्या दोर्‍यांची खाट, त्यावर जाडं भरडं कांबळ टाकून रात्री तारे मोजत मोजत झोपण्यातलं सुख अवर्णनिय आहे. ते सुख जितकं मोकळ्या आकाशाखाली झोपण्यातलं असतं तितकच नकळतपणे त्या सारवलेल्या अंगणाचा येणार्‍या गंधाच देखिल असतं.

प्रत्येक घराला, घराच्या प्रत्येक खोलीला, खोलितल्या कपटांना आपापला गंध असतो. आवरण्याच्या निमित्ताने जुनी पेटि उघडली कि त्यातुन विशिष्ट गंध येतो. तो गंध केवळ त्या वस्तूंचा नसतो …. आठवणींचा देखिल असतो. जुने – लहानपणीचे कपडे, फोटो, मळक्या किंवा मोडक्या तरीहि हव्याहव्याश्या वाटणार्‍या – न टाकवणार्‍या बाहुल्या किंवा खेळणी. त्यांचा ठेवणीतला वासच फार लाडिक असतो, म्हणजे, कामात डोकं घालुन बसलं असताना कोणीतरी छोट्या छोट्या हातांनी मागुन गळ्याला मिठी मारावी आणि बोबडं बोबडं “चल ना लेऽऽऽ खेलूया आपन!” असं म्हणाव ….  कि टाकायला म्हणून काढलेल्या जवळपास सगळ्या गोष्टि परत तश्याच त्या पेटित जातात.

अजून एक सुखावणारा प्रसन्न वास म्हणाजे सणासुदिच्या दिवशी किंवा घरात शुभ कार्य असताना स्वयंपाक खोलीतून येणारा अन्नाचा एक विशिष्ट मिश्र वास. एरवी कधी तेच सगळे पदार्थ जसेच्या तसे केले तरी “तो” गंध इतर दिवशी नाहि येत हेहि खरआहे. खास करुन मसाला उदबत्तीची सुगंधी वलय पंक्तीत आजूबाजूला तरंगत आहेत, पानात वरण-भात-साजूक तूप, केळं घालून केलेला नैवेद्याचा शीरा किंवा खीर, बटाट्याची भाजी, डाळिंबीची उसळ या दोन – चार पदार्थांचा मुख्य व त्यात कोशिंबीरी, पातळ भाज्या, लोणची यांचा “मी पण! मी पण!!” करत मिसळला गेलेला सुगंध … वा (…. मी खुलासेवार वर्णन करत अजून नाही लिहू शकत कारण मला भूक लागायला सुरुवात झालीये आता!). म्हणजे आधी गंधाने, मग डोळ्यांनी व त्यानंतर जीभेने अन्नाची चव घेतली जाते.

गंध नसता तर अनेक सुखांना मुकलो असतो. Anosmia नावाचा आजार असलेल्यांची गंध घेण्याची जाणीव कमी कमी होत जाते, अश्यांची नंतर काय घुसमट होत असेल? मध्ये “गंध” याच नावाने एक मराठी चित्रपट आला होता त्यात HIV बाधीत व्यक्तीची भूमिका मिलिंद सोमणने उत्तम वठवली होती त्यात त्याच्या गंध घेण्याच्या ताकदीवर परीणाम झाला असतो त्यातली मनावर सर्वात जास्त ओरखाडा काढणारी गोष्ट म्हणजे त्याची बायको (सोनाली कुलकर्णी) न्हाऊन आल्यावर तो तिच्या ओल्या केसांचा गंध घेत असतो पण तो गंध न आल्यावर त्याने दाखवलेली बेचैनी आतवर बोच लावणारी आहे. या उलट तसाच चित्रपटातला संदर्भ पण सुखद शेवट करणारा म्हणजे “श्वास” चित्रपटाचा शेवट, कोकणात आपण आपल्या गावात आलोय हे अंध झालेल्या छोट्या्या परश्याला तो आपल्या गावाचा ओळखीचा हवाहवासा वाटणारा गंध छातीभर भरुन घेतल्यावर समजते, त्यावेळच्या त्याच्या आनंदाने वाजविलेल्या टाळ्या आपल्याहि चेहर्‍यावर आपसूक आश्वासक हसू आणतात.

एकदा विचार करुन बघा आपलं आयुष्य या गंधांनी किती सुखकर बनवलय. चार दिवस घरा बाहेर असाल तर घराचं दार उघडल्यावर आधी मनभरुन घराचा ऊबदार गंध घ्या, घर त्यानेच तुमचं स्वागत करेल. जेवण झाल्यावर एकदा नॅपकिनला हात – तोंड पुसण्या ऐवजी कधीतरी घरातल्या आजी, आई, मावशीच्या पदराला तोंड पुसा, तो गंध साठवून घ्या.

तसा शैक्षणिक दृष्ट्या  “ढ” असल्याने आजवरच्या आयुष्यात दुसरं काहिहि नसेल पण मी एक गोष्ट शिकलोय, रंग आणि गंध या दोन गोष्टि फार सुंदर आणि हळव्या असतात तुम्हि त्यांना जितका जीव लावाल तितकच ते तुमचं आयुष्य रंगीत करतील –  गंधाळलेलं करती. क्वचित तो गंध दु:खाचाही असेल, वादळि रात्रींचा अनामिक सुगंध देखिल असेल. पण तो गंध खरा असेल, निर्मळ असेल ….. अगदी एका हातात मोर्चेल घेऊन दुआ देत फिरणार्‍या फकिराच्या त्या धुपाटण्यातल्या गंधा इतकाच.

 – सौरभ वैशंपायन.

पांडुरंगांची व्यंगचित्रे

महाराष्ट्राचे  आराध्यदैवत असलेल्या पांडुरंगाचे पंढरपूर हे ज्यांचे जन्मस्थान होते त्या, खऱ्या तर खूप मोठ्या, पण वादग्रस्त चित्रकाराला, म्हणजेच पैगंबरवासी मकबूल फिदा हुसेन ह्यांना  सर्वांच्या  भावना दुखावणारी  लक्ष्मी,सरस्वती आणि  भारतमातेची  नग्नचित्रे  काढल्याने ह्या देशातून परागंदा होऊन, लंडनला जाऊन अल्लाला प्यारे व्हावे लागले होते,त्या मुळे पांडुरंगांची व्यंगचित्रे असे वाचल्यावर आपल्या भुवया वर जाणे स्वाभाविक आहे.पण केवळ नाव साधर्म्या व्यतरिक्त ह्या पांडुरंगाचा नि आपल्या त्या पांडुरंगाचा काही एक संबंध नाही.उलट ह्या जेष्ठ कन्नड व्यंगचित्रकाराची मराठी वाचकांना माझ्या तर्फे थोडीशी तोंडओळख करून देण्याचा आणि आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करून,ह्या महान व्यक्तिमत्वाला सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

हे आहेत कर्नाटकातील बंगलोरचे जेष्ठ व्यंगचित्रकार श्री.बी.व्ही.पांडुरंगा राव.मध्यप्रदेशातील भिलाई स्टील प्लांट मधून जेष्ठ व्यवस्थापक म्हणून २००१ साली निवृत्त झाल्या नंतर हे बंगलोरला स्थाईक झाले आणि स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून  त्यांचा ह्या क्षेत्रातील प्रवास अधिकच जोमाने सुरु झाला. ह्यांनी १९६५ साली अमेरिकेतल्या Cleveland मधील रे बर्न्स  ह्या कार्टुनिंग स्कूल मधून डिप्लोमा घेतला आहे.आजपर्यंत ह्यांची असंख्य व्यंगचित्रे कन्नड,हिंदी आणि इंग्रजी दैनिकातून नियमितपणे आणि इतर प्रकाशनां मधून प्रसिद्ध झाली आहेत,तसेच असंख्य व्यंगचित्रे आजवर आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांच्या उत्सवात,प्रदर्शनात प्रसिद्ध झाली असून २९ वेळा ती आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांच्या अल्बम मध्ये प्रसिद्ध केली गेली आहेत.एवढेच काय तर  त्यांनी  देशभरात आजवर ३७ वेळा त्यांच्या व्यंगचित्रांचा एकपात्री कार्यक्रम सादर केला आहे.त्याची नोंद २०१०-११ साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून घेतली गेली आहे.सर्वात छोट्या आकाराच्या त्यांच्या फ्लिप बुक अँनिमेशनची, ह्या क्षेत्रातील “राष्ट्रीय विक्रम” म्हणून २०१०-११ साली नोंद सुद्धा आहे.ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुण,होतकरुंच्या साठी त्यांनी अनेक शिबिरांचे आजवर आयोजन केले आहे.  
त्यांनी कर्नाटक कार्टूनिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविण्या बरोबरच भिलाई स्टील प्लांट आणि मध्य प्रदेश विभागवार क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडू म्हणून  प्रतिनिधित्व केले आहे  आणि मध्य प्रदेश राज्यस्तरीय क्रिकेट मंडळाचे अधिकृत पंच (क्रिकेट अम्पायर) म्हणून देखील काम पहिले आहे.खेळातील त्यांचे प्राविण्य फक्त एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी मध्य प्रदेश विभागवार बॅङमिंटन स्पर्धेत सुद्धा भाग घेतला आहे.अशा ह्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची हि नुसती तोंड ओळख आहे कारण एखादी व्यक्ती किती ब्लॉग्ज सुरु ठेवू शकते,काढू शकते किंवा निदान त्याचा एक हिस्सा बनू शकते त्याचे हे गृहस्थ म्हणजे एक मासलेवाईक उदाहरण आहे.ह्यांचा प्रोफाईल बघितला असता हे गृहस्थ १-२ किंवा १०-२०नव्हे तब्बल ६२ ब्लॉग चालवतात/लिहितात /त्यांच्या व्यंगचित्रांनी रंगवतात हे बघितल्यावर आश्चर्य चकित होऊन आपोआपच तोंडात बोट जाते.

तर अशा ह्या अफलातून व्यंगचित्रकाराची काही व्यंगचित्रे मध्यंतरी माझ्या पाहण्यात आली नि त्या वरील “पांडुरंगा” ह्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सहीने त्याचा मागोवा घेत गेलो असता ह्या अफलातून व्यक्तिमत्वाची ओळख झाली.खरेतर त्यांच्या व्यंगचित्रांना भाषेची गरजच नाही/नसते तरीही नेहमी प्रमाणे मी त्यातील काही व्यंगचित्रांचे माझ्या सवयीने  स्वैरानुवादाने मराठीकरण केले आहे.हि व्यंगचित्रे वाचकांचा या वेळच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करतील ह्यात शंका नाही.चला तर मग ……. 

आणि हे श्री.बी.व्ही.पांडुरंगा राव. त्यांच्या राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झालेल्या सर्वात छोट्या आकाराच्या फ्लिप बुक अँनिमेशन सोबत ..

हे पोस्ट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून श्री.पांडुरंगा रावांच्या ६२ ब्लॉग पैकी काही ब्लॉगमधील, काही निवडक व्यंगचित्रांचे संकलन आहे.त्या मुळे मी श्री.बी.व्ही.पांडुरंगा रावांचे ह्या प्रसंगी आभार मानतो.ज्या कुणाला ह्या विषयात गती, रुची नि आवड असेल त्यांनी श्री.रावांच्या  http://www.paanducartoonist.blogspot.com/ ह्या ब्लॉगला एकवार अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.

  

‘फॉर्म्युला वन’ची बाराखडीबघता बघता पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा येथे तयार करण्यात आलेल्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारतातील ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत पार पडणार असून यानिमित्ताने प्रथमच भारतात या महागड्या खेळाचे आगमन होणार आहे.
गेल्या काही वर्षांपर्यंत खरंतच भारताचा या खेळाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. मात्र टी.व्ही.च्या माध्यमातून कधीतरी रविवारी सकाळी स्पोर्ट्स चॅनेलवर तब्बल ३०० किमी प्रति तास या वेगाने पळणाऱया या गाड्या पाहून अनेकांचे कुतूहल चाळवले जायचे. त्यात या काळात मायकल शूमाकररुपी हिरो या खेळाला सापडला आणि असंख्य भारतीय तरूणांनीही त्याला डोक्यावर घेतले. परंतु तोपर्यंत या खेळात भारताचे असे काहीच स्थान नव्हते. त्याची सुरूवात झाली ती नरेन कार्तिकेयन या भारतीय ड्रायव्हरने जेव्हा फॉर्म्युला वनच्या शर्यतीत भार घेतला तेव्हा. मात्र कार्तिकेयनला यात फारशी चमक दाखवता आली नाही आणि त्याने एफ वन शर्यतीत ड्रायविंग करायचे थांबवले.
त्यानंतर २००७ सालच्या एका घटनेने मात्र भारतीयांना कायमचे या खेळाशी जोडून टाकले. भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी तब्बल ९० मिलियन युरो मोजून फॉर्म्युला वनमधील स्पायकर हा संघ विकत घेतला आणि नंतर त्याचे फोर्स इंडिया असे अस्सल भारतीय नामकरणही केले. मात्र आपण एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे की, खरंतर फॉर्म्युला वनमधील संघ किंवा ड्रायव्हर्स हे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसतात. हा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा खेळ आपल्याला म्हणता येईल. बड्याबड्या उद्योगपतींचे त्यांच्या कंपनीच्या नावाने ओळखले जाणारे संघ आणि त्यात असणारे देशविदेशातील नानाविध खेळाडू असे साधारण या खेळाचे स्वरूप असते. त्यात कोणीही कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसते.
२००७ मधील विजय मल्ल्यांच्या या सीमोल्लंघनामुळे भारतीयांना फॉर्म्युला वन हा खेळ जरा जास्तच आपलासा वाटू लागला. आणि याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी मल्ल्यांच्याच पुढाकाराने यंदा पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. अर्थात एफ वनची शर्यत भारतात आयोजित करण्याचे ठरवले गेले.
एफ वनची बऱयापैकी माहिती झाली असली, तरी नेमका हा खेळ कसा खेळला जातो, त्यात कोण विजयी ठरतं, काय नियम असतात असे बरेच प्रश्न भारतीयांना सध्या पडले आहेत. त्यामुळे फॉर्म्युला वन हा खेळ समजावून घेण्यापूर्वी त्यातील काही विशिष्ट संज्ञांची ओळख असणे फार महत्त्वाचे ठरते. आज त्यापैकी काही महत्त्वपूर्ण संज्ञा पाहूयात.
ग्रॅड प्रिक्स किंवा ग्रां. पी. – फॉर्म्युला वन किंवा एफ वनमध्ये ग्रां. पी. हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानी पडतो. हे ग्रां.पी. म्हाणजे दुसरे तिसरे काही नसून शर्यत असा त्याचा सरळसाधा अर्थ आपण घेऊ शकतो. उदा. इंडियन ग्रां.पी. प्रत्येक वर्षी किती ग्रां. पी. भरवायच्या आणि त्या कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक वर्षाच्या सुरूवातीलाच तयार केले जाते. जगाच्या विविध कोपऱ्यात या शर्यती भरवल्या जातात. दरवर्षी या शर्यंतींचा आकडा १-२ ने बदलत असतो. यंदाच्या मोसमात (२०११) एकूण १९ शर्यती पार पडणार आहेत. ३० तारखेला नॉयडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पार पडणारी शर्यत या हंगामातील १७ वी ग्रां.पी. आहे. यावर्षी २७ मार्चला झालेल्या मेलबर्न ग्रां.पी.ने मासमाची सुरूवात झालेली, तर २९ नोव्हेंबरला ब्राझीलमधील साओ पालो ग्रांपीने या मोसमाचा शेवट होणार आहे.
सर्किट– सर्किट म्हणजेच एफ वन शर्यतींसाठी बांधण्यात आलेला खास रस्ता. फॉर्म्युला वनच्या कार्स या प्रचंड वेगाने पळत असल्याने साध्या नेहमीच्या रस्त्यांवर त्या पळणे शक्य नसते. त्यासाठी खास वेगळ्या प्रकारचे रस्ते बांधावे लागतात. भारतातील शर्यतीसाठी बांधण्यात आलेल्या या सर्किटचे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट असे नामकरण करण्यात आलेले आहे. तब्बल ८७५ एकर इतक्या परिसरात हे सर्किट असून त्याची लांबी साधारण ५.१४ किमी इतकी आहे. साधारण दीड लाख लोक या शर्यतीचा याचि देही याचि डोळा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रॅक किंवा सर्किटवर एकूण १६ वळणे आहेत, जिथे ड्रायव्हर्सची खरी कसोटी लागणार आहे. सरळ रस्त्यावर तब्बल ३२० किमी प्रति तास इतका वेगही ड्रायव्हर्स गाठू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर वळणांवर मात्र साधारण २१० किमी प्रति तास इतका वेग असेल.
लॅप– एफ वनची एखादी शर्यत पूर्ण करण्यासाठी किंवा ती जिंकण्यासाठी ड्रायव्हर्सना या सर्किटला ठरवलेल्या संख्येएवढ्या फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजेच या सर्किटचे हे साधारण ५.१४ किमीचे अंतर पुन्हा पुन्हा कापावे लागते. या सर्किटची एक फेरी म्हणजेच लॅप. प्रत्येक शर्यतीत त्या सर्किटच्या लांबीचा विचार करून लॅपची संख्या ठरवण्यात येते. ती साधारण ६० ते ८० च्या दरम्यान असते. इंडियन ग्रां.पी. मध्ये ६० लॅप्स असणार आहेत. म्हणजे एका कारला या सर्किटला ६० फेऱ्या मारायच्या आहेत.
ड्रायव्हर्स आणि कंस्ट्रक्टर्स – एफ वनच्या भाषेत एखादा संघ म्हणजेच कंस्ट्रक्टर. जगभरातील विविध कंपन्या या एफ वनमधील संघांच्या मालक आहेत. यंदाच्या मोसमात एकूण १२ संघ आहेत. फेरारी, रेडबुल, मॅक्लेरन, मर्सिडीज, विलियम आणि अर्थात विजय मल्ल्यांची फोर्स इंडिया ही त्यापैकी काही नावं आपण ऐकली असतील. याप्रमाणेच एचआरटी, टोरो रोसो, वर्जिन, सौबर, टीम लोटस हे इतर संघ किंवा कंस्ट्रक्टर आहेत.
प्रत्येक संघाचे किंवा कंस्ट्रक्टरचे दोन ड्रायव्हर्स शर्यतीत उतरतात. म्हणजे यंदा १२ संघांचे २४ ड्रायव्हर्स हे या शर्यतींमध्ये स्पर्धक म्हणून भिडतायत. मायकल शूमाकल, जेन्सन बटन, सेबेस्टियल वेटेल, फर्नांडो अलोन्सो, मार्क वेबर, लुईस हॅमिल्टन हे सध्याचे काही आघाडीचे ड्रायव्हर्स म्हणता येतील. विजय मल्ल्यांच्या फोर्स वन संघातर्फे अड्रियन सुटिल आणि पॉल दि रेस्ता हे दोन ड्रायव्हर्स आपल्याला इंडियन ग्रां.पी. मध्ये भाग घेताना दिसतील.
गुण– प्रत्येक शर्यतीत विजयी होणाऱ्या म्हणजेच सर्वात कमी वेळात त्या सर्किटचे ठरवण्यात आलेले लॅप्स पूर्ण करणाऱ्या ड्रायव्हरला विजयी घोषित करण्यात येते. आणि त्यानंतर इतर ड्रायव्हर्सचेही त्यांच्या वेळेनुसार पुढील क्रमांक लावले जातात. प्रत्येक शर्यतीनंतर त्या शर्यतीतील त्यांच्या क्रमांकानुसार ड्रायव्हर्सना काही गुण दिले जातात. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास २५ गुण, दुसऱ्या क्रमांकाच्या ड्रायव्हरला १८, तिसऱ्याला १५, चौथ्याला १२, पाचव्याला १०, सहाव्याला ८, सातव्याला ६, आठव्याला ४, नवव्याला २ आणि दहाव्या क्रमांकावारील स्पर्धकाला १ गुण दिला जातो. वर्षाअखेरीस मोसमातील सर्व शर्यतीत मिळून सर्वात जास्त गुण पटकावणारा ड्रायव्हर त्या मोसमातील चॅम्पियन ठरतो. तर त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही ड्रायव्हर्सचे गुण मिळून ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात, त्या संघाला कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिप दिली जाते.
मोसमातील ३ शर्यती बाकी असल्या तरी यापूर्वीच आपल्या इतर प्रतिस्पर्ध्याच्या खूप पुढे निघून गेल्याने रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने यंदा जेतेपदावर कब्जा केला आहे. त्याचे आता ३४९ गुण झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील मॅक्लेरेनच्या जेन्सन बटनचे २२२ गुण आहेत. फेरारीचा फर्नांडो अलोन्सो हा २१२ गुणांसहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रेड बुलने मॅक्लेरेनला मागे टाकत ५५८ गुणांसहित कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिपवर दावा सांगितला आहे.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार,

सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Image from: www.theholidayspot.com

चला या दिवाळी एक वचन घेऊ, आज मी एका चेह-यावर हसू येईल. एखाद्याला आनंद मिळेल असे काही कार्य करणार. जेथे अंधार आहे त्या ठिकाणी प्रकाशाची एक ज्योत नेणार.

प्रदुषण टाळा.  पर्यावरण सांभाळा.

– नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

यशस्वी

यश म्हणजे काय? याविषयावर हल्ली माझं माझ्याशीच कडाक्याचं भांडण व्हायला लागलंय. आपण ज्या वाटेवरून चाललोय, त्या वाटेवर सध्या तर कौतुकच कौतुक वाट्याला येतंय आपल्या.. मग बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या वाट्याला ते थोडं जास्त येतंय हे दिसल्यावर पोटात का दुखतं आपल्या? प्रत्येकाचा स्वतःचा असा एक ‘पेस’ असतो… आणि त्यात सामावणारी प्रत्येकाची एक ‘स्पेस’ असते.. हे सगळं कळत असून ‘यश’ खेचून घ्यायचा अट्टाहास का चाललाय? कुठल्याही कार्यक्रमानंतर ‘कार्यक्रम छान झाला’, यापेक्षा “आज पाकीट आपल्याला किती, आणि ‘त्याला’ किती इतका घाणेरडा विचार का येतोय डोक्यात? तरी बरं, आत्ता कुठे सुरुवात होते आहे करियरला… जगण्याला. पण ‘जगणं’ नेमकं कळायच्या आधीच ही तुटत जाण्याची जाणीव कशामुळे येतेय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा.

हवं तेव्हा, हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही?
मान्यवरांनी पाठीवर शाबासकीची थाप देणं म्हणजे यश नाही?
प्रामाणिक समीक्षकांकडून कौतुकाची दाद येणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्रांना आपल्याकडे कधीही मन मोकळं करता येण्याचा विश्वास वाटणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्राने केलेला आघात विसरून त्याच्यावर तरीही प्रेम करता येणं, म्हणजे यश नाही?
एखादी सुंदर कविता, लेख, चित्रपट, शिल्प, चित्र यांचा आनंद घेता येणंसौंदर्याचं कौतुक करता येणं  म्हणजे यश नाही?
आपल्या प्रतिस्पर्ध्यामधलं चांगलं शोधता येणं म्हणजे यश नाही?
आपल्यामुळे किमान एक तरी जीव रात्री हसून झोपतो हे समाधान, म्हणजे यश नाही?
हे सगळं जमत होतं आपल्याला, अगदी आत्ताआत्तापर्यंत. मग तेव्हाच खरंतर जास्त यशस्वी होतो आपण असं म्हणायला हवं.. ही भूक, ही वखवख का? कुठून आली ती? कोणासाठी आहे आहे ती? माझ्यासाठी? पण मग मी तर खूप आनंदात असायला हवं. माझ्याचसाठी तर चाललंय सारं काही..
तसं होत मात्र नाही.. मग एक त्याचंही एक वेगळंच फ्रस्ट्रेशन. आणि पुन्हा लोकांच्या सहानुभूतीवर आपला अधिकारच आहे, अशी स्वतःचीच समजूत घालून घेणं. हे का लक्षात येत नाही की आपल्याला जे वाटतं, ते आपल्यासोबत जे घडतं त्यामुळे नाही. कारण आपण गोष्टी नेहमीच आपल्याला हव्या तशा इंटरप्रिट करू पाहतो. त्यांचं प्रत्यक्षातलं रूप आपल्याला बघायचं नसतं. मग त्या आभासी विश्वात रमणं सुरु होतं. आणि तेच आवडायला लागतं हळूहळू. कारण सरळ आहे, तसं करणं सोपं असतं. तिथे खऱ्याखुऱ्या प्रश्नांचा सामना करायचा नसतो. आपल्या पळपुटेपणा झाकायचा तो उपाय होऊन जातो.. पुढे जाऊन त्याची ज्यांना त्याची सवय होते, आणि जे असे सराईत पणे वागायला शिकतात त्यांना आपण ‘यशस्वी’ अशी उपाधी देऊन टाकतो. आणि मग त्यांच्या ‘सर्कल’ मध्ये शिरायची धडपड करत राहतो. या पद्धतीने ‘यशस्वी’ होणं तसं फार अवघड नाहीये. दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक, तुम्हाला नक्की काय हवंय हे  ठरवायचं. आणि मग त्यासाठी जी किंमत द्यावी लागेल, ती द्यायची. ती किंमत तुमचं समाधान, संसार, तत्त्वं, मन, यापैकी काहीही असू शकते. हे जमलं की मग आलंच सगळं !

माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. मला यशस्वीही व्हायचंय आणि ही किंमतही द्यायची नाहीये. त्यामुळे मी सध्या उलटा विचार सुरु केलाय.. ‘समाधानी’ होऊ शकेन का, याचा.. बघूया, त्यात ‘यशस्वी’ होता येतंय का ते. कारण इतकी खात्री आहे, की हे यश कायमचं टिकणारं असेल. माझं हसू हिरावणारं नाही, तर ते आणखी खुलवणारं असेल!

दिवाळी शुभेच्छा

8 महिन्यांपूर्वी फेसबुकवर एकीकरणाची सुरू केलेली ही मोहीम आज यशस्वी होत आहे हे पहाताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवार भागातील विखुरल्या गेलेल्या समाजाला फेसबुकवर एकत्र आणणे आणि समाजसुधारकांच्या कार्याची माहिती करून देणे हा आमचा पहिला उद्देश होता आणि त्यात आम्ही बऱ्यापैकी सफल झालो आहोत. १५० वर्षांपुर्वी किल्लेदार बाळोजीराव परुळेकर आणि रायसाहेब डॉ. खानोलकर तर १०० वर्षांपुर्वी राजाराम पैगीनकर यांनी सूरु केलेल्या एकत्रीकरणाच्या मोहिमेला मध्यंतरी विश्रांती मिळाली होती. ही मोहीम पुन्हा एकदा नव्या स्वरुपात सुरू करण आणि समाजाच्या विकासाला चालना देण हे मुख्य उद्देश होते आणि आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रायसाहेब डॉ. आर्. डी. खानोलकर, रावसाहेब शंकर मठकर आणि सुभेदार मेजर विष्णुपंत परुळेकर या त्रयींनी आपल्या कार्यकर्तृव्ताने समाजाला सन्मानाची जागा प्राप्त करून दिली. गोव्यात हेच काम राजाराम पैगीनीकर, दयानंद बांदोडकर आणि अनेक इतर दिग्गजांनी केले. या महान लोकांच्या कार्याची जाणीव तरूण पिढीला करून देणे अतिशय महत्वाचे आहे. त्याला एकच कारण आहे ते म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बंड पुकारून स्वत:च्या समाजाला चांगली स्थिती प्राप्त करून देण्यासाठी तत्कालीन विचारवंतांनी आणि सामाजासुधारकांनी जर प्रयत्न केले नसते तर कदाचीत आपण आजही अविकसीत राहिलो असतो. समाजाकडे मागे वळून पाहण्याची वृत्ती जर या दिग्गजांकडे नसती तर विचार करा आपण एवढी प्रगती केली असती का?
कोणतीही व्यक्तीपूजा न करता या महान लोकांचे विचार आचरणात आणत आपल्याला अजून प्रगती करायची आहे. त्यामुळेच सुरू केली ही मोहीम. अर्थात सुरुवातीला मी, माझी पत्नी विस्मयी आणि वडील असे तीनच सदस्य होते. ०७ फेब्रुवारी या दिवशी मी Abhishek Kolwalkar यांना add केले. माझ्या कुंटूंबाव्यतिरिक्त ते आपले पहिले सदस्य ठरले. त्यानंतर Samir Raikarji , Arun Bordekarji, Rohan Sakhalkar, Shashank Naik, Borkar Nitinkumarji यांना add केलं. दिवसेंदिवस आपलं कुटुंब वाढतच गेल. ०४ एप्रिलला आपल्याला Bakul Paigankar यांच्यासारखे active member मिळाले. आपल्या या मोहिमेत आपल्याला सदस्य वाढविण्यात मोठी मदत मिळाली ती Ankita Kundaikar, Bakul Paingankar आणि samir raikar यांची. त्यानंतर केवळ झंझावात. प्रत्येक कार्यात काहीना काही विघ्ने असतातच तसा आम्हालाही काही लोकांनी विरोध केला पण तो न जुमानता आपण प्रगती करत गेलो आणि अजूनही करू. अजून काही वर्षांनी आपला रजिस्टर महासंघ होईल यात शंकाच नाही. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे त्यासाठी कोणीही पुढाकार घेतला तरी त्याचे स्वागतच असेल.

गेल्या काही दिवसात आपण केलेल्या प्रगतीचा हा अल्प आढावा.  तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद.

शुभेच्छा!!!

दीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ!!!

फुल्ल बॉडी चेकप (…भाग १…)

बाप! किमान शंभर व्याख्या सहज असतील ह्या शब्दाच्या. लग्न झालेल्या पोरींच्या डोळ्यांच्या कडा सहज ओल्या करणार हा विषय आहे. पण तो क्षण, जेंव्हा एक स्त्री आई होते आणि एक माणूस बाप होतो, तो क्षण मात्र बहुतेक लोकांचा एकसारखाच असावा. स्वत:च्या बाळाला अगदी पहिल्यांदा मांडीवर घेऊन पहात बसण्यात ज्या भावना जाग्या होतात, त्या बाप लोकांच्या डोळ्याच्या कडा सहज ओल्या करुन जातात. माझ्या आयुष्यात सुद्धा तो सुखद क्षण एके दिवशी आला. पहाटेच बायकोला अ‍ॅडमिट केल आणि सुमारे पाच-सहा तासात ‘गुड न्यूज’ हा प्रकार काय असतो, त्याची अनुभूती झाली. डॉक्टर बाहेर आले आणि ‘सगळं नॉर्मल आहे’ अस सांगून निघून गेले. मग दना-दन फोन बाहेर निघाले आणि आमच्या बाळाचा जन्म ही एक ग्लोबल न्यूज झाली. पुण्याच्या एका प्रख्यात मॅटर्निटी हॉस्पिटल मधले सगळे लोक माझ्याचकडे पहात आहेत असा भास मला होऊ लागलेल; किंबहुना तसं एक्सप्रेशनंच मी चेह-यावर ठेऊन वावरत होतो. अर्ध्या तासात एक मध्यमवयीन नर्स, अत्यंत मक्ख चेह-याने बाळाला बाहेर घेऊन आली आणि त्याला माझ्या हातात दिल. ती पाठ फिरवून परतणार तोच मी तिला विचारलं,
‘नर्स! आणि माझी मिसेस…’‘सिस्टर म्हणा सिस्टSSSर!’, तेच मक्ख एक्सप्रेशन चेह-यावर ठेऊन तिने अत्यंत थंडपणे, पण जरा चढत्या स्वरातंच मला हटकलं.


‘बर सॉरी, सिस्टर! अहो पण माझी बायको कशी आहे ते सांगता का?’‘ठीक आहे’, असं म्हणून तिने पाठ फिरवली ती न परतण्या साठीच. म्हणजे एखाद्या टेस्टरला, त्याला नको असलेल्या प्रोजेक्टमध्ये काम करायला लावल्यानंतर जर विचारलं ‘काय रे किती डिफेक्ट आहेत?’, आणि जर तो ‘ठीक-ठाक’ असलं मोघम उत्तरला, तर मॅनेजरची जी चिड-चिड होईल, तीच माझी झालेली. नावडत्या व्यवसायात, अनिच्छेने काम करायला लागत असेल तर असा उत्साह निर्माण होत असावा.असो! मी दुर्लक्ष केलं आणि माझ्या सोन्याला मांडीवर घेऊन एका बाकावर बसलो. त्याचा अगदी पहिला-वहिला स्पर्श! सगळे कुटुंबीय घोळका करुन त्याला पहात होते. हॉस्पिटल मधे शांतता हवी असते म्हणून कुजबुजण्याचाच कल-कलाट चाललेला. अत्यंत भावूक क्षण होता तो. माझे डोले पाणावलेले, नाकातलं पाणी खाली पडू नये म्हणून मी चोंबाळून पुसत होतो. बहीण, आई, आजीची, ‘काय बाबा, कसं वाटतंय!’ अशी चिडवा-चिडवी चाललेली. दूर एका कोप-यात बाबांना हर्षवायूचा अ‍ॅटॅक आलेला. कोणालातरी मोबाईलवरून ते बातमी सांगत होते, आणि तितक्यात माझा फोन व्हायब्रेट झाला. अभिनंदनाचे कॉल्स येत होते म्हणून मी त्याच अपेक्षेने फोन कानाला लावला
‘अभिनंदन सर! नवीन बाळाच्या आगमनासाठी तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा’, समोरचा अनोळखी आवाज, अत्यंत उत्साहात बोलत होता.
‘थँक्स थँक्स. कोण बोलतंय?’   तमुक बँकेचं नाव घेऊन त्याने चक्क एका इंश्युरन्स पॉलिसीचा उल्लेख केला. मला जितका आनंद मुलाच्या जन्माचा झालेला, तितकाच धक्का ह्या ईसमाच्या पुढच्या वाक्याने झाला.
‘सर मी फार वेळ नाही घेणार तुमचा. आता जे बाळ तुमच्या मांडीवर झोपलं आहे, त्याचं आगमन हे सुखकारक, पण तितकंच जबाबदारीचं नाही का! तुम्ही एक जबाबदार फादर आहात याची मला पूर्ण खात्री आहे, आणि म्हणूनच आमची बँक आपल्या सारख्या सूज्ञ वडीलांसाठी ‘पित्रुत्व दातृत्व सुरक्षा’ असा प्लॅन घेऊन आली आहे.’मी खरं सांगू, माझं टाळकं सरकलं होतं! तासा भरात ह्या बँके पर्यंत हे सगळे डीटेल्स कसे पोहोचले हे गूढ मला सुटेना. मी त्याची बड-बड मधेच कापत बोललो‘अरे मित्रा आत्ता मी खरच ह्या मूड मध्ये नाहीये. प्रसंग काय, तुझं चाललंय काय!’पण तो अतीशय थंडपणे, ‘सर, तुम्ही रागावू नका, पण ही पोलिसी तुमच्या बाळाला ह्या क्षणापासूनच कव्हर करायला सुरु करतीये. आहो त्या बाळाकडे एकदा बघा…’मी मान खाली वाकवली तर बाळ माझ्या मांडीवर नव्हतच. ह्याच्या फोनच्या नादात, ते माझ्या आईने कधी तिच्या मांडीवर घेतलं, ते मला कळालं सुद्धा नाही.‘… एकदा बघा की तुमचं बाळ कीती निरागस, कीती डिपेंडंट आहे ते. पण समजा तुम्हाला ह्या क्षणाला काही झालं, काही अघटित घटना घडली, तर कोण आहे त्याच्या पाठीशी!…’आता ह्या क्षणाला असलं अभद्र कोण आणि कसं बोलू शकतो यार! पण हा बोलला आणि नंतर एक गिल्ट फीलिंग सुद्धा देऊन गेला.‘…अहो तुम्हाला तरी फार उशीरा जाणीव होतीये, नाहीतर काही जबाबदार पालक लग्नानंतर, आणि हनीमूनच्या आधीच, लगेचंच ही पॉलिसी उचलतात; मूल होईल तेंव्हा होईल’, जबाबदार पालक म्हणे! इतकं गिल्टी-गिल्टी वाटू लागलेलं म्हणून सांगू! पण तेवढ्यावंर हा थांबला नाही. पुढे टेंन्शन प्रक्रीया सुरू झाली.‘…आता तुमचं हॉस्पिटलचंच बील घ्या; अडोतीस हजार, सातशे बावन्न! हे असले खर्च आता वाढत जाणार. इंजेकशन्स, लशी, औषध, चेकंप्स, हे कमालीचं महाग आणि आवाक्या बाहेर आहे आज. तो सगळा खर्च आम्ही कव्हर करणार आहोत आणि शिवाय टॅक्स बेनीफिट सुद्धा!’जे बील मी अजून पाहीलं सुद्धा नव्हतं, ते ह्याला ‘सातशे बावन्न’ इतकं अ‍ॅक्यूरेट माहीत होतं. गंमत अशी होती की हा फोन कट करण्या ऐवजी मी कानावर का धरला होता हे माझं मलाच समजलं नाही. मला एक डाऊट आला, की हा माणूस माझ्यावर पाळत ठेऊन आहे, म्हणून मी नजर फिरवून एकदा पूर्ण होस्पिटल पाहीलं. सगळे मोबाईलवाले मला हा एजंट वाटू लागले. पण तेवढ्यात माझी नजर हॉस्पिटलच्या रीसेपशनकडे गेली. तिथे ह्या विख्यात बँकेने स्वत:चं टेबल टाकलेलं दिसलं आणि तेंव्हा सगळं गूढ उकललं गेलं. पुढचे सुमारे वीस मिनीट ह्या माणसाने मला इंन्श्यूरन्स प्लॅन सांगीतला आणि फायनली त्या दिवशी मी दोन बिलं फाडली; एक होस्पिटलचं, दुसरं हे ‘पित्रुत्व दातृत्व सुरक्षा’.महिने उलटंत गेले आणि तसं आमच्या बाळाच्या लशी, चेकप व तत्सम कार्य सुद्धा कालांतराने पार पडत गेले. आमच्या बाळाची पहीलीच पोलिसी इतकी बोगस निघाली की त्यांच्या ‘कंडीशन्स अ‍ॅप्लाय’ मुळे माझ्या हाती काहीच लागलं नाही. बर पुन्हा वरती ‘बारश्यासाठी पर्सनल लोनचे’ फोन सतत सुरूच. संतापून ‘कोणताच मेडीकल इंश्यूरन्स मी कधीच काढणार नाही’ अशी प्रतिज्ञाच मी घेतली.दैवंयोगाने म्हणा कींवा नशीबाने म्हणा, पण मला पुन्हा अशाच पॉलिसीच्या उंबरठ्यावर कोणीतरी आणून उभं केलंच. काही महीनेच उलटले होते आणि अचानक कंपनीतल्या एका मित्राचे वडील वारल्याची बातमी कळाली. त्यांची नुकतीच बायपास सर्जरी झालेली, पण नाही वाचले ते. अगदी जवळचाच मित्र आहे म्हणून खूप वाईट वाटलं. पण त्याच बरोबर अजून एक तपशील समजला की एकूण चार लाख रुपये खर्च आलेला काकांच्या ट्रीटमेंटला. ह्या विषयाचीच रीघ मागे ओढत मग ‘मेडीकल इंशूरन्स’ हा विषय पोरांनी माझ्याच क्यूबीकल मध्ये सुरू केला. अत्यंत विरोधात असलेलं माझं मन सुमारे तासाभराच्या डिस्कशन नंतर पुन्हा गिल्ट फीलिंगचं गाठोड घेऊन उभं होतं. आमच्या कंपनीत सत्यजीत नावाचा एक कामगार होता. होता म्हणजे तो अजून सुद्धा आहे, पण फार काळ एकाच कंपनीत ‘तो आहे’ असं म्हणायला तो टिकत नाही. आर्थिक गुंतवणूकीचा हा महागुरू. त्याला मी गाठलं आणि त्याच्याचकडून एका कडक ‘मेडीकल इंश्यूरन्सचे’ डीटेल्स घेतले. त्यानेच एका एजंटचा नंबर सुद्धा दिला जो मला त्याच संध्याकाळी भेटायला घरी आला.‘हिते, हिते, हिते, हिते, हिते आनि हिते’, फॉर्मवरती सह्यांसाठी फुल्या मारून दिल्या माझ्या एजंटने.‘आपलं नाव काय म्हणालात?’, मी त्याला विचारलं.‘गन्या!’‘गण्या, म्हणजे गणेश का गणपती?’, मला खरं तर थोडं हासायला येत होतं, कारण त्याने स्वत:ची सही सुद्धा ‘गण्या’ ह्या नावानेच केली होती.‘ते नावाचे डीटेल्स राहूदेत सर!’, गण्या थोडास ओशाळून उत्तरला. तितक्यात गण्याचा फोन वाजला. फोन उचलल्या बरोबर लगेचंच गण्या सुरू झाला.‘… हा बोला काका. तुमचा संडासचा काय शीन असतोय?’मला जरा धक्का मिश्रित एक ऑक्वर्ड फीलिंग एकदम आलं. पलीकडचा कोणी का असेना, पण फोन उचलल्या बरोबर लगेच हे स्टेटमेंट!‘…अहो काका म्हंजे तुमचा येत्या शनवारी मेडीकल चेकप असनारे. फुल्ल बॉडी चेकप! सकाळी सात वाजत तेश्ट सुरू होतेत. पहिलीच श्टूल टेस्ट अस्तिये. तसंच यायचं, परसाकडला न जाता…’, गण्या रूल्स सांगू लागला. मी अंदाज बांधला की हे मला सुद्धा लागू असणारेत. म्हणून गण्याचं मी पुढे ऐकू लागलो, ‘… लागलीच रक्त तपासनी असतिये काका. म्हनून बारा तास आधी पासूनच जेवन-खान बंद. पोट मोकळं असावं लागतय तिथं. चेकपला भरपूर गर्दी असतीये. सकाळी सहालाच रांगेत थांबायचं, म्हंजे दुपारी चार पर्यंत मोकळे होता तुम्ही. मी असतोच तिथं. सगळे नियम लक्षात ठेवा काका आनि भेटा शनवारी सकाळी हॉस्पिटलमधे.’, हॉटेल मधला वेटर मेनू जसा सांगतो, तसं हे सगळं मला सुद्धा रीपीट करून गण्या घराबाहेर पडला. मला बाकी कशाचच टेन्शन नव्हतं, फक्त इतक्या सकाळी उठण्याचं सोडून.फायनली तो शनीवार उजाडला.पहाटे पाचचा गजर लावून मी अंदाजे सहाला उठलो. बारा तासाचा उपास होऊन सुद्धा मला भूक लागली नव्हती. प्रातरविधी उरकायचे नव्हते, बट आय वॉज स्टिल कंफरटेबल. ब-याच वर्षांनी इतका सकाळी बाहेर पडलो होतो मी. मस्त वाटत होतं! साधारण पावणे-सात वाजता हॉस्पिटल मधे पोचलो. इतकी सकाळ असून सुद्धा हॉस्पिटल अगदी गजबजलं होतं. बहुतेक लोक पेशंटचे नातेवाईक, किंवा हॉस्पिटल कर्मचारी वाटत होते. मी थोडा बावरल्यासारखाच इकडे-तिकडे पहात होतो.‘ओ साहेब… इकडे इकडे!’, गण्याचा आवाज ज्या दिशेनी आला, तिकडे मी पाहीलं. जवळपास पंधरा-वीस लोकांनी त्याला गराडा घातलेला. सगळ्यांच्या हातात एक-एक कागदी कार्ड होतं, माझ्याही हातात गण्यानी एक कार्ड दिलं. त्यावर माझ्या टेस्ट्सची यादी होती.‘बरं नीट ऐकायचं सर्वांनी आता… ओ तात्या ते कागद काखे घालू नका, घामानं बरबटतंय ते… हां, तर आता आधी ब्लड टेश्ट, यूरीन टेश्ट, मंग बी.पी., आनि बाकीचं नंतर बघूत… ताई फेसबुकवर नंतर टाका माझा फोटो, आधी नीट ऐका… तर ब्लड नंतर नाष्ता… नाषत्या नंतर पुन्हा ब्लड…’, गण्या मला मुकादम वाटू लागलेला आणि आम्ही रोजंदारीवरचे कर्मचारी.‘अहो पण ते स्टूल टेस्टचं काय म्हणालेलात?’, एका काकांनी गर्दीतून मान वर करून विचारलं. त्यांच्या चेह-यावर थोडी, आणि शरीराच्या हालचाली मध्ये कमालीची तगमग दिसत होती मला. शेजारी एक माझ्याच वयाचा मुलाचं सतंत येर-झार्या घालणं चाललं होतं. त्याचं शारीरीक प्रेशर त्यांच्या चेहे-यावर स्पष्ट दिसू लागलेलं. मी अजून सुद्धा निवांत होतो; सकाळचा पहिला चहा झाला नव्हता ना!पण तेवढ्यात गण्याने खुलासा केला ‘… ओ काका जरा निवांत घ्या. सगळं करतो मी बरोबर.’, आता ह्या केस मधे हा काय बरोबर करणार होता ते त्यालाच ठाऊक. ह्या प्रेशरला लपवण्याचा प्रत्येकजण कसोशीन, पण सोसत-सोसत प्रयत्न करत होता. एक-दोघं जण सतंत येरझार्या मारत होते. येणा-या जाणा-या नर्सेसचं त्यामुळे सतंत ‘ओ काका बसून घ्या, ओ मावशी बसा-बसा!’ असं चाललं होतं. बाकीचांच्या पद्धती निरनिराळ्या असतील, पण हेतू एकच. एक माणसाचं तर सतंत भुवया वर उडवून ‘हुशSSS! हुशSSS!’ असे लांब सुसकारे टाकणं चाललेलं. मला अश्या टाईपचा सीन चालू असताना हसू कंट्रोल होत नाही. आपलं नाणं खरं असताना कसलंच टेन्शन नाही ना यार!


पंधरा-वीस मिनीट झाले तरी काही कोणीच आमची विचारपूस करेना. तितक्यात एक नर्स त्याच काकां समोर येऊन थांबली,


‘काका स्टूल…’, काका म्हणजे त्या नर्सला कुठे ठेऊ आणि कुठे नको असा आविर्भाव ठेऊन उठले.


‘हो हो… चला चला’


नर्स मात्र एकदम ब्लँक, ‘ओ काका कुठे चालले? तुमच्या खालचा स्टूल घ्यायले आले मी. तुम्ही बसा तिकडे’. काका बिचारे केविलवाणं एक्सप्रेशन घेऊन शेजारच्या बाकावर जाऊन बसले.सुमारे अर्धा तास उलटून गेला तरी हॉस्पिटल कडून काहीच हालचाल होईना. काहीजण आता निपचित पडतात की काय असं वाटू लागलेलं आणि तितक्यात एक लेडी-डॉक्टर धावत येऊन गण्याचा शोध घेऊ लागल्या. तो नाही सापडला आमच्यात म्हणून मग त्याला फोन लावला.‘गण्या, कुठे आहेस तू? ताबडतोब इथे ये आधी…’, डॉक्टर भडकल्या होत्या, पण मग फोनवरच गण्याला झाडू लागल्या.‘अरे मूर्खा ह्यांना स्टूल टेस्ट आहे असं कोणी सांगितलं? तुला कोण सांगितला हा आगाऊपणा करायला! …… अरे तुझ्या काकांची करावी लागली, कारण त्यांना जंताचा विकार होता…… गण्या म्हणून काय सगळ्यांनाच करायला लावशील का!’, आता मात्र मला आणि अजून एकाला हसू कंट्रोल होईना. म्हणजे स्टूल टेस्ट मुळात नव्हतीच! गण्याला सगळे शिव्या घालत होते, पण मी जाम खुश झालो. तश्या ह्या टेस्ट्स एक बोरींग काम असतं. पण सुरुवातच इतकी दंगा! माझ्या आणि त्या दुस-या मुलाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं, इतके आम्ही हसत होतो. इन-फॅक्ट अनोळखी असून देखील टाळ्या दिल्या आम्ही एक-मेकांना. बाकीच्या त्रस्त लोकांना हा पांचटपणा नसेल आवडला बहुतेक, कारण आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न बरेच जण करताना दिसले. डॉक्टरनी खुलासा केल्या बरोबर जी धावपळ सुरू झाली की बस. इतकं पॅनिक झालेलं पब्लिक की आमच्या मागेच असलेलं शौचालय कोणालाच नाही दिसलं. त्यात एकाच हॉस्पिटल मधे इतकी सोय कशी असणार. त्यामुळे बाकी काहीजणं हॉस्पिटलच्या समोर असलेल्या ‘सशुल्क सुलभ शौचालया’ मध्ये शांत होऊन आले.एक-एक करून मग बाकी पब्लिक सुद्धा परत आलं आणि फायनली आमच्या टेस्ट्स सुरू झाल्या. आता पहिली होती ती ब्लड टेस्ट…(क्रमश:)

आयुष्यात उंच भरारी घ्यायची आहे ? तर मग हे वाचा…..

एकदा एका राजाला अरेबिया मधून दोन अप्रतिम बहिरी ससाणे भेटी दाखल मिळाले.राजाने आजवर बघितलेल्या स्थलांतरित,प्रवासी  बहिरी ससाण्यांच्या मधील “केवळ अप्रतीम ” अशी ती जोडी होती.राजाने  त्या  जोडीला त्यांच्या पुढील प्रशिक्षणासाठी  त्वरित त्याच्या दरबारातील बहिरी ससाण्याच्या प्रशिक्षकाच्या ताब्यात दिले.
काही महिन्यां नंतर एके दिवशी,त्या प्रमुख प्रशिक्षकाने राजाला येऊन सांगितले कि त्या जोडीतील एक ससाणा आकाशात उंचच उंच अशी जादुई  भरारी अगदी लीलया घेतो पण… जोडीतील दुसरा ससाणा मात्र आकाशात उडणे तर दूर  त्याला येथे आणल्या दिवसा पासून त्याच्या फांदी वरून हललेला सुद्धा नाही.
झाले..राजाने त्वरित फर्मान काढून,त्याच्या सूत्रांकडून त्या अतिशय उमद्या पण ढिम्म अशा बहिरी ससाण्याची काळजी घेण्यासाठी राज्यातून कोणी मिळतंय का हे पाहायला त्याचे दूत पिटाळले.पण कसचं  काय नि कसचं  काय  सगळ्यांचे सगळे प्रयत्न थकले, तो बहिरी ससाणा त्याची जागा सोडेल तर शपथ.शेवटी राजाने हि कामगिरी त्याच्या दरबारातील लोकांवर सोपवून दिली.दुसऱ्या दिवशी सहजचपणे राजाचे लक्ष  त्याच्या खिडकीतून बाहेर गेले असता,तो बहिरी ससाणा त्याच्या फांदी वरून तसूभर सुद्धा हलला नसल्याचे त्याने पुन्हा बघितले.त्या  ससाण्याने त्याच्या जोडीदारा सोबत आकाशात विहार करावा ह्या साठी केलेले सगळे प्रयत्न आता संपले.आपल्या राज्यात एवढी साधी कामगिरी पार पाडायला आपल्याला एकही माणूस मिळत  नाही, ह्या विचाराने अस्वस्थ होत हळूहळू राजाच्या रागाचा पारा चढला,नि तो जवळ जवळ ओरडलाच कि कोण आहे रे तिकडे ? जा… नि त्वरित एखाद्या शेतकऱ्याला घेऊन या …”
राजाने असा विचार केला कि निसर्गाच्या सान्निध्यात असलेला एखादा शेतकरी कदाचित ह्या वर काही उपाय काढू शकेल म्हंणून….
अन दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर राजा बघतो तर काय ? तो ढिम्म बहिरी ससाणा,आज,राजवाड्याच्या बागेवर आकाशात उंचच उंच मस्त पैकी भरारी घेत होता.आश्चर्यचकित होत राजाने त्वरित “केवळ एका दिवसात हि जादू करणाऱ्यात्या व्यक्तीला” लगेच माझ्या समोर घेऊन या ” असे फर्मान सोडले.

राजाच्या सेवकांनी त्या शेतकऱ्याला शोधून काढून त्वरित राजा समोर उभे केले.कुतुहूलमिश्रित नजरेने पहात,राजाने त्यास विचारले कि,” तो बहिरी  ससाणा आकाशात उडण्यासाठी तू नक्की काय केलेस ? 

शेतकऱ्याने मान खाली घालत राजाला सांगितले कि ,” काही केले नाही महाराज ,फार सोप्पं होत ते !फक्त तो बहिरी ससाणा ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी कापून टाकली.”


मित्रांनो,
खरे तर,आपण सगळेजण सुद्धा,आपआपल्या आयुष्यात अशी उंच भरारी घ्यायची  क्षमता बाळगून असतो,प्रत्येका मधेच काही ना काही गुण हे ठासून भरलेले असतात.कमतरता संधीची नसते पण आपण “फांदी” सोडायचे नाव घेत नाही.कारण ती आपल्या सोयीची असते.अन त्या मुळेच आपल्यातल्या कित्येकांचे कित्येक गुण हे  जगा समोर येणे तर दूर,खुद्द त्यांना स्वतःला सुद्धा ते कधीच कळत नाहीत,आणि त्या मुळेच आपले आयुष्य किंवा त्यातील बराचसा भाग हा चैतन्याने,उत्साहाने भरलेला रहायच्या ऐवजी,एकसुरी नि कंटाळवाणा होतो.

तेव्हा.. आता फार विचार करत बसू नका..उठा नि “ती” फांदी तोडायला घ्या,आणि “त्या ” आकाशाला गवसणी घालण्या साठी सज्ज व्हा.

सौजन्य :From the Book “Why walk when you can fly” by Isha Judd


वरील कथेचा स्वैरानुवाद व त्यातील छायाचित्रे ही आमच्या “जस्टनिफ्टी “ब्लॉगचे सर्वेसर्वा श्री.इलँगो  ह्यांचे  सौजन्याने.धन्यवाद इलँगो  सर.            

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला

थायरॉंइड म्हणजे काय ? 
थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल अचूक माहिती आहे. डाईबीटीस, कॅन्सर या सारख्या रोगान बद्दल जेवढी जनजागृती झाली आहे त्या तुलनेने ह्या रोगा ची फार कमी माहिती लोकांना आहे. त्या मुळे ह्या रोगाचे प्रमाण भारतात वाढले आहे.
थायरॉंइड म्हणजे नक्की आहे तरी काय ?
आपल्या शरीरात भरपूर एंडोक्राइन ग्लैंड्स (अंत: स्रावी ग्रंथि) असतात. ज्यानच काम असत हार्मोन्स तयार करण. त्या मध्ये थायरॉंइड हा एक आहे तो आपल्या मानेच्या मध्य भागी आढळतो. थायरॉंइड या मध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स येतात T3 आणि T4 ,जे आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म नियंत्रित करतो. निरोगी माणसामध्ये ह्या हार्मोन्से प्रमाण नियंत्रित असते तर या उलट रोगी माणसामध्ये ह्याचे प्रमाण कमी किंवा जास्त होते यालाच थायरॉंइड डीसऑर्डर असे म्हणतात. थायरॉंइड हार्मोन्स ह्याचा परिणाम शरीरावर सर्वत्र म्हणजेच आपल्या हृदयावर, मेंदूवर आणि पचन क्रियेवर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला थायरॉंइडची व्याधी होते तेव्हा आपल्या शरीरात असणाऱ्या हार्मोन्स नियंत्रित केल्या जाणाऱ्या पीयूषिका आणि थायरॉइड ग्रंथिन मध्ये अडथळे निर्माण होतात. 
थायरॉंइड डीसऑर्डर म्हणजे काय ? 
थायरॉंइड ग्रंथिन मधून निघणाऱ्या T3 आणि T4 हार्मोन्स चे प्रमाण कमी आणि जास्त होणे म्हणजेच थायरॉंइड डीसऑर्डर  होय. 
थायरॉंइड डीसऑर्डर चे प्रकार किती आहेत ? 
जागरूक थायरॉइड (हायपरथायरॉइडिझम) : 
रक्तात T3 आणि T4 प्रमाण अधिक असल्यास जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम) होतो. 
सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) : 
रक्तात T3 आणि T4 प्रमाण कमी असल्यास सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) होतो. 
थायरॉंइड ची लक्षण कोणती आहेत ? 
शरीराचे कमी तापमान 
जलद किंवा संथगतीने चालणारी नाडी 
असामान्यपणे कमी किंवा उच्च रक्तदाब 
असामान्यपणे मोठी किंवा लहान मान किंवा मानेतील गाठ 
घोगरा, कर्णकटू आणि कठोर आवाज 
खूप तहान किंवा भूक        
आहार किंवा व्यायाम यामध्ये बदल केला नाही तरी लक्षात येण्याजोगा वजनातील बदल (वाढणे किंवा कमी  होणे) 
इतरांना थंडी वाजत असते तेव्हा गरम होणे किंवा इतरांना गरम होत असते तेव्हा थंडी वाजणे 
हृदयाचे ठोके 
विचित्र पद्धत किंवा लय 
बद्धकोष्ठता किंवा अतिसार
थकवा 
अशक्तपणा 

हायपोथायरॉइडिझमची काही लक्षणं :

आळस, थकवा, अंगदुखी, मंुग्या-पेटके येणं, सूज, केस गळणं, त्वचा जाड आणि कोरडी होण, औदासिन्य, बद्धकोष्ठ, आवाज घोगरा होण, नपंुसकत्व, मासिक सावात बदल, वंध्यत्व, गलगंड, चेहरा सुजणे, सांधेदुखी, मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे), प्रचंड झोप येणे, घट्ट शौच. 
हायपरथायरॉइडझमची काही लक्षणं : 
थकवा, भावनाशीलता, अस्वस्थपणा, थरथरणं, अशक्तपणा, छातीत धडधड, निदानाश, धाप लागणं, त्वचा गरम आणि ओलसर होण, वजन कमी होण, भुकेत बदल, मासिक स्त्रावात बदल, वारंवार गर्भपात, गलगंड, डोळे मोठे होणे, लाल होण, डोळ्यातून पाणी येण, थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढणे, खाज सुटणे,पुरुषांमध्ये स्तनांची वाढ,शौचास जास्त वेळा जावे लागणे. 
प्रत्येक वेळी सर्व लक्षणं असतीलच असं नाही. कोणतंही बाह्य लक्षण नसताना थायरॉइडचा विकार असू शकतो. नवजात अर्भकात आणि म्हातारपणी लक्षणांचा अनेकदा अभाव असतो. सर्व नवजात अर्भकात थारॉइडची चाचणी करणं अत्यावश्यक आहे. 
थायरॉंइड कॅन्सर म्हणजे काय ? 
थायरॉंइड कॅन्सरची सुरवात थायरॉंइड ग्रंथिन पासून होते. ह्या ग्रंथी तुमच्या मानेच्या खालच्या भागात असतात. थायरॉंइड कॅन्सर हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींन मध्ये आढळू शकतो. 
थायरॉंइडची सौम्य गाठ (Benign nodules) हि कॅन्सर मध्ये मोडत नाही. कारण सौम्य गाठी (Benign nodules) मधील सेल हे पूर्ण शरीरामध्ये पसरत नाहीत आणि ह्या गाठी पासून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा प्राणघातक धोका आढळत नाही. अनेकदा ९०% थायरॉंइडच्या गाठी ह्या सौम्य गाठ (Benign nodules) या प्रकारात मोडतात. 
थायरॉंइडची घातक गाठ (Malignant nodules) हि कॅन्सर मध्ये मोडते. हि बहुधा प्राणघातक हि ठरू शकते. ह्या कॅन्सर गाठीचे सेल आपल्या शरीरातील पेशींवर आणि विविध अंगावर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात. 
थायरॉंइड कॅन्सर चे किती प्रकार पडतात ? 
पॅपिलरी आणि फोलीकुय्लर थायरॉंइड कॅन्सर(Papillary and follicular thyroid cancers) : 
बहुधा थायरॉंइड मध्ये ९० ते ८०% कॅन्सर हा या प्रकारात मोडतो. या दोन्ही प्रकारातील कॅन्सर चे सेल हे सौम्य(Benign) असतात. अनेकदा पॅपिलरी आणि फोलीकुय्लर(Papillary and follicular thyroid cancers) याची वाढ हि हळू हळू होत असते. जर ह्याचे निदान लवकरात लवकर समजून आले तर ह्या वर योग्यतो उपचार करून तो नियंत्रणात आणला जाऊ शकतो. 
मेड्यूलरी थायरॉंइड कॅन्सर(Medullary thyroid cancer) : 
५ ते १० % कॅन्सर हा या प्रकारात मोडतो. ह्या कॅन्सर मध्ये शरीरातील ‘सी’ सेल चे प्रमाण वाढले जाते. जर हा शरीरामध्ये सर्वत्र पसरण्याच्या अगोदर त्याचे योग्य ते निदान करून, त्यावर योग्यतो औषध उपचार केला असता, हा कॅन्सर सहज रित्या नियंत्रणात आणला जाऊ शकतो. 

अनाप्लास्टिक थायरॉंइड कॅन्सर (Anaplastic thyroid cancer) :

थायरॉंइड कॅन्सर मध्ये हा प्रकार भरपूर कमी आढळतो (फक्त १ ते २%). ह्या प्रकारात आपल्या शरीरातील फोलीकुय्लर सेल वाढले जातात. ह्या प्रकारातील कॅन्सर चे सेल हे असामान्य असतात आणि त्यांचे निदान करणे खूप कठीण जाते. ह्या प्रकाराचा कॅन्सर हा नियंत्रित करणे खूप कठीण जाते कारण ह्या कॅन्सरच्या सेल ची वाढ आणि प्रसरण शरीरात भरपूर जलद गतीने होते. 
थायरॉंइड वर उपचार कोणते आहेत ? 
थायरॉंइड वर उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. सामान्यपणे या प्रकारात हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. या आजारात कमी झालेल्या हार्मोन्सची कमतरता औषधांनी भरून निघू शकते. सुप्त थायरॉईड या प्रकारात गर्भवती महिलांना सामान्य महिलांप्रमाणे उपचार केले जातात. गरोदरपणात थायरॉइडचं प्रमाण वाढतं. जसजसे दिवस पूर्ण होत जातात तसतसा याचा डोस वाढवला जातो. गरोदर महिलांना योग्य ते उपचार वेळीच मिळावे, यासाठी गरोदर महिलांची प्रत्येक महिन्यात टी-4 आणि टीएसएच (Thyroid Stimulating Harmone) या दोन टेस्ट केल्या जातात. प्रसूतीनंतर सामन्यपणे औषधोपचार केले जातात. 
टीएसएच (Thyroid Stimulating Harmone) : 
थायरॉइड ग्रंथीमधून होणारा हार्मोन्सचा स्राव अधिक अथवा कमी प्रमाणात होतो आहे, हे समजण्यासाठी रक्ताद्वारा ही चाचणी केली जाते. जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम)मध्ये रक्तातील थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण अधिक असल्यास टीएसएचचं प्रमाण कमी असतं. तर सुप्त थायरॉईड (हायपोथायरॉइडिझम)मध्ये रक्तातील थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण कमी असतं आणि टीएसएच च  प्रमाण अधिक असतं. 
टेक्निशियन चाचणी(Radioactive iodine) : 
या प्रकारच्या टेस्टला थायरॉइड स्कॅन टेस्ट असंदेखील म्हटलं जातं. यात रेडिओ अ‍ॅक्टिव्ह आयोडिनची थोडीशी मात्रा रक्तात मिसळली जाते. त्यानंतर थायरॉइडचा एक्स-रे काढला जातो. ग्रंथीमधील आयोडिनचा स्तर वाढला असल्यास हायपरथायरॉइडिझम तर कमी असल्यास हायपोथायरॉइडिझम ओळखला जातो. महिला गर्भवती असल्यास ही टेस्ट केली जात नाही. 
एफएनएबी चाचणी (Fine Needle Aspiration Biopsy Of The Thyroid (FNAB) Procedure)
 गळ्यात गाठी आढळल्यास एफएनएबी ही चाचणी केली जाते. गाठीत सुई घालून त्यातील पेशी काढून घेतल्या जातात. या पेशींची मायक्रोस्कोपमध्ये तपासणी केल्यास थायरॉइडचं निदान केलं जातं. 

अँटिबॉडिज टेस्ट(Thyroid Antibodies) :
या टेस्टद्वारे थायरॉइडचं मूळ कारण शोधलं जातं. 
कोणामध्ये जास्त आढळतो ? 
थायरॉंइड हा जास्तकरून पुरुषांपेक्षा महिलांन मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. याचे प्रमाण पाच ते सहा पट जास्त पुरुषांपेक्षा महिलांन मध्ये अधिक असते. महिलांमध्ये असणा-या इस्ट्रोजन हार्मोन्समुळे हा विकार होतो. गर्भवती महिलांमध्ये आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉइडची शक्यता वाढते. थायरॉइडची लक्षणं इतकी सामान्य असतात की ती लवकर कळून येत नाहीत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून याचा प्रतिबंध कसा करता येईल, याचा विचार करणं आवश्यक आहे. 
काय खावे ? 
मुख्यता थायरॉंइड रुग्ण व्यक्तीने हलका आहार घ्यावा. आणि आपल्या जेवणात हिरव्या पाले-भाज्यांचे प्रमाण वाढवावे. डाळ आणि पोळी चा सामावेश आहारात केव्हा ही चांगला. आणि कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचा जेवणात सामावेश करावा. 
काय न खावे ? 
वांगी, भात, दही, राजमा, ई. खाने टाळावे. थायरॉंइड व्यक्ती ने जास्त गरम किंवा जास्त थंड जेवण खाऊ नये. तेलात तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ खाऊ नये. 
सूचना: 
वरील माहिती वेगवेगळे ब्लॉग, वर्तमानपत्र, पुस्तकातून आणि वेगवेगळया साईड वरून एकत्र करून वाचकांनसाठी संक्षिप्त रुपात मुद्देसुधपने लिहिली आहे. केवळ हि माहिती आपण एक सल्ला म्हणून घ्यावी आणि कृपया डॉक्टरांनच्या किंवा तज्ञांनच्या मदतीने थायरॉंइड वर योग्य तो उपचार करावा. 
वरील लेखा मध्ये काही लिहायचे राहिले असेल किंवा काही चूका असतील तर कृपया आपल्या कमेंट मधून सुचवाव्यात. 

तेव्हाची दिवाळी…

            आत्ता सहामाही परीक्षा चालू असल्या असत्या, शेवटी शेवटी म्हणजे इतिहास किंवा भूगोलाचा पेपर. आणि मग शाळेला दिवाळीची सुट्टी… शेवटच्या दिवशी चित्रकलेचा पेपर असायचा, विषय आवडता; पण ३ तासात २ सुंदर चित्र काढायला मला तर कधीच जमलं नाही बाबा! आणि मग तो कागद वाळवून एकदाचा देऊन टाकला की न चुकता सगळ्या आवडत्या शिक्षकांकडे जायचं आणि त्यांचे पत्ते उतरवून घ्यायचे, दर वर्षी घ्यायचो, पण कुठे जायचे देव

स्वप्न माझे..

हे उमलत्या पाकळ्यांचे स्वप्न माझे 
चिंब भिजल्या आठवांचे स्वप्न माझे..
चांदण्यांचा खेळ चाले शांत राती,
हासले पाहून त्यांना स्वप्न माझे..
आज येथे साद दे हळुवार कोणी
पाहते तो थांबलेले, स्वप्न माझे..
वाट माझी वेगळी ही शोधिली मी,
भेटले वाटेवरी अन स्वप्न माझे..
एकटी मी चालले वाटेवरी या,
आज माझ्या सोबतीला स्वप्न माझे..
-स्पृहा.  

मुली ह्या विषयावर एका मुलाने लिहिलेला निबंध

बरेच दिवस झाले काही हि लिहिण्यासाठी विषय मिळत नव्हता. मेंदूला पार गंज पकडलेला. नेहेमी प्रमाणे रात्री झोपताना मित्र-मैत्रिणींना जरा त्रास देऊन झोपावे म्हणून जरा मोबईल मध्ये मेसेज शोधत होतो. तेव्हाच एका मैत्रिणींचा हा मेसेज वाचला आणि हा मेसेज ब्लॉग वर टाकायचा म्हणून लिहायला बसलो.

मुली ह्या विषयावर एका मुलाने लिहिलेला निबंध 

समजून सारे ना समज बनतात ह्या मुली ? 
चांगल्या मुलांना वेढ्यात काढतात ह्याच मुली ? 
अनोळखी मुलांना आपल मानतात ह्या मुली ? 
पण आपल्या च ओळखीच्यांना ओळख दाखवत नाहीत ह्याच मुली ? 
बोलायला गेलो तर लाईन मारतोय, म्हणतात ह्या मुली ? 
मग नाही च बोललो तर अँटीट्युड दाखवतोय, 
असे म्हणतात ह्याच मुली ? 
मुद्याचे बोलणे थोडे असते, तरी चिव चिव खूप करतात या मुली ? 
जेव्हा खरच बोलण्याची गरज असते, तेव्हा नजर खाली करून, 
रुमाल का खराब करतात ह्या मुली ? 

पावसात भिजायचे असते,
तरी चिखल पाहून नाक मुरडतात ह्याच मुली ?

थंडी गुलाबाची चांगली म्हणतात, 
मंग दोन चार स्वेटर घालून कुड-कुडत,
 का असतात ह्या मुली ? 
वाचून हि कविता चांगल्याच भडकतील ह्या  मुली ? 
मंग कदाचीत विचार करून मनात, थोडे तरी बरोबर आहे. 
असे म्हणतील ह्याच मुली ? 
फायनली खरच किती कॉम्पलीकेटेड असतात ह्या मुली ? 
तरी पण मुलांना का आवडतात ह्याच मुली ?